Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - मे २०२१ (भाग १)

श
श्रीगुरुजी
Sat, 05/01/2021 - 11:30
🗣 130 प्रतिसाद
बिहारमधील अत्यंत क्रूर माफिया डॉन बाहुबली महंमद शहाबुद्दीन कोरोनामुळे गेला. तो पूर्वी अनेकदा लालूच्या राजदच्या तिकिटावर निवडून आला होता. पूर्वी त्याला अटक करण्यास गेलेल्या पोलिसांवर त्याच्या टोळीतील सदस्यांनी गोळीबार करून ११ पोलीस मारले होते. इतर अनेक खुनांचा त्याच्यावर आरोप होता. शेवटी दोन भावांंचा खून केल्याचा आरोप त्याच्यावर सिद्ध झाल्याने त्याला जन्मठेप मिळाली होती. अपेक्षेप्रमाणे लालूपुत्र तेजस्वी यादवने त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे. https://www.loksatta.com/desh-videsh-news/covid-updates-former-rjd-mp-mohammad-shahabuddin-dies-of-covid19-tihar-jail-dg-bmh-90-2459066/ काल भारतात कोरोनाचे ४,०१,९९३ नवीन रूग्ण सापडले व ३,५२३ जणांचा मृत्यु झाला.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 39889 views

🗣 चर्चा (130)
श
श्रीगुरुजी Sat, 05/01/2021 - 11:52 नवीन
महंमद शहाबुद्दीनची कृष्णकृत्ये https://m.rediff.com/news/special/the-shahabuddin-effect-when-nitish-cowered/20210501.htm
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल Sat, 05/01/2021 - 12:26 नवीन
https://timesofindia.indiatimes.com/india/supreme-court-there-should-be-no-clampdown-on-citizen-seeking-covid-19-help-on-internet/articleshow/82325346.cms इथं सुप्रिम कोर्ट होस्टेल, मंदिर, चर्च व इतर ठिकणे असं म्हणतय...... इतर ठिकणे असं मोघमात का बरे म्हणत असावे?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 05/01/2021 - 12:33 नवीन
"india corona crisis china soldier movement on border | कावेबाज चीन! भारतातील करोना संकट पाहता सीमेवर हालचालींना वेग | Loksatta" https://www-loksatta-com.cdn.ampproject.org/v/s/www.loksatta.com/desh-videsh-news/india-corona-crisis-china-soldier-movement-on-border-rmt-84-2459020/lite/?amp_gsa=1&amp_js_v=a6&usqp=mq331AQFKAGwASA%3D#amp_tf=From%20%251%24s&aoh=16198649992368&csi=0&referrer=https%3A%2F%2Fwww.google.com&ampshare=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fdesh-videsh-news%2Findia-corona-crisis-china-soldier-movement-on-border-rmt-84-2459020%2F
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 05/01/2021 - 12:52 नवीन
नीरव मोदीचं प्रत्यार्पण पुन्हा लांबणार? आता ब्रिटनच्या उच्च न्यायालयात केली याचिका ------------ https://www.loksatta.com/desh-videsh-news/nirav-modi-extradition-to-india-may-delay-seeks-permission-to-appeal-in-high-court-pmw-88-2459063/ ----------- मोदी एक एक पाचर बरोबर मारत आहेत.... "नीरव मोदीला" भारतात आणतीलच...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 05/01/2021 - 12:54 नवीन
Maharashtra DGP offered settlement if I withdraw complaint against Anil Deshmukh: Param Bir Singh ------------- https://www.indiatoday.in/amp/india/story/param-bir-singh-letter-cbi-maharashtra-dgp-offered-settlement-anil-deshmukh-1796726-2021-04-30 काय बोलावं ते सुचेना ....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 05/01/2021 - 16:05 नवीन
https://maharashtratimes.com/maharashtra/nashik/5-person-arrested-for-allegedly-defaming-opposition-leader-devendra-fadnavis/articleshow/82345144.cms ------------ आपण सगळेच जण थोडी काळजी घेऊ या.... धोरणांना विरोध असणे, हे लोकशाहीचे लक्षण आहे, पण राजकीय नेत्यांवर, वैयक्तिक शेरेबाजी टाळू या...
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Sat, 05/01/2021 - 16:15 नवीन
जी एस टी.. सकारात्मक बातमी. एप्रिल २०२१ या महिन्यात एकूण १ लाख ४१ हजार ३८४ लाख कोटींचा जीएसटी मिळाला आहे. देशात जीएसटी लागू झाल्यापासून आतापर्यंतचा सर्वाधिक जीएसटी आहे. साथीवर लवकर नियंत्रण मिळाल्यास अजून चांगली प्रगती होऊ शकते असे वाटते!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 05/01/2021 - 16:31 नवीन
नक्कीच
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Sun, 05/02/2021 - 03:24 नवीन
एप्रिलमध्ये मुंबई तर lockdown होती. मग इतका GST कसा आला?
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Sat, 05/01/2021 - 16:31 नवीन
https://www.esakal.com/desh/adar-poonawala-interview-to-the-times-says-threat-calls-aggression-over-covid-vaccines-is-overwhelming
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Sat, 05/01/2021 - 16:32 नवीन
https://www.thetimes.co.uk/article/adar-poonawalla-aggression-over-covid-vaccines-is-overwhelming-everyone-expects-to-get-theirs-first-bfqbgcm96 https://www.hindustantimes.com/india-news/everything-falls-on-my-shoulders-adar-poonawalla-on-vaccine-pressure-in-india-101619873739116.html
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sat, 05/01/2021 - 19:31 नवीन
टाइम पेवॉल मागे आहे. ट्विटर वर पहिले तर पुनावालांनी एक अत्यंत खळबळजनक विधान केले आहे. ते HT मध्ये छापले नाही आहे. पेवॉल शिवाय टाइम्स चा ई पेपर वाचत येतो असे दिसते, लिंक- https://epaper.thetimes.co.uk/the-times/20210501/282411287177644 ते म्हणाले आहेत-
“If I give you the right answer, or any answer, my head would be chopped off . . . I can’t comment on the elections or Kumbh Mela. It’s too sensitive.”
भयंकर (आणि न पटण्यासारखे) विधान. आणखी काही रोचक बाबी- (मुलाखतीतून.) लेखाच्या सुरुवातीला राज्यांचे CM, मोठया उद्योगसमूहाचे प्रमुख यांच्याकडून लस मिळवण्यासाठी फोन येतात असे म्हणले आहे.
" आता पूनावालायांच्यावर नफेखोरीचे आरोप होत आहेत. ते केंद्र सरकारला लस १५० रु. ला विकत होते तर राज्य आणि प्रा. ला चढ्या किमतीत. १५० रुपयांमध्ये जेमतेम खर्च निघत होता. हा दर केंद्र बल्क आणि ऍडव्हान्स मध्ये घेत असल्याने लावला होता. जास्त किंमतीमध्ये नफा जास्त झाला तरी सुद्धा कोव्हिशिल्ड जगातली सर्वात स्वस्त लस असणार आहे, असे पूनावाला म्हणाले. "
" आम्ही काहीही चुकीचे केले नाही, आम्ही कुठे कामटाळू प्रकार केला नाही, नफेखोरी केली नाही, आता भारतातील इतर लसकंपन्या पुढाकार घेतील अशी आशा आहे, जेणेकरून लोक मला विसरुन जातील. "
" पूनावाला यांनी (सरकार कडून प्रेशर येत असल्याबाबत) सांगितले: मोदींचा थेट फोन येतो असे त्यांनी सांगितले नाही, पण सरकार मधल्या अतिशय उच्च पातळीतल्या लोकांचे फोन येत असतात. "
एकंदरीत मुलाखतीचे रंगढंग पूनावाला पळून/ सुरक्षेसाठी गेले असे सुचवणारे आहेत. माझा अंदाज आहे सुप्रिम कोर्टाने विचारलेल्या प्रश्नामुळे काहीतरी घटनाक्रम सुरु झाला आणि पूनावालांना भारताबाहेर जावे असे वाटले. हा संपूर्ण अंदाजच आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 05/01/2021 - 20:10 नवीन
मविआतील काही कुप्रसिद्ध गुंडांकडून आणि पक्षांकडून धमक्या आल्या असतील.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sat, 05/01/2021 - 20:21 नवीन
शक्य आहे. परवाच पूनावाला आम्ही महाराष्ट्रा सोबत आहोत असे काहीतरी म्हणले होते.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 05/01/2021 - 20:27 नवीन
https://www.google.com/amp/s/www.loksatta.com/pune-news/adar-poonawalla-should-have-played-important-role-for-maharashtra-and-india-says-deputy-cm-ajit-pawar-svk88-sas-89-2458908/lite/ अदर पूनावालांनी महाराष्ट्र आणि देशासाठी महत्त्वाची भूमिका बजावयाला पाहिजे होती - यावरून काही अंदाज येऊ शकतो.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sat, 05/01/2021 - 20:44 नवीन
नेत्यांकडून धमक्या येतात हा एक भाग असला तरी ते पूर्ण उत्तर आहे असे वाटत नाही. सुप्रिम कोर्टाने लस किमतींवर प्रश्न विचारल्यावर एक (का दोन ?) दिवसात हे सगळे समोर येणे हा फार मोठा योगायोग दिसतो आहे. किंमतीचे तर्क सांगण्यासाठी माहिती कोर्टाला दिल्यास काही निर्णय कोर्टाकडून किंवा केंद्राकडून होईल, असे वाटून ते गेले हे सुद्धा संभव वाटत आहे. त्यापेक्षा कोर्टापासून दूर आपण आपली बाजू आपल्या तोंडाने वृत्तपत्रांना सांगू, असे वाटून गेले असू शकतात. मी कुंभ किंवा निवडणुकांबद्दल बोललो तर माझे डोके कापले जाईल- हे काय पटण्यासारखे सध्या तरी वाटत नाही. ह्या भागावरून तर उगाचच सिम्पथी खेचतायत असे वाटते. अर्थात, नक्की काही सांगता येत नाही. काय होते बघायचे.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Sun, 05/02/2021 - 03:21 नवीन
हे मला तितके लिमिटेड वाटत नाही.. पुनावाला हे छुपे राष्ट्रवादीचे समर्थक / सहाय्यक आहेत असे म्हटले जाते. पुनावाला यांचे स्टेटमेंट आणि पाठोपाठ आलेले अजित पवारांचे स्टेटमेंट काहीतरी वेगळेच सूचित करत आहेत. लसीवरून फार मोठे राजकारण चालू आहे. भारतात आणि भारताबाहेर पण. विशेषतः भारताने लसी ब्राझील वगैरेंना निर्यात केला म्हणीं विरोधकांचा प्रोपौगंडा सुरू आहे. परंतु, साधारण सगलीकडची परिस्थिती बघितल्यानंतर माझे असे मत झालें आहे की करोनाची दुसरी लाट इतकी मोठी येईल याचा अंदाज लावण्यात आपण सगळेच चुकलो, पण सगळीच सरकारे या प्रकाराला संवेदनशीलपणे सामोरी जात आहेत. पुनावाला यांचे स्टेटमेंट हे एकप्रकारे आपल्याकडची लाट ओसरायला लागण्याचे द्योतक आहे. जर एव्हढी मोठी लाट केवळ ऑक्सिजन च्या जोरावर सरकारे हाताळू शकली तर लसीचे महत्व काम होईल की काय असा देखील मला संशय वाटतो
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sun, 05/02/2021 - 04:49 नवीन
पुनावालांच्या विधानांचा आणि लाट ओसरण्याचा काय संबंध समजले नाही. ऑक्सिजन च्या आधारे पुढची लाट टाळण्याची आशा नाही, त्यासाठी वॅक्सिन पाहिजे. तिथेसुद्धा खात्री नाहीच, लाट टाळण्याची.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 05/01/2021 - 16:35 नवीन
पुनावाला यांनी, बिंधास्त नावे उघड करावीत... महामारीच्या काळांत तरी स्वार्थी पणा नको... जनतेला पण कळू देत की, मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे, नक्की कोण कोण आहेत....
  • Log in or register to post comments
क
कोण Sat, 05/01/2021 - 19:01 नवीन
https://www.opindia.com/2021/04/loksatta-quietly-edits-its-fact-check-on-rss-swayamsevaks-supreme-sacrifice/
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 05/02/2021 - 03:36 नवीन
लोकसत्ता, हा त्यापैकीच एक पेपर ....
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 05/02/2021 - 05:27 नवीन
काही वृत्तपत्रे लहान मुलांसाठी वापरले जातात.
  • Log in or register to post comments
अ
अगम्य Sat, 05/01/2021 - 23:27 नवीन
वेगळ्या दरांचे लॉजिक माझ्या मते असे असावे. केंद्र सरकारने सीरमबरोबर १५० रुपये दराने करार केला आहे. माझ्या माहितीनुसार दर महिन्याला सिरमने केंद्राला किती लशी द्यायच्या त्याची काही संख्या ठरलेली नाही. दरमहा सिरमने बनवलेल्या सगळ्याच्या सगळ्या लशी किंवा काही ठराविक टक्केवारी केंद्रालाच द्याव्यात असा काही करार नसावा. इतर देशातील ग्राहकांनी सुद्धा सीरमबरोबर (केंद्राच्या आधीच) खरेदी करार केले आहेत. त्यानुसार सीरम त्यांना लशी पुरवीत आहे (त्यातही सीरम मागे पडलेली आहे). लशी उपलब्ध होतील तश्या केंद्र सरकारला पुरवल्या जातील. केंद्र त्या लशी घेऊन दरमहा विविध राज्यांना थोड्या थोड्या वाटेल. केंद्राकडून आपल्याला दरमहा मिळालेल्या लशींपेक्षा जास्त लशी जर एखाद्या राज्याला हव्या असल्यास त्या राज्याने सीरमकडून वेगळ्या विकत घ्यायला केंद्राने परवानगी दिली आहे. राज्य हे सिरमसाठी निव्वळ एक वेगळे गिऱ्हाईक आहे. त्यासाठी सीरम खुल्या मार्केट प्रमाणे किंमत लावीत आहे. ज्या राज्यांना केंद्राचे लस वाटप पूर्ण होईपर्यंत थांबायचे नसेल, आणि जास्त पैसे द्यायची तयारी असेल त्यांनी जास्तीच्या लशी बाजारातून घ्याव्या असा हेतू दिसतो.
  • Log in or register to post comments
स
स्वलिखित Sun, 05/02/2021 - 03:55 नवीन
पिकवतो भरपूर , पण कमवत काहीच नाही
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Sun, 05/02/2021 - 04:17 नवीन
"पूनावाला (किंवा इतर कोणीही) हे कुंभमेळा किंवा निवडणुकीबद्दल बोलले तर त्यांचा शिरच्छेद केला जाऊ शकेल" यात न पटण्यासारखं काय आहे? शिरच्छेद करणारे शांतताप्रिय लोक, कुणी कुंभमेळ्याबद्धल चांगलं बोलणे, निवडणुकीमध्ये राष्ट्रहिताची भूमिका घेणे, यांचा शिरच्छेद करू शकणार नाहीत का?
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Sun, 05/02/2021 - 04:23 नवीन
अख्ख्या पारशी समुदायाला शांतताप्रिय लोकांनी पर्शियातून नष्ट केले याची भीती त्या समुदायातील आता शिल्लक राहिलेल्या लोकांना नसेल का?
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sun, 05/02/2021 - 04:43 नवीन
कायपण बोलताय.
  • Log in or register to post comments
प
पिनाक Sun, 05/02/2021 - 05:54 नवीन
https://www.livemint.com/news/india/raw-materials-are-needed-for-covovax-serum-tells-us-govt-11619804369271.html
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sun, 05/02/2021 - 08:22 नवीन
इतक्या दिवस गदारोळ चाललेला तो हे मटेरियल कोव्हिशिल्ड साठी आहे समजून चाललेला... फारच लवकर क्लारिफाय केले म्हणायचे.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 05/06/2021 - 09:21 नवीन
हा जाणकारांना माहिती होता, फेब्रुवारीपासुनच सुरुय हे. आपले अतिहुशार पत्रकार अन राजकारण्यांनी उगाच गोंधळ घातला.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 05/03/2021 - 11:48 नवीन
१५ वर्षात पहिल्यांदाच ग्राम प्रमुख गँगस्टर विकास दुबेच्या परिवारातून नाही! https://www.loksatta.com/desh-videsh-news/up-panchayat-polls-for-1st-time-in-15-years-village-head-not-from-vikas-dubeys-family-vsk-98-2460691/ ------------ कॉंग्रेसने तयार केलेले बाहुबलीराज हळूहळू संपत आहे,.... मुख्तार अन्सारी म्हणून तर पळाला ....
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 05/05/2021 - 23:18 नवीन
Dubey soon became one of the most wanted criminals in Kanpur. The first case against him was lodged in 1990 for murder.[4][6] Soon after, he associated himself as a close aide of the politician Harikishan Srivastava. Srivastava was then a part of the Bharatiya Janata Party (BJP) but joined the Bahujan Samaj Party (BSP) in the mid-1990s
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 05/06/2021 - 05:20 नवीन
ही अर्धवट आणि सोयिस्कर माहिती आहे. हरीकिशन श्रीवास्तव प्रारंभीच्या काळात १९७७ मध्ये जनता पक्षात होता, नंतर १९८० मध्ये तो जनता पक्ष (सेक्युलर) या पक्षात गेला. नंतर १९८७ मध्ये तो जनता दलात गेला. १९९०-९१ या काळात उत्तर प्रदेशात जनता दलाचे सरकार होते व मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव होते. त्या काळात हा उत्तर प्रदेश विधानसभेत सभापती होता. १९९३ ची निवडणुक त्याने भाजप तिकिटावर लढविली होती. नंतर लगेच तो बसपत गेला व १९९६ मध्ये बसप तिकिटावर निवडून आला होता. २००१ मध्ये तो वारला. १९९६ पासून २००१ पर्यंत तो बसपमध्ये होता. एकंदरीत हा सर्व पक्ष हिंडून आलेला दिसतोय.
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Mon, 05/03/2021 - 11:53 नवीन
https://www.lokmat.com/national/assembly-election-2021-politics-voices-are-getting-stronger-about-congress-rout-elections-a653/
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 05/03/2021 - 12:05 नवीन
परमपूज्य राहुल गांधी आणि घराणेशाहीच्या पाईकांना, कोण समजावून सांगणार?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 05/03/2021 - 15:36 नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh-news/serum-institute-ceo-adar-poonawalla-explanation-on-vaccine-shortage-rmt-84-2460865/ आता केंद्रावर कसे काय ढकलणार?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 05/03/2021 - 15:44 नवीन
“त्या पक्षाला उघडं पाडणार”; अदर पूनावाला प्रकरणावरुन आशिष शेलारांचा इशारा https://www.loksatta.com/maharashtra-news/bjp-ashish-shelar-on-serum-adar-poonawala-threats-sgy-87-2460714/ --------- असे केले तर, अगदी उत्तम ....
  • Log in or register to post comments
क
कॉमी Mon, 05/03/2021 - 19:20 नवीन
शेलार यांनी पण लेख पूर्ण वाचला नाही वाटतं. पेवॉल आहे त्यामुळे समजू शकतो. त्यांच्या पक्षावर सुद्धा बंदूक रोखली आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 05/04/2021 - 14:47 नवीन
मग ती माणसे, कुठल्याही पक्षाची का असेनात?
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Tue, 05/04/2021 - 16:38 नवीन
हे कधीच, कुठेही व कुणालाही कळत नसते, हो. आपण आपले, शक्य तितक्या व आपणांस विश्वास असेल अशा स्त्रोंतातून मिलालेल्या माहितीच्या आधारे, काही आडाखे बांधायचे. आता इथे पहा. माझ्या मते विऑन, व त्यांतील पलकी शर्माचे ग्रॅव्हिटास, हे बर्‍यापैकी विश्वसनीय माहिती देतात. ह्यांतील माहितीप्रमाणे, सदर गृहस्थाने ऑर्डरी घेतांना (त्यांत भारत सरकारच्या तसेच अ‍ॅस्ट्रो- झेनेकाच्या लायसन्सनुसार, WHO च्या कोव्हॅक्स कार्यक्रमासाठी परदेशी निर्यात करणे हे सर्व आले) आपल्या क्षमतेनुसार घेतल्या नाहीत. त्यामुळे आता थोडी गडबड उडाली आहे. कदाचित सुरूवातीस भारताची दुसरी लाट नव्हती, तसेच ती येत आहे, व अतिशय तांतडीने भारतासाठीच लशीचा पुरवठा करावा लागणार आहे, ह्याची त्याला कल्पना नसावी. एक मात्र खरे, सुरूवातीपासून सदर गृहस्थ बरीच विधाने, माध्यमांकडे करत आला आहे, त्यांतील बर्‍याच तक्रारीच्या सुरांत. पण भारत बायोटेकच्या सी.ई. ओंकडून असली काहीही वक्तव्ये ऐकावयास मिळालेली नाहीत. पूनावाला, बराच सुएव्ह असल्याने, परदेशी माध्यमांचा तो लाडका आहे, व त्याची त्यालाही जाण असावी, असे दिसते. यू. के. मधे जाऊन तो जो प्लँट उभारेल, त्याला उभारण्यास अजून किती वेळ लागेल वगैरे प्रश्न तर आहेतच, पण मला त्याहीपेक्षा पडलेला प्रश्न असा की, तो, तिथे तयार करणार असलेल्या लशी, नक्की कुठल्या मार्केट्साठी आहेत? तेथील स्थानिक मार्केट नसावे, कारण त्यांना स्वतःला हव्या असलेल्या लशींची त्यांनी केव्हाच तरतूद् फायझर, अ‍ॅस्ट्रा- झेनेका व मॉडर्ना ह्यांजकडून करवून घेतलेली आहे. हे भारतासाठी व कोव्हिक्सच्या कार्यक्रमासाठीही नसावे, कारण यू. के. मधील उत्पादनाची किंमतच त्याच्या विक्री- किंमतीपेक्षा बरीच जास्त होईल. तर मग हे उत्पादन नक्की कसले, व कुणासाठी?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 05/04/2021 - 17:16 नवीन
एका चर्चासत्रात असे सांगण्यात आले की भारत सरकारबरोबर केलेल्या करारानुसार सीरमला दिलेल्या वेळेस पुरेश्या लस देता आल्या नाहीत. त्यामुळे Breach of Contract च्या तरतुदीनुसार त्यांना मोठा दंड व कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे पूनावाला घाईघाईने भारताबाहेर गेले आहेत व आपल्याला धमक्या येत आहेत वगैरे सांगून लंडनमध्ये दीर्घकाळ वास्तव्यासाठी पार्श्वभूमी तयार करीत आहेत. खरे खोटे झरत्रुष्ट जाणे.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 05/03/2021 - 15:46 नवीन
तिथेच खाली ही बातमीसुद्धा दिसली. यात काही तथ्य असलं तर हा अतिशय गंभीर प्रकार आहे. https://www.loksatta.com/manoranjan-news/south-actor-tweeted-that-he-got-above-500-calls-of-death-threat-rape-threat-and-abuse-vsk-98-2457420/?utm_source=Taboola_Recirculation&utm_medium=RC&utm_campaign=LS
  • Log in or register to post comments
ल
लिओ Mon, 05/03/2021 - 19:16 नवीन
बातमी क्र. १ . . . Image removed. कोरोनामुळे किती लोक मृत्युमुखी पडले हे बाहेरील जगाला कळु नये म्हणुन हा फलक उत्तर प्रदेश मुख्यमंत्री यांच्या मतदारसंघातील गोरखपुर येथील स्मशानभुमीबाहेर लावण्यात आला होता. जेंव्हा तेथील लोकांनी व प्रसारमाध्यमांनी यावर विचारपुस केली असता गोरखपुर प्रशासन यावर काही उत्तर देऊ शकले नाही काही जागरुकांनी विचारले " कोणत्या कायद्यातंर्गत हा दंडनीय अपराध आहे ???" नंतर हा फलक काढुन टाकण्यात आला. उत्तर प्रदेश सरकार काय सिध्द करु ईच्छिते कळत नाही .... बातमी क्र. २ Image removed. हे ट्वीट उत्तर प्रदेश मुख्यमंत्री कार्यालयाकडुन प्रसिध्द करण्यात आले. उत्तर प्रदेश मुख्यमंत्री व उत्तर प्रदेशातील विद्वान कोरोना काळात नायट्रोजन वायुचे रुपांतर ऑक्सिजन वायुमध्ये करण्यासाठी IIT kanpur मधील तज्ञांबरोबर चर्चा करण्याबद्द्ल ट्वीट केले होते. नंतर हे ट्वीटपण हटवले. कंपाऊंडरने ज्ञान उधळले सगळ्या जगाने पाहीले त्या कंपाऊंडरच्या पुढे जाणारे धन्य ते " उत्तर प्रदेश मुख्यमंत्री " धन्य ते "उत्तर प्रदेश IAS अधिकारी " धन्य ते "उत्तर प्रदेशचे डोळस विद्वान " खरच नेहरुंनी आता खाली येऊन लोटांगण घातले पाहिजे I. I. T. सुरु केल्याबद्द्ल याला खरोखर नेहरुच जबाबदार आहेत.
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Tue, 05/04/2021 - 03:41 नवीन
ते तेवढ मेरिट सगळीकडेच आणाव का?
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 05/04/2021 - 04:36 नवीन
दंडणीय आहे कि नाही माहित नाही छायाचित्र घेउ नका हि विनंती कदाचित मुद्डमून भीषणता पसरवली जाऊन लोकं अजून भिऊ नयेत म्हणून हि केली असेल ? पण ममृतनवार अंत संस्कार करताना त्याचे चित्रीकरण सगळ्याच समजत ( देश/ धर्म/ वर्ण ) योग्य मानले जाते असे नाही किंवा काही ठिकाणी याचाच होतो तेवहा टिळक करम्य आधी जगभर प्रथा वेगवेगळी असू शकतात हे ध्यानात घावे दोन उदाहरें - १) मृत व्यक्तीचे छायाचित्र बघणे हे उचित ना समजले जाते असा ऑस्ट्रेलियातील आदिवासी समाज = it’s common practice that when there is a member of the community that has deceased, the person’s name is changed due to cultural beliefs and the images of that person are suppressed. https://www.sbs.com.au/nitv/article/2017/07/27/indigenous-cultural-protocols-what-media-needs-do-when-depicting-deceased-persons २) म्रुत व्यक्तीचं अंत संस्करचे मिरवणूक पद्धतीत / उत्सव पद्धतीत मोडणारा सामाजिक बाली हिंदू प्रथा = बाली हिंदू https://www.youtube.com/watch?v=Kx42qrqmEks ३) दफनांतर च्या दुख्खद परिस्थिती पण नीटनेटके कपडे घालून अल्पोपहार असतो = ख्रिस्ती ४) मरणांनंतर दुःखहामुळे खाणे वगैरे त्यागाने हि विरक्ती = भारतीय हिंदू , पण दुखः सरलायचे चिन्ह म्हणून १३ वया ला गोडाचे जेवण अर्थात या सर्व चालीरीती आपापल्या परीने यौग्य आहेत टीका करू नये
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 05/04/2021 - 04:41 नवीन
किंवा काही ठिकाणी याचा उत्सव होतो तेवहा टीका करम्य आधी जगभर प्रथा वेगवेगळी असू शकतात हे ध्यानात घावे
  • Log in or register to post comments
प
पिनाक Tue, 05/04/2021 - 05:35 नवीन
नायट्रोजन प्लँट चे ऑक्सिजन प्लँट मध्ये रूपांतरण बद्दल सध्या चर्चा चालू आहेत existing Pressure Swing Absorption (PSA) nitrogen plants for production of oxygen was discussed, the Prime Minister's Office said. In the nitrogen plants Carbon Molecular Sieve (CMS) is used whereas Zeolite Molecular Sieve (ZMS) is required for producing oxygen. https://www.livemint.com/news/india/govt-explores-feasibility-of-converting-nitrogen-plants-to-produce-oxygen-11619950250151.html
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 05/06/2021 - 09:27 नवीन
अंतर्गत करता येऊ शकेल कारवाई. कोणत्याही सु़जाण नागरिकाला स्मशानात जळणार्या चितांचे असे प्रदर्शन आवड्णार नाही. बाकि तो नाय्ट्रोजन तयार करणार्या प्लांटचा उपयोग ऑक्सिजन तयार करता येईल का ह्या विषयी असावा. ट्विटरवरही प्रूफ रिडर्स बसवावे लागणार ह्यांना !!
  • Log in or register to post comments
स
सुक्या Mon, 05/03/2021 - 20:48 नवीन
बातमी : https://www.loksatta.com/maharashtra-news/serum-should-supply-more-vaccine-to-maharashtra-health-minister-tope-msr-87-2460969/ खुले आम आरोग्यमंत्री राजेश टोपे स्पेशल ट्रीटमेंट ची गोष्ट करत आहेत. हतबलता असेल कदाचीत परंतु असाच प्रकार इतर राज्यांनी (आक्सिजन वगेरे) साठी केला तर काय परीस्थिती उद्भवेल हे सांगता येणार नाही. पुनावाला यांनी खुलासा केला ते एक बरे झाले. https://twitter.com/adarpoonawalla/status/1389166756871041024 सरकार काहीही करत नाही हे बोलनारे थोडे गप्प तरी होतील.
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Tue, 05/04/2021 - 03:26 नवीन
https://www.hindustantimes.com/cities/mumbai-news/iitbombay-converts-existing-nitrogen-plant-into-oxygen-generator-101619723864256.html
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    19 hours 55 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 7 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 9 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 11 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 15 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा