Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - मे २०२१ (भाग 2)

म
मुक्त विहारि
Fri, 05/07/2021 - 06:47
🗣 174 प्रतिसाद
संगमनेरमध्ये गर्दी केल्याचा जाब विचारणाऱ्या पोलिसांना पाठलाग करुन मारहाण; धक्कादायक व्हिडीओ व्हायरल... https://www.loksatta.com/maharashtra-news/people-attack-on-police-in-sangamner-ahmednagar-sgy-87-2464555/ -------- तडीपार गुंडाने पोलीस अधिकाऱ्याचा गळा चिरला, हत्याकांडाने पुण्यातील बुधवार पेठ हादरली https://www.tv9marathi.com/crime/pune-police-asi-sameer-sayyad-murdered-by-tadipar-goon-pravin-mahajan-near-budhwar-peth-crime-news-today-450790.html ------------- साधू हत्याकांड, सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण, सामान्य माणसाला जीवे मारण्याची धमकी देणारा आमदार, आणि आता वरील बातम्या ..... ----------- कायद्याचा धाक नसेल तर, अशा बातम्या येतच राहणार ... खिळ्या परी नाल गेली, नाली पाई घोडा गेला, घोड्या पाई स्वार गेला, स्वारा पाई राष्ट्र गेले..... इतका अनर्थ खिळ्याने केला....

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 57960 views

🗣 चर्चा (174)
आ
आग्या१९९० गुरुवार, 05/13/2021 - 08:19 नवीन
सध्याच्या केंद्र सरकारने अदनानला भारतीय नागरीकत्व का दिले ह्याचे उत्तर द्या. सूर्य योग्य दिशेलाच उगवतो, वाळूत डोके खूपसून बसत नाही.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा गुरुवार, 05/13/2021 - 08:54 नवीन
पाकिस्तानात कट्टर मुसलमानांकडून छळ होत असेल तर कोणत्याही धर्माचा नागरिक भारतात आश्रय घेऊ शकला पाहिजे. धर्मधारीत नागरिकत्व कशाला हवे?
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे गुरुवार, 05/13/2021 - 09:00 नवीन
पाकिस्तानी मुस्लिमांनी भांडूण भारताचा तुकडा पाडला की, अत्ता त्यांच्यावर तिथे अत्याचार होत असेल तर परत भारतामध्ये आश्रय कशाला द्यायचा? पाकिस्तानी हिंदूंना मात्र आश्रय दिला पाहिजे. कारण त्यांना भारत सोडून कुठलाच देश जवळ करणार नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 05/13/2021 - 09:45 नवीन
ज्या कारणांमुळे १९८० च्या दशकात सलमा आगा, १९५९ च्या दशकात नासिर खान, १९९० च्या दशकात फैझल कुरेशी या पाकिस्तानांन्या भारताने नागरिकत्व दिलं त्याच कारणांसाठी. बादवे, अदनान Anglo-pakistani आहे.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० गुरुवार, 05/13/2021 - 09:52 नवीन
अपेक्षित उत्तर. एकंदरीत बंदे मे दम नही हेच दिसून येते.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० गुरुवार, 05/13/2021 - 09:56 नवीन
बादवे, अदनान Anglo-pakistani आहे. घातले शेपूट. इथल्या १००% भारतीय नागरिकाने जरा कुठे सरकारचा दोष दाखवला तर त्याला पाकिस्तानचा रस्ता दाखवतात, आणि अँगलो पाकिस्तानींना गालिचे अंतरथा. व्वा!
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 05/13/2021 - 10:23 नवीन
घातले शेपूट. इथल्या १००% भारतीय नागरिकाने जरा कुठे सरकारचा दोष दाखवला तर त्याला पाकिस्तानचा रस्ता दाखवतात, आणि अँगलो पाकिस्तानींना गालिचे अंतरथा. व्वा! नेहमीप्रमाणेच घातलं शेपूट. हे खाली लिहिले त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष. नेहरू-राजीव गांधी-नरसिंहरावांनी पाकड्यांना नागरिकत्व दिले तर डोळे, कान, तोंड वगैरे पंचेंद्रिये बंद करून झोपेचं सोंग घेणे आणि इतरांनी दिले तर बेंबीच्या देठापासून कांगावा! ज्या कारणांमुळे १९८० च्या दशकात सलमा आगा, १९५९ च्या दशकात नासिर खान, १९९० च्या दशकात फैझल कुरेशी या पाकिस्तानांन्या भारताने नागरिकत्व दिलं त्याच कारणांसाठी.
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 05/13/2021 - 10:50 नवीन
नेहरू नरसिंह रावांचे निर्णय तुम्हाला योग्य वाटतात का ? नसतील तर मोदींनी केल्यावर लगेच नेहरू आणि नरसिंह रावांचा दाखल देण्यात काय मतलब आहे ? त्याउलट तुम्हीच सद्य घटनेकडे नेहरूंचे नाव काढून दुर्लक्ष करता आहात असे वाटते.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 05/13/2021 - 11:11 नवीन
https://www.misalpav.com/comment/1107140#comment-1107140 हा प्रतिसाद वाचलेला दिसत नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 05/13/2021 - 10:25 नवीन
प्रतिसादातील तथ्यांकडे अपेक्षित दुर्लक्ष. आपला तो पप्पू दुसऱ्यांंचं ते कार्टं, हेच दिसून येतं.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० गुरुवार, 05/13/2021 - 10:50 नवीन
आपला तो पप्पू दुसऱ्यांंचं ते कार्टं, हेच दिसून येतं. ठिक आहे तुमचाही पप्पूच. पप्पू पप्पू पप्पू.
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 05/13/2021 - 10:55 नवीन
=))
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 05/13/2021 - 11:10 नवीन
पप्पू चांगला का वाईट हे ठरवा आधी. हे म्हणजे पप्पूने केलेल्या राफेल आरोपांसारखं झालं. एकीकडे म्हणायचं की बोफोर्स दलाली प्रकरणात केले गेलेले आरोप खोटे होते आणि दुसरीकडे म्हणायचं की राफेल घोटाळा म्हणजे भाजपचे बोफोर्स आहे.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० गुरुवार, 05/13/2021 - 11:31 नवीन
ते तुम्ही ठरवायचं आहे पप्पू चांगला की वाईट. दोन्ही अपत्ये आपलीच आहेत. पाकिस्तानी कलाकारांना भारताचे नागरिकत्व देऊन तत्परतेने "भारतरत्न" दिले जाते. इथले कलाकार पाकिस्तानात जाण्याच्या लायकीचे. तरीही आम्ही येथे हिंदूंचे संघटन करणार. तोंड करी बाता... जाऊ दे सगळाच गोंधळ आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 05/13/2021 - 11:38 नवीन
नेहमीप्रमाणेच शेपूट घातली. माझा सर्वात पहिला प्रतिसाद वाचा.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Mon, 05/10/2021 - 10:16 नवीन
पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम मिळू नये असे मला काय गरजेचे वाटत नाही. द्यायचे तर द्या, जे बघायचे ते बघतील. नक्की काय प्रॉब्लेम आहे पाकिस्तानी कलाकारांसोबत ? मुक्ताविहारी यांनी "पाकिस्तानी कलाकारांनी साधू हत्याकांडाचा निषेध केला नाही" असा तर्कशुन्य मुद्दा मांडला आहे, हसूच आले. मुवि जी, कोणी कोणी निषेध केला आणि केला नाही अश्या सगळ्या घटनांना कव्हर करणारे आणि सगळ्या सेलेब्रिटींना कव्हर करणारे पुस्तक किंवा साईट आहे काय ? असेल तर सांगा, म्हणजे ख्रिस्तोफर नोलन, तारांटिनो, बच्चन वैगेरे लोकांनी कुठेकुठे कशाकशाचा निषेध केला हे बघून त्यांचा सिनेमा बघायचा कि नाही ठरवता येईल.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Mon, 05/10/2021 - 11:27 नवीन
आपल्या साठी जे अतिरेकी आहेत ते पाकिस्तानी जनते साठी हिरो आहेत, समजा पाकिस्तानी कलाकार भारतात आले, करोडो नाही तर कमीत कमी लाखों मध्ये कमवून गेले आणि तिकडे जाऊन त्यांचा हिरो लोकांना म्हणजेच आपल्या साठी अतिरेकी असलेल्या लोकांना दान केले तर मग नुकसान कोणाचे होणार? मुळात पाकिस्तान हे आपले शत्रू राष्ट्र आहे, पाकिस्तानी जनते साठी तुमच्या मनात राग नसेल तर तो तुमच्या पुरता ठीक आहे परंतु पाकिस्तानी कलाकारांना आर्थिक फायदा तो पण भारतीय जनते कडून नको व्हायला.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Mon, 05/10/2021 - 11:39 नवीन
फार फेच्ड आहे. अतिरेक्यांना पैसे देण्यासाठी फक्त फिल्म स्टार लागतात काय ? पाकिस्तानचे फिल्मस्टार भारतातून जे कमावतात ते पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत नगण्यच असणार आहे. हे झाले तर ते होईल वैगेरे ने काय वाट्टेल ते आर्ग्युमेन्ट करता येतील. पण इथे काय तर्क दिसत नाही. कुठल्या भारतात काम करणाऱ्या पाकिस्तानी कलाकाराने आतंकवाद्यांना पैसे दिल्याचे उदाहरण आहे ? मला बुवा आली जफर जबर आवडतो, अतिफ अस्लमची गाणी आवडतात. भारतीय निर्माते सुद्धा पाकिस्तानात चिक्कार पैसे कमावतात.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Mon, 05/10/2021 - 12:05 नवीन
विषय कलाकारांचा आहे म्हणून मी कलाकारांचे उदाहरण दिल, पाकिस्तानि लोकांना कुठल्याही प्रकारचा आर्थिक फायदा होईल अशी कुठलीही गोष्ट भारताने केली नाही पाहिजे. कुठल्या भारतात काम करणाऱ्या पाकिस्तानी कलाकाराने आतंकवाद्यांना पैसे दिल्याचे उदाहरण आहे अतिरेकी तर आपल्या साठी आहेत, त्यांच्या साठी ते हिरोच आहेत. पाकिस्तानी कलाकार कुठे दान करतेत हे आपल्याला कस माहिती. खुदद पाकिस्तान FATF च्या ग्रे लिस्ट मध्ये आहे. भारताचं जाऊ द्या UN designated कितीतरी अतिरेकी पाकिस्तान मध्ये उजळ माथ्याने फिरत असतात, आणि अशा देशातील कलाकारांसाठी आपण कशाला पायघड्या पसरायच्या.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 05/10/2021 - 12:03 नवीन
पाकड्यांना भारतात काम देऊन पैसे देणे म्हणजे पाकिस्तानची म्हणजे पर्यायाने अतिरेक्यांची अर्थव्यवस्था बळकट करणे. भारताने पाकिस्तानबरोबरील राजनैतिक संबंध तोडले पाहिजे.
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 05/13/2021 - 10:48 नवीन
अँग्लो पाकिस्तानी असले नागरिकत्व दिले की चालते आणि पूर्ण पाकिस्तानी असले की (नागरिकत्व जाऊदे, आपल्या गुणधर्मांमुळे मिळणारे कामसुद्धा) द्यायचे नाही, हे फारच arbitrary निर्णय आहेत तुमचे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 05/13/2021 - 11:04 नवीन
https://www.misalpav.com/comment/1107140#comment-1107140 हा प्रतिसाद वाचलेला दिसत नाही.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Mon, 05/10/2021 - 12:15 नवीन
आणि यातले लोक हेर पण असु शकतात
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० गुरुवार, 05/13/2021 - 12:06 नवीन
13 May 2021 - 3:08 pm | श्रीगुरुजी माझा सर्वात पहिला प्रतिसाद वाचा. तुम्हीच पारायणे करत बसा त्याची. अदनानला नागरिकत्व, पद्मश्री. त्याचे पिताश्री काय करत होते १९६५ मध्ये पाकिस्तानात?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 05/13/2021 - 13:40 नवीन
अपेक्षित पलायन
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 05/10/2021 - 02:09 नवीन
कानडा आणि अमेरिका ह्यांची तुलना सुद्धा शक्य नाही कारण साधे आहे लोकसंख्या बघा ! कानडा ३० मिलियन , ऑस्ट्रेलिया २६ आणि अमेरिका ३०० + आणि युके ६० + एकवेळ ऑस्ट्रेलिया आणि कानडा ची तुलना होऊ शकते .. त्यामुळे प्रतेक्य देशाची पद्धत वेगळी.... त्यामुळे प्रतेक् पद्धतीत काही तरी "भिकार" असणार आणि काही तरी उत्तम सरसकट सगळेच "भिकार" असे म्हणणे योग्य होत नाही याशिवाय अमेरिकेतील या शेतररातील शोध आणि त्याचा फायदा प्रथम अमेरिकेला च होतो साहजिक आहे .. मी जेव्हा जेवहा वैद्यकीय उपकरणात काम केल्या तेव्हा तेव्हा कंपनी चा हाच उद्देश कि आधी अमेरिकन एफडीए नंतर योरीपण आणि मग जपान आणि मग ऑस्ट्र्रेल्यान .. कारण बाजारपेठच तशी आहे ) असो व्यद्यकीय सेवेकडे वळूयात कानडा युके मध्ये अरोयोग्य सेवेत ज्या त्रुटी आहेत ( इलेक्टिव्ह सर्जरी साठी खूप वेळ थांबावे लागणे इत्यादी ) तशाच काही ऑस्ट्रेलीयत आहेत आणि भारतीय स्तहलन्तिरात यावर नेहमीच अशी चर्चा चालू असते .. जसे भारतात किंवा साहनाजी म्हणतात तसे अमेरिकेत स्पेशालिस्ट ला पटकन भेटतात येते पण ऑस्ट्रेलियात येत नाही हि एक नेहमीची तक्रार असते या मागे कारण मला असे वाटते कि " भारतीयांना पैसे असले तर पटकन सेवा मिळते " याची " सवय " झाली आहे त्यामुळे तसे तिथे करता येते, येथे तसे करता येत नाही म्हणून चिडचिड ( पैसा फेको तमाशा देखो, पैसा नसला तर रस्त्यावर ) कानडा चे माहित नाही पण आयस्ट्रियातील काही चांगले आणि वाईट दोन्हही मांडतो येथे खांजागी आणि सरकारी असे मिश्रण आहे ( कदाचित अमेरिकेतील भांडवलशाही चे एक टोक एक टोक आणि यूरोपातील सोशॅलिस्टांचे चे दुसरे बघून येथे जरा मध्यम मार्ग अवलंबला असावा ) - डॉक्तरांना खाजगी सेवा देण्याची पूर्ण मुभा आहे , याशिवाय खाजगी इस्पितळे हि आहेत - जनरल प्रॅक्टिशनर हा खाजगीच असतो सरकार दोन गोष्टी करते , जि पी आणि इतर सर्व विवाद्यकीय सेवांचे दरपत्रक आहे , समजा तुमचाच जि पी भेटीसाठी ६० डॉलर आकारात असेल तर मेडिकरे त्यातील ३३ तुम्हाला देते .. काही डॉक्टर ३३ मध्येच भागवतात .. - मेडिकेअर साठी उत्पन्नाच्या साधारण १ ते दि ड टक्के मेडिकेअर लेवी भरावी लागते - खाजगी मेडिकल इन्शुरन्स आहे आणि तो लोकांनी घ्यावा म्हणून सरकार त्यासाठी सवलत देते अमेरिकेत जे ऐकले आहे कि नोकरी गेली कि मेडिकल इन्शुरन्स गेला तसे येथे नाही , मेडिकल इन्शुर्सने पाहिजे तर तुम्ही तुमचाच स्वतःचाच घ्याचा असतो नोकरी शी संबंध नाही - नोकरी वर इजा झाली तर सरकार तुम्हाला काही रक्कम देते या "सिस्टीमम" मध्ये त्रुटी नाहीत असे अजिबात नाही , एकीकडे आपत्कालीन सेवा आणि बाळंतिणीची सेवा उत्तम , जवळ जवळ सर्व पॅथोलोजी/ रेडिओलॉजि फुकट आहे ( खाजगी ठिकाणी करणे आणि सरकार जो दर देते त्यात ते भागते ) आहे बरयाच औषधांवर सरकार सूट देते तर दुसरी कडे इलेक्टिव्ह सर्जरी ला फार वेळ लागतो .. दत्तचीकीत्सा पूर्ण खाजगी आहे आणि त्याला ना सरकार मदत करते ना विमा ! त्यामुळे "सरसकट भिकार" संबोधने हे चुकीचे ठरेल .. अमेरिकेतील "सिस्टीम" चे पण वाभाडे काढता येतील ... आम्रिकेतील मिपाकर यावर पण प्रकाश टाकतील अशी अपेक्षा करतो .. तोपर्यंत अमेरिकेतील सिस्टीम "भिकार आहेच" असे मि तरी म्हणणार नाही
  • Log in or register to post comments
न
निपा Mon, 05/10/2021 - 09:13 नवीन
भारतीयांना वाट बघण्याची सवय नाही . हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे . सर्दी झाली तरी आपण डॉक्टर कडे जातो . इथे त्यासाठी अपॉइंटमेंट मिळणे अशक्य . गर्भधारणे पासून तर डिलिव्हरी पर्यंत डॉक्टर ची गरज लागत नाही पण भारतात फ़क्त गायनॉकॉलॉजिस्ट लागतेच . आम्ही इथे फुकट IVF केली आहे पण गरिबांना भारतात मिळते का हे ऑपशन ? किंवा अमेरिकेत ?
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Mon, 05/10/2021 - 09:32 नवीन
सर्दी झाली तरी आपण डॉक्टर कडे जातो . इथे त्यासाठी अपॉइंटमेंट मिळणे अशक्य .
हे देश किती पण सुधारलेले असोत आणि व्यक्तीस्वातंत्र्याचा डंका पिटत असोत पण जर मी डॉक्टर कडे केव्हा जायचे हे दुसरे कोणी ठरविणार असेल तर मग कठीण आहे.
  • Log in or register to post comments
न
निपा Mon, 05/10/2021 - 10:35 नवीन
नाही . general practitioner (डॉक्टर) ठरवतो कि तुम्हाला स्पेसिऍलिस्ट ला रेफेर करायचे कि नाही . बरेचदा आपण डॉक्टर ला पुश करू शकतो . व्यक्ती स्वत्रंतयाचा इथे संबंध नाही .
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 05/10/2021 - 10:39 नवीन
तरीही हे unfair नाही का? मला कोणत्या डॉक्टर ला भेटायचे आहे हे ठरवणारा तो कोण? समजा मला डॉ अबक ला भेटायचे आहे, आणि जीपी ने मला डॉ यझ ला भेटायला सांगितले तर मग काय करायचे?
  • Log in or register to post comments
क
कॉमी Mon, 05/10/2021 - 10:57 नवीन
मेडिकल सल्लागार आणि सोयी यांच्या तुटवड्यामुळे हा इन्कनविनियन्स आहे. हे unfair वाटले, आणि व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आहे असे वाटले, तरी, ज्यांना कधीही आरोग्य सेवा परवडणार नाहीत त्यांना सुद्धा ह्या सेवा ह्या व्यवस्थेत मिळतात. बायपास सर्जरी ते कॅन्सर उपचार- सगळे मिळते. पैसे नाहीत म्हणून कोणी उपचारांविना राहत नाही. हे माझ्या मते फार महत्वाचे आहे. प्रत्येक समाजात, मग तो कॅपिटालिस्ट असो वा सोशलिस्ट, व्यक्तिस्वातंत्र्यावर एका प्रमाणात, कमी किंवा जास्त, बंधने असतातच. त्यामुळे, व्यक्तिस्वातंत्र्यावर बंधने असावीत का, हा प्रश्न नसतोच, तर किती असावीत हा प्रश्न असतो. माझ्या मते इथे end justifies the means a thousand times over. जेव्हा तुटवडा दूर होण्याइतपत तांत्रिक प्रगती होईल, तेव्हा हा इन्कन्व्हिनियन्स काढण्यासाठी प्रयत्न होतील.
  • Log in or register to post comments
न
निपा Mon, 05/10/2021 - 16:44 नवीन
कुठल्याही व्याधी साठी तुम्ही डॉक्टर कडे जाता . तोच डॉक्टर तुम्हाला स्पेसिऍलिस्ट कडे रेफेर करतो . तो डॉक्टर पूर्णपणे तुमच्या साठी काम करत असतो . फॅमिली डॉक्टर म्हणा . बहुतेक वेळी तोच /तीच डॉक्टर तुम्हाला particular व्याधी च्या स्पेसिऍलिस्ट कडे पाठवते . आपल्या कडे पण असेच होते . तुम्ही हा G P बदलू शकता . पण specialist हे लोक faceless असतात . म्हणजे हार्ट specialist कोण असेल ते आपल्याला ठरवता येत नाही. भारतात आपण हे स्वतः ठरवू शकतो . पण तुमच्यावर same quality चे उपचार होतात .
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 05/11/2021 - 01:09 नवीन
आनन्दा तुमची समजूत चुकीची आहे जि पी जेवहा तुम्हाला स्पेशालिस्ट ला भेट असे सुचवतो तेवहा तो १-२ नावांची शिफारस करतो... आणि त्यातूनही तुम्ही तुमच्या आवडीचा स्पेशालिस्ट पाहिजे असल्यास तुम्ही विचारू शकता बाकी निपा म्हणाले ते बरोबर आहे आणि पुढे यांनी पण छान वीवेचन केले आहे
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 05/11/2021 - 01:15 नवीन
मी वरील विधान ऑस्ट्रेलियातील पद्धती बद्दल केले आहे युके नाही .. येथे जि पी आणि स्पेशालिस्ट हे दोन्हीही खाजगी असतात , कधी कधी स्पेशालिस्ट हा सरकारी रुग्न्यालयातील असू शकतो हा तेव्हा मात्र जो असतो तो .. हे खरे एकूणच संपूर्ण खाजगी किंवा संपूर्ण सरकारी अशी दोन टोके ना गाठता मध्य गाठता येऊ शकतो ..
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 05/10/2021 - 10:37 नवीन
जर मी डॉक्टर कडे केव्हा जायचे हे दुसरे कोणी ठरविणार अहो कोण म्हणलं कि हे दुसरे कोणीतरी ठरवते? रोतूम्हीच ठरवता कि कधी डॉक्टर कडे जायचे ते तेथील यंत्रणेची नक्की माहिती आहे का? हा आटा ऑस्ट्रएल्यात स्पेशालिस्ट कडे जाण्यासाठी आधी गेनेरळ प्रॅक्टिशनर शी सल्ला मसलत करावी लागते ते खरे आहे पण गैर काय त्यात !
  • Log in or register to post comments
क
कॉमी Mon, 05/10/2021 - 17:22 नवीन
अनुभवाधारीत मत मांडल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 05/10/2021 - 08:28 नवीन
https://www.loksatta.com/mumbai-news/maha-vikas-aghadi-government-focuses-on-appointments-of-retired-officers-zws-70-2466613/ ---------------- या यादीत आता विजयकु मार गौतम यांची भर पडली. गौतम हे राष्ट्रकू ल क्रीडा घोटाळ्यातील आरोपी असून, निवृत्तीच्या दिवशी म्हणजे ३० एप्रिलला त्यांना केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाने गौतम यांना चौकशीसाठी नोटीस बजावली. तरीही त्यांची फे रनियुक्ती झाल्याने राज्य सरकारच्या भूमिके विषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होते. -----------
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 05/10/2021 - 13:58 नवीन
राज्य सरकार म्हणजे सगळंच प्रश्नचिन्ह आहे. सचीन वाझे प्रकरण आठवलं !
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 05/10/2021 - 14:04 नवीन
ह्या सरकार बद्दल चांगले बोलावे.... आणि ह्या सगळ्या बातम्या लिखित स्वरूपात आहेत. वर्तमान पत्रात येतात, त्याच आहेत....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 05/10/2021 - 13:59 नवीन
“तुला चपलेनं मारलं नाही, तर माझं नाव रणजित नाही”; काँग्रेस आमदाराची जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला शिवीगाळ.... ------------ https://www.loksatta.com/maharashtra-news/congress-mla-ranjit-kamble-dho-district-health-officer-threat-abuse-bmh-90-2467139/ ------------ काय बोलावं, ते सुचेना.....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 05/10/2021 - 14:43 नवीन
काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याच्या निर्णयाला काही तासातच स्थगिती सोनिया गांधींकडे काँग्रेसचे हंगामी अध्यक्षपद --------------- https://www.loksatta.com/desh-videsh-news/congress-president-election-cancelled-due-to-corona-pandamic-rmt-84-2467108/ ------------ आधी कॉंग्रेसचे अध्यक्षपद, फिरते असायचे, असे वाचनांत आले होते.... आता मात्र, 1998 पासून, एकाच घराण्यात अध्यक्षपद आहे.... https://en.m.wikipedia.org/wiki/List_of_presidents_of_the_Indian_National_Congress
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 05/10/2021 - 15:09 नवीन
संजय राऊतांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नाही आणि...'; पटोले भडकले ---------- https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/we-dont-take-sanjay-raut-seriously-says-nana-patole/articleshow/82521798.cms ----------- राज्यकर्त्यांचेच एकमेकांशी पटत नसेल तर, ह्या अनागोंदीचा त्रास, सामान्य माणसाला होणारच...
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Mon, 05/10/2021 - 16:35 नवीन
करोनाच्या पहिल्या लाटेत करोनामुक्तीच्या धारावी पॅटर्नची जगभरात चर्चा झाली होती. थेट जागतिक आरोग्य संघटनेने धारावी पॅटर्नचे कौतुक केले होते. आता करोनाच्या दुसऱ्या लाटेचाही मुंबई महापालिका समर्थपणे मुकाबला करत असून सर्वोच्च न्यायालयाने या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे. त्यासोबत नीती आयोगानेही मुंबई मॉडेलची वाहवा केली https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/iqbal-singh-chahal-praised-chief-minister-uddhav-thackeray/articleshow/82523525.cms
  • Log in or register to post comments
स
सुक्या Mon, 05/10/2021 - 19:34 नवीन
"बेस्ट शीयम ओफ द वर्ल्ड" अशे एखादे अवार्ड देउन टाका. हाय काय अन नाय काय. त्यांच्याक्डे "बेस्ट शीयम" असे अवार्ड आधीच आहे ..
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 05/11/2021 - 01:27 नवीन
"बेस्ट शीयम ओफ द गॅलेक्सी..." बाय द वे, "बेस्ट शीयम ओफ द युनिवर्स" , हे पद मात्र, श्रीमती ममता बॅनर्जी साठीच राखीव आहे....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 05/11/2021 - 01:35 नवीन
“ममता बॅनर्जींची तुलना आहिल्यादेवी होळकरांशी, इथेच संजय राऊतांची वैचारिक पातळी लक्षात आली” --------------- https://www.loksatta.com/maharashtra-news/sanjay-raut-compared-mamata-banerjee-with-ahilyabai-holkar-vsk-98-2467355/lite/ ------------ कुठे त्या हिंदू हितवादी पुण्यश्र्लोक अहिल्याबाई होळकर आणि कुठे ह्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्या करणार्या तृणमुल कॉंग्रेसच्या मुख्यमंत्री..
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 05/11/2021 - 01:56 नवीन
चुकांबद्दल मोदींनी प्रायश्चित्त घ्यावे! काँग्रेस कार्यकारिणीचा ठराव... https://www.loksatta.com/desh-videsh-news/pm-must-atone-for-his-mistakes-commit-to-serving-people-cwc-on-covid-19-crisis-zws-70-2467654/ ---------- कॉंग्रेसने लादलेल्या घराणेशाहीचे पातकांचे प्रायश्र्चित्त, गांधी घराण्याला, लोकंच घ्यायला लावत आहेत... आता दुसरे काहीही करता येत नाही म्हणून, मोदींच्या नावाने शंख करत आहेत...
  • Log in or register to post comments
य
यश राज Tue, 05/11/2021 - 06:18 नवीन
आजच्या म. टा. मधील बातमी. https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/bmc-asked-to-explore-global-vaccine-procurement-says-aaditya-thackeray/articleshow/82529692.cms मुंबईत होणाऱ्या महापालिका निवडणुकांच्य पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी मुंबईसाठी कोविड लसीच्या विदेशातून मागवण्याच्या शक्यतेचा विचार करत असल्याचा सांगितले आहे. वडील महाराष्ट्राचे मा.मुं व स्वतः महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री असलेले आपण हे मुंबईच्या बाहेर खूप मोठा असा महाराष्ट्र पसरलेला आहे त्याबद्दल कधी विचार करणार. बाकी उर्वरित महाराष्ट्रात नागरिकांवर "तुमचे कुटुंब व तुमचीच जवाबदारी". बाकी ही दुसरी बातमी म्हणजे निव्वळ हास्यास्पद.. एकेकाळी म. टा हा माझा आवडतं वृत्तपत्र होतं पण आता त्याचा निव्वळ चा. टा. झालंय. काय करणार शेवटी चाय बिस्कीट पत्रकारिता. https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/shiv-sena-praises-cm-uddhav-thackeray-for-doing-good-work-in-corona-pandemic/articleshow/82540047.cms
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 05/11/2021 - 06:24 नवीन
आमची तयारी आहे करोनाशी लढायची, पण, करोनाची तयारी आहे का? ------ बेडस् पुरवतांना, ऑक्सीजनची व्यवस्था करतांनाच, ही तयारी उघडी पडली...
  • Log in or register to post comments
प
पिनाक Tue, 05/11/2021 - 09:27 नवीन
पण डॉक्टर ना काय कळतंय, कंपाऊंडर ना डॉक्टर पेक्षा जास्त माहीत असतंय असं एक जण बोलले होते . ते आता कॅन्सल समजायचं का?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 16 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 30 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 32 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 36 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा