शिवसेनेचे हे काय चाललय
मुंबईत ज्या पद्धतीने महापालीकेने कंगना राणावतचे घर पाडले तोडफोड केली त्या वरून शिवसेनेला राजकारणापेक्षा रस्त्यावर मारामार्या कर्अण्यातच जास्त रस आहे असे दिसतेय.
एक क्षण असे समजूया कंगना ने घरात परवानगीशिवाय बांधकाम केले होते. मात्र हायकोर्टाच्या कोविड च्या काळात डिसेंबर पर्यंत कोणतीही तोडफोड करू नये अशा आदेशानंतरही महापालीकेने तोडफोड केली.
कंगना घरात नसताना तीला नोटीसीला उत्तर देण्यासाठी वेळही न देता ही कारवाई केली गेली. ते देखील ती मुंबई मधे नसताना.
मुंबई महापालीकेला कंगना च्या घरात बाथरून च्या जागी ऑफीस केले ही बातमी मिळते मात्र वांद्रे स्टेशनच्या बाहेरच्या पाच पाच मजली अनधिकृत झोपड्या कधीच दिसत नाहीत.
मुंबई महापालीकेला कंगनाच्या घरावर ज्या तातडीने कारवाई करता आली तितकी तातडी महापालीका रस्ते दुरुस्तीबाबतीत , स्वच्छतेबाबत का दाखवत नाही.
शिवसेनेचे म्हणणे आहे की ही कारवाई शिवसेनेने नाही तर मुंबई महापालीकेने केली आहे. शिवसेनेला अशी स्वतंत्र कारवाई करायचा काय अधिकार आहे का? दुसरे म्हणजे महापालीकेतली शिवसेना ही वेगळी शिवसेना आहे का?
शिवसेना ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळत आहे. ते पहाता स्टॅलीन च्या दडपशाही ची आठवण होते.
या सगळ्या प्रकरणात मविआ चे सर्वेसर्वा तथाकथीत जाणते राजे सोयीस्करपणे मुग गिळून बसलेत.
बी एम सी ही एक सरकारी संस्था आहे. त्यांनी केलेल्या कोर्टाच्या आदेशा विरुद्ध जाऊन अनधिकृत कारवाई च्या विरोधात कोर्टात दाद मागितली तर अधिकार्यांवर काही कारवाई होईल असे नाही. त्यामुळे अधिकारी निर्धास्त आहेत. त्यामुळे त्यांना जनतेवर अन्याय करायला परमीट मिळाले आहे असे दिसतेय
शिवसेनेचे हे नक्की काय चालले आहे तेच समजत नाही.
ते स्वतःच्या हातानेच स्वतःचे भवितव्य खणून काढताहेत
शिवसेनेने जे करायचे तेशिवसेनेने दुटप्पीपणा केलेला नाही, कोंग्रेस बरोबर जानार नाही ह्याचा अर्थ भाजप बरोबरच राहू असाही नाही, २०१४ ते २०१९ सेनेला सत्तेत डावलणे, केंद्रात दुय्यम दर्जाचे मंत्रीपद देणे वगैरे प्रकार भाजपने केले, २०१९ ला युती असुनही सेने विरोधात भाजपने ठिकठिकाणी बंडखोर ऊभे केले होते. ह्याचा वचपा सेनेने वेळ आल्यावर बरोबर घेतला. भाजपची साथ सोडणे हा ठाकरेंच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम निर्णय होता. सेनेने भाजपला संधीदिली होती पण भाजपने पहाटेच्या शपथेने माती खाल्ली, नी सेनेला नाईलाजाने काॅंग्रेस बरोबर जावे लागले. ईतकीच जर भाजपला हिंदूत्व नी सेनेची काळजी होती तर द्यायचं होतं अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद. आताही बाहेरून पाठींबा देऊ शकतात सेनेला. पण नाही भाजपला हवी आहे फक्त नी फक्त सत्ता. त्यासाठी कुठलंही कपट करायला भाजपेई तयार असतात. मग सत्तेसाठी पहाटे अजित दादांबरोबर शपथ घ्यायची असो की मातोश्री पुढे नतमस्तक व्हायचे असो. थोडक्यात “कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा“ “कपटी भाजप पेक्षा दिलदार काॅंग्रेस पक्ष कधीही चांगला.”श्री बाळासाहेबांची असंख्य भाषणे उपलब्ध आहेत त्या सर्वाला हरताळ फासून आजची शिवसेना सत्तेत आली आहे. उदा. शिवसेना कधीही सोनिया गांधींच्या बरोबर जाणार नाही तसे झाले तर मी माझी संघटना बंद करून टाकीन किंवा “हिजड़े झुकते हैं सोनिया के सामने”
शिवसेनेने काँग्रेसच कशाला हवं तर दाऊद इब्राहिम /ओवैसींशी सुद्धा युती करावी. पण निदान बाळासाहेबांच्या आत्म्याला त्रास होउ नये म्हणून त्यांच्या नावाची ग्वाही देणे, त्यांना वचन दिले होते म्हणून मुख्यमंत्री झालो सांगणे आणि त्यांच्या नावाने मते मागणे असले दुटप्पीपणा करणे बंद करावे इतकेच म्हणणे आहे. अर्थात तुमचे एकंदर प्रतिसाद पाहून तुम्ही या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणार हे माहिती होतेच पण तुमचाही दांभिकपणा उघड करावा म्हणून हा प्रतिसाद होताआणि ते उपरोधिक बोलणेते ऊपरोधीक वगैरे असं काहीही बोलले नव्हते.