Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - जानेवारी २०२१

श
श्रीगुरुजी
Sun, 01/10/2021 - 18:21
🗣 111 प्रतिसाद
अमेरिकेने तैवानवरील नियंत्रणे हटविल्याने चीनला संताप अनावर झालाय. मागील १-२ वर्षांपासून चीनला शह देण्यासाठी अमेरिका तैवानला पाठबळ देतेय. अमेरिका व तैवानचे राजनैतिक अधिकारी एकमेकांच्या देशात अधिकृत भेट द्यायला लागल्याने चीन अत्यंत नाराज आहे. आता यापुढील पाऊल म्हणजे अमेरिकेने तैवानला स्वतंत्र सार्वभौम देश म्हणून अधिकृत मान्यता देणे. तसे झाले तर चीन संतापून तैवान ताब्यात घेण्यासाठी हल्ला करू शकतो. आता भारताने सुद्धा वन चायना धोरणाला मूठमाती देऊन तैवानशी संबंध वाढवून तैवानला स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्यावी. त्यासाठी भारत बहुतेक आधी अमेरिकेने मान्यता द्यायची वाट पहात असावा. https://m.timesofindia.com/world/us/us-lifts-self-imposed-restrictions-on-contacts-with-taiwan-chinas-official-media-reacts-sharply/articleshow/80200994.cms#_ga=2.213133906.710310796.1610040637-amp-jYqPLLBLSTAtzk5m0R26KNDoIeqn0_pDb7YPfI0XUkDWAAutIxoPjbVk4R8pO4ue

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 41454 views

🗣 चर्चा (111)
R
Rajesh188 Fri, 01/29/2021 - 20:43 नवीन
Remdesivir disrupts COVID-19 virus better than other similar drugs: study
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 01/30/2021 - 04:55 नवीन
Image removed. आंदोलन मोडीत काढण्याचे सरकारचे सर्वोतपरी प्रयत्न सुरु असतांना काल, टीकैत यांच्या भाऊक आवाहानानंतर, सद्भाभावना रॅली, एक दिवसाचे आमरण उपोषण आणि शेतक-यांची रात्रीपासून गाझीपूर बॉर्डरवर उत्सफूर्त वाढती गर्दी पाहता आंदोलन पार्ट टू पुन्हा जोमाने, उत्साहाने सुरु. एकदा की हे आंदोलन मोडल्या गेले. सरकार कोणतेही आंदोलन मोडीत काढत राहील. व्यवस्थेशी अन्यायाबाबत लढाई चालू राहीली पाहिजे, ही महत्वाची घडामोड वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/30/2021 - 05:21 नवीन
खलिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद, अशा घोषणा ज्या आंदोलनात होतात, ते आंदोलन योग्य आहे, असे मी तरी समजत नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 01/30/2021 - 06:08 नवीन
. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/30/2021 - 06:15 नवीन
अशा घोषणा देणे, योग्य आहे का?
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Sat, 01/30/2021 - 06:27 नवीन
सरकार कोणतेही आंदोलन मोडीत काढत राहील. व्यवस्थेशी अन्यायाबाबत लढाई चालू राहीली पाहिजे, ही महत्वाची घडामोड वाटते.
चार टाळकी अन्याय अन्याय म्हणून बोंबलली म्हणजे अन्याय आहे अस नाही.. भर पावसाळ्यात चौकात उभे राहून 100 जण उन्हाळा उन्हाळा असे ओरडले म्हणून उन्हाळा होत नसतो. शीख आणि दलाल यांचे सर्व व्हिडीओ पाहिलेत तर ह्यांचा नेमका प्रॉब्लेम काय आहे ते समजून येईल. पण महत्वाच्या गोष्टीवर दुर्लक्ष करून आपला अजेंडा पुढं रेटायचा ही लिब्रान्दुची जुनी खोड. बाकी लोकमत ने अशी बातमी छापून कालचा गोंधळ सोयीस्कर रित्या कसा दुर्लक्ष केला हे दिसतेच आहे. यालाच लिब्रान्दु ची तत्व म्हणतात. घडणाऱ्या गोष्टीचा रंग कोणताही असो दाखवताना आपल्याला नको असणारे रंग झाकून ठेवायचे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/30/2021 - 06:30 नवीन
खोटी गोष्ट, परत परत रेटून सांगायची...
  • Log in or register to post comments
स
सुक्या Sat, 01/30/2021 - 08:13 नवीन
जे बात. हे असले चाळे खुप पाहिलेत. ह्या लोकांनी दिल्ली मधे जो गोंधळ घातला त्यावर अळी मिळी गुप चिळी. कुणी काही विचारले की "रजा घेतो" म्हणुन पलायण कारायचे. आणी लगेच बाहेर येउन गळे काढायचे सरकार च्या नावाने. शिकलेला आणी सुशिक्षीत यात हाच फरक आहे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 01/30/2021 - 06:46 नवीन
अशा घोषणा सर्व आंदोलनकरत्यांनी एका सुरात दिल्या की 8 ते 10 लोक च अशा घोषणा देत होते. मला जिथं पर्यंत माहिती आहे सर्व आंदोलन करत्यानी एकसुरात अशा घोषणा दिलेल्या नाहीत. ज्या काही मोजक्याच लोकांनी दिल्या असतील त्यांच्या वर सरकार नी कारवाई करावी. सरकार नी अशी कोणतीच कारवाई केली नाही ह्याचा अर्थ सरकार डाव पेच खेळत आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/30/2021 - 07:16 नवीन
मानलं तुम्हाला .... आपल्या सारख्या लोकांसाठी, राजीव गांधी, हे अतिशय योग्य नेते आहेत ... पुलावामा प्रकरणात, राजीव गांधी, यांचे असेच मत होते की, भाजपने मुद्दाम हल्ला केला .... आनंद आहे ....
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 01/30/2021 - 07:25 नवीन
त्यांना तेधून पुलगामा दिसत नाही.आणि मानव लोकात काय चालले आहे त्याच्या शी त्यांना काही देणे घेणे नाही
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/30/2021 - 07:30 नवीन
त्यांची आणि तुमची, विचारसरणी जुळते, हा योगायोग ...
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 01/30/2021 - 06:51 नवीन
आजचे पेट्रोल दर ९३.२८पैसे. डीजल ८२.४५ धन्यवाद. अच्छे दिन दुसरं काय. यावर आज चांगलं फॉरवर्ड आलं.पुढील काही दिवसांत पेट्रोलची किंमत १00 / - वर जाईल. सर्व तयार रहा. एकदा का किंमत १०० / - पर्यंत पोहोचल्यावर ताबडतोब रस्त्यावर उतरा, आपले हेल्मेट काढा आणि आकाशाकडे पहा. शतक ठोकल्यानंतर हे करण्याची प्रथा आहे. =)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/30/2021 - 07:20 नवीन
त्या गोष्टी समोर, ही इंधनवाढ काहीच नाही ... शिर सलामत तो पगडी पचास पाकिस्तान आणि चीनला, आर्थिक झळ सोसत असेल तर, इंधनदर कितीही होवो, चिंता नाही.... देश प्रथम.....
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Sat, 01/30/2021 - 07:49 नवीन
बदला घेतला? लाज वाटायला पाहीजे पुलवामा हल्ला झाला ह्याचे. नौटंकी करून आवेशात दम देऊन ना पाकिस्तान घाबरत ना चीन . आपले जवान हकनाक मरत आहे आणि हे म्हणत आहेत " ना कोई आया ना कोई गया " आपले जवान सीमेवर आत्महत्या करत आहेत असे म्हणायचे आहे का?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/30/2021 - 09:13 नवीन
100 न झालेले हल्ले असतात .... आपले जवान हकनाक मरत आहेत कारण, हे शुक्लकाष्ठ, आपल्या मागे, जवाहरलाल नेहरू यांनीच, लाऊन ठेवले आहे.... मुंबई वर हल्ला झाला, तेंव्हा बदला नाही घेतला .... पण आता मात्र घेतला, ही वस्तुस्थिति आहे .... लाज तर त्यांनाच वाटायला पाहिजे की, काॅग्रेसने इतक्या सगळ्या चुका करूनही, घराणेशाहीच्या उमेदवाराला मतदान करतात...
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Sat, 01/30/2021 - 09:26 नवीन
असे न झालेले हल्ले पूर्वीही होत. सीमेवर व आजूबाजूच्या दुर्गम परिसरात असे हल्ले भारतीय सेना पूर्वीपासून रोखत आहे. परंतू सैन्याच्या ताफ्यावर अन तेही हायवेवर असा हल्ला केला जातो ही लाजीरवरणी गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/30/2021 - 09:30 नवीन
मुंबई वर हल्ला झाला, तेंव्हा, बदला का नाही घेतला? अर्थात, त्यावेळी, काॅग्रेसला लाज वाटली असावी ...
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Sat, 01/30/2021 - 09:57 नवीन
चीनने आपले २० सैनिक मारले तेव्हा बदला का नाही घेतला?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/30/2021 - 09:18 नवीन
पाकिस्तान आणि बांगलादेश यांचे शुक्लकाष्ठ यांनीच, आपल्या मागे लावले... तिबेटला पाठिंबा, यांनीच दिला नाही... चीनला दरवाज्या पर्यंत, यांनीच येऊ दिले... देशाला सगळ्यात जास्त असुरक्षित, ह्यांनीच केले.... चुका करायच्या काॅग्रेसने आणि लाज मात्र, भारतीयांनी बाळगायची ...
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Sat, 01/30/2021 - 09:31 नवीन
लाल डोळे वटारायला काय लागतंय? तिकडे चीन आपल्या हद्दीत घुसून २० जवानांची हत्या करून निघून जाते. तरी ना आपण त्यांच्यावर हल्ला करत ना त्यांची घुसखोरी मान्य करत. डरपोक.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 01/30/2021 - 10:01 नवीन
आपले अज्ञान वारंवार प्रदर्शित करू नका. वाचन व अभ्यास वाढविल्यास अज्ञानाचा अंधकार कमी होईल.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Sat, 01/30/2021 - 10:07 नवीन
सरळ कबूल करा की , चीनची भ्या वाटते .
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 01/30/2021 - 10:15 नवीन
हे वाचा
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Sat, 01/30/2021 - 10:21 नवीन
मारुती कांबळेचे काय झाले?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/30/2021 - 10:28 नवीन
त्यांनीच, तुम्हाला विचारला पाहिजे....
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 01/30/2021 - 10:48 नवीन
बांगलादेश निर्माण केला हे भारताच्या फायद्याचे आहे की नुकसानीचे. ह्या वर तुम्ही मत मांडावे. पाकिस्तान ची निर्मिती झाली नसती आणि अखंड पाकिस्तान सह भारत निर्माण झाला असता तर आता भारताची अवस्था काय असती. आणि त्या अखंड भारत देशावर सत्ता मुस्लिम नी गाजवली असती की हिंदू नी. ह्या वर सुद्धा तुम्ही मत मांडावे अशी नम्र विनंती आहे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 01/30/2021 - 10:30 नवीन
भारत सरकार नी ऍप वर बंदी घालण्या पलीकडे काहीच कारवाई केली नाही भारताचे 20 सैनिक मेले तरी सरकार चुपचाप बसले आहे. एअर strike नाही,की पाकिस्तान मध्ये केला तसा गुप्त हल्ला नाही. एवढी घबराट का आहे मोदी सरकार ला. चीन नी कॅन्सर साठी लागणाऱ्या औषदा चा कच्चा माल भारतातला देणे बंद केल्या मुळे कॅन्सर वरील एक महत्वाचे औषद भारतात उपलब्ध च नाही. किती अवलंबून राहणारा चीन वर.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/30/2021 - 10:39 नवीन
काही तरी वेळ हा लागणारच ... साधं, 370 कलम हटवायला, किती वेळ लागला? चीन नामक शत्रू, एका दशकांत पण, आटोक्यात येणार नाही ... वाचनाची आवड असेल तर, चीन-जपान, युद्धाच्या बाबतीत, जरा वाचून बघा...
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 01/30/2021 - 10:50 नवीन
भारतीय सैन्याने चीनला २०१७ मध्ये डोकलाममधून मागे जाण्यास भाग पाडलं, गलवानमध्ये भारतीय सैनिकांनी २० सैनिकांच्या बदल्यात ४५-५० चिनी माकडांंना यमसदनाला पाठवलं, अगदी मागच्या आठवड्यात सिक्कीममध्ये चिन्यांना दणका दिला. दुर्दैवाने अज्ञान्यांना हे समजणे अशक्य आहे.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Sat, 01/30/2021 - 11:04 नवीन
४० - ५० चिनी माकडं आपल्या हद्दीत आली होती का ? नसतील आली तर का आणि कसं मारलं ? ना कोई आया ना कोई गया असं पंतप्रधान म्हणाले म्हणून विचारले .
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 01/30/2021 - 12:31 नवीन
हे घडले होते
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Sat, 01/30/2021 - 12:26 नवीन
चीन आणि भारता मध्ये बऱ्याच ठिकाणी LAC आणि LOC ची भानगड आहे. Pangong Tso च्या शेजारील डोंगर रांगांनां फिंगर 1 ते 8 अशी नावे दिलेली आहेत. झालेली घटना ही फिंगर 4 आणि 5 च्या मध्ये घडली आहे. भारताचा ताबा हा फिंगर 4 पर्यंत आहे तर दावा फिंगर 8 पर्यंत आहे, भारताची शेवटची चौकी फिंगर 3 आणि 4 च्या मध्ये आहे तर चीन ची शेवटची चौकी फिंगर 8 ला आहे तर दावा फिंगर 2 पर्यंत आहे. म्हणजेच भारताचा ताबा फिंगर 4 पर्यंत आहे तर चीन चा ताबाही फिंगर 4 पर्यंतच आहे. फिंगर 3 ते फिंगर 8 दरम्यान कोणतीही चौकी नव्हती. परंतु चीन ने 1-4 मे दरम्यान फिंगर 5 जवळ एक चौकी उभी केली होती आणि भारताचा त्याच गोष्टीला विरोध आहे. कारण भारत आणि चीन दरम्यान सीमेवर status quo maintain करायचा असा करार आहे. कंमांडर पातळीवरील चर्चेत चीन ने चौकी काढुन टाकण्याचे काबुल ही केलेले होते. परंतु भारताचा चीन वरती विश्वास नसल्यामुळे चौकी काढली का नाही हे बघण्यासाठी च आपले सैनिक तिथे गेले होते आणि त्याच वेळी भारतीय सैनिक आणि चिनी सैनिक यांच्यात झटापट होऊन आपले 20 सैनिक शाहिद झालें. चीन ने त्यांच्या मेलेल्या सैनिकांची संख्या सांगितली नाही. 30-40 चिनी सैनिक मेल्याचा अंदाज आहे. आणि त्याच मुळे चीन अजून ही मेलेल्या सैनिकांची संख्या जाहीर करत नाही. कारण एकदा का हे मान्य केले की चीन च्या आंतराष्ट्रीय image वरती हा आघात असेल. डोकलांम नंतर भारताने चीन ला दिलेला हा दुसरा तडाखा आहे. झालेली घटना ही फिंगर 4 च्या पुढे घडली आहे म्हणजेच जो भूभाग आपल्या ताब्यात आहे त्याच्या पुढे घडली आहे म्हणजेच चीन ने आपल्या भूमीत घुसकोरी केलेली नाही परंतु चीन ने Status quo maintain केला नाही हा भारताचा आरोप आहे, कारण त्या भागावरती आपला दावा आहे. शेखर गुप्तांच्या Cut the cutter मध्ये त्यांनी झालेला प्रकार अतिशय योग्य रित्या समजावून सांगितला आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/30/2021 - 14:40 नवीन
माहिती बद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 02/01/2021 - 18:54 नवीन
मोठी घडामोड घडून पण सर्व शांत आहेत.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Mon, 02/01/2021 - 20:49 नवीन
हो का? काय आहे अर्थसंकल्पात? म्हणजे चांगला आहे की नेहेमिसारखा वाइट?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 02/02/2021 - 04:02 नवीन
घडामोडीचा धागा काथ्याकूट करून टाकल्यावर काय घडामोडी लिहिणार. १) इंधनदरवाढ, सारखीच होत होती आता उपकराच्या नावाखाली महागाई आपल्या मानगूटीवर अधिकृत बसली आहे. सरकारला योजनांसाठी पैसा लागतो तेव्हा त्यांच्याकडे हा लूट करण्याचा सोपा उपाय आहे. पेट्रोलवर प्रति लिटर 4 रुपये आणि डिझेलवर प्रतिलिटर २ रु२५० पैसे इतका 'कृषी अधिभार' आकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे वाहतुकीचे दर मोठ्या प्रमाणावर वाढतील, त्याचा परिणाम म्हणून देशात महागाई पुन्हा वाढू शकेल. २) प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये जे प्रत्येक शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जात होते. त्यामध्ये ७५ हजार कोटी रुपयांवरून ६५ हजार कोटी रुपये इतकी कपात करण्यात आली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना प्राप्त होणाऱ्या रक्कमेवर किंवा काही शेतकऱ्यांना या तुटपुंज्या लाभापासून वंचित ठेवण्यावर याचा थेट परिणाम होणार आहे. ३)एम एस पी दिडपट दिली जाणार आहे, परंतु वस्तुस्थिती एम एस पी दीडपट केली जाणार नसून एम एस पी साठीची तरतूद दीड पट केली जाणार आहे, शब्दांचा खेळ लक्षात घ्यावा. ४) देश बिकने नही दूंगा ' असे म्हणायचे व सरकारच्या माध्यमातून तेवीस सार्वजनिक उपक्रमांची विक्री केली जात आहे, जसे काही दिवाळी धमाका सेल लागला आहे. Tax मधे काहीही बदल नाहीत, त्यामुळे सध्याच्या महागाईच्या काळात महागाई वाढतच आहे, उद्योगजगताचा फायदा, बेरोजगारांच्या वाट्याला काही नाही. ही महत्वाची घडामोड. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 02/02/2021 - 05:35 नवीन
सरकारच्या ह्या मदतीची गरज नसल्याने, मी ती मदत घेत नाही .. नंबर 4 बाबत, तोट्यात चालणारे किंवा पुढेमागे पांढरे हत्ती होणारे सरकारी उपक्रम बंद करणेच उत्तम... शिवाय, हे सरकारी उपक्रम बंद करणे, सगळेच सरकार करत आहे ... अगदी, मनमोहन सिंग, यांच्या काळात पण केले आहेत ... मी तेंव्हा पण, तोट्यात चालणारे सरकारी उपक्रम बंद करणेच उत्तम, असे म्हणत होतो आणि आत्ता पण हेच म्हणत आहे ...
  • Log in or register to post comments
स
सुक्या Tue, 02/02/2021 - 08:25 नवीन
१. मजेदार गोष्ट आहे की नाही? म्हणजे खोटं बोल पण रेटुन बोल. गम्मत अशी आहे की 'कृषी अधिभार' आकारण्याचा निर्णय घेतलेला आहे पण त्यावरचा बेसिक एक्साइज टॅक्स आणी स्पेशल एक्साइज टॅक्स अशे अ‍ॅड्जेस्ट केले आहेत की पेट्रोल व डिझेलवर च्या किमती वाढणार नाहीत. हे सांगायला विसरले की काय? २. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ फक्त गरजु शेतकर्‍यांना असावा. तो फक्त २ हेक्टर पेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकर्‍यांनाच मिळेल. ट्रअ‍ॅक्टर / मर्सिडीज वाले नाही. ३.माझा यावर जास्त अभ्यास नाही .. तस्मात पास . . . ४. पांढरे हत्ती / तोट्यात चालनारे उद्योग विकलेलेच बरे ... बाकी ते ३५००० करोड कोविड लसिकरण करण्यासाठि दिले ... ते कुठेतरी वापरले गेले असते .. महामारी नसती तर. बाकी चालु द्या. रौत दिल्ली ला शेतकरी लोकांना भेटनार आहे म्हणे. ते एकरी २५००० रु नुकसान भरपाइ चे काय झाले? सातबारा कोरा झाला का?
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Tue, 02/02/2021 - 10:32 नवीन
@ सुक्या.. मस्त प्रतिसाद. व्यवस्थित खोपच्यात घेतलेत स्वतः खोटे बोलून दुसऱ्यांना फेकूचंद म्हणणाऱ्यांना. पण जित्याची खोड आहे.. मेल्याशिवाय जाणार नाही... लिब्रान्दु मारतील पण आपला हेका सोडणार नाहीत. असो. यावेळी कोविड च्या संकटामुळे मुळे आणि लोकडाऊन मुळे सरकारकडे पैसा नसल्याने यावेळचा अर्थसंकल्प काही विशेष नसणार आहे हे गल्लीतले शेंबड पोरग सुद्धा सांगू शकले असते. त्यामानाने निर्मला सीतारामन यांनी चांगला अर्थसंकल्प मांडला. काही लोकं अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच त्याचा निषेध नोंदवत होते.. हे पाहून आश्चर्य वाटले.. आणि त्यांच्या बुद्धीची कीव वाटली.. अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक शीख आणि दलाल सरकारसोबत चर्चेला जाताना आमचे मुद्दे सरकार मान्यच करणार नाहीये असे बोंबलत चर्चा करायला जात असतो. अरे दलाला.. जर एवढाच कॉन्फिडन्स आहे सरकारवर तर जातोसच कशाला चर्चेला?? फुकटची पब्लिसिटी हाणायला?? फक्त विरोधासाठी विरोध करणार्यांना काय म्हणावं.??? आंदोलन आणि विरोध करणाऱ्यांची अक्कल पहिली कि राहून राहून हा सीन आठवतो. https://youtu.be/8g84-uqPYVw हे देखील पहा.. ( जुना आहे पण आंदोलकांचे खरे रूप हेच आहे. ) https://youtu.be/9Ts4whaVOfw
  • Log in or register to post comments
स
सुक्या Tue, 02/02/2021 - 18:59 नवीन
लिब्बु लोक याच कारणामुळे डोक्यात जातात. काहीही झाले तरी गळे काढणे हेच एक काम असते ... गोचि झालि की सुंबडीत गायब .... मग हळुच उगवनार ... परत गळा काढायला..
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Tue, 02/02/2021 - 11:22 नवीन
कृषी अधिभार' आकारण्याचा निर्णय घेतलेला आहे पण त्यावरचा बेसिक एक्साइज टॅक्स आणी स्पेशल एक्साइज टॅक्स अशे अ‍ॅड्जेस्ट केले आहेत की पेट्रोल व डिझेलवर च्या किमती वाढणार नाहीत बरोबर आहे. गुदगुल्या करणारे बजेट . गेल्या सहा वर्षात पहिल्यांदा बजेट नंतर एक दिवसात शेअर मार्केट मधून भरपूर फायदा झाला. आता माझ्या बँकेत सरकारने पैसे टाकणे बंद करावे , भले मी अल्पभूधारक असलो तरी.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Tue, 02/02/2021 - 19:02 नवीन
अगदी .. खरे . जर तुम्ही अल्पभूधारक शेतकरी असाल .. आणी तुम्ही शेतीवर अवलंबुन नसाल तर ह्या स्कीम मधे लाभार्थी न होणे हेच संयुक्तीक आहे. सरकार ला तशी माहीती देउन मदत करु शकता. त्यामुळे कदाचित खर्‍या गरजु ला मदत मिळेल. काय म्हणता?
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Tue, 02/02/2021 - 20:04 नवीन
शेती व्यवसायातून झालेला फायदा शेअर्समध्ये लाँगटर्म गुंतवणुक करतो. दोन्हीही बेभरोशाचे असले तरी सरकारकडून अप्रत्यक्षपणे आर्थिक लाभ झाल्यामुळे अल्पभुधारक म्हणून पैसे घेणे बंद करणार.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Tue, 02/02/2021 - 21:10 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 02/03/2021 - 07:35 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 02/03/2021 - 03:03 नवीन
मी तसेच करत आहे ... सध्या मीपण, अल्प भुधारक शेतकरी आहे ... पण, माझ्या पेक्षा, इतर शेतकरी बांधवांना, जास्त गरज असू शकते, म्हणूनच मी ह्या योजनेचा लाभ घेत नाही ....
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 02/03/2021 - 07:35 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 02/03/2021 - 11:03 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 02/01/2021 - 21:01 नवीन
उद्योग चालवणे हे सरकार चे काम नाही हा बकवास युक्तिवाद करून फायद्यात चालणाऱ्या कंपन्या विकायला काढल्या आहेत. सरकार चा हेतू साफ असेल तर जागतिक निविदा मागवून जे जास्त किमंत देतील त्यांना विकाव्यात.जागतिक सर्व देश सहभागी पाहिजेत. फक्त गौतम,आणि मुकेश नाही. आणि त्या मध्ये परदर्क्षता असावी जनतेला सर्व निविदा बघता आल्या पाहिजेत. गुपचूप व्यवहार केला की सरकार नी कमिशन साठी कंपन्या विकल्या असाच अर्थ काढावा लागेल. लोक मग अशा सरकार ला दलाल सरकार हिच उपमा देईल.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 18 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 18 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 18 hours ago
  • सुंदर !!
    1 day 19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा