Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ६)

श
श्रीगुरुजी
Wed, 03/17/2021 - 12:30
🗣 167 प्रतिसाद
सचिन वाझेंपाठोपाठ आज मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांची सुद्धा उचलबांगडी झाली. मुकेश अंबानीच्या घराबाहेर स्फोटके असलेली स्कॉर्पिओ सापडणे, गाडीचा मालक मनसुख हिरेनचे प्रेत सापडणे, सचिन वाझेचा प्रकरणाशी संबंध जुळणे . . . यातून हे प्रकरण दिवसेंदिवस जास्त गूढ होत चाललंय. सुरूवातीला यात प्यादी बळी जाताना दिसताहेत. सर्व प्यादी संपली तर शेवटी वजीर बळी जाऊ शकतो. यातील नक्की वजीर कोण, राजा कोण आणि डाव खेळणारा कोण हे गूढ कधी उकलेल का हे समजत नाही.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 47757 views

🗣 चर्चा (167)
म
मुक्त विहारि Wed, 03/17/2021 - 12:38 नवीन
https://www.loksatta.com/maharashtra-news/sachin-vaze-case-nia-probe-black-mercedes-car-used-by-waze-recovered-congress-bjp-leaders-fadnavis-chandrakant-patil-bmh-90-2422755/ नक्की काय घडले आहे?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/17/2021 - 13:59 नवीन
या बातमीतील सचिन सावंतांच्या ही ट्विटरची लिंक - https://mobile.twitter.com/sachin_inc/status/1372037890797015041 या ट्विटखालील वेगवेगळे प्रतिसाद पाहिले तर बऱ्याच परस्परविरोधी गोष्टी दिसतात. - या मर्सिडीज गाडीचा मूळ मालक धुळ्यातील सारांश भावसार हा राष्ट्रवादी काँग्रेसचा असूनअसून तो अनिल गोटेचा निकटवर्तीय आहे. - त्याने ही गाडी कार्स२४ मार्फत विकली होती. - या फोटोत सारांश भावसार व भाजपचा देवेन शेळके हे दोघे दिसत आहेत. हा फोटो कार विकण्यापूर्वीचा आहे. - हीच गाडी मनसुख हिरेनने १७ फेब्रुवारीस वापरली होती. - अजून एका फोटोत सचिन सावंत एका गुन्हेगाराबरोबर दिसतोय. - देवेन शेळकेचा एकनाथ खडसेंंबरोबर पण एक फोटो दिसतोय. एकंदरीत कोठून तरी भाजपचा या प्रकरणाशी संबंध जोडण्याचा सावंतांचा प्रयत्न दिसतोय.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 03/18/2021 - 08:08 नवीन
देवेन शेळके माझा वर्गमित्र. तो फोटो कार विकण्या पूर्वीचा आहे.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 03/17/2021 - 12:44 नवीन
या सगळ्या प्रकारावरून अमेरिकेतील वॉटरगेट प्रकरणाची आठवण होत आहे. १९७२ च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकांमध्ये अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना डेमॉक्रॅटिक पक्षाचे जॉर्ज मॅकगव्हर्न यांनी आव्हान दिले होते. मतदानाच्या जवळपास पाच महिने आधी वॉशिंग्टनमध्ये वॉटरगेट नावाच्या इमारतीत डेमॉक्रॅटिक पक्षाच्या प्रचार मुख्यालयात रात्री पहिल्यांदा दोघांनी घुसखोरी करून तिकडच्या लॅन्डलाईन फोनमध्ये टॅपिंग करणारी यंत्रणा लावली. उद्देश हा की प्रतिस्पर्ध्याचे नक्की काय डावपेच चालू आहेत हे समजावे. ही यंत्रणा काही कारणाने काम करेनाशी झाल्यावर परत ते लोक रात्रीच्या वेळी तिथे घुसले. मात्र यावेळी इमारतीच्या सुरक्षारक्षकाला संशय आल्यामुळे त्याने पोलिसांना फोन केला आणि त्या दोघांना पकडले गेले. नंतर त्यांचा संबंध रिचर्ड निक्सन यांच्या प्रचारात सामील असलेल्यांशी आहे हे समजले. आणि सगळ्यात शेवटी स्वतः अध्यक्षांनी या मंडळींना पाठीशी घालायचा प्रयत्न केला हे उघड झाले आणि १९७२ मध्ये अभूतपूर्व विजय मिळवूनही ऑगस्ट १९७४ मध्ये रिचर्ड निक्सनना राजीनामा द्यावा लागला. म्हणजे सुरवात लहान प्याद्यांना पकडण्यापासून झाली. त्यानंतर घोडा/उंट असे करत करत थेट राजालाच घेरले गेले. सुरवात सचिन वाझे या त्यामानाने अतिशय कनिष्ठ पदावर असलेल्या पोलिस अधिकार्‍याला पकडण्यातून झाली. आता त्यापुढील एक विकेट पडलेली दिसते. आता प्रश्न हा की यापुढे अधिकाधिक वरीष्ठ लोकांची विकेट यातून जाणार का?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 03/17/2021 - 13:04 नवीन
तपास भरकटत जाण्याची शक्यता जास्त आहे.... घराणेशाहीची पुजा करणारे मतदार, ऐनवेळी, सगळे विसरतात...
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 03/17/2021 - 15:31 नवीन
फक्त समजा असे घडणार नाही. पण २०२४ , मध्ये bjp च निवडून आली तर bjp प्रधान मंत्री पदावर मोदी ची नेमणूक न करता दुसऱ्या व्यक्ती ला संधी देईल का?, सलग पंधरा वर्ष एकच व्यक्ती ची पंतप्रानपदासाठी निवड होत असेल तर त्याला एकाधिकार शाही असे तुम्ही म्हणणार का. घराणे शाही म्हणून जे टोमणे मारत असतात त्यांच्या साठी हा प्रश्न
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब Wed, 03/17/2021 - 16:07 नवीन
घराणेशाही तेव्हाच होईल जेव्हा मोदी आपल्या मुलाला किंवा मुलीला पंतप्रधान पदासाठी ( लायकी नसताना देखील ) पुढे करतील किंवा त्याची शिफारस करतील... एकाच व्यक्तीने जर निर्विवाद सत्ता काबीज केली तर तो त्या व्यक्तीचा स्वतःचा असा करिष्मा, मेहनत, विजय इ असतो.. तुमच्या घराणेशाही ची डेफिनेशन मध्येच लोचा आहे
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Wed, 03/17/2021 - 16:42 नवीन
असा लोचा बरेच जणांचा (माझ्यासहित) आहे असे जाणवते. माझ्या मते जनतेतून निवडून आलेला कुणीही घराणेशाहीच्या व्याख्येत बसायला नको. शेवटी ते लोकशाहीच्या मार्गाने लोकांमधून निवडले जातात. घरणेशाहीचे साधे उदाहरण म्हणजे अमुक एक घराण्यात जन्माला आल्यामुळे पक्षाचे सर्वेसर्वा होऊन बसलेले लोक. अर्थात यातही परत लोचा होतोच कारण आंध्राच्या मुख्यमंत्रसारखे काही लोक व्याख्येत बसूनही घराणेशाहीत बसवावे वाटत नाहीत कारण आज त्यांच्या पक्षाचे स्थान त्यांच्या करिष्म्यामुळे असल्याचे जाणवते.
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब Wed, 03/17/2021 - 17:01 नवीन
हम्म. थोडंसं स्पष्टीकरण देतो. माझ्या मते घराणेशाही म्हणजे एखादी सामाजिक संघटना किंवा पक्ष यांच्या महत्वाच्या पदावरती आपल्या मुलाला किंवा मुलीला किंवा जवळच्या नातेवाईकाला त्याची लायकी नसताना बसवणे. आणि असे करताना असलेल्या सक्षम पर्यायाला संधी न देणे. उदा.च द्यायचे झाले तर राजीव गांधी पंतप्रधान होण्याच्या लायकीचे नव्हते ( माझे वयक्तिक मत आणि माझा अभ्यास) कारण त्यावेळी पक्षात इतर सक्षम पर्याय उपलब्ध होते पण तरीही त्यांना डावलून राजीव जी यांना पंतप्रधान बनवले गेले. आत्ता देखील काँग्रेस च्या अध्यक्ष पदी राहुल गांधी विराजमान आहेत पण त्यांच्याजवळ ती जबाबदारी सांभाळण्याची कुवत नसताना देखील फक्त वंशपरंपरागत पद बनवून ठेवले आहे. सोनिया गांधी स्वतः पंतप्रधान बनु शकल्या नाहीत पण आतून कोण कारभार चालवत होते ते संपूर्ण जग जाणून आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी राज यांना डावलून उद्धव ठाकरे यांना शिवसेना अध्यक्षपदी बसवले. आणि त्यानंतर आदित्य ठाकरे त्या पदावर बसतील. सेम राज ठाकरे यांच्या MNS बाबत.. त्यांच्यानंतर MNS त्यांच्या मुलाकडेच जाईल. नारायण राणे यांचे दोन्ही पुत्र, भुजबळ यांचें पुत्र, पवार खानदान, लालू यादव हे सगळे घराणेशाही च चालवत आहेत. मागची पिढी आपल्या अधिकाराचा वापर करून आपल्याच पुढच्या पिढीला व्यवस्थित सेटल करतात ते देखील सार्वजनिक क्षेत्रात जिथे प्रत्येकाला संधी मिळणे अपेक्षित आहे. ही गोष्ट प्रायव्हेट क्षेत्रात लागू होत नाही. उदा. माझ्या वडिलांनी अमुक तमुक कंपनी स्थापन केली तर त्याचे अधिकार वारसाहक्काने माझ्याजवळ राहतील.. भले मी ती कंपनी सांभाळू शकेल अथवा नाही.. पण हक्क माझाच राहील. कारण ती कंपनी ही खाजगी मालमत्ता आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 03/17/2021 - 17:12 नवीन
उदा, कॉंग्रेस, नेहरू घराण्याच्या ताब्यात शिवसेना, ठाकरे घराण्याच्या ताब्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस, पवार घराण्याच्या ताब्यात समाजवादी पार्टी, मुलायम सिंह यादव, यांच्या घराण्याच्या ताब्यात लालू यादव, राबडीदेवी, ही पण घराणेशाहीचीच उदाहरणे .... एकाच घराण्यातील सदस्य सत्ता उपभोगत असतील तर, राष्ट्र लयाला जाते, हा इतिहास आहे.... सध्याच्या काळांत, आखाती देश हे अपवाद आहेत....
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 03/17/2021 - 17:20 नवीन
की सत्ता राज्य सत्तेवरील पदावर असणारा व्यक्ती सत्ता उपभोगतो. मोदी सत्ता उपभोगत आहेत आणि त्यांची एकाधिकशही घराणेशाही पेक्षा पण चुकीची आहे. दुसऱ्या लोकांना संधी दिलीच पाहिजे. Bjp काय मोदी ची pvt कंपनी आहे का
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब Wed, 03/17/2021 - 17:22 नवीन
प्रभू.... _^_ आपले चरण कुठे आहेत. _^_
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 03/17/2021 - 17:35 नवीन
त्यांना, नोटाबंदीचा त्रास झाला असावा...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 03/17/2021 - 17:23 नवीन
मोदींना, वंशज आहे का?
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब Wed, 03/17/2021 - 17:25 नवीन
अजुन एक प्रश्न.. मोदी कुणाचे वंशज आहेत??
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 03/17/2021 - 17:38 नवीन
मोदी यांच्या घराण्याच्या किती लोकांनी, ह्या आधी , सत्ता उपभोगली?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 03/17/2021 - 17:54 नवीन
मनमोहन सिंग ची अगोदर आणि नंतर त्यांच्या घरात कोण सत्तेत होते. Devgonda च्या अगोदर कोण त्यांच्या घरातील पंतप्रधान होते..vp sing च्या अगोदर त्यांच्या खानदान मध्ये कोण पंतप्रधान होते. ममता दीदी च्या अगोदर कोण त्यांच्या घरातील मुख्य मंत्री होते. Udhav ठाकरे अगोदर त्यांच्या घरात कोण मुख्य मंत्री होते.. इंदिराजी, पंडित नेहरू सत्तेवर होते कारण त्यांनी देश स्वतंत्र होण्या अगोदर पासून कष्ट घेतले होते. खरे तर ब्रिटिश काळात ब्रिटिश प्रशासनात आणि सैन्यात कोण नोकरी करत होते त्यांची यादी सरकार नी जाहीर करावी . आणि आता त्यांचे वंशज कोण आहेत ह्याची पण यादी प्रसिद्ध करावी.
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब Wed, 03/17/2021 - 17:56 नवीन
कायच्या काय.. कश्याचा कश्याला मेळ नाही.. यांच्या थेअरी प्रमाणे राहुल गांधी किंवा सोनिया गांधी हे घराणेशाही नसून मोदी घराणेशाहीतुन आलेले आहेत. (प्रतिसाद संपादित)
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 03/17/2021 - 18:46 नवीन
पण एकाधिकार शाही तर चालवत आहेत ना.दुसऱ्या टर्म ला पण तेच पंतप्रधान,तिसरी term मिळाली तरी तेच पंत प्रधान असणारा . हा प्रकार घराणेशाही पेक्षा जास्त धोकादायक आहे. Bjp madhye फक्त मोदी च लायक असतील तर बाकी घाण्याचे बैल लोकांनी का निवडून द्यायचे.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Wed, 03/17/2021 - 19:07 नवीन
Image removed. पक्षाध्यक्ष पद एकाच व्यक्तिकडे किंवा तिच्या मुलाकडे ते पण गेले २०+ वर्षे आणि त्यात १० वर्षे सुपर पंतप्रधानपद. तुमचे एकाधिकारशाही आणि घराणेशाही दोन्हि एकाच काँग्रेस पक्षात आहेत.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/17/2021 - 18:33 नवीन
हे आणि ते दुसरे कोविड तज्ज्ञ या दोघांचे प्रतिसाद वाचणे बंद केले तर वैताग येणार नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 03/17/2021 - 15:21 नवीन
ह्या वॉटरगेट प्रकरणावर मिपावर तपशीलवार धागा आहे का? प्रकरण ओझरते माहिती आहेच पण तपशीलवार वाचावयास नक्की आवडेल.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 03/17/2021 - 16:08 नवीन
ह्या वॉटरगेट प्रकरणावर मिपावर तपशीलवार धागा आहे का? प्रकरण ओझरते माहिती आहेच पण तपशीलवार वाचावयास नक्की आवडेल.
माझ्या माहितीप्रमाणे नाही. असल्यास मला पण वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Wed, 03/17/2021 - 16:53 नवीन
ज्यांनी हे प्रकरण समोर आणलं त्या पत्रकारद्वयीने पुस्तक लिहिले आहे. (त्यातल्या बॉब वूडवर्डने नुकताच ट्रम्पने कोव्हिडचे गांभीर्य जाणूनबुजून लोकांना सांगितले नाही असा दावा आपल्या पुस्तकात केला होता. पण त्याने तरी पुस्तक प्रकाशित होण्याची वाट का पाहिली आणि आधीच का सांगितले नाही, असे पडसाद आले होते.)
  • Log in or register to post comments
स
साहना Wed, 03/17/2021 - 17:23 नवीन
> पण त्याने तरी पुस्तक प्रकाशित होण्याची वाट का पाहिली आणि आधीच का सांगितले नाही, असे पडसाद आले होते. ह्यांत नवीन काहीही नाही. ट्रम्प समर्थक आत्ता सुद्धा कोविड सब झूट है नादांत वावरत आहेत. ट्रम्प ने स्वतःच्या हाताने एका म्हातारीचा गाला घोटून तिला ठार मारले ह्याचा व्हिडीओ सुद्धा तुम्ही ट्रम्प समर्थकांना दाखवला तरी ट्रम्प समर्थक त्याला सत्य मानणार नाहीत अशी परिस्थती अमेरिकेत आहे.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Wed, 03/17/2021 - 18:01 नवीन
ट्रम्पने कोव्हिडचे गांभीर्य बरेच महिने माहीत असून उशीखाली ठेवले यात शंकाच नाही. वुडवर्ड हा व्हेटरन पत्रकार आहे. तो निराधार लिहिणार नाहीच. पण वुडवर्डने ट्रम्पने असे केले हे सांगायला स्वतः सुद्धा बराच उशीर केला. ट्रम्प फेब्रुवारी 20 मध्ये एका मुलाखतीत वूडवर्ड कडे व्हायरसच्या गंभीर्याची कबुली देतो. पुढे मार्चमध्ये I wanted to play it down असे व्हायरसबद्दल म्हणतो. आणि माहित असून वुडवर्डने हे जाहीर करायला सप्टेंबरपर्यंत वाट पाहिली. जर ह्यापूर्वी त्याने ट्रम्पचे खरे मत काय आहे हे दाखवले असते तर कदाचित काही लोकांचे प्राण वाचले असते.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Wed, 03/17/2021 - 18:50 नवीन
मला हे ट्रम्प ने डाउन प्ले केले म्हणून अमेरिकेत कोरोनाचा फैलाव जास्त झाला हे लॉजिक काही पटत नाही. कोव्हिड हा काय फक्त अमेरिकेतच होता का त्याचे गांभीर्य दाबून ठेवायला? आणि शिवाय ट्रम्पचे ऐकून लोकं गंभीर झाले नाहीत म्हणावं तर एक तर अमेरिकेत सगळेच ट्रम्पचं ऐकणारे त्यांचे समर्थक आहेत म्हणावं लागेल किंवा मग कोव्हिड झालेले सगळे त्यांचे समर्थक आहेत म्हणावं लागेल. ******* आणि जरी ट्रम्प यांनी त्यांना गांभीर्य माहीत असून तशी भूमिका घेतली असेल तर त्यामागे कोरोना नियंत्रण की अर्थव्यवस्था यातील अर्थव्यवस्थेला त्यांनी प्राधान्य दिलं असण्याची शक्यता असेल का?
  • Log in or register to post comments
श
शा वि कु गुरुवार, 03/18/2021 - 03:32 नवीन
त्याने अर्थव्यवस्थेला प्राधान्य दिलं तरी नागरिकांना किमान इन्फॉर्मड निर्णय घेता येईल इतकी माहिती द्यायलाच पाहिजे होती.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 03/17/2021 - 13:02 नवीन
https://www.loksatta.com/mumbai-news/mumbai-police-commissioner-parambir-singh-transferred-hemant-nagrale-new-police-commissioner-pmw-88-2423002/
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 03/17/2021 - 14:03 नवीन
https://www.loksatta.com/mumbai-news/who-is-hemant-nagrale-appointed-mumbai-police-commissioner-on-parambir-singh-sachin-vaze-case-pmw-88-2423050/
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 03/17/2021 - 13:22 नवीन
https://www.loksatta.com/krida-news/india-women-vs-south-africa-women-fifth-odi-match-analysis-adn-96-2422803/ पुजा वस्त्रकार, अनुजा पाटील, वेदा कृष्णमुर्ती, ह्यांना संघात स्थान मिळाले नाही.... मिताली राज, अनावश्यक जागा अडवून बसली आहे...
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 03/17/2021 - 13:43 नवीन
आधीच्या धाग्यात म्हंटल्या प्रमाणे शेवटी परमबीर सिंग यांची पालखी उचलली गेली आहे. हे प्रकरण मारुतीच्या शेपटी प्रमाणे लांब ठरणार असे दिसतेय. आगे आगे देखीये होता है क्या ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Main Nikla Gaddi Leke... :- Gadar
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 03/17/2021 - 13:57 नवीन
पुढे काहीही होणार नाही .... हे घोंगडे भिजत राहणार
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 03/17/2021 - 13:47 नवीन
https://www.sumanasa.com/go/HGmhq6
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 03/18/2021 - 14:20 नवीन
फाटके कपडे घालणे काय धड आहे का? ती बै तशी फिरेल, तिचे पोरं नागडे फिरतील!
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 03/17/2021 - 13:53 नवीन
https://www.sumanasa.com/go/C0mhq6
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 03/17/2021 - 14:52 नवीन
https://www.loksatta.com/maharashtra-news/maharashtra-politics-nana-patole-attack-maharashtra-bjp-chandrakant-patil-and-devendra-fadnavis-bmh-90-2422999/ बाबासाहेब भोसले, यांना मग कसे काय हटवले?
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Wed, 03/17/2021 - 16:46 नवीन
दोन बँकांच्या खाजगीकरणाविरोधात बँक कर्मचार्‍यांनी संप केला. खाजगीकरणाची ही तर नुसती सुरुवात आहे. धंदा करणे सरकारची जबाबदारी नाही हे श्री मोदींनी केव्हाच समजावून सांगितले आहे. खरंतर मोदींना भरघोस पाठिंबा देणार्‍या व “२०० रुपये पेट्रोल झाले तरी चालेल; पण आमचे मत मोदींनाच“ असे म्हणणार्‍या वर्गाने खाजगीकरणास पाठिंबा द्यायला हवा. सरकारी आस्थापनांमध्ये आरक्षणामुळे, ज्यांचे पूर्वज गटार साफ करणारे मजूर वगैरे होते अशा ऐतखाऊ लोकांचा बुजबुजाट वाढला होता. खाजगीकरणामुळे आता आरक्षण जाऊन परंपरागत हार्डवर्किंग लोकांना “आपल्यातला आहे ना?” हे पाहून हार्डवर्किंग लोकांनाच कामावर घेणे शक्य होणार आहे. मराठा, जाट व गुज्जर वगैरे येडपट मंडळी मात्र आरक्षण मिळणार म्हणून खुशीत आहेत. श्री मोदींच्या दूरदृष्टीस तोड नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/17/2021 - 17:22 नवीन
बँकांच्या खाजगीकरणास माझा पाठिंबा आहे.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Wed, 03/17/2021 - 17:26 नवीन
अर्थातच! आपल्या फायद्याचेच आहे ते!
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब Wed, 03/17/2021 - 17:38 नवीन
खाजगीकरणामुळे आता आरक्षण जाऊन परंपरागत हार्डवर्किंग लोकांना “आपल्यातला आहे ना?” हे पाहून हार्डवर्किंग लोकांनाच कामावर घेणे शक्य होणार आहे.
मी स्वतः 10+ वर्षे खाजगी क्षेत्रात काम करतोय. आजवर शेकडो interview पॅनल मध्ये काम केलेय, संपूर्ण व्यवस्थापन जवळून पाहिलेय.. कुठेही अश्या प्रकारचा विचार करून कामावर घेतले जात नाही. अगदी रेफरल सिस्टीम मध्ये देखील interview, पात्रता, शैक्षणिक बॅकग्राऊंड चेक इ सर्व सोपस्कर केले जातात. एखाद्या 5-10 माणसांच्या खाजगी कंपनी मध्ये अश्या पद्धतीने विचार करून लोकांना कामावर घेतले जात असेल पण मोठ्या स्केलवर काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये असं घडत नाही. बाकी तुमचे विचार आरक्षणावर तंतोतंत लागू होतात.. शेवटी आरक्षण म्हणजे तरी काय हो ??? तुमच्याच भाषेत सांगायचं तर - "" आपल्यातच आहे ना.. मग 10-20 मार्क कमी असले तरी घ्या याला आत.. "" (प्रतिसाद संपादित)
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/17/2021 - 18:04 नवीन
हो, खाजगी बँक माझ्या फायद्याचीच आहे.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Wed, 03/17/2021 - 17:36 नवीन
खासगी बँका असाव्यात, पण सरकारी का नको ?
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब Wed, 03/17/2021 - 17:46 नवीन
सरकारी पण असाव्यात.. सरकारी बँकेला विरोध नाही.. ज्यांच्याकडे भरपूर वेळ आहे.. ज्यांना लायनीत उभे राहुन आपला नंबर आल्यावर अपमान करून घेण्यात थ्रिल वाटते, ज्यांना बिनकामाचा पैसा हाडपायला आवडतो त्यांच्यासाठी सरकारने जागोजागी सरकारी बँका उभाराव्यात.. माझा काहीही आक्षेप नाही. पण एकेकाळी खाजगी असलेल्या बँकेला जबरदस्ती गिळंकृत करून सरकारी बनवणे कितपत बरोबर..? आजवरच्या सरकार ला स्वतः ची एखादी बँक ( RBI वगळता ) स्क्रॅच पासून सुरु करता आली का?? ते सगळे उद्योग जे आज सरकारी म्हणून गणले जातात त्यापैकी बरेचसे उद्योग एकेकाळी खाजगीच होते.. !! खाजगीकरणाच्या नावाखाली बोंबा मारणारे ह्या गोष्टीला सोयीस्कररित्या विसरतात.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Wed, 03/17/2021 - 17:56 नवीन
खासगी बँक बुडाल्यास सरकारने त्या बँकांना वाचवू नये. परंतू सरकारी बँकांचे खासगीकरण करू नये.
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब Wed, 03/17/2021 - 18:04 नवीन
खासगी बँक बुडाल्यास सरकारने त्या बँकांना वाचवू नये
त्याच प्रकारे सरकारी बँक बुडाल्यास सरकारने वाचवू नये... चालेल का !! तसेही एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे ती म्हणजे सरकारने घालून दिलेल्या नियमावलीनुसारच कोणतीही बँक चालते. मग खाजगी असो वा सरकारी. आणि राहता राहिला प्रश्न लोकांच्या पैश्याचा.. तर कोणतीही बँक ती बुडाल्यास लोकांचे पैसे परत देण्याला बांधील नाही.. !! त्यामुळे सरकारी बँका सेफ आणि खाजगी अनसेफ असं काहीही नाही..!!
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Wed, 03/17/2021 - 18:32 नवीन
सरकार जेव्हा तोट्यातील खासगी बँका वाचवायचा प्रयत्न करते तेव्हा बँक खासगीकरण समर्थक त्याला विरोध का करत नाही?
  • Log in or register to post comments
प
पिनाक Wed, 03/17/2021 - 19:19 नवीन
करत नाही असं कोण म्हणलं? दोन्ही गोष्टींचा काही संबंध आहे का? म्हणजे खाजगिकरणाचा समर्थक असल्याचा आणि अशा गोष्टींचे समर्थन करण्याचा?
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० गुरुवार, 03/18/2021 - 03:23 नवीन
नक्कीच संबंध आहे. खासगीकरण १००% असावे. तोट्यातील खासगी बँका मोठ्या खासगी बँकांनी ताब्यात घ्याव्या आणि तोट्यातील सरकारी बँका मोठ्या सरकारी बँकांनी ताब्यात घ्यावा. खासगी बँकांचे लोढणे सरकारी बँकांवर अजिबात टाकू नये.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 03/17/2021 - 18:11 नवीन
खासगी बँका आहेत त्या कर्ज बुडव्या उद्योग पती नी बुडविली की सरकार पॅकेज देते आणि सरकारी पैसा खासगी बँकेंस दिला जातो. आता जर खासगीकरण चालू आहे. त्याची अगोदरची स्टेप बँकेचे एकत्रीकरण केले आहे. कर्ज budvya लोकांनी बँका लुटल्या मुळे त्यांचा npa वाढला आहे . त्या बँकांचे एकत्रीकरण फक्त Npa कमी करण्यासाठी केले. म्हणजे लोकांच्या ठेवी वर दरोडा च टाकला. आणि एकत्रीकरण करून दरोडा टाकून झाल्या वर Npa कमी करून ती मोठी बँक खासगी लोकांना परत दरोडा टाकण्याच्या हेतू नी त्यांच्या ताब्यात दिली आहे.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा