चालू घडामोडी - मे २०२१ (भाग १)
बिहारमधील अत्यंत क्रूर माफिया डॉन बाहुबली महंमद शहाबुद्दीन कोरोनामुळे गेला. तो पूर्वी अनेकदा लालूच्या राजदच्या तिकिटावर निवडून आला होता. पूर्वी त्याला अटक करण्यास गेलेल्या पोलिसांवर त्याच्या टोळीतील सदस्यांनी गोळीबार करून ११ पोलीस मारले होते. इतर अनेक खुनांचा त्याच्यावर आरोप होता. शेवटी दोन भावांंचा खून केल्याचा आरोप त्याच्यावर सिद्ध झाल्याने त्याला जन्मठेप मिळाली होती. अपेक्षेप्रमाणे लालूपुत्र तेजस्वी यादवने त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे.
https://www.loksatta.com/desh-videsh-news/covid-updates-former-rjd-mp-mohammad-shahabuddin-dies-of-covid19-tihar-jail-dg-bmh-90-2459066/
काल भारतात कोरोनाचे ४,०१,९९३ नवीन रूग्ण सापडले व ३,५२३ जणांचा मृत्यु झाला.
मराठा आरक्षण हा मूळ मुद्दा नाहीच तर तो मतांसाठी स्वतःच्या स्वार्थासाठी असंख्य मराठा तरुणांच्या भावनांशी काकासाहेबांनी खेळलेला खेळ आहे.अगदी हाच खेळ फडणवीस सुद्धा खेळले. माझ्या मते ते भाजपतील पवार आहेत. दोघांमध्ये अनेक साम्य आढळतील.महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी आहे त्यात ३४% मराठा आहेत म्हणजे ४ कोटी.या आकड्यांवर विश्वास ठेवणे अवघड आहे. आपली संख्या ५२% आहे असा दावा इतर मागासवर्गीय करतात. यासाठी ते १९३१ किंवा त्याआधी केव्हा तरी झालेल्या जनगणनेचा संदर्भ देतात. मराठ्यांची वेगळी जनगणना झालेली नाही. परंतु ते आपली संख्या ३२% सांगतात. यात मागासवर्गीय ७-८%, मुस्लिम १४%, इतरधर्मीय ३-४%, ब्राह्मण ३-४%, आदिवासी, भटक्या जमाती इ. ची संख्या मिळविली तर एकूण बेरीज १२५% हून अधिक होते.हि सर्व वस्तुस्थिती श्री फडणवीसांना माहिती होती शिवय ते स्वतः वकील असल्याने मराठा आरक्षण हे न्यायालयात अजिबात टिकणार नाही हेही त्यांना स्पष्टपणे माहिती आहे. कारण मुळात आरक्षणाचा निकष हा सामाजिक मागासले पण आहे आर्थिक मागासले पण नाहीच. स्वातंत्र्यानंतर ७० वर्षाच्या आणिराज्याच्या ६० वर्षाच्या कालावधीत राज्यात सत्ता हि संपूर्णपणे मराठा समाजाच्या हातातच राहिलेली आहे आणि सामाजिक उतरंडीत मराठा समाज हा सर्व बाबतीत पुढारलेला आहे त्याला मागासलेला ठरवणे हे संपूर्णपणे स्वार्थी राजकारणाचा खेळ आहे.हेच मी सांगतोय. हे सर्व माहिती असूनही फडनवीसांनी बनावट अहवाल तयार करून त्याआधारे रा़खीव जागा देऊन मरठ्यांना फसविले आणि प्रत्येक निवडणुकीत डोळे झाकून भाजपला मत देणार्या समर्थक अराखीव वर्गाचेही नुकसान केले.आजच आलेल्या निकालात स्पष्टपणे हेही म्हटलेले आहे कि ५० % च्या वर आरक्षण देणे हे अधिक मोठ्या ( ९ किंवा अधिक न्यायाधीशांच्या) घटना पीठाकडे वर्ग करण्याची अजिबात गरज नाही कारण याअगोदर दिलेला हा निकाल (इंद्रा साहनी केस) चार पूर्णपीठानी तपासून पाहिलेला आहे आणि तो वैध ठरवला आहे. तेंव्हा आता याबद्दल पुनर्विचार याचिका सुद्धा दाखल करून घेण्याची शक्यता मावळली आहे.९ न्यायाधीधांच्या घटनापीठाचा निर्णय बदलण्यासाठी किमान ९ न्यायाधीशांचे नवीन घटनापीठ असणे बंधनकारक आहे. ५ न्यायाधीशांचे घटनापीठ तो निर्णय बदलू शकत नाही, त्यामुळेच या खटल्यासाठी किमान ११ न्यायाधीशांचे घटनापीठ असावे ही मागणी सिब्बल सातत्याने करीत होते. जाता जाता . . . सरकारच्या बाजूने खटल्यातील एक वकील सिब्बल होते. तेव्हाच हा खटला सरकार हरणार हे निश्चित झाले होते, कारण मागील काही काळात सिब्बल अनेक खटले हरलेले आहेत (उदाहरणार्थ - श्रीरामजन्मभूमी खटल्यात ते बाबरी मशीद कृती समितीचे वकील होते, न्यायालयाच्या नावाने राहुल खोटे बोलला त्या खटल्यात ते राहुलचे वकील होते.)अमेरिकेत शिकागो येथील इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये एम.एस करून अजितसिंग अनेक वर्षे अमेरिकेतच वास्तव्याला होते.ते अमेरिकेत असताना आय बी एम या प्रख्यात संगणक कंपनीत काम करीत होते.the court said “the data collected and tabled by the Commission as noted in the report clearly proves that Marathas are not socially and educationally backward class”. In fact, “the Marathas are dominant forward class and are in the main stream of national life”.हे जर खरे असेल तर गायकवाड आयोगाने कोणत्या आधारावर मराठ्यांना १६% राखीव जागा देण्याची शिफारस केली होती? हा अहवाल २५ नोव्हेंबर २०१८ या दिवशी सरकारला दिल्यानंतर फडणवीसांनी तो कोणालाही वाचायला न देता तातडीने दुसऱ्या दिवशी विधीमंडळाचे अधिवेशन बोलावून दोन्ही सभागृहात अहवालावर व राखीव जागा विधेयकावर एक सेकंदही चर्चा न करता अक्षरशः १५ सेकंदात एकमताने संमत करून घेऊन पुढच्या मिनिटाला सहीसाठी राज्यपालांकडे पाठविला होता. राज्यपालांनी तातडीने त्यावर सही करून विधेयकाचे कायद्यात रूपांतर केले होते. तो अहवाल नंतर अनेक संघटनांनी तो अहवाल संपूर्ण प्रसिद्ध करण्याची मागणी केली होती. परंतु त्या अहवालात काही स्फोटक माहिती आहे व ती प्रसिद्ध झाल्यास सामाजिक अशांतता पसरू शकते, असे सांगून फडणवीसांनी फक्त आयोगाने केलेल्या शिफारशी सार्वजनिक केल्या. आयोगाने जमा केलेली माहिती, आकडेवारी, सर्वेक्षणात गोळा केलेला डेटा हे सर्व फडणवीसांनी प्रसिद्ध होऊन दिले नव्हते. असे का केले ते सर्वोच्च न्यायालयाच्या वरील निकालावरून लक्षात येतंय. नंतर उच्च न्यायालयात या कायद्याला आव्हान दिल्यानंतर उच न्यायालयाने अहवालातील माहिती न तपासता फक्त कायदा करण्याची प्रक्रियाचा कायदेशीरपणा तपासून कायदा मान्य केला होता. परंतु शेवटी सर्वोच्च न्यायालयात भांडं फुटलंच. मराठे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या अजिबात मागास नसून ते सामाजिक वर्चस्व असलेली प्रगत जात आहे हे अहवालातील माहितीतून दिसत आहे, हे सर्वोच्च न्यायालयाने निकालात सांगितलंय. फडणवीसांनी मराठे मागास नाहीत व प्रगत आहेत, हे अहवालात दिसत असूनही तो सार्वजनिक न करता मराठे मागास आहेत असे खोटे सांगून १६% राखीव जागा देऊन अराखीव वर्गावर अन्याय केलाच आणि त्याबरोबरीने मराठ्यांचीही फसवणूक केली हे स्पष्ट आहे. या खटल्यात कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, मुकुल रोहटगी अशा मातब्बर वकीलांविरूद्ध झुंज देऊन, सामाजिक दडपण व धमक्यांचा सामना करून खटला जिंकणारे वकील गुणरत्न सदावर्ते अभिनंदनास पात्र आहेत.