Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - जानेवारी २०२१

श
श्रीगुरुजी
Sun, 01/10/2021 - 18:21
🗣 111 प्रतिसाद
अमेरिकेने तैवानवरील नियंत्रणे हटविल्याने चीनला संताप अनावर झालाय. मागील १-२ वर्षांपासून चीनला शह देण्यासाठी अमेरिका तैवानला पाठबळ देतेय. अमेरिका व तैवानचे राजनैतिक अधिकारी एकमेकांच्या देशात अधिकृत भेट द्यायला लागल्याने चीन अत्यंत नाराज आहे. आता यापुढील पाऊल म्हणजे अमेरिकेने तैवानला स्वतंत्र सार्वभौम देश म्हणून अधिकृत मान्यता देणे. तसे झाले तर चीन संतापून तैवान ताब्यात घेण्यासाठी हल्ला करू शकतो. आता भारताने सुद्धा वन चायना धोरणाला मूठमाती देऊन तैवानशी संबंध वाढवून तैवानला स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्यावी. त्यासाठी भारत बहुतेक आधी अमेरिकेने मान्यता द्यायची वाट पहात असावा. https://m.timesofindia.com/world/us/us-lifts-self-imposed-restrictions-on-contacts-with-taiwan-chinas-official-media-reacts-sharply/articleshow/80200994.cms#_ga=2.213133906.710310796.1610040637-amp-jYqPLLBLSTAtzk5m0R26KNDoIeqn0_pDb7YPfI0XUkDWAAutIxoPjbVk4R8pO4ue

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 41454 views

🗣 चर्चा (111)
म
मराठी_माणूस Wed, 01/13/2021 - 04:00 नवीन
https://epaperdivyamarathi.bhaskar.com/nashik/247/13012021/0/0/ काही नैतीकता शिल्लक आहे का ?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 01/13/2021 - 06:28 नवीन
काही राजकारणी लोकांचा आणि नैतीकतेचा संबंध नसतो.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Wed, 01/13/2021 - 08:47 नवीन
इथे राजकारणी नाहीय्येत
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 01/13/2021 - 16:00 नवीन
हे मलाही माहिती आहे
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 01/13/2021 - 04:59 नवीन
कमला हरिस - . वोग मासिक फोटो.
  • Log in or register to post comments
स
साहना Wed, 01/13/2021 - 10:23 नवीन
४०० पेक्षाही जास्त प्रकारची केळीची बाग बनवणारा हा अफलातून भारतीय ह्याची दखल जगाने घेतली आहे https://www.atlasobscura.com/articles/how-many-kinds-bananas-are-there ह्याच विषयावरून आंबा ह्या विषयावरील हा लेख सुद्धा आठवला (गोव्याच्या मानकुराडच्या नखाचीही सर हापूस आंब्याला नाही असे अनेकांना म्हटले असता वाईट वाटते पण सत्य आहे हो) : https://www.livemint.com/mint-lounge/features/my-mango-is-better-than-yours-11588343807581.html
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 01/13/2021 - 13:05 नवीन
महाराष्ट्रात काही लोक चवीप्रमाणे अशी क्रमवारी लावतात. १)रत्नागिरी हापूस २) दैवगड हापूस ३) बलसाड हापूस इतर प्रकारात उत्तर भारतात १)दशेरी २) हापूस ३)रुमाली ४)लंगडा परदेशांत केसर अधिक आवडू लागला आहे. मानकुर फारच थोडा बघायला मिळतो.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 01/19/2021 - 15:21 नवीन
गोव्याच्या मानकुराडच्या नखाचीही सर हापूस आंब्याला नाही याच्याशी मात्र अजिबात सहमत नाही. हापूसची चव मानकुराड ला नाही हे १०० % सत्य गोव्यात ५ वर्षे राहून हे अनुभवास आलेले आहे. बाकी माहेरचा कावळा गोरा असतो हि उक्ती याबाबत सत्य आहे.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Wed, 01/13/2021 - 11:54 नवीन
चीन तैवान ताब्यात घेण्यासाठी हल्ला करू शकत नाही. थयथयाट करण्यापलिकडे ते काही करू शकणार नाहीत. एकतर तैवान बेट असल्याने तिथे पुरेसे सैन्य, विमाने, रणगाडे नेणे ही खर्चिक अन वेळखाऊ बाब आहे. आणि ते होईपर्यंत तैवान (आणि जापान-अमेरिका सुद्धा) शांत बसणार नाहीत. जर चीनने असा प्रयत्न केलाच तर ही कदाचित दुसर्‍या महायुद्धातील नॉर्मंडी अथवा डंकर्क इतकी मोठी घडामोड असेल. फक्त इथे समोर तैवान्+जापान्+अमेरिका+कदाचित द कोरिया असतील. सध्याच्या काळात इतका मोठा आंतरराष्ट्रीय धोका अन आर्थिक बोजा चीन ओढावून घेणार नाही. भारताचे तैवानशी चांगले सांस्कृतिक अन व्यापारी संबंध आहेत. मात्र राजकीय संबंध नाहीत. तसे ते अमेरिकेचेही नाहीत. अर्थात अमेरिकेने केल्यास नाटो सदस्य देश, भारत, जापान, द. कोरिया सुद्धा राजकीय संंबंध प्रस्थापित करतील हे नक्की. पण प्रश्न असेल की कधी. नजीकच्या भविष्यात असे घडण्याची शक्यता कमी दिसते. मात्र आर्थिक उलाढाल वाढवून चीनसोबतच्या व्यापारावरील अवलंबित्व किंचीत का होईना कमी करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 01/13/2021 - 12:50 नवीन
मुंडे प्रकरणात निवडणूक आयोगाकडुन मुंडे यांच्यावर काही कारवाई होण्याची शक्यता नाही असे मत आहे. https://www.loksatta.com/maharashtra-news/advocate-aseem-sarode-facebook-post-ncp-dhananjay-munde-accused-of-rape-sgy-87-2378900/
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Wed, 01/13/2021 - 15:25 नवीन
लोकं तसे नेते..वेगळी काय अपेक्षा आहे? संभाजीनगर नंतर आता धाराशिव असाही उल्लेख आला आहे सी एम ओ कडून! निवडणुकीची तयारी झाली वाटतं.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Wed, 01/13/2021 - 17:36 नवीन
नवाब मलिक यांच्या जावयाला अमली पदार्थ प्रकरणात अटक बातमी
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 01/19/2021 - 11:11 नवीन
आपल्या देशात प्रत्येक बाबतीत राजकारण केले गेले आणि केले जाते ! पण एकाच बाबतीत कधीच कोणते राजकारण केले गेले नाही, कोणी कोणला मदत केली नाही, कोणासाठी न्याय मागितला गेला पाहिजे असे देशातील मिडियाला देखील वाटले नाही, सगळे मौन होते. हे कोण ? तर काश्मिरी पंडीत. ज्याच्या बायकांची अब्रु लुटली गेली, संपत्ती पळवली गेली आणि पुरुष कापले गेले ! जे पळाले तेच वाचले आणि स्वत:च्याच देशात आश्रित झाले, ज्यांना कोणी वालीच उरला नाही असे ते हतबल आणि शरणार्थी ! :( आज सर्वस्व लुटले गेलेल्या काश्मिरी पंडीतांना स्वतःच देशात निर्वासित म्हणुन ३१ वर्ष झाली !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India Today CFO and Distribution Head being grilled by ED again in the fake TRP case: Read details
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Tue, 01/19/2021 - 11:25 नवीन
काश्मीरी पंडीत आणि त्यांच्या कुटुंबावर झालेल्या अत्याचाराचा तीव्र निषेध. संपूर्ण भारतीयांसाठी काळा दिवस. आणि भारत सरकारचे पुन्हा एकदा अभिनंदन की अश्या प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत म्हणून 370 कायद्याला केराची टोपली दाखवल्याबद्दल. आता तरी काश्मीर मध्ये मुळ हिंदूंचे पुनर्वसन करून तिथे लोकसंख्येचा योग्य तो समतोल साधला गेला पाहिजे. देशविघातक जमातीची लोकसंख्या एका ठराविक प्रमाणापेक्षा जास्त वाढून दिली की हे असेच होते त्यामुळे ही वाळवी प्रमाणात ठेवण्यासाठी त्यांच्यावर कडक निर्बंध आणि लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी कायदा करणे अत्यावश्यक आहे.. अन्यथा अजुन एक पाकिस्तान अटळ आहे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 01/19/2021 - 13:01 नवीन
किती काश्मिरी पंडीत आतंकवादी झाले आहेत ? एक तरी शोधुन दाखवता येइल का ? नाही,कारण ते खूनशी वृत्तीचे नाहीत, ते बलात्कारी वृत्तीचे नाहीत आणि ते लुटारु वृत्तीचे देखील नाहीत. पण काश्मीर मध्ये मात्र आतंकवादीच्या जनाज्याला गर्दी करणारे मात्र शांतता प्रेमी समाजाचे आहेत नाही का ? शाहीन बाग झाले तरी मिडिया यांचीच बाजू घेत राहिला. लव्ह जिहादाच्या घटना होत राहिल्या तरी मिडिया डोळे बंद करुन बसला होता... आता तांडव सुरु झाले ! असो... आज महाराणा प्रताप यांची पुण्यतिथी आहे, त्यांना कोटी कोटी नमन ! जाता जाता :- हिंदूंच्या स्त्रिया,मुली आजही फसवल्या जात आहेत, पळवल्या जात आहेत आणि बलात्कार करुन भोगल्या जात आहेत, तरी काही मिडियावाले म्हणतात लव्ह जिहाद असं काही नाहीच आहे. मेरठ: नौकरी के नाम पर हिंदू लड़कियों को फंसाकर रेप, फिर पोर्न वीडियो से ब्लैकमेलिंग के जरिए कराता था धर्मांतरण, मो. आफताब गिरफ्तार शादीशुदा सोहैल ने सन्नी बन कर युवती को फंसाया, धर्म परिवर्तन के लिए मारपीट, 'लव जिहाद' में गिरफ्तार

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India Today CFO and Distribution Head being grilled by ED again in the fake TRP case: Read details
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 01/19/2021 - 15:30 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 01/21/2021 - 18:29 नवीन
मे २०२१ मध्ये केरळ, तामिळनाडू, पॉंडीचेरी, बंगाल व आसाम या ५ राज्यात विधानसभा निवडणुक होणार आहे. या निवडणुकीसाठी एबीपी न्यूज व सी-व्होटर यांनी केलेल्या निवडणुकपूर्व सर्वैक्षणाचे अंदाज रोचक आहेत. बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेस २९४ पैकी १५४ जागा मिळवून सत्ता राखेल असा अंदाज आहे. परंतु २०१६ च्या तुलनेत तृणमूलला ५७ जागा कमी मिळतील. दुसरीकडे भाजपने २०१६ मध्ये फक्त ३ जागा जिंकल्या होत्या. परंतु २०२१ मध्ये भाजप तब्बल १०२ जागा जिंकण्याचा अंदाज आहे. तामिळनाडूत द्रमुक २३४ पैकी १६० जागा जिंकून सत्तेवर येईल, तर अद्रमुकची संख्या १२४ वरून वर येऊन सत्ता गमवावी लागेल. केरळमध्ये सध्या सत्तेवर असलेले डाव्या आघाडीचे सरकार १४० पैकी ८६ जागा जिंकून सत्ता टिकवेल. २०१६ प्रमाणे २०२१ मध्येही कॉंग्रेसप्रणित आघाडीचा पराभव होईल. आटोकाट प्रयत्न करूनही भाजपला जास्तीत जास्त २ जागा मिळू शकतील. १२६ सदस्यांच्या आसाम विधानसभेत सत्तेवर असलेल्या भाजपप्रणित रालोआची सदस्यसंख्या ८६ वरून ७७ वर घसरली तरी सत्ता टिकून राहील. कॉंग्रेसची संख्या २६ वरून ४० वर पोहोचेल. ३० सदस्यांच्या पॉंडीचेरी विधानसभेत सध्या सत्तेवर असलेल्या कॉंग्रेस-द्रमुक आघाडीला १४ जागा मिळतील. भाजप-अद्रमुक आघाडीला १६ जागा मिळून सत्तांतर होईल. https://www.google.com/amp/s/www.financialexpress.com/india-news/assembly-elections-2021-opinion-poll-predicts-big-gains-for-bjp-in-west-bengal-left-to-retain-kerala-fortress/2174095/lite/
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 01/21/2021 - 18:56 नवीन
इंडिया टुडे हे साप्ताहिक दरवर्षी जानेवारी व ऑगस्टमध्ये मतदार सर्वेक्षण करून मतदारा़चा व जागा़चा अंदाज देतात. आज जाहीर झालेल्या सर्वेक्षणाच्या अंदाजानुसार जर आज लोकसभा निवडणुक झाली तर रालोआला ३२१ जागा मिळून (त्यात एकट्या भाजपला २९१ जागा) रालोआ पुन्हा सत्तेत येईल. कॉंग्रेसप्रणित संपुआला ९३ जागा मिळतील (त्यात एकट्या कॉंग्रेसला ५१ जागा). एकंदरीत पंतप्रधान मोदी व रालोआची लोकप्रियता अबाधित आहे, तर कॉंग्रेस अजूनही गाळात आहे. टाळेबंदी, टाळेबंदीमुळे घसरलेली अर्थव्यवस्था, पंजाब-हरयाणातील शेतकऱ्यांचे आंदोलन, शिवसेना-अकाली दल या पक्षांनी दिलेली सोडचिठ्ठी, चीनबरोबरील युद्धस्थिती अशा गोष्टींचा मतदारांवर प्रभाव पडलेला दिसत नाही. https://www.indiatoday.in/mood-of-the-nation/story/covid-china-no-challenge-bjp-still-poised-to-win-clear-majority-if-polls-held-today-finds-motn-survey-1761471-2021-01-21 https://www.indiatoday.in/mood-of-the-nation/story/motn-poll-pandemic-recession-protests-couldn-t-lock-down-pm-narendra-modi-1761508-2021-01-21
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 01/22/2021 - 09:40 नवीन
युएइ आणि आपले संबंध अधिक घनिष्ट होत असुन दोन्ही देशांना या संबंधातुन मोठा फायदा होणार आहे. UAE Air Force to help 3 Rafale fighters reach India, 7 more in April UAE Air Force to help 3 Rafale fighters reach India, 7 more in April Desert Knight 2021 :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Ex-Desert Knight 21: Rafale to roar over Jodhpur skies during Indo-French air exercise
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 01/22/2021 - 10:43 नवीन
सुशांत सिंग विषयी काहीच व्हिडिओ पोस्ट करत नाही. खून होती आत्महत्या ह्या विषयी latest काहीच माहिती तुम्ही देत नाही. कसा मिळणार सुशांत ला न्याय. राम कदम,कंगना,आणि बरेच जण सुशांत विषयी गप्प आहे. सुशांत ला न्याय देण्याची लढाई बिहार निवडणूक झाली की संपली काय? आणि सीबीआय नी काय दिवे लावलेत त्या केस मध्ये त्याची पण माहिती न्यायप्रिय अर्णव महाराज देत नाहीत.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Fri, 01/22/2021 - 10:48 नवीन
https://www.loksatta.com/lokmanas-news/loksatta-readers-response-letter-abn-97-75-2385025/ "नामांतर करायचेच...................." औरंगाबाद च्या नाव बदलण्यासंबंधीचे तेथील नागरिकाचे मत
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 01/26/2021 - 16:56 नवीन
ममता बॅनर्जी इतकी मूर्ख असेल असे मला वाटले नव्हते ! :))) [ ममता तिच्या राज्यात दंगली घडवुन येण्यास प्रोत्साहन देइल का ? ] शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली दलाल आणि लाभार्थी यांनी जो हिंसाचार माजवला तो अतिशय निंदनिय आणि घृणास्पद दिसला. ट्रॅक्टर रॅलीची परवानगी दिली गेली तर त्या परवानगीचा उपयोग पोलिसांच्या अंगावरच ट्रॅक्टर घालण्यात केला गेला. हे शेतकरी आंदोलनाचे ढोंग आता सरकारने मोडुन काढायला हवे. ज्या तिरंंग्याच्यासाठी आपले वीर सैनिक स्वतःचे बलिदान देतात त्या तिरंग्याचा आज अपमान देखील या ढोंगी आणि देशहित विरोधी आंदोलनाने केला, या आंदोलनला ज्या ढोंगी राजकारण्यांनी पाठिंबा दिला ते देखील यास तितकेच जवाबदार आहेत. :( चीन सीमेवर मिसाइल सकट येउन बसला आहे, आपले लाखो सैनिक त्याच बॉर्डवर आपले रक्षण करण्यासाठी दिवसरात्र हाड गोठवणार्‍या थंडीत देखील आपले कर्तव्य निष्ठेने बजावत आहेत, त्यांचा तरी विचार आता लोकांनी करायला हवा... युद्धाचे सावट समोर असताने असली आंदोलने देशहिताची नसुन देशद्रोही आहेत. ६२ नंतर आता चीन परत सज्जतेने सीमेवर बसला आहे, काळ आणि वेळ सांगुन येत नसते हे करोनाने अधोरेखित केलेच आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- North Sikkim Clash: China तिलमिलाया है वो कुछ न कुछ करने का कोशिश करेगा, तैयार रहना चाहिए- GD Bakshi
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 01/27/2021 - 11:56 नवीन
ती जनतेला मूर्ख बनवत आहे. काही राजकारणी मंडळी अशीच असतात. भारतात, राजा जयसिंगच्या पावला वर पाऊल टाकून चालणारी मंडळी, कमी नाहीत. आणि अशा मंडळींना, साथ देणारी, त्यांचे गुणगान करणारी लाचार मंडळी, पण कमी नाहीत.
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 01/27/2021 - 08:33 नवीन
"[जगभरात] कोविड लस पुरवठा करण्यास भारत सज्ज" - पं. मोदी [twitter, 19Jan] यासंदर्भात भारत सरकार कडून वॅक्सिन मैत्री या हॅशटॅग चा वापर करण्यात येतोय. भारत या कार्यक्रमांतर्गत अनेक देशांना लस डोसेज पाठवत/पाठवणार आहे. जवळपास २ कोटी डोसेज भारत आपल्या शेजार्‍यांना पाठवण्याची योजना करत आहे आणि त्यानंतर जगभरात आणिक अनेक देशांना तसे पाठवेल. २६ जाने. पर्यंतच्या माहितीनुसार भूतान [१.५० लक्ष], नेपाळ [१० लक्ष], बांगलादेश [२० लक्ष], मालदिव [१ लक्ष], म्यानमार [१५ लक्ष], सेशेल्स [०.५ लक्ष] यांना डोसेज पाठवलेले आहेत. हे सगळे डोसेज नि:शुल्क आहेत. यानंतर व्यापारी करार तत्त्वावर पुढचे डोसेज पाठवले जातील. लिंक श्रीलंका आणि अफगाणिस्तानला देखील पाठवण्याची तयारी चालली आहे. हे डोसेज पाठवण्यासोबतच एक छोटा ट्रेनिंग प्रोग्रॅम देखील करवल्या जातोय ज्यात लस देण्यासंदर्भातील माहिती दिल्या जातेय. लिंक या सगळ्यात आणिक महत्त्वाची बाब म्हणजे, चीन उत्पादित लस घेण्यासाठी प्रयत्न करणारे देशसुद्धा भारताकडे येत आहेत. भारतातही २४ जाने. पर्यंत १६ लक्ष डोसेज देण्यात आलेले आहेत. लिंक
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 01/27/2021 - 08:37 नवीन
ब्राझिल आणि मोरोक्कोला व्यापारी तत्त्वावर लस पुरवठा करण्यात आलाय आणि पहिली शिपमेंट पोहोचलेली आहे. लिंक
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 01/27/2021 - 15:34 नवीन
आणि दोन मोठ्या लेकींची हत्या भयानक प्रकार आहे. आईवडील उच्चशिक्षित आहेत.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 01/29/2021 - 07:14 नवीन
कठीण आहे
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Fri, 01/29/2021 - 06:59 नवीन
पेट्रोल 94 ₹ झाले . भक्तांना ऑर्गझ्म आला असेल. हे देशाच्या भल्यासाठी आहे हे पटवून सांगतील . मग यांचे जुने ट्विट यांच्या तोंडावर मारले तर खरे-खोटे करणारे लोक्स गोल पोस्ट बदलून विषय भरकटत राहील याची काळजी घेतील
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 01/29/2021 - 07:13 नवीन
महाराष्ट्रातील, ह्या सरकारला, जनतेची इतकी काळजी आहे की, जसे वीज दर कमी करण्याचे आश्र्वासन दिले, तसेच, इंधनावरील कर माफीचे, आश्र्वासन पण देतील .... जाताजाता, इतर काही राज्यात, महाराष्ट्रापेक्षा इंधन स्वस्त आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 01/29/2021 - 07:16 नवीन
२०१३ मध्ये ८४ होते. त्या तुलनेत फारशी वाढ नाही.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 01/29/2021 - 07:21 नवीन
भक्तांना ऑर्गझ्म आला असेल. ???? किती ती जळजळ?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 01/29/2021 - 07:49 नवीन
करोना संपला की, इंधनदर अजून वाढतील. मागणी आणि पुरवठा, यांचे संतुलन, ओपेकच्या हातात आहे. ती राष्ट्रे त्यांचे नुकसान भरून काढणारच.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Fri, 01/29/2021 - 19:36 नवीन
जाने. २०१४ ला कच्च्या तेलाचा दर रु .६३०० प्रतिबॅरल होते आणि पेट्रोलचा दर रु. ८० प्रति लिटर होता. आज कच्च्या तेलाचा दर रु. ३८०० प्रति बॅरल असताना पेट्रोलचा दर रु.९२ प्रति लिटर आहे. असे का बरं ?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 01/30/2021 - 04:12 नवीन
या विषयावर पूर्वी अनेकांनी लिहिले आहे. पहिली गोष्ट म्हणजे इंधनावर केंद्राप्रमाणे राज्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर कर लावून उत्पन्न मिळवितात. इंधन, मद्य, विडी-सिगरेट इ. दुभत्या गायी असल्याने या गोष्टींंचा वस्तू व सेवा करांतर्गत समावेश करण्यास सर्व राज्यांनी विरोध केल्याने यावर किती कर लावायचा यावर कोणतीही मर्यादा नाही. त्यामुळे हे दर कमी करण्यास कोणतेही राज्य व केंद्र तयार नाही. अजून एक कारण म्हणजे अंदाजपत्रकातील वित्तीय तूट कमी करणे, कच्चे तेँल साठवण करण्यासाठी नवीन केंद्रे बांधणे, देशातील वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प, संरक्षण खात्यावरील खर्च इ. साठी केंद्राकडून कच्च्या तेलातून मिळालेला महसूल वापरला जातो. इंधन दर कमी केले तर यातून मिळणारा महसूल कमी होऊन या प्रकल्पांसाठी होणारा वित्तपुरवठा कमी होऊन प्रकल्प रेंगाळतील.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 01/30/2021 - 04:30 नवीन
कापून खाण्या सारखे आहे
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Sat, 01/30/2021 - 07:35 नवीन
आयकर , वस्तू सेवाकर वसूलीत वृदधी झाली असं सरकार म्हणत असतं , मग केंद्र सरकारला पेट्रोलजन्य पदार्थांवर कर वाढवायचे कारण काय? आणि केंद्र सरकार हा पैसा खर्च करत असेल तर अर्थव्यवस्था गटांगळ्या का खात आहे? हे सरकार आल्यापासून सतत जिडीपी घसरत आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 01/30/2021 - 08:53 नवीन
अभ्यास व वाचन वाढवा, म्हणजे कारणे समजतील.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Sat, 01/30/2021 - 09:12 नवीन
अच्छा! म्हणजे तुम्हाला ह्याचे उत्तर ठाऊक नाही किंवा तुमचा तेव्हडा अभ्यास नाही. असंच ना?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/30/2021 - 09:23 नवीन
एका तेलियाने ही दोन पुस्तके वाचलीत, तर काही समजेल ....
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 01/30/2021 - 09:59 नवीन
माझा अभ्यास आहे व उत्तर सुद्धा माहिती आहे. परंतु निद्रेचे सोंग घेतलेल्यांना जागृत करण्याची मला आवश्यकता वाटत नाही. स्वतः वाचन वाढवा व अभ्यास करा. आपोआप उत्तरे मिळतील.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Sat, 01/30/2021 - 10:33 नवीन
नुसतं ' माझा अभ्यास आहे उत्तर सुद्धा माहीत आहे ' असं बोलून नाही चालत . कितपत अभ्यास आहे हे सांगितल्याशिवाय कसं कळणार? शाळेत उत्तर पत्रिकेत असेच लिहायचे का? किंवा शाळेतील मुलं तुम्हाला असंच उत्तर देतात का?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 01/30/2021 - 10:45 नवीन
मी सर्व काही सांगेन, पण ते ऐकणाऱ्याला समजायला नको का? ऐकणारा अज्ञानी असेल तर सांगून कळणारच नाही. तस्मात् अभ्यास व वाचन वाढवा. अनेक प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतील.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/30/2021 - 10:47 नवीन
स्वतः माहिती गोळा केली तरच फायदा होतो
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/30/2021 - 09:20 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Fri, 01/29/2021 - 14:33 नवीन
मुंबई च्या लोकल ट्रेन पुन्हा चालू ! महाराष्ट्र सरकारने अखेरे ट्रेन चालू करुन दाखवल्या. सरकारने सर्वसामान्यांसाठीचे वेळापत्रक इतके अफलातून बनविले आहे की ज्याचे नाव ते ! सामान्यांना कोणत्या वेळेत परवानगी ? १. पहिली लोकल (साधारण पहाटे ४.३० ते सकाळी ७ पर्यंत) २. दुपारी १२ ते दुपारी ४ ३. रात्री ९ ते रात्री शेवटच्या लोकलपर्यंत (म्हणजे साधारण मध्यरात्री १ पर्यंत). वरील वेळेत कामावर कसे जाणार आणी घरी कसे येणार ? त्यापेक्षा सरकारने सरकारी कार्यालयातील व्यक्ती, अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती यांना या वेळेत प्रवास करायला लावावा. हवे तर त्यासाठी एक हुच्चस्तरीय समिती नेमावी आणि पुढील फेब्रुवारी २०२२ पर्यंत अहवाल द्यावा. तोपर्यंत रेल्वे सेवा बंद ठेवावी. आणि हो त्या समितीत मला पण घ्या. माझ्याकडे पण अशा अफलातून कल्पना आहेत. अजून कोणाला काही कल्पना सुचत असतील तर इथे लिहा. आम्हाला श्रेय नको. सरकारने श्रेय घेतले तरी चालेल. मात्र कल्पना अफलातूनच हवी.
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Fri, 01/29/2021 - 14:39 नवीन
वाह्ह... करून दाखवले.. !!!! आईभवानी चा आशीर्वाद आणि साहेबांची पुण्याई.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 01/29/2021 - 14:56 नवीन
हे सरकार आल्या पासून, मी नंदनवनात रहात आहे ...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 01/29/2021 - 14:43 नवीन
असे अगाध ज्ञान, ऐकल्यापासून, मी आजकाल, जास्त विचार करत नाही... आमचे बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात,"80% लोकांनी नाकारलेल्या पक्षाचा, मुख्यमंत्री आहे. महाराष्ट्रातील 20% जनता फक्त शहाणी आहे.त्यामुळे, 20% लोकांचाच विचार करून, निर्णय घेतल्या जातील." असो, आपल्याला काय? लहानपणी तीन पायांची शर्यत खेळायचो,आता प्रत्यक्षात बघत आहे. आनंद घ्यायचा ....
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 01/29/2021 - 19:14 नवीन
तुम्हा लोकांना ना मेलं कश्शाचं कौतुकच नाही. ज्यावेळेस गर्दी असते त्यावेळेसच बंद करावं लागणार ना? मुंबईसारख्या ठिकाणी करोनासाठीची गर्दी टाळून लोकल चालू करून दाखवा पाहू! या अफलातून कल्पनेत आणिक भर टाकण्याचा मोह आवरत नाही. सकाळी चर्चगेट कडे जातांना आणि संध्याकाळी विरारकडे जातांना लोकल ला खूप गर्दी असते. त्यावेळेस त्या त्या बाजूची लोकलसेवा बंद ठेवायची. गर्दीत सुद्धा लोकल चालवून दाखवली सा शेरा स्वतःलाच देऊन पाठ थोपटून घेण्याची नामी संधी! [काही खास लोकांसाठी - हा उपरोधिक प्रतिसाद आहे हे कृपया ध्यानात घ्यावे अशी णम्र विनंती]
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 01/29/2021 - 20:31 नवीन
वजा 7 वर भारताचा GDP आणून दाखवलच
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 19 hours ago
  • सुंदर !!
    1 day 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा