Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

लोकसंख्या वाढीचा बागुलबुवा

स
साहना
Sun, 02/07/2021 - 09:02
🗣 178 प्रतिसाद
खालील ध्याग्यावर दिलेली प्रतिक्रिया थोडी खूपच लांब झाली म्हणून इथे वेगळा लेख म्हणून पाडत आहे. https://misalpav.com/node/48280 पाश्चात्य देशांत २-३ दशकांनी एक नवीन पोपट निर्माण होतो. मग हा विषय घेऊन तेथीतील हस्तदंती मनोऱ्यातील लोक येथेच्छ प्रोपागंडा करून लोकांची प्रचंड प्रमाणात दिशाभूल करतात. महायुद्धानंतर निर्माण झाला तो बागुलबुवा लोकसंख्या वाढीचा आणि हा बागुलबुवा बऱ्याच काळ चालला. भारतासारख्ग रीब देश ह्या विदेशी प्रोपागंडाला जास्त डोके न चालविता बळी पडतात. (सध्या बागुलबुवा वातावरण बदलाचा आहे आणि तो सुद्धा तितकाच दांभिक पणाचा आहे). लोकसंख्या वाढीचे परिणाम समजण्यासाठी भौतिक शास्त्र किंवा जीवशास्त्र पूर्णपणे निरर्थक आहे. त्यासाठी अर्थशास्त्र समाजणे जरुरीचे आहे. ह्या संदर्भांत अमेरिकेतील १९८० मधील सायमन-एहरलीच हि पैज वाचणे मनोरंजक ठरेल. तर अर्थतज्द्न्य जुलिअन सायमन आणि जीवशास्त्री पॉल एहरलीच ह्यांच्यात एक मोठी जाहीर पैज लागली. १९६८ साली पॉल ह्यांनी पॉप्युलेशन एक्सप्लोजन नावाचे एक भयंकर प्रसिद्ध पुस्तक लिहिले. त्यांच्या मते लोकसंख्या वाढ तात्काळ थाम्बवली नाही तर जगांत प्रचंड अन्न कमतरता होऊन कोट्यवधी लोक मरणार होते. ह्या पुस्तकाने खळबळ माचवली आणि ह्यांच्या नादाला लागून गोऱ्या लोकांनी मुले निर्माण करणे कमी केले (ज्याची फळे ते आज भोगत आहेत). भारत, चीन आणि अनेक देशांनी जास्त विचार न करता विविध योजना राबवून लोकसंख्या वाढ म्हणजे जणू काही भस्मासुर आहे असा प्रोपागंडा निर्माण केला. ज्युलियन सायमन ह्यांनी त्यांची हि भविष्यवाणी साफ खोटी ठरणार आहे असे जाहीर रित्या प्रकाशित केले आणि १० हजार डॉलर्स ची जाहीर पैज लावली. पैजेच्या नुसार ज्युलियन ह्यांचे म्हणणे होते कि बहुतेक संसाधनाचा तुटवडा तर असणार नाहीच पण वर तीच संसाधने स्वस्त सुद्धा असणार आहे. १९९० साली जुलिअन सायमन हे पैज सहज, म्हणजे अगदी मोठ्या फरकाने जिंकले. त्या दहा वर्षांत जगाची लोकसंख्या सुमारे ८०० दशलक्ष वाढली पण जे ५ धातू त्यांनी निवडले होते त्यांची किंमत बऱ्यापैकी कमी झाली होती. लोकसंख्या वाढीचे काहीच वाईट परिणाम आहेत असे नाही. लोकसंख्या वाढीचे अनेक वाईट परिणाम आहेत. पण जगांत नक्की किती लोक असायला पाहिजेत हे सुद्धा कोणीही निर्धारित करू शकत नाही. बहुतेकांना लोकसंख्यावाढीचे वाईट परिणाम दिसतात पण त्याचे असंख्य चांगले फायदे दिसत नाहीत. लोकसंख्या कमी झाली तर हे अनेक फायदे गायब होतीलच पण त्या फायद्यांना आम्ही मुकलो आहोत हे सुद्धा समजणार नाही. सोपे उदाहरण घेऊया. पोलिओ ची लस हि आमच्या साठी वरदान ठरली आहे ह्यांत काहीच दुमत नाही. अक्षरशः कोट्यवधी मुलांचा जीव ह्या लसीने वाचवला आहे. पण फक्त लसच नाही तर अनेक औषधे निर्माण झाली आहेत त्यामुळे आम्हा सर्वांचेच जीवन जास्त सुखकर झाले आहे. तर हि औषधे कशी निर्माण होता ? अक्षरशः हजारो लोकांचे परिश्रम ह्यांत गुंतले असतात. जगाच्या पाठीवर जितके जास्त डॉक्टर, संशोधक आहेत तितकी जास्त औषधांचा शोध लागतो. आज देशाची लोकसंख्या ७ अब्ज ऐवजी ४ अब्ज असती तर मार्केट मधील अनेक औषधें गायब झाली असती. पण मी फक्त औषधांचे उदाहरण दिले आहे. सॉफ्टवेर पासून, टीव्ही वरील विविध चॅनेल पर्यंत अनेक गोष्टी गायब झाल्या असत्या आणि आम्हा सर्वांचा जीवनमानाचा स्तर खूपच खाली गेला असता. तुमहाला आवडत असलेली कुठलीही गोष्ट घ्या. समजा तुम्हाला तुमचा फोन आवडतो. ह्या फोनच्या निर्मितीसाठी हजारो पेटंटन्स लागली आहेत आणि अक्षरशः लक्षावधी विविध छोटे छोटे शोध अनेक लोकांनी निर्माण केले आहेत. आणि ह्यांत जो एकूण मानवी वेळ गेला आहे त्याची जर बेरीज केली तर कदाचित कोट्यवधी मनुष्य-तास त्या फोन चा शोध लावण्यासाठी खर्च झाले आहेत. समजा देशाची लोकसंख्या अर्धी असती तर तितके मनुष्यतास खर्च होण्यासाठी दुप्पट वेळ लागला असता आणि फोन आपल्या हाती येण्यासाठी २०२० ऐवजी कदाचित २०४० वर्ष लागले असते. अर्थानं त्याच तर्काने आम्ही असे म्हणू शकतो कि जगाची लोकसंख्या फक्त ७ अब्ज असल्याने आज आमच्या हातात अश्या अनेक गोष्टी नाहीत ज्या कदाचित २०५० मध्ये आमच्या हाती असतील. आज जगाची लोकसंख्या १४ अब्ज असती तर कदाचित आणखीन अजब साधने आणि तंत्रज्ञान आमच्या हाती असते. > अहो पण लोकसंख्या अशीच वाढत राहिल्यास पर्यावरणाचे काय ? हा मुद्दा अनेक लोक वर काढतात आणि काही प्रमाणात तो रास्त सुद्धा आहे. पहिली गोष्ट म्हणजे जसे जीवनमान उंचावते आणि लोक जास्त काळ जगू लागतात त्याच वेळी लोकांना मुलें नकोशी होतात. आमच्या आजोबांच्या काळी खाण्यापिण्याचे वांधे होते त्यामुळे लोक दिवसभर काबाडकष्ट करायचे आणि रात्रभर प्रजनन करायचे. महिलांची अवस्था फक्त चूल आणि मूल अशी होती. पण त्यांची चूक नव्हती. रात्री आणखी करणार काय ? मग ४०-५० वर्षांत हृदयविकाराचा झटका वगैरे येऊन मृत्यू. आता जीवनमानाचा स्तर उंचावलाय. गर्भनिरोधक आल्याने शरीरसुख घेता येते आणि प्रजनन रोखता येते. रोमान्स ची व्याख्या रुंदावलीय. आता जोडपी चित्रपट पाहतात, दिनार करतात, कुठे फिरायला वगैरे जातात. पुस्तके वाचतात आणि नेटफ्लिकस पाहतात. त्याशिवाय प्रत्येक वेळी फिरायला वगैरे जाताना लक्षांत येते कि जास्त मुले म्हणजे खूपच जास्त खर्च त्यामुले फार तर एक दोन मुले खूप होतात. ह्यामुळे आपसूकच जन्मदर खालावत जातो. ह्या दृष्टिकोनातून कर्वे हे खूपच दूरदर्शी आणि विद्वान होते. मुले जास्त जन्माला घालण्याचे एक कारण म्हणजे मुले मारण्याचे प्रमाण सुद्धा खूप होते. आता ते कमी झाल्याने वंशाला एक दिवा असला तरी पुरतो मोठी माळ लावायची गरज नाही. परंपरागत घरे आता बंद पडत आहेत. बापाने बांधलेल्या घरांत मुलें राहू इच्छित नाहीत म्हणून "वंशाचा दिवा" हि सुद्धा जास्त डिमांड नसलेली गोष्ट झालीय. मुलांच्या संगोपनाचा मार्जिनल खर्च आणि लोकसंख्या वाढीचा दर हि दोन महत्वाची व्हेरिएबल्स अर्थतज्ञ पाहतात आणि दोन्ही मध्ये खूपच जास्त संबंध आहे. आणि ह्या संबंधाने मानवी लोकसंख्या चादर पाहून हात पसरेल ह्यांत मला तरी अजिबात शंका वाटत नाही. मुलांच्या संगोपनाचा मार्जिनल खर्च : मार्जिनल खर्च ह्याचा अर्थ प्रत्येक ऍडिशनल मुलाच्या संगोपनासाठी खर्च किती येतो. एका मुलाचा खर्च प्रचंड असतो. कारण मूल नाही तर माता काम करू शकते. एक मूल झाले आणि तिने नोकरी सोडली तर ते पैसे येणे बंद होतात आणि त्यामुळे तो मुलाच्या संगोपनाचा खर्च ठरतो. पण एकदा नोकरी सोडल्यानंतर तिला २ मुले झाली तर त्या दुसऱ्या मुलाचा मार्जिनल खर्च खूपच कमी असतो. (एका मुलासाठी ३ लक्ष वर्षाला खर्च येतो तर दोन मुलांसाठी ३.५ लक्ष खर्च येतो इत्यादी). जुन्या खाली हा मार्जिनल खर्च खूपच कमी असायचा कारण बहुतेक खर्च हा फक्त अन्नाचा असायचा. आता तुम्ही दुबईला किंवा किमान खंडाळ्याला जाता तर सुद्धा तिकिटाचा खर्च प्रत्येक मुलांमागे होतो तो फार असतो. ४ मुले झाली तर मग तुम्हाला ५ सीटर गाडी सुद्धा चालत नाही. जसे जसे जीवन मान उंचावते तसे तसे मार्जिनल खर्च हा खूपच वेगाने वाढतो. मुलाला विदेशांत शिकायला पाठवायचे तर ५० लक्ष रुपये पाहिजेत. दोन मुले झाली तर मग १ कोटी. पण गरीबाच्या घरांत हे प्रश्न नसतात. पण खर्च वाढतो म्हणजे नक्की काय होते ? माणसाला जगांत फक्त दोनच खर्च असतात. एक खर्च असतो ऊर्जेचा दुसरा खर्च असतो दुसऱ्या माणसाच्या वेळेचा. (आयफोन पासून कांदे बटाटे पर्यंत तुम्ही काहीही विकत घेतले तर तुम्ही फक्त ऊर्जा आणि दुसऱ्या लोकांचा वेळ ह्या दोनच गोष्टींचा मोबदला देत असता. समजा ह्या दोन गोष्टी अपरंपार आणि फुकट असत्या तर आयफोन आणि कांदे बटाटे ह्यांची किंमत सुद्धा शून्य असती.). खर्च वाढतो ह्याचा अर्थ तुम्ही जास्त ऊर्जा आणि मानवी वेळ खर्च करत आहात असा होतो. आपण पर्यावरणाच्या नावाने बोंब मारतो तेंव्हा पर्यावरणाला होणारी हानी हि १००% ऊर्जा ह्या एका संसाधना द्वारे तुंबलेली जाऊ शकते. पण ऊर्जा महाग असल्याने आम्ही ती हानी अन-डू करू शकत नाही. जर पर्यावरणाची हानी वाढत गेली तर ऊर्जेचा दर सुद्धा वाढत जातो आणि आणि त्यामुळे मुलांच्या संगोपनाचा मार्जिनल खर्च. त्यामुळे हि दोन्ही व्हेरिएबल्स एकमेकांना बॅलेन्स करतात. पण ऊर्जा हि काळाचा ओघांत स्वस्त होत गेली तर लोकसंख्या सुद्धा वाढत जाते आणि पर्यावरणाला हानी सुद्धा होत नाही. ह्या दोन्ही व्हेरिएबल्स मधील गणिती संबंध तसा स्पष्ट पणे अभ्यासाने कठीण आहे कारण लोकसंख्या वाढली कि हे लोक नवीन शोध लावून ऊर्जेचा दर आणखीन कमी करतात. टीप : युनायटेड नेशन्स किंवा विविध तद्न्य मंडळी जगाची लोकसंख्या सुमारे २०५० मध्ये स्टेबल होईल असे भाकीत करत आहेत. मला त्यांत शंका वाटते. पहिली गोष्ट म्हणजे माझ्या मते ऊर्जेचा खर्च येत्या २० वर्षांत १०० पटीने कमी होणार आहे. बहुतेक ऊर्जा फ्युजन सेल द्वारे किंवा इतर कुठल्या नवीन शोधांतून निर्माण होईल आणि त्यानंतर सर्वच जीवनावश्यक वस्तूंचा भाव कमालीचा पडणार आहे. ऊर्जा स्वस्त आणि मुबलक होताच, शेती, पिण्याचे पाणी वगैरे गोष्टींचा काहीही तुटवडा असणार नाही त्याशिवाय कार्बन एमिसशन वगैरे उलट करणे सहज शक्य होणार आहे. कदाचित IVF वगैरे प्रक्रिया खूपच सोप्या होऊन गरोदर न राहता सुद्धा मुले निर्माण करणे शक्य होईल आणि त्यामुळे कुठल्याही वयांत मुले निर्माण करणे शक्य होईल आणि कदाचित मंडळी जास्त मुले निर्माण करतील. अर्थांत मी हे भाकीत एखाद्या ज्योतिष्या प्रमाणे वर्तवत आहे. टीप २ : जगांतील सर्व नैसर्गिक संसाधने हि अक्षय म्हणजे अनलिमिटेड आहेत. एकच असे संसाधन आहे जे अक्षय नाही आणि ते म्हणजे मानवी वेळ. हि संकल्पना बहुतेक इकॉनॉमिक्स च्या पुस्तकांत मंडळी गेलेली असते पण राजकीय कारणासाठी पाश्चात्य राष्ट्रांनी "लिमिटेड रिसोर्सिस" आणि "अनलिमिटेड रिसोर्सेस" किंवा "रिन्यूएबल ऊर्जा" आणि "नॉन रिन्यूएबल ऊर्जा" असल्या श्रेणी शाळांतून आम्हा मुलांच्या डोक्यांत घातल्या. हि विचारसरणी डाव्या लोकांची असून पाश्चात्य देशांतून आपल्या देशांत आली आहेत आणि त्यांत काहीही तथ्य नाही. हि गोष्ट बहुतेक लोकांना पचणार नाही किंवा पटणार नाही कारण ह्या प्रकारच्या प्रोपागंडावर आमच्या देशांत कुणीही प्रश्न विचारला नाही. कुणाला इंटरेस्ट असेल तर वेगळ्या लेखांत विस्ताराने लिहीन. प्रतिक्रिया किंवा खरडवहीवर लिहून कळवा.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 48630 views

🗣 चर्चा (178)
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sun, 02/07/2021 - 13:14 नवीन
पाश्चात्यांचे माहित नाही पण गिरगावात चाळीत राहत असताना परसाकडला जाण्यासाठी लोकांची जी लाईन लागायची त्यावेळेपासुन 'लोकसंख्या कमीच हवी' असे ह्यांचे मत आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 02/07/2021 - 13:51 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
स
साहना Mon, 02/08/2021 - 06:49 नवीन
तेंव्हापासून आता लोकसंख्या कदाचित डबल झाली असावी पण परसाकडे जाताना अनुभव सध्या वाईट आहे कि चांगला आहे ? (ह्यां प्रश्नाच्या उत्तरांत माझ्या लेखाचे सार दडले आहे)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 02/08/2021 - 07:37 नवीन
लोकलच्या आसपास दुर्गंधी कमी असायची ... आता वाढली आहे ... सार्वजनिक व्यवस्थेवर, लोकसंख्या वाढीचा ताण येतोच...
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 02/09/2021 - 13:02 नवीन
तेव्हा लायनीत उभ्या राहणार्या अनेकानी नंतर फ्लॅट घेतले. पण त्यामुळे बांधकाम वाढले, प्रदुषण वाढले.. वगैरे असो खायचे/ह*यचे वांदे असणार्या देशानी लोकसंख्या वाढवण्याच्या भानगडीत पडु नये असे आमचे मत आहे. मग भारत असो पाकिस्तान असो वा बांग्लादेश डेन्मार्क देशाची लोकसंख्या ६० लाखाच्या आसपास आहे. म्हणजे अर्धी मुंबई.. ह्या मंड्ळीनी विचार केला तर ठीक आहे. त्यांच्याकडे साधन संपत्तीही विपुल आहे. अमेरिकेची लोकसंख्या ३० कोटी असेल पण तो देश आकाराने आपल्या तिप्पट आहे. म्हणजे प्रत्येक नागरिकास तेथे आपल्या ९ पट अधिक जागा/नैसर्गिक संपत्ती आहे. भारतिय सैन्यात भरती होण्यासाठी सैनिकाच्या एका पदासाठी २० अर्ज येतात. लोकसंख्या वाढ्वा म्हणणारे लोक तेवढ्या प्रमाणात नोकर्या निर्माण करू शकतील? शेयर मार्केट थेट परदेशी गुण्तवणुकीवर चाललेले. गुंतवणुक काढुन घेतली की मार्केट कोसळते. पश्चिम युरोप्/अमेरिकेपेक्षा आपली गुणवत्ता उजवी आहे अशातलाही भाग नाही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 02/09/2021 - 13:12 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Wed, 02/10/2021 - 04:44 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 02/10/2021 - 04:53 नवीन
माहिती बद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
क
काळे मांजर Sun, 02/07/2021 - 13:35 नवीन
छान
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 02/07/2021 - 13:51 नवीन
म्हणजे, येत्या काही वर्षांत, भारताची लोकसंख्या, 1000 कोटी झाली तरी काही फरक पडणार नाही, असे तुमचे मत आहे का?
  • Log in or register to post comments
स
साहना Sun, 02/07/2021 - 21:03 नवीन
१००० होईल कि ५०० कोटी ठाऊक नाही पण १००० कोटी असूही शकते. २०० वर्षे मागे भारताची लोकसंख्या १३० कोटी होईल असे कुणी सांगितले असते तर कुणाचाही विश्वास बसला नसता. जी काही लोकसंख्या असेल ती आपसूक तंत्रज्ञानाशी निगडित असेल आणि लोकांचे राहणीमान खूपच उंचावलेले असेल. प्रदूषण कमी असेल, अन्नधान्य जास्त आणि स्वस्त असेल दरडोई ऊर्जेचा वापर जास्त असेल हे मात्र पैसे लावून सांगू शकते.
  • Log in or register to post comments
स
साहना Sun, 02/07/2021 - 21:04 नवीन
https://www.theguardian.com/world/from-the-archive-blog/2015/oct/29/china-one-child-policy-failure-archive-1979-2016
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 02/08/2021 - 02:20 नवीन
तितके प्रदूषण जास्त.... 1000 कोटी जनतेला पुरेल, इतके अन्न आपण कसे तयार करणार? 1000 कोटी जनतेला, दळणवळण कसे पुरवणार? साध्या बुलेट ट्रेनला, इतका विरोध होतो... 1981 मध्ये मी डोंबिवली येथून 7:12 ची लोकल, दादरला जाण्यासाठी पकडत होतो...आरामात चढू शकत होतो...आज, लोकल तीच आहे, पण धक्काबुक्की करूनच लोकलमध्ये प्रवेश मिळतो ..अफाट लोकसंख्येचे, परिणाम आहेत.... हा एक भाग झाला ... ट्रॅफिक जॅम, हा दुसरा भाग झाला प्रदूषण वाढले आहे, 1966 पासून मी डोंबिवली येथे राहतो, गेल्या 50 वर्षांत डोंबिवली येथील हवा जास्त प्रदुषित झाली आहे... धूळ आणि आवाज, यांचे प्रदूषण वाढलेले आहे ... ह्या डोळ्यासमोरच्या गोष्टी आहेत ....
  • Log in or register to post comments
स
साहना Mon, 02/08/2021 - 05:29 नवीन
> 1000 कोटी जनतेला पुरेल, इतके अन्न आपण कसे तयार करणार? हाच प्रश्न तुम्ही १०० कोटी जनतेला अन्न कसे पुरवणार म्हणून १९०० मध्ये विचारू शकला असता आणि तो रास्त सुद्धा वाटला असता. आता तुम्ही १००० कोटी लोकांविषयी प्रश्न विचारत आहात तो रास्त वाटत आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 02/08/2021 - 07:07 नवीन
ह्याचेही एक लिमीट असणारच... एक वेळ, इमारती उंच होतील, दळणवळण सुधारेल, अन्नपुरवठा पण कदाचित होईल. पण, गर्दीवर नियंत्रण राहणार नाही ...जे आत्ता होत आहे गुन्हेगारीचे प्रमाण वाढेल ... मी संख्येची गोष्ट करत नाही आहे, दर शेकडा प्रमाण वाढेल. प्रदूषण वाढेल मानसिक रूग्णांचे प्रमाण वाढेल व्यक्तीपुजेचे स्तोम जास्तच वाढेल हुकूमशाहीला अतिशय पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता असल्याने, अराजकता वाढेल...
  • Log in or register to post comments
स
साहना Mon, 02/08/2021 - 06:53 नवीन
> 1981 मध्ये मी डोंबिवली येथून 7:12 ची लोकल, दादरला जाण्यासाठी पकडत होतो...आरामात चढू शकत होतो...आज, लोकल तीच आहे, पण धक्काबुक्की करूनच लोकलमध्ये प्रवेश मिळतो ..अफाट लोकसंख्येचे, परिणाम आहेत.... इथे लोकसंख्या हि समस्या अजिबात नाही. रेलवेचे सरकारी नियंत्रण हि समस्या आहे. मुंबई ते पुणे हा प्रवास १९८० मध्ये जास्त आरामदायक होता कि आज आहे ? आपल्या एकूण उत्पन्नाच्या किती टक्के भाग आपण दररोजच्या प्रवासावर खर्च करता ? १९८० च्या तुलनेत आपल्याकडील वाहने काय आहेत ? १९८० पासून २०२० पर्यंत विमान प्रवास आपल्याला जुन्या काळी परवडत होता कि आज परवडत आहे ? एकूण प्रवास ह्या दृष्टिकोनातून सरकारी नियंत्रित वाहतूक सोडल्यास इतर सर्व प्रकारची वाहतूक खूप चांगली झाली आहे ह्यांत शंकाच नसावी.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 02/08/2021 - 07:15 नवीन
अफाट लोकसंख्येला ती अपुरीच पडणार .... पुर्वीचा प्रवास जास्त सुरक्षित होता ... मी वयाच्या 10 व्या वर्षा पासून, प्रवास करत आहे ... तेंव्हा, सेवाग्राम एक्सप्रेस जास्त सुरक्षित होती.... आता नाही ... सामान्य माणसाला, विमान प्रवास आत्ता पण परवडत नाही ... वाहने वाढली आणि प्रदुषण पण वाढले .... जितकी लोकसंख्या जास्त, तितके प्रदूषण जास्त
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Sun, 02/07/2021 - 14:30 नवीन
'One-child policy' का बरे आणली असावी, त्यांच्याकडील नैसर्गिक संसाधने संपली की आणखी काही कारण होते ?
  • Log in or register to post comments
स
साहना Sun, 02/07/2021 - 21:01 नवीन
सरकारी बाबू काही नवीन नियम आणतात त्यांत तारतम्य असतेच असे नाही. ह्या चुकीच्या पॉलिसीची फळे चीनला सध्या भोगावी लागत आहेत.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Mon, 02/08/2021 - 05:04 नवीन
चीनचे कसले चुकीचे नियम व त्याची कोणती फळे ... जरा इस्कटून सांगाल काय ... ? नाहीतर विधान मागे घ्या !! उगाच काहीतरी टाकत बसू नका !
  • Log in or register to post comments
स
साहना Mon, 02/08/2021 - 05:40 नवीन
लोकसंख्या वाढीच्या बागुलबुव्याला घाबरून चीन च्या बाबू लोकांनी एक मूल पॉलिसी आणली. ह्यामुळे चीन ची लोकसंख्या वाढ जरी मंदावली तरी त्याचे एकूण परिणाम चीन देशासाठी जास्त घातक ठरले आहेत ह्यावर आता सर्वांचेच एकमत झाले आहे. सर्वांचे = इतर जग तसेच चिनी सरकार आणि विद्वान. २००१ पासून चिनी अभ्यासक चिनी सरकारला हि पॉलिसी बदल्याण्याचे आवाहन करत होते आणि शेवटी चिनी सरकारने सुद्धा देर आये दुरुस्त आहे ह्या तत्वाने हि पॉलिसी चुकली आहे हे मान्य करून ती मागे घेतली आहे. तुम्हाला जास्त माहिती हवी असेल तर तुम्ही हे वाचू शकता : - https://www.bbc.com/news/world-asia-pacific-11404623 - https://www.brookings.edu/articles/the-end-of-chinas-one-child-policy/ - https://www.theguardian.com/world/2019/mar/02/china-population-control-two-child-policy - https://www.nationalgeographic.com/news/2015/10/151030-china-one-child-policy-mei-fong/ - https://www.youtube.com/watch?v=eNKQT7Ub2Ps - https://www.bbc.com/news/world-asia-pacific-11404623 सर्वांत चांगला लेख इथे आहे : https://www.cato.org/commentary/flawed-assumptions-chinas-disastrous-childbearing-laws# लोकसंख्या वाढ कमी करण्याचा सर्वांत चांगला उपाय म्हणजे लोकांचे जीवनमान उंचावणे होय. १९७८ मध्ये दक्षिण कोरियाचा प्रजनन दर चीनपेक्षा जास्त होता. त्यांनी काहीही कायदे केले नाहीत पण त्यांची अर्थी प्रगती वेगाने झाल्याने कोरिआ चा प्रजनन दर आपोआप कमी होत गेला.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Mon, 02/08/2021 - 08:35 नवीन
या धोरणाचे चीनवर बरेच परिणाम झाले आहेत. एक तर चीनी समाजात दीर्घायुषी लोकांचे प्रमाण जास्त आहे. काहीही कारण असले चीनमध्ये life expectancy ७६ वर्षे आहे असे आंतरजालावर समजले. भारतात ते ६७ वर्षे आहे. म्हणजे ६० व्या वर्षी निवृत्ती धरली तर सामान्य चीनी निवृत्तीनंतर सरासरी १६ वर्षे जगतो तर सामान्य भारतीय निवृत्तीनंतर सरासरी ७ वर्षेच जगतो. १९७० च्या दशकाच्या शेवटापासून चीनने हे धोरण अवलंबायला सुरवात केली. याचा परिणाम हा झाला की चीनी नागरिकांचे सरासरी वय वाढले. आर्थिक प्रगतीत तरूणांचा हातभार वृध्दांपेक्षा जास्त असतो हे वेगळे सांगायला नको. दुसरे म्हणजे आता टिपीकल चीनी कुटुंब म्हणजे एक जोडपे त्यांचा एक मुलगा/मुलगी आणि नवरा बायकोचे आईवडिल. म्हणजे दोघांच्या उत्पन्नावर सात जणांना पोसायची जबाबदारी. त्यामुळे चीनी समाजात सेव्हिंगचे प्रमाण गेल्या दहा वर्षात कमी झाले आहे हे https://data.worldbank.org/indicator/NY.GDS.TOTL.ZS?locations=CN वरून कळेल. तरीही चीनी समाज बर्‍यापैकी काटकसरी असल्याने अमेरिकेपेक्षा हे प्रमाण बरेच जास्त आहे पण चीनने इतकी वर्षे जो दर राखला आहे तो कमी होत आहे हे नक्की. आणि चीनने एक मूल धोरण १९७९ पासून अंमलात आणले आणि सेव्हिंगचा दर २०१० पासून कमी व्हायला लागला यात बरेच काही आले नाही का? आता सेविंग्जचा दर कमी झाला म्हणून काय बिघडले? तर सेव्ह केलेले पैसे कोणी आपल्या गादीमध्ये किंवा उशीमध्ये भरून ठेवत नसतो तर बँकेत ठेवतो. त्यातून मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टना कर्जे द्यायला चीनी बँकांकडे भरपूर पैसे इतकी वर्षे उपलब्ध होते ते यापुढील काळात कमी होतील ही भिती आहे. त्यातून चीनने इतकी वर्षे infrastructure development for the sake of it असे काही अंशी केल्याने १००% वापर न होणार्‍या अनेक मोठ्या इमारती, विमानतळे वगैरे पडून आहेत. याविषयी https://www.npr.org/sections/parallels/2015/10/15/446297838/chinas-white-elephants-ghost-cities-lonely-airports-desolate-factories वगैरे अनेक लेखांमध्ये. त्यामुळे चीनी अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या वेगावर प्रश्नचिन्ह नक्कीच उभे राहिले आहे. चांगल्या हेतूने सरकार करायला काहीतरी जाते आणि त्याचे परिणाम वेगळेच होतात हा प्रकार अनेक ठिकाणी बघायला मिळतो त्यातलाच हा प्रकार दिसतोय.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 02/08/2021 - 02:23 नवीन
त्यामुळेच, चीन त्या बाबत जास्त बोलत नाही किंवा चुकीची माहिती देतो.. चीन आणि घराणेशाहीचे अपरिपक्व उमेदवार, यांच्यावर मी कधीच विश्र्वास ठेवत नाही ...
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 02/07/2021 - 20:29 नवीन
कंपू बाजी करणारी गँग गायब आहे ह्या धाग्यावर सोयी नी मत व्यक्त करत नाहीत. फसण्याची शक्यता आहे एक तर सर्व दावे चुकीचे आहेत अर्थ शास्त्र मधील कोणत्या तरी पानावर बारीक अक्षरात लिहलेले विचार आहेत. आणि दुसरे मुस्लिम लोक शक्य तेवढ्या जास्त बायका करून शक्य तेवढी जास्त मुळ जन्मास घालतात. ह्या धाग्याला पाठिंबा देणे म्हणजे मुस्लिम समाजाच्या मुलांना जन्न देण्या विषयी विचारणा पाठिंबा देण्या सारखे आहे. अवघड जागेचे दुखणं आहे. मुस्लिम समाज हा खूप प्रगत विचाराचा असून तो अर्थ व्यवस्था वाढावी म्हणून जगावर उपकार करत आहे हे मान्य करण्या सारखे आहे त्या मुळे कंपू बाज गायब आहेत.
  • Log in or register to post comments
P
pspotdar Sun, 02/07/2021 - 21:32 नवीन
http://legislative.gov.in/actsofparliamentfromtheyear/muslim-women-protection-rights-marriage-act-2019 यावर आपल काय म्हणनं आहे
  • Log in or register to post comments
स
साहना Sun, 02/07/2021 - 21:58 नवीन
इथे पाहण्यासारखे काहीही नाही पुढे चला ....
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 02/08/2021 - 03:31 नवीन
मुळात पूर्वी मुले हणजे म्हातारपणीची काठी अशी कल्पना भारतात तरी होती.. कितो काही म्हटले तरी ती कल्पना आता हळूहळू मोडीत निघू लागली आहे.. अश्या परिस्थितीत किती पालक आपले तारुण्य मुलांच्या खस्ता काढण्यात खर्च करतील? त्यापेक्षा नोकऱ्या करिअर करून सेव्हिंग केले, आणि उतारवयात एखाद्या 5 स्टार वृद्धाश्रम बुक केला की झाले नाही का? सध्या एकल मूल नव्हे, तर मूल नको असं ट्रेंड वाढू लागला आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 02/08/2021 - 04:09 नवीन
Double Income No Kid, अशा पद्धतीने कुणी संसार करत असेल तर, अशा कुटुंबाला सरकारी सोयीसुविधा आणि सबसिडी आधी मिळायला हवी ...
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 02/08/2021 - 04:28 नवीन
त्यांना गर्भ निरोधक मान्य नाही,मुल ही अल्ला ची देणं आहे असे त्यांचे पक्के मत आहे. जास्त मुल जन्माला घालण्यासाठी जास्त बायका करा ही त्यांची परंपरा ह्याचा अर्थ सरळ आहे मुस्लिम समज हा प्रगत समाज आहे. जगाची उन्नती करायची असेल, भरभराट करायची असेल खूप लोकसंख्या हवी आणि त्या साठी आपल्याला च प्रयत्न करायला हवेत असा त्यांचा निस्वार्थी विचार आहे. आज जी कशी अफाट प्रगती दिसत आहे ती फक्त जास्त लोकसंख्या मुळे. बाकी पर्यावरण (त्या वर आधारित असलेली शेती आणि रोगराई) मोकळ्या जागा,विस्तीर्ण पसरलेला जंगल आणि हवेतील कार्बन शोषून राखला जाणारा समतोल . हे सर्व बकवास आहे. Trump नी असेच तारे तोडले आणि पॅरिस करारा मधून अमेरिका बाहेर पडला आणि biden आल्या बरोबर ट्रम्प चा निर्णय त्यांनी फिरवला. म्हणजे biden हे अमेरिका द्रोही आहेत.
  • Log in or register to post comments
स
साहना Mon, 02/08/2021 - 04:59 नवीन
पॅरिस करारा मधून बाहेर पडण्याचा ट्रम्प ह्यांचा निर्णय १००% बरोबर होता. पॅरिस करार काय आहे ते इथे पहा https://www.youtube.com/watch?v=cVkAsPizAbU&t=2s
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Mon, 02/08/2021 - 04:59 नवीन
सहना यांच्याशी अजिबात सहमत नाही. लोकसंख्या किती हवी याबाबत तारतम्य असायला हवे कारण एका मनुष्य आणि इतर प्राणी असे डायरेक्ट कंपॅरिजन केले जाऊ शकत नाही. इतर प्राणी फक्त खाणे आणि प्रणय या दोनच गोष्टीसाठी आपले जिवन जगत असतात पण मनुष्याचे तसे नाहीये. त्यामुळे मनुष्यांची संख्या वाढली तर प्राकृतिक संसाधनांवर तसेच मानवनिर्मित संसाधनांवर देखील मर्यादा येणार हे नक्की. ज्यादिवशी मनुष्य फक्त खाणे आणि प्रणय या दोनच गोष्टीसाठी जगेल.. त्याला वस्त्र, निवारा, नोकरी, शिक्षण, रस्ते, आरोग्य, वीज, पर्यटन, चैनीच्या गोष्टी, पाणी इ सर्व गोष्टींची गरज नसेल तेव्हाच सहना ताईंची मते बरोबर असतील.. पण आता या सर्व गोष्टी मानवी जीवनाचा भाग आहेत त्यामुळे लोकसंख्या वाढवून आपण आपल्याच पायावर धोंडा मारून घेतोय. इथे काही लोकं मुस्लिम समाज कसा प्रगतिशील आहे.. 4 4 बायका आणि सोळा पोरं काढून कशी मानवजातीच्या प्रगतीला हातभार लावतायेत हे वाचून डोळे पाणावले. कारण मांजर फक्त एकटीच परत नाही आली तर सोबत आपला जुळा भाऊ देखील घेऊन आली (188).. हे नक्की झाले. इतके दिवस शंका होती पण आज कळले कि गंगाधरच शक्तिमान आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 02/08/2021 - 05:05 नवीन
आणि अवतारी मंडळींना, वारंवार सहन करण्या इतपत, मिपाकर सहनशील आहेत .... रामचन्द्र कह गए हैं की, हंस चबेगा दाना-तिनका, कौवा मोती खाएगा.
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Mon, 02/08/2021 - 05:34 नवीन
लोकसंख्यावाढ आणि बागुलबुवा => 'अस्माकं बदरीचक्रं युष्मांक बदरीतरुः । बादरायणसंबंधात् यूयं यूयं वयं वयंम् ।' 😄 😄 😄 - (हस्तदंती मनोऱ्यात नसलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 02/08/2021 - 06:14 नवीन
सोत्री आले ... जुने आणि जातीवंत, आय.डी. भेटले की आनंद होतो...
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Mon, 02/08/2021 - 05:34 नवीन
लोकसन्ख्या कमी करण्यासाठी कोणतेही सरकारी धोरण असु नये असे वाटते. (उदा: अमुक इतकीच मुले असतील तर सरकारी नोकरी इ इ.) शिक्षण, सुबत्ता आली की लोकसन्ख्या वाढ आपोआप नियंत्रणात येते. चीनने वन चैल्ड पोलिसी अलिकडेच मोडीत काढली कारण त्याचे तोटेच दिसले.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Mon, 02/08/2021 - 06:50 नवीन
लेख आवडला. एक प्रश्न- टॅक्सेशनमध्ये लाफर कर्व्ह असते त्याप्रमाणे लोकसंख्येच्या बाबतीत एखादा ऑप्टिमम पॉईंट असू शकेल का? ही संज्ञा अर्थतज्ञ आर्थर लाफर यांनी आणली. Image removed. सामान्यतः असे वाटेल की कराचे दर कमी केले तर सरकारचे करसंकलन कमी होईल. पण प्रत्येकवेळी तसे होतेच असे नाही. वरील आकृतीत दाखवल्याप्रमाणे सध्याचे कराचे दर टी-४ असतील तर त्यावरून कर टी-३ पर्यंत कमी केल्यास करसंकलन वाढेल. कर आणखी टी-२ पर्यंत कमी केल्यास करसंकलन कमी होईल. याचे कारण हे की समजा ०% टॅक्स असेल तर सरकारचे करसंकलन अर्थातच शून्य असेल. पण १००% टॅक्स असेल तरी सरकारचे करसंकलन शून्यच असेल. याचे कारण १००% टॅक्स असेल तर अर्थव्यवस्थेतील उलाढाली शून्य होतील. आपण जितके कमावतो ते सगळे सरकार कराच्या रूपात द्यायचे असेल तर किती लोक कामधंदा करतील? त्यामुळे १००% टॅक्स असेल तरीही सरकारचे करसंकलन शून्य असेल. त्यामुळे सरकारचे करसंकलन सर्वात जास्त करणारा ऑप्टिमम पॉईंट मध्ये कुठेतरी असतो. आता माझा प्रश्न हा की लोकसंख्या अगदी कमी असेल तर जीवनमानाचा स्तर कमी असेल हे मान्य. पण वाढती लोकसंख्या हा प्रत्येकवेळी जीवनमानाचा स्तर वाढेलच का? की लाफर कर्व्हप्रमाणे मधे कुठचातरी ऑप्टिमम पॉईंट असेल? समजा लोकसंख्या त्यापेक्षा जास्त असेल तर लोकसंख्या कमी होणे हितकर असेल आणि लोकसंख्या त्यापेक्षा कमी असेल तर त्यापेक्षा लोकसंख्या वाढणे हितकर असेल अशी परिस्थिती असेल का?
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 02/08/2021 - 07:05 नवीन
सगळेजण याचा आधार घेतयात त्यासाठी https://en.m.wikipedia.org/wiki/Behavioral_sink
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 02/08/2021 - 07:08 नवीन
फक्त प्रॉब्लेम एकच आहे की उंदीर फक्त genetically ऍडव्हान्स होऊ शकतात, technogically नाही..
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Mon, 02/08/2021 - 07:20 नवीन
उंदरांवरच्या प्रयोगांवरून व.पुंचा स्टॅटिस्टिक्स मराठे आठवला.
  • Log in or register to post comments
स
साहना Mon, 02/08/2021 - 09:37 नवीन
+१ तुम्हाला ह्याचे मर्म समजले आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 02/08/2021 - 07:17 नवीन
हा बदलतो वातावरण, जमिनीची सुपिकता, भौगोलिक परिस्थिति, राजकीय इच्छाशक्ती, हे पण भाग महत्वाचे ठरतात
  • Log in or register to post comments
स
साहना Mon, 02/08/2021 - 09:33 नवीन
उत्कृष्ट प्रतिक्रिया आहे. आपला प्रश्न वाचून खूप आनंद झाला. ह्या प्रश्नाचे उत्तर सोपे नाही त्यामुळे एक संपूर्ण लेख लिहून सविस्तर उत्तर देईन. ग्राफ सुद्धा देईन. > पण वाढती लोकसंख्या हा प्रत्येकवेळी जीवनमानाचा स्तर वाढेलच का? बहुतेक वेळा हो. झांबिया पासून चीन पर्यंत आणि भारत पासून ब्राझील पर्यंत सर्वत्र हाच अनुभव संपूर्ण इतिहासांत आहे. ह्याला अनेक कारणे आहेत जी मी वेगळ्या लेखांत मांडेन. मॅट रिडली ह्यांचे ह्युमन प्रोग्रेस वेबसाईट पहा. > की लाफर कर्व्हप्रमाणे मधे कुठचातरी ऑप्टिमम पॉईंट असेल? क्ष अक्षावर लोकसंख्या आणि य अक्षावर राहणीमान ह्यांत लाफर कर्व्ह प्रमाणे संबंध नाही कारण लोकसंख्या आणि राहणीमान ही इंडिपेंडंट व्हेरिएबल्स नाही आहेत. ती दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहेत. उदाहरण म्हणजे सरकार वाट्टेल तो कर दर ठरवू शकते. पाहिजे तर अगदी १००% कर ठरविला जाऊ शकतो. पण लोकसंख्या आणि राहणीमान ह्यांचा तसा संबंध नाही. लोकसंख्या हि राहणीमानावर अवलंबून आहे आणि राहणीमान हे लोकसंख्यवर अवलंबून आहे. काही प्रमाणात दोन्ही सेल्फ रेगुलेटिंग आहेत यिंग आणि यांग प्रमाणे. मला काही सुपर पावर आहे आणि ठाणोस प्रमाणे चुटकी वाजवून उद्या सकाळी मी जगाची लोकसंख्या डबल केली किंवा अर्धी केली तर तर मात्र कदाचित तुम्हाला लाफ़र कर्व्ह प्रमाणे संबंध सापडेल. पण निव्वळ अकॅडेमिक दृष्टिकोन सोडून प्रत्यक्ष जीवनात त्याचा काहीही उपयोग नाही. > पण वाढती लोकसंख्या हा प्रत्येकवेळी जीवनमानाचा स्तर वाढेलच का? जो पर्यंत लोक स्वखुशीने लोकसंख्या वाढवत आहेत तो पर्यंत जीवनमानाचा स्तर वाढत राहील. ह्याची करणे वेगळ्या लेखन देईल. मी उल्लेख केलेल्या सायमन ह्यांच्या पैजेत सायमन ह्यांचा मुख्य मुद्दा तोच होता. > समजा लोकसंख्या त्यापेक्षा जास्त असेल तर लोकसंख्या कमी होणे हितकर असेल आणि लोकसंख्या त्यापेक्षा कमी असेल तर त्यापेक्षा लोकसंख्या वाढणे हितकर असेल अशी परिस्थिती असेल का? प्रत्यक्षांत "हित" हे नेहमी वैयक्तिक हित असते. लोकसंख्येची वाढ हितकर आहे कि नाही ह्या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक व्यक्ती मला मूल होणे मला स्वतःला हितकर आहे कि नाही हा निर्णय घेऊन ठरवते. काही कारणांनी मूल नको असेल तर आपसूक प्रजननदर खालावतो. बहुतेक वेळा मला स्वतःला स्वतःचे आयुष्य जगायचे आहे आणि मुलांच्या फंदांत पडायचे नाही असा विचार करून लोक मुलं टाळतात. ह्याचा अर्थ राहणीमान एका स्तराच्या वर गेले आहे असे समजावे आणि आपसूक लोकसंख्या वाढ कमी होते. लोक वैयक्तिक हित साधतात त्यातून मग समाजाचे हित आपसूक ठरवले जाते. मुक्त बाजारपेठीय अर्थशास्त्रांत तसेच ऍडम स्मिथ ह्यालाच इन्व्हिसिबल हॅन्ड असे संबोधित करतो. ह्याचे चपखल उदाहरण म्हणजे आपले स्टॉक मार्केट. कुठल्याही शेअर चा दर मार्केट ठरवते. लक्षावधी लोक कंपनीच्या विविध बातमीवर लक्ष ठेवून भूतकाळांतील त्याचा परफॉर्मन्स वगैरे पाहून दार सेकंदाला "ह्या शेअर चा भाव माझ्या मते अमूक आहे" असे सांगून तो विकत घेण्याचा किंवा विकण्याचा प्रयत्न करत असतात. इथे नक्की "हितकर" भाव कुठला आहे हे कुणालाही ठाऊक नसते पण त्याच वेळी मार्केट अत्यंत वेगाने बदलांना रीस्पॉन्ड करत असते. अमुक कंपनीचा शेअर X आहे तो बरोबर आहे का ह्या प्रश्नाला काहीही अर्थ नाही कारण मार्केट ने तो भाव ठरविला असल्याने तुम्हाला (किंवा आणखी कोना एक्स्पर्ट ला) काय वाटते हा प्रश्न नगण्य आहे. समाज साक्षांत सर्व व्यापून राहिलेला प्रभू नारायण पृथ्वीवर आला तर त्याला त्या कंपनीची इत्यंभूत माहिती असेल. अजून उघडकीस न आलेली स्कँडल्स ठाऊक असतील, बॅलेन्स शीट मधील भानगडी ठाऊक असतील, कुठल्या अफवा सत्य आणि कुठल्या अफवा खोट्या हे ठाऊक असेल त्यामुळे प्रभू नारायण कदाचित खरा भाव आम्हाला सांगू शकेल पण सरकार, एक्सपर्टस, इत्यादी मंडळी इथे पूर्णपणे निरुपयोगी आहेत. लोकसंख्या किती असावी ह्याचे सुद्धा तसेच आहे. मुले निर्माण करून (किंवा न करून) प्रत्येक व्यक्ती ह्याविषयावर आपले भाष्य करत असतो आणि ह्यांतून लोकसंख्या ठरते. अमुक एक आकडा हितकर आहे कि नाही ह्या प्रश्नाला इथे त्यामुळे काहीच अर्थ नाही.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Mon, 02/08/2021 - 10:03 नवीन
बहुतेक वेळा हो. झांबिया पासून चीन पर्यंत आणि भारत पासून ब्राझील पर्यंत सर्वत्र हाच अनुभव संपूर्ण इतिहासांत आहे.
यात एक उपप्रश्न म्हणजे गेल्या काही दशकात/शतकांमध्ये राहणीमान उंचावले आणि लोकसंख्या वाढली पण लोकसंख्या वाढल्यामुळे राहणीमान उंचावले असे म्हणता येईल का? म्हणजे अनेकदा दोन गोष्टी एकाच वेळेला होतात त्यावेळी एका गोष्टीमुळे दुसरी गोष्ट झाली असा अर्थ प्रत्येक वेळेस काढता येईलच असे नाही. गेल्या काही दशकांमध्ये/शतकांमध्ये तंत्रज्ञानात विशेषतः मेडिकलशी संबंधित तंत्रज्ञानात कमालीची प्रगती झाली त्यामुळे ज्या कारणांमुळे गावेच्या गावे, शहरेच्या शहरे एकेकाळी मारली जायची ती कारणे आता काळजी करायचा विषय राहिलेली नाहीत. त्यामुळे लोकसंख्या वाढली. आता असे म्हणता येईल की गरज ही शोधाची जननी असती त्यामुळे ही प्रगती झाली. उदाहरणार्थ कॉलरा/टायफॉईड/प्लेग इत्यादी साथींमुळे एकेकाळी हजारो-लाखो लोक मरायचे त्यामुळे त्यावर उपाय शोधायला म्हणून तंत्रज्ञानाची प्रगती झाली आणि कित्येक नवी औषधे शोधून काढली गेली असे म्हणता येईल. पण आता अशी गावेच्या गावे निर्मनुष्य करणार्‍या साथी राहिलेल्या नाहीत तरीही तंत्रज्ञानाची प्रगती चालूच आहे त्यातून आपल्या राहणीमानाचा स्तर उंचावत आहे आणि लोकसंख्याही वाढत आहे. तेव्हा माझा उपप्रश्न हा- तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे राहणीमान उंचावणे आणि लोकसंख्या वाढणे हे दोन्ही परिणाम होत असतील आणि म्हणून वरकरणी असे वाटत असेल की लोकसंख्या वाढल्यामुळे राहणीमान उंचावत आहे पण त्यामागचे कारण वेगळेच आहे असे असेल का?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 02/08/2021 - 10:12 नवीन
1. प्रदुषण वाढतेच 2. खनिज संपत्ती संपत येतेच. उदा. कोळसा खाणी कोलार येथील सोन्याची खाण
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Mon, 02/08/2021 - 10:16 नवीन
बाकी तंत्रज्ञानाच्या प्रगतीत दरवेळी जीव वाचवावेत हा हेतू असतोच असे नाही तर आपण नफा कमवावा हे हेतू अधिकवेळा असतो. त्यामुळे मी स्वतः अगदी पूर्ण फ्री मार्केटवाला आहे आणि बराचसा ऑस्ट्रीयन इकॉनॉमिक्सवाला आहे. मी प्रोफेसर डॉनल्ड बोडरॉक्स यांचा कॅफेहायेक हा ब्लॉग नेहमी वाचतो. त्यात मागे वाचले होते की १९२४ मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष केल्व्हिन कुलीज यांचा मुलगा व्हाईट हाऊसमध्ये टेनिस खेळत असताना गंजलेला पत्रा लागून त्यामुळे इन्फेक्शन झाले आणि ते वाढून त्यात गेला. आज भारतासारख्या देशातले गरीब लोकही त्या कारणाने मरण पावायचे नाहीत. पण १०० वर्षांपूर्वी त्या कारणामुळे अमेरिकेच्या अध्यक्षांचा तरूण मुलगा गेला. तसेच जॉन डी. रॉकफेलर त्यावेळचा जगातील सगळ्यात श्रीमंत माणूस होता. पण त्यालाही न्यू यॉर्कहून कॅलिफॉर्नियात एखादी महत्वाची गोष्ट पाठवायची असेल तर तीन-चार दिवस लागायचे. पण आज तंत्रज्ञानामुळे बर्‍याचशा गोष्टी इलेक्ट्रॉनिकली पाठवता येणे शक्य झाले आहे आणि एखादे कागदपत्र तातडीने पाठवायचे असले तरी ओव्हरनाईट कुरियरने ते पाठवता येऊ शकेल. रॉकफेलरला चांगली गाणी ऐकायची असतील तर मुद्दामून गायकांना घरी बोलावून वगैरे मेहफिल करावी लागायची. आज आपण ते माऊसच्या एका क्लिकवर घरबसल्या करू शकतो. तेव्हा आजचा सामान्यातला सामान्य माणूसही पूर्वीच्या श्रीमंतातील श्रीमंतांपेक्षा जमिनजुमला, वाडेगढ्या-बंगले वगैरे गोष्टी सोडल्या तर अधिक चांगले आयुष्य जगत असतो. पण ते आपल्याला समजत नाही.
पण सरकार, एक्सपर्टस, इत्यादी मंडळी इथे पूर्णपणे निरुपयोगी आहेत.
+१ लक्ष. एकेकाळी एक्सपर्ट वगैरे लोकांविषयी आदर वाटायचा पण कोरोना काळात त्यांनी केलेली सगळी भाकिते चुकली त्यानंतर तो बराचसा कमी झाला. भारतात ३० ते ५० कोटी कोरोनाच्या केसेस होणार, ३०-४० लाख लोक मरणार वगैरे नानाविध भाकिते त्यांनी केली होती. पण त्यापैकी कोणतेही भाकित (सुदैवाने) बरोबर ठरले नाही. इतकेच नव्हे तर या एक्सपर्ट मंडळींना आपले भाकित का चुकले आणि १८-१९ सप्टेंबरपासून कोरोना अचानक उतरणीला का लागला हे पण सांगता आले आहे असे दिसत नाही. म्हणजे स्वतः काहीतरी अचाट भाकिते करायची आणि ती चुकल्यास का चुकली हे पण सांगता येत नसेल तर यांना एक्सपर्ट नक्की कशाकरता आणि कोणत्या आधारावर म्हणायचे?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 02/08/2021 - 10:40 नवीन
जो सगळ्यात जास्त चुकतो, तो एक्सपर्ट. असे, आमचे बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात ... ..... 1. तंत्रज्ञान कितीही सुधारले तरी, एखाद्या धातूचे सोन्यात रुपांतर होत नाही.. 2. एका वर्षांत, एक इंच जाडीची, माती बनवू शकत नाही. 3. प्रदुषण कमी होणार नाही ..उलट कचरा वाढतो, प्लास्टिकच्या बॅगा वाढल्या.... कितीतरी घरांत अजूनही, जुने मोबाईल असतील किंवा हा घन कचरा, एखाद्या ठिकाणी, पडलेला असेल
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 02/08/2021 - 14:58 नवीन
तंत्रज्ञान सुधारले तर तितक्याच चौरस फुटात दसपट उत्पादन घेता येईल - व्हर्टिकल फार्मिंग.. कदाचित 100पट पण.. बाकी चालू द्या, चर्चा वाचायला मजा येत आहे. मी पण सरकारने कायदे करून लोकसंख्या नियंत्रण करू नये, किमान एक कुटुंब 1 मूल या लेव्हलला जाऊ नये, एक कुटुंब 2 मूल पर्यंत आहे हे ठीक आहे, ते देखील मला लोकसंख्या विस्फोटाची भीती आहे म्हणून नव्हे, तर लोकसंख्या असमतोलाची भीती आहे म्हणून. काय आहे, वर साहना यांनी म्हटल्याप्रमाणे, लोकसंख्या नेहमी ज्यांचे राहणीमान चांगले नसते त्यांचीच जास्त वाढते.. असा असमतोल वाढत गेला तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि आपल्या 188 मुख्यमंत्र्यांना काळं मांजर आडवं जेल, म्हणून कायदा आणावा असे माझे मत आहे.
  • Log in or register to post comments
स
साहना Mon, 02/08/2021 - 15:19 नवीन
> 1. तंत्रज्ञान कितीही सुधारले तरी, एखाद्या धातूचे सोन्यात रुपांतर होत नाही.. चुकीची माहिती आहे. ऊर्जेची किंमत कमी झाली तर प्रचंड प्रमाणात सोने निर्माण केले जाऊ शकते. सोनेच काय कुठलेहि खनिज निर्माण केले जाऊ शकते. समुद्राच्या पाण्यांत प्रचंड प्रमाणात सोने आहे. सध्या हे काढण्याचा खर्च लागणाऱ्या ऊर्जेमुळे प्रोहिबीटिव आहे पण ऊर्जा स्वस्त झाली तर सर्वच खनिजांचे दर आपोआप खाली पडतील. मी आधी लिहिल्या प्रमाणे खनिज संपत्ती कमी होईल हि भीती पूर्णतः निरर्थक आहे. जगांतील क्रूड ऑईल चे साठे वाढत गेले आहेत, कमी नाही झाले. > एका वर्षांत, एक इंच जाडीची, माती बनवू शकत नाही. अहो कशाला पाहिजे ? मातीची कमतरता आहे का कुठे ? नक्की म्हणायचे काय आहे ? गंगाधर उर्फ शक्तिमान सारखे युक्तिवाद कशाला ? > 3. प्रदुषण कमी होणार नाही ..उलट कचरा वाढतो, प्लास्टिकच्या बॅगा वाढल्या.... कितीतरी घरांत अजूनही, जुने मोबाईल असतील किंवा हा घन कचरा, एखाद्या ठिकाणी, पडलेला असेल पॉईंट काय आहे ?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 02/08/2021 - 15:56 नवीन
एका ठराविक कालावधी नंतर आणि अति वापरामुळे, हे साठे, कधी ना कधी संपणारच आहेत ... साठे आहे तिथेच आहेत, पण तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे, आता काही ठिकाणी, हे तेल काढणे आर्थिक दृष्टीने परवडत आहे... अजूनही काही ठिकाणी, तेलाचे साठे आहेत, पण त्यांचा काढण्याचा खर्च जास्त आहे. तेलाची किंमत वाढली की, हे पण साठे वापरात येतील ... सौदी अरेबिया, उगाच इतर क्षेत्रांत गुंतवणूक करत नाही आहे. अरामको, भारतीय व्यापारांच्या बरोबर उगाच संबंध वाढवत नाही आहे. नाणार रिफायरीला, उगाच विरोध झालेला नाही. तेलाचे खूप आर्थिक, सामाजिक, धार्मिक आणि हुकूमशाही पदर आहेत.एकाचा अभ्यास करायला घेतला तर दुसरा समोर येतो...तेल हळूहळू कमी होत आहे, ही वस्तुस्थिति आहे.. कोणे एके काळी, नैसर्गिक वायुंपासून तेल काढणे हा आतबट्याचा व्यवहार होता. तंत्रज्ञान होते पण परवडत न्हवते. तेलाची किंमत वाढल्यामुळे, आता ही प्रोसेस परवडत आहे .... 2. रासायनिक खते आणि कीटकनाशके, यांच्या वापरामुळे, अन्न उत्पादन वाढले पण, जमिनीचा कस कमी होत आहे ...एकदा नापिक व्हायला लागलेली जमीन, परत कसदार व्हायला वेळ लागतो... तुम्हाला ह्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागेल ...विदर्भ, मराठवाड़ा, कोंकण,खानदेश,पश्र्चिम महाराष्ट्र इथे फिरलात तर, तुम्हाला माहिती मिळेल... जमिनीचा कस कमी झाला आहे, ही वस्तुस्थिति आहे आणि जमिन एका वर्षांत कसदार होत नाही .... 3. लोकसंख्या वाढली की प्रदुषण वाढतेच, हे साधे गणित आहे..
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 02/08/2021 - 16:07 नवीन
हे अनुभवाचे बोल आहेत म्हणून 100% खरे आहेत. रासायनिक खते वापरून जमिनी चा कस निघून गेला की ती परत उपजावू करणे अत्यंत अवघड आहे खर्चिक आहे. नवीन शोध पर्याय देतील पण जी गोष्ट फुकट मध्ये उपलब्ध होती त्या साठी खूप मोठा खर्च येईल. जंगल जमिनी च्या पोटात गाडली गेल्यावर अनेक वर्षाच्या कालावधींतर खनिज तेल आणि नैसर्गिक वायू तयार झाले असे शास्त्र सांगते . ती खूप वर्षाची क्रिया प्रक्रिया आहे . तेच खनिज तेल संपले तर ते कारखान्यात लगेच निर्माण करता येणार नाही. चांगल्या प्रकार ची दारू हवी असेल तर 50 ते 100 वर्ष त्या दारू ची निर्मिती करण्यासाठी लागतात.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 19 hours ago
  • सुंदर !!
    1 day 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा