Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जनातलं, मनातलं

पुस्तक परिचय - फुले आणि मुले

च
चांदणे संदीप
Sun, 05/02/2021 - 16:32
💬 6 प्रतिसाद

लॉकडाऊनसारख्या नीरस काळात घरात बसून काय करावे हा प्रश्न दर दोन दिवसांनी वळवाच्या पावसासारखा गडगडत धावत येतो. घरातली कामे, पाककृतींचे प्रयोग, मुलांसोबत खेळ-मनोरंजन, चित्रपट या सगळ्यांचाही काही काळानंतर तिटकारा येतो. घरातली पुस्तकेही परत परत वाचून झालेली असल्यामुळे ती हातातही धरवत नाहीत. काय नवीन करायचं हा प्रश्न सतत छळत असतो. माझंही आजच्या रविवारी असंच झालं. अशातच एक पुस्तक हाती आले. आचार्य अत्रे यांचे "फुले आणि मुले." नावावरूनच लक्षात येतं की हे पुस्तक लहान मुलांसाठी आहे.

आधी कित्येक वेळा वाचलं असलं तरी आता मुलांना वाचून दाखवायच ह्या हेतूने वाचायला घेतलं तर शेवटचं पान वाचूनच खाली ठेवलं. अर्थात, पुस्तक काही मोठं नाही. अगदी लहान-लहान, फाफटपसारा न करता लिहिलेल्या अठरा कथांचा यात समावेश आहे. आचार्य अत्रे यांच्या समर्थ लेखणीचा हा वेगळा पैलू आपल्याला थक्क करून सोडतो.

अतिशय बोलक्या, नेमक्या आणि साध्यासोप्या शब्दांत, मुलांचे भावविश्व उलगडून आपल्या काळजाला हात घालणाऱ्या या सगळ्या कथा आहेत. काही काही कथा वाचताना टचकन डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही. वैयक्तिक माझ्याबाबत बोलायचं झालं तर, 'ए, बाबा रडतोय बघ!' अशा बोलण्यांनी मी भानावर येऊन पुन्हा वाचायला सुरूवात करीत होतो. असं बऱ्याच वेळेस झालं.

नंतर माझ्या लहान मुलींना ह्यातल्या काही कथा वाचून दाखवल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी वगैरे आलं नाही पण वाचून झाल्यावर, मधमाशांचं पोळं सुटून माशा सैरभैर व्हाव्यात तसे प्रश्न माझ्यावर कोसळले. त्यांना सांगितलेल्या प्रत्येक कथेतली पात्रं त्यांना खूप आवडली, पुन्हापुन्हा आठवत राहिली. अजून काही दिवस अजून खूप प्रश्न येणार आहेतच.

प्रस्तावनेत पुस्तकातल्या कथांचं, त्यांच्या विषयांचं समर्पक शब्दांत जणू निरूपण केलेलं आहे. आचार्य अत्रेंनी थोडक्यात आपली हे पुस्तक लिहितेवेळीची मनोभूमिका स्पष्ट केली आहे. मुलांविषयी त्यांचा असलेला जिव्हाळा, आपल्या शिक्षकी पेशामुळे मुलांसोबत आलेले अनुभव त्यांनी खुबीने या पुस्तकात वापरले आहेत. सर्व वाचून झाल्यावर नेहमीप्रमाणे आचार्य अत्रेंना मी मनोमन वंदन केले. असे मुलांसाठीचे निर्भेळ लेखन मराठीत पुन्हा आले नाही अशी बोचरी जाणीवही लगेचच झाली.

हे पुस्तक बाळगोपाळांसाठी असले तरी मोठ्यांनी मुलांचा निरागसपणा पुन्हा अनुभवताना आनंद मिळेल यात शंका नाही. मुलांचे निरागस भावविश्व तितक्याच निरागसतेने दाखावणारं हे एक दुर्मिळ पुस्तक आहे. अवश्य मिळवून वाचा. इतके वाचल्याबद्दल धन्यवाद.

1

- संदीप चांदणे (रविवार, २/५/२०२१)


  • Log in or register to post comments
  • 3871 views


वाचनखूण लावा
| 3871 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद (6)
ह
हेमंतकुमार Sun, 05/02/2021 - 16:38 नवीन
छान परिचय
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 05/02/2021 - 17:17 नवीन
तुमची मुले जर बाल वयांत किंवा कुमार वयांत असतील तर, मी एका धाग्यांत काही पुस्तकांचा उल्लेख केला होता ... तो धागा देतो .... https://misalpav.com/node/22123
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sun, 05/02/2021 - 17:26 नवीन
पुस्तकाची सुंदर ओळख ! धन्यवाद संदीपजी ! खुप लहानपणी वाचले होते, आता परत वाचायला हवे ! श्यामची आई सारखा नितांत सुंदर चित्रपट दिग्दर्शित करणारे आचार्य अत्रे मुलांच्या प्रति संवेदनाशील होते ! त्यांच्या सारख्या सिध्दहस्त लेखणीतून "फुले आणि मुले." सारखी कलाकृती न घडते तर नवलच.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Mon, 05/03/2021 - 06:41 नवीन
श्यामची आई नंतर लहान मुलांसाठी हे पुस्तक छानच असावे.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 05/03/2021 - 07:15 नवीन
सुरेख परिचय. हे पुस्तक लहानपणी वाचले होते पण आता त्यातले काहीही आठवत नाहीये.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Mon, 05/03/2021 - 08:37 नवीन
लेखावर नजर फिरवता फिरवता...
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 22 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 34 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 36 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 38 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 42 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा