Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

उपक्रम/चांगल्या सवयी दीर्घकाळ चालवणे

उ
उपयोजक
Tue, 10/20/2020 - 17:59
🗣 112 प्रतिसाद
बर्‍याचदा आपण आपल्या व्यक्तिमत्वात काही चांगला बदल घडवण्याच्या उद्देशाने काही नवीन सवयी लावू पाहतो.जसे की दररोज पहाटे उठून व्यायाम करणे किंवा दररोज किमान २० मिनिटे मेडीटेशन करणे किंवा दररोज ठराविक अंतरापर्यंत सायकल चालवणे इ. असे बरेचसे बदल उपक्रम असतील आणि बरेच लोक तो ठरवत असतील.पण हे उपक्रम दीर्घकाळ टिकवणे सोपे नसते.२-३ दिवसात त्याचा कंटाळा येतो आणि तो उपक्रम सोडून द्यावासा वाटतो; किंवा मधेच काही कारणांनी खंड पडतो आणि पुन्हा तो उपक्रम सुरु करणे टाळण्याकडे मनाचा कल असतो किंवा पुरेशी मानसिक ऊर्जा नसल्याने पुनश्च हरिअोम होत नाही. असे का होते? या उपक्रमांमधे रंजकता नसल्याने असे होते का? प्रत्येक उपक्रम रंजक बनवणे शक्य आहे का? कशी आणावी रंजकता उपक्रमांमधे? तुम्ही कधी या अशा प्रकाराला सामोरे गेला आहात का? एखादा चांगला पण तुमचे पेशन्स बघणारा उपक्रम तुम्ही मधेच सोडून दिलात किंवा बाह्य कारणांनी त्यात खंड पडला असेल तर तो परत सुरु करणे आणि दीर्घकाळ चालवणे तुम्हाला जमले का? तुम्ही हे कसे साध्य केलेत? या विषयावर काही पुस्तके किंवा साईटस् ,अॅप्स असतील तरी सुचवाव्यात.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 45291 views

🗣 चर्चा (112)
म
मोहनराव Wed, 10/21/2020 - 12:13 नवीन
चांगल्या सवयी अंगभूत करून घेण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे मोटिवेशन लागते. ते असेल तरच तुम्ही तग धरू शकता. दुसरी एक गोष्ट म्हणजे मी कुठेतरी एका व्हिडिओत पाहिल्याप्रमाणे तुम्ही एखादी गोष्ट २० वेळा सलग करून पहिली तर पुढे ती गोष्ट सवयीत रूपांतर होते. हे मी माझ्या अनुभवावरून सांगत आहे.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Wed, 10/21/2020 - 15:29 नवीन
स्वतः काहीही विचार न करता, डायरेक्ट इथे पोस्ट टाकण्याचा फंडा भारीये ! एनी वे, सगळ्यांना उपयोगी होईल म्हणून उत्तर देतो : १. कुठलीही गोष्ट लावून धरण्यामागे तुमच्या इंटरेस्टची तीव्रता कारणीभूत असते. लोकांचे इंटरेस्ट फारसे तीव्र नसतात त्यामुळे प्रोजेक्ट फाफलतो. २. आपल्याला जमेल हा अत्मविश्वास असेल तरच त्या उपक्रमावर मेहेनत होते. संदिग्धावस्थेमुळे उपक्रम बारगळण्याची शक्यता प्रचंड. ३. उपक्रमासाठी आवश्यकती उत्तम गॅजेटरी विकत घेणं तुमचा इंटरेस्ट वाढवतं (म्हणजे धावायचं असेल तर ब्रँडेड शॉर्ट्स, आरामदायी टी शर्ट आणि उत्तम स्पोर्टस शूज) ४. लवकारात लवकर थोडं फार यश मिळणं अत्यंत अनिवार्य आहे. जर रिझल्ट येत नसेल तर तुम्ही चुकीची मेथड (उपक्रम नाही) निवडली आहे असा अर्थ होतो. त्यामुळे योग्य मेथड हा एक अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर आहे.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Wed, 10/21/2020 - 17:06 नवीन
स्वतः काहीही विचार न करता, डायरेक्ट इथे पोस्ट टाकण्याचा फंडा भारीये! स्वत:च काहीही तर्क करायचा ,स्वत:च निष्कर्ष काढायचा ,स्वत:च तो परिपूर्ण असल्याचे ठरवून स्वत:लाच सर्वज्ञ असल्याचे प्रमाणपत्र द्यायचे हा तुमचा फंडा त्याहून भारीये. असो.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Wed, 10/21/2020 - 17:13 नवीन
देण्याची सवय तुम्हालाही जडलेली दिसते !
त्यांनी एखादा दीर्घकालीन उपक्रम राबवून यशस्वी केला असता तर त्यांचा अनुभवच त्यांच्या कामी आला असता. या पोस्टमधे सुद्धा त्यांना नक्की कोणता उपक्रम हाती घ्यायचा आहे किंवा घेतला आहे, तो चालू ठेवण्यात काय अडचणी आल्या याविषयी काहीही उल्लेख नाही.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Wed, 10/21/2020 - 17:20 नवीन
कसा मांडला जावा,केव्हा काय लिहावे हे त्या लेखकाचं स्वातंत्र्य असलं पाहिजे ना? की तुम्ही सांगाल तसंच लिहायचंय?
  • Log in or register to post comments
व
वीणा३ Wed, 10/21/2020 - 18:00 नवीन
सगळेच मुद्दे फारच बरोबर आहेत. ३. उपक्रमासाठी आवश्यकती उत्तम गॅजेटरी विकत घेणं तुमचा इंटरेस्ट वाढवतं (म्हणजे धावायचं असेल तर ब्रँडेड शॉर्ट्स, आरामदायी टी शर्ट आणि उत्तम स्पोर्टस शूज) - हे माझ्याबरोबर नेहमी होतं. मी जर चांगल्या वस्तू विकत घेतल्या कुठल्यातरी व्यायाम प्रकारासाठी तर मला सकाळी उठायचा उत्साह पण येतो. आणि वस्तू विकत घेतली असेल तर तो उत्साह जवळपास ८-१० महिने टिकतो आणि वजन बऱ्यापैकी कमी होऊन जातं तेवढ्या वेळात. मग २-४ महिने (खासकरून थंडीचे) असेच जातात, मार्च-एप्रिल नंतर परत उत्साह येतो व्यायाम करायला . माझे थोडे पैसे : १. थंडीच्या महिन्यात कुठल्याही सकाळी लवकर उठायच्या उपक्रमाची सुरवात करू नका (खासकरून तुम्हाला सकाळी लवकर उठायची सवय नसेल तर) . २. एखादा मित्र - मैत्रीण शोध जे नियमित व्यायाम करतायत, आणि त्यांच्या बरोबर व्यायाम करायचा प्रयत्न करा. कोणी बरोबर असेल तर उत्साह नक्कीच वाढतो. ३. उपक्रम सुरु केल्या केल्या खाण्या-पिण्याकडे लक्ष ठेवा. कारण खूप व्यायाम करून वजन कमी होतंच नाहीये असं झालं कि व्यायामाचा उत्साह निघून जातो. व्यायाम केलाय आता दुप्पट खाल्लं तरी चालेल असं करू नका. ४. वेळ अशी निवड कि जी सहज शक्य असेल (ती बरेचदा सकाळचीच येते :( ) , संध्याकाळी ऑफिस वरून आल्यावर करेन असा प्लॅन असेल तर तो बारगळण्याची शक्यता जास्त असते.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 10/22/2020 - 08:16 नवीन
१. कोणत्याही दीर्घकालीन उपक्रमाची सुरुवात रोज सकाळी लवकरात लवकर केली तरंच सातत्य टिकतं. संध्याकाळी ठरवलेल्या वेळेत हमखास विक्षेप येतात आणि तो लवकरच बंद पडतो. २. ग्रुप अ‍ॅक्टीविटी अनंत काळ चालते आणि नक्की मजेची होते. आमच्या टेबलटेनीसची टाईम स्लॉट सकाळी ८ ते ९ आहे. आम्हाला फार हौस म्हणून आम्ही ७.३० लाच हजर ! एकजण तर सकाळी ६ वाजता निघून फुल सायकल मारुन खेळायला येतो. दिवसाची सुरुवात फार प्रसन्न होते.
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम गुरुवार, 10/22/2020 - 07:23 नवीन
स्वतः काहीही विचार न करता, डायरेक्ट इथे पोस्ट टाकण्याचा फंडा भारीये !
+१ कदाचित म्हणूनच लोक इथे लिहिते होत नसतील
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 10/23/2020 - 14:39 नवीन
तुमच्या 1 आणि 2 पॉइंट शी पूर्णतः सहमत. आणि 3 शी पूर्णतः असहमत. पॉइंट 4 शी अंशतः सहमत
  • Log in or register to post comments
र
रानरेडा Fri, 10/23/2020 - 19:34 नवीन
तुमची फार मोठ्या बाता मारून ठरवलेली पेड साईट ३ वर्षात आली नाही त्यामागे यातली कोठली कारणे नव्हती ? आत्मविश्वास तर जास्तच दिसत होता कि
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 10/21/2020 - 15:42 नवीन
माझा अनुभव
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Wed, 10/21/2020 - 17:13 नवीन
छान अनुभव आहे. आभार्स!
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 10/21/2020 - 16:33 नवीन
@ उपयोजक : मनात विचार आला की त्यावर

स्वतः काहीही विचार न करता,

डायरेक्ट इथे पोस्ट टाकण्याचा फंडा भारीये ! त्यांनी याच्या वर काहीही विचार केलेला नाही हे तुम्हाला कसे समजले? त्यांना त्यांचा विचार सध्या लोकांना जाहीर करायचा नसू शकतो. काही वेळेस आपला विचार व्यक्त केला कि दुसऱ्या बाजूचा पूर्वग्रह (BIAS) होऊ शकतो.

जिकडे तिकडे मीच शहाणा

म्हणू दर्पोक्ती का करता?
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Wed, 10/21/2020 - 17:02 नवीन
लॉजिक वाढत जाईल. फक्त घाईघाईनी उपप्रतिसाद न देता शांतपणे वाचत जा ! सदर लेखक सतत फुटकळ विषय घेऊन पोस्ट टाकतात. त्यांनी एखादा दीर्घकालीन उपक्रम राबवून यशस्वी केला असता तर त्यांचा अनुभवच त्यांच्या कामी आला असता. या पोस्टमधे सुद्धा त्यांना नक्की कोणता उपक्रम हाती घ्यायचा आहे किंवा घेतला आहे, तो चालू ठेवण्यात काय अडचणी आल्या याविषयी काहीही उल्लेख नाही. तरीही उपक्रम चालू रहावा यासाठी काय करावं हे वरच्या प्रतिसादात लिहिलं आहे; ते सोडून तुम्ही पुन्हा विषय भरकटवत सुटलात !
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Wed, 10/21/2020 - 17:10 नवीन
सतत फुटकळ विषय घेऊन पोस्ट टाकतात दुसर्‍यांचे धागे हायजॅक करुन त्या धाग्याची वाट लावणे हे तुमचे कौशल्य सर्वांकडे असणे शक्य नाही. असो. जहाँ नहीं चैना उस धागे को मत वाचना। बघा जमेल का इतकं ते!
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Wed, 10/21/2020 - 17:16 नवीन
एनी वे, सगळ्यांना उपयोगी होईल म्हणून उत्तर देतो
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Wed, 10/21/2020 - 17:21 नवीन
आभारी आहे!
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 10/22/2020 - 06:19 नवीन
@ संजय क्षीरसागर त्यांनी याच्या वर काहीही विचार केलेला नाही हे तुम्हाला कसे समजले? याचं उत्तर द्या मग तुमच्या बाकी सगळ्या भंपक गोष्टींबद्दल विचार करू त्यांच्या मेंदूत चालणारे विचारही तुम्हाला ऐकू येतात कि काय? हे स्किझोफ्रेनिया चे लक्षण आहे. काळजी घ्या
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 10/22/2020 - 07:11 नवीन
न वाचता वैयक्तिक शेरेबाजी करुन दरवेळी स्वतःचं हसू करुन घेणं बरं नाही > आता तरी नीट वाचा : त्यांनी एखादा दीर्घकालीन उपक्रम राबवून यशस्वी केला असता तर त्यांचा अनुभवच त्यांच्या कामी आला असता. या पोस्टमधे सुद्धा त्यांना नक्की कोणता उपक्रम हाती घ्यायचा आहे किंवा घेतला आहे, तो चालू ठेवण्यात काय अडचणी आल्या याविषयी काहीही उल्लेख नाही.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 10/22/2020 - 07:37 नवीन
ते सगळं ठीक आहे पण त्यांनी याच्या वर काहीही विचार केलेला नाही हे तुम्हाला कसे समजले? हे सांगा मग बाकी चर्चा करू
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 10/22/2020 - 07:59 नवीन
पुन्हा वाचा : त्यांनी एखादा दीर्घकालीन उपक्रम राबवून यशस्वी केला असता तर त्यांचा अनुभवच त्यांच्या कामी आला असता. या पोस्टमधे सुद्धा त्यांना नक्की कोणता उपक्रम हाती घ्यायचा आहे किंवा घेतला आहे, तो चालू ठेवण्यात काय अडचणी आल्या याविषयी काहीही उल्लेख नाही.
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम गुरुवार, 10/22/2020 - 08:02 नवीन
बऱ्याच वेळा मी संक्षी यांच्याशी सहमत नसतो पण इथे मात्र आहे !
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 10/22/2020 - 08:10 नवीन
ते सगळं ठीक आहे पण त्यांनी याच्या वर काहीही विचार केलेला नाही हे तुम्हाला कसे समजले? हे सांगा मग बाकी चर्चा करू
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 10/22/2020 - 08:22 नवीन
महासंग्रामांना कळलंय, त्यांना व्यनि करुन विचारा म्हणजे आता आणखी शोभा होणार नाही.
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम गुरुवार, 10/22/2020 - 08:52 नवीन
मी त्यांनी एखादा दीर्घकालीन उपक्रम राबवून यशस्वी केला असता तर त्यांचा अनुभवच त्यांच्या कामी आला असता. या पोस्टमधे सुद्धा त्यांना नक्की कोणता उपक्रम हाती घ्यायचा आहे किंवा घेतला आहे, तो चालू ठेवण्यात काय अडचणी आल्या याविषयी काहीही उल्लेख नाही या बाबतीत सहमत आहे. विचार करायचा कि नाही हे ज्याची त्याची वैयक्तीक गोष्ट आहे
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा गुरुवार, 10/22/2020 - 08:35 नवीन
असा प्रश्न तुम्ही सर्वज्ञानींना कसा विचारू शकता? धागा काथ्याकूटात असला तरी देखील लेखकाने स्वतः संपूर्ण विचार करून आधी एक लेख पाडावा आणि मगच काथ्या कुटावा. अवांतर, लेखकाने उपक्रम अयशस्वी का होतात असे विचारले आचा, सबब त्याला अनेक उपक्रम अयशस्वीपणे सुरू करायचा अनुभव असावा असे गृहीत धरू शकतो. त्यामुळे विचार केला नाही ही टिपण्णी अनाठायी आहे, असे मत व्यक्त करून खाली बसतो.
  • Log in or register to post comments
ड
डॅनी ओशन गुरुवार, 10/22/2020 - 08:54 नवीन
***संक्षि मोड ऑन*** निरर्थक प्रतिसाद देण्याची इतकी घाई करू नका ! आधी प्रतिसाद नीट वाचत चला, म्हणजे पुन्हा पुन्हा अशी वेळ येणार नाही ! मिसळपावचे काथ्याकूट धोरण वाचले असते तर अशी वेळ आली नसती ! वाचा-
येथे तुम्ही एखाद्या विषयावर थोडे लिहावे म्हणजे लोकांना त्या विषयाची पार्श्वभूमी लक्षात येईल. त्यानंतर आपले मत मांडावे आणि शेवटी अन्य लोकांचे मत मागावे. अश्याने अन्य लोकसुध्दा त्या चर्चेत सहभागी होतील. केवळ कुठल्यातरी बातमीचा दूवा (लिंक) देवून याविषयी तूमचे मत काय? असे प्रश्न विचारू नये. त्याचर्चे बाबत तुम्ही गंभीर आहात किंवा किमान तुम्ही त्याबाबत विचार करताय हे लोकांना कळल्यास त्यांना त्याचर्चेत सहभागी व्हायला आवडेल.
इथे धागालेखकाने स्वतःचा एकतरी विचार लिहिलाय का ? त्यामुळे उगाच विरोध करण्याऐवजी जरा वाचत चला ! ***संक्षि मोड ऑफ***
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 10/22/2020 - 09:05 नवीन
इथे धागालेखकाने स्वतःचा एकतरी विचार लिहिलाय का ? ते सगळं ठीक आहे पण संक्षी यांनी लेखकाने विचारच केलेला नाही असे सांगितलंय. काय म्हणताय?
  • Log in or register to post comments
ड
डॅनी ओशन गुरुवार, 10/22/2020 - 09:19 नवीन
संक्षि मोड ऑन धागालेखक म्हणजे उपयोजक या आयडीने यावर विचार केला नाही असे मी म्हणालो आहे आणि ते योग्य, परफेक्शन, तंतोतंतच आहे ! धागा मोकळा असेल तर मूळ व्यक्तीने विचार केला अथवा न केला याला काडीचेही महत्व नाही ! उपयोजक या आभासी व्यक्तीने कोणताही विचार केला नाहीच ! संक्षि मोड ऑफ
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 10/23/2020 - 09:19 नवीन
सदर लेखक सतत फुटकळ विषय घेऊन पोस्ट टाकतात.
लेखकाचे फुटकळ विषय आणि सततचे पाट्या टाकणारे दळणाविषयी आपल्या मुद्द्याशी सहमत असलो तरी लिहिण्या-बोलण्याचे स्वातंत्र्य असल्यामुळे व्यक्त होण्याची संधी या विचारपिठाची असल्यामुळे लेखकांनी प्रॅक्टीकली काही केल्याशिवाय लेखन करावे असे काही आढळत नाही, असे दिसते. त्यामुळे आपण म्हणता की लेखक फुटकळ विषय घेऊन पोश्ट टाकतात असे असले तरी आपल्याला प्रत्येकाच्या लिहिण्या-बोलण्याचा आदर व्यक्त केला पाहिजे असे वाटते. इग्नोर करण्याचा मार्ग आपल्याकडेही आहेच असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Fri, 10/23/2020 - 20:39 नवीन
काहीजणांना माझे धागाविषय चांगले वाटतात.सर्व प्रतिसाद वाचलेत तर कळेल. इथल्या प्रत्येक धाग्यात 'दर्जा' शोधण्याआधी बहुतांश वेळेला १० पेक्षा जास्त सदस्य उपस्थित नसतात; किंवा कधी कधी तर आत्ता उपस्थित सदस्य १ असेही वाचले आहे.याकडे लक्ष द्या जरा. आधीच लोकांचा वाचनाकडे कल कमालीचा कमी झालाय त्यात तुम्ही आणि इथलीच दोन-चार मंडळी प्रत्येक धाग्यात 'साहित्यिक दर्जा' वगैरे शोधू लागलात तर जे लोक लिहितायत ते सुद्धा लिहायचं बंद करतील.किंवा तुम्हाला हवं तसं दर्जेदार लेखन हवं असेल तर इथे तुम्ही आणि 'तुमच्याइतके' 'दर्जेदार' लेखन करणारे लोकच का सगळे धागे काढत नाही? तुमच्या तराजूत न बसणार्‍यांना मनाईच करावी लेखनाला. म्हणजे मग मनासारखे दर्जेदार लेख मिळत नसल्याने होणारी चिडचिड तरी थांबेल तुमची. आधी लोकांना हवं तसं लिहा म्हणायचं आणि नंतर त्यांच्या लेखनाची मापं काढायची हा विकृत आनंद झाला ना? त्या 'भेजा फ्राय' सिनेमातल्यासारखा.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 10/24/2020 - 05:01 नवीन
आपलं मिपाचं वय आणि वावर पाहता, एकच सल्ला देतो आपण मिपाची फार काळजी करु नका. तान घेऊ नका. दळत राहा सॉरी लिहिते राहा शुभेच्छा....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sat, 10/24/2020 - 05:45 नवीन
चालतंय की! :) पण मग तुम्हीही इतरांच्या धाग्याच्या विषयांचा दर्जा आणि वारंवारिता यांची काळजी करत जाऊ नका.ही विनंती! बाकी मिपावरचं वय आणि वावर जास्त असणे हे निकष कैच्या कै आहेत. ;)
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 10/21/2020 - 17:06 नवीन
माझा असा समज आहे की चांगल्या सवयी आहेत असं वाटतं त्या गोष्टी १) वेळ उलटून गेल्यावर लक्षात येतात. त्याचा पाठपुरावा करण्यास वय आणि शरीर साथ देत नाही. थोडे दिवस करून मग विचार येतो की याची सुरुवात अगोदरच करायला हवी होती. २) निरीक्षण कमी पडणे किंवा त्या सवयींचं महत्त्व उशिरा कळणे हेसुद्धा आहे. अर्थात उत्साह गेलेला असतो. अगदी झोपसुद्धा येऊ लागते. आणखीही कारणं आहेत. नंतर.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Wed, 10/21/2020 - 17:16 नवीन
सवयींचं महत्त्व उशिरा कळणे हेसुद्धा आहे. दुर्दैवाने खरं आहे! :(
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Wed, 10/21/2020 - 19:15 नवीन
असा काहि उपाय बिपाय नाहि आमच्याकडे ;) पण स्वानुभवाने एक गोष्त लक्षात आलि आहे. जर एखादा उपक्रम / सवय अंगी बाळगायची इच्छा होत असेल तर त्याची काहि ना काहि गरज नक्की वाटली असते. उदा. व्यायाम करायची सवय लागावी अशी इच्छा असेल तर आरशात दिसणारं स्थुल शरीर, एखादा वाईट मेडीकल रिपोर्ट, किंवा अगदी पोरगा/पोरगी पटवणे वगैरे काहिही कारण असु शकेल. असं म्हणतात कि कुठलिही सवय २१ दिवसांच्या नियमीत सरावाने लावुन घेता येते. आता असा काटेकोर २१ दिवसांचा विदा नाहि नाहि माझ्याकडे, पण माझी एक पद्धत आहे. सवय लावुन घ्यायला जे कारण असेल, जसं इथे व्यायामाच्या गरजेबद्दल म्हटलय, ते कारण दृष्य स्वरुपात आपल्याला नेहेमी दिसेल अशा ठिकाणी ठेवावे. एखादा फोटो, तक्ता, मेडीकल रिपोर्ट वगैरे. त्या सवयीला अनुकुल अशी १५ मिनीटाची अ‍ॅक्टीव्हिटी बनवावी. म्हणजे कसं, कि व्यायाम करायचा असेल तर ५ मिनिटे वॉर्म अप, ५ मिनीट मुख्य व्यायाम, ५ मिनीटे कुल डाऊन. बस्स.. आणि हि अ‍ॅक्टीव्हिटी दिवसाची सुरुवात होताच सर्वप्रथम उरकावी. ८ - १० दिवस जर असं करु शकलो तर नवीन सवय आत्मसात करायचे चान्सेस खुप वाढतात.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Wed, 10/21/2020 - 19:54 नवीन
हा उपाय भारीये! अमुक व्हायला नको असेल तर ही चांगली सवय लावलीच पाहिजे.भारी!
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 10/22/2020 - 07:48 नवीन
कुठलिही सवय २१ दिवसांच्या नियमीत सरावाने लावुन घेता येते. ८ - १० दिवस जर असं करु शकलो तर इथेच तर घोडं पेंड खातंय. व्यायाम करायचा तर आळस फार येतो. बाकी वजन कमी करणे किंवा असा कोणताही हेतू नाहीये.(ते प्रमाणातच आहे)
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Wed, 10/21/2020 - 21:31 नवीन
व्यायामाला मी एक ठराविक वेळ ठरविली नाही आहे आणि जिम वगैरेही लावली नाही. जिन्याच्या पायर्यांवर स्टेप अप स्टेप डाऊन करत बसायचे. ठराविक वेळ नसल्याने ती उलटुन जायचा प्रश्नच नाही. (म्हणजे सकाळी ८ लाच व्यायाम करायचा असे ठरवले कि एकदा का साडेआठ झाले तर मग आपणच स्वत:ला कन्विन्स करतो कि आता तर वेळ गेली उद्या करु.) आणि जिनाही कुठे जात नसल्याने जबरदस्तीने व्यायाम करावा लागतो नाहीतर मन खात राहते. तरीही टाळाटाळ होते पण तरीदेखील हा प्रकार सुरु राहतो.
  • Log in or register to post comments
स
सोत्रि गुरुवार, 10/22/2020 - 04:32 नवीन
उत्तम विषय! शरीर - मन (विचारप्रवाह) ह्यांच्या परस्पर संबंधांवर कुठल्याही बदलाला आपण कसे सामोरे जातो हे ठरते. डोपामाइन नावाचे हार्मोन ह्यासाठी महत्वाचे असते. कुठलीही गोष्ट केल्यावर मिळणारा मोबदला काय आणि तो कसा आणि कितीआनंदायी आहे ह्याची चिकित्सा झाल्यावर डोपामाइन हार्मोन तयार होते. त्याची मात्रा मोबदला मिळणाची शक्यता किती जास्त आहे त्यावर ठरते. तर, डोपामाइन शरीरात किती प्रमाणात तयार होते ह्यावर उपक्रम दीर्घकाळ चालणार की नाही हे ठरते. ह्या डोपामाइनच्या योग्य पातळीसाठी खालील सोप्पे उपाय उपयोगी ठरावेत. १. समतोल आहार २. आहाराची ठरलेली वेळ ३. पुरेसा व्यायाम ४. भरपूर वाचन किंवा एखादा छंद जो नविन अनुभव देऊ शकेल ५. ध्यान (मेडीटेशन) ह्या डोपामाइनचा एक लेख रेकमेंड करतोय वाचण्यासाठी. तसेच सखोल अभ्यासाठी हे एक पुस्तक रेकमेंड करेन. Image removed. - (उपक्रम दीर्घकाळ टिकवण्याच्या प्रयत्नात असलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक गुरुवार, 10/22/2020 - 17:29 नवीन
लेख आणि पुस्तक दोन्ही उत्तम!
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक गुरुवार, 10/22/2020 - 20:03 नवीन
धन्यवाद सोत्रि.तुम्ही थोडं तांत्रिक/वैज्ञानिक अंगानं लिहिलंय त्यामुळेच थोडं अधिक लिहितो. माझा प्रॉब्लेम हा मेडीटेशनसंबंधीच आहे.बर्‍याच वर्षांपूर्वी एका किचकट प्रॉब्लेममधून जाताना मानसिक ताणामुळे येणारे मनातले अनावश्यक किंवा नकारात्मक विचार कमी व्हावेत यासाठी एका स्नेह्यांनी जपमाळेचा उपाय सुचवला होता.दुसरा काही पर्याय त्यावेळी नसल्याने त्यावेळी 'शरणागती पत्करुन' मी तो उपाय केला आणि त्यामुळे कमालीचा फायदा झाला देखील. आता हे मला परत सुरु करायचं आहे.त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.पूर्वी हे कार्य बिनबोभाट घडून गेलं कारण पर्याय नव्हता,फारच अडचणीत होतो,शरणच गेलो म्हणा! आता का जमत नाहीये तर 'समस्येची तीव्रता किंवा आवाका पूर्वीइतका मोठा नाहीये.सध्याचा उपक्रम हा आहे त्यापेक्षा अधिक फायदा मिळवण्यासाठी करत आहे. यात अजून एक लोचा म्हणजे मी जरा चिकित्सक आहे.जपमाळेचा उपाय हा तसा 'एकसुरी' आहे.दररोजचा अर्धा तास.सुरुवातीला पहिले ५-६ दिवस चिकाटीने केला जातो.नंतर नंतर ती मोनोटोनस क्रिया जोखड वाटू लागते.याच्याऐवजी इतकाच प्रभावी पण एकसुरी नसणारा उपाय करता येईल का यावर समांतरपणे विचार सुरु राहतो.त्यामुळे त्या जपावर १००% एकाग्रता होत नाही.हातात माळ,तोंडातून 'यांत्रिकपणे' बारीक आवाजात जप सुरु.पण मेंदूत विचार मात्र या जपमाळेपेक्षा दुसरा एखादा 'कंटाळवाणा नसणारा' उपाय असेल का याच्या चिंतनावर.नंतर नंतर तर इमॅजिनेशनला चेव चढून कल्पनेत मी बोरींग चेहर्‍याने जप करत असल्याचे कल्पनाचित्र मला दिसू लागते.पुढे पुढे १-२ दिवस खंड पडतो.मग बळजोरीने परत काही दिवस रेटले जाते.हा खंड पडण्याचा कालावधी वाढला तर उत्साह जवळपास संपल्यात जमा होऊन उपक्रम थंडावतो.मी आचरत असलेल्या उपायामुळे मला फायदा होणार आहे हे मला १००% माहित आहे.तसूभरही शंका नाही. सारांशाने सांगायचे तर उपक्रम बारगळ्याचे कारण हे त्या उपक्रमाच्या प्रक्रियेतला 'एकसुरीपणा' हे आहे. यावर काय उपाय करता येईल?
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Fri, 10/23/2020 - 00:34 नवीन
उपक्रमाविषयी सविस्तर पार्श्वभूमी सांगिल्यावर प्रॅाब्लेम स्टेटमेंट स्वच्छ झालं. व्यनि करतो, चर्चा करूयात, मीही ह्यातून गेलोय / जातोय. - (मुमुक्षू) सोकाजी
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Fri, 10/23/2020 - 05:09 नवीन
धन्स!
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Fri, 10/23/2020 - 01:00 नवीन
https://www.youtube.com/watch?v=4O2JK_94g3Y
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 10/23/2020 - 07:57 नवीन
तर इतका गोंधळ झाला नसता ! लपवाछपवीमुळे गुंता वाढत जातो हा फंडा आहे. १. जप ही मेंटल अ‍ॅक्टीविटी थांबवायची सर्वात बोगस पद्धत आहे. ते लहान मुलाचं लक्ष त्याच्या हट्टापासून काही काळ दुसरीकडे वेधण्यासारखं आहे. जप थांबला की पुन्हा मनातला गोंधळ दुप्पट वेगानं उसळी मारुन सुरु होतो. थोडक्यात जप हा निर्बुद्ध टाईमपास आहे. एकतर तो करत असतांना तुम्हाला दुसरं काही करता येत नाही आणि तो थांबवला की मनाच्या आवेगाची दहशत कायम रहाते. तस्मात, हा प्रोजेक्ट ड्रॉप करणं उत्तम ! २. मेंटल अ‍ॅक्टीविटी थांबवण्याचा एकमेव उपाय आणि पहिली स्टेप म्हणजे त्याची व्यर्थता लक्षात येणं. मनानी कोणतंही काम होत नाही. काम शरीर आणि मन यांच्या संगतीनंच होऊ शकतं. त्यामुळे मनानं काम करण्याचा खटाटोप सोडून देणं श्रेयस. उदा. घरात असतांना मनानी ऑफिसला जाण्याचा प्रयत्न हा असंभव प्रयास आहे. मन आणि शरीर कायम एकसंगत असतील तरच काम होईल इतकी साधी गोष्ट लक्षात आली की तुमची ७० ते ८० टक्के मेंटल अ‍ॅक्टीविटी थांबलीच म्हणून समजा. ३. कायम समोर पहाणं आणि आजूबाजूला चाललेलं ऐकत रहाणं हे जगातल्या सर्व ध्यानप्रणालींचा अभ्यास करुन मी शोधलेलं सर्वोच्च आणि सर्वात सोपं मेडीटेशन आहे. एकदा तुम्हाला ते जमलं की मनाची दहशत संपलीच म्हणून समजा.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 10/23/2020 - 08:25 नवीन
जप ही सर्वात बोगस पद्धत आहे जप हा निर्बुद्ध टाईमपास आहे. मनानी कोणतंही काम होत नाही. जगातल्या सर्व ध्यानप्रणालींचा अभ्यास करुन

मी

शोधलेलं सर्वोच्च आणि सर्वात सोपं मेडीटेशन आहे. एकदा तुम्हाला ते जमलं की मनाची दहशत संपलीच म्हणून समजा.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 10/23/2020 - 08:38 नवीन
मी जेवलो याचं दुसरं वर्शन करुन दाखवा. आणि अर्थात ती मी शोधलेली पद्धत आहे. गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटननी लावला असंच वाक्य होणार. तुम्ही उगीच गोंधळ घालून विषय भरकटवण्यापेक्षा, जमल्यास ते मेडीटेशन करुन पाहा, प्रचिती येईल.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 10/23/2020 - 08:42 नवीन
मी कुठे काय म्हणालोय? मी फक्त तुमचेच शब्द लिहिलेले आहेत. त्यात माझे अक्षरशः एकही अक्षर नाही जाता जाता -- खाई त्याला खवखवे अशी एक म्हण ऐकली आहे.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 10/23/2020 - 08:53 नवीन
तद्दन प्रतिसाद देऊन आणखी शोभा होते. खवखवतंय तुम्हाला की लेखकानं सरते शेवटी नक्की प्रॉब्लम उघड केला. तुम्ही उगीच फालतू मुद्दा लावून धरला होता तो आता फेल गेलायं.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 21 hours ago
  • सुंदर !!
    1 day 21 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 21 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा