इंग्लंडचा भारत दौरा
सध्या इंग्लंडचा संघ भारत दौर्यावर आला आहे. या दौर्यात ३ एकदिवसीय सामने, ५ ट-२० सामने आणि ४ कसोटी सामने खेळले जातील. सामन्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे (सर्व वेळा भारतीय प्रमाण वेळेनुसार) -
कसोटी सामने
पहिला सामना - शुक्रवार ५ फेब्रुवारी सकाळी ९:३० वाजता चेन्नई येथे
दुसरा सामना - शनिवार १३ फेब्रुवारी सकाळी ९:३० वाजता चेन्नई येथे
तिसरा सामना (दिवसरात्र सामना) - बुधवार
२४ फेब्रुवारी दुपारी २:३० वाजता अहमदाबाद येथे
चौथा सामना - गुरूवार ४ मार्च ९:३० वाजता अहमदाबाद येथे
ट-२० सामने
पहिला सामना - शुक्रवार १२ मार्च सायंकाळी ७:०० वाजता अहमदाबाद येथे
दुसरा सामना - रविवार १४ मार्च सायंकाळी ७:०० वाजता अहमदाबाद येथे
तिसरा सामना - मंगळवार १६ मार्च सायंकाळी ७:०० वाजता अहमदाबाद येथे
चौथा सामना - गुरूवार १८ मार्च सायंकाळी ७:०० वाजता अहमदाबाद येथे
पाचवा सामना - शनिवार २० मार्च सायंकाळी ७:०० वाजता अहमदाबाद येथे
एकदिवसीय सामने
पहिला सामना (दिवस-रात्र सामना) - मंगळवार २३ मार्च दुपारी १:३० वाजता पुणे येथे
दुसरा सामना (दिवस-रात्र सामना) - शुक्रवार २६ मार्च दुपारी १:३० वाजता पुणे येथे
तिसरा सामना (दिवस-रात्र सामना) - रविवार २३ मार्च दुपारी १:३० वाजता पुणे येथे
भारताचा इंग्लंडमध्ये दोन वर्षांपूर्वी २०१८ मध्ये कसोटी मालिकेत १-४ फरकाने पराभव झाला होता. २०१२ मध्ये इंग्लंडने भारताचा भारतात २-१ असा पराभव केला होता. २०१२ च्या निकालाची पुनरावृत्ती होऊ नये हीच सदिच्छा आहे.
🗣 चर्चा
(152)
म
मुक्त विहारि
Tue, 02/09/2021 - 04:54
नवीन
सकाळच्या सत्रात विकेट जायला नको .....
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 02/09/2021 - 05:44
नवीन
पुजारा गेला. भारताच्या पराभवाची शक्यता वाटायला लागलीये. ८५/२. दोन्ही फलंदाजांना लीचने बाद केले. जॅक लीच मधुसूदन पानसरे किंवा ओकीफसारखा भारताला नडणार अशी शंका मनात येतेय.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 02/09/2021 - 05:59
नवीन
कठीण आहे
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 02/09/2021 - 06:42
नवीन
१२०/६. पराभवाची फक्त औपचारिकता शिल्लक आहे. सिडने कसोटीसारखी फलंदाजी करणे आवश्यक आहे.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 02/09/2021 - 06:50
नवीन
Vs India
- Log in or register to post comments
र
राघव
Tue, 02/09/2021 - 08:07
नवीन
खरंय. त्या अँडरसनला कोण चावलंय माहीत नाही. अचानक कसली धारदार बॉलिंग करायला लागलाय.
कोहली आणि अश्विन म्हणजे शेवटची जोडी.
त्यानंतर कुणी वीस बॉल्स सुद्धा खेळणार नाहीत अशी परिस्थिती आहे. :-(
इंग्लंडने या कसोटीत संपूर्ण वर्चस्व गाजवलंय आपल्यावर. होमपीचवर जे आपण करायला हवं ते इंग्लंड करतांना दिसतंय.
पुढच्या वेळेस तरी टीम आणिक चांगली निवडतील अशी आशा.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 02/09/2021 - 08:50
नवीन
दोघेही गेले. १७९/९.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 02/09/2021 - 08:56
नवीन
टाॅस जिंकला पाहिजे....
टाॅस जिंकला तो मॅच जिंकला, असे झाले असावे ....
- Log in or register to post comments
ग
गोंधळी
Tue, 02/09/2021 - 09:23
नवीन
भारत आज भारतासारखाच खेळला.खेळाडु येतात जातात पण संघाचा मुळ स्वभाव कही बदलत नाही.
माझ्या मते दोष खेळपट्टी व sg चेंडु यांचा आहे.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 02/09/2021 - 12:36
नवीन
पाचव्या दिवशी, फलंदाजी करणे कठीण होते ...
आपण जर पहिल्यांदा फलंदाजी केली असती तर, आपण जिंकलो असतो...
तरीही, पाचव्या दिवशी, पहिल्या सत्रात, Andersonने कमाल केली ...
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 02/09/2021 - 18:38
नवीन
दुसरा कसोटी सामना याच मैदानात आहे.
२०१५ मधील श्रीलंका दौऱ्यात भारत पहिला कसोटी सामना हरला पण पुढील दोन सामने जिंकून मालिका २-१ अशी जिंकली.
२०१७ मधील ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यात भारत पहिला कसोटी सामना हरला पण पुढील तीनपैकी दोन सामने जिंकून मालिका २-१ अशी जिंकली.
२०२०-२१ मधील भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारत पहिला कसोटी सामना हरला पण पुढील तीनपैकी दोन सामने जिंकून मालिका २-१ अशी जिंकली.
आता तसेच व्हावे.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 02/10/2021 - 04:56
नवीन
पण,
भारतात टाॅस हा अतिशय महत्वाचा ठरतो ...
ह्या कसोटी सामन्यात जर, भारताने पहिल्यांदा फलंदाजी केली असती तर, भारतच जिंकला असता...
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Tue, 02/09/2021 - 20:06
नवीन
मला क्रिकेटातलं काहीही कळंत नाही. तरीपण कोहलीच्या नेतृत्वावर मला शंका यायला लागलीये. कोहली सामन्यात नसतांना आणि असतांना ज्या प्रकारे खेळाडू खेळतात त्यावरून ही शंका उद्भवली आहे. कदाचित कर्णधारपदावरून त्याला मोकळीक मिळाल्यास त्याचा खेळ बहरू शकेल.
-गा.पै.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 02/10/2021 - 04:57
नवीन
कोहली थोडासा हुकूमशाही पद्धतीने वागतो...
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
Wed, 02/10/2021 - 05:25
नवीन
सहमत
फलंदाज म्हणून कोहली श्रेष्ठ आहेच. पण
शास्त्रीने कोहलीला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळेच कोहलीची एकाधिकारशाही आहे असे वाटते. कुंबळे औटघटकेचा कोच असताना सरावासाठी खेळाडू वेळेवर आला नाही तर त्याला फैलावर घेत असे हे खेळाडूंना पसंत नव्हते, या विधानावरून कोहलीची मानसिकता लक्षात येते.
हा संघ गोलंदाजीत खूपच असमतोल होता.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 02/12/2021 - 18:29
नवीन
उद्यापासून याच मैदानात दुसरा कसोटी सामना सुरू होतोय. पण खेळपट्टी शेजारची म्हणजे वेगळी असणार आहे.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sat, 02/13/2021 - 03:50
नवीन
पहिल्या दिवसाच्या खेळाचा परिणाम मॅच वर होण्याची शक्यता आहे ...
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
Sat, 02/13/2021 - 04:50
नवीन
नाणेफेक जिंकून भारताची प्रथम फलंदाजी. इशांत अजूनही संघात आहे आणि बुमराह जाऊन सिराज आला आहे. नदीम जाऊन कुलदीप यादव आला आहे आणि सुंदरच्या जागी अक्षर पटेल. इशांतचे असणे आणि बुमराह चे जाणे सोडून संघ ठीक वाटत आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठी हा सामना दोन्ही संघांसाठी खूपच महत्वाचा आहे.
- Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे
Sat, 02/13/2021 - 04:50
नवीन
कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि सिराज ला आज टीम मध्ये स्थान. बुमराह ला आराम देऊन सिराज ला संधी.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 02/13/2021 - 06:54
नवीन
भारत ९०/३
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
Sun, 02/14/2021 - 06:42
नवीन
भारताची तिखट फिरकी गोलंदाजी, इंग्लंड २३/३
कसोटीत रूटचा बळी घेऊन अक्षर पटेलने खाते उघडले.
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Sun, 02/14/2021 - 07:37
नवीन
जेवणाच्या सुट्टी पर्यंत इंग्लंड ३९/४!
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 02/14/2021 - 08:55
नवीन
८७/६
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Sun, 02/14/2021 - 08:58
नवीन
फिरकी चालणार होती आणि त्यात टॉस जिंकला तेथेच भारताचा विजय निश्चित झालाय
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 02/14/2021 - 09:57
नवीन
चहापानापर्यंत १०६/८
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 02/14/2021 - 11:12
नवीन
इंग्लंड सर्वबाद १३४. भारताला १९५ धावांची आघाडी. भारत दुसऱ्या डावात ३५/०.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sun, 02/14/2021 - 12:08
नवीन
रोहित शर्मा १२.२ वर पायचीत होता म्हणे. पंचांनी रडीचा डाव खेळला वाटतं!
-गा.पै.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sun, 02/14/2021 - 12:20
नवीन
मानवी चुका ...
मुद्दाम केलेले नाही..
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Sun, 02/14/2021 - 12:58
नवीन
रिव्यु घेतला नाही का इंग्लंडने.?
क्रिकेट पाहणे कधीच सोडुन दिले आहे.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sun, 02/14/2021 - 15:22
नवीन
तिसर्या पंचाने, नीट चेक केले नाही ....
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Sun, 02/14/2021 - 15:40
नवीन
या चेंडू मध्ये प्रॉब्लेम काय होता ते कळले नाही.
commentary करताना सुनील गावस्कर सुद्धा वारंवार 'no shot offered" असं म्हणत होते आणि त्यामुळं रुट नाराज होता.
रोहित ने शॉट खेळला की नाही याने काय फरक पडतो? ट्रॅकिंग नुसार तो आऊट नव्हताच ना?
ट्रॅकर ने दाखवलं: १. टप्पा ऑफ स्टंप च्या बाहेर होता. - आऊट
२. बॉल पॅड ला लागला, ते ऑफ स्टंप बाहेर - आऊट नाही (इम्पॅक्ट स्टंप च्या रेषेत व्हावा लागतो)
इथेच क्लिअर झालं की आऊट नाही, त्यामुळे पुढील ट्रॅकिंग लगेच नाही दाखवलं आणि तिसऱ्या पंचाने (रिव्यू चा) निर्णय दिला.
थोड्या वेळाने पुढील ट्रॅकिंग दाखवलं.
३. बॉल स्टंपवर आदळला असता - आऊट
रुट ची नाराजी कशासाठी होती?
शॉट खेळलाच नाही, म्हणून नॉट आउट दिलं असतं तर रिव्ह्यू वाया गेला नसता म्हणून?
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Sun, 02/14/2021 - 15:50
नवीन
The ball must hit in line : The ball must hit the batsman in the region directly between the two wickets. An important exception is that, if the impact is outside the off stump, the batsman can be out LBW if he does not make a genuine attempt to play the ball (that is, if he does not "play a stroke"). If the impact is between wicket and wicket, the playing of a stroke is irrelevant.
जर इम्पॅक्ट ऑफ स्टंप च्या बाहेर झाला तर, आणि फलंदाज खेळण्याचा प्रयत्न करत नसेल तर, तो LBW आउट असतो.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sun, 02/14/2021 - 15:54
नवीन
तुषार काळभोर,
बाद होण्यासाठी ३ लालबत्ती लागतात हे स्पष्ट करून सांगितल्याबद्दल आभार. दुसरी बत्ती हिरवी असल्याने तिसरी बत्ती बघायची गरज नाही, हे पटलं.
cricinfo.com वर काही जणांनी निषेध नोंदवला होता. म्हणून मला शंका आली.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
U
Ujjwal
Tue, 02/16/2021 - 07:33
नवीन
England 116/7 till lunch break. 366 more to win. Looks like only formality is left. Kudos to Ashwin for his century.
- Log in or register to post comments
न
नीलस्वप्निल
Tue, 02/16/2021 - 09:00
नवीन
भारत जिन्कला
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 02/16/2021 - 18:17
नवीन
अपेक्षेप्रमाणे भारत जिंकला. आता तिसरा सामना बहुतेक अनिर्णित होईल व चौथा भारत जिंकेल.
- Log in or register to post comments
V
Vichar Manus
Tue, 02/16/2021 - 18:56
नवीन
तिसरा सामना दिवस रात्र आणि पिंक बॉल नी आहे ज्यात गोलंदाजांना मदत मिळते त्यामुळे अनिर्णित राहण्याची शक्यता नाही
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
Wed, 02/24/2021 - 06:23
नवीन
जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत जाण्यासाठी दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाची कसोटी.
दिवसरात्र असल्यामुळे अजूनच उत्सुकता ताणली गेली आहे. स्पेशली तिसऱ्या सत्रात काय होईल? दव पडून फलंदाजांना मदत मिळेल का? वगैरे
धावपट्टीवर भरपूर गवत होते त्याचे काय झाले ते पण माहीत नाही. संघनिवड काय असेल?
कसोटीवर पूर्णपणे लक्ष ठेऊन बसणार आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 02/24/2021 - 10:41
नवीन
England won the toss and chose to bat.
India: 1 Rohit Sharma, 2 Shubman Gill, 3 Cheteshwar Pujara, 4 Virat Kohli (capt), 5 Ajinkya Rahane, 6 Rishabh Pant (wk), 7 R Ashwin, 8 Washington Sundar, 9 Axar Patel, 10 Jasprit Bumrah, 11 Ishant Sharma
England: 1 Dom Sibley, 2 Jonny Bairstow, 3 Zak Crawley, 4 Joe Root (capt), 5 Ben Stokes, 6 Ollie Pope, 7 Ben Foakes (wk), 8 Jofra Archer, 9 Jack Leach, 10 James Anderson, 11 Stuart Broad
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 02/24/2021 - 10:41
नवीन
इंग्लंड २७/२
- Log in or register to post comments
प
पाटीलभाऊ
Wed, 02/24/2021 - 12:11
नवीन
चहापानापर्यन्त ८१/४
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
Wed, 02/24/2021 - 12:18
नवीन
निर्विवादपणे भारताचे सत्र. सामना प्रत्यक्ष बघितला नाही पण अधूनमधून ऑनलाइन स्कोर चेक करत होतो. अश्विनने रुटचा बळी लवकर घेतला. अशीच गोलंदाजी चालू राहिली तर यजमानांचा पहिला डाव आजच आटपेल. बघू आता दुसऱ्या सत्रात काय होतंय. ऑफिसचे काम संपवून तिसऱ्या सत्राचा प्रत्येक चेंडू बघणार आहे.
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Wed, 02/24/2021 - 12:38
नवीन
अरे यार आज match आहे लक्षातच नव्हते
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Wed, 02/24/2021 - 15:38
नवीन
८१/४ वरून ११२/१०. इंग्लंडचं शेपूट चटकन गुंडाळलं हे फार आवडलं.
-गा.पै.
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Wed, 02/24/2021 - 15:46
नवीन
Once in a Blue Moon कामगिरी!
बऱ्याचदा वरचे सहा १५० करतात आणि खालचे चार शे सव्वाशे करून जातात.
- Log in or register to post comments
न
नीलस्वप्निल
Wed, 02/24/2021 - 17:37
नवीन
विराट चुकुन त्रिफलाचित झाला अस वाटले
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Wed, 02/24/2021 - 18:04
नवीन
आपण ९९/३ वरनं ३०० मारणार काय? मारले तर विजय नक्की.
-गा.पै.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 02/25/2021 - 10:43
नवीन
११७/६
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 02/25/2021 - 11:01
नवीन
१२५/८
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 02/25/2021 - 11:01
नवीन
१२५/८
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »