Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - मार्च २०२१

च
चंद्रसूर्यकुमार
Mon, 03/01/2021 - 07:11
🗣 199 प्रतिसाद
आज मार्च महिना सुरू झाल्याने या महिन्यातील घडामोडींसाठी नवा धागा काढत आहे. आजपासून महाराष्ट्र विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. हे लिहिताक्षणी राज्यपालांचे अभिभाषण सुरू आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 50561 views

🗣 चर्चा (199)
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 03/03/2021 - 11:03 नवीन
कर्नाटकातील बी.एस.येडियुराप्पा यांच्या मंत्रीमंडळातील जलसंपदामंत्री रमेश जरकीहोळी यांची सेक्स स्कँडल सीडी उघडकीस आल्यामुळे त्यांना राजीनामा द्यायला लागला आहे. ते १९९९ ते २०१९ या काळात बेळगाव जिल्ह्यातील गोकाक विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून कर्नाटक विधानसभेवर निवडून गेले होते. ते सिदरामय्यांच्या काँग्रेस सरकारमध्ये आणि एच.डी.कुमारस्वामींच्या जनता दल धर्मनिरपेक्ष-काँग्रेस सरकारमध्ये मंत्री होते. कुमारस्वामींचे सरकार खाली खेचायला भाजपने जदध आणि काँग्रेसच्या अनेक आमदारांना राजीनामे द्यायला लावून ऑपरेशन कमळ राबवले. त्या विधानसभा जागांवर नोव्हेंबर २०१९ मध्ये पोटनिवडणुका झाल्या आणि त्यातील बरेचसे भाजपचे उमेदवार म्हणून निवडून आले. असल्या फालतू लोकांना पक्षात घेऊन भाजपने नसतं गळ्यातलं लोढणं अडकवून घेतले आहे. उन्नाव बलात्कारवाला कुलदीप सेंगर पण समाजवादी पक्षातून भाजपात आला होता. गोव्यातही प्रमोद सावंतांनी बाबू मोन्सेराटसारखा फालतू माणूस घरी घेतला आहे. महाराष्ट्रातही फडणवीसांनी घाण पक्षात घेतली आहे त्यामुळे पक्षाला चांगलाच त्रास व्हावा आणि भविष्यात बाहेरच्या कोणाला घरी घेण्यापूर्वी शंभरदा विचार करायला भाग पडावे असे वाटते. बाहेरच्या कोणाला घ्यायचे असेल तर ते सरबानंद सोनोवालांसारखे चांगले लोक असावेत पदमसिंग पाटील किंवा हा रमेश जरकीहोळी असले कोणी नसावे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 03/03/2021 - 11:22 नवीन
भले एकच उमेदवार घ्या पण उत्तम घ्या...
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 03/03/2021 - 12:01 नवीन
महाराष्ट्राच्या​ मुख्यमंत्रीच घणाघाती भाषण चालू आहे. :)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 03/03/2021 - 13:16 नवीन
करोना समोरून हल्ला करतो. आमची तयारी आहे, करोना बरोबर रहायची पण करोनाची तयारी आहे का? तुम्ही खबरदारी घ्या, मी जबाबदारी घेतो, ते तुम्हीच जबाबदार, असा प्रवास झाला आहे.... शिवाय, जोडीला हिंदूत्व, मर्द मराठा, कोथळा, खंजीर, बेडूक, शेण आणि गोमुत्र, किंबहुना, मीच कुटुंबप्रमुख, इत्यादी आहेच मुख्यमंत्र्यांचे भाषण न वाटता, एखाद्या खेडेगावातील लहान मुलाचे भाषण वाटते.... स्वतःचे अपयश झाकायला, विरोधीपक्ष आणि केंद्राला जबाबदार धरण्यासाठीच, भाषण करतात, असे वाटते.... 80% लोकांनी नाकारलेल्या पक्षाचा मुख्यमंत्री असल्याने, खूप काही अपेक्षा करण्यात अर्थ नाही....
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/03/2021 - 13:24 नवीन
https://m.lokmat.com/politics/cm-uddhav-thackeray-vidhan-sabha-live-criticism-bjp-devendra-fadnavis-over-hindutva-a681/ म्हणे बाबरी पाडली तेव्हा सगळे येरेबागळे पळून गेले आणि एकटे बाळासाहेब आक्रमकपणे ठाम उभे होते. मुळात शिवसेना आणि श्रीरामजन्मभूमी आंदोलनाचा संबंध काय? शिवसेनेचा त्या आंदोलनात सहभागच नव्हता. असलाच तर अत्यल्प होता. तीनही ठाकरे, नवलकर, दोन्ही जोशी, राणे, भुजबळ, रावते, शिंदे, महाडिक, कदम, सुतार असे सेनेचे सर्व प्रमुख नेते त्या काळात मुंबईतील घरातून बाहेरच पडत नव्हते. या नेत्यांपैकी एकानेही तोपर्यंत व नंतरही अनेक वर्षे अयोध्येत पाऊल ठेवले नव्हते. त्या स्थानी फक्त भाजप, विश्व हिंदू परीषद, बजरंग दल व संघाचे नेते व कार्यकर्ते होते. संपूर्ण आंदोलनात फक्त याच संघटना होत्या व त्यात सेनेचा कणभरही सहभाग नव्हता. याच नेत्यांवर खटले दाखल झाले होते व अनेक वर्षे चौकशी सुरू होती.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 03/03/2021 - 13:41 नवीन
कार्याचे श्रेय लुटणारा पक्ष... मुंबई साठी 105 माणसे मेली तेंव्हा, शिवसेनेचा जन्म पण झाला न्हवता... बेळगाव, कारवार साठी आचार्य अत्रे आणि इतर मंडळी लढत असतांना, शिवसेनेचा जन्म पण झाला न्हवता... शिवसेना ठरवेल तो इतिहास, हा जमाना गेला....
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/03/2021 - 13:51 नवीन
तसा सेनेचा हिंदुत्वाशी आणि मराठी बाण्याशीही संबंध नाही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 03/03/2021 - 14:22 नवीन
शिवसेनेने आता कितीही मखलाशी केली तरी, कातडे घरंगळून पडलेले आहे...
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 03/03/2021 - 16:49 नवीन
राम मंदिर हा मुद्दा जुना होता, भाजप ने फक्त राजकीय फायदा उचलला, कधी भाजप याच्या केस मध्ये पक्षकार होता का ? कोणत्या भाजप नेत्याने होय मी बाबरी पाडली असे म्हणले ? सगळे जण आम्ही नाय बॉ म्हणून लपून बसले. जनता देईल तो कौल असेल तर मुंबईत दंगलीत सेना उभी राहिली बाळासाहेब उभे राहिले, बाकी सगळे गायब होते, त्या जीवावर मुंबईत सेना वाढली.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/03/2021 - 17:32 नवीन
कसला जुना मुद्दा? १९८६ मध्ये श्रीरामजन्मभूमीवरील मंदिराच्या दाराचे कुलुप निघाल्यानंतर विश्व हिंदू परीषदेच्या नेतृत्वाखाली भाजपने आंदोलन सुरू केले होते. त्यासाठी रथयात्रा, विटा जमा करणे, मंदीरनिर्मितीचे जाहीरनाम्यात आश्वासन देणे, देशभर मंदीरनिर्मितीसाठी वातावरण निर्मिती करणे हे भाजपनेच केले होते. १९८९, १९९० व १९९२ मधील कारसेवेचे आयोजनही भाजपचेच होते. मंदीर निर्मितीसाठी आधी त्या जागेवर बळजबरीने उभी केलेली मशीद पाडणे व त्याच जागेवर मंदीरनिर्मितीचे काम सुरू करणे हे देखील भाजपनेच केले होते. त्यांच्या बरोबर विश्व हिंदू परीषद, बजरंग दल व संघ सुद्धा होते. ६ डिसेंबर १९९२ पर्यंत या आंदोलनात सेनेचा सहभाग नव्हता. एकदा बाबरी पाडल्यानंतर त्यासाठी शिक्षा वगैरे भोगण्याची गरजच नव्हती कारण मुळात मशीदच बेकायदेशीर होती व बेकायदेशीर बांधकाम उद्ध्वस्त केल्याबद्दल प्रामाणिकपणा दाखविणे हा शुद्ध मुर्खपणा ठरला असता. नंतर झालेल्या दंगलीत डिसेंबरमध्ये तत्कालीन पोलीस आयुक्त श्रीकांत बापट यांनी दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देऊन ५-६ दिवसात दंगल आटोक्यात आणली होती. परंतु तत्कालीन मुख्यमंत्री नाईकांनी दडपणाखाली त्यांची बदली केल्यामुळे नंतर जानेवारीत पुन्हा दंगल पेटून ती आटोक्यात येण्यास खूप दिवस लागले होते. मुंबईत सेना वाढली ती श्रीरामजन्मभूमी आंदोलनामुळे ज्यात सेनेचा सहभागच नव्हता.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 03/03/2021 - 17:48 नवीन
नंतर झालेल्या दंगलीत डिसेंबरमध्ये तत्कालीन पोलीस आयुक्त श्रीकांत बापट यांनी दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देऊन ५-६ दिवसात दंगल आटोक्यात आणली होती. परंतु तत्कालीन मुख्यमंत्री नाईकांनी दडपणाखाली त्यांची बदली केल्यामुळे नंतर जानेवारीत पुन्हा दंगल पेटून ती आटोक्यात येण्यास खूप दिवस लागले होते.
एक सुधारणा- श्रीकांत बापट यांची बदली जानेवारीतील दंगल थांबल्यानंतर करण्यात आली होती. बहुदा २९-३० जानेवारी अशी बदलीची तारीख होती तर दंगल ६ जानेवारी ते १८-१९ जानेवारीपर्यंत चालू होती. श्रीकांत बापट यांच्याऐवजी त्यावेळी ठाण्याचे पोलिस आयुक्त असलेले अमरजितसिंग सामरा यांना मुंबईचे पोलिस आयुक्त म्हणून नेमण्यात आले होते.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/03/2021 - 17:52 नवीन
ओके. इतक्या वर्षांनंतर थोडी चूक झाली असू शकते. जानेवारीतील दंगलीत पोलिसांना गोळीबार करण्यावर मर्यादा आणल्या होत्या असे अंधुकसे आठवत आहे.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 03/03/2021 - 16:01 नवीन
उध्दव ठाकरेंचे भाषण ऐकले. राज्यपालांच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव असेल तर आपल्या सरकारच्या धोरणांविषयी/ महाराष्ट्र राज्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलावे अशी अपेक्षा असेल तर त्यात काय चुकले? पण नुसती इतरांवर टीका, भाजप/मोदींना शिव्या सोडून या भाषणात नक्की काय होते?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 03/03/2021 - 16:11 नवीन
टीका करणे, हेच आयुष्यभर केलेले आहे.. एन्राॅन, संजय दत्त, झुणकाभाकर, नाणार, आरे, फक्त बोलत रहायचे...
  • Log in or register to post comments
स
सुक्या Wed, 03/03/2021 - 20:18 नवीन
फार काही नव्हते भाषणात .. दोन गोष्टीसाठी रुमाल टाकुन ठेवतो. १. शर्जिल ला अटक करु. २. औरंगाबाद चे संभाजीनगर करु .. बघु काय मुहुर्त निघतो ते
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 03/03/2021 - 14:33 नवीन
https://www.loksatta.com/maharashtra-news/cm-uddhav-slams-central-government-for-marathi-language-issue-scsg-91-2412837/ इतकेच जर मराठी प्रेम आहे तर, स्वतःच्या मुलाला इंग्रजी शाळेत का घातले? एखाद्या भाषेला, अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा असेल तर, काही नियम असतात, ते तरी नीट पाळले गेले आहेत का?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 03/03/2021 - 17:00 नवीन
आदित्य ठाकरे उत्तम मराठी बोलतात त्यांना मराठी भाषेची उत्तम जान आहे. ते इंग्लिश मिडीयम मध्ये शिकले म्हणून मराठी भाषा आणि संस्कृती थोडीच विसरले आहेत. काही पण पोस्ट करत जावू नका
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 03/04/2021 - 00:59 नवीन
इंग्रजी माध्यमातून शिकून सुद्धा मराठी ची चांगली जाण असणारे असतात हे खरे आहे परंतु असे फार कमी ( उदाहरण संगीतकार श्री कौशल इनामदार) प्रश्न इंग्रजी माध्यमातून शिकण्याचा नाहीये ,ते जरूर शिकावे पण ते करताना मराठी कडे दुर्लक्ष होते ते कसे टाळणार? चांगली मराठी जर शिकली नाही तर वाचन नाही? मग त्यातील खुब्या कश्या समजणार? प्रश्न तो आहे मग अश्या मराठी बांधवांना आपलीच भाषा "डाऊन मार्केट " वाटू लागते मग आप्लि ओळखच पुसली जाऊ लागते यावर अनेक वर्ष ना उलगडलेला कोडे आहे ... ते म्हणजे पूर्ण इंग्रजी माध्यमातील शाळेत , मराठी हे ५०गुणांचे (कनिष्ठ) का असते? ते १०० गुणाचे का नाही ठेऊ शकत?
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु गुरुवार, 03/04/2021 - 05:42 नवीन
मराठी माध्यमातुन शिकुन फाडफाड इंग्रजी बोलले असते तर जास्त कौतुक वाटले असते. उदा. देवेंद्रजी फडणवीस. आदित्य ठाकरे विधानसभेत एकतास फक्त अस्खलित मराठीत भाषण करु शकतील का ह्याबद्दल शंका वाटते. पार्थ पवारचे एका सभेत मराठीत भाषण करताना काय हाल झाले होते हे बर्याच लोकांनी पाहिले आहे. आधीच्या नेत्यांना नीट इंग्लिश येत नव्हते आणि आता त्यांच्या पोरांना मराठी नीट येत नाही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 03/03/2021 - 14:44 नवीन
जर माझ्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली तर मला त्याचा अभिमान आहे, असे शिवसेनाप्रमुख म्हणाले होते. https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-cm-uddhav-thackeray-targets-amit-shah/articleshow/81311835.cms
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 03/03/2021 - 14:50 नवीन
आणि शिवसेना आत्ता म्हणते की, 2014 मध्येच युती तोडली... सगळ्याच गंमतीजंमती आहेत....
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 03/03/2021 - 14:58 नवीन
मुंबई शिवसेना,शिव सेना नेते रस्त्यावर होते.एक bjp नेता तेव्हा लोकांच्या मदतीला नव्हता हे समस्त मुंबई करानी अनुभवले आहे भाषण ठोकणे आणि रस्त्यावर येवून मदत करणे ह्या मध्ये जमीन आसमनचा फरक असतो. दुकान दारणी स्थिती फायदा घेवून भाव वाढवून लोकांची अडवणूक करू नये ह्याची काळजी पण सेणेनी घेतली होती. सर्व bjp नेते तर कोर्टात निर्दोष सुटले आहेत त्यांनी बाबरी मशीद पाडली च नाही ना लोकांना त्या कृत्यासाठी भडकवले असा कोर्टात स्टँड होता त्यांचा.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/03/2021 - 16:12 नवीन
https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-cm-uddhav-thackeray-targets-amit-shah/articleshow/81311835.cms आज विधानसभेतील भाषणात उद्धव ठाकरेंनी भाजप नेत्यांना झोडपून काढले. अमित शहांची निर्लज्ज अशी संभावना केली. बाळ ठाकरे सुद्धा २२-२३ वर्षे भाजप नेत्यांना यथेच्छ झोडपत होते, पण भाजप नेते ते निमूटपणे सहन करीत होते. सेनेपेक्षा सर्व दृष्टीने राज्यात खूप मोठा पक्ष असूनही भाजप नेते सेनेची मुजोरी का निमूटपणे सहन करीत होते व सेनेची प्रत्येक मागणी विनातक्रार का मान्य करीत होते हे एक गूढच आहे. उद्धवने मागील ८ वर्षे तेच पुढे सुरू ठेवलंय. १५ ऑगस्ट २०१८ चे भाषण रद्द करावे लागू नये म्हणूनच मोदींनी मुद्दाम वाजपेयींच्या निधनाची बातमी काही दिवस लपवून ठेवली, हा सेनेचा अत्यंत अश्लाघ्य आरोपही भाजपने कोडगेपणा दाखवून सहन केला. सेनेने अनेकदा लाथाडूनही भाजप नेते लोचटासारखे उद्धवची खुशामत करण्यात व बाळ ठाकरेंंचे कोडकौतुक करण्यात मग्न होते. निदान यापुढे तरी भाजप नेते बाळ ठाकरे व त्यांच्या बेगडी हिंदुत्वाचं कोडकौतुक थांबवून सेनेसमोर थोडा स्वाभिमान दाखवितील अशी अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 03/03/2021 - 16:30 नवीन
...... त्यांच्या बेगडी हिंदुत्वाचं कोडकौतुक थांबवून सेनेसमोर थोडा स्वाभिमान दाखवितील अशी अपेक्षा आहे. म्हणजे, नक्की काय करायला पाहिजे?
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 03/03/2021 - 16:33 नवीन
म्हणजे, नक्की काय करायला पाहिजे?
इतके सगळे होऊनही भाजपवाले परत शिवसेनेपुढे युतीची भिक मागायला गेले तरी आश्चर्य वाटू नये. असले काही करायचा विचारही भाजपवाल्यांनी करू नये. जून महिन्यात फडणवीसांनी संजय राऊतची भेट घेतल्यामुळे ती शक्यता पूर्ण नाकारता येणार नाही. मी तर ठरविले आहे की भाजपवाले जर परत युती करायला गेले तर मी विधानसभेत राष्ट्रवादीला मतदान करेन.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/03/2021 - 17:16 नवीन
इतके सगळे होऊनही भाजपवाले परत शिवसेनेपुढे युतीची भिक मागायला गेले तरी आश्चर्य वाटू नये. शिवसेनेशी पुन्हा युती करण्याचा पर्याय भाजपने बंद केलेला नाही. जुलै २०२० मध्ये सेनेला पाठिंबा देण्याची ऑफर चंपाने दिली होती. ऑक्टोबर २०२० मध्ये राऊत व फडणवीसांची २ तास भेट झाली होती. राष्ट्रवादीशी युती करण्याचा पर्यायही बंद केलेला नाही. येनकेनप्रकारेण सत्ता मिळवण्यासाठी भाजप आटोकाट प्रयत्न करीत आहे. सेनेविरूद्ध सातत्याने प्रकरणे काढून, ईडी वापरून, दडपण आणून सेनेला पाठिंब्यासाठी तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उद्धव ठाकरे अजून तरी दबले गेलेले दिसत नाही. आता ५ राज्यांची निवडणुक संपल्यानंतर थेट ठाकरे कुटुंबियांना अडकावण्याचे प्रयत्न होण्याची शक्यता आहे. तसे झाले तर सेना व भाजपमधील दुरावा कधीही कमी होणार नाही व ती संधी साधून पवार पाठिंबा काढून मुदतपूर्व निवडणुक लादू शकतील ज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी युतीविरूद्ध भाजप व सेना एकेकटे लढतील व दोघेही धारातीर्थी पडतील.. उद्धव ठाकरे आता मुरारबाजी देशपांडेंसारखी निकराची लढाई लढत आहेत असं दिसतंय. आज थेट अमित शहांची निर्लज्ज अशी संभावना करणे हे दुरावा टोकाला गेल्याची चिन्हे आहेत.
  • Log in or register to post comments
स
सॅगी Wed, 03/03/2021 - 17:31 नवीन
पण काँग्रेसच्या आणि त्यांच्याबरोबरच्यांना मत देऊन ते फुकट घालवण्यापेक्षा "नोटा"ला मत दिलेले कधीही चांगले असे मला वैयक्तिकरित्या वाटते.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 03/03/2021 - 17:52 नवीन
तसे केल्यास मतदारांना गृहित धरून चालायचे नाही आणि मतदार जबरदस्त शिक्षा करू शकेल हा संदेश पुरेसा प्रभावीपणे जायचा नाही. काहीही झाले तरी शिवसेनेला कोणत्याही निवडणुकीत मत देणार नाही. शिवसेना-भाजप युती झाल्यास विधानसभेला राष्ट्रवादीला मत देणार आणि युती असल्यास आमच्या लोकसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार असेल त्यामुळे कोणालाच मत देणार नाही किंवा नोटाला मत देणार. काहीही झाले तरी विधानसभेत शिवसेना ज्या बाजूला असेल त्या बाजूला मत देणार नाही. लोकसभेत अर्थातच मोदींना मत द्यायचे आहे पण शिवसेना उमेदवार असल्यास नाईलाज होईल तरीही लोकसभेत काँग्रेसला मत द्यायचा प्रश्नच नाही त्यामुळे मत न देणे किंवा नोटाला मत देणे हा पर्याय.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/03/2021 - 17:59 नवीन
मी लोकसभेसाठी पुन्हा मोदींनाच मत देणार. जोपर्यंत फडणवीस व चंपा भाजपचे महाराष्ट्रातील सर्वोच्च नेते आहेत, तोपर्यंत महाराष्ट्रातील कोणत्याही स्थानिक व विधानसभा निवडणुकीत मत द्यायला मतदान केंद्रावर जाणारच नाही.
  • Log in or register to post comments
स
सॅगी Wed, 03/03/2021 - 18:09 नवीन
मत द्यायला मतदान केंद्रावर जाणारच नाही.
"नोटा"ला मत द्यायला तरी जाच...डुप्लिकेट मतदानाद्वारे तुमचे मत दुसर्‍याने कोणत्यातरी नालायक उमेदवाराला देण्यापेक्षा ते बरे..
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 03/03/2021 - 18:37 नवीन
पक्ष निष्ठा दाखवण्यासाठी पक्षांनी उभे केलेल्या. गुंड उमेदवार ला मत देण्याच्या वृत्ती नुकतेच भारतात लोकशाही ची हत्या झाली आहे. आपल्या विभागातील प्रश्न ,समस्या जो व्यक्ती सोडवितो त्याचा पक्ष न बघता सज्जन लोकांना निवडून देणे हे देशप्रेमी लोकांचे प्रथम कर्तव्य आहे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 03/03/2021 - 18:00 नवीन
सेने शिवाय महाराष्ट्रात bjp कधीच सत्तेवर येणार नाही. ग्रामीण महाराष्ट्रात राष्ट्रवादी चा संपर्क समाजातील शेवटच्या पातळीवरील लोकांशी आहे. आणि ती स्थिती प्राप्त करण्यासाठी bjp कडे सक्षम नेतृत्व नाही. सेना शहरी भागात आपला दबदबा राखून आहे.आणि गुंडगिरी हीच सेने ची शहरातील ताकत आहे.
  • Log in or register to post comments
स
सॅगी Wed, 03/03/2021 - 18:03 नवीन
काहीही झाले तरी शिवसेनेला कोणत्याही निवडणुकीत मत देणार नाही.
+१
काहीही झाले तरी विधानसभेत शिवसेना ज्या बाजूला असेल त्या बाजूला मत देणार नाही.
+१
लोकसभेत अर्थातच मोदींना मत द्यायचे आहे पण शिवसेना उमेदवार असल्यास नाईलाज होईल तरीही लोकसभेत काँग्रेसला मत द्यायचा प्रश्नच नाही त्यामुळे मत न देणे किंवा नोटाला मत देणे हा पर्याय.
+१
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 03/03/2021 - 17:10 नवीन
किंवा मराठी प्रेमी राजकारणी लोकांवर आरोप करतात त्यांची मुल इंग्लिश मिडीयम मध्ये शिकतात. पण तीच मुल उत्तम मराठी बोलतात ,सर्व मराठी रिती रीवज ते पाळतात. पण जे विदेशात राहून येथील राजकीय लोकांवर आरोप करतात त्यांची मुल मराठी संस्कृती आणि मराठी भाषा ह्या विषयात पूर्णतः नापास असतात. उंटावरून शेळ्या हाकणे ह्यालाच म्हणतात.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 03/03/2021 - 17:20 नवीन
सेने शिवाय bjp ला महाराष्ट्रात कधीच सत्ता मिळणार नाही.हे सत्य bjp वाले चांगले ओळखून आहेत. आणि राष्ट्रवादी ,काँग्रेस शी bjp satte साठी युती करू शकत नाही. देशात वेगळाच संदेश त्या मुळे जाईल आणि त्यांची नाचक्की होईल.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 03/03/2021 - 17:40 नवीन
कर्णवती ठेवावे अशी हिंदू ची मागणी आहे पण हिंदू हित वादी bjp ते मान्य करून अहमदाबाद चे नाव Karnavati करणार नाही. फक्त लोकांना उपदेश देण्याचे काम करतील पण हे काम करणार नाहीत. हिंदुत्व वादी सध्या एक पण पक्ष नाही bjp तर नाहीच नाही. Mim ची ताकत वाढत आहे ह्याचा अर्थ हिंदू mim ल मत देत आहेतं
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 03/03/2021 - 18:24 नवीन
पूर्णतः कोलमडली आहे म्हणून लोकांनी bjp ला निवडून दिलेले आहे . पण bjp सुध्दा त्या मध्ये काहीच बदल करू शकली नाही. खूप विश्वास होता लोकांचा bjp वर . पण Bjp सुद्धा त्या मध्ये काडी चा सुद्धा बदल करू शकली नाही. ह्याचा अर्थ सरळ आहे काँग्रेस आणि bjp मध्ये काडी चा फरक नाही. लोकांना बदल हवा आहे. मग बदल करणारा पक्ष mim असेल तरी लोकांना त्या बद्द्ल हरकत नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/04/2021 - 04:36 नवीन
https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/pil-against-fastag-system-hc-seeks-centres-response/articleshow/81322707.cms योग्य याचिका. फक्त fasttag च वापरण्याची बळजबरी का? रैख रक्कम, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वापरून का टोल द्यायचा नाही? रस्ते गुळगुळीत, रूंद, खड्डेविरहीत असण्याची बळजबरी का नाही? रस्त्यांची कामे ठरलेल्या वेळेत संपविण्याची सक्ती का नाही? मुळात रस्तेबांधणीसाठी इंधनाच्या किंमतीत वाढीव अधिभार वसूल केला जात असताना अनंत काळापर्यंत टोल का?
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० गुरुवार, 03/04/2021 - 04:54 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
ख
खेडूत गुरुवार, 03/04/2021 - 04:58 नवीन
फक्त fasttag च वापरण्याची बळजबरी का? वेळ वाचणे हे मुख्य कारण. सुट्टे पैसे देणे, पावती छापणे हा वेळ वाचून शिवाय कमी कर्मचारी लागतील. अर्थात अजून काही वर्षांनी. टोल नाके राजकीय मंडळी चालवतात, आणि घोळ करतात. पूर्ण टोल फास्टटॅग ने भरलेल्या गाड्या पुढील सर्व नाक्यांवर नोंदल्या जात नाहीत असे निदर्शनाला आले आहे. अनेक गुन्ह्यांच्या तपासाला याची मदत होईल. बाकी जगात पंधरा वर्षे आधीच ते वापरतात. रोख रक्कम तसेच कार्ड वापरता येते पण जास्त पैसे द्यावे लागतात कारण व्यवस्था स्वीकारायला केलेला उशीर.. आज ना उद्या ते करावं लागेल. आधीच एक वर्ष वेळ दिला आहे. गुळगुळीत रस्त्यांसाठी हजारो तक्रारी गेल्या तर दाखल घेतली जाईल. बाबू लोकं शक्यतो हलत नाहीतच. इंधनावर कर वाढवून केलेलं काम इथे नाही, तर सीमेवर, पूर्वांचल आणि काश्मीर मधे वापरतात असं वाचलं होतं. हल्ली एक रेल्वे पुल आयफेल टॉवरच्या उंचीचा करत आहेत असा व्हिडिओ बातम्यांत पहिला होता. नत्थुला पास इथे चीन सीमेवर जायचा रस्ता गेल्या सहा वर्षांत प्रचंड बदलला आहे. ही कामे काही हजार कोटी घातल्या शिवाय होणार नाहीत.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 03/04/2021 - 06:08 नवीन
फक्त fasttag च वापरण्याची बळजबरी का?
श्रीगुरुजी? तुमच्या कडून या प्रष्णाची अपेक्षा नव्हती. हे म्हणजे शेजार्‍याची मुले शाळेत जाणार नसतील तर मीही माझ्या मुलांना शाळेत घालणार नाही असे म्हणण्या सारखे झाले. सुधारणा कुठेही होत असो तिचे स्वागतच करायला हवे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/04/2021 - 06:56 नवीन
एका विशिष्ट शाळेतच मुलांना शिकवा ही सक्ती कशासाठी? मुळात ही सुधारणा नसून एका नवीन प्रकारची खंडणी आहे.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस गुरुवार, 03/04/2021 - 06:11 नवीन
अनंत काळापर्यंत टोल का?
आतापर्यंतच्या चर्चेतला महत्वाचा, सामन्य माणसाच्या जिव्हाळ्याचा मुद्दा.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 03/04/2021 - 05:57 नवीन
सरकार बदलतात पण सामान्य लोकांच्या अडचणी कधीच सुटत नाहीत. दोन सरकार ची तुलना करून जे सरकारं चांगले आणि हे सरकार वाईट असे ठरवायचे झाले तर कोणतेही निकष लावले तरी तुलना करता येत नाही . कारण सरकार बदलली तरी व्यवस्था बदलत नाही. Bjp सरकार च्या काळात घेतलेले दोन निर्णय जास्त महत्वाचे वाटतात त्या मुळे भ्रष्ट कारभार थोडा संपुष्टात आला. १) गॅस चे अनुदान सरळ ग्राहकाच्या खात्यात जमा करणे. ह्या मुळे सबसिडी असलेल्या गॅस सिलिंडर चा काळाबाजार थांबला आणि सरकारी पैश्याची लूट थांबली. २) आणि दुसरा निर्णय वार्षिक सहा हजार रुपये अल्प भूधारक शेतकऱ्यंपर्यंत पोचले सरळ त्यांच्या बँक अकाऊंट मध्ये. मध्ये कोणीच एजंट नाही. हे दोन निर्णय ह्या सरकार चे वेगळे पण दाखवतात. शेतकऱ्या ना अनुदान देण्याचा नावाखाली सरकारी निधी मध्येच जिरवणारे महाभाग आहेत.रासायनिक खत आणि बी बियाणे ह्यांचे अनुदान सुद्धा सरकार नी सरळ शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट मध्ये जमा करावे . खूप पैसा सरकार चा वाचेल. सरकार मध्ये फरक दिसला पाहिजे. आणि दुर्दैव ची गोष्ट आहे हे दोन निर्णय सोडले तर काँग्रेस सरकार ,आणि bjp सरकार ह्या मध्ये काहीच फरक नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 03/04/2021 - 06:39 नवीन
सध्याचं आघाडीचं सरकारमधील मा.उद्धवजी ठाकरे यांचं सरकार आणि त्यांच्या पाठीशी असलेला अनुभव पाहता त्यांचं कौतुक केलं पाहिजे. सुरुवातीपासूनचं त्यांचं साधेपणाने कौटुंबिक बोलणे अनेकांना भावले आहे, म्हणजे फार गम्मतही वाटते. कारण राजकीय पक्ष नेत्यांचा आव बघायची सवय असलेल्यांना हे नवखं रुप वेगळं वाटू शकतं. कालचं भाषण तसंच होतं. राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देतांना त्यांनी चांगलेच हात धुवून घेतले. 'शेतक-यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला की पळे' शेतकरी आंदोलन, वाढते इंधन दरवाढ, मैदानाचे नामांतर, चीनची घुसखोरी या आणि विषयावर मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांना धु धु धुतले आणि ’देश म्हणजे तुमची काही खासगी मालमत्ता नाही आणि महाराष्ट्र तर नक्कीच नाही’ करोनाची साखळी तोडायची असेल तर लॉकडाउन हा प्रभावी उपाय असला तरी गोरगरिबांची चुल विझवायची नाही असे ते म्हणाले. व्हायरस कोणाला ओळखत नाही. ' आता तो मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन' म्हणत परत यायचा प्रयत्न करीत आहे. ( हा भारी होता. हहपुवा झाली) मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबतीत सर्वोतपरी महाराष्ट्र सरकारचे प्रयत्न सुरु आहेत, देत आहोत केंद्र सरकारची जवाबदारी आहे की त्यांनी आता मातृभाषेला अजून किती दिवस तिष्ठेत उभे ठेवणार असेही ते म्हणाले. आम्ही शिवभोजन थाळी देत आहोत. विदर्भ वेगळा होऊ देणार नाही. हिंदुत्वाच्या गप्पा आम्हाला शिकवू नका. मेट्रो कारशेड, असे अनेक विषय होते. मजा आली. धन्यवाद. बाकी, विरोधी पक्ष नेते मा.फ़डणविसांचा त्रास आपण समजू शकतो. माझी पूर्ण सहानुभूती त्यांच्या पाठीशी आहे. माझ्या मनात त्यांच्याबद्दल पूर्ण दयाभाव आहे. एकशे पाच सदस्य सोबत असतांना विरोधी बाकावर बसावे लागते. सारखं, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, हे योग्य नाही. सरकारचं लक्ष वेधू इच्छितो, नको त्या गोष्टीवर रडारड करावी लागते. मला त्यांचं हावभाव, बोलणे, वगैरे लै भारी वाटतं. जाता जाता : केंद्र सरकारवर टीका करणे देशद्रोह नव्हे असा एक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे, चला या निमित्ताने केंद्रसरकारप्रणित मुस्कटदाबी कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा करु या...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
B
Bhakti गुरुवार, 03/04/2021 - 06:51 नवीन
मुख्यमंत्र्यांनी असच बोलत राहिले पाहिजे... फक्त ते फेसबुकवर पार बोर करतात...ते कमी करा म्हणाव.. निष्पक्ष राहायचा राष्ट्रीय फार्म्युला -५ मि.NDTV पाहायचा आणि ५ मि. Republic पाहायचा.. तसा आता राज्यासाठी ५.मि.मुख्यमंत्रींना ऐकायचं आणि ५ मि. माजी मुख्यमंत्रीना ऐकायचं... ;)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 03/04/2021 - 07:16 नवीन
खरंय.... ऐकावे कोणाचेच वाटत नाही. सनातन वाहिन्यांवर ते बाबा महाराज लोक आणि ज़रा चायनल बदललं की आदरणीय पंतप्रधान कोणत्या ना कोणत्या विषयावर प्रवचन चालूच असतं, सध्या त्यांनाही अजिबात पाहवत नाही. खुपच बोर व्हायला लागलंय. पण चालायचंच...!:) -दिलीप बिरुटे (सहनशील)
  • Log in or register to post comments
स
सॅगी गुरुवार, 03/04/2021 - 07:31 नवीन
भरीस भर म्हणून आता मराठी बातम्यांच्या साईट उघडल्या तर टिनपाट मुखपत्रात आज काय विचारमौक्तिके उधळलीत याच्या बातम्या...जणू काही देशात चांगले घडतच नाहीये अशा प्रकारची निराशावादी "*करी" भाषा :)
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 03/04/2021 - 06:53 नवीन
मा.उद्धवजी ठाकरे यांचं सरकार आणि त्यांच्या पाठीशी असलेला अनुभव पाहता त्यांचं कौतुक केलं पाहिजे. हे म्हणजे राजीव गांधी पंतप्रधान पदी आल्यावर त्यांनी त्या पदाची जबाबदारी बऱ्यापैकी निभावून दिली असे म्हणण्यासारखे आहे ! सोयीस्कर रित्या हे विसरायचे कि ना राजीव गांधींना पंतप्रधान होण्याचा काही अधिकार होता ना सेनेला मुख्यमंत्रीपद मिळवण्याचा ! अर्थात अनेकांना हे कधी पटणार नाही कारण कसेही करून भाजप सत्तेवर नाही आले यातच आनंद आहे अशांना मग झालं तर .... १०५+ ५० अशीच जनतेने मते दिली होती तीन तिघाडा ला नाही हे हि दिसत नसावे ... वर हि मखलाशी कि बघ कसे व्यवस्थित मुख्यमंत्रीपद ( + बारामती रिमोट) निभावून नेत आहेत! .. चालुद्या
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/04/2021 - 06:53 नवीन
'शेतक-यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला की पळे' हे वाक्य पराकोटीचे अज्ञान (खरं तर महामुर्खपणाची परीसीमा) दर्शविते. अशा वाक्यांवर टाळ्या पिटणाऱ्यांच्या बुद्धीची आता कीव सुद्धा येत नाही. अर्थात शिवसेना आणि ज्ञान व शहाणपणा यांचा छत्तीसचा आकडा आहेच. त्यामुळे अशा बरळण्यावर अजिबात विस्मय वाटत नाही. बाकी चालू दे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 16 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 16 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 16 hours ago
  • सुंदर !!
    1 day 17 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 17 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा