Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

उपक्रम/चांगल्या सवयी दीर्घकाळ चालवणे

उ
उपयोजक
Tue, 10/20/2020 - 17:59
🗣 112 प्रतिसाद
बर्‍याचदा आपण आपल्या व्यक्तिमत्वात काही चांगला बदल घडवण्याच्या उद्देशाने काही नवीन सवयी लावू पाहतो.जसे की दररोज पहाटे उठून व्यायाम करणे किंवा दररोज किमान २० मिनिटे मेडीटेशन करणे किंवा दररोज ठराविक अंतरापर्यंत सायकल चालवणे इ. असे बरेचसे बदल उपक्रम असतील आणि बरेच लोक तो ठरवत असतील.पण हे उपक्रम दीर्घकाळ टिकवणे सोपे नसते.२-३ दिवसात त्याचा कंटाळा येतो आणि तो उपक्रम सोडून द्यावासा वाटतो; किंवा मधेच काही कारणांनी खंड पडतो आणि पुन्हा तो उपक्रम सुरु करणे टाळण्याकडे मनाचा कल असतो किंवा पुरेशी मानसिक ऊर्जा नसल्याने पुनश्च हरिअोम होत नाही. असे का होते? या उपक्रमांमधे रंजकता नसल्याने असे होते का? प्रत्येक उपक्रम रंजक बनवणे शक्य आहे का? कशी आणावी रंजकता उपक्रमांमधे? तुम्ही कधी या अशा प्रकाराला सामोरे गेला आहात का? एखादा चांगला पण तुमचे पेशन्स बघणारा उपक्रम तुम्ही मधेच सोडून दिलात किंवा बाह्य कारणांनी त्यात खंड पडला असेल तर तो परत सुरु करणे आणि दीर्घकाळ चालवणे तुम्हाला जमले का? तुम्ही हे कसे साध्य केलेत? या विषयावर काही पुस्तके किंवा साईटस् ,अॅप्स असतील तरी सुचवाव्यात.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 45291 views

🗣 चर्चा (112)
उ
उपयोजक Mon, 10/26/2020 - 05:55 नवीन
छान प्रतिसाद. पण खंड पडायची संधी आपण होऊन शोधू नये किंवा पटकन बळी पडू नये असे वाटते. शिस्तीने राष्ट्र मोठे होते असे म्हणतात ना?
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Mon, 10/26/2020 - 06:02 नवीन
आपल्याला जे आवडते ते काही दिवस टाळणे हे मानसिक सामर्थ्य मिळविण्याचे एक साधन नक्कीच आहे. यातून मानसिक गुलामी ( क्रेविंग ) कमी होते. मग ती चांगली सवयअसो वा वाईट !
एक नंबर प्रतिसाद. माझेही मत असे आहे कि व्यायामाचीही शरीराला सवय होता कामा नये. कारण नियमित व्यायाम होत असेल तर कालांतराने ते ही रूटीन होते व एखादा दिवस व्यायाम करु शकलो नाही तर शरीर आळसावते. पूर्ण दिवस अक्षरशः दुर्मुखलेल्या अवस्थेत जातो.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Mon, 10/26/2020 - 06:14 नवीन
मी अनेक जप वाले पाहिले आहेत जे आपली सगळी माणुसकी विसरून काही झाले तरी माझा जप चुकता कामा नये यासाठी विवाह मंडपात देखील कोपर्यात जप करीत बसतील., आलेल्या अतिथीला पुरेसा वेळ देणार नाहीत !
😀 असेही जपवाले मी पाहिले आहेत की, जे माणूसकीला अतोनात जपतात. विवाह मंडपात अतिथीला व्यवस्थित वेळ देतात. कोणाचीही उपेक्षा करत नाहीत. मात्र जेव्हां त्यांना फावला वेळ मिळतो तेव्हां त्यांचा जप आपोआप सुरू होतो. त्याचबरोबर ते सावधपणे सगळीकडे लक्ष ठेऊन असतात. हा (आपोआप होणारा) जप मनातल्या मनात असल्याने कोणालाच कळू शकत नाही. निदान त्यांनी स्वतःहून सांगितल्याशिवाय ते कोणालाही कळू शकत नाही. 😀
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Mon, 10/26/2020 - 15:56 नवीन
बरोबर आहे! असे संतुलन साधणारे लोकही असतात. किंबहूना त्यांचा जप अधिक फलदायी होत असावा.कारण त्यात अनावश्यक हेकटपणा नसतो.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Mon, 10/26/2020 - 05:54 नवीन
माझा चालण्याचा " नेम" आहे सबब तुम्ही काहीतरी करीत घरी बसा असा मी आग्रह करीत नाही
फारच चांगली गोष्ट. दुसर्‍यांची दखल न घेता आपला परीपाठ चालु ठेवणे हे आलेल्या पाहुण्यासाठी अपमानास्पद आहे. (अवांतरः आपण काही बोलत असताना, समोरचा स्वतःच्या मोबाइल मधे व्यस्त असतो, नुसतेच हुं हुं चालु असते , मग मोबाइल मधे बघणे संपल्यावर मग विचारायचे "काय म्हणत होतास ?" हे अतिशय चीड आणणारे. )
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Mon, 10/26/2020 - 06:19 नवीन
असंही असतं का? मला वाटले फक्त जपवालेच इतरांशी अपमानास्पद वागतात!!!! 😃 @मराठी_माणूस कृहघ्या.
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Mon, 10/26/2020 - 10:13 नवीन
या धाग्यावर मिपाचे सर्व पैलवान तेल लावून उतरले आहेत हिच धाग्याची उपयुक्तता ! आता आपण फक्त पॉपकॉर्न खायचे आणि त्रिशतका साठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Mon, 10/26/2020 - 12:09 नवीन
💯
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Mon, 11/23/2020 - 15:21 नवीन
बर्‍याच दिवसांनी या धाग्यावर पुन्हा लिहितोय याचं कारण आधी केले मग लिहिले असे करायचे होते.शिवाय एक सुटलेला गुंताही कसा सुटला ते लिहायचे होते. इथे संजय क्षीरसागर यांनी जपापेक्षाही समोर पाहणे आणि आजुबाजूला जे काही आवाज ऐकू येतील ते ऐकणे हे सर्वात सोपे मेडीटेशन असल्याचे लिहिले होते.ते काही दिवस करुन पाहिले.पण त्याची उपयोगिता ही जपापेक्षा कमी असल्याचे माझे निरीक्षण आहे.सदर प्रकार म्हणजे एखाद्या अपार्टमेंटमधला सजग वॉचमन याच्यापलीकडे काहीही नाही.भटके कुत्रे शिरताना दिसले की काठी उगार, अनोळखी माणूस शिरताना दिसला तर आयडी प्रुफ मागणे , संशय आल्यास हाकलून देणे अशी कामे एखादा वॉचमन करतो त्यापेक्षा या पद्धतीत अधिक काही नाही. आता माळ घेऊन जप करणे हे अधिक फलदायी कसे ते सांगतो. माळ घेऊन काही मंत्र मनात पुटपुटून मणी पुढे सरकवणे या प्रकारात मंत्र १०८ वेळा म्हणणे,मणी मागे सरकवणे अशा कृती केल्या जातात ज्यामुळे अवधान जपावर 'केंद्रीत' होते.परिणामत: एकाग्रता वाढते.अवधान परत परत खेचून आणले जाते.अंतिमत: याचा सराव होतो.एकाग्रतेत वाढ होते.संक्षी यांनी सुचवलेला प्रकार हा अतिसंवेदनशील आहे.म्हणजे विशेष अशी कृती नसल्याने समोर पाहण्यातून किंवा भोवतालचे आवाज ऐकण्यातून मनात त्या ऐकू आलेल्या माहितीकडे किंवा समोरच्या दृश्याकडे अोढले जाऊन विचारांच्या प्रवाहात अडकण्याचीच शक्यता जास्त आहे.कारण काम काहीच नाही.शिवाय एखादा विचार आलाच मनात तर त्याला एंटरटेन करायचे नाही.मनात शिरु द्यायचे नाही.हे काम तसे सोपे नाही.म्हणूनच सर्वसामान्य लोकांना हा मार्ग तितकासा सोपा नाही.तस्मात जप जिंदाबाद! आता कोणता गुंता कसा सुटला ते सांगतो.जप करताना मधेच मन भरकटण्याचे कारण होते 'श्रद्धा नसणे'.अशा प्रकारे जप करणे हे काहीतरी दैवी/धार्मिक काम आहे आणि देव वगैरे वास्तवात काही नसल्याने या जपाला काही अर्थ नाही;आपण वेळ वाया घालवतोय वगैरे अतिचिकीत्सक तत्वज्ञानामुळे जप मधेच सुटायचा.श्रद्धा हा प्रकार केवळ भगवंतासमोर हात जोडणे,पुजा करणे अशा धार्मिक कार्यापुरताच मर्यादित आहे असा माझा गैरसमज होता. दरम्यान श्रद्धा या विषयावर मिपावरचेच धागे चाळताना हा धागा https://www.misalpav.com/node/41837 हाती लागला. श्रद्धेबद्दलचा गैरसमज या धाग्यातल्या या प्रतिसादामुळे दूर झाला. https://www.misalpav.com/comment/978992#comment-978992 श्रद्धेचा व्यापक अर्थ या प्रतिसादामुळे उमजला.थॉर माणूस यांनी ती श्रद्धा नव्हे असे म्हटले असले तरी पुढच्या प्रतिसादात श्री अरुण जोशी यांनी नेमका प्रश्न विचारला आहे. https://www.misalpav.com/comment/979062#comment-979062 त्याला काहीच उत्तर मिळाले नाही.ते तसे 'न मिळणे' साहजिकच होते. श्रद्धेबद्दलचा साधारण असाच पण मोघम स्वरुपातला विचार बर्‍याच वर्षांपूर्वी मी डॉ.राजेंद्र बर्वे यांच्या या https://youtu.be/7g8um6PWEXk (6.26 पासून ऐका) व्हिडिओत ऐकला होता पण त्याचा अदैवी/अधार्मिक असा व्यापक अर्थ मात्र गॅरी ट्रुमन यांच्या प्रतिसादामुळे समजला. ट्रुमन आणि arunjoshi123 यांचे तसेच हा उपयुक्त धागा काढल्याबद्दल आनन्दा यांचेही मनापासून आभार! _/\_
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Mon, 11/23/2020 - 18:56 नवीन
ओशोंनी म्हटलंय की साधक शेवटी स्वतःच्या अक्कल हुशारीनंच गुरु निवडतो ! त्याची आठवण झाली. १. बरोब्बर एक महिन्यापूर्वी आपले विचार बरेच सूज्ञ होते असे वाटते : जपमाळेचा उपाय हा तसा 'एकसुरी' आहे.दररोजचा अर्धा तास.सुरुवातीला पहिले ५-६ दिवस चिकाटीने केला जातो.नंतर नंतर ती मोनोटोनस क्रिया जोखड वाटू लागते.याच्याऐवजी इतकाच प्रभावी पण एकसुरी नसणारा उपाय करता येईल का यावर समांतरपणे विचार सुरु राहतो.त्यामुळे त्या जपावर १००% एकाग्रता होत नाही.हातात माळ,तोंडातून 'यांत्रिकपणे' बारीक आवाजात जप सुरु.पण मेंदूत विचार मात्र या जपमाळेपेक्षा दुसरा एखादा 'कंटाळवाणा नसणारा' उपाय असेल का याच्या चिंतनावर.नंतर नंतर तर इमॅजिनेशनला चेव चढून कल्पनेत मी बोरींग चेहर्‍याने जप करत असल्याचे कल्पनाचित्र मला दिसू लागते.पुढे पुढे १-२ दिवस खंड पडतो.मग बळजोरीने परत काही दिवस रेटले जाते.हा खंड पडण्याचा कालावधी वाढला तर उत्साह जवळपास संपल्यात जमा होऊन उपक्रम थंडावतो.मी आचरत असलेल्या उपायामुळे मला फायदा होणार आहे हे मला १००% माहित आहे.तसूभरही शंका नाही. सारांशाने सांगायचे तर उपक्रम बारगळ्याचे कारण हे त्या उपक्रमाच्या प्रक्रियेतला 'एकसुरीपणा' हे आहे. यावर काय उपाय करता येईल? २. आजच्या प्रतिसादावरुन असे दिसते की आपल्याला जपाचा उपक्रमच पुढे रेटायचा होता फक्त त्यासाठी आवश्यक मानसिक सामुग्री जमा करण्यासाठी हा विसविशित धागा काढला होता. त्या वेळीआम्ही जोखिम पत्करुन आपल्यास आणखी रेटले, त्यामुळे आपला नेमका मनसुबा समोर आला. ते एक असो, आता मुद्दा असा की आपण श्रद्धेचा आश्रय घेऊन तो रेटा पुन्हा मारण्याचे ठरवल्यामुळे सद्य परिस्थितीत आपला गुंता सुटला आहे असे आपणास वाटते आहे. ३. आपण श्रद्धेवर वाचन करण्याऐवजी इथले जपचंडी श्री शामराव भागवत यांच्या गेली तीस /पस्तीस वर्ष राबवलेल्या याच उपक्रमावरचे फलित दर्शवणारा हा धागा अप्रिय आठवणींपासून सुटका वाचला असता तर कालापव्यय टळला असता असे वाटते. कारण तिथे आम्ही यावर विस्ताराने लिहिले आहे व श्री शाभा आता आम्ही दिसलो की फक्त ॐ शांती: शांती: शांती: हा एकच जप करतात.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Mon, 11/23/2020 - 19:24 नवीन
बहुधा तुम्हाला माझा http://www.misalpav.com/comment/1087107#comment-1087107 हा प्रतिसाद आवडला नाही.कारण त्यात मी तुम्ही सुचवलेल्या उपायाची जपाच्या तुलनेत मर्यादा दाखवली आहे. वास्तविक मी आधी केले मग सांगितले आहे. मला समस्या सोडवणारा उपाय मिळणे माझ्यासाठी महत्वाचे होते.तो उपाय काय आहे नि कोणी सांगितला हे नव्हे.यात जपाचा उपाय श्रेष्ठ ठरला कारण त्याचे तंत्र अधिक फलदायी आहे इतकेच! शाम भागवतांच्या जपसाधनेचा त्यांना छळणार्‍या अप्रिय आठवणींपासून सुटका न होण्याशी संबंध कसा काय म्हणे? जप केला की अप्रिय आठवणी येणे थांबते असे कुठे लिहिले आहे का? असो! माझ्यापुरता माझ्या समस्येचा गुंता सुटला हेच माझ्यासाठी पुरेसे आहे.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Mon, 11/23/2020 - 20:23 नवीन
असे वाटते.
१. जप केला की अप्रिय आठवणी येणे थांबते असे कुठे लिहिले आहे का ?
हाच तर त्यांनी शोधलेला उपाय आहे आणि त्याला कल्पनेतल्या घोडेस्वाराला क्षमा करण्याचा मार्ग सांगितला आहे. शिवाय तीस वर्ष जप करुनही वास्तव आणि कल्पना यातला फरक उमगू शकत नाही असा निष्कर्ष आम्ही आमच्या मतीनं काढला आहे. आमच्या ध्यानपद्धतीत कमालीची सजगता येते असा अनुभव आहे. जास्त काय लिहावे ? याउप्पर आपली इच्छा.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 19 hours ago
  • सुंदर !!
    1 day 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा