Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

इंग्लंडचा भारत दौरा

श
श्रीगुरुजी
Wed, 02/03/2021 - 18:01
🗣 152 प्रतिसाद
सध्या इंग्लंडचा संघ भारत दौर्‍यावर आला आहे. या दौर्‍यात ३ एकदिवसीय सामने, ५ ट-२० सामने आणि ४ कसोटी सामने खेळले जातील. सामन्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे (सर्व वेळा भारतीय प्रमाण वेळेनुसार) - कसोटी सामने पहिला सामना - शुक्रवार ५ फेब्रुवारी सकाळी ९:३० वाजता चेन्नई येथे दुसरा सामना - शनिवार १३ फेब्रुवारी सकाळी ९:३० वाजता चेन्नई येथे तिसरा सामना (दिवसरात्र सामना) - बुधवार २४ फेब्रुवारी दुपारी २:३० वाजता अहमदाबाद येथे चौथा सामना - गुरूवार ४ मार्च ९:३० वाजता अहमदाबाद येथे ट-२० सामने पहिला सामना - शुक्रवार १२ मार्च सायंकाळी ७:०० वाजता अहमदाबाद येथे दुसरा सामना - रविवार १४ मार्च सायंकाळी ७:०० वाजता अहमदाबाद येथे तिसरा सामना - मंगळवार १६ मार्च सायंकाळी ७:०० वाजता अहमदाबाद येथे चौथा सामना - गुरूवार १८ मार्च सायंकाळी ७:०० वाजता अहमदाबाद येथे पाचवा सामना - शनिवार २० मार्च सायंकाळी ७:०० वाजता अहमदाबाद येथे एकदिवसीय सामने पहिला सामना (दिवस-रात्र सामना) - मंगळवार २३ मार्च दुपारी १:३० वाजता पुणे येथे दुसरा सामना (दिवस-रात्र सामना) - शुक्रवार २६ मार्च दुपारी १:३० वाजता पुणे येथे तिसरा सामना (दिवस-रात्र सामना) - रविवार २३ मार्च दुपारी १:३० वाजता पुणे येथे भारताचा इंग्लंडमध्ये दोन वर्षांपूर्वी २०१८ मध्ये कसोटी मालिकेत १-४ फरकाने पराभव झाला होता. २०१२ मध्ये इंग्लंडने भारताचा भारतात २-१ असा पराभव केला होता. २०१२ च्या निकालाची पुनरावृत्ती होऊ नये हीच सदिच्छा आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 54731 views

🗣 चर्चा (152)
ग
गणेशा गुरुवार, 02/25/2021 - 11:44 नवीन
Root ५ wkts/८ runs / ६.२ overs Nice spell.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 02/25/2021 - 12:13 नवीन
भारत १४५/१०. इंग्लंड ५/२.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 02/25/2021 - 13:54 नवीन
मी आता क्रिकेट अजिबात बघत नाही पण इंग्लंड ११३ आणि भारत १४५ या धावसंख्येवरून पाकिस्तानच्या १९८७ च्या भारत दौर्‍यातील बंगलोर कसोटी सामना आठवला. हा सामना या जन्मी तरी विसरता येईल असे वाटत नाही. त्या सामन्याची पुनरावृत्ती व्हायला नको. पहिल्या दिवशी पाकिस्तानचा डाव अवघ्या ११६ धावांमध्ये आटोपला आणि भारताने २ बाद ६८ अशी मजल मारली तेव्हा सामन्यावर भारताची बर्‍यापैकी पकड असेल असे वाटले. दुसर्‍या दिवशी शनीवार होता आणि मी शाळेत गेलो होतो.शनीवार असल्यामुळे शाळा अर्धा दिवस होती. दुपारी अडिचच्या सुमारास परत आलो तेव्हा अपेक्षा होती की भारताने बरीच आघाडी मिळवली असेल.पण कुठचे काय.तौसिफ अहमद आणि इक्बाल कासिमची फिरकी चालली आणि भारताचा डाव १४५ धावांमध्ये गुंडाळला गेला आणि अवघी २९ धावांची आघाडी आपल्याला मिळाली.दुसर्‍या दिवसाच्या शेवटापर्यंत पाकिस्तानने ५ बाद दिडशेच्या आसपास धावा केल्या.तिसर्‍या दिवशी रवी शास्त्री आणि मणिंदरसिंगची फिरकी चालली आणि पाकिस्तानचा डाव २४९ धावांमध्ये संपला.भारतापुढे लक्ष्य होते २२१ धावांचे.तिसर्‍या दिवशी दिलीप वेंगसरकर, श्रीकांत हे खंदे मोहरे स्वस्तात गमावून भारताने मजल मारली ४ बाद ९९ पर्यंत. चौथ्या दिवशी भारताची भिस्त होती सुनील गावसकरवर. त्याने एका बाजूने किल्ला लढवून ९६ धावा केल्या.मला वाटते सुनील गावसकरची ही शेवटची कसोटी होती.सुनील बाद झाला तेव्हा भारताने ८ विकेट गमावल्या होत्या आणि धावसंख्या झाली होती १८०. म्हणजे विजय आणखी ४१ धावा दूर होता.अशावेळी रॉजर बिन्नीने शिवलाल यादव आणि मणिंदरसिंग यांना साथीला धरून किल्ला लढवायचा प्रयत्न केला. शिवलाल यादवने एक चौकार आणि रॉजर बिन्नीने एक षटकारही मारला.शिवलाल यादव बाद झाल्यावर शेवटचा फलंदाज होता मणिंदरसिंग. त्याकाळी मणिंदरसिंगने बॉलला बॅट जरी लावली तरी अख्खे स्टेडियममध्ये टाळ्यांचा कडकडाट होत असे.त्यामुळे त्याच्याकडून फार अपेक्षा नव्हत्या.तरीही त्याने एक बाजू लावून धरली.शेवटी एका चेंडूवर रॉजर बिन्नी झेलबाद झाला आणि भारताचा डाव २०५ धावांवर संपला. भारताने सामना १५ धावांनी गमावला होता. त्यावेळी मला खरं सांगायचं तर रडायला आले होते. त्यावेळी ११६ आणि १४५ धावा होत्या तर आता ११३ आणि १४५ आहेत. त्या सामन्याची पुनरावृत्ती व्हायला नको.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर गुरुवार, 02/25/2021 - 13:07 नवीन
रूट ने झक्कास बॉलिंग केली. आता अक्षर पटेल नाचवतोय त्यांना! २००१-०२ च्या भारताच्या न्युझीलंड दौर्‍यची आठवण झाली. तेव्हापण सकाळी उठून टीव्ही लावला की २-३-४ आऊट झालेले असायचे. थोड्या वेळाने कळायचं की हा तिसरा डाव आहे!
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा गुरुवार, 02/25/2021 - 13:14 नवीन
अगदी अगदी, ड्रॉप इन पिच हा शब्द तेव्हाच पहिल्यांदा ऐकला. ८०-१२० या रेंजच्या बाहेर शक्यतो कोणताच डाव जायचा नाही.
  • Log in or register to post comments
न
नीलस्वप्निल गुरुवार, 02/25/2021 - 13:17 नवीन
इंग्लंड ५५/४
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 02/25/2021 - 13:48 नवीन
आजच संपणार असं दिसतंय.
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी गुरुवार, 02/25/2021 - 14:18 नवीन
लय बेकार खेळपट्टी.
  • Log in or register to post comments
V
Vichar Manus गुरुवार, 02/25/2021 - 15:14 नवीन
कसोटीला खेळपट्टी फ्लॅट नको पण इतकी गोलंदाजीला मदत करणारी नको की जिथे रूट सारखा गोलंडक 5 बळी घेईल ते पण केवळ 8 धावत, अजिबात चांगली पिच नाहीये
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 02/25/2021 - 18:40 नवीन
+ १ अक्षर पटेल सुद्धा केवळ दुसऱ्या सामन्यात ११ फलंदाज बाद करण्याएवढा महान गोलंदाज वाटत नाही. हा सामना अजिबात आवडला नाही. क्रिकेटच्या इतिहासातील २४१२ कसोटी सामन्यात २ दिवसांच्या आत संपलेला हा २२ वा सामना. सामना ५ दिवस चालावा व त्यात सतत चढउतार असावे. आजच्या सामन्यापेक्षा सिडने येथील ५ दिवस चालून अनिर्णित राहिलेला आणि त्याच मैदानावर ५ व्या दिवशी धावांचा पाठलाग करून जिंकलेला सामना जास्त थरारक व आनंददायी होता. भविष्यात अशा खेळपट्ट्या नको.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 02/26/2021 - 11:27 नवीन
श्रीगुरुजी, सुनील गावसकरच्या मते खेळपट्टी ठीक होती. फलंदाज हाराकिरी करून बाद झाले. विराट कोहली सुद्धा खेळपट्टी व्यवस्थित होती असं म्हणाला. जो रूटनेही खेळपट्टीवर भाष्य केलेलं नाही. ३० पैकी २१ बळी सरळ चेंडूंवर पडले. याचा अर्थ खेळपट्टी उत्तम होती, असा लावू नये. दिनरात सामना असल्याने दिवसाच्या मानाने रात्री वातावरणात आमूलाग्र फरक पडंत असतो. फलंदाज नवीन गुलाबी चेंडू, खेळपट्टी व वातावरणाशी नीटपणे जुळवून घेऊ शकले नाहीत. असं मला वाटतं. मला क्रिकेटातलं फारसं कळंत नाही. मी फक्त पर्यायी दृष्टीकोन मांडतो आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 02/26/2021 - 11:31 नवीन
अशी गोष्ट आहे .... त्यामुळे, खेळपट्टी योग्यच होती...
  • Log in or register to post comments
V
Vichar Manus गुरुवार, 02/25/2021 - 15:14 नवीन
* गोलंदाज
  • Log in or register to post comments
न
नीलस्वप्निल गुरुवार, 02/25/2021 - 15:23 नवीन
भारत जिन्कला :)
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा गुरुवार, 02/25/2021 - 19:23 नवीन
हुर्रे, जिंकलो. पुढची कसोटीसुद्धा जिंकून जागतिक कसोटी मालिकेच्या अंतिम फेरीत भारताचा प्रवेश व्हायला पाहिजे. पिचबद्दल सहमत, 2 दिवस पण खेळ झाला नाही. दिग्गज समालोचक पिच रिपोर्ट सांगताना सपशेल गंडतात हे परत सिद्ध झाले.
  • Log in or register to post comments
V
Vichar Manus Fri, 02/26/2021 - 12:13 नवीन
केवळ आपण जिंकतो म्हणून अशा खेळपट्टीचे समर्थन करणे योग्य नाही
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा गुरुवार, 03/04/2021 - 10:43 नवीन
कोणी सामना बघतय का नाही? इग्लंड्ची नाणेफेक जिंकुन फलंदाजी आणि पहिल्या डावात १७०/७ सिराजने जो रुट्ची अवघड विकेट लवकर मिळवली.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/04/2021 - 10:48 नवीन
बघतोय. कंटाळवाणा खेळ चाललाय.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/04/2021 - 11:46 नवीन
सर्वबाद २०५. भारत ०/१.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 03/04/2021 - 11:55 नवीन
आपण ४००+ केले तर विजय नक्की. -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 03/04/2021 - 11:56 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Fri, 03/05/2021 - 11:00 नवीन
पंतचे अर्धशतक, भारत १९६/६ गिल, पुजारा, कोहली सपशेल अपयशी, रहाणे परत एकदा बरी सुरुवात करुन जम बसतोय असे वाटत असताना बाद. ३०-५० धावांची आघाडीसुद्धा महत्वपुर्ण ठरु शकते. खेळपट्टीपेक्षा फलंदाजांचा कमी झालेला संयम हेच फलंदाज पटापट बाद होण्याचे कारण वाटत आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 03/05/2021 - 11:09 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 03/05/2021 - 15:31 नवीन
सौंदाळा, माझ्या मते इंग्लंडचे गोलंदाज अँडरसन व स्टोक्स अप्रतिम आहेत. पण त्यांना इतरांकडून पुरेसा हातभार लाभंत नाहीये. त्यामुळे ते दमतात. अर्थात, हे पंतच्या पथ्यावर पडलं. वरच्या फलंदाजांनी बोथट केलेली धार तिसऱ्या सत्रात कामी आली. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 03/06/2021 - 09:00 नवीन
सुंदर चं शतक दुर्दैवाने हुकलं. ९६वर नाबाद राहिला. सिराज ला नक्कीच वाईट वाटलं असेल. असो. परत घसरगुंडी सुरू झालीय. ४८/४ . हे टाईप होईपर्यंत ५८/४ झालेत. नुकताच पोपने आश्विनला लाँगऑनला एक उत्तुंग षटकार ठोकला आहे.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 03/06/2021 - 09:19 नवीन
घसरगुंडी परत सुरू. ६६/६
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Sat, 03/06/2021 - 11:28 नवीन
एक डाव आणि २५ धावांनी भारताचा विजय. अक्षर, अश्विनचे ५-५ बळी भारताने मालिका ३ -१ ने जिंकली. आता जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठी भारत - न्यूझीलंड अंतिम सामना लोर्ड्सवर (कदाचित) जूनमध्ये होईल. त्याआधी आयपीएल सामने असतील आणि नंतर लगेच खेळाडूंचा फॉर्म आणि फिटनेस कसा असेल सांगता येणार नाही. आता एकदिवसीय सामने संपले की आयपीएलचे पडघम वाजायला सुरुवात होईलच.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 03/06/2021 - 11:54 नवीन
पहिला कसोटी सामना वगळता अगदीच एकतर्फी मालिका झाली. इंग्लंडची रोटेशन पॉलिसी सुद्धा इंग्लंडला भोवली. मालिकेत मजा आली नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 03/06/2021 - 14:47 नवीन
पहिल्या डावात ४ बळी व दुसऱ्या डावात ५ बळी. पहिल्या डावात ४३ धावा. ही अक्षर पटेलची अष्टपैलू कामगिरी सामनावीर पुरस्कारासाठी खूप कमी पडली. माझ्या दृष्टीने या सामन्यात हीच कामगिरी सर्वोत्तम आहे. २०११ च्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात ०/१ अशा अवस्थेत केवळ तिसऱ्या चेंडूवर खेळायला आलेल्या गंभीरने एक बाजू लावून धरून ९७ धावा केल्या. ०/१ वरून ३१/२ व नंतर ११४/३ अशी स्थिती होती. २२३ धावा असताना गंभीर बाद झाला तेव्हा सामना भारताच्या खिशात होता. सामन्यातील सर्वोत्तम खेळी गंभीरची होती. परंतु धोनीला सामनावीर पुरस्कार दिला. २००७ मधील ट-२० विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात गंभीरने ५४ चेंडूत ७५ धावा करूनही १६ धावात ३ बळी घेतलेल्या इरफान पठाणला सामनावीर पुरस्कार दिला होता. त्या सामन्यात रूद्र प्रताप सिंगने सुद्धा २६ धावात ३ बळी घेतले होते. भारतातर्फे दुसऱ्या क्रमांकाच्या धावा ३० होत्या (रोहीत शर्मा).
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 03/06/2021 - 15:43 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 03/16/2021 - 14:34 नवीन
पहिल्या कि दुसऱ्या टेस्ट नंतर आज वेळ मिळाला.. बघू पहिलीच t२० साठी team बनवली आहे.. https://photos.app.goo.gl/5ns3AuLnW2वोचरबजा काय होते बघू
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 03/16/2021 - 14:35 नवीन
https://photos.app.goo.gl/5ns3AuLnW2WoCRbJA लिंक, auto मराठी असल्याने काही word मराठीत convert झालेले आधी
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 03/16/2021 - 14:58 नवीन
बकवास झाली team.. :-) Loss
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 03/20/2021 - 18:39 नवीन
भारताने ट-२० मालिका ३-२ अशी जिंकली. ११ षटकांत १२०/१ अशा भक्कम स्थितीतून इंग्लंड ढेपाळले. आता २३ मार्च, २६ मार्च व २८ मार्चला पुण्यात एकदिवसीय सामने.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Mon, 03/22/2021 - 13:23 नवीन
कोहलीला चांगलाच सुर गवसला आहे. वन डे मधे पण भारताचे पारडेच जड असेल असं वाटतय
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 03/22/2021 - 16:41 नवीन
तर, इंग्लंडचा संघ, रणनीति आणि गुणवत्ता घेऊन खेळतो... त्यामुळे, टाॅस महत्वाचा आहे.... पहिल्यांदा बॅटिंग करून किमान 340च्या आसपास रन्स कराव्या लागतील.. इंग्लंडचे, बटलर, करन बंधू, बेयरस्टो, जेसन राॅय, बेन स्टोक्स आणि मोईन अली, 300-325 टार्गेट सहज पार करू शकतात... डे-नाईट मॅच असेल तर, नंतर बॅटिंग करणे, अवघड होईल...
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 03/22/2021 - 13:51 नवीन
एकदिवसीय सामन्यांसाठी इंग्लंडचा संघ - इऑन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जोनाथन बेअरस्टो, सॅम बिलिंग्ज, जोस बटलर, सॅम करन, टॉम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, मॅट पार्किन्सन, आदिल रशीद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रीस टॉपली, मार्क वूड आर्चर पाठदुखीमुळे घरी गेला. ख्रिस वोक्सला एकही सामना खेळविला नाही.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 03/22/2021 - 18:38 नवीन
रूट नाहीये काय? पुणे difficult pitch असणार पण. Score कमी होतील.. England have edge
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 03/23/2021 - 09:07 नवीन
https://photos.app.goo.gl/TJmgarrSLjc8wCUo9 आजची माझी dream ११ team. बघू, रोहित आणि kl न घेण्याचा किती फटका बसतोय ते पाहू..
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 03/23/2021 - 09:11 नवीन
किमान, 340 च्या आसपास तरी रन्स हव्यात...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 03/26/2021 - 17:15 नवीन
375 चे टार्गेट हवे ...
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 03/23/2021 - 09:27 नवीन
इंग्लंड धावांचा पाठलाग करणार. पावसाची शक्यता आहे. डकवर्थ-लुईस चा फायदा होऊ शकतो.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 03/23/2021 - 09:34 नवीन
इंग्लंड धावांचा, यशस्वी पाठलाग करणार.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 03/23/2021 - 13:39 नवीन
भारत ३१७/५ (५०)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 03/23/2021 - 13:45 नवीन
इंग्लंडची विकेट पडली नाही तर, आपण हरायचे चान्सेस जास्त आहेत...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 03/23/2021 - 14:33 नवीन
पॅक अप करायला घ्यावे लागणार
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 03/23/2021 - 17:13 नवीन
जबरदस्त मॅच फिरवली 135/0 Required Run Rate, 6 पेक्षा कमी आणि नंतरच्या 116 रन्स मध्ये 10 विकेट .... खूप दिवसांनी, चांगली मॅच झाली....
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 03/26/2021 - 16:07 नवीन
स्टोक्स आणि बेअरस्टो मनसोक्त धुलाई करताहेत.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 03/26/2021 - 17:00 नवीन
भारत अत्यंत वाईट हरला. इंग्लंडने गोलंदाजांंचा कचरा केला.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 03/26/2021 - 17:14 नवीन
आपण आधीची मॅच टर्न केली ह्या मॅचमध्ये जमले नाही
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 17 hours ago
  • सुंदर !!
    1 day 18 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा