Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

उपक्रम/चांगल्या सवयी दीर्घकाळ चालवणे

उ
उपयोजक
Tue, 10/20/2020 - 17:59
🗣 112 प्रतिसाद
बर्‍याचदा आपण आपल्या व्यक्तिमत्वात काही चांगला बदल घडवण्याच्या उद्देशाने काही नवीन सवयी लावू पाहतो.जसे की दररोज पहाटे उठून व्यायाम करणे किंवा दररोज किमान २० मिनिटे मेडीटेशन करणे किंवा दररोज ठराविक अंतरापर्यंत सायकल चालवणे इ. असे बरेचसे बदल उपक्रम असतील आणि बरेच लोक तो ठरवत असतील.पण हे उपक्रम दीर्घकाळ टिकवणे सोपे नसते.२-३ दिवसात त्याचा कंटाळा येतो आणि तो उपक्रम सोडून द्यावासा वाटतो; किंवा मधेच काही कारणांनी खंड पडतो आणि पुन्हा तो उपक्रम सुरु करणे टाळण्याकडे मनाचा कल असतो किंवा पुरेशी मानसिक ऊर्जा नसल्याने पुनश्च हरिअोम होत नाही. असे का होते? या उपक्रमांमधे रंजकता नसल्याने असे होते का? प्रत्येक उपक्रम रंजक बनवणे शक्य आहे का? कशी आणावी रंजकता उपक्रमांमधे? तुम्ही कधी या अशा प्रकाराला सामोरे गेला आहात का? एखादा चांगला पण तुमचे पेशन्स बघणारा उपक्रम तुम्ही मधेच सोडून दिलात किंवा बाह्य कारणांनी त्यात खंड पडला असेल तर तो परत सुरु करणे आणि दीर्घकाळ चालवणे तुम्हाला जमले का? तुम्ही हे कसे साध्य केलेत? या विषयावर काही पुस्तके किंवा साईटस् ,अॅप्स असतील तरी सुचवाव्यात.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 45291 views

🗣 चर्चा (112)
उ
उपयोजक Fri, 10/23/2020 - 09:22 नवीन
स्वतः काहीही विचार न करता हा स्वत:ला हवा तसा केलेला तर्क आतातरी उघडा पडलाय का? फेल गेला का आतातरी? की अजून काही मल्लिनाथी येणारेय यावरदेखील? धागा विषयाबद्दल बोलाल तर बरे होईल. किंवा दुसरे झाड धरावे!
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 10/23/2020 - 09:47 नवीन
इतका वेळ तुम्ही ताकाला जाऊन भांडं लपवत होता आणि म्हणून ते निरिक्षण पर्फेक्टच होतं ! आता झकत नेमका प्रश्न लिहिल्यामुळे धागा योग्य वळणावर आला आहे.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Fri, 10/23/2020 - 11:13 नवीन
डॉन आहात तुम्ही मिपाचे. आम्ही काय सामान्य माणसं! ;)
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 10/23/2020 - 11:39 नवीन
सगळ्यांनी मुद्दा सोडून आधी मला घेरायचा प्रयत्न करायचा आणि काही जमलं नाही की ही मखलाशी ! व्यक्तिगत होण्यापेक्षा सगळे मुद्दा धरुन लिहायला लागले तर संकेतस्थळावर सर्वांना उपयोगी असं काही तरी विधायक होत राहील.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Fri, 10/23/2020 - 15:44 नवीन
आधी मला घेरायचा तसे का होते याचा विचार केलात का कधी? १. तुमचे प्रतिसाद हे अनावश्यकपणे धार लावलेले असतात. सौम्य शब्दांत आपला मुद्दा समोरच्यापर्यंत पोहचवता येतो यावर तुमचा विश्वास नाही.जगात कोणीही परिपूर्ण नसतो हे मुख्य तत्वच तुम्ही विसरता. ही अनावश्यक धार न लावता संवाद साधायचा प्रयत्न करा.शाब्दिक तलवारींचा खणखणाट नसावा. २. तुम्ही अध्यात्म,विज्ञाननिष्ठता या विषयात इथल्या लोकांपेक्षा थोडे अधिक ज्ञानी असालदेखील.पण त्यामुळे अध्यात्म,विज्ञाननिष्ठता या विषयातलं जगातलं सगळं ज्ञान तुम्हाला आहे असा तुमचा गैरसमज होतो. आणि त्यातून तुम्ही तुमचे विचार लादायला बघता.विचार मांडावेत आणि लोकांना तुमच्या विचारांवर विचार करायला वेळ द्यावा हे तुमच्या लक्षातच येत नाही.तुमचे विचार लोकांनी बिनबोभाटपणे मान्य करावेत असा तुमचा दुराग्रह असतो. तुमचे विचार पटले तर लोक तसं सांगतील ना! पटलेच पाहिजेत असा दुराग्रह नसावा.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Fri, 10/23/2020 - 16:29 नवीन
२. तुम्ही अध्यात्म,विज्ञाननिष्ठता या विषयात इथल्या लोकांपेक्षा थोडे अधिक ज्ञानी असालदेखील. अहो उपयोजक, हा गैरसमज दूर करा हो आधी.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 10/23/2020 - 18:21 नवीन
अर्थात, हाच धागा पाहा : १. तुम्ही पोकळ धागा काढला म्हणून मला स्पष्ट प्रतिसाद देणं भाग पडलं. २. इतर सदस्यांना मधे पडायची गरज नव्हती तरी ते मुद्दा लक्षात न घेता नाहक मधे पडले (आणि तुमचं स्पष्टीकरण आल्यावर तोंडावर आपटले). त्यांचे प्रतिसाद किती व्यक्तिगत आहेत ते पाहा. अशा लोकांना सांगायची इथे कुणाची हिंमत नाही; त्यामुळे जशास तसे उत्तर देणे क्रमप्राप्त झाले. ३. जालावर कुणी कुणाचं ऐकून घेत नाही त्यामुळे मी मतं लादतो हा तर फारच तकलादू युक्तीवाद आहे. थोडक्यात, तुम्हाला माझं पटलं तरच तुम्ही जपाचा नाद सोडाल हे सरळ आहे. ४. शिवाय राजेंद्र बर्व्यांचे सगळे मुद्दे बाद झाले आहेत त्याचा तुम्हाला आणि इतरांनाही (नीट विचार केला तर) हमखास उपयोग होईल. ५. नामस्मरणाचा फोलपणा शाम भागवतांच्या अप्रिय आठवणींच्या धाग्यावर यथोचित खोडून काढला होता. जप हा तोच प्रकार आहे. माझ्याबाजूनी सर्व मुद्देसूद आणि सकारण लिहिलेलं आहे. या उप्पर जशास तसे हा व्यावहारिक दृष्टीकोन आहे हे समजायला काहीच अडचण नाही.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sat, 10/24/2020 - 06:58 नवीन
५. नामस्मरणाचा फोलपणा शाम भागवतांच्या अप्रिय आठवणींच्या धाग्यावर यथोचित खोडून काढला होता. जप हा तोच प्रकार आहे. माझ्याबाजूनी सर्व मुद्देसूद आणि सकारण लिहिलेलं आहे. या उप्पर जशास तसे हा व्यावहारिक दृष्टीकोन आहे हे समजायला काहीच अडचण नाही.
हाहाहा. तसं काहीही झालेलं नाहीये. तुम्ही तर्काच्या जोरावर विचार करता व मुद्दे मांडता. नामस्मरण हे तर्काच्या कक्षेच्या बाहेर असल्याने ते तुम्हाला कधीच कळू शकणार नाही. प्रत्यक्ष कृती करून व अनुभव घेऊनच जाणता येणारी गोष्ट आहे ती. नामस्मरण करत असताना एक क्षण असा येतो की देहभान हरवते. आजूबाजूचा कोलाहल गोंगाट सगळंच एकदम विरून जाते. परत जेव्हा भान येते, तेव्हां अंग हलकं झालेले असते. प्रसन्नतेचा अनुभव येत असतो. कितीही शारिरीक कष्ट झालेले असले तरी ते सगळे निघून गेलेले असतात. तुम्ही कितीही तर्काच्या जोरावर विचार केला तरी तुम्हाला ते कळू शकणार नाही. तिथे प्रत्यक्ष कृतीची आवश्यकता असते. मात्र या अनुभवानंतर आपण कोणितरी विशेष आहोत हा अभिमान धरायचा नसतो, तर ह्या बोधात जगायचे असते. त्यातून शहाणपण व अखंड प्रसन्नता प्राप्त होत असते. त्याची परिणिती अजातशत्रूत्वात होत असते. नामस्मरणाच्या माध्यमातून शांतता अनुभवणाऱ्याला हे सहज जमू शकते. कारण ही स्थिती मी मिळवलेली नसून, ती मला भगवंताच्या कृपेने लाभलीय अशी भावना असते. त्यामुळे या शांततेचा वारंवार अनुभव घेताना त्याच्यातील कृतज्ञता वाढत जात असते, नम्रता अंगी बाणली जात असते. मात्र इतर मार्गांनी शांतता अनुभवणाऱ्यांना मात्र मी ही स्थिती मिळवली आहे असे वाटत असल्याने, “आपण कोणी विशेष आहोत” हा अभिमान नडतो. इतकेच नव्हे तर मला सगळे कळते असे वाटू लागल्याने नवीन ज्ञान ते मिळवू शकत नाहीत. त्यामुळे नामस्मरण कसं काम करते हे तुम्हाला कधीच कळू शकणार नाही. तर्काच्या सहाय्याने तर्काच्या पलिकडे असलेले भगवंताचे नाम जाणण्याचा प्रयत्न करणे हे मुलाने आपल्या वडिलांच्या बारशाला हजर राहण्याचा अट्टाहास करण्यासारखे आहे. यासाठी मी माऊलींची ओवी उद्धृत केली होती. नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळीकाळाचा रीघ नाही ॥२५.२॥ तेथील प्रमाण नेणवे वेदांसी तें जीवजंतूंसी काय कळे ॥२५.३॥ पण तुमची सर्व संतांबद्दलची मते माहीत असल्याने थांबायचे ठरवले. पण शेवटचा प्रतिसाद आपला असला की आपण जिंकलो असा तुमचा ग्रह झालेला असल्याने काय करावे हे कळत नव्हते. साधारणत: वाद थांबवायचा असेल तर मी नमस्कार करून बाजूला होतो. पण त्याचा वेगळाच अर्थ घेतला जाऊ लागल्याचे लक्षात आल्याने ॐ शांती ॐ ने समारोप करायचा असा करायचा प्रघात मी सुरू केला. खरे तर मी उत्तर देणार नव्हतो. त्याचा तुम्हाला काहीच उपयोग नाही. मात्र
नामस्मरणाचा फोलपणा शाम भागवतांच्या अप्रिय आठवणींच्या धाग्यावर यथोचित खोडून काढला होता.
या तुमच्या वाक्याने धागाकर्ता आणखीन गोंधळात पडू नये यासाठी हे सगळे लिहायला लागले. परत एकदा ॐ शांती ॐ
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sat, 10/24/2020 - 07:45 नवीन
इतरांच्या धारणांना तो शह देतो तेंव्हा “आपण कोणी विशेष आहोत” असा तकलादू युक्तीवाद करुन त्याची बोळवण करण्याचा प्रयत्न केला जातो. १. कोणत्याही नामजपापेक्षा सजगता सरस आहे. इतकी वर्ष नामसाधना करुन सुद्धा साधक कल्पना आणि वास्तव यात फरक करु शकत नाही याचा अर्थच साधकाला फक्त गुंगी आलेली आहे. तो साध्या कल्पनेनी इतका बेभान होतो की त्याची सर्व साधना आणि शांती एका क्षणात हरवून जाते. २.
मात्र या अनुभवानंतर आपण कोणितरी विशेष आहोत हा अभिमान धरायचा नसतो, तर ह्या बोधात जगायचे असते. त्यातून शहाणपण व अखंड प्रसन्नता प्राप्त होत असते. त्याची परिणिती अजातशत्रूत्वात होत असते.
ही भावना किती फोल आहे याची कल्पना तुम्हाला स्वतःच्या त्या पोस्टवर लिहिलेल्या अनुभवातून आलेली आहे. सजग व्यक्ती विषय तिथल्या तिथे मिटवते, मग भूतकाळाचं ओझंच रहात नाही. थोडक्यात, अप्रिय आठवणींपासून सुटकेसाठी कल्पनेतल्या व्यक्तीला काल्पनिक क्षमा करणं, असा भोळसट प्रकार करावा लागत नाही. ३.
तर्काच्या सहाय्याने तर्काच्या पलिकडे असलेले भगवंताचे नाम जाणण्याचा प्रयत्न करणे हे मुलाने आपल्या वडिलांच्या बारशाला हजर राहण्याचा अट्टाहास करण्यासारखे आहे
उलट आहे, नामस्मरणाची गुंगी चढलेल्याला आपण वडिलांच्या बारशाला हजर होतो असा सुद्धा भास होऊ शकतो ! पण सजग व्यक्ती सर्व आभासी दुनियेतून मुक्त झालेली असते. (तुम्हाला इतरांना क्वोट करुन रुपकात्मकतेनं विधानला जोर आणावा लागतोयं) ४.
शेवटचा प्रतिसाद आपला असला की आपण जिंकलो असा तुमचा ग्रह झालेला असल्याने काय करावे हे कळत नव्हते.
प्रतिसादात मटेरियल असेल तरच तो टिकतो, नाही तर ॐ शांती ॐ करत पुन्हा नामाची गुंगी चढवून घेण्यापरता उपाय रहात नाही.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sat, 10/24/2020 - 07:48 नवीन
ॐ शांती ॐ
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Fri, 10/23/2020 - 08:52 नवीन
जप ही मेंटल अ‍ॅक्टीविटी थांबवायची सर्वात बोगस पद्धत आहे. तुमच्याकडून हा असाच काहीतरी प्रतिसाद येणार याची १००% खात्री होती.म्हणून धाग्याच्या निवेदनात स्पष्टपणे सांगत नव्हतो. --------------------------------------------- प्रफुल्ल डॉ . राजेंद्र बर्वे स्मरण - विस्मरण स्मरणाचं महत्त्व प्रत्येक धर्मगुरूंनी , संतांनी , महंतांनी आणि सद्गुरूंनी आपल्या सर्वांना पटवलं आहे . वैखरीवाटे प्रकट होणारे ' नाम ' अगदी अंतरात्म्यापासून आलं पाहिजे , याचा आग्रह धरला आहे . आपल्या आराध्यदैवताचं गोड नाव असो की आपापल्या गुरूंनी कानात सांगितलेले मंत्रात्मक नाम असो . ज्यानं त्यानं मुखात परमेश्वराचं नाव धारण केलं पाहिजे , असा उपदेश केला जातो . सर्व पिढ्यांतल्या काही आबालवृद्धांना नामस्मरणाची महती पटते असं नाही , तर त्यांना ते आचरणातही आणता येते . आपापली अत्यंत जिकिरीची आणि जटिल कामं पार पाडताना मनातल्या मनात नामस्मरण करीत राहण्याची तारेवरची कसरत ' त्यांना जमते . खरंच , अशा मंडळीचं कौतुक वाटतं . परंतु सर्वसामान्य माणसांना ते जमतंच असं नाही . पटतं ; पण वर्तनात वठत नाही . कळतं ; पण वळत नाही . तर काही विलक्षण चिकित्सक शास्त्रीय विश्लेषण करू इच्छिणाऱ्या शिक्षित लोकांना ते आवडलं तरी पटतंच असं नाही . त्यांना असं नामस्मरण अनाठायी आणि अवडंबर आहे असं वाटतं . अशा लोकांसाठी काही विश्लेषण ! मानसशास्त्रानुसार मनाची एकाग्रता म्हणजे एखाद्या संवेदनेवर लक्ष केंद्रित करणं . असं अवधान खरोखरंच एकाग्र असतं . स्मरण करताना त्या एकाच संवेदनेवर अथवा मनांतर्गत विचारावर लक्ष केंद्रित होतं . त्या एकाग्रतेनं मानसिक शक्ती एकवटण्याची क्षमता मनात निर्माण होते . मनाला लक्ष एकाग्र करण्याचं प्रशिक्षण मिळतं . अशा प्रशिक्षणाचा आपल्याला खूप फायदा होतो . पण नामस्मरणाच्या उपयुक्ततेचं रहस्य पुढे आहे . आपण स्मरण करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपोआप विस्मरणाची प्रक्रिया सुरू होते . चक्रावलात ना ? मनामध्ये असंख्य विचार असतात . काही होकारात्मक , काही नकारात्मक . ( काहींच्या बाबतीत नकारात्मक अधिक ) नामस्मरण होकारात्मक असतं , अशा होकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आणि हळूहळू ते जमू लागलं की आपोआप ' नकारात्मक ' विचारमालिकाचं विस्मरण होतं . होकारात्मक विचारांची मनात स्थापना होते . नकारात्मक विचारांना गच्छन्ती मिळते . ते विचार मनातून मावळतात . होकारात्मक विचारातून सद्गुणांवर विश्वास निर्माण होतो . त्या विश्वासातून ' आशा ' जन्म घेते . आशा म्हणजे उत्साहित मन , प्रसन्न मन प्रफुल्ल मन ! आहे की नाही गंमत !! तुमची माझी!!! drrajendrabarve@yahoo.com ----------------------------------------------- आता हे डॉक्टर राजेंद्र बर्वे कोण ते इथे वाचा. https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87 मुंबई विद्यापीठातून डॉक्टरकीची परीक्षा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. पण तुमच्या ज्ञानाच्या तुलनेत यांचं ज्ञान आणि अनुभव तसं किरकोळच असणार नाही का? ;)
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 10/23/2020 - 09:42 नवीन
तुमची सतावणारी मेंटल अ‍ॅक्टिवीटी ? एनी वे, काय म्हणतात बर्वे पाहा : १.
मानसशास्त्रानुसार मनाची एकाग्रता म्हणजे एखाद्या संवेदनेवर लक्ष केंद्रित करणं . असं अवधान खरोखरंच एकाग्र असतं . स्मरण करताना त्या एकाच संवेदनेवर अथवा मनांतर्गत विचारावर लक्ष केंद्रित होतं . त्या एकाग्रतेनं मानसिक शक्ती एकवटण्याची क्षमता मनात निर्माण होते . मनाला लक्ष एकाग्र करण्याचं प्रशिक्षण मिळतं . अशा प्रशिक्षणाचा आपल्याला खूप फायदा होतो .
मन एकाग्र करण्याचा प्रयत्नच विक्षेप निर्माण करतो ! तुम्ही प्रेयसी समवेत असतांना मनाची एकाग्रता साधता का ? तीचा सहवासच मेंटल अ‍ॅक्टीविटी थांबवतो. ही निर्विचार अवस्था हेच रिलॅक्सेशन आहे. त्यामुळेच तर तीचा सहवास हवाहवासा वाटतो. तस्मात, जपानी मन एकाग्र करणं व्यर्थ आहे (हे तुम्हाला ही लक्षात आलं आहे आणि म्हणूनच तुमचा प्रोजेक्ट बारगळला आहे !) २.
पण नामस्मरणाच्या उपयुक्ततेचं रहस्य पुढे आहे . आपण स्मरण करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपोआप विस्मरणाची प्रक्रिया सुरू होते . चक्रावलात ना ? मनामध्ये असंख्य विचार असतात . काही होकारात्मक , काही नकारात्मक . ( काहींच्या बाबतीत नकारात्मक अधिक ) नामस्मरण होकारात्मक असतं , अशा होकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आणि हळूहळू ते जमू लागलं की आपोआप ' नकारात्मक ' विचारमालिकाचं विस्मरण होतं . होकारात्मक विचारांची मनात स्थापना होते . नकारात्मक विचारांना गच्छन्ती मिळते . ते विचार मनातून मावळतात . होकारात्मक विचारातून सद्गुणांवर विश्वास निर्माण होतो . त्या विश्वासातून ' आशा ' जन्म घेते . आशा म्हणजे उत्साहित मन , प्रसन्न मन प्रफुल्ल मन ! आहे की नाही गंमत !! तुमची माझी!!!
नेगटिव विचार हद्दपार करायला सजगता लागते. सजगतेमुळे नेगटिव विचार येता क्षणी तुम्ही सावध होता आणि लगोलग तो विचार निघून जातो. बर्व्यांचा सजगतेचा अभ्यास शून्य आहे. एकदा विचारचक्र सुरु झालं की सकारात्मक विचारांमागे नकारात्मक विचार आपसूक येणारच. बर्व्यांना निर्मन अवस्थेची कल्पनाच नाही त्यामुळे त्यांचा मनाचा अभ्यास एकांगी आणि निरुपयोगी आहे .
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Fri, 10/23/2020 - 15:38 नवीन
नामस्मरण मन एकाग्र करूनच करावे असे काही बंधन आहे का? खरे तर हे बोलायचा मला अधिकार नाही, पण तरी सांगतो.. नामस्मरण एक विशिष्ट मर्यादेपलीकडे गेले की ते एक छंद होऊन जाते, आणि ज्याला त्याची गोडी लागेल त्याला ती गोडी खूपच चांगली वाटते असे म्हणतात.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Fri, 10/23/2020 - 19:01 नवीन
🎯
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 10/23/2020 - 19:18 नवीन
यथार्थ आणि मार्मिकपणे मांडला आहे ते वाचलेलंच दिसत नाही ! वाचा :
यात अजून एक लोचा म्हणजे मी जरा चिकित्सक आहे.जपमाळेचा उपाय हा तसा 'एकसुरी' आहे.दररोजचा अर्धा तास.सुरुवातीला पहिले ५-६ दिवस चिकाटीने केला जातो.नंतर नंतर ती मोनोटोनस क्रिया जोखड वाटू लागते.याच्याऐवजी इतकाच प्रभावी पण एकसुरी नसणारा उपाय करता येईल का यावर समांतरपणे विचार सुरु राहतो.त्यामुळे त्या जपावर १००% एकाग्रता होत नाही.हातात माळ,तोंडातून 'यांत्रिकपणे' बारीक आवाजात जप सुरु.पण मेंदूत विचार मात्र या जपमाळेपेक्षा दुसरा एखादा 'कंटाळवाणा नसणारा' उपाय असेल का याच्या चिंतनावर.नंतर नंतर तर इमॅजिनेशनला चेव चढून कल्पनेत मी बोरींग चेहर्‍याने जप करत असल्याचे कल्पनाचित्र मला दिसू लागते
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Fri, 10/23/2020 - 19:49 नवीन
ॐ शांती ॐ
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Sat, 10/24/2020 - 03:42 नवीन
म्हटलं शांती मंत्र विसरलात कि काय =)) =))
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sat, 10/24/2020 - 09:28 नवीन
😀
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Fri, 10/23/2020 - 10:06 नवीन
मुंबईवरून दिल्लीला पोहोचण्याचे अनेक मार्ग आहेत. कोणी कोणता मार्ग पकडून दिल्लीला पोहोचतो हे महत्वाच नसून पोहोचणं महत्वाचं असतं. एक २५ वर्षांचा सधन तरूण विमानाने दिल्ली गाठण्याचा प्रयत्न करतो म्हणून दिल्ली गाठण्याचा तोच एक मार्ग असं असू शकत नाही. ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या मार्गाने दिल्ली गाठण्याचा प्रयत्न करणार. ध्यानाचेही तसेच आहे. विविध मार्ग आहेत. ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार (कर्मसंस्कारांच्या ओझ्यानुसार किंवा अविद्येच्या पडद्यानुसार) जो तो आपापल्या अनुभूतीने मार्ग अवलंबतो. कारण मुक्ती मिळणं महत्वाचं कशी आणि कधी हे गौण असतं! - (मुमुक्षू) सोकाजी
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 10/23/2020 - 10:35 नवीन
तस्मात, तो मुक्तीचा मार्गच नाही. उगीच गोलगोल फिरण्यापेक्षा जपानं मुक्ती कशी मिळते हे लिहा. तो तुमचा मार्ग नसेल किंवा त्याविषयी तुमचा अभ्यास नसेल तर प्रतिसाद न देणं योग्य. बर्व्यांच्या मेथडॉलॉजीचा वरच्या प्रतिसादात यथोचित उहापोह झाला आहे त्याला अनुसरुन काही जमत असेल तर पाहा.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sat, 10/24/2020 - 04:55 नवीन
कायम समोर पहाणं आणि आजूबाजूला चाललेलं ऐकत रहाणं हे जगातल्या सर्व ध्यानप्रणालींचा अभ्यास करुन मी शोधलेलं सर्वोच्च आणि सर्वात सोपं मेडीटेशन आहे. १००% अंध व्यक्ती 'पाहणार' कशी? आणि १००% बहिरी व्यक्ती 'ऐकणार' कशी? की हे दोन तुम्ही शोधलेल्या पद्धतीला अपवाद असणारेत? या दोघांना मनात येणार्‍या नकारात्मक विचारांचा त्रास होत नाही का? जरा उलगडून सांगा!
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Mon, 10/26/2020 - 12:38 नवीन
अरेच्चा, हे राहूनच गेलंय की! उत्तराच्या प्रतिक्षेत... - (विद्यार्थी) सोकाजी
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Mon, 10/26/2020 - 14:42 नवीन
१००% अंध व्यक्ती 'पाहणार' कशी? आणि १००% बहिरी व्यक्ती 'ऐकणार' कशी? की हे दोन तुम्ही शोधलेल्या पद्धतीला अपवाद असणारेत? या दोघांना मनात येणार्‍या नकारात्मक विचारांचा त्रास होत नाही का? जरा उलगडून सांगा!
पूर्ण अंध आणि मूक-बधीर असलेल्या व्यक्तीच्या मेंदूला केवळ स्पर्श आणि गंध या दोनच संवेदनांमधून इनपुट जाईल त्यामुळे अशा व्यक्तीची मेंटल अ‍ॅक्टीविटी न्यूनतम असेल. तस्मात, तिला नैसर्गिक भयाव्यतिरिक्त इतर काही नेगटिवीटी असण्याची शक्यता न्यूनतम आहे.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 10/26/2020 - 14:57 नवीन
या विधानाला काही शास्त्रीय आधार? माझ्यामते हे विधान फारच धाडसी आहे.
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Mon, 10/26/2020 - 15:34 नवीन
तिला नैसर्गिक भयाव्यतिरिक्त इतर काही नेगटिवीटी असण्याची शक्यता न्यूनतम आहे
म्हणजे अंध किंवा बहिऱ्या व्यक्तीला मेडीटेशनची गरज नसते? कि तुम्ही शोधलेल्या मेडीटेशनसाठी त्या व्यक्ती फीट नाहीत?? - (चिकित्सक) सोकाजी
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Mon, 10/26/2020 - 15:51 नवीन
जी व्यक्ती अंध आणि बहिरी आहे तिला काय दिसणार आणि ती काय ऐकणार ? उगीच फालतूचा टाईमपास करण्यात काय अर्थ आहे ? त्यापेक्षा स्वतः ते ध्यान करुन पहाणं श्रेयस आहे.
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Tue, 10/27/2020 - 00:24 नवीन
विचार केला आणि जे काय शिकायचे ते शिकलो! &#128519 - (कोणताही प्रश्न फालतू न समजणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Wed, 10/28/2020 - 06:20 नवीन
अति अवांतर : नाना तो कॉकटेल लाऊंज च्या रेसिप्यांचा उपक्रम पुन्हा सुरु करावा हि विनंती विशेष. जुने लेख वाचून भारी वाटलं होतं
  • Log in or register to post comments
व
विश्वनिर्माता गुरुवार, 10/22/2020 - 06:35 नवीन
कॉम्प्लेक्स काम कसे करावे यासाठी अतुल गावांदे यांचे "द चेकलिस्ट मॅनिफेस्टो" नावाचे उत्तम पुस्तक आहे, ज्यात अनेक क्षेत्रांमध्ये जिथे अतिशय गुंतागुंतीच्या प्रक्रिया असतात, तिथे चेकलिस्टचा वापर करून कसे क्वालिटी मेंटेन केली जाते , हे पुस्तकात दिले आहे. चेकलिस्ट सामान्य जीवनात पण खूप उपयोगी आहे, आणि खूप सोप्पी. चेकलिस्टचे अनेक ऍप्स उपलब्ध आहेत.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस गुरुवार, 10/22/2020 - 06:55 नवीन
जे मिळवयचे आहे ते दुय्यम ठेउन, ते मिळवण्यासाठीची जी प्रक्रिया असेल (activity), ती करण्यात आनंद वाटत असेल तर ते मग सहज आणि सातत्याने होण्याची शक्यता वाढते.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 10/22/2020 - 07:09 नवीन
ज्यात अनेक क्षेत्रांमध्ये जिथे अतिशय गुंतागुंतीच्या प्रक्रिया असतात, तिथे चेकलिस्टचा वापर करून कसे क्वालिटी मेंटेन केली जाते हवाई दलाचे/ नौदलाचे विमान जेंव्हा हवेत उडते. मग ते अगदी १५ मिनिटांसाठी का असेना त्याच्या एकंदर १०,००० गोष्टींचा कसून तपास होतो या तपास पालिकेत प्रत्येक तपासलेल्या गोष्टीवर त्याला जबाबदार असणाऱ्या वायुसैनिकाची सही असते. यानंतर प्रत्यक्ष उड्डाणाच्या अगोदर त्याची देखरेख करणारा अधिकारी हि तपस तालिका स्वतः सर्वेक्षण करून पाहतो. त्यामुळे एखादी गोष्ट चुकून राहून गेली असे होतच नाही.( अशीच स्थिती नागरी विमानात सुद्धा असते असे ऐकले आहे) यामुळेच हवाई प्रवास हा अतिशय सुरक्षित झालेला आहे. दुर्दैवाने आपल्याकडे आपले वाहन अशा तर्हेच्या तपासतालीकेचा वापर करून उत्तम स्थितीत ठेवले जात नाही. ब्रेक नीट लागत नसताना सुद्धा अनेक लोक आपली वाहने तशीच चालवत असतात.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 10/22/2020 - 15:05 नवीन
आधुनिक काळात .. चेकलिस्ट ,रिमांईंडर ,प्लान बी ची सवय दोन घ्या दोन फ्री ची गेम समजावून घेणे ,शक्यतो एजंट टाळणे पण अपरिहार्य असेल तर त्याचाच वापर करणे ई सवयी लावून घेणे फायद्याचे होईल.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 10/23/2020 - 10:47 नवीन
तुम्ही ठरवून उद्या पासून व्यायाम सुरू करू शकता पण ती सवय 7 दिवसाच्या वर टिकवू शकत नाही कोणाच्या सांगण्या वरून व्यायाम ची सवय टिकत नाही. त्या साठी तुम्हाला मनापासून व्यायामाची आवड असावी लागते. व्यायाम करताना तुम्हाला त्यात आनंद वाटला पाहिजे जबरदस्ती नी काम केल्या सारखा तो करून चालत नाही. माझे निरीक्षण. रोज पहाटे गिरगाव चौपाटी वरून हँगिंग गार्डन मार्गे मी चालत ऑफिस ला जायचो अनंत वॉकिंग करणारे रमतगमत वॉकिंग च्या सोहळ्यात सहभागी असतं. आणि काही थोडके च नियमित रोज मनापासून वॉकिंग करणारे दिसायचे. जरा पावूस पडला की सर्व हौसे,नवसे,गवसे गायब असायचे त्या दिवशी. फक्त मनापासून नियमित वॉकिंग करणारे सदा सर्वकाळ उन्ह असू नाही तर पावूस वॉकिंग करत असत. ते खरे वॉकर. बाकी असेच ठरवून वॉकिंग चे नाटक करणारे.
  • Log in or register to post comments
ब
बाजीगर Fri, 10/23/2020 - 15:40 नवीन
मला वाटतं 'पॅशन' चा अभाव हे उपक्रम न चालण्याचे ऐकमेव कारण असावे. मी काही उपक्रम केले आणि यशस्वीपणे दिर्घकाळ चालू ठेवले, (1) 50 th Bithday ( 20-Oct) पासून हा उद्योग सूरु केलाय, B'day...No cake....मग? धावायचं! 50 th B'day--- 5 km jog 51 th B'day--- 6 km jog 52nd B'day -- 8 km jog 53rd B'day -- 10 km jog 54th B'day -- 12 km jog (all on tread mill) 55 th B'day--- 20 km walk 56nd B'day -- 10 km jog on tread mill 57rd B'day -- 20 km walk 58 th B'day -- 10 km jog on tread mill 59 th B'day -- 13 km cycling-done कुणीही तपासत नसतांना मी अपनेआप शी वादा केल्यासारखा एक दशकभर हे करतो आहे. (2) starmaker वर गाणे म्हणून publish करणे. मागच्यावर्षी सुरवात केली, काहितरी 92 गाणी झालीत,पुढे ही होत रहातील. (3) चालणे, दिड दोन वर्षापूर्वी NRC app वर चालणे नोंदवायला सुरवात केली, 15 दिवसापूर्वी 1000 किमी पार केले असे दिसले, आधी नोंदवत नव्हतो,आता एक हिशोब कळतोय, मजा वाटतेय. (4) यू ट्यूब व्हीडीओज- मागच्या वर्षी Nov 2019 ला सहज म्हणून अकाऊंट सूरु केले, आता पर्यंत 52 videos, प्रवास,recepi,tutorial वगैरे upload केलेत. (5) blog writing - 8 वर्षापासून अधूनमधून ब्लाॅक लिहीतोय,90 plus post झाल्यात,13,500 plus visits दिसतात, ( जरुरी नाही की त्यांनी पूर्ण लेख वाचला असेल) (6) गाण्यांना एक extra अंतरा लिहीणे,छंद म्हणून हा उद्योगही चालू असतो,लिहून स्वत:जवळचठेवणे. तर हे सर्व स्वत:च्या समाधानासाठी करत असतो, आणि चांगली consistency आहे.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Fri, 10/23/2020 - 16:35 नवीन
वयाच्या साठीतही तुमचा उत्साह आणि दिनचर्येतील सातत्य वाखाणण्याजोगे आहे. (तुम्ही दिलेल्या माहीतीवरुन तुम्ही साठीत असाल असं मी गृहीत धरत आहे) तुमच्या ब्लॉगवरील लेखन तसेच युट्युब चॅनलवरील व्हिडीओज वाचायला/पाहायला आवडेल. हे दुवे इथे देणे तुम्हाला उचित वाटत नसेल तर तुम्ही मला व्यनि करु शकता. :)
  • Log in or register to post comments
ब
बाजीगर Sat, 10/24/2020 - 19:27 नवीन
धन्यवाद सतिश गावडे साहेब.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Fri, 10/23/2020 - 17:09 नवीन
मस्त! आवडलं. मनमुराद 'जगत' आहात!!!
  • Log in or register to post comments
ब
बाजीगर Sat, 10/24/2020 - 19:28 नवीन
धन्यवाद @ उपयोजक सर
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 10/23/2020 - 19:01 नवीन
१. स्टार मेकर ऐवजी स्म्यूलवर गाणी म्हणून पाहा, जास्त मजा येईल. मला रोज १०/१२ मुलींचे ड्युएट गायला इनवाइटस येतात. जवळजवळ २०० गाण्यांची लिरिक्स पाठेत. चांगल्या गायिकां बरोबर गायला सॉलीड मजा येते. २. चालणं किंवा धावणं यापेक्षा खेळणं हे जास्त मजेचं आहे. गेली कित्येक वर्ष दिवसाची सुरुवातच > योगासनं, प्राणायाम आणि टेबलटेनीस (करोनाचा कालावधी सोडता) अशी होते. ३. पोहणं हे एक कमालीचं आवडीचं कौशल्य आत्मसात केलं आहे. पाण्याच्या बायोंसीचा एक्झॅक्ट अंदाज आल्यामुळे देह होडीसारखा पाण्यावर तरंगत ठेवून तासंतास जलविहार करण्याचा छंद आहे. आपण, पाणि आणि अथांग आकाश हा ट्रायो जबरदस्त महौल जमवतो. ४. लेखनाची मौज काही औरच आहे. कविता, गजल, ललित कथा, चित्रपट परिक्षणं, कवितांचं रसग्रहण आणि जीवनाला स्पर्श करणर्‍या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर अनेक पोस्टस इथे प्रकाशित आहेत. " ती सध्या काय करते " वरचं परिक्षण ज्योती आळवणींनी सतीश राजवाड्यांना दाखवलं तेंव्हा ते ज्याम खूष झाले. त्यावेळच्या मिपा दिवाळी अंकात राजवाड्यांची मुलाखत आहे. ५. अध्यात्म हा जबरदस्त आवडीचा विषय आहे. मनोगतवर ऐंशीच्या जवळपास लेख वेगवेगळी उपनिषदं, झेन, अष्टावक्र महागिता आणि अध्यात्मातल्या अनेक गुंतागुंतीच्या विषयांचा उलगडा करतात. ६. माझं काम (सीए) हा एक सर्वोत्तम छंद आहे. सीझनला रोज सलग दहा ते बारा तास काम करणं आणि त्यातून व्यावसायिक कौशल्य वाढवत नेणं हे शेवटापर्यंत चालू राहिल.
  • Log in or register to post comments
ब
बाजीगर Sat, 10/24/2020 - 19:32 नवीन
स्मूल वर पण गाणं सूरु आहे. आपले छंद आवडले, लगे रहो. धन्यवाद संजय जी
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sat, 10/24/2020 - 19:51 नवीन
१. सिंथेसायजर वाजवणे > ५०/६० लोकांसमोर जुन्या हिंदी गाण्यांची इंस्ट्रुमेंटल मैफिल सहजपणे जमवू शकतो. २. चेस.कॉमवर कंप्युटरशी चेस खेळणं > सध्या १२ व्या लेवलला मशीनला हरवू शकतो. यानं लॉजिकल माइंड डिवेलप होतं > कमालीचं फोकसिंग तयार होतं. ३. पत्नी समवेत जवळच्या रिसॉर्टसना (शक्यतो स्प्लेंडर कंट्रीच), हनीमून ट्रीप्स करणं ! . द मोस्ट रिफ्रेशिंग थींग ऑफ लाईफ .
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 10/24/2020 - 20:19 नवीन
ग्रेट तुम्ही स्वतल विविध छंद मध्ये गुंतवून घेत आहात ते नक्कीच प्रशंसनीय आहे. आणि जे उपक्रम हाती घेत आहात ते आवडीने करत असल्या मुळे पूर्णत्वास जात आहेत.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sun, 10/25/2020 - 07:37 नवीन
Sanjay Kshirsagar · Najani Bada Rangi Hai Vada Tera नाज़नी बडा रंगी है वादा तेरा !
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sun, 10/25/2020 - 08:33 नवीन
तुमच्या गायन कलेचे कौतुक वाटले. हे गाणे मी पहिल्यांदाच ऐकले त्यामुळे युट्यबर जाऊन मुळ गाणे ऐकले. मुळ रचनेपेक्षा तुमचे गायन थोड्या धिम्या चालीत वाटले पण आवडले. तुमच्या प्रतिसादांबद्द्ल १. कुठलीही गोष्ट लावून धरण्यामागे तुमच्या इंटरेस्टची तीव्रता कारणीभूत असते. लोकांचे इंटरेस्ट फारसे तीव्र नसतात त्यामुळे प्रोजेक्ट फाफलतो. सहमत यापुढे असे म्हणेन की फक्त इंटरेस्ट (आवड) नव्हे तर त्या गोष्टीची गरज त्या उपक्रमाच्या यशाची शक्यता वाढवितो. अर्थात गरजेमुळे बर्‍याचदा आनंदावर पाणी सोडावे लागते हा भाग अलहिदा ! २. आपल्याला जमेल हा अत्मविश्वास असेल तरच त्या उपक्रमावर मेहेनत होते. संदिग्धावस्थेमुळे उपक्रम बारगळण्याची शक्यता प्रचंड. सहमत ३. उपक्रमासाठी आवश्यकती उत्तम गॅजेटरी विकत घेणं तुमचा इंटरेस्ट वाढवतं (म्हणजे धावायचं असेल तर ब्रँडेड शॉर्ट्स, आरामदायी टी शर्ट आणि उत्तम स्पोर्टस शूज) असहमत ! उलट प्रतिकुल परिस्थितीतून येऊन झगडणार्‍यांनी जास्त यश मिळविल्याची उदाहरणे आहेत. ४. लवकारात लवकर थोडं फार यश मिळणं अत्यंत अनिवार्य आहे. जर रिझल्ट येत नसेल तर तुम्ही चुकीची मेथड (उपक्रम नाही) निवडली आहे असा अर्थ होतो. त्यामुळे योग्य मेथड हा एक अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर आहे. असहमत. बर्‍याचदा बर्‍याच जणांना पहिल्या फटक्यात / लवकर यश मिळतं. त्याने त्यांचा आत्मविश्वास देखील वाढतो. मात्र पहिल्याच मिळालेल्या यशाने बरेच जण गाफील होतात त्यामुळे प्रयत्नांत सातत्य आणि प्रयोगशील राहणं हे यश मिळण्यासाठी आणि ते जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक आहे. अर्थात जग हे नाशिवंत आहे आणि जगातील सगळ्याच गोष्टी नाशिवंत आहेत त्यामुळे 'यश' देखील त्याला अपवाद नाही. तेव्हा अपयश पचविण्यासाठी मनाची तयारी ठेवणे कधीही आवश्यकच.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sun, 10/25/2020 - 15:06 नवीन
धागा विषयातले उपक्रम छांदाचे आहेत, तिथे करु किंवा न करु असा पर्याय असतो. तुमचे विचार उपजिवीकेसाठी राबाववल्या जाणार्‍या उपक्रमांबद्दल आहेत आणि त्या दृष्टीकोनातून ते योग्य आहेत.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 10/24/2020 - 09:38 नवीन
चालण्याचे आणि पळण्याचे तुम्ही जे आकडे दिले आहेत ते रोजचे असतील तर तुम्ही 99.99 ,% लोकांपेक्षा उत्तम कामगिरी करत आहात. तुमची आकडेवारी ही सहज साध्य होणारी नाही.
  • Log in or register to post comments
ब
बाजीगर Fri, 10/23/2020 - 15:59 नवीन
(7) कंत्राटी शेती -शेवगा लागवड पुण्याहून 27 किमी वर मित्राच्या फार्मवरील 10 गुंठे जागेवर 300 शेवगा रोपं लावलीत. 92 जगलीत, जून-2019 ला सुरवात केलीय. गेले 14 महीने महीना रु.6000/-- मजूरी खर्च देतोय, इतर खर्च मिळून आता पर्यंत रु.1,75,000 खर्च केलेत. बघूया.अजून वर्ष दोनवर्ष सहज करु शकेन, हा pilot project म्हणूनबघतोय.
  • Log in or register to post comments
भ
भीमराव Fri, 10/23/2020 - 18:15 नवीन
एरंडाचं गुऱ्हाळ जे म्हणतात ते काय असतं? त्यातुन कोणत्या प्रतीचं उत्पादन घेता येतं? साधारण एका गुऱ्हाळाला किती खर्च येतो? कुटिलउद्योगाची सबसिडी याला लागु होते का? आपले काही अनुभव असतील तर कृपया व्यक्त करावेत.
  • Log in or register to post comments
न
नीलस्वप्निल Fri, 10/23/2020 - 20:35 नवीन
मी मि.पा. वाचायची सवय लाऊन घेतली आहे... गेली ५-७ वर्स... नुकताच सभासद झालोय... आणी प्रतीसाद द्यायला सुरवात केलिये... रोजच्या कामातुन विरुनगला आणि मनस्वास्थ्यासाथी उत्तम असे माझे मत आहे..
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sun, 10/25/2020 - 16:32 नवीन
कोणताही उपक्रम नियमित असावा याचा दुराग्रह असता कामा नये. मला चालण्याची आवड आहे व अपरिहर्यता देखील. तरीही माझ्याकडे बर्‍याच दिवसानी पाहुणा आला तर माझा चालण्याचा " नेम" आहे सबब तुम्ही काहीतरी करीत घरी बसा असा मी आग्रह करीत नाही .तर त्यदिवशी माझा व्यायाम रद्द करतो. मी अनेक जप वाले पाहिले आहेत जे आपली सगळी माणुसकी विसरून काही झाले तरी माझा जप चुकता कामा नये यासाठी विवाह मंडपात देखील कोपर्यात जप करीत बसतील., आलेल्या अतिथीला पुरेसा वेळ देणार नाहीत ! एवढे करून आयुष्यात त्यानी समाधान, शान्ती सहजीवन हे अनुभवलेले असतेच असा काही तर्क आपण काढू शकत नाही. जपाचा माझ्या मते एक फायदा असा असावा की त्याने उलट सुलट विचारान्ची आन्दोलने कमी होऊन निदान तेवढ्या पुरते तरी बी पी कमी होत असावे. यात अमुक अमुक शब्दात सामर्थ्य असते हा मात्र भम्पक पणा आहे. मुळात भाषा ही आवश्यक असली तरी ती वैश्विक कधीच नसते याचा पक्का विचार मनात असला की विशिष्ट जपात काही ताकद आहे यातील फोलपणा कळून येतो. जसे कहरवा या तालात याच्या ग्रीड ला महत्व आहे धागे नति नक धिन या बोलाना नाही. ह्र्दय लब डब करते काय वा टप टप करते काय त्यात अनियमित पणा आहे किन्वा कसे याला महत्व आहे ! आपल्याला जे आवडते ते काही दिवस टाळणे हे मानसिक सामर्थ्य मिळविण्याचे एक साधन नक्कीच आहे. यातून मानसिक गुलामी ( क्रेविंग ) कमी होते. मग ती चांगली सवयअसो वा वाईट !
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 19 hours ago
  • सुंदर !!
    1 day 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा