Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ८)

स
साहना
Wed, 03/24/2021 - 05:04
🗣 193 प्रतिसाद
- आमची माणसं, आमची वसुली - वसुलीच्या बाबतीत दुबई ची मक्तेदारी मोडत मुंबई आत्मनिर्भर झाली आहे. त्याशिवाय खंडणी वसुली हा सरकारी व्यवसाय झाला आहे. - भारताने इंग्लंड चा पुन्हा एकदा क्रिकेट मध्ये धुव्वा उडवला. - फायजर आता तोंडाने घेणारी कोविड ची गोळी आणणार आहे (म्हणे). - आईसलॅन्ड मध्ये पुन्हा एकदा ज्वालामुखी उद्रेक झाला आहे. मागे एकदा असे घडले तेंव्हा ६ महिने विमानसेवा खंडित झाली होती. - सुएझ कॅनाल मध्ये एक महाप्रचंड बोट अडकली आहे आणि त्यामुळे हजारो बोटींचा ट्रॅफिक जॅम झाला आहे. - कंगना राणावत जयललिताच्या बायोपीक मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलर हल्लीच लाँच झाला आहे. - येथेच्छ खाऊन झाल्यानंतर पैसे मागितले म्हणून एक ढाब्यावाल्याला आणि त्याच्या ९ माणसांना उत्तर प्रदेश पोलिसांनी खोट्या चकमकीत गुंतवले. - मुंबई पुणे ची डेक्कन queen रेल्वेगाडी नव्या स्वरूपांत येणार आहे. - नांदेड येथे कोर्टाने एका बलात्कार्याला ६४ दिवसांत फाशीची शिक्षा सुनावली. - एका २२ वर्षीय मुलीने आपल्याच बापाला दारू पाजून जिवंत पेटवून दिले. बाप आपल्यावर लैगिक अत्याचार करत होता असा दावा तिने केला. - अधोवस्त्र आणि विग मध्ये लपवून काही कोटींचे सोने आणणाऱ्या लोकांना चेन्नई हवाई तळा वर पकडले. देशांत सोने आणणार्यांना शिक्षा करण्याच्या भारतीय सरकारच्या मूर्खपणाची किंवा आमच्यासारख्यानी केली. विरंगुळा म्हणून हे विस्मृतीत गेलेले गाणे : https://www.youtube.com/watch?v=eCpbYmO4Ndo

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 55650 views

🗣 चर्चा (193)
R
Rajesh188 Wed, 03/24/2021 - 18:08 नवीन
मुलांच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी राजकारणी लोकांना मस्का मारून ते करून घेणे ही अवस्था गंभीर आहे. त्या मध्ये पालक मिंध्ये होतात. त्या पेक्षा मुलांना शाळेत प्रवेश मिळावा ही समस्या च दूर करणे हे उत्तम सरकार चे काम असते. वैयतिक प्रश्न जे राज्याचे प्रश्न नसतात तर पूर्ण जनतेच्या समस्या काय आहेत हे माहीत कसून ते सोडवणे हे सरकार चे काम आहे आणि विरोधी पक्षांनी त्या वर लक्ष ठेवणे हे विरोधी पक्षाचे काम आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य फक्त कंगना चेच नाकारले गेले आहे का? फक्त mansukh चाच राज्यात खून झाला आहे का? Drug च वापर ७० वर्षात फक्त आत्ताच होत आहे का? राज्यातील प्रतेक खुनाचा तपास झाला पाहिजे. फक्त mansukh च nahin. अभिव्यक्ती स्वतंत्र सर्वांचे जपले पाहिजे फक्त कंगना चे नाही. सर्व जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत. फक्त अंबानी चा जीव महत्वाचा नाही प्रतेक व्यक्ती चा महत्वाचा आहे.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Wed, 03/24/2021 - 18:21 नवीन
प्रश्नांबाबत खाली उत्तर दिले आहे. पण तरीही, वरील प्रश्नांचे गांभीर्य तुम्हाला समजले नसावे हे पटत नाही. वरून ज्यांना ते प्रश्न सोडवायला बसवलंय ते सोडवत नसतील तर त्यांना बडवायचे सोडून विरोधी पक्षाला झोडपताय, यातून बायस दिसून येतो. त्यामुळे पूर्णविराम.
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब Wed, 03/24/2021 - 18:44 नवीन
त्यांची जुनी सवय आहे.. कदाचित त्यांनी त्याचसाठी मिपावर अकाउंट उघडले आहे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 03/24/2021 - 16:52 नवीन
- सुएझ कॅनाल मध्ये एक महाप्रचंड बोट अडकली आहे आणि त्यामुळे हजारो बोटींचा ट्रॅफिक जॅम झाला आहे. एव्हर ग्रीन आता जरा हलले आहे म्हणे, आता जरा ट्रॅफिक कमी होइल... हिंदू द्रोही मिडिया :- काही दिवसांपूर्वी गाजियाबाद मध्ये डासना देवी मंदीरात एका मुस्लिम युवकाला पाणी पिण्यावरुन मारहाण झाल्याचा व्हिडियो व्हायरल झाला होता. मुळात या मंदीराच्या बाहेरच्या परिसरात पाणी पिण्याची सोय असुन अगदी हॅन्डपंप [कूपनलिका ] देखील आहे हे मिडिया ने सांगितले नाही तसेच या मंदिरात मुसलमानांना प्रवेश नाही अश्या प्रकारचा मोठा बॅनर बराच काळ तिथे लावलेला आहे. नक्की तो मुस्लिम युवक पाणीच प्यायला आत गेला होता का ? हा प्रश्न देखील मिडियाने विचारण्याचे कष्ट न घेता कशी अमानुष मारहाण केली गेली याचाच गवगवा करण्यात त्यांना रस होता असे पुन्हा एकदा इतर अन्य घटनां सारखेच पहायला मिळाले. [ ज्या भागात हिंदू अल्पसंख्यक होतात तिथे काय स्थिती उत्पन्न होते याचे हे एक ताजे आणि उत्तम उदाहरण आहे. ] यावर अधिक इकडे :- लव्ह जिहाद बद्धल योगी आदित्यनाथ यांची लव्ह जिहाद कायदा या विषयक मुलाखतीचा एक छोटासा भाग पाहण्यात आला होता तो देखील इथे देउन ठेवतो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ASHRAFF - CHAIYYA CHAIYYA (VERSI INDONESIA) - OFFICIAL VERSION
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 03/24/2021 - 17:15 नवीन
योगींचा वरील व्हिडियोत शेवटची काही वाक्य गाळली गेली आहेत ती खालील व्हिडियोत मिळतील :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ASHRAFF - CHAIYYA CHAIYYA (VERSI INDONESIA) - OFFICIAL VERSION
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब Wed, 03/24/2021 - 18:56 नवीन
@ मदनबाण जी. नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधान कोण याचे उत्तर निदान मला तरी मिळालेय. भारतात 70 वर्ष्यापासून ज्याप्रकारे बहुसंख्य हिंदूंचे शिरकाण, खच्चीकरण, गळचेपी आणि संस्कृतीचे हणन होत आहे त्याच्याकरिता योगी आदित्यनाथ सारखा कडवा माणुस पंप्र होणे गरजेचे आहे. अन्यथा हळूहळू सेक्युलॅरिज्म च्या नावाखाली दुसरा इस्लामिक देश होईल यात शंका नाही. जिथे मुस्लिम बहुसंख्य आहेत तिथे इतरधर्मियायांना पूर्ण स्वातंत्र्य असलेला एकही देश भूतलावर अस्तित्वात नाही त्यामुळे मी स्वतः तरी या पापात सहभागी होणार नाही. बाकी असिफ च्या नावाने गळे काढणाऱ्या लोकांनी दुसरी बाजू ( सत्य ) जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही याचे आश्चर्य वाटते.. ट्विटर वर लगेच सॉरी असिफ ट्रेंड करणाऱ्या फेक्युलर लोकांची कीव येते.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 03/24/2021 - 17:04 नवीन
मनसुख हिरेन हत्याप्रकरणी महाराष्ट्र एटीएसने तपास थांबवावा आणि आतापर्यंत केलेल्या सगळ्या तपासाची कागदपत्रे एन.आय.ए कडे द्यावी असा आदेश ठाण्याच्या सत्र न्यायालयाने दिला आहे. एक गोष्ट समजत नाही या प्रकरणाचा तपास एन.आय.ए ने करावा हा आदेश आधीच दिलेला असताना ए.टी.एस नक्की कोणत्या अधिकारात तपास करत होते? बहुदा हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाझेला ताब्यात घ्यायचे होते आणि मग एन.आय.ए च्या तपासाला खिळ घालायची होती. कारण सचिन वाझे एन.आय.ए च्या ताब्यात असताना नक्की काय सांगेल आणि आणखी कोणाकोणाला अडचणीत आणेल हे सांगता येणार नाही.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 03/24/2021 - 17:11 नवीन
एक गोष्ट समजत नाही या प्रकरणाचा तपास एन.आय.ए ने करावा हा आदेश आधीच दिलेला असताना ए.टी.एस नक्की कोणत्या अधिकारात तपास करत होते? १५ दिवस एटीएस वाले फक्त कारच शोधत होते ! त्या कुठे मिळाल्या ते आणि कोणी शोधल्या हे देखील आता सगळ्यांना ठावुक झाले आहे. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ASHRAFF - CHAIYYA CHAIYYA (VERSI INDONESIA) - OFFICIAL VERSION
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Fri, 03/26/2021 - 08:41 नवीन
माझ्या मते तरी वेळकाढुपणा करण्यासाठीच ए टी एस ला तपासाचे अधिकार दिले असावेत. प्रथम मुंबई पोलिसांनी "कार्यक्षमतेने" तपास करुन ठिकठिकाणचे डी व्ही आर वगैरे गायब केले, ईतरही अनेक पुरावे नष्ट केले असतील. मग ए टी एस तपासात घुसली आणि बरेच काहि केल्याचा आव आणुन वाझेला,शिंदेला वगैरे अटक करुन चौकशीचा फार्स केला. यात १०-१५ दिवस निघुन गेले, तोवर अनेक पुरावे कुजुन,जाळुन, किवा पैसे दाबुन नष्ट करायला वेळ मिळाला. शेवटी परमवीर् ने पोटावर पाय आल्याने थयथयाट चालु केला आणि सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. मला नाही तर कोणलाच नाही या न्यायाने त्याने सगळे पुरावे बाहेर काढायला सुरुवात केली त्यामुळे एन आय ए कडे प्रकरण देण्याशिवाय गत्यंतरच राहिले नाही. कारण तसे न केल्यास राज्य सरकारची भुमिका संशयास्पद ठरली असती. शिवाय केंद्रालाही या सगळ्या प्रकरणात रस असेलच (फडणवीसांनी या प्रकरणाचे पोटेन्शियल जाणले आहे) त्यामुळे "नि:पक्षपाती" चौकशी साठी एन आय ए ला पाठवले आहे असे वाटते. पण पूजा चव्हाण्,सुशांतसिन्ग आणि डेलकर प्रकरणाप्रमाणेच मनसुख प्रकरणही लवकरच दबणार की महाराष्ट्रात राजकीय भुकंप घडवणार हे पाहणे मनोरंजक ठरेल.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 03/26/2021 - 08:49 नवीन
पण mansukh ह्या प्राण्याची नक्की ह्या प्रकरणात भूमिका काय असावी असा प्रश्न एका पण व्यक्ती ल पडू नये ह्याचे आश्चर्य वाटत आहे Mansukh ल police शी दोस्ती करावी असे का वाटेत होते. वझे आणि mansukh ह्यांची जवळीक का होती. हा प्राणी नक्की काय धंदे करत होता की ते चालू राहण्यासाठी पोलीस ची मैत्री गरजेचे होते. ह्या mansukh वर सर्व तपास यंत्रणांनी लक्ष केंद्रित करावे. Mansukh च खरा गुन्हेगार किंवा bjp च गुलाम नाही ना. त्याचा तपास करावा. अर्णव,कंगना bjp ची गुलाम असू शकतात तर. Mansukh का नसेल.
  • Log in or register to post comments
र
रंगीला रतन Fri, 03/26/2021 - 08:56 नवीन
बरोबर आहे. तपासाला योग्य दिशा देण्यासाठी तुमची एन आय ए प्रमुखपदी नेमणूक करावी असा आदेश मी भारत सरकारला देत आहे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 03/24/2021 - 17:08 नवीन
Zee news,republic bharat, आज तक,सुदर्शन न्यूज ,bjp माझा, हे सर्व मीडिया ग्रुप हिंदू विरोधी आहेत. आणि जे हिंदू विरोधी मीडिया आहे त्यांचे मालक कट्टर हिंदू आहेत. मुस्लिम लोकांच्या ताब्यात एक पण न्यूज चॅनल नाही. एक पण मोठा न्यूज paper नाही. मग हिंदू विरोधी मीडिया कोण चालवत.
  • Log in or register to post comments
स
स्वलिखित Wed, 03/24/2021 - 18:31 नवीन
नाही म्हणजे Rajesh786 वैगेरे , आणि हो अजून एक , वयक्तिक न घेणे
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 03/24/2021 - 18:41 नवीन
काही गडबड नाही आयडी मध्ये. मी एक हिंदू असून हिंदू हित च सर्वोच्च स्थानी मानतो. पण देश हित ,राज्य हित सुद्धा तेवढेच महत्वाचे समजतो. पण हिंदू हित कशात आहे हे जे राजकीय पक्षांना वाटते ते मला वाटतं नाही. हिंदू आर्थिक बाबतीत समर्थ असावा. एकजूट असावी त्यांच्या मध्ये. शारीरिक आणि बौद्धिक क्षेत्रात तो अग्रेसर असावा. ह्या विचाराचा मी आहे. त्या साठी कोणते हिंदू वादी राजकीय पक्ष कार्य करत आहेत? पण राजकीय पक्षांचे हिंदू हित म्हणजे त्याने फक्त दुसऱ्या धर्माच्या लोकांच्या विरूद्ध भूमिका घ्यावी ह्या मध्ये असते .
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 03/24/2021 - 17:28 नवीन
आता एप्रिल महिना चालू आहे राज्य मधील धरणात किती पाणीसाठा आहे आणि पुढील तीन महिने तो पुरेल का ह्या विषयी विधान सभेत चर्चा होत नाही. शेती साठी पाणी पुरेल का ह्या विषयी विधानसभा आणि मीडिया मध्ये चर्चा होत नाही. Covid रुग्णांवर उपचार योग्य रिती नी होत आहेत का? बेड उपलब्ध आहेत का? ह्या विषयात मीडिया आणि विधान सभेत चर्चा होत नाही. मुंबई मध्ये विविध redevlopment प्रोजेक्ट पूर्ण झाले नाहीत . त्या विषयी मीडिया आणि विरोधी पक्ष सरकार ल धारे वर धरत नाही. ठाणे आणि परिसरातील क्लस्टर डेव्हलपमेंट ची योजना अजुन वेग पकडत नाही. त्या विषयात मीडिया आणि विरोधी पक्ष काही बोलत नाही. मेट्रो पूर्ण होणे ही मुंबई ची गरज असेल तर केंद्र सरकार नी किती वेळा राज्याच्या मुख्य मंत्री असलेल्या ठाकरे ना चर्चेचे निमंत्रण दिले? एकदा पण नाही . फक्त अडवणूक चालू आहे. शेतकरी,नोकरदार ह्यांचे पण प्रश्न आहेत. अनंत प्रश्न आहेत. आणि इथे आणि BJP, मीडिया ह्यांना फक्त. हसमुख . अंबानी . सुशांत . कंगना . वझे असेल अतिशय फालतू प्रश्न महत्वाचे वाटतं आहे. सामान्य लोकांना त्या मध्ये काडीचा इंटरेस्ट नाही. Bjp ल राज्य हित महत्वाचे नाही फक्त फालतू राजकारण करण्यात च त्यांना इंटरेस्ट आहे. चंपा,आणि फडणवीस BJP ल राज्यातून हद्ध पार नक्कीच करणार.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Wed, 03/24/2021 - 17:35 नवीन
बाकी प्रश्नांचे माहित नाही पण या प्रश्नाचे उत्तर मला वाटते आपल्याला काही वर्षांअगोदरच मिळाले आहे आणि ते अगदी लक्षात राहण्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/24/2021 - 17:44 नवीन
मागील वर्षी बरेच महिने बांधकामे, उद्योगधंदे, उपहारगृहे वगैरे बंद राहिल्याने पाण्याचा वापर खूप कमी झाला. त्यामुळे यावर्षी बहुतेक धरणात पाण्याचा भरपूर साठा शिल्लक आहे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 03/24/2021 - 17:47 नवीन
होणे ही देशाची गरज आहे पण त्या जनतेला फक्त भावनिक प्रश्नात गुंतवून सर्व राजकीय पक्ष स्वतःच्या नालायक राज्य कारभार वर कोणाचे लक्ष जावू नये ह्याची खबरदारी घेत आहेत. मीडिया कर mature असती तर ही ह्या trap मध्ये सापडली नसती पण मीडिया त्या कट कारस्थाने लपवण्यात च धन्यता मानत आहे. त्याची कारणं सरकारी वरद हस्त प्राप्त करणे आणि दुसरा हेतू कोणता. मीडिया हाऊस अजुन कोण कोणते व्यवसाय करत आहेत त्याची माहिती मिळाली की तो दुसरा हेतू पण स्पष्ट होईल. कशा साठी त्यांना सरकारी वरद हस्त हवा आहे.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Wed, 03/24/2021 - 18:15 नवीन
तुम्ही मीडिया काय दाखवतेय यावर विधानसभेत काय झाले हे ठरवताय का? एखादा प्रगल्भ नागरिक विधानसभेच्या वेबसाईट वर जाऊन गेल्या एक वर्षभरात विचारले गेलेले प्रश्न, तारांकित/अतारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना वगैरेची माहिती घेईल आणि मग दावे करेल.
  • Log in or register to post comments
स
स्वलिखित Wed, 03/24/2021 - 18:40 नवीन
https://www.opindia.com/2021/03/sita-road-in-pakistan-renamed-rehmani-nagar-post-partition/ योगी आदित्यनाथ यांनी जरा इकडे पण लक्ष देणे , हे एकच नव्हे अनेक उदाहरणे आहेत , पाकिस्तान मध्ये शहरांची आणि रस्त्यांची नावे बदलली आहेत , ना त्यांना कुठलाही इतिहास ना , आधार , अर्थात पाकिस्तान जन्माला आला तेव्हा पासूनच हि नावे बदलायला सुरुवात झाली , मग इकडे महाराष्ट्रात आणि भारतातच नाव बदलण्यासाठी ऐतिहासिक आधार आणि इतर गोष्टींची पूर्तता करावी अशी खाज का ? औरंगाबाद च संभाजीनगर करायला ऐतिहासिक आधार लागत होता म्हणे
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब Wed, 03/24/2021 - 19:05 नवीन
हे एकच नव्हे अनेक उदाहरणे आहेत , पाकिस्तान मध्ये शहरांची आणि रस्त्यांची नावे बदलली आहेत , ना त्यांना कुठलाही इतिहास ना , आधार , अर्थात पाकिस्तान जन्माला आला तेव्हा पासूनच हि नावे बदलायला सुरुवात झाली
, यात नवीन ते काय.. ज्यांनी आपले बाप बदलले, ज्यांनी तलवारी समोर आपली सलवार उतरवली, दुश्मनांची आणि आक्रमकांची मुंडकी छाटायची सोडून "दुसरेच" काहीतरी छाटले.. त्यांच्याकडून आणखीन काय अपेक्षा.. आयडेंटी क्रायसिस चे सर्वात बेस्ट उदाहरण म्हणजे पाकिस्तान... आणि त्यांचे इथे राहिलेले वंशज..!!
  • Log in or register to post comments
स
सुक्या Wed, 03/24/2021 - 20:36 नवीन
चालायचेच !! देश तशी संस्क्रुती ... म्हणजे बघा बर्‍याच देशात शिक्षा म्हणुन खुले आम मुंडके छाटतात. तसे आपणही करावे का? नाही ना? मग ईतर करतात म्हणुन आपणही केलेच पाहिजे का? आम्रविकेत कुठल्याही हायवे ला कुणाचेही नाव नाही. नंबर असतो. तसे आपणही करावे ... म्हणजे नामांतराचा प्रश्नच मिटला .. काय म्हणता ??
  • Log in or register to post comments
म
मनो Wed, 03/24/2021 - 23:20 नवीन
अमेरिकेत हायवेला नावे आहेतच, ती रोज वापरली जात नाहीत म्हणून लक्षात राहत नाहीत. उदाहरणार्थ आय-८८० ला Nimitz Freeway असे नाव आहे. तिथे असल्या गोष्टींच्या मागे फुकट वेळ खर्च करण्यापेक्षा कमीत कमी वेळात जास्तीत जास्त डॉलर कमविणे हेच अंतिम ध्येय असल्याने उगाच कुणी यासाठी आंदोलने करत बसत नाही. आर्थिक स्वातंत्र्य भारतात अजून मिळायचे आहे, ते जर मिळाले तर या सगळ्या गोष्टींची तीव्रता आपोआप कमी होईल.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Fri, 03/26/2021 - 08:41 नवीन
खरी शंका = आर्थिक स्वातंत्र्य यात काय अपेक्षित असते? अमेरिकेत कोणते आर्थिक स्वातंत्र्य आहे जे आपल्याकडे नाही? त्याने काही अडचणी निर्माण होतील का? (समाजाला किंवा राजकारणी लोकांना)?
  • Log in or register to post comments
स
साहना Fri, 03/26/2021 - 21:29 नवीन
आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे दोन व्यक्तींना सरकार च्या लुडबुडीशिवाय आर्थिक व्यवहार करण्याचे स्वातंत्र्य. मागील ३० वर्षांत अमेरिकेतील अर्थी स्वातंत्र्य बऱ्यापैकी कमी झाले असले तरी भारताच्या तुलनेत ऐरावत आणि गंगू तेल्याचे गाढव इतका फरक आहे. तुम्हाला जास्त माहिती हवी असेल तर तुम्ही हा रिपोर्ट पाहू शकता https://www.heritage.org/index/ एक सोपे उदाहरण पहा. अमेरिकी MRP नावाचा दळभद्री प्रकार नाही. तुम्ही तुमच्या मालकीची वस्तू तुम्हाला वाट्टेल त्या किमतीला विकू शकता. ह्या एका स्वातंत्र्याने ग्राहक आणि विक्रेता ह्यांचा फायदा होतो. वीज म्हणजे ऊर्जा क्षेत्र भारत सरकारने आपल्या ताब्यांत ठेवले. ह्याची परिणीती भारत मागासलेला राहण्यात झाली. ऊर्जा हा सर्व क्षेत्रांचा क्षेत्रांचा पाया असल्याने एकदा ह्या क्षेत्राचे बॉटल नेक झाले कि इतर सर्व क्षेत्रे मागे पडतात. १९५० मध्ये नेहरू सरकारने नवीन कपड्याच्या गिरणी निर्माण करण्यावर बंदी घातली. ह्याचा परिणाम म्हणून भारत जगाच्या तुलनेत वस्त्रोद्योगात खूपच मागे पडला. आज बांगलादेश आणि इंडोनेशिया आमच्या पुढे आहे. आर्थिक स्वातंत्र्य नसल्याने काय नुकसान होते सर्वांत चांगले उदाहरण म्हणजे APMC कायदा आणि त्यांतून झालेले शेतकऱ्यांचे नुकसान. आर्थिक स्वातंत्र्याने समाजाचा फायदा आणि राजकारणी मंडळींचे नुकसान होते. आर्थिक व्यवहारावर सरकारचा अंकुश असला कि सर्वांच्या शेंड्या राजकारणी मंडळींच्या हातात असतात त्यामुळे त्यांचा फायदा होतो.
  • Log in or register to post comments
स
साहना गुरुवार, 03/25/2021 - 01:01 नवीन
नावे असतात पेंसिफिक कोस्टल हायवे, सेंट्रल एक्सप्रेस वे. कोरियन मेमोरियल, डाल्टन हायवे इत्यादी. पण हि नवे विशेष महत्वाची नसतात. आकडे महत्वाचे. अमेरिकेतील रस्त्यांचे नंबर रँडम नसून त्याला अर्थ असतो, GPS आधी हे नंबर अत्यंत महत्वाचे असायचे. सम आकडा असेल तर इंटरस्टेट पूर्व पश्चिम म्हणजे आडवा जातो. विषम संख्या असेल तर उत्तर दक्षिण जातो. आकडा पूर्व पासून पश्चिम पर्यंत वाढत जातो. US १ अटलांटिक महासागराजवळ आहे तर us १०१ पश्चिम किनारपट्टीवर आहे. तीन आकडे असतील तर त्याचा अर्थ तो महत्वाचा रास्ता नसून एखाद्या महत्वाच्या रस्त्याला जोडणारा जोड रास्ता असतो. १०१ ह्याला एकमेव अपवाद आहे. त्यामुळे विना मॅप न वापरता आपण बऱ्यापैकी दिशा समजू शकतो.
  • Log in or register to post comments
स
साहना गुरुवार, 03/25/2021 - 01:02 नवीन
पाकिस्तानात हिंदू मंडळींना मुस्लिम लोकांइतकेच शाळा चालविण्याचे अधिकार आहेत. ते केले तरी मिळवली.
  • Log in or register to post comments
स
साहना Fri, 03/26/2021 - 04:57 नवीन
- हरप्पा मधील लोक त्या काली सुद्धा मल्टिग्रेन पौष्टिक लाडू खात होते असे निदर्शनास आले आहे. - सुएझ कालवा किमान आणखीन १ आठवडा तरी बंद राहणार आहे असे वाटते. जहाजाचे नाक जमिनीत घुसले आहे आणि इजिप्त मधील प्रत्येक ओढनौका हिला खेचण्यात गुंतली आहे. - दारू च्या व्यवसायातून सरकार बाहेर पडेल असा स्तुत्य निर्णय केजरीवाल ह्यांनी घेतला आहे त्याच बरोबर दारू विकत घेण्यासाठी वयोमर्यादा आता १८ असेल, २१ नाही. हा सुद्धा निर्णय स्तुत्य आणि बरोबर वाटतो. - महाराष्ट्रातील रिवर्स चाणक्य रामदास आठवले ह्यांनी राष्ट्रपती कोविंद ह्यांची भेट घेऊन महाराष्ट्रांत राष्ट्रपती राजवट लावण्याची विनंती केली. - मोदी ह्यांनी नेहमी प्रमाणे यु टर्न घेत दिल्लीला राज्य दर्जा देण्याऐवजी दिल्लीची स्वायत्तता काढून घेणारा कायदा पारित केला. माझ्या मते मोदी ह्यांचा हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे आणि लोकशाही विरोधी आहे. केजरीवाल हा माणूस कितीही नालायक असला तरी लोकशाही पद्धतीने निवडून आलेला आहे. मनीष सिसोदिया सारखे नेते किमान विनोद तावडे पेक्षा जास्त चांगले काम करत आहेत. - आदित्य ठाकरे ह्यांना एड्स झाला आहे अशी खोटी बातमी सोशल मीडिया वर पसरून बरीच मोठी खळबळ उडाली. पण हि बातमी TV९ च्या बातमीला एडिट करून पसरवण्यात आली आहे असे स्पष्टीकरण देण्यात आले. - ऑक्सफर्ड चे स्कॉलर अभिजित सरकार ह्यांनी हिंदू विरुद्ध गरळ ओकली आणि लहान असताना आपण कश्या प्रकारे सरस्वती देवीच्या मुर्त्या फोडत होतो हे त्यांनी सांगितले. त्याशिवाय ऑक्सफर्ड मधील एका हिंदू युवा विद्यार्थिनीला सुद्धा त्यांनी टार्गेट केले. ऑक्सफर्ड ने त्यांना हाकलून लावावे अशी मागणी अनेक हिंदू लोकांनी केली. (ज्या लोकांना स्वतः एखादे विद्यापीठ चालविण्याची लायकी नाही त्यांनी इतरांना सॅले देऊ नयेत असेच कदाचित ऑक्सफर्ड ह्या मंडळींना सांगेल) - ईयूटुब आसुसून प्रेरणा घेऊन केरोसीन लावून स्वतःचे केस सरळ करण्याच्या प्रयत्नात एका बारा वर्षीय विद्यार्थ्याने स्वतःला आग लावून घेतली. - मोदी सरकारच्या कृषी सुधारणांचा फायदा घेत अनेक भारतीय स्टार्टअप्स पुढे सरसावल्या आहेत. ह्या वर्षी एकूण २०० मिलियन डॉलर्स चे फंडिंग ह्यांनी मिळवले आहे. - भारतांत कोरोनाची दुसरी लाट (कि तिसरी) आली आहे हे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रांत रोग विशेष पसरला असून दिल्लीत सुद्धा रोगाने थैमान मांडले आहे. - शेतकऱ्यांचे आंदोलन फुस्स झाले असे असे वाटते. थोर शेतकरी नेत्यांनी बोलावलेल्या लुधियाना मधील कृषी महापंचायीतला ३००० हजार लोक सुद्धा आले नाहीत म्हणून वैफल्यग्रस्त होऊन पुन्हा पंजाब आणि हरियाणात कधीही पुन्हा महापंचायत घेणार नाही असे गुरनामसिंग चारुनि ह्यांनी सांगितले आहे. - शेतकऱ्यांनी २६ मार्च ला भारत बंद घोषणा केली आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 03/26/2021 - 05:21 नवीन
दिल्लीला राज्य दर्जा देण्याऐवजी दिल्लीची स्वायत्तता काढून घेणारा कायदा पारित केला. मुळात दिल्लीला राज्याचा दर्जा देणे हीच चूक आहे. कारण दिल्लीत देशाची आणि आंतराष्ट्रीय संस्था यांची सर्व महत्त्वाची/ मुख्य कार्यालये आहेत त्यामुळे त्या "राज्याचे" धोरण कायम केंद्र सरकारशी जुळणारे असणे आवश्यक आहे. उद्या महत्त्वाची आंतराष्ट्रीय अर्थशास्त्रीय परिषद होणार असताना केजरीवाल सारख्या टमरेल गँगच्या माणसाने १ लाख आंदोलनजीवींना आंदोलन करण्यास परवानगी दिली तर काय अनर्थ होईल हे लक्षात घ्या? उमर खालिद सारख्या अतिरेकी माणसावर दिल्ली मध्ये दंगे करण्याबद्दल UAPA सारख्या अत्यंत महत्त्वाच्या कायद्याखाली खटला भरण्याबद्दल केवळ परवानगी देण्यासाठी श्री केजरीवाल यांनी ३ वर्षे लावली. हा काही कोंबडी चोरीचा खटला नव्हता. दिल्लीतील सुरक्षा हि देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. अशा ठिकाणी श्री केजरीवाल सारखा बेभरवशी माणूस प्रमुख असणे हेच अत्यंत धोक्याचे आहे. दिल्ली हि केंद्र शासितच असावी असे माझे मत आहे आणि त्याला माझ्या बहुसंख्य लष्करी आणि नागरी मित्रांनी दुजोरा दिला आहे. लोकशाहीत अशा गोष्टी ज्याला रास्त मर्यादा (reasonable restrictions) म्हणतात, आवश्यक आहेत. उदा. लग्न करणे हा मूलभूत हक्क आहे. परंतु लष्करात २५ वर्षापर्यंत आपल्याला लग्न करता येत नाही आणि आपण केलेच तर आपल्याला सरकारी घर हक्क म्हणून मागता येत नाही. या रास्त मर्यादा (reasonable restrictions) घटनेशी सुसंगत आहेत हे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेले आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 03/26/2021 - 06:03 नवीन
मुळांत कुठल्याही राजधानीत, किमान माणसे असावीत... चाणक्यचे हेच मत होते आणि चीन मध्ये राजधानीच्या बाबतीत, हीच पद्धत होती... इतकेच कशाला? छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील, राजगड आणि रायगडावर, कमीतकमी राबता कसा राहील? ह्याचीच काळजी घेतली होती...
  • Log in or register to post comments
स
साहना Fri, 03/26/2021 - 07:59 नवीन
दिल्ली राजधानी असली तरी महत्वाचे शहर आहे आणि असंख्य लोक इथे राहतात. भारत सरकार कॅन्सर प्रमाणे वाढून अवाढ्यव्य झाले आहै ह्यांत त्यांची काही चूक नाही. सर्वच गोष्टी सरकारी सोयीने का बरे कराव्यात. पाहिजे तर असंख्य सरकारी खाती दिल्ली बाहेर हलवली जाऊ शकतात. काही प्रमाणात केंद्रीय सरकारला दिल्लीच्या रोजच्या गोष्टींत निर्णय क्षमता असली पाहिजे हा आपला मुद्दा पटतो पण मोदी सरकारचा कायदा त्या दृष्टीने अजिबात नाही. केजरीवाल सरकार कडून त्यांची निर्णय क्षमता काढून घ्यावी आणि त्यांच्या प्रत्येक प्रकल्पांत खो घालावा असा उद्धेश्य वाटतो. त्याशिवाय दिल्लीला संपूर्ण राज्याचा देण्याच्या मोदी ह्यांच्या आश्वासना पासून हा यू टर्न आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 03/26/2021 - 08:10 नवीन
दिल्लीला संपूर्ण राज्याचा देण्याच्या मोदी ह्यांच्या आश्वासना पासून हा यू टर्न आहे. केजरीवाल सारखा बेभरवशी माणूस दिल्लीचा मुख्यमंत्री होतो यानंतरच त्याचे तोटे काय आहे ते समोर आले आहेत. एखाद्या दहशतवादाला उघड समर्थन करणाऱ्या माणसावर खटला भरण्यासाठी तीन वर्षे थांबायला लागले तर दिल्लीची सुरक्षा कशी करणार हा फार मोठा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. बाकी दिल्लीची अर्धी लोकसंख्या तेथील केंद्रीय आणि परदेशी कार्यालये आणि त्याला अनुषंगिक सेवांसाठीच तर आहे तेंव्हा कार्यालये बाहेर हलवली तर हि लोकसंख्या सुद्धा तेथे हलवावी लागेल आणि केवळ नवी दिल्ली च्या ऐवजी अत्याधुनिक दिल्ली असे नामकरण सोडले तर पुन्हा तेच प्रश्न उपस्थित होतील.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 03/26/2021 - 09:38 नवीन
पाहिले तर दिल्ली जी देशाची राजधानी आहे तिची सीमा कोणत्या ह्या विषयी निर्णय घेता. अमुक इतके वर्ग फूट चे शहर जे दिल्ली आहे आणि ते शहर देशाची राजधानी आहे. हे ठरवल्या नंतर तो भाग पूर्णतः केंद्र शासित प्रदेश असलाच पाहिजे . विविध राज्यातील अन्याय ग्रस्त लोक तिथे प्रदर्शन करतात .. विविध राज्यातील महत्वाची लोक तिथे राहतात . त्या मुळे त्या भागात विशिष्ट राजकीय पक्ष ची सत्ता बिलकुल नको. एक स्वतंत्र संस्थेचे तिथे सरकार असावे. ते पक्ष विरहित असेल. इथपर्यंत ठीक आहे गुरगाव पासून नोएडा पर्यंत दिल्ली आहे. त्या लोकांचा स्वतःचे राज्य असावे ही अपेक्षा मोदी नाकारू शकत नाहीत .जरा स्वतःच्या बुध्दी नी मत व्यक्त करत जा
  • Log in or register to post comments
र
रंगीला रतन Fri, 03/26/2021 - 09:53 नवीन
बरोबर आहे. एक स्वतंत्र संस्थेचे तिथे सरकार असावे. तुमची ही मागणी मान्य करुन राष्ट्रपती सारखे राजधानीपती असे नवीन घटनात्मक पद निर्माण करुन त्यावर तहहयात तुमची नेमणूक करावी असा आदेश मी भारताच्या घटना समितीला देत आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 03/26/2021 - 09:45 नवीन
दिल्लीची अर्धी लोकसंख्या तेथील केंद्रीय आणि परदेशी कार्यालये आणि त्याला अनुषंगिक सेवांसाठीच तर आहे तेंव्हा कार्यालये बाहेर हलवली तर हि लोकसंख्या सुद्धा तेथे हलवावी लागेल आणि केवळ नवी दिल्ली च्या ऐवजी अत्याधुनिक दिल्ली असे नामकरण सोडले तर पुन्हा तेच प्रश्न उपस्थित होतील..... हा प्रयोग, इतिहासात करून झाला आहे.देवगिरीला, राजधानी करण्याचा....
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 03/26/2021 - 10:00 नवीन
त्या साठी दिल्ली च्या सीमा fix करा. सरकारी कार्यालय,मंत्र्यांचे निवास स्थान,विविध राज्याचे प्रती निधी,विविध देशाचे प्रतिनिधी . ह्यांचे निवड स्थान . ह्यांची हद्द fix करा. देश भरातील आंदोलक आंदोलन करून निषेध व्यक्त करू शकतील त्यांना जागा ध्या. आणि ह्या सर्व घटकांना सामावून घेईल ती देशाची राजधानी आणि ती स्वायत्त संस्थे च्या नियंत्रणात हवी . त्याचे सभासद सर्व राज्य असतील. केंद्र सरकार देशातील विविध राज्यांशी भेदभाव करते हे जग जाहीर आहे. आणि बाकी राहिलेला भू भाग हे स्वतंत्र राज्य असेलच पाहिजे
  • Log in or register to post comments
र
रंगीला रतन Fri, 03/26/2021 - 10:11 नवीन
बरोबर आहे. मुक्त विहारी तुम्ही वरील सर्व मागण्या मान्य करुन त्याप्रमाणे त्वरित कार्यवाही करावी असा आदेश मी तुम्हाला देत आहे :)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 03/26/2021 - 12:09 नवीन
आदेश मंजूर
  • Log in or register to post comments
स
स्वलिखित Fri, 03/26/2021 - 14:50 नवीन
यापूर्वीही जागा दिलीच होती ना , मग लाल किल्ल्यावर कशाला गेले होते हे लोक्स ?? झक मा... हे लोकसभेवर जात नाहीत , लोकसभेवर चाल करून जातात
  • Log in or register to post comments
स
साहना Fri, 03/26/2021 - 21:32 नवीन
> केजरीवाल सारखा बेभरवशी माणूस दिल्लीचा मुख्यमंत्री होतो यानंतरच त्याचे तोटे काय आहे ते समोर आले आहेत. होतो म्हणजे काय ? लोकांनी भरपूर मते घालून निवडून दिलाय. आपल्याला ना आवडणारी व्यक्ती निवडून येते म्हणून त्याच्या मुसक्या आवळ्यांसाठी कायदे पास करणे मला तरी बरोबर वाटत नाही (केजरीवाल हा अत्यंत नालायक माणूस आहे असे मला वाटत असले तरीही).
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 03/27/2021 - 04:49 नवीन
साहना ताई कोणत्याही नावडत्या व्यक्तीच्या मुसक्या आवळण्याबद्दल माझेही आपल्यासारखेच मत आहे केजरीवाल यांच्या बद्दल माझे जे मत आहे तेच श्रीमती ममता बॅनर्जी यांच्या बद्दल आहे. परंतु दोन्हीच्या भौगोलिक आणि राजकीय परिस्थितीत जमीन अस्मानाचा फरक आहे एवढेच लक्षात घ्या. तसे का आहे याचे मी आता विश्लेषण करत नाही( वर बऱ्यापैकी सांगितलेले आहेच.) बाकी मोदी रुग्ण हे असहिष्णुता लोकशाहीची गळचेपी इ मुद्द्यांचे वेळेस श्री केजरीवालांचेच उदाहरण देत असतात कारण ते सोयीचे आहे. पण त्यामागची पार्श्वभूमी गाळून टाकण्यास विसरत नाहीत
  • Log in or register to post comments
स
स्वलिखित Fri, 03/26/2021 - 07:58 नवीन
काय लावलय राव वर वाचायला तर दिसले पाहिजे का नको
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Fri, 03/26/2021 - 12:18 नवीन
माचो (macho man) मोदी यांची विजय यात्रा रोखणाऱ्या केजरीवालला धडा शिकवण्यासाठी दिल्लीतील फुकट्या लोकांनी निवडून दिलेले सरकारच्या मुसक्या आवळल्या आहेत. शिक्षण ,आरोग्य असल्या फालतू गोष्टीमध्ये अडकून राहिल्याने हे सरकार लोकांसाठी चांगले निर्णय घेत नव्हते. उद्या सगळी पोर उत्तम प्रकारे शिकली तर यात्रा मध्ये यांचे झेंडे घेऊन कोण नाचणार? म्हणून अत्यंत खुनशीपणे घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत ! मैदानात हरवता आले नाही म्हणून काय झालं? सत्तेचा गैरवापर करणार नाही तर आलमगीर मोदीशा कसले? मागच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने एल जी ला थांबवले होते तर या वेळी कायदाच बदलला ! आता न्यायालय घंटा काय करणार ??
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 03/26/2021 - 12:20 नवीन
सांगता येत नाही आणि सहनही होत नाही अशी अवस्था झाली असेल तर भेटा अथवा लिहा . . .
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Fri, 03/26/2021 - 13:01 नवीन
वैयक्तिक प्रतिसाद देऊ नये
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 03/26/2021 - 13:55 नवीन
सहमत आहे.... मतभेद असावेत, मनभेद नकोतच, पण मने जुळत नसतील तर, वैयक्तिक चिखलफेक नको... माझ्या कडून, तुमच्यावर, वैयक्तिक चिखलफेक झाली असल्यास, क्षमस्व...
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 03/26/2021 - 14:20 नवीन
खुनशी, आलमगीर मोदीशा, घंटा हे एखाद्याच्या संदर्भात वापरण्यासाठी सभ्य शब्द आहेत का?
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Fri, 03/26/2021 - 15:10 नवीन
ह्यातले काय तुम्हाला वैयक्तिकरीत्या म्हणले आहे ?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 03/26/2021 - 15:19 नवीन
मग मी तरी तुमचे नाव वापरले आहे का?
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Fri, 03/26/2021 - 16:07 नवीन
तुम्हाला पटत नसेल तर लिहीत जाऊ नका , मागच्या वेळीही तुम्हाला हेच सांगितले होते! आणि लिहिले तर कमीतकमी तेवढा प्रामाणिकपणा दाखवा. नाही लिहिले तर स्पष्ट लिहा की" वरील प्रतिसाद कपिलमुनी यांना नव्हता".. बघू काय निवडता
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा