हिंदू कधी एकत्र येणार?
रेफरन्स: राजा शिवछत्रपती, लेखक, बाबासाहेब पुरंदरे (पान क्रमांक, 54,55,56)
गाभा एक आणि गोष्टी अनेक,
आदिलशहाचा दरबार संपला. सरदार आणि शिलेदार मंडळी बाहेर पडत होती. नेमके त्याच गडबडीत, खंडागळे यांचा हत्ती पिसाळला आणि हत्तीला आवर घालायला, छत्रपती शिवाजी महाराज यांचे मामा पुढे सरसावले, तर हत्तीचे रक्षण करायला छत्रपती शिवाजी महाराज यांचे चुलत काका पुढे सरसावले...
पुढे झालेल्या धुमश्र्चक्रीत, जाधव आणि भोसले घराण्यातील कर्ती मंडळी बळी पडली...
ह्याच्या पण आधी, सिकंदरला साथ देणारे हिंदूच होते.मागच्या आठवड्यात देखील, शिवसेना भवन येथे हीच घटना घडली ...
गेल्या अडीच हजार वर्षांपुर्वी जे होत होते, तेच आजही होत आहे...
हिंदू कधी एकत्र येणार?
🗣 चर्चा
(209)
ग
गॉडजिला
Sun, 06/20/2021 - 14:41
नवीन
बसुन त्यात ठरवु, कसे एकत्र आणायचे ते.
फक्त सेना भाजप संबंधि बोलत असाल तर... त्याची शक्यता नाकारता येत नाही.
- Log in or register to post comments
D
Dattatray Ghadge
Tue, 09/13/2022 - 17:10
नवीन
हहिन्दुस्थान चे गजवा ए हिन्द झाल्या नन्तर
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Sun, 06/20/2021 - 16:07
नवीन
दर्बार होता हो ;)
- Log in or register to post comments
ग
गॉडजिला
Mon, 06/21/2021 - 12:54
नवीन
आदिलशाहीचा दरबार होता की विषय संपला. त्यापेक्षात्यांचे म्हणणे ऐका, मैत्री करा, कट्टे करा, चिल कराना भाऊ... कशाला वादविवाद करायचे आपापसात ?
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Sun, 06/20/2021 - 16:40
नवीन
हिंदू धर्मात राहून माझी आर्थिक उन्नती होत आहे.
हिंदू धर्मात राहून मला समाजात संरक्षण मिळत आहे.
हिंदू धर्मात राहिल्या मुळे माझ्या अडचणी च्या वेळी मदत मिळत आहे.
असे वातावरण जेव्हा निर्माण होईल तेव्हा हिंदू एकत्र येतील ,त्यांच्यात दुरावा असणार नाही.
भले त्यांची राजकीय मत वेगळी असली तरी.हिंदू हित हीच प्राथमिकता असेल.
- Log in or register to post comments
स
समाधान राऊत
Sun, 06/20/2021 - 17:32
नवीन
(。ŏ﹏ŏ)
- Log in or register to post comments
त
तिता
Mon, 06/21/2021 - 06:22
नवीन
मी काय म्हणतो, सर्वजण एकत्र येउन मानव धर्माचे पालन कसे करता येइल असा विचार केला तर बरे होइल का?
धर्म ही आपली संकल्पना Religion च्या खूप वरच्या level ची आहे.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Mon, 06/21/2021 - 07:15
नवीन
तिता...
हो अगदी करूयात ना पण एक समाज म्हणून बघितले जातेच कि
मी भले मंदिरात जात नसेन.. कर्मकांडाला आणि अंधश्रेधला कडाडून विरोध करीत असें पण आवडो ना आवडो माझी ओळख समाजात " अमुक धर्माचा"
मग जर उगाचच माझया "सामाजिक ओळखीवर " अन्याय होत असेल तर मी त्या धर्मासाठी उभा राहणारच .. किती उदाहरणे द्यायची ! आणि खास करून एकीकडे "सर्वधर्म समभाव " जप करणाऱ्यांना त्याची व्याख्या हि " सगळ्यांना पाहिजे ते नियम " अशी करावयाचा "शातीर " / चापलुसी करावीशी वाटते तेवहा.
मंदिर गेला खड्यात . काह्ही फरक नाही ," शाळा आणि वयैद्यकीय उपचार हेच माझे मंदिर" असे असले तरी पण "मंदिर व्हावे" या भावनिक हक्क साठी मी भलावण करणारच ... मग भले "धर्मांध" म्हणून लेबल चिकटले तरी चालेल
अगदी सगळेच एका धर्माचे असले तरी १२ मैलावर जर भासहा आणि पद्धती बदलत असणार तर तेढ होणार ..
तेवहा अगदी मानवता वैगरे सगळे बरोबर असले तरी रोजचे प्रश्न आहेतच कि
एक क्षण असे धरुयात कि देशात सगळे खाऊन पिऊन सुखी आहेत , रोग नाही पण तरी तेढ आणि भांडणे थांबतील का? निसर्ग नियम आहे
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Mon, 06/21/2021 - 08:07
नवीन
हिंदू ची व्याख्या ठरल्यावर एकत्र येतील .
आधी हिंदू ची व्याख्या ठरवू या
- Log in or register to post comments
क
कॉमी
Mon, 06/21/2021 - 08:32
नवीन
हिंदू ची पण आणि एकत्र येण्याची पण.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Mon, 06/21/2021 - 09:35
नवीन
जगातील सर्वात प्राचीन असलेला धर्म((संस्कृती) हिंदू आहे.
जगातील कोणत्याच धर्मात झाले नाही त्याच्या पेक्षा किती जास्त आणि उत्तम दर्जा चे अनेक ग्रंथ हिंदू धर्मात आहेत.
योगा ,तंत्व ज्ञान,आरोग्य,कामजीवन,जीवनाचे सार,सर्व काही हिंदू धर्मात आहे.
आणि हिंदू हा असे सर्व विषयात ज्ञानदेणारा एकमेव धर्म आहे.
जे हिंदू देवदेवता, मानतात,सर्व प्राचीन ज्ञान चा आदर करतात ते सर्व हिंदू.
- Log in or register to post comments
क
कॉमी
Mon, 06/21/2021 - 15:47
नवीन
हिंदूची लोकसंख्या एकहाती कमी करून टाकली की !
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Mon, 06/21/2021 - 20:06
नवीन
१९४८ साली हिंदुबांधवांनी आमच्या " तत्वनिष्ठ गांधीवादी" आजोबांचा वाडा जाळला आणि सणसणीत कानाखाली लाऊन गाढ झोपेतुन कोणीतरी जागं करावं तसं काहीसं झालं. त्याच दिवशी आमचा हिंदु धर्माशी असलेला संबंध संपला. आता हिंदु म्हणुन कोणाविषयी आत्मीयता वाटत नाही. त्यामुळे हिंदु म्हणुन एकत्र यायची गरज वाट्त नाही.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 06/22/2021 - 19:39
नवीन
पण आता जुन्या गोष्टी विसरून, एकाच झेंड्याखाली यायला लागणारच आहे...
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Tue, 06/22/2021 - 20:19
नवीन
आता तुम्ही कोणतातरी झेंडा हातात घ्यायचा आग्रहच करत असाल तर आमचा झेंडा आहे !!
Let the revolution begin !
- Log in or register to post comments
ग
गॉडजिला
Wed, 06/23/2021 - 04:24
नवीन
बघूया लेखक मार्कसजींची यशस्वी मनधरणी कशी करतो ते.. लेखकाच्या स्टान्स वर हिंदू कसे एकत्र येऊ शकतात याचे भवितव्य दडलेले आहे आणि
मिपाकट्ट्याला सदस्य एकत्र आणायचा अनुभव मुळातच पुरेसा गाठी असल्याने मुव्ही काका हे ही आव्हान लीलया पार करतील असा मला विश्वास वाटतो.
रोचक धागा अन प्रतिसाद.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 06/23/2021 - 05:13
नवीन
डोळ्यासमोर आले ...
- Log in or register to post comments
ग
गॉडजिला
Wed, 06/23/2021 - 10:17
नवीन
आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा।
माझिया सकला हरिच्या दासा।। १।।
कल्पनेची बाधा न हो कोणे काळी।
ही संत मंडळी सुखी असो।। २।।
अहंकाराचा वारा न लागो राजसा।
माझ्या विष्णुदासा भाविकांसी।। ३।।
नामा म्हणे तया असावे कल्याण।
ज्या मुखी निधान पांडुरंग।। ४।।
नामदेवरायांची प्रार्थनापण किती गोड. ते काय मागतात तर
हरिच्या दासांनी कल्पनेची बाधा, संशय पिशाच्छाचा संसर्ग आपल्या तन-मनाला होणार नाही याची दक्षता बाळगावी. या राजस आणि राजयोगी भाविकांना अहंकाराचा थोडाही वारा लागू नये. मनातील संशय हा देवाजवळ, सद्गुरूजवळ जाण्यापासून रोखतो, कारण संशय भ्रम वाढवतो आणि भ्रमामुळे दृष्टी अंध होते. अंधासमोर साक्षात परमेश्वर उभा असला तरी त्याला तो कसा दिसणार, शक्यच नाही. तद्वत संशय आत्मज्योतीला झाकोळून टाकतो. तीच गोष्ट अहंकाराची. एकदा का अहंकाराचा झंझावात सुटला की, भले-भले योगी तपस्वी यांचा संयम अंगावरील उपरण्याप्रमाणे उडून जातो. त्यामुळे संशय आणि अहंकार या दोन गोष्टीपासून तुम्ही दूर रहा, तर तुम्हाला हरिच्या कुळामध्ये चांगले स्थान लाभेल असे नामदेवरायांचे आश्वासन आहे
- Log in or register to post comments
ग
गॉडजिला
Wed, 06/23/2021 - 10:31
नवीन
वरील प्रतिक्रीया वाट्सप मधुन सभार
- Log in or register to post comments
स
सॅगी
Fri, 06/25/2021 - 10:06
नवीन
गडचिरोलीच्या जंगलातील दहशतवाद्यांचाही असाच झेंडा असतो ना?
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Sat, 06/26/2021 - 04:48
नवीन
हा झेंडा नक्कीच नको!
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Wed, 06/23/2021 - 19:07
नवीन
जितक्या लवकर पसरेल तितकं चांगलं.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Fri, 06/25/2021 - 06:47
नवीन
मुवी हे पहा :
https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/in-fraud-case-famous-pune-builder-paranjape-brothers-in-mumbai-police-custody/articleshow/83829546.cms
डी.एस.के झाले , आता परांजपेंचा नंबर ... चितळे गाडगीळ वगैरे लाईन मध्ये आहेत !
भांडारकर तो झांकी है, बालगंधर्व अभी बाकी है !
आता तुम्हीच ठरवा कोणता झेंडा घ्यायचा हातात ते =))))
अवांतर : बाकी इस्रायल मध्ये " गेर तोशाव" नावाची एक संकल्पना आहे , कधी वेळ मिळातर जरुर वाचा त्या विषयी !
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Fri, 06/25/2021 - 08:00
नवीन
हिंदू तितका मेळवावा...
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Fri, 06/25/2021 - 09:04
नवीन
मेळवा मेळवा , आमच्या कडून शुभेच्छा !
इत्यलम !
लेखनसीमा !
_____________________________________________________________________________
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Fri, 06/25/2021 - 12:02
नवीन
धन्यवाद ....
- Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे
Sat, 06/26/2021 - 05:16
नवीन
अविनाश भोसलेंच्या घरावर पण ED ने छापा मारून 40 कोटीची मालमत्ता जप्त केली. चुकीचं वागला तर भरपाई करावीच लागणार, मग चितळे असो नाहीतर भोसले असो.
भुजबळांना अटक झाल्यावर आपण OBC चे नेते आहोत म्हणूनच कारवाही झाली अशीच ओरड त्यांनी केली होती.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Fri, 06/25/2021 - 12:08
नवीन
क्रूरपणाचा कळस! आधी फसवून लग्न, मग धर्मांतरासाठी बळजबरी आणि अल्पवयीन मुलीवर बलात्कार...
https://www.loksatta.com/desh-videsh-news/up-man-marries-woman-after-faking-identity-forces-her-to-convert-rapes-daughter-vsk-98-2510998/
-------
हिंदू तितका मेळवावा ....
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Sat, 06/26/2021 - 14:58
नवीन
लोकसभेत ३०१ जागा त्या मुळे तर मिळाल्या.
हिंदू नी एकत्र येवून हिंदुत्व वादी सरकार केंद्रात स्थापन केले ना.
५५.७४% मत bjp ला मिळाली आहेत.
हिंदू नी एकत्र येवून त्यांची जबाबदारी पार
पाडली आहे.
आता सरकार नी हिंदू हिताचे निर्णय घेवून त्यांची जबाबदारी पार पाडावी.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Mon, 07/05/2021 - 03:11
नवीन
आता सरकार नी हिंदू हिताचे निर्णय घेवून त्यांची जबाबदारी पार पाडावी.
येथे आपण भाजपचं पाठीशी असलेल्या रा स्व संघाच्या विचारसरणीची थोडी ओळख करून घेणे अवयषयक आहे असे वाटते
- त्याना देशाचे हित अभिप्रेत आहे "त्यात हिंदूंचे आपोआप येते" मग असे देशाचे हित हे भाजप कि काँग्रेस राखते याने संघाला फार फरक पडत नाही असे म्हणले जाते ( हंम रहे ना रहे भारत ये रहना चाहिये" या "मनकर्णिका " या चित्रपटातील गीत आणि त्याचा अर्थ आठवा )
- दूर पल्याचा विचार ( आणि तो तसा फारच दूर पाल्याचा आहे अस हि मतप्रवाह आहे संघाच्या पाठीराख्यात , "आधी जनमानसाची मने वळवू सत्ता महत्वाची नाही" हा एक विचार आणि दूसरा "सत्ता आधी मग कार्यक्रम राबवू आणि मग मने वळतील " असे हे अंतर्गत द्वंद्वव
- Log in or register to post comments
ग
गॉडजिला
Mon, 06/28/2021 - 11:13
नवीन
आले का सर्व एकत्र ? कुठे भेटायचं वगैरे ठरलं का ?
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 06/29/2021 - 08:16
नवीन
काश्मीर: १८ वर्षीय मुलीचं जबरदस्ती धर्मांतर?; शीखांचं श्रीनगरमध्ये आंदोलन.....
https://www.loksatta.com/desh-videsh-news/conversions-marriages-sikh-leaders-protest-in-shrinagar-interfaith-marriage-bmh-90-2514571/
---------
शीख समुदाय लगेच एकत्र आला...
- Log in or register to post comments
ग
गॉडजिला
Tue, 06/29/2021 - 09:22
नवीन
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीनं कुटुंबियांनी केलेल्या आरोपांविरुद्ध भूमिका न्यायालयात मांडली. आपण स्वतःच्या मर्जीने विवाह केला असल्याचं तिने न्यायालयात सांगितलं ???
- Log in or register to post comments
क
कॉमी
Wed, 06/30/2021 - 13:15
नवीन
ह्या बद्दल सतत मुस्लिमद्वेष्टा टिव्हीटीवाट करणाऱ्या ट्विटर आयडीने आपला भंपक पणा उघड झाल्यावर वक्तव्ये बदलली. मुलीचे वय १८ नव्हते, २६ होते. जबरदस्ती धर्मांतर झाल्याचे पोलिसांनी सुद्धा फेटाळले आहे. तरी त्या मुलीचे लग्न दुसऱ्या शीख व्यक्तीशी लावण्यात आले.
https://www.thequint.com/amp/story/news/india/jk-sikhs?__twitter_impression=true
- Log in or register to post comments
ग
गॉडजिला
Wed, 06/30/2021 - 13:26
नवीन
तुम्हाला व मुविकांकाना मी निर्मळ मनाचे माझे चांगले मित्रच मानतो त्यांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन कोणीतरी त्यांना मेनूपुलेट केल्यानेच त्यांनी घाईघाईत शहानिशा न करता प्रतिसाद दिला असावा ???
आपण तिघेही एक कट्टा करू व ज्यात कॉफी आणि मद्याची रेलचेल ठेवू अन गप्पागोष्टी करू ज्यावर मी इथे एक फोटो सकट धागाही काढेन असे मी आता सुचवतो.. काय म्हणता मित्राहो?
- Log in or register to post comments
क
कॉमी
Wed, 06/30/2021 - 13:41
नवीन
जरूर ! जुलै नंतर कधीपण तयार.
मुविकाकांची यात चूक नाही आहे, ज्यांनी ही बातमी खोटे बोलून पसरवली त्यांची चूक आहे. शहानिशा करणे त्या पॉइंटला मुवींच्या पण हातात नव्हते. त्यापुढे ते तरी काय करणार ? त्यांनी वाचलं आणि टाकलं. शेवटचं वाक्य वाचायचं राहिलं असेल कदाचित. आपल्या मताशी जुळणारी घटना झाली की एकंदर चित्राच्या विरोधात जाणाऱ्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष भल्याभल्यांचे होते (Including me.)
- Log in or register to post comments
ग
गॉडजिला
Wed, 06/30/2021 - 14:33
नवीन
हम्म खरं आहे... आपण यासाठी मुविना दोष दिला नाही पाहिजे तसेच मिपाचे अथवा भारताच्या धोरणात अफवा पसरवणे अथवा शहानिशा न करता नेटवर बातमी पेरणे अक्षम्य गुन्हा जरी ठरू शकत असेल तरीही मूवी काका नी त्यांचे विधान करताना क्वेश्चन मार्कचा खुबीने वापर केल्यामुळे ते कोणत्याही कायद्यात सकृतदर्शनी चूक ठरणार नसावेत.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 06/30/2021 - 14:25
नवीन
https://youtu.be/Jya24IjYpHY
---------
ही बातमी भारतात कुठल्या वर्तमान पत्रांत आली?
- Log in or register to post comments
न
नावातकायआहे
Wed, 06/30/2021 - 15:58
नवीन
हिन्दुस्तान टाईम्स.
सोमालीयन रेफुजी होता आणि त्याला मानसोपचार चालू होता.
https://www.hindustantimes.com/world-news/germany-three-dead-several-injured-in-wuerzburg-stabbing-attack-101624664306835.html
- Log in or register to post comments
क
कॉमी
Wed, 06/30/2021 - 17:20
नवीन
द हिंदू, इंडिया टुडे इथे पण आली आहे बातमी.
पण गुगल सर्च करणे हा गुड फेथ मार्ग वापरतील तर ते मुक्त विहारी कसले ! मुक्तपणे दाणकन मिपावरच येणार ते :)), आणि बॅड फेथने असे सुचवतील कि ही बातमी कोणत्याच पेपरात आली नाही.
- Log in or register to post comments
ग
गॉडजिला
Wed, 06/30/2021 - 17:54
नवीन
तसे ते मनाने अत्यन्त निर्मळ व सरवांचेच चांगले मित्रही आहेत. पूर्वी ते मिपाकर जोडण्यात पुढे होते असे त्यांचे धागे व प्रतिसाद वाचून दिसते आहे सध्या त्यांनी थोडा व्यापक उपक्रम हाती घेतला आहे आणि तो म्हणजे हिंदूना त्यांचे क्षात्रतेज परत मिळवून देणे, जागृती करणे हे हि त्यांचे रिसेंट प्रतिसाद वाचूनच समजून येते आहे आणि मिपाकर म्हणून त्यांच्या या उद्योगाचा आपण अर्थातच मान राखणे आवश्यक आहे... कारण शेवटी ते जोडायचे काम करायचा प्रयत्न करतात लोकांना विभागायचा नाही...
त्यामुळे त्यांच्या योग्य त्या सर्व कृतींना पाठिंबा होता व पुढेही राहील आणि इतरांनी हीच कृती अनुसरावी ही माझीही वैयक्तिक अपेक्षा आहे
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 06/30/2021 - 18:51
नवीन
छापील बातमी येऊनही, आपल्या देशातील, मानवाधिकारवाल्यांनी काही टिप्पणी केली नाही...
----------
मानसोपचारांची मदत ऐनवेळी लागतेच.....
https://youtu.be/2FmWzeUGV8c
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 06/30/2021 - 14:28
नवीन
https://youtu.be/-3V6Xu2qBQs
?
- Log in or register to post comments
क
कॉमी
Wed, 06/30/2021 - 14:57
नवीन
धाग्याचे नाव हिंदू कधी एकत्र येणार पेक्षा मुस्लिमविरोधी अनेकडोट्स असे ठेवावे, सार्थ होईल.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Wed, 06/30/2021 - 15:50
नवीन
आताच एक लोकसत्ता मध्ये बातमी वाचली.भारतात सर्वात जास्त धर्मांतर हिंदू धर्मातून होत आहे.
धर्मांतर करणारे अनुसूचित जाती आणि जमाती मधील लोक जास्त आहेत. ओबीसी मधील पण लोक आहेत.
धर्मांतर करण्याचे महत्वाचे कारण हिंदू धर्मात त्यांना भेदभाव ला समोर जावे लागते.
म्हणजे हे धर्मांतर होण्याला हिंदू पण जबाबदार आहे.
सर्वात जास्त हिंदू Christan धर्मात जात आहेत.
दक्षिण भारत हे प्रकार जास्त घडतात.
पण तरी सुद्धा हिंदू च्या एकूण लोकसंख्येत जास्त फरक पडलेला नाही ,आणि पडणार पन नाही.
अगदी आणीबाणी ची स्थिती नाही.
- Log in or register to post comments
ग
गॉडजिला
Wed, 06/30/2021 - 16:35
नवीन
टक्का इतरांचा वाढतो आहे की नाही याचा अभ्यास आपण ऑप्शनला टा़कला असावा ?
- Log in or register to post comments
क
कॉमी
Wed, 06/30/2021 - 16:49
नवीन
त्या वाढत्या टक्क्यावरून काय निर्णय घ्यावा ?
(असाच प्रश्न विचारला आहे. मला व्यक्तिष: फारशी माहिती नाही. S.Y.QURESHI (पूर्व EC अध्यक्ष) यांचे या विषयावरचे सरकारी डेटावर आधारित पुस्तक लाईन अप करून ठेवले आहे.)
- Log in or register to post comments
ग
गॉडजिला
Wed, 06/30/2021 - 23:06
नवीन
हाच कि ज्याला कमी टक्के मिळतात त्याचा नंबर खालचा असतो. त्यामुळे आपला टक्का वाढो न वाढो इतरांचा तो वाढत असेल तर एक दिवस तुम्हाला तो मागे टाकेल ही काळ्या दगडावरील रेघ
- Log in or register to post comments
क
कॉमी
गुरुवार, 07/01/2021 - 03:25
नवीन
इथे ते खरे नाहीये. तो पॉईंट येणार नाही. Fear-Mongering. तात्पुरते हे वाचा, पॉप्युलेशन मिथ वाचून सविस्तर लिहिणार आहे.
https://www.livemint.com/Opinion/5bsICkXvl4t4hXSewk8bkN/Four-out-of-five-Indians-will-still-be-Hindu-even-when-Musli.html?facet=amp
- Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे
गुरुवार, 07/01/2021 - 04:39
नवीन
एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात 60-70 वर्षाचा काळ म्हणजे फार मोठा आहे परंतु देशासाठी 60-70 वर्ष म्हणजे काहीच नाही. त्यामुळे तुम्ही जे पॉप्युलेशन मिथ वरती सविस्तर लिहिणार आहेत त्यासाठी पुढच्या 300 -400 वर्षात जर अशीच लोकसंख्या वाढ होणार असेल तर काय होईल ह्याबद्दल लिहिले तर बरं होईल. वरच्या लेखा मध्ये पुढील 60 -70 वर्षे नंतर काय होईल हेच लिहिले आहे. परंतु भारता सारख्या देशासाठी हा काही मोठा कालखंड नाही.
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- ›
- »