Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

इंग्लंडचा भारत दौरा

श
श्रीगुरुजी
Wed, 02/03/2021 - 18:01
🗣 152 प्रतिसाद
सध्या इंग्लंडचा संघ भारत दौर्‍यावर आला आहे. या दौर्‍यात ३ एकदिवसीय सामने, ५ ट-२० सामने आणि ४ कसोटी सामने खेळले जातील. सामन्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे (सर्व वेळा भारतीय प्रमाण वेळेनुसार) - कसोटी सामने पहिला सामना - शुक्रवार ५ फेब्रुवारी सकाळी ९:३० वाजता चेन्नई येथे दुसरा सामना - शनिवार १३ फेब्रुवारी सकाळी ९:३० वाजता चेन्नई येथे तिसरा सामना (दिवसरात्र सामना) - बुधवार २४ फेब्रुवारी दुपारी २:३० वाजता अहमदाबाद येथे चौथा सामना - गुरूवार ४ मार्च ९:३० वाजता अहमदाबाद येथे ट-२० सामने पहिला सामना - शुक्रवार १२ मार्च सायंकाळी ७:०० वाजता अहमदाबाद येथे दुसरा सामना - रविवार १४ मार्च सायंकाळी ७:०० वाजता अहमदाबाद येथे तिसरा सामना - मंगळवार १६ मार्च सायंकाळी ७:०० वाजता अहमदाबाद येथे चौथा सामना - गुरूवार १८ मार्च सायंकाळी ७:०० वाजता अहमदाबाद येथे पाचवा सामना - शनिवार २० मार्च सायंकाळी ७:०० वाजता अहमदाबाद येथे एकदिवसीय सामने पहिला सामना (दिवस-रात्र सामना) - मंगळवार २३ मार्च दुपारी १:३० वाजता पुणे येथे दुसरा सामना (दिवस-रात्र सामना) - शुक्रवार २६ मार्च दुपारी १:३० वाजता पुणे येथे तिसरा सामना (दिवस-रात्र सामना) - रविवार २३ मार्च दुपारी १:३० वाजता पुणे येथे भारताचा इंग्लंडमध्ये दोन वर्षांपूर्वी २०१८ मध्ये कसोटी मालिकेत १-४ फरकाने पराभव झाला होता. २०१२ मध्ये इंग्लंडने भारताचा भारतात २-१ असा पराभव केला होता. २०१२ च्या निकालाची पुनरावृत्ती होऊ नये हीच सदिच्छा आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 54731 views

🗣 चर्चा (152)
म
मुक्त विहारि Wed, 02/03/2021 - 18:15 नवीन
इंग्लंडला हरवणे, कठीण जाणार ...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 02/03/2021 - 18:20 नवीन
पहिला प्रतिसाद दिला... जीवन मोहिते, यांनी इथे लेखन प्रकाशित करणे बंद केले आणि पहिल्या प्रतिसादाची चढाओढ संपली... निदान त्या पहिल्या प्रतिसादाची चढाओढ परत सुरू करण्यासाठी तरी, जीवन मोहिते, यांनी परत लेख लिहीणे सुरू करायला हवे ....
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 02/03/2021 - 18:47 नवीन
इंग्लंड संघ - जो रूट, मोईन अली, जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जॉस बटलर, झेक क्रॉली, बेन फोक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, डॉम सिबले, बेन स्टोक्स, ऑली स्टोन, ख्रिस वोक्स भारत संघ - कोहली, रहाणे, मयंक आगरवाल, अश्विन, बुमराह, कुलदीप, सिराज, हार्दिक पंड्या, पंत, अक्षर पटेल, पुजारा, राहुल, साहा, ईशांत शर्मा, रोहीत शर्मा, शुभमन गिल, ठाकूर, सुंदर ६००+ फलंदाज बाद करणारा जेम्स अँडरसन आणि ५००+ फलंदाज बाद करणारा स्टुअर्ट ब्रॉड भारतात कितपत यशस्वी ठरेल हे सांगणे अवघड आहे. जो रूट, जॉस बटलर, जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स व ख्रिस वोक्स नक्कीच यशस्वी ठरतील. उर्वरीत खेळाडूंपैकी बरेच जण प्रथमच भारतात खेळत आहेत. भारतातर्फे कुलदीप यादव नक्कीच संघात असेल. ईशांत शर्मा भारतात फारसा यशस्वी ठरत नसल्याने सिराज किंवा ठाकूर संघात असावा.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 02/04/2021 - 02:42 नवीन
वाचत आहे
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा गुरुवार, 02/04/2021 - 09:44 नवीन
काही वर्षांपूर्वी भारत दौऱ्यावर आलेला असताना अँडरसनने कोहलीला टोमणा मारला होता की कोहली फक्त भारतीय खेळपट्टीवर चांगला खेळतो. आणि आश्चर्यकारकरीत्या त्याला दुसऱ्या दिवशी प्रतिउत्तर कोणी दिले असेल, इंझमाम उल हक!!! इंझमाम म्हणाला अँडरसन दुसऱ्याला बोलतोय पण तो स्वतः तरी भारतीय उपखंडात कुठे बळी मिळवू शकलाय, त्याने कोहलीला शिकवू नये.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 02/04/2021 - 10:05 नवीन
३८ वर्षीय जेम्स अँडरसनने १५०+ कसोटी सामन्यात ६००+ फलंदाज बाद केले आहेत. परंतु भारतात खेळलेल्या १० कसोटीत तो फक्त २६ फलंदाज बाद करू शकलाय. ३४ वर्षीय स्टुअर्ट ब्रॉडने ५००+ फलंदाज बाद केलेत. परंतु भारतात ६ कसोटी सामन्यात त्याचे फक्त १० बळी आहेत.
  • Log in or register to post comments
ख
खेडूत गुरुवार, 02/04/2021 - 07:39 नवीन
मालिका नेहेमीप्रमाणे फॉलो करत आहे... कुठल्या वाहिनीवर पाहता येईल? दूरदर्शन दाखवणार का? नाहीतर जियो टीव्ही आहेच.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 02/04/2021 - 09:37 नवीन
Live telecast on Star Sports network and Hotstar.
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी गुरुवार, 02/04/2021 - 09:47 नवीन
भारत मालिका जिंकेल पण... काहीही होउ शकत (ft. Australia Tour). इंग्लंडला कमी लेखुन चालणार नाही.
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास गुरुवार, 02/04/2021 - 11:07 नवीन
आपले फलंदाज बऱ्यापैकी धावा करतील ... रोहित - शुभमन या सलामीच्या जोडीवर विशेष लक्ष असेल... आणि अर्थातच रिषभ पंत वर .... गोलंदाजीत जडेजाची उणीव जाणवेल ... जर अश्विनला कुलदीपची योग्य साथ मिळाली तर भारत जिंकेल....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 02/04/2021 - 12:53 नवीन
क्षेत्ररक्षण, हा आपला अतिशय कच्चा भाग आहे ..
  • Log in or register to post comments
ज
जॅक द रिपर गुरुवार, 02/04/2021 - 18:56 नवीन
India will beat England hands down. At least 3-0
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 02/05/2021 - 03:08 नवीन
असं झालं तर उत्तम
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Fri, 02/05/2021 - 04:40 नवीन
नाणेफेक जिंकून इंग्लडची प्रथम फलंदाजी नदीमला संधी. शार्दूल, सिराजपैकी कोणालाच संधी नाही. याचा त्यांच्या मनोधैर्यावर आणि खेळावर विपरीत परिणाम होऊ नये. संघ निवडीवर कोहलीची छाप वाटतेय.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Fri, 02/05/2021 - 04:58 नवीन
आणि एक कोरोनाच्या धास्तीमुळे ४ कसोटीसाठी २ मैदाने हे काही पटले नाही. एकदिवसीय आणि ट२० ठीक आहे पण कसोटी क्रिकेट मध्ये व्हेन्यू पण महत्वाची भूमिका बजावतो आणि मजा आणतो
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 02/05/2021 - 05:02 नवीन
इंग्लंड जर आपल्या स्पिन ला योग्य पद्धतीने सामोरे गेला तर ते जिंकू शकतात.. बघू काय होतेय ते
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 02/09/2021 - 06:45 नवीन
इंग्लंड जिकेल असेच वाटत होते, आणि ते खरे होताना दिसतेय
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 02/09/2021 - 06:47 नवीन
दुर्दैव आपलं.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 02/05/2021 - 09:26 नवीन
इंग्लंड १२७/२ गोलंदाजीत फारसा दम दिसत नाही. फलंदाजी सुद्धा कंटाळवाणी सुरू आहे. या वेगाने आज फार तर सव्वादोनशे धावा होतील.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 02/05/2021 - 09:39 नवीन
आपले क्षेत्ररक्षण कधी सुधारणार? हा प्रश्र्न तुम्हाला नाही ...
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 02/05/2021 - 12:41 नवीन
दिवसाखेर २६३/३ (८९.३) शेवटच्या षटकांत सिबले ८७ वर बाद झाल्याने खेळ थांबला. जो रूट १२७ धावांवर खेळतोय.
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास Fri, 02/05/2021 - 13:17 नवीन
आपण साडेतीन बॉलर्स घेऊन खेळतोय ... बुमरा, ईशांत आणि अश्विन हे तीन ..... सुंदर आणि नदीम मिळून अर्धा .... जडेजाची उणीव जाणवतेय ... कुलदीप आणि कोहली चे काय फाटलंय माहित नाही ... ही कसोटी अनिर्णित राखली तरी उत्तम
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 02/05/2021 - 13:34 नवीन
खरं तर तीनच. कुलदीप असताना नदीम चहाबाजला का घेतले? ईशांतला भारतात क्वचितच यश मिळते हा इतिहास माहिती असताना सिराज ऐवजी त्याला का घेतले?
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 02/05/2021 - 13:39 नवीन
नटराजन कुठे गेला?
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Fri, 02/05/2021 - 14:51 नवीन
ईशांतला भारतात क्वचितच यश मिळते पूर्णपणे सहमत, सकाळीच लिहिणार होतो पण म्हटलं कुठं सुरुवातीलाच नाट लावायचा. अनाकलनीय सिलेक्शन आहे. यावरुन आता कोहली आणि रहाणे मधे अंतर्गत धुसफुस सुरु होऊ नये म्हणजे मिळवली.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 02/05/2021 - 15:12 नवीन
चालायचेच... खेळ त्यांचा, पैसे त्यांचे, मग मनस्ताप आपण कशाला घ्या? खेळाचा आनंद लुटायचा ....
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास Fri, 02/05/2021 - 15:19 नवीन
मुवि ... जिंकलो तर जास्त आनंद होतो हो
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 02/05/2021 - 15:38 नवीन
पण 3 गोष्टी फार महत्वाच्या असतात ... 1. काही गोष्टी आपल्या हातात नसतात, जसे संघ निवडणे ... 2. काही गोष्टी आपल्या हातात असतात, वेळ मिळाला की मॅच बघणे 3. त्यामुळे, खेळाचा आनंद लुटायचा .... ह्या बाबतीत आमचे सासरे उत्तम म्हणायचे, त्यांच्या मते, पाकिस्तान आणि बांगलादेश, सोडला तर, जिंकणारा प्रत्येक संघ आपला ... त्यांनी आयुष्यभर, मनापासून क्रिकेटचा आनंद घेतला ...
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 02/05/2021 - 15:41 नवीन
ईशांतला परदेशात खेळलेल्या ६२ कसोटी सामन्यात १९९ बळी मिळालेत आणि भारतात खेळलेल्या ३५ कसोटी सामन्यात ९८ बळी मिळालेत.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 02/05/2021 - 19:32 नवीन
सौंदाळा, संघनिवडीवर कर्णधाराची छाप असतेच. बघूया कोहली काय करतो ते. अन्यथा राहणेस कर्णधार बनवणं इष्टं ठरावं. कोहली जबाबदारीतून मोकळा झाला की तो अधिक उपयुक्त ठरेल. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 02/05/2021 - 22:12 नवीन
Dream ११ भारी team झालीये माझी.. बघू.. https://photos.app.goo.gl/zeu9EkxERPNR4tRV8
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 02/06/2021 - 03:38 नवीन
भारी टीम आहे.
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Sat, 02/06/2021 - 06:12 नवीन
रुट बहुतेक परत २०० करणार. खेळपट्टी अगदिच निर्जिव वाटतेय.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 02/06/2021 - 06:20 नवीन
काही सांगता येत नाही ...
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 02/06/2021 - 09:25 नवीन
षटकार मारून जो रूटचे द्विशतक पूर्ण ४४०/४
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Sat, 02/06/2021 - 09:55 नवीन
३०० ही आरामात होउ शकतात.(करुन नायर प्रमाणे).
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Sat, 02/06/2021 - 10:57 नवीन
पहिल्या कसोटीत इंग्लंडची दमदार फलंदाजी आणि जो रुटचे शानदार द्विशतक. इंग्लंड आता ही कसोटी अजिबातच हरणार नाही. भारताच्या पहिल्या डावावर, कदाचित उद्या दिवस अखेरीस सामन्याचे चित्र स्पष्ट होईल.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 02/06/2021 - 12:34 नवीन
हातातली मॅच घालवतात ... एक कॅच सुटला की, एक कोटी रूपये दंड लावला पाहिजे ...हलकेच घ्या ... असे काही होणार नाही ...
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 02/06/2021 - 15:48 नवीन
इंग्लंड दिवसाखेर ५५५/८ (१८०.०). जो रूट बाद झाल्यानंतर इंग्लंड ४७६/६ (१५४.०) या भक्कम धावसंख्येवर होते. तेव्हाच डाव घोषित केला असता तर दमलेल्या भारताला २४ षटके फलंदाजी करावी लागली असती. परंतु डाव घोषित न करता पुढे २६ षटके खेळून अजून ७९ धावा वाढवून इंग्लंडने काय मिळविले राम जाणे.
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Sun, 02/07/2021 - 14:25 नवीन
भारत ३ र्या दिवसाच्या खेळानंतर बॅकफुट वर गेला आहे. इंग्लंडकडे ३२१ चा लीड आहे.भारत २५७/६. (टिव् टिव भारी पडली की काय)
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 02/07/2021 - 14:36 नवीन
तरीसुद्धा सामना अनिर्णित होणार.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Sun, 02/07/2021 - 16:25 नवीन
सांगता येत नाही. तब्बल दोन दिवस बाकी आहेत. बाकी स्पिन चांगली खेळणारी सेहवाग, गांगुली, लक्ष्मण, द्रविड यांची शेवटची पिढी. सध्याचे बहुतांश भारतीय फलंदाज स्पिन गोलंदाजी चाचपडत खेळतात यावर परत शिक्कामोर्तब झाले.
  • Log in or register to post comments
V
Vichar Manus Sun, 02/07/2021 - 17:08 नवीन
हो खरे आहे, रहाणे तर खुप प्रॉब्लेम येतो स्पिन खेळताना, विराट पण आजकाल फार काही आश्वासक वाटत नाही फिरकी समोर
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 02/07/2021 - 16:34 नवीन
ह्या पंतचे करायचे काय? मस्त खेळत असतांना, इतका बेभरवशी पणा अयोग्य आहे .... इन, नौ-दस रनों की किमत, तुम क्या जानोगे?
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 02/08/2021 - 11:46 नवीन
इंग्लंड ने दुसर्‍या डावात झटपट १७८ रन केल्या आणि भारता पुढे विजयासाठी ४२० धावांचे आवहान ठेवले आहे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 02/08/2021 - 12:35 नवीन
भारत दिवसाखेर ३९/१. ४२० धावांचे लक्ष्य आहे.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Mon, 02/08/2021 - 12:40 नवीन
तुमचा काय अंदाज? सर्व पर्याय शक्य वाटत आहेत.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 02/08/2021 - 12:43 नवीन
सामना बहुतेक अनिर्णित राहणार. कदाचित इंग्लंड जिंकेल. भारत जिंकण्याची शून्य शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
र
राघव Mon, 02/08/2021 - 21:48 नवीन
९० षटकांत ३८० धावा करायच्या आहेत. म्हणजे ४ हून थोडा अधिकचा रन रेट हवा. कसोटीत हे नेहमीच कठीण असते. त्यात खेळपट्टी चांगली हातभर बॉल वळवते आहे. शेवटची इनिंग इथे त्रासदायकच. पुन्हा ऑस्ट्रेलियातील मॅच ची आठवण आली. खात्री आहे की इंग्लंडला देखील तसे वाटले असावे.. म्हणूनच एवढा वेळ लावला डिक्लेअर करायला असावा. पहिल्या दोन सत्रात २५० च्या आसपास धावा गोळा झाल्यात [जास्त विकेट्स न गमावता] तर भारत जिंकण्यासाठी काही प्रयत्न करू शकेल. नाहीतर सामना वाचवण्याशिवाय गत्यंतर नाही.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Tue, 02/09/2021 - 03:24 नवीन
पाचव्या दिवशी शक्यतो अडीचशे सुद्धा अशक्यप्राय असतात. पण मागील काही वर्षात चौथ्या डावात ३००-३५०+ धावा करण्याचं प्रमाण वाढलंय. कदाचित नवीन पिढीच्या नव्या शैलीचा परिणाम असेल. भारताने काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियात हा पराक्रम केलाय. आज ड्रॉ ची शक्यता कमी वाटते. कदाचित २५० च्या आत सर्व बाद. नव्वद षटके खेळून काढली तर कदाचित जिंकतील सुद्धा! अन्यथा वाचवण्यासाठी आमला, ए बी डी, दुप्लेसिस यांनी २०१५ च्या दिल्ली कसोटीत जो प्रयत्न केला होता (६३८ चेंडूत ७८ धावा), तो पुजारा, रहाणे, पंत (!) यांना करावा लागेल. कोहली कडून अपेक्षा नाहीत. त्यापेक्षा जास्त मी आजकाल पंत कडून करतो.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 19 hours ago
  • सुंदर !!
    1 day 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा