Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - ऑगस्ट २०२१ (भाग २)

च
चंद्रसूर्यकुमार
Fri, 08/13/2021 - 11:12
🗣 196 प्रतिसाद
आधीच्या भागात १५० प्रतिसाद झाल्यामुळे पुढचा भाग काढत आहे. अफगाणिस्तानातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. देशातील चार महत्वाच्या शहरांपैकी कंदाहार आणि हेरात तालिबान्यांच्या ताब्यात गेली आहेत. मझार-ए-शरीफही जवळपास गेल्यातच जमा आहे असे दिसते. पुढील तीन महिन्यांमध्ये काबूलही पडेल अशी भिती पाश्चिमात्य माध्यमांनी वर्तवली आहे. अशा परिस्थितीत काबूलमधील आपल्या दूतावासावर हल्ले करू नयेत अशी विनंती अमेरिकेकडून तालिबानला केली गेली आहे. http://www.uniindia.com/washington-calls-on-taliban-to-spare-us-embassy-as-fight-for-kabul-nears/world/news/2475419.html एका दहशतवादी संघटनेला असा बाबापुता करून केलेली विनंती अमेरिकेसारख्या महासत्तेला शोभते का? असो. मला वाटते की पूर्ण जगात शापित देश असा कोणता देश असेल तर तो अफगाणिस्तान आहे. एकेकाळी बौध्द संस्कृती त्या भूमीत बहरली होती. पण तिथेच जवळपास गेल्या हजारेक वर्षांपासून काही वर्षे वगळली तर सतत अस्थिरता, सतत हिंसाचार यांचेच साम्राज्य राहिले. गझनीचा महंमद, महंमद घोरी पासून अहमदशाह अब्दालीसारखे क्रूरकर्मे तिथे सत्तेत होते. अलीकडच्या काळात रशिया आणि अमेरिका या दोन महासत्तांच्या साठमारीत अफगाणिस्तान या सुंदर देशाची मात्र पूर्ण वाताहत झाली. हे सगळे बघून खरोखरच वाईट वाटते. अफगाणिस्तानात पूर्ण लोकसंख्येत लहान मुलांची संख्या लक्षणीय आहे. तालिबान राज्यात शाळांमध्ये आधुनिक शिक्षण मिळायची तर शक्यताच नाही. मग या मुलांच्या मनात तेच दहशतवादाचे प्रशिक्षण भरवले जाऊन भविष्यात परिस्थिती अधिकाधिक चिघळत जाणार का ही भिती वाटते. आणि अफगाण स्त्रियांविषयी काही बोलायलाच नको. घराबाहेर पडायचे नाही, पडायचेच असले तर नवरा, भाऊ, बाप किंवा मुलगा यांच्याबरोबरच पडायचे, शिक्षण मिळायचा संबंधच नाही, घरकाम करत बसायचे आणि मुले काढत आणि सांभाळत बसायची, जरा चेहर्‍यावरचा बुरखा बाजूला झाला तर भर चौकात चाबकाचे फटके पडणार का या भितीच्या सावटाखाली वावरायचे.. खरोखरच भयानक. आणि या परिस्थितीतून मार्ग निघायची शक्यता अजिबात नाही. असले प्रकार बघितले की भारतातल्या अनेक गोष्टी आपल्याला आवडत नसल्या तरी आपण किती सुदैवी आहोत हे जाणवते.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 51878 views

🗣 चर्चा (196)
R
Rajesh188 Mon, 08/16/2021 - 09:04 नवीन
निर्मिती खर्च जास्त असल्या मुळे अव्यवहारी. मोदी नी फक्त घोषणा केली आहे . कार्य पूर्णत्वास गेल्यावर च त्या वर विश्वास ठेवला जाईल. घोषणा करणे आणि सोडून देणे ,विकास फक्त कागदावर च प्रत्यक्षात काम झीरो. अशीच मोदी सरकार ची प्रतिमा आहे. Cng पाइप द्वारे वितरण करणार आहेत. त्याच्या अगोदर पासून lpg पाइप द्वारे घरोघरी काँग्रेस सरकार नी पोचवलं आहे. त्याची आकडेवारी आणि मोदी काळातील cng ची आकडेवारी ध्या . म्हणजे चित्र स्पष्ट होईल.. लोक आता हुशार झालेत अनुभवातून सहज विश्वास ठेवणार नाहीत ह्या सरकार वर
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Mon, 08/16/2021 - 09:14 नवीन
हे स्पष्ट कराल का? महानगर गॅस लिमिटेडची स्थापना १९९५ ला झाली तर महाराष्ट्र गॅस लिमिटेड २००६ ला स्थापन झाली आहे. पुण्यात मला पाइप्ड गॅस जोड फेब्रुवारी २०१६ ला मिळाला. मोदींनी असे काय वैशिष्ठ्यपूर्ण गोष्ट केली कि मे २०१४ पासून मुंबई ते पुणे गॅस पाईप लाईन पूर्ण होऊन ग्राहकांना कनेक्शन मिळाले? भारत फार अगोदर पासून जागतिक पर्यावरण संस्थेचा सदस्य आहे आणि जैविक इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठीचे प्रयत्न हे पूर्वीच्या सरकारांनीदेखील केले आहेत. मी नमूद केलेली संस्था फार ध्येयनिष्ठेने काम करते असे नाही. अमेरिकेची तिथे मुजोरी चालते. विकसनशील देशांमधील गरीबी हा सर्व मानवतेला असलेला मोठा धोका आहे अशा प्रकारचा कांगावा जवळपास ८०% इंधन जेमतेम जागतिक लोकसंख्येच्या १०% लोकांमध्ये वापरणारी देश असा कांगावा करीत असतात. भारताचे प्रतिनिधी कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी असणारा दबाव झुगारून विकसनशील देशांची बाजू तेथे खंबीरपणे मांडतात आणि इंधनाचे विविध पर्यायांना विकसित करण्याचा प्रयत्न करतात. तेंव्हा काहीतरी माहिती डकवताना अभिनिवेश टाळता आला तर बरे.
  • Log in or register to post comments
न
निनाद Tue, 08/17/2021 - 03:14 नवीन
काहीतरी माहितीडकवताना अभिनिवेश टाळता आला तर बरे. - काहीतरी माहिती?? बरं!! अभिनिवेश टाळता आला तर बरे. जर घडामोड असेल तर त्याच्या परिणांचा विचार केला तरी अभिनिवेश असणारच. अभिनिवेश नसेल तर घडामोडी नमूद तरी कशाला करायच्या? असो. महानगर गॅस लिमिटेड नावातच असल्याप्रमाणे फक्त महानगरात आहे. मोदींनी असे काय वैशिष्ठ्यपूर्ण गोष्ट केली २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेवर आले तेव्हा केवळ वरील नावा प्रमाणे २५ लाख जोडण्यांद्वारे फक्त महानगरात गॅस वितरण होत होते. त्यानंतर त्यांनी सुमारे ४०० शहरात नैसर्गिक वायू वितरणाचे कार्य हाती घेतले आहे. यासाठी भारतभर वायू वितरण पाईपलाईन टाकणे सुरू आहे. सुमारे ७०% लोकसंख्येला वायू वितरणाच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न आहे. या शिवाय आधी फक्त देशात फक्त ६६ नैसर्गिक वायू स्टेशन्स होती ती संख्या शेकड्यांनी वाढते आहे. या वर्षी अधिक १२९ जिल्ह्यात नैसर्गिक वायू स्टेशन्स वितरण पंप सुरू केले आहेत. इकॉनॉमिक टाईम्सच्या बातमीचा संदर्भ येथे पहा याशिवाय नैसर्गिक वायू पाईपलाईन ३२००० किमी पर्यंत वाढवले जात आहे. वाहनात नैसर्गिक वायूचा वाटा १५% पर्यंत वाढवण्याचा आऊटलूक ने दिलेल्या बातमी प्रमाणे मोदींचा प्रयत्न आहे. वरील बातम्या पहता मोदी सरकार आल्या त्यांनी पासून भारतात मिळणार्‍या वायूच्या वितरणावर मोठा भर देऊन पायाभूत सुवीधांचे प्रचंड कार्य आरंभले आहे असे दिसून येते आहे. याचा जागतिक पर्यावरणावर मोठा परिणाम होणार आहे आणि इंधनाचे प्रदुषण कमी होणार आहे. २०१५ मध्ये पॅरिस कराच्या वचनबद्धतेचा भाग म्हणून कराराच्या२०३० पर्यंत कार्बन फुटप्रिंट त्याच्या २००५ च्या पातळीपेक्षा सुमारे ३०% कमी करण्याची योजना आखली आहे. इतक्या मोठ्या स्तरावचे कार्य आधीच्या सरकारने केल्याचे माझ्या पाहण्यात नाही. त्यामुळे त्यांची कार्य पद्धती आणि व्हिजन यासाठी त्यांचे कौतुक केलेच पाहिजे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 08/17/2021 - 07:06 नवीन
असं कसं, असं कसं? रोज सकाळी श्री मोदींच्या नावाने शंख केल्या शिवाय काही लोकांचे पोट साफच होत नाही.
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Tue, 08/17/2021 - 10:48 नवीन
नसली कि तिला भाटगिरी म्हणतात. तुमच्या प्रतिसादातील बेदरकारपणा बघता भाटगिरीला तुमची हरकत नसावी. असो. योजना परिणामकारक आहेत कि नाही हे त्यांच्या आरंभशूरतेवर नाही तर चिकाटीने राबवनिव्यावर आणि यशस्वी होण्याच्या शक्यतेवर अवलूंबन असते. उदाहरणादाखल उज्वला योजनेची आत्ता काय परिस्थिती आहे ते बघा. ग्रामीण भागात २२ रु. रोज आणि शहरी भागात ३७ रु. रोज अशी प्राप्ती असणाऱ्यांना दारिद्र्यरेषेखालील वर्ग समजले जाते. अशा वर्गात घरटी दोन माणसं जरी मिळवती आहेत असे समजले तरी अनुदानप्राप्त सिलिंडर देखील त्यांना खरेदी करता येणार नाही हे समजायला फार मोठी अक्कल असण्याची गरज नाही. आरंभशूरतेचं अजून एक उदाहरण म्हणजे स्वच्छ भारत योजना. अजून एक माथी बसलेला कर या व्यतिरिक्त या योजनेला काही अस्तित्व आहे का अशी शंका येते. तेंव्हा निव्वळ घोषणा केली म्हणजे फार मोठठं काम झाले असे असेल तर ठीकच आहे.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Tue, 08/17/2021 - 11:39 नवीन
उज्वला योजना फार चांगल्या रीतीने राबवलेली आहे. माझ्या स्वतः च्या गावात बऱ्याच गरीब लोकांना फुकट गॅस जोडणी आणि गॅस सिलिंडर मिळालेला आहे. आणि महत्वाचे म्हणजे लोकांना वापरायची सवई पण लागलेली आहे. पण ग्रामीण भागात दिवसाला 22 पेक्षा कमी कमावणारे घर शोधूनही सापडणार नाही, कारण शेतकमजुराची एका दिवसाची हजेरी 300 ते 400 आहे. स्वच्छ भारत योजनेचा सर्वात मोठा फायदा हा महिलांना झाला. बऱ्याच ठिकाणी महिला स्वछताग्रह उभी राहिलेली आहेत. रेल्वे स्टेशन्स पहिल्या पेक्षा स्वछ झालीत. पण मनावी अशी स्वछता झाली आस म्हणता येणार नाही. पण यात केवळ सरकार चा दोष नाही तर आपल्या सवयी पण कारणीभूत आहेत.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 08/18/2021 - 06:08 नवीन
जाऊ द्या हो. श्री मोदी यांनी स्वतः झाडू घेऊन स्वच्छता केली तरी चमच्यांचं आणि गुलामांचं समाधान होणारच नाही. कारण ७० वर्षातील घाण ७ वर्षात साफ होणारच नाही. बाकी चालू द्या
  • Log in or register to post comments
न
निनाद Tue, 08/17/2021 - 14:04 नवीन
तुमच्या प्रतिसादातील बेदरकारपणा बघता भाटगिरीला तुमची हरकत नसावी. असो. सहमत आहे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 08/16/2021 - 06:29 नवीन
तालिबान नी सहज अफगाणिस्तान च सत्ता काबीज केली.सरकारी फौजांकडून विरोध झालाच नाही. असे वाटत जसे काही ठरवून केल्यासारखे च झाले . पैसे,वेळ खर्च करून नाटो आणि अमेरिकेने अफगाण लष्कर ला प्रशिक्षण दिले ,अत्याधुनिक शस्त्र दिली त्याचा वापर झालाच नाही. आता प्रशिक्षित ,अत्याधुनिक हत्यार नी सज्ज अफगाण फौज तालिबान च्या बाजून नेच लढेल. दुसऱ्याच्या पैस्यानी सेना उभी करून घेण्याचे चातुर्य पूर्ण जगात फक्त अफगाणिस्तान कडेच आहे. अंतस्थ हेतू खूप वेगळा आहे.अमेरिका तिथे हरली नक्कीच नाही उलट त्यांनी त्यांचा हेतू साध्य केला असावा. पण अमेरिका नक्की काय राजकारण खेळत आहे ते समजण्यास मार्ग नाही. ज्या पाकिस्तान वर अफगाण सत्ताधारी तालिबान ला मदत करण्याचा आरोप करत होते . तिथेच हे आश्रयाला गेले. म्हणजे काहीतरी शिजतंय हे नक्की.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Mon, 08/16/2021 - 09:15 नवीन
काबूल: महिला, अल्पसंख्यकांना शरियतनुसार अधिकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य देणार; तालिबान प्रवक्ते मोहम्मद नईमचे वक्तव्य एक गोष्ट लक्षात आली आहे का? बघा तालिबान शरीया कायद्याप्रमाणे अभिव्यक्तीस्वातंत्र्य द्यायला तयार झाले आहेत पण मोदी मात्र भारतीय राज्यघटनेत नागरिकांना अभिव्यक्तीस्वातंत्र्य दिलेले असूनही पार्लामेंट हल्ल्यामधील 'शहिदाला' श्रध्दांजली वाहायच्या सभेत भारताचे तुकडे तुकडे व्हावेत अशा घोषणा देणार्‍यांविरोधात देशद्रोहाचे खटले दाखल करतात. म्हणजे कायद्याची, राज्यघटनेची, अभिव्यक्तीस्वातंत्र्याची जास्त पर्वा कोणाला आहे? तालिबान्यांना की मोदींना? दोघांमध्ये अधिक श्रेष्ठ कोण? तालिबानी की मोदी?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 08/16/2021 - 09:24 नवीन
भारताचे पंतप्रधान पद हे भारतीय नागरिकांसाठी आदरणीय आहे.मग त्या पदावर कोणी ही असेल तरी . तालिबानी अतिरेक्यांची तुलना भारताच्या पंतप्रधान शी करताना थोडा तरी विचार करणे अपेक्षित होते. जे काही मतभेद असतील पंतप्रधान ह्यांच्या कार्याविषयी .पण ते देशांतर्गत आहेत. पण तालिबान शी तुलना .खूप त्रासदायक
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Mon, 08/16/2021 - 09:28 नवीन
मग त्या पदावर कोणी ही असेल तरी . तालिबानी अतिरेक्यांची तुलना भारताच्या पंतप्रधान शी करताना थोडा तरी विचार करणे अपेक्षित होते. जे काही मतभेद असतील पंतप्रधान ह्यांच्या कार्याविषयी .पण ते देशांतर्गत आहेत. पण तालिबान शी तुलना .खूप त्रासदायक
खो खो खो. मग गंदी नालीका किडा, नीच, हिटलर वगैरे विशेषणे विचारवंतांनी मोदींना बहाल केली होती तेव्हा ही अक्कल कुठे पेंड खायला गेली होती?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 08/16/2021 - 09:34 नवीन
तालिबान शी तुलना करताना जशी तुमची अक्कल पेंड खायला गेली तशीच भारताच्या पंतप्रधान पदावरील व्यक्ती विषयी अभद्र भाषा बोलणाऱ्या लोकांची पण गेली असेल. मतभेद आहेत,आरोप आहेत पण ती बाब वेगळी आहे
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Mon, 08/16/2021 - 16:51 नवीन
चूक. पंतप्रधानपदी जर नेहरू, ईंदीरा गांधी असतील तर ते पद काही लोकांसाठी आदरणीय असत नाही. पण वाजपेयी , मोदी असतील तरच आदरणीय होईल. मग भलेही ईंदीरा गांधींनी बांगलादेशात सैन्य पाठवले असले तरी आणी ईतरानी हाफीज सईद ला सोडणे किंवा कारगील वेळी सैन्याला सिमापार करू दिली नसली तरी. राष्ट्रापेक्शा विशीष्ट पक्शाला निष्टा वाहीलेले लोक आहेत.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 08/16/2021 - 10:29 नवीन
आज खूप महिन्यातून रेल्वे चा पास काढण्याची वेळ असली.. फक्त गोंधळ राज्य सरकार च्या निर्देश नुसार फक्त दोन लसी चे डोस घेतलेल्या लोकांना प्रवास करण्यास मान्यता. Bmc कर्मचारी असलेल्या व्यक्ती कडून तसे कन्फर्म करून घेतल्या नंतर महिन्याचा पास. पण काहीच कन्फर्म न करता फक्त आयडी बघून सर्रास प्रवासी तिकीट दिले जात होती. राज्य आहेत म्हणून केंद्र आहे राज्यच नसतील तर केंद्र पण नसेल.. दोन्ही सरकार मध्ये समन्वय हवा. पण तो नाही. भारतातील राजवट म्हणजे मूर्ख लोकांची राजवट असेच मत झाले.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 08/16/2021 - 10:29 नवीन
आज खूप महिन्यातून रेल्वे चा पास काढण्याची वेळ असली.. फक्त गोंधळ राज्य सरकार च्या निर्देश नुसार फक्त दोन लसी चे डोस घेतलेल्या लोकांना प्रवास करण्यास मान्यता. Bmc कर्मचारी असलेल्या व्यक्ती कडून तसे कन्फर्म करून घेतल्या नंतर महिन्याचा पास. पण काहीच कन्फर्म न करता फक्त आयडी बघून सर्रास प्रवासी तिकीट दिले जात होती. राज्य आहेत म्हणून केंद्र आहे राज्यच नसतील तर केंद्र पण नसेल.. दोन्ही सरकार मध्ये समन्वय हवा. पण तो नाही. भारतातील राजवट म्हणजे मूर्ख लोकांची राजवट असेच मत झाले.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Mon, 08/16/2021 - 16:53 नवीन
पुढच्या निवडणुकीत तुम्ही उभे रहा ... बदला सारे हे .. बाकी या अनागोंदी विषयी तक्रार केलीच असेल ... काय झाले त्याचे ते पण सांगा .. कोर्टात एखादी जनहित याचिका पण दाखल करा ... या पैकी काहीही केले नसेल ... तर ... पलायन करा ... (नेहेमीप्रमाणे) . . .
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 08/16/2021 - 11:49 नवीन
खूप मोठे शुर विर आहेत अमेरिकेसारखं अती प्रचंड राक्षसी लष्करी शक्ती असलेला देश अत्यंत मागास , शस्त्र आस्त्र साठी दुसऱ्या वर अवलंबून असलेल्या अत्यंत निकृष्ट तालिबान सारख्या संघटना समोर. हरला हे पटणार च नाही. काही मिनिटात जग नाहीसे करण्याची शक्ती अमेरिका बाळगून आहे. त्या समोर तालिबान काय आहे. बदनाम करून सर्वनाश करण्याचा परवाना सर्व देशांनी दिला की बघा .काही तासात अफगाणिस्तान गुलाम असेल
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 08/16/2021 - 12:32 नवीन
पाकिस्तान कडून धोका,चीन कडून धोका,बांगलादेश कडून धोका,नेपाल कडून धोका,तालिबान कडून धोका . मग भारतीय सैन्य सुसज्ज करा,जगातील सर्वोत्तम शस्त्र अस्त्र त्यांना ध्या देशातील सर्वोच्च गुणवत्ता असणारी लोक सैन्यात भरती करा. AI वर आधारित पर्यायी लष्कर रोबोटिक तयार करा . की फक्त भीती दाखवणार आणि करणार काहीच नाही. हे राजकारण बंद करा .. एकी कडे मुस्लिम कसे हिंदू चे दुश्मन आहेत हे सांगायचे आणि दुसरीकडे सर्व सामान्य हिंदू लाचार कसा होईल अशी सरकारी धोरण rabvaychi ही धोरण बंद करा.. जनता आता झोपेतून जागी होत आहे
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Mon, 08/16/2021 - 13:22 नवीन
एक जेन्यूईन प्रश्न. तुम्हाला हे सगळं टाइप करण्याइतका वेळ कसा मिळतो?
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 08/16/2021 - 13:44 नवीन
विचार करायचा वेळ वाचवून =))
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Mon, 08/16/2021 - 16:54 नवीन
एक जेन्यूईन प्रश्न. तुम्हाला हे सगळं टाइप करण्याइतका वेळ कसा मिळतो>>>> हे चांगलंय. मुळावर घाव घातला कुणी की विषय डायवर्ट करायचा.
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Tue, 08/17/2021 - 04:59 नवीन
अजिबात नाही. विषय डायव्हर्ट करण्यासाठी तो आधी वाचावा लागतो. मी त्यांचे प्रतिसादच वाचत नाही. तेवढा वेळच नसतो. एकदा त्यांचे लिहिणे सुरू झाले की फक्त अंगठा खालून वर करत राहायचं असं निदान मी तरी करतो. डायव्हर्ट वगैरे करत बसण्यापेक्षा मला इतर बरीच कामे असतात.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 08/17/2021 - 05:09 नवीन
अजून एक जेन्युईन प्रश्न-- बाकी सगळे मराठीत लिहिलेले असताना राबवायची हा एकच शब्द rabvaychi असा लिहायचे काय कारण असू शकेल?
  • Log in or register to post comments
M
mayu4u Mon, 08/16/2021 - 14:52 नवीन
अफगाणिस्तानातून पलायन केलेल्या मुस्लिम शरणार्थींना जगातल्या अन्य मुस्लिम देशांपैकी कोणत्या देशाने रेस्क्यू केले म्हणे?
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Mon, 08/16/2021 - 16:31 नवीन
Save Gaza साठी गळे काढनारे अफगाण बाबत गप्प कसे ? तालिबान फायटर्सना(?) करायचंय लग्न, मागवली 15 वर्षांखालील तरुणींची यादी– News18 Lokmat - इकडून तिकडे भरतीचा ओघ लागणार काय ?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 08/16/2021 - 16:38 नवीन
अफगाणिस्तान काही भारताचा शेजारी नाही .आणि अती उच्च लष्करी takat असलेला देश पण नाही. लोकसंख्या अतिशय किरकोळ. भारताला तो विषय गंभीर पण घेण्याची काही गरज नाही चीन जसे तालिबान चे समर्थन केले तसे समर्थन न करता भारता नी तटस्थ राहिले तरी चालेल उगाच त्या मध्ये उडी घेण्याचे कारण नाही. आणि तालिबान,मुस्लिम,अतिरेकी ह्यांचा बागुलबुवा उभा करून हिंदू ना भीती दाखवून २०२४ ची निवडणूक जिंकू असे कोणी मनात पण आणू नये. लोक सजक आहेत.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Mon, 08/16/2021 - 16:55 नवीन
+१ पुलवामा ने २०१९ ला तारले. आता अफगान तारेल अशी स्वप्ने पडत असावीत.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Tue, 08/17/2021 - 12:40 नवीन
अच्छा म्हणजे कॉग्रेसच्या पराजयाचे कारण आधीच ठरवुन ठेवलेत. गुड .....कॉन्फीडन्स चांगलाच आहे. भाजप जिकला तर "अफगाणिस्तान" चे कारण दाखवुन जिंकला. बादवे....भाजपा काय फंडा वापरेल अफगाणिस्तान चे नाव वापरुन जिंकायला???? काय भिती, स्ट्रॅटेजी वगैरे (ही कारणं पण तयार असतीलच म्हणा) भाजपाच्या विजयाविषयीच्या शुभेच्छांबद्द्ल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 08/17/2021 - 13:16 नवीन
आय टी सेल चे ढकलपात्र येत आहेत की. पण आता २०१४ राहीला नसल्याने लोक पडताळणी करताहेत. त्यामुळे खोटं पण रेटून बोला हा फोर्म्युला आता यशस्वी होणार नाही.
  • Log in or register to post comments
M
mayu4u Mon, 08/16/2021 - 18:15 नवीन
"सजग" म्हणायचं आहे का? सजग लोकांनी ३०३ खासदार निवडून दिलेत, तरी (किंवा म्हणूनच) तुमची मूळव्याध ठसठसतेय, त्यावर जरा उपचार करायचं बघा.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 08/17/2021 - 00:51 नवीन
भारताला तो विषय गंभीर पण घेण्याची काही गरज नाही हो ना आणि इम्रान खान मियांनी म्हणल्याप्रमाणे भारताने पण अफगाणिस्तान गुलामगिरीतुन मुक्त असे काही तरी जाहीर करावे .. काय म्हणता ? मुस्लिम अतिरेक्यांची ही धर्मशाळा होईल आणि त्याचे परिणाम भारतावर होणार नाहीत असे असे तुमचे म्हणणे असेल तर धन्य आहे १८८ तुम्ही आपले पेट्रोल भा ववाढ / पत्रकारितेची गळचेपी हा विषय धरून मोदींना कसे पाडायचे त्याकडे लक्ष द्या ..
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 08/16/2021 - 17:44 नवीन
एकाच वेळी ३७६ म्हणजे एकदम दोन १८८ आलेत. अजून यायला हवे. म्हणजे तेवढंच जास्त मनोरंजन.
  • Log in or register to post comments
M
mayu4u Mon, 08/16/2021 - 18:12 नवीन
ठणकणारी मूळ्व्याध घेउन.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 08/16/2021 - 18:27 नवीन
खिक्
  • Log in or register to post comments
U
Ujjwal Mon, 08/16/2021 - 18:31 नवीन
अगदी अगदी ३९ टक्क्यांची उदबत्ती लावायला हजर
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Mon, 08/16/2021 - 19:11 नवीन
राज्सात १०५ आणूनही घरी बसल्याने जास्तच मुळव्याध ऊफाळला असावा.
  • Log in or register to post comments
स
सौन्दर्य Mon, 08/16/2021 - 20:05 नवीन
ह्या घडीला अफगाणिस्तान मध्ये जवळजवळ १८००० अफगाणी जे अमेरिका तसेच नाटो फौजांसाठी दुभाष्याचे काम करायचे, अमेरिकी/नाटो तळावर वेगवेगळी कॉन्ट्रॅक्टची कामे करायचे ते आता कात्रीत सापडले आहेत. अमेरिका त्यांना वेळेत अफगाणिस्तानमधून सुखरूप बाहेर काढू शकली नाही त्यामुळे ते आयतेच तालिबानच्या हाती लागणार व त्यांचे हाल आता कुत्राही खाणार नाही. ह्या सर्व मंडळींकडे एक गद्दार म्हणून पहिले जाईल व त्यांचे भवितव्य आणि भविष्य पूर्णपणे अंधारमय आहे.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Mon, 08/16/2021 - 22:57 नवीन
+१ आजच निनाद कुलकर्णी ह्यांची जर्मन आख्यान ही लेखमाला संपवली त्यात एका दूभाष्याचा तालीबानीनी मान चिरून हत्या केल्याचा ऊल्लेख होता. गळ्या एवजी मान का चिरली तर गळाचिरल्यावर माणूस लवकर मरतो. मान चिरल्यावर तडफड..... अमेरीका तालीबान ला संपवू शकली नाही हे खरे नाही वाटत. काहीतरी डील झाली असावी तालीबान नी अमेरीकेत. नाहीतर ईतकं सहज काबूल पडेल??
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 08/17/2021 - 07:26 नवीन
"... तेव्हा तुम्ही कुठे होतात ?" हा प्रश्न अनेक विचारवंताना विचारण्यात येतो. सध्याच्या काळात तर तो हमखास विचारला जातोच. कवी जावेद अख्तर ह्यानी अफगाणिस्तनातातील परिस्थितीवर भाष्य केले हे बरे झाले- "अमेरिका जर तालिबान नावाच्या या रानटी लोकांचा नायनाट करू शकत नसेल तर ते कोणत्या प्रकारची महाशक्ती आहेत? तसेच हे जग कोणत्या प्रकारचं आहे ज्यांनी अफगाण स्त्रियांना दया नसलेल्या धर्मांधांच्या भरवशावर सोडलंय. मानवाधिकारांचे रक्षणकर्ते असल्याचा दावा करणाऱ्या सर्व पाश्चात्य देशांना लाज वाटली पाहिजे.” असं जावेद अख्तर यांनी म्हटलंय https://www.loksatta.com/desh-videsh-news/javed-akhtar-and-taslima-nasreen-reaction-on-afghanistan-crises-hrc-2565954/
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Tue, 08/17/2021 - 07:41 नवीन
खुद्द एका भारतीय मुस्लिमाने हे म्हटले आहे , ते नक्कीच कौतुकास्पद आहे. आता तरी निदान तथाकथित भारतीय 'विचारवंत, पुरोगामी इत्यादी' काही धीट वक्तव्ये करतील का ते पाहूंयात. 'अशी आशा करतो' असे लिहीणार होतो, इतक्यात जाणवले, उगाच फोल आशा करू नये, आपल्यालाच त्रास होतो. भारतीय मीडिया मात्र काही 'आशादायी' बातम्या देण्यात मग्न आहे. उदा. इंडियन एक्स्प्रेसने, अफगाणिस्तानातील सीख व हिंदूंना, तालिबानने 'शांती व सुरक्षा' देत असल्याचे जाहीर केले आहे, अशी मोठ्या मथळ्याची बातमी दिली आहे. ती वाचून हसावे की रडावे, हे कळेना. हे आश्वासन म्हणे तालिबान्यांनी, सीखांच्या भेटीत दिले. (त्यांत हिंदू नक्की कुठून आले, हे मला समजले नाही. बातमीत फक्त तेथील एका मोठ्या गुरूद्वारांत हिंदूंनीही आश्रय घेतला आहे' इतके नमूद केले होते). पुढे पाहूंयात काय होते आहे ते.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 08/17/2021 - 09:54 नवीन
जावेद अख्तर ह्यानी अफगाणिस्तनातातील परिस्थितीवर भाष्य केले जग कोणत्या प्रकारचं आहे ज्यांनी अफगाण स्त्रियांना दया नसलेल्या धर्मांधांच्या भरवशावर सोडलंय. हे महाशय दोन्ही कडून बोलणार .. सोयीनुसार मुळात "अमेरिका अफगाणिस्तनात गेली का " अशी डमरू वाजवायचा आणि आता सोडून का गेलात म्हणून आरडाओरडा करायाचा असो त्यापेक्षा हि अफगाणिस्तानातील युवती काय म्हणते ते पहा https://www.youtube.com/watch?v=LxsiDCigOqQ
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Tue, 08/17/2021 - 12:44 नवीन
हे अख्तर महाशय कोणत्या अधिकाराने पाश्च्यात्त देशांना बोल लावतात. आतापर्यंत त्यांनीच तर वाचवल नां. त्या नवबालविवाहोत्स्युक धर्मांधानाच का नाही समजवुन सांगत.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Tue, 08/17/2021 - 12:51 नवीन
अश्या विदारक परिस्थितीमधे अफगाण जनतेच्या न्याय्य मागण्या "स्वयंघोषित नवीन सरकार तालिबान " समक्ष मांडण्यासाठी मी खालील व्यक्तींचे (अति) शिष्टमंडळ काबुलला पाठवावे असा विचार करतोय. तुम्हाला वाटत असेल तर अजुन काही लोकांना अ‍ॅडवु शकता. १. माजी उपराष्ट्रपती सुश्री. हमीद अंसारी, २. नसिरुद्दीन शहा ३. जावेद अख्तर ४. माजी पंतप्रधान सुश्री. मनमोहन सिंग
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 08/17/2021 - 13:38 नवीन
तहहयात भावी पंतप्रधान राहिले की
  • Log in or register to post comments
M
mayu4u Tue, 08/17/2021 - 16:17 नवीन
मुमि (मुळव्याधग्रस्त मिपाकर) लोकांना पण पाठवून द्या, बॅण्डविड्थ वाचेल.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 08/17/2021 - 16:58 नवीन
विरोधी मत म्हणजे केंद्र सरकार चा दुश्र्वास नाही. Bjp असेल किंवा कोणताही भारतीय राजकीय पक्ष परका थोडी आहे. पण जन हितविरोधी निर्णय होत असतील तर १००% भारतीय लोक त्या वर हक्कानी ,अधिकार नी टीका करू शकतात . मूळव्याध झालंय ,मोदी विरोधाची कावीळ आहे असेल नीच्य दर्जा ची मत व्यक्त करू नयेत. सरकार विरोध म्हणजे भारत विरोध नक्कीच नाही . राज्य सरकार वर फालतू comment करता तेव्हा तुम्ही मराठी असून महाराष्ट्र चा द्वेष करता तुम्हाला महाराष्ट्र हित झाले की मूळव्याध उठतो असे म्हणले तर चालेल का? सत्य असले तरी तुमच्या मत व्यक्त करण्याचा अधिकार आम्ही मान्य करतो. वरती एका सभासद नी मोदी ची तुलना तालिबानी वृत्ती शी केली . ते मात्र आक्षेप घेण्यासारखे कोणाला वाटले नाही. मला आक्षेप घेवा लागला
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 08/17/2021 - 17:09 नवीन
+१
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 08/17/2021 - 17:13 नवीन
वरती एका सभासद नी मोदी ची तुलना तालिबानी वृत्ती शी केली .
मीच तो सदस्य बरं का.
ते मात्र आक्षेप घेण्यासारखे कोणाला वाटले नाही. मला आक्षेप घेवा लागला
याचं कारण ते उपरोधिक लिहिले होते हे इतर सगळ्यांना कळले म्हणून इतर कोणीही आक्षेप घेतला नाही. नेमके तुम्हालाच ते कळले नसेल तर त्याला इतरांचा नाईलाज आहे. आणि त्या प्रतिसादातून मोदींवर टीका नाही की तालिबानींवरही टीका नाही तर त्या प्रतिसादाचा रोख भलतीकडेच आहे हे पण तुम्हाला कळले नसेलच. बाकी तुमचे प्रतिसाद अनेकदा निखळ मनोरंजन करत असतात त्यामुळे त्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 08/18/2021 - 06:12 नवीन
क्लिंटन हे त्या भुजबळांना सुद्धा सांगा त्यांना सुद्धा उपरोध कळत नाही
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 13 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 13 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 13 hours ago
  • सुंदर !!
    1 day 13 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 13 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा