Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - मे २०२१ (भाग १)

श
श्रीगुरुजी
Sat, 05/01/2021 - 11:30
🗣 130 प्रतिसाद
बिहारमधील अत्यंत क्रूर माफिया डॉन बाहुबली महंमद शहाबुद्दीन कोरोनामुळे गेला. तो पूर्वी अनेकदा लालूच्या राजदच्या तिकिटावर निवडून आला होता. पूर्वी त्याला अटक करण्यास गेलेल्या पोलिसांवर त्याच्या टोळीतील सदस्यांनी गोळीबार करून ११ पोलीस मारले होते. इतर अनेक खुनांचा त्याच्यावर आरोप होता. शेवटी दोन भावांंचा खून केल्याचा आरोप त्याच्यावर सिद्ध झाल्याने त्याला जन्मठेप मिळाली होती. अपेक्षेप्रमाणे लालूपुत्र तेजस्वी यादवने त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे. https://www.loksatta.com/desh-videsh-news/covid-updates-former-rjd-mp-mohammad-shahabuddin-dies-of-covid19-tihar-jail-dg-bmh-90-2459066/ काल भारतात कोरोनाचे ४,०१,९९३ नवीन रूग्ण सापडले व ३,५२३ जणांचा मृत्यु झाला.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 39889 views

🗣 चर्चा (130)
स
सुखीमाणूस Tue, 05/04/2021 - 03:37 नवीन
बन्गालमध्ये एकही जागा मिळाली नाही https://www.loksatta.com/desh-videsh-news/west-bengal-people-rejected-the-congress-and-the-left-parties-in-2021-assembly-election-rmt-84-2460721/
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 05/04/2021 - 05:43 नवीन
जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन (मल्होत्रा) यांचे ४ मे २०२१ रोजी वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांचा २५ सप्टेंबर १९२७ रोजी आता पाकिस्तानात गेलेल्या हाफिजाबाद येथे जन्म झाला. ते फाळणीनंतर दिल्लीला आले. काही वर्षात त्यांनी सनदी सेवेत प्रवेश केला. आणीबाणीच्या वेळेस ते दिल्ली डेव्हलपमेन्ट ऑथोरिटीचे उपाध्यक्ष होते. आणीबाणीत संजय गांधी हे घटनाबाह्य सत्ताकेंद्र होते. आपली शहरे सुंदर असावीत असा संजयचा आग्रह होता आणि दिल्लीत लाल किल्ल्याहून जामा मशिदीचे घुमट दिसले पाहिजेत असा त्याचा आग्रह होता. तसे होण्यात तुर्कमान गेटजवळच्या अनधिकृत झोपडपट्टीचा अडसर होता. ही झोपडपट्टी बळाचा वापर करून हटवायचा आदेश संजय गांधींनी दिला होता. त्यावेळी रहिवाशांनी विरोध केल्यावर तिथे गोळीबार झाला आणि अनेक लोक मारले गेले. किती लोक मारले गेले याचा खरा आकडा आणीबाणी असल्याने शेवटपर्यंत बाहेर आला नाही. काही अंदाजांप्रमाणे १५० च्या आसपास लोक तिथे मारले गेले. या सगळ्या प्रकारात जगमोहन यांची भूमिका संशयास्पद होती. या प्रकरणात संजय गांधी यांनी काहीच चुकीचे केले नाही असे जगमोहन यांचे मत होते आणि ते नंतरच्या काळातही कायम राहिले. तुर्कमान गेट प्रकरण हे जगमोहन यांच्या कारकिर्दीवर काळा डाग होते हे नक्की. १९८४ मध्ये इंदिरा गांधींनी त्यांना जम्मू काश्मीरचे राज्यपाल म्हणून पाठवले. त्यावेळी राज्यपालांना हाताशी धरून विरोधी पक्षांची राज्य सरकारे पाडायचा इंदिरांनी प्रयत्न केला. त्याप्रमाणे काँग्रेसने नॅशनल कॉन्फरन्सच्या काही आमदारांना हाताशी धरले आणि २ जून १९८४ रोजी हे आमदार राज्यपाल जगमोहन यांना भेटायला गेले. त्यानंतर मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी बहुमत गमावले आहे असे म्हणत जगमोहन यांनी फारूख अब्दुल्लांचे सरकार तडकाफडकी बरखास्त केले. महिन्याभरात असाच प्रकार इंदिरा गांधींनी आंध्र प्रदेशातही केला. या प्रकारामुळे जगमोहन आणि इंदिरा दोघेही बदनाम झाले. मे १९८९ मध्ये त्यांची काश्मीरचे राज्यपाल म्हणून कारकिर्द संपली. १९८७ च्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्यातील वातावरण बिघडत आहे असे अनेक इशारे जगमोहन यांनी केंद्र सरकारला दिले होते पण त्याची दखल राजीव गांधींच्या सरकारने घेतली नाही म्हणून वातावरण बिघडले असे त्यांचे मत झाले. जानेवारी १९९० मध्ये त्यांची राज्याचे राज्यपाल म्हणून परत एकदा नियुक्ती झाली. नेमक्या त्याच दरम्यान काश्मीर खोर्‍यातून हिंदूंना देशोधडीला लावले जात होते. एकूणच तो काळ खूप कठिण होता. तसेच जगमोहन यांच्या राज्यपालपदावर केलेल्या नियुक्तीचा निषेध म्हणून मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी राजीनामा दिला आणि लगेच राज्यात राज्यपाल राजवट लावण्यात आली. २६ जानेवारी १९९० ला शुक्रवार होता. त्यावेळी श्रीनगरमध्ये इदगाह मैदानात दोनेक लाख लोक एकत्र जमून काश्मीर भारतापासून फुटून निघणार अशी घोषणा करणार अशी माहिती जगमोहन यांना मिळाली होती. त्यामुळे २६ जानेवारीचा दिवस असूनही त्यांनी श्रीनगरमध्ये कडक संचारबंदी लावली आणि कोणालाही घराबाहेर पडू दिले नाही. त्यातून मोठा अनर्थ टळला. ही परिस्थिती त्यांनी नक्कीच कौशल्याने हाताळली. त्यानंतर काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात त्यांनी कडक भूमिका घेतली. हिलिंग टच वगैरे पुरोगामी फालतूपणाला स्थान दिले नाही आणि दहशतवाद्यांना ठोकायला सुरवात केली. बहुदा हा प्रकार वि.प्र.सिंगांच्या सरकारला आवडला नसावा. नंतरच्या काळात मुख्यमंत्री झाल्यावर हिलिंग टच हे धोरण अंमलात आणणारे मुफ्ती महंमद सईद वि.प्र.सिंगांच्या सरकारमध्ये गृहमंत्री होते. शेवटी २६ मे १९९० रोजी केंद्र सरकारने त्यांना राज्यपाल पदावरून परत बोलावले आणि राज्यसभेवर नियुक्त केले. १९९६ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून ते १९९६, १९९८ आणि १९९९ मध्ये लोकसभेवर निवडून गेले. अटलबिहारी वाजपेयींच्या मंत्रीमंडळात ते मंत्री पण होते. २००४ मध्ये त्यांचा काँग्रेसच्या अजय माकन यांनी पराभव केला. त्यानंतर ते सक्रीय राजकारणातून निवृत्त झाले. जगमोहन यांचे 'माय फ्रोझन टरब्युलन्सेस इन काश्मीर' हे काश्मीरच्या राज्यपालपदाच्या कारकिर्दीवर पुस्तक प्रसिध्द आहे. त्या पुस्तकाचे पत्रकार मो.ग.तपस्वी यांनी 'काश्मीर- धुमसते बर्फ' या नावाने मराठीत भाषांतर केले होते. शाळेत असताना मी ते मराठी भाषांतर वाचले होते आणि नंतर मुळातले इंग्लिश पुस्तकही वाचले. ठाण्यात रामभाऊ म्हाळगी स्मृती तर्फे जानेवारी महिन्यात व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते (निदान त्यावेळी केले जायचे). त्यासाठी ते जानेवारी १९९४ मध्ये ठाण्यात आले होते. त्यांच्या भाषणाला मी गेलो पण होतो आणि त्यांच्या पुस्तकाच्या माझ्याकडील मराठी भाषांतरावर त्यांची सही घ्यायचा माझा प्रयत्न होता. पण प्रेक्षकांपैकी कोणालाही त्यांच्या जवळ जायला पोलिसांनी मनाई केली होती त्यामुळे मला ती सही घेता आली नाही. त्या पुस्तकात काश्मीरात ३७० व्या कलमामुळे नक्की काय दुष्परिणाम झाले याविषयी विस्ताराने लिहिले आहे. हे कलम रद्द करावे अशी आग्रही मागणी त्यात केली आहे. २०१९ मध्ये शेवटी ते कलम काढले तेव्हा गृहमंत्री अमित शहांनी जगमोहन यांच्याशी पण चर्चा केली होती असे वाचल्याचे आठवते. असो. जगमोहन यांना श्रध्दांजली. Image removed.
  • Log in or register to post comments
प
पिनाक Tue, 05/04/2021 - 06:01 नवीन
https://www.hindustantimes.com/india-news/1-ct-scan-is-equivalent-to-300-chest-x-rays-guleria-warns-against-risk-of-cancer-101620041702134-amp.html 1 CT स्कॅन = 300 ते 400 x-ray?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 05/04/2021 - 15:16 नवीन
https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/ncp-mla-nilesh-lanke-takes-responsibility-of-covid-positive-children-after-relatives-refused-to-come-forward/articleshow/82389506.cms -------------- सगळे लोकसेवक, असेच वागायला लागले तर, फारच उत्तम ....
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 05/04/2021 - 18:57 नवीन
बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत. ३०० पेक्षा जास्त भाजप कार्यकर्ते घाबरून बंगाल सोडून आसाममध्ये गेले आहेत.

In a sad development 300-400 @BJP4Bengal karyakartas and family members have crossed over to Dhubri in Assam after confronted with brazen persecution & violence. We’re giving shelter & food. @MamataOfficial Didi must stop this ugly dance of demonocracy!

Bengal deserves better. pic.twitter.com/d3MXUvgQam

— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) May 4, 2021
हेच समजा युपी किंवा इतर कोणत्या भाजपशासित राज्यात झाले असते, विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या असत्या तर सगळा हलकल्लोळ उडाला असता. सगळ्या पुरोगामी ढुढ्ढाचार्यांनी असहिष्णुता, फासिझम वगैरे वगैरे वर लेक्चर झोडली असती. पण आता कसे सगळे काही थंड. जसे काही घडलेलेच नाही अशाप्रकारे सगळे पुरोगामी विचारवंत वावरणार. असल्या लोकांची किळस का येऊ नये?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 05/05/2021 - 02:13 नवीन
‘बंगालमध्ये वाघीण जिंकली म्हणणारे, हिंसाचाराच्या घटनेवर मुग गिळून गप्प’, प्रवीण दरेकरांचा शिवसेनेवर निशाणा https://www.tv9marathi.com/politics/vilence-in-bengal-opposition-leader-praveen-darekar-criticizes-shiv-sena-on-the-backdrop-of-violence-in-west-bengal-450464.html/amp ------------- काय बोलावं ते सुचेना....
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 05/05/2021 - 03:18 नवीन
असल्या लोकांची किळस का येऊ नये? फक्त किळस...? जे शब्द आहेत ना ते इथे लिहिता येत नाहीत जीप ला पुढे बान्धुन या लोकांना सिरीयात पाठवले पाहजे किंवा मोसुल ला
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Wed, 05/05/2021 - 08:28 नवीन
तर हतबालता आहे जर तुम्ही खरी बातमी लोकानपुढे पोचवु शकत नसलात तर. आता तर विरोधक/सेक्युलर असा आव आणतिल की ही अबला ममता असुन तिने जखंमी वाघिण बनुन शहा व मोदिना पराभुत केले आहे... तिची लोक ह्या भाजपा च्या लोकाना वठणीवर आणतील चान्गला मार देउन.. आता दुसर्याच्या काठीने साप मारणारी आणि टाळ्या पिटणारी ही सगळी लोक तीच काठी त्यान्च्या स्वताच्या पाठीत बसायला लागली की मग रणरागिणी ममताला डायन ममता ठरवतील... खुप मजा येइल २०२४ ला हे सगळे एकत्र येउन बहुमताने निवडुन आले तर खातेवाटपासाठी जो गोन्धळ घालतील तो पहायला... कोण असेल पन्तप्रधान २०२४ चा प्रियान्का/राहुल्/ममता/मामु/जाणता राजा प्रणित कोणी की एक एक वर्ष प्रत्येक जण... मराठी माणुस पन्तप्रधान कधी बनणार?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 05/05/2021 - 09:34 नवीन
पण जनता पार्टीचा अनुभव घेतला आहे ... त्यामुळे लोकसभेत एकच पार्टी हवी ...
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 05/05/2021 - 08:15 नवीन
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. एक चांगला निर्णय.
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Wed, 05/05/2021 - 08:35 नवीन
कधी काढायचे? बिचारी मराठा तरुण लोक किती एकत्र आली होती कारण एका भट मुख्यमन्त्र्याला कामाला लावायचे होते... ठाकरे मराठा आहेत ना? नाहीतर परत मोर्चे काढावे लागतील. करोना मुळे भारतात नाही शक्य पण परदेशातील मराठा बान्धव आहेच जातीच्या सेवेला हजर..
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 05/05/2021 - 11:22 नवीन
मुळात मराठे अत्यंत मागास आहेत असे कागदावर दाखविणारा फ्रॉड अहवाल फडणवीसांनी तयार करून घेतला होता व त्याआधारे तब्बल १६ टक्के राखीव जागा देऊन अराखीव वर्गावर प्रचंड अन्याय केला होता. हाच अराखीव वर्ग भाजपचा कट्टर समर्थक होता. हा फडणवीसांचा अपराध अक्षम्य आहे. फडणवीस भाजप नेता असेपर्यंत महाराष्ट्रात भाजपला मत नाही.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 05/05/2021 - 12:02 नवीन
नक्कीच. फ्डणवीसांची या बाबतीतली भूमिका संशयास्पद आहेच. फडणवीस मलाही फार आवडतात असे नक्कीच नाही. या बाबतीत इतर कोणीही सत्तेवर असता तरी अशीच माती खाल्ली असते असे वाटते. मुळात पृथ्वीराज मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणासंबंधी मंत्रीमंडळाने निर्णय घेतला होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर हा निर्णय घेऊन विधानसभेत सत्ता राखता येईल अशी काँग्रेसची अपेक्षा असावी. फडणवीसांचा हा निर्णय आवडला नसला तरी भाजपला मत न देण्याचा निर्णय मी तरी घेऊ शकत नाही. कारण सध्या सत्तेत असलेला प्रकार अत्यंत किळसवाणा आणि राज्याला कलंक असलेला आहे. त्याला काहीही झाले तरी हटवायला हवे. त्यामुळे दगडापेक्षा वीट मऊ म्हणा की आणखी काही म्हणा मी तरी फडणवीसांचे काही निर्णय मान्य नसले तरी भाजपलाच मत देणार.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 05/05/2021 - 12:06 नवीन
सध्या सत्तेत असलेला प्रकार अत्यंत किळसवाणा आणि राज्याला कलंक असलेला आहे. त्याला काहीही झाले तरी हटवायला हवे. + ९९९९९९९९ ... त्यामुळे दगडापेक्षा वीट मऊ म्हणा की आणखी काही म्हणा मी तरी फडणवीसांचे काही निर्णय मान्य नसले तरी भाजपलाच मत देणार. फडणवीस किंवा चंपा हे जर मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार नसतील तरच भाजपला मत, अन्यथा नोटा.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 05/05/2021 - 12:28 नवीन
आरक्षणाचा मुद्दा, डब्बल ढोलकी वाला केला होता.... आरक्षण नसते दिले तर मराठा समाज नाराज झाला असता आणि आरक्षण दिले तर, इतर समाज नाराज झाला असता .... हा एक मुद्दा झाला .... दुसरा मुद्दा म्हणजे, The Longest Day.... फडणवीस का नको होते? आपण जर आढावा घेतलात तर बरेच तुकडे मिळतील ... 1. एकनाथ खडसे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले नाही 2. कुठलाही मोठा घोटाळा नाही, चिक्की प्रकरण जितक्या जोरात पुढे आले तितक्याच जोरात आता बुडाले .... 3. सचिन वाझे यांना परत कामावर घेतले नाही 4. आम्हाला कामे करू देत नाहीत, असा शिवसेनेच्या मंत्र्यांचा आरोप 5. नाणार 6. जैतापूर आणि सगळ्यात मोठा 7 वा तुकडा म्हणजे, बुलेट ट्रेन आणि मेट्रो.... ह्या 7 व्या तुकड्यावरच सगळी मदार आहे ... बुलेट ट्रेन हा एक Prestige Issue आहे.... त्यामुळे, जो कुणी बुलेट ट्रेन आणेल, त्या पक्षाला एक प्रकारची सामाजिक प्रतिष्ठा नक्कीच मिळेल... उदाहरणार्थ डब्बल डेकर एक्सप्रेस ... आता ह्या सातही मुख्य गोष्टींना लपवण्यासाठी, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने, मराठा आरक्षणाचा मुद्दा उठवला .... 60-70 च्या काळापासून हा मुद्दा आहे, तो नेमका फडणवीस यांच्या कारकिर्दीतच का आला? वैयक्तिक सांगायचे तर, मराठा समाजातील अजूनही कितीतरी मंडळी आर्थिक दृष्टीने गरीब आहेत आणि बुद्धीवान असूनही, त्यांना आरक्षणाचा फायदा मिळत नाही... समाजातील, अशा घटकांना आरक्षणाचा फायदा मिळालाच पाहिजे...
  • Log in or register to post comments
प
पिनाक Wed, 05/05/2021 - 12:43 नवीन
आरक्षण हे आर्थिक दृष्ट्या देणे चुकीचे आहे कारण मग आपण असं मानतो की एखादा माणूस श्रीमंत असेल तर त्याच्यापेक्षा गरीब माणसाचा हक्क जास्त आहे. हे खरं असेल का? असावं का? जर अ श्रीमंत आहे, ब गरीब आहे तर केवळ त्यामुळे अ च्या मुलाला मेडिकल ला ऍडमिशन मिळू नये आणि ब च्या मुलाला मिळावी? कदाचित ब ला पैसे कमावण्याची अक्कल नसेल. कदाचित ब कष्टाळू नसेल. कदाचित ब ने लहानपणी टवाळक्या करून आलेली संधी गमावली असेल. त्यासाठी अ ला शिक्षा द्यायची? थोडक्यात, आपण चुकीच्या गोष्टीला समर्थन आणि प्रोमोट करतोय.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 05/05/2021 - 13:00 नवीन
आर्थिक दरी अधिकच वाढत जाईल .... एक उदाहरण देतो .... केवळ पैसे नाहीत म्हणून माझ्या एका मित्राला बुद्धीमत्ता असूनही इंजिनीयर होता आले नाही, कारण तो सवर्ण होता. आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षणाचा फायदा मिळाला पाहिजे, हे माझे वैयक्तिक मत आहे.
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब Wed, 05/05/2021 - 13:30 नवीन
बुद्धीमत्ता असूनही इंजिनीयर होता आले नाही, कारण तो सवर्ण होता
. हे माझ्यासोबत होता होता राहिले. शेवटच्या क्षणी माझ्या आई वडिलांनी कर्ज करून आणि दागिने वगैरे मोडून management quota मधुन एडमिशन घेऊन दिले.. अर्थात माझे गुण चांगलें होते पण इंजिनिअरिंग मध्ये हवा तो ट्रेड मी रहात असलेल्या शहरात मिळत नव्हता. कट ऑफ पेक्षा ३ गुण कमी पडले. इतर शहरात एडमिशन मिळाली असती पण मग परत तिथे हॉस्टेल, जेवण, येणे जाणे इ गोष्टी साठी एडिशनल खर्च पुढच्या ४ वर्षात करावा लागला असता. त्याचसोबत मी शिकता शिकता घरी व्यवसायाला हातभार लावत होतो ते देखील जमले नसते आणि सर्व भार पुन्हा वडिलांवर आला असता. माझ्यापेक्षा कितीतरी कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना सहज एडमिशन मिळाली. एक विद्यार्थी माझ्यापेक्षा निम्मेच गुण मिळून सुध्दा त्याचे एडमिशन झाले. का?? तर तो NT कॅटेगरी चा होता. नंतर हाच मुलगा कॉलेज ला बुलेट घेऊन येऊ लागला ( त्यावेळी कॉलेज ला स्वतःची गाडी घेऊन येने ही खूप उच्चाभ्रू गोष्ट होती) आणि मी बसचा एक रुपया वाचवण्यासाठी घरापासून अलीकडच्या स्टॉप वर उतरून तिथून चालत जायचो. लहानपापासून ज्या गोष्टीचा ( जातीपाती) कधी विचार ध्यानीमनी नव्हता , त्या गोष्टीने क्षणात माझे डोळे खाडकन उघडले होते. आणि तिथून पुढे आरक्षण या व्यवस्थेवर राग आणि चीड निर्माण झाली ती आजतागायत आहे.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Wed, 05/05/2021 - 15:29 नवीन
त्यांच्या पूर्वजांनी हज्जारो वर्षे अन्यायात सोसला त्याची ही किंमत समजा.
  • Log in or register to post comments
प
पिनाक Wed, 05/05/2021 - 15:55 नवीन
पूर्वजांच्या अन्यायाची किंमत या generation ने चुकवायची असते? मग जपान ने अमेरिकेवर अणुबॉम्ब टाकायला हवा, भारताने ब्रिटन ला आपली वसाहत बनवायला हवं, इन्का लोकांच्या वारसांनी स्पेन मध्ये जाऊन कतलेआम करायला हवा, ज्यूंनी जर्मन लोकांचं शिरकाण करायला हवं. हो ना?
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक गुरुवार, 05/06/2021 - 12:41 नवीन
ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांची कदाचित आजसुद्धा बदला घेण्याइतकी ताकद नसल्याने बदला घेत नसतील. अमेरिकेवर सत्ता गाजवता आली तर जपान्यांना नको असेल? किंवा ब्रिटन भारताच्या ताब्यात राहिला तर भारताचा फायदाच आहे की.
  • Log in or register to post comments
प
पिनाक गुरुवार, 05/06/2021 - 13:02 नवीन
थोडक्यात, जर एखाद्याला बदला घेता आला तर त्याने तो घ्यायलाच हवा नाही का? अमेरिकेवर ब्रिटनने प्रचंड अन्याय केला पण दुसऱ्या महायुद्धात ब्रिटन च्या मदतीला अमेरिकेने धाव घेतली. त्यांना बहुधा हे असं करायचं असतं हे माहीत नसावं. जपान ने दुसऱ्या महायुद्धात केलेल्या अत्याचारांचा परिणाम म्हणून सिंगापूर पासून सगळ्या दक्षिणपूर्व देशांमध्ये आजही जपानी पर्यटकांचे शेकडोंच्या संख्येने खून पडतात हे आपल्याला ज्ञात असणारच. तुमच्या तर्कशास्त्राप्रमाणे अगदी भारतात सुद्धा NT, SC, ST यांच्यामध्ये बदला घेण्याची ताकत जेव्हा येईल तेव्हा ते मराठा लोकांचे खून पाडतील असा अंदाज करायला हरकत नाही. निअंडरथल अगदीच नाहीसे झालेले नाहीयेत तर ! असो !! ता.क.: ब्रिटन भारताच्या ताब्यात राहिला तर भारताचा फायदा कसा ते मला काही कळलं नाही. तेवढं जरा सांगून उपकृत करावे ही नम्र विनंती.
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 05/06/2021 - 13:29 नवीन
१. जर्मन लोकांनी ज्यूंच्या शिरकाणासाठी रिपेरेशन्स दिले आहेत आणि देतही आहेत. होलोकास्ट मधल्या लोकांसाठी जर्मनीने जवळपास ९१.९ बिलीयन डॉलर आजच्या तुलनेत खर्च केले आहेत. हे पैसे विविध देशांना तसेच विविध होलोकास्ट पीडितांना देण्यात आले आहेत. हा आकडा रुपयांमध्ये काढताना माती गुंग होते. (६,३८,४०० करोड रुपये जवळपास.) जर्मनीने पूर्ण मनापासून रिपेरेशन्स देऊन स्वतःची मान उंचावली आहे, आणि बाकी देशांमध्ये जर्मनीचे उदाहरण दिले जाते. https://qz.com/1915185/how-germany-paid-reparations-for-the-holocaust/amp/ २.ब्रिटनने भारताला रिपेरेशन द्यावेत असे शशी थरूर यांचे ऑक्सफर्ड डिबेट मोठ्या चवीने भारतीय बघतात. ३. जपान वर बॉंब टाकणे हि चुकीची गोष्ट होती आणि आहे, पण त्याची तुलना ज्यू शिरकाण, वसाहती इइत्यादींशी करणे हास्यास्पद आहे. जपान त्याच ज्यू लोकांना मारणाऱ्या आक्रमक देशाच्या बाजूने लढत होता आणि अमेरिकेच्या पर्ल हार्बर् वर हल्ला केला होता.बाकी सर्व घटनांमध्ये एक क्लिअर अन्यायी आणि क्लिअर अन्यायग्रस्त आहे. जपान बद्दल ही रेषा अत्यंत धुसर आहे. ४. अमेरिकेत नेटिव्ह लोकांवर आणि कृष्णवर्णीय लोकांवर केलेल्या अन्यायासाठी रिपेरेशन्स मागितल्या जातात, आणि काही प्रमाणात दिल्या सुद्धा गेल्या आहेत. किंमत चुकवणे म्हणजे जष्यास तशी हिंसा असा बालिश अर्थ नसतो, तर झालेल्या अन्यायांमुळे मागे पडलेल्या लोकांना लेव्हल फिल्डवर आणणे असते. हे बालिश अर्थ केवळ विषय साईडट्रॅक करायला काढले जातात. तुमचा आर्थिक निकषावर सुद्धा आरक्षणास विरोध आहे, मग तिथे पूर्वज्यांच्या चुकांचे निकष का लावत नाही तुम्ही ? एकवेळ गरिबीचे दुष्टचक्र हि संकल्पना खिडकीबाहेर भिरकावून म्हणूया कि सगळ्या गरीब मुलांच्या स्थितीचे कारण त्यांचे आईबाप असतात जे मूर्ख आणि मददड असल्याने त्यांना काही उखाडता आले नाही. मानले. तर इथे त्या मुलांची काय चूक ? त्यांना त्यांच्या जीवनात अतिरेकी कष्ट केल्याशिवाय पैसे असलेल्या मुलांशी स्पर्धा करता येणार नाही. मग सगळ्यांनी मिळून त्यांना संधी देणे हे मला तर चांगलेच वाटते. इथे कुणाच्या चुकांची भरपाई कुणी करायची हा प्रश्न कमी महत्वाचा आहे. व्यवस्थेने अन्याय केल्यामुळे कोण मैलभर मागे राहिले आणि आता व्यवस्थेनेच त्यांना पुढे आणायला काय करायला हवे, हा प्रश्न आहे. Equality of opportunity. किंमत चुकवणे हा गौण मुद्दा आहे.
  • Log in or register to post comments
स
साहना गुरुवार, 05/06/2021 - 20:46 नवीन
संपादित सदस्यांनी प्रतिसाद देताना सामाजिक संकेतांचे भान राखणे आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
स
साहना गुरुवार, 05/06/2021 - 20:57 नवीन
कॉपी पेस्ट करताना दोन पोस्ट चुकून पेस्ट झाले आहेत. प्रतिसाद खालील प्रकारे वाचावा. (संपादक मंडळींना वरील प्रतिसाद संपादित करावासा वाटला तर डिलीट न करता empty ठेवावा) संपूर्ण सृष्टींत "न्याय्य" (फेअर) असे काहीच नाही. तुम्ही कुठे जन्माला येत ह्यावरच अनेक गोष्टी अवलंबून आहेत. तुम्ही सोमालिया मध्ये जन्माला आला किंवा न्यू यॉर्क मध्ये जन्माला आला ह्यावरूनच तुमच्या भविष्याला मोठा फरक पडतो. तुम्ही पुरुष म्हणून जन्माला आला किंवा स्त्री म्हणून जन्माला आला ह्यावरून खूप फरक पडतो. मानवाचे सोडून द्या पृथ्वी वरच न्याय्य असे काहीच नाही. रशिया मधील सर्व नद्या आर्टिक समुद्रांत जाऊन मिळतात त्यामुळे ह्या देशाला जुन्या काळांत जास्त प्रगती करता आली आणि. ह्याच्या उलट फ्रांस आणि लंडन आहे. जगांतील ९८% टोर्नेडो अमेरीकेतील एका छोट्याश्या भागांत निर्माण होतात. आफ्रिकेतील बहुतेक नद्या दळण वळणास योग्य नाहीत त्यामुळे ह्यांना नाविक व्यापार करता येत नाही. जगांतील खनिज तेलाचे साठे काहीच देशांत उपलब्ध आहेत तर जगांतील सिलिकॉन चिप डिसाईन ५-६ देशांतच होतो. जगांतील जवळ जवळ ८०% टेक कंपन्या ह्या सिलिकॉन वेलीतील सुमारे १००० चौरस मैलांच्या आत आहेत. पृथ्वीच न्याय्य नसल्याने निव्वळ भौगोलिक उपस्थिती वरून व्यक्तीला प्रचंड फरक पडतो. अफगाणिस्तान ला प्रत्येक शतकांत मोठ्या आक्रमणाला सामोरे जावे लागते तर जपान ला दररोज भूकंपाचा सामना करावा लागतो. पण भौगोलिक स्थानच नाही तर इतिहास, धर्म, जात, लिंग, पूर्वज, जन्मस्थान, भाषा ह्या अनेक गोष्टी ज्या आमच्या हातांत नाहीत त्यावरून आमच्या भवितव्यावर प्रचंड म्हणजे खूपच प्रचंड फरक पडतो. हि वस्तुस्तिथी आहे. निव्वळ एखादा दुसरा निकष लावून सरकारी दंडुका वापरून आम्ही "समता" आणणार हा निव्वळ मूर्खपणा तर आहेच पण माझ्या मते लबाड माकडा प्रमाणे बोक्याकडून लोणी पळविण्याचा प्रकार आहे. भारतातील सर्वच मंडळी एके काळी गरीब होती. सर्वांचेच पूर्वज साधारण व्यक्ती होते आणि सर्वच लोकांना विविध काळ आणि स्थानात अत्याचारांचा सामना करावा लागला. काहींना जास्त तर काहीना कमी असू शकतो पण हे मोजण्याची काहीही पट्टी आमच्याकडे नाही. समानते साठी लोकांच्या हृदयाला पीळ पडणे स्वाभाविक आहे पण "बदला" देऊन लोकांना काही फरक पडतो ह्याच्यासाठी काहीही पुरावा नाही. उलट ज्या समाजांत जास्त आर्थिक आणि राजकीय स्वातंत्र्य आहे आणि जिथे व्यक्ती अधिकारांना मानाचा स्थान आहे तिथे गरीब आणि मागासलेल्या लोकांना सुद्धा पुढे येण्याची जास्त चांगली संधी मिळते, तिथे इकॉनॉमिक मोबिलिटी जास्त असते, आणि अगदी गरीब व्यक्तीला सुद्धा इतर समाजांच्या तुलनेत जास्त सुख सुविधा उपलब्ध असतात. कुणी गरीब परिवारांत जन्माला आला किंवा तथाकथित मागासलेल्या जमातीत जन्माला आला म्हणून अश्या व्यक्तीला नालायक ठरविणे आणि इतरांच्या हक्कांची पायमल्ली करून निव्वळ सरकी दंडुक्याने अश्या व्यक्तीला पुढे काढणे हे नैतिक दृष्ट्या चुकीचे तर आहेच पण त्या संपूर्ण समाजाच्या आत्मविश्वासाला तडा देणे आहे. एके काली महाशक्तिशाली मुगल साम्राज्याला नष्ट करणाऱ्या महापराक्रमी मराठ्यांचे वंशज स्वतःला मागासलेले म्हणवून आरक्षण मागतात हि माझ्या मते शरमेची गोष्ट आहे. ह्या समाजाने खरे तर आपल्या जातीतील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी भली मोठी आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यापीठे बांधण्याची स्वप्ने पाहायला हवी होती (असे करणे सध्या कायद्याने गुन्हा आहे) आणि पाहिजे तर त्यासाठी कायदे बदलायला सरकारला भाग पडायला पाहिजे होते. पण असो. > ना त्यांच्या जीवनात अतिरेकी कष्ट केल्याशिवाय पैसे असलेल्या मुलांशी स्पर्धा करता येणार नाही. ह्यांत काहीही तथ्य नाही. विविध क्षेत्रांत गरीब मुलांनी भरारी घेतली आहे. रिक्षावाल्याचा मुलगा IAS झाला प्रकारच्या बातम्या दाररोज येत असतंच पण त्याशिवाय आपल्या आजूबाजूला पहिले तर अनेक व्यक्ती गरिबीतून कायमच्या बाहेर आलेल्या दिसतील त्या सुद्धा विना आरक्षण. त्याशिवाय गरीब मुलांना मदत करणे हि आम्हा सर्वांची वैयक्तिक जबाबदार आहे. आपल्या संपूर्ण परिवारांत कुणीही व्यक्ती निव्वळ पैश्यांचा अभावी शिक्षणासाठी वंचित राहणार नाही हे तुम्ही आणि आम्ही पदरमोड करून बघायला पाहिजे. तिसऱ्याचा पैसे चोरून भलत्याला मदत करावी आणि आपली पाठ "समतावादी" मधून थोपटावी हा मूर्खपणा आहे.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 05/07/2021 - 06:14 नवीन
१. समता आणणे म्हणजे फार लांबचे झाले. मी समता आणण्याबद्दल बोलत सुद्धा नाही आहे. Equqlity of outcome नाही equality of opportunity बद्दल बोलत आहे. २. भौगोलिक स्थान, धर्म, जात ईत्यादी गोष्टींनी जो आपल्या जीवनांवर फरक पडतो, त्याचा परिपाक आर्थिक परिस्थितीतून दिसतो असे म्हणण्यास हरकत नसावी. ३.बदला हा उद्देश नाही आहे. आजच्या पिढीतल्या लोकांना कलेक्टिव्हली मदत करणे हा उद्देश आहे. ४.गरीब व्यक्तीला नालायक ठरवले हे वाचून तर हसूच आले. त्यांच्या समोरच्या स्ट्रक्चरल बॅरियर ला अक्नॉलेज करणे म्हणजे त्यांची किंमत किंवा लायकी ठरवणे नव्हे. ५. निव्वळ सरकारी दंडुका ? आर्थिक निकषावर आरक्षण लोकनियुक्त सरकारनेच द्यावे असे मत आहे . दंडुका वैगेरे भावविभोर शब्द असे सिलेक्टिव्हली का वापरायचे मग ? मोनोपॉली थांबवणे हे तुम्हाला गरजेचे वाटते म्हणून तिथे तुम्ही सरकारचा दंडुका इग्नोअर करताच कि. मला त्याप्रमाणे हे सुद्धा गरजेचेच वाटते. आणि अर्थातच, माझ्यासोबत करोडो लोकांना असे वाटत असेल तरच ते असे करणारे सरकार निवडून देतील. दंडुका प्रत्येक सरकारी गोष्टींमध्ये असतोच. ६. मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही आहे हे मला मान्य आहे. मी आर्थिक निकष वापरून आरक्षणाच्या समर्थनात आहे. ७.
> ना त्यांच्या जीवनात अतिरेकी कष्ट केल्याशिवाय पैसे असलेल्या मुलांशी स्पर्धा करता येणार नाही. ह्यांत काहीही तथ्य नाही. विविध क्षेत्रांत गरीब मुलांनी भरारी घेतली आहे. रिक्षावाल्याचा मुलगा IAS झाला प्रकारच्या बातम्या दाररोज येत असतंच पण त्याशिवाय आपल्या आजूबाजूला पहिले तर अनेक व्यक्ती गरिबीतून कायमच्या बाहेर आलेल्या दिसतील त्या सुद्धा विना आरक्षण.
रिक्षावाल्याच्या मुलाची बातमी पेपर मध्ये येण्याचे कारण तेच असते साहनाजी. त्या मुलाने अपिरिमित कष्ट केले आहेत आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात दिली हेच अंडरलायीन्ग स्टेटमेंट असते. त्याचे यश एका IAS ऑफिसरच्या मुलाच्या यशापेक्षा वेगळ्या कक्षेत असते, म्हणूनच रिक्षावाल्यांचा मुलगा CA किंवा IAS झाला तर बातमी येते. अनेक गरीब मुले त्यांच्या कर्तृत्वाने चमकतात यात काहीच वाद नाही आहे. पण हे सुद्धा पूर्ण पॉप्युलेशन बद्दल विचार न करता एक सॅम्पल उचलून पाहणे नाही काय ? ८.
त्याशिवाय गरीब मुलांना मदत करणे हि आम्हा सर्वांची वैयक्तिक जबाबदार आहे. आपल्या संपूर्ण परिवारांत कुणीही व्यक्ती निव्वळ पैश्यांचा अभावी शिक्षणासाठी वंचित राहणार नाही हे तुम्ही आणि आम्ही पदरमोड करून बघायला पाहिजे. तिसऱ्याचा पैसे चोरून भलत्याला मदत करावी आणि आपली पाठ "समतावादी" मधून थोपटावी हा मूर्खपणा आहे.
आजिबात पटण्यासारखा युक्तिवाद नाहीये. एका व्यक्तीने आणि एका कुटुंबाने किती लोकांना मदत होईल यावर मर्यादा असतात. म्हणूनच अश्या मदती सरकार कडे पूल केल्या जातात. व्यक्तिगत किंवा संस्थानकडून मदत याची रीच सरकार करू शकणाऱ्या मदतीपेक्षा कित्येक पटीने कमी असते, ह्या कडे दुर्लक्ष होत आहे. आणि आरक्षणाच्या संदर्भात चर्चा होती म्हणून प्रतिसाद दिला. आरक्षणापेक्षा जास्त महत्वाचे माझ्या मते सरकारने निशुल्क आणि उत्तम दर्ज्याचे शिक्षण देणाऱ्या शाळा गावोगावी चालू करणे.
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब Wed, 05/05/2021 - 17:32 नवीन
त्यांच्या पूर्वजांनी हज्जारो वर्षे अन्यायात सोसला त्याची ही किंमत समजा
अतिशय भंपक प्रतिसाद आणि युक्तिवाद. हजारो वर्षे अन्याय??? कायच्या काय.. !!!
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक गुरुवार, 05/06/2021 - 13:08 नवीन
मग किती वर्षे झाला ते तरी सांगा! तो मुलगा बुलेट घेऊन यायचा यातून तुम्हाला आरक्षणाचा उपयोग दारिद्र्य निर्मुलनासाठी झाला असंच सुचवायचं आहे की. तो मुलगा लुना सारखी बुलेटच्या तुलनेत बरीचशी स्वस्त अशी गाडी घेऊन आला असता तर तुम्ही असेच लिहिले नसते. BTW मी सुद्धा ओपनमधेच येतो. तुमचे काय नि माझे काय दोघांचेही पूर्वज त्यावेळच्या दलितांपेक्षा बरेच सुसह्य जीवन जगले असतीलच की. चांगले बैलगाडी किंवा घोडागाडीतून फिरले असतील. त्यावेळी याच मुलाचे पूर्वज त्यावेळी वंचितांचं किंवा सवर्णाच्या तुलनेत खूप अपमानास्पद जीवन जगले असतील की. त्यावेळी त्यांनाही वाटलं असेल की आपल्याला उच्चवर्णीयांप्रमाणे चांगलं जीवन जगायला कधी मिळणार? पूर्वी सवर्णांचे सुगीचे दिवस होते आता आरक्षण घेणार्‍यांचे सुगीचे दिवस आले. फिट्टमफाट!
  • Log in or register to post comments
प
पिनाक गुरुवार, 05/06/2021 - 13:11 नवीन
188 स्वामींची आठवण आली (मी इथे डोळे टिपतोय अशी कल्पना करावी). ते होते तेव्हा असाच काय बहारदार विवाद करायचे!
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 05/06/2021 - 13:29 नवीन
स्पॉईलर अलर्ट- मुळातला उपयोजक यांचा प्रतिसाद उपरोधिक आहे. चला पळतो आता.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक गुरुवार, 05/06/2021 - 15:19 नवीन
असो, @बापूसाहेब आणि इतर ; मला इतकच सांगायचं होतं की आरक्षण हे योग्य की अयोग्य याबद्दल ओपनवाल्यांच्या मताला तशी फारशी किंमत नाहीये. अगदी आरक्षणाचा अतिरेक झालाय नि सवर्णांनी जितका दलितांवर अन्याय केला असेल त्याहीपेक्षा जास्त अन्याय सध्या सवर्णांवर होतोय असं जरी धरलं तरी उपयोग काय? आपण सगळेच राजकारण्यांच्या हातचे बाहूले आहोत. एकगठ्ठा मते मिळून सत्ता मिळणे, पैसा मिळणे हे त्यांचे स्वार्थ ज्या मार्गाने पुरे होतात त्यामधे ते अडचणी निर्माण होऊ देतील का? तस्मात आरक्षणामुळे सवर्णांचं किती नुकसान होतं यापेक्षा वंचित समाजाकडून मिळणारी हमखास मतं राजकारण्यांसाठी महत्वाची आहेत. आजपर्यंत एका तरी राजकीय पक्षाने आरक्षणाचं प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न केलाय का? फडणवीसांसारख्या मुत्सद्दी माणसानेही राजकीय मतांसाठी मराठा आरक्षणाची चलाखी केलीच की नाही? आणि अन्यायग्रस्तांनी बदला घ्यावा हाही तिरकस प्रतिसादच आहे बरं का! :) पण मी जरी तिरकस प्रतिसाद दिला असला तरी दोन आठवणी सांगण्यासारख्या आहेत. १) फेसबुकवर केरळच्या दलित+कम्युनिस्टांनी चालवलेलं एक हिंदूद्वेष्टं पान आहे. अमेरिकेत त्या कृष्णवर्णीयाचा मृत्यू झाल्यानंतर अन्य कृष्णवर्णीयांनी पुतळे पाडणे,जाळपोळ हे केले होते. त्याला या केरळी कम्युनिस्ट पेजचा सपोर्ट होता. तसाच उत्पात भारतातही झाला पाहिजे अशा आशयाचे प्रतिसाद होते. अर्थात झाडून सगळे दलित अशा बदला घेण्याच्या वृत्तीचे असतात असे मला अजिबात म्हणायचे नाहीये. तो गैरसमज नसावा. २) करुणानिधी हे चिन्ना मेलम समाजाचे होते. हा समाज मुळचा तेलुगू भाषिक. तो प्रवास करत करत तमिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यात स्थिरावला. कालांतराने इथे तेलुगू भाषिक नायक राजांचे राज्य आले. हे नायक राजे कट्टर वैष्णव होते. त्यामुळे ते येताना तेलुगूभाषिक वैष्णव ब्राह्मणांना सोबत घेऊन आले. यामुळे करुणानिधींच्या समाजाला फारसे महत्व मिळेना त्या रागातून हा ब्राह्मणद्वेष सुरु झाला. त्याला जोड मिळाली ती पेरियार यांची. हा ब्राह्मणद्वेष आजही (हो हो आजही) तमिळनाडूत सुरु आहे. अगदी इथल्या संभाजी बिग्रेडचा ब्राह्मणद्वेष फिका पडावा इतका. काहीवेळा द्रमुक कार्यकर्त्यांची टोळकी गटागटाने ब्राह्मणांना पिडतात. जानवे खेचून तोडून टाकतात. आतातर याच माकडांची सत्ता तमिळनाडूत आलीय. तीनशे वर्षांपूर्वी तेलुगूभाषिक नायक राजांवर वैष्णव ब्राह्मणांचा प्रभाव पडला त्याचा राग आजही तमिळ ब्राह्मणांवर द्रमुककडून काढला जातोय.
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 05/06/2021 - 13:31 नवीन
तुमच्या मते काय, अन्याय झाला, झालाच नाही, किती वर्षे झाला, काय ?
  • Log in or register to post comments
स
सुक्या Wed, 05/05/2021 - 19:09 नवीन
त्यांच्या पूर्वजांनी हज्जारो वर्षे अन्यायात सोसला त्याची ही किंमत समजा. धन्य झालो ... जास्त काय बोलु /..
  • Log in or register to post comments
प
पिनाक Wed, 05/05/2021 - 13:39 नवीन
केवळ पैसे नाहीत म्हणून माझ्या एका मित्राला बुद्धीमत्ता असूनही इंजिनीयर होता आले नाही, कारण तो सवर्ण होता.
हो, पण यासाठी आरक्षणाची काय गरज? त्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी स्वस्त दरात कर्ज देणे, सरकारने फी कमी करणे, फी मध्ये सवलत देणे , समाजातल्या सन्मान्य धनाढ्य लोकांनी आर्थिक मदत करणे इत्यादी उपायांना वाढवायला हवे. केवळ एखाद्याकडे पैसे आहेत म्हणून त्याच्या मुलाला प्रवेश न देणे म्हणजे आपण साम्यवादी विचारांचा अवलंब करत आहात. जगात कुठेही असे केले जात नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्या मित्राला बुद्धिमत्ता असेल (आणि ती एखाद्या श्रीमंत मुलापेक्षा जास्त असेल) तर त्याने तशीही सरकारी एंजिनिरिंग कॉलेज मध्ये एखादा टक्का जास्त मार्क घेऊन प्रवेश मिळवला असता. तिथे श्रीमंत मुलांसाठी तर आरक्षण नव्हते ना? मग त्याला प्रवेश मिळवण्यासाठी कोणताच प्रॉब्लेम नसायला हवा. प्रवेश मिळाल्यानंतर इंजिनियरिंग पूर्ण करणे हे त्याच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून असणार. ती कुवत नसेल तर एखाद्या श्रीमंत मुलाला बाहेर ठेवून तो तसाही इंजिनीअर झाला नुसताच. की आपण डोनेशन वाल्या जागांबद्दल बोलत आहात? बाकी मी वरची तुलना श्रीमंत सवर्ण आणि गरीब सवर्ण यांच्यामध्ये केली आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 05/05/2021 - 13:22 नवीन
त्यांनी तसे केले नसते तर "तुम्ही ब्राहमण म्हणून तुम्ही अडवून धरलाय" असा मोठा गदारोळ झाला असता... काय करायच त्यांनी ?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 05/05/2021 - 14:26 नवीन
म्हणजे स्वतःची मान वाचविण्यासाठी समर्थक अराखीव वर्गाचा बळी दिला. बरोबर ना? मुळात २०१४ मध्ये मराठ्यांना १६ टक्के राखीव जागा देण्याचा केलेला कायदा उच्च न्यायालयाने २०१५ मध्ये रद्द केला होता. मराठे मागास नाहीत असा उच्च न्यायालयाचा निर्णय होता. या निर्णयाविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले असते तर २-३ वर्षे खटला चालून शेवटी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला असता. त्यामुळे फडणवीस यातून अलगद सुटले असते व अराखीव वर्गावरील अन्यायही टाळता आला असता. परंतु मराठा व्होट बँक तयार करण्यासाठी व पवार/चव्हाण इ. ना जे जमलं नाही ते मी करून दाखविलं हे जनतेला दाखविण्यासाठी फडणवीसांनी अत्यंत फाजील उत्साह दाखविला. बहुसंख्य मराठा सदस्यांचा समावेश असलेला व मराठा अध्यक्ष असलेला एक आयोग तयार करून त्याद्वारे मराठा आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक अशा सर्व क्षेत्रात अत्यंत मागास आहेत, त्यांच्यावर सामाजिकदृष्ट्या अनेक शतके खूप अन्याय झाला आहे असे कागदोपत्री दाखविणारा फ्रॉड अहवाल तयार करून घेतला. या आयोगाचे काम २ वर्षे सुरू होते. परंतु आम्ही आयोगाचा अहवाल आल्यावर लगेच मराठ्यांना राखीव जागा देणार आहोत, असे सुरूवातीपासून फडणवीस वारंवार सांगत होते कारण आयोगाने काय अहवाल तयार करायचा व काय शिफारशी करायच्या हे आधीपासूनच प्लॅन्ड होते. २०१९ च्या निवडणुकीच्या तोंडावर हा अहवाल आणून त्याआधारे राखीव जागा देऊन निवडणुकीत फायदा मिळवायचा हे ठरलेले होते. त्या योजनेनुसारच नोव्हेंबर २०१८ मध्ये अहवाल सादर केला गेला व अहवाल दिल्याच्या दुसऱ्या दिवशी विधीमंडळात राखीव जागा देण्याचे विधेयक कोणतीही चर्चा न करता १५ सेकंदात मंजूर करून घेतले. ही कॅलक्युलेटेड योजना होती. यामुळे जेमतेम ३-४ टक्के असलेली अराखीव मते कमी होऊ शकतील परंतु याची यापेक्षा जास्त भरपाई मराठा मतांमधून होईल, अशी गणिते होती. या घाणेरड्या फ्रॉड राजकारणात अराखीव वर्गाचा बळी दिला गेला. काही अराखीव मते नक्कीच भाजपविरोधात गेली. परंतु राखीव जागा देऊनही फडणवीसांना वाढीव मराठा मते मिळाली नाहीत (यामागचे कारण उघड आहे). २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत याचा थोडा फटका भाजपला बसला आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 05/05/2021 - 15:42 नवीन
तुम्हाला पटणार नाही आणि ह्याचे पुरावे मला देता येणार नाहीत ... पण, कदाचित तुम्ही खालील पाटी, आंदोलन सुरू झाल्या नंतर बघीतली असेल.... मुस्लिम-मराठा भाईभाई, ब्राह्मण तो कसाई है...
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब Wed, 05/05/2021 - 17:37 नवीन
मराठा मोर्चा मध्ये मुस्लिम लोक पाणी, सरबत आणि नाष्टा वगैरे वाटण्यात आघाडीवर होती.. यावरूनच समजते की नेमका या गर्दी जमावण्यामागे कुणाचा हात होता आणि का होता.. मी खात्रीने सांगू शकतो की जोवर हे तिघडी सरकार आहे.. किँवा एनसीपी सत्तेत आहे तोवर पुन्हा असे लोखोंचे मोर्चे निघणार नाहित. फार फार तर एखाद दुसऱ्या ठिकाणी शे दोनेशे माणसे मोर्चा किंवा आंदोलन करतील.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 05/05/2021 - 08:36 नवीन
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. एक चांगला निर्णय. याच बरोबर हिंदूस्थानात हिंदूंनाच बरबाद करण्यासाठी जे कायदे केले आहेत ते देखील लवकरात लवकर नष्ट केले जावेत अशी इच्छा व्यक्त करतो. हल्ली न्यायालये अनेक बाबतीत लक्ष घालत आहेत, तेव्हा त्यांनी हिंदूंवर अन्यायकारक असणारे आणि अगदी पाकिस्तानात देखील नसणारे पण आपल्या देशात असणारे हे कायदे रद्द करण्यासाठी पुढाकार घ्यावा. अधिक इकडे :- Laws of Aurangzeb in Secular India

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Unna Paartha Naeram... :- All in All Azhagu Raja
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Wed, 05/05/2021 - 08:45 नवीन
स्वागत आहे ह्या बातमीचे.
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब Wed, 05/05/2021 - 10:27 नवीन
मराठा आरक्षण रद्द झाल्याचा निर्णय योग्य आहे. मुळातच मराठा समाजाला आरक्षण देण्याची काहीही गरज वाटत नाही.. माझ्यावर वयक्तिक आणि जातीवाचक तोंडसुख घेण्याआधी क्लिअर करतो की मी स्वतः मराठा आहे. फडणवीस सरकार च्या काळात निघालेले सर्व मोर्चे हे राजकीय दृष्टीने प्रेरित होते आणि त्याला हवा देण्याचे काम b ग्रेडी संघटना आणि पडद्यामागून काकासाहेब करत होते. सर्वसामान्य मराठा लोकं फक्तं आपल्या जातीचा फुका अभिमान आणि ताकद दाखवण्यासाठी त्या लाखोंच्या गर्दीत उड्या घेत होते.. गाडीला स्टिकर, झेंडे, व्हॉट्सॲप ला जाती वरून स्टेटस ठेवणे या सर्व गोष्टी फक्त आपण मराठा आहोत हे दाखवण्यासाठी होत होत्या. याचा भरपूर फायदा राजकीय पक्षांनी उचलला. उघडपणे कोणी बोलत नसले तरी याला ब्रम्हण vs मराठा असं रूप देण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला ( हे सर्व पडद्यामागून कोण करत होत आणि का करत होते ते सांगण्याची गरज नाही.. ) . इतकं सगळं होऊनही फडणवीस सरकारने हा मुद्दा योग्य पद्धतीने हाताळला. आणि ५ वर्षाचा कालावधी पूर्ण केला. बाकी आज निर्णय रद्द झाला हे चांगलेच झाले. हळूहळू इतर सर्व प्रकारचे आरक्षण रद्द करून सर्वांना समान संधी द्यावी. सर्व सरकारी कागदपत्रांतून जात हा रकणा काढून टाकावा. एखादी व्यक्ती ब्राह्माण , मराठा, लोहार, कोळी ई कोणीही असेल त्याला हिंदू च मानावे. अर्थातच त्याने जातीपाती नष्ट होतील असे नाही पण हे सर्व लोकांनी घरी पाळावे. सार्वजनिक जीवनात जातीपातीन्ना ऑफिशेली कुठेही थारा देऊ नये.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 05/05/2021 - 11:54 नवीन
सहमत आहे.... धर्म घरात आणि कायद्याचे राज्य बाहेर... हिंदू तितका मेळवावा....
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Wed, 05/05/2021 - 12:17 नवीन
खयाली पुलाव ह्या पलिकडे काही नाही. ह्या जन्मी शक्य नाही हे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 05/05/2021 - 12:42 नवीन
विधवा विवाह होत आहेत ... सती जाणे बंद झाले ... स्त्री शिक्षण सुरू आहे ... एका पिढीत ह्या गोष्टी होत नाहीत, अशा गोष्टींना तीन पिढ्या जाव्या लागतात .... मी आणि माझी मुले, कुठल्याही सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमांत जात नाही... गणपती आणि नवरात्र, घरांतच साजरे करतो... सुपारीचा गणपती आणि खड्यांच्या देवी...100% प्रदूषणमुक्त...
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब Wed, 05/05/2021 - 13:34 नवीन
खयाली पुलाव ह्या पलिकडे काही नाही. ह्या जन्मी शक्य नाही हे.
तुमची प्रक्टिकल मते ऐकायला आवडतील.. हे खायली पुलाव असेल तर दुसरा काही पर्याय सुचवा..
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Wed, 05/05/2021 - 14:21 नवीन
जात , धर्माचा उल्लेख सरकारी कागद पत्रावरुन काढुन टाकणे आणि आर्थिक मागासांकरता आरक्षण ठेवणे हा उपाय आहे. दुर्दैवानी सर्व राजकिय पक्ष जात आणि धर्म ह्यावर अवलंबून आहेत. ५,५.६, ५६, ५६६ कितीही इंची छाती किंवा इतर कुठलाही अवयव असला तरी कोणिही जात , धर्माचा उल्लेख सरकारी कागद पत्रावरुन काढुन टाकण्यास धजावणार नाही कारण त्या बळा(?) वर तर राजकारण आणि सत्ता टिकून आहे. आता मराठा आरक्षणाचा चेंडु अद्रुश्य हातानी व्यवस्थित केंद्राकडे टोलावला आहे! मज्जानु लाइफ!
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब Wed, 05/05/2021 - 17:41 नवीन
आता मराठा आरक्षणाचा चेंडु अद्रुश्य हातानी व्यवस्थित केंद्राकडे टोलावला आहे! मज्जानु लाइफ! यात नविन ते काय.. आल अंगावर ढकल केंद्रावर.. !!!
दुर्दैवानी सर्व राजकिय पक्ष जात आणि धर्म ह्यावर अवलंबून आहेत. ५,५.६, ५६, ५६६ कितीही इंची छाती किंवा इतर कुठलाही अवयव असला तरी कोणिही जात , धर्माचा उल्लेख सरकारी कागद पत्रावरुन काढुन टाकण्यास धजावणार नाही कारण त्या बळा(?) वर तर राजकारण आणि सत्ता टिकून आहे.
सहमत. सध्याच्या परिस्थितीत हे अशक्यप्राय गोष्ट आहे. पण एक ना एक दिवस हे होईल असा विश्वास आहे. कही दशके किंवा कदाचित शतके गेल्यावर नक्कीच हा मुद्दा सुटेल.. आणि जर तोवर हा प्रश्न नाही सुटला तर येणाऱ्या काळात भारताची अजून काही तुकडे पडणार हे नक्की..!!
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 05/05/2021 - 13:04 नवीन
हे टिकले तर बरे... मुळातच आता फक्त आर्थिक निकषावर मदत हे धोरण राबवले पाहिजे .. पण ते कोणीच करू देणार नाही... मराठा आरक्षणाबद्दल म्हणलं तर.. खर तर मला सुरवातीला हि गोष्ट फार विचित्र वाटली... कारण असं कि हे म्हणजे राजाच्या वंशजाने आरक्षण मागण्यासारखेच दिसले ... क्षत्रिय समाजाने असे हात पसरणे हे कसे काय अभिमानस्पद होते कोण जाणे ! ती सर्व मेहनत दुसऱ्या कशासाठी वापरली असती तर फार बरे झाले असते !
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 05/05/2021 - 16:03 नवीन
मराठा आरक्षण हा मूळ मुद्दा नाहीच तर तो मतांसाठी स्वतःच्या स्वार्थासाठी असंख्य मराठा तरुणांच्या भावनांशी काकासाहेबांनी खेळलेला खेळ आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी आहे त्यात ३४% मराठा आहेत म्हणजे ४ कोटी. यातील एक ते दीड कोटी तरुण आहेत. ज्यांना नोकरी किंवा शिक्षण याची गरज आहे. संपूर्ण भारतात सर्व सरकारी निमसरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्था मिळून सव्वा दोन कोटी नोकऱ्या आहेत. यात १६ टक्के आरक्षण दिले तर ३२ लाख नोकऱ्या येतील. सर्वच्या सर्व सरकारी नोकरांना बडतर्फ केले तरी अक्ख्या भारतभराच्या नोकऱ्या मध्ये सुद्धा हे मराठा तरुण सामावून घेऊ शकणार नाहीत. मागच्या वर्षी महाराष्ट्र राज्याच्या सरकारी नोकऱ्यांत भरती झाली त्यात ६९ हजार विविध नोकऱ्या होत्या यात हे १६ % आरक्षण दिले तरी केवळ ११ हजार तरुणांना नोकरी मिळाली असती. मग एक मराठा लाख मराठा कुठे जाणार आहे? हि सर्व वस्तुस्थिती श्री फडणवीसांना माहिती होती शिवय ते स्वतः वकील असल्याने मराठा आरक्षण हे न्यायालयात अजिबात टिकणार नाही हेही त्यांना स्पष्टपणे माहिती आहे. कारण मुळात आरक्षणाचा निकष हा सामाजिक मागासले पण आहे आर्थिक मागासले पण नाहीच. स्वातंत्र्यानंतर ७० वर्षाच्या आणिराज्याच्या ६० वर्षाच्या कालावधीत राज्यात सत्ता हि संपूर्णपणे मराठा समाजाच्या हातातच राहिलेली आहे आणि सामाजिक उतरंडीत मराठा समाज हा सर्व बाबतीत पुढारलेला आहे त्याला मागासलेला ठरवणे हे संपूर्णपणे स्वार्थी राजकारणाचा खेळ आहे. राहिला मुद्दा आर्थिक निकषावर आरक्षण देणे. एखाद्या सधन बापाने मुलाला प्रवेश मिळण्यासाठी आपल्या बायकोला घरातून विभक्त केल्यास मुलगा आणि आई आर्थिक दृष्ट्या मागास होतात. शिवाय असे आरक्षण दिल्यास शेतीमध्ये दार एकरी ५ कोटी उत्पन्न काढणाऱ्यांची शेती पुढच्याच वर्षी नापीक होऊन जाईल. तेंव्हा आर्थिक मुद्द्यावर आरक्षण देणे हे फार कठीण आहे आणि त्याचा गैरवापर मोठ्या प्रमाणावर होईल. आजच आलेल्या निकालात स्पष्टपणे हेही म्हटलेले आहे कि ५० % च्या वर आरक्षण देणे हे अधिक मोठ्या ( ९ किंवा अधिक न्यायाधीशांच्या) घटना पीठाकडे वर्ग करण्याची अजिबात गरज नाही कारण याअगोदर दिलेला हा निकाल (इंद्रा साहनी केस) चार पूर्णपीठानी तपासून पाहिलेला आहे आणि तो वैध ठरवला आहे. तेंव्हा आता याबद्दल पुनर्विचार याचिका सुद्धा दाखल करून घेण्याची शक्यता मावळली आहे. आता अनेक राजकीय नेते घटना दुरुस्ती करा म्हणून मागे लागतील/ लागले आहेत. परंतु केशवानंद भारती केस मध्ये हे सुस्पष्ट झालेले आहे कि घटनेच्या मूळ ढाच्याला घटनादुरुस्तीने सुद्धा हात लावता येणार नाही. तेंव्हा अशी घटना दुरुस्ती न्यायालयात टिकणारच नाही. तेंव्हा मराठा तरुणांना स्वच्छपणे सांगणे आवश्यक आहे कि तुम्ही आरक्षणाच्या भिकेसाठी राजकीय नेत्यांच्या मागे लागणे सोडून आत्मनिर्भर होणे आवश्यक आहे. पण असे सांगणारा एकही नेता महाराष्ट्र्रात नाही हे खेदाने नमूद करावे लागते.
  • Log in or register to post comments
प
पिनाक Wed, 05/05/2021 - 16:30 नवीन
पोपट मेला आहे हे सांगण्याचे धैर्य कोणाच्या अंगात असणार? कारण असे धाडस जो करेल त्याच्यावरच पोपटाच्या हत्येचा आरोप येणार हे निश्चित. म्हणून वेगवेगळे वैद्य आणून उपचाराचे सोंग चालू आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 16 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 19 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 23 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा