Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

दोन तासांत आणि 25 माणसांत लग्न कसे करावे?

म
मुक्त विहारि
गुरुवार, 04/22/2021 - 13:46
🗣 115 प्रतिसाद
फतवा: https://www.tv9marathi.com/maharashtra/maharashtra-lockdown-regulations-for-wedding-ceremony-attendance-of-only-25-people-and-2-hour-limit-provision-of-penalty-of-rs-50-000-for-breaking-the-rules-442502.html हे सरकार आल्या पासून विविध प्रकारचे आदेश किंवा सुचना , साॅरी फतवे, निघत आहेत... पण, हा फतवा मात्र खरोखरच विचार करायला लावणारा आहे... आम्ही आमच्या परीने ह्या फतव्याचे पालन, माझ्या मुलाच्या लग्नाच्या दिवशी, करणार आहोतच. त्यासाठी काही नियमावली पण आखून ठेवणार होतो.. पण जालावर खालील नियमावली मिळाली.... -------------- दोन तासात लग्न समारंभ आटपायची नियमावली... 1.आता मामाचे आणि विहिणबाईंचे रुसणे यावर बंधन घालण्यात आले आहे. 2. नवरीने मेकअप आटोपता घ्यावा व मॅगी नूडल्स प्रमाणे झटपट तयार व्हावे. 3. लग्न विधी लवकर आटोपण्याची ब्राम्हणांची जबाबदारी असेल.10ऐवजी 3मंत्र म्हणण्याची अट. 4.वधू वरांना वरमालेच्या वेळेस उचलण्यासाठी फक्त 2मिनिटे दिली जातील. 5. जमलेल्या 25 लोकांनी ठरलेल्या वेळात आशिर्वाद द्यावा, सगळ्यांच्या एकदाच दुरून सामुहिक पाया पडले जाईल. 6. जेवण पार्सल दिले जाईल व आग्रहाचे 2 गुलाबजाम आधीच पॅक केलेले असतील. 7. दोन तासांचा कालावधी होण्याआधी नवरी मुलीच्या रडण्याच्या कार्यक्रमा साठी 10मिनिट दिले जातील... त्यात तिला प्रत्येकाच्या गळ्यात पडून वेगवेगळे रडायची परवानगी नसेल, काय ते एकदाच रडायचे 10 मिनिट आणि लगेच नवऱ्या मुलाची ही जबाबदारी असेल की त्याने तिला गाडीत बसवून पटकन आपल्या घरी न्यावे.. *नियमावली संपली* ----------- आपल्या मनांत देखील, ह्या कार्याला आणि ह्या फतव्याला अनुसरून काही मुद्दे सुचत असतील तर जरूर सांगा...

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 36276 views

🗣 चर्चा (115)
R
Rajesh188 गुरुवार, 04/22/2021 - 14:01 नवीन
ज्यांना आत्ताच लग्न करायचे आहे.ज्यांना हे सुद्धा माहीत आहे covid व्हायरस क्रूर झाला असून सुपर spreadar आहे. तरुण सुद्धा ह्या मध्ये मृत्यू मुखी पडत आहेत. तरी सुद्धा ज्यांना लग्न करायचेच आहे त्यांनी कोर्ट marriage करावे फक्त दोन्ही कडचे आई वडील बस. ज्यांना पाचपन्नास माणसं जमा करायची आहेत,जेवणावळी उठवायच्या आहेत.dj वाजवायचा आहे,फोटो शूटिंग करायची आहे. त्यांना सर्वांना एकत्र जमा करा एक बोटी मध्ये बसवा आणि खोल समुद्रात न्या . आणि खोल समुद्रात पोचल्यावर पार्श्व भागावर लाथ मारून जल समाधी ध्या . हाच रामबाण उपाय आहे.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक गुरुवार, 04/22/2021 - 14:05 नवीन
आता साधेपणाने आणि फक्त आवश्यक धार्मिक विधी (कारण ते टाळा म्हणालो असतो पण लोकांना पटणार नाही.. असो) आणि मग काही महिन्यांनी कोरोनाचं संकट टळल्यावर झकास रिसेप्शन करावं.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 04/22/2021 - 14:09 नवीन
मी कोर्ट मॅरेजचा पर्याय सुचवला आहे ... बघू या, काय निर्णय ठरतो...
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 04/22/2021 - 14:09 नवीन
संसार करायला नवरा ,नवरी जिवंत हव्या असतील तर कोर्ट मध्ये लग्न फक्त नवरा नवरी,आणि आई वडील. बाकी कोणी नको.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ गुरुवार, 04/22/2021 - 14:11 नवीन
इतके करण्यापेक्षा, आता लग्न सरळ रजिस्टर पद्धतीने करा व ही कोरोना नामक पिडा टळली की एक छान पैकी रिसेप्शन द्या, पाहुण्या व मित्रमंडळीना.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 04/22/2021 - 14:18 नवीन
तसेच ठरवत आहोत
  • Log in or register to post comments
इ
इरसाल गुरुवार, 04/22/2021 - 14:11 नवीन
मा. उद्धव ठाकरेंनी मला व्हाट्सप्वर एक मेसेज शेअर केलाय. त्यांनी जो २५ आकडा दिलाय त्याबाबत. भटजी १ अंतरपाट धरणारे २ नवर्‍याचे आईबाबा २ नवरीचे आईबाबा २ नवर्‍याच्या करवल्या २ नवरीच्या करवल्या २ नवर्‍याचे करवले २ नवरीचे करवले २ नवर्‍याचे व्हि/फो. ग्रा २ नवरीचे व्हि/फो. ग्रा. २ नवर्‍याचे मामा/मामी २ नवरीचे मामा/मामी २ मंडप वाला १ डीजेवाला १ झाले टोटल - २५ पण पण पण...... नवरा नवरी ????????????? त्यांच काय. ज्यांच्यासाठी एवढी हायउपस चाललीय तेच नाही म्हणजे.....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 04/22/2021 - 14:17 नवीन
DJ आणि मंडपवाला कॅन्सल करून, तिथे नवरा-नवरी Adjust करणार आहोत...
  • Log in or register to post comments
प
पिनाक Fri, 04/23/2021 - 10:37 नवीन
आधीच्या दोन बायका आणि 2 मुलांचं काय?
  • Log in or register to post comments
इ
इरसाल गुरुवार, 04/22/2021 - 14:27 नवीन
ती दोन माणसं (डीजे नी मंडपवाला) मुख्यमंत्र्यांची असली म्हणजे ....बंगल्या वर नेताय तुम्हाला :))
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 04/22/2021 - 15:04 नवीन
नगर सेवकाची माणसे पण , वाट्टेल ते करू शकतात.. लग्न लागो की न लागो, नगरसेवकांना खूष करायलाच हवे..
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म गुरुवार, 04/22/2021 - 14:33 नवीन
अगदी शक्य आहे. आजच आमच्या बिल्डिंगमध्ये एका फ्लॅटमध्ये असे एक लग्न झाले. फक्त त्या मजल्यावरच्या कुटुंबातील प्रत्येकी दोन माणसे होती.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 04/22/2021 - 14:36 नवीन
लग्न म्हणजे ६०० लोक तरी हवीतच,dj हवाच,फोटोशूट हवेच,जेवणावळी उठल्याच पाहिजेत,कमीत कमी हे तर पाहिजेच लग्नात. विधी च्या नावाखाली चार तास गेलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 04/22/2021 - 14:43 नवीन
कुंभमेळ्यात जाऊन लग्न होऊ दे. पुण्य ते पुण्य, सोय ती सोय, पाहिजेत तेवढी माणसं बोलवा. रिस्क वैगेरे तुम्ही विचारात घेतली असती तर हे प्रश्न पडले नसते. बघा, आमचा खारीचा सल्ला. पटला तर ठेवा नाही तर सोडा.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 04/22/2021 - 15:01 नवीन
मला वाटते कोणत्याच वयोगटातील माणसाची शाश्वती नाही अशी या विषाणूंची लाईफ स्टाईल आहे ( लाईफ ... अं ... ? ) सबब आता लग्नाची घाई करू नये ! आणखी एक वर्ष थाबंल्याने काय फरक पडणार आहे ? एका वर्षात कदाचित औषध सापडेल , लसीकरण भरपूर प्रमाणात होईल व लग्नही ही त्यानंतर मानपानासह व मानापमानासह होईल !
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 04/22/2021 - 15:07 नवीन
अजून एक वर्ष उशीर म्हणजे, 30-35 वर्षांनी, किमान 3-4 कोटीचा फटका... लवकर लग्न, म्हणजेच लवकर आर्थिक निवृत्ती...
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 04/22/2021 - 15:03 नवीन
मुव्ही या दुकानातून नवी कोरी सी डी बाहेर पडली आहे !!! त्वरा करा ! ))))) )))))))))))))))))))))))))))
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास गुरुवार, 04/22/2021 - 15:08 नवीन
त्यापेक्षा लग्न कारण्यांनो ... जरा सहा महिने धीर धरा .. लस वगैरे घ्या नाहीतरी आत्ता लग्न केलेत तरी हनिमून ला जायचे वांधेच आहेत .. तेंव्हा धीर धरा ...
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 04/22/2021 - 15:11 नवीन
पण ठाकरे सरकार नी जनहिताच्या निर्णय घेतला आहे त्या विरूद्धध वागून आम्हाला अजून राज्याला संकटात टाकायचे आहे.
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास गुरुवार, 04/22/2021 - 15:13 नवीन
अहो म्हणूनच धीर धारा सांगतोय ना ? तुमच्या बाजूने बोललो तरी तुमचं चालूच ... गोल गोल राणी
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ गुरुवार, 04/22/2021 - 15:16 नवीन
पण ठाकरे सरकार नी जनहिताच्या निर्णय घेतला आहे -- ठाकरेंच्या नियमाला त्यांच्याच पक्षाचे नेते वाटण्याच्या अक्षता लावतात, तिथे इतरांचे काय ? एक आठवड्यापुर्वी कल्याणमधे शिवसेना नगरसेवकांने हजार माणसे गोळा करुन अगदी थाटामाटात लग्न व हळद साजरी केली. अशी अनेक उदाहरणे आहेत.
  • Log in or register to post comments
ड
डॅनी ओशन गुरुवार, 04/22/2021 - 15:20 नवीन
काँग्रेसला जे बरोबर वाटते, ते जनतेच्या विरोधातच असते असे माझे वैयक्तिक मत आहे
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा गुरुवार, 04/22/2021 - 15:41 नवीन
कोर्ट मॅरेज किंवा फक्त भटजी (इच्छा असेल तर), वधु, वधुचे कुटुंबिय घरी बोलवुन लग्न करा. कोर्ट मॅरेज केले तरी कोर्टात गर्दी असणारच आहे, बंदोबस्तासाठी असलेले पोलीसच कितीतरी असतात. त्यापेक्षा घरी केलेले बरे. झुम, गुगल, व्हॉटसअप व्हिडीओ कॉल करुन नातेवाईकांना सोहळा लाईव दाखवा. मोबाईल मधुन पण उत्तम दिसते. दोन-तीम वेगवेगळ्या एंगल्सने किमान दोन, तीन मोबाईल सेट करुन ठेवा. ऑनलाईन किंवा जवळच्या दुकानातुन सुपारी, मका किंवा तत्सम पर्यावरणपुरक डिश, वाट्या, ग्लास, चमचे वगैरे मागवा आणि जवळच्या माहिती असलेल्या होटेलमधुन जेवण गोडासहीत मागवा. आणि थोडा आगावू सल्ला - मधुचंद्रासाठी चिरंजीवांना तुमच्या शेतातील घरावर खाजगी वाहनाने (कारच) पाठवा.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 04/22/2021 - 15:47 नवीन
सगळे मुद्दे नोट केलेले आहेत..
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/22/2021 - 16:01 नवीन
मुलाच्या विवाहासाठी अभिनंदन व शुभेच्छा! लाडू़ंंचे पार्सल नक्की पाठवा.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 04/22/2021 - 16:18 नवीन
आम्ही भडंग घेऊन येउच...
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 04/22/2021 - 16:19 नवीन
माझ्या मुलीचे लग्न मागच्या वर्षी (२०२०) दसऱ्याच्या दिवशी ५० माणसांतच झाले. तेंव्हा करोना ऐन भरात होता आणि लससुद्धा उपलब्ध नव्हती हॉलचे १ वर्ष अगोदरच आरक्षण केलेले होते आणि पूर्ण पैसे भरलेले होते त्यामुळे ते परत मिळण्याची शक्यता सुतराम नव्हती. ( ७ महिने हॉल बंद होता त्यामुळे त्याच्या मालकाची इच्छा असती तरी देणे कठीण गेले असते.) मुळात हॉल मोठा असल्याने सामाजिक अंतर ठेवणे फार सोपे होते. ५० म्हणजे ५० च हा मंत्र मी कायम ठेवला होता. ( हॉल वाल्याने १०० पर्यंत बोलवा मी मॅनेज करतो) असे सांगितले होते पण मला नियमाच्या विरुद्ध अजिबात जायचे नव्हते. सुदैवाने हा "२ तासात लग्न उरका" सारखा आचरट नियम नव्हता. दारूच्या दुकानात किंवा लस घेण्यासाठी लोक ४ तास रांगेत उभे असतात पण त्याबद्दल बोलायचे नाही. चार तास बस मध्ये किंवा लोकल मध्ये अत्यावश्यक सेवेतील माणसे रोज नव्या माणसांबरोबर प्रवास करतात ते चालते. आम्ही सकाळी ८ वाजता हॉल वर गेलो आणि २ वाजेपर्यंत जेवणासकट सर्व कार्यक्रम उरकून घरी आलो. नात्यातील एक वरिष्ठ डॉक्टर आणि मी आणि माझा व्याही( हा पण डॉक्टर - स्त्रीरोग तज्ञ आहे) असे सल्ला मसलत करून आमचे जे नातेवाईक कोव्हीड होऊन बरे झाले होते अशानाच लग्नाला बोलावले. वरिष्ठ नागरिक पैकी फक्त माझे आई वडील आणि सासरे एवढेच होते . बाकी कोणत्याही वरिष्ठ नागरिकाला बोलावले नव्हते. त्यांना करोना झाला असता तर ते महाग पडले असते. ५० मध्ये एक फोटोग्राफर आणि गुरुजी एवढीच बाहेरची माणसे होती. सर्वाना पत्रिका व्हाट्सअँप वर पाठवली होती आणि आग्रहाचे निमंत्रण करण्याची इच्छा असूनहि बोलावता येत नाही म्हणून त्यांची क्षमा मागितली. उगाच बोलावल्यामुळे यायला लागेल या भीतीतून अनेक जण मोकळे झाल्याचे त्यांच्या बोलण्यातून मला जाणवले. (डॉक्टर म्हणून आम्ही अनेक मित्र आणि नातेवाईकांना केंव्हा ना केंव्हा काहीतरी मदत केल्यामुळे हे बंधन( OBLIGATION) आणि भीड आल्यासारखे होते). यातून लोकांची सुद्धा मुक्तता झाली हा कार्यक्रम त्याच फोटोग्राफर ने झूम वर प्रक्षेपित केला कारण माझ्या व्याह्याचे आईवडील आणि सासू सासरे ( सर्व ८० च्या वर वय) दिल्लीला असतात त्यांना विमान प्रवासात होणाऱ्या संसर्गाचा धोका घेणे इष्ट नव्हते. माझी मुलगी आणि जावई माझी गाडी घेऊन सुला वाईन्सच्या येथे ४ दिवस मधुचंद्रासाठी सुद्धा जाऊन आले. हॉटेल मध्ये सर्व तर्हेची काळजी व्यवस्थित घेतली गेली होती. यानंतर ते दोघे माझ्या व्याह्याकडे कोचिनला गेले. अनेक लोकांनी कार्यक्रम लांबणीवर टाकण्याचा सल्ला दिला होता मी त्याला सक्त विरोध केला. कारण होणारे नवरा बायको रोज ३-४ तास फोन वर घालवत असतील तर त्यांना अजून काही महिने असेच ताटकळत ठेवणे हा निर्दयीपणे ठरला असता. आज ६ महिन्यांनी हा निर्णय किती बरोबर ठरला हे स्पष्ट होते आहे. आज स्थिती अधिकच बिघडली आहे. वर आणि वधू याना लग्नात होणाऱ्या कोणत्याही विधी किंवा जेवणात शष्प रस असतो. त्यांना सहजीवन केंव्हा सुरु करतो असे झालेले असते. बाकी लग्नात हिंदू धर्मशास्त्र आणि हिंदू विवाह कायद्यात आवश्यक असे केवळ तीनच विधी केले आणि त्याचे थेट प्रक्षेपण पाहून जावयाच्या दोन्ही आजी आजोबाना जे समाधान मिळाले ते कोर्टाच्या आवारातील लग्नात कधीही मिळाले नसते. तुमच्या लग्नाची आत्मीयता सरकारी कार्यालयात कुणालाही नसते. जेथे तुमचे स्वागत होणार नाही अशा ठिकाणी आणि उलट हि पीडा कशासाठी आली असा चेहऱ्यावर भाव असलेल्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत लग्नासारखा मंगल समारंभ करणे हेच मला तिटकारा आणणारे वाटते. आणि आयुष्यातील एका अत्यंत महत्त्वाच्या अशा लग्नाच्या दिवशी वधू वरांना अशा टवके उडालेल्या आणि पोपडे निघालेल्या भिंती असणाऱ्या सरकारी कार्यालयात घेऊन जाणे हेच अत्याचार वाटतो. असो. लग्न कसेही करा. वधूवरांना त्यात फारसा रस नसतो. आपण स्वतः आठवण करून पहा. गेल्या तीन वर्षात आपण उपस्थित झालेल्या लग्नाच्या सजावटीबद्दल आपल्याला काय आठवते आहे? काहीही नाही. तेथे वधू वर आणि त्यांच्या आईबापाना किती मिनिटे आपण भेटला होतात? लक्षात काय राहते? जेवण उत्तम असले तरच लग्न लक्षात राहते किंवा जेवण भिकार असेल तेवढेच लक्षात राहते. बस, मग कशाला एवढा आटापिटा करायचा? २५ माणसात सुखाने लग्न उरका.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/22/2021 - 16:28 नवीन
उत्तम पायंडा!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 04/22/2021 - 16:44 नवीन
दोन तासांत लग्न कसे उरकायचे? हाच एक प्रश्र्न आहे...
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/22/2021 - 17:53 नवीन
पुरोहितांशी बोलून, काही फारसे आवश्यक नसलेले विधी टाळून किंवा अल्प वेळात उरकून, लग्न लावता येईल. कृपया लग्नात "कन्यादान" हा अनुचित शब्द न वापरण्यास पुरोहितांना सांगावे कारण आपली कन्या "दान" देणे ही कल्पनाच हीन आहे.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे गुरुवार, 04/22/2021 - 17:56 नवीन
विधी तसाच ठेऊन त्यासाठी वेगळे नाव, उदा परस्पर स्वीकार विधी चालेल का?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/22/2021 - 18:18 नवीन
कन्या दानात देत आहे अशा अर्थाचे श्लोक असतील तर हा विधीच रद्द करावा.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 04/22/2021 - 19:41 नवीन
कन्यादान वगैरे शब्दांना हीन म्हणणाऱ्या लोकांच्या बालिश पणाची कीव वाटते. ज्या श्रीगुरुजींचे नाव सदस्यनाम म्हणून घेतले असते त्यांचे विचार 2 टक्के जरी वाचले असते तरी असल्या विचारापासून मुक्तता मिळाली असती.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Fri, 04/23/2021 - 10:15 नवीन
कुठं हैस तू ? आज एकदम बोर्डावर एन्ट्री ??
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 04/22/2021 - 17:12 नवीन
मला मात्र वरील वर्णन वाचून डॉ खरेना आता संतूरच्या जाहिरातीत घ्यावे असे मी कंपनीला कळवू इच्छितो ! मुलीचे लग्न ..? काय मेनटेन्ड व्याही आहेत राव !!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 04/22/2021 - 17:20 नवीन
उत्तम केलेत.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु गुरुवार, 04/22/2021 - 19:51 नवीन
भारी प्रतिसाद
  • Log in or register to post comments
B
Bhakti Fri, 04/23/2021 - 10:57 नवीन
आणि नवरा नवरी यांच्याबद्दल मनातील अवस्था छानच मांडली :) आवडलं. अवांतर
तुमच्या लग्नाची आत्मीयता सरकारी कार्यालयात कुणालाही नसते.
हा विचार मी कधीच केला नव्हता.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख गुरुवार, 04/22/2021 - 16:28 नवीन
विवाहसोहळा शक्य तेवढे, शक्य तसे नियम पाळून थाटात पार पाडा. आम्ही घरचं कार्य समजून व्हर्च्युअल उपस्थिती लावू. वधू-वरांना आमच्याकडून सुखी सहजीवनाच्या हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 04/22/2021 - 16:44 नवीन
नक्कीच ...
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 04/22/2021 - 17:21 नवीन
आमच्या शुभेच्छा आहेतच.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 04/22/2021 - 18:07 नवीन
फक्त आपल्या शब्दावर लग्न होऊ शकते. साक्षीदार आणि कोण कुठे आणि नोटीस महत्त्वाची. नंतर नोंदणी. जी आता केवळ छप्पा मारून होत नाही. रजिस्ट्रारसमोरच होते.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 04/22/2021 - 18:57 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 04/22/2021 - 19:38 नवीन
सरळ 2 गुरुजी बोलवावे घरी, मुलीचे आणि मुलाचे आईवडील बास, ८ जणांमध्ये छान धार्मिक पद्धतीने लग्न लावावे. लोकडाऊन संपला की कोर्टात जाऊन रजिस्टर करणे, रिसेप्शन करणे वगैरे सगळे सोपस्कार करता येतील.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 04/23/2021 - 00:30 नवीन
ज्या दिवशी लग्न, त्याच दिवशी फाॅर्मवर सह्या केल्या जातात... लग्न रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी असेल तर, सरकारी कार्यालय उघडे असेल, त्या दिवशी फाॅर्म द्यायचा... ही भानगड टाळणे आणि विशेषतः दोन तासांची वेळ पाळणे, हे जास्त महत्वाचे आहे, त्यामुळे लग्न रजिस्टर करणे, हे उत्तम ... ---------- दोन मिनिटे कार्यालयात उशीर झाला तर पन्नास हजार रूपये दंड ठोकणारच.... असे समारंभ, मिनीटा मिनीटाच्या हिशोबावर होत नाहीत... साधी जेवणाची पंगत किमान अर्धा ते एक तास चालते...
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त गुरुवार, 04/22/2021 - 23:39 नवीन
मॅरेज सर्टिफिकेट नसले तर पुढे मुलगा-सुनेलाच काय पण त्यांच्या पुढील पिढीला सुद्धा - विशेषतः परदेशात रहाण्याच्या, स्थायिक होण्याच्या दृष्टीने - अडचणी येतात. सर्टिफिकेट इंग्रजीत असावे आणि प्रत्येक शब्दाचे स्पेलिंग व्यवस्थित तपासून घ्यावे. फक्त एका अक्षराच्या चुकीमुळे खूप त्रास झाल्याचे आमच्या घरातलेच उदाहरण आहे. (सर्टिफिकेट घेण्यासाठी दोघांचे पालक आणि लग्न लावणारे गुरूजी यांना जावे लागते. तसेच लग्नाची पत्रिका आणि फोटो वगैरे न्यावे लागते... अर्थात हे तुम्हाला ठाऊक असेलच तरी लिहीतो आहे कारण मला माहीत नव्हते त्यामुळे मुलाचे सर्टिफिकेट घेण्याचे वेळी उगाचच हेलपाटे पडले होते) आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि वधु-वरास अनेक उत्तम आशिर्वाद.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 04/23/2021 - 00:31 नवीन
माहिती बद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Fri, 04/23/2021 - 02:42 नवीन
आपल्याकडच्या बर्याच नेत्यांना आणि सरकारी बाबूंना 'लोकांची जास्तीत जास्त गैरसोय कशी करता येईल व आपले उपद्रवमूल्य कसे दाखवता येईल' असे निर्णय घेण्यातच इंटरेस्ट असतो. आपण नेते झालो किंवा IAS वा IPS झालो म्हणजे आपल्यालाच सगळे कळते ह्या थाटात ही मंडळी वावरत असतात. मग असले २ तासात लग्न लावण्याचे आचरट नियम काढले जातात. फक्त २५ लोक असावेत वगैरे ठीक. पण त्या २५ पैकी एकजण जरी करोना बाधीत असला तर, २ तासात लग्न लावले तरी उरलेल्या २४ पैकी काही जण बाधीत होतीलच. त्यामुळे इथे वेळेपेक्षा कमी उपस्थिती एवढेच करोना टाळण्याच्या दृष्टीने आपण करणे जास्त महत्वाचे ठरते. पण राजा बोले दल हाले ह्या प्रकारे कुणाच्या तरी सुपीक डोक्यातून ही २ तासाची आयडिया आली असणार आणि सगळ्यांनी मान डोलावली असेल. तसेच अत्यावश्यकच्या नावाखाली फक्त किराणा मालाची व मेडिकल दुकाने चालू वगैरे. बाकी वर्हाडी मंडळी जाऊदेत पण किमान लग्न करणाऱ्या जोडप्याला नवीन कपडे घेणे, मेकअप करणे वा अन्य काही खरेदी करणे गरजेचे असते. जुने कपडे अंगावर चढवुन लग्न करणे हे निश्चितच फारश्या लोकांना आवडणार नाही. पण कपड्याची दुकाने बंद म्हणजे बंद. बांधकामाला परवानगी पण बांधकामाचे साहित्य मिळणारी दुकाने बंद. ह्या भर उन्हाळ्यात चुकून एखाद्याच्या घरातील फॅन वगैरे खराब झाला किंवा घरातील पाण्याची मोटार वगैरे खराब झाली तर त्याने तसेच बोंबलत बसायचे. कारण इलेक्ट्रिक वस्तू अत्यावश्यक नाहीत. ४०-४५ डिग्री तापमानात फॅन शिवाय राहणे सहज शक्य आहे. अन्न व औषधे सोडून पण अनेक गोष्टी जीवनाला आवश्यक आहेत हे ह्या मंडळींना खरेच कळत नसेल तर ह्यांच्या बुद्धीची कीव करावी तितकी थोडीच. काही दिवसांपूर्वी तर एका जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्या जिल्ह्यात प्रवेश करायचा असेल तर ७२ तासांपूर्वीचा करोना निगेटिव्हचा RT-PCR रिपोर्ट घेऊन यायचे असा हास्यास्पद फतवा काढला होता. आता रोज कामानिमित्त हजारो लोक जिल्ह्यात येणार व जिल्ह्यातील मूळ रहिवासी पण रोज दुसर्या जिल्ह्यात जाऊन संध्याकाळी घरी येणार अशी परिस्थिती होती. त्यांना पण नियमात सूट न्हवती. लोकांनी सडकून टीका केल्यावर 'लोकांची गैरसोय होईल' असे कारण देऊन लगेच निर्णय मागे घेतला. पण नियम काढतानाच तो हास्यापद आहे हे डोक्यात शिरले न्हवते ह्यांच्या. असो, आता वेळेचे बंधन टाकलेच आहे तर करून टाका कसेतरी २ तासात. पण मला वाटते लगेच नियमात सुधारणा होऊन २ तासाचे ४ तास होतीलच. आचरट नियम बनवायचे आणि मग टीका झाली की सुधारित आदेश काढायचे हे होतेच आपल्याकडे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 04/23/2021 - 02:51 नवीन
माझ्या भावाचेच कोर्ट मॅरेज झाले आहे... पण 2 तासांत लग्न कसे करावे? हे कोडे सुटत नाही ... बघू या, काहीतरी मार्ग निघेलच...
  • Log in or register to post comments
स
साहना Fri, 04/23/2021 - 08:03 नवीन
कोरोनाच्या निमित्ताने विविध सरकारी यंत्रणा किती बेअक्कल आहे हे लोकांना समजत चालले आहे. एक मूर्खपणाचा निर्णय म्हणजे रात्रीची जमाव बंदी. ह्याला काय अर्थ आहे ? आता रात्री सर्व बंद म्हटल्यावर लोक दिवसा प्रवास उरकण्याच्या नादांत जास्त गर्दी करतात. वॅक्सीन पुरावा घेतल्यास लोकांना बाहेर सूट असे किमान सांगितले असते तर लोक वॅक्सीन घ्यायला घाईने गेले तरी असते. आम्ही काही तरी करतो आहोत असा आव आणण्यासाठी हि सगळी धडपड आणखी काही नाही.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 14 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 14 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 14 hours ago
  • सुंदर !!
    1 day 14 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 14 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा