Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ८)

स
साहना
Wed, 03/24/2021 - 05:04
🗣 193 प्रतिसाद
- आमची माणसं, आमची वसुली - वसुलीच्या बाबतीत दुबई ची मक्तेदारी मोडत मुंबई आत्मनिर्भर झाली आहे. त्याशिवाय खंडणी वसुली हा सरकारी व्यवसाय झाला आहे. - भारताने इंग्लंड चा पुन्हा एकदा क्रिकेट मध्ये धुव्वा उडवला. - फायजर आता तोंडाने घेणारी कोविड ची गोळी आणणार आहे (म्हणे). - आईसलॅन्ड मध्ये पुन्हा एकदा ज्वालामुखी उद्रेक झाला आहे. मागे एकदा असे घडले तेंव्हा ६ महिने विमानसेवा खंडित झाली होती. - सुएझ कॅनाल मध्ये एक महाप्रचंड बोट अडकली आहे आणि त्यामुळे हजारो बोटींचा ट्रॅफिक जॅम झाला आहे. - कंगना राणावत जयललिताच्या बायोपीक मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलर हल्लीच लाँच झाला आहे. - येथेच्छ खाऊन झाल्यानंतर पैसे मागितले म्हणून एक ढाब्यावाल्याला आणि त्याच्या ९ माणसांना उत्तर प्रदेश पोलिसांनी खोट्या चकमकीत गुंतवले. - मुंबई पुणे ची डेक्कन queen रेल्वेगाडी नव्या स्वरूपांत येणार आहे. - नांदेड येथे कोर्टाने एका बलात्कार्याला ६४ दिवसांत फाशीची शिक्षा सुनावली. - एका २२ वर्षीय मुलीने आपल्याच बापाला दारू पाजून जिवंत पेटवून दिले. बाप आपल्यावर लैगिक अत्याचार करत होता असा दावा तिने केला. - अधोवस्त्र आणि विग मध्ये लपवून काही कोटींचे सोने आणणाऱ्या लोकांना चेन्नई हवाई तळा वर पकडले. देशांत सोने आणणार्यांना शिक्षा करण्याच्या भारतीय सरकारच्या मूर्खपणाची किंवा आमच्यासारख्यानी केली. विरंगुळा म्हणून हे विस्मृतीत गेलेले गाणे : https://www.youtube.com/watch?v=eCpbYmO4Ndo

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 55650 views

🗣 चर्चा (193)
आ
आनन्दा Wed, 03/24/2021 - 06:07 नवीन
बऱ्याच घडामोडी झाल्यात!! बाकी गाणे संजूबाबाचे असल्याने आपला पास.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Wed, 03/24/2021 - 08:12 नवीन
धन्यवाद. उघडुन बघण्याचे कष्ट वाचले.
  • Log in or register to post comments
प
पिनाक Wed, 03/24/2021 - 10:08 नवीन
दाऊद ची गर्लफ्रेंड सुद्धा असल्याने आपला ही पास :-)
  • Log in or register to post comments
स
स्वलिखित Wed, 03/24/2021 - 06:15 नवीन
घडामोडीचा धागा काढावा तर असा , भरजरी , वाचायला हुरूप येतो , मग खाली काहीही धिंगाणा होऊ द्या
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Wed, 03/24/2021 - 06:26 नवीन
सुरुवात झाली पूजा चव्हाण प्रकरणाने. राठोड्च्या राजीनाम्यानंतर तो विषय शांत झाला नाही तोच डेलकर प्रकरण उपटले. पण ते पेट घेते आहे तोवर मनसुख हिरेन आणि वाझे प्रकरणाचा जो धुरळा उडलाय तो बसायलाच तयार नाही. पहीले मनसुख ची हत्या, पत्नीचे आरोप, मग वाझेने सी सी टि व्ही फूटेज्/डी व्ही आर गायब करणे, फडणवीसांनी रोज नवीन पुरावे आणणे, पोलिस खात्यात त्यांचा संभाव्य सोर्स कोण आहे ते शोधुन त्यांच्या बदल्या,मग ए टी एस आणि एन आय ए ची एंट्री, वाझेची चौकशी आणि अटक, अलिशान गाड्या, परमबीर सिंगचे आरोप, देशमुखांचे १०० कोटिंचे टार्गेट, पवारांची क्लीन चीट,गुजरातचा बिल्डर आणि बुकि यांचा सहभाग, पॅरोलवर सुटलेल्या पोलिस शिपायाचा सहभाग, एका दिवसात ७०-८० अधिकार्‍यांच्या बदल्या डोकेच गरगरु लागलेय. सिंहासन चित्रपटात निळु फुलेची शेवटी जी अवस्था होते तसे काहिसे. कोण कोणासाठी काय डाव टाकतेय आणि त्यात कोणाचा फायदा आहे काहीच समजत नाहिये.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Wed, 03/24/2021 - 07:48 नवीन
कोण कोणासाठी काय डाव टाकतेय आणि त्यात कोणाचा फायदा आहे काहीच समजत नाहिये. तीच गोची झाली आहे. नेमका डाव कोणी टाकलाय आणि कोण कोणाचा गेम करतेय काहीच कळेनासे झाले आहे. मनसुख प्रकरण चलू होते तोपर्यंत भाजप शिवसेनेचा गेम करतेय असे वाटत होते.. पण परमवीर सिन्ग नी कोर्टात जाऊन या प्रकरणात प्रचंड गुन्ता करून ठेवला आहे. आता कोण कोणचे पाय ओढतंय काहीच कळेना झालंय :(
  • Log in or register to post comments
स
साहना Wed, 03/24/2021 - 08:25 नवीन
मला वाटते हा रॉकी ३ प्रमाणे सामना आहे. सर्वच मंडळी घाणेरडी आणि भ्रष्ट आहेत आणि प्रत्येकाचे आपले सापळे आणि प्यादी आहेत. माझ्या मते जनतेने आगीत भरपूर घी ओतून मजा घ्यावी. तक्षकाय स्वाहा आणि इंद्राय स्वाहा न्यायाने. जितके भ्रष्ट लोक ह्या प्रकरणात अडकून राजकारणातून बाहेर पडतील तितके चांगले.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/24/2021 - 08:49 नवीन
कोण कोणासाठी काय डाव टाकतेय आणि त्यात कोणाचा फायदा आहे काहीच समजत नाहिये. माझ्या मते काका जबरदस्त डाव खेळताहेत. काकांनी मोदींसकट सर्वांना धोबीपछाड दिला आहे. आधी महाराष्ट्रात डील करण्यासाठी २९ ऑक्टोबर २०१९ ला काका दिल्लीत जाऊन मोदी-शहांचा भेटले. महाराष्ट्रात अडीच वर्षे सुप्रिया मुख्यमंत्री, निम्मी मंत्रीपदे, केंद्रात २ मंत्रीपदे या बदल्यात महाराष्ट्रात पाठिंबा हे डील मोदी-शहांनी फेटाळल्यानंतर काकांनी उद्धवला हाताशी धरले. कॉंग्रेस शिवसेनेला पाठिंब्यासाठी तयार नव्हती. सेना सुद्धा चाचरत होती. राष्ट्रपती राजवट उठण्याची चिन्हे नव्हती. या दोन्ही पक्षांवर दबाव आणण्यासाठी काकांनी अजित पवारांना फडणवीसकडे पाठवून राष्ट्रपती राजवट उठवायला लावली. फडणवीस-अजित पवार शपथविधी झाल्यानंतर अपेक्षेप्रमाणे कॉंग्रेस व सेना डेस्परेट होऊन एकत्र येण्यासाठी तयार झाले. लगेच काकांनी अजित पवारांना बाहेर काढून फडणवीसांना घरी पाठविले. दोन दिवसात नवीन सरकार स्थापन झाले. त्यात राष्ट्रवादीला गृह, अर्थ, सार्वजनिक बांधकाम अशी महत्त्वाची मंत्रीपदे मिळाली आणि सर्व निर्णय काकाच घेताहेत. पवारांच्या गुगलीवर फडणवीस, मोदी व शहा एकाच चेंडूवर बाद झाले. आता काका भाजप व सेनेला उचकवून त्यांच्यातील दरी वाढवित आहेत. आता ते दोघे परत एकत्र येणार नाहीत याची खात्री झाल्यानंतर राष्ट्रवादी सरकारमधून बाहेर पडेल व मुदतपूर्व निवडणुक घ्यायला लावेल. कॉंग्रेस व राष्ट्रवादी एकत्र निवडणुक लढतील. भाजप व सेना स्वतंत्र लढतील ज्यात दोघांचाही पराभव अटळ आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/24/2021 - 08:53 नवीन
त्यात भर म्हणून अजित पवारांनी जलसंधारण घोटाळ्यात फडणवीसांकडून क्लीन चिट मिळविली. अजित पवारांना मांडीवर घेतल्याने फडणवीसांचं तोंड कायमचं काळं झालं आणि भाजपचेच समर्थक नाराज झाले हा अजून एक बोनस.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 03/24/2021 - 10:14 नवीन
हे क्लीन चीट प्रकरण जरा उलगडून सांगाल काय? (कायप्पावरून माहिती घेतली असेल तर नको.)
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/24/2021 - 11:55 नवीन
- २३ नोव्हेंबर २०१९ ते २६ नोव्हेंबर २०१९ या काळातील औटघटकेच्या सरकारमध्ये फडणवीस मुख्यमंत्री व अजित पवार उपमुख्यमंत्री. - २५ नोव्हेंबर २०१९ या दिवशी अजित पवारांचा सहभाग असलेली ९ जलसंधारण घोटाळा प्रकरणे भ्रष्टाचारविरोधी आयोगाने बंद केली. योगायोगाने या आयोगाचे अध्यक्ष परमबीर सिंह होते. - ही प्रकरणे बंद झाल्यानंतर कॉंग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी फडणवीसांवर कडाडून टीका केली होती. आता प्रियंका चतुर्वेदी शिवसेनेच्या खासदार आहेत आणि अजित पवार उधोजींच्या मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्री आहेत. - २८ नोव्हेंबर २०१९ या दिवशी उधोजी मुख्यमंत्री झाले व अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. ६ डिसेंबर २०१९ या दिवशी जलसंधारण घोटाळ्यांच्या अजून काही प्रकरणात अजित पवारांना क्लीन चिट मिळाली. पुन्हा एकदा परमबीर सिंह. - आता परमबीर सिंह शिवसेना व राष्ट्रवादीसाठी खलनायक झाले आहेत. एकंदरीत भाजप व शिवसेना या दोघांच्या साठमारीत खरे लाभार्थी ठरले अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 03/24/2021 - 12:35 नवीन
अहो, हे फक्त आरोप आहेत. वर्तमानपत्रे, टीव्ही वगैरेवर आरोप प्रत्यारोप चालतात तेच परत वाचण्यात काही रस नाही. मी विचारतो आहे की, क्लीन चीट दिली म्हणजे नक्की काय केले? त्याचा काही दुवा आहे का? अशी क्लीन चीट देण्याची पध्दत काय असते? ती पध्दत किती कायदेशीर असते? माहीती नसेल तर राहू दे. पण तुम्ही हा आरोप बर्‍याच वेळेस केला असल्याने तुमचा विशेष अभ्यास या विषयावर असावा असे वाटल्याने विचारले. पण हा म्हणाला, तो म्हणाला असं वरवरचं नको.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/24/2021 - 12:38 नवीन
पूर्वी अनेकदा सांगितले आहे. अग अग म्हशी . . . असे न करता स्वतः शोध घ्यावा. ते करायचे नसेल तर ...!
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 03/24/2021 - 13:04 नवीन
एकंदरीत तुमची माहीती ऐकीव दिसते आहे. 😉 ओके. आता शोधा शोध करायलाच लागेल असे वाटतेय. माझ्या माहिती प्रमाणे हे प्रकरण हाय कोर्टात आहे. त्यामुळे कोणीही अशी क्लीन चीट देऊ शकत नाही. नक्कीच काहीतरी अर्थाचा अनर्थ करायचा प्रयत्न दिसतोय. काही ठोस माहिती मिळाली तर लिहीनच. असो. 😀
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/24/2021 - 13:59 नवीन
माझी माहिती ऐकीव वाटत असेल तर माझे प्रतिसाद वाचण्याचे व त्यावर उत्तर देण्याचे कष्ट घेऊ नयेत.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 03/24/2021 - 14:08 नवीन
मला माहिती मिळाली व ती तुमच्या माहितीशी जुळणारी असेल तर मी तसे जरूर सांगेन. पण जर ती जुळली नाही तर मी ती इथे मांडेन. कोणाची माहिती खरी मानायची ते वाचक ठरवतीलच. माझा हेतू दोन्ही बाजू वाचकांसमोर याव्यात एवढाच असेल. त्यात कोणाची बाजू घ्यावी असा हेतू नसेल. पुढच्या निवडणुकीत कोणाला मत द्यावं हे ठरवायला लोकांना मदत व्हावी असा या मागचा विचार आहे. असो. 😀
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/24/2021 - 14:15 नवीन
म्हणजे तुमच्याकडे माहिती नाही. मग माझी माहिती ऐकीव हा निष्कर्ष कसा काढला? असो.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Wed, 03/24/2021 - 14:19 नवीन
ज्या ९ केसेस बंद केल्या गेल्या होत्या त्या पवारांशी निगडित नव्हत्या हे अधिकृत स्पष्टीकरण सीबीआय ने तेव्हाच दिलेले असताना तूम्ही कुठल्या आधारावर असे आरोप करत आहात हे विचारले तर तुमचं तुम्ही शोधा असे म्हणणे फक्त ट्रोल लोकांना शोभते. अशावेळी आपण ट्रोल आहोत असं मान्य केलं की पुढे असे प्रतिसाद टाकताना कसं मोकळं मोकळं वाटतं. अभ्यासू लोकांकडून ट्रोलगिरी अतिशय खेदजनक असते. https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/crime/acb-closes-nine-irrigation-cases-no-clean-chit-for-ajit-pawar/articleshow/72224521.cms
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/24/2021 - 14:27 नवीन
यात सीबीआय कोठून आलं? महाराष्ट्र राज्य अधिकारांतर्गत असलेल्या Anti Corruption Beauro ही प्रकरणे बंद केली आहेत. अर्थात २३ नोव्हेंबर २०१९ ते २६ नोव्हेंबर २०१९ या काळात फडणवीस-अजित पवार सत्तेत असणे आणि याच ३ दिवसांच्या काळात २५ नोव्हेंबर २०१९ या दिवशी प्रकरणे बंद करणे हा निव्वळ योगायोगच! नाही का?
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Wed, 03/24/2021 - 14:39 नवीन
चुकून सीबीआय लिहिले, मला एसीबीच म्हणायचे होते. ********** त्या केसेस शी पवारांचा संबंध नव्हता असे एसीबी ने स्पष्ट केलेले असताना तुम्ही तो दावा कशाच्या आधारावर करत आहात हा मुळ प्रश्न आहे. एसीबी ने असेही म्हटल्याचे आठवते की ही प्रकारणे सहा महिन्यांपूर्वी तपासानंतर पुरावे न आढळल्याने क्लोजर साठी आली होती आणि पुढच्या प्रोसेस नंतर ती बंद करण्यात आली. त्याची लिंक सापडली तर इथे टाकतो, पण कृपया मूळ मुद्द्याला बगल न देता, ती प्रकरणे पवारांशी निगडित होती हया दाव्याचा स्रोत काय आहे हे सांगावे. ********** तुम्ही म्हणताय की खूप प्रकरणे होती, तर त्यातली फक्त ९ आणि तीही निगडित नसलेली बंद करणे ही सत्तेसाठी असलेली डिल होती असे आपल्याला म्हणायचे आहे का?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/24/2021 - 15:19 नवीन
त्या केसेस शी पवारांचा संबंध नव्हता असे एसीबी ने स्पष्ट केलेले असताना तुम्ही तो दावा कशाच्या आधारावर करत आहात हा मुळ प्रश्न आहे. एसीबी राज्य सरकारच्या म्हणजेच मुख्यमंत्र्यांच्या नियंत्रणात असते. २३ नोव्हेंबर २०१९ ला फडणवीस-पवारांनी शपथ घेणे आणि २ दिवसात २५ नोव्हेंबर २०१९ ला एसीबीने सिंचन घोटाळ्यांची काही प्रकरणे बंद करणे हा योगायोगच! नाही का? तुम्ही म्हणताय की खूप प्रकरणे होती, तर त्यातली फक्त ९ आणि तीही निगडित नसलेली बंद करणे ही सत्तेसाठी असलेली डिल होती असे आपल्याला म्हणायचे आहे का? फडणवीस हातातील सर्व हुकुमाची पाने एकदम टाकून देण्याइतके दुधखुळे नाहीत.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Wed, 03/24/2021 - 15:30 नवीन
परत मुद्द्याला बगल मिळाली आहे. सिंचन घोटाळ्याची बंद झालेली प्रकरणे पवारांशी निगडित होती हा दावा कुठल्या आधारावर? आणि जर ती निगडित नसतील तर मग बंद झाली काय आणि उघडी राहिली काय त्याचा सरकार स्थापन करण्याशी काय संबंध? संबंधित नसलेली प्रकरणे सरकारस्थापणेसाठी बंद करून घेणे हा योगायोगच, नाही का? ती प्रकरणे अनेक महिन्यांच्या प्रोसेसिंग नंतर बंद करण्यात आली होती हा मुद्दा तूर्तास बाजूला ठेवू. ************ याव्यतिरिक्त राजकारणात बहुमत सिद्ध केल्याशिवाय असले निर्णय घेता आले असते का/घेतले असते का हा वेगळा मुद्दा. तूर्तास तुमचा दावा सिद्ध करणारा स्रोत सांगितला तर फडणवीसांचा/भाजपचा निर्णय चुकीचाच नव्हता तर प्रमाणाच्या बाहेर चूकीचा होता हेच अधोरेखित होईल. पण तरीही ती क्रियेला प्रतिक्रिया होती हे नजरेआड करून चालणार नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/24/2021 - 16:22 नवीन
सिंचन घोटाळ्याची बंद झालेली प्रकरणे पवारांशी निगडित होती हा दावा कुठल्या आधारावर? सिंचन घोटाळा प्रकरणात अजितदादा चक्की पिसायला तुरूंगात जाणार हे आश्वासन फडणवीसांनी ज्या आधारावर दिले होते किंवा सिंचन घोटाळा प्रकरणात अजितदादांना केव्हाही अटक होऊ शकते हे रावसाहेब दानवेंनी ज्या आधारावर सांगितले होते, त्याच आधारावर. याव्यतिरिक्त राजकारणात बहुमत सिद्ध केल्याशिवाय असले निर्णय घेता आले असते का/घेतले असते का हा वेगळा मुद्दा. असले निर्णय घेण्यासाठी फक्त पदावर असणे आवश्यक आहे. त्यासाठी बहुमताची अजिबात गरज नाही. ही घटनात्मक माहिती आपल्याकडे दिसत नाही.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Wed, 03/24/2021 - 16:37 नवीन
थोडक्यात काय नुसताच हवेत गोळीबार करत आहात. ती प्रकरणे त्यांच्याशी संबंधित नव्हती हे एसीबीने अधिकृतरित्या सांगितलेले असतानाही आणि तुमच्याकडे कुठलाही स्रोत नसताना तुम्ही खोटे दावे तुमचा फडणवीसविरोध कुरवाळण्यासाठी करत आहात असा साधारणपणे अर्थ निघतोय. हे दावे समाज माध्यमांमधून चालणाऱ्या ट्रोलिंग पेक्षा वेगळे ठरत नाहीत. त्यामुळे, तुमचे ट्रोलिंग चालुद्या! **********
ही घटनात्मक माहिती आपल्याकडे दिसत नाही<./blockquote> मी पुरावा नसलेला दावा नाही केला, प्रश्न विचारला, शंका बोलून दाखवली. 'करता येते का' हा त्यातला एक भाग होता, 'केले असते का' हा दुसरा.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/24/2021 - 17:41 नवीन
थोडक्यात काय नुसताच हवेत गोळीबार करत आहात. म्हणजे फडणवीस आणि दानवे सुद्धा हवेत गोळीबार करीत होते ना? ती प्रकरणे त्यांच्याशी संबंधित नव्हती हे एसीबीने अधिकृतरित्या सांगितलेले असतानाही एसीबीचे नियंत्रण कोण करते हे माहिती नाही? बरोबर २५ नोव्हेंबर २०१९ ला, फडणवीसांंच्या औटघटकेच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातच, हा साक्षात्कार एसीबीला झाला हा योगायोगच आहे. नाही का? तुमच्याकडे कुठलाही स्रोत नसताना तुम्ही खोटे दावे तुमचा फडणवीसविरोध कुरवाळण्यासाठी करत आहात असा साधारणपणे अर्थ निघतोय. फडणवीस व दानवे जे अधिकृतपणे सांगत होते तो स्त्रोत नाही? मग ते खोटे आरोप करीत होते का? मी लिहितो ते ट्रोलिंग आहे असा गैरसमज होत असेल तर माझे प्रतिसाद वाचण्याचे व त्यावर उत्तर देण्याचे वृथा कष्ट घेऊ नये.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Wed, 03/24/2021 - 18:05 नवीन
फडणवीस, दानवे, मोदी, शहा याला अटक करू त्याला अटक म्हणत असतात तेव्हा ते काही कोर्टाचो ऑर्डर हातात घेऊन बोलत नसतात. त्यांचे ते आरोप असतात. कोणालाच जेल मध्ये टाकण्याचा अधिकार त्यांना नसतो हे तुमच्यासारख्या अभ्यासू माणसाला माहीतच असेल. त्यामुळे तयच फडणवीस, दानवे, मोदि शहा हे सर्व दावे करत असतात पोकळ की कसे ते कोर्ट आणि काळ ठरवते. राममंदिर, ३७० हे भाजप चे हवेत गोळीबार म्हणणारे आज शांत आहेत. ************ एसीबीने त्या केसेस संबंधित नव्हत्या म्हटल्यावर, एकानेही खरेच त्या होत्या का हे जाऊन नाही पाहिले. तशी गरज वाटली नसणार. ज्याला संशय आहे अशा एखाद्याने एखादा स्रोत वापरून ही माहिती नसती वाटतं काढली, योगायोगच! ************ हो खरंय, ट्रोलिंग आणि अंधविरोधी भूमिकेमुळे, माझ्याबाजूने पूर्णविराम.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/24/2021 - 18:44 नवीन
फडणवीस, दानवे, मोदी, शहा याला अटक करू त्याला अटक म्हणत असतात तेव्हा ते काही कोर्टाचो ऑर्डर हातात घेऊन बोलत नसतात. त्यांचे ते आरोप असतात. या आरोपांना काही आधार होता का? जर असेल तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. जर नसेल तर त्यांनी खोटे आरोप करून जनतेला खोटी आश्वासने देऊन फसविले हे सिद्ध होते. स्वतःच्या प्रश्नाचे उत्तर स्वत:च शोधल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Fri, 03/26/2021 - 03:42 नवीन
https://www.loksatta.com/vishesh-news/article-on-make-the-right-choice-in-the-police-force-by-julio-ribeiro-abn-97-2429354/ दरम्यान परमबीर यांना फडणवीसांनी ‘भ्रष्टाचारविरोधी विभागा’चा कार्यभार सुपूर्द केला. अजित पवार यांच्यावरील ‘सिंचन घोटाळ्या’चे सारे आरोप मागे घेऊन त्यांना दोषमुक्त करण्यात आले, ते याच दरम्यानच्या काळात… आणि राजभवनातील एका खोलीत ‘पहाटेचा शपथविधी’ झाला, तोही याच कालखंडात. माजी पोलीस आयुक्त.( मुंबई )
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 03/26/2021 - 05:45 नवीन
आसं काही झालंच नव्हतं असे येथील काही फडणवीस अंधभक्त सांगत आहेत. हा आरोप म्हणजे फडणवीसांविरूद्ध ट्रोलिंग आहे असाही निष्कर्ष एका फडणवीस अंधभक्ताने काढला आहे. या न्यायाने आता ज्युलियस रिबेरो सुद्धा ट्रोल ठरतात. असो. फडणवीसांनी आयुष्यात एकही चूक केली नाही, करणार नाहीत व त्यांनी आयुष्यात एकही अयोग्य निर्णय घेतला नाही व घेणार नाहीत, अशी माझी खात्री पटली आहे.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Fri, 03/26/2021 - 11:16 नवीन
मंदभक्त फक्त पुराव्यापासून पळतात, मग तो अंधविरोध मोदींबाबतीत असो मी फडणविसांबाबतीत! दोषमुक्त केले याला पुरावा काय याचे उत्तर अजूनपर्यंत न देता वायफळ वाफ दवडण्यात काही लोकांना आनंद असतो! हरकत नाही. ************ मंदभक्तांची अजून एक मजा समाजमाध्यमांवर चालू आहे. हे आयुक्त अगदी काही महिन्यांपूर्वी अर्णबच्या मागे लागले होते तेव्हा ते गोड होते, तेव्हा त्यांचे बोलावते धनी आठवत नसतील, आता आठवत आहेत. ************ इथलेच काही जुने लेख काढून वाचले तरी कळेल की अंधभक्त म्हणजे काय:)
  • Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख Tue, 03/30/2021 - 10:47 नवीन
पवार प्रकरणात सत्तेसाठी त्यांनी ह्या तपासाला क्लिन चीट नव्हे तात्पुरती स्थगिती दिल्याचे वाचले आहे..
  • Log in or register to post comments
र
रंगीला रतन Wed, 03/24/2021 - 12:59 नवीन
त्या घोटाळ्यात नेमकी किती प्रकरणे आहेत? की ९+अजून काही प्रकरणे = सगळी प्रकरणे? https://www.bbc.com/marathi/india-46112145 इथे काही माहिती मिळाली पण नक्की प्रकरणे किती त्याचा स्पष्ट उल्लेख नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/24/2021 - 14:07 नवीन
बरीच प्रकरणे आहेत. आम्ही सत्तेवर आल्यानंतर अजित पवारांना चक्की पिसायला तुरुंगात पाठविणार, असे महाराष्ट्रातील एक अत्यंत स्वच्छ व कार्यक्षम नेते काळी पाच पट्टीत जाहीररीत्या म्हटले होते. ती चित्रफीत उपलब्ध आहे. (पण ही ऐकीव माहिती बरं का). सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार आणि इतर आरोपींना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते असं विधान भाजपचे रावसाहेब दानवे यांनी नोव्हेंबर २०१८ मध्ये केलं होतं. (ही पण ऐकीव माहिती बरं का).
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/24/2021 - 14:21 नवीन
एकूण २००+ लहानमोठे सिंचन प्रकल्प व संबंधित जवळपास ३००० निविदा संशयास्पद आहेत.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 03/24/2021 - 14:10 नवीन
तेच तर पहायला पाहिजे. गुरूंजीनी फडणवीसांविरूध्द खूपच आरोप केले आहेत. त्यामुळेच मी जास्ती खोलात जातो आहे. यात नक्की खरं काय आहे हे ते कळावे एवढाच उद्देश आहे. त्यामुळे गुरूजींचे आभारच मानले पाहिजेत.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Wed, 03/24/2021 - 14:45 नवीन
श्रीगुरुजी, आपले पुर्वीचे प्रतिसाद आणि आत्ताचे प्रतिसाद यात बराचसा वेगळेपणा जाणवतो. कदाचित तो भाजपा च्या चुकीच्या रणणितीवरील रागावरुन असावा. अर्थात पक्षाच्या तहहयात समर्थकास असे रागवायचा पुर्ण अधिकार आहे. असो ! मला वाटते की सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात कितीही घडामोडी घडल्या तरी सरकार काही पडणार नाही. त्याची कारणे माझ्या अंदाजाप्रमाणे खालीलप्रमाणे. १. शिवसेनेस राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपद मिळत आहे. भविष्यात ते मिळेलच किंवा निदान सत्तेत तरी बसता येईल का याची आजमितिस खात्री देता येत नाही. त्यामुळे काहीही करुन ५ वर्षांचा कार्यकाल पुर्ण करणे हेच त्यांच्या हिताचे राहिल. शिवाय मुख्यमंत्री अननुभवी असले तरी त्यांनी याप्रसंगी धारण केलेले मौन पाहता ते म्हणावे इतके नवखे राजकारणी आहेत असे वाटत नाही. त्यांचे हे मौन त्यांना कदाचित या प्रसंगांमधून तारुन नेईल. २. राष्ट्रवादी सत्तेत असली आणि त्यांच्याकडे महत्वाची पदे असली तरी अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी असे दोन प्रवाह निर्माण झाले आहेत. यातील मुख्य शरद प्रवाह आज शक्तीमान असला तरी तो या वादग्रस्त घडामोडींमुळे उत्तरोत्तर क्षीण होत जाऊ शकतो. कदाचित अजित पवार त्यामुळेच हिरहिरीने पक्षाची / सरकारची बाजू मांडायला पुढे येत नाहित. मात्र भाजपाचे बहुमताचे सरकार सोडून इतर कोणत्याही प्रकारची सत्त्तास्थापना झाली तरी राष्ट्रवादी त्यातील महत्वाची पदे मिळवील हे निश्चित. किंबहुना राष्ट्रवादी हा कोणत्याही एका ठराविक राजकीय विचारसरणीचा पक्ष नसून सत्ता हवी असणार्‍या आणि राबवू श़कणार्‍या शक्तीमान, संपत्तीमान व्यक्तींचा एक गट आहे. मग ही पदे एकतर राष्ट्रवादीच्या चिन्हावर मिळविली जातील किंवा वेळ पडली तर इतर पक्षांच्या चिन्हावर लढून मिळविली जातील. परवाच शरद पवारांनी सध्याच्या प्रकरणांची जुलियो रिबेरोंसारख्या व्यक्तीची समिती नेमून चौकशी करावी असे पत्रकार परिषदेत म्हटले. मात्र अनेक पावसाळे पाहिल्यावर वयाच्या ९०/९१ वर्षी पवारांसारखे पुन्हा पावसात भिजून लोकप्रिय होणाच्या रिबेरोंना कंटाळा आला असावा अथवा त्यांच्याकडे तितकासा जोम राहिला नसावा त्यामुळे त्यांनी या मागणीला समर्थन दर्शविलेले नाही. ३. काँग्रेस ला तर काहिही करुन सत्तेत राहणे गरजेचे आहे. आता नजीकच्या काळात कोणताही चमत्कार त्यांना एकट्याला सत्तेत आणू शकत नाही. महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीणीमधे मोठे फेरबदल केल्यामुळे पक्षाला काही उभारी मिळतेय असे सध्या तरी वाटत नाहीये.सोनिया गांधींची तब्येत आता साथ देत नाहीये त्यामुळे पक्षाला एका नवीन प्रेषीताची गरज आहे. तोपर्यंत जुन्या कराराचा आधार घेऊन चालण्याशिवाय गत्यंतर नाहिये. ४. परत निवडणूक झाली तरी भाजपा लगेच एकट्याच्या जोरावर सत्ता स्थापन करु शकत नाही. शिवाय सेना आणि अजित पवार नामक दोन्ही मोर्‍यांमधून आता बरेचसे पाणी वाहून गेले आहे . त्यामुळे राज्यात आता निवडणूक झाली तरी आता आहे त्यापेक्षा जास्त चिखल निर्माण होईल. मात्र प्रत्येक चिखलात कमळ फुलेल असे नाही. शिवाय जनतेची स्मरणशक्ती फार तोकडी असते असे म्हणतात तेव्हा आताच्या उपद्व्यापांचा २०२४ ला फायदा / तोटा होईलच असे नाही. त्यामुळे भाजपाने सध्या जैसे थे राहावे हेच उत्तम. मात्र त्याचवेळी देशात इतरत्र आपली शक्ती वाढवत राहावी हे उत्तम. सध्या बंगाल / आसाम मधे त्याचाच अभ्यास चालू आहे असे वाटते. शिवाय भाजपाने आता हळूहळू दक्षिणे कडे लक्ष देऊन तिकडे आपला टक्का हळूहळू का होईना वाढवत नेला पाहिजे. प्रादेशिक अस्मितेचे राजकारण करण्याचे दिवस हळूहळू संपत चालले आहेत आणि दक्षिण देखील त्याला फार काळ अपवाद राहणार नाहिये . ५. राष्टपती राजवट : यात भाजपाला जास्त नुकसान आहे. मात्र राष्ट्रपती राजवट लागली की इतर पक्षांना भाजपाच्या नावाने शिमगा करता येईल, जनतेवर अन्याय झाला अशी सामान्यांची भावना होऊ शकते. आणि याचा फायदा इतर पक्षांना जास्त होईल. त्यामुळे सध्याचे सरकार चालू देणे, त्यांच्या चुका दाखवत राहणे मात्र सरकार कोसळेल इतपत न ताणणे हेच सगळ्या पक्षांच्या दृष्टीने हितावह आहे. २०२४ मधे सगळ्यांनीच सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत, काहिंना जर सत्तेचा हिरवा चारा परत मिळणार नसेल दुसर्‍या गोठ्यात जाऊन राहणे, तेही शक्य नसेल तर निदान वैरण / कडब्याची होता होईल तेव्हढी सोय करुन ठेवावी. शेवटी कधी ना कधी हिरवा चारा मिळेल या आशेवर दिवस ढकलावेत हेच श्रेयस्कर असेल. मिपाचा मंच हा महाराष्ट्राचा छोटा का होईना आरसाच आहे. इथे वाहणार्‍या वार्‍यांचा अंदाज बर्‍यापैकी योग्य प्रमाणात येतो. त्यामुळे आपले फडणविसांवरील मत लक्षात घेतले तरी अजून त्यांनी तेवढासा जनाधार गमाविलेला आहे असे वाटत नाही. अर्थात माझा अंदाज हा फक्त अंदाज आहे. तुमचा राजकारणाचा अभ्यास माझ्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे तुम्ही जास्त बरोबर ठरण्याची शक्यता देखील आहेच.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Wed, 03/24/2021 - 15:45 नवीन
उत्कृष्ट प्रतिसाद
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/24/2021 - 16:12 नवीन
मला वाटते की सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात कितीही घडामोडी घडल्या तरी सरकार काही पडणार नाही हे सरकार जास्तीत जास्त अजून एक वर्षे टिकेल. योग्य वेळी राष्ट्रवादी पाठिंबा काढून घेऊन मुदतपूर्व निवडणुक लादेल किंवा केंद्र सरकार उधोजींना कशात तरी अडकवून राजीनामा द्यायला भाग पाडेल. राष्ट्रवादी सत्तेत असली आणि त्यांच्याकडे महत्वाची पदे असली तरी अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी असे दोन प्रवाह निर्माण झाले आहेत. दोघेही मतभेद टोकाला नेत नाहीत. महाराष्ट्रातील अनेक राजकीय घराण्यात फूट पडली. परंतु पवार घराणे अजूनही अभंग आहे. परत निवडणूक झाली तरी भाजपा लगेच एकट्याच्या जोरावर सत्ता स्थापन करु शकत नाही. भाजप अभंग राहिला असता व स्वतःच्या समर्थक मतदारांचा विश्वासघात करून त्यांना दुखावले नसते तर २०१९ मध्येच भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले असते. परंतु आता भाजपचे समर्थक मतदार कमी होत आहेत. त्यामुळे स्वबळावर सत्ता पुढील किमान दोन निवडणुकीत तरी मिळणे शक्य नाही. त्यामुळे सध्याचे सरकार पाडून, राष्ट्रवादीच्या (किंवा सेनेच्या) पाठिंब्यावर पुढील साडेतीन वर्षांसाठी सत्ता मिळविणे यासाठी भाजप आटोकाट प्रयत्न करीत आहे.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Wed, 03/24/2021 - 08:58 नवीन
व्हाट्सऍप युनिव्हर्सिटी की काही खात्रीलायक स्रोत? की नुसतेच अंदाज? ******* शेवटच्या पॅराशी काहीअंशी सहमत. फरक एवढाच की कुणीही बाहेर पडून निवडणुका लागव्यात ही खरेतर भाजपची अपेक्षा आहे असा माझा अंदाज आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र, भाजप शिवसेना वेगळे, काँग्रेस राष्ट्रवादी बहुमतातात पोहोचणार नाहीत, भाजप शिवसेना निवडणूक झाल्यावर एकत्र येणार, शिवसेनेचा सरकार पाडल्याचा बदला पूर्ण होणार, भाजप सत्तेत येणार. कशी वाटतेय स्टोरी?
  • Log in or register to post comments
र
रांचो Fri, 03/26/2021 - 13:47 नवीन
उ.ठा. च्या नावाची घोषणा झाल्या नंतर अ.प. हे दे.फ. कडे गेले होते. त्यामुळेच दुसर्‍या दिवशीच्या वर्तमानपत्रांचे मथळे शिळे झालेले आठवतात...
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 03/24/2021 - 08:06 नवीन
कंगना काय करत आहे हे सोडून बाकी प्रतेक घडामोडीी दखल घेण्यासारखी आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/24/2021 - 08:12 नवीन
बंगाल विधानसभा निवडणुकीवर एबीपी-सीएनएक्स च्या नवीन सर्वेक्षणाचे अंदाज - मतांची टक्केवारी तृणमूल - ४२.०५ भाजप - ४३.६१ डावे + कॉंग्रेस - ६.७४ संभाव्य जागा तृणमूल - १३६ ते १४६ भाजप - १३० ते १४० डावे + कॉंग्रेस - १४ ते १८ https://news.abplive.com/news/india/abp-news-cnx-opinion-poll-2021-vote-share-predictions-wb-election-state-assembly-seat-wise-analysis-abp-west-bengal-1449806/amp
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 03/24/2021 - 08:20 नवीन
म्हणजे या अंदाजांप्रमाणे अगदीच चुरशीची लढत दिसते. पण एक गोष्ट स्पष्ट होताना दिसत आहे की पूर्वी तृणमूलला सहज बहुमत मिळेल (अगदी १५०-१५५ जागा का असेना) असा अंदाज होता तो आता तितका स्पष्ट राहिलेला दिसत नाही. २००४ मध्ये लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर भाजप आघाडीला २९० वगैरे जागा अशा चाचण्या देत होत्या. पण जसेजसे दिवस-आठवडे पुढे सरकू लागले त्याप्रमाणे हा आकडा पण कमी झाला. अगदी शेवटी चाचण्यांमध्ये आणि एक्झिट पोल्समध्ये २४५ च्या आसपास जागा दिल्या जात होत्या. आणि प्रत्यक्षात काय झाले ते आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. त्याप्रमाणे आणखी पुढच्या चाचणीत तृणमूलचा आकडा आणखी कमी झाला तर प्रत्यक्षात भाजप बहुमत मिळवेल आणि तृणमूल १००-११० मध्ये आटपेल असे व्हायची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Wed, 03/24/2021 - 14:45 नवीन
पल्स, सिएनएक्स आणि सी वोटर यांचा पोल ऑफ पोल भाजप - १४३, टिएमसी - १३२, आणि लेफ्ट/काँग्रेस - १९ येत आहे. असाच निकाल आला तर भाजपचे सरकार नसेल. पण असेही वाटते की भाजप बहुमतापासून दूर राहिला पण १३५ पार केले तर वर्षभरात त्यांचे सरकार असू शकते :):)
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 03/24/2021 - 10:46 नवीन
बंगाल मध्ये ३० टक्के मुस्लिम मतदाता आहेत. राज्याच्या १४५ विधान सभा सीट कोण जिंकणार हे मुस्लिम मतदार ठरवतात. मुस्लिम लोक एक गठ्ठा मत देतात. पण हिंदू तसे वागत नाहीत. म्हणजे १०० टक्के हिंदू bjp ला मत देतील हे शक्य नाही . किती ही धार्मिक विभाजन झाले तरी बंगाल मध्ये ते घडणे शक्य नाही. राष्ट्रीय पक्ष बंगाल मध्ये कधीच सत्तेवर आलेले नाहीत. आणि तीच परंपरा आता पण चालू राहील.
  • Log in or register to post comments
क
कोण Wed, 03/24/2021 - 15:47 नवीन
<<<राष्ट्रीय पक्ष बंगाल मध्ये कधीच सत्तेवर आलेले नाहीत.>>> क्रूपया थोडा अभ्यास करा
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 03/24/2021 - 16:22 नवीन
जेव्हा पासून bjp राज्यात विरोधी बाकावर आहे महाराष्ट्र मधील ११ कोटी जनतेच्या भल्यासाठी कधीच आक्रमक झाला नाहीं ना bjp नी ११ कोटी जनतेचे प्रश्न विधान सभेत मांडले . ना रस्त्यावर संघर्ष केला. एक )सुशांत सिंग. दोन) कंगना तीन )वझे ही असली प्रकरण bjp नी निवडली. राज्य समोर विविध गंभीर प्रश्न आहेत त्या विषयी bjp चूप आहे.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Wed, 03/24/2021 - 16:41 नवीन
राज्यसमोर कोणते गंभीर प्रश्न आहेत ते मांडता का? मग बघू की त्या गंभीर प्रश्नावर सरकार (ज्यांची जबाबदारी आहे) काय करत आहे आणि विरोधी पक्ष काय करत आहे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 03/24/2021 - 16:58 नवीन
सुशांत चे मरण कंगना चे घर आणि अंबानी च्या घरासमोर स्फोट न झालेली स्फोटक. हेच फक्त प्रश्न आहेत का?. आणि ह्या प्रश्नांच आणि सामान्य जनतेचा काडीचा संबंध नाही. वरील सर्व प्रश्न तपास यंत्रणा पुरताच मर्यादित आहे. केंद्र सरकार,राज्य सरकार बघून घेतील. फडणवीस आणि राज्य bjp चे त्या मध्ये काय काम केंद्र सरकार आंधळे आहे का त्या मुळे फडणवीस डोळस झाले आहेत. वरील प्रश्न राजकीय करण्याचे कारण च काय. लोकांना मूर्ख समजू नका राजकारणी लोकांच्या पुढे जावून लोक विचार करतात. न्यूज चॅनेल सांगतात ते लोकांचे मूड नसतात. राज्याचे प्रश्न विरोधी पक्षांना माहीत नसतील तर दिव्य आहेत ते फडणवीस.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Wed, 03/24/2021 - 17:54 नवीन
तुम्हाला माझा प्रश्न समजला नसावा, परत प्रयत्न करतो. तुमच्यामते विरोधी पक्षाने विचारावे असे कोणते गंभीर प्रश्न राज्यसमोर आहेत ते सांगा म्हणजे त्यावर राज्य सरकार त्यांची ती जबाबदारी असल्यामुळे काय करतंय आणि विरोधी पक्षाने त्याबद्दल काही विचारलं की नाही हे शोधता येईल. समजा विरोधी पक्षाने काही विचारलं नसेल आणि त्यांनी विचारावं अशी तुमची अपेक्षा असेल तर अशा गंभीर प्रश्नांवर सरकार काही करत नाहीये म्हणजेच ते बेजबाबदार आणि निष्क्रिय आहेत हे मान्य करावं लागेल. ************ सुशांत सिंग - ड्रग्ज रॅकेट चा संबंध, अतिशय गंभीर प्रश्न, विरोधी पक्षाने उचलायला हवा, उचलला. कंगनाचे घर - अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सत्तेचा वापर करून दबावाचा प्रयत्न (या बाबतीत कोर्टाचे म्हणणे जरूर वाचावे), अतिशय गंभीर प्रश्न, विरोधी पक्षाने उचलायला हवा, उचलला. अंबानीच्या घरासमोर स्फोटके - वसुली, स्फोटकांचा असा वापर, खून - अतिशय गंभीर प्रश्न, विरोधी पक्षाने उचलायला हवा, उचलला. वरील प्रश्न तुम्हाला गंभीर वाटत नसतील तर तुमची कमाल आहे. याव्यतिरिक्त कुठले प्रश्न ते विस्ताराने लिहा.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 17 hours ago
  • सुंदर !!
    1 day 18 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा