Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

दोन तासांत आणि 25 माणसांत लग्न कसे करावे?

म
मुक्त विहारि
गुरुवार, 04/22/2021 - 13:46
🗣 115 प्रतिसाद
फतवा: https://www.tv9marathi.com/maharashtra/maharashtra-lockdown-regulations-for-wedding-ceremony-attendance-of-only-25-people-and-2-hour-limit-provision-of-penalty-of-rs-50-000-for-breaking-the-rules-442502.html हे सरकार आल्या पासून विविध प्रकारचे आदेश किंवा सुचना , साॅरी फतवे, निघत आहेत... पण, हा फतवा मात्र खरोखरच विचार करायला लावणारा आहे... आम्ही आमच्या परीने ह्या फतव्याचे पालन, माझ्या मुलाच्या लग्नाच्या दिवशी, करणार आहोतच. त्यासाठी काही नियमावली पण आखून ठेवणार होतो.. पण जालावर खालील नियमावली मिळाली.... -------------- दोन तासात लग्न समारंभ आटपायची नियमावली... 1.आता मामाचे आणि विहिणबाईंचे रुसणे यावर बंधन घालण्यात आले आहे. 2. नवरीने मेकअप आटोपता घ्यावा व मॅगी नूडल्स प्रमाणे झटपट तयार व्हावे. 3. लग्न विधी लवकर आटोपण्याची ब्राम्हणांची जबाबदारी असेल.10ऐवजी 3मंत्र म्हणण्याची अट. 4.वधू वरांना वरमालेच्या वेळेस उचलण्यासाठी फक्त 2मिनिटे दिली जातील. 5. जमलेल्या 25 लोकांनी ठरलेल्या वेळात आशिर्वाद द्यावा, सगळ्यांच्या एकदाच दुरून सामुहिक पाया पडले जाईल. 6. जेवण पार्सल दिले जाईल व आग्रहाचे 2 गुलाबजाम आधीच पॅक केलेले असतील. 7. दोन तासांचा कालावधी होण्याआधी नवरी मुलीच्या रडण्याच्या कार्यक्रमा साठी 10मिनिट दिले जातील... त्यात तिला प्रत्येकाच्या गळ्यात पडून वेगवेगळे रडायची परवानगी नसेल, काय ते एकदाच रडायचे 10 मिनिट आणि लगेच नवऱ्या मुलाची ही जबाबदारी असेल की त्याने तिला गाडीत बसवून पटकन आपल्या घरी न्यावे.. *नियमावली संपली* ----------- आपल्या मनांत देखील, ह्या कार्याला आणि ह्या फतव्याला अनुसरून काही मुद्दे सुचत असतील तर जरूर सांगा...

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 36276 views

🗣 चर्चा (115)
स
सुबोध खरे Fri, 04/23/2021 - 08:15 नवीन
वॅक्सीन घ्यायला घाईने गेले तरी असते. सध्या लस घेण्यासाठी लांब रांग असते हे आपल्याला ठाऊक नसावे. कित्येक केंद्रात अजूनही लस उपलब्ध झालेली नाही बाकी सरकारी यंत्रणेच्या विचार न करता निर्णय घेण्याच्या वृत्तीबद्दल( NON APLICATION OF MIND) सहमत
  • Log in or register to post comments
स
साहना Sat, 04/24/2021 - 20:12 नवीन
तसे असेल तर आनंदच आहे. गोव्यांत बहुतेक हेल्थ सेंटर मध्ये गर्दी नाही असे मित्र लोक सांगतात, आमची बागायत पाहणारे काही मजूर लस घ्यायला साफ नकार देत आहेत (अंधविश्वासामुळे).
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 04/23/2021 - 08:29 नवीन
फक्त रात्री बंद ठेवणे हे मूर्खपणाचेच होते. काही लॉजिक नाही. आणखी एक वाईट गोष्ट म्हणजे, हा लोकडावून लागण्यापूर्वी मॉल, थेटर, मार्केट, हॉटेल चालू होते, पण आठवड्याच्या भाजी बाजारास बंदी होती. म्हणजे गरीब भाजीविक्रेते आणि गरीब ग्राहक दोघांच्या पोटावर पाय. आमच्या गावात भाजीवाले पोलिसांपासून लपत लपत गल्लीबोळांमध्ये भाजी खाली न पसरता तसेच बसले होते, पोलीस आले की लगेच पळून जायला लागेल म्हणून. कोव्हिड काय फक्त गरिबांच्या आणि लोवर मिड्लक्लास जमावातच पसरतो काय अशी शंका यावी असा नियम. हे सगळीकडे होतं का माहित नाही.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Fri, 04/23/2021 - 10:16 नवीन
आपण ज्या वेळी पासपोर्ट काढायला जातो त्यावेळी आपल्याला नुसतीच तारीख देत नाहीत तर वेळ ही देतात तसे काहीसे सर्वच क्षेत्रात केले असते तर गर्दी टाळता आली असती .अर्थात लग्न समारंभ ,देवळातील आरती यात असले काही करता आले नसते. पण समजा व्यापार्याना हा पर्याय दिला असता की तुम्हाला जर व्यवसाय चालू ठेवणे असेल तर २४ तास दुकान उघडे ठेवावे लागेल व ग्राहकास मोबाइलवर बोलावून घ्यावे लागेल ! अर्थात भाजी मंडई ई बाबतीत हे भारत देशात किती शक्य झाले असते या बद्दल शंकाच आहे ! आता देखील काही तांत्रिकते च्या जोरावर आठवड्यात ठराविक लिटर पेट्रोल मिळेल असे सीलिंग टाकल्यास रहदारी कमी होऊ शकते . रात्रीचा कर्फ्यू म्हणजे एकादशीच्या दिवशी मासे मटन विकण्याचे दुकान बंद ठेवण्यासारखे आहे ! अतिशय अतार्किक निर्णय !
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sat, 04/24/2021 - 04:02 नवीन
@ चौरा- रात्रीचा कर्फ्यू हा तुमच्या आमच्यासारख्यांना अतार्किक वाटत असला तरी ते नाईटलाईफ का काय म्हणतात त्यात गुंतलेल्या लोकांमुळे, रात्री इतर अनेक धंदे करणार्‍यांमुळे पोलिसांवर पडणार्‍या अतिरिक्त ताणामुळे आवश्यक आहे असे मला वाटते. माझा एक मित्र दिल्ली पोलिसात इन्स्पेक्टर असल्याने तो पोलिसांवर पडणार्‍या ओझ्याबद्दल - दबावाबद्दल सांगत असतो. त्यांना तसेच नेहमी अठरा अठरा तास काम करावे लागते. घरीसुद्धा वेळेवर येणे क्वचितच जमते. पगार अपुरा, जेवणाखाण्याची वेळ निश्चित नाही आणि वरून दबाव खूप असतो. एकादी आपल्याला किरकोळ वाटणारी घटना वा गुन्हा सुद्धा पोलिसांसाठी खूप गुंतागुंतीचा असतो. अर्थात हा मित्र संपूर्णपणे प्रामाणिक, भ्रष्टाचारापासून दूर, कर्तव्यनिष्ठ असा आहे. अशा लोकांवर जास्तच दबाव असतो.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 04/24/2021 - 05:24 नवीन
पण सत्य जाणून घ्यायची इच्छा इथे काही लोकांना नसते ते टिंगल टवाळी करतात. हे जे काही चालले आहे तो काविळ नियंत्रणात आणण्यासाठी च ना? लोकांचे सहकार्य अपेक्षित आहे अशा वेळी पण की दिसते समाजात अजुन पण लोक असेच समजतात lockdown त्यांच्या भल्यासाठी नाही तर सरकार स्वतःची खाज भागवण्यासाठी लॉक down करत आहे. एकदम सहा सात दिवसांचे किराणा सामान आणि भाजी पाला घरात ठेवून सात दिवस घराच्या बाहेर पडणार च नाही असे लोकांनी ठरवले पाहिजे पण नाही. कोणाला अमकीच भाजी हवी कोणाला हाच मासा हवा,कोणाला अमकेच फ्लेवर चे आइस्क्रीम हवं. मग त्या साठी दुनिया फिरणार. मुंबई च विचार केला तर संध्याकाळी सहा नंतर जत्रा भरते चौपाटी वर आजुन सुद्धा. अगदी पोर बाळ घेवून. गाडीत पण सरकार नी मास्क लावयला सांगितला आहे त्याची पण खिल्ली उडविली होती रात्री नवरा बायको एकत्र झोपणार आणि गाडीत मास्क कशाला. सरकार ला हे माहीत नाही का ? माहीत आहे चांगले माहित आहे पण सूट दिली तर बिन्धास्त मित्र मंडळी,प्रवासी घेवून लोक बिना मास्क फिरतील. लोक शहणी नाहीत . लोक शहाणी असती तर लॉक down ची पण गरज नव्हती. आणि पोलिस ना रस्त्यावर यायची पण गरज नव्हती.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sat, 04/24/2021 - 09:32 नवीन
मग दिवसाही कडक कर्फ्यू का लावत नाहीत ? बँका कधी कधी ४ ते ५ दिवस सलग बंद असतात त्याने काय देश बंद पडतो का ? आम्ही अतिशय कडाक लॉक डाऊन लावत असून येत्या तीन दिवसात ,किराणा,,मंडई , पेट्रोल जे काय साठवायचे ते साठवून घ्या असे का सांगत नाहीत. पेपर ८ महिने बंद होता काय अडले ? नाईट लाइफ साठी गाडीत पेट्रोल नसेल तर माणूस काय चालत पब मध्ये जाईल ..... ?
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sat, 04/24/2021 - 14:13 नवीन
त्यामुळे जेवढे प्रयास करावेत तेवढे कमीच पडतील असे सध्याच्या स्थितीवरून वाटत आहे. ज्या लोकांच्या चरितार्थावर संकट आलेले आहे त्यांची स्थिती फार वाईट आहे. या गोष्टीचा फायदा घेऊन पैसे देऊन मोठ्या प्रमाणावर हिंदूंना बाटवून खिस्ती बनवण्याचा धंदा जोरात चालल्याची बातमी समजली. कठीण आहे सगळे. आणखी किती वर्षे चालणार हे सगळे कुणास ठाऊक. सगळे काही बदलत आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sun, 04/25/2021 - 06:13 नवीन
नुकतीच मुबंईत एक पाहणी मुंबईत झाली त्यात म्हणे ३६ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी आढळल्या ! मागे पुणे परिसरात ही ४६ टकके लोकात अँटीबॉडी आढळलया होत्या ! १९१८ ते २० या काळात मोठा नरसंहार साथीने केला तरी आज जगाची लोकसंख्या ७५० कोटी च्य दरम्यान आहे ! याचा अर्थच असा की साथीत सर्वच जण मरत नाहीत तर औषध न घेता व लस न घेताही काही नक्की बरे होणार आहेत ! डॉ जॉन डोयार यालाच बायओलॉजिकल गिफ्ट असे म्हणतात ! चार पाच वेळा लिलावतीत जाऊन ९५ वर्षांचा दिलीपकुमार जगतोय त्याचे असेच काही दैवी कारण आहे ! निसर्ग हा अन्यायी नाही वा न्यायी ही नाही ! कोण जगेल कोण मरेल व कोण मारेल याचे गुपित तो कधीच फोडणार नाही ! त्याला हातावर पोट आहे यांच्याशी काही देणेघेणे नाही आहेरे माणसांनी नाहीरे ना मदत करणे एवढाच " मानवी " मार्ग आहे व तसा प्रयत्न चालू आहे पण तो अपुरा पडणार आहे ! आमच्या सोसायटी खाली झाडाखाली बसणार्या एका भाजीवालीला दोन दिवसाचा शिधा देत आहोत . चहाची दुकाने बंद असल्याने वाचमन लोकांना एक वेळचा चहा देत आहोत आमच्या वयक्तिक मिळकतीतून ! मदत अल्प आहे पण जाणीव होऊ लागली आहे हे नक्की !
  • Log in or register to post comments
स
साहना Sat, 04/24/2021 - 20:17 नवीन
रात्रीच्या जमावबंदीने पोलिसांचा ताण कमी होत असेल तर बरे आहे पण वरून पाहता तरी हि जमाव बंदी एन्फोर्स करण्यासाठी आणखीन पोलिसांना रात्रपाळी करावी लागतेय असे दिसते. त्याशिवाय रात्रीच्या सामसुमीचा फायदा घेऊन इतर वाईट कृत्ये सुद्धा वाढू शकतात.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 04/23/2021 - 03:37 नवीन
कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. आपली उपस्थिती अनावश्यक आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 04/23/2021 - 03:42 नवीन
ऐनवेळी साखरपुडा केल्याने, बरेचसे नातेवाईक नाराज आहेत... आता, "आपली उपस्थिती अनावश्यक आहे."... असे लिहिले की सगळेच दोर कापल्या जातील
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 04/23/2021 - 04:39 नवीन
मुलीच्या मामाने, मुलीला स्टेज वर घेऊन या.. ह्यातच २ तास निघून जातात... - वधू वरास अनेक शुभेच्छा...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 04/23/2021 - 05:18 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
द
दिगोचि Fri, 04/23/2021 - 06:12 नवीन
यासाठी प्रसाद_१९८२ यांचा सल्ला आवडला. तसे करा. म्हणजे कोरोंनाच्या धोक्यापासून दूर राहाल. मी स्वत: लग्ने लावतो. या वर्षी चार लग्ने फक्त नऊ जणांच्या (नवरा-नवरी त्यांचे आई-वडील दोन साक्षीदार व मी) उपस्थितीत व त्यान्च्या घरीच लावली आहेत. कारण पोलीसानी एव्हढ्याना परवानगी दिली होती. काळजी घ्या.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 04/23/2021 - 06:15 नवीन
व्यनी करतो
  • Log in or register to post comments
स
साहना Fri, 04/23/2021 - 07:58 नवीन
वधूवरांस आणि पालकांस लग्नाच्या शुभेच्छा ! खालील गोष्टी १००% कराव्यात : - लग्नाचे कायदेशीर प्रमाणपत्र करून घ्यावे. (इतरांनी का व कसे ते सांगितले आहेच). - लग्नाची तारीख असलेली आमंत्रण पत्रिका छापून त्याच्ये फोटो घ्यावेत. - सात फेरे घेतानाचे फोटो नक्की घ्यावेत. - वधुवर आणि त्यांचे पालक आणि गळ्यांतील हार आणि मेहंदी इत्यादींचे फोटो घ्यावेत.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 04/23/2021 - 08:08 नवीन
.. .. ................ आणि नववधूचे नांव लग्नानंतर बदलले असल्यास नाव बदलाची कायदेशीर प्रक्रिया करुन गॅजेट डिक्लेरेशन ही करून घ्यावे !
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 04/23/2021 - 08:38 नवीन
ह्या गोष्टी येतात
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Fri, 04/23/2021 - 10:18 नवीन
लग्नानंतर बदललेले नाव वापरणार असेल तर पारपत्र काढताना गेजेट लागते, फक्त लग्नाच्या सर्टिफिकेटवर काम होत नाही
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Fri, 04/23/2021 - 10:59 नवीन
मला पासपोर्ट काढताना लग्नाच्या सर्तीफेकेटची मूळ प्रत नाही म्हणून परत पाठवले ! बायकोचे नाव बदलले होते .त्यासाठी तिने प्रतिज्ञापत्र केले व मूळ सर्टिफिकेट सापडत नाही असा त्यात उल्लेख केला व दोन वृत्तपत्रात जाहिरात देऊन त्याची कॉपी पासपोर्ट ऑफिसला सादर केली . त्यात गेझेट वगरे काही लागले नाही !
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 04/23/2021 - 10:55 नवीन
गॅजेट डिक्लेरेशनची गरज नाही. नाव बदलल्याचे प्रतिज्ञापत्र पुरेसे आहे.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 04/23/2021 - 16:14 नवीन
प्रतिज्ञापत्र, लग्नाची पत्रिका, विवाह प्रमाणपत्र, पेपरमधील जाहिरात हे नाव बदलल्याचे वैध पुरावे नाहीत त्यामुळे नाव बदलाची कायदेशीर प्रक्रिया करुन गॅजेट डिक्लेरेशन करून घ्यायला लागेल असे पारपत्र काढताना सांगितले गेले होते.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 04/23/2021 - 16:28 नवीन
माझ्या लग्नानंतर बरी अर्धीचे नाव बदलले होते. त्यावेळी पारपत्रासाठी फक्त प्रतिज्ञापत्र द्यावे लागले होते. आता नियम बदलले असल्यास माहिती नाही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 04/23/2021 - 16:36 नवीन
मॅरेज सर्टिफिकेट जोडले होते
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 04/23/2021 - 08:37 नवीन
माहिती बद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
द
देशपांडे विनायक Fri, 04/23/2021 - 08:48 नवीन
काखेत  कळसा आणि गावाला वळसा . हल्लीच्या पिढीने तर लग्नाला पर्याय काढला आहे वेळ वाया जाऊ नये वाटत असेल तर लिव्ह इन सुरु करावे.  सर्वांच्या अनुमतीने योग्य वेळी सर्व हॊस मौज ,पाहिजे ते विधी, पाहिजे तितके लोक बोलावून लग्न साजरे करावे [ आमचे वय ७९ वर्षे असून वरील सूचनेस आमचा शुभाशीर्वाद आहे याची नोंद घ्यावी ]
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Fri, 04/23/2021 - 09:38 नवीन
वर देशपांडे विनायक यांनी लिहीले आहे तेच मी पण लिहीणार होतो. असे करता आले तरी कायदेशीर सर्टिफिकेट मात्र जरुर घ्यायला हवे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 04/23/2021 - 12:41 नवीन
सामाजिक कारणे योग्य आहेत... शिवाय, मुलाला पण ते पटलेले नाही सौ.ला विचारले नाही, पण विचारले तर, ती आधी मला घराबाहेर काढेल...आणि असे घडले तर ती मुलाला कुटून काढेल... नकोच ते ...
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sat, 04/24/2021 - 04:24 नवीन
ब्रह्म, दैव, आर्य, प्राजापत्य, असुर, गन्धर्व, राक्षस आणि पिशाच -- असे आठ प्रकारचे विवाह पूर्वी हिंदुस्थानात प्रचलित होते. याबद्दल जरा अभ्यास करून सोयीचा असेल त्याप्रकारे विवाह करून टाकावा. कोरोना मुळे जी सामाजिक स्थित्यंतरे आगामी काळात येऊ घातली आहेत त्यात या अष्ट्विवाहांचाही समावेश व्हायला हवा असे आम्हास वाटते.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 04/24/2021 - 05:18 नवीन
प्राजापत्य विवाहच योग्य आहे तो शास्त्र संमंत पण आहे संदर्भ : कौटिल्याचे अर्थशास्त्र , पान क्रमांक 238
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 04/24/2021 - 06:49 नवीन
वेळ वाया जाऊ नये वाटत असेल तर लिव्ह इन सुरु करावे. सर्वांच्या अनुमतीने योग्य वेळी सर्व हॊस मौज ,पाहिजे ते विधी, पाहिजे तितके लोक बोलावून लग्न साजरे करावे अव्यवहार्य पर्याय आहे. त्यापेक्षा घरच्या घरी हिंदू विवाह कायद्याप्रमाणे विवाह करावा हौस मौज आणि विधी वगैरे इतर लोकांसाठी असतात त्यांना एवढे महत्त्व देण्याची काय गरज आहे. कन्या वरेते रूपं माता वित्तं पिता गुणम बांधव: कुलम इच्छन्ति मिष्टान्ने इतरेजन: अर्थात मुलगी मुलाचे रूप पाहते. मुलीची आई मुलाच आर्थिक स्थिती आणि वडील मुलाचे गुण पाहतात मुलीचे बांध मुलाचे कुळ पाहतात बाकी सार्यांना फक्त लग्नात मिळणाऱ्या सुग्रास भोजनात रस असतो. म्हणजेच त्यांना फाटा मारायली मुळीच हरकत नाही. ज्याला कायद्याचे संरक्षण नाही कि समाजमान्यता नाही आणि मुलगा मुलगी एकमेकांशी वचनबद्ध ( commitment) होण्यास तयार नाहीत असला अचाट आणि अफाट पर्याय येथे कामाचा नाही सारे माझे मत आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 04/24/2021 - 06:58 नवीन
कुठल्या मुलीचे आई वडील अशा अफाट पर्यायाला तयार होतील?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 04/24/2021 - 07:16 नवीन
नाही होणार ...
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sat, 04/24/2021 - 18:16 नवीन
बरोबर.. करोनाने खरच कुठपर्यंत शिरकाव केलाय..लिव इन..काहीपण , अशक्य पर्याय.
  • Log in or register to post comments
N
nanaba Mon, 04/26/2021 - 08:31 नवीन
मुलगा,आईवडील आमच्या ओळखीचा असेल आणि आमचा त्यावर विश्वास असेल तर चालू शकेल
  • Log in or register to post comments
N
nanaba Mon, 04/26/2021 - 08:29 नवीन
आपल्याला आपलं मन क्लीयर असेल तर बाहेरच्या गोष्टींकडे किती लक्ष द्यायचे! देवा ब्राह्मणाच्या आणि आई वडिलांच्या साक्षीने - आपल्या शपथा तयार करून- बोलून (घेऊन) लिव इन लग्नाला पर्याय म्हणून चालायला हरकत नाही कुणीतरी ते ८ प्रकारचे विवाह दिले आहेत त्यातले जबरदस्ती वाले (उदा राक्षस) सोडून बाकीचे आता समाजमान्य करायला हरकत नाही!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 04/26/2021 - 10:15 नवीन
साधं मास्कचा वापर करता येत नाही, तिथे अशा गोष्टी न दिलेल्याच उत्तम ...
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Fri, 04/23/2021 - 09:38 नवीन
साखरपुडा झाला अस्ल्यास कोरोना जाइ पर्यंत लिवीन अनुसरावे असा फतवा लवकरच येणार आहे ? अशी अफवा कानावर आली आली आहे.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Fri, 04/23/2021 - 09:43 नवीन
आणि 25 माणसांत लग्न कसे करावे
आपणास बहुदा 25 उपस्थितांत लग्न कसे करावे हा प्रश्न पड्ला आसावा
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 04/23/2021 - 12:36 नवीन
हो
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Sat, 04/24/2021 - 17:49 नवीन
पण उत्तर अत्यंत सोपं आहे....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 04/24/2021 - 17:55 नवीन
आता फक्त दोन तासांत, हा समारंभ कसा उरकायचा? ह्यावरच गाडे अडले आहे ... पण, पुढच्या आठवड्यात ही अडचण पण दूर होण्याची शक्यता आहे ... भेंडी, मिपाकरांनाच राज्यशकट चालवायला द्यायला हवा... कारण, दोन्ही प्रश्र्नांना, तर्काला धरून उत्तरे मिळाली...
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Sat, 04/24/2021 - 18:09 नवीन
रच्याकने भेंडी या शब्दाचा अर्थ जाणकार लोक एका हिण्दी स्लँगचा सब्सिट्युट म्हणुन घेतात...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 04/24/2021 - 18:38 नवीन
भेंडी, हा शब्द वापरतो ....
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Sun, 04/25/2021 - 06:12 नवीन
कॅजुअली ?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 04/25/2021 - 10:10 नवीन
आयला, च्यायला ... हे शब्द जितके सहज वापरल्या जातात, तितक्याच सहजतेने हा शब्द मी वापरतो .... ह्या शब्दांना काहीही अर्थ नसतो
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Sun, 04/25/2021 - 10:16 नवीन
हे बाकी भारी हं _/\_
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Fri, 04/23/2021 - 10:53 नवीन
अहो मुवि काका लग्न ठीक आहे हो , पण नंतर कसे करावे ? आधीच महामारी चालू है , त्यात घरात बसने ओघाने आले , मग कालौघाने बरेच सहन करणे आले . मला तर वाटत हे सर्व निवळल्यानंतर लग्न करावे . काय बोलता
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 04/23/2021 - 12:36 नवीन
बघू या
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा