लोकसंख्या वाढीचा बागुलबुवा
खालील ध्याग्यावर दिलेली प्रतिक्रिया थोडी खूपच लांब झाली म्हणून इथे वेगळा लेख म्हणून पाडत आहे.
https://misalpav.com/node/48280
पाश्चात्य देशांत २-३ दशकांनी एक नवीन पोपट निर्माण होतो. मग हा विषय घेऊन तेथीतील हस्तदंती मनोऱ्यातील लोक येथेच्छ प्रोपागंडा करून लोकांची प्रचंड प्रमाणात दिशाभूल करतात.
महायुद्धानंतर निर्माण झाला तो बागुलबुवा लोकसंख्या वाढीचा आणि हा बागुलबुवा बऱ्याच काळ चालला. भारतासारख्ग रीब देश ह्या विदेशी प्रोपागंडाला जास्त डोके न चालविता बळी पडतात. (सध्या बागुलबुवा वातावरण बदलाचा आहे आणि तो सुद्धा तितकाच दांभिक पणाचा आहे).
लोकसंख्या वाढीचे परिणाम समजण्यासाठी भौतिक शास्त्र किंवा जीवशास्त्र पूर्णपणे निरर्थक आहे. त्यासाठी अर्थशास्त्र समाजणे जरुरीचे आहे. ह्या संदर्भांत अमेरिकेतील १९८० मधील सायमन-एहरलीच हि पैज वाचणे मनोरंजक ठरेल. तर अर्थतज्द्न्य जुलिअन सायमन आणि जीवशास्त्री पॉल एहरलीच ह्यांच्यात एक मोठी जाहीर पैज लागली. १९६८ साली पॉल ह्यांनी पॉप्युलेशन एक्सप्लोजन नावाचे एक भयंकर प्रसिद्ध पुस्तक लिहिले. त्यांच्या मते लोकसंख्या वाढ तात्काळ थाम्बवली नाही तर जगांत प्रचंड अन्न कमतरता होऊन कोट्यवधी लोक मरणार होते. ह्या पुस्तकाने खळबळ माचवली आणि ह्यांच्या नादाला लागून गोऱ्या लोकांनी मुले निर्माण करणे कमी केले (ज्याची फळे ते आज भोगत आहेत). भारत, चीन आणि अनेक देशांनी जास्त विचार न करता विविध योजना राबवून लोकसंख्या वाढ म्हणजे जणू काही भस्मासुर आहे असा प्रोपागंडा निर्माण केला.
ज्युलियन सायमन ह्यांनी त्यांची हि भविष्यवाणी साफ खोटी ठरणार आहे असे जाहीर रित्या प्रकाशित केले आणि १० हजार डॉलर्स ची जाहीर पैज लावली. पैजेच्या नुसार ज्युलियन ह्यांचे म्हणणे होते कि बहुतेक संसाधनाचा तुटवडा तर असणार नाहीच पण वर तीच संसाधने स्वस्त सुद्धा असणार आहे. १९९० साली जुलिअन सायमन हे पैज सहज, म्हणजे अगदी मोठ्या फरकाने जिंकले. त्या दहा वर्षांत जगाची लोकसंख्या सुमारे ८०० दशलक्ष वाढली पण जे ५ धातू त्यांनी निवडले होते त्यांची किंमत बऱ्यापैकी कमी झाली होती.
लोकसंख्या वाढीचे काहीच वाईट परिणाम आहेत असे नाही. लोकसंख्या वाढीचे अनेक वाईट परिणाम आहेत. पण जगांत नक्की किती लोक असायला पाहिजेत हे सुद्धा कोणीही निर्धारित करू शकत नाही. बहुतेकांना लोकसंख्यावाढीचे वाईट परिणाम दिसतात पण त्याचे असंख्य चांगले फायदे दिसत नाहीत. लोकसंख्या कमी झाली तर हे अनेक फायदे गायब होतीलच पण त्या फायद्यांना आम्ही मुकलो आहोत हे सुद्धा समजणार नाही.
सोपे उदाहरण घेऊया. पोलिओ ची लस हि आमच्या साठी वरदान ठरली आहे ह्यांत काहीच दुमत नाही. अक्षरशः कोट्यवधी मुलांचा जीव ह्या लसीने वाचवला आहे. पण फक्त लसच नाही तर अनेक औषधे निर्माण झाली आहेत त्यामुळे आम्हा सर्वांचेच जीवन जास्त सुखकर झाले आहे. तर हि औषधे कशी निर्माण होता ? अक्षरशः हजारो लोकांचे परिश्रम ह्यांत गुंतले असतात. जगाच्या पाठीवर जितके जास्त डॉक्टर, संशोधक आहेत तितकी जास्त औषधांचा शोध लागतो. आज देशाची लोकसंख्या ७ अब्ज ऐवजी ४ अब्ज असती तर मार्केट मधील अनेक औषधें गायब झाली असती. पण मी फक्त औषधांचे उदाहरण दिले आहे. सॉफ्टवेर पासून, टीव्ही वरील विविध चॅनेल पर्यंत अनेक गोष्टी गायब झाल्या असत्या आणि आम्हा सर्वांचा जीवनमानाचा स्तर खूपच खाली गेला असता.
तुमहाला आवडत असलेली कुठलीही गोष्ट घ्या. समजा तुम्हाला तुमचा फोन आवडतो. ह्या फोनच्या निर्मितीसाठी हजारो पेटंटन्स लागली आहेत आणि अक्षरशः लक्षावधी विविध छोटे छोटे शोध अनेक लोकांनी निर्माण केले आहेत. आणि ह्यांत जो एकूण मानवी वेळ गेला आहे त्याची जर बेरीज केली तर कदाचित कोट्यवधी मनुष्य-तास त्या फोन चा शोध लावण्यासाठी खर्च झाले आहेत. समजा देशाची लोकसंख्या अर्धी असती तर तितके मनुष्यतास खर्च होण्यासाठी दुप्पट वेळ लागला असता आणि फोन आपल्या हाती येण्यासाठी २०२० ऐवजी कदाचित २०४० वर्ष लागले असते.
अर्थानं त्याच तर्काने आम्ही असे म्हणू शकतो कि जगाची लोकसंख्या फक्त ७ अब्ज असल्याने आज आमच्या हातात अश्या अनेक गोष्टी नाहीत ज्या कदाचित २०५० मध्ये आमच्या हाती असतील. आज जगाची लोकसंख्या १४ अब्ज असती तर कदाचित आणखीन अजब साधने आणि तंत्रज्ञान आमच्या हाती असते.
> अहो पण लोकसंख्या अशीच वाढत राहिल्यास पर्यावरणाचे काय ?
हा मुद्दा अनेक लोक वर काढतात आणि काही प्रमाणात तो रास्त सुद्धा आहे. पहिली गोष्ट म्हणजे जसे जीवनमान उंचावते आणि लोक जास्त काळ जगू लागतात त्याच वेळी लोकांना मुलें नकोशी होतात. आमच्या आजोबांच्या काळी खाण्यापिण्याचे वांधे होते त्यामुळे लोक दिवसभर काबाडकष्ट करायचे आणि रात्रभर प्रजनन करायचे. महिलांची अवस्था फक्त चूल आणि मूल अशी होती. पण त्यांची चूक नव्हती. रात्री आणखी करणार काय ? मग ४०-५० वर्षांत हृदयविकाराचा झटका वगैरे येऊन मृत्यू.
आता जीवनमानाचा स्तर उंचावलाय. गर्भनिरोधक आल्याने शरीरसुख घेता येते आणि प्रजनन रोखता येते. रोमान्स ची व्याख्या रुंदावलीय. आता जोडपी चित्रपट पाहतात, दिनार करतात, कुठे फिरायला वगैरे जातात. पुस्तके वाचतात आणि नेटफ्लिकस पाहतात. त्याशिवाय प्रत्येक वेळी फिरायला वगैरे जाताना लक्षांत येते कि जास्त मुले म्हणजे खूपच जास्त खर्च त्यामुले फार तर एक दोन मुले खूप होतात. ह्यामुळे आपसूकच जन्मदर खालावत जातो. ह्या दृष्टिकोनातून कर्वे हे खूपच दूरदर्शी आणि विद्वान होते.
मुले जास्त जन्माला घालण्याचे एक कारण म्हणजे मुले मारण्याचे प्रमाण सुद्धा खूप होते. आता ते कमी झाल्याने वंशाला एक दिवा असला तरी पुरतो मोठी माळ लावायची गरज नाही. परंपरागत घरे आता बंद पडत आहेत. बापाने बांधलेल्या घरांत मुलें राहू इच्छित नाहीत म्हणून "वंशाचा दिवा" हि सुद्धा जास्त डिमांड नसलेली गोष्ट झालीय.
मुलांच्या संगोपनाचा मार्जिनल खर्च आणि लोकसंख्या वाढीचा दर हि दोन महत्वाची व्हेरिएबल्स अर्थतज्ञ पाहतात आणि दोन्ही मध्ये खूपच जास्त संबंध आहे. आणि ह्या संबंधाने मानवी लोकसंख्या चादर पाहून हात पसरेल ह्यांत मला तरी अजिबात शंका वाटत नाही.
मुलांच्या संगोपनाचा मार्जिनल खर्च :
मार्जिनल खर्च ह्याचा अर्थ प्रत्येक ऍडिशनल मुलाच्या संगोपनासाठी खर्च किती येतो. एका मुलाचा खर्च प्रचंड असतो. कारण मूल नाही तर माता काम करू शकते. एक मूल झाले आणि तिने नोकरी सोडली तर ते पैसे येणे बंद होतात आणि त्यामुळे तो मुलाच्या संगोपनाचा खर्च ठरतो. पण एकदा नोकरी सोडल्यानंतर तिला २ मुले झाली तर त्या दुसऱ्या मुलाचा मार्जिनल खर्च खूपच कमी असतो. (एका मुलासाठी ३ लक्ष वर्षाला खर्च येतो तर दोन मुलांसाठी ३.५ लक्ष खर्च येतो इत्यादी).
जुन्या खाली हा मार्जिनल खर्च खूपच कमी असायचा कारण बहुतेक खर्च हा फक्त अन्नाचा असायचा. आता तुम्ही दुबईला किंवा किमान खंडाळ्याला जाता तर सुद्धा तिकिटाचा खर्च प्रत्येक मुलांमागे होतो तो फार असतो. ४ मुले झाली तर मग तुम्हाला ५ सीटर गाडी सुद्धा चालत नाही.
जसे जसे जीवन मान उंचावते तसे तसे मार्जिनल खर्च हा खूपच वेगाने वाढतो. मुलाला विदेशांत शिकायला पाठवायचे तर ५० लक्ष रुपये पाहिजेत. दोन मुले झाली तर मग १ कोटी. पण गरीबाच्या घरांत हे प्रश्न नसतात.
पण खर्च वाढतो म्हणजे नक्की काय होते ? माणसाला जगांत फक्त दोनच खर्च असतात. एक खर्च असतो ऊर्जेचा दुसरा खर्च असतो दुसऱ्या माणसाच्या वेळेचा. (आयफोन पासून कांदे बटाटे पर्यंत तुम्ही काहीही विकत घेतले तर तुम्ही फक्त ऊर्जा आणि दुसऱ्या लोकांचा वेळ ह्या दोनच गोष्टींचा मोबदला देत असता. समजा ह्या दोन गोष्टी अपरंपार आणि फुकट असत्या तर आयफोन आणि कांदे बटाटे ह्यांची किंमत सुद्धा शून्य असती.). खर्च वाढतो ह्याचा अर्थ तुम्ही जास्त ऊर्जा आणि मानवी वेळ खर्च करत आहात असा होतो. आपण पर्यावरणाच्या नावाने बोंब मारतो तेंव्हा पर्यावरणाला होणारी हानी हि १००% ऊर्जा ह्या एका संसाधना द्वारे तुंबलेली जाऊ शकते. पण ऊर्जा महाग असल्याने आम्ही ती हानी अन-डू करू शकत नाही. जर पर्यावरणाची हानी वाढत गेली तर ऊर्जेचा दर सुद्धा वाढत जातो आणि आणि त्यामुळे मुलांच्या संगोपनाचा मार्जिनल खर्च.
त्यामुळे हि दोन्ही व्हेरिएबल्स एकमेकांना बॅलेन्स करतात. पण ऊर्जा हि काळाचा ओघांत स्वस्त होत गेली तर लोकसंख्या सुद्धा वाढत जाते आणि पर्यावरणाला हानी सुद्धा होत नाही. ह्या दोन्ही व्हेरिएबल्स मधील गणिती संबंध तसा स्पष्ट पणे अभ्यासाने कठीण आहे कारण लोकसंख्या वाढली कि हे लोक नवीन शोध लावून ऊर्जेचा दर आणखीन कमी करतात.
टीप : युनायटेड नेशन्स किंवा विविध तद्न्य मंडळी जगाची लोकसंख्या सुमारे २०५० मध्ये स्टेबल होईल असे भाकीत करत आहेत. मला त्यांत शंका वाटते. पहिली गोष्ट म्हणजे माझ्या मते ऊर्जेचा खर्च येत्या २० वर्षांत १०० पटीने कमी होणार आहे. बहुतेक ऊर्जा फ्युजन सेल द्वारे किंवा इतर कुठल्या नवीन शोधांतून निर्माण होईल आणि त्यानंतर सर्वच जीवनावश्यक वस्तूंचा भाव कमालीचा पडणार आहे. ऊर्जा स्वस्त आणि मुबलक होताच, शेती, पिण्याचे पाणी वगैरे गोष्टींचा काहीही तुटवडा असणार नाही त्याशिवाय कार्बन एमिसशन वगैरे उलट करणे सहज शक्य होणार आहे. कदाचित IVF वगैरे प्रक्रिया खूपच सोप्या होऊन गरोदर न राहता सुद्धा मुले निर्माण करणे शक्य होईल आणि त्यामुळे कुठल्याही वयांत मुले निर्माण करणे शक्य होईल आणि कदाचित मंडळी जास्त मुले निर्माण करतील. अर्थांत मी हे भाकीत एखाद्या ज्योतिष्या प्रमाणे वर्तवत आहे.
टीप २ : जगांतील सर्व नैसर्गिक संसाधने हि अक्षय म्हणजे अनलिमिटेड आहेत. एकच असे संसाधन आहे जे अक्षय नाही आणि ते म्हणजे मानवी वेळ. हि संकल्पना बहुतेक इकॉनॉमिक्स च्या पुस्तकांत मंडळी गेलेली असते पण राजकीय कारणासाठी पाश्चात्य राष्ट्रांनी "लिमिटेड रिसोर्सिस" आणि "अनलिमिटेड रिसोर्सेस" किंवा "रिन्यूएबल ऊर्जा" आणि "नॉन रिन्यूएबल ऊर्जा" असल्या श्रेणी शाळांतून आम्हा मुलांच्या डोक्यांत घातल्या. हि विचारसरणी डाव्या लोकांची असून पाश्चात्य देशांतून आपल्या देशांत आली आहेत आणि त्यांत काहीही तथ्य नाही. हि गोष्ट बहुतेक लोकांना पचणार नाही किंवा पटणार नाही कारण ह्या प्रकारच्या प्रोपागंडावर आमच्या देशांत कुणीही प्रश्न विचारला नाही. कुणाला इंटरेस्ट असेल तर वेगळ्या लेखांत विस्ताराने लिहीन. प्रतिक्रिया किंवा खरडवहीवर लिहून कळवा.
🗣 चर्चा
(178)
च
चंद्रसूर्यकुमार
Mon, 02/08/2021 - 18:30
नवीन
लोकसंख्या वाढत राहावी असे मला वाटत नाही. कारण वाढती लोकसंख्या कायम चांगलीच असे असेल तर मग लोकसंख्या अमर्याद का वाढू नये म्हणजे उभे राहायला जागा नाही अशी परिस्थिती पृथ्वीवर सर्वत्र (किंवा पाणी हटवून तिथे जमिन रिक्लेम केली तिथे किंवा परग्रहावर वस्ती झाली तर तिथे) आली तरी ते पण चांगलेच म्हणायला लागेल. ते कसे चांगले हे कल्पनाशक्तीला कितीही ताण दिला तरी त्याची मला तरी कल्पना करता येत नाहीये. म्हणजे एक कोणतातरी आकडा येईल त्यानंतर जास्त लोकसंख्या ही अॅसेट न होता लाएबिलिटी व्हायला लागेल असे मला अजूनही वाटते. वरील प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे लेखिकेच्या नव्या लेखाची वाट बघत आहे.
तरीही
यात आता ज्या पध्दतीने गोष्टी चालू आहेत त्या तशाच चालू असतील हे एक गृहितक आहे. तंत्रज्ञानाचा विकास या प्रकाराला एंडरएस्टिमेट करून चालणार नाही. एक साधे उदाहरण द्यायचे तर एकेकाळी म्हणजे फार पूर्वीची गोष्ट नाही- १० वर्षांपूर्वीची सौर उर्जा बर्यापैकी महाग होती (१० रूपये पर युनिटपेक्षा जास्त). पण दोन वर्षांपूर्वी गुजरातमध्ये २.६५ रूपये प्रति युनिट या दराने पॉवर परचेस अॅग्रीमेन्ट गुराविमंने केले (https://mercomindia.com/gujarat-ppa-solar-projects/). तेव्हा समजा तेलाचे साठे संपले तरी इतर पध्दतीने (अणुउर्जा, टायडल एनर्जी वगैरे) उर्जा निर्माण करता येणे अशक्यच आहे असे नाही. आणखी काही वर्षांनी इलेक्ट्रिक कार्स सर्रास वापरात आल्या की तेलाची उपयुक्तता बरीच कमी होईल. अगदी भारतात एक लॅन्डलाईन फोन मिळण्यासाठी अनेक वर्षे वाट बघणे ते अगदी भाजीवाले-कामवाल्यांपर्यंत सगळ्यांकडे मोबाईल येणे हा मोठा पल्ला १२-१५ वर्षात पार पडला तेव्हा पुढील १२-१५ वर्षात तेलावर/नैसर्गिक वायूवर आधारीत वाहने जाऊन इलेक्ट्रिक वाहने येणे अशक्यच आहे असे नक्कीच नाही.
लेखिकेच्या जास्त लोकसंख्या नेहमी चांगलीच हा दावा मलाही तितकासा पटलेला नाही. पण वरील प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे दुसर्या लेखाची वाट बघू आणि नवे कोणते मुद्दे येतात का ते बघू.
- Log in or register to post comments
स
साहना
Mon, 02/08/2021 - 21:26
नवीन
> लोकसंख्या वाढत राहावी असे मला वाटत नाही.
माझ्या लेखांत मी तसे लिहिलेही नाही आहे. माझा दावा हायेकीयन आहे. लोकांना त्यांना पाहिजे तशी मुले निर्माण करण्याचे स्वातंत्र्य द्या आणि आपोआप समाजाचे हिट त्यातून साधले जाईल. कुना सरकारी बाबूने काही वैश्विक फॅमिली प्लॅनिंग करण्याची गरज नाही.
> कारण वाढती लोकसंख्या *** कायम चांगलीच *** असे असेल तर मग लोकसंख्या अमर्याद का वाढू नये
तुम्हाला ठाऊक असलेले फ्री मार्केट ची तत्वेच इथे लागू पडतात. जो पर्यंत ट्रेड फ्री आहे तोपर्यंत तो पॉसिटीव्ह सम गेम असतो. सरकारी किंवा इतर कुणी लुडबुड सुरु केली कि त्या व्यवहाराचे सामाजिक चांगले परिणाम कमी होत जातात. वाढती लोकसंख्या तो पर्यंत चांगली आहे जो पर्यंत लोक ती स्वखुशीने वाढवत आहेत. तुम्ही कृत्रिम रित्या लोकांना ती जास्त किंवा कमी करण्यास मजबूर केले तर त्याचे नेहमी प्रमाणे अन इंटेंडेड परिणाम होतील आणि ते बहुतेक करून वाईट असतील. (चीन आणि कोरिया ह्यांचा विरोधाभास पहा).
> ते कसे चांगले हे कल्पनाशक्तीला कितीही ताण दिला तरी त्याची मला तरी कल्पना करता येत नाहीये. म्हणजे एक कोणतातरी आकडा येईल त्यानंतर जास्त लोकसंख्या ही अॅसेट न होता लाएबिलिटी व्हायला लागेल असे मला अजूनही वाटते.
कल्पना करण्याची गरज नाही कारण अशी स्थिती उध्दभवणे शक्य नाही.
> कोणतातरी आकडा येईल
बरोबर आहे. आपले इंट्युशन बरोबर आहे. पण हा आकडा कसा निर्धारित होईल ? तर लोकसंख्येचा आकडा ठरविण्याऐवजी, प्रत्येक व्यक्ती आपले मूल असेट आहे कि लायेबिलिटी हे वैयक्तिक स्तरावर ठरवेल आणि त्यामुळे एका मोठ्या मार्केट प्रमाणे लोकसंख्येचा एकूण आकडा ह्या इन्व्हिसिबल हॅन्ड ने ठरविला जाईल. अर्थांत काही लोक चांगले निर्णय घेतील तर काही लोक चुकीचे पण फ्री मार्केट च्या तत्वानुसार काय चांगले आणि काय चांगले नाही हे काळाच्या ओघांत स्पष्ट होईल आणि लोकसंख्या एका योग्य आकड्यावर येऊन आपोपाप स्थिरावेल.
हा आकडा नक्की काय आहे हे कुणालाच ठाऊक नाही आणि कुठल्याही एक्स्पर्ट ला सुद्धा तो ठाऊक नसेल त्यामुळे त्या संदर्भांत काहीही कायदे वगैरे केले तरी ते बहुतेक करून चुकीचे असेल हे नक्की.
> तेव्हा समजा तेलाचे साठे संपले
आपले म्हणणे १००% बरोबर आहे. तेलाचे साठे संपणार सुद्धा नाहीत. जर सप्लाय कमी झाली तर किमती वाढतील आणि त्यामुळे मागणी आपोआप कमी होईल. हे सर्व इलॅस्टिक असेल आणि साधारणतः ३०३० मध्ये सुद्धा खनिज तेल जमिनीत उपलब्ध असेलच.
खनिज तेलाच्या आधी पाश्चात्य जग व्हेल ऑईल वापरत होते. व्हेल ऑईल आजही उपलब्ध आहे, फक्त प्रचंड प्रमाणात महाग आहे.
- Log in or register to post comments
स
साहना
Mon, 02/08/2021 - 20:41
नवीन
चक्रम (सर्क्युलर) वाद घालण्यात अर्थ नाही.
कुठलाही खनिजाचा साठा कधीही संपणार नाही. हे माझे मत नसून अर्थशास्त्रांतील एक ठाऊक असलेले ज्ञान आहे. तुमच्या धारणेत प्रमुख दोष हा आहे कि सब्स्टिट्यूशन (पर्यायी पदार्थ) आणि डिमांड/सप्लाय इलॅस्टिसिटी ह्या दोन गोष्टी तुम्ही समजत नाही आहात. दुर्दैवाने काही शब्दांत समजावून सांगण्यासारख्या गोष्टी नाहीत पण ३०० वर्षे आधी जगाची लोकसंख्या २०२० मध्ये ७ अब्ज असेल असे कोणाला सांगितले असते तर त्या व्यक्तीने म्हटले असते कि "जगांत इतके मेण उपलब्ध नाही त्यामुळे इतक्या मेणबत्त्या निर्माण होऊच शकणार नाही आणि त्यामुळे बहुतेक जग अंधारात जगेल". प्रत्यक्षांत ना भूतो अश्या प्रकारच्या उजेडांत आम्ही जगत आहोत. सध्याची स्थती पाहून त्यावरून भविष्य एक्सट्रापोलेट करणे ह्यासारखी चुकीची गोष्ट नाही.
तुम्हाला आवड असेल तर कोबाल्ट धातूंबद्दल हा लेख सुदर आहे आणि सोन्याच्या बद्दल दुसरा लेख:
१. https://fee.org/articles/no-were-not-running-out-of-minerals/
२. https://www.bloombergquint.com/gadfly/is-the-world-running-out-of-gold-there-s-a-long-way-to-go
> 2. रासायनिक खते आणि कीटकनाशके, यांच्या वापरामुळे, अन्न उत्पादन वाढले पण, जमिनीचा कस कमी होत आ
बरोबर आहे. ह्याला चुकीच्या सरकारी पॉलिसी भारतांत जबाबदार आहेत. बहुतेक प्रगत राष्ट्रांत जमिनीचा कस जास्त चांगल्या प्रकारे मॅनेज केला जातोय.
> . लोकसंख्या वाढली की प्रदुषण वाढतेच, हे साधे गणित आहे.
हो पण त्याचा इथे संबंध काय ? प्रदूषण, प्रदूषणाचे प्रकार आणि आमच्या राहणीमानावर होणारा त्याचा परिणाम बदलत जातो.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 02/09/2021 - 03:30
नवीन
भारतात, सोन्याच्या खाणी होत्या ... त्यातील सोने संपले ...आता काही खाणी बंद आहेत ....
2. सरकारने कधीही, शेतकरी वर्गाला, रासायनिक खते आणि कीटकनाशके, यांच्या वापराची जबरदस्ती केली नाही...
घरखर्च चालवायला, कमीत कमी जागेत, जास्तीत जास्त उत्पन्न काढण्यासाठी, ते करणे भाग पडते ...
3. प्रदुषणाचा संबंध येतोच ... आजारपणाचा आणि प्रदुषणाचा संबंध असतोच... 1960-70 मध्ये डोंबिवलीत, शुद्ध हवा होती, आज अफाट लोकसंख्ये मुळे, डोंबिवली येथील हवा प्रदुषित झाली आहे...
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Mon, 02/08/2021 - 16:16
नवीन
कोणतेही मूलद्रव्य सामान्य पणे निर्माण केले जाऊ शकत नाही ! सोने हे पिरियॉडिक टेबलात समावेश असलेला धातू आहे ना ? शोधाशोध करून आजुन पुष्कळ खनिजे शोधली जाऊ शकतील . सूर्यऊर्जा जर सुलभपणे साठवता आली तर इंधनाचा प्रश्न बराच सुटू शकेल ! कदाचित अजूनही पेट्रोल देखील खूप मिळू शकेल पण या केवळ अटकळी भूतकाळातील डेटावर अवलंबून मांडल्या जाऊ शकत नाहीत ! भूतकाळात जे घडले तसे ते त्याच रीतीने घडेल असे म्हणता येत नाही तसे ते घडणार असेही म्हणता येत नाही !
अर्थात वरील उदाहरणे जागतिक पातळीवर लागू असतील कोणता भूप्रदेश इटकर किती अन्य साधनांसाठी अडवला जाऊ शकेल हे त्या त्या देशातच ठरणार आहे! कालांतराने देश हीच संकल्पना मोडीत निघाली तर मानव जातीला काही आशा असेल !
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 02/09/2021 - 03:34
नवीन
पण, ते साठवायला खनिजे लागतात .... आणि खनिजे संपणारच आहेत ...
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Mon, 02/08/2021 - 17:41
नवीन
समुद्राच्या पाण्यातून सोने निर्मिती करणारा प्रयोग जगात कुठे झाला आहे का?
असेल तर विश्वासू माहिती पुरवणाऱ्या सायन्स मॅगझिन ची लिंक ध्या .
आणि कोण कोणती खनिजे माणूस बनवू शकतो आणि तसे प्रयोग झाले आहेत ह्याची पण लिंक ध्या.
खनिज तेलाचे साठे कमी न होता वाढत आहेत ह्या तुमच्या वाक्याला काही आधार असेल तर त्याची पण विश्वासू लिंक ध्या.
तुम्ही सांगितले म्हणून खरे मानता येणार नाही.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Mon, 02/08/2021 - 18:00
नवीन
सहनाजी ना माझी नम्र विनंती आहे त्यांनी fusion energy वर सविस्तर लिहावे .
ती जवळ जवळ फुकट कशी उपलब्ध होईल ह्या वर चार शब्द सांगावेत.
पेट्रोल नी 100 री जवळ गेल्या मुळे जनता त्रस्त आहे .
ही fusion energy फुकट मिळणार आहे हे फक्त वाचून सुद्धा आम्ही दिवस काढू .
तेरी परत एकदा विनंती आहे त्यांनी ह्या फुकट निर्माण होणाऱ्या आणि लोकांना सुद्धा अतिशय स्वस्तात मिळू शकणाऱ्या ऊर्जा विषयी सांगावा च
- Log in or register to post comments
स
सतिश म्हेत्रे
Mon, 02/08/2021 - 18:05
नवीन
अगदी माझ्या मनातले बोललात राजेश राव. साहनाताई उत्तराच्या प्रतीक्षेत.
- Log in or register to post comments
स
साहना
Mon, 02/08/2021 - 21:10
नवीन
> लोकसंख्या वाढल्यामुळे राहणीमान उंचावले असे म्हणता येईल का?
आपण कॅफे हायेक वाचता म्हटल्यावर काही गोष्टी तुम्हाला आधीपासूनच ठाऊक असतील. (fee.org आणि reason.com सुद्धा वाचावे).
तंत्रज्ञान सुधारते कारण लोकसंख्या जास्त आहे म्हणून. जगाची लोकसंख्या समाज २ अब्ज असती तर आयफोन पासून इंटरनेट पर्यंत बहुतेक शोध २०२० पर्यंत लागलेच नसते.
जुलिअन सायमन ह्यांचा मुख्य दावा खालील होता.
मानवी वेळ हा एकाच खरा रिसोर्स आहे. इतर सर्व त्याच्यावर अवलंबून आहे. जीवनमानाचा दर्जा हा तंत्रज्ञानाने वाढतो (इथे तंत्रज्ञान ह्या शब्दाचा अर्थ फक्त फोन आणि संगणक नसून, सुई धागा पासून बैलगाडीपर्यंत सर्व काही अंतर्भूत आहे). तंत्रज्ञानाची प्रगती हि मानवी वेळेवर अवलंबून आहे. जितकी लोकसंख्या जास्त तितकी तंत्रज्ञानाची प्रगती वेगाने आणि पर्यायाने लोकांचे राहणीमान उंचावत जाते.
आपण लिहिलंय याप्रमाणे तंत्रज्ञानाने लोकसंख्या वाढते. पोलिओ लसीने लक्षावधी जीव वाचविले. आधुनिक शेती पद्धतींनी अन्न धान्याचे भाव कमी केले इत्यादी. पण त्याच वेळी तंत्रज्ञानाने लोकसख्या कमी सुद्धा होते. परिवार नियोजन आणि गर्भनिरोधक असल्यामुळे. आता ह्याचा नेट एफ्फेक्त पॉसिटीव्ह आहे कि निगेटिव्ह हे ठाऊक नाही. पण दोन्ही गोष्टीमुळे राहणीमान उंचावते.
राहणीमान उंचावले कि लोकांना मुले नकोशी होतात. आणि लोकसंख्येला रेग्युलेट करण्याचे मुख्य साधन हे आहे (सरकारी नियम नाही).
१. https://www.cato.org/blog/prosperity-world-population-growth
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Mon, 02/08/2021 - 22:40
नवीन
राहणीमान उंचावले कि वेळेचा उपयोग राहणीमान मेण्टेन करण्यात खर्च होणे, अनेक अपत्यांना तेच उच्च राहणीमान उपलब्ध करुन देण्याची शक्यता न वाटणे इत्यादी कारणमुळे मानसीक कारणांमुळे लोकसंख्या रेग्युलेट होते हे खरं आहे. युरोपमधे अनेक देशांत लोकसंख्या वाध उणे दरात होते आहे यामागे हेच कारण आहे का? कल्पना नाहि.
लोकसंख्या वाढीचे तंत्रज्ञान प्रगतीशी डायरेक्ट काहि संबंध नाहि. बहुतांश लोक्स तंत्रज्ञानाचे उपभोक्ते असतात. अधिकांश लोक्स समस्येचा कळत-नकळत भाग असतात. समस्या सोडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणार्या मेंदुची सरासरी फार कमि असते. त्यामुळे तंत्रज्ञान मानवाला कडेलोटापासुन वाचवण्याची किंवा मानवी जीवन आनंददायी करण्याची गॅरॅण्टी घेऊ शकत नाहि.
विनाशातुन आपोआप लोकसंख्या कंट्रोलमधे येते, पण हा मुद्दा सदर चर्चेच्या दृष्टीने औट ऑफ सिलॅबस आहे :)
तर मुळ मूद्दा असा, कि लोकसंख्या वाढीचा पृथ्वीवर मानवी वस्ती करण्यायोग्य वातावरण मेण्टेन राखण्याशी डायरेक्ट संबंध आहे हे उघड आहे. मानवी कल्पकतेला काहि मर्यादा नाहि. त्यामुळे मनुष्य प्राणी हजारो करोडची संख्या गाठुन देखील यच्चयावत सोलर सिस्टीमवर घर बांधुन आरामात जगेल, किंवा आहे ते रिसोर्सेस फस्त करुन तडफडुन मरेल, या दोन्ही एक्स्ट्रीम शक्यता आहेत.
- Log in or register to post comments
स
साहना
Mon, 02/08/2021 - 23:48
नवीन
> बहुतांश लोक्स तंत्रज्ञानाचे उपभोक्ते असतात. अधिकांश लोक्स समस्येचा कळत-नकळत भाग असतात.
समजा लाखांत एक माणूस जिनिअस असतो तर असे जिनिअस जास्त कसे निर्माण होतील ? खूप लाख लोकसंख्या असेल तर. आमच्यासारखी माणसे जिनिअस नसली तरी ह्या प्रक्रियेत भाग घेऊन हातभार लावत असतात. लोकसंख्या जितकी जास्त तितके अधिक एलोन मस्क किंवा आईन्स्टाईन हे निर्विवाद सत्य आहे.
> आहे ते रिसोर्सेस फस्त करुन तडफडुन मरेल, या दोन्ही एक्स्ट्रीम शक्यता आहेत.
रिसोर्सेस फस्त करणे हे फ्रिज मधील दूध संपवणे ह्या प्रकारचे नाही. हि प्रक्रिया प्रचंड इलॅस्टिक असते. म्हणजे समजा खनिज तेल कमी होत आहे तर हळू हळू अनेक ऑईल रींग्स बंद पडतील. त्यामुळे त्यांच्या किमती वर जातील. किमती वर झाल्या कि आपसूक आम्ही लोक कमी वाहने वापरू लागेल. मग डिझेल वर चालणारे पावर प्लांट्स बंद पडून त्या जागी कोळसा वापरला जाईल. तरी सुद्धा खनिज तेल जमिनीतून येणे कमी झाल्यावर किमती आणखीन वाढतील मग हळू हळू बस, ट्रेन्स, विमाने महाग होत जातील. हि सर्व प्रक्रिया अनेक दशके चालेल. ह्या दरम्यान मानवी मेंदू बहुतेक करून खनिज तेलाचे पर्याय शोधेल. हे पर्याय नक्की काय असतील हे सांगणे अशक्य आहे. पण बहुतेक करून पर्याय हे असतीलच. पण हि प्रोसेस अत्यंत हळू असेल. जानेवारी १२ २०३५ मध्ये जगांतील खनिज तेल संपले आणि जानेवारी १३ ला तात्यांनी बुलेट भंगारात विकून सायकल घेतली असे होणार नाही.
आणि समज पर्याय नाहीच तर मग एकूण राहणीमानाचा स्तर वेगाने खाली जात राहील. त्यातून एका बाजूने गरिबी, बालमृत्यू, उपासमार इत्यादीने जास्त लोक मरतील, सरासरी आयुर्मर्यादा कमी होत जाईल, लोकसंख्या त्यामुळे कमी होईल आणि जो संसाधांवर ताण पडला असेल तो आपसूक कमी होईल. पण तोपर्यंत सरासरी लोकसंख्या आणि जीवनमान इतके कमी झाले असेल कि पुन्हा प्रजनन दर वाढायला लागेल.
ह्या सर्व गोष्टी १०-२० वर्षांत नाही तर कदाचिन्त १००-२०० वर्षांच्या कालावधीत होतील. माझ्या मूळ मुद्याशी आपला काहीही मतभेद असला तरी किमान हि एक गोष्ट मान्य करणे बहुतेकांना शक्य असावे. इतक्या प्रचंड कालावधीत नक्की लोकसंख्या किती असावी, प्रजनन दर नक्की कधी शून्य व्हावा हे निर्धारित करणे कुठल्याही एक्स्पर्ट च्या आवाक्याच्या बाहेर आहे. त्यामुळे सरकारी हस्तक्षेप ह्यांत चांगल्या पेक्षा वाईट जास्त घडवून आणू शकतो.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Tue, 02/09/2021 - 17:09
नवीन
तुम्हाला सरकार म्हणजे काय अपेक्षीत आहे? माणसाचं जगणं रेग्युलेट करणारी संस्था? जोपर्यंत समाजजीवन रेग्युलेशन आधारीत आहे तोपर्यंत सरकार नामक संस्था अस्तीत्वात असेलच. आणि जर ति अस्तित्वात असेल तर सरतेशेवटी समाजाच्या सर्व समस्या सरकार दरबारी दाखल होतीलच. त्यामुळे सरकारी हस्तक्षेप अटळ आहे. समाजात होणारे स्तित्यंतरं जास्तीतजास्त सुखकर आणि कमितकमी दु:खकर व्हावेत हि सरकार नामक यंत्रणेची जबाबदारी आहे. हि यंत्रणा ऑर्गेनीक पद्धतीने इव्होल्व झाली आहे. संसदेपासुन ते खाप पंचायतीपर्यंत, आणि राष्ट्रपतींपासुन ते हॅड ऑफ फॅमिली पर्यंत अशी अनेक स्तरीय, अधिकृत-अनधिकृत प्रतलांची हि सांगड आहे. या संस्थेचा हस्तक्षेप टाळणं एकतर शक्य नाहि, किंवा तसा तो टाळलाच तर होणारे परिणाम जास्त क्लेशदायक असतील.
तुम्ही ज्या दोन शतकांच्या स्थित्यंतरांचा परिणाम विशद करताय तो देखील सरकारी हस्तक्षेपाशिवाय होणार नाहि.
माणसाच्या वैयक्तीक निर्णयांमधे सरकारने लुडबुड करु नये, निसर्गाचे आणि समाजाचे हार्डकोर नियम मानवी जीवन ऑटेमॅटीक रेग्युलेट करत असतात, हे म्हणणं तत्वतः ठीक आहे. पण सरकार नामक रचना माणसाच्या गरजेतुनच निर्माण झाली आहे. तिच्या मर्यादा आणि कार्यक्षमता काय असाव्या हा फार सब्जेक्टीव्ह विषय आहे. माणसाच्या लोकसंख्या नियंत्रण करण्यामागे जे विवेकी-अविवेकी विचार असतील तेच त्याच्या सरकारमधे देखील प्रतिबींबीत होतील.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 02/09/2021 - 17:16
नवीन
अफाट लोकसंख्ये मुळे, 1960 ते 2020, ह्या फक्त 60 वर्षांत, डोंबोलीची वाट लागली....
- Log in or register to post comments
क
काळे मांजर
Tue, 02/09/2021 - 17:38
नवीन
लोकसंख्या वाढले की वाटण्या होऊन शेताचे अप्पेपात्र होते
तसेच शहराचेही होते
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Tue, 02/09/2021 - 05:07
नवीन
हा दावा मी वाचला आहे पण तो तितकासा पटला नाही किंवा पचला नाही.
तंत्रज्ञानाची प्रगती होण्यास स्वतंत्र विचार करण्यावर कमीतकमी बंधने असणे हे सगळ्यात महत्वाचे युरोपात रेनेसान्सच्या नंतर अशी बंधने बरीच कमी झाली आणि स्वातंत्र्याचा अनुभव लोकांना घ्यायला मिळाला. त्यानंतर काय झाले हे सगळ्यांनाच माहित आहे. तीच गोष्ट अमेरिकेची. तिथे तर कसलीच बंधने नव्हती. तसेच आयफोनचा शोध हा कोणत्याही पार्श्वभूमीशिवाय लागलेला नाही. १८८० च्या सुमारास टेलिफोनचा शोध, त्यापूर्वी तारयंत्राचा शोध, दरम्यान रेडिओचा शोध मग सुरवातीला पोलिस-लष्कराच्या वापरासाठी वायरलेस हॅन्डसेट्स मग सामान्यांसाठी मोबाईल फोन आणि मग आयफोन अशी प्रगती झाली. हे शोध बहुसंख्य अमेरिकेत लागले. सामान्य अमेरिकन लोकांना अजूनही अमेरिका म्हणजेच जग वाटते तेव्हा १००-१५० वर्षांपूर्वीही फार वेगळी परिस्थिती असेल असे मानायचे कारण नाही. तेव्हा मुद्दा हा की हे शोध बर्याच अंशी नफा कमवावा या उद्देशाने जरी लागले असले तरी जगात किती लोकसंख्या आहे हा मुद्दा शोध लागताना कसा काय महत्वाचा ठरला असेल हे समजायला मार्ग नाही. आजही हे काही इनोव्हेशन चालू आहे ते पण आताची लोकसंख्या हाच घटक लक्षात घेऊन केले जात असेल ना? म्हणजे समजा जगाची लोकसंख्या ७०० कोटी आहे (किंवा भारताची १३० कोटी आहे) तर इनोव्हेशन करणारा- 'अरे यार जगाची लोकसंख्या ८०० कोटी असती (किंवा भारताची १५० कोटी असती) तर हा शोध मी लावला असता' असे थोडीच म्हणणार आहे? मग तेव्हाही शोध लावणारे असे म्हणाले असतील ही कल्पना करायला मला तरी जड जाते.
दुसरे म्हणजे वर म्हटल्याप्रमाणे स्वतंत्र विचार करण्यावर कमीतकमी बंधने असणे हे तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी महत्वाचे असते. आपले मिल्टन फ्रीडमनसाहेब म्हणाले आहेत त्याप्रमाणे 'पाश्चिमात्य जगात स्वातंत्र्याच्या वातावरणात जन्माला आल्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य हे मानवी समाजाची नैसर्गिक स्थिती आहे असे वाटत असेल तर ते चुकीचे आहे. इतिहासात आणि आताही बहुसंख्य लोक स्वातंत्र्य आणि समृध्दीच्या वातावरणात नाही तर दहशत आणि दडपशाहीच्या वातावरणात राहिले आहेत'. समजा आफ्रिकेतल्याप्रमाणे हुकुमशाही/ यादवी याचे वातावरण जगात सर्वत्र असते तरी ६०० नाही ८०० कोटी लोकसंख्या असती तरी इंटरनेटचा शोध लागला असता का? मला तरी हे कठिण वाटते.
तिसरे म्हणजे आता ६००-७०० कोटी लोकसंख्या आहे म्हणून इंटरनेट-आयफोनचे शोध लागले असे गृहित धरले तरी मग अशा काही गोष्टी असतील त्यासाठी आताची ६००-७०० कोटी लोकसंख्या कमी आहे आणि कदाचित १००० कोटी लोकसंख्या असती तर ते शोध लागले असते. ते कोणते हे आता आपल्याला सांगता आले नाही तर मग उपयोग काय? कारण हा सगळा खटाटोप predicting the past साठी होणार.
असे काही प्रश्न पडले होते.
नक्कीच. जिथेतिथे सरकारचा हस्तक्षेप नकोच.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 02/09/2021 - 07:05
नवीन
वेगवान संदेशवहन आणि दळणवळण, ह्याचे शोध उत्तरोत्तर होतच राहणार...
जिथेतिथे सरकारचा हस्तक्षेप नकोच.
भारतीय लोकांची मानसिकता वेगळी आहे ... आपल्या लोकांना फटक्यांचीच भाषा समजते ...
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Tue, 02/09/2021 - 10:41
नवीन
प्रतिसाद आवडला!
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Mon, 02/08/2021 - 11:44
नवीन
प्रत्यक्षांत "हित" हे नेहमी वैयक्तिक हित असते. अगदी चूक धारणा !
तुमची सर्व विचारधारा आतापर्यंत पाहता व्यक्ती आधिष्ठित आहे असे दिसते . त्या मुळेच चौथे मूल देखील यशस्वी झाले असे तुम्ही म्हणता आहात ! सर्वच रोख वैयक्तिक प्रगती म्हणजेच एकूण राष्ट्राची एकत्रित प्रगती असा मायक्रो अर्थ शास्त्राचा सिद्धांत आपण उचलून धरता आहात. पुस्तके विकत वाचून घेणे , योगासने करणे ई सुबत्तेमुळे घडते असा उल्लेख तर तुम्ही केलेलाच आहे ! पण एक उदाहरण तुम्हाला दिले तर ते पूरेसे आहे ते असे की हेलमेट घालणे हे वैयक्तिक हित आहे ना ? त्याने फक्त माझेच डोके वाचते की मी ज्या पादचार्याच्या अंगावर गाडी घातली त्याचेही डोके वाचते ? तरीही ते सक्तीचे असणारा कायदा भारत देशात आहे ! जगात आहे ! तो कशासाठी ? तर त्याने एकतर काही सामाजिक प्रश्न निर्माण होत असावेत असा समज कायदे करणाऱ्याचा आहे म्हणून !
मानवी समाजात कायदे आहेत ते सर्व व्यक्तीचे सामायिक असे हित जपले जावे म्हणून. ती सर्व नागरिकांच्या हिताची बेरीज नव्हे .नागरिकात जसे पोलीस असतात तसे चोर देखील नागरिकच असतात. एरवी एक उपमुख्यमंत्री दोन वर्षे तुरुंगात खितपत का पडता ?
आपण सुस्थितीत आले की सभोवार सुबत्ता आली हा जर तुमचा समज दृढ असेल तर मग आणखी काय बोलणार ?
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Mon, 02/08/2021 - 11:59
नवीन
अजून भर घालतो ....
आमचे एक गुरू आहेत, ते म्हणतात, राजधानीत, जितकी लोकसंख्या कमी, तितकी उत्तम ...
- Log in or register to post comments
स
साहना
Mon, 02/08/2021 - 13:56
नवीन
> रीही ते सक्तीचे असणारा कायदा भारत देशात आहे ! जगात आहे ! तो कशासाठी ? तर त्याने एकतर काही सामाजिक प्रश्न निर्माण होत असावेत असा समज कायदे करणाऱ्याचा आहे म्हणून !
चुकीचा कायदा आहे. सीट बेल्ट कायद्याप्रमाणेच.
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Mon, 02/08/2021 - 07:10
नवीन
सुबत्ता व लोकसंख्या नियंत्रण यांचा एक संबंध मला असा दिसतो की सुबत्ता आली की हाव वाढते हाव वाढली की अधिक मुले झाली तर आपली हाव पुरी होणार कशी या काळजीने कमी मुलांना जन्म दिला जातो ! दुसरे कारण मला असे सापडते की आपले शिक्षण ,आपल्याला जाणवणारी स्पर्धा या पेक्षा आपले मुलाला अधिक कठीण परिस्थितीत आयुष्य घडव्हावे लागेल अशी काळजी म्हणून कमी मुले . वेगळी मीमांसा कुणाकडे असेल तर तिचे स्वागत आहे .जगात कुणाला काय वाटून लोकसंख्या का कमी झाली यापेक्षा ती कोणकोणत्या कारणाने वाढते व कोणत्या कारणाने कमी होते हे नीट पाहावे लागेल . माझ्या निरीक्षणात लोकसंख्या वाढीत खालील घटक महत्वाची भर घालतात.
१) जगभर मुलगीच सासरी जात असल्याने मुलगाच आपल्याला म्हातारपणी आधार होईल अशी अटकळ ! ( १९९१ नंतर ही अटकळ फोल होताना दिसत आहे !) त्यामुळे मलगी झाली तर हरकत नाही पण एकतरी मुलगाच हवा ही भावना .
२) आपल्या दोघ नोकरी करत असल्याने आपले एक मूल एकलकोंडे होऊ नये व नाती हळू हळू पातळ होत असल्याने एकाला दुसरे जिव्हाळ्याचे जवळचे कुणीतरी असावे ही भावना .
३) एक मूळ मतिमंद ,अपंग असेल तर त्याची काळजी आपल्यानंतर कोण घेणार सबब दुसर्या मुलाचा जन्म .
४) आपल्या भावाला बहिणीला मूल नाही त्यांची संपत्ती जवळचे नातेवाईक म्हणून आपल्याच मुलांना मिळेल या आशेने आपण एखादे मूल जास्त जन्माला घातले तर काय बिघडले ही भावना .
५) आपला मोठा बिझिनेस आहे त्याला पुढे विकासात घरचेच विश्वासाचे मनुष्यबळ हवे सबब थोडी जास्त मुले असायला काही हरकत नाही ! असा हिशेब !
६) अधिक मुले घरात नांदणे ही मानसिक गरज असणे !
७) बाळ मृत्यू कमी व वैद्यकीय प्रगतीमुळे दिर्घआयुष्य यामुळे एकाच वेळी मुले व आईवडील जगात अस्तित्वात असण्याचा काळ जास्त .
माणसाचे जसे जीवन असते की त्याच्या वाढीला , रोगातून बरे होण्याला एक थ्रेशोल्ड असतो त्यात्यानंतर कितीही उपाय केले तरी देह वाढत नाही वा रोगमुक्त होत नाही प्रमाणे समाजजीवनाचे असते . अन्न निर्मिती ,वैज्ञानिक क्रान्तिकारक शोध लागण्याची शक्यता ई त्याला अपवाद नाहीत. समजा भारताला जमीन कमी पडू लागली तर अमेरिका व्हायोमिंग सारखे एखादे राज्य भारताला फुकट देऊन टाकेल अशी शक्यता किती ? तर फक्त युद्ध झाले तर ! असे त्याला उत्तर मिळेल . एक दिवस असा नक्कीच येईल की भारतातील , चीनमधील लोकांना भारतात परत पाठवावे असा अमेरिकेत फतवा निघेल . अमेरिकेची ती थ्रेशोल्ड लिमिट अजूनही आलेली नाही. ती आली की लोकसंख्या वाढीचे फायद्याचे समर्थ करणाऱ्या सर्व थिअरीज कोलमडून पडतील. माणसाच्या संशोधक मेंदूची माणसाला आजही गरज आहे ती कायम राहील उपयोजित क्षेत्र व श्रम क्षेत्र यातील गरज मात्र कमी होणार हे सांगायला कुणा तज्ञ माणसाची गरज नाही .
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Mon, 02/08/2021 - 07:35
नवीन
सहमत आहे
- Log in or register to post comments
ग
गवि
Mon, 02/08/2021 - 07:59
नवीन
उत्तम विषय आणि बहुतांशी उत्तम चर्चा. चंद्रसूर्यकुमार यांचा प्रश्नही रोचक आणि नेमका.
एकूण पाहता व्यक्तिगत पातळीवर न जाता चर्चा झाल्यास अधिक रोचक होईल. विषय विचार करण्यासारखा आहे.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Mon, 02/08/2021 - 09:07
नवीन
उत्तम चर्चा....
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Mon, 02/08/2021 - 12:07
नवीन
गेल्या काही वर्षांपासून तथाकथित उच्च जातींमधील लग्नाळू मुली वधुवरसुचक मंडळात थेट 'नॉन आयटी क्षमस्व,नॉन MBBS क्षमस्व' किंवा विशिष्ट शहरातच राहणारा,स्ववास्तूत राहणारा,किमान इतका पगार असणारा' असे लिहून येत आहेत. सर्वच मुलींच्या अपेक्षा अतोनात वाढल्या आहेत.(यावर सर्वाधिक प्रतिसादांचा धागाही येऊन गेला आहे) तर यामुळे कायमच्या बिनलग्नाच्या राहणार्या किंवा चाळीशीत विवाह होणार्या पुरुषांमुळे लोकसंख्या वाढीला थोडा आळा बसेल का? कारण जे या उच्च जातींमधे आज होतंय तोच ट्रेंड नंतर अन्य सर्व जातींमधे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Mon, 02/08/2021 - 12:16
नवीन
आणि त्यांचे राहणीमान बघता, ते योग्य पण आहे ...
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Mon, 02/08/2021 - 12:53
नवीन
अपेक्षा पूर्ण करणारी मुल पण कमी असतात.
म्हणजे सुख वस्तू असणारे.
स्वतःची मोठी जागा असणारे.
उत्तम नोकरी व्यवसाय असणारे.
मुल ही कमीच असतात सर्वच मुलींना असा जोडीदार मिळणे शक्य नसते अस्तित्वात च नाही तर मिळणार कोठून त्या मुळे अनेक मुली सुद्धा वयाच्या 40 शी पर्यंत शोध च घेत अविवाहित असतात.
त्याचा लोकसंख्या वर नक्की परिणाम होणार.
मुलीची कमी होत जाणारी संख्या हे पण विवाह साठी मुलगी न मिळण्याचे कारण आहे .
ज्या गोष्टी ची उपलब्धता कमी त्याची किंमत जास्त.
त्याचा संबंध लोकसंख्या जास्त असणे उद्योग वाढ होण्यास आवश्यक आहे ह्याच्या शी पण आहे.
जेवढी लोकसंख्या जास्त तेवढे स्वस्तात कामगार उपलब्ध होतात.
सर्वच क्षेत्रात निपुण असणाऱ्या लोकांची संख्या जास्त असली की उद्योगांना मनुष्य बळ स्वस्तात मिळते कारण ते विपुल प्रमाणात उपलब्ध आहे.
मोजकेच डॉक्टर,किंवा बाकी स्किल ,unskil लोक उपलब्ध असतील तर त्यांची कमतरता जाणवते आणि त्यांना जास्त पगार सुद्धा द्यावा लागतो .
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Mon, 02/08/2021 - 12:31
नवीन
लोकसंख्या किती असावी हे जसे महत्वाचे आहे त्या पेक्षा जास्त जी लोक आहेत त्यांचा दर्जा काय आहे हे अती महत्वाचे आहे.
1) ते तंदुरुस्त आणि निरोगी आहेत का
2) त्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळत आहे का.
3)ते खेळात किंवा बाकी ॲक्टिविटी निपुण आहेत का
4) ते व्यसनी आणि चरसी तर नाहीत ना.
म्हणजे लोकांचा दर्जा हा उच्च असावा .
त्या साठी उत्तम सरकारी यंत्रणा असणे गरजेचे आहे उत्तम स्थिती निर्माण करण्यासाठी उत्तम प्रशासन हे हवेच..
फक्त जास्त लोकसंख्या आहे आणि त्या मध्ये जास्त व्यसनी आहेत ,अशक्त रोगीट आहेत .
शिक्षित आहेत पण सुशिक्षित नाहीत क्रिमिनल आहेत.
अडाणी आहेत .
तर अशा ह्या फक्त आकडे वाढवणाऱ्या लोकसंख्या असलेल्या जनतेचा देशाच्या प्रगतीत काय हातभार असणार.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Mon, 02/08/2021 - 13:02
नवीन
जे आयडी लोकसंख्या वाढ कशी चांगली ह्याचे जोरदार समर्थन करत आहेत त्यांना स्वतःला 8 ते 10 मुल आहेत का?
आहे असा कोणी इथे.
8 ते 10 जावू ध्या 3 मुल असणारा तरी कोणी आहे का नवतरुण इथे.
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Mon, 02/08/2021 - 13:13
नवीन
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Mon, 02/08/2021 - 13:27
नवीन
बोलती बंद प्रतिसाद....
सहमत आहे
- Log in or register to post comments
ग
गवि
Mon, 02/08/2021 - 13:38
नवीन
लेखाचा रोख आठ दहा किंवा तीन मुले जन्मास घालून लोकसंख्या वाढवावी असा प्रचार करण्याकडे नसावा असे वाटले. लोकसंख्यावाढ हाच विनाश असा बागुलबुवा उभा करुन कृत्रिमरित्या ती कमी करण्याचे कायदे करणे आवश्यक नाही असा रोख दिसतोय. एकंदरीत cause effect यांची दिशा समजण्यात गल्लत होतेय अशी काहीशी वेगळी बाजू मांडण्याचा हा प्रयत्न वाटतो आणि त्यात तथ्य असावे. लोकसंख्या वाढीचे सर्व फायदेच आहेत असे नाही हेही नोंदवलेलं दिसतं. पण जे तोटे म्हणून दाखवले जातात त्यातील कार्यकारणभाव चुकीचा आहे असं मला समजलेलं मूळ धागाकर्त्याचं म्हणणं. चुभूद्याघ्या.
- Log in or register to post comments
स
साहना
Mon, 02/08/2021 - 23:52
नवीन
बरोबर आहे. किमान १-२ लोकांना मुद्दा समजला आहे हे पाहून माझे लेखन अगदीच वेंधळटपणाचे नाही असे वाटते. अर्थांत मुद्दा मी जास्त अधोरेखित करायला पाहिजे होता.
लोकसंख्या शेवटी स्वतःला रेग्युलेट करते आणि हे स्व-नियंत्रण सरकारी नियंत्रणापेक्षा जास्त चांगले आहे. हा सारांश होता.
- Log in or register to post comments
र
रांचो
Tue, 02/09/2021 - 11:49
नवीन
सर्वात प्रथम, उत्तम लेख आणि तितकीच उत्तम चर्चा घडवुन आणल्या बद्दल लेखीकेचे आभार. मुळात लोकसंख्या वाढ चांगली की वाईट, हा मुद्दा अगदी फार पुर्वी पासुनच चर्चीला जात आहे. अगदी थॉमस मालथसच्या काळापासुन. "स्व-नियंत्रण सरकारी नियंत्रणापेक्षा जास्त चांगले आहे" हे विधान सकृत दर्शनी पटण्या सारखेच आहे. पण, त्या विधानचे संदर्भही तितकेच महत्वाचे असतात. जेंव्हा समाज स्व-नियंत्रण करण्यासाठी लागणारा वेळ खुप असतो आणि वेळ दडवण्याने दुष्परिणामाची तिव्रता अधिक असते, तेंव्हा जगभरात सगळीकडे सरकारे बाजारात असो अथवा लोकसंख्या नियंत्रण, त्यात हस्तक्षेप करीतच असतात. थोडक्यात जेंव्हा अकार्यक्षम बाजार किंवा समाज असतो, तेंव्हा सरकारी हस्तक्षेप जरुरी असतो. उ.दा. अनेक वेळा आलेल्या महामंदी, युरोपियन कर्ज संकट आताचे करोना संकट इ. लोकसंख्येच्या संदर्भात अनेक अतिशय गरीब एशियन, आफ्रिकन देश जिथे नियंत्रित लोकसंख्या अकार्यक्षम समाज लवकर करु शकत नाही.
- Log in or register to post comments
स
साहना
Mon, 02/08/2021 - 14:03
नवीन
कुणी तरी दूध पिण्याचे फायदे ह्यावर निबंध लिहिला तर "आपल्या घरी किती म्हशी आहेत" हा प्रश्न विचारणार आहात काय ?
इथे पाहण्यासारखे काहीही नाही. पुढे चला.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Mon, 02/08/2021 - 14:21
नवीन
जर एखाद्याला, एखादा विचार पटत असेल, तर तो सूरूवात घरापासून करण्याचा प्रयत्न करतो ...
मला रासायनिक शेतीचे वाईट परिणाम माहिती असल्याने, मी नैसर्गिक पद्धतीने शेती करणे उत्तम ...
आधी केले मग सांगीतले, हेच तत्व इथे लागू पडते ..
एक उदाहरण देतो .....
कुटुंब नियोजनाचे समर्थन करणारे, कर्वे आडनावाचे एक गृहस्थ होते ... त्यांनी स्वतः पासून सुरूवात केली...
- Log in or register to post comments
स
साहना
Mon, 02/08/2021 - 14:35
नवीन
१. सर्वानी असे केले पाहिजे.
२. सर्वाना असे करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे.
ह्या दोन वाक्यांत फरक आहे. १ मधील वाक्याला राजेश ह्याचा तर्क लागू पडतो. २ ह्याला पडत नाही.
लोकांना हॉटेल मध्ये वेटर म्हणून काम करण्याचे स्वातंत्र्य असायला पाहिजे का ? ह्या प्रश्नाचे उत्तर मी हो म्हणून दिले तर मी स्वतःचा धंदा सोडून हॉटेल मध्ये वेटर म्हणून काम करायला सुरुवात करावी असा होत नाही.
जे लोक इथे कुटुंब नियोजनाचे समर्थन करत आहेत त्यापैकी किती लोकांनी आपली नसबंदी केली आहे ?
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Mon, 02/08/2021 - 14:38
नवीन
दुसरे मार्ग वापरले
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Mon, 02/08/2021 - 14:45
नवीन
तुम्ही सल्लागार आहात....स्वतः करणार नाही...
एक उदाहरण देतो,
मध्यंतरी विडी कामगारांच्या हलाखी बद्दल एक लेख वाचनांत आला होता. लेखक स्वतः विडी कामगारांच्या बरोबर राहिले होते. त्यामुळे तो लेख जास्त भावला ...
क्रियेविण वाचाळता, व्यर्थ आहे.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Mon, 02/08/2021 - 15:13
नवीन
काय संबंध?
लोकांना खाजगी जागी सिगारेट पिण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे असे म्हणणारा स्वतः चेन स्मोकर असला पाहिजे का
लोकांना दारू पाजाणार्याने स्वतः अट्टल असलेच पाहिजे का
प्रपंचातील बरेच मौलिक सल्ले देणारे रामदास स्वामी स्वतः बाल ब्रह्मचारी होते.
समलैंगिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणार्याने स्वतः समलैंगिक असलेच पाहिजे का?
लेखिका फक्त सरकारने हस्तक्षेप करू नये इतकेच म्हणतेय, सरकारने अनुदान द्यावे असे म्हणत नाहीये.
ज्यांना मरायचे आहे त्यांनी हेल्मेट न घालता रस्त्यावर फिरावे.. ज्यांना आपल्या जीवाची भीती वाटते त्यांनी पिस्तुल घेऊन फिरावे.. पण पिस्तुल असेल आणि वापरण्याची अक्कल नसेल तर? भलत्याच ठिकाणी गोळी घालेल ना तो!!
त्यामुळे ज्याच्याकडे अक्कल आहे त्यालाच ते स्वातंत्र्य असावे.. त्यामुळे एका मर्यादेत राहून, मे बी 2/3 कितीही मुले जन्माला घालण्याचे स्वातंत्र्य असावे.
अर्थात उद्या याच न्यायाने मला 10 बायका करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिले असेही म्हणता येईल.. म्हणजे मग 10* 4 = 40.
मग हे 40 लोक जर साम्यवादी निघाले, (सर्वासामान्यपणे जेव्हढी गरिबी जास्त तितका साम्यवादाकडे ओढा अधिक) तर लोकशाही देशात ते 40 साम्यवादि आपल्या एका भांडवळवादी मुलाची संपत्ती राष्ट्रीयीकृत करण्याची शक्यता वाढते..
तस्मात नियंत्रण असावे!!
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Mon, 02/08/2021 - 15:33
नवीन
1) खून करणे वाईट आहे असे सांगणारा स्वतः खुनी नसावा
2) भ्रष्टाचार कसा समाजाला पोखरतो आणि त्यासाठी कडक शिक्षा हवी असे विचार मांडणार व्यक्ती स्वतः भ्रष्ट नसावं
3) स्त्री चा सन्मान राखला पाहिजे असे सांगणारा व्यक्ती स्वतः स्त्री लंपट नसावा.
4) आपण जे सल्ले देतो त्याचा स्वतःला अनुभव असावा.
एवढी माफक अपेक्षा का असू नये.
5) इंजिनियर लाच जा डॉक्टर च हो असे सांगणाऱ्या व्यक्ती ला त्या क्षेत्रातील पूर्ण अनुभव आणि माहिती असावी.
हल्ली क्रिकेट ची bat पन हातात न घेतलेली व्यक्ती सचिन नी कसे खेळायला पाहिजे आणि त्यांनी अमक्या तमक्या चुका केल्या हे अधिकार वानी नी सांगतो ते नक्कीच योग्य नाही.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Mon, 02/08/2021 - 16:05
नवीन
पटली
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Mon, 02/08/2021 - 16:15
नवीन
मुख्यमंत्रीसाहेब, तुम्हाला लेखकाचा मुद्दा काळात नाहीये असे दिसतेय..
लेखकाला लोकानी सदसद्विवेकबुद्धी वापरून निर्णय घ्यावा असे अपेक्षित आहे..
तुम्ही किती मुले जन्माला घालहे सरकारने सांगणे म्हणजे साम्यवाद आहे..
उद्या जर या उद्योगांनी लोकसंख्या कमी झाली तर सरकार प्रत्येकाला 5-5 मुले जन्माला घालायला लावणार का? त्यापेक्षा जे काही व्हायचे असेल ते नैसर्गिकरित्या व्हावे असे लेखिकेचे मत आहे, जे पटण्यासारखे आहेच, परंतु व्यापक जनहिताच्या दृष्टीने विचार करता, सरकारने पूर्ण स्वतंत्र ठेवू नये, कारण सर्वसामान्य जनता तारतम्य बाळगण्याची शक्यता नाही, आणि अश्या गोष्टीमुळे सामाजिक असमतोल वाढेल असे माझे मत आहे.
तुम्हाला काय वाटते मुख्यमंत्रीसाहेब?
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Mon, 02/08/2021 - 16:30
नवीन
मला लेखिकेचा दृष्टिकोन पण पूर्ण समजला आहे आणि तुमचा पण दृष्टकिन समजला आहे.
दोघे पण बरोबर आहात .
फक्त लोकसंख्या चा समतोल साधला जावा एवढेच माझे सामान्य मत आहे.
मग तो ऐच्छिक पद्धतीने साधला गेला तर उत्तम च नाही तर काही मर्यादे नंतर हस्तक्षेप करून समतोल साधने गरजेचे आहे एवढीच साधी इच्छा आहे.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Mon, 02/08/2021 - 17:23
नवीन
लोकांना फक्त फटक्यांचीच भाषा समजते ....
बाॅसने डोळे वटारले की, समस्त भारतीय जनता कामाला लागते .....
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Tue, 02/09/2021 - 02:10
नवीन
फक्त लोकसंख्या चा समतोल साधला जावा एवढेच माझे सामान्य मत आहे.
मग तो ऐच्छिक पद्धतीने साधला गेला तर उत्तम च नाही तर काही मर्यादे नंतर हस्तक्षेप करून समतोल साधने गरजेचे आहे एवढीच साधी इच्छा आहे
मी आज चक्क काही अंशी राजेश यांच्या विधानाशी सहमत आहे
बळजबरी नसली तरी लक्ष ठेवावं लागतेच,देश पातळीवर आणि ते सुद्धा दोन्ही बाजूने
म्हणजे अति लोकसंख्या किंवा पुरेशी लोकसंख्या नसणे या त्या दोन्ही बाजू
२ उद्धरणे देतो ( लोकसंख्या कमी असल्यामुळे सरकारला लक्ष घालावे लागते )
१) सिंगापोर मध्ये ( विविध आर्थिक करणामुळॆ बहुतेक) लोक लग्न करीत नाहीत ( आणि म्हणजे बहुतेकदातयामुळे प्रजोत्पादन होत नाही कारण लग्नबाहेर प्रजोत्पादन त्यामानाने कमी आहे ) त्यामुळे तरुण तरुणींना "उत्तेजित " करण्यासाठी सरकार स्वतः म्याच मेकर म्हणून कि काय वीकएंड क्रूझ जमवून आणायची..
२) "लग्न किंवा लिव्ह इन काह्ही असो पण मुलं करा आणि देशाची लोकसंख्या वाढवा " सरकार प्रत्येक मुलांमागे अंदाजे अडीच लाख रुपये आईला भेट आणि इतर सवलती देत असे ( साधय माहित नाही ) AUSTRALIA
तेवहा जर साहनजी किंवा कोणाचे असे म्हणणे असेल कि "लोकांना पाहिजे ते करू दे आपोआप सगळे सुरळीत होते " तर ते तेवढे काही पटत नाही बुवा .. असो
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 02/09/2021 - 03:37
नवीन
त्यामुळे, कायदे करणे भाग पडते...
- Log in or register to post comments
श
शा वि कु
Mon, 02/08/2021 - 17:55
नवीन
.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Mon, 02/08/2021 - 18:08
नवीन
असे का वाटते?
अशी कल्पना करा, आज तुम्हाला एकच मुल झाले, त्याला तुम्ही चांगल्या संधी दिल्यात आणि चांगला पैसा मिळवू लागले वगैरे.. चांगले घर, एखादा व्यवसाय वगैरे.. तुम्ही असे करता कारण तुम्हाला आर्थिक सुबत्ता म्हणजे काय ते माहीत आहे. तुमचे मूल देखील तेच करेल कारण त्याला सुबत्तेची किंमत माहीत आहे.
पण तुमचा शेजारी, ज्याला याची किंमत माहीत नाही, तो ५ मुले जन्माला घालेल. ती ५ मुले दुर्दैवाने तुमच्या मुलासारखे सुखी जीवन जगु शकतील असे नाही.. कदाचित २ जगती, तीन नाही.. मग ते ३ आणखीन ५ मुले प्रत्येकी जन्माला घालतील.. म्हणजे तिसर्या पिढीत तुम्च्याकडे १, आणि शेजार्याकडे १५+२ = १७.
आता तुम्चे १ जे असेल ते म्हणजे अंबानीची लाईफस्ताइल जगत असेल.. आणि ते १७ खुप स्ट्रगल करत असतील.. ते काय म्हणणार याला, तुझ्या बापाने दिलाय तुला धंदा काढून, तुझे कर्तृत्व काय? म्हणजे तू या धंद्याला लायक नाहीस.
जिथे गरिबी असते तिथे साम्यवादाचा ओढा जास्त असतो. कारण आपल्याला मिळत नाही, आणि कोणाला मिळते, म्हणजे ते अपले शोषण करूनच मिळवले आहे असे माणूस सहज धरून जाऊ शकतो.
अश्या परिस्थितीत जर साम्यवादी वाढले, किंवा कोणत्याही कारणाने पुरेश्या संधी उपलब्ध नसल्याने जर गुन्हेगारी वाढली, तर ज्यचाकडे आहे त्यालाच भीती असते. नंगे से खुदा भी डरता है.. त्यामुळे अश्या परिस्थितीत ज्याचाकडे आहे त्याचेच नुकसान होइल..
मग अश्या परिस्थितीत आपण पद त्याच्यासारखी ५ -५ जन्माला घालून समतोल साधावा का? तुम्हाला काय वाटते?
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »