Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग २)

च
चंद्रसूर्यकुमार
Fri, 03/05/2021 - 12:51
🗣 164 प्रतिसाद
आधीच्या भागात जवळपास २०० प्रतिसाद होत आले आहेत म्हणून नवा भाग काढत आहे. पूर्वीच्या भागातील एखाद्या प्रतिसादावर काही लिहायचे असल्यासच त्या भागात लिहावे अन्यथा या भागात लिहावे ही विनंती. इतके सगळे प्रतिसाद झाल्यानंतर नवे प्रतिसाद पुढच्या पानावर जाऊन वाचायला अडचण येते. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांच्या कलकत्ता शहरातील भवानीपूर या विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुक न लढवता पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढविणार आहेत. एखादा माणूस इरेला पेटला तर तो कशी चूक करतो याचे हे एक उदाहरण आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बंगालमधून तृणमूल काँग्रेसला २२, भाजपला १८ तर काँग्रेसला २ लोकसभेच्या जागा मिळाल्या. भाजपची राज्याच्या मध्य आणि उत्तर भागात कामगिरी खूपच चांगली होती. पण राज्याच्या दक्षिण भागात तृणमूलने विजय मिळवला होता. विकीपीडीयावरून घेतलेल्या या नकाशावरून आपल्याला अधिक चांगली कल्पना येईल. bengal या नकाशात चौकटीत कलकत्ता शहरातील लोकसभा मतदारसंघ आहेत तर ३० आणि ३१ क्रमांकाचे अनुक्रमे तामलूक आणि कंठी मतदारसंघ आहेत. तर १९ आणि २० क्रमांकाचे अनुक्रमे जॉयनगर आणि मथुरापूर हे लोकसभा मतदारसंघ आहेत. या सगळ्या दहाच्या दहा मतदारसंघांमध्ये २०१९ मध्ये तृणमूलने विजय मिळवला होता. यावरून बंगालचा दक्षिण भाग तृणमूलसाठी किती महत्वाचा आहे याची कल्पना येईल. तामलूक मतदारसंघातून २००९ आणि २०१४ मध्ये तृणमूलचे नेते शुभेंदू अधिकारी जिंकले होते. ते २०१६ मध्ये नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून बंगाल विधानसभेवर निवडून गेले आणि ममतांच्या मंत्रीमंडळात मंत्री झाले. २००६ मध्ये सिंगूर आणि नंदीग्राम मध्ये जमिन संपादनाविरूध्द ममतांनी लढा उभा करून नंतर डाव्यांची ३४ वर्षे जुनी राजवट जमिनदोस्त करून टाकली होती. त्या नंदीग्राममध्ये शुभेंदू अधिकारी आंदोलनात पुढे होते. २०१६ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी चांगली ६७% मते घेऊन दणदणीत विजय मिळवला होता. हा नंदीग्राम विधानसभा मतदारसंघ शुभेंदू अधिकारी पूर्वी निवडून गेले होते त्या तामलूक लोकसभा मतदारसंघात येतो. शुभेंदू अधिकारी विधानसभेवर निवडून गेल्यानंतर त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि त्या जागेवर शुभेंदूंचे बंधू दिब्येंदू अधिकारी पोटनिवडणुकीत निवडून आले. तामलूकच्या शेजारी असलेल्या कंठी लोकसभा मतदारसंघातून २००९ पासून शुभेंदू-दिब्येंदू या बंधूंचे वडील शिशिर अधिकारी लोकसभेवर निवडून येत आहेत. तेव्हा सांगायचा उद्देश म्हणजे नकाशात दाखविलेल्या ३० आणि ३१ या मतदारसंघांच्या क्षेत्रात या अधिकारींची पकड चांगली आहे. त्याच मतदारसंघांच्या बाजूला असलेल्या ३४ (मेदिनीपूर- पूर्वीचे मिदनापूर) मतदारसंघातून भाजपचे बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष २०१९ मध्ये लोकसभेवर निवडून गेले. त्या बाजूलाच असलेल्या ३३ (झारग्राम), ३५ (पुरूलिया), ३६ (बांकूडा) आणि ३७ (विष्णूपूर) या लोकसभेच्या जागाही भाजपनेच जिंकल्या होत्या. या सगळ्या जागा राज्याच्या मध्य आणि पश्चिम भागातील आहेत. डिसेंबर २०२० मध्ये या शुभेंदू अधिकारींनी ममतांच्या मंत्रीमंडळातून राजीनामा देऊन भाजपत प्रवेश केला. त्यामुळे भाजपला २०१९ मध्ये राज्याच्या ज्या दक्षिण भागातून फार यश मिळाले नव्हते त्या भागात या अधिकारींच्या मदतीने हातपाय रोवायची संधी भाजपला मिळणार आहे. अशावेळी ममता बॅनर्जी इरेला पेटून शुभेंदू अधिकारींविरूध्द त्यांच्या नंदीग्राम मतदारसंघातून निवडणुक लढवणार आहेत. हा मतदारसंघ आणि आजूबाजूचा तामलूक लोकसभा मतदारसंघात येणारा भाग या अधिकारींचे प्रभावक्षेत्र आहे. तसेच बाजूलाच पश्चिमेला भाजपचे प्रभावक्षेत्र आहे. अशावेळी इरेला पेटून स्वतःचा हक्काचा भवानीपूर विधानसभा मतदारसंघ सोडून आपल्या प्रतिस्पर्ध्याविरूध्द लढायला त्याच्याच प्रभावक्षेत्रात ममतांनी जायची काही गरज आहे का? खरं तर मुख्यमंत्री वगैरेंना स्वतःच्या मतदारसंघाची कधी काळजी नसते त्यामुळे ते राज्याच्या इतर भागात पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करायला मोकळे असतात. आणि तृणमूल काँग्रेस मते ममतांच्या नावावर मागणार असेल तर स्वतः ममतांनी प्रचारात मोठा भाग घ्यायला हवा. अर्थात बंगालमध्ये ८ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे तेव्हा नंदीग्राममध्ये नक्की कधी मतदान होणार आहे हे बघायला हवे. पण निदान काही दिवस तरी ममता आपल्याच मतदारसंघात अडकणार आहेत. त्यातून शुभेंदू अधिकारींनी ममतांना हरवले तर ममतांच्या भविष्यातील राजकारणाला मोठा धोका पोहोचेल. आणि ममता जिंकल्या तरी त्याची किंमत मोठी भरावी लागणार आहे. वास्तविक पक्षाचे सर्वोच्च नेते आपल्याला गमावण्यासारखे फार काही नसेल तरच अशा मोठ्या लढाया लढायला जातात. उदाहरणार्थ राममनोहर लोहियांनी जवाहरलाल नेहरूंविरूध्द निवडणुक लढवली होती किंवा केजरीवालांनी शीला दिक्षित यांच्याविरूध्द निवडणुक लढवली होती. असे असताना इतके इरेला पेटायचे कारण समजत नाही. बघू पुढे काय होते ते. घोडामैदान जवळच आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 46774 views

🗣 चर्चा (164)
म
मुक्त विहारि Sun, 03/07/2021 - 16:07 नवीन
आम्ही मुस्लिम मतांमुळे निवडून आलो, असे सांगतात आणि नंतर म्हणतात की..... https://maharashtratimes.com/india-news/bjp-spreading-communal-poison-in-country-says-sharad-pawar/articleshow/81377279.cms शरद पवार यांच्यावर, माझा तरी विश्र्वास नाही...
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Sun, 03/07/2021 - 17:15 नवीन
शरद पवार यांच्यावर, माझा तरी विश्र्वास नाही...
माझा तरी विश्वास नाही म्हणजे? खरं तर कोणाचाच त्यांच्यावर विश्वास नाही :)
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 03/07/2021 - 18:02 नवीन
ज्यांनी आयुष्यभर जातीयवादी प्रचार केला, तेच आज भाजपवर जातीयवादाचा आरोप करीत आहेत. ऑक्टोबर २०१९ मधील विधानसभा निवडणुकीनंतर हेच दिल्लीला जाऊन भाजपबरोबर सरकारस्थापनेची चर्चा मोदी-शहांबरोबर करीत होते.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 03/07/2021 - 18:17 नवीन
घराणेशाहीची पुजा करणार्यांना समजत नाही....
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Mon, 03/08/2021 - 11:42 नवीन
त्यांचे लोक बंगल्यावर बोलवून चाबकाने मारतात. https://www.mahamtb.com/Encyc/2020/4/7/Thane-news-minister-jitendra-awhad-misuse-power-to-take-revenge-of-fb-post-by-anant-karmuse.html
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Mon, 03/08/2021 - 11:42 नवीन
त्यांचे लोक बंगल्यावर बोलवून चाबकाने मारतात. https://www.mahamtb.com/Encyc/2020/4/7/Thane-news-minister-jitendra-awhad-misuse-power-to-take-revenge-of-fb-post-by-anant-karmuse.html
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 03/07/2021 - 17:39 नवीन
https://www.loksatta.com/maharashtra-news/both-died-when-a-car-went-into-the-laborers-house-msr-87-2415843/
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 03/07/2021 - 17:56 नवीन
https://www.loksatta.com/photos/lifestyle-gallery/2411680/atum-1-0-cafe-racer-style-electric-motorcycle-commences-its-deliveries-check-price-and-other-details-sas-89/lite/?utm_source=Taboola_Recirculation&utm_medium=RC&utm_campaign=LS
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 03/07/2021 - 18:01 नवीन
https://www.loksatta.com/mumbai-news/mansukh-hiren-death-case-sandeep-deshpande-slams-shiv-sena-over-sachin-waze-bmh-90-2415007/?utm_source=Taboola_Recirculation&utm_medium=RC&utm_campaign=LS
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 03/07/2021 - 18:16 नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh-news/woman-files-rape-case-against-2-after-son-asks-father-name-sgy-87-2415201/?utm_source=Taboola_Recirculation&utm_medium=RC&utm_campaign=LS आता, महाराष्ट्र राज्यात पण, काही केसेस परत ओपन होऊ शकतात....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 03/08/2021 - 04:09 नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh-news/auction-of-a-liquor-store-in-rajasthan-began-at-rs-72-lakhs-ended-at-rs-510-crores-scsg-91-2415965/
  • Log in or register to post comments
श
शलभ Mon, 03/08/2021 - 05:57 नवीन
आज आपला अर्थसंकल्प आहे. आणि उत्पन्न वाढीची चिंता अशी न्यूज आहे लोकसत्ता ला. ही खूप चांगली आयडिया आहे. सगळ्या दारू दुकानाचे परवाने रद्द करा आणि लिलाव करा. पण राजकारणी लोकांचीच दुकानं असतील ही सगळी..सो हे होणं अवघड आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 03/08/2021 - 06:08 नवीन
दारूच्या नादात, यादव बुडाले... ह्या धंद्यात राजकारणी मिलीभगत करू शकणार नाहीत... आपली पोळी कुणीच दुसर्याला देणार नाही...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 03/08/2021 - 04:13 नवीन
https://www.loksatta.com/maharashtra-news/minister-sanjay-rathod-sent-5-crore-rupees-to-pooja-chavans-mother-and-father-thats-why-they-are-silent-on-the-murder-allegations-by-shantabai-rathod-svk-88-sas-89-2410977/?utm_source=Taboola_Recirculation&utm_medium=RC&utm_campaign=LS
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 03/08/2021 - 06:18 नवीन
https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/nanar-refinery-opposing-leaders-reaction-after-raj-thackeray-writes-open-letter-to-cm-thackeray-in-the-support-of-refinery-project/articleshow/81384969.cms हे असेच काहीसे, Enron च्या वेळी घडले होते... मातोश्री वर बैठक झाली आणि समुद्रात बुडलेली Enron बाहेर निघाली... इतिहासाची पुनरावृत्ती होणार असे दिसते....
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 03/08/2021 - 07:24 नवीन
नाणार होणारच हे भविष्य मी 2 वर्षांपूर्वी वर्तवले होते. का ते मला माहीत आहे, पण उगाच पब्लिक फोरम वरती त्याची चर्चा नको.. नाणारची अधिसूचना रद्द करणे आणि तो प्रकल्प पुनर्जीवित करणे यात एक मोठे अर्थकारण दडलेले आहे. त्याचा साक्षात्कार मला MIDC आणि अधिग्रहण याचा एकंदर अभ्यास करताना माझ्या सरकारी कर्मचारी असलेल्या भावाने जेव्हा अधिग्रहण कायद्यातील एक क्लॉज सांगितला तेव्हा झाला.. याच कारणामुळे आपल्याकडे बरेच प्रकल्प आले की त्यांना विरोध होतो, मग ते रद्द होतात आणि पुन्हा जिवंत पण होतात :)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 03/08/2021 - 08:51 नवीन
आधी एक बोलतात आणि नंतर शब्द फिरवतात... संजय दत्त, Enron, एक रूपयांत झुणका भाकर, ही काही उदाहरणे...
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Mon, 03/08/2021 - 08:16 नवीन
श्री मोदींचा नाकर्तेपणा जसजसा उघडा पडत चाललाय तसतशी त्यांच्या भज्तांची हेटाळणी वाढत चाललीय. मोठमोठ्या गप्पा मारणारे हे सुशिक्षित मूर्ख भक्त वेळ-काळ-स्थळ किंवा सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ सत्य किंवा वाढता जनारोष न पाहता मोदींच्या व्यक्तिपूजेत आपले भान हरपताना दिसतात. नुकतीच एअर फ्रान्सच्या पॅरिस ते दिल्ली विमानात घडलेली घटना खूप बोलकी आहे. आपल्या पूर्वजांनी बहुसंख्य भारतीयांचे दमन करणारी जी व्यवस्था निर्माण केली होती त्या व्यवस्थेचे पुनरुज्जीवन मोदी करतील असे ह्या हिंदू उच्चवर्णीय भक्तांना वाटते आणि त्याला कोणी विरोध करताना दिसला की त्यांचे पित्त खवळते. असाच हा विमानात गोंधळ घालणारा भक्त आता पाच-दहा वर्षांसाठी आत जाणार आणि त्याच्या सुटकेसाठी त्याचे प्रिय मोदी शष्प काही करु शकणार नाहीत. https://scroll.in/latest/988894/air-france-flight-makes-emergency-landing-after-indian-passengers-disruptive-behaviour?fbclid=IwAR3PVUVAdD3_EjU7-I2M7sjLcvTXmyML6gaZr-Pw1zuuARLjkaC9GTVxKQU
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Mon, 03/08/2021 - 08:49 नवीन
असाच हा विमानात गोंधळ घालणारा भक्त आता पाच-दहा वर्षांसाठी आत जाणार आणि त्याच्या सुटकेसाठी त्याचे प्रिय मोदी शष्प काही करु शकणार नाहीत.
मोदी याविषयी काही करू शकणार नाहीत , त्यांनी काही करूही नये आणि ते काही करणारही नाहीत. तसेही आपल्यासाठी विमानात नुसता आरडाओरडा नाही तर विमान अपहरण करणार्‍यांना पक्षात घेऊन आमदारकीचे तिकिट देऊन आमदार बनवायला मोदी हे इंदिरा गांधी थोडीच आहेत? बादवे, भक्त वगैरे गरळ ओकून झाल्यानंतर मन थार्‍यावर आले (आलेच तर) की मग असे करणारा माणूस मानसिकदृष्ट्या अस्थिर असू शकतो या शक्यतेचाही विचार करता आला तर करा.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 03/08/2021 - 08:53 नवीन
रामराव आदिक आठवले
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Mon, 03/08/2021 - 09:03 नवीन
नुसते रामराव आदिक नाही राजीव गांधी पण आठवायला हवेत. भोपाळ वायुगळतीप्रकरणी युनियन कार्बाईडचे सीईओ वॉरन अ‍ॅन्डरसनना भारतीय कायद्याने अटक केली होती. ती अटक करणे कितपत समर्थनीय होते वगैरे प्रश्न आहेतच आणि दोनेक महिन्यांपूर्वी मिपावर साहनांनी त्यावर एक लेखही लिहिला होता. काहीही असले तरी भारतीय कायदेशीर प्रक्रीयेप्रमाणे वॉरन अ‍ॅन्डरसनला पकडले होते. तेव्हा भारतीय कायदाच त्यांना सोडेल असे राजीव गांधी म्हणाले का? छे भलतेच काही. आम्ही वॉरन अ‍ॅन्डरसनला सोडतो आणि तुम्ही आमचा एक माणूस सोडा असे डील राजीव गांधींनी अमेरिकेबरोबर केले होते. आणि तो सोडलेला माणूस कोण होता? तर फ्लॉरीडात ट्रक जाळल्याचा गुन्हा केल्यामुळे तुरूंगात असलेला राजीव गांधींचा मित्र आदिल शहरयार. वॉरन अ‍ॅन्डरसनला डिसेंबर १९८४ मध्ये सोडले आणि आदिल शहरयारला अमेरिकेने लगेच सोडले असते तर ते अगदीच डोळ्यात आले असते म्हणून राजीव गांधींनी जून १९८५ मध्ये पंतप्रधान म्हणून अमेरिकेला पहिली भेट दिली तेव्हा त्यांचे विमान अमेरिकेत पोचतानाच अमेरिकेच्या अध्यक्षांनी आदिल शहरयारला माफी देऊन सोडले. म्हणजे ट्रक जाळणे या त्यामानाने कितीतरी किरकोळ गुन्ह्याबद्दल शिक्षा झालेल्या भारतीय नागरिकाला सोडून कितीतरी मोठ्या गुन्ह्यासाठी भारतीय कायद्याच्या कचाट्यात अडकू शकणार्‍या अमेरिकन नागरिकाला अमेरिकेच्या अध्यक्षांनी सोडवले म्हणजे त्यांच्यासाठी ते कितीतरी चांगले डील झाले. खरं तर मोदींनी युरोपातल्या देशांबरोबर असेच काहीतरी डील केले पाहिजे. तुम्ही आमच्या भक्ताला सोडा आणि आम्ही कितीतरी मोठ्या गुन्ह्याबद्दल चौकशी चालू असलेल्या कोणा युरोपियनाला सोडतो अशाप्रकारचे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 03/08/2021 - 09:08 नवीन
तुमचे मोदी किती कार्यक्षम पंतप्रधान आहेत ते सांगा . तुमचे कर्तृत्व सांगा . आत्ता पर्यंत जेवढे कर्तृत्व भारताच्या सर्व पंत प्रधान असलेल्या लोकांनी केले आहे ह्याचा हिशोब मांडला तर मोदी चे देशाच्या भल्यासाठी काहीच कर्तृत्व नाही. शून्य च्या खाली किती तरी वजा शून्य असलेले आकडे वापरावे लागतील.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Mon, 03/08/2021 - 09:18 नवीन
मोदींनी काय केले ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला खरच हवं असेल तर उगाच लोकांना विचारत कशाला फिरायचे? बरेच मोदींविरोधी लोकं असले बालिश प्रश्न विचारत फिरताना दिसतात. त्याऐवजी साधं सरळ गुगल करायचं. पण खात्री आहे मोदीद्वेषाचा ज्वर असं काही करू देत नाही.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Mon, 03/08/2021 - 09:21 नवीन
दंगलीमध्ये पोलिसांना काही ठिकाणी दिसताक्षणी गोळ्या घालायचे आदेश दिलेले असतात. त्याप्रमाणे मी माझ्या सबकॉन्शस माईंडला (मराठी शब्द?) आदेश दिला आहे की प्रतिसादांमध्ये १८८ चे नाव दिसले की ताबडतोब प्रतिसाद दुर्लक्षित करायचा. पुढचे काही वाचायचेच नाही. या आयडीचे प्रतिसाद वाचून त्याला उत्तरे द्यायचा संयम तुमच्याकडे आहे यामुळे प्रचंड आदर वाटायला लागला आहे :)
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 03/08/2021 - 09:35 नवीन
मोदी चे उच्च विद्या विभूषित भक्त आहेत त्यांनाच ते स्वतः अयशस्वी मोदी ना का आपण का पाठिंबा देत आहोत हेच माहित नाही माझा प्रतिसाद दुर्लक्षित केला तरी सत्य स्थिती बदलत नाही .. उच्च विद्या विभूषित भक्त(हा शब्द नी ठरवून वापरत आहे बिनडोक ,अशिक्षित ,भक्त ह्यांना काहीच समजत नसते ते कधी ही विचार बदलतात बिचारे ) ह्यांना सर्व माहीत आहे पण तरी ते आंधळे झाले आहेत . पण बाकी लोक थोडी आंधळे आहेतं
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Mon, 03/08/2021 - 09:36 नवीन
लेकी बोले सुने लगे करायचा प्रयत्न करून बघितला, एवढा बावळट प्रश्न पडणारे बरेच असतात. ****** दारू पिऊन किंवा पॅनिक अटॅक मध्ये कुणीतरी विमानात दहा विचित्र गोष्टी करतो, त्यातली एक मोदींचे नाव घेणे असते, त्यातही मोदीद्वेषाने पछाडलेल्यांना मोदी आणि त्यांचे समर्थक दिसतात. अवघड दुखणं आहे हे मोदीद्वेषज्वर :):).
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 03/08/2021 - 10:38 नवीन
प्रतिसादांमध्ये १८८ चे नाव दिसले की ताबडतोब प्रतिसाद दुर्लक्षित करायचा. पुढचे काही वाचायचेच नाही. + १ मिपावर काही विशिष्ट सदस्यनामे दिसली की मी प्रतिसाद न वाचता पुढे जातो. हा त्यातलाच एक आयडी.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 03/08/2021 - 10:40 नवीन
सत्य ते सत्य च असते तुम्ही दुर्लक्ष केले म्हणून काही फरक पडत नाही
  • Log in or register to post comments
स
सॅगी Tue, 03/09/2021 - 04:11 नवीन
रेटून बोलले म्हणजे खोट्याचे खरे होत नाही..
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 03/08/2021 - 08:55 नवीन
तसेही आपल्यासाठी विमानात नुसता आरडाओरडा नाही तर विमान अपहरण करणार्‍यांना पक्षात घेऊन आमदारकीचे तिकिट देऊन आमदार बनवायला मोदी हे इंदिरा गांधी थोडीच आहेत? इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचे अपहरण करणाऱ्या पांडे बंधू या हवाई चाच्यांना इंदिरा गांधींनी मंत्रीपदाचे बक्षीस दिले होते. अजून एका विमानात मंत्रीपदावर असताना रामराम आदिकांनी शिवास रीगलची आख्खी बाटली ढोसून हवाईसुंदरी बरोबर गैरवर्तन केले होते. परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 03/08/2021 - 09:26 नवीन
तो उच्चवर्णीय आहे याला काही आधार? की विमानप्रवास आणि परदेशगमन ही उचचवर्णीयांची मक्तेदारी आहे असे म्हणायचे आहे तुम्हाला? त्याचे नाव कळलेले नसून सुद्धा तुम्ही असे म्हणताय म्हणून विचारतोय. बाकी हाच न्याय लावायचा म्हटलं तर अल्ला हु अकबर म्हणून डांगे करण्याऱ्या लोकांचा अल्ला म्हणजे मोठेच failure मानले पाहिजे. कारण त्यांनी तर महाभयंकर उपद्व्याप केले आहेत. असो, मी यातले दोन्ही मानत नाही, पण तुमच्या विधानाचा नेमका अर्थ काय होतो ते दाखवावे म्हणून लिहिले.
  • Log in or register to post comments
प
पिनाक Mon, 03/08/2021 - 20:12 नवीन
नगरकरांना तेवढा विचार करायची शुद्ध आहे असा तुम्ही विचार करता म्हणजे नवल आहे. काहीही बरळून लिहिलेला प्रतिसाद आहे तो त्यांचा.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 03/09/2021 - 02:54 नवीन
खरं सांगायचं तर विमानात गोंधळ घातलेल्या प्रवाशापेक्षा त्याचा बादरायण संबंध मोदींशी जोडून आपली मोदीद्वेषाची खाज भागवून घेणारेच कायम नशेत असतात.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Mon, 03/08/2021 - 23:30 नवीन
प्रश्न सांख्यिकीचा आहे. फक्त उच्चवर्णीयच विमानप्रवास करतात असे मी म्हणतच नाहीय. मोदी भक्ती करणारे व काहीही झालं तरी मोदींची बाजू घेणारे कोण आहेत ते मी लिहीलंय फक्त. स्वत:ला काहीही फायदा नसूनही मोदी-मोदी करणारे निम्नवर्णीय/अवर्णीय मूर्खही असतातच; पण तुलनेने फारच कमी. बाकी मुस्लिमांतही जाती आहेतच. तसा फारसा फरक नाही
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 03/08/2021 - 08:37 नवीन
हे खरोखर उच्च शिक्षित लोक आहेत त्यांच्या क्षेत्रात प्रगती केलेली लोक आहेत पण मोदी हे पूर्णतः अयशस्वी पंतप्रधान आहेत हे त्यांच्या मेंदूत घुसत नाही. सर्व क्षेत्रात भारत मागे पडत आहे हे त्यांना दिसत नाही. समजा समाजात द्वेष वाढत आहे हे त्यांना दिसत नाही , देशाच्या इतिहासातील सर्वात नालायक पंतप्रधान ही त्यांची खरी प्रतिमा आहे. पण हे उच्च शिक्षित भक्त आंधळे झाले आहेत. नक्की ह्यांनी डिग्री अभ्यास करून घेतली आहे की कॉपी करून अशीच शंका येते.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 03/08/2021 - 08:51 नवीन
यात मोदींचा काय संबंध आहे? हा प्रवासी नशेत असण्याची शक्यता असू शकते. विमानात असा गोंधळ घालणारे दरवर्षी पाचसात प्रवासी सापडतात. त्यांचा मोदी किंवा इतरांशी संबंध काय? एका अभ्यासानुसार विमानात गोंधळ करणारे ९०% प्रवासी जास्त ढोसल्यामुळे नशेत असतात. काही लोकांना ढाळ लागले किंवा खडा झाला तरी त्यासाठी ते मोदींनाच जबाबदार धरतात. वरील पोस्ट त्याच प्रकारातील आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 03/08/2021 - 09:13 नवीन
.... प्रवासी जास्त ढोसल्यामुळे नशेत असतात.... असेही, असू शकते.... काही लोकांना घराणेशाहीची नशा चढते, तसेच असेल...
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 03/08/2021 - 09:17 नवीन
उच्च शिक्षित आंधळे मोदी भक्त च असतात. त्याची माहिती मागवून बघा.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Mon, 03/08/2021 - 09:28 नवीन
गुलामगिरी करणारे अडाणी असतात काय?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 03/08/2021 - 09:20 नवीन
देश हितासाठी घेतलेले निर्णय ह्याची माहिती उच्च विभूषित भक्तांनी द्यावी आणि ते भक्त सांगतील ते थापा नाही खरे आहे हे बाकी लोकांनी मना पासून सांगावे. करा चालू उच्च शिक्षित मोदी भक्त.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Mon, 03/08/2021 - 09:21 नवीन
नशेत किंवा मानसिकदृष्ट्या आस्थिर आसलेली व्यक्ती मोदी मोदी करुन ओरडत असेल तर चिंतेची बाब अधिकच आहे. सरकारी खर्चाने इतका प्रचंड प्रोपागांडा केला आहे की ज्यांच्याशी मोदींचा काही संबंध नाही तेही मोदी मोदी ओरडायला लागले आहेत असा त्याचा अर्थ होतो. बाकी विमानात गैरवर्तणूक करणारे बरेच असतात; परंतु विद्यमान पंतप्रधानाचे नाव घेऊन आरडाओरडा करण्याची व गोंधळ घालून विमानाचे इमर्जन्सी लेंडिंग करायला लावण्याची पहिलीच वेळ. विमानात हवाईसुंदरींशी गैरवर्तणूक करणार्‍यांना शिक्षा झालीच पाहिजे मग आदिक असो की आणखी कोणी. परंतु, ह्या नाकर्त्या सरकारला तेही जमलेले नाही. उलट तोंडाने बेटी बचाओ म्हणणार्‍या ह्या मनुवादी लोकांनी कठुआ, ऊन्नाव आणि हाथरसमध्ये बलात्कार्‍यांना वाचवण्याचे पुरेपूर प्रयत्न केले. सकल हिंदूंच्या रक्षणाची भाषा करणारे हे सरकार केवळ हिंदू उच्चवर्णीयांच्या हिताचेच रक्षण करण्यात रस घेतेय हे इतर हिंदूंच्या लक्षात आलेले नाहीय असे नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 03/08/2021 - 10:29 नवीन
नशेत किंवा मानसिकदृष्ट्या आस्थिर आसलेली व्यक्ती मोदी मोदी करुन ओरडत असेल तर चिंतेची बाब अधिकच आहे. त्यात कसली चिंता आणि कोणाला चिंता? नशा उतरली की येईल तो ताळ्यावर. मुळात असल्या तद्दन फालतू, संध्यानंद टाईप सनसनाटी घडामोडी येथे टाकणे व त्या निमित्ताने दुरान्वयाने संबंध नसलेल्या मोदींना झोडपण्याची खाज शमविणे हा मोदीद्वेष्ट्यांचा आवडता छंद आहे कारण प्रतिसादातील उर्वरीत भाग तसाच आहे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 03/08/2021 - 10:34 नवीन
मोदी ह्यांचा फक्त एकच निर्णय आणि त्याची अंमलबजावणी सांगा . त्या मुळे सर्व स्तरातील हिंदू आर्थिक बाबतीत सक्षम होण्याची संधी उपलब्ध झाली. मुकेश ,अदानी हे हिंदू नाहीत व्यापारी आहेत उद्या इम्रान नी जरी ह्यांचा फायदा केला तर तिकडे जावून हिंदू ना शिव्या देतील.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Mon, 03/08/2021 - 13:09 नवीन
किती निरागस आहात तुम्ही! मोदींनी द्वेषाला अधिकृतताच नव्हे तर राजमान्यता दिली आहे. ट्वीटरवर गरळ ओकणार्‍या आयडींना स्वतः मोदी फॉलो करतात. कोणत्याही समुदायाला सरसकट शिव्या घालणे, गौरी लंकेश सारख्या पत्रकारांच्या मृत्युवर हत्येवर अत्यंत हीणकस भाषेत शेरेबाजी करणे असल्या उद्योगांना शिक्षा करायची सोडून मोदी त्यांना फॉलो करतात. हा विद्वेष आता अधिकृतच नव्हे तर विभूषण ठरायला लागला आहे. ह्य विद्वेषाने लोकांची मानसिकता बदलते आहे. बाबू बजरंगी व साध्वी प्रज्ञांची उदाहरणे पाहून लोकांना त्यात वावगं वाटतच नाही. पोलिसांच्या देखत आंदोलकांवर बंदूक चालवणार्‍या उच्चवर्णीय हिंदू मुलाला काहीच होत नाही; जेएनयुमध्ये जाऊन झोडपलं विद्यार्थ्यांना तरी काहीही होत नाही हे कोणी दाखवून दिलं? हे कोणी घडवलं? विद्वेषाला खतपाणी घालून असे रेबीड लोक तयार करण्याचे काम कोण करतंय हे सगळ्या जगाला कळतंय; परंतु उच्चवर्णीय हिंदूंचे हितसंबंध गुंतलेले असल्याने ते डिनायल मध्ये आहेत.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 03/08/2021 - 15:20 नवीन
कसली द्वेषाला मान्यता? द्वेषभावना काय असते ते मी सांगतो. ज्याला बायको सांभाळता आली नाही तो देश काय सांभाळणार, मौत का सौदागर, सैनिकांच्या रक्ताचा दलाल, नीच माणूस, नरराक्षस, हिटलर, चहावाला, फेकू, शेठ, क्रूरकर्मा अशी खास विशेषणे ज्याच्या संदर्भात वारंवार वापरली जातात त्याला द्वेषभावना म्हणतात. असे म्हणणाऱ्यांचे कौतुक करणारेही द्वेष्टेच असतात. द्वेषाचा चष्मा सतत डोळ्यांंवर ठेवलेल्यांना यात द्वेषभावना दिसतच नाही.
  • Log in or register to post comments
स
स्वलिखित Mon, 03/08/2021 - 09:52 नवीन
सकल हिंदूंच्या रक्षणाची भाषा करणारे हे सरकार केवळ हिंदू उच्चवर्णीयांच्या हिताचेच रक्षण करण्यात रस घेतेय हे इतर हिंदूंच्या लक्षात आलेले नाहीय असे नाही. ◆◆आता इथून सुरुवात करायची का ?? ■■ मुस्लिम हिताचा तर विषय सुद्धा नसेल , नाही का
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 03/08/2021 - 10:02 नवीन
तेवढे कमजोर,असमर्थ मोदी काळात झाले. आर्थिक विवंचनेत हिंदू मोदी ह्यांच्या काळात च राहू लागले. बहुसंख्य हिंदू परावलंबी झाले कृषी कायद्यांनी अजुन हिंदू अशक्त होतील. हा कसला हिंदू हित वादी पंतप्रधान .. त्या पेक्षा औरंगजेब उत्तम होता.
  • Log in or register to post comments
र
राघव Mon, 03/08/2021 - 16:29 नवीन
आपला औरंगजेबाबद्दलचा अभ्यास बराच [कमी] आहे असं दिसतं. आपण काय लिहिता आहात याचं काही भान? अवांतरः मालक, केवळ धागा भरकटवण्यासाठी जरी आपण काही[बा]ही लिहित असलात तरी एक ताळतंत्र असावा. आपल्याला जरा आरामाची गरज आहे. काही दिवस वाचनमात्र राहावे अशी आपणांस सूचना कराविशी वाटते. कृपया जरा मनावर घ्यावे.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Mon, 03/08/2021 - 10:07 नवीन
अर्थातच. बीजेपीला पूर्वापार स्वच्छपणे “बामन-बनियोंकी पार्टी” असेच म्हटले जातेय हे आपल्याला विदीत असेल वा नसेलही. पूर्वी इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा सुळसुळाट इतका नसल्याने व्हॉट्सॅपवर वगौरे खोटे संदेश पाठवून लोकांना ब्रेनवॉश करणे अवघड होते. नवीन “टेकसॅव्ही” पिढीला तंत्रज्ञान कळत असेल; परंतु स्वतःचा इतिहास माहित असेलच असे नाही. अन्यथा “हिंदू एकता” ह्या शब्दाला इतिहासात काहीही आधार नाहीय हे त्यांना कळले असते.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 03/08/2021 - 10:35 नवीन
पूर्वी इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा सुळसुळाट इतका नसल्याने व्हॉट्सॅपवर वगौरे खोटे संदेश पाठवून लोकांना ब्रेनवॉश करणे अवघड होते. काहीही. शालेय पाठ्यपुस्तके, दूरचित्रवाणी, आकाशवाणी, मुद्रित माध्यमे, सेन्सॉरशिप या माध्यमातून पन्नासेक वर्षे लोकांचे ब्रेनवॉश सुरू होते की. आता आंतरजाल, सामाजिक माध्यमे वगैरे असल्याने लोकांना वस्तुस्थिती समजायला लागली आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 16 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 16 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 16 hours ago
  • सुंदर !!
    1 day 17 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 17 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा