Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

बातम्यांचे विषारी गुलाबजाम

ए
एस.बी
Wed, 10/14/2020 - 13:46
🗣 161 प्रतिसाद
बातम्यांचे विषारी गुलाबजाम देणारे कोण आणि खाणारे कोण??? निषेध !! घोर निषेध!! आम्हीच न्याय मिळवून देणार!! हे सगळे चोर आहेत!! गोळ्या घालून उडवून द्या ह्यांना !! देशद्रोही आहेत!!...आमचा आवाज सत्याचा आवाज...आमचं भाषण स्वातंत्र्याची गळचेपी करणारे हेच...ह्यांच्या वर बहिष्कार घाला! अशा कानठळ्या बसवणाऱ्या आरोळ्या रोज रात्री घराघराच्या बैठकीच्या खोलीत घुमताना दिसतात..आणि आई बाप लेकरे म्हातारे सर्व एका धुंदीत होऊन ," बरोबर आहे!! बरोबर आहे!! द्या त्यांना शिक्षा !! " असा आक्रोश करताना आढळत आहेत!.. चौकाचौकात गटबाजी होऊन वादविवादाचे फड रंगतात ...तावातावाने आरोप प्रत्यारोप केले जातात.. पुराव्याचा काय सवाल?? व्हॉट्सअँप आहे...फेसबुक आहे...तिथं सगळं खरं असतं असं म्हणून प्रत्येक जण आपला अंतरात्मा जो की मूलभूत समस्यांच्या विळख्यात अडकल्याने भयंकर धुसफूसलेला आहे त्याच्या रागाला एक वाट काढून देतोय बास्स!!!.... इतिहास सतत पुनरावृत्ती करतो असं म्हणतात...कारण मनुष्याची जात एवढी मुजोर आहे जी त्याच त्याच चुका परत करत राहते आणि मग परिणाम काय वेगळे होणार आहेत ?? जरा इतिहासात मागे जाऊयात ... ही गोष्ट आहे १८९८ साल ची.. अमेरिका आणि स्पेन मधल्या युद्धाची ,जे की क्युबा या देशात घडले आणि मुळात पाहता प्रश्न होता सरळसरळ स्पेन आणि क्युबा मधला आंतरिक..म्हणजे स्पेन ने क्युबा वर साम्राज्य स्थापन केले होते..आणि क्युबन लोकांना एक ठराविक कालावधी नंतर ते जुलमी वाटू लागले..आणि साहजिक त्यांनी क्रांती,आंदोलने,वगैरे वगैरे उद्योग सुरू केले...अगदी आपल्यासारखेच...काही अहिंसक तर काही हिंसक ... आता हे सर्व उद्योग आणि त्याबद्दल वार्तांकन करायला अमेरिकन माध्यमे आपले आपले प्रतिनिधी क्युबा मध्ये पाठवत होती. आणि सर्व काही सुरळीत चाललं होत..म्हणजे क्युबा चे लोक क्रांती करत होते...अमेरिकन लोक त्याच्या बातम्या जगात दाखवत होते...स्पेन आपली बाजू मांडत होते की क्रांती करणारे लोकांचे गट मर्यादित आहेत...सर्वसामान्य क्युबन जनता त्यांचे समर्थन करत नाही वगैरे वगैरे..! मग आता प्रश्न पडतो की जर हे वादविवाद स्पेन आणि क्युबा मधले होते तर मग ह्या अमेरिकन बातमीदारी चे काय बिनसलं की बुवा अमेरिकेच्या शासनाने स्पेन बरोबर युद्ध पुकारले आणि क्युबाला स्वतंत्र करण्याचे पवित्र पुण्य कार्य आपल्या डोक्यावर घेतले??... तर त्याचे दोन आयाम आहेत पहिला म्हणजे अमेरिका आणि क्युबाचा असणारा साखर व्यापार ( जो की मोठ्या प्रमाणावर खासगी उद्योगपतींची मक्तेदारी होता ज्यात मोठ्या प्रमाणावर तत्कालीन विरोधी पक्ष तसेच सत्ताधारी पक्षाची चमचे मंडळी दाटीवाटी करून मोक्याच्या जागा अडवून बसली होती!) आणि दुसरा म्हणजे दोन अमेरिकन वृत्तपत्र समूह मधला आपापले गिऱ्हाईक वाढवण्यासाठी असणारी स्पर्धा... ( बघा कुठे काही सुत जुळते आहे का सध्या आपल्या आजूबाजूला उसळलेल्या गोंधळात आणि ह्या १८९८ च्या माथेफिरू मध्ये!!!) साखर सम्राटांनी अशी धारणा किंवा नियोजन करून घेतले होते की जर क्युबा स्पेन कडून मुक्त होण्यात आपला देश अग्रभागी राहिला तर पुढे भविष्यात आपल्या व्यवसायासाठी मोठे कुरण लाभेल.. आणि वृत्तपत्र समूहाचे बोलायचे झाले तर ती आघाडीची वृत्तपत्रं होती १)न्यूयॉर्क जर्नल - विल्यम हर्श्ट २) न्यूयॉर्क जर्नल वर्ल्ड - जोसेफ पुलित्झर ( हे तेच पुलित्झर बाबा आहेत ज्यांच्या नावाने पुरस्कार दिले जातात...काळाचा महिमा अगाध आहे!!) ह्या दोघांचे पण एकमेकांसोबत वाचक वर्ग मिळवण्यासाठी प्रचंड स्पर्धा होती.त्या स्पर्धेला तोंड फुटले ते "येलो किड" नावाच्या व्यंगचित्र स्तंभ लेखनावरून जो की पहिल्यांदा पुलित्झर यांच्या वर्तमानपत्र मध्ये प्रसिद्ध होत असे पण त्याचा व्यंगचित्रकार हर्श्ट यांच्या वर्तमानपत्र समूहाने सौदेबाजी करून पळवला आणि आपल्या वर्तमानपत्र मध्ये तो स्तंभ त्याच नावाने सुरू केला...झालं!! पुलित्झर साहेबांच्या नाकाला मिरच्या झोंबल्याना राव!! त्या काळी पेटंट , निकोप स्पर्धा कायदे असले काय प्रकार नसल्याने पैसा फेको तमाशा देखो असा राजरोस कार्यक्रम होता..त्यामुळे पुलित्झर समूहाने ही नवा चित्रकार पैसे देऊन उभा केला आणि त्याचं पण स्तंभ लेखन त्याच येलो किड नावाने सुरू राहिले आणि मुहूर्तमेढ रोवली गेली एका व्यापारी स्पर्धेची ज्याची अखेर झाली ३ देशांच्या युद्धामध्ये ,अनेक निर्दोष सैनिकांच्या बळी मध्ये!!,स्थानिक नागरिकांच्या युद्ध समर्थक आणि युद्धाला विरोध असणाऱ्या गटांच्या दंगली मध्ये!! आणि अमेरिकेच्या हाती काय लागलं तर.. क्युबाची तात्पुरती मालकी आणि अमेरिकेला स्पेन ला द्यावी लागली युद्ध भरपाई रक्कम म्हणून २० दशलक्ष डॉलर्स द्यावे लागले जे की सध्याच्या काळातील ६१० दशलक्ष डॉलर्स एवढे!! ( ६१० गुणिले १० लाख = आलेल्या उत्तराला ७० रू ने गुणून घ्या म्हणजे जे काय भारतीय रक्कम येईल ना त्यात नेमके किती शून्य असतात ते मला पण सांगा!!! शिंचे हे गणित फार द्वाड अस्तय राव!!) आता हे दोन माध्यमे आणि त्यांचे मालक यांनी नेमके युद्ध कसे पेटवले ते बघुयात.. वरती सांगितल्याप्रमाणे स्पर्धा सुरू होती आणि प्रत्येक माध्यम समूह जास्तीत जास्त वाचक गोळा करू पाहत होता..आणि त्यासाठी त्यांनी आपापल्या युद्धाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारावर दबाव टाकायला सुरुवात केली की ," आम्हाला बातम्या द्या ...चमचमीत बातम्या द्या...अशा बातम्या द्या की ज्या दाखवतील की स्पेन कसे क्युबा मध्ये अत्याचार करत आहे!.." ह्या बद्दल ची हर्श्ट यांच्या पत्रकाराने त्यांना पाठवलेला एक तार संदेश युद्धानंतर प्रसिद्ध झाला .. त्यात तो पत्रकार म्हणतो की ," इकडे सर्व शांत आहे..इथे काही युद्ध होऊ शकत नाही..थोडे स्थानिक परकीय वाद आहेत पण त्यामुळे युद्ध नाही होऊ शकत..मला कृपया अमेरिकेत परत बोलवून घ्या !" त्या वर हर्श्ट यांचं उलट तार उत्तर असं होतं," तू आहे तिथेच रहा..फक्त फोटोज् पाठवत रहा...तू क्युबावरून मला फोटो पाठव...मी तुला अमेरिकेकडून युद्ध पाठवतो!!!" केवढा हा दुर्दम्य आत्मविश्वास आणि दूरदृष्टी!!!! आणि त्यांनी बोलेल तसेच केले आणि अमेरिकेकडून युद्ध क्युबा मध्ये निर्यात करायला एकाहून एक सनसनीखेज प्रकरणे प्रसिद्ध करायला सुरुवात केली!! त्यातल पहिलं प्रकरण म्हणजे क्लेमेन्सिया अरांगो ह्या क्युबन महिलेची ओलिवेट ह्या अमेरिकन प्रवासी जहाजावर स्पॅनिश अधिकाऱ्यांनी घेतलेली अंगझडती चे प्रकरण! ह्या प्रकरणात ही क्युबन महिला अमेरिकन जहाजावरुन प्रवास करत असताना तिच्याकडे क्रांती संबंधित सामग्री असल्याचा संशय घेऊन स्पॅनिश अधिकाऱ्यांनी तिची झडती घेतली होती पण ह्या प्रकरणाचे वार्तांकन खालील प्रमाणे अमेरिकन माध्यमात करण्यात आले होते... "आपल्या देशाचा झेंडा एका महिलेची अब्रू वाचवू शकतो ? " "अमेरिकन जहाजावर स्पॅनिश अधिकाऱ्यांनी महिलेचा विनयभंग केला" "आपल्या देशाच्या झेंड्याच्या नजरेत असून सुद्धा कोवळ्या तरुणीचे कपडे उतरवतात स्पॅनिश अधिकारी!!!" आणि पुढे ह्यामुळे स्थानिक अमेरिकन महिलावर्ग बिथरला आणि सरकार कडे सतत क्युबा स्पेन मध्ये हस्तक्षेप करण्यासाठी आग्रह करू लागला...तत्कालीन विरोधी पक्षांनी पण पोळ्या भाजायला सुरुवात केली.. पण हा बुडबुडा लगेच फुटला कारण नंतर क्लेमेन्सिया अरांगो हिने स्वतः पुढे येऊन जबाब दिला की तिची झडती महिला अधिकारी घेतली होती आणि कोणता ही गैरप्रकार झाला नव्हता...पण तोपर्यंत उशीर झाला होता..स्पॅनिश अधिकारी हे महिलांसोबत गैरवर्तन करतात हे बीज जनतेमध्ये पक्के रुजले होते..त्यामुळे ही बाई खोटे बोलत असणार ...हिला स्पेन ने पैसे दिले...ही पण गद्दार आहे वगैरे वगैरे गरळ ओकणे सुरूच राहिलं!! नंतर या युद्ध ज्वराला फोडणी मिळाली ती म्हणजे डॉक्टर रिकार्डो रुईझ यांच्या क्युबा मधल्या तुरुंगात झालेल्या मृत्यूची! हे डॉक्टर शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत आले होते ..इकडे आल्यावर त्यांनी शिक्षण घेतले तसेच आपल्याकडे जसे एन आर आई चे आकर्षण असते तसेच अमेरिकन नागरिकत्वाचे आकर्षण त्यांनाही होते आणि त्यातून त्यांनी अमेरिकन नागरिकत्व पण मिळवले आणि नंतर ते स्वखुशीने क्युबा मध्ये परतले ..तिकडे परदेशी शिकून आलेले डॉक्टर म्हणून त्यांचा व्यवसाय ही उत्तम चालू होता आणि कुटुंब ही सुखी होते..पण त्यांनी स्थानिक क्युबा क्रांती मध्ये भाग घेतला आणि त्यात त्यांना अटक झाली..आणि तुरुंगात त्यांचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला. आणि मग ह्याचा फायदा अमेरिकन वृत्तपत्रांनी घ्यायला सुरुवात केली.. कोणत्या ही तटस्थ ,निष्पक्ष चौकशीची मागणी न करता..कोणते ही पुरावे सादर न करता...राजरोस युद्धाचा आग्रह करणाऱ्या बातम्या रोज छापल्या जाऊ लागल्या.. नमुना काही असा असायचा बघा... "हे खरे आहे की स्पेनच्या लोकांनी रुईझची त्याच्या क्यूबाच्या तुरूंगात हत्या केली, आपला राष्ट्रीय स्वाभिमान, तसेच राष्ट्रीय सन्मान, आपल्याकडे मागणी करतात की आपण स्पेनविरूद्ध लढा घोषित करावा .... युद्ध ही एक भयानक गोष्ट आहे, परंतु त्याहीपेक्षा आणखी भयानक गोष्टी आहे ती म्हणजे आपला राष्ट्रीय अपमान!. रुईजच्या मृत्यूसंदर्भातील सत्य जे सांगितले गेले त्याप्रमाणेच आहे यात शंका घेण्याचे कोणतेही कारण नाही. ... आता जनतेच्या भावना सूड उगवतील. आणि यावेळी लोकभावनेचे वर्चस्व राहील. " (New York World, 21 February 1897 and New York Journal, 22 February 1897) झालं मग जो तो एकच बरळू लागला बस... आता खूप झालं...स्पेन ला धडा शिकवायला हवा...त्यांना इंगा दाखवू आपण...अमेरिकेशी पंगा घेतला ना की काय होत ते समजेल आता त्यांना...अशा आरोळ्या चोहोबाजूंनी निनाद करू लागल्या!... आणि पुढे काय मग इंग्रजी मध्ये एक म्हण आहे बघा third time is the charm!!! म्हणजे तिसऱ्या प्रयत्नात यश हमखास !! आणि इथे पेपरवाले जिंकले कारण दैव त्यांचं बलवत्तर होत आणि त्यांना त्यांचं ब्रह्मास्त्र मिळवून देणारा प्रसंग घडला तो म्हणजे हवाना ह्या क्युबा च्या बंदरात Uss maine या अमेरिकी युद्ध नौकेला झालेला अपघात जो की समुद्री mines चा स्फोट मुळे झाला आणि त्यात ती युद्ध नौका बुडाली आणि जवळपास २००-३०० अमेरिकी नागरिकांना जलसमाधी प्राप्त झाली.. पुन्हा एकदा वृत्तपत्रे पेटली आणि मग काय.. " remember the maine !! to hell with the spain!!" " $ 50,000 price for the people who can punish spanish criminals!!!" " punishment to spain for the USS maine!!" अशा मथळ्याखाली रोज जनप्रक्षोभ भडकवनाऱ्या बातम्या छापल्या गेल्या!!!... या अपघाताची सखोल चौकशी न करताच वृत्तपत्रांनी निकाल लावून दिला की हा हल्ला स्पेन ने केला आहे आणि त्यांनीच समुद्री mines लावून आपली युद्धनौका बुडविली... पण तत्कालीन नौदल अधिकाऱ्यांचे एक मत असे ही होते की uss maine चा तळभाग मध्ये मोठ्या प्रमाणावर bituminus प्रतीचा कोळसा साठवून ठेवण्यात आला होता जो की fire dampening प्रक्रिये मधून स्फोटक वायूंची निर्मिती करत राहतो..आणि मग असे वायूचे कोठार कधी पण वाढत्या तापमानाला पेट घेऊ शकते... पण ऐकणार कोण...स्पेन सोबत युद्ध करायचे आहे...! स्पेन चा अत्याचार पेपर मध्ये छापायचा आहे...मग असल्या थातुर मातुर वैज्ञानिक शक्यतेला काय भाव द्यायचा आहे...?? त्या पेक्षा तत्कालीन सर्व वृत्तपत्रांनी स्पेन विरोधी आघाडी उघडली...आणि त्यात" आम्हाला अमेरिकी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांकडून विश्वसनीय बातमी मिळाली आहे की सदर हल्ला कसा स्पेन ने आखला होता..त्यांनी कसा आपल्या युद्धनौकेचा अभ्यास केला....स्फोटके कुठून मिळवली...ती तिथे कशी पेरून ठेवली याच्या सुरस कथा छापायला सुरुवात केली!!" या सर्वाचा परिणाम एकच झाला की तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष यांना आपल्या सार्वभौम सभागृहामध्ये युद्धाचा अधिकृत प्रस्ताव परित करून घ्यावा लागला आणि एप्रिल १८९८- ऑगस्ट १८९८ असे ३ महिने चाललेले युद्धाचा प्रारंभ झाला!!!! आता त्या युद्धात अमेरिका जिंकली...स्पेन हरला...क्युबा स्वतंत्र झाला...वगैरे वगैरे गोड गुलाबी ऐतिहासिक गैरसमजुती चे गुलाबजाम आजही अनेक इतिहासकार मिटक्या मारत खाताना आढळतील...तुम्हाला पण आग्रह करतील की चाखून तरी बघा ...किती गोड आणि स्वादिष्ट आहेत !! पण हे गुलाबजाम विषारी आहेत..त्यांची पाककृती ही एका विकृत व्यापारी मानसिकतेमधून तयार झाली आहे... त्याला बनवताना तप्त अशी धग तुमच्या आमच्या सारख्या मध्यमवर्गीय नागरिकांच्या संतापाची देण्यात आली होती!! सध्या तुमच्या आजूबाजूला अशाच अनेक विषारी मिठाई वाल्यांच्या चुलीवर कढई तापत ठेवलेल्या दिसतील... पण सांभाळ करा...वेळीच हे विष आवरणे तुमच्या आमच्या हातातच आहे... - शैलेश भोसले टीव्ही ला घाबरणारा एक सर्व सामान्य नागरिक

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 62337 views

🗣 चर्चा (161)
ए
एस.बी गुरुवार, 10/15/2020 - 07:31 नवीन
वामन जी मी त्या अमेरिकन माध्यमाची नावे स्पष्ट पणे घेतली कारण त्यांच्या कृती आणि स्पर्धा यांचा अंतिम परिणाम युद्ध मध्ये झाल्याने त्यांचावर आपण थेट संबंध जोडून चर्चा करू शकतो या उलट भारतीय संबंधात बोलताना सदर प्रक्रिया जवळपास सारख्याच प्रमाणात सुरू आहे एवढंच मला म्हणायचं आहे..आणि भारतीय प्रक्रियेचा अजून दृश्य आणि सर्वमान्य असा बरावाईट परिणाम निष्पन्न झालेला नाही आहे कारण ती प्रक्रिया अजून गतिमान आहे तर अशा परिस्थितीत उगाच ह्याची त्याची नावे मांडून हे चांगले आणि ते वाईट असा न्याय निवाडा करणे मला योग्य वाटले नाही म्हणून त्यांचा उल्लेख केला नाही.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 10/15/2020 - 08:50 नवीन
"भारतीय प्रक्रियेचा अजून दृश्य आणि सर्वमान्य असा बरावाईट परिणाम निष्पन्न झालेला नाही आहे" असं म्हणता पण अवॉर्ड वापसी ग्यांग तर म्हणतेय फार परिणाम झालाय// वाट लागलीय.. खास करून हि मंडळी जेव्हा भारताबाहेरील माध्यमांना मुलाखती देतात ना तेवहा "भारतात काय अराजक " माजलाय असंच दाखवतात ... जाऊदे ...भारतातील पत्रकारितेतील फार थोडे अपवाद सोडले तर सुमार दर्जाची आहे असेच खेदाने म्हणावे लागते ... एकावेळी ८ जण "पॅनल " वर घेऊन काय आरडा ओरडा चालू असतो... हे राम... एस बी क्षमा करा परंतु आपण प्रश्नाला बगल देताय...
  • Log in or register to post comments
ए
एस.बी गुरुवार, 10/15/2020 - 09:26 नवीन
अहो वामन जी अवॉर्ड वापसी वाट्टेल ते म्हणते ..आणि सरकार च समर्थन करणारे गट पण वाट्टेल ते बोलून आपलाच ढोल बडवत बसतात... अवॉर्ड वापसी गॅंग आपल्याला सोयीस्कर असा प्रक्रियेचा अर्थ लावून भारतीय पत्रकारितेवर नामउल्लेख करून दोषारोप करत असतील ...पण माझ्या मते पत्रकारिता हे एक असे क्षेत्र आहे की ज्याच काम नजर ठेवणे आहे दृष्टिकोन पुरवणे नाही. ह्या सीमारेषा पुसट होऊन जी अंधाधुंद माजत आहे त्यावर बोलायचे म्हणून लेखात सरसकट सर्वांचा उल्लेख माध्यमे असा केला !पण आता सुरुवातीला कोणी मला अर्णब बद्दल जोडून जाब विचारू पाहिले तर आता तुम्ही अवॉर्ड वापसी सोबत माझा बादरायण संबंध जोडता आहात!!!
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 10/15/2020 - 07:13 नवीन
ज्याचा फायदा होत आहे तो वर्ग म्हणतो देश चांगला चालला आहे ! हा वर्ग कोण आहे हे इथे लिहायची गरज नाही ! ज्याचे त्याच्या अपेक्षेपेक्षा वाईट चालले आहे तो म्हणतो हा देश वाईट चालला आहे . आपला देशाच्या प्रगतीत व्यक्तिगत फायदा काय हे प्रथम पाहिले जाते .ते आयडीयोलोजी वगरे सब झूठ नसते पण त्याला ऐकूण महत्व कमी !
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर गुरुवार, 10/15/2020 - 07:36 नवीन
प्रोपगंडाचे वस्त्रहरण करणारे लेखन वाचायला आवडत असल्याने लेखातील माहिती ह्यापूर्वीच माझ्या वाचनात आलेली असली तरी हा लेख आवडला! लेखात आपण स्पॅनिश-अमेरिकी युद्धाचे एकच उदाहरण दिल्याने तो थोडा त्रोटक वाटला असेही नमूद करतो. जानेवारी ते डिसेंबर २०१७ ह्या काळात लोकसत्ता मध्ये श्री. रवी आमले ह्यांचे प्रचारभान नावाचे सदर येत असे, त्यात अशा अनेक गोष्टींची रोचक माहिती त्यांनी दिली आहे. त्या लेखांचे संकलन करून ‘प्रोपगंडा : प्रचार | जाहिरात |अपमाहिती | आणि बरेच काही...’ नावाचे पुस्तकही प्रकाशित झालेले आहे. वरती एका प्रतिसादात आपण लिहिले आहे कि,
सद्य परिस्थितीत माध्यमं जे वृत्तांकन आणि टीव्ही ट्रायल चालवत आहेत त्यावरून पीत पत्रकारिता हा शब्द वाचनात आला आणि तेंव्हा अजून माहिती मिळवताना ह्या वरील नमूद सर्व घटना निदर्शनास आल्या त्या स्वतच्या शब्दात संकलित करून आणि सद्य परिस्थितीत समर्पक वाटल्या म्हणून सर्वांसमोर मांडल्या.
त्यामुळे ह्या विषयात रस असलेल्या आपल्या सारख्या लेखक आणि इतर वाचकांना वरील माहिती उपयोगी पडू शकेल असे वाटल्याने ती दिली आहे. अर्थात तटस्थपणे रवी आमले ह्यांचे लेखन वाचताना त्यांच्यावर असलेला लोकसत्ता दैनिकाच्या अजेंड्याचा दबाव स्पष्टपणे जाणवत असला तरी ते सदर खूप माहितीपूर्ण आहे! धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ए
एस.बी गुरुवार, 10/15/2020 - 07:55 नवीन
आभारी आहे आपला..लवकर च पुस्तक ऑर्डर करेल
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर गुरुवार, 10/15/2020 - 08:02 नवीन
पुस्तक ऑर्डर करायचे की नाही ते 'प्रचारभान' हे सदर ऑनलाइन वाचून मग ठरवू शकता 😀 सर्व लेख येथे उपलब्ध आहेत
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 10/15/2020 - 07:45 नवीन
भारतीय लोकांना पाकिस्तानी जनतेचा भयंकर राग येतो आणि पाकिस्तानी पण भारतीय नागरिकांचा तीव्र द्वेष करतात. हिंदू आणि मुस्लिम हे एकमेकांचे शत्रू आहे त असे दोन्ही समाजातील लोक का समजायला लागली. उच्च जाती आणि कनिष्ठ जाती एकमेकांविषयी चांगला विचार च करू शकत नाहीत म्हणून आमच्याच जातीचा लोकप्रतिनिधी असावा ,अधिकारी असावा ही मानसिकता कधी निर्माण झाली. चांगल्या सवयी सोडून लोक फास्ट फूड च्या नादाला का लागली. दुसरा गट आपल्यावर अन्याय करतोय ही मानसिकता कशी निर्माण झाली. ह्याला फक्त आणि फक्त माध्यमांनी चालवलेला अजेंडा च कारणीभूत आहे. मध्याम स्वतः अजेंडा तयार करतात .का तर ह्या प्रश्नाचे उत्तर नाही आहे. लबाड,ढोंगी,दृष्ट विचाराची लोक अजेंडा तयार करून मीडिया मार्फत लोकांमध्ये राबवतात आणि हा अजेंडा हा वाईट हेतू नीच पसरवला जातो. त्या मुळे अर्णव ,आणि बरखा ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ह्या मध्ये हा चांगला हा वाईट असा कोणी नाही . दोघे ही वाईटच आहेत.त्यांच्या मुळे कोणत्याच समाजाचे भले होणार नाही,देशाचे भले होणार नाही. मुळात अजेंडा हा वाईट घडावे ,नुकसान व्हावे म्हणूनच चालवला जातो. विषेरी झाडाला फळ ही विषारी च येणार.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 10/15/2020 - 09:09 नवीन
हिंदू आणि मुस्लिम हे एकमेकांचे शत्रू आहे त असे दोन्ही समाजातील लोक का समजायला लागली. ह्याला फक्त आणि फक्त माध्यमांनी चालवलेला अजेंडा च कारणीभूत आहे. अजिबात असहमत ...या दोन धर्मांमध्ये असलेली तेढ हि केवळ राजकारणी किंवा माध्यम यांचयामुळे असे ढकलून मूळ प्रश्न लपविला जातो - विविध देशातील मुस्लमानन बरोबर वेळ घालवल्यानंतर १-२ गोष्टी लक्षात आल्या त्यावरून लिहितोय ( यात मी नोकरी हि मुसलमानांकडे केलीय आणि माझा भाडेकरू हि मुसलमान होता ) १) धर्म आणि देश हा प्रश्न आला कि जेवढया सहजतेने बरेच हिंदू "देश आधी" असे म्हण्याला तयार असतात तेवढे कितीतरी मुसलमान नसतात किंवा टाळतात २) जेथे राहतो तिथे खाणे पिणे यात समरसून जाताना हिंदूंना फारशी अडचण येत नाही , मुसलमानांना येताना दिसते आणि याला कारण फक्त धर्म ३) इस्लाम फोफावला तो आक्रमकतेने ,, ख्रिस्ती धर्म हि फोफावला पण आज भारतीय हिंदूंचायत आणि मुसलमानातच का जास्त भांडणे ? त्यामानाने हिंदू आणि ख्रिस्ती लोकान्चायत कमी दिसतात का? हिंदू जर हलकट असतील तर आधी ख्रिस्ती मग बुद्ध आणि मग पारशी यांना वाटेला लावतील ना ? झालाय तसं? फारसा नाही ना! कारण हे इतर धर्म इस्लाम एवढे आंधळे वागताना दिसत नाहीत म्हणून ४) वरील प्रश्न थोडयाफार फरकाने इस्लाम आणि इतर धर्मांमध्ये पण दिसतात ( मियांमार ) त्यामुळे एकटे हिंदूच मुस्ल्माननचं विषयी मनात अढी धरून आहेत हे विधान खोटे पडते ५) जगभरचे ओझे वाहने ( इराकी मुसलमान भाडेकरू मला सांगायला लागला कि भारतात मुसलमानाची वाईट परिस्थिती वैगरे मी त्याला म्हणाला अरे भारतात कितीतरी इराकी बसतील तेवढे मुसलमान आहेत ,, आला सध्याचा सरकार आणि झाला का त्यांचा ऑश्वित्झ कॅम्प ? " किंवा भारतातील मुसलमान जयने माझेकडून घर खरेदी केले त्याची मखलाशी कि इसिस कसे तसे वाईट नाही ...! ( काही वर्षांपूर्वी) तेव्हा हा गुलाबी चष्मा जरा बाजूला ठेवावा.. आणि बघावे अवती भवती... त्यासाठी चड्डीवाला संघी होण्याची काहीच जरुरी नाही मूळ प्रश्न हाच आहे कि कोणत्याही मुसलमानाला विचार कि धर्म आधी कि देश/ लोकशाही? .. मेख तिथेच आहे , इंग्रजीत म्हणतात तसे "मिलियन डॉलर QUESTION "
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू गुरुवार, 10/15/2020 - 11:41 नवीन
प्रत्येक वाक्याशी सहमत. पण असं काही प्रॅक्टिकल बोललं कि लगेच आपण कसे दुष्ट, असहिष्णू आणि चड्डीवाले म्हणून हिणवणतात..
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 10/15/2020 - 19:40 नवीन
चौकस२१२, मी या संदेशाशी पूर्णपणे सहमत आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 10/15/2020 - 13:04 नवीन
समाजातील विविध घटकांनी एकमेकाला दोषी ठरवून एकमेकाच्या विरूद्ध विचार व्यक्त करायची काही गरज नाही. देश हित,राज्य हित आणि आपले स्वतःचे हित अबाधित ठेवायचे असेल तर कोणत्याच उन्माद निर्माण करणाऱ्या,द्वेष निर्माण करणाऱ्या प्रचाराला सामान्य लोकांनी बळी पडू नये. बळी पडला तर अशा गोष्टींचा शेवट शेवटी सामान्य लोकांचा बळी जाण्यातच होतो. जगात अनेक जिवंत उदाहरणे अस्तित्वात असताना परत आपण त्याच चुका करत असू तर भवितव्य नक्कीच अवघड आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 10/15/2020 - 13:58 नवीन
राजेश भाऊ मी अनुभवातून बोललो .. अजून पण उद्धरणे या समाजाची मी आधी दिली आहेत ... ती हवे तर खोदून काढा किंवा तुमची उद्धरे द्या अजून एक उद्धरण आहहेत आणि मी आधी हि दिली आहेत ( अफगाणी मुसलमानाने माझे शाकाहारी जेवण पण नाकारणे , सांगलीतलंय तरुण मुसलमानाचे अचानक कडवे धार्मिक बनणं इत्यादी ) माझा भाडेकरू हेंद्राबादी मुसलमान आणि त्याची बायको येथे बरेचदा प्रत्यक्ष भाडेकरूला भेटावे सुद्धा लागत नाही महिनोन महिने तरी काही कारणाने एकदा भेटलो .. त्याने चहा विचारला आणि सोबत खजूर खाणार का म्हणून विचारले.. म्हणले हो चालेल .. समोर आले ते लांबुडकाय गुलाबजाम / किंवा बिस्कीट सारखे... छान होते पण मला कळले नाही कि याला तो खजूर का म्हणतोय... मी धूर्तपणे विचारून त्याच्याकडून काढून घेतले अरबस्तानातील खजूर चांगले + आपण मुसलमान + म्हणून जणू आपण बनवणाऱ्या मिठाईला अरबस्तानाची आठवण म्हणून खजूर नाव! हे म्हणजे कसे झाले माहिती का , पाकिस्तानी लोक स्वतःला उगाचच अरबी वंशाचे समजतात ( हे मी म्हणत नाही अनेक विद्यमान मुस्लिम सुद्धा हि टीका करतात ताहीर गोरा यांचे भाष्य पहा ) म्हणजे काय तर वहाबी इस्लाम कसा नसानसात पसरेल याचे हे उदाहरण... उगाच आपलं सगळं कस आलबेल आहे असे समजू नका .. अब्राहमीक धर्मांचा सरळ जग भर प्रसाराचा कार्यक्रम आहे . त्यात भरकटलेला समाजवादी+ कम्युनिस्ट खात घालायला . आपण वेन्धले पण करून आपण नाहीसे होऊ एकदिवस ... मग बस तुम्ही आपल्या अहो धर्मांध पणा कोणालाच नकोय हो .. प्रत्येक हिंदू काही संघी नाही कि त्याला हिंदुराष्ट्र्र हि नकोय पण या चापलुसी चा आता जाम कंटाळा आणि उबग आलाय ..मग ती चहा ची जाहिरात असो नाहीतर बोटचेपी धोरणे असोत ... एकवेळ ओवेसी परवडला त्याच्याशी दोन हात तरी करता येतात पण कान्हया नको . एकवेळ काँग्रेस परवडली पण हे शॅम्पेन पिट सामाजिक न्याय बोलणारे भडभुंजे समाजवादी नकोत ( अरुंधती रॉय, प्रयाग राज इत्यादी )
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 10/15/2020 - 15:15 नवीन
असे समजले तरी . जो धर्म देशापेक्षा त्यांचा धर्म श्रेष्ठ मानतो,त्याची निष्ठा देशाशी नसून धर्माशी आहेत. पर धर्मीय लोकांना नष्ट करणे ही त्या धर्माची शिकवण आहे . हे सर्व च्या सर्व खरे आहे असे मानले . तरी त्या धर्माच्या लोकाचा द्वेष करून,त्यांच्या वर मीडिया मधून टीका करून,त्यांना मारझोड करून हा प्रश्न सुटेल का. तर नाही. त्या साठी देशातील वातावरण शांत हवे,आर्थिक विकास सर्व स्तरावर हवा. मीडिया नी फक्त बातम्याच द्याव्यात न्यायाधीश बनू नये. उत्तम दर्जाचे सरकार ,आणि सर्वोत्तम प्रशासन देशात स्थापित झाले की तुम्ही म्हणता त्या वर आरामात नियंत्रण ठेवता येईल. त्यांना कायद्या नी राहण्यास भाग पाडता येईल. त्यांच्याच समाजातील लोक मदतीचा हात पुढे करतील. द्वेषातून काहीच निष्पन्न होणार नाही.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 10/16/2020 - 02:17 नवीन
द्वेषातून काहीच निष्पन्न होणार नाही. हो बरोबर अहो कोणाला वेळ आहे द्वेष करण्यात...आणि इच्छा पण हि नाराजी का आहे हे तपासून पाहण्याचा मोकळे पण तरी दाखवा हो.. हिंदूंना साहिशुनतेचा सल्ला देण्या पेक्षा संघ गेला खड्यात , भाजप गेलं खड्यात, मी गाय खाणारा, देवळात फारसा ना जाणारा केवळ जन्माने हिंदू आहे तरी मला या मुसलमानांच्या असल्या वागण्याचा प्रथम कंटाळा मग उबग आणि मग राग येतो ते का? कधी विचार केलाय तुमच्यासारख्यांनी आणि हे सर्व आधी लिहिल्याप्रमाणे जगातील भारतासह २ /३ देशातील वर्तणूक पाहून मग लिहीत आहे तेव्हा मुद्य्यांचा बोला .. उगा लोकांनी शांत राहावे भडकू नये वैग्रे गप्पा खूप झाल्या .. आणि जातीबद्दल बोलताय तर हे हि लक्षात ठेवा कि इसिस ( विचाराने) नाग्या तलवारी घेऊन आल्यावर तो काय हे बघणार आहे कि तुम्ही जोशी कि पाटील कि कांबळे ? तुम्ही आम्ही काफीरच ... जगाच्या अंतापर्यंत
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Fri, 10/16/2020 - 12:07 नवीन
✓ धृविकरण कसे होते याचा उत्तम नमूना. हेच काँग्रेस, समाजवादी, पुरोगामी व कम्युनिस्टांना अजून समजलेले नाही. भाजपाला विरोध करण्याची तीच जुनी पध्दत अवलंबणे अजूनही चालू आहे. यातून भाजप दिवसेंदिवस बळकटच होत चालला आहे. ज्यांचा भाजपाशी काहीही संबंध नाही अशी लोकं भाजपाकडे वळवण्यात या लोकांचा मोठा हात आहे. मुख्य म्हणजे अशा नव्या लोकांना संघी / भक्त म्हणून हिणवल्यामुळे तर ही नवीन लोकं जाम चिडतात. त्यामुळे त्यांच्या आजूबाजूची लोकंपण (जी नेहमी राजकारणापासून चार हात लांब राहतात) भाजपकडे वळायला लागतात. पण काँग्रेस, समाजवादी, पुरोगामी व कम्युनिस्ट अजूनही आपले जुने व बोथट झालेले हत्यार बदलायला तयार नाहीत. त्यामुळे त्यांना फक्त भाजपाला जोरदार विरोध केल्याचे मानसिक समाधान मिळते. मते मिळत नाहीत असे दिसून येतंय. मतदान टक्केवारीच्या अभ्यासात तरत्या मतदारांना खूप महत्व दिले जाते. हे तरते मतदार मोठ्या संख्येने भाजपकडे ढकलले जात आहेत. त्यांनाही "काँग्रेस + समाजवादी + पुरोगामी + कम्युनिस्ट" यांना कोणताही पर्याय न मिळाल्याने भाजपाला मत देण्याशिवाय पर्याय राहात नाही. असो. चालायचेच. इश्वरेच्छा बलियसी. 😀
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू गुरुवार, 10/15/2020 - 15:16 नवीन
मुस्लिम ब्रॉदरहूड या संकल्पनेत सर्व गोष्टींची उत्तरे दडलीयेत. जिथे राहतोय त्यापेक्षा इतर इस्लामिक जगात काय चालल्ये त्याकडे बारीक लक्ष. उदा. स्वातंत्र्य पूर्व काळात गांधीजींनी दिलेल्या खलिफा आंदोलनास दिलेला पाठिंबा आठवा. प्रश्न होता तुर्कस्थान मधला आणि इथले मुस्लिम लोकं ( ज्यांना त्या सगळ्याने काहीही फरक पडणार नव्हता ) पेटून उठली होती.. आणि गांधीजी सारख्या सेकुलर ( ठो.. ) माणसाने मुस्लिम लोकांनी भारतातील स्वातंत्र्य लढ्यात भाग घ्यावा किंवा त्यांचा पाठिंबा मिळावा म्हणून खिलाफत आंदोलन दिलेला पाठिंबा.. इस्राईल चा द्वेष भारतीय मुस्लिमांनी करण्याचे काय कारण?? इस्राईल भारतासाठी नेहमीच भरोश्याचा मित्र राहिला आहे मग इस्राईल चे नाव घेतल्यावर भारतीय मुस्लिमांना शिसारी येण्याचे कारण काय? रोहिंग्या मुस्लिमांना भारतात अवैध रित्या ठेवून घ्या म्हणण्याची प्रवृत्ती. इथले खाऊन, मोठे होऊन, ISIS साठी लढण्यासाठी इराक कडे जाणे. काय च्या काय लॉजिक. अश्या प्रकारचे conflicts फक्त इस्लाम मानणाऱ्या लोकांमध्येच होतात. हेच लोकं माय पेक्षा मावशी आणि शेजारीण यांची जास्त काळजी करताना दिसतात. त्यामध्ये अशिक्षित, सुशिक्षित, श्रीमंत, गरीब असं काहीच नाहीये.. अपवाद आहेत पण फारच कमी आहेत. ह्या गोष्टी बरेचसे लोकं दुर्लक्ष करतात का तर म्हणे हे सगळे नेत्यांनी किंवा राजकारण्यांनी चालवलेल्या गोष्टी आहेत. पण हे इतके सोपे नाही. थोडा जनसंपर्क वाढवा. गुळगुळीत आणि गोड गोड वाक्यांनी टाळ्या मिळतात, वस्तुस्थिती झाकली जात नसते.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 10/15/2020 - 15:57 नवीन
आणि कसले हिंदू मुस्लिम,दलित,ब्राह्मण करत बसलाय. देशाची अर्थ व्यवस्था गाळात गेली आहे प्रशासन काय लायकीचे आहे ते सांगण्याची गरज नाही. न्याय व्यवस्था चा दर्जा खालावत चालला आहे तिथे न्याय मिळेल ह्याची खात्री नाही. न्यायाधीश पण पण कायद्या ला फाट्यावर मारून स्वतःची मत वापरून न्यायदान करत आहेत. जगातील सर्वात जास्त गरीब भारतात राहतात. ही स्थिती पाहिली सुधारणे गरजेचे आहे. हिंदू ,मुस्लिम,दलित,अमका ह्या असल्या फालतू गोष्टीत ताकत वाया घालवण्यात काही अर्थ नाही.
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू गुरुवार, 10/15/2020 - 16:26 नवीन
अराजक?? बाप रे?? ते आणि कधीपासून माजलेय? गेल्या 4-5 वर्ष्यापासून का?? बाकी प्रश्नाला आणि प्रॅक्टिकल मुद्द्यांना छान बगल देता तुम्ही.. बॉडी मध्ये कँसर डेव्हलोप होत असताना सर्दी खोकला आणि डोकेदुखी कडे लक्ष देण्यासारखं झाले.. कँसर चा पहिल्यांदा काही डायरेक्ट त्रास होत नाही त्यामुळे त्याच्यासमोर इतर दुखणी मोठी मानून त्यांच्यात गुंग होऊन जाणे सोपे आहे.. पण नंतर पुढच्या स्टेज ला गेल्यावर कँसर एकतर अवयव तरी घेऊन जातो किंवा संपूर्ण शरीर (जीव ) असो चालुद्या..
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 10/15/2020 - 17:12 नवीन
एकच धर्म असलेली राष्ट्र फक्त उन्माद मुळे बुडाली. त्याचे सर्वात ठळक उदाहरण पाकिस्तान. मुस्लिम राष्ट्र आज त्यांची काय अवस्था आहे. उर्दू भाषिक मुस्लिम,हिंदी भाषिक मुस्लिम, बांगला भाषिक मुस्लिम ह्या उन्माद मध्ये देशोधडीला लागले . आफ्रिकेतील अनेक राष्ट्र एक धर्मीय आहेत . बुडाली ती लोकांची अवस्था खराब आहे. केनिया ,येमेन ETC. UAE मुस्लिम राष्ट्र पण धर्म घरात ठेवला आज श्रीमंत आहेत. Abhganisthan एक धर्मीय मुस्लिम राष्ट्र आहे काय आहे त्यांची अवस्था. भारताने ह्या मार्गाने जावू नये. फक्त राज्य घटनेणी सांगितल्या प्रमाणे तंतोतंत राज्य कारभार करावा. आणि फक्त प्रगती करावी. कायद्याचे च राज्य असावे.
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू गुरुवार, 10/15/2020 - 17:52 नवीन
पूर्ण घासून गुळगुळीत झालेलं आणि अभ्यास न करता केलेलं वाक्य.. अमेरिका, चीन, रशिया, ओमान, सौदी, इस्राईल, जपान, कोरिया, इंग्लंड ही राष्ट्रे पण एकधर्मीय च आहेत. वरवर सेकुलर असली तरीही एकाच धर्माचे अधिपत्य आहे.. पण तरीही विकसित आहेत.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Fri, 10/16/2020 - 03:57 नवीन
जरा बदलू का? कट्टर मुस्लिम राष्ट्रे बुडाली आहेत. आणि याचे कारण पण सांगू? माझ्यामते त्याचे मुख्य कारण लोकसंख्या विस्फोट आणि साधनसामग्री ची उपलब्धता, आणि सोबत लष्करी भ्रष्टयाचार हे आहे. उद्या हिंदू की कितीही कट्टर झाला घरी तो स्वसंरक्षणासाठी होणार, त्यामुळे राष्ट्र बुडायची काळजी नको.. मी तर म्हणतो भीती वाटतेय ना, मग ते सिव्हिल वॉर एकदा होऊनच जाऊदे.. तसेही मारेल मारेल म्हणून भीतीने जगण्यापेक्षा एकदाच मेलेलं परवडेल आता. अवांतर- वयाच्या 17व्या वर्षापर्यंत मी पण निधर्मांध होतो, पण कॉलेजमध्ये वर्गातल्या मुसलमान मुलांनी माझे डोळे उघडले. त्यानंतर मी हिंदुत्ववादी आणि संघी झालो..
  • Log in or register to post comments
G
Gk Fri, 10/16/2020 - 04:05 नवीन
काय उजेड पडला ?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 10/16/2020 - 06:25 नवीन
तुमच्या डोक्यात अंधार आहे, त्याचं काय करायचं? हजारो वर्षे बाह्य आक्रमणे का झाली? कारण हिंदू भारत समृद्ध होता.
  • Log in or register to post comments
G
Gk Fri, 10/16/2020 - 09:34 नवीन
10000 वर्षे हिंदू राष्ट्र होते , आमचे खापर पणजोबा संपन्न होते तर आमचे रक्षण करणे हे त्यावेळच्या हिंदू राज्यकर्त्यांचे कर्तव्य होते , ते त्यांना नाही जमले तर मी काय बाबराला दोष देत फिरायचे ?
  • Log in or register to post comments
स
सॅगी Fri, 10/16/2020 - 10:02 नवीन
आक्रमण केले ते केले, वर हिंदुंच्या कत्तली केल्या, प्रार्थनास्थळे पाडली, जबरदस्ती धर्मांतर घडवले, तर दोष नाही द्यायचा तर काय गझला गायच्या त्यांच्या नावाच्या?
  • Log in or register to post comments
G
Gk Fri, 10/16/2020 - 10:17 नवीन
त्याच्या आधी एक हिंदू राजा दुसऱ्या हिंदू राजावर आक्रमण करत होता, तेंव्हा कत्तली होत नव्हत्या , बायका पळवत नव्हते ? पिकाची नासधूस , घराची पडझड होत नव्हती ?
  • Log in or register to post comments
स
सॅगी Fri, 10/16/2020 - 10:22 नवीन
कोणी अडवलंय??
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Fri, 10/16/2020 - 15:04 नवीन
त्याच्या आधी एक हिंदू राजा दुसऱ्या हिंदू राजावर आक्रमण करत होता, तेंव्हा कत्तली होत नव्हत्या , बायका पळवत नव्हते ? पिकाची नासधूस , घराची पडझड होत नव्हती ?
त्याच्या आधि मुख्यत्वे राजे/सैन्य लेव्हलला कापाकापी व्हायची. सामान्य जनतेला फार काहि त्रास व्हायचा नाहि.
  • Log in or register to post comments
G
Gk Fri, 10/16/2020 - 15:14 नवीन
युद्धाचे दुसपरिणाम तर जनतेवरही होणारच की , तसेही राजाकडे चौकीदार होणे ह्यापलीकडे धडधाकट पोरांना दुसरा कोणता जॉब होता ? दोन चार दुकानदार , 12 बलुतेदार आणि दोन चार शेतकरी उरलेले सगळे अशी ना तशी राजाचीच चाकरी करत होते . 15 ऑगस्ट 1947 ला हिंदू मुसलमान ख्रिसचन सगळ्याच राजा राणींचे लोकशाहीने मढे उठवले आहे , आता मुलांना भूगोल 50 मार्क , नागरिक शास्त्र 40 मार्क आणि इतिहास 10 मार्क ठेवायला हवा
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Fri, 10/16/2020 - 15:27 नवीन
युद्धानंतर जनसामान्यांच्या मुंडक्यांचे मिनार उभारणे, सैन्याने धर्माज्ञेने जनतेची लुटालुट करणे, ग्रंथालयं/विद्यापिठं उद्धस्त करणे, धार्मीक स्थळांचा / कलाकृतींचा विध्वंस करणे... असले प्रकार फारसे नव्हते... अपवादाने होतही असतील. असु द्या. तसंही हा भाग समजुन घेण्याचा नसुन समजुन घेतेलेले पण मान्य न करण्याचा आहे.
15 ऑगस्ट 1947 ला हिंदू मुसलमान ख्रिसचन सगळ्याच राजा राणींचे लोकशाहीने मढे उठवले आहे , आता मुलांना भूगोल 50 मार्क , नागरिक शास्त्र 40 मार्क आणि इतिहास 10 मार्क ठेवायला हवा
बरोबर. आणि तो १० मार्कांचा इतिहास कम्युनीस्ट मंडळींनीच शिकवावा, असाही नियम करायला हवा.
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Fri, 10/16/2020 - 07:43 नवीन
एक हजार वर्षे हिंदू राष्ट्रच होते कि.. काय उजेड पडला.
सांगतो ना.. अफगाणिस्तान गेला, ब्रम्हदेश गेला, तिबेट गेला, पाकिस्तान गेला, बांगलादेश गेला, काश्मीर गेले.. आणि आता जी चिटोरी राहिल्ये त्याला देखील आम्ही भारत म्हणतो.. हिंदुराष्ट्र नव्हे.. हाच उजेड पडला. आमच्या आजवरच्या सहिष्णू पणाचा नेमका हाच उजेड पडला. आजही फेक्युलर पणाचा चष्मा इथे अनेक लोकं लावून बसल्येत.. असच चालू राहील तर अजुन काही शे वर्षांनी जेवढा तुकडा राहिलाय तेवढाही राहणार नाही. इस्लामिक लोकांनी भारत सोडावा, किंवा त्यांना हाकलावे असे मला मुळीच म्हणायचं नाही. पण समोर एका विशिष्ट वर्गात नालायक आणि कृतघ्न प्रवृत्ती वाढत असताना त्याकडे दुर्लक्ष करून फेक्युलॅरिज्म चा चष्मा लावून निवांत बसणे मला पटत नाही. जे चूक आहे ते आहे ते बोलण्यात कसली लाज..
  • Log in or register to post comments
G
Gk Fri, 10/16/2020 - 10:21 नवीन
मुसलमानांनी अफगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेश नेले नेपाळ , भूतान , तिबेट , ब्रह्मदेश , श्रीलंका , थायलंड , इंडोनेशिया , मालदीव हे तुकडे तुमचे तुम्हीच पाडून घेतलेत.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 10/16/2020 - 14:13 नवीन
ते जपलच पाहिजे आपले अस्तित्वच हिंदू धर्माशी निगडित आहे . हिंदू धर्म वाचला तरच आपण वाचू. मग त्या साठी हिंदू सर्व क्षेत्रात बलवान झाला पाहिजे. पण तसे घडत आहे का राजकीय पक्ष तसा प्रयत्न करत आहेत का. मीडिया तसा प्रयत्न करत आहे का. तर नाही असे दुःख नी म्हणवसे वाटते. हिंदू ना हात धयाचे सोडून त्यांचे खच्चीकरण कोण पर धर्मीय करत नाहीत. शेतकरी,कामगार,गरीब वर्ग हे हिंदू नाहीत का. मग त्यांच्या गरिबी विरूद्ध लढणे हे धर्म बलवान करण्याचा मार्ग नाही का. फक्त त्यांची डोकी भडकावून दंगलीत किन
  • Log in or register to post comments
G
Gk गुरुवार, 10/15/2020 - 19:13 नवीन
खलिफा आंदोलनास मुसलमानानि पाठिंबा दिला किंवा कुठेतरी चर्चने दुसऱ्या देशातील ख्रिषणास मदत केली तर तुम्हाला का वाईट वाटते ? तुम्हाला वाईट वाटते कारण तुम्ही जगात एकटेच आहात , दुसरी हिंदू राष्ट्रे जगात नाहीत.
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Fri, 10/16/2020 - 07:53 नवीन
कोण म्हणाले कि जगात इतरत्र हिंदू लोकं नाहीत?? हा संस्काराचा फरक आहे, हिंदू लोकं जिथे जातात तिथे समरस होऊन जातात. त्या मातीशी एकनिष्ठ राहतात. मन एकीकडे आणि शरीर एकीकडे असे नाही. नेपाळ मध्ये हिंदू आहेत पण तिथले नेमके राजकारण, राज्यकर्ते, राहणीमान, अडचणी याबाबत भारतीय हिंदू कधी टेन्शन घेत नाही. पण भारतात राहणारा अर्धशिक्षित मुसलमान सौदी, ओमान, इराक , इराण, पॅलेस्टिन इ इ बद्दल जास्त विचार करत बसतो. प्रसंगी तिकडच्या जातभाईंच्या हितासाठी मातृभूमी वरील संकटे, प्रश्न आणि जबाबदाऱ्या यांना बगल देतो. आपण इथे उपरे आहोत आपले मूळ कुठेतरी वाळवंटात निर्माण झालेल्या संस्कृतीत आहे हे अगदी लहान सहन गोष्टीतून दाखवून देण्याचा प्रयत्न करतो. ( इडेन्टिटी क्रायसिस ). या असल्या थिल्लरपणामुळंच खिलाफत चळवळ उभी राहिली ज्याचा भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी काही एक संबंध नव्हता. त्यामुळे महात्मा ( :D ) गांधींनी फक्त आपला फेक्युलर पणा दाखवण्याच्या नादात मुस्लिमांना याबाबत समर्थन दिले..
  • Log in or register to post comments
G
Gk Fri, 10/16/2020 - 09:32 नवीन
कायच्या काय खिलाफतला पाठिंबा दिला म्हणजे इथे कुणाचा खून केला की काय ? मीही तेच लिहिले की बाहेर तुमचे फारसे कुणी नाही , दुसरे हिंदू राष्ट्र नाही , त्यामुळे तुम्हाला दुसऱ्या कुणाशी देणे घेणे नाही मुस्लिम , ख्रिश्चन जगात 30 व 35 % आहेत , त्यामुळे इंटर एक्शन होणे स्वाभाविक आहे देशद्रोही इंटर एक्शन असतील तर ते देशाचे गृह , संरक्षण खाते , मोदी , शहा घेतात बघून आणि ती खिलाफत , तो खलिफा , गांधी सगळे कधीच वर निघून गेलेत
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 10/16/2020 - 15:35 नवीन
इतिहासात अतिरिक्त गुण ( grace marks) देऊन पास केलंय का तुम्हाला? खिलाफत आणि मोपल्यांचं बंड वाचलं नाही का? https://www.oocities.org/hindoo_humanist/mopla.html https://www.rediff.com/news/2003/may/09rajeev.htm
  • Log in or register to post comments
G
Gk Fri, 10/16/2020 - 17:29 नवीन
https://www.news18.com/news/india/yogi-govt-allocates-rs-479-crore-for-madrasas-in-biggest-state-budget-till-date-2505271.html योगीजिनी मदर्शयाना 500 कोटी दिले , 2020-21 साठी हे काय इतिहासाचे होनररी स्टुडंट होते वाटतं
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 10/17/2020 - 07:59 नवीन
a provision of Rs 459 crore was made for

modernisation

of Arabic-Persian madrasas. ते अलिफ बे ते से करण्यासाठी नव्हे तर आधुनिक शिक्षणासाठी दिले आहेत. दिले तरी नाराज, नाही दिले तरी नाराज रडक्या लोकांचे आयुष्य च रडारड करण्यात्त जातंय
  • Log in or register to post comments
न
निनाद Fri, 10/16/2020 - 00:23 नवीन
हे ऐका - सबव्हर्जन कसे केले जाते त्याचे व्यवस्थित विवेचन व्हिडियो मोठा आहे पण कोणत्याही मिडियाच्या अभ्यासकासाठी अतिशय महत्त्वाचा आहे.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 10/15/2020 - 13:24 नवीन
पेड पत्रकर अणि त्यांच्या समर्थकांना नाव ना घेता झोम्बले यातच लेखाचा हेतू साध्य झालाय. आता भक्त मंडळी चिखल फेक करणार , मूळ मुद्दा बाजूला टकणार, गँग अप करणार डु आय डी ने प्रतिसाद देणे चालू केले आहे. @एस.बी-- हाही अनुभव घेउन बघा , बाकी लेख आवडला .
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 10/15/2020 - 14:01 नवीन
झोबले? छे उलट .. तुमच्यासारख्या विचारसरणीचा भंपक पणा दाखवून दिला.. एवढेच हा आता बसा तुम्ही ओरडत गॅंग अप वगैरे
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 10/15/2020 - 18:22 नवीन
निनाद कि चौकस२१२ ? ह भंपाक , दांभिक पणा झाला कि मग बोलू , तोवर तुमची पातळी नाही, या आता !
  • Log in or register to post comments
न
निनाद गुरुवार, 10/15/2020 - 23:56 नवीन
मला बोलावलेत? मी काय दांभिकपणा केला आहे? मी तर संदर्भासहीत दुवे दिले आहेत. अर्थात ते वाचले नसावेत असे वाटते. मित्रोखिन प्रकरण वाचले असते असते मेमुना बेगम (केजीबी कोड नेम वानो) यांना नोटांच्या सुटकेसेस कश्या पोहोचवल्या जात आणि तेव्हा मिडिया कसा विकला गेलेला होता ते ही कळेल. डिस-इन्फॉर्मेशन वापरून भारतीय जनतेला मूर्ख बनवले याणी वर्षानुवर्षे. हा भंपकपणा होता. आता त्याचे बुरखे फाटले म्हणून रडारड आहे. आज लिबरलांनी काहीहे खोटेपणा केला की तो उघडा पाडणारे लोक युट्युबर आहेत. आणि एक नाही अनेक आहेत. शाम शर्मा शो पाहा
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू गुरुवार, 10/15/2020 - 14:50 नवीन
पेड पत्रकर अणि त्यांच्या समर्थकांना नाव ना घेता झोम्बले यातच लेखाचा हेतू साध्य झालाय
. कपिलमुनी तुमच्या प्रतिसादाकडे पाहून असं वाटतेय कि हे सगळं गेल्या काही वर्षात सुरु झालेय.. परंतु हे लक्षात घ्या हे वर्षानुवर्षे चालू आहे, आणि लेखकाने त्या सगळ्यांच्या बाबत हा लेख लिहिलाय. ... लेखकाने कुठेही अमुक एक व्यक्ती, विचारसरणी यांना टार्गेट केलेलं नाहीये. खरं सांगायचं तर हे वर्षानुवर्षे चालू आहे मग सत्ता कोणाचीही असो. आपल्या मुलाच्या खोड्या आपल्याला लवकर दिसणार नाहीत त्यासाठी तटस्थ विचार करायला हवा.
आता भक्त मंडळी चिखल फेक करणार , मूळ मुद्दा बाजूला टकणार, गँग अप करणार
भक्त म्हणजे कोण? कोणाचे भक्त? स्पष्ट बोला कि. सध्या भक्त म्हणल्यावर भाजपेयी किंवा मोदी समर्थक असे समजले जाते. मग तुम्हालाही तो अर्थ अपेक्षित असेल तर सर्व नॉन भाजपेयी लोकं हे अत्यंत निष्पक्ष तटस्थ, चिखलफेक न करणारे, आणि मेन म्हणजे पेड पत्रकारितेला समर्थन न करणारे आहेत किंवा होते असं म्हणायचंय का?? बिगर bjp सरकार मध्ये सर्व पत्रकारिता आदर्श रित्या चालू होती असं म्हणायचं आहे का??
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 10/15/2020 - 15:27 नवीन
दुखण काय आहे ? मि किंवा लेखात कोणीही कसलेहि नाव घेतले नाही . उगाच उडणारा बाण ......... धन्यवाद
  • Log in or register to post comments
न
निनाद गुरुवार, 10/15/2020 - 23:58 नवीन
एकेटिके पाहा चांगली उतरवतात हे लोक.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 10/15/2020 - 17:36 नवीन
हिंदू चे भले आणि रक्षण हिंदुत्व वादी पक्ष bjp करेल असा कोणाचा भ्रम असेल तर तो पहिला डोक्यातून काढून टाका. हिंदू ना आर्थिक बाबतीत कमजोर हिंदुत्व वादी म्हणणारे उद्योगपती आणि त्यांची लाडकी bjp च करत आहे. हिंदू चे आर्थिक शोषण हिंदू च करत आहेत कमजोर हिंदू वर अन्याय ,अत्याचार हिंदू च करत आहेत. शेतकऱ्यांच,,कामगारांचं शोषण मुस्लिम करत नाहीत हिंदू च करत आहेत. राज सत्तेच्या जोरावर. हे सत्य नाकारणे मला तरी शक्य नाहीं
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू गुरुवार, 10/15/2020 - 17:55 नवीन
कोण म्हणतेय कि हिंदू चें रक्षण BJP करेल म्हणून?? गेले हजारो वर्षे BJP होती का?? तोदेखील इतर राजकीय पक्षासारखा पक्ष आहे.. त्यामुळे नो कामनेट्स..!! प्रश्न मानसिकतेचा आहे. समोर दिसणारे सत्य एक नाकारणे आणि फेक्युलरज्म चा चष्मा लावून निवांत बसणे हे षंढ आहे. निदान सर्वांनी खरे बोलायचे धाडस दाखवले तरी खूप आहे..
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 19 hours ago
  • सुंदर !!
    1 day 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा