Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

बातम्यांचे विषारी गुलाबजाम

ए
एस.बी
Wed, 10/14/2020 - 13:46
🗣 161 प्रतिसाद
बातम्यांचे विषारी गुलाबजाम देणारे कोण आणि खाणारे कोण??? निषेध !! घोर निषेध!! आम्हीच न्याय मिळवून देणार!! हे सगळे चोर आहेत!! गोळ्या घालून उडवून द्या ह्यांना !! देशद्रोही आहेत!!...आमचा आवाज सत्याचा आवाज...आमचं भाषण स्वातंत्र्याची गळचेपी करणारे हेच...ह्यांच्या वर बहिष्कार घाला! अशा कानठळ्या बसवणाऱ्या आरोळ्या रोज रात्री घराघराच्या बैठकीच्या खोलीत घुमताना दिसतात..आणि आई बाप लेकरे म्हातारे सर्व एका धुंदीत होऊन ," बरोबर आहे!! बरोबर आहे!! द्या त्यांना शिक्षा !! " असा आक्रोश करताना आढळत आहेत!.. चौकाचौकात गटबाजी होऊन वादविवादाचे फड रंगतात ...तावातावाने आरोप प्रत्यारोप केले जातात.. पुराव्याचा काय सवाल?? व्हॉट्सअँप आहे...फेसबुक आहे...तिथं सगळं खरं असतं असं म्हणून प्रत्येक जण आपला अंतरात्मा जो की मूलभूत समस्यांच्या विळख्यात अडकल्याने भयंकर धुसफूसलेला आहे त्याच्या रागाला एक वाट काढून देतोय बास्स!!!.... इतिहास सतत पुनरावृत्ती करतो असं म्हणतात...कारण मनुष्याची जात एवढी मुजोर आहे जी त्याच त्याच चुका परत करत राहते आणि मग परिणाम काय वेगळे होणार आहेत ?? जरा इतिहासात मागे जाऊयात ... ही गोष्ट आहे १८९८ साल ची.. अमेरिका आणि स्पेन मधल्या युद्धाची ,जे की क्युबा या देशात घडले आणि मुळात पाहता प्रश्न होता सरळसरळ स्पेन आणि क्युबा मधला आंतरिक..म्हणजे स्पेन ने क्युबा वर साम्राज्य स्थापन केले होते..आणि क्युबन लोकांना एक ठराविक कालावधी नंतर ते जुलमी वाटू लागले..आणि साहजिक त्यांनी क्रांती,आंदोलने,वगैरे वगैरे उद्योग सुरू केले...अगदी आपल्यासारखेच...काही अहिंसक तर काही हिंसक ... आता हे सर्व उद्योग आणि त्याबद्दल वार्तांकन करायला अमेरिकन माध्यमे आपले आपले प्रतिनिधी क्युबा मध्ये पाठवत होती. आणि सर्व काही सुरळीत चाललं होत..म्हणजे क्युबा चे लोक क्रांती करत होते...अमेरिकन लोक त्याच्या बातम्या जगात दाखवत होते...स्पेन आपली बाजू मांडत होते की क्रांती करणारे लोकांचे गट मर्यादित आहेत...सर्वसामान्य क्युबन जनता त्यांचे समर्थन करत नाही वगैरे वगैरे..! मग आता प्रश्न पडतो की जर हे वादविवाद स्पेन आणि क्युबा मधले होते तर मग ह्या अमेरिकन बातमीदारी चे काय बिनसलं की बुवा अमेरिकेच्या शासनाने स्पेन बरोबर युद्ध पुकारले आणि क्युबाला स्वतंत्र करण्याचे पवित्र पुण्य कार्य आपल्या डोक्यावर घेतले??... तर त्याचे दोन आयाम आहेत पहिला म्हणजे अमेरिका आणि क्युबाचा असणारा साखर व्यापार ( जो की मोठ्या प्रमाणावर खासगी उद्योगपतींची मक्तेदारी होता ज्यात मोठ्या प्रमाणावर तत्कालीन विरोधी पक्ष तसेच सत्ताधारी पक्षाची चमचे मंडळी दाटीवाटी करून मोक्याच्या जागा अडवून बसली होती!) आणि दुसरा म्हणजे दोन अमेरिकन वृत्तपत्र समूह मधला आपापले गिऱ्हाईक वाढवण्यासाठी असणारी स्पर्धा... ( बघा कुठे काही सुत जुळते आहे का सध्या आपल्या आजूबाजूला उसळलेल्या गोंधळात आणि ह्या १८९८ च्या माथेफिरू मध्ये!!!) साखर सम्राटांनी अशी धारणा किंवा नियोजन करून घेतले होते की जर क्युबा स्पेन कडून मुक्त होण्यात आपला देश अग्रभागी राहिला तर पुढे भविष्यात आपल्या व्यवसायासाठी मोठे कुरण लाभेल.. आणि वृत्तपत्र समूहाचे बोलायचे झाले तर ती आघाडीची वृत्तपत्रं होती १)न्यूयॉर्क जर्नल - विल्यम हर्श्ट २) न्यूयॉर्क जर्नल वर्ल्ड - जोसेफ पुलित्झर ( हे तेच पुलित्झर बाबा आहेत ज्यांच्या नावाने पुरस्कार दिले जातात...काळाचा महिमा अगाध आहे!!) ह्या दोघांचे पण एकमेकांसोबत वाचक वर्ग मिळवण्यासाठी प्रचंड स्पर्धा होती.त्या स्पर्धेला तोंड फुटले ते "येलो किड" नावाच्या व्यंगचित्र स्तंभ लेखनावरून जो की पहिल्यांदा पुलित्झर यांच्या वर्तमानपत्र मध्ये प्रसिद्ध होत असे पण त्याचा व्यंगचित्रकार हर्श्ट यांच्या वर्तमानपत्र समूहाने सौदेबाजी करून पळवला आणि आपल्या वर्तमानपत्र मध्ये तो स्तंभ त्याच नावाने सुरू केला...झालं!! पुलित्झर साहेबांच्या नाकाला मिरच्या झोंबल्याना राव!! त्या काळी पेटंट , निकोप स्पर्धा कायदे असले काय प्रकार नसल्याने पैसा फेको तमाशा देखो असा राजरोस कार्यक्रम होता..त्यामुळे पुलित्झर समूहाने ही नवा चित्रकार पैसे देऊन उभा केला आणि त्याचं पण स्तंभ लेखन त्याच येलो किड नावाने सुरू राहिले आणि मुहूर्तमेढ रोवली गेली एका व्यापारी स्पर्धेची ज्याची अखेर झाली ३ देशांच्या युद्धामध्ये ,अनेक निर्दोष सैनिकांच्या बळी मध्ये!!,स्थानिक नागरिकांच्या युद्ध समर्थक आणि युद्धाला विरोध असणाऱ्या गटांच्या दंगली मध्ये!! आणि अमेरिकेच्या हाती काय लागलं तर.. क्युबाची तात्पुरती मालकी आणि अमेरिकेला स्पेन ला द्यावी लागली युद्ध भरपाई रक्कम म्हणून २० दशलक्ष डॉलर्स द्यावे लागले जे की सध्याच्या काळातील ६१० दशलक्ष डॉलर्स एवढे!! ( ६१० गुणिले १० लाख = आलेल्या उत्तराला ७० रू ने गुणून घ्या म्हणजे जे काय भारतीय रक्कम येईल ना त्यात नेमके किती शून्य असतात ते मला पण सांगा!!! शिंचे हे गणित फार द्वाड अस्तय राव!!) आता हे दोन माध्यमे आणि त्यांचे मालक यांनी नेमके युद्ध कसे पेटवले ते बघुयात.. वरती सांगितल्याप्रमाणे स्पर्धा सुरू होती आणि प्रत्येक माध्यम समूह जास्तीत जास्त वाचक गोळा करू पाहत होता..आणि त्यासाठी त्यांनी आपापल्या युद्धाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारावर दबाव टाकायला सुरुवात केली की ," आम्हाला बातम्या द्या ...चमचमीत बातम्या द्या...अशा बातम्या द्या की ज्या दाखवतील की स्पेन कसे क्युबा मध्ये अत्याचार करत आहे!.." ह्या बद्दल ची हर्श्ट यांच्या पत्रकाराने त्यांना पाठवलेला एक तार संदेश युद्धानंतर प्रसिद्ध झाला .. त्यात तो पत्रकार म्हणतो की ," इकडे सर्व शांत आहे..इथे काही युद्ध होऊ शकत नाही..थोडे स्थानिक परकीय वाद आहेत पण त्यामुळे युद्ध नाही होऊ शकत..मला कृपया अमेरिकेत परत बोलवून घ्या !" त्या वर हर्श्ट यांचं उलट तार उत्तर असं होतं," तू आहे तिथेच रहा..फक्त फोटोज् पाठवत रहा...तू क्युबावरून मला फोटो पाठव...मी तुला अमेरिकेकडून युद्ध पाठवतो!!!" केवढा हा दुर्दम्य आत्मविश्वास आणि दूरदृष्टी!!!! आणि त्यांनी बोलेल तसेच केले आणि अमेरिकेकडून युद्ध क्युबा मध्ये निर्यात करायला एकाहून एक सनसनीखेज प्रकरणे प्रसिद्ध करायला सुरुवात केली!! त्यातल पहिलं प्रकरण म्हणजे क्लेमेन्सिया अरांगो ह्या क्युबन महिलेची ओलिवेट ह्या अमेरिकन प्रवासी जहाजावर स्पॅनिश अधिकाऱ्यांनी घेतलेली अंगझडती चे प्रकरण! ह्या प्रकरणात ही क्युबन महिला अमेरिकन जहाजावरुन प्रवास करत असताना तिच्याकडे क्रांती संबंधित सामग्री असल्याचा संशय घेऊन स्पॅनिश अधिकाऱ्यांनी तिची झडती घेतली होती पण ह्या प्रकरणाचे वार्तांकन खालील प्रमाणे अमेरिकन माध्यमात करण्यात आले होते... "आपल्या देशाचा झेंडा एका महिलेची अब्रू वाचवू शकतो ? " "अमेरिकन जहाजावर स्पॅनिश अधिकाऱ्यांनी महिलेचा विनयभंग केला" "आपल्या देशाच्या झेंड्याच्या नजरेत असून सुद्धा कोवळ्या तरुणीचे कपडे उतरवतात स्पॅनिश अधिकारी!!!" आणि पुढे ह्यामुळे स्थानिक अमेरिकन महिलावर्ग बिथरला आणि सरकार कडे सतत क्युबा स्पेन मध्ये हस्तक्षेप करण्यासाठी आग्रह करू लागला...तत्कालीन विरोधी पक्षांनी पण पोळ्या भाजायला सुरुवात केली.. पण हा बुडबुडा लगेच फुटला कारण नंतर क्लेमेन्सिया अरांगो हिने स्वतः पुढे येऊन जबाब दिला की तिची झडती महिला अधिकारी घेतली होती आणि कोणता ही गैरप्रकार झाला नव्हता...पण तोपर्यंत उशीर झाला होता..स्पॅनिश अधिकारी हे महिलांसोबत गैरवर्तन करतात हे बीज जनतेमध्ये पक्के रुजले होते..त्यामुळे ही बाई खोटे बोलत असणार ...हिला स्पेन ने पैसे दिले...ही पण गद्दार आहे वगैरे वगैरे गरळ ओकणे सुरूच राहिलं!! नंतर या युद्ध ज्वराला फोडणी मिळाली ती म्हणजे डॉक्टर रिकार्डो रुईझ यांच्या क्युबा मधल्या तुरुंगात झालेल्या मृत्यूची! हे डॉक्टर शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत आले होते ..इकडे आल्यावर त्यांनी शिक्षण घेतले तसेच आपल्याकडे जसे एन आर आई चे आकर्षण असते तसेच अमेरिकन नागरिकत्वाचे आकर्षण त्यांनाही होते आणि त्यातून त्यांनी अमेरिकन नागरिकत्व पण मिळवले आणि नंतर ते स्वखुशीने क्युबा मध्ये परतले ..तिकडे परदेशी शिकून आलेले डॉक्टर म्हणून त्यांचा व्यवसाय ही उत्तम चालू होता आणि कुटुंब ही सुखी होते..पण त्यांनी स्थानिक क्युबा क्रांती मध्ये भाग घेतला आणि त्यात त्यांना अटक झाली..आणि तुरुंगात त्यांचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला. आणि मग ह्याचा फायदा अमेरिकन वृत्तपत्रांनी घ्यायला सुरुवात केली.. कोणत्या ही तटस्थ ,निष्पक्ष चौकशीची मागणी न करता..कोणते ही पुरावे सादर न करता...राजरोस युद्धाचा आग्रह करणाऱ्या बातम्या रोज छापल्या जाऊ लागल्या.. नमुना काही असा असायचा बघा... "हे खरे आहे की स्पेनच्या लोकांनी रुईझची त्याच्या क्यूबाच्या तुरूंगात हत्या केली, आपला राष्ट्रीय स्वाभिमान, तसेच राष्ट्रीय सन्मान, आपल्याकडे मागणी करतात की आपण स्पेनविरूद्ध लढा घोषित करावा .... युद्ध ही एक भयानक गोष्ट आहे, परंतु त्याहीपेक्षा आणखी भयानक गोष्टी आहे ती म्हणजे आपला राष्ट्रीय अपमान!. रुईजच्या मृत्यूसंदर्भातील सत्य जे सांगितले गेले त्याप्रमाणेच आहे यात शंका घेण्याचे कोणतेही कारण नाही. ... आता जनतेच्या भावना सूड उगवतील. आणि यावेळी लोकभावनेचे वर्चस्व राहील. " (New York World, 21 February 1897 and New York Journal, 22 February 1897) झालं मग जो तो एकच बरळू लागला बस... आता खूप झालं...स्पेन ला धडा शिकवायला हवा...त्यांना इंगा दाखवू आपण...अमेरिकेशी पंगा घेतला ना की काय होत ते समजेल आता त्यांना...अशा आरोळ्या चोहोबाजूंनी निनाद करू लागल्या!... आणि पुढे काय मग इंग्रजी मध्ये एक म्हण आहे बघा third time is the charm!!! म्हणजे तिसऱ्या प्रयत्नात यश हमखास !! आणि इथे पेपरवाले जिंकले कारण दैव त्यांचं बलवत्तर होत आणि त्यांना त्यांचं ब्रह्मास्त्र मिळवून देणारा प्रसंग घडला तो म्हणजे हवाना ह्या क्युबा च्या बंदरात Uss maine या अमेरिकी युद्ध नौकेला झालेला अपघात जो की समुद्री mines चा स्फोट मुळे झाला आणि त्यात ती युद्ध नौका बुडाली आणि जवळपास २००-३०० अमेरिकी नागरिकांना जलसमाधी प्राप्त झाली.. पुन्हा एकदा वृत्तपत्रे पेटली आणि मग काय.. " remember the maine !! to hell with the spain!!" " $ 50,000 price for the people who can punish spanish criminals!!!" " punishment to spain for the USS maine!!" अशा मथळ्याखाली रोज जनप्रक्षोभ भडकवनाऱ्या बातम्या छापल्या गेल्या!!!... या अपघाताची सखोल चौकशी न करताच वृत्तपत्रांनी निकाल लावून दिला की हा हल्ला स्पेन ने केला आहे आणि त्यांनीच समुद्री mines लावून आपली युद्धनौका बुडविली... पण तत्कालीन नौदल अधिकाऱ्यांचे एक मत असे ही होते की uss maine चा तळभाग मध्ये मोठ्या प्रमाणावर bituminus प्रतीचा कोळसा साठवून ठेवण्यात आला होता जो की fire dampening प्रक्रिये मधून स्फोटक वायूंची निर्मिती करत राहतो..आणि मग असे वायूचे कोठार कधी पण वाढत्या तापमानाला पेट घेऊ शकते... पण ऐकणार कोण...स्पेन सोबत युद्ध करायचे आहे...! स्पेन चा अत्याचार पेपर मध्ये छापायचा आहे...मग असल्या थातुर मातुर वैज्ञानिक शक्यतेला काय भाव द्यायचा आहे...?? त्या पेक्षा तत्कालीन सर्व वृत्तपत्रांनी स्पेन विरोधी आघाडी उघडली...आणि त्यात" आम्हाला अमेरिकी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांकडून विश्वसनीय बातमी मिळाली आहे की सदर हल्ला कसा स्पेन ने आखला होता..त्यांनी कसा आपल्या युद्धनौकेचा अभ्यास केला....स्फोटके कुठून मिळवली...ती तिथे कशी पेरून ठेवली याच्या सुरस कथा छापायला सुरुवात केली!!" या सर्वाचा परिणाम एकच झाला की तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष यांना आपल्या सार्वभौम सभागृहामध्ये युद्धाचा अधिकृत प्रस्ताव परित करून घ्यावा लागला आणि एप्रिल १८९८- ऑगस्ट १८९८ असे ३ महिने चाललेले युद्धाचा प्रारंभ झाला!!!! आता त्या युद्धात अमेरिका जिंकली...स्पेन हरला...क्युबा स्वतंत्र झाला...वगैरे वगैरे गोड गुलाबी ऐतिहासिक गैरसमजुती चे गुलाबजाम आजही अनेक इतिहासकार मिटक्या मारत खाताना आढळतील...तुम्हाला पण आग्रह करतील की चाखून तरी बघा ...किती गोड आणि स्वादिष्ट आहेत !! पण हे गुलाबजाम विषारी आहेत..त्यांची पाककृती ही एका विकृत व्यापारी मानसिकतेमधून तयार झाली आहे... त्याला बनवताना तप्त अशी धग तुमच्या आमच्या सारख्या मध्यमवर्गीय नागरिकांच्या संतापाची देण्यात आली होती!! सध्या तुमच्या आजूबाजूला अशाच अनेक विषारी मिठाई वाल्यांच्या चुलीवर कढई तापत ठेवलेल्या दिसतील... पण सांभाळ करा...वेळीच हे विष आवरणे तुमच्या आमच्या हातातच आहे... - शैलेश भोसले टीव्ही ला घाबरणारा एक सर्व सामान्य नागरिक

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 62337 views

🗣 चर्चा (161)
श
शा वि कु Wed, 10/14/2020 - 14:29 नवीन
लेख फार आवडला. माहितीपूर्ण, रोचक आणि गरजेचा.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Wed, 10/14/2020 - 14:41 नवीन
मी इथे वाचले की "फोटू दया, युद्ध देतो" या टेलेग्रॅम्स खऱ्या नव्हेत, तेव्हा वावड्या असू शकतात. (तरी या वृत्तपत्रांचा सहभाग होताच.)
  • Log in or register to post comments
ए
एस.बी Wed, 10/14/2020 - 20:14 नवीन
शा वि कु जी.. सदर टेलिग्रामस चा संदर्भ मला पीत पत्रकारिता आणि त्याबद्दल चा इतिहास इंटरनेट वरती शोधाशोध करताना मिळाला होता..त्यामुळे मी तो ह्या लेखात वापरला आहे. आता त्या तार संदेश बद्दल सत्य असत्य काय असेल त्याबाबत अजून शोधाशोध करायला वाव आहे हे मान्य!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 10/17/2020 - 08:17 नवीन
लेख फार आवडला. माहितीपूर्ण, रोचक आणि गरजेचा.
असेच म्हणतोय. सध्याच्या काळाता आपल्याकडील गोदीमिडियाचा सर्व प्रभाव पाहता, माध्यांचा भविष्यातला प्रवास कसा असेल ते पाहणे रोचक ठरणार आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 10/14/2020 - 15:26 नवीन
चांगली माहिती आहे. लेखकास धन्यवाद! अशाच एका वृत्तपत्रास हाताशी धरून फिडेल कॅस्ट्रोने आपली भंपक कम्युनिस्ट क्रांती पुढे रेटली होती. त्या वृत्तपत्रहस्तकाचं नाव हर्बर्ट मॅथ्यूज. -गा.पै.
  • Log in or register to post comments
ए
एस.बी Wed, 10/14/2020 - 20:15 नवीन
त्या वृत्तपत्र आणि फिडेल कॅस्ट्रो बाबत वाचन करण्यासारखे साहित्य दुवे मिळावेत अशी विनंती गा पै जी
  • Log in or register to post comments
न
निनाद गुरुवार, 10/15/2020 - 00:59 नवीन
फिडेल कॅस्ट्रोने जशी आपली भंपक कम्युनिस्ट क्रांती पुढे लोटली, तशीच क्रांती आजही कम्युनिस्ट पार्टीला भारतात करायची आहे हे विसरू नका. स्टलिन किंवा कॅस्ट्रो यांनी साम्यवादी राजवट आल्या आल्या आपल्या विरोधकांना गोळ्या घालून ठार केले होते. व्हिएत्नाम मध्ये पण कम्युनिस्ट सत्ता आल्याबरोबर सर्व साम्यवाद विरोधक त्वरित मारले गेले. म्हणजे अक्षरशः भिंतीलगत उभे करून गोळ्या घालतात हे लोक. तेव्हा कोणतीही ह्युमन राईट्स वाली संघटना काहीच म्हणत नाही. हाँगकोंग मधून लोकशाहीवादी लोक अचानक गायब होतात ते पण असेच असावेत असा संशय आहेच.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Wed, 10/14/2020 - 15:32 नवीन
चांगला लेख!
  • Log in or register to post comments
ए
एस.बी Wed, 10/14/2020 - 20:16 नवीन
धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 10/14/2020 - 15:59 नवीन
पण त्या लेख मधून आपण काही शिकल पाहिजे. जगात अनेक देशातील उदाहरणे आहेत. ज्यांनी खूप छान प्रगती केली आणि ह्या असल्या घाणेरड्या मीडिया मुळे,एकमेकात द्वेष पसरवून त्या वर पोळी भाजनाऱ्या राजकारण्यांना मुळे. त्या देशांची अर्थ व्यवस्था,सामाजिक शांतता धुळीस मिळाली अन्न अन्न दशा झाली. त्या मधील एक ठळक उदाहरण व्हेनेझुएला देशाचं. एक वेळ हा देश जगात श्रीमंत होता सर्व जनता सुखात आणि वैभवात होती. आज त्यांना 2 वेळ चे अन्न मिळत नाही. आपल्या देशात पण तेच चाललं आहे. पाकिस्तान दुश्मन देश म्हणून फक्त सरकारी पातळीवर च दुष्मणी असायला हवी होती. पण देशातील जनतेत द्वेष निर्माण केला गेला त्याचा परिणाम दोन्ही देशाला बसला. जातीय द्वेष,धार्मिक द्वेष,आक्रमक राष्ट्रीयत्व हे सर्व घातक आहे. विचार पटले नाहीत की त्याच्या वस्तू वर बहिष्कार टाका, समाज घटकांवर बहिष्कार टाका.असले प्रकार.भारतात वाढत आहेत आणि हे असेच चालू राहिले तर जो आता प्रगतिशील भारत आहे तो भारत जगातील गरीब देशात गणला जाईल. तेव्हा आता सामान्य लोकांनी सावध राहणे गरजेचं आहे कोणत्याच उन्माद ला बिलकुल थारा दिला नाही पाहिजे.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Wed, 10/14/2020 - 19:26 नवीन
पाकिस्तान दुश्मन देश म्हणून फक्त सरकारी पातळीवर च दुष्मणी असायला हवी होती.
म्हणजे कसं ? संसदेवर हल्ला झाला (त्यात डायरेक्ट पाकिस्तानचा हात नव्हता वगैरे मुद्दे कामाचे नाहित) तर ति सरकारी पातळीवर दुश्मनी ठरवुन सरकारने कारवाई करायची. कसाबने मुंबईवर हल्ला केला (त्यातही पाकिस्तानी सरकारचा हात नव्हताच.. असं म्हणतात) तर तो सरकारी पातळीवर हल्ला नसल्यामुळे लोकांनी फार काहि सिरियसली घ्यायचं नाहि.. असा काहि फरक करायचा का?
विचार पटले नाहीत की त्याच्या वस्तू वर बहिष्कार टाका, समाज घटकांवर बहिष्कार टाका.असले प्रकार.भारतात वाढत आहेत
हे असले प्रकार फार बालिश कॅटॅगरीत मोडतात हे खरं आहे. पण मग ऑर्गनाइझ्ड आणि समंजस पद्धतीने जनतेने कसे वागावे याबद्द्ल कोण पुढाकार घेतोय ?
तेव्हा आता सामान्य लोकांनी सावध राहणे गरजेचं आहे कोणत्याच उन्माद ला बिलकुल थारा दिला नाही पाहिजे.
उन्माद वाईटच. पण मग युद्ध एकदम दाराशी आलं कि जागं व्हायचं का ? कि बर्‍याच मान्यवरांनी मागे दिला तसा चिनी आक्रमणाला उद्धारकर्ते समजुन पाठिंबा द्यायचा?
  • Log in or register to post comments
व
वीणा३ Wed, 10/14/2020 - 18:07 नवीन
माध्यमं अतिशय एकांगी होत चालल्यामुळे मला वाटतं सगळ्यांनीच त्यांच्या मूळ मताच्या विरुद्ध बाजू सतत ऐकली पाहिजे. म्हणजे भारतात मोदी ना मूळ मत असेल तर काँग्रेस, शिवसेना इ पक्षाच्या बाजू सुद्धा ऐकायला हव्यात. माझ्या मताच्या विरुद्ध काहीच ऐकणार नाही, असं करण्यापेक्षा "मी सगळ्याच बाजू ऐकून मत ठरवेन" हे जास्त बरोबर होईल. <<अशा कानठळ्या बसवणाऱ्या आरोळ्या रोज रात्री घराघराच्या>> हे चॅनेल्स लोक कसे बघतात तेच कळत नाही. मरे कुठल्या बाजूने आहात, रोज घरात फुकटचा आरडा ओरडा आणून आपल्या घराचं तापमान वाढवून मनःशांती का घालवायची :(
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 10/17/2020 - 08:32 नवीन
माध्यमं अतिशय एकांगी होत चालल्यामुळे मला वाटतं सगळ्यांनीच त्यांच्या मूळ मताच्या विरुद्ध बाजू सतत ऐकली पाहिजे.....
आपल्याकडे दोनहजार चौदानंतर हे प्रमाण खूप वाढले, विरोधातलं काहीही ऐकून घ्यायचं नाही, विरोधात असेल ते सर्व व्यवस्थेतून काढून टाकायचं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे, एबीपी न्युज मधील पुण्यप्रसून बाजपेयीचा राजीनामा आणि त्या सर्व घटना. प्राइम टाइम मधील कार्यक्रमात मा. मोदीसेठ यांच्या एका बातमीचा भंडाफोड केला त्यांना नौकरी गमवावी लागली. मास्टर स्ट्रोक या कार्यक्रमात सरकार विरोधीतलं सत्य समोर आणले आणि प्राइम टाइममधील कार्यक्रम बंद झाला. सवीस्तर व्हीडीयो निवांत बघा. सध्याचं सरकार आपल्यावर खोटं कसे लादल्या जातं त्याचं उत्तम उदाहरण आहे. जरुर पाहावे. माध्यंमांचा भारतीय प्रवास कसा होतोय हे आपल्या सर्वांच्या लक्षात यावे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Wed, 10/14/2020 - 18:40 नवीन
मस्त लेख ! आपल्या देशात सध्या मीडियाचा जो धुडगूस चालू आहे तो फार काही वेगळा नाही.
  • Log in or register to post comments
ए
एस.बी Wed, 10/14/2020 - 20:17 नवीन
धन्यवाद!! पण आपली अंतिम अवस्था वरच्या उदाहरण प्रमाणे होऊ नये एवढीच इच्छा!!!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 10/17/2020 - 08:41 नवीन
आपल्या देशात सध्या मीडियाचा जो धुडगूस चालू आहे तो फार काही वेगळा नाही.
सहमत....! गोदी मिडियाकडून काय अपेक्षा करणार ? मूळ प्रश्नांकडून आपलं लक्ष दुसरीकडे नेण्याचा उत्तम प्रयोग सुरु असतो. आपण करोनाशी झुंजत असतांना माध्यमं आपल्याला सुशांतसींगच्या आत्महत्त्याभोवती फिरवत राहीले, लावला टीव्ही के सर्वच वाहिन्यांवर तेच. अपवाद होत्याच. रवीशकुमारचं प्राइम टाइम सध्या एकमेव वाहिनी जी घटनांच्या बातम्यांचा उत्तम मागोवा घेत असते. सुशांतसींग-कंगना रावत चालवले, भारत-चीन, आता भारत पाकिस्तान वगैरे चालू ठेवतील. रोजगार, बेकारी, हे तर आता सरकारचे प्रश्नच राहीलेले नाही. महागाई, लोकांच्या प्रश्नांवर माध्यमं बोलत नाहीत. आपण कंटाळून टीव्ही बंद करावा अशा प्रकारे तुम्हाला बातम्यांपासूनही दूर ठेवल्या जातंय. चालायचंच...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 10/14/2020 - 18:49 नवीन
अतिशय रोचक लेख ! या युद्धाबद्द्ल नविन माहिती कळाली ! दोघांचे भांडण तिसर्‍याचा लाभ अशी मराठीत म्हण आहे पण लाभासाठी भांडणे लावणारे म्हणजे मढ्यावरचं लोणी खाणारी जमात ! अगतिकता वाईट असते !
  • Log in or register to post comments
ए
एस.बी Wed, 10/14/2020 - 20:10 नवीन
धन्यवाद सर्वांचे !! तसं बघायला गेलं तर हा लेख थोडा घाबरत घाबरत टाकला होता...कारण हाच लेख मी माझ्या फेबु भिंतीवर पोस्ट केलाच होता पण तिकडून काय फक्त अंगठे मिळाले..सकारात्मक किंवा नकारात्मक असे काहीच प्रतिसाद मिळाला नाहीत..मग म्हणले खरे जाणकार आणि अनुभवी मंडळींचा समूह म्हणजे मिपा..तिथे पाठवून बघू!!पुन्हा एकदा आभार !!
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 10/14/2020 - 22:59 नवीन
एस.बी., तुम्ही मिपावर लेख प्रकाशित करायचा अत्यंत योग्य निर्णय घेतला आहे. बिनधास्त लिहा इथे. आंतरराष्ट्रीय विषयांवर मराठीतनं व्यक्त व्हावंसं वाटणं ही मराठीची ताकद आहे. तिचा पुरेपूर वापर होऊ द्या. धन्यवाद. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
न
निनाद गुरुवार, 10/15/2020 - 00:53 नवीन
विकृत व्यापारी मानसिकतेमधून तयार झाली आहे... म्हणजे सगळे व्यापारी विकृत असतात? छुपा साम्यवाद म्हणतात तो असाच पसरवला जात असावा का? हेच गुलाबजाम साम्यवादी होते आणि असतात तेव्हा मात्र सगळे गुळण्या धरून बसतात हे पण नोंदवलेच पाहिजे. सध्या द हिंदु सारखे साम्यवादी पेपर चालवत असलेला चीनी प्रपोगंडा हे पण विषारी गुलाबजामच आहेत. जर आक्षेप असेल तर तो सर्व प्रकारांवर असावा. फक्त व्यापारी संदर्भ घ्यायचा आणि साम्यवादी प्रपोगंडा सोडायचे असे योग्य नाही. रशियन केजीबी ने नोवोस्टी या संस्थे मार्फत संपुर्ण भारतीय मिडिया आपल्या ताब्यात ठेवला होता. प्रमुख पत्रकार आणि संपादक सुद्धा रशियन पे रोल वर होते असे म्हणतात. तेव्हा सुद्धा विषारी गुलाबजामच दिले जात होते. आपले परराष्ट्र खाते सुद्धा रशिया चालवत होते अशी शंका तेव्हा व्यक्त होत असे. हा इतिहास विसरता येण्यासारखा नाही. जे काय वाईट होत असे ते सर्व सीआयए करते असे धड्धडीत छापुन आणले जात असे. खाली मित्रोखिन आर्काव्हज दुवा दिला आहे. या भयंकर षडयंत्राची माहिती मुळातून वाचण्यासारखी आहे. अधिक माहिती: https://www.cia.gov/library/readingroom/docs/CIA-RDP86T00586R000400490007-7.pdf https://mitrokhinarchiveii.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ए
एस.बी गुरुवार, 10/15/2020 - 03:12 नवीन
निनाद जी सध्या तरी मी छुपा किंवा जाहीर असा कुठल्याच इजम चा नाही आहे.. विकृत व्यापारी हा शब्द मी केवळ त्या लेखातील २ वर्तमानपत्र समूह साठी वापरला होता. आणि सद्य परिस्थितीत माध्यमं जे वृत्तांकन आणि टीव्ही ट्रायल चालवत आहेत त्यावरून पीत पत्रकारिता हा शब्द वाचनात आला आणि तेंव्हा अजून माहिती मिळवताना ह्या वरील नमूद सर्व घटना निदर्शनास आल्या त्या स्वतच्या शब्दात संकलित करून आणि सद्य परिस्थितीत समर्पक वाटल्या म्हणून सर्वांसमोर मांडल्या. पण ह्यात कोणत्या एक विशेष विचारधारेचा उदो उदो करायचा आहे आणि दुसऱ्या विचारधारेचे प्रतिमा हनन करावयाचे आहे असे बिलकुल नाही.. आणि हिंदू पेपर म्हणाल तर तो फक्त लोकसेवा आयोगाच्या परीक्षे मधल्या मार्क पुरता वापरात आहे!( माझ्याबाबत बोलले तर!! )
  • Log in or register to post comments
न
निनाद गुरुवार, 10/15/2020 - 05:31 नवीन
मग तसे लेखनातून मला वाटले नाही. अगदी छुपे लिबरल्स जसे लिहितात त्या पद्धतीचा लेख वाटला म्हणून तसे स्पष्ट लिहिले. पीत पत्रकारिता ही फार जुनी आहे. अनेक वर्षे भारतात चाललीच आहे. सुमार केतकर ते गिरिष चोरबाजार काय लिहितात हे हे पाहा. त्यांचा कोणताही लेख काढला तर त्यातल्या सगळ्या पिवळ्या छटा स्पष्ट दिसतात.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 10/15/2020 - 04:26 नवीन
जर आक्षेप असेल तर तो सर्व प्रकारांवर असावा. फक्त व्यापारी संदर्भ घ्यायचा आणि साम्यवादी प्रपोगंडा सोडायचे असे योग्य नाही. सहमत .. पण झोपलेल्याला उठवता येते , झोपेचे सोंग घेतलेल्याला नाही तसे .. सत्ताधारी पक्षातील अति टोकाच्या विचारसरणीच्या लोकांचा विरोध झाला पाहिजे पण तो करताना इंग्रजीत म्हणतात तसे " चेरी पिकिंग " करतात काही पत्रकार / लेखक .. अंगावर यायला लागला कि अळी मिळी गुप चिळी! मग सगळ्या मेणबत्या कपाटात बंद अजूनही गुजराथत दंग्यांचा विषय निघाला कि सुरवात का झाली ते मात्र सोयीस्कर रित्या विसरायचे लुटन च्या दिल्ली ग्यांग मध्ये हेच शिकवले जाते ..
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 10/15/2020 - 06:20 नवीन
विकृत व्यापारी मानसिकतेमधून तयार झाली आहे. हे वाक्य मलाही खटकलं. लेखकाची वृत्ती डावी कडे झुकणारी असावी असे वाटून गेलं. बाकी लेख ठीक आहे.
  • Log in or register to post comments
न
निनाद गुरुवार, 10/15/2020 - 06:27 नवीन
शेवटी साम्यवादी आणि छुपे लिबरल्स हेच तर करत राहतात. सामान्य माणसाला सारखे सांगत रहायचे: देश चांगला चाललेला नाही. लोकशाही सिसिटिम्स बरोबर नाही, समाज चांगला नाही, माध्यमे चांगली नाहीत कुणावरच विश्वास ठेऊ नका... डिस र्मेशन चे कँपेन करून सामान्य माणसाला भंडावून टाकायचे आणि एक वैचारिक गोंधळ तयार करायचा. कोणतीही राष्ट्रवादी राष्ट्रहिताची संवेदना तयार होऊ द्यायची नाही. पण तेच उघडे पडले की 'मला असे म्हणायचेच नव्हते असा कांगावा करायचा. ही फार जुनी मोडस ऑपरंडी आहे या इको सिस्टिमची.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 10/17/2020 - 08:44 नवीन
देश चांगला चाललेला नाही. लोकशाही सिसिटिम्स बरोबर नाही, समाज चांगला नाही, माध्यमे चांगली नाहीत कुणावरच विश्वास ठेऊ नका...
सध्याची परिस्थिती पाहता, लोकांनी या बाजूने सतत लिहिले पाहिजे. म्हणजे, लोकांना नेमकं काय सुरु आहे, ते लक्षात आले पाहिजे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 10/15/2020 - 04:04 नवीन
लेख रोचक आहे या बद्दल शंका नाही आणि एका जुन्या "बातमी युद्धची" माहिती मिळाली .. क्युबा हे अमेरिकेच्या उंबरठयावर घुसलेली डोकेदुखी आहे पूर्वीपासून ... त्याबद्दल अजून माहिती मिळाली सध्या तुमच्या आजूबाजूला अशाच अनेक विषारी मिठाई वाल्यांच्या चुलीवर कढई तापत ठेवलेल्या दिसतील... पण आपली हि शेवटची ओळ वाचली आणि खेदाने असे म्हणावेसे वाटते कि याचा रोख तोच आहे जो सकाळ सारख्या माध्यमातून श्र्रीअम पवारांसारखे थथाकथित "स्वतंत्र" पत्रकार करतात जो रतीब घालतात तोच ... काह्ही करा पण अधून मधून हे छापून आणा "भारतात कशी एकाधिकारशाही चालू आहे बातमी देण्याचे स्वत्रंत नाही राहिले .. वैगरे ..." आपण खालील गोष्टीत जर केल्यात तर मग खरंच म्हणता येईल कि लेखक दोन्ही बाजू विचार करून लिहितो - निनाद यांनी पुढे दाखवले तसे समाजवादी / कम्युनिस्ट राज्यकारणांनी भांडवलशानसारखेच जे काही चुकीचे जगात केले ते हि उघडकीला येउद्यात त्यावर लिहा - भारतात जर खरंच "बातम्यांचे विषारी गुलाबजाम वाटले जात" असतील तर ते काय फक्त एकच बाजू वाटते? शेखर गुप्ता, सरदेसाई बरखा इत्यादी ग्यांग काय समतोल पणाचे अमृत वाटत असतात का? अधःपाव अधःपाव प्रत्येकी ! - संपूर्ण लोकशाही पद्धतीने दोनदा निवडून आलेल्या आपल्याला ना पटणाऱ्या सरकारचे वाभाडे काढणाऱ्यांनी आणीबाणी लादणारी "भारतमाता आणि तिचे सुपुत्र पिढ्यान पिढ्या चालतातात ! तेवहा नवहते गुलाबजाम वाटले जात ? उगाच काहीतरी एकांगी
  • Log in or register to post comments
श
शा वि कु गुरुवार, 10/15/2020 - 04:22 नवीन
लेखकाने कम्युनिझमशी कोणतीही संलग्नता दाखवली नाहीये, कम्युनिझम निष्पाप आहे असा कोणताही दावा केला नाहीये, किंबहुना कोणत्याच एका विचारधारेवर टिका केली नाही. अशा वेळेस कम्युनिष्ठांचे नाव काढणे ही शुद्ध व्हॉटअबाउटरी आहे (असे माझे मत.)
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 10/15/2020 - 04:30 नवीन
लेखकाने कम्युनिझमशी कोणतीही संलग्नता दाखवली नाहीये, नाही? मग सध्या असे गुलाबजाम कोण वाटतंय ? हे तरी स्पष्ट कर्ववे , टीव्ही ला ना घाबरता! लेखकाने ताकाला जाऊन भांडं कशाला लपवायचं ? सरळ म्हणा ना न संघ परिवार प्रणित विकलेली माध्यमे विषारी गुलाबजाम वाटत आहेत किंवा निदान साम्यवादी राजवटीतील २ उद्धरणे द्यावी "ब्यालंस" म्हणून ! काय ?
  • Log in or register to post comments
श
शा वि कु गुरुवार, 10/15/2020 - 04:47 नवीन
अर्णब गोस्वामी वाटतोच आहे विषारी गुलाबजाम. लेखकाने नाव नाही लिहिले हा त्यांचा मोठेपणा आहे. कॉन्सर्व्हेटिव्ह विचारांचा पत्रकार वेड्यासारखा वागतो आहे असे म्हणल्याने माणूस कम्युनिस्ट होत नसतो. संघ प्रणित वैगेरे तुमचा मुद्दा आहे, तुम्हाला त्यावर लिहिण्यासारखे वाटत असेल तर लिहु शकता, आणि त्या लेखात या लेखाचा दुवा देऊ शकता. ब्यालॅन्स चा आग्रह केल्यापेक्षा ज्यावर लिहिले जावे असे वाटत आहे त्यावर आपण लिहावे. इतरांना ह्यावर का नाही लिहिलं आणि त्यावर का नाही लिहिलं विचारणं म्हणजेच व्हॉट अबौट्री.
  • Log in or register to post comments
न
निनाद गुरुवार, 10/15/2020 - 05:36 नवीन
अर्णब गोस्वामी तसे करत असेल तर गेली वीस वर्षे नाराजदीप वाटत होता ते काय निराळ्या प्रकारचे विषारी गुलाबजाम होते का? पहिल्यांदाच या लिबरल्स ना तडाखा मिळाला आहे. त्यांना जश्यास तशी उत्तरे मिळायला लागली आहेत. नाराजदीप आणि त्याची गँग जे खोटे आणि विषारी गुलाबजाम निर्वेध पणे वाटत होते. युट्युबमुळे त्यातले विष उघड करून दाखवले जाऊ लागले आहे. म्हणून तर यांना हे सगळे बंद व्हायला हवे आहे. त्यांची ईको सिस्टिम ढासळायला लागली आहे. म्हणून तर हे विविध मार्गांनी गळे काढत आहेत.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु गुरुवार, 10/15/2020 - 06:02 नवीन
तुम्ही परवाच व्हॉट आबाऊटरी कम्युनिस्ट कावा आहे असे म्हणत होता, तर तुमचा व्हॉट आबाऊटरीला विरोध आहे असे समजतो. इथे राजदीप आणि बरखा वैगेरे मला विचारून तुम्ही तेच करत आहात. माझी या लोकांबद्दल काय मते आहेत तुम्हाला माहित नाहीयेत, आणि अर्णब गोस्वामी बद्दल बोलायचे असेल तर यांचा निषेध करूनच बोलावे लागेल असे मी मानत नाही. मी अर्णब गोस्वामीला शिव्या घालत असलो, आणि राजदिपचे हायपोथॅटिकली समर्थन करत असतो तरी माझे अर्णब बद्दलचे म्हणणे निराधार होत नाही. अ वाईट आहे म्हणल्यावर ब क ड बद्दल बोलणे यालाच व्हॉट अबौट्री म्हणतात. (गरज नसली तरीही- तुमची राजदीप बरखा इत्यादी मते बव्हँशी मान्य आहेत. पण मी एखादा शिक्का मारला कि वैचारिक जबाबदारी संपत नाही अश्या मताचा आहे. एखादा माणूस संघी किंवा कम्युनिस्ट असण्याने त्याचे म्हणणे आपसूक चूक किंवा बरोबर होत नाही. त्यामुळे कम्युनिस्ट माणसाची आणि संघी माणसाची हि कम्युनिस्ट किंवा संघी आयडेंटिटी आउट ऑफ कंटेक्सट वर आणू नये, अशा मताचा मी आहे. म्हणजेच, अर्णब असो वा राजदीप. त्यांचे प्रत्येक म्हणणे चूक किंवा बरोबर नसते.) राजदीप बरखा इत्यादी तुमच्या मते विषारी गुलाबजाम वाटत आहेत, तर हे असे वागणे कोणत्याही सुविचारी माणसाला पटणार नाही. पण तुम्ही हा लेख केवळ अर्णबच्या गटावर आहे असे समजले. म्हणजेच इतरत्र वाईट गोष्टी दिसत असून लेखक त्यावर बोलत नाही, म्हणजेच लेखक कम्युनिस्ट प्रोपौगंडयांशी सहमत आहे असा तर्क तुम्ही लढवला. जे माझ्या मते अयोग्य आहे. लिबरल, कम्युनिस्ट असे लेबल तुमच्या दृष्टीने "वाईट, मूर्ख, दुष्ट, देशद्रोही" यांच्या समानच आहेत असे वाटले (चुभुद्याघ्या.) आणि ते लेबल तुम्ही लेखकाला चिकटवून टाकलेत, ह्याचे मला वाईट वाटले. हा लेख तुम्ही उल्लेखलेल्या "वैट्ट, दुष्ट" पत्रकारांवर आहे असे समजण्याचे तुमच्याकडे पुरेपूर स्वातंत्र्य होते.
  • Log in or register to post comments
न
निनाद गुरुवार, 10/15/2020 - 06:09 नवीन
तुम्ही अर्णब गोस्वामी चे नाव घेतले म्हणून मी इतर नावे घेतली. मला सोईस्कर असेल तेव्हा माझा व्हॉट आबाऊटरीला विरोध आहे आणि राहील. असा तर्क तुम्ही लढवला. मी सरळ सरळ प्रश्न केला आहे की छुपा साम्यवाद असाच पसरवला जातो का? मी काय आणि कसा विचार करावा याचे स्वातंत्र्य तरी मला असावे.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु गुरुवार, 10/15/2020 - 06:22 नवीन
तुम्ही हवा तसा विचार करा. तुम्हाला सोयीस्कर असेल तेव्हा विरोध आहे- ओकेच. हेच तर मी म्हणत होतो. वैचारिक स्वातंत्र लेखकाला पण आहे. त्याच्या लेखाला तुम्ही डबकं म्हणत असाल तर ह्या त्यांच्या वैचारिक स्वातंत्र्याचे तुमचे दुर्लक्ष झाले असावे , म्हणूनच मी आठवण करून द्यावी म्हणलं. (गामा पैलवान यांनी तुमचाच मुद्दा संयतपणे आणि योग्य प्रकारे मांडला आहे असे मला वाटले. त्यासाठी व्हॉट आबाऊटरी करण्याची गरज त्यांना वाटली नाही.)
  • Log in or register to post comments
न
निनाद गुरुवार, 10/15/2020 - 06:15 नवीन
ते लेबल तुम्ही लेखकाला चिकटवून टाकलेत, ह्याचे मला वाईट वाटले. तुम्ही आनंदाने काय वाईट वाटायचे ते वाईट वाटून घ्या. माझा त्याला आक्षेप नाही! तो तुमचा वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग आहे. पण अमक्या तमक्याला ढमका फलाणा असे बोलला म्हणून तुम्हाला वाईट वाटले - याची मात्र मौज वाटली. आता लेखकाने चिखलाच्या डबक्याचा विषय काढला तर चार शिंतोडे येणारच. त्याने आज आज बेत काय करावा असा विषय घेतला असता तर आज आंबे मिळाले असते! अपना अपना चॉइस है!
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 10/15/2020 - 08:43 नवीन
अर्णब गोस्वामी वाटतोच आहे विषारी गुलाबजाम. = खरे असले तरी एकांगी लिहिणे अर्णव आणि राजदीप बरखा हे सगळेच थोडयाफार फरकाने विषारी गुलाबजाम वाटत आहेत = दोन्ही बाजू मांडणे सध्याची खास करून अर्बन नक्षल लोकांची आवडती पद्धत - आव आणायचा " सद्य परिस्थितीवर लिहितो म्हणून आणि टीका मात्र एकाच अंगाने करायची - धर्मावरून राजकारण नको म्हणायचं आणि धर्मावर बेतलेले आरक्षण पुढे करायचे - भारतातही सगळे अवघड प्रश्न जणू गेल्या सात वर्षात निर्माण झाले असा कांगावा करायचा - भारतात अल्पसंख्यांक अगदी केवीलवानाय परिस्थितीत आहेत असा जगभर प्रचार करायचा = सगळा ढोंगीपणा
  • Log in or register to post comments
श
शा वि कु गुरुवार, 10/15/2020 - 09:43 नवीन
अर्णब गोस्वामी बद्दल बोलताना राजदिपचे नाव घेण्याची सक्ती अमान्य.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 10/15/2020 - 10:00 नवीन
काहो? निपक्षपणे बघणार लिहणार ना TUMHI? मग दोघांवर बोला...
  • Log in or register to post comments
श
शा वि कु गुरुवार, 10/15/2020 - 10:27 नवीन
मला हवा त्याबर बोलीन मी, निष्पक्ष असो वा नसो. तुम्ही उलटतपासणी घेण्याचे काय कारण ? राजदीपवर मत दिल्यावरच अर्णव वर मत व्यक्त करायची जबरदस्ती काय लॉजिकवर करत आहात ?
  • Log in or register to post comments
ए
एस.बी गुरुवार, 10/15/2020 - 05:44 नवीन
प्रिय चौकस जी.. मी माझ्या लेखात अर्णब चा उल्लेख विशेष केला नाही किंवा इतर कोणत्याही कोणाचे नाव घेऊन हे पहा किती चांगलं वार्तांकन करतात आणि नाहीतर (तुम्ही म्हणता तसं संघाची माध्यम ) हे पहा किती वाईट वार्तांकन करतात अशी गटबाजी करणारी तुलना मुद्दाम केली नाही.. या उलट लेखा मध्ये दोन माध्यमांची स्पर्धा जी की त्यांच्या वैयक्तिक उद्देशाने प्रेरित झाली होती त्याच्या दावणीला कशी जनता सरसकट बांधली गेली आणि शासनाला पण मग कृत्रिमरीत्या निर्मित जनप्रक्षोभाला शांत करण्यासाठी कसे युद्धजन्य परिस्थिती मध्ये जावे लागले हे सांगणे एवढंच अपेक्षित होते.. त्याच मुळे मी माध्यमांची ही काही हातघाई सुरू आहे त्यात नाव घेऊन एकाची बाजू घेणे टाळले..पण आपण सोयीस्करपणे माझा लेख म्हणजे फक्त आणि फक्त एका व्यक्ती, किंवा पक्षा चा विरोधात आहे असा समजून वाचलात माझा हेतू माध्यमांना वाईट ठरवणं हा बिलकुल नसून त्यांच्या स्पर्धेला बळी जाणाऱ्या नागरिकांनी गटबाजी करून एकमेकात हेवेदावे करणे,आणि वादविवाद करणे...एकमेकावर दोषारोप करणे की तू अमुक अमुक गटाचा आहेस म्हणून असे बोलतोस असे सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष बनून आपल्या नागरिकत्वाची निष्पक्ष परिक्षकाची भूमिका सोडण्याबाबत व्यक्त होणे एवढाच आहे . आता ह्या स्पर्धेचा परिणाम नाहीतर अजून काय म्हणायचं ..?? की तुम्ही सरळ सरळ मला संघ माध्यम विरोधी, अर्णब विरोधी लिखाण करणारे ठरवून मोकळे झालात आणि इतरांची नावे का नाही घेतलीत याचा जाब विचारू लागले!!
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 10/15/2020 - 06:48 नवीन
एस.बी अहो मग करा ना तुलना.. अर्णव येडे पण करत आहे तर बोला तसे.. मोकळे आहात बोलायला .. पण त्याचा बरोबर द quint/ वागले वैगरे किती एकांगी गरळ ओकतात हे हि लिहा "सद्य परिस्थिती" वर लिहिताय ना मग दोन्ही बाजू मांडा .. एवढेच म्हणणे होते आपण पोटतिडकीने लिहिले आहेत हे कळतंय .. पण जर समतोल नसेल तर मग विकले गेलेल्या माध्यमात आणि आपलय सारख्या प्रांजळ पणे लिहिणाऱ्या लेखात फरक तो काय ? विषाचे गुलाब जाम/ देशभक्तीची अफू / माध्यमाची गळचेपी वगैरे जणू आज जन्माला आले असे भासवणारे लेख आले तर प्रतिक्रिया पण तशीच येणार ना ? असो खुलासा( अर्णव जे गुराढोरांवर ओरडावे तसा ओरडतो हे लांशांदस्पद आहे आणि त्यामानाने शेखर गुप्ता सारखे जास्त शोभनाराय पद्धतीने आपलं मुद्दा मांडतात हे मला हि मान्य आहे )
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 10/17/2020 - 08:15 नवीन
अहो, येथील दोनचार आयडी भक्तांकडे दुर्लक्ष करुन लिहित राहा तुम्ही. मिपाच्या भाषेत फाट्यावर मारणे म्हणतात. हे गोदीभक्त चांगलं काहीही लिहू देत नाही. लेखन आवडले लिहिते राहा शुभेच्छा....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ए
एस.बी गुरुवार, 10/15/2020 - 05:53 नवीन
आता हेच बघा सदर लेखाचा विषय काय होता.. माध्यमे आणि त्यांची वैयक्तिक स्पर्धा आणि शासन आणि नागरिकांवर पडणारा प्रभाव आणि त्यामुळे एका देशात इतिहासामध्ये कसा परिणाम झाला ते सांगणे एवढंच ... पण आता लेखावर चर्चेचे स्वरूप काय होत आहे बघा १) लेखक फक्त अर्णव विरोधी का लीहतो? २) ह्यात इतर माध्यमाची नावे का नाहीत? ३) या पूर्वी असे प्रकार घडले तेंव्हा का नाही बोललात? ४) लेखक एका विशिष्ट समूहाचा द्वेष करणारे आहेत का?? थोड्याच वेळात ह्या चर्चेत १) राहुल २) शेठ ३) पप्पू ४) जमाई सरकार ५) ७० वर्षे ६) ५६ इंच असे शब्द पुन्हा पुन्हा आढळू लागले तर मला आश्चर्य बिलकुल वाटणार नाही!!!
  • Log in or register to post comments
न
निनाद गुरुवार, 10/15/2020 - 06:19 नवीन
माध्यमे आणि त्यांची वैयक्तिक स्पर्धा आणि शासन आणि नागरिकांवर पडणारा प्रभाव आणि त्यामुळे एका देशात इतिहासामध्ये कसा परिणाम झाला ते सांगणे एवढंच याच्याशी सुसंगत प्रतिसाद दिला आहे. नोव्होस्टी ने भारतीय शासन आणि नागरिकांवर प्रभाव कसा पाडला याचे उदाहरण दिले आहे.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस गुरुवार, 10/15/2020 - 05:58 नवीन
जो पर्यंत सामान्य माणसाला स्वत: चे हीत कशात आहे ते समजत नाही तो पर्यंत असेच चालेल. (उदा: एका अभिनेत्याचे आत्महत्या प्रकरण. सध्याचे महत्वाचे मुद्दे सोडुन लोक हे प्रकरण चघळत बसलेत)
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 10/15/2020 - 06:05 नवीन
दूरदर्शनवर काय आरडा ओरडा चालू आहे किंवा कोणति आत्महत्या चघळली जात आहे याचे सामान्य माणसाला फार काही पडलेले असते असे वाटत नाही. बाकी महत्त्वाच्या मुद्द्यावर कोणतेच सरकार काही करत नाही सामान्य माणसाला आपले रोजचे जीवन कोण जास्त सुसह्य करेल त्याला मत देणे एवढे सोडून काही फरक पडत नाही.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस गुरुवार, 10/15/2020 - 06:18 नवीन
त्या चर्चा सामान्य माणुसच अहीमहीकेने करताना दिसतो
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 10/15/2020 - 06:28 नवीन
त्या चर्चा सामान्य माणूस च्यूईंग गम सारख्या चघळतो आणि स्वाद संपला कि थुंकून टाकतो. सुशांत राजपूत झाला, कंगना राणावतचा बंगला पाडून झाला हाथरस झालं, आता आपले राज्यपाल आणि मुख्यमंत्री यातील खडा जंगी झाली, अर्णब गोस्वामी वि. परमबीर सिंघ झालं. यानंतर आरे ची मेट्रो कारशेड झाली. जलयुक्त शिवार झालं. आता अवकाळी पाऊस आणि त्यामुळे होणारं नुकसान आणि बळीराजा हे नित्य नियमाने येणारं यशस्वी च्युईंग गम घेतलं जाईल चघळायला.

यातल्या एका तरी प्रकरणाची तड लावली गेली आहे का?

च्युईंग गमचं पाकीट आणून च्युईंग गम चघळत राहायचं स्वाद संपला कि थुकून टाकायचं. आणि पाकीट संपलं कि नवीन आणायचं
  • Log in or register to post comments
ए
एस.बी गुरुवार, 10/15/2020 - 07:34 नवीन
एकदम मान्य सुबोध जी!! सामान्य माणसाला रोजची भाकरीची लढाई करायची असते ... त्या मुळे चुईंग गम चघळून पोट भरत नाही हे सत्य उमगले की चुईंग गम फेकून पुन्हा भाकरीचा पाठलाग सुरू होतो दरवेळी!!
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख गुरुवार, 10/15/2020 - 06:50 नवीन
१)न्यूयॉर्क जर्नल - विल्यम हर्श्ट २) न्यूयॉर्क जर्नल वर्ल्ड - जोसेफ पुलित्झर ... आता हे दोन माध्यमे आणि त्यांचे मालक यांनी नेमके युद्ध कसे पेटवले ते बघुयात..
मूळ घटनेतील माध्यमांची नावे लेखकाने स्पष्टपणे उल्लेखिली आहेत. पण या घटनेचा सध्याच्या भारताशी संबंध लावताना -
सध्या तुमच्या आजूबाजूला अशाच अनेक विषारी मिठाई वाल्यांच्या चुलीवर कढई तापत ठेवलेल्या दिसतील...
या घटनेतील / घटनाक्रमातील माध्यमांची नावे उल्लेखण्यास - लेखक विसरला आहे / अनावधानाने राहून गेले आहे/ प्रयोजन नव्हते / टाळले आहे / सोयीस्कर बगल दिली आहे / अजून कोणत्या कारणाने नावे आलेली नाहीत. हरकत नाही. आता एका प्रतिसादात धागा लेखकाने, विषारी मिठाई वाल्यांच्या चुलीवर कढई तापत ठेवलेल्या माध्यमांची नावे स्पष्टपणे उल्लेखावित. तसेच सध्या म्हणजे किती काळापासून हेही स्पष्ट करावे. वाद संपुष्टात आणण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे, नाही का? सकारात्मक + माहितीपूर्ण प्रतिसादाच्या प्रतीक्षेत असलेला
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 18 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 18 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 18 hours ago
  • सुंदर !!
    1 day 19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा