Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - मे २०२१ (भाग 2)

म
मुक्त विहारि
Fri, 05/07/2021 - 06:47
🗣 174 प्रतिसाद
संगमनेरमध्ये गर्दी केल्याचा जाब विचारणाऱ्या पोलिसांना पाठलाग करुन मारहाण; धक्कादायक व्हिडीओ व्हायरल... https://www.loksatta.com/maharashtra-news/people-attack-on-police-in-sangamner-ahmednagar-sgy-87-2464555/ -------- तडीपार गुंडाने पोलीस अधिकाऱ्याचा गळा चिरला, हत्याकांडाने पुण्यातील बुधवार पेठ हादरली https://www.tv9marathi.com/crime/pune-police-asi-sameer-sayyad-murdered-by-tadipar-goon-pravin-mahajan-near-budhwar-peth-crime-news-today-450790.html ------------- साधू हत्याकांड, सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण, सामान्य माणसाला जीवे मारण्याची धमकी देणारा आमदार, आणि आता वरील बातम्या ..... ----------- कायद्याचा धाक नसेल तर, अशा बातम्या येतच राहणार ... खिळ्या परी नाल गेली, नाली पाई घोडा गेला, घोड्या पाई स्वार गेला, स्वारा पाई राष्ट्र गेले..... इतका अनर्थ खिळ्याने केला....

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 57960 views

🗣 चर्चा (174)
च
चंद्रसूर्यकुमार Fri, 05/07/2021 - 07:58 नवीन
मालदिवचे माजी अध्यक्ष महंमद नाशिद यांच्यावर इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने प्राणघातक हल्ला केला आहे. त्यात ते जखमी झाले आहेत. मालदिव या आपल्या आणखी एका शेजारी देशात दहशतवाद्यांचा अड्डा होणे आपल्याला नक्कीच धोकादायक आहे. https://maharashtratimes.com/international/international-news/islamic-state-has-taken-responsibility-for-an-attack-on-maldives-parliament-speaker-mohamed-nasheed/articleshow/82449534.cms
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Fri, 05/07/2021 - 17:26 नवीन
करोना च्या लाटा १ ली लाट : ६० वर्षावरील व्यक्तींना धोका ! २ री लाट : तरुणांना धोका ! ३ री लाट : लहान मुलांना धोका ! करोना ने वयोगट वाटून घेतले आहेत काय ? ४ थ्या लाटेत काय होणार ? गर्भातील बाळांना धोका की येणार्‍या पुढील पिढ्यांना धोका ???
  • Log in or register to post comments
स
सुक्या Fri, 05/07/2021 - 20:10 नवीन
संगमनेरमध्ये झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. यात आता तोंडदेखले कारवाइ होइल. कदाचित अज्ञात लोकांविरोधात तक्रात पण होइल. त्या नंतर काहीही होणार नाही. बाळासाहेब थोरात चा तो गड आहे. तो कुणालाही धक्का लागु देणार नाही. तसे केले तर मतांचा टक्का कमी होइल. चीड येते .. भारतात करोनाची लाट यायला लोकांचा निष्काळजी पणा कारणीभुत आहे हे माझे पक्के मत झाले आहे. लोक अजुनही सुधारले नाही तर ३री काय ... अनंत लाटा येत राहतील.
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Fri, 05/07/2021 - 21:13 नवीन
https://www.lokmat.com/photos/national/coronavirus-cow-urine-effective-remedy-coronavirus-bjp-mla-surendra-singh-made-claim-drank-cow-urine-a301/
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Fri, 05/07/2021 - 22:52 नवीन
सगमनेर तो झांकी है, पूरा महाराष्ट्र अभी बाकी है।
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 05/08/2021 - 02:25 नवीन
कायद्याचा धाकच उरलेला नाही...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 05/08/2021 - 02:22 नवीन
“महाराष्ट्रात लस पुरेशी नसताना तिसरी लाट थोपवण्यासाठी…”, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मांडली भूमिका! ------------ https://www.loksatta.com/maharashtra-news/cm-uddhav-thackeray-on-third-wave-of-corona-in-maharashtra-oxygen-supply-pmw-88-2465164/ ------------ कुठलेही ठोस उपाय नाहीत, नेहमी प्रमाणे, "माझे कुटुंब, माझी जबाबदारी"...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 05/08/2021 - 03:41 नवीन
https://www.loksatta.com/maharashtra-news/sharad-pawar-sent-a-letter-to-chief-minister-uddhav-thackeray-said-msr-87-2465128/lite/ ------------- आदरातिथ्य क्षेत्रातील व्यावसायिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने त्यांच्या मागण्यांचा मुख्यमंत्री सहानुभूतीपूर्वक विचार करतील, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली करोनाच्या या संकटातून जनतेला दिलासा मिळेल, हा विश्वास मला आहे. असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला आहे... -------------- सध्या धंदा मंद आहे, त्यामुळे लाॅकडाऊन नंतर, बियर बार आणि हाॅटेल्स मधील खाद्य पदार्थांचे भाव वाढण्याची शक्यता आहे...
  • Log in or register to post comments
द
दिगोचि Sat, 05/08/2021 - 07:11 नवीन
ज्यान्च्याकडून दरमहा १०० कोटी वसूल केले जात होते त्यान्च्यासाठी सरकारने काही तरी करणे जुरुरीचे आहे. सर्व पाश्चात्य देशात ज्या कामगारान्च्या नोकर्या गेल्या व ज्या व्यावसायिकान्चे धन्दे तोट्यात जाऊ लागले त्याना आर्थिक मदत करण्यात आली. तसेच भारतात होणे जरुरीचे आहे.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sat, 05/08/2021 - 07:21 नवीन
अत्यंत सहमत. १०० कोटी न घेता सुद्धा हे करायला पाहीजे. पण करे तो करे क्या, बोले तो बोले क्या ! समाजवादी उपाय ठरला ना.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Sat, 05/08/2021 - 08:02 नवीन
तो उपाय समाजवादी होत नाही. असे संरक्षण मिळावे यासाठीच आपण सगळे लोक कर भरतो. नाहीतर मग आपले आपणच सगळे करायचे असेल तर लोकशाही सरकार हवे कशाला?
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sat, 05/08/2021 - 08:34 नवीन
तुम्ही वर्णन केलेली संबंध गोष्ट समाजवादी धोरण आहे. बर्णी सँडर्स ला समाजवादी म्हणतात. तो म्हणतो काय ? बिलीनेयर लोकांकडून टॅक्स घ्या आणि गरिबांना स्वस्त उच्चशिक्षण आणि स्वस्त आरोग्य सुविधा द्या. सुरक्षेवरचा कमी करता येण्याजोगा खर्च कमी करा आणि लोकांच्या भल्यासाठी ते पैसे वापरा. फार्मा कंपन्यांना वाट्टेल त्या किमती ठेवण्याचे अनिर्बंध स्वातंत्र्य देऊ नका.
  • Log in or register to post comments
प
पिनाक Sat, 05/08/2021 - 09:21 नवीन
फार्मा कंपन्यांना वाट्टेल त्या किमती ठेवण्याचे अनिर्बंध स्वातंत्र्य देऊ नका.
आणि फार्मा मध्ये नवीन औषधांचे, लसींचे कित्येक वर्षे संशोधन करण्याचा खर्च या बरणी कडून आणि समाजवादी खोकडांकडून वसूल करा.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sat, 05/08/2021 - 09:48 नवीन
अर्धवट माहिती आणि खवचट टीका करण्यासाठी इतके आगतिक होऊ नका. पहिला जरा वाचत जावा चार गोष्टी. मेडिकल रिसर्चचा मोठा खर्च सरकारच उचलत असतेच. सध्या यूएस गव्हर्नमेंट आरोग्य रिसर्च मधल्या सर्वोच्च गुंतवणूकदारांपैकी एक आहे. कॅनडा मध्ये असे नियंत्रण आहे. तिथून अश्या धमक्या ऐकायला येतात का ? कॅनडा मध्ये हेल्थकेअर अत्यंत स्वस्त आहे. https://www.ncbi.nlm.nih.gov/books/NBK235736/
  • Log in or register to post comments
प
पिनाक Sat, 05/08/2021 - 10:24 नवीन
जर यूएस गव्हर्नमेंट एखाद्या फार्मा कंपनीत मुख्य भागीदार असेल तर औषधे फुकट द्यायला त्यांना कोणीही रोखत नाही. मात्र फार्मा कंपनी मध्ये त्यांची भागीदारी किती आहे यावर त्यांचा कंट्रोल ठरेल. फार्मा कंपन्यांना अनिर्बंध किंमती ठरवण्याचे स्वातंत्र्य देऊ नका असे कुणीही गव्हर्नमेंट मेजर शेअरहोल्डर असेल तर म्हणण्याचा संबंध च येत नाही. तिथे कंट्रोल गव्हर्नमेंट कडेच असतो. जिथे भागीदारी नाही किंवा रिसर्च ग्रॅंट दिलेली नाही अशा बद्दल वरील वाक्य आहे. जे चुकीचं आहे, कारण किंमत किती ठेवावी हे कॉस्ट + प्रॉफिट वर ठरवले जाते. तिथे फार्मा कंपन्या अनिर्बंध किंमत ठेऊ शकतात.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sat, 05/08/2021 - 10:32 नवीन
तुमचे मूळ वाक्य होते- मग रिसर्च करणार कोण.म्हणून मी सांगितले की अत्ता सुद्धा सरकार रिसर्च मध्ये मोठा पैसा ओततच असते. भागीदार नसली तरी जीवनावश्यक औषधांवर प्राईज कॅप असायलाच पाहिजे, कॅनडात आहे आणि परिणामी, सोशलाइझड हेल्थ केअर आणि फार्मा नियंत्रण मिळून त्यांचे हेल्थकेअर अत्यंत स्वस्त आहेत. जीवनावश्यक बाबींमध्ये एक्झॉर्बिटंट नफा मिळवू नये ही अपेक्षा रास्त आहे. कॉस्ट+प्रॉफिट अर्थातच राहणार.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Sat, 05/08/2021 - 11:40 नवीन
कॅनडा मध्ये असे नियंत्रण आहे. कॅनडा मध्ये हेल्थकेअर अत्यंत स्वस्त आहे. तशी ती ऑस्ट्रेलिया मध्ये पण आहे आणि युनाइटेड किंग्डम मध्ये तर फुकट चया जवळ य तिन्ही देश तसे पाश्चिमात्य भांडवशाही असून त्यांनी समाजवाद ( खरा, नकली नाही ) आणि भांडवलशाही याचा संगम करण्याचाच प्रयत्न केला आहे पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि हे करण्यासाठी भरपूर आयकर भराव लागतो.. ते विसरू नये /// नाण्याची एक बाजू फक्त बघून कसे चालेल
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sat, 05/08/2021 - 11:58 नवीन
अर्थातच .
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Sat, 05/08/2021 - 12:09 नवीन
आयकर सर्वांना असावा. सरकारी मदत घेणाऱ्याला कोणी भिकारी म्हणून हिनवणार नाही.
  • Log in or register to post comments
य
यश राज Sat, 05/08/2021 - 12:16 नवीन
UK मध्ये प्रत्येकी सरसकट ४०% आय कर भरला जातो व त्याचबरोबर IHS म्हणजेच NHS surcharge for healthcare प्रतिवर्ष प्रतिव्यक्ती ६२४ पौंड आकारला जातो.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Sat, 05/08/2021 - 12:22 नवीन
युकेमधील नॅशनल हेल्थ सर्व्हिसवर https://mises.org/wire/its-time-give-britains-national-health-service हा लेख वाचला होता. या लेखात म्हटले आहे की या पध्दतीत अगदी तातडीची ट्रीटमेंट मिळणे गरजेचे असले तरी खूप वेळ थांबायला लागते. हे खरे आहे का?
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Sat, 05/08/2021 - 12:29 नवीन
हे खरे आहे का?
हे अर्थात तुम्ही युकेत वास्तव्याला असाल तरच सांगू शकाल :) अन्यथा हा प्रश्न गैरलागू.
  • Log in or register to post comments
य
यश राज Sat, 05/08/2021 - 12:46 नवीन
UK मध्ये अगदी आपल्याकडे मिळू शकते तशी ट्रीटमेंट लगेच मिळत नाही. अगोदर त्यांना इमर्जन्सी नंबर वर कॉल करावा लागतो . त्यात primary assesment होते.. त्यानुसार ते लोक ठरवतात की किती तातडीने मदत हवी आहे. जर योग्य वाटले तरच ते ambulance पाठवतात अन्यथा तुम्ही स्वतःच्या वाहनातून या असे सांगतात. बरं जरी ANE ( accedents ani emergency) मध्ये गेलात तरी लगेच मदत मिळत नाही. तीतेसुधा २ assessment होतात जे शिकाऊ डॉ किंवा nurses कडून केले जाते. त्यामध्ये ते ठरवतात की खरंच गरज आहे की नाही अन्यथा पेशंट ची बोळवण केली जाते. दुसऱ्या assesment नंतर जर खरंच गरज असेल तर मग पेशंट ला admit करतात. त्यानंतर पेशंट ची पूर्ण जवाबदारी त्यांची असते व ते प्रामाणिकपणे निभावतात ही. माझ्या मुलीच्या बाबतीत, मित्रांबरोबर खेळता खेळता तिच्या मित्राकडून चुकून प्लास्टिक चमच्यामुळे तिच्या डोळ्याच्या बुबुळा मध्ये जखम झाली . रात्री १० वाजता आम्ही ANE मध्ये पळालो. वरचे सर्व सोपस्कार पार पडले. साधारण पहाटे ३:३० ला आम्हाला मुख्य डॉ.भेटले. तोपर्यंत मुलगी अक्षरशः तळमळत होती व आम्ही सारखी विनंती करत होतो की तिला अगोदर check करा पण त्यांनी पहाटेचे ३:३० वाजवले. विशेष म्हणजे गर्दी नव्हतीच तरीसुद्धा. तपासल्यानंतर त्यांनी फक्त एक डोळ्यात टाकण्यासाठी एक antibiotics drop दिला व घरी जायला सांगितले. आमच्या जीवात जीव नव्हता. पण काय करणार. सकाळी ५ वाजता घरी पोहोचलो. मुलगी झोपलीच नाही आणि डोळ्यात औषध पण टाकू देईना. कसेतरी दिवसभरात औषध टाकत राहिलो आणि त्यानंतर संध्याकाळी तिला बरे वाटले व तिने डोळे उघडले.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Sat, 05/08/2021 - 13:04 नवीन
माझ्या मुलीच्या बाबतीत, मित्रांबरोबर खेळता खेळता तिच्या मित्राकडून चुकून प्लास्टिक चमच्यामुळे तिच्या डोळ्याच्या बुबुळा मध्ये जखम झाली . रात्री १० वाजता आम्ही ANE मध्ये पळालो. वरचे सर्व सोपस्कार पार पडले. साधारण पहाटे ३:३० ला आम्हाला मुख्य डॉ.भेटले. तोपर्यंत मुलगी अक्षरशः तळमळत होती व आम्ही सारखी विनंती करत होतो की तिला अगोदर check करा पण त्यांनी पहाटेचे ३:३० वाजवले. विशेष म्हणजे गर्दी नव्हतीच तरीसुद्धा.
बापरे. भारतात परिस्थिती मग बरीच बरी आहे/होती असे म्हणायचे (सध्याचा काळ येण्यापूर्वी).
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sat, 05/08/2021 - 14:15 नवीन
तुम्ही निष्पक्षपणे वर्णन केले आहे. तुमचे मत काय आहे ? सोशलाईझ्ड हेल्थ केअर असावी कि नसावी ? किंवा, वरील घटना घडू नये म्हणून सोशलाईझ्ड हेल्थ केअर तसेच ठेऊन ओपरेशनल बदल करावेत ? बर्णी ने जो रोगन पॉडकास्ट वर एक दावा केला- कॅनडा मध्ये सोशलाईझ्ड हेल्थ केअर मध्ये पर कॅपिटा खर्च अमेरिकेत नागरिकांकडून होणाऱ्या पर कॅपिटा खर्चा पेक्षा कमी आहे. सँडर्सला जास्तकरून त्याचे म्हणणे मांडण्याची संधी मिळत नाही. ती संधी त्याला रोगनच्या पॉडकास्ट वर मिळाली. तो पॉडकास्ट सगळ्यांनी ऐकावा किंवा वाचावा म्हणून लिंक देत आहे. ट्रान्सस्क्रिप्ट- https://scribie.com/blog/2019/08/bernie-sanders-on-joe-rogan-experience-1330-transcripts2020/ युट्युब- https://youtu.be/2O-iLk1G_ng
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sun, 05/09/2021 - 10:54 नवीन
Pressure is growing on the government to take urgent steps to tackle waiting time figures for the almost five million people seeking hospital treatment in England—a number that has reached a record high. The latest referral to treatment statistics1 from NHS England published on 15 April 2021 show that 4.7 million people were waiting to begin treatment at the end of February this year—the highest number since records began in 2007. Of those 4.7 million people, 387 885 patients were waiting more than 52 weeks for routine operations and procedures, which was an increase from 224 205 in December 2020. It is also the highest number since December 2007. https://www.bmj.com/content/373/bmj.n995.full
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sun, 05/09/2021 - 11:09 नवीन
आपल्या कडच्या वैद्यकीय सेवेस कायम नावे ठेवणाऱ्या असंख्य लोकांनी जर वस्तुस्थिती समजून घेतली तर बरे होईल. कमरेच्या खुब्याचे हाड मोडल्यावर तेथे शल्यक्रिया करण्यासाठी ७८ दिवस लागतात हा वेळ २१५ दिवसावरून ७८ दिवसावर आला आहे ( ७ महिन्यांचा अडीच महिन्यावर आला आहे ) the median wait for a hip replacement in the UK fell from 215 days in 2001 to 78 by 2008. Returning NHS waiting times to 18 weeks for routine treatment https://www.health.org.uk/publications/long-reads/returning-nhs-waiting-times-to-18-weeks The average waiting time for hospital treatment in England, including general surgery, is now 15.3 weeks The number of people waiting six weeks or more for diagnostic tests such as MRI scans is at an all-time high https://www.theguardian.com/society/2020/jul/09/nhs-patients-in-england-face-longest-ever-wait-for-surgery-and-cancer-care
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 05/11/2021 - 04:29 नवीन
युकेमधील एन.एच.एस किंवा इतर देशातील सरकारी वैद्यकीय सेवा सगळ्यांना (अगदी गरीबातल्या गरीबालाही) उपलब्ध असतात म्हणून या सेवा खूप यशस्वी आहेत असा अनेकांचा दावा असतो. पण जर तातडीच्या सेवेसाठी पण असे अनेक आठवडे थांबावे लागत असेल तर या सेवेला यशस्वी का आणि कोणत्या आधारावर म्हणायचे? मला वैद्यकीय क्षेत्रातले काहीही म्हणजे अगदी काहीही माहित नाही. तरीही तातडीची सेवा वेळेत न मिळाल्यास रूग्णावर काहीतरी वाईट परिणाम होत असेलच याची कल्पना करता येते. यातून काही रूग्णांचा मृत्यू अन्यथा झाला असता त्यापेक्षा लवकर होणे हा पण एक परिणाम असू शकतो का? म्हणजे सगळ्यांना (अगदी गरीबातील गरीबांनाही) त्यामानाने कमी गंभीर आजारासाठी सेवा मिळायला पाहिजे म्हणून अधिक गंभीर रूग्णांना वेळेत सेवा न मिळून त्यांचा मृत्यू होत असेल (तसे होत असल्यास) तर या पध्दतीला कित्ती कित्ती यशस्वी म्हणणे हा प्रकार केवळ डावे विचारवंतच करू शकतात.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 05/11/2021 - 05:01 नवीन
तातडीच्या सेवेसाठी पण असे अनेक आठवडे थांबावे लागत असेल तर या सेवेला यशस्वी का आणि कोणत्या आधारावर म्हणायचे? मग दुसरी बाजू अशी कि जेव्हा लोकसंख्येचं एका भागला काहीच उपाय परवडणे शक्य नाही त्याला काय म्हणायचे ? फक्त पैसे आहे तर उपाय आहे हे सुद्धा किती भीषण आहे ! नाही ? येथे समजा थांबायची तयारी नसेल आणि उत्पन्न चांगले असल्यामुळे इतर देशात जाऊन ( थायलंड , भारत ) सेवा घेणे परवडू शकते ... नॅशनल हेअल्थ सेवा "यशस्वीच" आहेत असा अजिबात दावा नाहीये... प्रत्येक पद्धतीचे गुण दोष आहेत ( मी इंग्लंड सारखी पण १००% इंग्लंड सारखी नसलेली ऑस्ट्रेलियातील मेडिकेअर " बद्दल नक्कीच अनुभवातून बोलू शकतो , चांगले आणि वाईट ) अति तातडीचं सर्जरी ला थांबावे लागते असे नाही ( अपघात वैगरे ) मध्यम तातडीच्या सर्जरी ला वेळ लागतो हा दोष आहे पण त्याबरोबर गुण हि पहा ना ... ( अर्थात भारताशी तुलना नाही ) - महागडे उपाय सर्व सामन्याला हि परवडतात ( मी एकदा एम आर आय फुकट आणि पार्किंग चे २० डॉलर असे अनुभवले आहे ) - चाचण्या आणि रेडिओलॉजी फुकट ! आणि त्यास्तही फारसे थांबावं लागत नाही खाजगीच असते सरकार ,, परस्पर पैसे देते - माध्यम शहरात सुद्धा आधुनिक सेवा आणि त्यात नुसत्या ऍम्ब्युलन्स नाही तर विमानाने रोग्यास नेणे वैगरे बरे प्रत्येक देशाचे प्रश्न वेगळे असतात , इंग्लंड मध्ये अगदी निर्मनुष्य भाग आणि तिथे ५-१० घरे असे फार कमी असावे त्यामानाने शेकडो किलोमीटर कोणी नाही असे कानडा आणि ऑस्ट्रेलिया मध्ये आहे म्हणजे त्यासनाही या देशांना सरकारला वेगळं कारच करावा लागतो https://www.flyingdoctor.org.au/what-we-do/aeromedical-retrieval/ तेव्हा सरसकट सगळे "भिकार" किंवा "अद्वितीय" असे होत नाही ... टीका करणे सोप्पे असते
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 05/11/2021 - 05:47 नवीन
जेव्हा लोकसंख्येचं एका भागला काहीच उपाय परवडणे शक्य नाही त्याला काय म्हणायचे ? फक्त पैसे आहे तर उपाय आहे हे सुद्धा किती भीषण आहे ! नाही ?
आहेच ना. पण या भागाला वैद्यकीय सेवा परवडायला हव्यात म्हणून जो उपाय केला जात आहे त्यातून अधिक गंभीर रूग्णांवर त्याचा परिणाम होतो (त्यात त्याच वर्गातले लोकही आले. केवळ श्रीमंत लोकच गंभीर रूग्ण असतात आणि गरीब नसतात असे काही नसते) याचा विसर पडू नये इतकेच.
मी एकदा एम आर आय फुकट आणि पार्किंग चे २० डॉलर असे अनुभवले आहे
फुकट काही नसते हो. कोणीतरी अधिक करांच्या स्वरूपात त्याची किंमत चुकती केलेली असते. त्यात तुम्हीसुध्दा आलात.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 05/11/2021 - 07:14 नवीन
फुकट काही नसते हो. कोणीतरी अधिक करांच्या स्वरूपात त्याची किंमत चुकती केलेली असते. त्यात तुम्हीसुध्दा आलात. हो ना पण तो कर भरायला फारशी हरकत नाही येथे कारण त्याचाच उपयोग सार्वजनिक सोयीनसाठी होत्यांना दिसतो... त्यामुळे जरी उजवे भांडवलशाही सरकार आले तरी येथे या "सोशालिस्ट" दिसणाऱ्या चालीरीतींना धुडकावून दिले जात नाही ... त्यामुळे पाश्चिमात्य असून सुद्धा टोकाची भांडवशी अनेकांनी झुगारली आहे ... कुठेतरी मध्ये आणणे परवडते आह तेम्हणून चालू आहे ...
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Tue, 05/11/2021 - 05:52 नवीन
लगेच उपलब्ध असते. तिच्यासाठी एन. एच. एसमध्ये कुणाला थांबावे लागत नाही, अशी माझी माहिती आहे. मी रहातो तेथेही पब्लिक हॉस्पिटल्सची अ‍ॅक्सिडंट व इमर्जन्सी तात्काळ उपलध असते- अगदी कुणालाही. आम्हा रेसिडंट्सना एक अतिशय वाजवी दाम पडतो; नॉन- रेसिडंट्सना जास्त पैसे पडतात.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 05/11/2021 - 05:57 नवीन
लगेच उपलब्ध असते. तिच्यासाठी एन. एच. एसमध्ये कुणाला थांबावे लागत नाही, अशी माझी माहिती आहे.
तसे होत असेल तर चांगलेच आहे. पण डॉ. खरेंनी दिलेल्या लिंकमध्ये आणि मी मुळात मिजेस.ऑर्गवरील लिंकमध्ये तरी वेगळे चित्र दिसत आहे. तसेच यश राज यांनी युकेतला अनुभव लिहिला आहे त्यातही वेगळे चित्र दिसत आहे. हे कितपत प्रातिनिधीक आहेत- हा नियम आहे की अपवाद आहे हे माहित नाही.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 05/11/2021 - 07:23 नवीन
आपत्कालीन परिस्थी कि इलेक्टिव्ह सर्जरी कि दोन वेगळ्या गोष्टी
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 05/11/2021 - 07:52 नवीन
Why wait times for specialists are still too long https://healthydebate.ca/2017/02/topic/referral-wait-times-specialists/ In England, an urgent referral means that you should see a specialist within 2 weeks https://www.cancerresearchuk.org/about-cancer/cancer-in-general/treatment/access-to-treatment/waiting-times-after-diagnosis आपल्याकडे पैसा असेल तर भारतासारखी उत्तम वैद्यकीय सुविधा आपल्याला साधारण कोणत्याही पाश्चात्य देशात मिळणार नाही. यात केवळ विशीष्ट आजाराचा उपचार हा भाग नसून त्यासाठी लागणारा वेळ पैसा आणि होणार मानसिक त्रास आणि तणाव हे गृहीत धरावे लागेल. वर दिले आहे त्याप्रमाणे जर आपल्या नातेवाईकाला कर्करोग आहे असे निदान झाले तर त्यासाठीच्या तज्ज्ञाला भेटण्यासाठी २ आठवडे सरासरी थांबावे लागले तर त्या काळात होणार मानसिक तणाव किती असेल याची किंमत पैशात अजिबात करता येणार नाही. माझ्या आईला कर्करोग निदान झाल्यावर तिसऱ्या दिवशी सगळे रिपोर्ट/ अहवाल हातात घेऊन मी कर्करोग तज्ज्ञाला भेटायला जाऊ शकलो. सर्व तपासणी करून प्रत्यक्ष शल्यक्रिया करण्यासाठी १ महिना लागला तरी नुसते तज्ज्ञाला भेटायलाच २ आठवडे लागत असतील तर त्या काळात येणाऱ्या मानसिक तणावाची पैशात आपण काय किंमत करणार? जर पैसे असतील तर खाजगी रुग्णालयात नसतील तरी टाटा सारख्या ठिकाणी जाता येते. टाटा मध्ये आपला नंबर लागेपर्यंत फार तर दिवसभर थांबायला लागेल. पण आलेल्या प्रत्येक रुग्णाला तज्ञ माणसाला त्याच दिवशी भेटता येते. याचे एक महत्त्वाचे कारण आपल्याकडे पेपरवर्क हे अत्यंत कमी आहे. संशोधनाच्या दृष्टीने हे वाईट असले तरी प्रत्यक्ष रूग्णाच्या दृष्टीने हि एक अतिशय चांगली गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 05/11/2021 - 08:16 नवीन
तातडी नसली तरी अनेक वेळेस शक्यतो लवकर शल्यक्रिया करा असा सल्ला दिला जातो तेंव्हा रुग्णाची स्थिती काय असेल ते हि गृहीत धरावे लागते. उदा. काल माझ्या कडे एक बाई आल्या होत्या त्यांच्या मूत्रपिंडात ४. ५ सेंमी आकाराचा मुतखडा होता ज्यामुळे त्यांच्या मूत्रपिंडात लघवी साठून त्यावर ताण येत होता. अशा रुग्णाला तातडीची नाही तरी शक्य तितकी लवकर शल्यक्रिया करावी लागते कारण दिवसागणिक मूत्रपिंडाचे काम कमी होत जाते. किंवा मागच्या आठवड्यात एक गृहस्थ आले होते त्याना हर्निया होता.( पोटातून आतडी बाहेर येत होती) शल्यक्रिया लवकर करावी असा सल्ला दिला होता अशा माणसाला सहा आठ महिने लागले तर पोटाचे भोक मोठे होत जाते आणि सध्या टाक्यांची शल्यक्रिया जास्त मोठी होते आणि भोकी मोठे झाल्यामुळे तेथे जाळी लावली लागते आणि ती चारी बाजूनी शिवावी लागते. निवृत्त झालेल्या माणसांना तर आपली प्रकृती हा एक पूर्ण वेळ डोक्यात राहणार विषय असतो, त्यांच्याशी संवाद साधून पहा म्हणजे लक्षात येईल. कर्करोगाचे बाबतीत तर अर्धवट ज्ञानामुळे माणसे गर्भगळीत होतात अशा स्थितीत महिनोन्महिने लागत असतील तर रुग्णाची स्थिती काय होईल हे आपल्याला सांगता येणार नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Tue, 05/11/2021 - 08:27 नवीन
ह्यांत फरक आहे. यश राज ह्यांनी इमर्जन्सीचे उदाहरण दिले आहे. तिथे ट्रिएज केल्यानंतर हॉस्पिटलने त्यांच्या अ‍ॅसेसमेंटनुसार, व शक्य होईल तितक्या लवकर इलाज केलेले दिसतात. डॉ. खर्‍यांच्या दुव्यात इतर सर्व ट्रीटमेंट्ससाठी असणार्‍या प्रतिक्षेचा उल्लेख आहे. अर्थात एन, एच. एस. अगदी आदर्श आहे, असा दावा नाही. त्याच्यावर असह्य ताण आहेच. मला वाटते, २००८ नंतरच्या मंदीनंतर तेथील सरकारने त्यांचे फंडिंग कमी केले, हे एक कारण. दुसरे, त्या संस्थेस, डॉक्टर्स व नर्सेस ह्यांच्यासाठी खाजगी हॉस्पिटलांशी स्पर्धा करावी लागते, त्यांत ती अर्थात मार खाते. ह्यावरून आमच्या येथील सरकारी, तत्सम सेवेविषयी सांगतो. अनेक दशके ए. अँड. ई. संपूर्ण विनामूल्य होती. पण माणसे दिवस रात्र अगादी छोट्या कारणांसाठीही तेथे जाऊ लागली. तेव्हा काही वर्षांपासून मग त्यांनी ह्याच्यासाठी एक छोटीशी फिक्ड् रक्कम आकरणे सुरू केले. त्यानंतर ए. अँड. ई. वरील ताण बराच कमी झाला.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Sat, 05/08/2021 - 10:16 नवीन
बर्नी सँडर्ससारखे लोक अत्यंत ढोंगी आहेत. बर्नीला एक प्रश्न विचारावासा नेहमी वाटतो. तो म्हणतो की श्रीमंतांवर कर लावावा आणि त्यातून गरीबांसाठी खर्च करावेत. एक साधा गुगल सर्च सांगतो की सिनेटरला वर्षाला १.७४ लाख डॉलर्स इतका पगार मिळतो. तर अमेरिकेतील मिडिअन इनकम वर्षाला ३१,१३३ डॉलर्स आहे. बर्नी सँडर्स २००७ पासून सिनेटर आहे. याचा अर्थ बर्नी गेल्या १४ वर्षांपासून मधल्या अमेरिकन माणसापेक्षा पाच ते साडेपाच पटींनी जास्त कमावत आहे. हा पाच-साडेपाच पटींचा हिशेब मिडिअन उत्पन्न गृहित धरून आहे. त्यापेक्षा कमी कमावणारे अमेरिकन आहेतच. त्यांच्यापेक्षा बर्नी दहा पटींनी जास्त कमावतो. काहीही असले तर बर्नी दरवर्षी १ लाख ७४ हजार वजा ३१ हजार = १ लाख ४३ हजार डॉलर्स दान करतो का? सरकारने श्रीमंतांवर अधिक कर लावावा याचा अर्थ कोणत्या तरी मार्गाने श्रीमंतांनी आपले अधिकचे उत्पन्न गरीबांसाठी द्यावे. सरकारने कर वाढवायची वाट का बघता? तुम्ही तुमच्या पातळीवर ती सुरवात करूच शकता की. मग करा दरवर्षी १.४३ लाख डॉलर्स दान. समजा ४० हजार कर बर्नी दरवर्षी भरत असेल तरी वरचे लाखभर डॉलर्स दान करायला त्याला काहीच हरकत नसावी. अमेरिकेतही गरीबांसाठी काम करणार्‍या भरपूर संस्था आहेत. त्यापैकी एखाद्या संस्थेला बर्नी दान का करत नाही? जेव्हा सरकार कराची टक्केवारी वाढवेल तेव्हा दान करायची रक्कम कमी करता येईल. बर्नीने मध्यंतरी मीमचा लिलाव करून १.८ मिलिअन एका संस्थेसाठी उभे केले. मी ते म्हणत नाहीये. तर सिनेटर म्हणून जो पगार मिळतो त्यातून दान का करत नाही हा माझा प्रश्न आहे. कारण इतर अमेरिकन्सनी तसेच करावे अशी त्याची अपेक्षा असते. मग स्वतः तेच करून आदर्श घालून द्यायला हरकत नसावी नाही का? म्हणूनच डावे विचारवंत सगळ्यात ढोंगी असतात. इतरांनी अमुक करावे, इतरांनी तमुक करावे म्हणून हे लोक उंटावरून शेळ्या हाकणार. जे काही करायचे ते इतरांनी करायचे हे स्वतः काहीही करणार नाहीत. तेव्हा माझा मिसळपाववरील सदस्यांपासून अमेरिकेतील सिनेटरपर्यंत सगळ्यानांच हा प्रश्न आहे. जर श्रीमंतांवर कर लावून तो पैसा गरीबांसाठी खर्च करावा असे तुमचे म्हणणे असेल तर तुम्ही स्वतः तुमचे उत्पन्न वजा देशाचे सरासरी उत्पन्न यातील फरक दान का करत नाही? सामान्य भारतीय राहतो त्यापेक्षा कितीतरी चांगल्या पध्दतीची लाईफस्टाईल तुम्ही का ठेवता? इतरांनी काय करावे हे सांगण्यापूर्वी आपण तेच करून आदर्श घालून का देत नाही? असे मत असलेले किंवा बर्नी सारख्याला पाठिंबा देणारे ९९.९९% लोक प्रत्यक्षात तसे करत नाहीत हे वेगळे सांगायलाच नको. ग.प्र.प्रधानांसारखे अगदी थोडे- हाताच्या बोटावर मोजण्याइतके. माझा मुद्दा त्यांच्यासारख्यांविषयी नाहीच. माझा प्रश्न इतरांविषयी आहे.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Sat, 05/08/2021 - 10:24 नवीन
म्हणूनच डावे विचारवंत सगळ्यात ढोंगी असतात. इतरांनी अमुक करावे, इतरांनी तमुक करावे म्हणून हे लोक उंटावरून शेळ्या हाकणार. जे काही करायचे ते इतरांनी करायचे हे स्वतः काहीही करणार नाहीत.
अगदी बरोबर आहे. अश्या विचारसरणीचा अक्षरशः उबग आला आहे. एखाद्याला मदत करणे हे दुसऱ्याचे कर्तव्य आहे हा तिसऱ्याचा आदेश असू नये.
  • Log in or register to post comments
प
पिनाक Sat, 05/08/2021 - 10:29 नवीन
तसं इथल्या कम्युनिस्टांनी मला दान करायलाही हरकत नाही. तसंही माझं उत्पन्न अमेरिकेतल्या मेडिअन उत्पन्ना इतकं नाहीच. कुणकुणाला पाठवू अकाउंट नंबर? ☺️
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Sat, 05/08/2021 - 10:46 नवीन
खूपच सकारात्मक बदल. स्वागत आहे.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sat, 05/08/2021 - 10:45 नवीन
व्यक्तिगत मदत विरुद्ध सिस्टमिक मदत ह्यांचातला फरक वारंवार नजरेआड केल्याशिवाय काही युक्तिवाद नाही. पोलीस दल नावाचा प्रकार असावा असे बऱ्याच गरीब, दुबळ्या, श्रीमंत, पेहेलवान अश्या वेगवेगळ्या लोकांनी मुद्दा मांडला. लगेच कॉन्सर्व्हेटिव्ह आले आणि पेहेलवानांना म्हणाले- हिपोक्रीट कुठले. तुम्ही आहात ना पेहेलवान, मग तुम्ही करा की वाईट लोकांशी कुस्ती. नाहीतर पोलीस दल वैगेरे मागणी करू नका. जिथे सहजगत्या शक्य आहे तिथे नक्कीच कलेक्टिव्हली मदत व्हावी. बर्णी सँडर्स ऍट वर्स्ट हिपोक्रीट असेल. त्याच्या कल्पनांवर त्याने काही फरक पडत नाही. सँडर्स हिपोक्रीट असला तरी त्याच्या पॉलिसी जनतेच्या भल्यासाठीच आहेत. जर सँडर्सने टॅक्स फ्रॉड न करता त्याचे पैसे भरले असतील तर त्यात काही गैर नाही. तो जे टॅक्स रिफॉर्म मागतो त्यात त्याचे सुद्धा उत्पन्न जास्त टॅक्स होणार हे सरळ आहे. बर्णीला माहित आहे की एकत्यादुक्त्या माणसाच्या गेश्चर पेकशा कलेक्टिव्ह प्रयत्न जास्त परिणामकारक असतात.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Sat, 05/08/2021 - 12:12 नवीन
अपेक्षित प्रतिसाद. सरकारी पातळीवर जास्त कर गोळा करणे आणि सिस्टेमिक मदतदेणे जेव्हा व्हायचे तेव्हा होईलच हो. तोपर्यंत काय हा प्रश्न आहे. आणि अगदी शून्य (किंवा तुटपुंजी) मदत करण्यापेक्षा वैयक्तिक पातळीवर होईल तितकी मदत सामाजिक कॉजसाठी झालेली चांगली नाही का? तेव्हा- १. सामान्य भारतीयापेक्षा कित्येक पटींनी उत्पन्न असलेल्या आणि सामान्य भारतीय राहतो त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक चांगल्या ठिकाणी आणि अधिक चांगल्या पध्दतीने राहणार्‍यांकडून जास्त कर घ्यावा असे म्हणणे असेल २. आपण त्याच गटात असू (सामान्य भारतीयांपेक्षा कितीतरी जास्त पटींनी उत्पन्न/राहणीमान) ३. सरकार अजूनपर्यंत तसा कर लादत नसेल तर तसा कर लादेपर्यंत सिस्टेमिक नाही तरी वैयक्तिक मदत करता येऊच शकते. काय म्हणता?
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sat, 05/08/2021 - 13:44 नवीन
तोपर्यंतपण आणि त्यानंतर पण गरजू व्यक्तीला आपल्याला शक्य तेव्हडी मदत व्हावीच. पण असे करणे व्यवस्था करू शकणाऱ्या मदतीला सबस्टिट्यूट ठरत नाही, असे म्हणणे आहे.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sat, 05/08/2021 - 13:15 नवीन
लोकांच्या भल्यासाठी एखादी गोष्ट व्हावी किंवा सरकारने करावी असे जर वाटत असेल तर त्याची सुरुवात स्वतपासून का करु नये? तिथं मग व्यक्तिगत मदत विरुद्ध सिस्टमिक मदत अशी पळवाट कशाला? असा जर भेदभाव असेल तर ती लोकांबद्दल वाटणारी कळकळ निव्वळ ढोंग आहे असे वाटते. माझा प्रतिसाद फक्त एव्हढ्याच मुद्द्यापुरता मर्यादीत आहे :)
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sat, 05/08/2021 - 13:42 नवीन
स्वतः पासून सुरुवात करू नये असे माझे म्हणणे नाहीच. व्यक्तिगत पातळीवर एकमेकांना शक्य तितकी मदत केली जावीच, शंका नाहीच. पण वैयक्तिक मदत सिस्टमिक मदतीसाठी सबस्टिट्यूट होणे मला तरी दिसत नाही. पण राजकीय आणि आर्थिक चर्चांमध्यें कलेक्टिव्ह बद्दल बोलताना व्यक्तिगत मदतीचा मुद्दा हा डिस्ट्रॅक्शन आहे. हे मला ठामपणे वाटते. मताचा आदर आहेच.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Mon, 05/10/2021 - 07:00 नवीन
रॉबीनहूड कर प्रणाली नकोच. त्यामुळे उद्योग अन नोकरधंदा उपलब्ध करुन देणारे उद्योजक आपला पयसा दुसरीकडे खेळवतात. बाकी ह्याचा एक फॉलाऔट म्हणजे, अमेरिकेत हाय नेट वर्थ असणारे लोक्स आता घटस्फोट घेउन कर वाचवायच्या मागे लागणार आहेत, अशीही एक अफवा ऐकलिये. कुठलतरी प्रॉपर्टी टॅक्स घटस्फोटीत / लिव्ह इन मध्ये असणार्या लोकांना लागत नाही म्हणे ;) असो आपल्याला काय ?
  • Log in or register to post comments
क
कॉमी Mon, 05/10/2021 - 08:37 नवीन
हे जनरल सत्य म्हणून खरे असले तरी स्पेसिफिकली कसे होईल आणि किती प्रमाणात होईल मला अंदाज नाही. उदाहरणार्थ, ट्रम्प ने भला मोठ्ठा टॅक्स कट दिला, जो श्रीमंतांसाठी अतिशय उत्तम आणि मध्यमवर्गीयांसाठी त्यामानाने अगदी छोटेशे कट होते. २५०००$ उत्पन्न असलेल्या घरांना- ६०$ सरासरी टॅक्स क्त मध्ये फायदा मिळाला. ३.४मिलियन $ उत्पन्न असलेल्या घरांना जवळपास १.९३ लाख $ फायदा झाला. आणि, तुम्ही म्हणता त्याच लॉजीकने ट्रम्प म्हणलेला कि टॅक्स कट मुले धंदा वाढेल, उत्पन्न इतके वाढेल कि कर दर कमी असून सुद्धा सरकारचा महसूल तितकाच राहील किंवा वाढेल. आणि हे त्याचे मत अधांतरी आणि बेसलेस होते हे समजण्यासारखेच होते. आज ट्रम्पच्या टॅक्स कट मुळे पुढील १० वर्षांत १.५ ट्रिलीयन $ डेफिसीट होईल अशी प्रेडिक्शन्स आहेत. https://youtu.be/G6dz41iUrj8 मुद्दा काय- टॅक्स दर वाढवल्यावर बिझनेज दुसरीकडे जातात आणि कमी झाल्यावर परत येतात हे जनरल सत्य असले तरी त्याचा परिणाम ओव्हररेटेड आहे असे माझे मत आहे. हे मत फारसे अभ्यासपूर्ण नाही हे कबूल.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 05/11/2021 - 04:19 नवीन
उदाहरणार्थ, ट्रम्प ने भला मोठ्ठा टॅक्स कट दिला, जो श्रीमंतांसाठी अतिशय उत्तम आणि मध्यमवर्गीयांसाठी त्यामानाने अगदी छोटेशे कट होते. २५०००$ उत्पन्न असलेल्या घरांना- ६०$ सरासरी टॅक्स क्त मध्ये फायदा मिळाला.
टॅक्स कट दिला की तो डॉलरमध्ये नेहमी श्रीमंतांनाच फायदेशीर असतो कारण मुळात श्रीमंत लोक जास्त कर भरणे अपेक्षित असते*. पण टक्केवारीत तो गरीबांना फायदेशीर ठरतो. याविषयी युनिव्हर्सिटी ऑफ जॉर्जियाचे प्रा.डॉ.डेव्हिड केमरश्चेन यांनी लिहिलेले 'बिअर इकॉनॉमिक्स' पेक्षा चपखल उदाहरण दुसरे नाही. १९८० च्या दशकात रॉनाल्ड रेगन (हो सगळ्या जगातले डाव्यांना ज्यांच्याविषयी कमालीचा राग असतो तेच रेगन) अध्यक्ष असताना अशा करसवलती दिल्या होत्या. तेव्हा पण अशीच टीका केली गेली होती आणि तेव्हाही हेच उत्तर दिले गेले असेल याची खात्री आहे. अर्थात डाव्या विचारसरणीच्या लोकांना या सगळ्या गोष्टी समजत असतील किंवा समजून घ्यायच्या असतील असे वाटत नाही. Suppose that every day, ten men go out for beer and the bill for all ten comes to $100. If they paid their bill the way we pay our taxes, it would go something like this: The first four men (the poorest) would pay nothing. The fifth would pay $1. The sixth would pay $3. The seventh would pay $7. The eighth would pay $12. The ninth would pay $18. The tenth man (the richest) would pay $59. So, that’s what they decided to do. The ten men drank in the bar every day and seemed quite happy with the arrangement, until one day, the owner threw them a curve. ‘Since you are all such good customers,’ he said, ‘I’m going to reduce the cost of your daily beers by $20. Drinks for the ten now cost just $80.’ The group still wanted to pay their bill the way we pay our taxes so the first four men were unaffected. They would still drink for free. But what about the other six men – the paying customers? How could they divide the $20 windfall so that everyone would get his ‘fair share?’ They realized that $20 divided by six is $3.33. But if they subtracted that from everybody’s share, then the fifth man and the sixth man would each end up being paid to drink his beer. So, the bar owner suggested that it would be fair to reduce each man’s bill by roughly the same amount, and he proceeded to work out the amounts each should pay. And so: The fifth man, like the first four, now paid nothing (100% savings). The sixth now paid $2 instead of $3 (33%savings). The seventh now pay $5 instead of $7 (28%savings). The eighth now paid $9 instead of $12 (25% savings). The ninth now paid $14 instead of $18 (22% savings). The tenth now paid $49 instead of $59 (16% savi ng s). Each of the six was better off than before and the first four continued to drink for free, but once outside the restaurant, the men began to compare their savings. “I only got a dollar out of the $20,” declared the sixth man. He pointed to the tenth man, “but he got $10!” “Yeah, that’s right,” exclaimed the fifth man. “I only saved a dollar, too. It’s unfair that he got TEN times more than I!” “That’s true!!” shouted the seventh man. “Why should he get $10 back when I got only two? The wealthy get all the breaks!” “Wait a minute,” yelled the first four men in unison. “We didn’t get anything at all. The system exploits the poor!” The nine men surrounded the tenth and beat him up. The next night the tenth man didn’t show up for drinks, so the nine sat down and had beers without him. But when it came time to pay the bill, they discovered something very important….they didn’t have enough money between all of them for even half of the bill! And that, boys and girls, journalists and college professors, is how our tax system works. The people who pay the highest taxes get the most benefit from a tax reduction. Tax them too much, attack them for being wealthy, and they just may not show up anymore. In fact, they might start drinking overseas where the atmosphere is somewhat friendlier. David R. Kamerschen, Ph.D. Professor of Economics University of Georgia For those who understand, no explanation is needed. For those who do not understand, no explanation is possible! संदर्भः https://thebasispoint.com/beer-economics-from-university-of-ga-professor/
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 05/11/2021 - 06:32 नवीन
फारच भारी उदाहरण!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    19 hours 45 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    20 hours 1 minute ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 4 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा