Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

हिंदू कधी एकत्र येणार?

म
मुक्त विहारि
Sun, 06/20/2021 - 14:19
🗣 209 प्रतिसाद
रेफरन्स: राजा शिवछत्रपती, लेखक, बाबासाहेब पुरंदरे (पान क्रमांक, 54,55,56) गाभा एक आणि गोष्टी अनेक, आदिलशहाचा दरबार संपला. सरदार आणि शिलेदार मंडळी बाहेर पडत होती. नेमके त्याच गडबडीत, खंडागळे यांचा हत्ती पिसाळला आणि हत्तीला आवर घालायला, छत्रपती शिवाजी महाराज यांचे मामा पुढे सरसावले, तर हत्तीचे रक्षण करायला छत्रपती शिवाजी महाराज यांचे चुलत काका पुढे सरसावले... पुढे झालेल्या धुमश्र्चक्रीत, जाधव आणि भोसले घराण्यातील कर्ती मंडळी बळी पडली... ह्याच्या पण आधी, सिकंदरला साथ देणारे हिंदूच होते.मागच्या आठवड्यात देखील, शिवसेना भवन येथे हीच घटना घडली ... गेल्या अडीच हजार वर्षांपुर्वी जे होत होते, तेच आजही होत आहे... हिंदू कधी एकत्र येणार?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 69267 views

🗣 चर्चा (209)
क
कॉमी गुरुवार, 07/01/2021 - 04:59 नवीन
जरूर.
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 07/01/2021 - 05:03 नवीन
तुमचं याकडे दुर्लक्ष झाले दिसतेय But this ignores the fact that growth in Muslim population is actually falling faster than the Hindu population growth rate.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे गुरुवार, 07/01/2021 - 10:09 नवीन
दुर्लक्ष नाही झालं, परंतु ह्यात काय चुकीचं आहे असं वाटतं नाही. मुळात मुस्लिम लोकसंख्या वाढ ही हिंदू लोकसंख्या वाढी पेक्षा भरपूर जास्त होती आणि अजूनही आहे. जो काही लोकसंख्या वाढीचा दर कमी झाला आहे तो फक्त 2001 ते 2011पुरताच आहे. 1991 ते 2001 व 1981 ते 1991 मध्ये तो हिंदू लोकसंख्या वाढीच्या दरा पेक्षा जास्तच होता.
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 07/01/2021 - 10:22 नवीन
ट्रेंड महत्वाचा नाहीये का ? फॅमिली प्लॅनिंग हळू हळू वाढणे आणि लोकसंख्या वाढदर हळू हळू कमी होत जाणे हे बदल ट्रेंडच्या रुपात दिसत आहेत. मुद्दा हा कि आत्ता उपलब्ध माहितीनुसार मुस्लिम लोकसंख्या हिंदूंपेक्षा जास्त होईल ही हिंदुत्ववाद्यांच्या डोक्यातली आणि पसरवलेली हॉरर-फँटसी कल्पना आहे. त्याला माहितीच्या जोरावर शून्य आधार आहे. हिंदू-मुस्लिम लोकसंख्या वाढदरातला फरक घटतानाच दिसला आहे.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला गुरुवार, 07/01/2021 - 10:54 नवीन
पॉप्युलेशन मिथ वाचून सविस्तर लिहिणार आहे.
सविस्तर लिहाच, अवश्य चर्चा करू लेखातील काही मुद्दे पटले नाहीत तेंव्हा एक धागा काढावा यावर आपण अवश्य चर्चा करूया... धन्यवाद कॉमी एक चांगला विषय चर्चेला येऊदे
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 07/01/2021 - 10:57 नवीन
इतक्यात नाही, दोन महिने किमान. लेखात मुद्दे नाहीत, तथ्य आहेत हे नमूद करतो.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला गुरुवार, 07/01/2021 - 14:31 नवीन
तथ्ये असतील तर तथ्येच उरतील लेखाची वाट पहात आहे...
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Wed, 06/30/2021 - 16:44 नवीन
भारतात सर्वात जास्त धर्मांतर हिंदू धर्मातून होत आहे.
ह्यात वाईट काय आहे हे मला कळत नाही. लोकं धर्मांतर करुन जीवनमान सुधारेल ह्या आशेने अन्य धर्मात जात असतील तर त्यात चूक काय ? उलट जितके जास्त लोकं हिंदु धर्म सोडून अन्य धर्मात जातील तितकेच हिंदु धर्मासाठी उत्तम असेल . मंदिरात असणारी गर्दी कमी होईल , भोंदु बाबा महाराजांचा रेव्हेन्यु घटल्याने त्यांचा धंदा बसेल , सण समारंभ उत्सव साजरे करण्याच्या नावाने सार्वजनिक ठिकाणी चालणारा उन्माद , रस्त्यात फटाके ऊडवणे, खड्डे खोदुन मांडव घालणे, , कमी होईल . आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे - ज्या लोकांचा मुळातच हिंदु धर्मावर विश्वास नाही, त्यातील परंपरांचा अभिमान नाही, त्यातील तत्वज्ञानाविषयी आदर नाही , असे लोकं धर्मात राहुन काय उपयोग , उलट अशा लोकांनी धर्मांतर केले तर उर्वरित हिंदु धर्म हा जास्त चांगला असेल ह्यात शंका नाही !
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Wed, 06/30/2021 - 17:01 नवीन
भलतेच लोक हिंदू धर्म सोडत आहेत हा असावा ? जे लोक हिंदुत्व सोडल्याने हिंदूंचे कल्याण होईल ते अजून हिंदुत्व सोडतच नसावेत ?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 06/30/2021 - 17:17 नवीन
ह्याला दोषी कोण? ह्या प्रश्नांचे उत्तर शोधणे गरजेचे आहे.रोगाचे मूळ माहीत पडले तर च उपाय करता येतील. पण अतिशय दुर्दैव नी हे सत्य आहे अजुन हिंदू धर्म जाती पाती मध्ये विभागला गेलेला आहे. महाराष्ट्रात अनेक महापुरुषांनी,संतांनी ,समज सुधारक लोकांनी जन्म घेतल्या मुळे जाती जाती मध्ये संघर्ष होत नाही .पण जातीभेद अजुन आहे. रोटी, बेटी व्यवहार हिंदू मध्ये जाती च्या पलीकडे जावून होणे गरजेचे आहे. उत्तर भारतात अजून पण जाती भेदाच्या भिंती मजबुत आहेत त्या अजुन ठिसूळ होणे गरजेचे आहे. पण हिंदू राजकारणी च तसे होवून देत नाहीत. आरक्षण चे गाजर सर्व जाती ना दाखवून संघर्ष निर्माण झाला पाहिजे हीच त्यांची रण निती आहे. कसा होणार हिंदू एक?
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 07/05/2021 - 02:59 नवीन
आरक्षण चे गाजर सर्व जाती ना दाखवून संघर्ष निर्माण झाला पाहिजे हीच त्यांची रण निती आहे. "ते" राजकारणी म्हणजे नक्की कोण बारामती कि नागपूर ? टीका करायाची तर सगळ्यांवर करा ना का फक्त नागपूर वाले जातीभेद करतात ( तरी बरं मोदी, शाह आणि योगी "जनेउधारी" नाहीत ) मग बारामती चे "जाणते राजे " कडून जागीर सभेत "पगडी नको पागोटे" असले चाळे होतात त्याच काय? का त्याच्याकडे सुमडीत कानाडोळा ! हिंदू धर्म जाती पाती मध्ये विभागला गेलेला आहे. हेच उगाळत राहायचं आणि म्हणून "हिंदू एकत्र व्हावा " या प्रयातनांना असा धोशा लावून एक प्रकारचा छुपा विरोध करावयाचा !
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Wed, 06/30/2021 - 17:18 नवीन
.ह्यात वाईट काय आहे हे मला कळत नाही. जर हे असेच होत राहील तर भारतात एक दिवस मुस्लिम कायदा लागू होईल, 1990 साली जी परिस्तिथी काश्मीर मधील उरलेल्या हिंदूंवर आली तीच इतर राज्यातील हिंदूंवर होईल.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 06/30/2021 - 17:35 नवीन
आधुनिक काळात कोणत्या देशात मुस्लिम कायदा लागू झाला आहे का?
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 07/05/2021 - 07:57 नवीन
भाऊ तोरसेकरांचे एक तर्क म्हणून विचार करण्यासारखे विधान https://www.youtube.com/watch?v=Io3pf7z7diA&t=84s हिंदू एकत्रित नसल्यमुळे फार मोठया संख्येने एकदम हिंदूंचे धर्मांतर होणे अवघड आहे म्हणजे असे कि ज्याला हिंदूंना मोठ्याप्रमाणात धर्मांतर घडवून आणण्याचे आहे त्याने अगदी शंकराचार्यांना जरी धर्मांतराला राजी केलं तरी याचा अर्थ हिंदू सगळे खाली मान घालून त्यान्चा मागे जातील असे नाही !
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 06/30/2021 - 17:38 नवीन
जसे मानव प्रगत होतील धर्म कमजोर होत जातील . पुढे जास्त वर्ष धर्म टिकणार नाहीत. पण प्राचीन ज्ञान ,संस्कृती,आहार,विहार हे धार्मिक कारणाने तो पर्यंत नष्ट झाले नाही पाहिजेत.तो मानवाच्या प्रगती ची इतिहास आहे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 06/30/2021 - 18:04 नवीन
हे महाभारत मध्ये आहे सर्व श्रेष्ठ धनुर्धर , दाणी व्यक्ती का . सूत पुत्र म्हणून हीनवून त्याचा अपमान करणाऱ्या हिंदू धर्मात धर्मांतर का नाही होणार. अजुन पण ती चूक सुधारली जात नाही टिप. मी मागासवर्गीय नाही हिंदू धर्मात समजल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित जाती मधील आहे.आणि हिंदू धर्माच्या अनेक गोष्टींचा अभिमानी आहे.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Wed, 06/30/2021 - 18:11 नवीन
सर्व श्रेष्ठ धनुर्धर , दाणी व्यक्ती का .
श्रेष्ठ धनुर्धर ठीक आहे दाणी व्यक्ती कसा ? माझ्या अंगातून फुकट सोने निर्मार होऊ लागले तर मी हि ते जगभर वाटत सुटेन कि...
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 07/03/2021 - 09:49 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - twenty one pilots - Heathens ( Lyrics )
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Sun, 07/04/2021 - 12:48 नवीन
जगात हिंदुत्व सोडून बाकी काही अस्तित्वातच नाही असे मानणाऱ्या हिंदूंना इतर धर्म हि गोष्टच आउट ऑफ सिल्याबस आहे याची अजूनही जाणीवच झालेली नाही... त्यामुळेच मुळात हिंदुत्व म्हणजे काय याचाच गोंधळ उडालेला दिसतो बरं इतर धर्मानचा उगम भारतभूमीत झाला असता तर काही ना काही जुगाड मारून ते शेवटी हिंदूच असं तरी ठसवता आले असते पण आता तेही शक्य नाही... त्यामुळे जेवढ्या लवकर शहाणपण येईल तेव्हडे बरे असे म्हणण्या खेरीज अन्य काहीच तूर्त शक्य नाही
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Sun, 07/04/2021 - 17:48 नवीन
पर्फेक्ट २ !
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Sun, 07/04/2021 - 18:21 नवीन
पर्फेक्ट २
म्हणजे काय ?
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Sun, 07/04/2021 - 21:36 नवीन
बरं इतर धर्मानचा उगम भारतभूमीत झाला असता तर काही ना काही जुगाड मारून ते शेवटी हिंदूच असं तरी ठसवता आले असते पण आता तेही शक्य नाही...त्यामुळे जेवढ्या लवकर शहाणपण येईल तेव्हडे बरे असे म्हणण्या खेरीज अन्य काहीच तूर्त शक्य नाही
तुमचा हा प्रतिसाद पाहुन आमच्या आधीच्या अनुमानाला दुजोरा मिळाल्याचा आनंद झाला . तुमची भाषा शैली आणि लेखनातील विचार पाहुन तुम्ही गट क्र. २ चे पर्फेक्ट रीप्रेझेंटेशन करता असे म्हणायचे होते . सारखं सारखं लिहित बसायचा कंटाळा आलाय , आता मी फक्त " २ " इतकाच प्रतिसाद देत जाईन आपल्या विचारसरणीच्या प्रतिसादांवर ! इत्यलम
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Sun, 07/04/2021 - 22:52 नवीन
हरकत नाही तुम्हाल आनंद मिळणार असेल तर हे वास्तव नसूनही स्त्रीहट्ट व बालहट्ट पुरवला पाहीजे या सवयीने मी आनंदाने वाचेन... कंटाळा करू नकोस, लिहते राहा...
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 07/04/2021 - 18:22 नवीन
असे आव्हान केले की संबंधित व्यक्ती ना ते बरोबर समजते.बरोबर सर्व हिंदू समाज एकत्र येतो. एकत्र येण्या अगोदर तो धर्म म्हणजे काय,हिंदू धर्म आहे का? असल्या फालतू प्रशांचे उत्तर शोधत बसत नाही. आपण कोणाशी जास्त जवळचे आहोत हे त्यांना बरोबर समजतो. धर्म म्हणजे काय,हिंदू म्हणजे कोण. हे असले प्रश्न फक्त अती विद्वान लोकांना पडतात. सामान्य लोकांना नाही
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Sun, 07/04/2021 - 18:24 नवीन
असे आव्हान केले की संबंधित व्यक्ती ना ते बरोबर समजते.बरोबर सर्व हिंदू समाज एकत्र येतो. एकत्र येण्या अगोदर तो..
इतर बाबींनी विखुरलेला असतो...
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 07/04/2021 - 18:33 नवीन
योग्य वेळी एकत्र येतो. उदा .९३ ची दंगल. जेव्हा हिंदू धर्मावर संकट येते तेव्हा सर्व विखुरलेला समाज एक होतो. धार्मिक बंधनात न राहता मत मांडण्याचा अधिकार,स्वतंत्र फक्त हिंदू धर्मात आहे .हिंदू हे हिंदू धर्मावर टीका करू शकतात त्यांना धर्मातून तीव्र विरोध होत नाही. बाकी धर्मात हे स्वतंत्र नाही. उदा. Tasleema. रश्दी. बाकी गुपचूप घडामोडी घडणाऱ्या खतरनाक धर्मा विषयी माहीत नाही. पण हिंदू आणि मुस्लिम हे दोनच धर्म कधीच काही लपवत नाहीत. जे असते ते स्पष्ट असते.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Sun, 07/04/2021 - 18:36 नवीन
तर धागा लेखकाला हा धागा काढायची गरजच का निर्माण झाली असावी ?
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Sun, 07/04/2021 - 22:55 नवीन
पटकन....
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Sun, 07/04/2021 - 23:15 नवीन
जग पालथे घातले असते तर त्यांना जगात इतरत्र काय चालू आहे ते नक्की समजले असते अन एक दिवस खाडकन मुस्काटात मारून झोपेतून जागे केल्याप्रमाणे अवस्था झाली नसती... आजही हिंदूंनी स्वतः चा निष्पक्ष अभ्यास करायची तयारी केली तर ते कोणत्याही आक्रमणाला तोंड द्यायला सिद्ध होऊ शकतात.. (काही बालगोपाळ आम्हाला नक्कीच गट क्रमांक एक अथवा दोन असे काही लेबल चिटकवतील, त्यांचे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणून स्वागत करत आहे)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 11/26/2021 - 12:20 नवीन
इस्लामिक ट्रस्टकडून शेकडो हिंदू मुलींचे धर्मांतर, पोलिसांच्या आरोपपत्रात धक्कादायक खुलासा https://www.lokmat.com/national/conversion-hundreds-hindu-girls-islamic-trust-gujarat-shocking-revelation-police-chargesheet-a732/amp/
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 11/27/2021 - 15:33 नवीन
https://www.esakal.com/maharashtra/nilesh-rane-criticism-on-supriya-sule-speech-konkan-marathi-political-news-akb84 कॉंग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष हिंदू हितवादी नाहीत, हे माझे वैयक्तिक मत आहे....
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Mon, 11/29/2021 - 18:14 नवीन
राम गणेश गडकरी पुतळा प्रकरण करणे किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणणे (अर्थातच भाजपात यायच्या अगोदर) हे पण त्यांची हिंदूंच्या विषयी असलेली कळकळ मानावी काय ? कारण आजतागायत त्यांनी त्या विषयात माफी मागितलेली ऐकिवात नाही, का त्यांचा त्या त्या विषयातील स्टँड पक्षाला (हल्ली त्यांनी बस्तान मांडलेल्या पक्षाला) मंजूर आहे म्हणायचं ? का अखिल हिंदू एकत्रीकरण कार्यक्रमाला ब्राह्मणद्वेषाची झालर असलेली चालेल म्हणता ? जाता जाता ह्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं आली की एक हिंदू म्हणून मी तुमच्याशी जो बंधुभाव शेअर करतो तो द्विगुणित होईलच, हा हिंदू एकत्र येणारच, कारण जर हुकूमशाहीत जगण्याचा प्रश्न असला तर मी कधीही एखाद हिंदू हुकूमशाहीच प्रेफर करीन ! (कन्फ्युज द्विज ब्राह्मण) वांडो. स्वाभिमानी कर्तृत्व
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 11/30/2021 - 05:56 नवीन
त्यामुळे, अशा गोष्टींवर मी वाद घालत नाही .... उडदामाजी काळे-गोरे असायचेच, काळे उदीड पण आपलेच असतात...
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 11/30/2021 - 08:01 नवीन
ब्राह्मण हिंदू आहेत का ?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 11/30/2021 - 13:27 नवीन
पण, जातीभेद पाळणारे आणि आडनावा वरून माणसाची पारख करणारे, अशा लोकांपासून मी जरा दूरच राहतो ....
  • Log in or register to post comments
T
Trump Wed, 12/01/2021 - 23:15 नवीन
पण, जातीभेद पाळणारे आणि आडनावा वरून माणसाची पारख करणारे, अशा लोकांपासून मी जरा दूरच राहतो .... >> +१ जन्मावरुन ज्या वेळी वर्ण सुरु झाले त्या वेळेपासुनच हिंदु धर्माची अधोगती चालु झाली.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Tue, 11/30/2021 - 15:23 नवीन
विषय वेगळा नाहीए ना हो खरंच, बघा म्हणजे मी प्रयत्न करतो तुम्हाला समजेल मला काय म्हणायचं आहे ते, शेवटी काय आपण दोघे साधी माणसे, म्हणजे बघा सिम्पल आहे, आमचे मुवि किंवा आम्ही बसणार हिंदू तेतुका मेळवावा टाईप कढ काढत, पण जर त्या मोबदल्यात, त्या सदिच्छेच्या अगेंस्ट मला फक्त "धूर्त भटूरडा" "कृष्णाजी भास्करची औलाद" "बामने सगळे हलकटच" ऐकायला मिळत असेल, किंवा दरेक बाधक घटनेचे पडसाद अन कार्यकारणभाव माझ्या जातीशी जोडताना दिसत असले तर

मी का हिंदू सगळे एकत्र करण्याचे काम करू ?

हा धर्म ब्राह्मणेत्तर हिंदूंचा पण आहे न ? मग घ्यावे की त्यांनीही तितकेच यत्न धर्मरक्षणाला, धर्मसाठी कळकळ बाळगून जर शेवटी मला जातीशी संलग्न विखारच मिळणार असेल तर मी किती दिवस हा व्यस्त व्यवहार चालवायचा अन का ? मी का माझे ब्राह्मणी संस्कार अन आयडेंटिटी जपत ज्यु लोकांप्रमाणे स्वतःची वांशिक ओळख बनवून जपू नये ? कारण एवीतेवी आजकाल ब्राह्मणांचे शिरकाण (ज्यूंचे झाले होते तसे) करायच्या कामना तर रोजच ऐकायला मिळतायत ना
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 11/30/2021 - 17:44 नवीन
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच... खूद्द छत्रपती शिवाजी महाराज, यांना देखील, त्यांच्या नातेवाईकांनी कूठे मदत केली? छत्रपती संभाजी महाराज यांना पकडून देण्यात, गणोजी राजेशिर्के यांनी मदत केली.. चुका दोन्ही बाजूंनी झाल्या आहेत... आता तीच चूक परत परत किती वेळा करायची? इतिहास मला एक गोष्ट सांगतो की, विजयनगर साम्राज्य नष्ट झाले, देवगिरी नष्ट झाली, ... आता तरी आपण एकत्र यायला पाहिजे...
  • Log in or register to post comments
क
कॉमी Tue, 11/30/2021 - 18:06 नवीन
मुविंसाठी हिंदू असणे म्हणजे एखादी विचारधारा असणे नसावे. जन्मलेला हिंदू म्हणजे हिंदू, किंवा शिक्का बदललेला हिंदू म्हणजे हिंदू. मग तो हिंदूनमधल्या सबग्रुपचा द्वेष का करत असेना- तो हिंदूच.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 12/01/2021 - 05:12 नवीन
एखाद्या जातीचा सरसकट द्वेष करणारे, आज किंवा उद्या बदलतील किंवा बदलणार नाहीत .... पण, पाकिस्तान आणि बांगलादेश, मधील घटते हिंदू बघता, मी तरी जाती-भेदात अडकू शकत नाही ....
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Wed, 12/01/2021 - 05:44 नवीन
जातीभेदाच्या बंधनात न अडकण्याचे "ऑप्शन" नाही ना आमच्याकडे, कारण ब्राह्मण म्हणून आम्ही कितीही जातीभेद पाळत नसल्याचे कंठशोष करून ओरडलो तरीही आम्ही तो पाळत नाही ह्यावर ब्राह्मणेतर हिंदू बांधव भरवसा ठेवत नाहीत ना ! एका कृष्णाजी भास्कर, मंबाजीच्या मागे एक मुरारबाजी देशपांडे अन एक बाजीराव पेशवे असल्याचे मान्य नाही लोकांना, दादू कोंडदेव (उच्चारी विखार ब्राह्मणेत्तर पद्धतीचा) अन गडकरी मंजूर नाही लोकांना. आपण मला सांगावेत मी ब्राह्मण म्हणून किती दिवस ह्या स्वप्नात जगावे ? नकोय आपण इतर जातीय लोकांना हे वास्तव आहे का नाही ?
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Wed, 12/01/2021 - 11:15 नवीन
जातीभेदाच्या बंधनात न अडकण्याचे "ऑप्शन" नाही ना आमच्याकडे
दुर्दैवाने खरे आहे. "बामना" विरुद्ध चा द्वेष शहरांपेक्षा खेड्यांत जाणिवपुर्वक जोपासला जातोय.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Wed, 12/01/2021 - 11:45 नवीन
कमी आहे असेही समजणे खूपच मोठ्ठा गैरसमज असेल सर.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Wed, 12/01/2021 - 12:34 नवीन
शहरात कमी आहे असेही समजणे खूपच मोठ्ठा गैरसमज असेल सर.
तुम्ही म्हणता तसेही असेल पण शहरात तो इतका प्रकर्षाने जाणवत नाही हे खरे. कदाचित धकाधकीच्या वातावरणात आपल्याला तितके निरिक्षण करायला वेळ नसेल असेही असू शकेल. मात्र टोकदारपणा कमी असावा.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 12/01/2021 - 12:54 नवीन
वैयक्तिक अनुभव दोन्ही प्रकारचे मिळाले... पण, इतर जातीतल्या मित्रांचे सकारात्मक अनुभव जास्त मिळाले. विशेषतः सर्वांगीण वाचन करणारे, वैयक्तिक पातळीवर आणि सामाजिक पातळीवर जातीभेद मानत नाहीत.....हाच अनुभव आला ...
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Wed, 12/01/2021 - 13:49 नवीन
आपण हिंदू एकतेबद्दल तर वैयक्तिक पातळीवर नाही चर्चा करत आहोत ना. आपण सम्यक विचार करतोय, नाहीतर "वैयक्तिक" विचार करता १९४७, १९७१ इत्यादी काळातच ज्या हिंदूंनी पाकिस्तान अन बांगलादेशात राहायचा आत्मघातकी निर्णय घेतला त्यांच्या लोकसंख्या वाढो का कम होवो आपल्यास तोषीस लागण्याचे कारण नाही ना. सम्यक पातळीवर मुटके सर म्हणतात तसेच चित्र आहे. @ धर्मराज मुटके सर, शहरे म्हणजे जर मुंबई पुणे म्हणत असाल तर दैनंदिन जीवन धकाधकीचे असल्यामुळे ब्राह्मणद्वेष जाणवत नाही, पण इतर शहरे पक्षी अगदी नाशिक, नागपूर, औरंगाबाद टाईप शहरांत पण हा प्रकार जोरात जाणवतो. संघटनांची नावे मी लिहीत नाही पण कित्येक जातींच्या संघटना ह्या आपापल्या मेळावे अधिवेशनात असा स्टँड क्लिअर घेत असतात, कधी कधी वाटते ब्राह्मण असे नेमके काय चुकत असावेत बरे ? पण असो, तूर्तास प्रश्न इतकाच आहे की अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उमटायला सुरुवात व्हायच्या ह्या काळात ब्राह्मण लोकांनी तरी हिंदू एकता, धर्मरक्षण, नीतिमत्ता, राजकारण इत्यादी सारखी बिनफायद्याच्या बाळंतपणात सुईण असल्याची भूमिका का अन कश्याला वठवावी ?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 12/01/2021 - 14:26 नवीन
खिळ्या साठी नाल गेली, नालेपाई घोडा गेला घोड्यापाई स्वार गेला अन् स्वारापाई राज्य गेले मी तरी असा खिळा होऊ इच्छित नाही ... शिवाय, असा जातीद्वेष करणार्या माणसांमुळे, माझे आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांचे काहीही नुकसान झाले नाही. जातीभेद पाळणारे, स्वतःचेच मानसिक आरोग्य, खराब करत असतात.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Wed, 12/01/2021 - 14:30 नवीन
असं नाही पण नम्रपणे सांगू इच्छितो की हा तुम्हाला वैयक्तिक आलेल्या अनुभवांचा प्रश्न नाही ना सर, प्रश्न वैयक्तिक नाही ना पण, विस्मरण झाले असल्यास आदरपूर्वक आठवण करून देऊ इच्छितो की विषय आहे

हिंदू कधी एकत्र येणार?

आय होप तुम्ही आता तरी समजून घ्याल
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 12/01/2021 - 16:29 नवीन
ब्राह्मण विरुद्ध इतर हा विषयच धारदार मुळात. त्यात मागच्या १००/१२५ वर्षांपासून हळूहळू हे बीज फोफावत गेलंय. नंतर आपल्या राजकीय पक्षांनी फोडा आणि राज्य करा ही नीती पुन्हा पुन्हा वापरली आणि हा आता विषवृक्ष झालाय. असो. ब्राह्मण असल्यामुळे असे अनुभव जाणवले आहेत हेही खरंय. अवांतरः श्री गोंदवलेकर महाराजांनी यावर एक सुंदर भाष्य केलंय. त्यांना जेव्हा कुणी विचारलं की हा विषय कसा संपेल, तेव्हा ते म्हणतात - "ब्राह्मणांनी अभिमान सोडावा आणि ब्राह्मणेतरांनी द्वेष. यानं हा विषय संपण्यास मदत होईल."
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 12/14/2021 - 15:58 नवीन
"ब्राह्मणांनी अभिमान सोडावा आणि ब्राह्मणेतरांनी द्वेष. मराठी मनात कायम ब्राह्मण द्वेष पसरवणारी असे अनेक लांडगे,कोल्हे, तरस...इ.इ.इ यांची कमी नाही.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Muza - Noya Daman (ft. Tosiba & Meem Haque) | Official Lyric Video
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 13 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 13 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 13 hours ago
  • सुंदर !!
    1 day 13 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 13 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा