Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

बातम्यांचे विषारी गुलाबजाम

ए
एस.बी
Wed, 10/14/2020 - 13:46
🗣 161 प्रतिसाद
बातम्यांचे विषारी गुलाबजाम देणारे कोण आणि खाणारे कोण??? निषेध !! घोर निषेध!! आम्हीच न्याय मिळवून देणार!! हे सगळे चोर आहेत!! गोळ्या घालून उडवून द्या ह्यांना !! देशद्रोही आहेत!!...आमचा आवाज सत्याचा आवाज...आमचं भाषण स्वातंत्र्याची गळचेपी करणारे हेच...ह्यांच्या वर बहिष्कार घाला! अशा कानठळ्या बसवणाऱ्या आरोळ्या रोज रात्री घराघराच्या बैठकीच्या खोलीत घुमताना दिसतात..आणि आई बाप लेकरे म्हातारे सर्व एका धुंदीत होऊन ," बरोबर आहे!! बरोबर आहे!! द्या त्यांना शिक्षा !! " असा आक्रोश करताना आढळत आहेत!.. चौकाचौकात गटबाजी होऊन वादविवादाचे फड रंगतात ...तावातावाने आरोप प्रत्यारोप केले जातात.. पुराव्याचा काय सवाल?? व्हॉट्सअँप आहे...फेसबुक आहे...तिथं सगळं खरं असतं असं म्हणून प्रत्येक जण आपला अंतरात्मा जो की मूलभूत समस्यांच्या विळख्यात अडकल्याने भयंकर धुसफूसलेला आहे त्याच्या रागाला एक वाट काढून देतोय बास्स!!!.... इतिहास सतत पुनरावृत्ती करतो असं म्हणतात...कारण मनुष्याची जात एवढी मुजोर आहे जी त्याच त्याच चुका परत करत राहते आणि मग परिणाम काय वेगळे होणार आहेत ?? जरा इतिहासात मागे जाऊयात ... ही गोष्ट आहे १८९८ साल ची.. अमेरिका आणि स्पेन मधल्या युद्धाची ,जे की क्युबा या देशात घडले आणि मुळात पाहता प्रश्न होता सरळसरळ स्पेन आणि क्युबा मधला आंतरिक..म्हणजे स्पेन ने क्युबा वर साम्राज्य स्थापन केले होते..आणि क्युबन लोकांना एक ठराविक कालावधी नंतर ते जुलमी वाटू लागले..आणि साहजिक त्यांनी क्रांती,आंदोलने,वगैरे वगैरे उद्योग सुरू केले...अगदी आपल्यासारखेच...काही अहिंसक तर काही हिंसक ... आता हे सर्व उद्योग आणि त्याबद्दल वार्तांकन करायला अमेरिकन माध्यमे आपले आपले प्रतिनिधी क्युबा मध्ये पाठवत होती. आणि सर्व काही सुरळीत चाललं होत..म्हणजे क्युबा चे लोक क्रांती करत होते...अमेरिकन लोक त्याच्या बातम्या जगात दाखवत होते...स्पेन आपली बाजू मांडत होते की क्रांती करणारे लोकांचे गट मर्यादित आहेत...सर्वसामान्य क्युबन जनता त्यांचे समर्थन करत नाही वगैरे वगैरे..! मग आता प्रश्न पडतो की जर हे वादविवाद स्पेन आणि क्युबा मधले होते तर मग ह्या अमेरिकन बातमीदारी चे काय बिनसलं की बुवा अमेरिकेच्या शासनाने स्पेन बरोबर युद्ध पुकारले आणि क्युबाला स्वतंत्र करण्याचे पवित्र पुण्य कार्य आपल्या डोक्यावर घेतले??... तर त्याचे दोन आयाम आहेत पहिला म्हणजे अमेरिका आणि क्युबाचा असणारा साखर व्यापार ( जो की मोठ्या प्रमाणावर खासगी उद्योगपतींची मक्तेदारी होता ज्यात मोठ्या प्रमाणावर तत्कालीन विरोधी पक्ष तसेच सत्ताधारी पक्षाची चमचे मंडळी दाटीवाटी करून मोक्याच्या जागा अडवून बसली होती!) आणि दुसरा म्हणजे दोन अमेरिकन वृत्तपत्र समूह मधला आपापले गिऱ्हाईक वाढवण्यासाठी असणारी स्पर्धा... ( बघा कुठे काही सुत जुळते आहे का सध्या आपल्या आजूबाजूला उसळलेल्या गोंधळात आणि ह्या १८९८ च्या माथेफिरू मध्ये!!!) साखर सम्राटांनी अशी धारणा किंवा नियोजन करून घेतले होते की जर क्युबा स्पेन कडून मुक्त होण्यात आपला देश अग्रभागी राहिला तर पुढे भविष्यात आपल्या व्यवसायासाठी मोठे कुरण लाभेल.. आणि वृत्तपत्र समूहाचे बोलायचे झाले तर ती आघाडीची वृत्तपत्रं होती १)न्यूयॉर्क जर्नल - विल्यम हर्श्ट २) न्यूयॉर्क जर्नल वर्ल्ड - जोसेफ पुलित्झर ( हे तेच पुलित्झर बाबा आहेत ज्यांच्या नावाने पुरस्कार दिले जातात...काळाचा महिमा अगाध आहे!!) ह्या दोघांचे पण एकमेकांसोबत वाचक वर्ग मिळवण्यासाठी प्रचंड स्पर्धा होती.त्या स्पर्धेला तोंड फुटले ते "येलो किड" नावाच्या व्यंगचित्र स्तंभ लेखनावरून जो की पहिल्यांदा पुलित्झर यांच्या वर्तमानपत्र मध्ये प्रसिद्ध होत असे पण त्याचा व्यंगचित्रकार हर्श्ट यांच्या वर्तमानपत्र समूहाने सौदेबाजी करून पळवला आणि आपल्या वर्तमानपत्र मध्ये तो स्तंभ त्याच नावाने सुरू केला...झालं!! पुलित्झर साहेबांच्या नाकाला मिरच्या झोंबल्याना राव!! त्या काळी पेटंट , निकोप स्पर्धा कायदे असले काय प्रकार नसल्याने पैसा फेको तमाशा देखो असा राजरोस कार्यक्रम होता..त्यामुळे पुलित्झर समूहाने ही नवा चित्रकार पैसे देऊन उभा केला आणि त्याचं पण स्तंभ लेखन त्याच येलो किड नावाने सुरू राहिले आणि मुहूर्तमेढ रोवली गेली एका व्यापारी स्पर्धेची ज्याची अखेर झाली ३ देशांच्या युद्धामध्ये ,अनेक निर्दोष सैनिकांच्या बळी मध्ये!!,स्थानिक नागरिकांच्या युद्ध समर्थक आणि युद्धाला विरोध असणाऱ्या गटांच्या दंगली मध्ये!! आणि अमेरिकेच्या हाती काय लागलं तर.. क्युबाची तात्पुरती मालकी आणि अमेरिकेला स्पेन ला द्यावी लागली युद्ध भरपाई रक्कम म्हणून २० दशलक्ष डॉलर्स द्यावे लागले जे की सध्याच्या काळातील ६१० दशलक्ष डॉलर्स एवढे!! ( ६१० गुणिले १० लाख = आलेल्या उत्तराला ७० रू ने गुणून घ्या म्हणजे जे काय भारतीय रक्कम येईल ना त्यात नेमके किती शून्य असतात ते मला पण सांगा!!! शिंचे हे गणित फार द्वाड अस्तय राव!!) आता हे दोन माध्यमे आणि त्यांचे मालक यांनी नेमके युद्ध कसे पेटवले ते बघुयात.. वरती सांगितल्याप्रमाणे स्पर्धा सुरू होती आणि प्रत्येक माध्यम समूह जास्तीत जास्त वाचक गोळा करू पाहत होता..आणि त्यासाठी त्यांनी आपापल्या युद्धाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारावर दबाव टाकायला सुरुवात केली की ," आम्हाला बातम्या द्या ...चमचमीत बातम्या द्या...अशा बातम्या द्या की ज्या दाखवतील की स्पेन कसे क्युबा मध्ये अत्याचार करत आहे!.." ह्या बद्दल ची हर्श्ट यांच्या पत्रकाराने त्यांना पाठवलेला एक तार संदेश युद्धानंतर प्रसिद्ध झाला .. त्यात तो पत्रकार म्हणतो की ," इकडे सर्व शांत आहे..इथे काही युद्ध होऊ शकत नाही..थोडे स्थानिक परकीय वाद आहेत पण त्यामुळे युद्ध नाही होऊ शकत..मला कृपया अमेरिकेत परत बोलवून घ्या !" त्या वर हर्श्ट यांचं उलट तार उत्तर असं होतं," तू आहे तिथेच रहा..फक्त फोटोज् पाठवत रहा...तू क्युबावरून मला फोटो पाठव...मी तुला अमेरिकेकडून युद्ध पाठवतो!!!" केवढा हा दुर्दम्य आत्मविश्वास आणि दूरदृष्टी!!!! आणि त्यांनी बोलेल तसेच केले आणि अमेरिकेकडून युद्ध क्युबा मध्ये निर्यात करायला एकाहून एक सनसनीखेज प्रकरणे प्रसिद्ध करायला सुरुवात केली!! त्यातल पहिलं प्रकरण म्हणजे क्लेमेन्सिया अरांगो ह्या क्युबन महिलेची ओलिवेट ह्या अमेरिकन प्रवासी जहाजावर स्पॅनिश अधिकाऱ्यांनी घेतलेली अंगझडती चे प्रकरण! ह्या प्रकरणात ही क्युबन महिला अमेरिकन जहाजावरुन प्रवास करत असताना तिच्याकडे क्रांती संबंधित सामग्री असल्याचा संशय घेऊन स्पॅनिश अधिकाऱ्यांनी तिची झडती घेतली होती पण ह्या प्रकरणाचे वार्तांकन खालील प्रमाणे अमेरिकन माध्यमात करण्यात आले होते... "आपल्या देशाचा झेंडा एका महिलेची अब्रू वाचवू शकतो ? " "अमेरिकन जहाजावर स्पॅनिश अधिकाऱ्यांनी महिलेचा विनयभंग केला" "आपल्या देशाच्या झेंड्याच्या नजरेत असून सुद्धा कोवळ्या तरुणीचे कपडे उतरवतात स्पॅनिश अधिकारी!!!" आणि पुढे ह्यामुळे स्थानिक अमेरिकन महिलावर्ग बिथरला आणि सरकार कडे सतत क्युबा स्पेन मध्ये हस्तक्षेप करण्यासाठी आग्रह करू लागला...तत्कालीन विरोधी पक्षांनी पण पोळ्या भाजायला सुरुवात केली.. पण हा बुडबुडा लगेच फुटला कारण नंतर क्लेमेन्सिया अरांगो हिने स्वतः पुढे येऊन जबाब दिला की तिची झडती महिला अधिकारी घेतली होती आणि कोणता ही गैरप्रकार झाला नव्हता...पण तोपर्यंत उशीर झाला होता..स्पॅनिश अधिकारी हे महिलांसोबत गैरवर्तन करतात हे बीज जनतेमध्ये पक्के रुजले होते..त्यामुळे ही बाई खोटे बोलत असणार ...हिला स्पेन ने पैसे दिले...ही पण गद्दार आहे वगैरे वगैरे गरळ ओकणे सुरूच राहिलं!! नंतर या युद्ध ज्वराला फोडणी मिळाली ती म्हणजे डॉक्टर रिकार्डो रुईझ यांच्या क्युबा मधल्या तुरुंगात झालेल्या मृत्यूची! हे डॉक्टर शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत आले होते ..इकडे आल्यावर त्यांनी शिक्षण घेतले तसेच आपल्याकडे जसे एन आर आई चे आकर्षण असते तसेच अमेरिकन नागरिकत्वाचे आकर्षण त्यांनाही होते आणि त्यातून त्यांनी अमेरिकन नागरिकत्व पण मिळवले आणि नंतर ते स्वखुशीने क्युबा मध्ये परतले ..तिकडे परदेशी शिकून आलेले डॉक्टर म्हणून त्यांचा व्यवसाय ही उत्तम चालू होता आणि कुटुंब ही सुखी होते..पण त्यांनी स्थानिक क्युबा क्रांती मध्ये भाग घेतला आणि त्यात त्यांना अटक झाली..आणि तुरुंगात त्यांचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला. आणि मग ह्याचा फायदा अमेरिकन वृत्तपत्रांनी घ्यायला सुरुवात केली.. कोणत्या ही तटस्थ ,निष्पक्ष चौकशीची मागणी न करता..कोणते ही पुरावे सादर न करता...राजरोस युद्धाचा आग्रह करणाऱ्या बातम्या रोज छापल्या जाऊ लागल्या.. नमुना काही असा असायचा बघा... "हे खरे आहे की स्पेनच्या लोकांनी रुईझची त्याच्या क्यूबाच्या तुरूंगात हत्या केली, आपला राष्ट्रीय स्वाभिमान, तसेच राष्ट्रीय सन्मान, आपल्याकडे मागणी करतात की आपण स्पेनविरूद्ध लढा घोषित करावा .... युद्ध ही एक भयानक गोष्ट आहे, परंतु त्याहीपेक्षा आणखी भयानक गोष्टी आहे ती म्हणजे आपला राष्ट्रीय अपमान!. रुईजच्या मृत्यूसंदर्भातील सत्य जे सांगितले गेले त्याप्रमाणेच आहे यात शंका घेण्याचे कोणतेही कारण नाही. ... आता जनतेच्या भावना सूड उगवतील. आणि यावेळी लोकभावनेचे वर्चस्व राहील. " (New York World, 21 February 1897 and New York Journal, 22 February 1897) झालं मग जो तो एकच बरळू लागला बस... आता खूप झालं...स्पेन ला धडा शिकवायला हवा...त्यांना इंगा दाखवू आपण...अमेरिकेशी पंगा घेतला ना की काय होत ते समजेल आता त्यांना...अशा आरोळ्या चोहोबाजूंनी निनाद करू लागल्या!... आणि पुढे काय मग इंग्रजी मध्ये एक म्हण आहे बघा third time is the charm!!! म्हणजे तिसऱ्या प्रयत्नात यश हमखास !! आणि इथे पेपरवाले जिंकले कारण दैव त्यांचं बलवत्तर होत आणि त्यांना त्यांचं ब्रह्मास्त्र मिळवून देणारा प्रसंग घडला तो म्हणजे हवाना ह्या क्युबा च्या बंदरात Uss maine या अमेरिकी युद्ध नौकेला झालेला अपघात जो की समुद्री mines चा स्फोट मुळे झाला आणि त्यात ती युद्ध नौका बुडाली आणि जवळपास २००-३०० अमेरिकी नागरिकांना जलसमाधी प्राप्त झाली.. पुन्हा एकदा वृत्तपत्रे पेटली आणि मग काय.. " remember the maine !! to hell with the spain!!" " $ 50,000 price for the people who can punish spanish criminals!!!" " punishment to spain for the USS maine!!" अशा मथळ्याखाली रोज जनप्रक्षोभ भडकवनाऱ्या बातम्या छापल्या गेल्या!!!... या अपघाताची सखोल चौकशी न करताच वृत्तपत्रांनी निकाल लावून दिला की हा हल्ला स्पेन ने केला आहे आणि त्यांनीच समुद्री mines लावून आपली युद्धनौका बुडविली... पण तत्कालीन नौदल अधिकाऱ्यांचे एक मत असे ही होते की uss maine चा तळभाग मध्ये मोठ्या प्रमाणावर bituminus प्रतीचा कोळसा साठवून ठेवण्यात आला होता जो की fire dampening प्रक्रिये मधून स्फोटक वायूंची निर्मिती करत राहतो..आणि मग असे वायूचे कोठार कधी पण वाढत्या तापमानाला पेट घेऊ शकते... पण ऐकणार कोण...स्पेन सोबत युद्ध करायचे आहे...! स्पेन चा अत्याचार पेपर मध्ये छापायचा आहे...मग असल्या थातुर मातुर वैज्ञानिक शक्यतेला काय भाव द्यायचा आहे...?? त्या पेक्षा तत्कालीन सर्व वृत्तपत्रांनी स्पेन विरोधी आघाडी उघडली...आणि त्यात" आम्हाला अमेरिकी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांकडून विश्वसनीय बातमी मिळाली आहे की सदर हल्ला कसा स्पेन ने आखला होता..त्यांनी कसा आपल्या युद्धनौकेचा अभ्यास केला....स्फोटके कुठून मिळवली...ती तिथे कशी पेरून ठेवली याच्या सुरस कथा छापायला सुरुवात केली!!" या सर्वाचा परिणाम एकच झाला की तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष यांना आपल्या सार्वभौम सभागृहामध्ये युद्धाचा अधिकृत प्रस्ताव परित करून घ्यावा लागला आणि एप्रिल १८९८- ऑगस्ट १८९८ असे ३ महिने चाललेले युद्धाचा प्रारंभ झाला!!!! आता त्या युद्धात अमेरिका जिंकली...स्पेन हरला...क्युबा स्वतंत्र झाला...वगैरे वगैरे गोड गुलाबी ऐतिहासिक गैरसमजुती चे गुलाबजाम आजही अनेक इतिहासकार मिटक्या मारत खाताना आढळतील...तुम्हाला पण आग्रह करतील की चाखून तरी बघा ...किती गोड आणि स्वादिष्ट आहेत !! पण हे गुलाबजाम विषारी आहेत..त्यांची पाककृती ही एका विकृत व्यापारी मानसिकतेमधून तयार झाली आहे... त्याला बनवताना तप्त अशी धग तुमच्या आमच्या सारख्या मध्यमवर्गीय नागरिकांच्या संतापाची देण्यात आली होती!! सध्या तुमच्या आजूबाजूला अशाच अनेक विषारी मिठाई वाल्यांच्या चुलीवर कढई तापत ठेवलेल्या दिसतील... पण सांभाळ करा...वेळीच हे विष आवरणे तुमच्या आमच्या हातातच आहे... - शैलेश भोसले टीव्ही ला घाबरणारा एक सर्व सामान्य नागरिक

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 62337 views

🗣 चर्चा (161)
च
चौकस२१२ Fri, 10/16/2020 - 08:37 नवीन
प्रश्न मानसिकतेचा आहे +१०० बाप्पू पण ज्यांनी दुर्लक्ष करायचे ठरवलेच आहे त्यांना कितीही सांगून काय उपयोग... त्यांना हे हि समजत नाही कि भाजपला आता समर्थन देणारा किंवा संधी देऊया असे म्हणणारा प्रत्येक जण काही मनुवादी संघी असावं लागत नाही उद्या काँग्रेस ने चांगले काम केले तर त्यानं हि हि मत जाऊ शकतात .. सहज राजेश आणि एस बी सारख्यांना मी किती तरी उद्धरण दिली तरी त्यांना माझ्य सारखेच मुस्लिम द्वेष्टी वाटतात काय बोलायचे ! असो आपण आत्ता एक "टोळीतील" झालो असे इतर म्हणतील !
  • Log in or register to post comments
न
निनाद गुरुवार, 10/15/2020 - 23:59 नवीन
भाऊ तोरसेकर पाहा
  • Log in or register to post comments
G
Gk गुरुवार, 10/15/2020 - 18:15 नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh-news/former-lok-sabha-speaker-meira-kumars-facebook-account-blocked-congress-aggressive-msr-87-2302812/ माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांचे फेसबुक अकाउंट ब्लॉक झाले आहे. बिहार विधानसभा निवडणुक जवळ आलेली असताना, हा प्रकार घडल्याचं समोर आल्याने काँग्रेस देखील यावरून आक्रमक झाली आहे. शिवाय, मीरा कुमार यांनी स्वतः या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 10/15/2020 - 19:20 नवीन
कोणतेच पक्ष सत्तेवर नकोत लोकांच्या भावनेशी खेळून त्यांचे शोषण करणे हाच ह्या पक्षांचे उद्दिष्ट आहे. धार्मिक ,जातीय भावना भडकाून सत्ता मिळवणे हाच हेतू आहे.. लोकांचे भले करणे ,देशाची उन्नती करणे हा हेतू त्यांचा नक्कीच नाही
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 10/15/2020 - 19:54 नवीन
त्या पक्षांनी हिंदू ना आर्थिक बाबतीत मजबुत बनवावे. पण तसे घडत नाहीं म्हणजे हे हिंदू चे कैवारी ढोंगी आहेत. भारतात हिंदू बहुसंख्य आहे .भारत हा हिंदूचा एकमेव देश आहे मग ह्या देशातील भ्रष्टाचार,नष्ट करणे हे हिंदुत्व वादी पक्षाचे काम आहे . पण ते हे काम करत नाहीत. भारत हा हिंदू चा एकमेव देश आहे मग ह्या देशातील गरिबी,अन्याय पूर्ण पने नष्ट करण्याचे काम हिंदुत्व वादी पक्ष करत नाहीत. मग ते नक्की करतात काय. तर हिंदू नाच कमजोर करण्याचे काम हे कथित हिंदू वादी पक्ष करत आहेत.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 10/15/2020 - 21:30 नवीन
निनाद,
म्हणजे सगळे व्यापारी विकृत असतात?
लेखात असं कुठेही म्हंटल्याचं दिसून येत नाही. हा लेख छुपा लिबरल असल्याचं तुम्हाला का वाटतं, यामागील कारणमीमांसा जाणून घ्यायला आवडेल. बाकी, लेखकास 'विकृत व्यापारी वृत्ती' म्हणजे 'विधिनिषेध न बाळगता दिसेल त्याचा व्यापार करायची वृत्ती' अभिप्रेत असावी. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव गुरुवार, 10/15/2020 - 21:46 नवीन
सध्या तुमच्या आजूबाजूला अशाच अनेक विषारी मिठाई वाल्यांच्या चुलीवर कढई तापत ठेवलेल्या दिसतील... पण सांभाळ करा...वेळीच हे विष आवरणे तुमच्या आमच्या हातातच आहे...
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव गुरुवार, 10/15/2020 - 21:48 नवीन
तसं वाटत नाहि. किंबहुना भारतीय जनतेला चिनी आव्हान फार उशीराने दिसायला लागले आहे.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Fri, 10/16/2020 - 04:06 नवीन
सहमत आहे. गांपै थोडं विस्कटून सांगतो - 1. यांनी उदाहरण घेतले ते अमेरिकेतील, म्हणजे लिबरल देश.. भारतासारखाच. 2. संदर्भ होता तो युद्ध पेटवण्याचा 3. शेवट देताना उदाहरण दिले ते भारतीय राजकारणात विष पसरवणाऱ्यांचे, म्हणजे आक्रमक पत्रकारिता करणाऱ्यांचे.. त्यात पण शब्द आहे सध्या.. म्हणजे पूर्वी असे चालू नव्हते. आता, जतक, ndtv वगैरे प्रस्थापित चॅनेल्स आहेत, आणि त्यांची भाषा पण कायम मवाळ असते, युद्ध नको, परवडणारे नाही वगैरे. मग आक्रमक पत्रकारिता कोण करतोय? मिळालं उत्तर?
  • Log in or register to post comments
न
निनाद Fri, 10/16/2020 - 00:20 नवीन
विकृत व्यापारी मानसिकतेमधून तयार झाली आहे... असे लेखकाचेच वाक्य आहे माझे नाही. ते छुपे लिबरल असावेत अशी शंका आली कारण डोक्यात विरोध असला की असे वाक्य सहज सुटून जाते. त्यांना अभ्यासच करायचा असेल तर त्यांनी सोवियेत डिसिन्फॉर्मेशन कँपेन चा केला पाहिजे. कारण ते खरे डिसेप्शन होते आणि आजही चाललेले आहे. कुणाला या विषयात रस असेल तर सोवियेत मधून पळालेला नोवोस्टी या प्रोपोगंडा संस्थेचा एक एजंट Yuri Alexandrovich Bezmenov (किंवा थॉमस शुमन) युरी बेझ्मेनोव्ह याच्या मुलाखतीचा केला पाहिजे होता. ही एक तास एकवीस मिनिटांची मुलाखत शांतपणे ऐका. यामध्ये युरी व्यवस्थित समजावून देतो की लिबरलांचे कार्य कसे चालते. हे किती अवाढव्य मशिनरी यासाठी चालवतात. अगदी विद्यापिठा पासून ते वाहिन्यांपर्यंत यांचीच लोकं भरली जातात. बाकी आवाज दाबून टाकला जातो. २९ व्या मिनिटाला भारताविषयी पण व्यवस्थित बोलला आहे तो या मुलखतीत. ४२ व्या मिनिटाला तो हे लोक असे खोटे का लिहितात यावर पण बोलतो. अर्थात अभ्यास करण्यासाठी सगळी मुलाखत जरूर ऐकली पाहिजे. अभ्यास करायचा नसेल तरी जनमत कसे फिरवले जाते यासाठी ही मुलाखत ऐकली पाहिजे. सब व्हर्जन नावाची ही पद्धती आहे. प्रत्येक लोकसेवा आयोगाचा अभ्यास करणार्‍याने, पत्रकाराने ही पद्धती अभ्यासली पाहिजे. आपण याचा बळी तर नाही ना हे पाहून घेतले पाहिजे. गामा जी खरे सांगायचे तर एस बी हे एक युजफूल इडियट आहेत. असे लोक जे फुकटात लिबरलांचा कांगावा पुढे चालवतात बाकी काहीच नाही.
  • Log in or register to post comments
ए
एस.बी Fri, 10/16/2020 - 06:18 नवीन
प्रिय निनाद जी , आणि इतर सर्व ज्यांना असं वाटत की मला हा लेख अर्णव आणि तत्सम व्यक्तींच्या विरोधात लिहायचा होता.. पुन्हा एकदा लेख वाचा..तुम्हाला कुठेही कोणाची ही नावे ( भारतीय व्यक्तींची ) घेतलेली दिसणार नाहीत कारण जसं मला अर्णाब बद्दल द्वेष नाही आहे तसेच मला रविष आणि राजदीप बद्दल प्रेम पण नाही . पण झालं काय आहे ... हे निनाद आणि इतर तत्सम प्रतिसाद देणारी मंडळी म्हणजे मला तरी असे दरोडेखोर वाटतात ना. भारंभार चाचण्या करून शेवटी पेशंट चा मनात ," तुला ना भला मोठ्ठा " आजार झाला आहे ! आणि मग त्यावर अस्तित्वात नसलेल्या आजारावर उपचार करून बरे केल्याचा ढोल बडवायला मोकळे... जरुरी आहे का ?? प्रत्येक नागरिकाने अर्णाब नाहीतर राजदीप अशा गटात सामील झालेच पाहिजे का?? मी जेंव्हा लेखाची शेवटी म्हणतो की अशा अनेक कढई तुमच्या आजूबाजूला दिसतात...तेंव्हा तुम्ही ते अर्णव ला का लावुन घेता?? लढाई नेहमी दोन गटात होते ना?? मग अर्णाब चा विरोधी गट पण त्या कढई मध्ये सामील होतोच ना??? कढई हा संदर्भ हर्श्ट आणि पुलित्झर या दोघांना उद्देशून वापरला आहे मग तोच संदर्भ भारताला जोडताना तुम्ही हे का लक्ष देऊन वाचत नाही की मी अनेक कढई असा अनेकवचनी शब्द वापरला आहे .. मला फक्त अर्णब अभिप्रेत असता तर मी अशीच एक विषारी कढई तापत आहे असा एकवचनी उल्लेख नसता का केला... असो चोराच्या मनात चांदणे ह्या नुसार तुम्ही तुमच्या पूर्वग्रदूषित नजरेने लेख वाचला आणि स्वतः एका कंपुमध्ये समविष्ट असल्याने साहजिकच तुम्हाला समोरची व्यक्ती एकतर आपल्या कळपातील असेल नाहीतर आपली शत्रू कळपातील असेल ह्या दोन दृष्टिकोन घेऊनच तुम्ही जगाचं परीक्षण करायला निघालात तर अवघड आहे निनाद!!!कळपात नसलेला म्हणजे आपला विरोधी अशी गैरसमजूत सोडून द्या जग म्हणजे काही दोन बाजूचे नाणे नाही की त्याला फक्त छापा आणि काटाच असेल ....
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 10/16/2020 - 07:15 नवीन
मग अर्णाब चा विरोधी गट पण त्या कढई मध्ये सामील होतोच ना? एस बी हे आधीच लिहिलं असतात ना तर पुढे चर्चा झालीच नसती... तुमचं एका वाक्याने सगळं घोळ झालं असे २-३ जण म्हणत आहेत ते ध्यान्यात घ्या माझा मूळ प्रतिसाद वाचा कृपया... आपण एक वेगळी माहिती दिली आहेत त्याबद्दल आपले कौतुकच आहे पण सध्या ज्या "येन केन भाजपला खाली दाखवा हा रतीब " घातला जातो ( श्रीराम पवार सकाळ, निखिल वागले ) त्यातील एक वाटला आपलं लेख त्या एका वाक्यामुळे... एकतर मी तरी अर्णव बद्दल मुळात बोललोच नाही एक खुलासा अर्णब च्या ऍक्ट्रेटले पण पेक्षा रवीश कुमार चे सादरीकरण खूपच चांगलं आहे (त्याचे विचार जरी पटत नसले तरी )..हे जाहीर करतो म्हणजे मग तुम्ही हि मला अर्णब च्या टोळीतील ठरवणार नाही !
  • Log in or register to post comments
ए
एस.बी Fri, 10/16/2020 - 08:14 नवीन
चौकस जी.. मुळात मला भाजपा, अर्नब यांच्या बद्दल किंचितही द्वेष नाही...त्यांचं काम ते करत आहेत... भाजप शक्तिशाली राजकारण करतो आणि करायलाच हवं शेवटी जनमत ने समर्थन दिलेला पक्ष आहे आणि सनदशीर मार्गाने करत आहे .. आणि अर्णब जे काही करतोय तो त्याचा व्यवसायाचा भाग आहे...त्याला ही चॅनल चालवायचा आहे... पण माझा रोख त्यांच्या मुळे नागरिक आपल्या स्वतः मध्ये पराकोटीचे बदल करून घेऊन गटबाजी करत मित्रपरिवार कार्यालयीन सहकारी यांच्यात द्वेष आणि विखार पूर्ण चर्चा करत आपले दैनंदिन संबंध निष्कारण रित्या बिघडवून टाकत आहेत आणि त्यामुळे चांगल्या चांगल्या मित्रांमध्ये ह्या असल्या प्रकारामुळे फूट पडताना पाहिली आहे मी... भाजपा आणि अर्णब किंवा इतर पत्रकार रविष येऊन तुम्हाला तुमच्या रोजच्या अडचणीत मदत करायला येणार आहेत त्या पेक्षा कैक पटीने लवकर तुमचे सहकारी आणि मित्र आणि नातेवाईक तुम्हाला आधार आणि मदत देऊ करतील .. मग ह्यांच्या उच्च दर्जाच्या भांडणामध्ये असा दुसऱ्यांचा बळी जातो आहे अशी भावना माझी झाल्याने मी लेखन केले .. पण आता त्यात पण सुतावरून स्वर्ग गाठायचा उद्योग सुरू आहे त्याच वाईट वाटत!
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 10/16/2020 - 08:49 नवीन
एस.बी परत सांगतो आपला मूळ लेख लिहिण्याचा आणि ते क्युबा चे उद्धरण वैगरे वाचनीयच होते ... त्या एका वाक्याने लोकांना का असे वाटले याचा जरा तरी विचार करा!
  • Log in or register to post comments
ए
एस.बी Fri, 10/16/2020 - 09:08 नवीन
इथून पुढे सहज म्हणून शब्द सुटणार नाही याची खात्री करेलच आणि इतर सर्वांनी नव्या सामग्रीचा अभ्यास नक्कीच करेल...रशियन पद्धती, नोवोस्तो ,वगैरे वगैरे!!
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 10/16/2020 - 08:55 नवीन
नागरिकांचायत भांडणे होत आहेत हे काही केवळ माध्यमांमुळे नाही तर लोकांनाही काहि गोष्टी समजून आल्यात पूर्वी जे कॉंम्ग्रेस्स एकमेव आणि गांधी एकमेवव ( महात्मा आणि नेहरू - गांधी) यावर काह्ही बोलणे म्हणजे देश द्रोह समजला जायचंच.. त्यावर आत जनता , आणि काही माध्यमे अरे ला कारे करीत आहेत ... महात्मांचा काय चुकलं असं म्हण्यायची हिंमत आणि मोकळीक होती पूर्वी? हळू हळू मिळाली त्यात जगभर चा इसिस चा धुडघूस + नवीन माध्यमे यामुळे एकूणच संवाद आणि वाद वाढला.. फक्त अर्णव किंवा रवीश मुले आपण वाद घालतो असं म्हणून चालणार नाही
  • Log in or register to post comments
G
Gk Fri, 10/16/2020 - 14:25 नवीन
महात्म्याला वाईट म्हणायची मोकळीक नव्हती ? त्यांना तर साक्षात गोळी घालून ठारच केले की , अजून किती मोकळीक हवी आहे ?
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Fri, 10/16/2020 - 20:20 नवीन
शतशः सहमत ! गेले कित्येक वर्ष याचाच अनुभव घेतो आहे.मोदी,भाजपविरुध्द एक टिकेचा शब्द उच्चारा,लगेच तुम्ही देशद्रोही,कॉंग्रेसी,गुलाम्,रुग्ण झालात म्हणून समजा.या असल्या घाणेरड्या वातावरणामुळे इतर विषयावर ना लिहायची इच्छा होते ना कोणत्या चर्चेत भाग घेउन मत व्यक्त करायची.असो. गप्प बसणे हेच हिताचे.
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Sat, 10/17/2020 - 15:05 नवीन
आम्ही देखील गेले काही वर्षे याचाच प्रत्यय घेत आहोत. जरा कुठे देश्प्रेमाबद्दल, हिंदुत्वाबद्दल, भारतीय संस्कृतीबद्दल, इतिहासाबद्दल, नेहरू गांधीं यांच्या चुकीच्या आणि एकतर्फी धोरणाबद्दल, तुष्टीकरणाच्या राजनीतीबद्दल बोलले कि लगेच आम्हाला भक्त, भाजपेयी, संघी, चड्डीवाले, Rss वाले , उजवे इ विशेषणे लावून आमचा उद्धार केला जातो. हे देखील बोला कि...
  • Log in or register to post comments
G
Gk Fri, 10/16/2020 - 05:16 नवीन
तनिष्क प्रकरणाबद्दल अडवाणींचे अभिनंदन, ह्यांच्या रथयात्रेने मंदिर होईल न होईल , पण सामाजिक शांततेला हे राम म्हणायला लावण्याचा हेतू मात्र साध्य झाला आहे
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Fri, 10/16/2020 - 06:10 नवीन
मला एक गुलाबजाम सापडला - तनिष्कच्या शोरूमवर हल्ला झाल्याची खोटी बातमी आणि मग सारवासारव आता तो विषारी आहे की नाही ते धागालेखक सांगतीलच. रच्याक - आणि मग अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आलं.
  • Log in or register to post comments
ए
एस.बी Fri, 10/16/2020 - 08:19 नवीन
प्रिय वामन जी ....माझ्या अगोदर तुम्हीच उत्तर दिले तुमच्या प्रश्नाचे... खोटी बातमी दिली आणि मग सारवासारव म्हणजे बातमी मुळातच खोटी होती हे तुम्ही सांगितले ना !! मग झाले प्रत्येक खोटी बातमी हा नक्कीच एक विषारी गुलाबजाम आहे!!! खोट्या बातम्या देणारा कोणी ही असो ...त्याचा गुलाबजाम हा विषारीच!! मग तो कोणीही असो...
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 10/16/2020 - 10:28 नवीन
तनिष्कच्या शोरूमवर हल्ला झाल्याची खोटी बातमी आणि मग सारवासारव तनिष्कचा संदर्भ आला म्हणुन...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Pani Da Rang (Video Song) | Vicky Donor | Ayushmann Khurrana & Yami Gautam
  • Log in or register to post comments
ए
एस.बी Fri, 10/16/2020 - 09:16 नवीन
पहिल्यांदाच मिपा वर लिहले आणि एवढं सगळं नवनवीन समजून येईल असं बिलकुल वाटलं नव्हतं... वाटलं की थोड्या फार प्रतिक्रिया येतील आणि थोड्या फार suggestion येतील बास्स... पण झालेली चर्चा खरेच नवनवीन गोष्टींचा उलगडा करणारी आहे.. त्याबद्दल सर्व मिपाकरांना मनापासून धन्यवाद!! आणि कालपासून हे गुलाबजाम गुलाबजाम होतंय ना त्याची एक गंमत लॉक डाऊन मध्ये कमावलेलं वजन उतरावं म्हणून डाएट वरती आहे हो.. त्यामुळे लेख लिहताना गुलाबजाम ची जाम क्रेविंग होत होती म्हणून डोक्यातून विचार काढून टाकायला विषारी गुलाबजाम अशी संज्ञा वापरली... पण ह्या प्रतिसाद मध्ये अनेकवेळा गुलाबजाम शब्द बघून आज लंच मध्ये नक्कीच १ वाटी तरी खाणार...मरो ते डायट तिकडे!!!....
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 10/16/2020 - 09:23 नवीन
भारताला आता कशाची गरज आहे, लोकांची मानसिकता आता कोणत्या प्रकारची असायला हवी. आता गरज आहे भारताला विकसित राष्ट्र बनवण्याची. त्या साठी उत्तम जलद प्रशासन आणि सर्व राज्यात,सर्व स्तरांत विकासाची गंगा नेण्याची. मीडिया नी फक्त ह्याच विषयात स्वतः ला वाहून घ्यावे. लोकांची मानसिकता बनवण्यात मीडिया ची मोठी भूमिका असते. आणि हे शक्य नसेल तर सरळ मीडिया आणि समाज मध्यामवर कडक बंधन घालावीत. चीन सारख्या देशात पण मीडिया वर बंधन आहेत. Media वर बंदी म्हणजे शांती ची हमी. हिंदू मुस्लिम सोडा भारतात हिंदू हिंदू मध्येच संघर्ष आता होत आहे आणि पुढे तीव्र होईल . तो फक्त रोजगार साठी,आर्थिक प्राप्ती साठी. त्या वरच लक्ष केंद्रित ठेवणे गरजेचे आहे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 10/16/2020 - 09:30 नवीन
जगात हिंदू चा एक आर्थिक,लष्करी ,ताकत प्रचंड असलेला देश असावा असे तुम्हाला का वाटत नाही. उद्या सर्व मुस्लिम राष्ट्र विरोधी गेली तरी त्यांच्या शी लढा देवू शकणार सक्षम देश भारत का नसावा. हिंदुत्व वादी त्या साठी काय प्रयत्न करत आहेत. सर्वच क्षेत्रात देशाची पिछेहाट हिंदुत्व वादी पक्षाच्या काळातच झाली आहे.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Fri, 10/16/2020 - 11:30 नवीन
पूर्वापार भारतीय लोक आपला विकास आपण स्वतःच करत आले आहेत. राजसत्तेकडून त्यांची अपेक्षा कायम फक्त आणि फक्त संरक्षण इतकीच राहिली आहे.. ते पण मिळत नसेल तत् मात्र कठीण असते. तेव्हा विकासाची चिंता तुम्हाला नको. विकास आपला आपण होईल. अजून एक सांगतो - जीवावर बेतल्याशिवाय हिंदू कट्टरवादी गॉट नाही, हे पण लक्ष्यात ठेवा.
  • Log in or register to post comments
G
Gk Fri, 10/16/2020 - 14:23 नवीन
हे सगळे आम्हाला इथे का सांगताय ? आम्ही काय तुमच्यावर अटॅक करणार नाही बॉर्डरवर जाऊन प्रयोग करा
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Fri, 10/16/2020 - 10:47 नवीन
नवीन माहिती कळाली.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Fri, 10/16/2020 - 13:01 नवीन
मुद्देसूद प्रत्युत्तरे देण्याची काहीएक गरज नाही. लिबरल आणि कम्युनिस्ट वैगेरे शिक्के मारून राडा केला की बास. असो चालायचंच. -(छुपा नसलेला लिबरल, फेक्युलर इत्यादी) शा वि कु.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 10/16/2020 - 15:37 नवीन
-(छुपा नसलेला लिबरल, फेक्युलर इत्यादी) कम्युनिस्ट पण आहात का हो तुम्ही? आपली एक शंका उत्तर नाही दिलं तरी चालेल
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Sat, 10/17/2020 - 03:25 नवीन
नाही.
  • Log in or register to post comments
ए
एस.बी Fri, 10/16/2020 - 15:56 नवीन
छुपा नसलेला लिबरल चा ऐवजी...लिबरल नसलेला बिरबल कसं वाटतं? जमतंय का? .. जमल तर वाप्रा पुढच्या येळेला!!!
  • Log in or register to post comments
स
सॅगी Fri, 10/16/2020 - 15:58 नवीन
या यादी मध्ये संघी, भक्त वगैरे शब्द घालायचे विसरुन गेलात की काय? नाही, हे शिक्के मारुनही राडे केले जातात म्हटलं.... असो चालायचंच
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Sat, 10/17/2020 - 03:23 नवीन
हे पण अयोग्यच.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Fri, 10/16/2020 - 15:22 नवीन
याच विषयावर नोम चोम्सकीचे मॅन्युफॅक्चरिंग कंसेंट नावाचे शोधग्रंथ कम पुस्तक आहे. जालावर सहजगत्या उपलब्ध आहे. इथे पुस्तकाचा सारांश उपलब्ध आहे.
  • Log in or register to post comments
ए
एस.बी Fri, 10/16/2020 - 15:53 नवीन
शा.वी.कु जी... लेख लिखाण करने से डर नही लगता साब.... शिक्का पडणे का डर लगता है !!!... अन् इतके शिक्के मिलने के बाद अब गुलाबजाम से भी लगता है.. मंग वो इषारी रहेन दो या बिन इषारी!!!! असो ह्यातून पण नोविस्टो, नॉम् चोस्की,रशियन मुलाखत, रवी अमले प्रचार भान, विकृत व्यापारी आणि काही विकृत व्यापारी या दोन शब्दसमुहाचा जमीन अस्मानाचा अर्थांतर फरक .. अशा एक ना अनेक गोष्टी समजल्या...आणि स्व: ची ओळख नव्याने प्राप्त झाली...
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 10/16/2020 - 16:19 नवीन
निनाद, तुमचा इथला संदेश वाचला. मला काय वाटलं ते सांगतो. १.
ते छुपे लिबरल असावेत अशी शंका आली कारण डोक्यात विरोध असला की असे वाक्य सहज सुटून जाते.
मला वाटतं हा निष्कर्ष जरा घाईत काढला आहे. 'विकृत व्यापारी मनोवृत्ती' हिचा अर्थ 'सर्व व्यापारी विकृत असतात' असा होत नाही. निदान मला तरी तसं वाटलं नाही. मात्र तुम्हांस एक वाचक या नात्याने तसं वाटवून घ्यायचा पूर्ण अधिकार आहे. २.
खरे सांगायचे तर एस बी हे एक युजफूल इडियट आहेत. असे लोक जे फुकटात लिबरलांचा कांगावा पुढे चालवतात बाकी काहीच नाही.
मला तरी या लेखात कसलीही मूर्खपणा ( = idiocy) दिसली नाही. अर्थात, हे माझं वैयक्तिक निरीक्षण आहे. असो. माझ्या मते लेख संतुलित आहे. लेखाच्या शेवटी जो परिच्छेद आहे त्यात विष आवरण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. ती अपेक्षा लेखकाने वाचकांकडून केली आहे. ती लेखकाने स्वत:च पार पाडण्याचा आग्रह वाचकाने धरू नये, असं मला वाटतं. वाचकाने स्वत:ची बुद्धी व निरीक्षणशक्ती वापरून स्वत:च भारतीय गुलाबजाम जोखावेत. गंमत म्हणजे ही जी लेखकाची अपेक्षा आहे, ती तुम्हीच पार पाडलेली आहे. मग झगडा कशासाठी? लेखक त्याला वाटतं ते सरळ शब्दांत लिहितोय. तुम्ही एक वाचक म्हणून तुमची जबाबदारी पार पाडताय. मग बखेडा हवाच कशाला? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Fri, 10/16/2020 - 17:04 नवीन
अवार्ड वापसी प्रकरण जोरात असताना अमीर खान ने त्याच्या बायकोचा किस्सा सांगितला, ति एकदा कधि म्हणाली होती कि देशात भिती वाटायला लागली आहे तेंव्हा स्थलांतर करावे काय... झालं... त्यावरुन अमीर खान ला अवार्ड वापसी गँगशी जोडल्या गेले.. आज लद्दाख प्रकरणी भारत-चीन सिरियसली आमने-सामने आहेत.. आपल्या जवनांचं रक्त सांडलय.. भारतीय माध्यमांमधे, खास करुन सोशल मिडीयावर, चीन विरोधातल्या संभावीत युद्धावर बरच चर्वीत चर्वण चाललं आहे.. आणि अशा वेळी लेखक इतिहासातल्या माध्यमप्रेरीत युद्धाचा संदर्भ देऊन आज देखील तसलीच रेसीपी बनवण्यात येत असल्याचं सांगतो... मग त्याचा संमंध भारत-चीन तणावाशी जोडला जाणे स्वाभावीक वाटते. लेखकाला तेच अभिप्रेत होतं कि नाहि कल्पना नाहि.
  • Log in or register to post comments
ए
एस.बी Fri, 10/16/2020 - 17:30 नवीन
आता पर्यंत वाटत नव्हत!! पण आता वाटायला लागलं आहे!!
  • Log in or register to post comments
G
Gk Fri, 10/16/2020 - 20:28 नवीन
  • Log in or register to post comments
G
Gk Fri, 10/16/2020 - 20:29 नवीन
टाटा तनिष्क विषयावरून भाजपे पिसाळलेत , टाटांचे पूर्वज म्हणे इस्लामी आक्रमणापासून स्वतःचे व पारशी धर्माचे रक्षण करायला भारतात आले म्हणे . ---------- ह्याच टाटांच्या पारशी नातीने रत्तनबाई पेटिट हिने एका मुसलमानाशी लग्न केले आणि इस्लाम धर्मही स्वीकारला, तो मुस्लिम मनुष्य म्हणजे बेरिस्टर मोहम्मद अली जिना त्यानंतर जिनाच्या मुसलमान मुलीने दिना जिना हिने एका पारशी मुलाशी लग्न केले , तो म्हणजे नेव्हिल वाडिया मुंबई मधील प्रसिद्ध वाडिया हॉस्पिटल , स्त्री रोग व लहान मुलांचे , ते ह्याच परिवाराचे आहे. त्यामुळे धार्मिक ऐक्य म्हणजे काय हे जगाला शिकवायला टाटा जाहिरात कशाला काढतील ? त्यांच्या स्वतःच्या घरात इतकी अंतर धर्मीय नातीगोती आहेत , टाटा , जिना आणि वाडिया हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. टाटाकडून एक मुलगी जिना परिवारात गेली. आणि जिनाकडून एक मुलगी वाडिया परिवारात गेली. ह्याच गोतावळ्यात अजून दोन आडनावे नातेवाईक आहेत , भाभा परिवार - थोर अणूशास्त्रज्ञ होमी जहांगीर भाभा . मिस्त्री परिवार - पालोनजी शापूरजी. https://en.m.wikipedia.org/wiki/Tata_Group टाटा , पेटिट , वाडिया - भारतीय नागरिकत्व जिना - पाकिस्तानी नागरिकत्व दिना जिना - आधी ब्रिटिश मग अमेरिकन नागरिकत्व शापुरजी - आयरिश नागरिकत्व आणि ह्या भाजप्याना भारतीय जाहिरातीत हिंदू मुसलमान लगीन खपेना आणि हे विश्वगुरू होणारेत म्हणे !!
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 10/16/2020 - 21:27 नवीन
Gk, तनिष्क एव्हढे जर आंतरधर्मीय विवाहप्रेमी असतील तर मुस्लिम घरात पारशी सून दाखवा म्हणावं. लव्ह जिहाद म्हणजे काय हे आम्हांस चांगलं ठाऊक आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Sat, 10/17/2020 - 03:58 नवीन
अगदी कम्युनिस्ट कॉम्रेड माणसाने हा लेख लिहिला तरीही केवळ तो कम्युनिस्ट आहे यावर बोंबाबोंब करून काही उपयोग नाही. १)त्याने कम्युनिसमचे कुठले फसवे सिद्ध झालेले तत्व या पर्टीक्युलर लेखात गृहीतक म्हणून वापरले आहे का ? २) कम्युनिस्ट क्रांती व्हावी अश्या उद्देशाचा काही संदेश या पर्टीक्युलर लेखात आहे का ? हे (उदा.) टीकेचे व्हॅलीड ग्राउंड होऊ शकतात. केवळ "व्यक्ती कम्युनिस्ट आहे, तेव्हा मांडलेले सर्व काही खोटे " असे Ad Hominem अर्ग्युमेंट निरर्थक असते. उद्योगपती अमुकतमुक अनैतिक गोष्ट करत आहेत, हा एक तथ्याचा दावा आहे. तथ्य कम्युनिस्ट किंवा भांडवलशाही नसते. त्यामुळे अश्या प्रकारचे तथ्य समोर आले तर निस्ते कॉमि कॉमि ओरडून काही उपयोग नाही. इथे तर कम्युनिझमशी एक वाक्य ओढून ताणून नसलेला संबंध जोडला आहे आणि पुढचा सगळा डान्स त्याच्यावरच केला आहे. असो चालायचंच.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 10/17/2020 - 08:04 नवीन
छे छे लेख कुणीही लिहावा हो. मी तुम्ही कम्युनिस्ट आहात का हे विचारले लेखकाबद्दल किंवा लेखाबद्दल नव्हतं बाकी -- कम्युनिस्टाने कोणताही लिहिला कि त्यात संघ द्वेष आपोआप येणारच. उदा. सीताराम येचुरी याना पपई आणायला सांगितली कि ती केवळ "केशरी रंगाची" आहे म्हणून ते आणत नाहीत असे ऐकिवात आहे.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Sat, 10/17/2020 - 08:47 नवीन
तुम्हाला उद्देशून नाहीये. (तुम्ही कम्युनिस्ट आहे का हे विचारणे खटकले तरीही. तुम्हाला उद्देशून नाहीच.)
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Sat, 10/17/2020 - 07:21 नवीन
Mumbai police arrests lawyer Vibhor Anand for "fake-theories-in-sushant-singh-rajput-disha-salian-death-cases" https://mumbaimirror.indiatimes.com/entertainment/bollywood/mumbai-police-arrests-lawyer-vibhor-anand-for-spreading-fake-theories-in-sushant-singh-rajput-disha-salian-death-cases/articleshow/78699735.cms सध्या तरी हिंदुस्तानात मागणी कमी होईल वि.गुलाबजामची असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Sat, 10/17/2020 - 07:30 नवीन
:) बिग बॉस चा सेट जेलमध्ये लागायचा होता, झाले भलतेच.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 10/17/2020 - 15:25 नवीन
महेश भटच्या सडक दोन चा जसा नागरिकांनी मोठा बेंड बाजा वाजवुन टाकला, तीच स्थिती आपली होइल ही भिती अक्कीला सतावत होती... मग लक्ष्मी बॉम्ब चा ट्रेलर प्रकाशित करणे पण पुढे ढकलले गेले, नंतर हिंमत करुन त्यांनी ट्रेलर तर रिलिज केला पण आपली कशी वाजवली जाते आहे ते कळु नये म्हणुन लाईक डिसलाईकचा कांउंटच हाइड करुन हा ट्रेलर युट्युबवर प्रसारित झाला ! बादवे... बिग बॉस त्याच्या "भाई" होस्टनेच चालु झाला असला तरी या तथाकथित भाई ची भाईगिरी काही लोकांच्या बहिष्कारा समोर चालु शकलेली नाही. जाता जाता :- विभोर आनंदला देखील पोलिसांनी उचलले आणि त्याच्या चॅनल वरील सर्व व्हिडियो आता डिलिट झाले आहेत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Genda Phool | Garba Mix | Kamlesh Jadhav | Janny Dholi
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 10/19/2020 - 18:04 नवीन
व्हिडीओ डिलीट करायला लागले कारण त्यात सत्यता काही नव्हती, पोलीसांनी अटक केली म्हणजे न्यायालयात त्याला सादर केले असणार, कायदेशीर प्रकिया आहे, तुमच्या धाग्याचे काय झाले ? सीबीआय ने खुनी पकडले का ??
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 19 hours ago
  • सुंदर !!
    1 day 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा