मदत पाहिजे - उत्तर भारतात प्रवास आणि COVID चे नियम
नमस्कार नमस्कार
लय लांबड लावत नाय मुद्द्याचं चालू करतोय
हा तर सगळं काही बंद पडून १ वर्ष झालय आणि कुठेतरी जायचंय असं म्हणून नुसतं एक्सेल वर प्लॅन बनवून बनवून आणि मॅप वर बघून बघूनच सगळं फिरून झालं (आणखी कोणी समदुःखी असेल तर बोलते व्हा)
मग बस्स आता एकच उपाय मिपावर मदत मागायची
हा तर १००-१ प्लॅन पैकी एक प्लॅन खाली देतोय, जर का कोणी तिकडे* गेलं असेल तर माहिती सांगावी
* तिकडे म्हणजे पुणे ते - दिल्ली विमानतळ, ISBT, New Delhi रेल्वे स्टेशन आणि इथून पुढे आणि परत असा प्रवास केला असेल तरी अनुभव सांगावा
पुणे - दिल्ली - विमान प्रवास
दिल्ली - डेहराडून - बस/रेल्वे
डेहराडून - मंडल - HRTC बस (Mandal is a village. District: Chamoli, Uttarakhand)
मंडल इथून सुमो करून - Chopta, चंद्रशिला, जोशीमठ, AULI (रुपये शिल्लक असतील तर Valley of Flowers)
परत येताना फक्त दिल्ली ते पुणे रेल्वे हा बदल का?
का तर फोटो आणि विडिओ पाठवायची चांगली जागा म्हणजे रेल्वे चे सहा फुटाचे बेड, कारण विमानाने लवकर माघारी आलो तरी दोन तीन दिवस फोटो पाहण्यात आणि लोकांना पाठवण्यात जातात.
अधिक माहिती
कधी प्रवास सुरु करणार: 15-April or 01-May
किती प्रवासी: एक - मी वय ३९ शुद्ध शाकाहारी (काहींना घाई असते कुठे काय चांगले मिळते ते सांगायची पण ते समोरचा खातो का हे आधी विचारत नाहीत)
खर्च: विमान प्रवास सहित दहा हजार
सुट्टी: १०० शिल्लक आहेत (बायको फक्त सात दिवस देतेय)
का प्रवास करणार: मंडल पासून अनुसया माता मंदिर आणि श्री दत्त जन्म स्थान जवळ आहे
तळटीप: (तळटीपा)
- COVID साठी कोणती काळजी घ्यावी लागतेय आणि बदलणारे नियम याची माहिती दिली तर स्वागत आहे
- माझे मिपावर कधीतरी लॉगिन होते, सगळ्यांना उत्तरे देता येतील असे नाही समजून घ्यावे
- भाषा थोडी सातारी वाटेल, मग बरोबरय - फलटणकर आहे
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments