चालू घडामोडी - ऑगस्ट २०२१ (भाग २)
आधीच्या भागात १५० प्रतिसाद झाल्यामुळे पुढचा भाग काढत आहे.
अफगाणिस्तानातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. देशातील चार महत्वाच्या शहरांपैकी कंदाहार आणि हेरात तालिबान्यांच्या ताब्यात गेली आहेत. मझार-ए-शरीफही जवळपास गेल्यातच जमा आहे असे दिसते. पुढील तीन महिन्यांमध्ये काबूलही पडेल अशी भिती पाश्चिमात्य माध्यमांनी वर्तवली आहे. अशा परिस्थितीत काबूलमधील आपल्या दूतावासावर हल्ले करू नयेत अशी विनंती अमेरिकेकडून तालिबानला केली गेली आहे. http://www.uniindia.com/washington-calls-on-taliban-to-spare-us-embassy-as-fight-for-kabul-nears/world/news/2475419.html एका दहशतवादी संघटनेला असा बाबापुता करून केलेली विनंती अमेरिकेसारख्या महासत्तेला शोभते का? असो.
मला वाटते की पूर्ण जगात शापित देश असा कोणता देश असेल तर तो अफगाणिस्तान आहे. एकेकाळी बौध्द संस्कृती त्या भूमीत बहरली होती. पण तिथेच जवळपास गेल्या हजारेक वर्षांपासून काही वर्षे वगळली तर सतत अस्थिरता, सतत हिंसाचार यांचेच साम्राज्य राहिले. गझनीचा महंमद, महंमद घोरी पासून अहमदशाह अब्दालीसारखे क्रूरकर्मे तिथे सत्तेत होते. अलीकडच्या काळात रशिया आणि अमेरिका या दोन महासत्तांच्या साठमारीत अफगाणिस्तान या सुंदर देशाची मात्र पूर्ण वाताहत झाली. हे सगळे बघून खरोखरच वाईट वाटते.
अफगाणिस्तानात पूर्ण लोकसंख्येत लहान मुलांची संख्या लक्षणीय आहे. तालिबान राज्यात शाळांमध्ये आधुनिक शिक्षण मिळायची तर शक्यताच नाही. मग या मुलांच्या मनात तेच दहशतवादाचे प्रशिक्षण भरवले जाऊन भविष्यात परिस्थिती अधिकाधिक चिघळत जाणार का ही भिती वाटते. आणि अफगाण स्त्रियांविषयी काही बोलायलाच नको. घराबाहेर पडायचे नाही, पडायचेच असले तर नवरा, भाऊ, बाप किंवा मुलगा यांच्याबरोबरच पडायचे, शिक्षण मिळायचा संबंधच नाही, घरकाम करत बसायचे आणि मुले काढत आणि सांभाळत बसायची, जरा चेहर्यावरचा बुरखा बाजूला झाला तर भर चौकात चाबकाचे फटके पडणार का या भितीच्या सावटाखाली वावरायचे.. खरोखरच भयानक. आणि या परिस्थितीतून मार्ग निघायची शक्यता अजिबात नाही.
असले प्रकार बघितले की भारतातल्या अनेक गोष्टी आपल्याला आवडत नसल्या तरी आपण किती सुदैवी आहोत हे जाणवते.
दुर्दवी असले तरी विभाजन झाले हे योग्यच झाले...होय परंतु ज्या भयप्रद पद्धतीने त्यात हिंदू मारले गेले ते अनावश्यक होते.विभाग % खप टक्केवारी वायू वितरण नळ जोडणी व्यवस्था असलेली राज्ये वायू वितरण नळ जोडणी व्यवस्था नसलेली राज्ये पश्चिम ५३% गुजरात, महाराष्ट्र गोवा उत्तर २६% दिल्ली, उ.प्रदेश, हरियाणा, राजस्थान पंजाब, जम्मु काश्मिर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड मध्य ३% मध्य प्रदेश छत्तीसगड दक्षिण १४% तमिळनाडू आन्ध्र प्रदेश केरळा, कर्नाटका पूर्व शून्य! एकही राज्य नाही! बिहार, प. बंगाल, झारखंड, उडिसा उत्तर पूर्व ४% आसाम, त्रिपुरा मेघालय, सिक्कीम अरुणाचल प्रदेश, मिझोरम, मणिपुर, नागप्रदेशसंदर्भः https://www.pngrb.gov.in/Hindi-Website/pdf/vision-NGPV-2030-06092013.pdf यात पुढे जाऊन सुधरणा होईल यात शंका नाही.