Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

शेतकरी आंदोलन कि हिंदू शीख वाद उकरणे ?

च
चौकस२१२
Mon, 12/28/2020 - 06:29
🗣 111 प्रतिसाद
"बघा या आंदोलनामाचेगे कोण आहे आणि किती त्यामागे आयोजन आहे वैगरे" सांगणारी व्हॉट आप विद्यालयावरील एक अजून भिंतीला तुंबड्या लावणारी "पोस्ट"\म्हणून आलेल्या पोस्ट कडे सुरवातीला दुर्लक्ष केले... भाजपचं "आय टी सेल" मधून आलेली म्हणून अशी पोस्ट वाटली असे धरू .. परंतु खालील अनुभववरुन यात खरंच काही तरी "काळे बेरे" आहे असे मात्र आता वाटत आहे. "कोणत्याही आंदोलनापथी काही तरी मूळ कारण असते/ दुख्ख असते " आणि ते तसेच या आंदोलनामागे खरंच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे असे धरले तरी यातून एक वेगळाच धोका आहे आणि हे मूळ आंदोलन "कोणीतरी " अपहृत केले आहे काय याबद्दल आता शंका नक्कीच येत आहे ... खालील आरोप खरंच दुर्लक्ष करण्यासारखेच आहेत का ? आंदोलनावर केला गेलेला एक गंभीर आरोप म्हणजे यामागे कोण आहे? - दावे तर असणार : त्यात काही आश्चर्या वाटण्यासारखेच नाही आणि वावगं नाही, त्यांचे तत्वात कोणतेहि बाजाराचे खुलीकरने निषिद्ध आहे मग ते यात सहभागी असले तर नवल ते काय . - भारताचं सीमेपलिकडले देश? हा मात्र आरोप मला आता खरा वाटू लागलं आहे शत्रू चा शत्रू तो मित्र या न्यायाने पाकिस्तान ( सेना आणि धार्मिक पाकिस्तानी दोन्ही ) भारताविरुद्ध ( म्हणजे ८०% हिंदू असलेल्या देशाविरुद्ध) खलिस्तानवाद्यांसारख्याना पाठिंबा देता असणार हा आरोप काही नवीन नाही .. याची रूपे खास करून कानडा आणि युनाइटेड किंग्डम मधील शीख खलिस्तानवादी कसे आहेत हे हि नवीन नाही परंतु यावेळी मात्र हे एक "हिंदू आणि शिखांच्यात " फूट पाडण्याचे कारस्थान आहे हे खरे वाटू लागलाय कारण कि कानडा आणियुके पासून दूर असलेल्या ऑस्ट्रेलिया सारखया छोटी देशात सुद्धा जे काही "आंदोलन" समर्थक आहेत त्याला एक प्रकारचे "शीख विरुद्ध हिंदू किंवा बाकी भारतीय " असे रूप दिसत आहे.. - बहुतेक आंदोलक शीख का? केरळ, बंगाली, मराठी आणि तामिळ लोक इथे आहेत कि? ते का नाही सहभागी ? - खालसा एड सारख्या संस्थांचा सहभाग ( पहा हा विडिओ हर्षल स्वकुळ या मूळ भारतीय पत्रकार जी आता मेलबर्न येथे राहते आहे तो विडिओ https://www.youtube.com/watch?v=-t7TbWn7V7M ) - पाठिंबा आंदोलन कि फक्त मोदी आणि भाजप हटाव हि मुख्य भूमिका कोणत्याही हिंदूला असावा तास मलाही शिखांबद्दल आदर आहे आणि तो राहीलच पण हे जे " भारत विरोधी / हिंदू विरोधी" चालू आहे ते बघून वाईट वाटते ... समस्त भाजपविरुद्ध मिपाकरांना एक आवाहन भाजपला धोरणांवर विरोध जरूर करा पण हे जे काही घडतंय त्याकडे कानाडोळा करू नका ...

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 43719 views

🗣 चर्चा (111)
स
साहना Mon, 12/28/2020 - 08:00 नवीन
एखादे जनावर मरायला टेकले तर सर्व छोटी श्वापदे आशेने लाळ गाळत गोळा होतात त्याचा प्रकारे काहीही छोटे मोठे बदल केले कि हि मंडळी आपल्या बिळांतून बाहेर येतात. हजारो वेळा आमरण उपोषण करणारे अण्णा हजारे सुद्धा इथे उडी मारणार आहेत असे मी आधीच इतर ठिकाणी लिहिले होते. आता म्हणे हे शेवटचे आमरण उपोषण असणार आहे म्हणे कारण ह्याच्या नंतर पुन्हा आमरण उपोषण ह्यांच्या आरोग्यास म्हणे मानवणार नाही. आधीच वय झाले आहे, ह्या आमरण उपोषणाच्या नादात जीव बीव जायचा ! दिल्लीत होणारे आंदोलन खरे तर शेतकरी आंदोलन नाहीच मुळी, निकृष्ट दर्जाचा माल अतिशय आळशी पणाने आणि इतर करदात्यांच्या पैश्यावर निर्माण करणाऱ्या आणि पाच पैसेही कर न देता तो माल सरकारच्या PDS सिस्टम मध्ये गल्लेलठ्ठ रेटवर विकणाऱ्या उन्मत्त गुंडांचा आहे. मुळांत MSP हे प्रकरण अतिशय मूर्खपणाचे आहे. ह्यांत खलिस्तानी, पाकिस्तानी मंडळींचा १००% हात असेल. आता एकदा इथे हाणामारी वगैरे झाली कि ती न्यूस वापरून अनेक सरदार मंडळी मेक्सिको मधून अमेरिकेत प्रवेश करेल आणि निर्वासित म्हणून आश्रय मागेल. मग अश्या प्रकारच्या कथा पुरावा म्हणून पेश केला जातो : https://www.theguardian.com/world/2020/feb/03/india-migrants-mexico-us-border ह्यांतील अनेक आश्रित शेवटी वेठबिगार म्हणून अमेरिकेत राबवले जातात : https://www.nbcbayarea.com/news/local/gilroy-liquor-store-owners-charged-with-human-trafficking-da/2394641/
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Mon, 12/28/2020 - 08:30 नवीन
राजेश 188 आणि प्राध्यापक डॉक्टर दिलीप बरुटे यांच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत. !!!
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Mon, 12/28/2020 - 09:29 नवीन
माझ्या माहितीतल्या सामान्य शेतकऱ्यांचा ह्या आंदोलनाला पाठिंबा दिसत नाही. >>>>दिल्लीत होणारे आंदोलन खरे तर शेतकरी आंदोलन नाहीच मुळी, निकृष्ट दर्जाचा माल अतिशय आळशी पणाने आणि इतर करदात्यांच्या पैश्यावर निर्माण करणाऱ्या आणि पाच पैसेही कर न देता तो माल सरकारच्या PDS सिस्टम मध्ये गल्लेलठ्ठ रेटवर विकणाऱ्या उन्मत्त गुंडांचा आहे. मुळांत MSP हे प्रकरण अतिशय मूर्खपणाचे आहे.>>>>>>> पण ह्या असल्या कॉमेंट्स टाळता आल्या पाहिजे. आळशी शेतकऱ्यांना कर माफी मिळत असेल तर तुम्ही स्वतः आंदोलन करून अशी कर माफी बंद पाडा. प्रत्येक उद्योगधंद्याला काही प्रमाणात सवलती मिळतच असतात, तरी पण पोट दुखत असेल तर योग्य ठिकाणी आवाज उठवला पाहिजे. आपण हे थोड्यावेळ समजू की हे आंदोलनाला पाकिस्तान, चीन, खालीस्थानी चा पाठिंबा आहे तर मग केंद्र सरकार त्यांच्यावर कारवाही का नाही करत? उलट त्यांना चर्चेला बरोबर जेवणाचे आमंत्रण का देत आहे? ते पन कर दात्यांच्या पैशातून, म्हणजे आपल्या देशाचे शत्रू आपल्या राजधानी मध्ये आंदोलन घडवून आणून काही रस्ते बंद करतोय आणि केंद्र सरकार त्यांना जेवणाचे आमंत्रण देतेय एवढंच नाही तर त्यांच्या काही मागण्या पण मान्य करतय. पण आपले प्रामाणिक कर दाते मात्र पाकीस्तान, चीन आणि खलिस्तान वाद्यांनाच शहाणपणा शिकवत आहेत.
  • Log in or register to post comments
स
साहना Mon, 12/28/2020 - 20:48 नवीन
> आळशी शेतकऱ्यांना कर माफी मिळत असेल तर तुम्ही स्वतः आंदोलन करून अशी कर माफी बंद पाडा. प्रत्येक उद्योगधंद्याला काही प्रमाणात सवलती मिळतच असतात, तरी पण पोट दुखत असेल तर योग्य ठिकाणी आवाज उठवला पाहिजे. जे कायदे सध्या सरकारने रद्द केले आहेत त्यामुळे हे होणारच आहे. त्यामुळे मला आंदोलन वगैरे करायची गरजच नाही. थोड्याफार सवलती आणि शेतकऱ्यांना मिळणारी खिरापत ह्यांत प्रचंड फरक आहे. त्याशिवाय माहुतेक धंद्यांना मिळणारी सवलत हि काहीतरी उच्च दर्जाचा माल निर्माण करण्यासाठी असते. पंजाबातील शेतकऱ्यांना मिळणारी खिरापत किंवा MSP हे प्रकरण निकृष्ट दर्जाचा शेतमाल निर्माण करण्यासाठी आहे. फुकट वीज, फुकट पाणी आणि वरून MSP हि निव्वळ चोरी आहे. अश्या चोरांच्या गर्दीत देशविघातक संघटना घुसल्या नाही तरच आश्चर्य. टीप: मी खलिस्तान चे १००% समर्थन करते. पाकिस्तानी पंजाबचे खलिस्तान निर्माण झाले पाहिजे. कॅनडा स्थित शीख बांधवानी अशी मागणी करावी आणि भारत सरकारने त्यांचे समर्थन करावे हि मागणी.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 12/28/2020 - 09:31 नवीन
1) देश covid19 च्या छायेत असताना,उभा देश लॉक डाऊन मध्ये असताना शेती सारख्या महत्वाच्या क्षेत्र विषयी कायदे पास करून लगेच त्याची अमलबजावणसाठी प्रयत्न करायची सरकार ल कोणती घाई झाली होती. 2) तीन शेती विषयक कायदे आहेत साठवणूक करण्यास परवानगी.. देशभर वितरण करण्यास परवानगी . कॉर्पोरेट क्षेत्राला शेती मध्ये गुंतवणूक करण्यास परवानगी,शेती करण्यास परवानगी.( कॉन्ट्रॅक्ट शेती मध्ये हे सर्व येते) आणि उत्पादन किमती वर आधारित भाव शेतकऱ्यांना msp म्हणून देण्याची कोणतीच तरतूद कायद्यात न करणे. ह्या तिन्ही एकत्रित कायद्याचा परिणाम असा होईल. शेती कॉन्ट्रॅक्ट farming च्या आडून कॉर्पोरेट क्षेत्र करेल. निघालेल उत्पादन हवं तेवढे दिवस आणि हवं तेवढा साठा केला जाईल. आणि कृत्रिम तुटवडा निर्माण करून देशभर योग्य वेळी विक्री केली जाईल. असे सर्व आक्षेप आहेत. कॉन्ट्रॅक्ट farming साठी काय नियम आणि अटी आहेत ह्या विषयी सरकार नी काहीच सांगितले नाही. लोकांचा आक्षेप आहे ,लोकांना भीती वाटतं आहे. आंदोलन करणारे कथित खलिस्तानी,आहेत तर. सरकार नी कायद्या ना स्थगिती देवून लोकसभेत ,राज्य सभेत परत ह्या विषयावर चर्चा केली पाहिजे होती. आक्षेप नोंदवण्यास लोकांना सांगितले पाहिजे होते. त्यांना आपली बाजू मांडण्याची रीतसर संधी दिली पाहिजे होती. आणि लोकांना वाटणारी भीती दूर केली पाहिजे होती. पण हे सर्व न करता हिवाळी अधिवेशन च रद्द केले. खलिस्तानी आंदोलक म्हणून it cell शेतकऱ्यांना बदनाम करायला लागली. ह्याचा सरळ अर्थ आहे सरकार ची नियत ठीक नाही.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Mon, 12/28/2020 - 10:02 नवीन
लोकांना वाटणारी भीती दूर केली पाहिजे होती. पण हे सर्व न करता हिवाळी अधिवेशन च रद्द केले. खलिस्तानी आंदोलक म्हणून it cell शेतकऱ्यांना बदनाम करायला लागली.
सहमत. हे नेहमीचेच आहे.
  • Log in or register to post comments
स
साहना Mon, 12/28/2020 - 20:53 नवीन
> शेती कॉन्ट्रॅक्ट farming च्या आडून कॉर्पोरेट क्षेत्र करेल. निघालेल उत्पादन हवं तेवढे दिवस आणि हवं तेवढा साठा केला जाईल. - मंडी मधील सरकारी दलाल हे (म्हणजे साठेबाजी) आधीपासूनच करत आहेत आणि हीच मंडळी इथे आंदोलक म्हणून दिसत आहे. ह्यांच्या पार्शवभागावर लत्ताप्रहार झाला आहे ह्याचा आनंदच आहे. - भारतांत जिथे जिथे कॉर्पोरेट क्षेत्राने विस्तार केला आहे तिथे तिथे सरकारी बाबूपेक्षा कित्येक पटीने जास्त चांगली सुविधा कमी दरांत मिळत आहे. अगदी बिग बाजार मधील साखर पासून ते स्कोडाची ऑक्टेव्हिया पर्यंत सगळी कडे मुक्त बाजार व्यवस्थेने देशाचे भले झाले आहे. फक्त शेतकऱ्यांना ह्या पासून वचिंत ठेवणे हे नेहमीच "feudal" प्रकार आहे. - भाजपचे IT सेल मूर्खांनी भरलेले आहेत. ह्यांना अक्कल असती तर खूप प्रभावी पणे त्यांनी कायद्याची माहिती जाणते पर्यंत नेली असती.
  • Log in or register to post comments
ध
धनावडे Sun, 01/03/2021 - 11:07 नवीन
साहेब आमच्या इथले शेतकरी बिगबास्केट ला स्ट्रॉंबेरी थेट विकून वाशी APMC पेक्षा जास्तच भाव मिळवत आहेत, अट फक्त एकच दर्जा, आणि खराब दर्जा मुळे माल परत पाठवला तरी एकाही शेतकऱ्यांची तक्रार नसते. शेतकऱ्यांना कळत आपल हित, कॉन्टॅक्ट शेतीत काही वाईट नाही.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 12/28/2020 - 16:12 नवीन
"कोणत्याही हिंदूला असावा तास मलाही शिखांबद्दल आदर आहे आणि तो राहीलच पण हे जे " भारत विरोधी / हिंदू विरोधी" चालू आहे ते बघून वाईट वाटते " का बुवा असा विशेष आदर ? जमीनी विकुन कॅनडा/लंडनला/अमेरिकेला जाउन स्थायिक होतात म्हणून्? असो. शीख लोक परदेशात जाउन सेटल झाले की त्यांच्या खलिस्तानी भावना उफाळून येतात हा अनुभव आहे. आपण ईतर भारतियांपेक्षा कसे वेगळे आहोत हे गोर्या माणसाना दाखवुन देण्यात अनेक समाज पुढे असतात त्यात शीख समाज आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 12/29/2020 - 01:17 नवीन
माईसाहेब : मी भारतातील शिखांबद्दलच्या आदर बद्दल बोलत होतो ..त्यांचा इतिहास आणि भारतासाठी त्यांनी त्यांच्या संख्येच्या मानाने दिलेले बलिदान... आता पुढे परदेशात गेल्यावर ते कसे वागतात ( त्यातील काही) या बद्दलचे आपले विधान बरोबर आहे पण माझा एकूण शिखांबद्दल आदर असण्याचा आणि त्याचा काय संबंध? शीख / जैन / बुद्ध हे हिंदूंना त्यामानाने जवळचे हे सर्वश्रुत नाही का? एकवेळ हिंदू आणि मूलमानात सलोखा नाही झाला तर त्याचे फार काही आस्चर्य आणि दुःख हि वाटणार नाही परंतु शिखांच्यात आणि हिंदूत हे नाही व्हायला पाहिजे असे वाटते .. त्यात गैर ते काय ? मागे आठवतंय शिवाजी मैदान मुंबई येथे काहीतरी संघाचा किंवा सेनेचा मेळावा होता त्यात एक छायाचित्र प्रदर्शन होते त्यात गुरु गोविंद साहेबांचा आणि गौतम बुद्धांचे पण छायाचित्र जरूर लावले होते ....त्यामागची भावना जी असले तीच भावना मी मांडतोय ...असो राजेश: "खलिस्तानी आंदोलक म्हणून it cell शेतकऱ्यांना बदनाम करायला लागली" महाराज .. आपण नुसते आरोप ना करता या खालील मुद्य्यांची मुद्देसूद उत्तरे द्याल तर बरे होईल माझा मूळ धागा या कायद्याबद्दल नवह्ताच तर तो होता यातून निर्माण होणाऱ्या हिंदू शीख तेढी बद्दल ... असो ते आपल्या लक्षात आले नसावे - prashna शेतकऱ्यांचा आहे तर मग देशातील इतर राज्यातील शेतकरी आणि त्यांचे भारताबाहेरील मित्र natewaik तेवढ्याच हिरीरीने रस्त्यावर का नाहीत ( खास करून आज मेलबर्न सारखया ठिकाणी अनेक पंजाबी ( बिगर शीख) आणि इतर राज्यातील लोक भरपूर असताना ? - जगभरच्या या "समर्थन" मोर्चात पाट्या पंजाबीत का? - फलकांवर शीख धर्माचे चिन्ह का? - ८४ च्या शीख दंगलींचा उल्लेख का? ( swakul yancha video jara barkaine bagha ) - निळे पगडी घातलेलं "धार्मिक शीख" यात का ? निहाल आर्मी कि काय ते - लंडन , नेऊ योरॉक सारखी शहरे जाऊदेत हो आणि अगदी मेलबर्न / सिडनी सारखाई प्रसिद्ध शहरे हि जाऊदेत .. जगाचं कपाऱ्यातील ऑस्ट्रेलियातील छोट्या गावातून सुद्धा इलेकट्रोनिक बोर्ड वॉर "इंडियन फार्मर्स//// वैग्रे पाट्या आणि त्यात इंग्रजी बरोबर पंजाबी madhye का lihile आहे कोणिका असेना पण कोणीतरी जगभरचया शिखांना हे जणू आपले धर्मयुद्ध आहे असे भासवत आहे आणि हिंदू आणि शिखाच्यात फूट पडणे हा हि या मागचं हेतू आहे हे जर दिसत नसेल तर धन्य आहे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 12/29/2020 - 04:36 नवीन
शीख लोक परदेशात जाउन सेटल झाले की त्यांच्या खलिस्तानी भावना उफाळून येतात हा अनुभव आहे.
भारतीय लोक परदेशात म्हणजे ऑष्ट्रोलिया वगैरे देशात जाऊन सेटल झाले की सध्याच्या सरकारबद्दल लिहिण्याच्या डू आयडींच्या भावना उफाळून येतात असे गडबडीत वाचले. बाकी, चालू द्या....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 12/29/2020 - 07:54 नवीन
प्राध्यापक महाशय आपण मूळ प्रश्नाबद्दल बोललात तर बरे होईल प्रत्येक जण भाजपचं आयटी सेल मधला आहे किंवा भारताबाहेर स्थायिक झालं म्हणजे तो आंधळं संघी असला पाहिजे वैग्रे नेहमीच पालुपद बास झालं - एकतर या कायद्यात धोका कसा आहे ते मुद्देसूद पणे मांडा नाही तर मी जो मूळ विषय मांडलाय त्यातील मुद्यांवर बोला ( शेतकरी कि हिंदू शीख तणाव ) उद्या जर खरंच शिखांच्यात हिंदू विरोधी भावना तीव्र झाली तर ते हे बघणार नाहीत कि तुम्ही निधर्मी सर्वधर्मभावी लिबरल भारतीय आहेत कि पहाटे संघाचं शाखेवर जातंय.. त्यांचं साठी तुम्हीही काफीरच ठराल ( काफिर हा हा शब्द आपल्या इतर प्रेमळ धर्माचं अनुयायांकडून उसना घेतला आहे ) निदान गेला बाजार ( नो पन इंटेंडेड ) कृषी उत्पन्न बाजार समिती कशी काम करते , हमी भाव , त्यातील चांगले आणि वाईट असा एखादा संशोधन पर निबंध तरी लिहा हो परदेशात गेल्यावर "कोणत्या भावना उफाळून येतात" ते आमचं आम्ही बघू
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 12/28/2020 - 17:52 नवीन
ह्याची 1 सविस्तर लिस्ट ध्या. १) bjp सरकार ल विरोध करणे हे देश विरोधी हिंदू विरोधी कृती आहे का? 2) सर्व धर्माचा सन्मान राखून त्यांना संरक्षण देणे हे देश विरोधी ,हिंदू विरोधी कृती आहे का? 3) एकच धर्माला सरसकट देश विरोधी ,हिंदू विरोधी ठरवणे हे देशप्रेम आहे का? 4) भाषिक स्वयत्ता मागणे हे देश विरोधी कृती आहे का? ५) विविध भाषा देशात बोलल्या जात आहेत,देशात विविध संस्कृती आहेत त्यांनी स्वतःची भाषा सोडून स्वतःची संस्कृती सोडून, वैदिक संस्कृती पाळावी हे देशप्रेम आहे का? आणि हिंदी ची गुलामी करावी हे देश प्रेम आहे का? हेच जर देशप्रेम असेल तर नको तो देश आणि नको त्या देशावर प्रेम अशी भावना लोकांत नक्कीच निर्माण होईल.
  • Log in or register to post comments
स
साहना Mon, 12/28/2020 - 22:00 नवीन
ह्याची 1 सविस्तर लिस्ट ध्या. १) bjp सरकार ल विरोध करणे हे देश विरोधी हिंदू विरोधी कृती आहे का? हिंसा करणे, संपत्तीची नासधूस करणे आणि आंदोलनाच्या आड चोरी करणे हे राष्ट्र विरोधी कृत्य आहे. त्याशिवाय आंदोलक मंडळी ह्या वादांत विनाकारण आपला धर्म घुसवत आहेत, सरकार किंवा भाजप पाठिराख्यांनी इथे धर्म आणला नाही. आंदोलक मंडळींनी आपल्या धर्माचा बाऊ केला आहे. 2) सर्व धर्माचा सन्मान राखून त्यांना संरक्षण देणे हे देश विरोधी ,हिंदू विरोधी कृती आहे का? ह्याचा अर्थ काय ? संपत्तीची नासधूस करणार्यांना धर्म मग कोणताही असो सामान्य चोरांप्रमाणे वाचविले पाहिजे. 3) एकच धर्माला सरसकट देश विरोधी ,हिंदू विरोधी ठरवणे हे देशप्रेम आहे का? हा कुठला धर्म आहे आणि असे कुणी ठरवले ? स्पष्ट करून सांगाल काय ? 4) भाषिक स्वयत्ता मागणे हे देश विरोधी कृती आहे का? धर्म आणि साम्यवाद कमी होता काय म्हणून भाषा सुद्धा ह्या वादांत घुसवली जातेय ? ५) विविध भाषा देशात बोलल्या जात आहेत,देशात विविध संस्कृती आहेत त्यांनी स्वतःची भाषा सोडून स्वतःची संस्कृती सोडून, वैदिक संस्कृती पाळावी हे देशप्रेम आहे का? आणि हिंदी ची गुलामी करावी हे देश प्रेम आहे का? इथे गुंड मधील लंबू आटा चा डायलॉग आठवतो : "खिसकेली है क्या ? " > हेच जर देशप्रेम असेल तर नको तो देश आणि नको त्या देशावर प्रेम अशी भावना लोकांत नक्कीच निर्माण होईल. आपली खरी गरळ इथे दिसून येते आहे. तुमच्या सारख्याना शेतकरी काय किंवा सामान्य माणूस काय ह्यांचे काहीही पडून गेलेले नाही. "देश " हि जी तुमची संकल्पना आहे त्याच्याबद्दल तुम्हाला प्रचंड द्वेष आहे आणि वाट्टेल त्या विषयांची सरमिसळ करून देशांत गोंधळ घालणे आणि आग लावणे हा निर्लज्ज उद्योग आपला आहे. काही तरी शुल्लक कायद्याचा बाऊ करून जणू काही देशांत भुकमारी येणार आहे, सर्व पैसे अंबानी (ज्यांनी अजून शेती व्यवसायांत पाय सुद्धा ठेवला नाही) नेणार अश्या अफवा पसरवणे. दलालांच्या आंदोलनाला उगाच "शीख आंदोलन" म्हणून भासवणे, त्यांत मग भाषा धर्म आणि वेदिक संस्कृती इत्यादी घुसावणे हे फक्त रिकामटेकडे साम्यवादी लोक किंवा विदेशी शक्तींच्या तुकड्यावर शेपटी हलवणारे नालायक लोकच करू शकतात. इतर कुणाला इथे जास्त वेळ आहे ? देश म्हणजे सरकार नव्हे आणि सरकार विरुद्ध कितीही भांडण उकरून काढणे हे देशप्रेमच आहे पण त्यासाठी सामान्य देशवासियांना वेठीस धरणे, APMC दलालांना हिरो करणे, खाज़गी संपत्तीची नासधूस करणे, देशाला प्रगतीपथावर नेणाऱ्या कॉर्पोरेट जगताला नुकसान पोचवणे म्हणजे आपल्या घराला आग लावण्यासारखे आहे. देशद्रोह आहे कि ठाऊक नाही पण मूर्खपणा जरूर आहे. दुसऱ्या देशांत राहणाऱ्या माझ्या सारख्या व्यक्तींना ह्यामुळे विशेष फरक पडत नाही पण भारत देशांत कर्मभूमी असणाऱ्या लोकांनी इथे सतर्क राहणे आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 12/29/2020 - 01:20 नवीन
साहना बरोबर सहमत अगदि मुद्यचे बोल्ने आहे
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 12/29/2020 - 01:43 नवीन
१) bjp सरकार ल विरोध करणे हे देश विरोधी हिंदू विरोधी कृती आहे का? - नाही परंतु २ वेळा ठणकावून लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकार वर प्रत्येकवेळी " हुमशाही " चे आरोप करणे हे मात्र देहविरोधी आणि देशाच्या लोकशाही विरोधी कृत्य आहे 2) सर्व धर्माचा सन्मान राखून त्यांना संरक्षण देणे हे देश विरोधी ,हिंदू विरोधी कृती आहे का? "सर्व धर्माचा सन्मान राखून त्यांना संरक्षण देणे" हेच तर हिंदूंनी केलाय आणि त्याला "सहिष्णुता " असे म्हणतात ...एखाद्या पारश्याला विचारा राजेशभाऊ 3) एकच धर्माला सरसकट देश विरोधी ,हिंदू विरोधी ठरवणे हे देशप्रेम आहे का? कोणत्या धर्माला ठरवल हो? सागा ना स्पष्ट ? अहो हिंदूंना पण हिंदुराष्ट्र्र नकोय पण हिंदूंचा अपमान ( काँग्रेस ने केलेले) हा थाबवा हेच म्हणणे आहे , भाजपावाले आता मुसलमानच नरसार होणार वैगरे कोणी उठवलं होता ? झाला ? 4) भाषिक स्वयत्ता मागणे हे देश विरोधी कृती आहे का? नाही ...भाषवर प्रांतरचं तर आहेच कि... कोण म्हणतंय कि हे देश विरोधी आहे म्हणून ?पण भाषा स्वायत्त आणि मग त्यात धर्म आणणे ( गोव्यातील पूर्वी कोकणी मराठी वाद आठवा.) हे मात्र चुकीचे आणि देशविरोधी होऊ शकते ५) विविध भाषा देशात बोलल्या जात आहेत,देशात विविध संस्कृती आहेत त्यांनी स्वतःची भाषा सोडून स्वतःची संस्कृती सोडून, वैदिक संस्कृती पाळावी हे देशप्रेम आहे का? आणि हिंदी ची गुलामी करावी हे देश प्रेम आहे का? देशाची ८०% जनता हिंदू आहे आणि त्याचा परिणाम अगदी सार्वजनिक चालीरीतींतून दिसणार आणि किती हि निधर्मी सरकार म्हणले तरी निदान संस्कृती या नावाखाली तरी अगदी सरकारी कार्यक्रमातून सुद्धा .. पचत नसेल तरी पचवा ... अमेरिकेचे अध्यक्ष आणि ऑस्ट्रेलिया चा पंतप्रधान जर निधर्मी देशात ख्रिसमस चा सॅन अधिरूत रित्या साजरा करतात तर भरतोय पंतप्रधानाने हिंदू संस्कृती जपली तर काय अधिकार आहे प्रश्न विचारायचा? विठ्ठलीचॆ पूजा मुख्यमंत्री करतो / ते हे काँग्रेसी काळात का नाही हो खुपलं तेव्हा अशी पूजा हे धार्मिक कृत्य आहे याचाच साक्षत्कार भाजप सत्तेवर अळ्यावरचा लक्षात आलं का? हिंदीची गुलामी? कशी काय? गेला बाजार मोदी आणि शाहूची मातृभाषा तर गुजराथी होती ! हेच जर देशप्रेम असेल तर नको तो देश आणि नको त्या देशावर प्रेम अशी भावना लोकांत नक्कीच निर्माण होईल. बरे झालेत स्पष्ट केलेत ते .. आता तुम्हाला अर्बन नक्षल म्हणून म्हणाल्या सगळे मोकळे ... घाला धुडघूस
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 12/28/2020 - 18:18 नवीन
माझ्या वाचण्यात आणि पाहण्यात जे आले आहे त्यावरून हात तथ्य वाटते.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Tue, 12/29/2020 - 06:05 नवीन
"They are the last communists, they believe class is a total explanation." संपूर्ण शीख लोकसंख्येचा आदर करणारे किंवा परदेशातील सगळी शीख मंडळी विशिष्ठ प्रकारे वागतात असं वाटणारे लोकं पक्के कम्युनिस्ट दिसतात :)
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 12/29/2020 - 07:41 नवीन
''सं वाटणारे लोकं पक्के कम्युनिस्ट दिसतात...." या पावली चे नक्की म्हणणे काय आहे? - सर्व शीखखांबद्दल सर्वसकट आदर असा आंधळेपणा मी करतोय असे अजिबात नाही .. लहानपणापासून जे संस्कार झाले त्यात एक सर्वसामान्य हिंदू म्हणून विस्तरित हिंदू समाजबद्दल कुतूहल आणि आदर आहे हे फक्त मांडले ... किंवा परदेशातील सगळी शीख मंडळी विशिष्ठ प्रकारे वागतात असा सरसकट पणा मी करीत नाहीये येथ बरेच भारत निष्ठ शीख पण आहेत परंतु त्याच बरोबर - येथील समर्थन मोर्चायतून जे दिसतंय / फलकातून जे दिसतंय त्यामुळे मी माझे विचार मांडले अजून एक उद्धरण देतो , येथेतरी काही वर्षात आलेला अनुभव - दुकानात भारतीय म्हणून एखाद्या शिखांशी विचारले कि तुम्ही कुठले तर उत्तर मूळ भारतातील असे ना येत आजकाल बरेचदा " पंजाबी शीख" असे येते आणि बरेचदा गाडीवर शीख धर्माचे चिन्ह आवर्जून असते.. त्यामानाने येथील हिंदू आपलं धर्म सगळीकडे दर्शवत हिंडताना तसे कमी दिसतात .. प्रत्येक हिंदूंचं गाडीवर ओम नसेल पण प्रत्येक शिखांच्या गाडीवर शीख शुभचिन्ह जरूर दिसते ... त्यात ताई पहिले तर वावगे काही नाही म्हणा ..पण मनात कुठेतरी शंकेची पाल चुकचुकते कि हे सगळे कुठंतरी कसे तरी करून शीख कसे वेगळे आणि हिंदू आणि त्याच्यात कसा वेगळे पणा दाखवयाचा निर्धार करून केलेले प्रयतत्न दिसतोय आणि या आंदोलनाचं माध्यमातून तो सरळ सरळ उघडपणे बाहेर आला आहे अर्थात हे मी प्रदेशातील परिस्थिती बद्दल बोलतोय...भारतात हे जाणवत नसेल कदाचित
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Tue, 12/29/2020 - 07:16 नवीन
ह्या मोर्चामुळे काँग्रेसला ८४ च्या दंगलीमुळे झालेली शीख विरोधी प्रतिमा सुधारण्याची संधी मिळाली आहे आणि काँग्रेस तिचा पुरेपुर वापर करतेय.प्रतिमा जरी सुधारली गेली नाही तरी बीजेपी ला पण शीखविरोधी दाखवले कि दोन्ही पक्ष ह्याबाबतीत तरी समान पातळीवर येतील.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 12/29/2020 - 08:34 नवीन
अमृतसर पंजाब,हरियाणा मध्ये वाटले गेले आणि वेगळे पणाची बीजे रोवली गेली. त्यांच्या हक्काचं शहर पण पंजाब ला मिळाले नाही. अजुन पण कारणे आहेत. एकाध्य समाज घटकांवर ठरवून अन्याय करायचा आणि तरी त्यांनी विरोध करायचा नाही अशी आशा ठेवायची ही हुकूम शाही वृती झाली. हुकूम शाही वृत्ती सरकार च असेल तर विरोध पण सशस्त्र च होणार. शेतकऱ्या ना कायदे अडचणी चे वाटत आहेत तर त्या वर चर्चा न करता त्यांचे म्हणणे ऐकून न घेता ते कायदे लादणे ही हुकूम शाही वृत्ती च आहे. आणि तरी शेतकऱ्या नी विरोध करायचा नाही ही काही च्या काही अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments
स
साहना Wed, 12/30/2020 - 08:34 नवीन
> हुकूम शाही वृत्ती सरकार च असेल तर विरोध पण सशस्त्र च होणार. खरा रंग इथे दिसून येतोय. आपण आता हिंसेचे समर्थन करत आहात. साष्टांग दंडवत.
  • Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन गुरुवार, 12/31/2020 - 01:02 नवीन
आपण मागे एका धाग्यावर illegal बांधकामाचे समर्थन करत होता ,आपणास पण दंडवत
  • Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन गुरुवार, 12/31/2020 - 01:02 नवीन
आपण मागे एका धाग्यावर illegal बांधकामाचे समर्थन करत होता ,आपणास पण दंडवत
  • Log in or register to post comments
र
रंगीला रतन Tue, 12/29/2020 - 08:52 नवीन
अमृतसर पंजाब,हरियाणा मध्ये वाटले गेले आणि वेगळे पणाची बीजे रोवली गेली.
ठोका तेज्जाला कायपण. भारताचा नकाशा तरी बघितलाय का तुम्ही कधी?किती फेकाफेकी कराल?चुकीची माहिती रेटून सांगायला तुम्ही पण शिक्षक आहात का?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 12/29/2020 - 08:59 नवीन
मला चंदीगड लिहायचे होते. अमृतसर चा चुकीच्या पद्धतीने उल्लेख केल्या बद्द्ल क्षमस्व.
  • Log in or register to post comments
ॲ
ॲबसेंट माइंडेड… Tue, 12/29/2020 - 14:19 नवीन
पंजाबातील ड्रग माफिया या सोकॉल्ड आंदोलनामागे आहेत. त्यांच्या फंडिंगच्या जीवावर शेतकरी आंदोलनाचा तमाशा चालू आहे. एका बाजूला असलेली पाकिस्तानची सीमा ज्यामार्गे अफगाणिस्तानातून ड्रग्स आयात केली जातात. ते ड्रग्स, हिमाचल प्रदेश, हरयाणा, राजस्थान आणि पूर्वीच्या जम्मू काश्मीर अशा पंजाबच्या सीमावर्ती राज्यांमधून भारतभर पुरवले जातात. जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्यापासून आणि सुशांत सिंग राजपुतच्या प्रकरणा नंतर ncb जास्तीच सक्रीय झाल्यावर या अवैध धंद्यावर गंडांतर आले. ड्रग माफियांमध्ये चलबिचल त्यावेळेपासून सुरु होती तिला या नव्या शेतकरी विधेयाकांचे निमित्त मिळाले. ISI, ब्रिटन आणि जगभरचे खलिस्तान समर्थक, कॅनडातील पंजाबी ड्रग माफिया व या अवैध धंद्यातून मलिदा मिळणारे भारतातील अनेक भ्रष्ट राजकारणी अशी अभद्र युती तयार झाली जी या सगळ्या प्रकरणामागे आहे. त्यांच्या सुरात सूर मिसळायला सद्य सरकारचे कट्टर विरोधक हिरीरीने पुढे आले. सरकारने अशा लोकांच्या दबावाला बळी पडू नये आणि बहुसंख्य शेतकऱ्यांच्या हितासाठी सदर विधेयाकांची अंमलबजावणी करावी. (डाव्या विचारांचा नसलेला) प्रोफेसर.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 12/29/2020 - 15:27 नवीन
केंद्रात बहु मतातातील सरकार आहे. 5 वर्ष ते कोणाच्याच दबावाला बळी पडणार नाही. पण 5 वर्ष नंतर सरकार चाच बळी दिला जाईल आणि दुसरे सरकार येईल
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 12/30/2020 - 05:03 नवीन
5 वर्ष नंतर सरकार चाच बळी दिला जाईल आणि येणार कोण? राहुल गांधी कि केजरीवाल कि ममता दीदी? आमच्या लहानपणी लहान मुलांना दुर्री ते छक्की दिली जात असे आणि मोठे लोक एक्का ते अठ्ठी घेऊन खेळत असत. त्यामुळे मुलांनी कितीही पिसले तरी एक्का येतच नसे. अशीच स्थिती विरोधी पक्षांची आहे. मराठीत याला एक ना धड भराभर चिंध्या म्हणतात. बाकी ५ खासदार निवडून आणलेल्या पक्षाचे सर्वेसर्वा २२ खासदार निवडून आणलेल्या ममता दीदींना भाजपशी दोन हात कसे करायचे याचा सल्ला देतात हे पाहून करमणूक झाली. आणि ते पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत आहेत तसं आता वातावरण छान आहेच. गाजरं खाऊन घ्या
  • Log in or register to post comments
स
साहना Wed, 12/30/2020 - 08:33 नवीन
५ वर्षानंतर सुद्धा मोदींचेच सरकार येण्याची दाट शक्यता आहे. (मी मोदी समर्थक नाही आहे असे नमूद करू इच्छिते). पण सरकार कोणाचेही येवो, मुक्त बाजारव्यवस्थेची गोड फळे एकदा जनता चाखू लागली कि मग उलट साम्यवादी दळीद्रयाच्या दिशेने कोणताही गाढव जात नाही. एकदा का खाजगी बाजारपेठा जागो जागी उघडल्या कीं नंतर कुठलेही सरकार त्यांचे वाकडे करू शकणार नाही. ह्याची जाणीव ह्या दळभद्री दलाल मंडळींना सुद्धा आहे म्हणून ह्यांनी आता हिंसक स्वरूप घेतले आहे. हे सुद्धा हळू हळू थंड पडेल आणि पंजाबी शेतकरी सुद्धा खुल्या बाजारपेठांचा फायदा घेणाय अग्रेसर होईल. उपाशी पडतील ते दलाल लोक आणि त्यांच्या पैश्यावर लेख लिहिणारे विचार-जंत.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 12/30/2020 - 01:42 नवीन
राजेश ...."....दुसरे सरकार येईल" येईल सुद्धा.. लोकशाही आहे ... आणि तो पर्यंत तरी सकारत्मक विरोध करा ... ते असो... हा धागा काढला होता फक्त शेतकरी आंदोलनाचे धर्मयुद्ध.." या उपविषयवर.. आपला नेहमीच "या सरकारचे काय चुकले हे पालुपद" निरीक्षण केलेल्या धाग्यातील मुद्यवर बोला ! किंवा शेती माल विपणन यवरेक सखोल अभ्यासात्मक धागा काढा.. आम्हाला हि केलेले कि "देशभरातील" शेतकरी ज्यवर पेटून उठलाय ते काय ते ? ... त्या आंदोलका सारखे.. मोदी शहा अदानी आणि अंबानी हे गुऱ्हाळ खूप झालं आणि हो भारतभर राहिलेल्यांचाच याच्याशी काय संबंध कोणी म्हणत असेल तर २ गोष्टी १) मी भारताबाहेरील शीख समुदायाचं वागण्याबद्दल लिहिले होतो .. दिल्ली किंवा नांदेड मधील शीख काय करीत आहेत या बद्दल नाही २) भारतीय शेतकऱ्यांना मदत चालूच आहे कि अनेक वर्षे अंदाजे ३०%किराणा भारतातूनच आणतो कि हो... ,आणि ते सुद्धा चांगली किंमत मोजून पार्ले जी पासून ते हिरव्या मिरचांपर्यंत ... आखाती देशात असेल तर ५०% असेल हेच प्रमाण तेवहा ५ वर्षे वैग्रे नंतर च बघू सध्या काय जळतंय ते पहा
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 12/30/2020 - 05:04 नवीन
पंजाब्/हरयाणा वगळता ईतर राज्यांतील शेतकर्यांचा विरोध नाही ह्या बीलांना. स्वामीनाथन अय्यर ह्यांनी म्हंटल्याप्रमाणे हे कायदे अस्तित्वात येणे गरजेचे आहे. पण एका रात्रित परिस्थितीत फरक पडेल असे नाही. चांगले बदल हळूहळू होतात. उद्योजकांना लहान शेतकर्यापर्यत पोचण्यासाठी चांगल्या पायाभूत सुविधा लागतील
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 12/30/2020 - 09:28 नवीन
नवीन तीनही कृषी कायदे मागे घेण्यावर कृषी संघटना अडून बसल्या आहेत. त्यामुळे आजच्या चर्चेत फार काही निष्पन्न होण्याची शक्यता दिसत नाही. जाता जाता . . . भटारखाने, खाण्यापिण्याची व फळांची रेलचेल, पाय चेपण्याची स्वयंचलित यंत्रे इ. असलेले आंदोलन पहिल्यांदाच पहात आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 12/30/2020 - 09:32 नवीन
मोफत वायफाय आणि १६ टन मोफत अननस! https://m.lokmat.com/national/aap-government-install-wifi-hotspots-farmers-protesting-delhi-borders-a597/
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Wed, 12/30/2020 - 09:43 नवीन
आंदोलन नसून शिखांचे ( खलिस्तान वाल्यांचे ) वयक्तिक फ्रस्ट्रेशन आहे. सर्व नेते आणि आंदोलक हे दाढीवालेच आहेत. (व्यवस्थित पहा , क्वचित एखादा बिगर दाढीवाला, पंजाबी नसलेला माणूस दिसेल.) सरकार ने जास्त भाव देऊ नये.. यांचे फंडिंग संपले कि आपोआप निघून जातील. जसे शाहीन बाग वाले बिर्याणी संपल्यावर गेले तसे. जाता जाता - या आंदोलनास शेतकरयांचे आंदोलन म्हणून संबोधने हा शेतकऱयांचा अपमान आहे. कुणालाही आंदोलन करण्यास विरोध नाही पण आंदोलनामागे फॅक्ट्स असाव्यात. उगागच... फक्त आम्हाला भीती वाटतेय म्हणून आंदोलन केले तर लोकं सपोर्ट करणार नाहीत. एक दाढीवाले (मुसलमान ) लोकं देखील CAA NRC च्या वेळेस आम्हाला बाहेर काढतील या अनाठायी भीतीपोटी आंदोलन करत होते.. आणि आता देखील हे दुसरे दाढीवाले आम्हाला उद्योगपती लुबाडतील आणि भूमीहीन करतील या भीतीपोटी आंदोलन करतायेत. बहुसंख्य शेतकरी आणि नॉन शेतकरी देखील या आंदोलनाकडे आता टाईमपास म्हणून पाहतायेत. जितके महत्व या डाव्या लोकांनी या आंदोलनास दिले त्यामुळे प्रत्येक घरात या कायद्यबद्दल माहिती समजली आणि बहुसंख्य लोकं आता शाहणे झालेत. अवांतर - पूर्वी खांग्रेस पक्षाचे निवडणूक चिन्ह बैल गाडी कि बैल असे काहीतरी होते त्यावेळी लोकांना इमोशनली ब्लॅकमेल केले जायचे कि बैल नसतील तर आपण खाणार काय?? त्यामुळे बैलावरच शिक्का मारा आणि निवडून दया.. त्यामुळे बरेच वर्षे भारतात "बैल" च राज्य करत होते.
  • Log in or register to post comments
स
सॅगी Wed, 12/30/2020 - 09:55 नवीन
या आंदोलनाला शेतकरी आंदोलन म्हणण्यापेक्षा पिझ्झा पार्टी आंदोलन म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल. "आंदोलन" हा शब्दही रेल्वे/रस्ते अडवले आहेत म्हणून, नाहीतर जे काही चालले आहे ते एखाद्या पार्टीपेक्षा कमी नाही.
  • Log in or register to post comments
य
यशवंत पाटील Wed, 12/30/2020 - 10:43 नवीन
शेतकर्यांवर लईच चिडले आहेत मिपाकर कुणी मिपाकर कधी कोणत्या आंदोलनात गेला होतात का त्यांचे काय अनभव असतील ते वाचायला मिळतील का तोवर काय सिरेस आहे काय नाही ते कळना झालय कुणालाबी चुकीच ठरवाया जास्तीच काही लागत नाही बरोबर असल तर पटवाया मेहनत करावी लागतेय असला जमाना आलाय
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 12/30/2020 - 11:44 नवीन
शेतकर्यांवर लईच चिडले आहेत मिपाकर... नाही पाटील साहेब शेतकऱयांवर नाही तर या "आंदोलनामागे असलेल्या / उघड दिसणाऱ्या फुटीरतावादी / काहीही करू पण या सरकार ला विरोधच करू / मूळ प्रशांवर नीट बोलायचं नाही या वृत्तीवर चिडलेत मिपाकर प्रत्येक वेळेला सरकार नि हे द्या ते द्या हेच का? कुठेतरी समतोल साध्याचया प्रयत्न केलं तर लगेच "भांडवशी अदानी अंबानी काढायचे ..जणू काही सध्याचे दलाल मार्क्स चे आजे आणि पणजे आहेत कि! सगळ्यास्नी समतोल वाटून देणारे उपकारी .. या धाग्यात तर मी एक वेगळाच मुद्दा मांडला होता ( धार्मिक रंग ) तो तर राहिला बाजूलाच. आणि अजूनही कोणी मूळ प्रश्न काय यावर बोलतच नाही बघा तुम्हाला माहिती असेल तर सांगा - शेतीमालाची विक्री कशी चालते ? - बाजार भाव समिती कशी चालावी हा मूळ हेतू होता आणि प्रत्यक्षात काय होते ? - नवीन कायद्याचे नक्की फायदे किंवा तोटे? (एक भारताबाहेरील शेतीप्रधान देशातील रहिवासी)
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Wed, 12/30/2020 - 12:57 नवीन
पाटील साहेब.. तुमचा शेतकरी असण्याचा ego बाजूला ठेवा आणि स्पष्ट आणि मुद्देसूद काय ते बोला. मी किंवा इथे जे कोणी प्रतिसाद देतायेत ते शेतकऱ्यांना विरोध म्हणून नव्हे तर आंदोलनाच्या आड जे काही चाललेय त्यावर देतायेत. त्यामुळे उगाच शेतकरी शेतकरी S S S असा आकांडतांडव करू नका.. आणि ज्याला तुम्ही शेतकरी आंदोलन म्हणताय ते शेतकरी आंदोलन नसून शीख आंदोलन आहे आणि तो प्रश्न आता त्यांनी जातीय इगो चा बनवलाय. आणि त्यातच खलिस्तान वाले, APMC दलाल कम्युनिटी वाले, खांग्रेस आणि इतर शेतकऱ्यांचे दुकान चालवणारे राजकीय पक्ष आपली पोळी भाजून घेतायेत. सर्वच्या सर्व कायदे रद्द करा ही मागणी अवास्तव आणि सरकार (मोदी ) द्वेषातून आलेली आहे हे चड्डीत मुतणारे बाळ ही सांगू शकते.
  • Log in or register to post comments
य
यशवंत पाटील Wed, 12/30/2020 - 17:45 नवीन
बाप्पुसाहेब अहो वस्कु नका अंगावर. नाय आवडल तर सोडुन द्या. ईगो काय , आकांडतांडाव काय (मला तर भगवान शंकर आठवले बघा). आता तुमच्यावाणी लांबलचक लिहाया जमना. जौंदे. तुमच अक्षाी समदं बरोबर. मंग तर झालं? आता ते मुदीशेठ अन ते शेतकरी मिपा वाचतील तर ते एक बर हुईल. रामराम. वळख ठिवा.
  • Log in or register to post comments
स
साहना Wed, 12/30/2020 - 22:11 नवीन
धुम्रपानाला विरोध करणार्यांनी आधी स्वतः धूम्रपान करावे असे तुम्हाला म्हणायचे आहे का ? आंदोलनाला विरोध करण्यासाठी आधी लोकांना आंदोलनाचा अनुभव असायला पाहिजे कि आंदोलनाची कारणे काय आणि टीका काय हे जास्त महत्वाचे ?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 12/30/2020 - 11:01 नवीन
जिओचे मनोरे तोडणे, खाण्यापिण्याची चंगळ, पाय दाबायची यंत्रे, इंदिरा को ठोका;अब मोदी को भी ठोकेंगे अशा घोषणा . . . असे आंदोलन असते का?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 12/30/2020 - 11:03 नवीन
जिओचे मनोरे तोडणे, खाण्यापिण्याची चंगळ, पाय दाबायची यंत्रे, इंदिरा को ठोका;अब मोदी को भी ठोकेंगे अशा घोषणा, फक्त पंजाबमधल्या अत्यल्प शेतकऱ्यांचा समावेश . . . असे आंदोलन असते का?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 12/30/2020 - 13:55 नवीन
1) शेतकरी आंदोलनात खलिस्तान च्या घोषणा दिल्या गेल्या आणि ध्वज फडकावले गेले. आणि हे आंदोलन फुटीरवादी लोक करत आहेत. जग खूप पुढे गेलेले आहे पोलिस पेक्षा चोर जास्त हुशार असतात. फुटीरवादी लोक आंदोलन उघड करत नाही त आणि घोषणा पण सर्व मीडिया समोर येवून देत नाहीत.गुप्तता हीच ताकत असते सर्व कसे प्लॅन नुसार घडवून आणले जाते . लष्करी कारवाई सारखी च अतिशय गुप्त पने योजना आखून ते यशस्वी केली जाते. आंदोलन करून स्वतंत्र मिळवायचे आता दिवस नाहीत. त्या मुळे आंदोलनात अतिरेकी सहभागी आहेत हा मुद्दाच हास्यास्पद आहे. 2) फक्त हरियाणा आणि पंजाब मध्येच आंदोलन होत आहे. आंदोलन दिल्ली मध्ये होत आहे. दिल्ली देशाची राजधानी आहे. सर्व देशभर चक्का जाम करण्यापेक्षा फक्त दिल्लीत आंदोलन करून विरोधाची जाणीव सरकार ल करून देणे योग्य च आहे. आणि तिथे अनेक राज्यातील शेतकरी आंदोलनात सहभागी आहेत. 3) आंदोलनात दाढी वाले शीख आहेत. का शीख लोकांना आंदोलन करता येणार नाही सरकारी निर्णय विरूद्ध जाता येणार नाही. असे राज्य घटनेत लिहलेे आहे का? 4) हिंदू विरूद्ध शीख असे कधीच घडणार नाही. हिंदू धर्मीय हे काय BJP चे अंकित नाहीत. त्या मुळे bjp ल वाटत म्हणून हिंदू शीख विरोधी होतील असे वाटत नाही. 5) शेती कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचेच आहेत असा प्रचार फक्त bjp कडून च केला जातोय. Bjp chya सर्व यंत्रणा त्या साठी वापरल्या जात आहेत. G
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Wed, 12/30/2020 - 14:30 नवीन
प्रश्न ओढून ताणून बनवलेत . पुढच्या वेळेस शुभेच्छा. !!!!
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 12/30/2020 - 16:26 नवीन
एपीएमसी सरकार बंद करणार नाही आणि नवीन कायद्या मुळे कंपन्या ह्या क्षेत्रात उतरल्या की शेतकऱ्यांना विकल्प मिळेल असा एक प्रचार केला जातो. पण आता पण शेतकरी शेतकरी खुल्या बाजारात माल विकू शकतो. नवीन कायद्या मुळे नवीन काही घडणार नाही. कॉन्ट्रॅक्ट शेती ह्या कायद्या मुळे कंपन्या शेतकऱ्या चा माल कॉन्ट्रॅक्ट केल्या शिवाय विकत घेणार नाहीत . आणि कॉन्ट्रॅक्ट कसे करायचे ,काय नियम आणि अटी टाकायच्या हे कंपन्याच ठरवू शकतात. विक्री चे जाळ एकदा कंपन्यांनी निर्माण केले की दुसरे कोणी विक्री व्यवसायात टिकून च राहू शकत नाही जे लहान लहान भाजी विक्रेते आहेत ते. ह्या वाक्याला आधार म्हणून आपण ओला आणि उबर मुळे टॅक्सी चालक कसे बाजूला फेकले गेले ह्याचे उदाहरण घेवू शकतो. काही व्यक्ती च हातात शेती माल विक्री व्यवसाय गेला की स्पर्धा होवूच शकत नाही तर Monopoly होईल.. सर्वच क्षेत्रात एक हाती सत्ता असू नये त्या मुळे रोजगाराच्या Sandhya कमी होतातच आणि शोषण होण्याची शक्यता वाढते. गृह उद्योग ,सुट्टे भाग निर्मिती,किराणा दुकान,लहान सहान जे व्यवसाय आहेत त्या मध्ये मोठ्या कंपन्यांना संधी देणे म्हणजे शोषण वाढवणे असाच अर्थ आहे. आता शेती करणारे आणि शेतमाल विक्री करणारे हे दोन्ही व्यवसाय समाजातील खूप मोठा वर्ग करतो . हे असेच चालावे. कंपन्यांनी हवं तर प्रक्रिया उद्योगात त्यांचे योगदान द्यावे पण शेती करणे आणि शेतमाल विक्री करणे हे उद्योग कॉर्पोरेट क्षेत्र करू लागले तर खूप मोठी लोकसंख्या परावलंबी होईल. आणि ग्राहकांच्या हिताचे पण ते असणार नाही.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 12/30/2020 - 19:18 नवीन
ह्या वाक्याला आधार म्हणून आपण ओला आणि उबर मुळे टॅक्सी चालक कसे बाजूला फेकले गेले ह्याचे उदाहरण घेवू शकतो.
ओला/उबरमुळे रिक्शा आणि टॅक्सीवाल्यांचा माज लै कमी झालीय बाकी चालूदे
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 12/30/2020 - 17:07 नवीन
जशी ऑनलाईन शॉपिंग ऍप मुळे मोबाईल विक्रेत्यांची झाली. मोबाईल कोणी दुकानातून खरेदी च करत नाही दुकाने बंद पडली. जशी अवस्था टीव्ही केबल चालक लोकांची झाली इंटरनेट वर टीव्ही दिसायला लागल्या वर केबल व्यवसाय बंद पडला. आणि टीव्ही चॅनेल च मालक च मीडिया उद्योगाचे एकमेव लाभार्थी झाले. इंटरनेट सेवा क्षेत्रात अशीच दोन तीन कंपन्यांची monopoly निर्माण झाली. . मध्ये एक बातमी वाचनात आली अमेझॉन नी उत्पादक लोकांना वेढीस धरायला suravat केली होती . कारण विक्री व्यवसाय वर अमेझॉन चे वर्चस्व असल्या मुळे उत्पादक पण अमेझॉन वर च अवलंबून आहेत त्यांच्या ह्या majburi च फायदा घेवून उत्पादक कंपन्यांना वेठीस धरून त्यांचे स्वतःचा फायदा वाढवत होती अमेझॉन. सरकार नी अँक्शन घेवून अमेझॉन वर करोडो रुपयाचा दंड लावला . हे भारतात नाही अमेरिका की दुसऱ्या कोणत्या देशात घडले. अलीबाबा पण अशीच गुण उधळू लागली होती वर्चस्व निर्माण झाल्या वर चीन सरकार नी पण अलीबाबा च्या मुसक्या आवळल्या. हे भारतात घडू शकतं नाही भारतात कायदे हे श्रीमंत लोकांचे गुलाम आहेत. त्या मुळे शेती क्षेत्रात सरकार शेतकऱ्या च्या बाजूने कधीच उभे राहणार नाही उद्या त्यांची पिळवणूक कॉर्पोरेट क्षेत्रा नी केली तरी.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Wed, 12/30/2020 - 17:43 नवीन
खरच खूपच वाईट दिवस आलेत. स्टेनलेस स्टील मुळे कल्हईवाले बेकार झाले. प्राण्यांच्या खेळावर बंदी आली आणि मदारी, दरवेशी बेकार झाले. टॅक्सी, बस आल्या आणि आमचे कित्येक टांगेवाले बेकार झाले. आणि कॉम्पुटरमुळे तर विचारूच नका. कालचक्र उलटे फिरवायला पाहिजे आता. टेक्नॉलॉजी, प्रगती, सुविधा गेल्या खड्ड्यात.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 12/30/2020 - 18:08 नवीन
आधुनिक तंत्र आणि tech ह्याला विरोध नाही केला. मी जी उदाहरणे दिली आहेत ती भले तंत्र ज्ञान चे परिणाम दाखवत असतील तरी मला वेगळेच सांगायचे आहे ते तुम्हाला पण समजले आहे. एकच व्यक्ती,कंपनी ह्यांनी राजकीय समर्थन,आणि आर्थिक takat ह्याच्या जोरावर सर्व च व्यवसाय वर मालकी हक्क वाजवणे म्हणजे बाकी अनंत लोकांच्या धंधा,व्यवसाय करण्याचे हक्क वर आक्रमण करण्या सारखे आहे. त्या मुळे अशी काही क्षेत्र ज्या वर खूप लोकांचा उदर निर्वाह अवलंबून आहे . ती क्षेत्र मोठं मोठ्या कंपन्या आणि व्यक्ती ह्यांचा हातात कायद्या नीच न देणे हेच देश हिताचे आहे. मायक्रोसॉफ्ट नी windows वर एकहाती स्वामित्व मिळवल्या नंतर कोणता एक part जी दुसरी कंपनी निर्माण करायची तो परत फुकट ग्राहकांना द्यायला survat करून त्या संबंधित कंपनीच्या हक्क वर गदा आणली होती. तेव्हा पण मायक्रोसॉफ्ट ला खूप मोठा आर्थिक दंड भरावा लागला होता . मी जी उदाहरणे देत आहे ती monopoly निर्माण झाल्यावर बाकी लोकांचा जगण्याचा हक्क कसा हिरावून घेतला जातो त्याची उदाहरणे आहेत. कलयी, टांगेवला,हे असेल टोमणे तिथे लागू पडत नाहीत. तो माझ्या युक्ती वादाचा प्रतिवाद ठरू शकत नाही.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 19 hours ago
  • सुंदर !!
    1 day 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा