Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

भाजप शिवाय, इतर पक्षांकडे, राष्ट्रीय पातळीवर नेते आहेत का?

म
मुक्त विहारि
Wed, 01/27/2021 - 11:45
🗣 184 प्रतिसाद
आजच्या घडीला तरी, राष्ट्रीय पातळीवर, भाजपला पर्याय नाही, हे माझे वैयक्तिक मत आहे. राष्ट्रीय पातळीवर, भाजपमध्ये घराणेशाही नाही. हा एक महत्वाचा भाग आहे. आज, भाजपची चौथी फळी पण तयार होत आहे. त्यामुळे, मोदींच्या नंतर कोण? हा प्रश्र्न, भाजपच्या पुढे नाही. अमित शहा, योगी, तेजस्वी सुर्या, इथपर्यंत पंतप्रधान पदासाठी, भाजपचे उमेदवार तयार आहेत. लोकसभेतील, ह्या वरील व्यक्तींची भाषणे ऐकलीत तर, प्रचिती नक्कीच येईल. माझ्या मते, इतर पक्षांकडे इतके सक्षम उमेदवार नाहीत. तुमच्या मते, पुढील निवडणूकीत, इतर पक्षांकडे पंतप्रधान पदासाठी, मोदींच्या इतका सक्षम नेता आहे का?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 61345 views

🗣 चर्चा (184)
ग
गणेशा Fri, 01/29/2021 - 03:38 नवीन
हे तुम्ही का ठरवता आहात? वयक्तिक रित्या त्यांना माहिती असेल तिथली.. मला up ची जास्त माहिती नाही.. त्यामुळे हे मुद्द्यावर मी बोलत नाही.. पण मागे हैद्राबाद मधील rape आणि police कारवाही वरती तुमची मते वाचली होती..पुन्हा आठवू शकता आपण.. बहुतेक यशोधरा यांचा धागा असेल... मग up मधील हाथरस बद्दल आणि सरकार, पोलिस यांच्याबद्दल काय म्हणणे आहे? कि ते पण योग्य व्यवस्थेचे उदाहरण वाटते आहे.. पोलिस आणि सरकार च्या या वागणुकी नक्कीच काळिमा फसणाऱ्या होत्या.. हेच तेथे काँग्रेस सरकार असते तर भाजपाई लोकांनी देशात रान उठवले असते, माझे म्हणणे आहे जे चूक ते चूक.. बाकि up च काय काश्मिर पासून कन्याकुमारी पर्यंत भारतातले प्रत्येक राज्य चांगले व्हावे... जो सुधर रहा है वो accha है.. पण अर्णब च्या मेसेज मध्ये काय वावगे होते असे म्हणताना आणि त्याला पाठीमागे घालताना ही त्याला राजकीय किनार असल्याने दुर्लक्ष केले जातेय.. म्हणजे आपण आपले विचार मोदी यांच्या साठी किती एकांगी केलेत ते दिसते परंतु आपण दुसर्यांना एकांगी म्हणता.. त्यामुळे पर्याय कोणता नाही या पेक्षा हाच पर्याय चुकीचा मिळाला आहे ह्या गोष्टीला तुम्हाला मीडियाचा प्रभाव फलाना असे बोलावे लागते आहे..
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 01/29/2021 - 04:51 नवीन
एका साध्या प्रश्र्नाचे उत्तर देऊ शकाल का? इतर पक्षांकडे, पंतप्रधान पदासाठी, योग्य उमेदवार कोणता?
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 01/29/2021 - 06:48 नवीन
तुम्हाला एक clear सांगतो पुन्हा, उद्या कोण योग्य होईल हि भविषवाणी करण्यात काहीच उपयोग नाही. जसे २०१४ ला, मोदी येणार म्हणजे विकास होणारच असे वाटत होते, पण तो भ्रमनिरास ठरला.. त्यामुळे सद्य परिस्थिती मध्ये मोदी हे आधीच्या दोन्ही पंतप्रधान नेत्यांपेक्ष्या निकृष्ट आहेत... त्यामुळे तुम्ही हाच पर्याय चुकलाय तर पुढचे काय विचारता.. हे bjp आणि त्यांच्या समर्थकांचा प्रोपोगंडा आहे, पर्याय नाही म्हणुन आम्ही कसे हि असु आम्हीच श्रेष्ठ.. या पेक्षा आम्ही विकास करतोय आम्हालाच पुन्हा निवडून द्या हे योग्य.. पर्याय नाही पर्याय नाही.. हा प्रोपोगंडा या साठी कि आम्ही काय करतोय ते विचारू नका.. आणि मोदी यांच्या लेवल ला कोणताच नेता मला सध्या दिसत नाही, इतकी खालची लेवल पंतप्रधान पदाची मी पाहिलेली नाही.. तरी मी सोडून कोणीच नाही हा अहम फडणवीस सारखा त्यांना नडू नये, आणि पुढचे पंतप्रधान तेच झाले तरी मला काहीच फरक पडणार नाही... परंतु ते योग्य नाहीत हे माझे मत आहे.. जसे वरती, योगी आणि इतर नावे बोलली गेली, मी त्यांच्यावर प्रतिक्रिया दिल्या नाहीत, कारण ते योग्य कि अयोग्य हे ते पंतप्रधान झाल्यावर सांगणे योग्य, कोणाचे विश्लेषण ते पंतप्रधान झाल्यावर करणे ठीक आहे, आणि मोदींचे विश्लेषण माझे फिक्स आहे, तुमचे मत तसेच असावे असा आग्रह नाहीच... पण इतरांची मते म्हणजे मीडियाचा अवडंबर हे चूक आहे... तुमची मते तुमच्या पाशी.. तुम्हाला प्रश्नच विचारायचा असेल तर तो असा आताचे पंतप्रधान तुम्हाला योग्य वाटतात काय? आणि याचे उत्तर माझ्याकडून नाही आहे, जे २०१४ नंतर तंतोतंत विरुद्ध आहे.. मग आत्ताचा पंत प्रधान मला योग्य वाटत नाही म्हणल्यावर त्यांच्या पेक्षा भारी कोण असे विचारल्यावर भविष्य का म्हणू सांगायचे? इतक्या खालच्या लेवल ला तर मला कोणी हि पंत प्रधान झाले तरी ते योग्य पर्याय असतील असे वाटते.. हे मी पहिल्या पासून सांगतोय.. तरी तुम्हाला ते कळत नाही..तुम्हाला असे वाटते आहे कि कोणीच नाही.. माझे म्हणणे आहे कोणी हि...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 01/29/2021 - 07:06 नवीन
असेच ना?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 01/29/2021 - 07:26 नवीन
मुवि कशाला वाद घालताय? लग्न संस्था वाईट आहे हे बेंबीच्या देठा पासून ओरडणारे लोक त्याला सशक्त पर्याय आज तरी नाही हे निदान नाईलाजाने कबुल करतात. पण मोदी द्वेषाची कावीळ झालेले लोक तसे मान्य करण्याचा किमान प्रामाणिक पणा सुद्धा दाखवू शकत नाहीत. लग्नसंस्थेत नक्कीच अनेक त्रुटी आहेत परंतु त्याचे पर्याय अजूनतरी समाजासाठी भंपक, भयंकर किंवा अव्यवहार्य आहेत. बाकी सुज्ञ लोक समजून घेतीलच
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 01/29/2021 - 07:56 नवीन
प्रमाणिक पणा दुसऱ्याला का शिकवता आहात? तुम्ही तुमच्या मुद्द्यावर प्रामाणिक असाल, मी माझ्या मुद्द्यावर प्रामाणिक आहे.. पण दुसरे म्हणजे मोदी द्वेषाचे काविळ झालेले आणि तुम्ही काय मोदी नावाची नागीन पाठीवर घेऊन मिरवणारे आहात काय? कृपया आपण फक्त प्रामाणिक इतर म्हणजे अप्रामाणिक हे बंद करा.. बाकी विषयांतर करण्यात तुमचा हात कोणी धरणार नाही.. लग्न संस्था बद्दल येथे बोलण्यात अर्थ नाही..
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 01/29/2021 - 09:40 नवीन
श्री मोदींच्या जागी आजमितीला तुमच्या कडे सशक्त पर्याय आहे का? तसे सांगा मग चर्चा करू
  • Log in or register to post comments
स
साहना Fri, 01/29/2021 - 08:37 नवीन
> माझे म्हणणे आहे जे चूक ते चूक माझा इथे काहीही आक्षेप नाही. योगी हे धुतल्या तांदळा प्रमाणे स्वस्च्छ आहेत, आधुनिक हरिश्चंद्र आहेत आणि उत्तर प्रदेश हे पृथ्वीवरील स्वर्ग आहे असे माझे म्हणजे नव्हते पण त्यांची वागणूक आणि काम करण्याची पद्धती आणि भ्रष्टाचार विरोध अखिलेश, पप्पू आणि मायावती ह्यांच्या पैकी कैक पटीने चांगला आहे. मागील ३ वर्षे प्रदेशांत नवीन उद्योग यावेत ह्यासाठी प्रचंड मेहनत ते करत आहेत. अखिलेश हे ह्या उलट होते. आयटम सोंग करणे, अभिनेत्रींसोबत फोटो, कुणाला फुकटची खातरी सायकल देणे आणि सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत घाणेरडी वाटणारी टोपी घालून फिरणे इतकेच काय ते काम ते करत होते.
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 01/29/2021 - 10:18 नवीन
नाही नाही, असे कसे? ते एक एक्स्प्रेस वे बांधण्याचा प्रयत्न करत होते. त्यासाठी त्यांनी [मिडियावर] कित्ती मेहनत घेतलेली माहित नाही?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 01/28/2021 - 17:39 नवीन
तुम्ही तुमच्या काही पोस्ट वर असे सांगितले आहे की तुम्ही bjp samarthak नाही आणि तुमची मत मांडली होती . काँग्रेसी साम्य वादा विषयी. आणि दुसऱ्याच कोणत्या लेखिके ची मत पण त्यांच्या लेख प्रस्तुत करून मांडली होती . आणि दावा केला होता ती लेखिका bjp samarthak नाही. पण लोक खूप हुशार आहेत सर्व काही ओळखतात . भूल थापणा बळी पडत नाहीत. उत्तर प्रदेश सारख्या बेशिस्त,कायद्या चे कुठेच अस्तित्व नसलेल्या,देशातील अत्यंत गरीब राज्य असलेल्या ,100 रुपये रोज कमावणे पण त्या राज्यात शक्य नसल्या मुळे देशभर वणवण करणाऱ्या लोकांचे राज्य असलेल्या . उत्तर प्रदेश ला उत्तम राज्य सिद्ध करण्याचा तुमचा प्रयत्न म्हणजे तुम्ही bjp ची कट्टर पाठीराखे आहात. योगी आल्या मुळे उत्तर प्रदेश ची परिस्थिती बिलकुल बदलेली नाही हे सत्य आहे. तीच बेशिस्त,जंगल राज ,बेरोजगारी. 100 रुपये रोज कमाविण्या साठी दुसऱ्या राज्यात जावे लागणे हे आज पण चालू आहे मोदी आणि bjp ची पाठराखण करण्यासाठी ovesi सारखीच वृत्ती असणाऱ्या व्यक्ती ला तुम्ही महात्मा करण्याचा प्रयत्न करत आहात. पण लोक विश्वास ठेवणार नाहीत त्या वर
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 01/28/2021 - 17:40 नवीन
असे वाचावे .
  • Log in or register to post comments
स
साहना गुरुवार, 01/28/2021 - 20:12 नवीन
> आणि दुसऱ्याच कोणत्या लेखिके ची मत पण त्यांच्या लेख प्रस्तुत करून मांडली होती . खिसलेली है क्या ? - लंबू आटा (गुंडा चित्रपट)
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 01/28/2021 - 12:55 नवीन
जंगल राज आहे यूपी मध्ये. रायडर चे vlogs बघितले तरी माहिती पडेल यूपी मध्ये प्रवेश केला की . काय ते रस्ते, काय ती बेशिस्त. जनावर रस्त्यावर फिरत असतात. हे योगी/ मोदी सत्तेत आल्यापासून सुरु झाले नाही का? त्याआधी उत्तर प्रदेश म्हणजे काय वर्णन करावे ...आह्हह्ह नतमस्तक या तर्कापुढे ( कि तर्कटपणापुढे!) राजेशभाऊ
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 01/28/2021 - 13:15 नवीन
गाडी पलटी आणि गुंड ठार
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 01/28/2021 - 12:56 नवीन
जंगल राज आहे यूपी मध्ये. रायडर चे vlogs बघितले तरी माहिती पडेल यूपी मध्ये प्रवेश केला की . काय ते रस्ते, काय ती बेशिस्त. जनावर रस्त्यावर फिरत असतात. हे योगी/ मोदी सत्तेत आल्यापासून सुरु झाले नाही का? त्याआधी उत्तर प्रदेश म्हणजे काय वर्णन करावे ...आह्हह्ह नतमस्तक या तर्कापुढे ( कि तर्कटपणापुढे!) राजेशभाऊ
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 01/28/2021 - 15:43 नवीन
गंगा नदी आता इतकी स्वच्छ झाली आहे की तिच्या नितळ पाण्यामुळे नदीचा तळ स्पष्ट दिसत आहे. गंगेत सोडले जाणारे शहरांचे सांडपाणी बहुतेक direct बंगाल च्या उपसागरात सोडण्याची उपाय योजना योगी नी केलेली दिसतेय. राज्यातील कायदा सुव्यवस्था खूपच सुधारली पण पोलिस कारवाई ची टिप गुंडांना मिळून पोलिस च गुंडाच्या सापळ्यात सापडून मृत्यू मुखी पडले हे घडले तेव्हा योगी राज्यात नसतील कारण ते असते तर अशी घटना घडलीच नसती. घरोघरी असलेला बंदुका बनवायचा कुटीर उद्योग योगी नी बंद केला असावा आता उत्तम प्रदेशात कोणाकडेच परवाना नसलेली better नाहीत. लग्नात जो गोळीबार करतात तो परवाना धारी हत्यार मधूनच. हत्यारांची परवाना ची खिरापत बंद केल्या मुळे बाकी राज्यात असलेल्या बंदुका धारी सुरक्षा रक्षक उत्तम प्रदेशातून मिळणे कठीण झाले आहे. राष्ट्रीय grid मधून उत्तम प्रदेश आता वीज चोरत नाही आणि काय काय वर्णावे तिथे रामराज्य च आले आहे.
  • Log in or register to post comments
स
सुक्या गुरुवार, 01/28/2021 - 23:14 नवीन
१८८ साहेब .. तुमच्या प्रतीसादांना कुणी आता सीरियसली घेत नाही. तेव्हा आपले टंकनश्रम वाचवता आले तर बघा.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 01/29/2021 - 03:25 नवीन
तितकाच टाईमपास होतो... सामना चित्रपट बघीतला आहे का?
  • Log in or register to post comments
स
सुक्या Fri, 01/29/2021 - 04:05 नवीन
:)
  • Log in or register to post comments
स
साहना गुरुवार, 01/28/2021 - 20:15 नवीन
> घरोघरी असलेला बंदुका बनवायचा कुटीर उद्योग योगी नी बंद केला असावा आता उत्तम प्रदेशात कोणाकडेच परवाना नसलेली better नाहीत. लग्नात जो गोळीबार करतात तो परवाना धारी हत्यार मधूनच. नागरिकांना बंदूक ठेवण्याचा अधिकार असावा अश्या मताची मी आहे. योगींच्या नेतृत्वांत प्रदेश मधील नागरिक बंदूक बाळगून आहेत ह्याचा आनंदच आहे. हा नैसर्गिक अधिकार असून माझ्या मते इथे परवाने वगैरेची आवश्यकता नाही. साम्यवादाची हिंसा तसेच इस्लामिक हिंसा रोखण्यासाठी हिंदू समाजाचे सशस्त्रीकरण झाले तर चांगलेच आहे. अश्या ठिकाणी हे दोन्ही रोग पसरत नाहीत असा अनुभव आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 01/29/2021 - 03:24 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 01/29/2021 - 05:06 नवीन
सर्वात जास्त उत्तर प्रदेश मध्येच मुघलांनी पाडली आहेत. त्यांनी काहीच विरोध केला नाही. राम मंदिर पाडून मशीद बांधली तेव्हा पण विरोध झाला नाही. आणि आता बाबरी मशीद पाडली त्या मध्ये उत्तर प्रदेशी नव्हते बाहेरच्या राज्यातील लोकांनाच ते काम करावे लागले. ते कसले विरोध करणार. घरोघरी बंदुका निर्माण होतात म्हणजे कायदा आणि सू व्यवस्था ह्याचे 12 वाजले आहेत.असा त्याचा अर्थ आहे. BJP samarthak आणि पुरोगामी मंडळी एकाच पातळीवर वर आहेत. जसे पुरोगामी बिनडोक लॉजिक मांडतात तसेच भक्त सुद्धा त्याच प्रकारचे लॉजिक मांडत आहेत. आणि तेच टाळ्या वाजवत आहेत. बाकी लोक ह्यांच्या पोस्ट सरळ न वाचता delete करतात. वाचायचे पण कष्ट कोणी घेत नाही. अशीच वृत्ती राहिली तर लोक पूर्ण दुर्लक्ष करतील ह्यांच्या कडे. कंगना आणि अर्णव ची आता कशी अवस्था झाली आहे. मूर्ख समजतात लोक त्यांना.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 01/29/2021 - 05:10 नवीन
मुळ प्रश्र्न असा आहे की .... इतर पक्षांकडे, पंतप्रधान पदासाठी योग्य, असा उमेदवार आहे का?
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 01/29/2021 - 05:34 नवीन
योग्य उमेद्वार म्हणजे कसा? सभा/निवडणुका जिंकणारा?अर्थशास्त्राचे चांगले ज्ञान असणारा?सगळ्याना एकत्र का काय म्हणतात तसे घेउन जाणारा?गरीबी कशी दूर करायची/ आरोग्य/शिक्षण व्यवस्था कशी सुधारायची ह्यावर उत्तरे असलेला? राजकीय पदावरील फक्त एक व्यक्ती देश बदलू शकते..समस्या चुटकीसरशी दूर करू शकते..ह्या भ्रमातून आपण बाहेर यायला हवे.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Fri, 01/29/2021 - 05:56 नवीन
राजकीय पदावरील फक्त एक व्यक्ती देश बदलू शकते..समस्या चुटकीसरशी दूर करू शकते..ह्या भ्रमातून आपण बाहेर यायला हवे. -- सहमत !
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 01/29/2021 - 05:49 नवीन
तेच देश चालवण्या साठी सक्षम नाहीत.देशाचे खूप मोठे नुकसान झाले आहे त्यांच्या काळात. अनेक राज्य नाराज झाली आहेत देशाची एकता च धोक्यात आली आहे. यूपी आणि उत्तरेची दोन तीन राज्य म्हणजेच भारत देश असा ह्यांचा गोड गैर समज झालेला आहे. समाजातील विविध घटकात द्वेष निर्माण करण्याचे काम चालू आहे. महागाई वाढत आहे पेट्रोल दर 90 रुपये पेक्षा जास्त झाले आहेत,गॅस 700 रुपये झाला आहे. सर्वच क्षेत्रात महागाई झालेली आहे. रेल्वे चे खासगीकरण करण्याचे धोरण राबवले जात कशी काही मार्ग उद्योगपती ना आंदण सुद्धा देवून झाले आहेत. मीडिया वर दबाव टाकून त्यांना हव्या त्याच बातम्या दिल्या जात आहेत. देशाची अर्थ व्यवस्था बिघडली आहे. चांगल्या चालणाऱ्या सरकारी कंपन्या तोट्यात आणून त्या विकल्या जात आहेत. देशाचा विकास पूर्ण थांबलेला आहे. अशा पंतप्रधान ना कसला जोड शोधत आहात.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 01/29/2021 - 06:02 नवीन
समाजातील विविध घटकात द्वेष निर्माण करण्याचे काम चालू आहे. महागाई वाढत आहे पेट्रोल दर 90 रुपये पेक्षा जास्त झाले आहेत,गॅस 700 रुपये झाला आहे. सर्वच क्षेत्रात महागाई झालेली आहे. उद्योगांचे खासगीकरण करण्याचे धोरण राबवले जात कशी काही मार्ग उद्योगपती ना आंदण सुद्धा देवून झाले आहेत. मीडिया वर दबाव टाकून त्यांना हव्या त्याच बातम्या दिल्या जात आहेत. देशाची अर्थ व्यवस्था बिघडली आहे. चांगल्या चालणाऱ्या सरकारी कंपन्या तोट्यात आणून त्या विकल्या जात आहेत. देशाचा विकास पूर्ण थांबलेला आहे. हायला तंतोतंत हेच शब्द वाममार्गी लोकांनी १९९१ च्या सुधारणांबद्दल पुढच्या काही दिवसात काढले होते. त्याचा परीणाम पुढच्या काही वर्षात दिसून आलाच. वाममार्गी आणि पुरोगामी लिब्रान्दू लोक टाहो फोडत आहेत याचा अर्थच सरकार व्यवस्थित मार्गावर चालत आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 01/29/2021 - 06:34 नवीन
सहमत आहे ....
  • Log in or register to post comments
स
साहना Fri, 01/29/2021 - 08:08 नवीन
मार्क्स, माओ, स्टालिन इत्यादींनी गुळणी करून फेकलेले पाणी ह्या भारतीय नतद्रष्टया लिब्रान्दू मंडळींनी तीर्थ म्हणून आणले आणि आपल्या समस्त कॉम्रेड मंडळीत वाटले. आता तेच तीर्थ हे पुन्हा पुन्हा रिसायकल केले जातेय. जग पुढे पोचले तरी ह्यांची झेप मात्र रेल्वे विकली आणि BSNL विकली इथेच आहे. आणखीन २० वर्षांनी सुद्धा हेच तीर्थ वाटत बसणार आहेत हि मंडळी.
  • Log in or register to post comments
स
साहना Fri, 01/29/2021 - 08:03 नवीन
> बाकी लोक ह्यांच्या पोस्ट सरळ न वाचता delete करतात. > वाचायचे पण कष्ट कोणी घेत नाही. > अशीच वृत्ती राहिली तर लोक पूर्ण दुर्लक्ष करतील ह्यांच्या कडे. अहो न वाचता डिलीट केले तर त्यालाच दुर्लक्ष म्हणायचे ना ? पूर्ण दुर्लक्षांत आणखीन वेगळे काय अपेक्षित आहे ? > कंगना आणि अर्णव ची आता कशी अवस्था झाली आहे. मूर्ख समजतात लोक त्यांना. कंगना करोडपती आहे आणि महाराष्ट्र सरकार तिची माफी मागून नुकसान भरपाई देत आहे. अर्णब चा चॅनेल सर्वाधिक लोकप्रिय असून त्याने एकट्याने हाजदीप, रॉय जोडी इत्यादींचे बँड पूर्ण पणे वाजवून ठेवले आहे. आपले उठणे बसणे कुठल्या लोकांत आहे हे ठाऊक नाही पण अर्णब तरी किमान आपल्या क्षेत्रांत आणखीन अनेक वर्षे गाजवणार आहे हे सर्वानाच ठाऊक आहे. --- मी भाजप समर्थक नाही आणि भाजपला मत सुद्धा दिले नाही. त्याच वेळी भाजप मध्ये मूर्खांचा बाजार आहे म्हणून तुमच्या सारखे विचारजंत बरोबर आहेत असे होत नाही. तुमची हि क्षुद्र वळवळ आणि वैचारिक बद्धकोष्ठता मोदी किंवा भाजपच्या कर्तृत्वावर अवलंबून नाही. मोदींनी काहीही केले तरी तुमची हि वळवळ चालूच असेल त्यामुळे तुम्हाला मी फक्त एक बी ग्रेड मनोरंजन म्हणून पाहाते. माणूस म्हणून समाजांत जगायचे असेल तर एक काही किमान बौद्धिक पातळी, काही तरी किमान तर्कक्षमता आणि थोडा तरी स्वतःहून विचार करण्याची क्षमता त्या प्राण्यात असावी लागते अशी माझी समज होती. पण कदाचित घनघोर मोदी द्वेष हा एक असा रोग आहे ज्यांतून ह्या गोष्टी गायब होतात आणि तुम्हाला पाहून तसेच वाटते. तुमचं प्रतिक्रियांना मी इथे उत्तर देते ह्याचा अर्थ प्रतिक्रिया समजण्याची तुमची लायकी आहे असे समजू नका. आपले जे वैचारिक कुंठन आहे ते माझ्या मते प्रतीकात्मक आहे. तुमचं सारख्या लोकांची संख्या ह्या देशांत एके काळी खूप होती आणि काँग्रेस पक्षाने तळवे चाटण्याची वृत्ती ओळखून अश्या लोकांना मोठ्या पदावर स्थानापन्न केले होते. त्यामुळे ह्या लोकांनी सर्वत्र गोंधळ घालून माझ्या देशाचे गोव्यांत म्हणतात तसे "बारा बिरेस्तार" केले. आता ह्या विचारजंतांचे दिवस भरले आहेत आणि ह्यांनी तोंड उघडताच युवा पिढी ह्यांची बिनदिक्कत टर उडवते. एके काळी धडकी भरवणारे डाकू लोक आता फक्त सब टीव्ही वरील बी ग्रेड कॉमेडी सीरिअल्स मधेय विनोदी पत्रे म्हणून वापरली जातात त्याच प्रमाणे राजेश साहेब आपल्या विचारवृत्तीचे विचारजंत आता विनोदास पात्र झाले आहेत आणि त्यांना पूर्णपणे नेस्तनाबूत करण्यासाठी दिसेल तिथे ह्या विचारजंतांची जाहीर खिल्ली उडवणे मी माझे कर्तव्य समजते. मिपा वरील माझ्या शेती विषयक पोस्ट वर APMC कायद्याचे निर्लज्जपणे समर्थन करणारी एकमेव व्यक्ती फक्त आपणच आहात. शितावरून भाताची परीक्षा न्यायाने शेतकरी आंदोलन करते आणि त्यांचे समर्थक ह्यांची बौद्धिक कुवत (रादर लॅक ऑफ) आपल्या प्रमाणेच असावी असे वाटते.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 01/29/2021 - 09:06 नवीन
त्यामुळे, फक्त हाच विषय धरून, ह्या प्रतिसादावरील, शेती ह्या विषयावर लिहितो.... खाजगी सावकार आणि दलाल, हे सारखेच असतात. मनुष्य आर्थिक मदतीसाठी, खाजगी सावकाराकडे जातो आणि फसतो, तसेच, स्वतःचे मार्केट, तयार करू न शकणारा, दलालांच्या कडे जातो. शेतकरी आत्महत्या करतो, त्याला जी काही कारणे असतात, त्यापैकी, सावकाराचे कर्ज, हे एक प्रमुख कारण आणि दलालांनी केलेली आर्थिक फसवणूक, हे इतर कारणांपैकी एक कारण ... केंद्रीय सरकार, हळूहळू का होईना पण, शेतकरी वर्गाला आर्थिक स्वातंत्र्य कसे मिळेल, ह्याचीच पावले उचलत आहे. 130 कोटी जनतेपैकी, किमान, 70 कोटी जनता, शेती करते किंवा शेती आधारित इतर कामे करते. Make In India, अंतर्गत, शेती हा पुर्णवेळ व्यवसाय आहे, असे समजून काही सवलती दिल्या आहेत. बांबू आपण चीन मधून आयात करत होतो. आता बांबू लागवडीला 100% सबसिडी आहे. एका मुलीमागे, 10-12, चंदन रोपे लावायला परवानगी दिली आहे आणि 10-15 वर्षांनी ही झाडे, सरकार बाजारभावाने विकत घेणार. ह्या दोन्ही पिकांमुळे, चीनचे थोडेफार का होईना, पण आर्थिक नुकसान होणारच आहे. थेंबे थेंबे तळे साचे, ह्या म्हणी प्रमाणे, एक एक करत, चीन मधून होणारी आयात, हे सरकार बंद करत आहे. पण, उद्या दलालांमार्फत ह्या वस्तूंवरील आर्थिक नियंत्रण, चीनने किंवा भारतातील एकाद्या धन दांडग्या माणसाने, बाजारपेठ ताब्यात घेऊ नये, हा पहिला उद्देश आहे... दुसरा उद्देश असा आहे की, खरेदीदार जर भरपूर असतील तर, शेतमालाला योग्य तो भाव, शेतकरी वर्गाला मिळेल. ... आता ह्याचा फायदा, शेतकरी वर्गाला होत आहे. विविध ठिकाणी, शेतकरी वर्गाचे गृप्स तयार होत आहेत आणि वाहतुक खर्च कमी कसा होईल, ह्या उद्देशाने आणि एकमेकांना बाजारपेठ देऊन, ही नविन पिढी, परत उभी रहात आहे. ....... दुर्दैवाने, काही लोकांना, मुळात शेतकरी वर्गाला नक्की काय हवे आहे? हे न विचारता, वाचून मते बनवायची आवड असते. वाचलेली, ऐकलेली, पाहिलेली प्रत्येक गोष्ट सत्य नसते...हे समजून घेण्याची, मानसिक तयारी पण नसते. ......... माझ्या ओळखीतला एकही शेतकरी, ह्या कायद्यांना विरोध करत नाही आहे...
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 01/29/2021 - 10:24 नवीन
बांबू साठी एक बेवकूफासारखा कायदा होता, ज्यानं बांबूची शेती करण्यावर अडचण होती. असला कायदा बदलायला इतकी वर्षे भारतात लागतात ह्यातच प्रगतीची आस किती आणि उगाचचे ढोलताशे बडवण्याची ईच्छा किती ते दिसून येतं.
  • Log in or register to post comments
स
साहना Fri, 01/29/2021 - 11:04 नवीन
+१ कुणाला ठाऊक नसेल म्हणून इथे लिहिते. बांबू हे शास्त्रीय दृष्ट्या गवत आहे. गवत कापून विकायला सरकारी खेचरा कडून परमिशन लागत नाही. बांबू ह्याला भारतीय बाबूंनी झाड ह्या कक्षेंत टाकले त्यामुळे बांबू कापायचा किंवा विकत वगैरे घ्यायचा तर नेहमीपरामें लाँच वगैरे देऊन लायसन घ्यावे लागते. अर्थांत गावांत कुणी त्या भानगडीत पडत नसले तरी मोठ्या प्रमाणावर बांबूची शेती आणि खरेदी विक्री करायला कुठलीही कंपनी गेली नाही. शेवटी ब्रम्हदेवाने साक्षांत स्वप्नात येऊन कुणाला तरी दृष्टांत दिला असेल म्हणून हि पॉलिसी बदलण्यात आली. एका पेनाच्या फाटकाऱ्यांत एक जुनाट सरकारी बंधन गेले आणि बांबू मुले अनेक नवीन उद्योग धंदे निर्माण झाले. गोव्यांत मध्यन्तरी पार्सेकर नावाचे एक मुख्यमंत्री होते. साक्षांत भाजप कार्यकर्तेच ह्यांची खिल्ली उडवायचे. पार्सेकर ह्यांनी चाणाक्ष पणे नारळ झाड हे झाड नाही असे घोषित केले. सर्वत्र लोक हसायचे. एका अश्याच गोवेकर शेतकऱ्याला मी थोडे फैलावर घेतले होते. आपल्याच घरातील आपल्याच आजोबाने पेरलेला आणि वडिलांनी पाणी घातलेला माड कापण्यासाठी २० किलोमीटर दूर तालुक्याच्या ठिकाणी हात जोडून याचक वृत्तीने कुठल्यातरी सरकारी खेचरा कडे परमिशन मागायला शरम वाटत नाही का ? माड आता झाड नसल्याने त्याची लागवड तसेच माड मारणे फार सोपे झाले आहे. अर्थांत हे समजावून सांगल्यानतंर त्याला पार्सेकरांची बुद्धी पटली.
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 01/29/2021 - 19:05 नवीन
आता हे काम देखील मोदी सरकारनंच केलंय असं म्हटलं की खूप जळजळ वाढते. पण जे आहे ते आहे. लिंक यातही विरोधी पक्षांनी वॉकआऊट केलेलं होतं. =))
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 01/29/2021 - 09:23 नवीन
१)कंगना करोडपती आहे. मुंबई मध्ये साध्या नगरसेवक पासून , बार मध्ये नाचणाऱ्या नर्तकी,भंगार वाले सुद्धा करोड पती अब्जपती आहेत. 2) अर्णव त्याच्या क्षेत्रात प्रगती करत आहे. Trp च घोटाळा करून चॅनेल ची प्रेक्षक संख्या वाढवून. पंतप्रधान कार्यालयातून अत्यंत संवेदनशील माहिती मिळवून त्या माहिती च वापर करून . 3) गोवा गोवा मुक्ती झाली ती नेहरू च्या काळात ज्यांना तुम्ही शिव्या देता त्यांनी च गोवा स्वतंत्र केला आहे नाहीतर आता पर्यंत चर्च मध्ये जावून येशू समोर उभे राहावे लागले असते. देशाचा स्वतंत्र लढा असू नाही तर आधुनिक भारताची उभारणी ह्या मध्ये ना bjp च सहभाग होता त्यांच्या पितृ संस्थेचा. आता फक्त आयत्या पिठावर रेगोट्या मारायचे ते काम करत आहेत. शेती कायद्याचे दुष्परिणाम दिसू लागतील तेव्हा हे BJP samarthak तोंड लपवून फिरतील.घोडे मैदान जवळ च आहे
  • Log in or register to post comments
P
pspotdar Fri, 01/29/2021 - 09:26 नवीन
महाराष्ट्र सरकार तिची माफी मागून नुकसान भरपाई देत आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 01/29/2021 - 09:46 नवीन
गोवा मुक्ती झाली ती नेहरू च्या काळात ज्यांना तुम्ही शिव्या देता त्यांनी च गोवा स्वतंत्र केला आहे नाहीतर आता पर्यंत चर्च मध्ये जावून येशू समोर उभे राहावे लागले असते. देशाचा स्वतंत्र लढा असू नाही तर आधुनिक भारताची उभारणी ह्या मध्ये ना bjp च सहभाग होता त्यांच्या पितृ संस्थेचा. गोवा स्वतंत्र व्हावा अशी नेहरूंची अजिबात इच्छा नव्हती (कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर आफली आक्रमक अशी प्रतिमा निर्माण होऊन शांतीदूत या प्रतिमेला धक्का लागेल अशी त्यांना भीति होती) व गोवा स्वतंत्र करण्याचे त्यांच्यात धाडसही नव्हते. नागरिकांच्या लढ्यामुळे व दबावामुळे शेवटी १९६१ मध्ये पोलिस कारवाई करावी लागली. तीच गोष्ट दादरा, नगर, हवेली या भागांची. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १२५ कार्यकर्त्यांनी (यात सुधीर फडके व बाबासाहेब पुरंदरे सुद्धा होते) १९५४ मध्ये या भागावर सशस्त्र हल्ला करून हे भाग स्वतंत्र केले होते.
  • Log in or register to post comments
स
साहना Fri, 01/29/2021 - 10:01 नवीन
> मुंबई मध्ये साध्या नगरसेवक पासून , बार मध्ये नाचणाऱ्या नर्तकी,भंगार वाले सुद्धा करोड पती अब्जपती आहेत. आणि त्याबद्दल सुद्धा मला त्यांच्याबद्दल आदर आहे. काही तरी उपयोगी काम करून पैसे मिळवले म्हणजे झाले. काँग्रेसी थुंकी चाटून नाही मिळवली म्हणजे झाले. शरीरविक्रय करून पैसे करणारे सुद्धा बुद्धी विक्रय करून पैसे करणाऱ्या पेक्षा केंव्हाही श्रेष्ठ. > गोवा मुक्ती झाली ती नेहरू च्या काळात ज्यांना तुम्ही शिव्या देता त्यांनी च गोवा स्वतंत्र केला आहे नाहीतर आता पर्यंत चर्च मध्ये जावून येशू समोर उभे राहावे लागले असते. अहो नेहरू सारखा गाढव प्रधान मंत्री होता म्हणून गोवा १९६१ साली स्वतंत्र झाला. थोडी जरी लाज आणि शरम होती तर १९४७ मध्येच पोर्तुगीजांचे बँड वाजवायला पाहिजे होते. त्याशिवाय नेहरूंनी स्वार्थासाठी गोव्याचा विषय आंतरराष्ट्रीय स्तरावर नेला होता. आणि गोवा स्वातंत्र्याला त्यांचा प्रचंड विरोध सुद्धा होता. त्यांनी उशीर केला नसता तर शेवटी इतर भारतीयांनी सशस्त्र पणे हल्ला केला असता आणि नेहरूंची अब्रूची लक्तरे टांगली गेली असती म्हणून नाईलाजाने त्यांनी सैन्य गोव्यांत पाठवले. त्याशिवाय १९११ मध्ये पोर्तुगाल ख्रिस्ती देशापासून सेकुलर (खऱ्या अर्थाने) बनला आणि मुक्त आर्थिक व्यवस्था त्यांनी घेतली. त्याचे फलस्वरूप म्हणून गोव्यांत आर्थिक सुबत्ता आणि जास्त धार्मिक अधिकार आज सुद्धा आहेत. गोव्यांतील मंदिरे लोकांच्या हाती असून गोव्यातील मुलींना कुठेही लग्न केले म्हणून निकाह किंवा हलला ची भीती नाही. नेहरू ह्यांचे घाणेरडे कायदे आणि घटनादुरुस्त्यांपैकी बहुतेक गोव्यांत लागू नसल्याने गोवा सोबीत आहे. आज पोर्तुगाल मध्ये हिंदू लोकांना भारतात आहे त्या पेक्षा जास्त अधिकार आणि स्वातंत्र्य आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Fri, 01/29/2021 - 10:08 नवीन
प्रतिसाद अगदे रोखठोक असतात.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Fri, 01/29/2021 - 05:38 नवीन
राष्ट्रीय पातळीवरचा नेता म्हणजे एखादा असा पक्ष ज्याला राष्ट्रीय पातळीवर मते मिळतात त्याचा नेता. आ़ज भाजप आणि, काँग्रेस ह्या पक्षांना बहुतेक सगळ्या राज्यांमध्ये लक्षणिय (आमदार\ खासदार निवडून येतील) मते मिळतात. तर कम्युनिस्ट पार्टी काही राज्यांमध्ये प्रभाव राखुन आहे. बसपाचे पंजाब ते आंध्रप्रदेश ह्या राज्यांमध्ये पॉकेटस् आहेत भले त्यांचे आमदार\ खासदार नसोत. ह्या पक्षांकडे राष्ट्रिय नेते असु शकतात. त्यात भाजप तुर्तास बाजूस ठेवू. काँग्रेसमध्ये लक्षणिय नेते आहेत उदा. जयराम रमेश, शशि थरूर, मुरली देवरा, कॅ. अमरिंदर सिंग, पॄथ्वीराज चव्हाण, सचिन पायलट, गहलोत, अगदी आपल्या राजीव सातवांमध्ये पण पोटेन्शिअल आहे. पण काँग्रेसमधल्या बेलगाम सुंदोपसुंदी, आणि घराणेशाहीचा अडसर आहे. काँग्रेसमध्ये कोणा गांधीतराला नेतॄत्व करण्याची संधी नाही. 'गांधी' हा असा एकखांबी तंबू ठरवल्यामुळे नो वन शुल्ड ऑउटपरफॉर्म राहुल गांधी अ‍ॅंण्ड राहुल गांधी डजन्ट परफॉर्म. सध्या नेतॄत्व करणार्‍या राहुल गांधीसाठी राजकारण हे फावल्या वेळातले काम आहे, ही अडचण आहे. कम्युनिस्ट पार्टी ही खरेतर केडर बेस्ड पार्टी, पण आता दरबारी राजकारणात हरवली (थँक्स टू इंदिरा गांधी). शिवाय ज्यांना कम्युनिस्ट पार्टीत काही मिळाले नाही त्यांनी काँग्रेसची वाट धरली (आणि तिथल्या दरबारी राजकारणात काँग्रेसची वाट लावली). त्यामुळे त्यांच्या कडे जनमानसात लोकप्रिय होईल असा राष्ट्रीय पातळीवरचा नेता नाही. बसपा, परत एकखांबी तंबू. मायावती. त्या एक राष्ट्रीय स्तरावर नेतॄत्व करु शकतात, आपला पक्ष मोठा करुन त्यांनी दाखवला आहे. सध्या अडचणीत आहेत, पण त्या कदाचीत पुढील एक-दोन निवडणुकीत परत पुढे येतील. त्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह आहेतच पण नेतॄत्वावर नाहीत. अर्थात सबकुछ बहेनजी असल्याने, दुसरी फळी वगैरे काही इथे नाही. आता भाजप, अर्थात भाजप कडे नेत्यांची फळी आहे. पहिली आहे, दुसरी आहे. शिवाय त्यांच्या कडे सतत संघर्ष करण्याच्या अनुभवामुळे नवनवे नेते तयार होत राहतात. ह्याशिवाय स्थानिक पक्षाचे नेते आहेत जे राष्ट्रीय स्तरावर नेतॄत्व करु शकतात, पण त्यांचा पक्ष एखाद दुसर्‍या राज्यापुरता सिमित असल्याने त्यांच्या पुढे येण्यात अडचणी आहेत. उदा. ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, जगमोहन. उद्या अखिलेश/ ममता कम्युनिस्ट पार्टीत गेले तर त्यांना राष्ट्रीय स्तरावर नेतॄत्व मिळेल. थोडक्यात भाजप सोडली तर काँग्रेसकडे नेते आहेत पण त्यांना राहुल रेषेची मर्यादा आहे. काही स्थानिक नेते आहेत, पण त्यांना त्यांच्या पक्षाची मर्यादा आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 01/29/2021 - 05:56 नवीन
संपूर्ण भारतात अत्यंत लोकप्रिय व सर्वपक्षीय मान्यता असलेले आदरणीय माननीय श्री. रा. रा. शरदचंद्रजी पवारसााे उपाख्य जाणता राजा यांचा पर्याय म्हणून उल्लेख न केल्याबद्दल तीव्र णिषेद.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 01/29/2021 - 06:04 नवीन
ते आजन्म भावी पंतप्रधान या स्थानावर अढळ कायम आहेत.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 01/29/2021 - 06:33 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Fri, 01/29/2021 - 09:13 नवीन
तहहयात भावी पंतप्रधान पदावर अढळ राहोत ह्याच शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Fri, 01/29/2021 - 09:49 नवीन
ते मुख्यमंत्री म्हणुन परत आले (किंवा पाठवले गेले, काय हवे ते म्हणा). तिथे त्यांचा राष्ट्रिय राजकारणातला बराचसा प्रभाव संपला. नंतर काँग्रेस पासुन फारकत घेवून राज्यातल्या सत्तेसाठी पुन्हा एकदा काँग्रेससोबत पाट लावल्यामुळे त्यांचा होता नव्हता तो पण प्रभाव संपला, नंतर राहीला तो फक्त वावर. मग राहुल गांधींचे नेतॄत्व (युपीए सरकार) मान्य करणे आणि आता तर फडणवीस, पाटील अश्या इतर पक्षातील राज्य स्तरीय नेत्यांशी स्पर्धा करुन त्यांनी स्वतःला अधिकच खुजे करुन घेतले. आता परत राष्ट्रिय राजकारणात गेले तर इकडे सेना, भाजप आणि मुख्यतः काँग्रेस राष्ट्रवादीचे लचके तोडेल, शिवाय जोडीला गॄहकलह आहेच. आयुष्यभर जे पेरले आता त्याचीच परतफेड होतेय. असो. त्यांना प्रभावशाली नेत्यांमध्ये मोजले नाही कारण ४०हून अधिक वर्षे राजकारणात आहेत म्हणताना, त्यांना एकदाही एकहाती महाराष्ट्र जिंकता आला नाही. त्यामानाने फडणवीस सुद्धा उजवे. ममता, अखिलेश, जगनमोहन हे त्यांच्या नंतर राजकारणात आले आणि मोठमोठी राज्ये त्यांनी कडवट विरोधकांकडुन जिंकली. पवार विरोधकांच्या बाबतीत तसे नशिबवान, त्यांना कडवट विरोधक असा कधी मिळाला नाही. जातीचे राजकारण, मराठी वर्तमानपत्र, साहीत्यीक, वगैरे लिबरल्स हाताशी, आणि काँग्रेसचा वारसा असे सगळे जमुन आलेले असतानाही त्यांना त्यांच्या उमेदीत १४५+ असा विजय कधी मिळाला नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 01/29/2021 - 10:12 नवीन
ते मुख्यमंत्री म्हणुन परत आले (किंवा पाठवले गेले, काय हवे ते म्हणा). तिथे त्यांचा राष्ट्रिय राजकारणातला बराचसा प्रभाव संपला. पवारांचा राष्ट्रीय राजकारणात कधीही प्रभाव नव्हता. २-४ जागा मिळविणारे रामविलास पास्वान, शिबू सोरेन इ. चा राष्ट्रीय राजकारणात जेवढा प्रभाव होता/आहे, फार तर तितकाच पवारांचा प्रभाव राष्ट्रीय राजकारणात आहे. २-४ खासदार असणाऱ्या छोट्या पक्षाला किंवा पक्षाच्या नेत्याला राष्ट्रीय राजकारणात काळं कुत्रं सुद्धा विचारत नाही.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Fri, 01/29/2021 - 19:14 नवीन
जेव्हा राज्याच्या राजकारणात परत आले तेव्हा ते केंद्रात संरक्षणमंत्री होते. शिवाय ते काँग्रेसचे नेते होते, २-४ खासदारांचे नाही. म्हणुन त्यांचा राष्ट्रिय राजकारणातला प्रभाव असा उल्लेख केला.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 01/29/2021 - 06:21 नवीन
फक्त मोदी मोदी. सरकार मधील च बाकी मंत्र्यांना सुद्धा स्वतः च्या विचाराने निर्णय घेण्याचे स्वतंत्र नसावे अशी शंका येतेय. सर्व गोष्टींचे श्रेय फक्त मोदी ना. बाकी मंत्री काय फक्त पुतळे आहेत काय. हा मंत्री लायकीचा नाही तो मंत्री लायकीचा नाही असे bjp samarthak च म्हणतात. लायकीचे नाहीत तर त्यांना कशाला मंत्री पद दिले आहे
  • Log in or register to post comments
B
Bhakti Fri, 01/29/2021 - 06:38 नवीन
आणि मोदी हे Bjp चा चेहरा आहे,पहिली टर्म कंटाळलेल्या जनतेने नाविन्य आणि उत्साहात स्वीकारली.दूसरी टर्म ठीकठाक चालू होती,कोवीड कडमडल ..त्यात जास्त नाही पण थोडेफार नुकसान झालंच आहे..मोदी चेहरा म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना कमी पडत आहेत वा दूर्लक्षित करत आहेत.असे सामान्यांचे प्रश्न टाळू लागले तर पुढची टर्म नाही मिळू शकणार..Bjp चा डेकोरम कमी पडतोय सध्या म्हणून लोकं पर्याय शोधत आहेत.Bjp ने दुसरा चेहरा शोधावा नाहीतर महाराष्ट्रासारखी गत होईल.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 01/29/2021 - 06:47 नवीन
मी स्वतः, शेती व्यवसायाशी निगडित आहे... दलाल नसल्याने, शेतकरी वर्गाला, आनंद झाला आहे....
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 17 hours ago
  • सुंदर !!
    1 day 18 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा