Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

आघाडी सरकार आणि सामान्य जनता

म
मुक्त विहारि
Sat, 01/16/2021 - 02:50
🗣 159 प्रतिसाद
भरपूर राजकारण करून, आघाडी सरकार स्थापन केले, पण हे सरकार, सामान्य जनतेसाठी नाही, हे माझे वैयक्तिक मत आहे. 1. सामान्य माणसाला, घरी बोलावून मारहाण. 2. एका माणसाला,जीवे मारण्याची धमकी देणारा आमदार. 3. साधु हत्याकांड 4. तांदूळ घोटाळा 5. अर्भक मृत्यू 6. शेतकरी वर्गाला दिलेली अपुरी मदत 7. वाढीव पेट्रोल दर. 8. ड्रगचा वाढता वापर... 9. मेट्रो रेल्वे बाबत केलेली चालढकल 10. CBI चौकशी होऊ नये, म्हणून उचललेली पाऊले 11. तक्रार केली तर, तक्रार करणारी व्यक्ती गायब होणे. 12. मराठा आरक्षणाचा सावळागोंधळ एकूणच, हे सरकार, सामान्य माणसासाठी नाही, हे माझे वैयक्तिक मत आहे....

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 52340 views

🗣 चर्चा (159)
स
सौंदाळा Sat, 01/16/2021 - 03:43 नवीन
गल्लीतील गुंड आणि खंडणीखोर सत्तेवर बसल्यावर दुसरं काय होणार? जनताच यांना योग्य वेळी धडा शिकवेल.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/16/2021 - 04:28 नवीन
सामान्यतः, हुषार माणसे, निवडणुक लढवत नाहीत. डोंबोली सारख्या, सो काॅल्ड, सुशिक्षित माणसांच्या शहरात, साध्या नगरसेवक पदासाठी, समाजसेवा करणारा उमेदवार, कुठल्याही पक्षाला मिळत नाही,
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 01/16/2021 - 04:13 नवीन
याआधीचे सरकार कोणत्याही वर्गातील जनतेसाठी नव्हते. ज्यांनी आपल्या खुर्चीसाठी, आपल्याला प्रत्येक निवडणुकीत डोळे झाकून मत देणाऱ्या निष्ठावंत मतदारांचा विश्वासघात करून नुकसान केले, ते फक्त स्वत:चेच असतात.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/16/2021 - 04:32 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
द
दिगोचि Sat, 01/16/2021 - 04:42 नवीन
यात वाचाळवीर राऊत यान्चे नाव हवे कारण त्यान्च्यामुळे २०२४च्या निवडणुकीवर परिणाम होईल असे आता तरी वाटत आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/16/2021 - 04:45 नवीन
त्यामूळे, मी वैयक्तिक पातळीवर टीका केली नाही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/16/2021 - 04:43 नवीन
13. एका निवृत्त सैनिकाला, मारहाण केली.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Sat, 01/16/2021 - 05:02 नवीन
कोणते सरकार सामान्य जनतेसाठी होते ?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/16/2021 - 05:21 नवीन
आधीच्या सरकारच्या चूका सांगीतल्यात तर उत्तम....
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Sat, 01/16/2021 - 06:33 नवीन
काही तुरळक अपवाद वगळता सर्व काही सत्तेसाठी.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/16/2021 - 06:42 नवीन
कुठल्या चूका?
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Sat, 01/16/2021 - 07:41 नवीन
भ्रष्टाचार की सर्वात मोठी कीड आहे हे सगळ्यांना माहीत आहे. तो करणे आणि करणार्‍यांना पाठीशी घालणे हे सतत चालले आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/16/2021 - 07:54 नवीन
मागच्या सरकारने चुका केल्या असतील तर, त्या चुका टाळायला, ह्या सरकारने काय केले?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/16/2021 - 08:02 नवीन
त्यामुळे, प्रत्येक पक्षाची ध्येय धोरणे, वेगळी असणे साहजिकच आहे. पण, त्याच बरोबर, सामान्य माणसाला त्रास होऊ नये, इतपत तरी काळजी घ्यायला हवी....
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 01/17/2021 - 09:27 नवीन
प्रशासन यंत्रणा,आणि ते प्रशासन हकणारे सरकार नसेल तर कोणताच देश चालणार नाही सरकारी धोरण ही सर्वात जास्त महत्वाची असतात त्या वर लोकांच्या नोकऱ्या,व्यवसाय अवलंबून असतो. धोरण बदलेले तर चांगले चालणारे व्यवसाय पण क्षणात माती मोल होवू शकतात.. कोणी असे समजत असेल मी स्वतःच्या मेहनतीवर पैसे कमवत आहे तर ते अर्ध सत्य आहे प्रशासन आणि सरकारी धोरण हीच तुम्हाला पैसे कमावण्याची संधी देतात. सरकार ही यंत्रणा जीवनात नगण्य नाही अतिशय महत्वाची आहे. सरकारी यंत्रणा च पूर्ण फायदा घेवून त्याच यंत्रणेला नगण्य समजायचं हे थोड विरोधी मत वाटत. चांगले सरकार निवडणे म्हणजे आपले स्वतःचे भविष्य चांगले बनवणे
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 01/16/2021 - 05:14 नवीन
तुम्ही कोणत्या पक्षाचा आमदार आणि नगरसेवक निवडून दिला आहे? अगदी वैयतीक बोलायचे झाले तर तुम्ही ज्या आमदार आणि नगरसेवकाला मतदान केले आहे तो समाज सेवा निस्सीम भावनेने करतो का? आणि तुम्ही त्याला का मत दिले त्याचे एका वाक्यात कारण काय आहे. ह्या दोन प्रश्नांची उत्तर सर्वात महत्वाची आहेत.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/16/2021 - 05:25 नवीन
सरकार एका माणसाचे नसते
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 01/16/2021 - 05:36 नवीन
पण एक एक आमदार मिळून च बहुमत मिळते आणि सरकार स्थापन होते.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/16/2021 - 05:50 नवीन
आघाडी सरकार, असे स्थापन झालेले नाही, ही वस्तुस्थिति आहे,
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Sat, 01/16/2021 - 05:47 नवीन
वर्षे, दिड वर्षा पासून कोथळा, खंजीर, मराठी आस्मिता, कोमट पाणी, घरातच बसा, माझे कुटुंब माझी जबाबदारी, या शिवाय एक ही वेगळा शब्द सध्याच्या महा आघाडी सरकार कडून ऐकला नाही. याशिवाय यांची सत्तेत येऊन केलेली कामे काय तर, गेल्या सरकारच्या योजना बंद करणे, स्वत:च्या हट्टासाठी आरे कारशेड इतत्र हलवणे, बुलेट ट्रेनला विरोध, केजरिवाल प्रमाणे प्रत्येक गोष्ट केंद्र सरकारवर ढकलने, कंगानाचे घर बुलडोजर चालवून पाडणे, मंत्र्यासाठी आलिशान गाड्या खरेदी करणे याशिवाय इतर एक ही काम या सरकारने केले असेल तर सांगावे कुणी.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/16/2021 - 05:51 नवीन
शिवभोजन थाळी
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 01/16/2021 - 05:59 नवीन
Corona काळात योग्य वेळी लॉक डाऊन. साथीच्या रोगात जनतेला फुकट रेशन. अपुऱ्या आरोग्य सुविधा असून सुध्धा परिस्थीत वर नियंत्रण. हिंदू मुस्लिम तणाव नाही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/16/2021 - 06:01 नवीन
आपले हे मुद्दे नक्की आहेत का?
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Sat, 01/16/2021 - 08:07 नवीन
Corona काळात योग्य वेळी लॉक डाऊन. -- तो केंद्र सरकारने लावला व त्यावर तुमच्या सारख्या अनेकांनी टिका केली होतो. साथीच्या रोगात जनतेला फुकट रेशन. -- फुकट अन्न धान्य केंद सरकारने दिले मात्र त्यातही महाविकास आघाडीने घोटाळे केले अपुऱ्या आरोग्य सुविधा असून सुध्धा परिस्थीत वर नियंत्रण. -- कोरोना संख्या व मृत्यु देशात सर्वात जास्त महाराष्ट्रात झाले आहेत. हिंदू मुस्लिम तणाव नाही. -- तो या आधी कधी होता ?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 01/16/2021 - 06:10 नवीन
फक्त योग्य पद्धत नी खोडून काढवेत. केंद्र सरकार ल मध्ये न घेता.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 01/16/2021 - 06:15 नवीन
हायला दुसऱ्या धाग्यावर तर लॉक डाऊन केला आणि श्रमिकांचे हाल झाले म्हणून मोदींच्या नावाने शिमगा करत होतात. शरद कोचिंग क्लासेस लावले काय? कोलांट्या मारायला शिकलाय!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/16/2021 - 06:17 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Sat, 01/16/2021 - 07:40 नवीन
शरद कोचिंग कलासेस...
ठो...!!
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 01/16/2021 - 16:09 नवीन
शरद कोचिंग क्लासेस 😂 हे आवडल्या गेलेले आहे !
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/16/2021 - 06:22 नवीन
करोनाच्या काळात, वांद्रे रेल्वे स्टेशनवर, गर्दी कशी काय जमा झाली? उत्तर प्रदेशची लोकसंख्या महाराष्ट्रा पेक्षा जवळ जवळ दुप्पट असुनही, त्या राज्याने, जास्त चांगल्या रीतीने ही लागण हाताळली
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/16/2021 - 06:23 नवीन
फुकट रेशन, केंद्र सरकारने दिले... आयजीच्या जीवावर बायजी उदार...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/16/2021 - 06:24 नवीन
मग आता सुधारली आहे का?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/16/2021 - 06:26 नवीन
तो कसा असेल? अजान स्पर्धा भरवली जाते... हिंदू हृदयसम्राट, "जनाब "होतात...
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 01/16/2021 - 06:54 नवीन
पण ते गरजवंत व्यक्ती पर्यंत पोचवणे हे राज्य सरकार चे काम असते. एक उदाहरण घेवू. बिहार ला 86450 MT धान्य केंद्र सरकार नी दिले पण बिहार मधील bjp आघाडी सरकार नी फक्त.1.84 MT च धान्य वाटप जनतेला केले . आणि बाकी सर्व धान्य कुठे गेले ह्याचा पत्ताच नाही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/16/2021 - 06:59 नवीन
पण काही लिंक असेल तर द्या... मला आपल्या राज्यात झालेला, तांदूळ घोटाळा मात्र माहिती आहे,
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 01/16/2021 - 07:01 नवीन
ही घ्या लिंक https://www.misalpav.com/comment/1091249#comment-1091249
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/16/2021 - 07:10 नवीन
थोडक्यात, आम्ही म्हणू, तेच सत्य, ह्या पंथातले दिसतात....
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 01/16/2021 - 07:28 नवीन
Bjp संचलित रिपब्लिक टीव्ही न्यूज चॅनेल वर त्याच गुन्ह्याखाली केस दाखल आहे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 01/16/2021 - 07:11 नवीन
https://www.foodnavigator-asia.com/Article/2020/07/13/India-s-COVID-19-free-food-rations-Government-s-compassionate-gesture-blighted-by-inefficiencies?utm_source=copyright&utm_medium=OnSite&utm_campaign=copyright
  • Log in or register to post comments
U
Ujjwal Sat, 01/16/2021 - 07:42 नवीन
लेख नीट वाचता कि नाही? तुम्हीच दिलेल्या लिंक मध्ये महाराष्ट्र सरकारने धान्याचे एप्रिल मे मध्ये १ टक्क्यापेक्षा कमी आणि जुन मध्ये 0% वितरण केले आहे हे लिहिलंय. Of the 36 states and Union Territories (UTs) in India, two distributed zero grains (Goa, Telangana), 11distributed less than 1% of allocated grains (Andhra Pradesh, Gujarat, Jharkhand, Ladakh, Maharashtra,Meghalaya, Odisha, Sikkim, Tamil Nadu, and Tripura) across April and May 2020, whereas in June 2020 sixmore (Bihar, Gujarat, Maharashtra, Tamil Nadu, Sikkim, and Ladakh) also distributed zero grains.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/16/2021 - 07:48 नवीन
असे होते कधीकधी
  • Log in or register to post comments
U
Ujjwal Sat, 01/16/2021 - 07:50 नवीन
:)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/16/2021 - 07:46 नवीन
माहिती बद्दल धन्यवाद...
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Sat, 01/16/2021 - 09:35 नवीन
तुम्ही विदा दिलाय. आजवर असे कधी झाले नव्हते की तुम्हाला माहिती/ दुवा/ विदा मागितला आणि तुमच्याकडून तो मिळाला .
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 01/16/2021 - 07:59 नवीन
सरकार कोणत्या पक्षाचे आहे ह्या पेक्षा सरकार चालवणारी लोक कोण आहेत हे जास्त महत्वाचे असते हेच तर सांगायचे आहे. म्हणून तर पहिल्याच कमेंट मध्ये मी तुम्ही कोणाला मत दिले होते आणि ज्याला मत दिले होते. तो व्यक्ती निस्सीम भावनेने समाजसेवा करत आहे का? असा प्रश्न विचारला होता.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/16/2021 - 08:06 नवीन
पण तो एकटाच सत्तेत नाही, इतरही काही जण सत्तेत आहेत असो, तुमची विचारसरणी, माझ्या पेक्षा वेगळी असल्याने, तुम्ही, तुमच्या जागी आणि मी माझ्या जागी
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Sat, 01/16/2021 - 08:11 नवीन
मुळात हे मान्य करायला हवे कि फडणवीसांचा अतिअहंकार त्यांना व पक्षाला व राज्याला नडला. थोडे तोंड गप्प ठेवले असते तर आज सत्तेत असते. सध्याचे सरकार हे राज्य चालवायचे ह्या उद्देशाने स्थापलेले नसुन फक्त सरकार चालवायचेच ह्या हेतुने स्थापले गेलेले आहे.त्यामुळे दर तीन-चार महिन्यानेन आता पड्णार आता पडणार अशी आवई उठवली जाते पण होत काही नाही.
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Sat, 01/16/2021 - 15:37 नवीन
>काहीही करून माझाच मुख्यमंत्री झाला पाहिजे हा *बाळ*हट्ट नडला. काहीही करुन मीच मुख्यमंत्री झालो पाहिजे हा हट्ट जास्त नडला.जेव्हा सेना मुख्य्मंत्री पदावर अडुन बसली होती तेव्हा ज्युनिअर ठाकरेंचे नाव पुढे केले होते. हा एक नंबरचा पोरकट पणा होता व कोणालाही मान्य झाला नसता.पण पुढे पवारांनी उध्दव ठाकरेंना पुढे आणुन मुत्सुद्दीपणा दाखवला.हाच पर्याय फडणवीसांना सेनेसमोर ठेवता आला असता.तसेही सेना अर्धा-अर्धा कार्यकाल वाटुन घ्यायला तयार होती.पण अतिस्वार्थ नडला. आणि पुढे अजित पवारांशी असंगाशी संग करुन स्वतःचे हसे करुन घेतले ते वेगळेच.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 01/16/2021 - 16:06 नवीन
फडणवीसांनी २०१७ पासून अनेक गंभीर घोडचुका केल्यामुळे (अजिबात गरज नसताना शिवसेनेच्यया गळ्यात पडून युती करणे ही त्यातील एक गंभीर घोडचूक) व दुर्दैवाने मोदी-शहांनी त्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करून त्यांना मुक्तहस्त दिल्याने, २०१९ मध्ये अत्यंत अनुकूल परिस्थिती असूनही भाजपच्या जागा कमी झाल्या व सरकार गेले. फडणवीसांच्या चुका अजूनही सुरू आहेत व मोदी-शहांच्या अजूनही ते लक्षात येत नसल्याने, पुढील स्थानिक आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला जोरदार फटका बसून भाजप चौथ्या क्रमांकावर फेकला जाईल. नुकत्याच झालेल्या शिक्षक-पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत भाजपला आपले बालेकिल्ले गमवावे लागल्याने याचे प्रत्यंतर आले आहे. फडणवीसांच्या गंभीर घोडचुका व त्यामुळे भाजपची वेगाने होत असलेली घसरण हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. मूड येईल तेव्हा यावर लिहीन.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 01/16/2021 - 09:18 नवीन
फक्त अतिअहंकार नव्हता. त्यांनी अनेक गंभीर घोडचुका केल्या व अजूनही त्या सुरूच आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जागा कमी होऊन सरकार गेले व भविष्यातील विधानसभा निवडणुकीतही त्यांचे सरकार येणे अवघड आहे. सद्यपरिस्थितीत सर्वाधिक फायदा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे व पुढील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होण्याची बरीच शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 16 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 16 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 16 hours ago
  • सुंदर !!
    1 day 17 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 17 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा