Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

घडामोडी नोव्हेंबर २०२०

म
माहितगार
Fri, 10/30/2020 - 11:14
🗣 314 प्रतिसाद
दोनेक युट्यूब पहाण्यात आल्या त्यांची नोंद घेण्याच्या निमीत्ताने आंतरराष्ट्रीय क्षितीजावरील घडामोडींचा बर्‍याच दिवसांनी आढावा घेण्याचा योग येतोय. या व्हिडीओत एक व्हिऑन या टिव्ही चॅनलच्या पलकी शर्मांच्या ग्रॅव्हीतास कार्यक्रमाचा आहे. त्यांचे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषण थोडक्यात पण लक्ष वेधक असते. आमेरीकेत डोनाल्ड ट्रंप आणि जो बिदेन अध्यक्षीय निवडणूकीत व्यस्त असल्याने आंतरराष्ट्रीय राजकारण वृत्तांकनाचे लक्ष्य तिकडे स्वाभाविकपणे अधिक आहे. कोणीही निवडून आले तरी आमेरीका भारत सामरीक संबंधांची प्रगती साधली जातानाच आर्थीक आघाडीवर भारताचा फार मोठा सरळ फायदा अध्यक्ष बदलल्याने होईल अशी चिन्हे दिसत नाहीत. अफगाणीस्तानातून बाहेर पडण्याची आमेरीकेची प्रक्रीया आस्ते कदम चालू राहील. त्याने पाकीस्तानचा अतीरेकी कारवायांपद्धतीवरील विश्वास अधिक वाढेल आणि अफगाणीस्तानातून मोकळे झालेले अतीरेकी भारतीय सीमेवर जुंपले जातील . युरोपाच्या काठावर अर्मेनीया विरुद्ध आझरबैजान असे नागोर्नो काराबाख या विषयावरून युद्ध चालू आहे. इराक आणि सिरीयातून मोकळे झालेले अतीरेकी तुर्कस्थान पडद्या मागुनच्या युद्धात वापरत असल्याच्या अर्मेनियाच्या दाव्यात अगदीच तथ्य नाही असे नसावे. याझीदींचे जे जेनोसाईड मागल्या सहा वर्षांपुर्वी झाले त्या पेक्षा अधिक भयंकर आर्मेनीयाने तुर्कस्थान कडून शंभर वर्षांपुर्विच भोगून झाले आहे, त्यामुळे नोगोर्नो काराबाख हा ख्रिश्चन बहुल भाग अझरबैजानला देण्यास आर्मेनीया तयार नाही यावरून हे युद्ध चालू आहे. रशियन हुकुमशहा स्टालीनने कोणत्या भरवश्यावर नोगोर्नो काराबाख अझरबैजानला कागदोपत्री जोडला हे माहित नाही पण सोव्हीएत संघाचे विसर्जन झाल्यापासून अझरबैजान अर्मेनीयाचे वितुष्ट मागच्या तीसेक वर्षात कायम चिघळत राहीला आहे. धार्मीक आधारावर भारताच्या विभाजनाचे समर्थन करणार्‍या पाकीस्तानला ख्रिश्चन बहुल नोगोर्नो काराबाख मात्र मुस्लिम बहुल अझरबैजानच्या मालकीत रहावा असे वाटते. दुटप्पी बोलण्यासाठी कोलांट उड्या किती सहज मारू शकतात याचे कुतूहल वाटते असा दुटप्पीपणा उघडा पाडण्यात भारतीय बर्‍यापैकी कमी पडतात. असाच निर्लज्जपणा पाकीस्तानच्या फवाद चौधरी नावाच्या मंत्र्याने पुलवामा अतीरेकीकांडात पाकीस्तानचा हात होता हे पाकीस्तानी संसदेत उघडपणे मान्य केले. भारतीय माध्यमांनी वृत्त देताच पुन्हा नरोवा कुंजरोवा केले हे पाकीस्तानचे जुनेच लक्षण आहे. फ्रान्स दोन कारणांनी बातम्यात आहे, कोविडने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केल्याने फ्रान्स कालपासून पुन्हा एकदा फुल लॉकडाऊनमध्ये गेले आहे. दुसर्‍या बातम्या फ्रान्समध्ये गेल्या पंधरा दिवसात अतीरेक्यांनी काही जणांच्या हत्या केल्या. फ्रान्समध्ये गेल्या काही वर्षात महिना दोन महिन्यात एखादी अतीरेकी कारवाई नित्याचीच झाली आहे. या वेळी एका शिक्षकाची हत्या झाल्याने फ्रान्सच्या जनता ते अध्यक्ष सर्वांनी सात्विक संताप व्यक्त करून जहाल गटांचे फ्रान्समधून समुळ उच्चाटनाचा पण घेतला तर नवल नसावे, कायदा हातात घेऊन हत्या करणार्‍या अतीरेक्यांचा निषेध करण्याचे सोडून तुर्कस्थानच्या एर्दोगन नावाच्या अध्यक्षाच्या नेतृत्वात अल्पसंख्यांक बहुल देशांनी निषेध फ्रान्सच्या अध्यक्षांचा केला कारण त्याने फ्रान्सच्या राज्यघटनेनुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बाजू घेतली. मोर्चेकाढून फ्रान्सच्या अध्यक्षाच्या फोटोला बुटाने मारणेवगैरे फ्रेंच वस्तुंचा बहीष्कार त्यापलीकडेचे मलेशियाच्या अध्यक्षांनी सर्वात एक पाऊल पुढे टाकत फ्रान्सचे अध्यक्ष ते फ्रान्सची सर्वसामान्य जनता या विरुद्ध अतीरेकी कारवाया करण्याची उघडपणे आवाहन केले असेच आवाहन मागे इराणच्या सर्वेसर्वाने सलमान रशदी विरोधात केले होते. यातील फ्रान्सच्या राजकीय भूमिकांची माहिती बातम्यातून येतेच पण मी आधी दुसरा जो युट्यूब पहाण्यात आल्याचा उल्लेख केला तो Caroline Fourest यां फेंच पत्रकाराच्या युट्यूब मुलाखतीचा यात फ्रान्समधील सेक्युलॅझमचे स्वरुप कसे वेग्ळे आहे, ते फ्रेंच लोक अभिव्यक्तीस्वातंत्र्य का आणि कसे जपू इछितात ते आमेरीकन सेक्युलॅरीझम आणि फ्रेंच सेक्युलॅरीझम मधील फरकाचे बारकावे इत्यादी रोचक आहे युटूब जरासा दीर्घ म्हणजे तासाभराचा आहे तरीपण जिज्ञासूंनी आवर्जून बघावा. युट्यूब दुवा France’s Fight Against Extremism *घडामोडींशी अनुषंगिक सोडून इतर अवांतरे, व्यक्तिगत टिका, शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी अनेक आभार.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 88419 views

🗣 चर्चा (314)
ग
गणेशा गुरुवार, 11/05/2020 - 11:40 नवीन
प्रश्न बरोबर आहे एकट्याच्याच नावे का ओरडले जातेय.. न्यायालयात मात्र मरणापूर्वी चिठ्ठीवर नाव कोणत्याही क्रमवारी वर असले तरी गुन्हा त्यामुळे कमी जास्त होत नाही.. अवांतर : आत्महत्येला प्रवृत्त केले असे सिद्ध झाल्यास काय शिक्षा असते हे मला माहित नाही.. अर्णब चेच सुशांत बद्दलचे episod पाहावे काय या माहितीसाठी..? नाही न्याय न्यायालय देतात कि न्यूज चॅनेल वाले असाच प्रश्न त्यावेळी पडत होता.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 11/05/2020 - 12:03 नवीन
काय शिक्षा असते ? Section 306 in The Indian Penal Code 306. Abetment of suicide.—If any person commits suicide, whoever abets the commission of such suicide, shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to ten years, and shall also be liable to fine.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 11/05/2020 - 18:55 नवीन
धन्यवाद, संजय जी
  • Log in or register to post comments
प
पिनाक Mon, 11/09/2020 - 20:21 नवीन
अर्थात पैसे बुडवले म्हणून आत्महत्येला प्रवृत्त केले असे सिद्ध होऊ शकत नाही. पहिला प्रकार दिवाणी न्यायालयात, दुसरा गुन्हे न्यायालयात. खरं सांगायचं तर आत्महत्येला प्रवृत्त करणे हे prove करणे प्रचंड अवघड आहे. आत्महत्या करण्यासाठीचा दबाव तुम्ही डायरेक्ट टाकला आणि त्याशिवाय त्या व्यक्तीकडे दुसरा पर्याय नव्हता हे सिद्ध करावं लागतं. ही केस होपलेस आहे हे त्या व्यक्तीच्या बायकोला ही बहुधा माहीत असावं. पण बहुधा दुसरीकडून चाव्या फिरवल्या जातायत, मराठी मराठी चा गजर केला जातोय आणि यडे मराठी लोक सरकारच्या illegal गोष्टींवर टाळ्या वाजवताहेत.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 11/05/2020 - 11:49 नवीन
बाकी दोघांनी कॉओपरेट केला आहे. अर्नब ने टीआरपी साठी तमाशा केलाय.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 11/05/2020 - 19:05 नवीन
पहिलं नाव ज्याने जास्त पैसे बुडवले त्याच्यापासुन सुरुवात करतात जनरली. (असो आत्महत्येची मानसिकता झालेला माणुस कदाचित ते ताळतंत्र विसरला असावा म्हणुन सोडुन देवु)
तुमच्या या ताळतंत्र विसरला असु शकतो, या वाक्यामुळे मी बऱ्याच घटना, काही vedio, केस या संबंधी माहिती मिळतेय का पाहिली.. शेवटी पहिले नाव अर्णब चे का याची उकल मला आत्ता मिळाली.. अर्णब चा project त्याचा आत्महत्या करण्या पूर्वीचा शेवटचा project होता.. मला वाटते काही लोक जास्तीत जास्त sastain करत असतील पण शेवटच्या धक्क्याला असह्य होत असतील. आणि त्यामुळे चिठ्ठीत शेवटी बुडवणाऱ्याचे नाव आधी असेल. असो.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Tue, 11/10/2020 - 13:09 नवीन
आणी असच जर असलं तर राहुदे त्याला मधे. आणी दररोज थोडा थोडा प्रसादही गेत चला म्हणा. पण तरीही अस असताना कुटुंबिय असा दुजाभाव का करत असावेत?
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 11/05/2020 - 11:08 नवीन
अप्रिय अर्णब आणि सपोर्टर्स, महाराष्ट्रात तुला अटक होऊन कायदेशीर कारवाई होते आहे, तुला न्याय मिळेल, उत्तर प्रदेश मध्ये असतास तर मुंबईहून अलिबागला जाताना गाडी पलटी झाली असती तू पळून जाताना तुला गोळ्या घातल्या असत्या आणि हाथरसप्रमाणे तुला मध्यरात्री कोणाला ना सांगता जाळले असते , त्यामुळे महाराष्ट्र सरकारचे आभार माना
  • Log in or register to post comments
स
सॅगी गुरुवार, 11/05/2020 - 11:21 नवीन
अर्णब गोस्वामी = विकास दुबे?? मस्तच लॉजीक आहे...
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 11/05/2020 - 11:35 नवीन
तुम्हाला हवे असेल तर उत्तर प्रदेश मधील पत्रकरांच्या हत्या पण शोधा . बाकि माफिया असायला हातात बंदूक लागते असे नाही.
  • Log in or register to post comments
स
सॅगी गुरुवार, 11/05/2020 - 11:44 नवीन
हो, पण विकास दुबे हा गुंड होता. चकमकीच्या काही दिवस आधी त्याने पोलीसांवरही हल्ला केला होता, काही पोलीस त्यात मारलेही गेले होते. आता अशा लोकांना न्यायालयाच्या मार्गाने जाउन वर्षानुवर्षे पोसत बसायचे (तेही जनतेच्या पैशाने) की ठोकायचे?
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर गुरुवार, 11/05/2020 - 11:46 नवीन
न्यायव्यवस्था सुधारायची की हा मनमानी शॉर्टकट मारायचा? तोही स्वतःच्या किंवा बोलवत्या धन्याच्या सोयीप्रमाणे?
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 11/05/2020 - 11:57 नवीन
८० व ९०च्या दशकात मुंबई पोलिस अनेक्वेळा शॉर्टकट मारायचे रे पैलवाना. गम्मत म्हणजे तत्कालिन सत्ताधार्याना किंवा पोलिस अधिकार्याना जास्त प्रश्न विचारले जात नसत. शॉर्टकट मारणार्या ह्या अधिकार्याना "एन्काउन्टर स्पेशलिस्ट" म्हणत.
  • Log in or register to post comments
स
सॅगी गुरुवार, 11/05/2020 - 12:04 नवीन
पण ते काम एका रात्रीत होणारे आहे का? आणि तोवर हे असले गुंड ज्यांना पोलीसांचेही भय नाही अशांना पोसायचे? पोलीस संरक्षण द्यायचे?? उद्या ह्याच न्याय व्यवस्थेने त्यांची सुटका केली की पुन्हा ते समाजाच्या डोक्यावर मिरे वाटायला मोकळे.....
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर गुरुवार, 11/05/2020 - 13:41 नवीन
मग तोपर्यंत ठोकत राहायचं का?
  • Log in or register to post comments
स
सॅगी गुरुवार, 11/05/2020 - 13:55 नवीन
त्या गुंडांनी कायद्याला आणि कायद्याच्या रक्षकांना (आणि निरपराध नागरिकांना) ठोकण्यापेक्षा गुंडांनाच ठोकलेलं बरं...
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Fri, 11/06/2020 - 07:28 नवीन
ते गुंड आहेत आणि त्यांनी अमूक एक गुन्हा केला आहे (जो त्यांना मारून टाकण्याची शिक्षा देण्याएवढा मोठा आहे) , हे कोण ठरवणार? पोलीस? पत्रकार? राजकीय व्यक्ती? समाज? समाज माध्यमं? न्यायव्यवस्था? यातील सर्वात विश्वासार्ह संस्था कोणती आहे? यातल्या कोणत्या संस्थेकडे 'एखाद्या गुंडाचं एन्काउंटर करायचं की नाही' याचा अधिकार (सद्य परिस्थितीमध्ये) असायला हवा?
  • Log in or register to post comments
स
सॅगी Fri, 11/06/2020 - 07:40 नवीन
जे गुंड असतात त्यांची कुंडली पोलीसांकडे असतेच, त्यामुळे हा अधिकारही त्यांच्याकडे असायला हवा...
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Fri, 11/06/2020 - 07:48 नवीन
अर्णब ची कुंडली असेलच की पोलिसांकडे ! म्हणून तर उचलला
  • Log in or register to post comments
स
सॅगी Fri, 11/06/2020 - 07:59 नवीन
माझे म्हणणे आहे की अर्णब आणि विकास दुबे हे एकाच तराजूत तोलले जाऊ शकत नाहीत.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Fri, 11/06/2020 - 09:11 नवीन
कशाला पाहिजेत ? फक्त पोलिसच ठेवा.
  • Log in or register to post comments
स
सॅगी Fri, 11/06/2020 - 09:58 नवीन
जज, कोर्ट, वकील, वधाधिकारी या सर्व सिस्टीम मध्ये जलद न्याय मिळेल अशी सोय करा...कसे?
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Fri, 11/06/2020 - 10:05 नवीन
फारच युनिक विचार आहेत.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Fri, 11/06/2020 - 08:55 नवीन
काहीतरी गडबडतंय. मी सागर गुरव यांच्या 'पोलीस' या प्रतिसादाला उपप्रतिसाद देतोय, तर हा इथं येतोय!
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Fri, 11/06/2020 - 08:54 नवीन
पोलीस सर्वाधिक विश्वासार्ह आहेत असे तुम्हाला नक्की वाटते? ते तटस्थपणे, निस्पृहपणे निर्णय घेऊन ठोकतील असे नक्की वाटते?
  • Log in or register to post comments
स
सॅगी Fri, 11/06/2020 - 09:13 नवीन
जे गुंड पोलीसांना/नागरिकांना उपद्रव करत असतील, ज्यांची मजल पोलीसांवर हात उचलण्यापर्यंत/मारण्यापर्यंत गेली असेल अशांना पोलीस तटस्थपणे, निस्पृहपणे निर्णय घेऊन ठोकतील असे मला नक्की वाटते.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Fri, 11/06/2020 - 09:27 नवीन
अभिनंदन!
  • Log in or register to post comments
श
शा वि कु गुरुवार, 11/05/2020 - 12:02 नवीन
NL मधल्या मेघनाद नावाच्या व्यक्तीने दुबेचा एन्काऊंटर होणार, असे प्रेडिक्शन केले होते, तेव्हा लागलीच पुढच्या दिवशी एन्काऊंटर झाले नाही म्हणून अर्णब गोस्वामीने नॅशनल टेलिव्हिजनवर NL ची "सेलआऊट्स, फेक न्यूज" अशी भलावण केली होती. प्रेडिक्शन खरे ठरल्यावर माफी वैगेरे मागणे तर अर्णबच्या तत्वातच नाही.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 11/06/2020 - 13:05 नवीन
@ सागर मस्तच लॉजीक आहे... करेक्शन... मुनी आणि त्यांचे प्रतिसाद यात अनेकदा लॉजीकचाच आभाव असतो ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Will Indian Army Get Access To Sensitive Maps Of Pakistan After India-US Signed Series Of Military Pacts?
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 11/05/2020 - 11:23 नवीन
फेक एन्काउन्टर म्हणजे खोटी चकमक ही मुंबई पोलिसांचीच देशाला दिलेली भेट आहे हो मुनी. ८०च्या दशकात रिबेरो कमीशनर असताना हे चालु झाले होते. कधी दाउद टोळीतल्या 'शार्प शूटर' ला मार तर कधी राजन्/शकिल/गवळी वगैरे. पकडलेल्या गुंडाची किंमत दुबईला फोन करून विचारली जाते.. सौदा पटला नाही तर मग चकमकीत मारले जाते. https://www.amazon.com/Maximum-City-Bombay-Lost-Found/dp/0375703403/ref=sr_1_1?dchild=1&keywords=maximum+city&sr=8-1 मॅक्सिमम सीटी ह्यात विस्त्रुत वर्णन केले आहे.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु गुरुवार, 11/05/2020 - 12:07 नवीन
अर्णबच्या नाव आले तरी त्याला हात लावू नये अशी अपेक्षा आहे काय ? दोन वर्षे का लागली हा योग्यच प्रश्न आहे, पण त्याच्या मुळाशी मिळणारे उत्तर का कोणाला माहित नाही ? तेव्हा उगाच वेड पांघरून पेडगावला कशाला जा ? नशीब, लायबल (अब्रूनुकसान) आणि सेडिशन सारखे कायदे वापरले नाहीयेत. एक स्टॅन्डअलोन केस आहे, अर्णबला पूर्ण संधी आहे बचावाची आणि सर्वात मोठ्ठा राष्ट्रीय पक्ष पाठराखण करतोय. काय होत नाही त्याला.
  • Log in or register to post comments
स
सॅगी गुरुवार, 11/05/2020 - 14:27 नवीन
कायद्याचं राज्य असलेल्या महाराष्ट्रात न्यायासाठी अजुन एक मागणी आली आहे. पाहु या पुढे काय होते या मागणीचे...
  • Log in or register to post comments
स
सॅगी Sat, 11/07/2020 - 08:26 नवीन
२ दिवस जाऊनही अजुन पुढे काही बातमी नाही... कायदा काहींसाठी जरा जास्तच समान असतो असे ऐकले होते....कायद्याच्या राज्यात ते खोटे ठरावे ही अपेक्षा...
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Sat, 11/07/2020 - 08:29 नवीन
तुमची प्रतीक्षा कधीच संपणार नाही.. त्यामुळे त्या मागणीचे काही होईल हा विचार विसरून जा.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 11/05/2020 - 15:22 नवीन
अर्णव आणि bjp सोडली तर कोणत्याच मीडिया ग्रुप ला,पत्रकारांना राज्य सरकार दडपशाही करतेय असे वाटत नाही राज्यसरकार वर टीका तर अनेक पत्रकार,न्यूज पेपर,न्यूज चॅनेल वाले करत असतात त्यांचा वर कधीच राज्य सरकार नी दबाव आणला नाही. अर्णव सोडून बाकी कोणालाच महाराष्ट्र मध्ये आणीबाणी सदृश स्थिती आहे असे वाटत नाही. फक्त हा अर्णव ज्याला पत्रकार म्हणता येणार नाही आणि जे तो करत आहे त्याला पत्रकारिता म्हणता येणार नाही. White कॉलर गुंड च आहे तो आणि त्याच्या वर गुंड वर जशी कारवाई करायला हवी तशीच कारवाई केली गेली आहे ह्या बद्द्ल देश भरातून महाराष्ट्र सरकार चे अभिनंदन लोकशाही प्रेमी लोक करत आहेत. फक्त भक्त,आणि त्यांचे आका डोळे, कान,बंद करून बसले आहेत
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Fri, 11/06/2020 - 05:13 नवीन
राज्यसरकार वर टीका तर अनेक पत्रकार,न्यूज पेपर,न्यूज चॅनेल वाले करत असतात
मराठी पत्रकारांबद्दल बद्दल बोलायचे झाले जमलंच तर कधी एबीपी माझा, झी २४ तास च्या पत्रकारांचे ट्विटर हॅन्डल पाहून घ्या, सगळे राज्य सरकारची तळी उचलण्यात धन्यता मानतात आणि त्यातले काही तर सिल्वर ओक च्या गेटवरच बसलेले आढळतील.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Wed, 11/11/2020 - 03:05 नवीन
ही मते उद्या जर राजदीप किंवा बरखा ला TRP घोटाळ्यात अटक झाली तर तशीच राहुदेत अश्या शुभेच्छा देतो.. निवडणुका संपल्या आहेत आणि हिशेब चुकते करायची वेळ आलेली आहे..
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Wed, 11/11/2020 - 05:15 नवीन
आनंदा.. असं होत नाही.. त्यावेळेस मग लोकशाही वर हल्ला.. आणीबाणी, फॅसीजम , भगवा दहशवाद, संविधानावावर हल्ला आणि अश्या बऱ्याच नसलेल्या गोष्टी देशात तयार होतात.. अवॉर्ड शोधून शोधून परत करण्यासाठी धावपळ सुरु होते..
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव गुरुवार, 11/05/2020 - 16:57 नवीन
तसंही अर्णवला आवरायची खलबतं सरकारी पातळीवर चालली होतीच. अर्णवने मविआ च्या शेपटावर पाय दिला. म्हणुन त्याला उचलला. कंगनाने टीवटीव केली. तिचंही ऑफीस मोडलं. हे दोघेही केंद्र सरकारच्या/सत्ताधीश पार्टीच्या आशिर्वादाखाली वटवट करायचे असा लोकांचा रास्त समज आहेच. शिवाय त्यांचा डोक्यात जाणारा आविर्भाव... त्यामुळे जनसामान्यांची सहानुभूती फार काहि मिळाली नाहि. त्यांनी त्यांच्या क्षेत्रात अनेकांशी पंगा घेतलेला, शिवाय मिडीया आणि मनोरंजन क्षेत्रात मविआ समर्थकांची लॉबी आहेच. त्यामुळे तिथुनही पाठिंबा यथातथाच. आता पुढे काय होणार? कदाचीत अर्णव परत आपल्या व्यवसायात परतेल. कंगनाचं करीअर बहुतेक दोलायमान राहील. भाजप तर तसंही नामानिराळा राहुन दुसरा एखादा अर्णव/कंगना सोडेल मविआ वर. फायदा झाला एकट्या पवार साहेबांचा. अर्णवची खोड मोडली. शिवसेनेची बदनामी करवली. सेनेला तसा काहि फरक पडत नाहि हा भाग वेगळा. सेना-भाजप मधली दरी रुंद केली. सेना भाजपाविरुद्ध आक्रमक मूड मधे आली आहेच बर्‍याच महिन्यांपासुन. सेनेला दुसरा पर्याय देखील नाहि. पण सेनेची पुण्याई संपत चालली दिवसेंदिवस. हि देखील पवारांचीच इच्छा. पुढील काहि महिन्यात सेनेवर आणखी व्यवस्थीत शिंतोडे उडवले कि अडीच वर्षांनी मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला सोपवण्याची मागणी सुरु होईल. हा सर्व खेळ त्यासाथीच चालला असावा कदाचीत. एकदम झकास.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 11/05/2020 - 19:10 नवीन
फायदा झाला एकट्या पवार साहेबांचा. अर्णवची खोड मोडली. शिवसेनेची बदनामी करवली. सेनेला तसा काहि फरक पडत नाहि हा भाग वेगळा. सेना-भाजप मधली दरी रुंद केली.
जो बायडेन निवडुन यावेत व ट्रम्प पडावेत म्हणून पवार प्रयत्नशील आहेत असेही काहीजण म्हणत आहेत. असो. हलकेच घेणे. आक्रस्ताळी भाषेमुळे अर्नबला अनेक्जण वैतागले होते. त्यात त्याच्या चॅनलच्या लोकप्रियतेमुळे अनेक चॅनल्वाल्यांच्या पोटात दुखत होतेच. आता पोलिसानी ही केस बंद का केली होती, हे कोर्ट विचारेल कदाचित व पोलिसाना स्पष्टिकरण द्यावे लागेल. भाजपावाले आता बॅकफूटवर गेले आहेत. आता कोण काय खेळी करतात ते बघायचे.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव गुरुवार, 11/05/2020 - 20:05 नवीन
कदाचीत थोडंफार लॉबींग केलेंही असतं पवारांनी ;) मोदिंनीही केलं असं म्हणतात. असो. आपण कितीही तर्क लावतो म्हटलं तरी आपल्याला किती आणि काय कळणार त्यातलं...
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 11/05/2020 - 19:21 नवीन
त्याच मुळे अटक अर्णव सारख्या फालतू व्यक्ती ची मुख्यमंत्री सेनेचा पण bjp आरोप करत आहे काँग्रेस वर . ती राष्ट्रवादी किंवा सेना ह्यांना जाहीर दोष देत नाही. म्हणून पप्पू सेना असे वाक्य असते. राज्यात काँग्रेस,राष्ट्रवादी,सेना एकत्र असतील तर bjp ni किती ही उड्या मारल्या तरी त्यांना इथे सत्ता मिळूच शकत नाही. महाराष्ट्र हे असे राज्य आहे ज्या राज्यातून सर्वात जास्त पैसा राजकीय पक्षांना मिळतो हेच राज्य जर bjp शासित नसेल तर bjp ची मस्ती पुढील 5 वर्षातच उतरेल . सेने सहित बाकी दोन्ही काँग्रेस चांगले मुरलेले खेळाडू आहेत. Bjp सारख्या सत्ता pippasu पक्षाला ते संधी देणारच नाहीत.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव गुरुवार, 11/05/2020 - 20:01 नवीन
Bjp सारख्या सत्ता pippasu पक्षाला ते संधी देणारच नाहीत.
भाजपा सत्तापिपासु, आणि इतर पक्ष काय समाजसेवेकरता आलेत का? सत्ताकांक्षा हेच सर्वांचं व्यवच्छेदक लक्षण आहे. सद्यः परिस्थिती अशी आहे कि युती करण्याची सर्वाधीक गरज राष्ट्रवादीला आहे, पण पवारांनी राजकारणच असं केलय कि राष्ट्रवादी बरोबर युती करण्याची शर्यत भाजपा आणि सेनेत लागली आहे. या सर्व प्रकरणात काँग्रेसला काहिच चॉईस नाहि. म्हणुनच भाजप राष्ट्रवादीला दोष देत नाहि, आणि सेनेचं नाक कापायचं पुण्यकर्म पवारांच्या हातुनच व्हावं अशी भजपाची इच्छा आहे. योग्य वेळी पवार तसं करतीलही. किंबहुना तेच राजकारण सध्या सुरु आहे. काँग्रेसला उचकवुन पवारांना भाजपाच्या भरीस पाडण्याची संधी भाजप शोधतय.. पण पवार इतक्या लवकर काहि करणार नाहित हे माहित असल्यामुळे भाजप तसा शांत आहे सध्या. सेना आपल्या नशीबावर आणि पूर्व पुण्याईवर जगते आहे. सेनेचा बोकड कापून पार्टी करायची भाजपा-राकाँची योजना आहे. तसं होईलच का माहित नाहि.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 11/06/2020 - 05:19 नवीन
अर्णब चे बोलताना, चर्चा bjp, शिवसेना आणि राष्ट्रवादी व काँग्रेस यावर व्हायला लागली पुन्हा.. मुद्दा किंवा विचार मांडणे योग्य.. पण चर्चाच मुद्द्यापासून डायव्हर्ट झाली.. :-)) असो..
एकट्या पवारांचा फायदा झाला?
फायदा झाला असेल तर ज्यांनी हि केस दाखल केली होती, त्यांचा झाला असे मला वाटते..
शिवसेनेची बदनामी झाली?
तुम्हाला असे वाटू शकते, पण बदनामी हि अर्णब ची झाली आहे. आणि शिवसेनेची बदनामी अमित शहा, चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र जी यांच्या ट्विट मध्ये दिसते आहे.. कि काँग्रेस च्या म्हणण्याप्रमाणे शिवसेना नाचते आहे.. गृहमंत्री राष्ट्रवादीचा आहे, त्यांचे नाव पण नाही ट्वीट ला.. आणि जर आरोपी पत्रकार असेल तर तो पत्रकार आहे म्हणुन त्याची बाजू घ्यायची कि तो गुन्हेगार नाहीये असे म्हणुन बाजू घ्यायची हे भाजपा ने ठरवावे... कारण गुन्हेगार नाहीये हे न्यायालय ठरवेल.. bjp कोण हे ठरवणारे? So ते पत्रकारिते वरती हल्ला म्हणत आहेत ते.. मग पत्रकारिते आडून पण आधी हल्ले करणारे हेच होते का? हा प्रश्न उपस्थित होतो आहे.. आणि ज्यांच्या मनात हा प्रश्न उपस्तिथ होतो त्यांना बदनामी अर्णब ची आणि राजकीय म्हणाल तर bjp ची होत आहे असे वाटते..
शिवसेना भाजप विरोधात जास्त आक्रमक झाली
येथे तरी भाजपा शिवसेने विरोधात जास्त आक्रमक वाटत आहे..भाजपा नेत्यांचे बोलणे किंवा tweet याचे पुरावे आहेत..
शिवसेनेवर शिंतोडे उडवून पवार यांनी आपला फायदा करून घेणे व मुख्यमंत्री पद आपल्या पारड्यात घेणे
हा आणखिन गैरसमज पसरवला जातोय.. तुम्हाला कदाचीत माहिती असेल राष्ट्रवादी ला काँग्रेस पेक्षा जास्त जागा आल्या होत्या तेंव्हा हि काँग्रेस चा मुख्यमंत्री राज्याला 5 वर्ष मिळाला होता, पण महत्वाची खाती राष्ट्रवादी कडे होती.. पवारांचे राजकारण एव्हडे सोप्पे नक्कीच नाही.. मुख्यमंत्री चा चेहरा घेण्यापेक्षा महत्वाची खाती घेणे हेच त्यांच्या साठी महत्वाचे आहे.. आणि 2.5 वर्षे मुख्यमंत्री पद तर त्यांना bjp पण देऊ शकते :-)) विरोधक आधी हे सरकार 100 दिवसात पडेल म्हणत होते आता वर्ष झाल्यावर 2.5 वर्ष टिकेल आणि मग पवार पाडतील असे म्हणत आहेत काय आता? मुख्यमंत्री पदाची हाव पवारांना आहे कि देवेंद्र जी आणि पर्यायाने bjp ला आहे हे एक वर्ष झाले महाराष्ट्र पाहतोय.. त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी शिंतोडे राष्ट्रवादी उडवत नसून bjp उडवत आहे हे समोर दिसते आहे..
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 11/06/2020 - 07:16 नवीन
+१ गणेशा
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Fri, 11/06/2020 - 18:38 नवीन
फायदा झाला असेल तर ज्यांनी हि केस दाखल केली होती, त्यांचा झाला असे मला वाटते..
तुम्हाला असे वाटू शकते, पण बदनामी हि अर्णब ची झाली आहे.
अर्णवची आणखी काय बदनामी होणार? त्याचा आक्रास्ताळपणा त्याकरता पुरेसा आहे. कंगना ने "क्या उखाडलोगे" म्हटलं, तिचं ऑफीस विस्कटलं. अर्णवने बोंबाबोंब केली , त्याला आत टाकलं. राज्यसरकारमधे पवार कंट्रोल्ड जरी असतं तरी फोकसमधे सेनाच आहे. कंगना, अर्णव प्रकरणं टेक्नीकली वेगवेगळे असली तरी पब्लीकमधे एकच मॅसेज गेला. सेना समर्थकांना अत्यानंद झाला, कारण नडला त्याला फोडला हिच सेनेची रीत आहे. सेना - भाजप कुंपणांदरम्यान हिंदु मतवादी/काँग्रेसविरोधी एक जनसमुह आहे. तिथे सेनेची बदनामीच झाली. त्यांच्यासाठीच हा खेळ चाला आहे. इतरांना काहि फरक पडत नाहि.
आणि शिवसेनेची बदनामी अमित शहा, चंद्रकांत पाटील... bjp ची होत आहे असे वाटते..
राजकीय पक्षांच्या भुमीका उघड आहेत. त्यात काहि आश्चर्य नाहि.
हा आणखिन गैरसमज पसरवला जातोय.. तुम्हाला कदाचीत माहिती असेल राष्ट्रवादी ला काँग्रेस पेक्षा जास्त जागा आल्या होत्या तेंव्हा हि काँग्रेस चा मुख्यमंत्री राज्याला 5 वर्ष मिळाला होता, पण महत्वाची खाती राष्ट्रवादी कडे होती.. पवारांचे राजकारण एव्हडे सोप्पे नक्कीच नाही.. मुख्यमंत्री चा चेहरा घेण्यापेक्षा महत्वाची खाती घेणे हेच त्यांच्या साठी महत्वाचे आहे..
तसंही असेल. शेवटी बार्गेनींग पॉवर महत्वाची. सेनेला मुम पद नकोसं झालं/केलं गेलं/काँग्रेसने दावा सांगीतला, तर राकॉ तीच मागणी करेल. अजीत दादांनी आणखी 'उप' राहायचं ?
आणि 2.5 वर्षे मुख्यमंत्री पद तर त्यांना bjp पण देऊ शकते :-))
तसा ऑप्शन विचारात घेतला असेलच. पण नाहि जमलं.
विरोधक आधी हे सरकार 100 दिवसात पडेल म्हणत होते आता वर्ष झाल्यावर 2.5 वर्ष टिकेल आणि मग पवार पाडतील असे म्हणत आहेत काय आता?
विरोधी पक्ष किंवा सततचे सेना विरोधक काय म्हणतात हे महत्वाचं नाहि. नव्या राजकीय समीकरणांमुळे मतदारांमधे जो विस्कळीत पणा आला आहे, त्यांना काय वाटतं हे महत्वाचं. सेनेव्यतीरीक्त इतरांच्या भुमीका स्पष्ट आहेत. लोकं सेनेला बघताहेत.
मुख्यमंत्री पदाची हाव पवारांना आहे कि देवेंद्र जी आणि पर्यायाने bjp ला आहे हे एक वर्ष झाले महाराष्ट्र पाहतोय.. त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी शिंतोडे राष्ट्रवादी उडवत नसून bjp उडवत आहे हे समोर दिसते आहे..
सत्तेची हाव सर्वांना सारखी आहे. पवारांना मुख्यमंत्रीपदाची हाव नसुन ति त्यांची गरज आहे. फडणवीसांना हाव असेलच, पण त्यांचं राजकीय करीअर आता कुठे सुरु झालय. त्यांना भरपूर उसंत आहे. असो.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sat, 11/07/2020 - 15:54 नवीन
प्रथमता एक सांगू इच्छितो.. बऱ्याच मुद्द्यांमध्ये तुमचे आणि माझे विचार वेगळे आहेत तरीही तुमचा हा प्रतिसाद मनापासुन आवडला.. चांगला आहे.. म्हणुन सगळ्या मुद्द्यावर बोलत नाही.. सेना समर्थक आणि त्यांच्या रीत बद्दल बोलतो.
कंगना, अर्णव प्रकरणं टेक्नीकली वेगवेगळे असली तरी पब्लीकमधे एकच मॅसेज गेला. सेना समर्थकांना अत्यानंद झाला, कारण नडला त्याला फोडला हिच सेनेची रीत आहे
नडला त्याला फोडला हि सेनेची रीत पूर्वी पासून लोक पाहत होती.. परुंतु अर्णब च्या चाललेल्या कृत्याला लगेच कुठली हि प्रतिक्रिया ना ठाकरें कडून आली ना सेना समर्थक मुंबई तील लोकांकडून कुठली हि तोडफोड झाली. यामुळे नडला त्याला फोडला हि इमेज येथे शिवसेनेची दिसली नाही.. आणि हि कारवाही, एकतर पत्रकारिता, trp आणि इतर संबधातील नसून, आत्महत्या आणि वयक्तिक संबंधातील आहे, उलट नीट विचारपूर्वक अभ्यासू पद्धतीने योग्य कारवाही ते हि timing पाहून जी झाली ते पाहता हि नीती शिवसेनेची नक्कीच नाही.. (आणि जर असेल आणि या मुळे कोणाला न्याय मिळत असेल तर ते योग्य आहे.. ) असा टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करण्याचा गेम शिवसेना कधीच खेळत नव्हती.. उलट संदेश गेला असेल तर नडला त्याला फोडला हि नीती पुसून.. टप्प्यात घेऊन रीतसर कार्यक्रम केला जातोय हे पाहून शिवसैनिक नसून हि मला जास्त आनंद झाला.. बाळासाहेब ठाकरे हे माझ्या आवडत्या नेत्यांपैकी एक आहेत (जरी त्यांच्या हयातीत मी शिवसेनेला वोट दिले नव्हते ), पण उद्धव ठाकरे हे मला कधीच आवडले नव्हते, परंतु या एक वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी मला तरी आश्चर्याचे धक्के दिलेत.. आणि ते सुसंस्कृत मुख्यमंत्री मला वाटतात..
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Sat, 11/07/2020 - 17:38 नवीन
या सगळ्यात मुख्य गम्मत अशी आहे की, महाराष्ट्रात एक शिवसेनेचा सहानुभूतीदार आणि कुंपणावर बसणारा हिंदुत्ववादी मतदार आहे. सध्याचा सगळं तमाशा हा त्या मतदाराला खेचण्यासाठी चालू आहे. याशिवाय, मला ही कारवाई सामान्य जनतेचा सरकारवरून, मह आहे ठाकरे सरकार वरून विश्वास उडावा या उद्देशाने केली जातेय अशी शंका घ्यायला पण वाव आहे. ही मोडस ऑपरेडी शिवसेनेची अजिबात नाही, ही पद्धत आहे राष्ट्रवादीची, पण बिल फाडतायत शिवसेनेवर, यातच सगळे समजून जाते. जर दुर्दैवाने न्यायालयाने सरकारवरती ताशेरे ओढले तर काय होईल याचा विचार व्हायला हवा. गृहमंत्री राष्ट्रवादीचा आहे, पण बिल सेनेवरती.. आणि उडते बाण घ्यायला संपादक आहेतच! एकंदरीत पुढचे काही महिने अजून मजा येणार आहे.. बिहार निवडणुकीच्या निकालावर सगळे कळेल.. निवडणुकीच्या तोंडावरच अर्णबला अटक झाली, आणि मतदान होईपर्यंत सोडले नाही यात पण मला काळेबेरे दिसतेय सरकारमधले कोणीतरी फितूर आहे हे नक्की!
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sat, 11/07/2020 - 19:59 नवीन
@ आनंदा, ( (प्रतिसाद छोटा दिसेल, सो येथे देतोय ) _____
महाराष्ट्रात एक शिवसेनेचा सहानुभूतीदार आणि कुंपणावर बसणारा हिंदुत्ववादी मतदार आहे. सध्याचा सगळं तमाशा हा त्या मतदाराला खेचण्यासाठी चालू आहे.
मुळात तमाशा अर्णब करत होता, यात तरी दुमत नसावे. मतदार खेचण्यासाठी हे असावे असे वाटत नाही.. कारण येथे महिन्या पूर्वी हाथरस ला पत्रकार जाऊन न देणाऱ्या लोकांना जनता विसरली पण. कुंपणा वरचे लोक 4 वर्षानंतर वोट देणार म्हणुन आता प्रयत्न नक्कीच नाही..
ही मोडस ऑपरेडी शिवसेनेची अजिबात नाही, ही पद्धत आहे राष्ट्रवादीची, पण बिल फाडतायत शिवसेनेवर, यातच सगळे समजून जाते.
कोण बिल फडतायेत, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि इतर bjp नेते? आणि हे बिल फाडल्याने शिवसेनेची बदनामी होण्या ऐवजी bjp चीच नाचक्की होणार.. कारण हि पत्रकारितेवरचा हल्ला नाहीये, हि वयक्तिक केस आहे.. आणि तरी एव्हडे bjp ला अर्णब ची बाजू घ्यायची आहे तर त्याचा तमाशा bjp च करवून घेत होती हे कोणाच्याही लक्षात येते आहे.. मग पत्रकारिते आडून bjp चा अजेंडा राबवणे शोभते का? हा प्रश्न पडतोच.. उलट शिवसेना तोडफोड करेल अर्णब च्या कार्यालयाची आणि आम्ही तो पत्रकारीते वरील हल्ला म्हणुन बोंब मारू असे bjp ला वाटत असेल, पण शिवसेनेला साथ पवारांची आहे हे ते विसरले कि काय? टप्प्यात घेऊन कार्यक्रम केला बरोबर.. अर्णब ला कळाले पाहिजे किती खालच्या दर्जाला जाऊन पत्रकारितेला बट्टा लावायचा.. (रवीश चा लेख वाचनीय आहे यावर, नक्की वाचा.. वाटल्यास लिंक देतो मी ) आणि bjp ला पत्रकारितेची एव्हडी पडली असेल तर अलीकडेच 40 वर्ष पत्रकारितेत असलेले पत्रकार नाव विसरलो मी , हिमाचल चे होते करोना काळात सरकार वर प्रश्न केले म्हणुन राजद्रोह चा आरोप लावला bjp ने.. मग हा कशावर हल्ला होता.. मग न्याय सगळ्यांना सारखा पाहिजे ना.. यातून काय दिसते? असे अनेक पत्रकार आहेत, जे bjp ने आत टाकलेत ते आता मी शोधत नाही.. मला तर उलट वाटते शिवसेना हि तोडा आणि फोडा नीतीतून बाहेर येत असेल तर अभिनंदन आहेच..
जर दुर्दैवाने न्यायालयाने सरकारवरती ताशेरे ओढले तर काय होईल याचा विचार व्हायला हवा
. आताच्या सरकार चा संबंध काय? केस reopen का केली असा जाब कोर्ट सरकार ला विचारेल काय? ताशेरे ओढले तर, कोर्ट म्हणेल केस आधी बंद करणारे अधिकारी कोण त्यांची चौकशी करा.. आणि त्या वेळेस च्या गृहमंत्री यांनी राजकीय दबाव आणला का ते पण पहा.. मग हे ताशेरे सरकार आणि त्यावेळेस चे गृहमंत्री यांच्यावर का ओढले जाणार नाहीत?
एकंदरीत पुढचे काही महिने अजून मजा येणार आहे.. बिहार निवडणुकीच्या निकालावर सगळे कळेल.. निवडणुकीच्या तोंडावरच अर्णबला अटक झाली, आणि मतदान होईपर्यंत सोडले नाही यात पण मला काळेबेरे दिसतेय
याचे काही नाही.. बिहार निवडणूक आणि अर्णब ची अटक डोंबल्याचा संबंध नाही.. आणि बिहार निवडणूक यावेळेस तेजस्वी यादव ने विकासाच्या मुद्द्यावर लढविली, एक यादव जातीपाती पेक्षा विकासाच्या मुद्द्यावर मत मागतोय हे मला तरी बिहारचे चित्र बदलवण्यास आश्वासक वाटते.. आणि तेथे तोच निवडून येईल असे मला वाटते.. आणि संबंध असेल तर बिहार ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सुशांत आत्महत्या चा मुद्दा अर्णब आणि bjp ने बनवला, bjp ने पत्रक वाटलेत तेथे पूर्णिया मध्ये.. बिहार का बेटा समथिंग.. सरकारचे कोण फितूर व्हायची गरज नाही... हे सरळ आहे...
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Sun, 11/08/2020 - 04:27 नवीन
माझा अंदाज जर खरा असेल तर सोमवारी किंवा मंगळवारी mostly सोमवारीच कोर्टाचा निकाल येईल, आणि तो निकाल आला की बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील असे मला तरी वाटते. बिहार चे मतदान झाले आहे, त्यामुळे आता अर्णब ला तुरुंगात ठेवायची गरज उरलेली नाही असे माझे तरी मत आहे. सुनावणीत बऱ्यापैकी वेळकाढूपणा केला आहे या बाबतीत, आणि विनाकारण तारीख टाकलेली आहे असे माझे मत आहे बाकी माझ्या मते ही केस बऱ्यापैकी loopholes सोडून आहे, त्यामुळे जमीन अर्जावर निकाल देताना कोर्ट काय बोलते हे पाहणे रोचक ठरावे. पुढील चर्चा त्यानंतर करू.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 19 hours ago
  • सुंदर !!
    1 day 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा