चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग २)
आधीच्या भागात जवळपास २०० प्रतिसाद होत आले आहेत म्हणून नवा भाग काढत आहे. पूर्वीच्या भागातील एखाद्या प्रतिसादावर काही लिहायचे असल्यासच त्या भागात लिहावे अन्यथा या भागात लिहावे ही विनंती. इतके सगळे प्रतिसाद झाल्यानंतर नवे प्रतिसाद पुढच्या पानावर जाऊन वाचायला अडचण येते.
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांच्या कलकत्ता शहरातील भवानीपूर या विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुक न लढवता पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढविणार आहेत. एखादा माणूस इरेला पेटला तर तो कशी चूक करतो याचे हे एक उदाहरण आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बंगालमधून तृणमूल काँग्रेसला २२, भाजपला १८ तर काँग्रेसला २ लोकसभेच्या जागा मिळाल्या. भाजपची राज्याच्या मध्य आणि उत्तर भागात कामगिरी खूपच चांगली होती. पण राज्याच्या दक्षिण भागात तृणमूलने विजय मिळवला होता. विकीपीडीयावरून घेतलेल्या या नकाशावरून आपल्याला अधिक चांगली कल्पना येईल.
या नकाशात चौकटीत कलकत्ता शहरातील लोकसभा मतदारसंघ आहेत तर ३० आणि ३१ क्रमांकाचे अनुक्रमे तामलूक आणि कंठी मतदारसंघ आहेत. तर १९ आणि २० क्रमांकाचे अनुक्रमे जॉयनगर आणि मथुरापूर हे लोकसभा मतदारसंघ आहेत. या सगळ्या दहाच्या दहा मतदारसंघांमध्ये २०१९ मध्ये तृणमूलने विजय मिळवला होता. यावरून बंगालचा दक्षिण भाग तृणमूलसाठी किती महत्वाचा आहे याची कल्पना येईल.
तामलूक मतदारसंघातून २००९ आणि २०१४ मध्ये तृणमूलचे नेते शुभेंदू अधिकारी जिंकले होते. ते २०१६ मध्ये नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून बंगाल विधानसभेवर निवडून गेले आणि ममतांच्या मंत्रीमंडळात मंत्री झाले. २००६ मध्ये सिंगूर आणि नंदीग्राम मध्ये जमिन संपादनाविरूध्द ममतांनी लढा उभा करून नंतर डाव्यांची ३४ वर्षे जुनी राजवट जमिनदोस्त करून टाकली होती. त्या नंदीग्राममध्ये शुभेंदू अधिकारी आंदोलनात पुढे होते. २०१६ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी चांगली ६७% मते घेऊन दणदणीत विजय मिळवला होता. हा नंदीग्राम विधानसभा मतदारसंघ शुभेंदू अधिकारी पूर्वी निवडून गेले होते त्या तामलूक लोकसभा मतदारसंघात येतो. शुभेंदू अधिकारी विधानसभेवर निवडून गेल्यानंतर त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि त्या जागेवर शुभेंदूंचे बंधू दिब्येंदू अधिकारी पोटनिवडणुकीत निवडून आले. तामलूकच्या शेजारी असलेल्या कंठी लोकसभा मतदारसंघातून २००९ पासून शुभेंदू-दिब्येंदू या बंधूंचे वडील शिशिर अधिकारी लोकसभेवर निवडून येत आहेत. तेव्हा सांगायचा उद्देश म्हणजे नकाशात दाखविलेल्या ३० आणि ३१ या मतदारसंघांच्या क्षेत्रात या अधिकारींची पकड चांगली आहे. त्याच मतदारसंघांच्या बाजूला असलेल्या ३४ (मेदिनीपूर- पूर्वीचे मिदनापूर) मतदारसंघातून भाजपचे बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष २०१९ मध्ये लोकसभेवर निवडून गेले. त्या बाजूलाच असलेल्या ३३ (झारग्राम), ३५ (पुरूलिया), ३६ (बांकूडा) आणि ३७ (विष्णूपूर) या लोकसभेच्या जागाही भाजपनेच जिंकल्या होत्या. या सगळ्या जागा राज्याच्या मध्य आणि पश्चिम भागातील आहेत.
डिसेंबर २०२० मध्ये या शुभेंदू अधिकारींनी ममतांच्या मंत्रीमंडळातून राजीनामा देऊन भाजपत प्रवेश केला. त्यामुळे भाजपला २०१९ मध्ये राज्याच्या ज्या दक्षिण भागातून फार यश मिळाले नव्हते त्या भागात या अधिकारींच्या मदतीने हातपाय रोवायची संधी भाजपला मिळणार आहे. अशावेळी ममता बॅनर्जी इरेला पेटून शुभेंदू अधिकारींविरूध्द त्यांच्या नंदीग्राम मतदारसंघातून निवडणुक लढवणार आहेत. हा मतदारसंघ आणि आजूबाजूचा तामलूक लोकसभा मतदारसंघात येणारा भाग या अधिकारींचे प्रभावक्षेत्र आहे. तसेच बाजूलाच पश्चिमेला भाजपचे प्रभावक्षेत्र आहे.
अशावेळी इरेला पेटून स्वतःचा हक्काचा भवानीपूर विधानसभा मतदारसंघ सोडून आपल्या प्रतिस्पर्ध्याविरूध्द लढायला त्याच्याच प्रभावक्षेत्रात ममतांनी जायची काही गरज आहे का? खरं तर मुख्यमंत्री वगैरेंना स्वतःच्या मतदारसंघाची कधी काळजी नसते त्यामुळे ते राज्याच्या इतर भागात पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करायला मोकळे असतात. आणि तृणमूल काँग्रेस मते ममतांच्या नावावर मागणार असेल तर स्वतः ममतांनी प्रचारात मोठा भाग घ्यायला हवा. अर्थात बंगालमध्ये ८ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे तेव्हा नंदीग्राममध्ये नक्की कधी मतदान होणार आहे हे बघायला हवे. पण निदान काही दिवस तरी ममता आपल्याच मतदारसंघात अडकणार आहेत. त्यातून शुभेंदू अधिकारींनी ममतांना हरवले तर ममतांच्या भविष्यातील राजकारणाला मोठा धोका पोहोचेल. आणि ममता जिंकल्या तरी त्याची किंमत मोठी भरावी लागणार आहे.
वास्तविक पक्षाचे सर्वोच्च नेते आपल्याला गमावण्यासारखे फार काही नसेल तरच अशा मोठ्या लढाया लढायला जातात. उदाहरणार्थ राममनोहर लोहियांनी जवाहरलाल नेहरूंविरूध्द निवडणुक लढवली होती किंवा केजरीवालांनी शीला दिक्षित यांच्याविरूध्द निवडणुक लढवली होती. असे असताना इतके इरेला पेटायचे कारण समजत नाही.
बघू पुढे काय होते ते. घोडामैदान जवळच आहे.
🗣 चर्चा
(164)
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Sat, 03/06/2021 - 04:52
नवीन
मनसुख हिरेन प्रकरण गुंतागुंतीचे दिसतय. हिरेन मनसुख ह्यांचा गाडी-डेकॉरचा धंदा होता. नेमकी ह्यांची गाडी चोरीला जावी हा योगायोग समजायचा का? हे सचिन वझे मुंबईतील अधिकारी पण हिरेन ह्यांचा मृत्यु झाल्यावर हे अधिकारी मुंबईतून ठाण्यात गेले व ह्या प्रकरणात रस घेउ लागले.
आता हे प्रकरण ए.टी.एस.कडे गेले आहे.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Sat, 03/06/2021 - 05:02
नवीन
The फ्रीडम हाऊस च्या अहवालात भारताला स्वतंत्र देशाच्या यादीत खाली आणून 'आंशिक स्वतंत्र ' देशाच्या यादीत स्थान देण्यात आले आहे.
शेवटी भारताचे जगात नाव करून दाखवले च.
'मोदी हे तो मुणकिन hai'
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 03/06/2021 - 06:02
नवीन
शेतकरी आंदोलकांच्या आंदोलनाचा आज शंभरावा दिवस. प्रसिद्धी माध्यमांमधे शेतकरी आंदोलनाची धग कुठेच दिसणार याची पुरेपुर काळजी सरकार घेत आहे, त्यामुळे केवळ युट्यूब आणि सोशियल मिडियाद्वारे या आंदोलनाची माहिती येत असते. सत्य लपवून ठेवता येत नाही. भविष्याचा अंदाज येत नसतांनाही संघर्षाच्या निर्धारावर ठाम असल्याचे दिल्लीच्या पाच सीमांवर सुरु असलेल्या शेतक-यांच्या आंदोलनाचे हे चित्र आहे. शंभराव्या दिवसापर्यंत मोदीसरकार हलले नसले तरी, शेतक-यांचा निर्धारही ढळलेला नाही. कृषी कायदे रद्द करण्यासाठी आणखी किती दिवस आंदोलन करावे लागेल याचा कोणताही अंदाज आंदोलकांना नसेल, एकदा असे आंदोलन मोडून काढल्या गेले, त्याकडे दुर्लक्ष झाले तर येत्या काळात कोणतेही आंदोलन असेच सरकार दडपून टाकेल, २८७ च्या जवळपास शेतक-यांना आपल्या जीवाला गमवावे लागले (संख्या संदर्भ दै. लोकसत्त्ता) आणि अशा वेळी आंदोलन थांबले तर, देशात असे आंदोलन पुन्हा कधीच उभे राहणार नाही, ही जाणीव शेतकरी आंदोलकांना असल्यामुळे ते सहजासहजी मागे हटणार नाहीत असे चिन्ह आहेत, एक भारतीय म्हणून त्याच्या लढ्याला-संघर्षाला आपला कडक सॅल्यूट आहे.
२६ नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या या आंदोलनात अनेक वळणे आली. सरकारसोबत ११ पेक्षा अधिक चर्चेच्या फे-या झाल्या. कडाक्याची थंडी, पाण्याचे फवारे, रस्त्यात रोवलेले खिळे, प्रजासत्ताकदिनी आंदोलन बदनाम करण्याचा झालेला प्रयत्न, त्यामुळे तर आंदोलनाचे कंबरडे मोडल्याचे चित्र निर्माण झाले होते, पोलिसांनी घेराव घालून आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला. अनेक शेतक-यांवर गुन्हे दाखल केले. तंबु उखडून फेकले, लंगर बंद केले. वीज बंद केली, पाणी बंद केले. शौचालये हटवली. मारहाण केली. खोटे समर्थक आणून आम्हाला शेतक-यांच्या आंदोलनाचा त्रास होत आहे, त्यांना हटवावे असे खोटे बोलणारे लोक उभे केले. तरीही आंदोलकांनी हळुहळु आपला जम बसवला. सरकारने साम-दाम-दंड भेद नितीचा वापर केला पण दिल्लीच्या सीमेवर सिंधु-गाझीपूर-टीकरी, शाहाजनपूर, ढासा सीमेवर बसलेले शेतकरी हलले नाहीत. चाळीसपेक्षा अधिक संघटनामधे फूट पाडण्याचा प्रयत्न झाला, तोही प्रयत्न यशस्वी झाला नाही. शेतकरी समर्थक अजून एकजूट झाले, शक्ती वाढली, सरकारने शेतकरी आंदोलकांवर केलेला अन्याय लाखो लोकांनी पाहिला तीच शक्ती या आंदोलकांची झाली. आता आंदोलकांनी आपल्या आंदोलनाचे डावपेचही बदलत असल्याचे लक्षात येत आहे.
सरकारने शेतकरी आंदोलकांशी २२ जानेवारीपासून संवाद बंद केल्यानंतर, एक कॉल की दुरी या निव्वळ सरकारच्या बाता आहेत हे आंदोलकांना माहिती आहे, तेव्हा सरकारवर दबाव आणन्यासाठी जेलभरो आंदोलन, संसदेस घेराव, पाकच्या अटारीसीमेपासून ते सिंधु सीमेपर्यंत मानवी साखळी उभारणे, आमरण उपोषण करणे यासारखा उपायांवर आंदोलन अधिक तीव्र करण्यावर किसान मोर्चा विचार करणार आहे. आंदोलनात २६ जानेवारीच्या हिंसाचारामुळे आंदोलनाने सहानुभूती गमावली असे चित्र निर्माण केले गेले पण टीकैत यांचा अश्रुंचा बांध फुटला आणि पुन्हा आंदोलनात जान भरल्या गेली. पंजाबच्या शेतक-या नंतर जाट आणि गुजर समुदायाचा सहभाग वाढला.
आज शेतक-यांची संख्या रोडावली असली तरी आंदोलनाच्या भविष्यावर फरक पडणार नाही. शेतकरी कापणी करुन पुन्हा मोठ्या संखेने आंदोलनात पुन्हा सहभागी होतील.
आंदोलकांनी आंदोलनाचे स्वरुप बदलले आहे, दिवसभर भाषणे चालू असतात. आंदोलनाला देशातील ४४ गुरुद्वाराच्या प्रबंधन समित्यांकडून पूर्ण पाठबळ लाभलेले आहे. गुरुद्वारांच्या लंगरच्या माध्यमातून नाश्ता, भोजनाची व्यवस्था होत आहे. तंबूंची काळजी, वीजेची सोय, स्वच्छ स्नानगृहे, या सर्वांची व्यवस्था गुरुद्वारा प्रबंधन समितीकडून केली जात आहे. आंदोलकांची संख्या वाढली की व्यवस्था काही काळासाठी विस्कळीत होते आणि पुन्हा एक दोन दिवसानंतर ती व्यवस्था पूर्वपदावर येते. मोफत पुस्तके, पुस्तके स्टॉल, वृत्तपत्रे, मोबाईल चार्जींग व्यवस्था तिकडे असते. वीज-पाण्याची व्यवस्था दिल्ली सरकारने केली आहे. टीव्ही, डीटीएच, चर्चा हुक्कापाणी घरच्यांशी संवाद, मनोरंजनासाठी गाणे असा आंदोलनस्थळी माहोल असतो.
तिन्ही कायदे रद्द करण्यासोबत किमान आधारभूत किंमतीसाठी कायदा रद्द करण्याची मागणी मान्य झाल्याशिवाय परत जायचेच नाही या निर्धाराने दिल्लीच्या सीमा बाधित करणारे आंदोलन सहजासहजी गुंडाळले जाईल असे चिन्ह आज तरी दिसत नाही.
जाता जाता : टाइमच्या मुखपृष्ठावर महिला शेतकरी '' आम्हाला कोणी धमकावू शकत नाही, आम्हाला कोणी खरेदी करु शकत नाही'' या ओळींसह जगप्रसिद्ध 'टाइम' नियतकालिकाच्या मुखपृष्ठांवर दिल्लीच्या सीमांवरील आंदोलनकर्त्या महिला शेतक-यांना स्थान मिळाले आहे.
प्रतिसाद माहिती संदर्भ : दै. सकाळ, लोकमत, लोकसत्ता आणि टाइम.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sat, 03/06/2021 - 06:10
नवीन
शेतकरी तर नक्कीच नाहीत...
कायदा हातात घेणारा, अस्सल शेतकरी असूच शकत नाही... जो जनावरांसाठी डोळ्यातून पाणी काढतो, तो मानवहत्या कशी करेल?
- Log in or register to post comments
प
पिनाक
Sat, 03/06/2021 - 06:55
नवीन
फारच अपेक्षा करता तुम्ही. शेतकरी कायद्यांमध्ये काय चुकीचं आहे या प्रश्नाचं उत्तर जरी प्राध्यापक महाशयांनी दिलं तरी फार आहे.
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Sat, 03/06/2021 - 07:06
नवीन
मोदींनी ते कायदे केले आहेत हेच अशा लोकांच्या मते चुकीचे आहे.
असल्या लोकांच्या रोमारोमात मोदीद्वेष इतका भिनला आहे की समजा मोदींनी म्हटले की दररोज सकाळी तिकडे (म्हणजे कुठे ते विचारू नका) जावे तर ते लोक मरायला टेकले तरी तिकडे जायचे नाहीत.
- Log in or register to post comments
स
सुक्या
Sat, 03/06/2021 - 06:55
नवीन
"प्रजासत्ताकदिनी आंदोलन बदनाम करण्याचा झालेला प्रयत्न"
प्रतीवाद करण्याची ईच्छा नाहीये .. पण प्रजासत्ताकदिनी जे झाले ते लाज वाटावी असेच होते ...
त्यामुळे चालु द्या. वर्गणी दिली तरी चालेल ...
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sat, 03/06/2021 - 07:14
नवीन
हे माझे निरीक्षण आहे
- Log in or register to post comments
स
सुक्या
Sat, 03/06/2021 - 07:44
नवीन
सहमत ...
रिकामटेकडे लोक असले धंदे करतात. सगळे फुकट मिळते आहे तर गजाली करायला काय जाते ...
"मोफत पुस्तके, पुस्तके स्टॉल, वृत्तपत्रे, मोबाईल चार्जींग व्यवस्था तिकडे असते. वीज-पाण्याची व्यवस्था दिल्ली सरकारने केली आहे. टीव्ही, डीटीएच, चर्चा हुक्कापाणी घरच्यांशी संवाद, मनोरंजनासाठी गाणे असा आंदोलनस्थळी माहोल असतो."
असले प्रकार आम्ही ग्लँपिंग ला करतो ... च्यायला आंदोलन आहे की टाइमपास?
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sat, 03/06/2021 - 08:04
नवीन
नाहीतर, ह्या आंदोलनाच्या निमित्ताने, ऐश करायला गेलो असतो...
ऑगस्ट ते ऑक्टोबर, हा तसा फ्री काळ असतो, तितके दिवस चालले तर, जाऊन यायचा विचार आहे...
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Sat, 03/06/2021 - 08:07
नवीन
दोन महिने आंदोलनजीवी बनून ऐश करायचा विचार दिसतोय. ;)
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sat, 03/06/2021 - 09:25
नवीन
विचार करायला पैसे लागत नाहीत...
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 03/06/2021 - 07:12
नवीन
मेलेल्या म्हशीला मणभर दूध अशी या दलालांच्या आंदोलनाची अवस्था आहे. ते केव्हाच संपले आहे. परंतु बिरबलाच्या मेलेल्या पोपटासारखी यांची अवस्था आहे.
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Sat, 03/06/2021 - 10:36
नवीन
बिलाचा त्रास फक्त पंजाब्यांनाच का होतो आहे?
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Sat, 03/06/2021 - 07:12
नवीन
शेतकरी कायदे कसे शेतकऱ्यांचे अहित करतील ह्याची कारणं खूप वेळा सांगून झाली आहेत.
तीच परत वाचावीत.
ज्यांच्या साठी कायदे करत आहात त्यांनाच ते nako आहेत.
जबरदस्ती नी कशाला भले करताय
- Log in or register to post comments
प
पिनाक
Sat, 03/06/2021 - 07:22
नवीन
पद्धत आहे आमची. काय म्हणणं आहे?
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Sat, 03/06/2021 - 08:08
नवीन
तुम्हाला कितीतरी वेळा तुम्ही किंवा प्राडॉ नी लेख लिहून सविस्तर उहापोह करा म्हणून सांगितले.
पण तुम्ही मुद्देसूद चर्चा करायला कधी येतच नाही.
अजूनही सांगतो, आंदोलन आहे आंदोलन आहे म्हणून ओरडण्याचा अगोदर त्या कायद्यात नेमक्या काय चुका आहेत, आणि त्या दुरुस्त करण्यासारख्या आहेत का, असतील तर कश्या, नसतील तर का नाहीत याचा एक सविस्तर लेख लिहा.
उगीच प्रच्छन्नपणे बिनबुडाचे आरोप करत फिरू नका..
उगीच नसलेली अजून जाते.
- Log in or register to post comments
अ
अमर विश्वास
Sat, 03/06/2021 - 08:21
नवीन
राजेश १८८
शेतकरी कायद्यात काय चुकीचे आहे हे तुम्ही कधीच सांगितलेले नाही .. उगाच गळा मात्र काढताय
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sat, 03/06/2021 - 10:04
नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh-news/dinesh-trivedi-who-had-resigned-as-tmc-mp-in-rajya-sabha-on-february-12th-joins-bjp-msr-87-2415127/
शिवसेना मात्र, तृणमुल मध्ये विरघळून गेली...
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Sat, 03/06/2021 - 10:18
नवीन
तसा तृणमूलमध्ये कोणी चांगला माणूस असेल असे वाटत नाही. बरेचसे सारदा-नारदा चिट फंड घोटाळ्यात गुंतलेले आहेत. त्यातील मुकुल रॉय आणि शुभेंदू अधिकारी यांनी भाजपत प्रवेश केला पण आहे. तरीही दिनेश त्रिवेदी हा त्यातल्या त्यात बरा माणूस आहे असे दिसते. २०१२ मध्ये रेल्वेमंत्री असताना त्यांनी रेल्वेची तिकिटे एक रूपयाने वाढवल्यावर ममतांनी थयथयाट केला होता आणि त्यांना राजीनामा द्यायला लावला होता. तेव्हा रेल्वेला दुसरी एअर इंडिया बनू द्यायची नाही ही रेल्वेमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे असे बरेच सेन्सिबल विधान त्यांनी केले होते. तसेच ममतांच्या आक्रस्ताळेपणात आणि इतर थयथयाटात डेरेक ओ ब्रायन सारखे सहभागी असतात त्याप्रमाणे दिनेश त्रिवेदी कधी सहभागी असल्याचे वाचल्याचे माझ्या तरी लक्षात नाही.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Sat, 03/06/2021 - 11:04
नवीन
पण शुभेंदु अधिकारीपुढे दिनेश त्रिवेदी झाकोळला जाईल असे वाटत नाही का?
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Sat, 03/06/2021 - 10:39
नवीन
पण शुभेंदु अधिकारीपुढे दिनेश त्रिवेदी झाकोळला जाईल असे वाटत नाही का?
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Sat, 03/06/2021 - 11:23
नवीन
तसे होईलच. शुभेंदू अधिकारी तरूण आहे आणि नंदीग्रामसारख्या चळवळीची पार्श्वभूमी असल्याने जास्त ग्लॅमरस आहेत. तसेच त्यांचे वडील शिशिर अधिकारी हे सगळ्यात पहिल्यांदा १९८२ मध्ये बंगाल विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले होते म्हणजे ती राजकीय पार्श्वभूमी त्यांना आहे. त्यामानाने दिनेश त्रिवेदी वयाच्या सत्तरीत आहेत आणि फार कधी मिडियामध्ये येत नाहीत.
लेनिन म्हणायचा तसे हे सगळे लोक युजफूल इडियट्स आहेत. ममताच्या साम्राज्याला धक्का लावायचा कार्यभाग पूर्ण झाल्यानंतर या सगळ्यांना लवकरात लवकर फेकून द्यायला हवे. अर्थात तसे काही होईल याची शक्यता फारच थोडी.
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Sat, 03/06/2021 - 11:02
नवीन
https://youtu.be/tLocLhLQxCQ
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Sat, 03/06/2021 - 14:15
नवीन
Bjp ल बंगाल मध्ये चांगले यश मिळाले असेल पण त्या वरून विधान सभेच्या निवडणुकी मध्ये तसेच मतदान होईल हे नक्की नसते.
लोकसभेच्या निवडणुकीत लोक विचार करताना देश पातळीवर चा विचार करतात.
बांगलादेश ची सीमा बंगाल ला लागून आहे त्या मुळे घुसघोरी चा प्रश्न bjp सोडवेल अशी भावना असू शकते.मुस्लिम लोकसंख्या जास्त असल्या मुळे हिंदू card चालले असेल.किंवा देशभर पसरलेल्या बंगाली लोकांचे हित bjp जपेल अशी भावना असेल.
पण विधान सभेच्या निवडणुकीत भाषिक अस्मिता जोरात असते.अमित शाह,आणि मोदी जी दोघे ही गैर बंगाली ,राज्य स्तरावर च राज्यभर प्रभाव असणारा नेता bjp कडे असलाच पाहिजे.तर च त्याच्या जोरावर मत मागता येतील.
भाषिक अस्मिता ही अतिशय तीव्र असते आणि गैर हिंदी राज्यात त्या अस्मितेचा जोर असतो.
परत पेट्रोल चे वाढलेले दर,वाढती महागाई,शेती विषयक कायदे, रेल्वे चे खासगीकरण हे मुद्दे लोकांची मत फिरवू शकतात.बंगाल मधून सुद्धा देशभर प्रचंड स्थलांतर होत आहे.त्या मुळे रेल्वे हा त्यांच्या दृष्टी नी महत्वाचा विषय आहे.
- Log in or register to post comments
अ
अमर विश्वास
Sat, 03/06/2021 - 14:29
नवीन
माझं तर म्हणणं आहे कृषी कायद्याचे जबरदस्त प्रतिसाद उमटतील ...
भाजप चा प्रचंड पराभव होईल
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 03/06/2021 - 17:29
नवीन
https://www.loksatta.com/pune-news/veteran-actor-shrikant-moghe-passes-away-msr-87-svk-88-2415432/
जेष्ठ मराठी अभिनेता श्रीकांत मोघे यांचे निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 03/07/2021 - 04:27
नवीन
https://m.rediff.com/news/column/aakar-patel-does-modi-really-care-about-indians/20210306.htm
The rights to
- freedom of speech and expression
- practice any profession or occupation
- peaceful assembly
- form associations
- freely practice and propagate religion
- to be deprived of life and liberty
do not exist in India today.
These rights are Fundamental, which enjoy a high degree of protection from encroachment by the State.
But they are not available to Indians today despite what the Constituent Assembly wanted.
The State has taken them away and many never existed in the first place.
- Log in or register to post comments
V
Vichar Manus
Sun, 03/07/2021 - 05:43
नवीन
https://www.loksatta.com/maharashtra-news/82-point-2-per-cent-farmers-oppose-agricultural-laws-abn-97-2415497/
- Log in or register to post comments
V
Vichar Manus
Sun, 03/07/2021 - 05:45
नवीन
महाराष्ट्रातील 82 टक्के शेतकऱ्यांचा नवीन कायद्यांना विरोध आहे, पण आंदोलन करताना कोणी दिसत नाही
- Log in or register to post comments
ध
धनावडे
Sun, 03/07/2021 - 06:51
नवीन
कसला विरोध? माझे निम्मे नातेवाईक शेती करतात, त्यांच्या तोंडून या कायद्याबद्दल काहीच ऐकलं नाही, ज्यांना कायद्याबद्दल माहित आहे त्यांना काहीच समस्या नाही.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sun, 03/07/2021 - 07:00
नवीन
https://www.loksatta.com/maharashtra-news/82-point-2-per-cent-farmers-oppose-agricultural-laws-abn-97-2415497/
८२.६ टक्के शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतमालाला हमी भावापेक्षा कमी भाव मिळतो असे सांगितले आहे, तर ७.५ टक्के शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतमालाला सरकारने घोषित केलेला हमी भाव मिळतो, असे सांगितले...
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sun, 03/07/2021 - 06:57
नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh-news/ram-mandir-teerth-kshetra-trust-receives-2-5-thousand-crore-donation-for-the-temple-pmw-88-2415403/
शिवसेनेचे दुःख इथे आहे, ही देणगी, सामान्य माणसांनी गोळा केलेली आहे....
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sun, 03/07/2021 - 07:21
नवीन
https://maharashtratimes.com/crime-news/5-member-hindu-family-killed-in-punjab-province-in-pakistan/articleshow/81373837.cms
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sun, 03/07/2021 - 07:25
नवीन
https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/many-bogus-employees-government-employees-who-have-passed-exam-bogus-manner-are
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sun, 03/07/2021 - 07:38
नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh-news/tmc-leader-threatens-voters-about-post-poll-consequences-sbi-84-2415609/
टीएमसीचे उमेदवार तपन दासगुप्ता यांनी मतदारांना सांगितले की ज्या भागात त्यांना मत मिळणार नाहीत त्या भागातील लोकांना “वीज आणि पाणी मिळणार नाही”.
हमीदुल रहमान यांनी लोकांना टीएमसीला मत देण्यास सांगितले. ते म्हणाले की पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारी फायद्यांचा आनंद लुटल्यानंतरही “विश्वासघात” करणारे लोक “देशद्रोही” म्हणून गणले जातील.
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Sun, 03/07/2021 - 09:19
नवीन
यावर पुरोगामी विचारवंतांची आणि शिवसेना समर्थकांची प्रतिक्रिया काय असणार आहे हे बघायचे. ते सोयीस्कर मौन पाळतील ही शक्यता सर्वात जास्त.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sun, 03/07/2021 - 09:31
नवीन
कधीच जनतेच्या भल्यासाठी विचार करत नाहीत...
तृणमुल कॉंग्रेस पण अशीच आहे...
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी, तृणमुल कॉंग्रेसने पण गठबंधनात भुमिका घेतली होतीच...
अशा पक्षाबरोबर, शिवसेना, हात मिळवत आहे....
दिवसेंदिवस शिवसेना मनांतून उतरत चालली आहे..
- Log in or register to post comments
र
राघव
Sun, 03/07/2021 - 12:07
नवीन
फारतर "ममताद्रोही" किंवा "तृणमूलद्रोही" म्हणायला हरकत नाही. तृणमूलला विरोध म्हणजे देशाला विरोध असे म्हणायचे आहे असे दिसते, किंवा या बातमीच्या खांद्यावर बंदूक ठेवून केंद्र सरकारला हाणायचा बेत दिसतोय! :-)
- Log in or register to post comments
स
सॅगी
Sun, 03/07/2021 - 09:23
नवीन
बातमी
गँग्ज ऑफ वासेपुर मधल्या एका वाक्याची आठवण झाली..."मजदूर पैदा हुये थे...मजदूर ही मरोगे......वोट ना दिया हमे...तो जिंदा जलोगे"
इथे जिवंत जाळणार नाहीत, पण जिवंतपणीच नरकयातना भोगायला नक्की लावतील हे लोकं.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sun, 03/07/2021 - 09:35
नवीन
मराठी माणसांचे दुर्दैव असे आहे की, शिवसेने सारखा मराठी पक्ष, अशा वृत्तीच्या माणसांबरोबर युती करतो....
निवडणूकीत हारजीत ही व्हायचीच, पण सामान्य माणसावर सूड उगवणे ही पाशवी वृत्ती मराठी माणसांत नाही...
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Sun, 03/07/2021 - 11:21
नवीन
शिवसेनेने bjp ची झोप उडवली आहे एक महाराष्ट्र सारख्या श्रीमंत राज्यात ह्यांना सत्ता मिळू दिली नाही.
आणि भविष्यात अजुन किती वर्ष महाराष्ट्रात सत्ता मिळणार नाही ह्याची शाश्वती नाही.
कसा भागवायच पक्षाचा खर्च निवडणूक फंड कोण देणार ह्यांना.
बिहार ,यूपी हातात आहे तिथे फक्त आंधळे भक्त मिळतात निवडणूक फंड मिळत नाही.
सेने नी अवघड करून ठेवलं आहे.
झोप लागणं कोणालाच.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 03/07/2021 - 09:37
नवीन
२०१४ मधील निवडणुकीच्या प्रचारात अजितदादांनी एका बारामती परिसरातील एका गावातील सभेत अगदी अशीच धमकी दिल्याची ध्वनीफीत प्रसिद्ध झाली होती. तेच अजितदादा नंतर फडणवीसांचे बडी झाले होते आणि आता ते उद्धव ठाकरेंचे बडी आहेत.
हा त्या विषयावर निघालेला मिपावरील धागा
https://www.misalpav.com/node/27632
हीच ती धमकीची चित्रफीत
https://youtu.be/ZToKF05aTHY
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Sun, 03/07/2021 - 10:55
नवीन
मिथुन चक्रवर्ती यांचा भाजपमधे प्रवेश!
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Sun, 03/07/2021 - 11:06
नवीन
रामा रामा.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Sun, 03/07/2021 - 11:16
नवीन
जन्म बांगला देशात 1950 ला.
Nexal movement मध्ये पण सुरुवातीला नाव जोडले होते.
नंतर सिनेमे,नाटक केली की नाही माहीत नाही.
तृणमूल काँग्रेस नी ह्यांना राज्यसभेवर पाठवला(तेव्हा ममता पूजनीय होत्या,वंदनीय होत्या मिथुन साठी)
श्रद्धा स्कॅम ह्यांच्या पर्यंत पोचले म्हणून राज्यसभेचा राजीनामा.
राज्यसभेत हे महाशय ह्यांच्या कार्यकाळात फक्त तीन दिवस हजर होते.
आता हे सत्तर वर्षाचे आहेत आणि निवडुंग सारखे निवडणूक पूर्ण bjp मध्ये गेले.
हे सत्तर वर्षाचे ह्यांचे शरीर च सांभाळणे ह्यांना भारी पडत आहे आता बंगाल सांभाळणार.
आणि ह्यांच्या वर bjp ची भिस्त.
पाच वर्षांपूर्वी पूजनीय,वंदनीय असलेल्या ममता जी ह्यांना आता आदरणीय वाटत नाहीत.
किती नाटक करणार.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Sun, 03/07/2021 - 14:02
नवीन
2019/20 वर्षाचा सर्वोत्तम शुध्द पाणी पुरवठा करणारी महानगर पालिका म्हणून मुंबई महानगर पालिकेला पुरस्कार देण्यात आला आहे.
मुंबई मधील पिण्याचे पाणी 99.34टक्के शुद्ध आहे.योगीच्या रामराज्य मध्ये असे शुद्ध पाणी
नाही.
- Log in or register to post comments
स
स्वलिखित
Sun, 03/07/2021 - 17:11
नवीन
केंद्रात भाजप असल्यामुळे छोट्या मोठ्या संस्था स्वायत्त काम करत आहेत , सत्यापन आणि सत्य यावर आधारित रिपोर्ट सादर करत आहेत आणि करू दिले जात आहेत , नाहीतर स्वतः अवॉर्ड तयार करून स्वतःला अर्पण करणाऱ्याची संख्या कमी नव्हती ,
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sun, 03/07/2021 - 17:29
नवीन
महानगर पालिकेचा 12 व्वा नंबर आला...
जबरदस्त प्रदूषण असतानांही, 12 व्वा नंबर आहे, त्यातच सगळे काही आले...
अर्थात, ह्या नंबरमुळे, जागांचे भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही...
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 03/07/2021 - 15:34
नवीन
मोदी प्रचारात DNA हा शब्द काही वेळा वापरतात. पूर्वी बिहार विधानसभा निवडणुकीत विनाकारण DNA शब्द वापरून काहीतरी चुकीची वाक्ये वापरली होती. त्यावेळी नीतीशकुमारांनी या संदर्भाचा वापर करून मोदींवर जोरदार हल्ला चढविला होता.
आता पुन्हा एकदा मोदींनी DNA शब्दाचा वापर प्रचारात केला आहे.
https://www.indiatoday.in/elections/west-bengal-assembly-polls-2021/story/pm-modi-bjp-bengal-kolkata-rally-brigadechalo-tmc-trinamool-mamata-didi-sonar-bangla-asol-poribortan-1776619-2021-03-07
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »