Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

नवे कृषी व्यापार विषयक कायदे

म
माहितगार
Mon, 09/21/2020 - 06:01
🗣 159 प्रतिसाद
या धाग्याचा उद्देश्य राजकीय नाही (अर्थशास्त्रीय आहे). पुन्हा एकदा सांगतो या धाग्याचा उद्देश्य राजकीय नाही या कायद्यांनी सर्वसामान्य शेतकरी ते सर्वसामान्य ग्राहक कसे प्रभावित होतील आणि हे प्रभाव सुखकर ठरण्यासाठी नेमके काय करणे गरजेचे असू शकते हा धाग्याचा मुख्य विषय आहे. मोदी सरकारने तीन नवे शेतकी व्यापार विषयक कायदे संसदेतून मंजूर करून घेतले आहेत. ज्याचा थेट परिणाम शेतकरी, शेतीमालाच्या विक्री आणि व्यापार पद्धती शेती मालावरचे प्रक्रीया उद्योग ते शेतीमालाचे ग्राहक या सर्वांवर होणे स्वाभाविक आहे. मला कायद्यांवर भाष्य करण्यापुर्वी कायदा मुळातून वाचण्यास आवडते पण संसदीय आंतरजालाने या वेळी साथ न दिल्याने वृत्तपत्रीय विश्लेषणावर अवलंबून रहाण्या शिवाय पर्याय नाही. कुणाला दुवे उपलब्ध झाल्यास प्रतिसादातून उपलब्ध करावेत. कशा बद्दल आहेत हे तीन कायदे ? पहिला शेतीमालाची खरेदी विक्री शेती उत्पन्न बाजार समिती पद्धतीने करण्याची सक्ती थांबवतो, दुसरा शेतीमालाच्या साठवणूकीवरील मर्यादा उठवतो आणि तिसरा करार करून शेतीस अनुमती प्रदान करतो कृषी उत्पन्न बाजार समितीतूनच सक्तीने विक्रीचा उद्देश्य काय होते? बाजार नियंत्रण आणि अधिक विश्वासार्ह व पारदर्शक व्यापार. कृषी उत्पन्न बाजार समिती पद्धतीचा इतिहास एकोणिसाव्या शतकाच्या शेवटून चालू होत असला तरी मला वाटते १९३० ते १९७० चे दशक संबंधीत प्रक्रीया विकसनाचा प्रमुख काळ असावा. यात बदल का केले जात आहेत? मला वाटते व्यापारावरील नियंत्रणे कमी करून व्यापाराची सुलभता वाढवणे, शेतीमालाच्या साठवणूक वितरण आणि प्रक्रीया उद्योगास चालना मिळण्यातील अडथळे कमी करणे. ही प्रमुख उद्दीष्ट्ये असावीत. परिणाम काय असतील आणि त्यांना कसे सामोरे जावे ? शेतीमाल प्रक्रीया तसेच शेतीमालाच्या मोठ्या वितरण साखळ्यांना करारी शेती आणि थेट खरेदीचा अवलंब करता येईल गरजेनुसार साठवणूक करता येईल. ज्या पिकांना हमी भाव नाहीत त्यांच्या खरेदीची अधिक आश्वासकतेच्या संधी शेतकर्‍यांना उपलब्ध होऊ शकेल. शेतीमाल प्रक्रीया उद्योग यशस्वी झाल्यास देशाच्या अर्थकारणास अधिक चालना मिळेल. शेतीस अधिक प्रमाणात खासगी भांडवलाचा पतपुरवठा वाढेल. सरकार हमी भाव पद्धती बंद करेल का ? मला वाटते भाजपा सरकार अन्न सुरक्षा विषयक प्रतिबद्धता बहुधा कमी करणार नाही कारण अगदी जागतिक व्यापार संघटनेच्या वाटाघाटींना भाजपा सरकारने तेवढ्या मुद्द्यावरुन थांबवले. ते एकच रेशनकार्ड देशभरची घोषणाही करते आहे त्यामुळे हमी भावाने खरेदी चालू रहातील अशी शक्यता अधिक आहे. शेतीमालाच्या साठेमारी आणि भाव हाताच्या बाहेर जाण्याच्या शक्यता तसेही केंद्र सरकार साधारणतः शेतीमालाच्या आयात आणि निर्यातीच्या बळावर शेतकी मालाच्या बाजार भावांवर नियंत्रण ठेवण्यावर भर राहीला आहे - परकीय चलनाच्या गंगाजळीचे प्रश्न नाहीत तो पर्यंत गरज पडल्यास आयात करुन अथवा निर्यात थांबवून मुल्य वृद्धीवर नियंत्रण ठेवता येते. शेतीमाल नाशवंत असल्याने प्रदीर्घ साठेमारीच्या शक्यता वस्तुतः कमी असतात. अडचणी जागतिक व्यापार अधिक खुला होण्याच्या शक्यता असताना आयात निर्यातीत सरकारला भावीकाळात किती हस्तक्षेप करता येतील हि एक समस्या समोर दिसते. दुसरे बाजारावरील नियंत्रणे कमी करणे ठिक पण शेतीमालाच्या उपलब्धतेची माहिती प्रणाली हि बाजार भावांवर माहिती आणि नियंत्रण ठेवण्यासाठी महत्वाची असते त्या माहिती प्रणाली चा सद्य आधार काढून घेतला जात असताना पर्यायी माहिती प्रणालीची व्यवस्था असावयास हवी. शेती प्रक्रीया उद्योग वाढल्यास रोजगाराच्या संधी वाढू शकतील पण हात उत्पादकांचे बळकट होताहेत का एक मध्यस्थ जाऊन दुसरे मध्यस्थ येतील कारण भारतीयांचा स्वाभाविक भर उत्पादनापेक्षा व्यापारी साट्यालोट्यावर अधिक आहे ही काळजीची गोष्ट आहे. कृषी उत्पन्नाच्या व्यापारात ज्या प्रमाणात आधुनिक तंत्रज्ञान आणले जावयास होते ते आणले गेले नाही त्यातील तंत्रज्ञानास उत्तेजन दिले जावयास हवे होते सहकार चळवळीचे राजकीय करण होऊन मोडीत काढली गेली. जेव्हा सरकारी नियंत्रणे कमी होतात तेव्हा सहकारी पर्याय मजबूत व्हावयास हवेत ते होताना दिसत नाहीए. संदर्भ दुवे * https://en.wikipedia.org/wiki/Agricultural_produce_market_committee#History * https://indianexpress.com/article/explained/agriculture-ordinances-punjab-haryana-farmers-protest-explainspeaking-6603039/ * https://indianexpress.com/article/explained/in-three-ordinances-the-provisions-that-bother-protesting-farmers-6598905/ * https://www.livemint.com/news/india/will-the-new-freedom-to-trade-act-benefit-farmers-11600592998681.html * https://www.thehindubusinessline.com/opinion/why-the-new-agri-laws-are-not-anti-farmer/article32654417.ece * https://www.ndtv.com/india-news/passage-of-farm-bills-evokes-mixed-political-reactions-in-uttar-pradesh-2298488 * https://www.news18.com/news/politics/bjp-manages-to-get-farm-bills-passed-in-parl-but-faces-allies-ire-oppn-creates-ruckus-calls-it-black-day-2892883.html * धागा लेखाचा उद्देश्य मुख्यत्वे सर्वसामान्यांसाठी सुक्ष्म आणि ढोबळ अर्थशास्त्रीय स्वरुपाचा आहे चर्चा सहभाग आपापले राजकीय चष्मे बाजूस ठेऊन व्हावा राजकीय कारणासाठी धागाचर्चा हायजॅक करू नये अशी विनंती आणि अपेक्षा आहे. * अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे, शुद्धलेखन चर्चा व्यक्तीगत टिका, टाळण्यासाठी अनेक आभार.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 58847 views

🗣 चर्चा (159)
G
Gk Wed, 09/30/2020 - 08:12 नवीन
ऊस तोडला आणि तासाभरात तर्कट भरून कारखान्यात नेऊन साखर केली असे होत नाही ऊस तोडून शेतात काही तास पडून असतो मग वाहनातून नेला तरी त्यातही वेटिंगवर पडून असतो जर ऊस कापण्याचे क्षेत्रफळ चौपट केले तर हा वेटिंग पिरियडही थोडाफार वाढणार
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 09/30/2020 - 08:46 नवीन
कशाला फडतुस समर्थन करताय?
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Wed, 09/30/2020 - 19:32 नवीन
उस तोडल्यापासून ८ तासात त्याचे गाळप झाले नाही तर उतारा २५% नि घटतो हे तुम्हाला ठाऊक आहे का? जिथे तिथे विद्यमान सरकारच्या टीकाकारांना उद्दाम प्रतिसाद देण्याची चाटूगिरी का करीत आहात?
  • Log in or register to post comments
G
Gk Wed, 09/30/2020 - 20:59 नवीन
त्याना सांगून फायदा नाही त्यांच्या मते , हा कायदा किती सुंदर आहे , महाराष्ट्रात 3300 आणि पंजाबात 3700 दर असला तर त्यांच्या मते इथला शेतकरी पंजाबात ऊस घालू शकतो मोदिजींनी शेतकऱयांचा उद्धार केला !!
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 10/02/2020 - 07:45 नवीन
उस तोडल्यापासून ८ तासात त्याचे गाळप झाले नाही तर उतारा २५% नि घटतो हे तुम्हाला ठाऊक आहे का? हा शोध कुणी लावला? याला काही शास्त्राधार वगैरे? का असंच हवेत गॅस मारलाय? कोणती घन गोष्ट ८ तासात २५ % वाळेल त्यातील पाणी वाळेल कि साखर?
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sat, 10/03/2020 - 05:13 नवीन
आता काय बोलणार यावर ...... ? ह्ये तर प्रकाश वेव्ह आहे का पार्टिकल आसं भाण्डान दिसतया !! )))))
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Sat, 10/03/2020 - 06:56 नवीन
जर माझी हेटाळणी करण्याचा उद्देश असेल तर अगोदर मी काय म्हणतो याची गुगलवर खातरजमा केली असती तर बरं झालं असतं. अजूनही impact of delayed harvesting of sugarcane एवढ्या माहितीवर गुगल करून बघा. बाकी डॉ. खरे यांच्याबद्दल काय बोलणार? मी चाटूगिरी सोडतो असं म्हणाले असते तर दाखला देणं, प्रबोधन करणं याचा विचार करता आला असता.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 10/03/2020 - 09:24 नवीन
टोबी बुवा मी ते अगोदरच गुगलून पाहिले होते. केवळ आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी आपण ८ तास लिहिले होते आपल्या दुव्यात सुद्धा २४ तास आहे ८ तास नव्हे. थापा मारायच्या त्याला काही तरी बेस असावा. खाली दिलेल्या दुव्यात पूर्ण तालिका दिली आहे त्यात उतारा १२० तासांनी( म्हणजे ५ दिवसांनी) २५ % कमी होतो असे दिसते. https://www.irjet.net/archives/V2/i3/Irjet-v2i383.pdf Average Change in sugarcane juice quality(in hot climati conditions) Duration Particular %weight loss Brix% Pol% Apparent Purity Sucrose purity pH Titrable acidity R.S./1000 Brix 00 hrs - 22.10 19.45 87.97 86.96 5.21 24.6 2.92 24 hrs 2.7 22.27 19.05 85.54 83.64 5.17 26.5 3.55 48 hrs 4.9 22.76 18.66 81.98 78.94 5.12 28.5 5.83 72 hrs 6.8 23.13 17.93 77.51 74.06 5.08 31.1 8.52 96 hrs 8.8 23.61 17.05 72.23 69.34 5.03 33.4 12.35 120 hrs 11.5 24.46 16.01 65.38 62.48 4.94 35.7 17.70 बाकी आपण चाटूगिरी सारखे शब्द वापरून GK/ मोगाखान/ चंपाबाई /हितेश च्या पातळीवर उतरलात बढिया है
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 10/03/2020 - 09:50 नवीन
सर टोबी उस तोडल्यापासून ८ तासात त्याचे गाळप झाले नाही तर उतारा २५% नि घटतो हे तुम्हाला ठाऊक आहे का? हे पुराव्यानिशी सिद्ध करा मग बोलू.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 10/03/2020 - 16:10 नवीन
हायला दर ८ तासाला साखरेचा उतारा २५ % कमी होतो तर मुंबईत रसवंती गृहात मिळणाऱ्या रसात काय सॅकॅरीन घालतात काय?
  • Log in or register to post comments
G
Gk Sat, 10/03/2020 - 05:47 नवीन
पाणी वाळते , साखर तशीच रहाते पण मुळात पाणी हे माध्यमच नसेल तर उसातील साखर तशीच आत प्रेसिपितेत होऊन रहाते , ऊस चिरडला तरी कमीच बाहेर येणार आणि तोडलेला ऊस लगेच मरत नसेल , तोवर मग त्याच्या खोडा पानांना स्वतःचीच साठलेली साखर खाऊन जगावे लागेल ना ? म्हणून पाणी आणि उतारा दोन्ही घटत असणार
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 10/03/2020 - 06:16 नवीन
ऊस चिरडला तरी कमीच बाहेर येणार आपली अफाट तर्कशक्ती वापरून प्रतिसाद लिहू नका. वस्तुस्थिती जाणून लिहा. साखर निर्मिती प्रक्रियेत उसाचा रस काढल्यावर सुद्धा त्यावर परत पाणी मारून त्यातील जमेल तितका साखरेचा अंश काढला जातो उसातील साखर तशीच आत प्रेसिपितेत होऊन रहाते. हा शोध आपण कुठून लावलात? का आता या साखरेचे स्फटिक तयार होतात आणि त्यातूनच ऑरगॅनिक खडीसाखर तयार होते असा शोध लावणार आहात? उसात साधारण १५% साखर असते म्हणजे १०० मिली उसाच्या रसात १५ ग्रॅम आणि साखर पाण्यात फार मोठ्या प्रमाणात विरघळते म्हणजे साधारण २५० ग्राम साखर १०० मिली पाण्यात विरघळते. त्यामुळे उसात साखर तशीच आत प्रेसिपितेत होऊन रहाते हे म्हणणे म्हणजे शुद्ध थापा आहेत.
  • Log in or register to post comments
G
Gk Sat, 10/03/2020 - 06:19 नवीन
तुम्ही स्वतःच लिहिले की पाणी मारून मारून पुन्हा साखरेचा अंश मिळवतात म्हणून
  • Log in or register to post comments
G
Gk Sat, 10/03/2020 - 06:25 नवीन
तुम्ही स्वतःच लिहिले की पाणी मारून मारून पुन्हा साखरेचा अंश मिळवतात म्हणून , उसात असलेल्या पाण्यावरच जर भागले असते तर पाणी मारायची गरज नव्हती ना ? का तुमच्या केमिस्त्रीनुसार ती 100 ग्रॅम साखर उसाच्या अंतर्गत पाण्यात द्राव्य असतेच ना ? प्रेसिपितेत होते म्हणजे अगदी खडीसाखर तयार व्हायला हवी का ? आणि तोडलेला ऊस लगेच मरत नाही , तो स्वतःचीच साखर वापरत जगत रहाणार , हे तरी पटले ना ?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 10/03/2020 - 09:49 नवीन
कशाला उगाच या बोटावरची थुंकी त्या बोटावर करताय? उसात असलेल्या पाण्यावरच जर भागले असते तर पाणी मारायची गरज नव्हती ना ? किती रस काढला तरी चिपाडात साखरेचा अंश राहतोच त्यासाठी त्यावर पाणी मारून जितके शक्य आहे तितका रस काढतात. तोडलेला ऊस लगेच मरत नाही , तो स्वतःचीच साखर वापरत जगत रहाणार , याला काही पुरावा दुवा वगैरे?
  • Log in or register to post comments
G
Gk Sat, 10/03/2020 - 14:05 नवीन
ब्लड ब्यांकेत जाऊन विचारा ब्लड बॅग 100 दिवसानंतर वापरली तर काय होईल ? ते देतील उत्तर
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 10/03/2020 - 15:36 नवीन
रक्तातील लाल पेशींचे आयुष्य शरीरातच १२० दिवस असते.मग रक्तपेढीत काय होणार? उसाचा पहिला उतारा १२ महिन्यांनी येतो आणि खोडवा १८ महिन्यांनी उगाच अहमदशहा अब्दालीची शेंडी बाजीरावाला कशाला लावताय?
  • Log in or register to post comments
G
Gk Sat, 10/03/2020 - 18:52 नवीन
तेच मीही लिवले रक्ताच्या पेशी शरीराबाहेर 120 दिवस जिवन्त असतात , तसा उसही कापला म्हणून लगेच मरत नाही , काही काळ जिवन्त असतो ह्या जिवन्त रक्त पेशींना जगायला जे लागते ते त्या पिशवीतच असते , तसे उसाच्या पेशींना जे लागते ते म्हणजे ग्लुकोज त्या उसातूनच काही काळ त्याला मिळणार . तिसरे अजून एक आहे , आपल्या शरीरात स्टारवेशन मेंटबॉलिजम असते , तसे तोडलेल्या उसातही अन्न पाणी न मिळता जे मेंटबॉलिझम असते , ते भिन्न असू शकते
  • Log in or register to post comments
क
कोहंसोहं१० Fri, 09/25/2020 - 05:44 नवीन
मूळ प्रश्न नाशवंत मालाच्या वितरणाचा असेल तर सरकारने सरसकट खाजगीकरण करण्याऐवजी प्रभावी वितरणव्यवस्था उभी करण्यासाठी पाऊले उचलायला हवीत असे मला वाटते. संपूर्ण सरकारी नसेल तर निमसरकारी व्यवस्था उभी करून कमी फायद्याच्या व्यवस्थेत शेतकरी आणि ग्राहक यांचा फायदा जास्त कसा होईल हे पाहिले पाहिजे म्हणजे दलालांवर वचक बसेल कारण सर्वात जास्त फायदा आणि सर्वात जास्त शोषण फक्त दलालच करतात असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 09/25/2020 - 07:14 नवीन
सर्वात जास्त शोषण फक्त दलालच करतात दलाल हा "कलंकित" आहे हे जरी खरे असले तरी काही बाबतीत दलाल हा फक्त "प्रेताचं टाळू वरचे लोणी खातो" असे मानणे चुकीचे ठरेल - प्रतेय्क उत्पादकाला सगळी कडे आपला माल पोचवणे शक्य असतेच असे नाही म्हणून मग डिस्ट्रिब्युटर नेमलं जातो - दलालाला बरेचदा उत्पादकाचं मालावर अजून काम करावे लागते ,, स्वतःचे पैसे/ श्रम पण पणाला लावावे लागतात , - दलाला दलालात स्पर्ध असते ग्राहक हुशार असेल तर दलालाला यशस्वी होण्यासाठी खूप दह्ड्पड करावी लागते यात बरेच उत्पादक एकत्र मिळून आपले स्वतःचाच दलाली चा व्यवसाय काढतात ( खास करून निर्यात उद्योगात उदाहरण अमेरिकन बदाम / ऑस्ट्रेलियन वाईन / श्रीलंकन चहा )
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 09/25/2020 - 06:41 नवीन
अतिशय मजबूत अशी शेतकरी संघटना कमीत कमी राज्य पातळीवर तरी हवी. अगदी गावागावंतील प्रतेक शेतकरी त्यांचा सभासद हवा आणि राज्य स्तरीय नेतृत्व हवे . त्यांच्या एका इशाऱ्या वर मतदान झाले पाहिजे, माल विकायचा की नाही हे ठरवले गेले पाहिजे. तरच दबाव गट निर्माण होवून शेतकऱ्यांचे हित जपले जाईल. कोणी तरी येईल आणि आपले भले करेल असे होणार नाही. इथे सरकार असू नाही तर अजुन कोणी हे कधीच शेतकऱ्यांचे. भले करणार नाहीत.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Fri, 09/25/2020 - 08:01 नवीन
असे प्रयत्न सहकारी चळवळीच्या माध्यमातून पूर्वी झालेले आहेत. आज त्यांची काय परिस्थिती आहे?
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 09/25/2020 - 07:08 नवीन
त्यांच्या एका इशाऱ्या वर मतदान झाले पाहिजे, म्हणजे अजून एक सत्ताकेंद्र ! आणि समजा असे झाले तर त्याचाच उपयोग फक्त शेती/ सभासदांचे भले इथपर्यंत मर्यादित राहील असे वाटते? सहकारी "चळवळीचे" पश्चिम महाराष्ट्रात काय झाले अप्लाय पुढे आहेच शेवटी कृषिउत्पादन हा एक व्यवसाय आहे हेच मान्य नसेल तर चालू दे राडा
  • Log in or register to post comments
ऋ
ऋतुराज चित्रे Fri, 09/25/2020 - 13:36 नवीन
स्वामीनाथ आयोगाच्या शिफारसी लागू करण्यासाठी कुठलाच विरोधी पक्ष अथवा शेतकरी संघटना आग्रही का नाही ? नवीन कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांना मिळणारे लाभ स्वामीनाथन आयोगातही आहेत. मग प्रचंड बहूमतात असलेल सरकार हा आयोग लागू का करत नाही?सर्व राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटनांना आयोगाच्या शेतकरी हिताच्या शिफारसी अडचणीच्या का वाटतात ? १ ) शेतीमाल विक्री तसेच उत्पादन नियंत्रण यावर ज्या शिफारशी आयोगाने केल्या त्या अमलात आणल्यास शेतीमालाची विक्री वाढून शेतकऱ्यांची आर्थिक बाजू सुधारण्यास मदत होऊ शकते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दबावामुळे शेतकरी संघटना किंवा कुठलाच राजकीय पक्ष हे स्वीकारणार नाही. २ ) शेतकऱ्यांना हमीभाव सरासरी उत्पादन खर्चाच्या ५०% इतका नफा देणारा असावा. सध्याची हमीभाव मोजणी पद्धत शेतकऱ्याला योग्य भाव देऊ शकत नाही. नविन कृषी विधेयकामुळे हमीभावाच्या जबाबदारीतून सरकार मुक्त होउ शकेल. ३) वन्यजमीन अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीसाठी देणे आणि गुरांना चरण्यासाठी राखीव ठेवणे. सुपिक शेतजमिन औद्योगिकिकरणास देण्यास मनाई. हे लागू केल्यास एका रात्रीत वनसंपदा नष्ट करता कशी येईल ? तो गुन्हा ठरेल. विकासाच्या नावाखाली सुपिक जमिनी बळकावता येणार नाही. नवीन विधेयकात अशी सुस्पष्टता नाही. मुख्य म्हणजे आयोग लागू करण्यासाठी केंद्र आणि राज्यांची अर्थस्थिती भक्कम असणे गरजेचे आहे. गेल्या सहा वर्षात देशाची अर्थव्यवस्था गटांगळ्या खात आहे आणि राज्यांचा हक्काचा जिएसटी नाकारून केंद्राने राज्यांचीही अर्थस्थीती दुबळी करून टाकली. ह्या परिस्थीतीचा फायदा घेत केंद्र सरकार शेतकऱ्यांचा हिताच्या नावाखाली बहुमताच्या जोरावर विधेयक पास करून नुकसान भरपाई , आरोग्य आणि पीक विमा , शेतकरी पेन्शन ई .जबाबदारीतून मुक्त होण्याचा प्रयत्न करत आहे.
  • Log in or register to post comments
G
Gk Sat, 09/26/2020 - 07:43 नवीन
मोदी सरकारच्या प्रस्तावित तीन कृषी विधेयकांना विरोध करत शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. तीन विधेयकांच्या विरोधात शुक्रवारी (२५ सप्टेबर) शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली होती. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. त्याचबरोबर रेल्वे गाड्याही रोखून धरल्या होत्या. आंदोलनादरम्यान आंदोलकांना लाठ्यांनी मारहाण करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांचा एक व्हिडीओ काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी ट्विट केला आहे. https://www.loksatta.com/desh-videsh-news/shashi-tharoor-congress-leader-farmers-protest-agriculture-bills-farmers-bills-bmh-90-2285674/
  • Log in or register to post comments
च
चिगो Tue, 09/29/2020 - 13:55 नवीन
हे शेतीविषयक कायदे ह्या चर्चेत भाग घेणार्‍या लोकांपैकी कुणी वाचले आहेत का? मुळात ह्या बिलांवर नुकतीच राष्ट्रपतींची सही झालीय, तर ते कुठेही आधिकारीकरित्या उपलब्ध आहेत का? 'सुशांत -रिया-कंगना- माल - ५९ ग्राम गांजा' ह्यांच्या विकतच्या प्रेमात पडलेल्या प्रसारमाध्यमांवर कुठेही ह्या कायद्यांवर साधक-बाधक चर्चा आली आहे का? 'कृउबास'ची मक्तेदारी संपवून त्याबदल्यात खुल्या मार्केटची पर्यायी व्यवस्था देतांना शेतकर्‍यांना संरक्षणाची कुठली व्यवस्था देण्यात आली आहे? 'द डेव्हील लाईज इन द डिटेल्स' हे कायदाक्षेत्राएवढं खरं कुठंही नसेल, तर हा 'डेव्हील इन डिटेल्स' काय आहे हे कळल्याशिवाय कसं करायचं? वरती बहुतांश जणांनी 'हे दलाल बाजूला केलेत, हे फारच बरं केलंत. ते लुबाडतातच' थाटाची भुमिका घेतली आहे. त्यातली शेतकर्‍यांबद्दलचा कळवळा स्तुत्य असला, तरी शेतकर्‍याला दलालाची गरज असतेच, हे समजून घ्या. शेतकर्‍याचं 'स्किल सेट' हे शेती करुन, नांगरणी-पेरणीपासून कापणी-मळणीपर्यंत कामं करुन पीक घेणं, हे आहे. शेतमालाची साठवण करुन त्याचं मार्केटींग करण्याची स्किल वा वेळ त्याच्याकडे नाहीये, कारण त्याला पुढच्या पिकाच्या मागे लागायचं असतं. हे खरेदी-साठवण-संरक्षण-वितरण करणारा जो वर्ग आहे, त्यात दलाल आणि व्यापारी मोडतात. (हेच तत्व कुठल्याही 'मॅन्युफॅक्चरर आणि मार्केटींग'वाल्या व्यवसायाला लागू होईल.) शेतकरी-दलाल-व्यापारी ह्यांच्यात दुवा निर्माण व्हावा, आणि शेतकर्‍याला योग्य मालभाव मिळावा ही कृउबासची मुळ प्रेरणा. गावातलं आणि छोट्या शहरांतलं राजकारण हे शेतकर्‍यांभोवतीच फिरत असल्याने कृउबास हे राजकारणाचं कुरण झालं. आजच्या कित्येक कृषीरत्न, कृषीमहर्षी, दुग्धमहर्षी, सहकारमहर्षी नेत्यांची किंवा त्यांच्या पुढ्च्या राजकारणी पिढीची मुळे तुम्हाला इथेच सापडतील. कृउबासच्या पॅनल्सवर आपली पकड बसवून कित्येकांनी राजकारणाच्या गंगेत हात-पाय धुवून घेतलेयत. आता कृउबासच्या व्यतिरीक्त इतर मार्गांनेही शेतकरी आपला शेतमाल विकू शकतील ही चांगली गोष्ट आहे. पण मग त्याला मिळणारे 'प्रोटेक्टीव्ह मेजर्स' कुठले आहेत? त्यासाठी जमीन-विषयक कायद्यांमध्ये काय बदल केले आहेत? 'कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग'नुसार शेती करतांना शेतकर्‍याचे आणि शेतजमिनीतल्या त्याच्या हितसंबंधाचे संरक्षण करणार्‍या उपाययोजना कुठल्या? उदाहरणार्थ, सातबार्‍यावर शेतमालाचे विवरण व शेती करणार्‍याचे नाव असते. सातबार्‍याचा उतारा हा शेतजमीनीवरील मालकी-हक्क दाखवण्यासाठी वापरला जातो. सातत्याने सातबार्‍यावर दुसर्‍या कुणाचे (उदाहरणार्थ, कुळाचे) नाव आल्यास सदर व्यक्ती शेतजमीनीवर हक्क दाखवू शकतो. 'कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग'ला अमलात आणण्यासाठी ह्या प्रावधानावर तोडगा काय? मी स्वतः शेतकरी कुटूंबातला असल्याने (आणि भविष्यात शेती करण्याच्या इराद्याचा असल्याने) ह्या कायद्यांबद्दल मला प्रचंड उत्सुकता आहे. 'शेतकर्‍यांना काय घंटा कळतंय' वाल्या वाफा दवडण्याच्या उद्योगापलिकडे कुणाला साधक-बाधक चर्चा करायची असेल, तर त्यात मला रसदेखील आहे. मी माझ्या शेतकरी नातेवाईकांशी आणि परीचितांशी ह्याविषयावर बोलतपण आहे. कृउबास आणि शेती-बाजारातील राजकारणावर हल्लाबोल करण्याचा (कारण तिथे सद्यसरकारची मुळे तितकी खोलवर रुजलेली नसावीत कदाचित) मर्यादीत हेतून प्रेरीत न होता, हे कायदे जर शेतकर्‍यांना खरोखर आधुनिक आणि प्रगतीशील बनवायला मदत करणार असतील तर त्यांचे स्वागतच आहे. अन्यथा, शेतकर्‍यांचा (इतरांप्रमाणेच) राजकारणासाठी वापर झालाय, आताही होईल, इतकंच..
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Tue, 09/29/2020 - 15:26 नवीन
चिगो साहेब उत्तम प्रतिसाद.
ह्या कायद्यांबद्दल मला प्रचंड उत्सुकता आहे. 'शेतकर्‍यांना काय घंटा कळतंय' वाल्या वाफा दवडण्याच्या उद्योगापलिकडे कुणाला साधक-बाधक चर्चा करायची असेल, तर त्यात मला रसदेखील आहे.
अगदी अगदी. मला सुद्धा ह्या कायद्यांबद्दल प्रचंड उत्सुकता असल्याने मी हा धागा फॉलो करत आहे, पण त्या कायद्यांविषयी कुठलीच माहिती न मिळता चर्चा राजकीय दृष्टीकोनातून त्याच गांधी, नेहरू, मोदी, काँग्रेस आणि भाजप वगैरे मुद्यांकडे वळलेली बघून निराशा झाली. मी शेतकरी कुटुंबातला नसलो तरी गेल्या पाच वर्षांपूर्वी हौशीने पार्ट टाईम शेतकरी झालो आहे. सध्या स्वतः पुरतेही उत्पादन घेत नसलो तरी भविष्यात ह्या व्यवसायात काहीतरी चांगलं करायचे ध्येय आहे. मिडिया मध्येही आंदोलने आणि विरोधाच्या बातम्याच दिसत आहेत पण कायद्याबद्दल कोणीच काही बोलत-दाखवत नाहीये. आत्ताच मला अध्यादेशांच्या 2 PDF फाईल्स सापडल्या आहेत. File 1 File 2
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Tue, 09/29/2020 - 16:38 नवीन
तुमचा एकंदरीत प्रतिसाद पटला. पण हे मात्र नीट पचल नाही. थोडंसं विस्तृतपणे लिहावं.
'कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग'नुसार शेती करतांना शेतकर्‍याचे आणि शेतजमिनीतल्या त्याच्या हितसंबंधाचे संरक्षण करणार्‍या उपाययोजना कुठल्या? उदाहरणार्थ, सातबार्‍यावर शेतमालाचे विवरण व शेती करणार्‍याचे नाव असते. सातबार्‍याचा उतारा हा शेतजमीनीवरील मालकी-हक्क दाखवण्यासाठी वापरला जातो. सातत्याने सातबार्‍यावर दुसर्‍या कुणाचे (उदाहरणार्थ, कुळाचे) नाव आल्यास सदर व्यक्ती शेतजमीनीवर हक्क दाखवू शकतो. 'कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग'ला अमलात आणण्यासाठी ह्या प्रावधानावर तोडगा काय?
हे अनाठायी वाटतंय. जाणकारांनी प्रकाश टाकावा.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 09/29/2020 - 19:48 नवीन
कुळ कायदा आता अस्तित्वात आहे की नाही ते माहीत नाही. खरे तर शेती विषयी कायदे अत्यंत किचकट आहेत ते बदलणे गरजेचे आहे ह्या विषयी दुमत नाही. मालक,कुळ,आणि वहिवाट दार असे तीन प्रकार असतात. मालक आणि कुळ हे पहिल्या पानावर आणि वहिवाट दारा चे नाव 7/12 वर पाढच्या पानावर असते. आणि ह्या मध्ये जमिनी चा मालक ठरवण्याचे किचकट कायदे आहे ते असे संभ्रम निर्माण करणारे का आहेत ह्याचा सरळ अर्थ आहे शेतकऱ्यांना नेहमी भीती च्यावातावरणात ठेवणे. त्या मुळे सरळ सोपे कायदे असावेत अशीच मागणी शेतकऱ्यांनी करावी आणि सरकार नी जुने कायदे बदलावेत. राहील त्याचे घर ह्या कायद्या मुळे भाडेकरू हा प्रकार शहरात निर्माण झाला आणि मालकांची डोकेदुखी वाढली. इमारत पडेल अशी अवस्था झाली तरी मालक ते दुरुस्त करत नाहीत त्याचे हेच कारण आहे. आता मूळ प्रश्नावर येवू या. कंपनी शेतकऱ्या शी कॉन्ट्रॅक्ट करणार ते फक्त कोणते पीक घ्यायचे ते कंपनी ठरवणार,बी कंपनी देणार पण उत्पादन शेतकरी च घेणार त्या मुळे सातबारा वर पीकपाणी शेतकऱ्या च्याच नावावर असणार. कॉन्ट्रॅक्ट फक्त माल विकत घेण्य पुरतेच मर्यादित असणार. कंपन्या शेती करणार नाहीत. त्यांना ते परवडणार पण नाही. ऊन, वारा,पावूस,रोग हे माणसाच्या हातात नाहीत . आणि कधी ही पिकांचे नुकसान करू शकतात. असा बेभरवशाच्या नादाला कंपनी लागणार नाही.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Fri, 10/02/2020 - 09:09 नवीन
याचा काही अभ्यास केलात तर एक लेख लिहा असे।म्हणेन. मला या कायद्यातील काही तरतुदी धोकादायक दिसत आहे, उदा. कंपनी सुरू करताना जमीन ही भांडवल म्हणून वापरणे.. हे म्हणजे एक तर जमीन लुबाडणूक किंवा मनी लोंडेरिंग साठी फाटक उघडणे आहे असे मला तरी वाटते. त्यासाठी बाकी तरतुदी काय आहेत हे समजणे आवश्यक आहे. याबाबत संसदेत काय चर्चा झाली याचा देखील तपशील आला नाही, त्यामुळे तसेही बरेचसे अध्याहृतच आहे.
  • Log in or register to post comments
ज
जानु Tue, 09/29/2020 - 15:11 नवीन
हा मुद्दा योग्य आहे. जे लिहले आहे त्यापेक्षा काय नाही लिहले ते महत्त्वाचे आहे. पण त्यातही महत्त्वाचे म्हणजे मानवी वृत्ती ही प्राण्यांपेक्षा वेगळी आहे का? मागील अनुभव हाच आहे की कोणत्याही कायद्याची शाब्दिक चौकट मोडून आपण भारतीय तिला वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी वापरून घेतो. हे जगात थोड्या फार फरकाने सगळीकडे होते. कायदा हा काय करणे अपेक्षित आहे हे सांगते. जगात कोणताही कायदा अध्यारुत परिस्थिती वर भाष्य करीत नाही. शेतकऱ्यांना दलाल आवश्यकच आहेत. पण ते फक्त बाजार समिती नसाव्यात.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 09/29/2020 - 15:59 नवीन
शेतकर्‍यांचा (इतरांप्रमाणेच) राजकारणासाठी वापर झालाय, आताही होईल, इतकंच.. हे तर स्पष्टच आहे. कारण सत्तेत असताना मोठ्या आवाजात ज्याचे समर्थन काँग्रेसचे नेते करत होते तेच नेते आता त्याचा उच्च रवात धिक्कार करत आहेत आणि वर आता सोनियाजींनी काँग्रेस सत्तेत असलेल्या राज्यात या कायद्याचे पालन करू नका असे आवाहन केले आहे. राज्याला असे करण्याचीची घटना परवानगी देते का हे मला माहिती नाही.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Wed, 09/30/2020 - 08:17 नवीन
दुटप्पी पणा राज्कारणात होतच असतो. https://www.loksatta.com/agralekh-news/editorial-on-vodafone-wins-anti-government-tax-dispute-abn-97-2287616/ ह्या अग्रलेखावरचे २ पत्र. https://www.loksatta.com/lokmanas-news/loksatta-readers-response-letter-abn-97-28-2288618/
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 09/30/2020 - 08:27 नवीन
शेती हा विषय राज्याच्या अधिकारात येतो. संघीय देशात केंद्र सरकार ला सर्व अधिकार दिलेले नाहीत. राज्यांना पण अधिकार असतात.ते त्याचा उपयोग करू शकतात. अमेरिकेत तर प्रतेक राज्याचे स्वतंत्र सर्वोच्य न्यायालय पण आहे. फक्त काही विषयात च संघीय न्यायालय ला अधिकार असतात. आणि भारतात पण प्रतेक राज्याचे सर्वोच्य न्यायालय असावे. फक्त काही प्रश्न च संघीय सर्वोच्च न्यायालयात गेले पाहिजेत.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Wed, 09/30/2020 - 08:41 नवीन
केवळ queastion of law संघीय न्यायालय उर्फ सुप्रिम कोर्टात जावेत, इतर queastion of facts हे सुप्रिम कोर्टात न नेता हायकोर्टानेच सोडवावेत. :)
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 09/30/2020 - 08:49 नवीन
हि आपली मते आहेत. परंतु घटनाकारांनी फ्रान्स, इंग्लंड अमेरिका अशा अनेक देशाच्या लोकशाहीचा सखोल अभ्यास करून बऱ्याच विचाराअंती आपली न्यायव्यवस्था निर्माण केली आहे. भारतात जर प्रत्येक राज्यात सर्वोच्च न्यायालय केले तर काय बजबजपुरी निर्माण होईल हे सांगता येणार नाही.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Wed, 09/30/2020 - 09:16 नवीन
तुमचे म्हणणे योग्य आहे. मी हि वरील प्रतिसाद त्याच उपरोधिक अंगाने दिला आहे. आत्ता सध्या सुद्धा सुप्रिम कोर्ट फक्त कायद्याच्या आकलनाबद्दल प्रश्न असेल तिथेच पाहाते. जर कायदा आकलनाचा प्रश्न नसेल तर सुप्रिम कोर्टात अपील करता येत नाही. चालू घडीला पण "काहीच प्रश्न" सुप्रिम कोर्टात जातात असे म्हणायचे होते.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 10/01/2020 - 15:33 नवीन
आपल्या म्हणण्याचे माझे आकलन चुकीचे झाले. क्षमस्व
  • Log in or register to post comments
ऋ
ऋतुराज चित्रे Tue, 09/29/2020 - 16:34 नवीन
शेती हा राज्यसूचीत अंतर्भूत विषय आहे , केंद्र आयात निर्यात नियमन करू शकते . फडणवीस सरकारच्या काळात शेतकऱ्यांना शेतमालाची थेट बाजारात विक्री करण्यास परवानगी दिली होती . अशी विक्री करणारे फार थोडे शेतकरी आहेत . जोपर्यंत सरकार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत कितीही कायदे केले तरी उपयोग होणार नाही.
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Tue, 09/29/2020 - 17:18 नवीन
फडणवीस सरकारच्या काळात शेतकऱ्यांना शेतमालाची थेट बाजारात विक्री करण्यास परवानगी दिली होती . हेच म्हणतो की महाराष्ट्रात ही सवलत आधीच दिलेली आहे. महत्वाचा मुद्दा आहे तो लहान जे शेतकरी आहेत त्यांना संरक्षण व हित जपण्याचा.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 09/30/2020 - 06:48 नवीन
फडणवीस सरकारच्या काळात शेतकऱ्यांना शेतमालाची थेट बाजारात विक्री करण्यास परवानगी दिली होती . असे जर असेल तर श्री अजित पवार "कृषी विषयक कायदा महाराष्ट्रात लागू करणार नाही असं म्हणतात आणि श्री शरद पवार तिसरंच बोलतात Farm Bills well-intentioned, but why the haste: Sharad Pawar https://www.nationalheraldindia.com/national/farm-bills-well-intentioned-but-why-the-haste-sharad-pawar
  • Log in or register to post comments
ऋ
ऋतुराज चित्रे Wed, 09/30/2020 - 07:53 नवीन
केंद्र सरकारने कृषी बील घाईघाईत विस्तृत चर्चा न करता पास केल्याने सर्व गोंधळ झाला आहे. त्यात कांदा निर्यातबंदी केल्याने सरकारच्या कृषी धोरणावर शंका उपस्थित करण्यात शेतकरी संघटना व विरोधी पक्ष यशस्वी झाले. सभागृहात सखोल चर्चा केली असती तर जीवनावश्यक वस्तु कायदा , कृषी निर्यात धोरण आणि कृषी जमीन संपादन हे केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या मुद्यांवर चर्चा झाली असती आणि सरकारला स्पष्ट धोरण असलेला कायदा मंजूर करण्यात अडचण आली असती. आता मंजूर केलेल्या कायद्यात स्पष्टता नाही. येत्या काही राज्यातील निवडणुका डोळयासमोर ठेवून हा निर्णय घेतला असेल तर केंद्र सरकारला लाभ होण्याची शक्यता कमी आणि विरोधी पक्षांना / शेतकरी संघटनांना लाभाबरोबर शेतकऱ्यांची दिशाभूलही करता येणार आहे. ज्या राज्यांना आपल्या राज्यात हे कायदे लागू करायचे नसतील त्यांनी स्वामीनाथन आयोग लागू करावा असे केंद्र सरकारने घोषित करावे तेव्हाच सगळया पक्षांचे / शेतकरी संघटनांचे शेतकरी प्रेम किती दांभिक आहे हे बळीराजाला कळेल .
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 10/03/2020 - 09:40 नवीन
सरकार वर विसंबून जो राहिला तो समाज घटक संपला च समजा. आता गांधी पण गेले आणि त्यांचे विचार पण गेले. अगदी कडवी शेतकऱ्यांची संघटना हाच एकमेव मार्ग आहे. संघटना म्हणजे अगदी सुनियोजित ,जशी लष्कराची तुकडीच शिस्तीत राहणारी आणि नियोजित पद्धतींनी विरोध करणारी. न्याय कधीच फुकट मिळत नाही किंवा दुसरा कोणी मिळवून देत नाही तो आपल्यालाच मिळवावा लागतो. शेतकऱ्यांनी कोणत्याच राजकीय पक्षांच्या नादाला लागायची गरज नाही. उद्योगपती लोकांची पण अशीच कडवी संघटना आहे ते सरकार कडे जात नाहीत सरकार त्यांच्या कडे येते वार्षिक बजेट काय आणि कसे असावे हे ठरवण्यासाठी. मग कोणत्या ही पक्षाचे सरकार असू ध्या.
  • Log in or register to post comments
स
सॅगी Sat, 10/03/2020 - 10:08 नवीन
सरकार ह्या यंत्रेनेवर अवलंबून राहिला तो संपला
सरकार नावाची कोणती यंत्रणाच नको असे म्हणायचे आहे का? सरकार नसेल तर काय होईल याचा अंदाज आहे का?
  • Log in or register to post comments
G
Gk Sat, 10/03/2020 - 10:12 नवीन
मंदिर , दंगे ह्याला सरकार पाहिजेच की
  • Log in or register to post comments
स
सॅगी Sat, 10/03/2020 - 10:13 नवीन
सोयिस्कर विस्मरण??
  • Log in or register to post comments
स
सॅगी Sat, 10/03/2020 - 10:17 नवीन
बाकी दंग्यांबद्द्ल असे बोलताय जणु काही रोजच्या रोज गँगवॉर वगैरे होत आहेत...
  • Log in or register to post comments
G
Gk Sat, 10/03/2020 - 10:26 नवीन
यु पी बलात्कारावर कुणी काही लिहिना दातखीळ बसली वाटतं
  • Log in or register to post comments
स
सॅगी Sat, 10/03/2020 - 10:34 नवीन
सगळेच बलात्कार/हत्या वाईटच...मग तो यु पी चे असोत, वा राजस्थान किंवा अगदी आपला महाराष्ट्र... बाकी यु पी वर बोंबा मारणार्यांची राजस्थानच्या घटनेवर बोलायला दातखीळ का बसते हा ही विचार करण्यासारखा प्रश्न आहे...नै का? दातखीळ सोयिस्करपणे बसते का हो Gk काका? नाही डॉक्टरी पेशातले आहात म्हणुन विचारलं....
  • Log in or register to post comments
G
Gk Sat, 10/03/2020 - 10:36 नवीन
मग त्याविरुद्ध आंदोलने तिथले तिथले विरोधी पक्ष करतात यूपीत आंदोलनाला राहुल प्रियंका गेले, राजस्थानात कोण जाणार , जय शहा का ?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 21 hours ago
  • सुंदर !!
    1 day 21 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 21 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा