Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग २)

च
चंद्रसूर्यकुमार
Fri, 03/05/2021 - 12:51
🗣 164 प्रतिसाद
आधीच्या भागात जवळपास २०० प्रतिसाद होत आले आहेत म्हणून नवा भाग काढत आहे. पूर्वीच्या भागातील एखाद्या प्रतिसादावर काही लिहायचे असल्यासच त्या भागात लिहावे अन्यथा या भागात लिहावे ही विनंती. इतके सगळे प्रतिसाद झाल्यानंतर नवे प्रतिसाद पुढच्या पानावर जाऊन वाचायला अडचण येते. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांच्या कलकत्ता शहरातील भवानीपूर या विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुक न लढवता पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढविणार आहेत. एखादा माणूस इरेला पेटला तर तो कशी चूक करतो याचे हे एक उदाहरण आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बंगालमधून तृणमूल काँग्रेसला २२, भाजपला १८ तर काँग्रेसला २ लोकसभेच्या जागा मिळाल्या. भाजपची राज्याच्या मध्य आणि उत्तर भागात कामगिरी खूपच चांगली होती. पण राज्याच्या दक्षिण भागात तृणमूलने विजय मिळवला होता. विकीपीडीयावरून घेतलेल्या या नकाशावरून आपल्याला अधिक चांगली कल्पना येईल. bengal या नकाशात चौकटीत कलकत्ता शहरातील लोकसभा मतदारसंघ आहेत तर ३० आणि ३१ क्रमांकाचे अनुक्रमे तामलूक आणि कंठी मतदारसंघ आहेत. तर १९ आणि २० क्रमांकाचे अनुक्रमे जॉयनगर आणि मथुरापूर हे लोकसभा मतदारसंघ आहेत. या सगळ्या दहाच्या दहा मतदारसंघांमध्ये २०१९ मध्ये तृणमूलने विजय मिळवला होता. यावरून बंगालचा दक्षिण भाग तृणमूलसाठी किती महत्वाचा आहे याची कल्पना येईल. तामलूक मतदारसंघातून २००९ आणि २०१४ मध्ये तृणमूलचे नेते शुभेंदू अधिकारी जिंकले होते. ते २०१६ मध्ये नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून बंगाल विधानसभेवर निवडून गेले आणि ममतांच्या मंत्रीमंडळात मंत्री झाले. २००६ मध्ये सिंगूर आणि नंदीग्राम मध्ये जमिन संपादनाविरूध्द ममतांनी लढा उभा करून नंतर डाव्यांची ३४ वर्षे जुनी राजवट जमिनदोस्त करून टाकली होती. त्या नंदीग्राममध्ये शुभेंदू अधिकारी आंदोलनात पुढे होते. २०१६ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी चांगली ६७% मते घेऊन दणदणीत विजय मिळवला होता. हा नंदीग्राम विधानसभा मतदारसंघ शुभेंदू अधिकारी पूर्वी निवडून गेले होते त्या तामलूक लोकसभा मतदारसंघात येतो. शुभेंदू अधिकारी विधानसभेवर निवडून गेल्यानंतर त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि त्या जागेवर शुभेंदूंचे बंधू दिब्येंदू अधिकारी पोटनिवडणुकीत निवडून आले. तामलूकच्या शेजारी असलेल्या कंठी लोकसभा मतदारसंघातून २००९ पासून शुभेंदू-दिब्येंदू या बंधूंचे वडील शिशिर अधिकारी लोकसभेवर निवडून येत आहेत. तेव्हा सांगायचा उद्देश म्हणजे नकाशात दाखविलेल्या ३० आणि ३१ या मतदारसंघांच्या क्षेत्रात या अधिकारींची पकड चांगली आहे. त्याच मतदारसंघांच्या बाजूला असलेल्या ३४ (मेदिनीपूर- पूर्वीचे मिदनापूर) मतदारसंघातून भाजपचे बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष २०१९ मध्ये लोकसभेवर निवडून गेले. त्या बाजूलाच असलेल्या ३३ (झारग्राम), ३५ (पुरूलिया), ३६ (बांकूडा) आणि ३७ (विष्णूपूर) या लोकसभेच्या जागाही भाजपनेच जिंकल्या होत्या. या सगळ्या जागा राज्याच्या मध्य आणि पश्चिम भागातील आहेत. डिसेंबर २०२० मध्ये या शुभेंदू अधिकारींनी ममतांच्या मंत्रीमंडळातून राजीनामा देऊन भाजपत प्रवेश केला. त्यामुळे भाजपला २०१९ मध्ये राज्याच्या ज्या दक्षिण भागातून फार यश मिळाले नव्हते त्या भागात या अधिकारींच्या मदतीने हातपाय रोवायची संधी भाजपला मिळणार आहे. अशावेळी ममता बॅनर्जी इरेला पेटून शुभेंदू अधिकारींविरूध्द त्यांच्या नंदीग्राम मतदारसंघातून निवडणुक लढवणार आहेत. हा मतदारसंघ आणि आजूबाजूचा तामलूक लोकसभा मतदारसंघात येणारा भाग या अधिकारींचे प्रभावक्षेत्र आहे. तसेच बाजूलाच पश्चिमेला भाजपचे प्रभावक्षेत्र आहे. अशावेळी इरेला पेटून स्वतःचा हक्काचा भवानीपूर विधानसभा मतदारसंघ सोडून आपल्या प्रतिस्पर्ध्याविरूध्द लढायला त्याच्याच प्रभावक्षेत्रात ममतांनी जायची काही गरज आहे का? खरं तर मुख्यमंत्री वगैरेंना स्वतःच्या मतदारसंघाची कधी काळजी नसते त्यामुळे ते राज्याच्या इतर भागात पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करायला मोकळे असतात. आणि तृणमूल काँग्रेस मते ममतांच्या नावावर मागणार असेल तर स्वतः ममतांनी प्रचारात मोठा भाग घ्यायला हवा. अर्थात बंगालमध्ये ८ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे तेव्हा नंदीग्राममध्ये नक्की कधी मतदान होणार आहे हे बघायला हवे. पण निदान काही दिवस तरी ममता आपल्याच मतदारसंघात अडकणार आहेत. त्यातून शुभेंदू अधिकारींनी ममतांना हरवले तर ममतांच्या भविष्यातील राजकारणाला मोठा धोका पोहोचेल. आणि ममता जिंकल्या तरी त्याची किंमत मोठी भरावी लागणार आहे. वास्तविक पक्षाचे सर्वोच्च नेते आपल्याला गमावण्यासारखे फार काही नसेल तरच अशा मोठ्या लढाया लढायला जातात. उदाहरणार्थ राममनोहर लोहियांनी जवाहरलाल नेहरूंविरूध्द निवडणुक लढवली होती किंवा केजरीवालांनी शीला दिक्षित यांच्याविरूध्द निवडणुक लढवली होती. असे असताना इतके इरेला पेटायचे कारण समजत नाही. बघू पुढे काय होते ते. घोडामैदान जवळच आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 46774 views

🗣 चर्चा (164)
क
कंजूस Fri, 03/05/2021 - 13:00 नवीन
कांग्रेस का कामुनिस्ट? टाटाला विरोध केला त्यात फायदा राजकीय का आर्थिक?
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 03/05/2021 - 13:01 नवीन
आल्यावर दुसरे पान उघडा.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 03/05/2021 - 13:20 नवीन
खरं तर १४०+ प्रतिसाद झाल्यानंतर १५० प्रतिसाद होण्यापूर्वी नवीन धागा सुरू केल्यास नवीन पानावर प्रतिसाद जाणार नाहीत.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 03/05/2021 - 13:26 नवीन
काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानींंच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ मिळाली होती. ती स्कॉर्पिओ चोरीची होती असे नंतरच्या तपासात निष्पन्न झाले होते. जैश उल हिंद नावाच्या संघटनेने ती गाडी ठेवल्याचे एका सामाजिक माध्यमातील पोस्टवर कोणी तरी लिहिले होते. नंतर या संघटनेने त्यात आपला हात असल्याचे नाकारले. काल रात्रीपासून गाडीचा मालक मनसुख हिरेन बेपत्ता होता व आज सकाळी त्याचा मृतदेह सापडला. एकंदरीत हे प्रकरण बरेच रहस्यमय दिसते. संजय राठोड प्रकरणातील धुरळा खाली बसण्याच्या आतच भाजपच्या हातात नवे प्रकरण आले आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 03/05/2021 - 13:33 नवीन
https://www.loksatta.com/maharashtra-news/bjp-devendra-fadanvis-mukesh-ambani-explosive-car-mansukh-hiren-dead-body-thane-sgy-87-2414585/
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 03/05/2021 - 13:53 नवीन
मुकेश अंबानी ह्यांच्या घराबाहेर स्फोटकानी भरलेली गाडी सापडली होती, त्या गाडीच्या मालकाचा मृतदेह ठाणे येथे रेतीबंदर खाडीत सापडला. गाडी १७ तारखेला चोरी झाली होती. 'स्टीयरिंग व्हील जॅम झाले होते म्हणून गाडी तशीच सोडुन मी दुसर्या दिवशी पाहतो तर गाडी नव्हती' असा खुलासा हिरेन ह्यांनी टी.व्हीवर दिला होता. आता स्टीयरिंग व्हील जॅम झालेली गाडी दुरुस्त केली व नंतर चोरी केली? https://www.businesstoday.in/current/economy-politics/mansukh-hiren-whose-car-was-used-to-plant-gelatin-sticks-threat-letter-outside-antilia-found-dead/story/433093.html
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 03/05/2021 - 13:56 नवीन
https://www.loksatta.com/mumbai-news/bjp-devendra-fadanvis-reliance-mukesh-ambani-explosives-sachin-waze-thane-crawford-market-sgy-87-2414520/lite/
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 03/05/2021 - 15:20 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Din Mahine Saal Gujarte jayege... :- Avatar
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 03/05/2021 - 16:07 नवीन
https://www.loksatta.com/maharashtra-news/devendra-fadnavis-slams-uddhav-thackeray-government-says-there-is-big-corruption-in-covid-center-work-scsg-91-2411861/ आता काय बोलणार?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 03/05/2021 - 16:51 नवीन
आणि प्रतेक जन न्यूज वाचत असतो परत त्या लिंक वाचायचा कंटाळा येतो. न्यूज chya लिंक देण्या पेक्षा स्वतःची मत काय आहेत ते मांडा ती तुमची मतं वाचायला आवडतील. मीडिया trial मध्ये कोणालाच इंटरेस्ट नाही
  • Log in or register to post comments
स
सॅगी Fri, 03/05/2021 - 16:54 नवीन
Rate Cut प्रति युनिट सरासरी २ पैशांची दणदणीत कपात केल्याबद्दल महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्रातील जनतेचे हार्दीक अभिनंदन!!!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 03/05/2021 - 17:10 नवीन
शेतकरी वर्गाच्या तोंडाला पाने पुसून झाली आहेत, आता सामान्य माणसासाठी, वीज दरात कपात केली आहे... शांतपणे आयुर्वेदिक कोंबडी खा आणि बरे वाटत नसेल तर,कंपाउंडर कडून औषध घ्या.करोना समोरून हल्ला करतो, त्याची काळजी घ्या...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 03/05/2021 - 17:07 नवीन
आज तब्बल १० हजारावर नवीन रुग्णांची भर https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-reports-10216-new-covid19-cases-6467-discharges-and-53-deaths-in-the-last-24-hours/articleshow/81352464.cms आता जबाबदार कोण? आधी म्हणाले की, तुम्ही खबरदारी घ्या, मी जबाबदारी घेतो...
  • Log in or register to post comments
स
सॅगी Fri, 03/05/2021 - 17:12 नवीन
आपली जबाबदारी आपणच घ्यायची.... . . . "ते" फक्त दसरा मेळाव्यातली भाषणे सगळीकडे देणार, "त्यांची" जबाबदारी तेवढीच...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 03/06/2021 - 05:54 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 03/05/2021 - 17:35 नवीन
सुशांतसिंग राजपूत प्रकरण, धनंजय मुंडे प्रकरण याप्रमाणे मनसुख हिरेन या प्रकरणातूनही भाजपच्या हाती फारसे काही लागण्याची शक्यता नाही.
  • Log in or register to post comments
प
पिनाक Sat, 03/06/2021 - 05:21 नवीन
हाती लागणे वगैरे महत्वाचे नसते.सक्षम विरोधी पक्षाची भूमिका भाजप पार पाडते आहे. ते महत्वाचे आहे. शिवाय जनतेला लक्षात येते आहे की कायदा आणि सुव्यवस्था राज्यात काडीमात्र उरलेली नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 03/06/2021 - 05:59 नवीन
भाजप करतोय तो सक्षम विरोध वगैरे नसून ठाकरेंना अडचणीत आणणे व हे सरकार पाडणे हा एकमेव उद्देश त्यामागे आहे. सुशांतसिंह रजपूत प्रकरणात भाजपने आदित्य ठाकरेचा संबंध जोडून आकाशपाताळ एक करून ठाकरेंना अडचणीत आणण्याचा जोरदार प्रयत्न केला. त्यामागे हाच एकमेव उद्देश होता. पण तो प्रयत्न पूर्ण फसला. पालघर साधू हत्याकांड, धनंजय मुंडे ही प्रकरणे सुद्धा पूर्ण फसली. संजय राठोडने चुका केल्या नसत्या तर ते प्रकरण सुद्धा फसले असते. मुळात या प्रकरणातील विरोधामागे भाजपची भूमिका प्रामाणिक विरोधाची नाही हे जनता सुद्धा ओळखून आहे. केवळ विरोधासाठी विरोध करण्यासाठी भाजप फुसक्या प्रकरणात आकांडतांडव करीत आहे. मागील संपूर्ण वर्षात मुलांच्या शिक्षणाची पूर्ण वाट लागली आहे. महाविद्यालयांंच्या परीक्षा, स्पर्धापरीक्षा, महाविद्यालयातील प्रवेश हे पूर्ण ठप्प आहेत. अशा खऱ्याखुऱ्या समस्यांवर भाजपने भूमिका घेतली तर नक्कीच उपयोग होईल. परंतु भाजपला खऱ्या समस्यांंवर बोलण्याऐवजी अशा सनसनाटी प्रकरणात तेल ओतून ठाकरेंना अडचणीत आणण्यातच रस आहे. परंतु त्याच्याशी जनतेला घेणेदेणे नाही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 03/06/2021 - 06:04 नवीन
शिवसेना स्वतः होऊन आपली, मराठी आणि हिंदुत्वाची, कवचकुंडले उतरवत असतांना, कोण झाकायला जाईल? भाजप फक्त ती कवचकुंडले उतरलेली दाखवत आहे... पुढच्या प्रत्येक निवडणूकीत, शिवसेनेला कॉंग्रेस फरफटत नेणार... मुंबई महानगर पालिकेत समजेलच...
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Sat, 03/06/2021 - 07:07 नवीन
पुढील निवडणुकीत कदाचित शिवसेनेला प्रचंड तोटा होईल पण भाजपला जास्त काही फायदा होणार नाही.राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोघांनाही अतिरिक्त फायदा मिळेल असे वाटते. हे म्हणजे पंचतंत्रातल्या आपल्या बेडुक जातभाईंना धडा शिकवायला सापाला बोलावणे धाडण्यासारख्या गोष्टीसारखे झालेय.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 03/06/2021 - 07:13 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Sat, 03/06/2021 - 07:26 नवीन
पुढील निवडणुकीत कदाचित शिवसेनेला प्रचंड तोटा होईल पण भाजपला जास्त काही फायदा होणार नाही.
तसे होईल असे वाटते. भाजप ११५-१२० पर्यंत गेल्यास आणि सेना १५-२० मध्ये आटोपल्यास परत काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येऊन राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बनू शकतो. शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बनलेला कधीही परवडले. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे १५ वर्षे सरकार होते पण सरकारविरोधात बोलल्यास नेव्ही अधिकार्‍याला मारहाण होणे, जेसीबी आणणे वगैरे प्रकार कधी घडलेले नव्हते. शिवसेनेचे अस्तित्व हाच महाराष्ट्राच्य राजकारणाला लागलेला कलंक आहे. तो लवकरात लवकर मिटायला हवा. इतकी वर्षे वाजपेयी-अडवाणी शिवसेनेला महत्व देत होते म्हणून शिवसेना कधीच आवडत नसतानाही शिवसेनेचे समर्थन करावे लागत होते. नशीबाने शिवसेना उमेदवाराला मत द्यायचा प्रसंग कधी आला नाही. मला वाटते एम.आय.एम/मुस्लिम लीग/पीडीपी वगैरे पक्षच फक्त शिवसेनेपेक्षा वाईट आहेत बाकी कोणताही पक्ष शिवसेनेपेक्षा चांगलाच आहे. त्यामुळे दगडापेक्षा वीट मऊ म्हणून राष्ट्रवादीचे सरकार आलेले कधीही परवडेल. काँग्रेसचे इतके वर्षे मुख्यमंत्री असताना राज्यपालांच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावर ठाकरेंनी जे किळसवाणे भाषण करून लाज आणली तसे कधी केले नव्हते.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 03/06/2021 - 07:43 नवीन
मुंबई आणि ठाणे, आणि थोड्या प्रमाणात, कोकणांत आहे.... त्यामुळे आता, शिवसेनेचा मुख्यमंत्री होणे कठीण आहे.... मुख्यमंत्री पदाची एक वेगळी भाषा आणि देहबोली असते, हे शिवसेनेला कधीच समजणार नाही...
  • Log in or register to post comments
प
पिनाक Sat, 03/06/2021 - 07:54 नवीन
शिवसेना हा किळसवाणा पक्ष झालेला आहे. आता भाजप ने शिवसेनेबरोबर युती केली तर मी राष्ट्रवादी ला मत देईन. आणि जर काँग्रेस चा candidate उभा असेल तर मग नोटा.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 03/06/2021 - 08:00 नवीन
नोटा, हा उत्तम पर्याय आहे
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Sat, 03/06/2021 - 09:44 नवीन
नोटा हा कधीही उत्तम पर्याय ठरु शकत नाही कारण नियमानुसार नोटाची मते जास्त असतील तर दुसर्या क्रमांकाच्या उमेदवाराला विजेता घोषित केले जाते.
  • Log in or register to post comments
र
रंगीला रतन Sat, 03/06/2021 - 10:07 नवीन
सहमत. त्यामुळे मला पण तो पर्याय आवडत नाही.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 03/06/2021 - 08:03 नवीन
नोटा चा विचार नोटा च बदलतात.नोटा मध्ये खूप ताकत आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 03/06/2021 - 08:51 नवीन
शिवसेना हा किळसवाणा पक्ष झालेला आहे. + ९९९९९९९९९ . . . जन्मापासून हा पक्ष असाच आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 03/06/2021 - 08:49 नवीन
शिवसेनेचे अस्तित्व हाच महाराष्ट्राच्य राजकारणाला लागलेला कलंक आहे. + ९९९९९९९९ . . . हा कलंक १९८९ पर्यंत मुंबईतील काही प्रभागांपुरता मर्यादित होता. परंतु संपूर्ण महाराष्ट्राच्या भाळी हा कलंक वारंवार थापण्याचा अपराध भाजपचाच आहे.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Sat, 03/06/2021 - 09:55 नवीन
संपूर्ण महाराष्ट्राच्या भाळी हा कलंक वारंवार थापण्याचा अपराध भाजपचाच आहे.
नक्कीच. याबद्दल भाजप नेत्यांनी खरं तर महाराष्ट्राची जाहीर माफी मागायला हवी.
  • Log in or register to post comments
स
स्वलिखित Sat, 03/06/2021 - 15:38 नवीन
पण ज्या लेव्हल वर जाऊन शिवसेनेला शिव्या द्यायचा कार्यक्रम या धाग्यावर चालू झालाय , जर कुण्या सेनेच्या नेत्याने पाहिले तर मिसळपाव अडचणीत येऊ नये , भलेही मिपा सर्वांसाठी खुले आहे , आपली मते मांडू शकतात , पण ते सेनेचे अक्कलशुन्य नेते आहे , ते एका ऑफिसर च्या कानफाटात देऊ शकतात तर काहीही करू शकतात , (आमची बापुडी शंका दुसरे काय )
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Sun, 03/07/2021 - 03:57 नवीन
आयला म्हणजे मोदीना जाहीर शिव्या घातल्या तेव्हा कोणी मारायला येणार नव्हते वाटते? इतक्या थराला हे प्रकरण जाईल असे वाटले नव्हते.
  • Log in or register to post comments
स
स्वलिखित Sun, 03/07/2021 - 04:37 नवीन
असांसदीय शब्दांची यादी जाहीर झालीय , पप्पू , दीदी , बालबुद्धी , कुटुंब, भैया अशा शब्दावर संसदेत बंदी घातलीय , त्यामुळे राहुल ला( राहुल्याला) कोणत्या शब्दाने संबोधित करावे हा प्रश्न गोची करतोय , मोदी गरीबय ओ , 1. हाय हाय मोदी मर जा तू म्हणले तरी तो गप्प बसतो ,
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 03/07/2021 - 06:35 नवीन
राहुल गांधी यांना, परम पुज्य, असेच म्हणतो....
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 03/06/2021 - 08:58 नवीन
तसे होईल असे वाटते. भाजप ११५-१२० पर्यंत गेल्यास आणि सेना १५-२० मध्ये आटोपल्यास परत काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येऊन राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बनू शकतो. सेना एकटी लढली तर १५-२० पर्यंतच जाऊ शकते. परंतु सद्यस्थितीत भाजप युती करूनही तीन अंंकी आमदार निवडून आणू शकणार नाही. एकटा लढला तर सद्यस्थितीत भाजप फार तर ६० पर्यंत जाईल. मागील ३-४ वर्षात भाजपने आपले बरेच हक्काचे मतदार दुखावले आहेत. ते परत भाजपकडे आणण्यासाठी काही काळ लागेल व त्यासाठी महाराष्ट्रात नेतृत्वबदल करणे आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Sat, 03/06/2021 - 09:53 नवीन
सेना एकटी लढली तर १५-२० पर्यंतच जाऊ शकते. परंतु सद्यस्थितीत भाजप युती करूनही तीन अंंकी आमदार निवडून आणू शकणार नाही. एकटा लढला तर सद्यस्थितीत भाजप फार तर ६० पर्यंत जाईल.
आकड्यांचा मेळ लागत नाही. समजा भाजप ६० आणि सेना २० असे धरले. तसेच अपक्ष आणि इतर लहान पक्ष यांचे ३० आमदार धरले तरी काँग्रेस-राष्ट्रवादी वगळून ११० आमदार होतील. म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीला १७५-१८० जागा मिळतील असे म्हणायचे आहे? या दोन पक्षांना मिळून १९९९ मध्ये १३३, २००४ मध्ये १४० आणि २००९ मध्ये १४४ जागा मिळाल्या होत्या. महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाला/आघाडीला १८० जागा गेल्या ४० वर्षात एकदाही मिळालेल्या नाहीत. शिवसेना-भाजप युती यापुढे होणार नाही असे गृहित धरले तरी गेल्या सव्वा वर्षात घातलेल्या नंगानाचामुळे शिवसेनेचे हक्काचे मतदार काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा भाजपकडे वळतील असे वाटते. त्याप्रमाणेच भाजपचे मतदार कितीही दुखावले असले तरी फार तर मत देणार नाहीत किंवा नोटाला मत देतील पण काहीही झाले तरी शिवसेनेला किंवा काँग्रेस-राष्ट्रवादीला मत देणार नाहीत. तसेच अनेक वर्षे युतीमुळे शिवसेनेला दिले गेलेले कोथरूडसारखे मतदारसंघ भाजपने २०१४ मध्ये जिंकले होते. अशा अनेक मतदारसंघांमध्ये भाजपमुळे शिवसेनेला फायदा होत होता पण ती मते भाजप उमेदवारांनाच मिळतील. तेव्हा भाजप ६० मध्ये आटपेल हे मला तरी शक्य वाटत नाही. बघू काय होते ते.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 03/06/2021 - 10:13 नवीन
सद्यस्थितीत भाजप व सेना हे दोघेही स्वबळावर लढले तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी युती किमान बहुमत मिळवेल हे नक्की. १७५-१८० पर्यंत जाण्याची शक्यता बरीच कमी आहे. २०१९ मध्ये भाजप-सेना युतीला १६१ जागा होत्या. मधल्या २५-३० जागांचा फरक हा निवडणुकीच्या वेळी मनसे, सप, शेकाप सारखे लहान पक्ष कोणाशी युती करतील त्यावर ठरू शकेल. लागोपाठ २ निवडणुकीत पूर्ण वाट लागल्याने मनसे आता एकटे लढतील असे वाटत नाही. १९९५ मध्ये भाजप-सेना युतीला १३८ तर कॉंग्रेसला ८० जागा होत्या. उर्वरीत ७० जागा या शेकाप, जनता दल, सप, अपक्ष अशा अनेकांमध्ये विभागल्या गेल्या होत्या. पुढील निवडणुकीत लहान पक्षांचा वाटा तुलनेने बराच मोठा असू शकतो. २००९ मध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादी युतीला १४४ जागा होत्या. पण त्यावेळी सेना व भाजप युती होती. पुढील निवडणुकीत भाजप व सेना एकटे लढतील असे आतातरी वाटत आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी युती नक्की असणार. अशा परिस्थितीत या युतीला सर्वाधिक जागा मिळतील हे नक्की. कोणाला नक्की किती जागा मिळतील याचा अंदाज प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळीच येईल.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sat, 03/06/2021 - 10:34 नवीन
गुरूजी तुम्ही मतदान टक्केवारी वगैरेचा अभ्यास करता का?
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Sat, 03/06/2021 - 06:40 नवीन
तुमची काय अपेक्षा होती की मागच्या प्रत्येक प्रकारणावेळी सरकार पडेल? असं कुठं होत असतं का राव? प्रकरण फसली म्हणजे नेमकं काय झालं? थोडक्यात तुमची अपेक्षा असावी की अशाच प्रकरणात भाजप ने बोलावे ज्याने त्यांना सत्ता मिळेल नाहीतर बोलू नये आणि माझ्या मते ही विचित्र अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 03/06/2021 - 06:58 नवीन
सगळे पक्ष आपापली पोळी भाजून घेत आहेत 1. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने, शिवसेनेला उदारमतवादी बनवले 2. भाजप, विरोधी पक्षाची भुमिका व्यवस्थित मांडत आहे 3. 80% जनता, आपण शिवसेनेला मत दिले नाही, हे योग्यच केले, असे समजत आहे. शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळाले पण, अर्थखाते आणि गृहमंत्री खाते, ही महत्वाची खाती, शिवसेनेकडे नाहीत... आता शिवसेनेची मदार फक्त हाॅटेल्स आणि बाॅलीवूड, यांच्यावरच अवलंबून आहे.. पण तिथेही, इतर पक्षांचा सहभाग आहेच.... आता शिवसेनेची मदार आहे ती फक्त, फेरीवाले, रिक्षा संघटना आणि इतर संघटीत मतदारांवर, मराठी आणि हिंदू, असंघटीत मतदार शिवसेनेला मत देण्याची शक्यता कमीच आहे...
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 03/06/2021 - 07:16 नवीन
प्रकरणे फसली म्हणजे प्रचंड जोर लावूनही प्रकरणातून काहीही निष्पन्न झाले नाही. भाजपने खऱ्याखुऱ्या समस्यांवर बोलावे. अशा फालतू प्रकरणात ताकद वाया घालवू नये, अशी माझी अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Sat, 03/06/2021 - 10:09 नवीन
भाजप खऱ्याखुऱ्या समस्यांवर तर बोलतच आहे त्याव्यतिरिक्त ही अशी एरवी सहज दडपली गेली असती अशी प्रकरणे उचलून धरून जो द्यायचा तो योग्य संदेश देत आहे असे मला वाटते. विरोधी पक्षाचे ते कामच आहे. युसलेस मीडिया ने घातलेला गोंधळ आणि भाजप ने अधिकृत रित्या लावून धरलेले मुद्दे यात गल्लत करू नये असे मला वाटते. फडणवीस हे दुसऱ्यांदा अतिशय उत्तमपणे विरोधी पक्षनेतेपद सांभाळत आहे असे माझे मत आहे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 03/05/2021 - 17:40 नवीन
Corona च्या नावाखाली प्लॅटफॉर्म तिकीट दर प्रचंड वाढवले आहेत आता प्लॅटफॉर्म तिकीट दर ५० रुपये केला आहे. खासगी रेल्वे सारखे exp train मधील ज्येष्ठ नागरिक किंवा बाकी लोकांना मिळणाऱ्या तिकीट दरातील सुविधा बंद केल्या आहेत. गुपचूप रेल्वे चे खासगीकरण तर करण्याचा सरकार चा डाव नाही ना.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Fri, 03/05/2021 - 18:00 नवीन
सगळ्या सवलती बंद कराव्यात. परंतू रेल्वे खासगीकरण अजिबात करू नये.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 03/05/2021 - 18:06 नवीन
काही रेल्वे मार्गावर खासगी रेल्वे गाड्या धावायला पण लागल्या. एकदम केले की विरोध होईल म्हणून हळू हळू चालू आहे. लोक covid मध्ये अडकली आहेत त्याचा फायदा घेणे चालू आहे
  • Log in or register to post comments
स
सुक्या Fri, 03/05/2021 - 18:58 नवीन
मला खात्री आहे .. तुम्ही .. प्रायवेट चानेल न बघता दुरदर्शन बघत असाल. प्रायवेट कंपणीची गाडी न वापरता आंबेसिडर वापरत असाल प्रायवेट बँके ऐवजी एस बी आइ मधे बन्किन्ग करत असाल प्रायवेट नेट ऐवजी एम्टीएनेल / बीएसएनएल वापरत असाल प्रायवेट होस्पिटल ऐवजी सरकारी दवाखाना वापरत असाल ... रामदास स्वामींची ती गोष्ट माहीत आहे ना ज्यात एक माता आपला मुलगा खुप गूळ खातो असे सांगत होती ? तेव्हा आधी प्रायवेट जे काही असेल ते वापरणे सोडा. . . .मग बोला ...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 03/06/2021 - 05:56 नवीन
सध्या शाकाहारी कोंबडीचा भाव काय आहे? आमच्या डोंबोलीत तरी सध्या मिळत नाही...
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 03/05/2021 - 19:01 नवीन
सचिन वाझे नामक अधिकारी अम्बानी प्रकरणात तपास करत होता. हा सचिन वाझे कोण? ६०-६५ एन्काऊन्टरमध्ये सहभागी असलेला हा गृहस्थ 'एन्काउन्टर स्पेशालिस्ट' म्हणून ओळखला जायचा. २००२ साली घाटकोपर येथे बेस्ट बस स्फोटात 'ख्वाजा युनुस' ह्या संगणक अभियंत्याला अटक करण्यात आली होती. तपासात त्याला थर्ड डिग्री देउन नंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे 'शौर्य' ज्यानी दाखवले त्यात सचिन वाझे होता. न्यायालयाने मग त्यांच्यावर कारवाई केली होती. २००८ साली रामदास कदम ह्या शिवसेना नेत्याचा ड्रायव्हर बनण्याचे कामही ह्या वाझेसाहेबानी केले होते. २०१९ मध्ये नविन सरकार आल्यावर ह्यांना पुन्हा कामावर घेण्यात आले. असो. तर असा हा 'कर्तबगार' अधिकारी हिरेन मनसुख ह्यांच्याबरोबर बराच काळ संपर्कात असल्याचे पुढे आले आहे. हिरेन मनसुख काही दिवसापुर्वी क्रॉफर्ड मार्केट येथे एका व्यक्तीला भेटला. त्या व्यक्तीचे नाव जाहीर करा अशी मागणी फडणवीस ह्यानी केली आहे. क्रॉफर्ड मार्केट येथे हिरेन मनसुख कशासाठी गेले? क्रॉफर्ड मार्केट येथे पोलिस मुख्यालय आहे! https://www.indiatoday.in/india/story/khwaja-yunus-murder-case-encounter-specialist-sachin-vaze-reinstated-1686351-2020-06-07
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 03/06/2021 - 04:28 नवीन
सुशांतसिंह राजपूत - आत्महत्या पूजा चव्हाण - आत्महत्या मनसुख हिरेन - आत्महत्या सर्व प्रकरणात आत्महत्या?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा