Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

कोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध

ह
हेमंतकुमार
Fri, 04/02/2021 - 06:40
🗣 230 प्रतिसाद
ok या विषयाचे आधीचे संदर्भ : १. हात, जंतू, पाणी आणि साबण २. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज ३.कोविड १९ : व्याप्ती आणि भवितव्य ४. कोविड १९ : वर्षपूर्ती आणि लसीकरण ........................ पूरक विषय : पल्स ऑक्सीमीटरचे गमभन ....... 31 डिसेंबर 2019 रोजी जागतिक बारसे झालेल्या कोविड१९ या आजाराने अद्यापही आपला पिच्छा सोडलेला नाही. मध्यंतरी काही काळ आपण त्याच्यावर कुरघोडी केल्यासारखे वाटत होते. परंतु आता तर तो विषाणू विविध अवतार बदलून आलाय. या बदललेल्या अवतारांची काही रुपे जरा जास्तच त्रासदायक होत आहेत. दरम्यान जागतिक पातळीवर लसीकरण व्यापक स्वरूपात होत आहे. औषधोपचारांच्या दृष्टीनेही संशोधन चालू आहे पण अद्याप रामबाण असा उपाय सापडलेला नाही. एकंदरीत पाहता भारतात या आजाराची दुसरी लाट आली आहे असे म्हटले जाते. काही युरोपीय देशांनी तर त्यांच्याकडे ‘तिसरी लाट’ आली असे म्हटले आहे. या लेखमालेच्या मागच्या भागामध्ये एका वाचक महोदयांनी निरोपाद्वारे अशी सूचना केली, की इथे चर्चेदरम्यान दिली जाणारी महत्त्वाची माहिती ही प्रतिसादांच्या रूपाने असल्याने ती विस्कळीत स्वरूपात राहते. तेव्हा अशी माहिती एकसंध वाचायला मिळाल्यास बरे होईल. त्यावर अन्य काही वाचकांशीही विचारविनिमय झाला. तसेही असा माहितीपर धागा सुमारे तीन महिने जुना झाला की त्याच्या चर्चेची जागा बऱ्यापैकी फुगलेली असते. त्यामुळे मागच्या पानांवर जाऊन काही बघायचे झाल्यास ते बऱ्यापैकी कष्टप्रद होते. यावर विचार करून मी असा एक पर्याय काढला आहे. मागच्या धाग्यातील चर्चेदरम्यान आलेली महत्त्वाची उपयुक्त माहिती संपादित करून इथे एकसंध स्वरूपात लिहीत आहे. त्यानेच या धाग्याची सुरुवात करतो. ही महासाथ आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला तीन आघाड्यांवर लढायचे आहे : १. लसीकरणाच्या माध्यमातून प्रतिबंध २. औषधोपचार आणि ३. सामूहिक आरोग्यशिस्त आणि प्रशासकीय उपाय. गेल्यावर्षीच्या अखेरीस विविध उत्पादकांच्या लसी बाजारात उपलब्ध होऊ लागल्या. त्यातील काहींना संबंधित देशांच्या औषध प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर लोकांचे लसीकरण सुरू झाले. भारतातील लसीकरण साधारण जानेवारीमध्ये सुरू झाले. भारतात सध्या दोन प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत या दोन्ही स्नायूंमध्ये इंजेक्शन द्वारा घ्यायच्या आहेत : १. कोविशिल्ड : ही ‘सिरम’ने तयार केलेली असून त्यात अन्य वाहकविषाणू आणि प्रथिन-कोड हे तंत्रज्ञान वापरले आहे. २. कोवाक्सिन : हे भारत बायोटेकने तयार केलेले असून त्यात निष्प्रभ विषाणूशी संबंधित तंत्रज्ञान वापरलेले आहे. दोन्ही लसींचे दोन डोस घ्यावयाचे आहेत. कोवाक्सिनच्या बाबतीत ते एक ते दीड महिन्याच्या अंतराने, तर कोविशिल्डच्या बाबतीत पहिल्या डोसनंतर दीड ते दोन ( जास्तीत जास्त तीन) महिन्यांपर्यंत दुसरा डोस घेतलेला चालेल, असे संबंधितांनी जाहीर केले आहे. अमेरिकेत मुख्यतः फायझर आणि मॉडरना या दोन कंपन्यांच्या लसी वापरल्या जात आहेत. त्या दोन्ही अत्याधुनिक अशा एम-आरएनए तंत्रज्ञानावर आधारित बनवल्या आहेत. त्याही इंजेक्शनद्वारच घ्यायच्या आहेत. अमेरिकेत फायझर व भारतात कोवाक्सिनच्या संदर्भात २ डोस घेऊन झाल्यानंतर तिसरा डोसच्या आवश्यकतेबाबतचे शास्त्रीय प्रयोग सुरु झालेत. कुठलीही लस परिपूर्ण नसते. त्यामुळे स्वतः लसवंत झाले तरीही संबंधित रोगजंतूचा संसर्ग होऊ शकतो. परंतु त्या परिस्थितीत लसीकरण झाल्याचे स्वतःला प्रत्यक्ष व इतरांना अप्रत्यक्ष फायदे असे मिळतात :

१. लस घेतलेल्या व्यक्तीस तो संसर्ग जर झालाच तरी त्याचा परिणाम सौम्य असतो. तिच्या शरीरात विषाणूची घनता व आक्रमकता खूप कमी राहते. २. वरील व्यक्तीद्वारा ते विषाणू पसरवण्याची शक्यता राहते, पण तिचे प्रमाण खूप कमी असते.

अर्थात इंजेक्शनद्वारा दिलेल्या लसीमुळे इतरांना होणारा रोगप्रसार थांबेल की नाही, हे अद्याप सिद्ध झालेले नाही. या संदर्भात अमेरिकेत एक महत्त्वाचे संशोधन चालू झाले आहे. त्यामध्ये बारा हजार महाविद्यालयीन तरुणांचा समावेश केलाय. दोन टप्प्यांत त्यांना मॉडर्नाची लस दिली जाईल. त्या प्रत्येकाजवळ एक ‘इ-डायरी ऍप’ असेल. यातील प्रत्येकजण स्वतःच्या नाकातून रोज स्वाब घेईल. तसेच ठराविक काळाने त्यांचे रक्तनमुनेही तपासणी जातील. पुढच्या टप्प्यात या तरुणांचे कुटुंबीय आणि जवळचे लोक यांचीही संबंधित तपासणी केली जाईल. सुमारे पाच महिन्यानंतर या अभ्यासाचे निष्कर्ष हाती येतील. लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतर लोकांच्या वैयक्तिक अनुभवांची देवाणघेवाण होत आहे. त्यातील एक महत्वाचा मुद्दा असा: “लस दिल्यानंतर इंजेक्शनच्या जागी दुखले, जागा लाल झाली आणि थोडा ताप आला, म्हणजे ‘चांगलेच’ झाले. याचा अर्थ लस काम करीत आहे”, अशी एक सामान्य समजूत (मिथक) असते. ( नो पेन, नो गेन कन्सेप्ट). यासंदर्भात बराच शास्त्रीय अभ्यास झालेला आहे. लसींच्या विविध प्रकारानुसार अगदी भिन्न स्वरूपाचे अनुभव आलेले आहेत. लोकांमध्ये ताप येण्याचे प्रमाण तर सहसा २५ टक्‍क्‍यांवर जात नाही. एकंदरीत विदा पाहता वरील मिथक शास्त्रीयदृष्ट्या काही सिद्ध झालेले नाही. लसीमुळे शरीरात निर्माण होणारी प्रतिकारशक्ती ही प्रतिपिंडे (Ab) आणि T संरक्षक पेशी या दुहेरी स्वरूपाची असते. ती व्यक्तीनुसार कमीअधिक प्रमाणात निर्माण होते. आपले शरीर आणि पर्यावरण यांच्याशी संबंधित अनेक घटकांवर ती अवलंबून असते. करोना-2 च्या जनुकीय बदलाने सुमारे १६ नवे विषाणू-अवतार अस्तित्वात आले आहेत. त्यापैकी ५ हे पूर्वीच्या तुलनेत अधिक संसर्गजन्य आहेत. त्यापैकी चौघे सद्य लसींना मध्यम प्रमाणात विरोध करणारे (evaders) आहेत, तर एक अल्प विरोध करणारा आहे. सद्य लसी या अजूनही विषाणूला भारी आहेत असे तज्ञ म्हणताहेत. पण बहुतेक मोठ्या उत्पादकांनी विषाणूच्या बदलानुसार लसीमधील तांत्रिक बदल सुरू केलेले दिसतात. शेवटी सतत बदल करत राहण्याऐवजी एकच सर्वसमावेशक (युनिव्हर्सल) लस करता येईल का, याचा उहापोह चालू आहे. इंजेक्शनद्वारा दिलेल्या लसीमुळे शरीरात केंद्रीय प्रतिकारशक्ती चांगली निर्माण होते. परंतु श्वसनमार्गात स्थानिक प्रतिकारशक्ती फारशी निर्माण होत नाही. ही शक्ती देखील महत्वाची असते कारण मुख्यत्वे तिच्यामुळे एखाद्या व्यक्तीकडून दुसरीस होणारा रोगप्रसार आटोक्यात येतो. त्यादृष्टीने अशा काही लसींचे संशोधन सुरु आहे. भारतातील परिस्थिती अशी आहे: १. भारत बायोटेकने नाकाद्वारे घ्यायची लस बनवली असून त्याचे मानवी शास्त्रीय प्रयोग सुरू झालेले आहेत. २. प्रेमास बायोटेकने तोंडातून घ्यायच्या कॅप्सूलच्या माध्यमातून लस विकसित केली आहे. तिचे प्राणीप्रयोग यशस्वी झालेले आहेत. लसींच्या जोडीने उपचारांवरही संशोधन सातत्याने चालू आहे. त्यापैकी नवीन घडामोडी : १. १० फेब्रुवारी रोजी अमेरिकेच्या औषध प्रशासनाने Bamlanivimab and Etesevimab (Antibodies) या औषधांच्या संयुक्त वापराला आपत्कालीन वापराची परवानगी दिली. सौम्य ते मध्यम आजार असलेल्या रुग्णांना हे दिल्यास आजार रोखला जातो. 2. Monlupiravir : हे औषध तोंडाने घ्यायची गोळी असून त्याचे सध्या दुसऱ्या टप्प्यातील रुग्णप्रयोग काही ठिकाणी चालू आहेत. ते औषध शरीरात गेल्यानंतर करोना विषाणूचे पुनरुत्पादन थांबवते. अधिक अभ्यासांती चित्र स्पष्ट होईल. तोंडाने घ्यायची गोळी हा तिचा महत्त्वाचा फायदा राहील. ३. Favipiravir (गोळी) या औषधाला भारतात ‘आपत्कालीन वापराची परवानगी’ या आधीच मिळालेली आहे. काही रुग्णांना त्याचा चांगला उपयोग होत आहे. तरीसुद्धा त्याच्या उपयोगितेचा पुरेसा विदा अजून उपलब्ध नाही. त्याच्या वापराबाबत तज्ञांत मतांतरे आहेत. रुग्णास जर मूत्रपिंडाची सहव्याधी असेल तर हे औषध काळजीपूर्वक द्यावे लागते. ४. Ivermectin : हे पूर्वापार जंतावरील औषध कोविड रुग्णांसाठी भारत आणि दक्षिण आशियात बर्‍यापैकी वापरलं जातं आणि त्याचे अनुभव चांगले आहेत. मात्र WHOने त्याचा सरसकट वापर करू नये असे म्हटले आहे; सध्या ते फक्त शास्त्रीय रुग्णप्रयोगादरम्यान वापरले जावे असे सुचविले आहे. वैद्यकाच्या अन्य उपचारपद्धतींमध्ये कोविड संबंधी काही संशोधन पुढे गेलेले असल्यास संबंधित जाणकारांनी जरूर भर घालावी. महासाथ नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण आणि उपचारांच्या जोडीने मूलभूत त्रिसूत्री आणि गर्दी टाळण्याची शिस्त दीर्घकाळ ठेवावी लागेल. .... तर असा आहे हा गेल्या २ महिन्यातील घडामोडींचा परामर्श. खरं म्हणजे ही महासाथ जर या वर्षाच्या प्रारंभीच बरीचशी आटोक्यात आली असती तर या विषयावरील वाढत्या चर्चेचे काही कारण नव्हते. परंतु निसर्गाला अजून तरी हे मंजूर नाही असे दिसते. त्यामुळे सध्या तरी वैज्ञानिक व संबंधित सामाजिक घटनांचा आढावा घेणे एवढे आपण करूया. नेहमीप्रमाणेच प्रश्न, पूरक माहिती आणि व्यक्तिगत अनुभव अशा विविधांगी चर्चेचे स्वागत आहे. …………………………………………………

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 113841 views

🗣 चर्चा (230)
R
Rajesh188 Fri, 08/13/2021 - 09:43 नवीन
आपण स्वतचं आपली खात्री करून घेणे उत्तम.ही टेस्ट करून घेतो.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 08/26/2021 - 09:53 नवीन
टेस्ट करून घेतली का?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 08/13/2021 - 08:59 नवीन
लसी चे दोन्ही डोस घेवून सुद्धा मुंबई मध्ये 62 वर्षीय स्त्री चा डेल्टा प्लस नी बळी घेतला. मधुमेह असणाऱ्या व्यक्ती नी लस घेवून सुद्धा संरक्षण मिळत नसेल तर कठीण आहे. भारतात मधुमेही लोकांची प्रचंड लोकसंख्या आहे..हल्ली तरुण मुल ,मुली पण मधुमेह ला बळी पडत आहेत.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Fri, 08/13/2021 - 09:00 नवीन
पहिल्या लाटेत मृत्यूमुखी पडलेल्यांमधे जेष्ठ नागरिकांचे प्रमाण जास्त होते असे वाचले होते. यास्तव लसीकरणामधे जेष्ठ नागरिकांना प्रधान्य देण्यात आले अशीही उपपत्ती वाचली होती. दुसर्‍या लाटेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांमधे जेष्ठ नागरिकांचे प्रमाण घटले असे म्हणतात. हा परिणाम जर जेष्ठ नागरिकांमधील लसीकरणामुळे झाला असेल, तर लसीकरण करून घेणे योग्य समजले पाहिजे असे वाटते.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 08/13/2021 - 09:05 नवीन
सहमत .
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 08/13/2021 - 16:55 नवीन
अमेरिकी औषध प्रशासनाने प्रतिकारशक्ती दुबळी झालेल्या लोकांसाठी covid-19 लसीच्या तिसऱ्या डोसची शिफारस केली आहे. या प्रकारात खालील रुग्ण मोडतात : १. इंद्रिय प्रत्यारोपण झालेले २. कर्करोग उपचार घेत असलेले ३. विविध ऑटोइम्युन आजार असलेले
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 08/18/2021 - 10:02 नवीन
भारतात सापडल्या Covishield च्या बनावट लसी; WHO नं दिला सतर्कतेचा इशारा!
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 08/21/2021 - 13:05 नवीन
लसी पण बनावट ?बाजारात लस टोचून देणारे डॉक्टर तरी original आहेत का ?का ते पण बनावट.
  • Log in or register to post comments
ग
गुल्लू दादा Sat, 08/21/2021 - 17:54 नवीन
वा राजेश वा. मानलं तुम्हाला. पण डॉ. शक्यतो लस टोचत नाही हो. शक्यतो म्हंटल बरं नाहीतर यावर पण जिलेबी पाडालं.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 08/21/2021 - 11:49 नवीन
करोना’योध्दा’च… ! १०९ दिवस. ECMO व व्हेंटिलेटरवर राहून करोनाला दिली मात https://www.loksatta.com/desh-videsh-news/corona-update-chennai-discharged-corona-patient-from-the-hospital-after-109-days-srk-94-2570802/ अभिनंदन !
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 08/21/2021 - 13:03 नवीन
१०९ दिवस व्हेंटिलेटर राहून पण जीव वाचला जी आनंदाची च बातमी आहे. पण १०९ दिवस व्हेंटिलेटर राहिल्या मुळे शरीराचे किती अतोनात नुकसान झाले असेल.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Sat, 08/21/2021 - 17:11 नवीन
डब्यामध्ये ?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 08/21/2021 - 18:06 नवीन
Dr कुमार ह्यांचा हा धागा आहे. आपली भेट राजकीय धाग्यावर होत च राहील.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Sat, 08/21/2021 - 20:20 नवीन
मुगाची उसळ अन पोळी आहे खाणार का
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 08/21/2021 - 17:31 नवीन
लसीचे दोन डोस घेऊनही अमोल कोल्हेंना करोनाची लागण; केले महत्त्वाचे आवाहन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Misirlou Acapella
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 08/25/2021 - 17:22 नवीन
अमेरिकी औषध प्रशासनाने फायझर कंपनीच्या कोविड लसीला पूर्ण मान्यता नुकतीच दिली (सोळा वर्षावरील वयोगटांसाठी) https://www.fda.gov/news-events/press-announcements/fda-approves-first-c...
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 08/25/2021 - 17:25 नवीन
https://www.fda.gov/news-events/press-announcements/fda-approves-first-covid-19-vaccine
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 08/26/2021 - 09:14 नवीन
"कोविड - 22 असा नवा घातक variant " या मथळ्याची बातमी समाजमाध्यमांमध्ये फिरत आहे. त्यासंबंधी गैरसमज नको म्हणून हा खुलासा : विषाणूच्या संभाव्य प्रकाराला असे नाव देणे चुकीचे आहे. प्रा. साई रेड्डी यांच्या एका मुलाखतीचा चुकीचा अर्थ काढून माध्यमांनी हे पसरवले आहे. प्राध्यापक रेड्डी यांनी खालील खुलासा इथे केलेला आहे : https://www.google.com/amp/s/inews.co.uk/news/world/covid-22-new-variant-doesnt-exist-viral-what-happened-explained-1164990/amp “To make it clear my statement meant to convey that I believe Covid in 2022, particularly the early part of the year (January – March) has a chance to be worse than this year, Covid in 2021
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 08/30/2021 - 15:50 नवीन
दोन महिन्यांपूर्वी इस्रायलने कोविडवर चांगला विजय मिळवला होता आणि तिथली बरीच बंधने हटवली होती .सध्या मात्र तिथे चौथी लाट जाहीर केलेली आहे. https://www.google.com/amp/s/www.theweek.co.uk/news/science-health/953940/israel-fourth-covid-wave%3famp
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Mon, 08/30/2021 - 17:12 नवीन
Very important piece of information... 4th wave ? Oh my lord... Have mercy.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Wed, 09/01/2021 - 19:53 नवीन
भारतात लशीचे दोन्ही डोस घेतल्यावर ज्या रुग्णांना कोविड होत आहे त्यांच्या लशीबाबत अधिक माहिती प्रसिद्ध केली जात आहे का ? असल्यास कुठे मिळू शकेल ? म्हणजे उदा: कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस घेतलेल्या किती टक्के लोकांना कोविड झाला आहे ? किती टक्के लोकांचा आजा गंभीर झाला ? किती टक्के मृत्यू झालेत ? तशीच आकडेवारी कोव्हिशिल्डचीही.. मला वाटते प्रसारमाध्यमे हे लपवत आहेत. अगदी डॉ. आगरवाल यांच्या मृत्यूसंबंधित बहुतेक बातम्यांत त्यांनी घेतलेल्या लशीचा उल्लेख नव्हता.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 09/01/2021 - 20:10 नवीन
याबाबत मी एक तर्क मांडला होता.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Wed, 09/01/2021 - 20:16 नवीन
लसीकरण योग्य की अयोग्य किंवा हवे की नको यापेक्षा मला सांख्यिकी माहितीद्वारे कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन यांचे तुलनात्मक परिणाम जाणून घेण्यात रस आहे. पण अजून ते प्रसिद्ध केले जात नाहीयेत (कदाचित जाणूनबुजूनच?) असे दिसतेय.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस गुरुवार, 09/02/2021 - 06:07 नवीन
एका डॉक्टरांनी स्वानुभवातुन मांडलेले मत https://www.loksatta.com/visheshlekh-news/corona-virus-infection-orthopedic-covid-care-center-physical-mental-condition-of-individuals-akp-94-2583399/
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 09/02/2021 - 12:49 नवीन
लसीकरण किती उपयोगी पडेल ह्या बाबत ठाम माहिती नसताना सुद्धा लसी चे स्तोम माजवले गेले.दोन डोस घेणारे अन सुरक्षित नाहीत हे आता practically सिद्ध होत आहे लसी मुळेच व्हायरस जास्त धोकादायक झाला हे काही दिवसातच सुद्धा होईल. उपचार पद्धती पण पण चुकीची च होती हे पण सिद्ध होत च आहे. संजीवनी समजून प्रचार केलेली औषध च सरकार ban करत आहे. उपचार मुळेच लोक जास्त मृत्यू मुखी पडले असं निष्कर्ष निघू नये म्हणजे झाले.
  • Log in or register to post comments
ग
गुल्लू दादा गुरुवार, 09/02/2021 - 13:09 नवीन
काही पुरावे आहेत का ह्या बकबक चे. की हातात मोबाईल आणि नेट पॅक स्वस्त आहे म्हणून चालू आहे खरडणे.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 11/10/2021 - 08:48 नवीन
दोन डोस घेणारे अन सुरक्षित नाहीत हे आता practically सिद्ध होत आहे जगातील बहुतेक सरकार आणि वैद्यकीय विचारवंत महामूर्खाच असणार ,, कारण दोन लसी घेऊन रोगाचे शेवटचे टोक गाठणे टाळता येते असेच सगळे म्हणत आहेत पण १८८ आणि थोतांड वाले गामा यांना नक्की काही तरी या सर्वांपेक्षा जास्त माहिती असणार..... धन्य
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 09/11/2021 - 15:09 नवीन
सध्याच्या महासाथीमुळे अन्य तीन महत्त्वांच्या रोगांवरील नियंत्रणही बरेच ढिले पडले आहे. हे तीन आजार म्हणजे एड्स, क्षयरोग आणि मलेरिया. यासंदर्भात सुमारे १०० गरीब देशांचा अभ्यास करून काही निष्कर्ष निघाले आहेत: https://www.nature.com/articles/d41586-021-02469-8 सद्य महासाथीमुळे सर्व आरोग्य सुविधा व संसाधने covid-19 वर केंद्रित झाल्यामुळे वरील तीन आजारांकडे कमालीचे दुर्लक्ष झालेले असून त्याचे काही दुष्परिणाम दिसून येत आहेत.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 09/19/2021 - 06:07 नवीन
फायझर व मॉडर्नच्या कोविडविरोधी लसी या एम- आरएनए तंत्रज्ञानावर आधारित आहेत हे सर्वज्ञात आहे. या तंत्रज्ञानावर सुमारे 40 वर्षांपासून संशोधन चालू आहे. आधी त्याचा इन्फ़्लुएन्ज़ा व आता करोना विरोधात त्याचा वापर केला गेला आहे. हे संशोधन खूपच कष्टाचे ठरले आहे. पुढील महिन्यात यंदाचे नोबेल पुरस्कार जाहीर होतील. यंदा वैद्यकातील पुरस्‍कार एम-आरएनए तंत्रज्ञान संशोधकांपैकी कोणाला तरी तो मिळेल अशी जोरदार हवा आहे. त्यामुळे या संशोधनाचे मुख्य श्रेय कोणाला मिळावे हा वैज्ञानिक वादाचा मुद्दा झाला आहे. संबंधित वैज्ञानिकांचे या बाबतीतील मतभेद चव्हाट्यावर आलेले आहेत :
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 09/22/2021 - 06:35 नवीन
अमेरिकेतील ओरेगॉन राज्यातील एक ठळक घडामोड. तिथल्या एका डॉक्टरांनी या महासाथी दरम्यान स्वतः मास्क बिलकुल वापरला नाही. एवढेच नाही तर त्यांनी त्यांच्या रुग्णांनाही तो वापरू नका असा ठाम सल्ला दिला. या डॉक्टरांच्या मते सतत मास्क वापरल्याने स्वतः बाहेर सोडलेल्या कार्बन डाय ऑक्साईडचे पुन्हा श्वसन होऊन आपल्याला विषबाधा होते. महासाथी दरम्यान सर्वांनी मास्क वापरावेत हा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियम आहे. त्याचा भंग केल्याबद्दल आधी या डॉक्टरांना दहा हजार डॉलरचा दंड ठोठावण्यात आला. तरीही त्यांनी त्यांच्या व्यवसायात आपला हेका चालूच ठेवला. यापुढे जाऊन त्यांनी दमा व अन्य श्वसनविकाराच्या रुग्णांना असा सल्ला दिला, की मास्क वापरलात तर तुमचा आजार वाढेल किंवा तुम्हाला हृदयविकाराचा झटका पण येऊ शकेल. या सगळ्याची दखल घेऊन अखेर संबंधित राज्य वैद्यकीय मंडळाने या डॉक्टरांचा व्यावसायिक परवाना रद्द केला आहे. १. २.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 09/22/2021 - 06:36 नवीन
२. https://omb.oregon.gov/Clients/ORMB/OrderDocuments/c1d122d1-5459-4d6f-889d-76789c8ee183.pdf
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस गुरुवार, 09/23/2021 - 12:59 नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh/uk-vaccine-policy-covishield-discrimination-against-indians-abn-97-2598527/ प्रमाणपत्राला मान्यता नाही, असे का ?
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Fri, 09/24/2021 - 08:06 नवीन
https://www.loksatta.com/sampadkiya/agralekh/editorial-page-covishield-recognition-vaccine-certificate-congress-leaders-foreign-secretary-on-behalf-of-the-government-astrazeneca-pfizer-moderna-johnson-and-johnson-akp-94-2600811/ थरुरांच्या निर्णयाचे कौतुक.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 09/23/2021 - 19:43 नवीन
करोनाचा विषाणू मुद्दाम पसरवलेला आहे. संबंधित ( इंग्रजी ) बातमी : https://www.rt.com/usa/535555-darpa-funding-bat-coronavirus-project-china/ -गा.पै.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 09/29/2021 - 12:29 नवीन
October सुरू झाला तरी तिसरी लाट आली नाही..
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Wed, 09/29/2021 - 13:11 नवीन
नेट स्लो आहे म्हणून जरा वेळ लागतोय
  • Log in or register to post comments
स
सुक्या Wed, 09/29/2021 - 19:06 नवीन
October सुरू झाला
कुठे??
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 09/29/2021 - 12:54 नवीन
भारताचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार के विजय राघवन यांच्या मते तिसरी लाट येईलच असे नाही. जरी आली तरी ती सौम्य असू शकते. नागरिकांनी आहे ती काळजी घेत राहणे उत्तम.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 09/29/2021 - 15:16 नवीन
अजून एक मत : भारतात तिसरी लाट येण्याची शक्यता जवळ जवळ नाही :डॉ. जेकब जॉन, नामवंत विषाणूतज्ञ
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 10/08/2021 - 11:08 नवीन
मुंबई विमानतळ की लोकल ट्रेनचं स्टेशन? प्रवाशांची तुफान गर्दी, करोना नियमांचा उडाला फज्जा! https://www.loksatta.com/mumbai/mumbai-airport-sees-heavy-rush-as-people-head-home-for-navratri-many-missed-flights-hrc-97-2621829/
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 10/29/2021 - 08:08 नवीन
कोविड लसीच्या सक्तीकरणाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झाली होती. त्या संदर्भातील न्यायालयीन तपशील इथे आहे. त्यातील महत्त्वाचे : या सुनावणीदरम्यान भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयातर्फे एक प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले गेले. त्यानुसार कोणत्याही नागरिकाला त्याच्या इच्छेविरुद्ध ही लस देता येणार नाही. तसेच, ही लस घेतलेले आणि न घेतलेले या दोन प्रकारच्या नागरिकांमध्ये सरकारला समाजजीवनात भेदभाव करता येणार नाही.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Wed, 11/03/2021 - 16:22 नवीन
हे वाचून बरे वाटले. सक्तीने लस देणे अयोग्यच ठरेल. लशीचे इतर दीर्घकालीन परिणाम (साईड इफेक्ट्स) नेमके काय काय आहेत हे पण अजून पुर्णतः समोर आलेलं नाही. शिवाय लशींना आपत्कालीन वापराकरीता परवानगी देण्यात आली आहे. पण आपत्कालीन वापर म्हणजे नेमके काय ?
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 11/03/2021 - 16:37 नवीन
आपत्कालीन वापर म्हणजे नेमके काय ?
चांगला प्रश्न. एखाद्या नव्या औषधाला मान्यता देताना काही टप्पे असतात. जर त्या औषधाला अंतिम स्वरूपाची मान्यता द्यायची असेल, तर त्या औषधाचे रुग्णांवर पुरेसे प्रयोग करून समाधान कारक निष्कर्ष मिळाल्याचा विदा सादर करावा लागतो. सद्यस्थितीत जेव्हा मोठी साथ आलेली असते तेव्हा तातडीने काहीतरी औषध किंवा लस देणे भाग असते. पुरेसा विदा जमा होईपर्यंत थांबता येत नाही. अशा वेळेस औषध प्रशासन जो काही थोडा विदा सादर केलेला असेल त्याला अनुसरून तात्पुरत्या वापराची मान्यता देते.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 11/10/2021 - 07:38 नवीन
आज सकाळीच कोर्टातला तपशील वाट्सॅपवर वाचायला मिळाला. आणि तेव्हाच आमच्या औरंगाबाद जिल्हाधिका-यांनी आदेश काढले की ज्यांनी कोणी लशीचा डोस घेतला नसेल त्याला राशनपाणी पेट्रोल डिझेल बंद. ( आशय असाच कमी जास्त होऊ शकतो) खात्रीसाठी संबंधित आदेश बघावा. माझ्या मनात एक विचार आला. आपण सगळेच करोनाच्या दहशतीखाली होतो. जगभर परिस्थितीही तशी झालीच होती. जगु की जगणार नाही इतका तो करोना आपल्या बोकांडी बसला होता. आत्ता थोडीशी हिम्मत वाढल्यावर असे वाटते. मिपावर एक धागा होता. करोनाची लस : एक थोतांड या धाग्याचा श्वास मोकळा करावा. असे काय झाले की झालं की एकदमच इतकं करोना कमी झाला ? अजूनही कित्येक लोक विना मास्क लशीचं वावरत आहेत. चर्चा व्हायला पाहिजे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 11/10/2021 - 08:14 नवीन
**असे काय झाले की झालं की एकदमच इतकं करोना कमी झाला ? >>> एकदम नाही कमी झालेला. इथे या आधी काही लिहिलं होते. https://www.misalpav.com/comment/1064648#comment-1064648 त्यानुसार मोठी लाट >> ओसरणे >> छोटी लाट >> सौम्य धुमसणे अशा टप्प्यांमध्ये तो कमी होत जातो. या कालखंडात उपचार, लसीकरण आणि सामूहिक प्रतिकारशक्ती या घटकांचाही प्रभाव पडतो
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 11/03/2021 - 13:33 नवीन
कोवॅक्सिन लसीला जागतिक आरोग्य संघटनेची मंजुरी, सूत्रांची माहिती
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 11/10/2021 - 07:21 नवीन
कोविड उपचारासाठी molnupiravir या तोंडाने घ्यायच्या गोळीला UK ने नुकतीच मान्यता दिली. https://www.gov.uk/government/news/first-oral-antiviral-for-covid-19-lagevrio-molnupiravir-approved-by-mhra
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 11/10/2021 - 08:42 नवीन
"ही लस घेतलेले आणि न घेतलेले या दोन प्रकारच्या नागरिकांमध्ये सरकारला समाजजीवनात भेदभाव करता येणार नाही." ज्या त्या देशाचा प्रश्न आहे .. पण इतर लोकशाही देशात "ज्यांनी लस घेतली आहे" आणि " ज्यांनी घेतली नाही" यांच्यात फरक केला जातो आहे .. आणि काही थोडी लोक सोडली तर बहुतेक समाज हे मान्य करतो कि असे "पॉसिटीव्ह डिस्क्रिमिनेशन " अश्या परिस्थितीत चालू शकते !
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 11/10/2021 - 10:33 नवीन
‘वास्तव’ : करोनानंतरच्या विश्वाचा वेध या चांगल्या दिवाळी अंकाचा परिचय इथे आहे https://www.aksharnama.com/client/article_detail/5579
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 11/11/2021 - 16:02 नवीन
चौकस२१२,
थोतांड वाले गामा यांना नक्की काही तरी या सर्वांपेक्षा जास्त माहिती असणार..... धन्य
काही वर्षांपूर्वी तुम्ही एक धुळीचा कणही नव्हतात. त्यापासून तुमचं एका पूर्ण वाढ झालेल्या नरात रुपांतर कोणी केलं? त्यासाठी तुमच्या शरीराचं संरक्षण व्हायला हवं ना? हे संरक्षण करण्यासाठी अत्यंत अभ्युच्च व हुरहुन्नरी रक्षाव्यवस्था ( = sophisticated and versatile immune system ) हवी ना? त्या रक्षाव्यवस्थेस करोनाशी लढायची ताकद नाहीये म्हणे. कुठलंसं द्रव्य टोचल्याने तिला ती ताकद येणारे म्हणे. अंधश्रद्धेचं इतकं प्राणघातक उदाहरण दुसरं काही आहे का? असो. पांढऱ्या कपड्यातल्या आलोपाठी मेडिसिनल चर्चच्या कार्डीनलानं फतवा काढला की करोना हा सर्वभक्षी विषाणू आहे. यावर कोणीही कसलेही प्रश्न उपस्थित करयचे नाहीत. कळलं? मग केवळ पांढऱ्या कपड्यातल्या कार्डीनलाने मंत्रावलेलं पाणीच तुमचा जीव वाचवू शकतं. यावर कोणीही कसलेही प्रश्न उपस्थित करयचे नाहीत. कळलं ना? व्हेरी गुड. हे पाणी टोचून घ्यायचं असतं. जे पुण्यवान असतील ते वाचतील. जे पापी असतील ते सारे नष्ट होतील. यावर कोणीही कसलेही प्रश्न उपस्थित करयचे नाहीत. कळलं ना व्यवस्थित ? फ्लूचा विषाणू मारायला mRNA लस कशाला? mRNA म्हणजे messenger-RNA. हे जनुकोपचार ( Gene Therapy ) आहेत. विषाणू मारायला जनुकोपचार कशासाठी? डास मारायला कोणी रणगाडा आणतं का? करोना खरंच इतका घातक आहे की त्याची वारंवार चाचणी करावी लागते? आणि लोकांना सतत पटवून द्यावं लागतं की तुम्हांस रोग झालाय म्हणून? पण काये की एकदा आपलं ठरलंय की प्रश्न विचारायचेच नाहीत. फक्त विज्ञानाच्या नावाने ढोल बडवायचे. मग सगळं कसं परीकथेसारखं चानचान दिसू लागतं. नरेंद्र महाराज की त्यांचे कोणी भक्त कसलासा ताईत वा अंगठी द्यायचे. ती वस्तू परिधान केली की भक्ताचं रक्षण होतं म्हणे. तर मग प्रश्न असाय की : आलोपाठी सफेदकोटी बिशप आणि नरेंद्र महाराज यांच्यात नेमका फरक काय ? उत्तर : आलोपाठी अभिमंत्रित पाण्याने जीव जाऊ शकतो. नरेंद्र महाराजांच्या ताईताने जीव जात नसतो. आवडलं उत्तर? असो. घोड्यास पाण्यापर्यंत नेता येतं. पाणी मात्र त्याचं त्यानेच प्यायचं असतं. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा