चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग १)
एप्रिल महिना सुरू झाला असल्याने चालू घडामोडींसाठी नवीन भाग सुरू करत आहे.
पी.पी.एफ आणि अन्य योजनांवरील व्याजदरात कपात करायचा वादग्रस्त निर्णय केंद्र सरकारने काही तासांत मागे घेतला आहे.
https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/govt-withdraws-cut-in-interest-rates-of-small-savings-schemes/articleshow/81811525.cms
जून २००४ मध्ये त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदींची हत्या करायला आलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांबरोबर इशरत जहान या मुंब्र्याच्या २० वर्षीय तरूणी चकमकीत मारली गेली ती चकमक खोटी नव्हती असा निर्णय कोर्टाने दिला आहे. इशरत जहान प्रकरणावरून युपीए सरकारने जे काही किळसवाणे राजकारण केले त्याला तोड नाही. हिंदू दहशतवादाचे थोतांड उभे करणे, संघाच्या शाखांमध्ये दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जाते आणि त्याविषयी गुप्तचरखात्याचे रिपोर्ट आपल्याकडे आहेत हे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी जाहीरपणे म्हणणे इथपर्यंत मजल गेली. हुतात्मा तुकाराम ओंबळेंनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी आपल्या प्राणांची आहुती देऊन कसाबला जिवंत पकडले म्हणून नाहीतर २६/११ चे हल्ले हा पण हिंदू दहशतवादच होता हे सिध्द करायची सगळी तयारी युपीए सरकारने केली होती. किंबहुना २६/११ चे हल्ले हा रा.स्व.संघाचा कट होता याविषयी एका पुस्तकाचे प्रकाशन दिग्विजयसिंगांनी केले होते. गुप्तचर विभागाचे प्रमुख मणी यांनी हिंदू दहशतवाद खरा आहे हे सिध्द करायला खोटे पुरावे उभे करायला विरोध केला त्यांना प्रचंड त्रास दिला गेला. आता चिदंबरम, शिंदे, शरद पवार, दिग्विजयसिंग वगैरे काँग्रेस नेते आणि त्यांची तळी उचलून धरणारे पुरोगामी विचारवंत यावरून देशाची माफी मागणार का? याच लोकांनी आणि युपीए सरकारने नरेंद्र मोदी आणि अमित शहांना यात गोवून त्यांची राजकीय कारकिर्द खतम करायचा प्रयत्न केला पण मोदी-शहा प्रचंड खमके निघाले आणि त्यांनी युपीए सरकारचा डाव त्यांच्यावरच उलटवला हे चांगलेच झाले. मात्र या प्रकरणात अनेक पोलिस अधिकार्यांना जवळपास १७ वर्षे खूप म्हणजे खूपच त्रास झाला याचे वाईट वाटते.
एकूणच या प्रकाराने महाभकास आघाडी सरकारने महाराष्ट्राला काळिमा फासला हे नक्की.पूर्ण सहमतलोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारीतेसफिदी फिदी फिदी . . .यामध्ये कोणालाच कसला हात वाटत नाहीये का?या सर्व प्रकारात प्रचंड रहस्ये लपलेली दिसतात. एकापाठोपाठ एक रहस्ये आता बाहेर येत आहेत. आतापर्यंत बाहेर आलेली प्रकरणे म्हणजे हिमनगाचे टोक वाटते. यातील खरे किती आणि खोटे किती हे सांगता येणे अवघड आहे. आता राष्ट्रीय तपास संस्था, केंद्रीय तपास संस्था यात उतरल्याने कपाटातील बरेच सापळे बाहेर येण्याची शक्यता आहे. आता अंमलबजावणी संचलनालय सुद्धा यात येईल. एकंदरीत यात बऱ्याच जणांचा बळी जाणार असं वाटतंय. ही प्रकरणे वापरून ठाकरेंना पायउतार होण्यास लावणे किंवा राष्ट्रवादीने बाहेर पडून भाजपला पाठिंबा देऊन आपली कातडी वाचविणे हा या प्रकरणाचा तार्किक शेवट असेल. एकंदरीत महाराष्ट्रात आपले सरकार आणण्यासाठी केंद्रातील भाजप सरकार या प्रकरणाचा पुरेपूर वापर करून घेणार हे नक्की.