लोकसंख्या वाढीचा बागुलबुवा
खालील ध्याग्यावर दिलेली प्रतिक्रिया थोडी खूपच लांब झाली म्हणून इथे वेगळा लेख म्हणून पाडत आहे.
https://misalpav.com/node/48280
पाश्चात्य देशांत २-३ दशकांनी एक नवीन पोपट निर्माण होतो. मग हा विषय घेऊन तेथीतील हस्तदंती मनोऱ्यातील लोक येथेच्छ प्रोपागंडा करून लोकांची प्रचंड प्रमाणात दिशाभूल करतात.
महायुद्धानंतर निर्माण झाला तो बागुलबुवा लोकसंख्या वाढीचा आणि हा बागुलबुवा बऱ्याच काळ चालला. भारतासारख्ग रीब देश ह्या विदेशी प्रोपागंडाला जास्त डोके न चालविता बळी पडतात. (सध्या बागुलबुवा वातावरण बदलाचा आहे आणि तो सुद्धा तितकाच दांभिक पणाचा आहे).
लोकसंख्या वाढीचे परिणाम समजण्यासाठी भौतिक शास्त्र किंवा जीवशास्त्र पूर्णपणे निरर्थक आहे. त्यासाठी अर्थशास्त्र समाजणे जरुरीचे आहे. ह्या संदर्भांत अमेरिकेतील १९८० मधील सायमन-एहरलीच हि पैज वाचणे मनोरंजक ठरेल. तर अर्थतज्द्न्य जुलिअन सायमन आणि जीवशास्त्री पॉल एहरलीच ह्यांच्यात एक मोठी जाहीर पैज लागली. १९६८ साली पॉल ह्यांनी पॉप्युलेशन एक्सप्लोजन नावाचे एक भयंकर प्रसिद्ध पुस्तक लिहिले. त्यांच्या मते लोकसंख्या वाढ तात्काळ थाम्बवली नाही तर जगांत प्रचंड अन्न कमतरता होऊन कोट्यवधी लोक मरणार होते. ह्या पुस्तकाने खळबळ माचवली आणि ह्यांच्या नादाला लागून गोऱ्या लोकांनी मुले निर्माण करणे कमी केले (ज्याची फळे ते आज भोगत आहेत). भारत, चीन आणि अनेक देशांनी जास्त विचार न करता विविध योजना राबवून लोकसंख्या वाढ म्हणजे जणू काही भस्मासुर आहे असा प्रोपागंडा निर्माण केला.
ज्युलियन सायमन ह्यांनी त्यांची हि भविष्यवाणी साफ खोटी ठरणार आहे असे जाहीर रित्या प्रकाशित केले आणि १० हजार डॉलर्स ची जाहीर पैज लावली. पैजेच्या नुसार ज्युलियन ह्यांचे म्हणणे होते कि बहुतेक संसाधनाचा तुटवडा तर असणार नाहीच पण वर तीच संसाधने स्वस्त सुद्धा असणार आहे. १९९० साली जुलिअन सायमन हे पैज सहज, म्हणजे अगदी मोठ्या फरकाने जिंकले. त्या दहा वर्षांत जगाची लोकसंख्या सुमारे ८०० दशलक्ष वाढली पण जे ५ धातू त्यांनी निवडले होते त्यांची किंमत बऱ्यापैकी कमी झाली होती.
लोकसंख्या वाढीचे काहीच वाईट परिणाम आहेत असे नाही. लोकसंख्या वाढीचे अनेक वाईट परिणाम आहेत. पण जगांत नक्की किती लोक असायला पाहिजेत हे सुद्धा कोणीही निर्धारित करू शकत नाही. बहुतेकांना लोकसंख्यावाढीचे वाईट परिणाम दिसतात पण त्याचे असंख्य चांगले फायदे दिसत नाहीत. लोकसंख्या कमी झाली तर हे अनेक फायदे गायब होतीलच पण त्या फायद्यांना आम्ही मुकलो आहोत हे सुद्धा समजणार नाही.
सोपे उदाहरण घेऊया. पोलिओ ची लस हि आमच्या साठी वरदान ठरली आहे ह्यांत काहीच दुमत नाही. अक्षरशः कोट्यवधी मुलांचा जीव ह्या लसीने वाचवला आहे. पण फक्त लसच नाही तर अनेक औषधे निर्माण झाली आहेत त्यामुळे आम्हा सर्वांचेच जीवन जास्त सुखकर झाले आहे. तर हि औषधे कशी निर्माण होता ? अक्षरशः हजारो लोकांचे परिश्रम ह्यांत गुंतले असतात. जगाच्या पाठीवर जितके जास्त डॉक्टर, संशोधक आहेत तितकी जास्त औषधांचा शोध लागतो. आज देशाची लोकसंख्या ७ अब्ज ऐवजी ४ अब्ज असती तर मार्केट मधील अनेक औषधें गायब झाली असती. पण मी फक्त औषधांचे उदाहरण दिले आहे. सॉफ्टवेर पासून, टीव्ही वरील विविध चॅनेल पर्यंत अनेक गोष्टी गायब झाल्या असत्या आणि आम्हा सर्वांचा जीवनमानाचा स्तर खूपच खाली गेला असता.
तुमहाला आवडत असलेली कुठलीही गोष्ट घ्या. समजा तुम्हाला तुमचा फोन आवडतो. ह्या फोनच्या निर्मितीसाठी हजारो पेटंटन्स लागली आहेत आणि अक्षरशः लक्षावधी विविध छोटे छोटे शोध अनेक लोकांनी निर्माण केले आहेत. आणि ह्यांत जो एकूण मानवी वेळ गेला आहे त्याची जर बेरीज केली तर कदाचित कोट्यवधी मनुष्य-तास त्या फोन चा शोध लावण्यासाठी खर्च झाले आहेत. समजा देशाची लोकसंख्या अर्धी असती तर तितके मनुष्यतास खर्च होण्यासाठी दुप्पट वेळ लागला असता आणि फोन आपल्या हाती येण्यासाठी २०२० ऐवजी कदाचित २०४० वर्ष लागले असते.
अर्थानं त्याच तर्काने आम्ही असे म्हणू शकतो कि जगाची लोकसंख्या फक्त ७ अब्ज असल्याने आज आमच्या हातात अश्या अनेक गोष्टी नाहीत ज्या कदाचित २०५० मध्ये आमच्या हाती असतील. आज जगाची लोकसंख्या १४ अब्ज असती तर कदाचित आणखीन अजब साधने आणि तंत्रज्ञान आमच्या हाती असते.
> अहो पण लोकसंख्या अशीच वाढत राहिल्यास पर्यावरणाचे काय ?
हा मुद्दा अनेक लोक वर काढतात आणि काही प्रमाणात तो रास्त सुद्धा आहे. पहिली गोष्ट म्हणजे जसे जीवनमान उंचावते आणि लोक जास्त काळ जगू लागतात त्याच वेळी लोकांना मुलें नकोशी होतात. आमच्या आजोबांच्या काळी खाण्यापिण्याचे वांधे होते त्यामुळे लोक दिवसभर काबाडकष्ट करायचे आणि रात्रभर प्रजनन करायचे. महिलांची अवस्था फक्त चूल आणि मूल अशी होती. पण त्यांची चूक नव्हती. रात्री आणखी करणार काय ? मग ४०-५० वर्षांत हृदयविकाराचा झटका वगैरे येऊन मृत्यू.
आता जीवनमानाचा स्तर उंचावलाय. गर्भनिरोधक आल्याने शरीरसुख घेता येते आणि प्रजनन रोखता येते. रोमान्स ची व्याख्या रुंदावलीय. आता जोडपी चित्रपट पाहतात, दिनार करतात, कुठे फिरायला वगैरे जातात. पुस्तके वाचतात आणि नेटफ्लिकस पाहतात. त्याशिवाय प्रत्येक वेळी फिरायला वगैरे जाताना लक्षांत येते कि जास्त मुले म्हणजे खूपच जास्त खर्च त्यामुले फार तर एक दोन मुले खूप होतात. ह्यामुळे आपसूकच जन्मदर खालावत जातो. ह्या दृष्टिकोनातून कर्वे हे खूपच दूरदर्शी आणि विद्वान होते.
मुले जास्त जन्माला घालण्याचे एक कारण म्हणजे मुले मारण्याचे प्रमाण सुद्धा खूप होते. आता ते कमी झाल्याने वंशाला एक दिवा असला तरी पुरतो मोठी माळ लावायची गरज नाही. परंपरागत घरे आता बंद पडत आहेत. बापाने बांधलेल्या घरांत मुलें राहू इच्छित नाहीत म्हणून "वंशाचा दिवा" हि सुद्धा जास्त डिमांड नसलेली गोष्ट झालीय.
मुलांच्या संगोपनाचा मार्जिनल खर्च आणि लोकसंख्या वाढीचा दर हि दोन महत्वाची व्हेरिएबल्स अर्थतज्ञ पाहतात आणि दोन्ही मध्ये खूपच जास्त संबंध आहे. आणि ह्या संबंधाने मानवी लोकसंख्या चादर पाहून हात पसरेल ह्यांत मला तरी अजिबात शंका वाटत नाही.
मुलांच्या संगोपनाचा मार्जिनल खर्च :
मार्जिनल खर्च ह्याचा अर्थ प्रत्येक ऍडिशनल मुलाच्या संगोपनासाठी खर्च किती येतो. एका मुलाचा खर्च प्रचंड असतो. कारण मूल नाही तर माता काम करू शकते. एक मूल झाले आणि तिने नोकरी सोडली तर ते पैसे येणे बंद होतात आणि त्यामुळे तो मुलाच्या संगोपनाचा खर्च ठरतो. पण एकदा नोकरी सोडल्यानंतर तिला २ मुले झाली तर त्या दुसऱ्या मुलाचा मार्जिनल खर्च खूपच कमी असतो. (एका मुलासाठी ३ लक्ष वर्षाला खर्च येतो तर दोन मुलांसाठी ३.५ लक्ष खर्च येतो इत्यादी).
जुन्या खाली हा मार्जिनल खर्च खूपच कमी असायचा कारण बहुतेक खर्च हा फक्त अन्नाचा असायचा. आता तुम्ही दुबईला किंवा किमान खंडाळ्याला जाता तर सुद्धा तिकिटाचा खर्च प्रत्येक मुलांमागे होतो तो फार असतो. ४ मुले झाली तर मग तुम्हाला ५ सीटर गाडी सुद्धा चालत नाही.
जसे जसे जीवन मान उंचावते तसे तसे मार्जिनल खर्च हा खूपच वेगाने वाढतो. मुलाला विदेशांत शिकायला पाठवायचे तर ५० लक्ष रुपये पाहिजेत. दोन मुले झाली तर मग १ कोटी. पण गरीबाच्या घरांत हे प्रश्न नसतात.
पण खर्च वाढतो म्हणजे नक्की काय होते ? माणसाला जगांत फक्त दोनच खर्च असतात. एक खर्च असतो ऊर्जेचा दुसरा खर्च असतो दुसऱ्या माणसाच्या वेळेचा. (आयफोन पासून कांदे बटाटे पर्यंत तुम्ही काहीही विकत घेतले तर तुम्ही फक्त ऊर्जा आणि दुसऱ्या लोकांचा वेळ ह्या दोनच गोष्टींचा मोबदला देत असता. समजा ह्या दोन गोष्टी अपरंपार आणि फुकट असत्या तर आयफोन आणि कांदे बटाटे ह्यांची किंमत सुद्धा शून्य असती.). खर्च वाढतो ह्याचा अर्थ तुम्ही जास्त ऊर्जा आणि मानवी वेळ खर्च करत आहात असा होतो. आपण पर्यावरणाच्या नावाने बोंब मारतो तेंव्हा पर्यावरणाला होणारी हानी हि १००% ऊर्जा ह्या एका संसाधना द्वारे तुंबलेली जाऊ शकते. पण ऊर्जा महाग असल्याने आम्ही ती हानी अन-डू करू शकत नाही. जर पर्यावरणाची हानी वाढत गेली तर ऊर्जेचा दर सुद्धा वाढत जातो आणि आणि त्यामुळे मुलांच्या संगोपनाचा मार्जिनल खर्च.
त्यामुळे हि दोन्ही व्हेरिएबल्स एकमेकांना बॅलेन्स करतात. पण ऊर्जा हि काळाचा ओघांत स्वस्त होत गेली तर लोकसंख्या सुद्धा वाढत जाते आणि पर्यावरणाला हानी सुद्धा होत नाही. ह्या दोन्ही व्हेरिएबल्स मधील गणिती संबंध तसा स्पष्ट पणे अभ्यासाने कठीण आहे कारण लोकसंख्या वाढली कि हे लोक नवीन शोध लावून ऊर्जेचा दर आणखीन कमी करतात.
टीप : युनायटेड नेशन्स किंवा विविध तद्न्य मंडळी जगाची लोकसंख्या सुमारे २०५० मध्ये स्टेबल होईल असे भाकीत करत आहेत. मला त्यांत शंका वाटते. पहिली गोष्ट म्हणजे माझ्या मते ऊर्जेचा खर्च येत्या २० वर्षांत १०० पटीने कमी होणार आहे. बहुतेक ऊर्जा फ्युजन सेल द्वारे किंवा इतर कुठल्या नवीन शोधांतून निर्माण होईल आणि त्यानंतर सर्वच जीवनावश्यक वस्तूंचा भाव कमालीचा पडणार आहे. ऊर्जा स्वस्त आणि मुबलक होताच, शेती, पिण्याचे पाणी वगैरे गोष्टींचा काहीही तुटवडा असणार नाही त्याशिवाय कार्बन एमिसशन वगैरे उलट करणे सहज शक्य होणार आहे. कदाचित IVF वगैरे प्रक्रिया खूपच सोप्या होऊन गरोदर न राहता सुद्धा मुले निर्माण करणे शक्य होईल आणि त्यामुळे कुठल्याही वयांत मुले निर्माण करणे शक्य होईल आणि कदाचित मंडळी जास्त मुले निर्माण करतील. अर्थांत मी हे भाकीत एखाद्या ज्योतिष्या प्रमाणे वर्तवत आहे.
टीप २ : जगांतील सर्व नैसर्गिक संसाधने हि अक्षय म्हणजे अनलिमिटेड आहेत. एकच असे संसाधन आहे जे अक्षय नाही आणि ते म्हणजे मानवी वेळ. हि संकल्पना बहुतेक इकॉनॉमिक्स च्या पुस्तकांत मंडळी गेलेली असते पण राजकीय कारणासाठी पाश्चात्य राष्ट्रांनी "लिमिटेड रिसोर्सिस" आणि "अनलिमिटेड रिसोर्सेस" किंवा "रिन्यूएबल ऊर्जा" आणि "नॉन रिन्यूएबल ऊर्जा" असल्या श्रेणी शाळांतून आम्हा मुलांच्या डोक्यांत घातल्या. हि विचारसरणी डाव्या लोकांची असून पाश्चात्य देशांतून आपल्या देशांत आली आहेत आणि त्यांत काहीही तथ्य नाही. हि गोष्ट बहुतेक लोकांना पचणार नाही किंवा पटणार नाही कारण ह्या प्रकारच्या प्रोपागंडावर आमच्या देशांत कुणीही प्रश्न विचारला नाही. कुणाला इंटरेस्ट असेल तर वेगळ्या लेखांत विस्ताराने लिहीन. प्रतिक्रिया किंवा खरडवहीवर लिहून कळवा.
🗣 चर्चा
(178)
म
मुक्त विहारि
Mon, 02/08/2021 - 18:11
नवीन
सहमत आहे
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Tue, 02/09/2021 - 10:58
नवीन
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Tue, 02/09/2021 - 17:15
नवीन
हेच एका वेगळ्या प्रकारे भांडवलशाहीला देखील लागु पडते.
ईर्शा द मॅन आपल्या पेक्षा बेटर... त्यातनच आपल्या प्रगतीच्या आकांक्षेला बळ मिळते :ड
- Log in or register to post comments
स
साहना
Mon, 02/08/2021 - 15:31
नवीन
जे काही मी वर लिहिले आहे त्यापेक्षा सोपे करून सांगण्याची माझी क्षमता नाही. त्यामुळं पटत नसल्यास क्षमा करावी. मिपाकर सुद्न्य आहेत आणि किमान इतर काही लोकांना तर्क समजेल अशी भाबडी अपेक्षा.
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Mon, 02/08/2021 - 13:54
नवीन
लेखाशी सहमत.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Mon, 02/08/2021 - 14:15
नवीन
नक्की का?
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Mon, 02/08/2021 - 14:33
नवीन
होय
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Mon, 02/08/2021 - 16:29
नवीन
लग्न केले की, भरपूर मुलांना जन्माला घाल ...
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Mon, 02/08/2021 - 14:59
नवीन
राजेश जी , इथल्या चर्चा.. फक्त काही नवीन विचार मिळतो का या साठी असतात त्यामुळे मी तरी तसा व्यक्तिगत प्रश्न विचारीत नाही. सर्वच डॉकटर दारू न पिणारे धूम्रपान न करणारे असत नाहीत तसे ते आहे ! लोकसंख्या मर्यादीत ठेवण्यासाठी कायदा करणे युक्त नाही पण त्यावर नियंत्रण व्हावे अशी समाजाची इच्छा असेल तर त्यासाठी काही नकारात्मक व काही प्रोत्साहनात्मक कायदे जरूर करता येतील. जसे तीन मुले असतील तर ग्रामपंचायतीला उभे राहाता येणार नाही ,संडास बांधला नसेल तर नगरसेवक होता येणार नाही असेच काही ! हेल्मेट नसेल तर विमा रक्कम मिळणार नाही असे ही काही ! अर्थात हे सर्व घटनेच्या मूळ चौकटीत बसत असेल तरच हे वेगळे सांगणे नको !
माझा एक शेजारी मला विचारता झाला तुम्ही संघात गेला होतात का ? किती वर्षे ? मी चार पाच वर्षे असे उत्तर दिले ! तो ऐकीव पणे संघाचा द्वेष वाला होता. जेव्हा मी समाजवादावर बोलायचो त्यावेळी त्याला मी संघात गेलो आहे का याची शंका यायची ! दुसरा एक फेसबुकवर होता तो पक्का संघवादी अर्थातच समाजवादाचा द्वेष्टया होता तो मला कम्युनिस्ट म्हणायचा . दोघानाही दोन्ही विचारधारांच्या मधली काही धारा असते याचे भानच नव्हते . तसे अर्थशास्त्राचेही असते . जगात या शास्त्राइतके वाद कोणत्याही शास्त्रात नाहीत . कारण हे एक मानशास्त्राचीच शाखा आहे हे आता मान्य होत आहे. त्यामुळे असे म्हणतात की नवश्रीमंत माणसाला नेहमी भांडवल वाद आवडतो . तो व्यावसायिकांना तर जास्तच आवडतो ! तो खेळाडूंना आवडतो ! कलावंतांना आवडतो कारण यात आपली किंमत ठरण्याची एक अनैसर्गिक अशी पद्धत असते ! उदा खेळाडूने लोकप्रियतेच्या जोरावर शाम्पूची जाहिरात तो ना वापरता देखील करून पैसे मिळविणे !
आपण सांगितल्या प्रमाणे ज्या वेळी आता जे नवश्रीमंत झाले आहेत त्याना येणाऱ्या कौशल्याचा पुरवठा करणारी माणसे बेसुमार होतील त्यावेळी हीच माणसे समाजवादाच्या गोष्टी करतील . एकेकाळी ठेवीच्या जाहिराती देणारे आता कर्जाच्या जाहिराती देत आहेत. आता पेपरात ठेवीची जाहिरात आली तर ती कुठल्यातरी किडुक पतसंस्थेची असते.
एका गंमत इथे लिहितो ते माझेच वाक्य आहे .. खर्च करणे हा मूर्खपणा आहे तसे फार सेव्हिंग करणे हाही मूर्खपणाच ! पण हे दोन्ही मूर्ख लोकच इकोनिमी चालवीत असतात ! सगळेच पोहायला शिकले तर लाइफ जॅकेटचा धंदा बुडेल पण त्याची काळजी देवाला असते. सगळे पोहायला शिकतच नाहीत !
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Mon, 02/08/2021 - 16:28
नवीन
मुले नकोतच हा माझा अट्टाहास नाही....
नियंत्रण असावेच...
अति मुले जन्माला घातल्याचे दुष्परिणाम, जे डोळ्यासमोर आहेत ते लिहीतो ...
1. स्वतःची 15 एकर जमीन, साल 1900... आजच्या घडीला 7-12 वर, 60 जण असते ...सुदैवाने कुणीही शेतीवर अवलंबून नाही, पण असते तर, सगळ्यांना 10 गुंठेच जागा मिळाली असती. कुणाचेच भागले नसते.
2. मुलगा मॅट्रिकला असतांना वडील वारले, साल 1930, मुलगा हुषार, मेडीकलला प्रवेश मिळाला पण 7 लहान भावंडे, मेडीकल मध्ये वर्षे घालवण्या इतका वेळ न्हवता, प्राण्यांचे डाॅक्टर झाले... त्यांचे उमेदीचे आयुष्य, भावांना शिकवण्यात गेले...
3. साल 1910, उत्तम सरकारी नौकरी, पण कर्व्यांना काय समजते? ही विचारसरणी, 1940 साली निवृत्ती, पदरी 12 मुले, त्यापैकी 4 घरात, 8 बाहेर गावी, कुणीतरी मनी ऑर्डर पाठवणार तेंव्हा महिना निघणार ...
अफाट मुले असल्याने, ही डोळ्यासमोरची उदाहरणे आहेत ....
तरीही कुणाला वाटत असेल तर, भरपूर मुलांना जन्म द्या..
- Log in or register to post comments
स
साहना
Mon, 02/08/2021 - 20:52
नवीन
> अफाट मुले असल्याने, ही डोळ्यासमोरची उदाहरणे आहेत
माझ्या लेखांत मी कुठेही जास्त मुले निर्माण करा असे लिहिले नाही. प्रत्येक व्यक्तीने आपले हित आणि सुख समाधान पाहून आपल्याला पाहिजे तितकी मुले जन्माला घालावीत आणि इतरांनी आणि विशेषतः सरकारने त्यांत ढवळाढवळ करू नये असा लेखाचा रोख आहे. हे सांगण्यास मी कुठे कमी पडले कि वाचणारे उगाच आपले पूर्वग्रह माझ्या लेखावर थोपत आहेत हे मला समजत नाही. लोकांनी आपल्याला पाहिजे तितकी मुले निर्माण केली म्हणून लोकसंख्या विस्फोट वगैरे होऊन काहीतरी खूप वाईट घडेल हे भाकीत चुकीचे आहे इतकाच लेखाचा सारांश आहे.
काही मंडळींनी १२ मुले जन्माला घातली आणि त्यामुळे कुठल्याही मुलांचे संगोपन ठीक होऊ शकले नाही हा तुमचा अनुभव १०० वर्षे मागे प्रत्येक घरांत दिसत होता. पण आणखी उपाय तरी काय होता ह्या मंडळींकडे ? दिवसा काबाडकष्ट आणि रात्री प्रजनन हेच चालू होते. गर्भनिरोधक उपलब्ध नव्हते आणि इंद्रियनिग्रह तर मोठ्या मोठ्यांना जमला नाही ह्या लोकांचे काय ? पण त्याच वेळी ह्यांनी प्रजनन केले म्हणून काही देशाचे वाट्टोळे झाले नाही. अफाट लोकसंख्या असून सुद्धा देश चांगला आहे आणि वेगाने प्रगती करत आहे. प्रचंड प्रमाणात मानव संसाधन आहे म्हणून देशाला काही किंमत आतंरराष्ट्रीय स्तरावर आहे.
त्याकाळी काही कायदे केले नाहीत मग आज करायची काय गरज आहे ? आणि काहीही कायदे नसताना भारताचा प्रजनन दार आपसूकच कमी होत असताना आणखी कायदे करून काय फायदा ?
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Mon, 02/08/2021 - 16:32
नवीन
>>> +१११ पटेश !
कायदा / सुविधा (मुद्द्यानुसार )
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Mon, 02/08/2021 - 16:46
नवीन
साल 1960 ते 1970
छानसे खेडेगाव, टुमदार घरे, भांडणे नाहीत, हवा शुद्ध, बियर बार एखाद दुसरा.रात्री 8 नंतर ध्वनी प्रदूषण शुन्य...
साल 1970 ते 1980
वस्ती वाढली, रिक्षा सुरू, रात्री 10 नंतर ध्वनी प्रदूषण अतिशय कमी.भांडणे थोडी वाढली.
1980 ते 2020
वस्ती अफाट, धुळ अफाट, आवाज अफाट, भांडणे वाढली, बियर बार संस्कृति वाढली..
अफाट लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम असे दिसतात...
अदृष्य परिणाम,
दर माणशी, शेती उत्पन्न कमी झाले.माणसे शहरात यायला लागली.त्यामुळे भाऊबंदकी वाढली.शेते ओसाड पडायला लागली.गोठे ओसाड झाले...
- Log in or register to post comments
ब
बाप्पू
Mon, 02/08/2021 - 17:53
नवीन
असे कसे??
लोकसंख्या वाढली म्हंजी मॅन हौर्स आणि क्रिएटिव्हिटी पण वाढली.. त्यामुळे आपोआप जागा, शेती, गाड्या, रेलवे, दवाखाने, बसेस, हवा, पाणी, झाडे, पैसा, रस्ते हे पण आपोआप वाढेल.. थोडी कळ काढा. तोवर एखादे पुस्तक वाचा.. किंवा चीन चा अभ्यास करा.
नुकतेच लग्न झाले असल्यास अपत्य निर्मिती सुरूच ठेवा.. कोणतीही अडचण येणार नाही. जितकी जास्त मुले तितका प्रगत समाज..
सॅरकॅस्टिक प्रतिसादाबद्दल क्षमस्व पण अती सर्वत्र वर्जयेत या नियमाप्रमाणे एका ठराविक ब्रेकपॉईंट नंतर सर्व कोलॅप्स व्हयला सुरवात होईल.
जास्त लोकसंख्या = प्रगती हे जर समीकरण असेल तर भारत आज जगावर राज्य करत असता पण परिस्थिती काय ते सर्व पाहतायेत.
पृथ्वीचा समतोल, निसर्ग, इतर प्राणी, हे सर्व थोडा वेळ बाजूला ठेवू. फक्त मनुष्याचा विचार करू.
मनुष्य हा इतर प्राण्याप्रमाणे नाहीये जे फक्त खाण्या पिण्याच्या शोधात जगतात आणि वेळ आल्यावर प्राणायसाठी पार्टनर शोधतात.. मानवी जिवन अश्या इतर प्राण्याप्रमाणे नसून त्यापेक्षा खूप वेगळे आहे ज्यामुळे फक्त अन्न आणि निवारा मिळाले कि झाले असं नाहीये. इतर असंख्य गरजा आहेत आणि त्या गरजा आयुष्याचा भाग आहेत. लोकसंख्या वाढली तर त्या सर्वांवर मर्यादा येतील आणि शेवटी मानवाचे आयुष्य इम्पॅक्ट होईल.
वर मूवी म्हणल्याप्रमाणे दर सेकेंदाला एक लोकल सोडली तरीही ती इतकी फुल असेल कि त्यात चढणे मुश्किल होईल..! इतकी मुले होतील कि सर्वांना शिक्षण देणे अवघड होईल. इतकि वाहने होतील कि 10 पदरी रस्ते केले तरी लांबच लांब रंगा लागतील.
त्यामुळे लोकसंख्या नियंत्रणात ठेवणे हे मानवाच्या हिताचे आहे.
- Log in or register to post comments
स
साहना
Tue, 02/09/2021 - 19:02
नवीन
आपला प्रतिसाद उपरोधिक असला तरी मी उत्तर देते.
> छानसे खेडेगाव, टुमदार घरे, भांडणे नाहीत, हवा शुद्ध, बियर बार एखाद दुसरा.रात्री 8 नंतर ध्वनी प्रदूषण शुन्य...
निव्वळ गतवैभवाची खोटी कल्पना आहे. त्या खेडेगावात कचरा बाहेर जळत असतील. जमीनदार मंडळी गरिबांचे शोषण करत असतील बहुसंख्य जनता अडाणी आणि निरक्षर असेल. बाळ मृत्युदर आभाळाला टेकलेला असेल. आरोग्याच्या सध्या सुविधा सुद्धा नसतील. अनेक आईवडिलांनी स्वतःच्या हातावे आपल्या लहान मुलांना सरणावर चढवले असेल किंवा पुरले असेल. त्याशिवाय तुम्ही "लोकसंख्या वाईट" म्हणून म्हणता ती वाढवण्याचे काम सुद्धा बहुतेक ह्याच लोकांनी अविश्रांत मेहनत घेऊन केले असेल. वीज आहेच असे नाही पण असली तरी भारनियमन.
तुम्ही प्रदूषण म्हणता पण बहुतेक महिला लाकूड नाहीतर शेणी जाळून त्या धुरांत स्वयंपाक बनवत होत्या. आणि सरासरी आयुर्मर्यादा ५० च्या आसपास होती. महिलांना साधी आरोग्याची साधने उपलब्ध नव्हती.
(आज सुद्धा अशी खेडेगावे सर्वत्र आहेत पण बहुतेक भारतीय अश्या खेडेगावांत राहू इच्छित नाही ह्यावरून ह्या खेडेगावांत राहणी अत्यंत निकृष्ट आहे असे बहुतेक भारतीयांना वाटते. )
> वस्ती वाढली, रिक्षा सुरू, रात्री 10 नंतर ध्वनी प्रदूषण अतिशय कमी.भांडणे थोडी वाढली.
त्याच वेळी दळणवळणाची साधने निर्माण झाली. शेतीव्यतिरिक्त इतर व्यवसायांच्या संधी उपलब्ध झाल्या. महिलांची काम करण्याची प्रवृत्ती वाढली. टीव्ही आला, वीज थोडी चांगली आली. पारंपरिक गरीब लोकांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या. पिण्याचे पाणी थोडे स्वच्छ झाले. आयुष्यमर्यादा साधारण ५ वर्षांनी वाढली. शेती आणि मजुरी कमी झाल्याने पिळवणूक सुद्धा कमी झाली.
> वस्ती अफाट, धुळ अफाट, आवाज अफाट, भांडणे वाढली, बियर बार संस्कृति वाढली..
हो पण लोकांना हेच आवडत आहे. म्हणून तर खेडेगावांतून लोक अफाट संख्येने शहरांची वाट धरत आहेत.
धूळ किंवा आवाज ह्या वाईट गोष्टी आहेत ह्यात शंकाच नाही पण त्याच वेळी इतर अनेक चांगल्या गोष्टी शहरांत असतात त्यामुळे धूळ आणि आवाज सहन करून सुद्धा लोक मुंबईत किंवा पुण्यात राहणे पसंद करतात टिम्बक्तू बुद्रुक मध्ये नाही. तुम्हाला धूळ दिसते आणि आवाज दिसतो, चांगल्या शिक्षणाच्या सुविदा, चांगल्या पायाभूत सुविधा, मनोरंजनाची साधने, सुरक्षा, चांगले आरोग्य, आर्थिक स्वातंत्र्य इत्यादी गोष्टी दिसत नाहीत.
---
बहुतेक माणसांनी अशी धारणा करून घेतली आहे कि पूर्वी चांगले होते, आता खराब झाले आहे. ह्याला काहीही अर्थ नाही. माणसाचे मन असे आहे कि भूतकाळांतील चांगल्या गोष्टी आठवणीत राहतात पण वाईट गोष्टी आपण सोयीस्कर पद्धतीने विसरतो. १९६० चा काळ चांगला होता म्हणून ओरड करण्यार्यांनी पोलिओ झालेल्या व्यक्तीला किंवा ज्या बापाने आपले मूळ आणि त्याची आई ह्या दोघांना एकाच दिवशी मारताना पहिले आहे त्यांना जाऊन सांगा. काय झाले पाय अधू झाला तर ? बियर बार संस्कृती नव्हती ना !
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Tue, 02/09/2021 - 21:05
नवीन
200 वर्ष पूर्वी जावू नका त्या वेळचे लोकांचे जीवन कसे होते हे आपल्याला फक्त काही लिखित दस्त्वेज मधून च कळते लीहणारा कोणत्या विचाराचा होता किंवा कोणासाठी लिहीत होता त्या वर त्याचे सत्य अवलंबून आहे.
पण ह्या 100 वर्षातील जनजीवन कसे होते हे लोकांना पक्के ठावूक आहे .आज जे 50 शी मध्ये आहेत त्यांनी ते अनुभवले आहे आणि त्यांच्या आई वडिलांकडून अजुन 50 वर्षाचा इतिहास त्यांना खरा माहीत आहे .
पूर्वी म्हणजे काही वर्ष पूर्वी च खेडेगाव ही अतिशय सुंदर होती.प्रदूषण नव्हत त्या मुळे नदी नाले स्वच्छ होते .
हवामान बदल तर तेव्हा पण होता पण त्याची तीव्रता आता आहे तेवढी नव्हती काही वर्षांनी येणाऱ्या दुष्काळ चा काळ सोडला तर पावूस वेळेवर सुरू होत होता आणि भरपूर पडत होता.
जमिनी मधील पाण्याची पातळी खाली गेलेली नव्हती खूप पाणी होते जमिनीत.
रासायनिक खते, कीटक नाशक नसल्या मुळे शुध्द ऑरगॅनिक धान्य आहारात होते.
संकरित प्राणी नसल्या मुळे देशी कसदार दूध उपलब्ध होते.
लोकसंख्या कमी असल्या मुळे जमिनी जास्त हीत्या.
लोक निती वान होती पैसे किती आहेत ह्या पेक्षा माणूस कसा आहे ह्याला जास्त किंमत होती.
वातावरण अतिशय स्वच्छ असल्या मुळे लोक तंदुरुस्त होती आज च्या सारखे 25 विशित च blood pressure, Madhu मेह,jadpana नव्हता .
लोकांचे आता आयुष्य वाढले आहे ते कोणाचे ज्यांचा जन्म 1900 ते 1870 पर्यंत चा आहे त्यांचेच .
त्या पुढील लोक 50 शी सोडा 40 शी मध्येच स्वर्गवासी होतील अशी त्यांची अवस्था आहे.
आजच्या पेक्षा पाढच्या 100 वर्षाचा काळ हा अतिशय सुंदर होता ..ह्या वर दुमत होण्याचे कारण च नाही.
घर मोठी होती कुटुंब एकत्र होते लोक स्वार्थी नव्हती..
आता शहरांची अवस्था कचरा पेटी सारखी झाली आहे.
फक्त घान,फक्त गर्दी,फक्त दूषित हवा आणि सर्वत्र पसरलेल्या बकालपणा असेच शहरांचे वर्णन करता येईल..
अमेरिकेने मोठ्या नावाने भारतीय लोकांना त्यांच्या देशात प्रवेश दिला म्हणून ते त्या देशातील अमेरिकन लोकांनी कष्टाने उभ्या केलेल्या सुनियोजित शहरात राहत आहेत.
ती फक्त अमेरिकन लोकांची कृपा आहे.भारतीय लोकांना त्यांच्या देशात त्यांनी प्रवेश दिला.
भारतीय लोकांचं तेथील सुनियोजित शहर बसवण्यात काही हातभार नाही फक्त ते अमेरिकेवर भार आहेतं
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 02/10/2021 - 04:40
नवीन
आता खेडेगावात राहणे, अतिशय उत्तम आहे ...
1970 साली जी परिस्थिति होती, ती 2020 मध्ये नाही ...
- Log in or register to post comments
स
साहना
Wed, 02/10/2021 - 06:48
नवीन
असे असेल तर ओढा लागला असेल ना शहरांतून खेडेगावाकडे ? ???
- Log in or register to post comments
ग
गवि
Wed, 02/10/2021 - 07:03
नवीन
:-))
जाऊ द्या हो. ते गावच्या आठवणीने जरा भावुक झालेत. सध्या शहरात आले असतील. ह घ्या हो मुविशेठ.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 02/10/2021 - 07:16
नवीन
माझ्या जीवनशैलीला, गावातील वातावरण पसंत पडते...
ह्याचे अर्थ, शहरात राहणारे अयोग्य आणि मीच तेवढा योग्य, असा होत नाही ....
तुम्ही तुमच्या जीवनशैलीला योग्य असे वातावरण निवडले आहे आणि मी माझ्या ....
समजा जर मला, तुम्ही करता ते काम आवडत असते तर मी शहरच निवडण्याचे Chances जास्त होते ...
याउलट, तुम्हाला जर शेतीची आवड असती तर तुम्ही गाव निवडले असते ....
एकाच व्यक्तीला हजारो कंगोरे असतात, तसेच एकाच समाजाला,एकाच तराजूत तोलणे अयोग्य आहे ...
आता एक कट्टा, शेतावर करू... मस्त पैकी बियर पिऊ ... आजकाल गावोगावी बियर शाॅपी सुरू झाल्या आहेत ...
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 02/10/2021 - 07:09
नवीन
कुणाला बर्गर प्रिय तर कुणाला चटणीभाकर ...
कुणाला मनोर्यात बसून, पुस्तक वाचून, सल्लागार व्हायला आवडते, तर कुणाला स्वतः माहिती घेऊन ...
त्यामुळे तुमचे विचार आणि माझे विचार, ह्या बाबतीत वेगळे आहेत...
दोघेही दोन धृवांवर उभे आहोत...
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 02/10/2021 - 04:38
नवीन
तुमचे अनुभव वेगळे आणि आमचे अनुभव वेगळे ....
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Mon, 02/08/2021 - 17:18
नवीन
माकडांचा कायदा,
साल साधारण, 1980
आंब्याची झाडे भरपूर आणि आंबा पण भरपूर, घरात खाणारी मंडळी 6, पैपाहुणा कितीही आला तरी, आंब्याला तोटा नाही.. माकडे मारायला परवानगी असल्याने, माकडांचा अजिबात उपद्रव नाही ...
साल 2000, माकडांना अभय ...
झाडे तितकीच, आंबेही भरपूर, घरात खाणारी मंडळी 8, पण, माकडे आंबेच शिल्लक ठेवत नाहीत ... पैपाहुणा आला तर, नको वाटतो... कारण, घरच्यांनाच जेमतेम आंबे मिळतात...
सध्या बर्याच ठिकाणी, रात्रंदिवस, नेपाळी गुरखे, आंब्यांचे रक्षण करायला ठेवावे लागतात... सकाळी माकडे आणि रात्री टाॅर्चवाले आंबे चोर....गुरख्यांचा खर्च वाढल्यामुळे आंब्याचा दर पण वाढला... माकडांच्या लोकसंख्येमुळे, लोकांना जास्त भावात आंबे विकत घ्यावे लागतात...
माकडे, म्हणजे सरकारचे जावईच, असे झाले आहे.
आज, कोकणात फळफळावळ घेण्याचे कष्ट कुणीही करत नाही... बघता बघता, एका तासात, कोबीचा वाफा उध्वस्थ झालेला, मी प्रत्यक्ष बघीतला आहे...
अफाट लोकसंख्येमुळे, एखाद्या शेताची लूट करायला, एखादी टोळी पण तयार होऊ शकते.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Mon, 02/08/2021 - 17:29
नवीन
कारण, भारतीय समाजाला तारतम्य नाही....
आपल्या लोकांना, फक्त फटक्यांचीच भाषा समजते...
- Log in or register to post comments
श
शा वि कु
Mon, 02/08/2021 - 17:38
नवीन
न्यूनगंड आणि अहंगंड एकाच प्रतिसादात !
भारतीय समाजाबद्दल न्यूनगंड.
आणि 'इतर लोकं आमच्यासारखे समजूतदार नाहीत हो' हा अहंगंड.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Mon, 02/08/2021 - 17:55
नवीन
हेल्मेट सक्तीचा कायदा करावा लागतो, ह्यातच सगळे आले ...
आणि
अहंगडा बद्दल, मीच तेव्हढा समजूतदार, असा तुमचा गैरसमज झाला असेल तर, क्षमस्व ...
- Log in or register to post comments
स
सतिश म्हेत्रे
Mon, 02/08/2021 - 18:09
नवीन
प्रतिसादाशी सहमत मुविकाका.
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Mon, 02/08/2021 - 18:21
नवीन
उपकार केलेत की देशाचं नुकसान केलंय तेवढं सांगा फक्त कोणीही.
https://www.google.com/amp/s/marathi.latestly.com/maharashtra/a-women-from-beed-got-admitted-in-the-hospital-for-her-21st-pregnancy-already-at-the-age-of-38-she-has-11-children-and-18-grandchildren-62961.html/amp
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Mon, 02/08/2021 - 18:25
नवीन
त्यामुळे दोष देता येणार नाही ...
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Mon, 02/08/2021 - 20:08
नवीन
दोष का द्यायचा? साहना यांची मते विचारात घेतल्यास.
आणि दुसरी बाजू
या क्रिकेट टीमला पोसायची जबाबदारी कोणाची? आणि उद्या ही मुले गुन्हेगार बनली गरीबीमुळे तर ती जबाबदारी कोणाची?
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 02/09/2021 - 03:41
नवीन
गुन्हेगार होण्याची शक्यता वाढू शकते...
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Mon, 02/08/2021 - 20:20
नवीन
आरक्षण मागतायत.त्या मागण्या न्याय्य आहेत की नाहीत याचाही विचार न करता आरक्षण मिळालेच पाहिजे अशी मागणी होत आहे.त्यासाठी विविध मार्गाने आंदोलने,अडवणुकी होत आहेत.खुल्या गटातील या जातींनी त्यांच्या जातीअंतर्गत लोकसंख्या मर्यादित न ठेवल्याने त्यांच्यावर ही वेळ आलीय असे म्हणता येईल का?
या जातींची एकगठ्ठा मते मिळण्याच्या आमिषाने राजकारण्यांनी ही आरक्षणे मिळवून दिली तर या जातींना त्यांच्या लोकसंख्येमुळे फायदा झाला असे म्हणावे का? पण राजकारण्यांच्या या एकगठ्ठा मते मिळवण्याच्या लालसेपोटी आरक्षण दिल्याने समाजात जो गहजब माजेल,दुरावा निर्माण होईल त्यात देशाचा तोटा नाही का?
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Mon, 02/08/2021 - 21:25
नवीन
लोकसंख्या वाढवायची मग त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी उंच इमारती बांधून ती गरज पूर्ण करायची.
सर्व मोकळ्या जागा नष्ट करून त्या जागेवर लोकवस्ती करायची. मुलांना खेळायला पण जागा ठेवायची नाही.
पृथ्वी वर जे अनेक जीव आहेत ती पृथ्वी ची संपत्ती आहे आणि निसर्ग चक्राचे महत्वाचे घटक आहेत त्यांचे जीवन धोक्यात आणायचे .
अन्न पिकवण्यासाठी
जागा कमी पडते म्हणून vertical शेती करायची.एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पोसण्यासाठी विविध कारखाने निर्माण करून प्रदूषण निर्माण करायचे आणि शुध्द हवा हवी म्हणून परत ऑक्सिजन निर्मिती चे कारखाने काढायचे...ट्रेन आणि विविध प्रवासी साधन वाढवत जायचे.
आणि त्याच बरोबर यांत्रिकी करणं करून रोजगार कमी करायचे.माणसाचे पूर्ण आयुष्य फक्त जगावे कसे ह्याच एकमेव प्रश्नात वाया जाईल ह्याची तरतूद करायची.
जमीन कमी पडते म्हणून समुद्रावर अतिक्रमण करायचे त्या अतिक्रमण करण्याचे काय भयंकर परिणाम होतील ह्याचा विचार करायचा.
कशा साठी हे सर्व करायचे .कशाला हवी प्रमाणाबाहेर लोकांची संख्या.
पृथ्वी मनुष्याचे अस्तित्व असावे एवढीच कमीत कमी लोकसंख्या असेल तर ह्या एकमेव सजीव सृष्टी ला अनुकूल अशा पृथ्वी चे रक्षण करायचे की माणसं साठी एकमेव घर असलेल्या ह्या पृथ्वी ला विनाशाकडे घेवून जायचे.
कशात शहान पण आहे हे तुम्ही च ठरवा.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 02/09/2021 - 03:39
नवीन
पटत आहे
- Log in or register to post comments
स
सुचिता१
Tue, 02/09/2021 - 03:38
नवीन
शाळेत असताना, म्हणजे २५ वर्षापूर्वी एका शिक्षकांनी ही संकल्पना मांडली होती, तेव्हा पुर्ण पणे कळले नव्हते पण तुमच्या लेखातील बरेच मुद्दे विचारात घेण्यासारखे आहेत. विस्ताराने लिहा ही विनंती ़
- Log in or register to post comments
स
सुचिता१
Tue, 02/09/2021 - 03:38
नवीन
शाळेत असताना, म्हणजे २५ वर्षापूर्वी एका शिक्षकांनी ही संकल्पना मांडली होती, तेव्हा पुर्ण पणे कळले नव्हते पण तुमच्या लेखातील बरेच मुद्दे विचारात घेण्यासारखे आहेत. विस्ताराने लिहा ही विनंती ़
- Log in or register to post comments
स
साहना
Tue, 02/09/2021 - 05:36
नवीन
नक्कीच.
- Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच
Tue, 02/09/2021 - 08:36
नवीन
नाही बुवा नाही पटलं. हे थोडक्यात असं झालं की प्रत्येक १००,००० व्यक्ती मागे १ चांगला वैज्ञानिक जन्माला येतो म्हणून लोकसंख्या वाढली की वैज्ञानिक वाढतील व जीवनमान उंचावेल.
असंच थोडसं लॉजीक खेळाच्या बाबतीत लावून पहा, दर १०००० व्यक्तिमागे १ चांगला फुटबॉलपटु जन्म घेतो तर चीन / भारत फुटबॉलमधे जगज्जेते असायला हवे होते.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 02/09/2021 - 08:41
नवीन
सहमत आहे
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Tue, 02/09/2021 - 11:02
नवीन
माल्कम ग्लॅडवेल यांचं प्रतिभावान मुलांची वैशिष्ट्ये हे पुस्तक वाचलेय का? त्यात आहे याबद्दल.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 02/09/2021 - 12:39
नवीन
ते जास्त धोकादायक आहे
- Log in or register to post comments
स
साहना
Tue, 02/09/2021 - 18:46
नवीन
आतंकवादी पेक्षा "विकृत गुन्हेगार" जास्त चांगला शब्द आहे. हो प्रत्येक समाजांत दर डोई विकृत गुन्हेगारांचे काहीतरी प्रमाण असते. लोकसंख्या जास्त तितके हे विकृत लोक जास्त असतील.
ह्यांत काही तरी ब्रम्हज्ञान असल्यासारखे लोक आश्चर्य का व्यक्त करीत आहेत ? शालेय पाठयपुस्तकांतील गणित आहे. जितकी लोकसंख्या जास्त तितके सर्व प्रकारच्या व्यक्तींची संख्या जास्त .... गावाची लोकसंख्या वाढत राहिली तर गावांत जास्त डॉक्टर, जास्त न्हावी, जास्त खानावळी वगैरे येतीलच ना ...
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Tue, 02/09/2021 - 19:08
नवीन
की अतिरेकी तयार होतात असे जन्माने कोणी अतिरेकी होत नाही किंवा गणिताच्या सूत्रांनी पण अतिरेकी तयार होत नाहीत.
जेव्हा न्याय मिळण्याचे सर्व मार्ग बंद होतात तेव्हाच हातात हत्यार घेतले जाते.
- Log in or register to post comments
स
साहना
Tue, 02/09/2021 - 18:37
नवीन
> दर १०००० व्यक्तिमागे १ चांगला फुटबॉलपटु जन्म घेतो
हि धारणा जर सत्य असेल तर भारतांत शेकडो उत्कृष्ट फुटबाँल पटू असायलाच पाहिजेत. ह्यांत न पटण्यासारखे काहीच नाही हे शालेय गणित आहे. आणि नसतील तर धारणा चुकीची आहे.
म्हणूनच तर आम्ही बहुतेक गोष्टी दर डोई पद्धतीने मोजत असतो. आत्महत्यांचे प्रमाणे १२ प्रति १००,००० आहे. खुनांचा दर १ प्रति १००,००० आहे इत्यादी. लोकसंख्या वाढली कि आपोआप एकूण आत्महत्या, खून वगैरे वाढतात. विविध व्यवसायांचे तसेच आहे. लोकसंख्या जास्त तितके एकूण डॉक्टर जास्त, इंजीनियर जास्त, शिक्षक जास्त इत्यादी.
त्याशिवाय नेचर विरुद्ध नर्चर हे सुद्धा आहे. सर्वच समाज मानवी क्षमतेचा योग्य विकास करून घेतो असे नाही. भारतीय समाज मागासलेला असल्याने मनुष्य क्षमता असून सुद्धा विकसित होत नाही. तर हेच भारतीय माणूस देश सोडून इतर समाजांत गेले के जास्त यशस्वी होतात.
- Log in or register to post comments
स
सामान्यनागरिक
Tue, 02/09/2021 - 14:04
नवीन
साहनाजी,
आपण जर भारताबाहेर रहात असाल तर लोकसंख्यावाढीमुळे होणारे दुष्परिणाम आणि भविष्यात होणारी आणीबाणीची परिस्थीती याची कल्पना आपणांस येऊ शकणार नाही.
लोकसंख्या नियंत्रित करायला हवी या बद्दल मिपावरच्या विद्वान मंडळींचे दुमत पाहुन आश्चर्य वाटले.
परदेशांत असणाऱ्या नैसर्गिक साधन्संपत्ती आणि लोकसंख्यचे प्रमाण याचे कारण लोकसंख्या लोकांनीच आपण्हुन नियंत्रित केली आहे हे आहे. शिक्षण आणी या विषयाबद्दलचे ज्ञान कमी असल्याने आपल्याकडे लोकसंख्या नियंत्रीत होत नाही. अजुनही संस्कृतीशी निगडीत कारणे आहेत. म्हणुनच मुलगा होई पर्यंत मुली होऊ देणे , मुले ही देवाची देणगी वगैरे अश्या कल्पना लोकांत आहेत.
नैसर्गीक साधन संपत्ती मर्यादित आहे याची पुरती जाणीव आपल्या समाजामधे झालेली नाही. हे दुर्दैव आहे.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 02/09/2021 - 14:57
नवीन
शिवाय,
इथले राजकारणी, खनिज संपत्तीची धुळधाण करत आहेत...
कोणे एके काळी, कोळशाला चांगला भाव मिळतो, म्हणून जंगल साफ केले. आता फक्त उरले आहेत ते, उघडे बोडके डोंगर ....
डोंबिवलीच्या परिसरतील, टेकड्या नाहीशा झाल्या.
चिमणी हा पक्षी जवळपास नाहीसा झाला.
चतुर गेले, फुलपाखरे गेली, मैदाने नाहीशी झाली, बेडूक गेले...
आता उरले ते फक्त प्रदुषण ...
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Tue, 02/09/2021 - 17:35
नवीन
मायन सिव्हिलायझेशन जंगलं कापत गेली आणि शेवटी निसर्गकोपामुळे नामशेष झाली. त्यांची लोकसंख्या फार नव्हती.
तुम्ही जो प्रोब्लेम दाखवताय त्यामागे आपल्या वैयक्तीक आणि समाज जीवनात 'पुनर्भरण' तत्वाचा अभाव हे एक सोपं कारण आहे.
आपण गरजे पोटी एखादी गोष्ट सुरु करतो, वापरतो, पण तिचा शेवट कसा असावा याबद्दल अनभिज्ञ, निश्काळजी असतो.
गरज म्हणुन आपण जो काहि उपभोग घेतला त्यामुळे एक पोकळी निर्माण होते. ति पोकळी आपण कॉन्शसली भरत नाहि.
खाण उद्योगात जेंव्हा कोळसा किंवा इतर खनीज उकरुन काढतात तेंव्हा बर्याच वेळेला आवष्यक तिथे रेतीच्या गोण्या भरुन ठेवतात जेणेकरुन रिकाम्या पोकळीमुळे वरची जमीन धसु नये.
आपण आपल्या रोजच्या जगण्यात हे तत्व वापरतच नाहि. प्रत्येक गोष्टीचा शेवट कुठल्यातरी नवीन सायकलाचा उगम असतो. आपली एक्टीव्हिटी सुरु होते आणि उपभोगावर संपते. त्याऐवजी एक्टीव्हीटीचा उगम ते शेवटाचा उगम अशी स्पायरल जीवनशैली अंगीकारायाला हवी.
असो.
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Tue, 02/09/2021 - 16:59
नवीन
खाली लिंक दिली आहे. हे लोकायतवाले म्हणतात. कि भारतात दुप्पट तिप्पट लोकसंख्या पोसू शकेल असे नैसर्गिक रिसोर्सेस आहेत प्रश्न फक्त वाटपाचा आहे.. विषमतेचे बळी आहेत लोकसंख्या वाढीचे नाहीत. लोकसंख्येचा बागुलबुवा करुन सामान्य गरीब नागरिकांचे लक्ष सरकार विचलित करत आहेत.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Tue, 02/09/2021 - 21:29
नवीन
भारतात असणाऱ्या आणि सर्व जमिनी चे
आणि नैसर्गिक साधन संपत्ती चे समान हिस्से करून प्रतेक व्यक्ती ला समान वाटले तर देशाची लोकसंख्या 200 कोटी झाली तरी देशात एक पण गरीब दिसणार नाही.
हा विचार अतिशय योग्य च आहे.
- Log in or register to post comments
स
साहना
Tue, 02/09/2021 - 19:21
नवीन
> नैसर्गीक साधन संपत्ती मर्यादित आहे याची पुरती जाणीव आपल्या समाजामधे झालेली नाही. हे दुर्दैव आहे.
नैसर्गिक संपत्ती मर्यादित नाही आहेत. ह्यावर मी पुष्कळ लेखन ह्या ध्याग्यावर केले आहे.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »