चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ८)
- आमची माणसं, आमची वसुली - वसुलीच्या बाबतीत दुबई ची मक्तेदारी मोडत मुंबई आत्मनिर्भर झाली आहे. त्याशिवाय खंडणी वसुली हा सरकारी व्यवसाय झाला आहे.
- भारताने इंग्लंड चा पुन्हा एकदा क्रिकेट मध्ये धुव्वा उडवला.
- फायजर आता तोंडाने घेणारी कोविड ची गोळी आणणार आहे (म्हणे).
- आईसलॅन्ड मध्ये पुन्हा एकदा ज्वालामुखी उद्रेक झाला आहे. मागे एकदा असे घडले तेंव्हा ६ महिने विमानसेवा खंडित झाली होती.
- सुएझ कॅनाल मध्ये एक महाप्रचंड बोट अडकली आहे आणि त्यामुळे हजारो बोटींचा ट्रॅफिक जॅम झाला आहे.
- कंगना राणावत जयललिताच्या बायोपीक मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलर हल्लीच लाँच झाला आहे.
- येथेच्छ खाऊन झाल्यानंतर पैसे मागितले म्हणून एक ढाब्यावाल्याला आणि त्याच्या ९ माणसांना उत्तर प्रदेश पोलिसांनी खोट्या चकमकीत गुंतवले.
- मुंबई पुणे ची डेक्कन queen रेल्वेगाडी नव्या स्वरूपांत येणार आहे.
- नांदेड येथे कोर्टाने एका बलात्कार्याला ६४ दिवसांत फाशीची शिक्षा सुनावली.
- एका २२ वर्षीय मुलीने आपल्याच बापाला दारू पाजून जिवंत पेटवून दिले. बाप आपल्यावर लैगिक अत्याचार करत होता असा दावा तिने केला.
- अधोवस्त्र आणि विग मध्ये लपवून काही कोटींचे सोने आणणाऱ्या लोकांना चेन्नई हवाई तळा वर पकडले. देशांत सोने आणणार्यांना शिक्षा करण्याच्या भारतीय सरकारच्या मूर्खपणाची किंवा आमच्यासारख्यानी केली.
विरंगुळा म्हणून हे विस्मृतीत गेलेले गाणे : https://www.youtube.com/watch?v=eCpbYmO4Ndo
कोण कोणासाठी काय डाव टाकतेय आणि त्यात कोणाचा फायदा आहे काहीच समजत नाहिये.माझ्या मते काका जबरदस्त डाव खेळताहेत. काकांनी मोदींसकट सर्वांना धोबीपछाड दिला आहे. आधी महाराष्ट्रात डील करण्यासाठी २९ ऑक्टोबर २०१९ ला काका दिल्लीत जाऊन मोदी-शहांचा भेटले. महाराष्ट्रात अडीच वर्षे सुप्रिया मुख्यमंत्री, निम्मी मंत्रीपदे, केंद्रात २ मंत्रीपदे या बदल्यात महाराष्ट्रात पाठिंबा हे डील मोदी-शहांनी फेटाळल्यानंतर काकांनी उद्धवला हाताशी धरले. कॉंग्रेस शिवसेनेला पाठिंब्यासाठी तयार नव्हती. सेना सुद्धा चाचरत होती. राष्ट्रपती राजवट उठण्याची चिन्हे नव्हती. या दोन्ही पक्षांवर दबाव आणण्यासाठी काकांनी अजित पवारांना फडणवीसकडे पाठवून राष्ट्रपती राजवट उठवायला लावली. फडणवीस-अजित पवार शपथविधी झाल्यानंतर अपेक्षेप्रमाणे कॉंग्रेस व सेना डेस्परेट होऊन एकत्र येण्यासाठी तयार झाले. लगेच काकांनी अजित पवारांना बाहेर काढून फडणवीसांना घरी पाठविले. दोन दिवसात नवीन सरकार स्थापन झाले. त्यात राष्ट्रवादीला गृह, अर्थ, सार्वजनिक बांधकाम अशी महत्त्वाची मंत्रीपदे मिळाली आणि सर्व निर्णय काकाच घेताहेत. पवारांच्या गुगलीवर फडणवीस, मोदी व शहा एकाच चेंडूवर बाद झाले. आता काका भाजप व सेनेला उचकवून त्यांच्यातील दरी वाढवित आहेत. आता ते दोघे परत एकत्र येणार नाहीत याची खात्री झाल्यानंतर राष्ट्रवादी सरकारमधून बाहेर पडेल व मुदतपूर्व निवडणुक घ्यायला लावेल. कॉंग्रेस व राष्ट्रवादी एकत्र निवडणुक लढतील. भाजप व सेना स्वतंत्र लढतील ज्यात दोघांचाही पराभव अटळ आहे.त्या केसेस शी पवारांचा संबंध नव्हता असे एसीबी ने स्पष्ट केलेले असताना तुम्ही तो दावा कशाच्या आधारावर करत आहात हा मुळ प्रश्न आहे.एसीबी राज्य सरकारच्या म्हणजेच मुख्यमंत्र्यांच्या नियंत्रणात असते. २३ नोव्हेंबर २०१९ ला फडणवीस-पवारांनी शपथ घेणे आणि २ दिवसात २५ नोव्हेंबर २०१९ ला एसीबीने सिंचन घोटाळ्यांची काहीप्रकरणे बंद करणे हा योगायोगच! नाही का?तुम्ही म्हणताय की खूप प्रकरणे होती, तर त्यातली फक्त ९ आणि तीही निगडित नसलेली बंद करणे ही सत्तेसाठी असलेली डिल होती असे आपल्याला म्हणायचे आहे का?फडणवीस हातातील सर्व हुकुमाची पाने एकदम टाकून देण्याइतके दुधखुळे नाहीत.सिंचन घोटाळ्याची बंद झालेली प्रकरणे पवारांशी निगडित होती हा दावा कुठल्या आधारावर?सिंचन घोटाळा प्रकरणात अजितदादा चक्की पिसायला तुरूंगात जाणार हे आश्वासन फडणवीसांनी ज्या आधारावर दिले होते किंवा सिंचन घोटाळा प्रकरणात अजितदादांना केव्हाही अटक होऊ शकते हे रावसाहेब दानवेंनी ज्या आधारावर सांगितले होते, त्याच आधारावर.याव्यतिरिक्त राजकारणात बहुमत सिद्ध केल्याशिवाय असले निर्णय घेता आले असते का/घेतले असते का हा वेगळा मुद्दा.असले निर्णय घेण्यासाठी फक्त पदावर असणे आवश्यक आहे. त्यासाठी बहुमताची अजिबात गरज नाही. ही घटनात्मक माहिती आपल्याकडे दिसत नाही.थोडक्यात काय नुसताच हवेत गोळीबार करत आहात.म्हणजे फडणवीस आणि दानवे सुद्धा हवेत गोळीबार करीत होते ना?ती प्रकरणे त्यांच्याशी संबंधित नव्हती हे एसीबीने अधिकृतरित्या सांगितलेले असतानाहीएसीबीचे नियंत्रण कोण करते हे माहिती नाही? बरोबर २५ नोव्हेंबर २०१९ ला, फडणवीसांंच्या औटघटकेच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातच, हा साक्षात्कार एसीबीला झाला हा योगायोगच आहे. नाही का?तुमच्याकडे कुठलाही स्रोत नसताना तुम्ही खोटे दावे तुमचा फडणवीसविरोध कुरवाळण्यासाठी करत आहात असा साधारणपणे अर्थ निघतोय.फडणवीस व दानवे जे अधिकृतपणे सांगत होते तो स्त्रोत नाही? मग ते खोटे आरोप करीत होते का? मी लिहितो ते ट्रोलिंग आहे असा गैरसमज होत असेल तर माझे प्रतिसाद वाचण्याचे व त्यावर उत्तर देण्याचे वृथा कष्ट घेऊ नये.फडणवीस, दानवे, मोदी, शहा याला अटक करू त्याला अटक म्हणत असतात तेव्हा ते काही कोर्टाचो ऑर्डर हातात घेऊन बोलत नसतात. त्यांचे ते आरोप असतात.या आरोपांना काही आधार होता का? जर असेल तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. जर नसेल तर त्यांनी खोटे आरोप करून जनतेला खोटी आश्वासने देऊन फसविले हे सिद्ध होते. स्वतःच्या प्रश्नाचे उत्तर स्वत:च शोधल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!मला वाटते की सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात कितीही घडामोडी घडल्या तरी सरकार काही पडणार नाहीहे सरकार जास्तीत जास्त अजून एक वर्षे टिकेल. योग्य वेळी राष्ट्रवादी पाठिंबा काढून घेऊन मुदतपूर्व निवडणुक लादेल किंवा केंद्र सरकार उधोजींना कशात तरी अडकवून राजीनामा द्यायला भाग पाडेल.राष्ट्रवादी सत्तेत असली आणि त्यांच्याकडे महत्वाची पदे असली तरी अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी असे दोन प्रवाह निर्माण झाले आहेत.दोघेही मतभेद टोकाला नेत नाहीत. महाराष्ट्रातील अनेक राजकीय घराण्यात फूट पडली. परंतु पवार घराणे अजूनही अभंग आहे.परत निवडणूक झाली तरी भाजपा लगेच एकट्याच्या जोरावर सत्ता स्थापन करु शकत नाही.भाजप अभंग राहिला असता व स्वतःच्या समर्थक मतदारांचा विश्वासघात करून त्यांना दुखावले नसते तर २०१९ मध्येच भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले असते. परंतु आता भाजपचे समर्थक मतदार कमी होत आहेत. त्यामुळे स्वबळावर सत्ता पुढील किमान दोन निवडणुकीत तरी मिळणे शक्य नाही. त्यामुळे सध्याचे सरकार पाडून, राष्ट्रवादीच्या (किंवा सेनेच्या) पाठिंब्यावर पुढील साडेतीन वर्षांसाठी सत्ता मिळविणे यासाठी भाजप आटोकाट प्रयत्न करीत आहे.