Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ६)

श
श्रीगुरुजी
Wed, 03/17/2021 - 12:30
🗣 167 प्रतिसाद
सचिन वाझेंपाठोपाठ आज मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांची सुद्धा उचलबांगडी झाली. मुकेश अंबानीच्या घराबाहेर स्फोटके असलेली स्कॉर्पिओ सापडणे, गाडीचा मालक मनसुख हिरेनचे प्रेत सापडणे, सचिन वाझेचा प्रकरणाशी संबंध जुळणे . . . यातून हे प्रकरण दिवसेंदिवस जास्त गूढ होत चाललंय. सुरूवातीला यात प्यादी बळी जाताना दिसताहेत. सर्व प्यादी संपली तर शेवटी वजीर बळी जाऊ शकतो. यातील नक्की वजीर कोण, राजा कोण आणि डाव खेळणारा कोण हे गूढ कधी उकलेल का हे समजत नाही.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 47757 views

🗣 चर्चा (167)
V
Vichar Manus Fri, 03/19/2021 - 14:19 नवीन
डॉक्टर साहेब तुमचा काँग्रेस विरोध माहीत आहे पण काँग्रेस ला 2019 मध्ये जवळपास 12 कोटी मतं मिळाले होते केवळ 4 कोटी नाही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 03/18/2021 - 11:10 नवीन
नाही का?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/18/2021 - 11:35 नवीन
खडसेंची कोंडी केल्याने त्यांना भाजप सोडावा लागला. जळगाव महापालिकेत खडसेंचे थोडेसे वर्चस्व आहेच. त्यामुळेच फोडाफोडी झाली. आता खडसेंची कोंडी कोणी केली हे उघड गुपित आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 03/18/2021 - 12:27 नवीन
खडसे यांची मनमानी, फडणवीस यांनी मान्य करायला हवी होती... बरोबर ना?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/18/2021 - 13:37 नवीन
मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त करणे ही मनमानी नाही. ही इच्छा पंकजा मुंडेंनी सुद्धा व्यक्त केली होती.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 03/18/2021 - 13:46 नवीन
मुख्यमंत्री पद कशासाठी हवे होते? ह्याचा विचार, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केला असेलच की.... खडसे यांच्या सारखा, वरिष्ठ नेता असतांना, फडणवीस यांना, मुख्यमंत्री का केले असावे?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/18/2021 - 15:13 नवीन
असेल ना. पण इच्छा व्यक्त केली म्हणून ३०+ वर्षे पक्षात असलेल्या जेष्ठ नेत्याला अनेक खोट्या प्रकरणात अडकविणे, मंंत्रीमंडळातून घालविणे, अवमानकारक पद्धतीने उमेदवारी नाकारणे, मुलीला निवडणुकीत पाडणे व नंतर राजकारणातून खच्चीकरण करणे हे योग्य होते का? पंकजा मुंडेंबद्दल असंच केलं गेलं. विनोद तावडेंबद्दलही हेच. बावनकुळेंंनी काय अपराध केला हेच माहिती नाही. मी खाली लिहिलंय ते काही नेहमीच्याच यशस्वी प्रतिसादकांना पटणे अवघड आहे. २०१७ त २०१८ मध्ये झालेल्या १९ महापालिका निवडणुकीत १४ महापालिकांंमध्ये भाजपचा महापौर झाला. ३ महापालिका कॉंग्रेसकडे गेल्या. शिवसेनेने ठाणे महापालिका जिंकली व मुंबई महापालिका भाजपने सेनेला आंदण दिली. त्यावेळी लातूर, पिंपरी चिंचवड, पुणे, सोलापूर, सांगली या महापालिकेत भाजपला अनपेक्षित विजय मिळाला होता. त्यातील लातूर, सांंगली व जळगाव महापालिकेतील महापौर निवडणुकीत आता भाजपचा पराभव झालाय. पुढील २ वर्षात या महापालिकांंची निवडणुक होईल. त्यात पिंपरी चिंचवड, पुणे, लातूर, सांगली, सोलापूर, उल्हासनगर या महापालिकेत भाजपचा पराभव होण्याची शक्यता आहे. शिक्षक-पदवीधर विधानपरीषद निवडणुकीत भाजपचा पुणे व नागपूर या दोन बालेकिल्ल्यात मोठ्या फरकाने पराभव झाल्याने जनमताचा कल दिसू लागला आहे. मोदी-शहांचा फडणवीसांवर कितीही विश्वास असला तरी जनतेचा विश्वास असल्याशिवाय निवडणुक जिंकणे शक्य नाही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 03/18/2021 - 15:32 नवीन
ह्यात फरक आहे...
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/18/2021 - 15:52 नवीन
नक्कीच. आपल्या सर्व प्रतिस्पर्ध्यांंना खोट्या प्रकरणात अडकवून संपविणे, स्वतःच्या खुर्चीसाठी किळसवाणी लाचारी करणे व सत्तेसाठी मतदारांना दिलेली सर्व आश्वासने बासनात गुंडाळून त्यांचा विश्वासघात करणे यातून लालसा स्पष्ट दृग्गोचर होते.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका गुरुवार, 03/18/2021 - 16:28 नवीन
अंध मोदीविरोध आणि अंध फडणवीस विरोध यात तिळमात्र फरक नाही. अर्थात ज्याप्रमाणे अंधविरोधी असलं काही मोदींविरोधात बरळायला लागले की लोकांचा मोदींवरील विश्वास अधिक पक्का होतो हेच आतापर्यंत दिसून आलेले आहे, त्याप्रमाणे इथेही काही वेगळे होईल असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/18/2021 - 16:50 नवीन
माझा फडणवीसविरोध अंध नसून पूर्णपणे डोळस आहे. त्यामागे अत्यंत सबळ कारणे आहेत व ती कारणे मी अनेकदा विशद केली आहेत. अर्थात फडणवीसांच्या अंधभक्तांना ती दिसणारच नाहीत. मातोश्रीवर फेऱ्या मारून उधोजींनी मारलेले सर्व जोडे सहन करून त्यांचे सर्व आदेश मान्य करण्याची चाटुगिरी करणे हा त्यांना मास्टरस्ट्रोक वाटतो. आपल्या सहकाऱ्यांचा विश्वासघात त्यांना राजकीय चातुर्य वाटते. मतदारांचा विश्वासघात त्यांना कौतै वाटतो. सर्व आश्वासने बासनात गुंडाळून भ्रष्टांशी केलेली हातमिळवणी त्यांना प्रशंसनीय वाटते. मोदी आणि फडणवीस यांच्यात जमीनअस्मानाचा फरक आहे. लवकरच हे समजेल (अर्थात डोळ्यांवरील पट्टी काढली तरच).
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 03/18/2021 - 16:55 नवीन
Bjp चे वरिष्ठ नेते च काढतील.आज जे महाराष्ट्रात चालू आहे त्याचा शेवट असा होईल की फडणवीस ह्यांचे राजकीय खच्छी करणं होईल. राजकारणात काही होवू शकत. अती शहाणी लोक कोणालाच नको असतात.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 03/18/2021 - 16:55 नवीन
फडणवीस यांना, बिहार मध्ये प्रचाराला, उगाच पाठवले नाही... तुमचा फडणवीस यांच्यावर कितीही राग असला तरी, केंद्रीय मंत्रीमंडळात, फडणवीस नक्कीच असतील...
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका गुरुवार, 03/18/2021 - 17:15 नवीन
अंधविरोधाच्या पातळीची खात्री पटली. वरील प्रतिसादात फडणवीस ऐवजी मोदी टाकले की असले अंधविरोधक मोदींच्या नावाने अगदी याच शब्दात खडे फोडताना दिसतात. वरून इतरांना अंधभक्त म्हणणे, डोळ्यावरची पट्टी काढायला सांगणे, आपणच कसे अभ्यास करतो आणि आपला विरोध हा अभ्यासानंतर आहे वगैरे सांगणे - लक्षणे तंतोतंत जुळतात. त्यामुळे, शुभेच्छा! ********* भ्रष्टाशी हातमिळवणी वगैरे पवारांशी युतीशी जोडणारे, उगाचच स्वतःचा ज्वर कुरवाळण्यासाठी असले मुद्दे वापरतात हे स्पष्ट आहे. ती मुख्यमंत्री पदाची शपथ त्यांच्या समर्थकांनाही आवडली नव्हतीच हे स्पष्ट असतानाही, शिवाय भाजपचा विश्वासघात करून महाघाडीचा घाट घातल्यानंतर त्याला उत्तर म्हणून पवारांना सोबत घेतले गेले होते हे सोयीस्कररित्या विसरून उगाच असले मुद्दे फडणवीस विरोध कुरवाळण्यासाठी वापरतात हे काही आता नवीन राहिले नाही. कुठेतरी कुठलेतरी नगरसेवक फुटून झालेल्या सत्ताबदलात आशा लोकांना फडणवीसांचा पराभव दिसू लागतो जसा मोदीविरोधकांना पंजाब च्या स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपच्या पराभवात शेतकरी आंदोलनामुळे झालेला मोदींचा पराभव दिसला होता. ********* असो, तीन पक्षांच्या एकत्रित मतांचा भाजपला फटका बसू शकतो हे सांगायला काही कोणत्या ज्योतिषाची गरज नाही. तूर्तास तरी १०५ जागांसह भाजप हा महाराष्ट्रातील जनतेची पहिली पसंती आहे हे गणित शेंबड्या पोरालाही कळते.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/18/2021 - 17:38 नवीन
वाचून हसू आवरले नाही. झोपलेल्याला जागे करता येते, झोपेचे सोंग घेणाराला नाही. असो.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 03/18/2021 - 18:00 नवीन
हरता हरता वाचले होते फडणवीस. निव्वळ हवेत आहेत अजुन्ही.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/18/2021 - 19:29 नवीन
ते हवेत नाहीत. त्यांना वस्तुस्थितीची जाणीव आहे. म्हणून तर स्वबळावर लढण्याची त्यांची तयारी नव्हती व सेनेबरोबर युती करण्यासाठी ते अत्यंत कासावीस झाले होते. आता जर हे सरकार पडले तर फडणवीस मुदतपूर्व निवडणुकीऐवजी राष्ट्रवादी किंवा सेनेशी युती करून सरकार स्थापण्यासाठी जिवाचे रान करतील, कारण निवडणुक स्वबळावर लढली तर पूर्ण वाट लागणार याची त्यांना कल्पना आहे.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Fri, 03/19/2021 - 15:19 नवीन
काय म्हणता?? २०१९ विधानसभेला? नवलच म्हणायचे, काँग्रेस उमेदवाराच्या दुप्पट मते होती म्हणतात त्यांना.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Fri, 03/19/2021 - 15:14 नवीन
शत प्रतिशत खरे! :):) सर्व अंधविरोधकांना हे कळते पण वळत नाही.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 03/18/2021 - 18:02 नवीन
तूर्तास तरी १०५ जागांसह भाजप हा महाराष्ट्रातील जनतेची पहिली पसंती आहे हे गणित शेंबड्या पोरालाही कळते.
मी परत येईन यावर फडणवीसांनी विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचार केला होता. प्रचारादरम्यान शिवसेनेने त्या घोषणेला एकदाही आक्षेप घेतल्याचे ऐकिवात नाही. मोदींची मुंबईत सभा झाली तेव्हा मोदी मतदारांना उद्देशून म्हणाले होते की केंद्रात जसे तुम्ही नरेंद्रला परत निवडून दिलेत तसेच राज्यात देवेंद्रलाही परत निवडून द्या. त्यावेळी उधोजी त्याच व्यासपीठावर होते पण त्यावेळी आणि नंतरही- अगदी मतमोजणीच्या दिवशीपर्यंत त्यांनी किंवा अन्य कोणत्या शिवसेनेच्या नेत्याने त्याला आक्षेप घेतला नव्हता. बाळासाहेबांना दिलेले वचन, बाळासाहेबांच्या खोलीत बसून अर्ध्या काळासाठी मुख्यमंत्रीपद द्यायचे कबूल केले होते वगैरे नंतर मारलेल्या थापा आहेत हे त्यावरून लक्षात येतेच. अर्थात विशिष्ट चष्मा घातल्याने ही गोष्ट बघायचीच नसेल तर गोष्ट वेगळी. तेव्हा खरं तर मतदारांच्या दृष्टीने देवेंद्रना मुख्यमंत्री म्हणून १०५ + ५६ = १६१ जागा दिल्या गेल्या होत्या. दुसरे म्हणजे विधान परिषदेच्या निवडणुकांचा वारंवार उल्लेख आला आणि त्यातून जनतेने भाजपविरोधी कौल स्पष्टपणे दिला असे म्हटले गेले आहे. याविषयी एक महत्वाची गोष्ट विसरली जात आहे की शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांसाठी प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस नव्याने मतदारयाद्या बनवल्या जातात. खरं तर असे करायला तसा काही अर्थ नाही. एकदा एखादा मतदार पदवीधर असेल तर तो आणखी सहा वर्षांनी पदवीधर राहणार नाही असे थोडीच आहे? तेव्हा दरवेळी नव्याने याद्या कशाला बनवायला हव्यात? पण कायदा गाढव असतो असे म्हणतात त्यातला हा एक अर्थहिन नियम आहे. हे प्रकरण कोर्टात गेले होते. हायकोर्टाने ही पध्दत रद्दबादल ठरवली पण सर्वोच्च न्यायालयाने मात्र दरवेळी नव्याने मतदारयाद्या बनवायला लागतील असे स्पष्ट केले. याविषयी अधिक https://ceo.maharashtra.gov.in/Downloads/PDF/Instruction_GraduateTeach_2017Oct.pdf येथे पान २ वर. भाजप इतकी दशके विरोधी पक्षात असताना पक्षाचे कार्यकर्ते दरवेळी पदवीधर/ शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुका आल्या की पात्र मतदारांची नोंदणी करून घ्यायला विशेष कष्ट घ्यायचे. पण काँग्रेस पक्ष (आणि नंतर काँग्रेस-राष्ट्रवादी) या निवडणुका फार गांभीर्याने घ्यायचा नाही त्यामुळे आपल्या मतदारांची नोंदणी करण्यासाठी विशेष कष्ट घ्यायचे नाहीत. झाले तर झाले असा त्यांचा दृष्टीकोन असायचा.तसेही विधानपरिषदेला फार अधिकार नसतात आणि ती केंद्रातील राज्यसभेइतकी अजिबात बलिष्ठ नसते. त्यातूनच देवेंद्र फडणवीसांचे वडील गंगाधर फडणवीस, नितीन गडकरी हे दिग्गज नागपूर पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून जात होते. २०२० च्या निवडणुकांसाठी ही मतदार नोंदणीची प्रक्रीया नोव्हेंबर २०१९ मध्ये झाली होती. तेव्हा भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या मतदारांची नोंदणी करण्यासाठी पूर्वीइतके कष्ट घेतले नाहीत असे (मला वाटते भाऊ तोरसेकरांच्या) व्हिडिओत ऐकल्याचे आठवते. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकांचा कौल कितपत जनमताचा निर्देशक आहे हा प्रश्न उभा राहतोच. फडणवीसांच्या अनेक गोष्टी मला पण आवडत नाहीत. तरीही फडणवीस म्हटले की अंगावर पाल पडल्यासारखे मला तरी वाटत नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/18/2021 - 19:21 नवीन
मी परत येईन यावर फडणवीसांनी विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचार केला होता. प्रचारादरम्यान शिवसेनेने त्या घोषणेला एकदाही आक्षेप घेतल्याचे ऐकिवात नाही. मोदींची मुंबईत सभा झाली तेव्हा मोदी मतदारांना उद्देशून म्हणाले होते की केंद्रात जसे तुम्ही नरेंद्रला परत निवडून दिलेत तसेच राज्यात देवेंद्रलाही परत निवडून द्या. त्यावेळी उधोजी त्याच व्यासपीठावर होते पण त्यावेळी आणि नंतरही- अगदी मतमोजणीच्या दिवशीपर्यंत त्यांनी किंवा अन्य कोणत्या शिवसेनेच्या नेत्याने त्याला आक्षेप घेतला नव्हता. १८ फेब्रुवारी २०१९ या दिवशी युतीची घोषणा करताना फडणवीस, शहा व उधोजी या तिघांनीही मुख्यमंत्री कोण यावर चकार शब्द काढला नव्हता. बाय डिफॉल्ट फडणवीसच मुख्यमंत्री असे भाजप समर्थकाना वाटले असेल. परंतु निवडणुक जिंकली तरी विद्यमान मुख्यमंत्रीच पुन्हा मुख्यमंत्री होतोच असे नाही. "शहांंशी झालेल्या चर्चेनुसार पहिली अडीच वर्षे सेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. त्या अटीवरच मी युती केली आहे." असे १९ फेब्रुवारीस उधोजींनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात वाहिन्यांंच्या उपस्थितीत सांगितले होते. त्याची चित्रफीत अनेकदा वाहिन्यांंनी दाखविली आहे. त्यावेळी कोणत्याही भाजप नेत्याने त्यावर आक्षेप घेतला नव्हता. त्यानंतर ऑक्टोबरपर्यंत वेगवेगळे सेना नेते हेच सांगत होते. तेव्हाही भाजपच्या कोणीही आक्षेप घेतला नव्हता. जुलै २०१९ मध्ये आदित्यने टाईम्सच्या मुलाखतीत हेच सांगितले होते. परंतु सर्व भाजप नेते गप्प होते. आपण विरोध केला तर सेना युती तोडेल ही भीति वाटत असावी. नंतर ११ ऑक्टोबरच्या सुमारास सर्वात पहिल्यांदा आपण असे काही मान्य केल्याचे शहांनी नाकारले. मग आधीचे ८ महिने ते का गप्प होते? मतदानाला जेमतेम एक आठवडा असल्याने आता सेना युती तोडू शकणार नाही याची खात्री झाल्यानेच त्यांनी तोंड उघडले होते का? सेना युतीच्या दुसऱ्या दिवसापासून मुख्यमंत्रीपदावर हक्क सांगत होती. परंतु ते नाकारायला भाजपने आठ महिने घेतले. बाळासाहेबांना दिलेले वचन, बाळासाहेबांच्या खोलीत बसून अर्ध्या काळासाठी मुख्यमंत्रीपद द्यायचे कबूल केले होते वगैरे नंतर मारलेल्या थापा आहेत हे त्यावरून लक्षात येतेच. अर्थात विशिष्ट चष्मा घातल्याने ही गोष्ट बघायचीच नसेल तर गोष्ट वेगळी. त्यांनी एकमेकांना नक्की काय आश्वासने दिली हे फक्त तेच सांगू शकतील. कोण थापा मारतोय व कोण सत्यवादी राजा हरीश्चंद्र आहे हे तेच सांगू शकतील. परंतु सेना युतीसाठी तयार नव्हती व फडणवीस युतीसाठी अत्यंत कासावीस होऊन मातोश्रीवर फेऱ्या मारत होते ही वस्तुस्थिती लक्षात घेता भाजपनेच युतीसाठी सेनेला मुख्यमंत्रीपद व इतर अनेक अव्यवहार्य आश्वासने दिली असण्याची बरीच शक्यता आहे. तेव्हा खरं तर मतदारांच्या दृष्टीने देवेंद्रना मुख्यमंत्री म्हणून १०५ + ५६ = १६१ जागा दिल्या गेल्या होत्या. सेनेच्या मतदारांनी सेनेच्या मुख्यमंत्रीपदासाठी कौल दिला आणि भाजपच्या मतदारांनी भाजपच्या मुख्यमंत्रीपदासाठी. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकांचा कौल कितपत जनमताचा निर्देशक आहे हा प्रश्न उभा राहतोच. पदवीधर मतदारसंघात लाखो मतदार असतात. पुणे पदवीधर मतदारसंघात ४ लाखांहून अधिक मतदार आहेत व हे सर्व सुशिक्षित आहेत आणि सुशिक्षित मतदार भाजपचे समर्थक समजले जातात. १९९०, १९९६, २००८ व २०१४ अशी चार वेळा भाजपने पुण्यातील निवडणुक जिंकली होती. नागपूर पदवीधर मतदारसंघ भाजपने सलग ६-७ वेळा जिंकला होता. या दोन्ही मतदारसंघात यावेळी भाजपचा चांगल्या फरकाने पराभव झाला. त्यातून कल स्पष्ट दिसतो.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Fri, 03/19/2021 - 04:21 नवीन
सेना युतीच्या दुसऱ्या दिवसापासून मुख्यमंत्रीपदावर हक्क सांगत होती. परंतु ते नाकारायला भाजपने आठ महिने घेतले.
तुमचा फडणवीसांवर आकस असल्याने तुम्ही असे म्हणणार हे अपेक्षितच आहे. पण भाजपचा सगळा प्रचार 'मी परत येईन' यावर आधारलेला होता त्यालाही कधी शिवसेनेने आक्षेप घेतल्याचे ऐकिवात नाही. बाकी पत्रकारांसमोर सेना नेते नक्की काय म्हणतात यापेक्षा भाजपच्या दाव्यांवर शिवसेनेने अधिकृत आक्षेप घेणे याला नक्कीच जास्त किंमत द्यायला हवी. अगदी सर्वोच्च पातळीवर- मोदींच्या सभेत व्यासपीठावर उद्धव उपस्थित असतानाही त्याविषयी आक्षेप घेतला नसेल तर इतर गोष्टी गैरलागू आहेत. बाकी या प्रकरणात कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचा आहे यात मी जातच नाही. मतदान करताना मतदारांना नक्की काय लक्षात असायची शक्यता जास्त- मी परत येईन हे स्लोगन की आठ महिन्यांपूर्वीची पत्रकार परिषद की आदित्य आणि आणखी कोणी टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखती? इतके असूनही मतदारांनी फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील हे चित्र त्यांच्यापुढे उभे असताना १०५ + ५६ =१६१ जागा दिल्या होत्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या वेळेस फडणवीसांविरूध्द फार मोठा रोष होता वगैरे गोष्टी तथ्यहिन आहेत.
फडणवीस युतीसाठी अत्यंत कासावीस होऊन मातोश्रीवर फेऱ्या मारत होते ही वस्तुस्थिती लक्षात घेता भाजपनेच युतीसाठी सेनेला मुख्यमंत्रीपद व इतर अनेक अव्यवहार्य आश्वासने दिली असण्याची बरीच शक्यता आहे.
असे का ना. पण फडणवीस मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील या मोदींच्या दाव्यावर तिथेच हजर असलेले उधोजी काहीही आक्षेप घेत नव्हते हे पण तितकेच खरे. शक्यता आहे की भाजपने शिवसेनेला फसवले. असू दे. हे राजकारण आहे. आणि शिवसेनेने पूर्वी, विशेषतः २०१४ नंतर केलेले प्रकार लक्षात घेता त्यांना बेसावध ठेऊन नंतर लाथ घालायचा भाजपचा बेत असेल तर तो चुकीचा मानता येणार नाही. पण तो डाव चुकीच्या अंमलबजावणीमुळे फसला आणि शिवसेनेने पण असाच डाव तयार ठेवला असेल याची कल्पनाही भाजपने न केल्याने भाजपला त्याची फळे भोगावी लागणे भाग आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघात ४ लाखांहून अधिक मतदार आहेत व हे सर्व सुशिक्षित आहेत आणि सुशिक्षित मतदार भाजपचे समर्थक समजले जातात.
पुणे पदवीधर मतदारसंघ म्हणजे केवळ पुणे शहर/जिल्हा नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्हे पण त्यात येतात. तीन चार जिल्ह्यात चार लाख मतदार (त्यापैकी प्रत्यक्ष मतदान करणारे किती हा प्रश्न विचारतच नाही) म्हणजे खूप मोठा आकडा आहे असे नाही. काही एकेक विधानसभा मतदारसंघांमध्ये पण त्यापेक्षा जास्त मतदार असतात. आणि त्यातही भाजपने आपली सत्ता कायम राहणार या गुर्मीतून विधानसभेत यावतचंद्रदिवाकरो आपलेच आमदार निवडून येणार मग विधानपरिषदेला कोण विचारतो या अनाठायी आत्मविश्वासातून पूर्वी या मतदारांची नोंदणी करण्यासाठी जितके प्रयत्न केले जायचे तितके केले नसतील पण काँग्रेस-राष्ट्रवादीने ते प्रयत्न केले असतील तर मुळात हे मतदार हे सँपल बायस्ड होते का हा प्रश्न विचारायला नक्कीच वाव आहे. असो. आता याविषयी माझा पूर्णविराम.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 03/19/2021 - 05:28 नवीन
एकमेकांच्या दाव्याला दोन्ही पक्षांनी आक्षेप घेतला नव्हता. त्यामुळे दोघांनी एकमेकांना नक्की कोणती आश्वासने दिली होती हे फक्त तेच सांगू शकतात. मुख्य फरक हा आहे की पहिली अडीच वर्षे आमचा मुख्यमंत्री होण्याचे शहांनी मान्य केले आहे हे उधोजी व इतर सेना नेते १९ फेब्रुवारी २०१९ पासून वारंवार सांगत होते, परंतु तो दावा भाजपने सर्वात पहिल्यांदा ११ ऑक्टोबर २०१९ च्या सुमारास नाकारला. भाजप नेते ८ महिने का गप्प होते? आधीच दावा नाकारला तर सेना युती तोडेल ही भीति असावी. त्यामुळे मतदानाला जेमतेम ७-८ दिवस असताना भाजपने दावा नाकारला कारण त्यावेळी सेना युती तोडणे अशक्य होते. परंतु आधी लिहिल्याप्रमाणे युती करण्यासाठी भाजपच अत्यंत आग्रही होता व शिवसेना खूपच थंड होती हे लक्षात घेतले तर भाजपनेच युती करण्यासाठी सेनेला, निदान मोघम स्वरूपात तरी, मुख्यमंत्रीपद व इतर काही अव्यवहार्य आश्वासने दिली असण्याची बरीच शक्यता दिसते. युती करून आपला आकडा १३० पर्यंत नेला की नंतर सेनेला लाथाडता येईल अशी त्यामागे योजना असू शकते. परंतु १०५ वरच विजयरथ रूतल्याने पुढची योजना फसली.
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Fri, 03/19/2021 - 16:18 नवीन
माझ्यामते सेनेला युती नकोच होती पण तोडण्याचे पातक डोक्यावर घ्यायचे नव्हते त्यामुळे जेव्हा सेनेचा अडीच वर्षाचा मुख्यमंत्री हा मुद्दा मांडला गेला तेव्हा मुख्यमंत्री म्हणुन आदीत्य ठाकरेंचे नाव पुढे केले गेले. हे हेतुपुर्रस्सर केले असावे कारण उध्दव जर आता मुख्यमंत्री होऊ शकतात तर तेव्हाही ते काही सोवळ्यात नव्हते पण मुद्दामुन ज्युनिअर ठाकरेंचे नाव पुढे नाचवत ठेवले. कारण हा पर्याय भाजपाला सोडा सेनेतल्या बहुतेकांना मान्य नसणार. कारण तसे जर असते तर तिघाडीचा मुख्यमंत्री म्हणुनही आदित्य ठाकरेंच्या नावावरच सेना ठाम राहिली असती. पण इथे काका बिलंदर निघाले. उध्दवजींना कमरेचे सोडुन डोक्यावर घ्यायची अट टाकली आणि आतापावेतो भाजपाशी काडीमोड घ्यायला संधी बघणार्या उध्दवजींनी ती लगोलग मान्य केली.(निवडणुकीआधी कधीतरी अमित शाह मुंबईला आले होते तेव्हा त्यांच्याशी चर्चा करायला स्वतः उद्धव ठाकरे न जाता आदित्य ठाकरेंना पाठवले गेले होते. हा ही भाजपाचा पाणउतारा करण्याचा प्रयत्न असणार पण भाजपाने हे सर्व होऊनही युती तोडली नाही.) फडणवीस आणि काकांमधला फरक हा एक नवशिक्या शिकारी आणि अनुभवी शिकारी ह्यामधल्या फरकासारखा आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 03/19/2021 - 16:29 नवीन
.(निवडणुकीआधी कधीतरी अमित शाह मुंबईला आले होते तेव्हा त्यांच्याशी चर्चा करायला स्वतः उद्धव ठाकरे न जाता आदित्य ठाकरेंना पाठवले गेले होते. हा ही भाजपाचा पाणउतारा करण्याचा प्रयत्न असणार पण भाजपाने हे सर्व होऊनही युती तोडली नाही) ते २०१४ मध्ये. तेव्हा अमित शहा नव्हते. राज्य पातळीवरील भाजप नेत्यांशी जागावाटपाच्या चर्चेला आदित्य गेला होता. माझ्या मते फडणवीस भाजपतील पवार आहेत व चंपा भाजपतील राऊत आहेत.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Fri, 03/19/2021 - 07:22 नवीन
@चंद्रसूर्यकुमार, पूर्णविराम दिलात हे बरे केले. :)
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 03/18/2021 - 19:22 नवीन
ज्या नागपूर मधील पश्चिम ,दक्षिण विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. त्या मतदार संघात त्यांचा स्वतःचा प्रभाव किती आहे आणि पक्षाचा प्रभाव किती आहे. तो मतदार संघ त्यांच्या साठी सुरक्षित आहे का? त्यांना त्या मतदार संघात किती किंमत आहे! उद्या bjp नी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला तर ते त्या मतदार संघात निवडून येवू शकतात का? ह्याची उत्तर नाही असतील तर bjp त्यांचे पंख कधी ही chhatu शकते.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 03/18/2021 - 16:51 नवीन
आपले निरीक्षण योग्यच वाटत आहे... फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर, खडसे यांनी काय केले? हे सगळ्यांनाच माहिती आहे. अशी माणसे, कुठल्याही पक्षांत नकोतच.. स्वतःच्या घरातील मंडळींना उभेदवारी मिळावी, म्हणून खडसे यांनी किती जणांना लग्गा लावला, हेही सगळ्यांना माहिती आहे.. सत्तेसाठी, भाजपने दिलेले सगळे विसरून, मतदारांना फाट्यावर मारून, खडसे राष्ट्रवादीत गेले, हे पण सगळ्यांना माहिती आहे... आता CD लावतीलच, असे वाटते...
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/18/2021 - 17:34 नवीन
>>> फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर, खडसे यांनी काय केले? हे सगळ्यांनाच माहिती आहे. अशी माणसे, कुठल्याही पक्षांत नकोतच.. नक्की काय केले? अरे हो विसरलोच. मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त करण्याचा अक्षम्य दंडनीय अपराध केला होता की. >>> स्वतःच्या घरातील मंडळींना उभेदवारी मिळावी, म्हणून खडसे यांनी किती जणांना लग्गा लावला, हेही सगळ्यांना माहिती आहे.. प्रत्येक जण तेच करतात. त्यांनी स्वतःच्या मतदारसंघातच उमेदवारी मागितली होती. चंपासारखा आयत्या बिळावर नागोबा बनून दुसऱ्यांंच्या मतदारसंघावर डल्ला मारला नव्हता ना. राधाकृष्ण विखे पाटलांनी, राणेंनी मुलासाठी व स्वतःसाठी काय केले ते माहिती असेलच. त्यांना तर भाजपत येण्यासाठी लाल पायघड्या पसरल्या होत्या. >>> सत्तेसाठी, भाजपने दिलेले सगळे विसरून, मतदारांना फाट्यावर मारून, खडसे राष्ट्रवादीत गेले, हे पण सगळ्यांना माहिती आहे... ते उघड उघड सांगून बाहेर पडले. पक्षाने पूर्णपणे वाळीत टाकल्यानंतर त्यांनी दुसरे काय करणे अपेक्षित होते? फडु त्यांना संपवित असताना पक्षाने संपूर्ण दुर्लक्ष केल्यानंतर बाहेर पडणे हा एकच मार्ग शिल्लक होता. बाकी मतदारांना वारंवार कोणी फाट्यावर मारले हे माहिती असेलच.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Fri, 03/19/2021 - 02:09 नवीन
जनतेने निवडुन दिलेल्या नगर्सेवकांनी असा बदल केला तर ती लोकशाही ची थट्टा नाही का? माझ्या मते अशा केसेस मधे नवीन निवड्णुका घ्यायला हव्यात. पक्ष कोणताही असो.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 03/19/2021 - 02:35 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 03/19/2021 - 08:46 नवीन
फक्त नगरसेवक नको. आमदार, खासदार किंवा एखाद्या पक्षाने विरूद्ध पक्षाला मदत केली किंवा विरूद्ध पक्षाची मदत घेतली तरी नव्याने निवडणुक व्हावी.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 03/18/2021 - 10:36 नवीन
उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तिरथसिंग रावत यांच्या रूपात भाजपला आणखी एक बिप्लब देब सापडलेला दिसतो. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब फालतू बडबड करून आपले नाव बातम्यांमध्ये राहिल याची काळजी मधूनमधून घेत असतात. त्याप्रमाणे आता तिरथसिंग रावत यांनी 'फाटक्या जीन्स घातलेल्या स्त्रिया आपल्या मुलांवर काय संस्कार करत असतील' असे विधान काही कारण नसताना केलेले आहे. अपेक्षेप्रमाणे स्त्रियांच्या संघटना त्यांच्यावर तुटून पडल्या आहेत. काय गरज होती त्यांना फालतू काहीतरी बोलायची? असे काही बोलणे हे उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या के.आर.ए मध्ये येते का?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 03/18/2021 - 11:12 नवीन
अशीच व्यक्तव्ये भोगावी लागतात.... सामान्य माणसाने, असे बोलले तरी चालते, पण पदावर असलेल्या व्यक्तीने, पदाचा योग्य तो मान, राखलाच पाहिजे...
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 03/18/2021 - 14:31 नवीन
संदर्भ लक्शात घेता सयुक्तिकच बोलले अस वाटेल. कुठल्यातरी ड्रग निवारण शिबिराचा समारंभात बोलत होते ते. संस्काराच्या मुद्यावर बोलतांना मातोश्री फाटकी जीन्स घालुन फिरताहेत तर पोरांवर कितपत संस्कार होतिल अश्या आशयाचं बोलले. आता आपण तेवढंच हाय्लाईट केलं.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/18/2021 - 11:38 नवीन
https://m.lokmat.com/national/if-farm-laws-not-repealed-then-we-will-target-corporate-godowns-rakesh-tikait-warns-govt-a719/ आपले तथाकथित आंदोलन डब्यात गेल्याचे वैफल्य आलेले दिसतंय.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 03/18/2021 - 12:01 नवीन
ही साधी गोष्ट आहे ....
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 03/18/2021 - 14:32 नवीन
बोलत राहीलेत तर टिकेत सरळ हिंसेला चिथावणी देताय म्हणुन आत टाकतील!
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० गुरुवार, 03/18/2021 - 15:04 नवीन
व्यापाऱ्यांची गोदामेच शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्यात अडथळा आणतात. ह्यात केंद्र सरकार मदत करते. हमीभाव देण्याचे लेखी आश्वासन देता येत नसेल कोण सरकारवर विश्वास ठेवेल? कांद्याचे भाव वाढले होते तेव्हा ह्याच सरकारने जीवनावश्यक वस्तू कायदा बासनात गुंडाळून कांदा आयात केला, तोपर्यंत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याकडून स्वस्तात घेतलेला कांदा चाळीत साठवून भरमसाठ नफा कमावला होता.
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब गुरुवार, 03/18/2021 - 15:19 नवीन
आग्या जी. हमीभावाचा विषय काढलाय म्हणून सांगतो. - आजवर हमीभावाबाबत कोणताही कायदा नव्हता. सरकार मग ते काँग्रेस असो वा BJP दोघांनीही हमीभाव दिला ( कोणी कमी आणि कोणी जास्त हा मुद्दा इथे नको ) पण कोणताही कायदा किंवा लेखी आश्वासन नव्हते. मोदी सरकारने हमीभावाबाबत लेखी आश्वासन आणि कायदा करण्याचे मान्य केले आहे. पण तरीही आंदोलक नवीन आलेले तीनही कायदे रद्द करूनच पाहिजेत त्याशिवाय आम्ही हटणार नाही अशी आडमुठी भूमिका घेऊन आंदोलनाच्या नावाखाली काहीबाहि चाळे करत आहेत.. अजुन एक. मोदी सरकारने कायदयामंध्ये आवश्यक ती सुधारणा करण्याचे मान्य केले होते तसेच काही काळासाठी कायदे स्थगित करण्याचा देखील प्रस्ताव ठेवला होता पण यांना कायदे रद्द करण्याशिवाय दुसरे काहीही नको.. आता तुम्हीच ठरवा हट्टवादी भूमिका कोण घेतेय. कोण विनाकारण सरकार आणि जनतेला वेठीस धरतेय आणि त्याआडून आपला छुपा अजेंडा पुढे रेटतेय. असो यावर याआधीच व्यापक चर्चा झाली आहे आणि मला पुन्हा त्याच विषयावर मिपावरच्या सो कॉलड लिबरल आणि डाव्या लोकांशी वाद घालायची इच्छा नाही धन्यवाद.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 03/18/2021 - 15:37 नवीन
कुठला भारतीय शेतकरी, खलिस्तान जिंदाबाद आणि पाकिस्तान जिंदाबाद,... अशा घोषणा देईल?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 03/18/2021 - 15:59 नवीन
आंदोलन बदनाम करण्यासाठी सत्ता धारी करतात. खलिस्तान जिंदाबाद चे घोषणा देणारे bjp कार्यकर्ते आणि सरकार चे दलाल होते. अलग्वादी चळवळी चालवणारे घोषणा देत नाहीत. तर सर्व गुप्त चालू असते. एवढे सामान्य न्यान तुम्हाला नाही. कसाब मुंबई मध्ये आला तो न्यूज चॅनल ,न्यूज पेपर मध्ये जाहिरात देवून आला होता का. की पाकिस्तान मध्ये कसाब नी मोर्चा काढून मुंबई मध्ये चाललो आहे अशा घोषणा दिल्या होत्या.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 03/18/2021 - 18:29 नवीन
ते कसे चुकीचे आहे ह्या वर चर्चा होणे आरोप होणे गैर नाही.पण ते देश द्रोही आहेत,पाकिस्तान चे हस्तक आहेत हे आरोप म्हणजे मूर्खपणा आहे. खलिस्तान जिंदाबाद च्या घोषणा दिल्या गेल्या .हे पण निंदनीय आहे.काही लोकांनी असे केले म्हणजे पूर्ण आंदोलन पाकिस्तान पुरस्कृत आहे असे ठरवणे चुकीचे आहे. पाकिस्तान चा शेतकरी आंदोलनात सहभाग असेल तर सरकार नी कारवाई करावी. अजुन एका पण व्यक्ती ला अटक का झाली नाही. कोर्टात देशद्रोही लोक विरूद्ध केस का दाखल झाली नाही. हा प्रश्न उपस्थित होतोच
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० गुरुवार, 03/18/2021 - 15:51 नवीन
मोदी सरकारने हमीभावाबाबत लेखी आश्वासन आणि कायदा करण्याचे मान्य केले आहे. कसं बोललात? आता हमीभाव कायदा संसदेत मंजूर का करून घेत नाहीत. बाकीच्या कायद्यांवर नंतर बोलू.
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब गुरुवार, 03/18/2021 - 16:05 नवीन
पुन्हा चर्चा त्याच अंगाने जातं असल्याने आणि नेहमीचे खेळाडू आपला उद्योग ( BJP विरुद्ध गरळ ओकणे ) करायला सुरवात करत असल्याने आपला पास.. ज्यांना गरज आहे ते जाऊन जुन्या चर्चा वाचून पाहतील.. नाही समजले तरी माझ्या बापाचं काय जातंय.. कायदे BJP शष्प रद्द करत नसते. ते कडबोळीच सरकार नसून स्पष्ट बहुमतातातील सरकार आहे.. आंदोलनाआडून चाललेले यांचे देशविरोधी धंदे पूर्ण जग पाहतेय आणि आंदोलन करणारे नेमके कोण महाभाग आहेत ते देखील स्पष्ट दिसतेय. धन्यवाद. !! रामराम.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० गुरुवार, 03/18/2021 - 16:12 नवीन
कायदा/ कायदे मागे घ्या असे मी म्हणतच नाही. बहुमतातील सरकार संसदेत हमीभाव कायदा मंजूर का करून घेत नाही.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे गुरुवार, 03/18/2021 - 17:33 नवीन
शेतमालासाठी असा कायदा शक्य नाही. कारण शेतमालाची सर्वांना मान्य होईल अशी प्रतवारी करणे शक्य नाही. उदा, एखाद्या मोबाईल कंपनीचा एखादा मॉडेल ह्याचे वजन ,प्रोसेसर मेमरी इत्यादी गोष्टी ह्या निश्चित करता येतात आणि ग्राहकाला त्या तपासून ही पाहता येतात आणि कंपनीला त्याचे उत्पादन ही घेता येते. परंतु शेती मध्ये हे शक्य नाही. समजा उद्या कांद्याला हमीभाव चा कायदा केला तर त्याची प्रतवारी काशी करणार? एका शेतकऱ्याच्या चांगल्या कांद्याला हमीभाव मिळाला ते बघून दुसरा शेरकरी आपले कमी प्रतीचे कांदे घेऊन गेला तर त्यालाही हमीभाव द्यावा लागेल. त्यामुळे मागणी तसा पुरवठा हेच तत्व शेतीसाठी योग्य आहे.
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब गुरुवार, 03/18/2021 - 19:36 नवीन
बरोबर. हमीभाव हे वादग्रस्त आणि बिनडोक प्रकरण आहे. रात्रीचे चांदणे यांनी बरोबर उदाहरण दिले आहे. आणखी एक उदाहरणं. तांदूळाच्या शेकडो जाती अव्हेलेबल आहेत. अगदी 10-15 रु किलो पासून 100-200 रुपये किलो असे त्यांचे दर आहेत. मग हमीभाव देताना नेमका किती द्यायचा?? फक्त तांदूळ म्हणले कि अमुक एक हमीभाव असं नाही ठरवता येणार. आणि हमीभाव आहे म्हणून कोणी कोलम, बासमती किंवा इंद्रायणी तांदूळ मार्केट यार्ड ला घेऊन जात नाही. तिकडे निकृष्ट किंवा हलक्या प्रतीचा तांदूळ घेऊन जाऊन शेतकरी हमीभावाचे पैसे लाटतात. पंजाबी आणि हरियाणा राज्यातील शेतकरी अश्या प्रकारची लूट करण्यात आघाडीवर आहेत. सहना जी यांनी या आणि असल्या निर्ल्लज्ज प्रकारावर सडेतोड धागा ऑलरेडी काढला होता काही दिवसापूर्वी.. असो ज्यांना समजून च घ्यायचे नाही त्यांच्यासमोर बडबड करून काय फायदा.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 03/19/2021 - 02:02 नवीन
हे अजून एक उदाहरण आहे...
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Fri, 03/19/2021 - 07:00 नवीन
मोदी सरकारने हमीभावाबाबत लेखी आश्वासन आणि कायदा करण्याचे मान्य केले आहे. एकदा आपण असे म्हणतात आणि आता हमीभाव हे वादग्रस्त आणि बिनडोक प्रकरण आहे असे म्हणता. मग बहुमतातील सरकार हमीभाव कायदा करण्याचे मान्य करून गोंधळात भर टाकत आहे असे वाटत नाही का? सरकारने कृषिसाठी पायाभूत सुविधांवर अधिक भर देऊन शेतकऱ्यांना उत्पादन, साठवण आणि विक्रीसाठी मार्गदर्शन करायला हवे ,ज्याला स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीत प्राधान्यक्रम दिला आहे. हमीभाव आणि शेतकऱ्याच्या खात्यात ठरावीक रक्कम टाकून सरकारवर आर्थिक बोजा वाढतो आणि मूळ समस्या आहे तेथेच राहतात. हाच पैसा सरकारने वरील कामावर खर्च केल्यास कालांतराने आता जे तीन कृषी कायदे केले त्यांचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो. सध्यातरी ह्या कायद्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होऊ शकत नाही. शेतकरी संघटना शेतकऱ्याला पंगू बनवतेय आणि केंद्र सरकार त्याला उद्योगपतींच्या जाळ्यात टाकून जबाबदारी टाळत आहे . सगळाच सावळा गोंधळ चाललाय.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा