Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

शिवसेनेचे हे काय चाललय

व
विजुभाऊ
Wed, 09/09/2020 - 09:42
🗣 293 प्रतिसाद
मुंबईत ज्या पद्धतीने महापालीकेने कंगना राणावतचे घर पाडले तोडफोड केली त्या वरून शिवसेनेला राजकारणापेक्षा रस्त्यावर मारामार्‍या कर्‍अण्यातच जास्त रस आहे असे दिसतेय. एक क्षण असे समजूया कंगना ने घरात परवानगीशिवाय बांधकाम केले होते. मात्र हायकोर्टाच्या कोविड च्या काळात डिसेंबर पर्यंत कोणतीही तोडफोड करू नये अशा आदेशानंतरही महापालीकेने तोडफोड केली. कंगना घरात नसताना तीला नोटीसीला उत्तर देण्यासाठी वेळही न देता ही कारवाई केली गेली. ते देखील ती मुंबई मधे नसताना. मुंबई महापालीकेला कंगना च्या घरात बाथरून च्या जागी ऑफीस केले ही बातमी मिळते मात्र वांद्रे स्टेशनच्या बाहेरच्या पाच पाच मजली अनधिकृत झोपड्या कधीच दिसत नाहीत. मुंबई महापालीकेला कंगनाच्या घरावर ज्या तातडीने कारवाई करता आली तितकी तातडी महापालीका रस्ते दुरुस्तीबाबतीत , स्वच्छतेबाबत का दाखवत नाही. शिवसेनेचे म्हणणे आहे की ही कारवाई शिवसेनेने नाही तर मुंबई महापालीकेने केली आहे. शिवसेनेला अशी स्वतंत्र कारवाई करायचा काय अधिकार आहे का? दुसरे म्हणजे महापालीकेतली शिवसेना ही वेगळी शिवसेना आहे का? शिवसेना ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळत आहे. ते पहाता स्टॅलीन च्या दडपशाही ची आठवण होते. या सगळ्या प्रकरणात मविआ चे सर्वेसर्वा तथाकथीत जाणते राजे सोयीस्करपणे मुग गिळून बसलेत. बी एम सी ही एक सरकारी संस्था आहे. त्यांनी केलेल्या कोर्टाच्या आदेशा विरुद्ध जाऊन अनधिकृत कारवाई च्या विरोधात कोर्टात दाद मागितली तर अधिकार्‍यांवर काही कारवाई होईल असे नाही. त्यामुळे अधिकारी निर्धास्त आहेत. त्यामुळे त्यांना जनतेवर अन्याय करायला परमीट मिळाले आहे असे दिसतेय शिवसेनेचे हे नक्की काय चालले आहे तेच समजत नाही. ते स्वतःच्या हातानेच स्वतःचे भवितव्य खणून काढताहेत

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 108943 views

🗣 चर्चा (293)
व
विजुभाऊ Wed, 09/09/2020 - 09:43 नवीन
एक नागरीक म्हणून आपण सेनेच्या या अन्यायाविरुद्ध दाद मागायलाच हवी.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 09/09/2020 - 09:46 नवीन
अनधिकृत बांधकामच तोडले आहे ना ? मुळात कोणीही अनधिकृत काम करावेच का ? आणि केल्यावर तोडले म्हणून रडावे का ? अगदी कंगणाच्या वक्तव्यामुळे हे पाडले असे मानू या,पण मग तिने जे बेकायदेशीर केले आहे ते योग्य कसे ?? आधी हे पाडा मग ते पाडा म्हणाले, तर चोर म्हणेल आधी माल्या ला पकडा मग मला शिक्षा करा. ऐसा कैसा चलेगा ?
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 09/09/2020 - 10:03 नवीन
कपिल मुनी अनधिकृत बांधकाम पाडताना सेनेने हायकोर्टाच्या आदेशाला मानले नाही. दुसरे म्हणजे कायद्यानुसार कंगनाला महापालिकेने उत्तर देण्यासाठी वेळ द्यायला हवा होता. तो दिला नाही. हे न्याय्य नाही. एका दिवसात कारवाई करणे सेनेने / पालीकेने ही तातडी इतर बाबतीत दाखवायला हवी. पूर्ण फुटपाथ गिळंकृत करणार्‍या सिद्धीविनायक ट्रस्ट बद्दल ही तातडी दाखवा ना. वांद्र्यातील झोपडपट्टीवर कारवाई करा ना एकूणातच सेनेला शासकीय पद्धतीने दादागिरी करायची आहे. हेच दिसतेय. मल्ल्या वगैरे विषय हे केंद्र सरकार च्या अखत्यारीत येतात. आणि त्यावर काम चालू आहे. आपली न्यायसंस्था कसाबलाही बचावाची संधी देते. कंगनाला तीही देण्यात आली नाही. सेने ची कंपाउंडरच्या साम्गण्यावरून वैयक्तीक पातळीवर दुश्मनी काढायची पद्धत दिसते
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 09/09/2020 - 10:17 नवीन
मी वाचले त्याप्रमाणे 2018 साली नोटीस दिली होती , आता वचपा काढला. पण जे मुळातच बेकायदेशीर आहे त्याचा बचाव कसा करावा ? की आधी बाकी सगळे पाडा मग माझ्याकडे या असे असते?
  • Log in or register to post comments
द
दादा कोंडके गुरुवार, 09/10/2020 - 22:12 नवीन
आपल्याकडचे सगळे कायदे मुळात ढिसाळ आहेत. ते सगळे पाळणं जिकीरीचं आहे. अशा परिस्थितीत दोष फक्त नागरिकांना देता येत नाही. ते पाळण्यासाठी लोकांमध्ये विश्वास निर्माण करावा लागतो. ते काम सरकारी यंत्रणेकडूनच होणं अपेक्षित आहे. ते होण्यासाठी अजून काही दशकं जावी लागतील. माझा एक सिए असलेला मित्र म्हणाला होता की जो पर्यंत तुम्ही जाणिवपुर्वक स्वच्छ रहाण्यासाठी दुसर्‍या एक सिएला तुमचे अकाउंट्स सांभाळायला देत नसाल, तर कोणताही सिए फायनँशिअल डिटेल्सबघून तुम्ही टॅक्सचोरी केली आहे ते सिद्ध करू शकतो. म्हणजे उद्या (थोडं वैयक्तीकपणाचा दोष पत्करून) तुम्ही सरकार विरुद्ध काही बोललात तर मला खात्री आहे की तुम्हाला किमान करचोरी प्रकरणात अडकवलं जाइल. दुसरं एक उदाहरण म्हणून एका सर्वे मध्ये रँडम ठिकाणी रस्त्यावरच्या ५००० दुचाकी धारकांची तपासणी केल्यावर ९५% लोकांकडे सगळी कागदपत्रं (लायसन्स, इन्श्युरन्स, आरसी-टीसी, पियुसी वगैरे) नव्हती. यात फक्त कागदपत्रं तपासली होती. बाकी नंबर प्लेट, दोन्ही आरसे, हेलमेट, सगळ्या लाईट्स वगैरे तपासलच नव्हतं. म्हणजे एकुण कायदे पाळण्यात आपण सगळेच किती उदासिन आहोत. याचं खापर फक्त नागरिकांवर फोडता येत नाही.
  • Log in or register to post comments
द
दादा कोंडके गुरुवार, 09/10/2020 - 22:19 नवीन
या तफावतीमुळे ती तपासणारी यंत्रणासुद्धा एखादी घटणा किती बेकायदेशीर आहे त्याचा न्यायनिवाडा त्या वेळची परिस्थिती, गुन्हा करणारी व्यक्ती, गुन्हा किती गंभीर आहे, वरून आलेले आदेश वगैरे बघून घेत असते. असो.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Wed, 09/09/2020 - 10:30 नवीन
कंगनाच्या घराची तोडफोड , अर्णव वरचा हक्कभंग. गेली ५ वर्षे खिशातले राजीनामे बाहेर काढायची हिम्मत नव्हती, आता एका दिवसात नोटिस आणि कारवाई. मुजोरपणे सत्ता राबवणे शिवसेनेला फार लवकर जमले. जनता पाहते आहे (अजुन काय पर्याय आहे?)
  • Log in or register to post comments
क
केदार-मिसळपाव Wed, 09/09/2020 - 10:47 नवीन
आणि ह्यांच काय चाल्लय बघा, म्हणजे सौम्य शब्दात सांगायचे झाले तर झालय असं की, "पक्षाला राहायला राजवाडा दिला तरी तो राहाणार झाडावर घरटे करुनच"!!
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Wed, 09/09/2020 - 10:52 नवीन
सामनातून इतर राजकिय नेत्यांवर अत्यंत खालच्या भाषेत येथेच्छ टिकाटिप्पणी करायला मागे पुढे पाहात नाहीत हे पेंग्विन. मात्र यांच्यावर कोणी टिका केली, तर मात्र मुंबई, महाराष्ट्र, छत्रपती शिवराय व महाराष्ट्रातील ११ कोटी जनतेचा अपमान होतो. ज्यांना उभ्या आयुष्यात तीन आकडी आमदार निवडणुन आणता आले नाहीत ते अकरा कोटी जनतेच्या अपमानाची भाषा करतात? अर्थात खंडणीखोरांच्या हातात सत्ता दिल्यानंतर त्याचे काय परिणाम होतात याचे जिते जागते उदाहारण आहे आजचे पेंग्विन सरकार. मागे 'मुंबई तुझा माझ्यावर भरवसा नाय काय' असे गाणे म्हणून मुंबईत पडलेल्या खड्ड्यांवर व साचणार्‍या पाण्याबाबत प्रश्न विचारणार्‍या आरजेच्या घरात डेंगुच्या आळ्या शोधायला पालिकेचे अधिकारी पोहचले होते, त्या 'आरजे मलिष्का'ने कोणते अनधिकॄत बांधकाम केले होते ? एरवी 'मिडीया की आजादी', 'बोलने की आजादी' बद्दल आवाज उठवणारे आता कुठे गायब झालेत ?
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Wed, 09/09/2020 - 11:10 नवीन
जनता पाहते आहे... पुढच्या महापालीका आणि विधानसभा निवडणुकीत सेनेला फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे ह्या सगळ्याची. बाळासाहेब परत या.... तुम्ही मोठ्या कष्टाने उभी केलेली एक सामर्थ्यशाली संघटना तुमचे वारसदार धुळीला मिळवायला निघाले आहेत असा आक्रोश कट्टर शिवसैनीक आता करू लागले आहेत.
  • Log in or register to post comments
न
नीलस्वप्निल Wed, 09/09/2020 - 12:40 नवीन
अगदि खर.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Wed, 09/09/2020 - 11:10 नवीन
आर जे मालिष्का ने 'मुंबई तुझा बीएमसीवर भरवसा नाय का' केले होते तेव्हा दुसऱ्याच दिवशी बीएमसीने तिच्या घरी धाड टाकून कुंडीत डेंग्यूच्या अळ्या तत्परतेने शोधून काढल्या होत्या त्याची आठवण झाली. सेनेचे राजकीय भवितव्य काही खरं दिसत नाही.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 09/09/2020 - 11:23 नवीन
पुढच्या इलेक्शनला भाजप सोबत युती केली म्हणजे पुन्हा झेंडा हाती घ्यायला लागेल तेव्हा दमाने घ्यावे
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Wed, 09/09/2020 - 11:32 नवीन
हॅहॅहॅ
  • Log in or register to post comments
स
सॅगी Wed, 09/09/2020 - 11:40 नवीन
त्या वेळेस भाजपाचा झेंडा हाती घेऊ की, सेनेचा झेंडा कोण हातात घेतोय?
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Wed, 09/09/2020 - 12:40 नवीन
खरंय...
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 09/10/2020 - 09:03 नवीन
खरंय.....! भाजपावाल्यांना दमच निघत नै. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 09/09/2020 - 12:26 नवीन
लाचारी ही शिवी नाही ती तडजोड असते वेळ पडेल तेव्हा.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 09/09/2020 - 12:33 नवीन
केंद्रात कोणाची ही सत्ता असू ध्या पण केंद्रीय सत्ते.नी नेहमीच महाराष्ट्र चा द्वेष केला आहे. अगदी ताजी उदाहरण घ्यायचं झाले तर कसाब ला पुरवलेल्या केंद्रीय सुरक्षा दल च खर्च महाराष्ट्र कडून वसूल करावा असे त्या वेळी चालले होते. मुंबई वरील हल्ल्यात अनेक पोलिस अधिकारी शहीद झाले पण जेव्हा ब्लॅक कॅट कमोंडो कारवाई साठी आले तेव्हा मीडिया स्पष्ट असे .म्हणत होती . मुंबई मराठी लोकांची आहे असे म्हणता मग परप्रांतीय कॅमोंडो च मुंबई ला वाचवायला बोलवायला लागले. असे प्रश्न उभे करून जे पोलिस शहीद झाले त्यांचा अपमान केला गेला. मुंबई,पुण्यात महाराष्ट्र सरकार नी निर्माण केलेल्या infrastructure चे कधीच कौतुक हिंदी मीडिया,इतर राज्यातील नेते ,केंद्र सरकार करत नाही. त्याच infra चा फायदा घेवून श्रीमंत झालेले मुंबई मध्ये महाराष्ट्र कुठे असा खोचक सवाल करतात. .मुंबई नसेल तर ते सुद्धा श्रीमंत राहणार नाहीत हे सत्य लपवून ठेवतात. त्या महाराष्ट्र मध्ये स्थानिक पक्षांचेच सरकार हवे. Bjp पण नको आणि काँग्रेस पण नको. सेना राष्ट्रवादी हा उत्तम पर्याय आहे.
  • Log in or register to post comments
न
नीलस्वप्निल Wed, 09/09/2020 - 12:46 नवीन
सेना राष्ट्रवादी हा उत्तम पर्याय आहे.... एकत्र नको ... एक हाती सत्ता एका पक्षाला... जसे तमीळनाडु, आन्ध्र, वैगरे...
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Wed, 09/09/2020 - 12:46 नवीन
ही मोडतोड काय आकस ठेऊन केली आहे ते स्पष्ट आहे.
  • Log in or register to post comments
G
Gk Wed, 09/09/2020 - 12:57 नवीन
बेकायदेशीर आहे ते पाडले, कायदेशीर असते तर कंगणाने कायदेशीर उत्तर दिले असते. कोविड असताना का पाडले , हा बचाव सध्या चालला तरी बेकायदेशीर बांधकाम आहे हेच तिनेही सांगितले आहे.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Wed, 09/09/2020 - 13:13 नवीन
थोडे दिवस थांबा.. कधी मजा येते ती बघा. प्रतिसाद नोट करुन ठेवतोय.. उद्या जर कोर्टाने थोबाडीत दिली तर इथे नमूद करायला विसरू नका म्हणजे झाले.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 09/10/2020 - 08:29 नवीन
बेकायदेशीर बांधकाम आहे हेच तिनेही सांगितले आहे. कुठे सांगितले आहे?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 09/09/2020 - 13:10 नवीन
कंगना नी अगोदर च बॉलिवूड मधील अनेक लोकांवर खोटे आरोप केले आहे. येथून पुढे तिला कोण सिनेमात घेईल ह्याची शास्वती कमीच आहे. आता bjp च्य नादाला लागून राजकीय दुश्मन पण निर्माण केले आहेत. आणि तिची जुनी केस ओपन करायची सरकार तयारी करेल. ती राहते त्या घरात सुद्धा तिनी बेकायदा बांधकाम केले आहे . 2018 मध्येच तिला नोटीस दिली आहे. आता ते पण पाडले जाईल हे नक्की. ठाकरे च्य रायगड मधील फार्म हाउस मध्ये जबरदस्ती नी प्रवेश केला म्हणून 3 लोकांना ats ni पकडले आहे. ते aarnav टीव्ही चे पत्रकार होते अशी माहिती आहे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 09/09/2020 - 13:34 नवीन
मुंबईत हजारो अनधिकृत बांधकामे आहेत, ती कोण्याच्या नजरेस कशी काय पडत नाहीत ? कंगना म्हणते की तिचे बांधकाम अनधिकृत नव्हते, पण इथे हे गृहित धरुन चालुया की ती खोटे बोलत आहेत. पण आज अचानक बीमएसीने ती मुंबईत नसताना का पाडले ? तिच्या वकिलाने तिच्या वतीने कायदेशीर उत्तर दिले असुन देखील तिला तिची बाजु मांडायचा वेळ आणि अधिकार का नाकारला गेला.याच बरोबर मुंबई उच्च न्यायालाचा ३० सप्टेंबर कोणतेही बांधकाम पाडता येणार नाही असा आदेश दिला असताना देखील बीएमसी ने या आदेशाचे पालन का केले नाही? याच बरोबर माननिय न्यायालयाच्या आदेशाचा आणि पर्यायाने न्यायालयाचा अपमान / अनादर करत आहोत हे बीएमसीला लक्षात आले नाही का ? संदर्भ :- कंगनाच्या वकिलाने बीएमसीच्या नोटिसला दिलेले उत्तर :- https://pbs.twimg.com/media/EhZDpPrUcAMWbU4?format=jpg&name=large टिवटिव दुवा :- https://twitter.com/KanganaTeam/status/1303303598730702849 मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश :- https://twitter.com/adv_chandnishah/status/1303594876655738881/photo/1 टिवटिव दुवा :- https://twitter.com/adv_chandnishah/status/1303594876655738881 याच बरोबर कंगनाने मुंबई पोलिसांचा अपमान केल्याचे सातत्याने बोलले गेले आहे, याच मुंबई पोलिसांच्या बद्धल माजी मुख्यमंत्री यांनी सध्याच्या मुखमंत्र्यांनी काय उद्गार काढले होते ते खालील व्हिडियोत कळेल. जाता जाता :- सत्तेत असलेल्या एका पक्षाच्या मुंबईत आणि संपूर्ण महाराष्ट्रात जागो-जागी शाखा आहेत, या सर्व शाखा अधिकृत आहेत का ? याची माहिती कुठे मिळेल का ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- #TwoBinsLifeWins [ मेरा बाबा देश चलाता है ]
  • Log in or register to post comments
च
चिर्कुट Wed, 09/09/2020 - 13:55 नवीन
१. तिला २०१८ पासुन अनेक वेळा नोटिसा दिल्या गेल्या होत्या असं वाचलं २. ती स्वतःच ट्विट करून "जो उखाडना है उखाड लो' असं आव्हान देत होती, त्यामुळे आता उखाडल्यावर रडायची काही गरज नाही ३. तिच्या मागे, सुशांतसिंग केस मागे लपून महाराष्ट्र राज्य सरकारची बदनामी कोण करतंय हे सगळ्यांना चांगलंच माहिती आहे ४. इथे फक्त अनधिकृत बांधकाम पाडलंय... फॅसिझम कशाला म्हणतात बघायचं असेल तर डॉ. काफील खान, संजीव भट्टची केस पाहून घ्या असं सुचवतो. बाकी फॅसिझम वाईट, लोकशाहीची किंमत वगैरे बर्याच लोकांना आज कळतंय हे बघून आनंद झाला. शेवटी माझं मत - राज्य सरकारनं चुकीचं धोरण निवडलं. यांच्याकडे दुर्लक्ष करायला पाहिजे होतं. करोणाच्या काळात तरी असल्या फालतू राजकारणाची गरज नाही. भले समोरचे सगळी ताकद तुम्हाला फेल करण्यासाठी लावत असले तरी.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु गुरुवार, 09/10/2020 - 07:15 नवीन
+१
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा गुरुवार, 09/10/2020 - 07:13 नवीन
हा धागा मधेच बोर्डावरून गायब झाला होता.. नेमकी भानगड काय होती?
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 09/10/2020 - 08:12 नवीन
विजुभाऊ अप्रकाशित झालेला धागा परत प्रकाशित झाल्या बद्धल अभिनंदन !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Rafale Jets Induction Live: Boost for IAF amid India China feud, 5 Rafale jets formally join Indian Air Force
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 09/10/2020 - 08:38 नवीन
We find the above conduct of the MCGM highly deplorable, more so since the MCGM was well aware that a Writ Petition would be filed by the Petitioner before this Court at any time, and an application seeking urgent orders will be moved by the Petitioner, and MCGM had therefore filed a Caveat before this Court. We therefore, informed Senior Advocate Shri Sakhare that such conduct on the part of the MCGM is totally unacceptable to the Court. However, Shri Sakhare immediately arranged to bring the Assistant Municipal Commissioner as well as the Executive Engineer (B&F) ssp 7/10 wpl_3011_of_2020__09.09.2020__PART_I.doc of H/W Ward of MCGM online to answer the queries raised by the Court. 7. In response to the queries put to the Assistant Municipal Commissioner, H/ W Ward as well as the Executive Engineer, they have informed the Court as follows: 7.1 That on 5th September, 2020 i.e. Saturday, the Building Mukadam whilst he was in the H/West Ward, noticed some work going on in the said Premises and also certain debris lying outside the said Premises. 7.2 The Mukadam informed about the same to the Assistant Engineer (B&F) of the MCGM. 7.3 The Assistant Engineer (B&F) of the MCGM, who is the Field Officer, informed about the same to the Designated Officer, (B&F), who is the Executive Engineer of H/W Ward of the Corporation. 7.4 The Executive Engineer along with others visited the said Premises on 7th September, 2020 at 11.00 a.m. (Monday), where Shri Nikhil Surve, Manager of the premises of the Petitioner was also present. After Shri Nikhil Surve took permission from Ms. Rangoli, sister of the Petitioner over the phone, the Executive Engineer and others were given access to the said Premises. The Executive Engineer and others inspected the said Premises and prepared inspection notes, inspection report and also notice under Section 354A, addressed to the Petitioner, on the same day i.e. 7th September, 2020, and pasted the Notice on the outer door of the said Premises on 8th September, 2020 (Tuesday) at 10.03 a.m. ssp 8/10 wpl_3011_of_2020__09.09.2020__PART_I.doc 7.5. Exactly after 24 hours, MCGM started the demolition work, which is stopped few minutes back in view of the oral directions of this Court. 8. Section 354A of the Act (which is invoked by the MCGM by issuing the impugned Notice dated 7th September, 2020), sets out the ‘power of Commissioner to stop erection of building or work commenced or carried on unlawfully.’ From the works set out in the Notice, it is clear beyond any doubt that the works which are ‘unauthorised’ have not come up overnight. However, all of a sudden, the Corporation appears to have overnight woken up from its slumber, issued Notice to the Petitioner, that too when she is out of the State, directing her to respond within 24 hours, and not granting her any further time, despite written request, and proceeding to demolish the said Premises upon completion of 24 hours. Though the manner in which the MCGM has proceeded to commence demolition work of the said Premises, prima facie does not appear to be bonafide and smacks of malafide, we are giving an opportunity to the MCGM to explain its stand / conduct on Affidavit by 3.00 p.m. tomorrow. 9. We cannot help but mention here that if the MCGM would act with similar swiftness qua the numerous unauthorized constructions in this City, the City would be a completely different place to live in. 10. In the circumstances, we pass the following Order : (i) We allow the Petitioner to carry out necessary amendments to the Petition. ssp 9/10 wpl_3011_of_2020__09.09.2020__PART_I.doc (ii) We direct the MCGM to file its Affidavit in Reply by 3.00 p.m tomorrow. (iii) In the meantime, the MCGM is restrained from carrying out any further demolition qua the said Premises mentioned in the impugned Notice. (iv) Stand over to 10th September, 2020 at 3.00 p.m. 11. This Order will be digitally signed by the Private Secretary of this Court. All concerned will act on production by fax or email of a digitally signed copy of this Order. मा उच्च न्यायालयाच्या कालच्या अंतरिम निकालाचे शेवटचे पान येथे शब्दश: देत आहे.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 09/10/2020 - 08:51 नवीन
अवांतरा पासून सुरुवात करतोय मग मुद्द्यावर बोलतो - एप्रिल पासून बातम्या पाहत नव्हतो आणि नाही, त्यामुळे यावेळेस काय काय घडले हे नक्की नीट पाहिलेले वाचलेले नाही.. मध्ये सुशांत सिंग मेला आणि त्या अगोदर इरफान दोघे गेल्याचे दुःख वाटले.. ऋषी. कपूर वय होते म्हणुन इतके काही वाटले नव्हते, बच्चन तिकडे गेलेला आवडले होते.. जुनी मैत्री विसरायची नाही.. कंगना चे दरवेळेस चे स्टान्स मला आवडले होते, वाटायचे ही बिनधास्त तोंड देते, ऋत्विक आवडत असूनही मी कंगना ला पाठींबा दिला, कारण मला तिचे बोलणे खरे वाटत होते.. पण सुशांत च्या केस मध्ये ती पडली त्यानंतर तीचा वापर केला जातोय किंवा ती करून देते हे मला वयक्तिक वाटते आहे... आता मुद्द्यावर येतो - शिवसेना, तसे पाहिले तर शिवसेना शांत, कायदेशीर कधी नव्हती, त्यांनी आता ही कुठलेही y security कोणाला दिली तरी विमान पण उतरवून नसते दिले.. उलट कायदेशीर मार्गाने त्यांनी उत्तरे द्यायला सुरुवात केली आहे हे मला जास्त चांगले वाटले.. आणि हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या संगतीने झालेय असे वाटते.. आणि सेनेचा हा बदल मला योग्य वाटतो.. सरकार बनवताना हि उद्धध्व यांनी एक स्टेटमेंट दिले होते, इतके वर्ष आम्ही धर्मावर आधारित राजकारण केले ती चूक होती.. हे हि वाक्य खुप जबाबदारीने आणि हिमतीने म्हणले गेलं आहे.. आणि हा बदल हि मला योग्य वाटतो.. उद्धव ठाकरे मला कधीच आवडत नव्हते, पण ज्या पद्धतीने ते वागत आहे, ते अतिशय योग्य वाटत आहे, कोविड नसता तर त्याचे मुख्यमंत्री पद जास्त उठून दिसलेच असते असे मला 100% वाटते. कोर्टाचा आदेशा विरोधात अनुधिकृत बांधकाम पाडले असेल तर कंगना ने कोर्टातर्फेच शिवसेनेला आव्हान द्यावे.. शिवसेनेचे हे बदललेले रूप मला आवडलं आहे.. कोणाला आवडू वा ना आवडू..
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 09/10/2020 - 09:46 नवीन
भाजप व राष्ट्रवादी यांचना अपेक्षीत असलेले ध्रृविकरण छान चाललंय अस माझं मत आहे. दोधांनाही आपली मतदान टक्केवारी वाढवायची आहे. त्यासाठी कोणाला तरी घरी बसवायला लागते. महाराष्ट्रात समाजवादी, प्रजा समाजवादी, माकप, भाकप, शेकाप वगैरे सगळ्यांना घरी बसवून झालंय. आआप जन्म होता होताच खाली बसलाय. बसपा पण फारसा राहिला नाहिये. राठा यांना घरी बसवून झालंय. आता उठा यांना घरी बसवून त्यांची मते भाजप व शिवसेना वाटून खाणार. खाण्यासाठी फक्त तेवढंच शिल्लक आहे म्हटल्यावर ते दोधे करणार तरी काय? पण सामान्यांना हे कळू नये म्हणून मग सुशांत, कंगनाची फोडणी द्यायची. शिवाय या फोडणीमुळे फोडाफोडीला/फाटाफूटीला चांगली गती मिळून काम सोपे होते. असो.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 09/10/2020 - 10:15 नवीन
आपला अनुभव जास्त आहे, आणि राजकारण बद्दलची मते हि जास्त अभ्यासू असतात, मला यावेळेस मात्र भाजपा आणि राष्ट्रवादी ला मिळून हे अपेक्षित असे काही वाटत नाही.. आणि उद्धव ठाकरे ना घरी बसवायचा वगैरे मुद्दा कदाचीत भाजपा मनात ठेवून असेल राष्ट्रवादी नक्कीच नाही.. सुशांत कंगना ची फोडणी, अर्णब चे शो ह्या सगळ्यामागे राष्ट्रवादी नक्कीच नाही हे कोणीही सांगू शकते.. मी जर भाजपा समर्थक असतो तर पार्टी with diff, व्यक्तिपूजा, चुकीला हि झाकून ठेवणे, आमदार फोडून आणि नाही जमले तर राहुल गांधीला पप्पू म्हणुन बाजार उठवला तसा jr. ठाकरे याचा बाजार उठवू पाहणे.. हे सगळे मला वयक्तिक खुप खालचे राजकारण वाटते.. आणि ह्या पक्षाचे समर्थक होणे मी बंद केले असते.. सरकार पडणार, फोडाफोडी होणार हे सगळे स्वप्न आहे, असले काहीच होणार नाही.. आणि झाले तरी भाजपा चे हात जे अनेक फोडाफोडी करून काळे झालेत ते कधीच पांढरे होणार नाहीत. भाजपा ने जे विकासाचे, पार्टी with diff चे, acche din चे जे स्वप्न दाखवले होते त्यात ते कुठेही खरे उतरले नाहीत.. परवा कुठे तरी वाचत होतो मिपावर, कोणीतरी लिहिले होते राहुलगांधी, mim यावर लिहून हे बदलले अजुन काय acche din पाहिजे.. अरे तुम्हाला हे acche din दाखवण्यास सत्तेत आणले होते का? हा प्रश्न मतदार स्वतःला पण विचारत नाहीये.. मला तर एका पक्षाची तळी भरणारेच आजकाल सगळ्यात जास्त दोषी वाटतात.. जे चूक ते चूक जे बरोबर ते बरोबर यात पवार, मोदी, उद्धव, शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप येतोच कुठे? पण कितीही चूका केल्या तरी आपण समर्थन करणारे पक्ष योग्य आणि इतर भिकार असे समजणारे मला आजच्या या परिस्थित तितकेच दोषी वाटतात.. त्यात देश नही बिकने दूंगा म्हणत.ज्या संस्था pravite करताना त्याची भागीदारी विकली जात आहे त्याचे हि कोणाला काही नाही.. उलट हेच कसे बरोबर हे सांगितले जातेय.. मग हे बरोबर असेल तर देश नही बिकने दूंगा काय होते? कोण देश विकत होते? हिंदू खतरे मे? अरे इतक्या वर्षात जो खतरा नव्हता तो आत्ता आला का? असल्या राजकारणाचा वीट आलाय.. चला थांबतो, मार्च पासून राजकारण पार बाजूला ठेवले hote, असे राजकीय धाग्यावर एक रिप्लाय दिला की मग विचारांच्या अश्या लाइनीच्या लाईनीच उगाच लिहिल्या जातात.. थांबवतो.. राजकारणावर ण बोललेले बरे..
  • Log in or register to post comments
ह
हस्तर गुरुवार, 09/10/2020 - 10:31 नवीन
कन्गना ने बन्गला शरद पवार ह्यान्च्या जवळ्च्या माण्साकडुन विकत घेत्लेला आहे
  • Log in or register to post comments
अ
अथांग आकाश गुरुवार, 09/10/2020 - 10:51 नवीन
माफ करा पण >>>यात देश नही बिकने दूंगा म्हणत.ज्या संस्था pravite करताना त्याची भागीदारी विकली जात आहे त्याचे हि कोणाला काही नाही.. उलट हेच कसे बरोबर हे सांगितले जातेय..>>> यात देश नही बिकने दूंगाचा आणि Privatization च कनेक्शन समजल नाही.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 09/10/2020 - 11:04 नवीन
हो, पुढच्या लाईन मध्ये हेच विचारले आहे.. देश नही बिकने दूंगा काय होते? कोण देश विकत होते? हि घोषणा नक्की कशा साठी होती, या आधी कोणी देश विकला होता? देश विकणे म्हणजे मग नक्की काय? खाणी, तेल, रेल्वे, विमानतळे, defense या सारखी आणि इतर सरकारी संस्था किंवा त्यातील भागीदारी विकणे म्हणजे देश विकणे नाही का? आणि नसेल तर देश नही बिकने दूंगा काय होते? बाकी private करणे म्हणजे, आपली सरकारी हिस्सेदारी विकणे होय.. देश नही बिकने दूंगा म्हणजे मग नक्की काय होते हाच प्रश्न मला पण पडलाय
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 09/10/2020 - 11:09 नवीन
गणेशाजी, मी पुढची मुंबईची मनपाची निवडणुक झाल्यावर निवडणूक टक्केवारी पाहून नक्की काय ते सांगेन. माझ्यामते ती निवडणूक व्हायच्या अगोदर २-३ महिने शिवसेनेचे नगरसेवक राजिनामा देऊन बाहेर पडायला लागतील. पण भाजपा असो की राष्ट्रवादी असो, किंवा आणखीन कोणी असो. कोणितरी मोठे होण्यासाठी कोणत्यातरी एका राजकीय पक्षाला आत्महत्या करायलाच लागणार आहे. ती काळाची गरज आहे. सध्यातरी उठा कार्यक्षम मुम बनू शकत नाहीत एवढे जरी सिध्द झाले तरी पुढच्या निवडणुकात राष्ट्रवादी व भाजपाला त्याचा फायदा होईल एवढे साधे गणित आहे असे माझे मत आहे. जर शिवसेना झटकन चिडत असेल तर तिला राग येईल असे करायचे की झाले. मग ते आपणहून चूकीची पावले किवा भाषा वापरतात. जेवढ्या प्रमाणात हे घडेल तेवढ्या प्रमाणात अजीत पवार चांगले मुम बनतील असं पुढच्या निवणुकीत सांगता येऊ शकते. भाजपाचा मुम चेहरा तयार आहेच. काॅंग्रेसकडे तर चेहरेच चेहरे आहेत! हल्लीच्या निवडणुकांत मुमच्या चेह-याला जास्त महत्व आलंय. हा खूप मोठा बदल आहे. हे लक्षात आल्यामुळे राठांनी देखील मुम बनण्याची घोषणा मागे कधीतरी केली होती!! उठा मुम झाल्यावर इथे बरेच जण त्यांच्याबद्दल चांगले बोलत होते. आता ते प्रमाण कमी होतंय. याचा अर्थ या राजकारणाला यश येतंय असा मी घेतला आहे. आपले पक्षीय प्रेम बाजूला ठेवता आले तर कोणीच वाईट किंवा चांगले असे न दिसता ही लोकं फक्त बुध्दीबळ खेळताहेत असंच दिसेल.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 09/10/2020 - 11:36 नवीन
शाम जी, तुमच्या पेक्षा मी अर्ध्या वयाचा असेल, त्यामुळे जी वगैरे नका बोलू. गणेशा बोला फक्त.. बाकी तुमचा टक्केवारीचा धागा आणि विश्लेषण वाचेलच. उद्धव ठाकरे माझ्या मते जास्त चांगले मुख्यमंत्री आहेत असे वाटते मला.. अजित पवार कसे हि असले तरी काम कारण्याचा धडाका त्यांचा जबरदस्त आहे.. रोखठोक.. पण मुख्यमंत्री उद्धव जास्त शोभतात आणि हे मला वाटेल असे कधी वाटले नव्हते.. बाकी प्रतिमा मलिन करणे हे भाजपा 2014 पासून करते आहे.. सोशल मीडिया, it cell ह्या काळातच विक्राळ रूप घेऊन आलाय.. पण हे बुमरँग पण होते, आणि त्याची फळे त्यांना पण मिळतीलच..
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु गुरुवार, 09/10/2020 - 11:54 नवीन
माझ्यामते ती निवडणूक व्हायच्या अगोदर २-३ महिने शिवसेनेचे नगरसेवक राजिनामा देऊन बाहेर पडायला लागतील.
पण ते जातील कुठे? माझ्या मते आयारामांना पक्षात घेऊन देवेंद्रजींनी फार मोठी चूक केली आहे आणि ते पुन्हा अशी चूक करणार नाहीत.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 09/10/2020 - 12:26 नवीन
जागावाटप शिवसेनेला त्रासदायक असणारेय. तिघांत वाटण्या करायच्या आहेत. तर भाजपाला कोणाला फारसं काही वाटायचं नाही. त्यामुळे भाजपात नाराजी नसणरेय. तर शिवसेनेत असणारेय. आपल्या जागा टिकवायच्या व शिवसेनेच्या वाट्याच्या जास्तीत जास्त मिळवायच्या हे धोरण भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेसचे असणारेय असं मला वाटतेय. त्यामुळे शिवसेनेचा आत्ताचा नगरसेवक मिळत असेल तर भाजप संधी सोडेल असं वाटत नाही. शेवटी हे नगरसेवकांच्या संख्येचे राजकारण आहे. हे असेच चालणार.
  • Log in or register to post comments
अ
अथांग आकाश गुरुवार, 09/10/2020 - 12:52 नवीन
बरोबर आहे! पटतंय!!
  • Log in or register to post comments
र
राघव Mon, 09/14/2020 - 07:45 नवीन
फक्त हे २-३ महिने अगोदर न होता एक-दीड वर्ष अगोदर होईलसं वाटतं. - कॉ+राकॉ समवेत जाऊन सेना मतं मागायला लोकांकडे जाईल असं वाटत नाही. तसंही ते केलं तर भाजपला ध्रुवीकरणाचा सरळसोट फायदा होईल. - सेना वि भाजप वि कॉ+राकॉ असं झालं तरीही भाजपलाच सगळ्यात जास्त फायदा होईल. त्यामुळे अशीच वेळ आली तर कॉ आणि राकॉ पण वेगळे लढतील. चौरंगी लढतीचा आधीचा निकाल पाहता आणि नंतरचा कालखंड पाहता, संपूर्ण बहुमतानं कोणताही पक्ष जिंकणार नाही. त्यामुळे पुन्हा तडजोडीचेच राजकारण. फरक शून्य. यात भाजप आणि सेना एकत्र येऊनच पुढे गेल्यास सगळ्यात योग्य आहे. सध्याची चिखलफेक बघता ते सहजशक्य नाहीच. त्यात पुन्हा आग लावून नामानिराळे राहणारे जाणते राजे आहेतच. पण राजकारणातल्या राजकीय लाभासाठीच्या कोलांटउड्या अनाकलनीय असतात. त्यामुळे हे अगदीच अशक्य आहे असंही नाही. :-)
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 09/14/2020 - 08:41 नवीन
आता शिवसेनेशी युती भाजपचे मतदार सहन करतील असे वाटत नाही.. सध्या परत सत्ता नाही अली तरी चालेल, अजित पवार पण चालेल, पण शिवसेना नको असाच सूर बहुतांशी पारंपरिक मतदारांचा आहे. Sample सेट मर्यादित
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Mon, 09/14/2020 - 10:29 नवीन
काही जण, हिन्दुत्ववादी युती सोडुन शिवसेना गेल्यावर पण शिवसेनेबद्दल शांत होते. शिवसेनेच्या सोबतीने आघाडी मध्ये जर हिन्दुत्ववादी राजकारणाची सुरुवात होणार असेल काय हरकत आहे, हा त्या मागचा विचार. नाहीतरी सध्या हिन्दुत्ववादी मते भाजपला एकट्यालाच मिळत आहेत. शिवाय एका मराठी प्रादेशिक पक्षाने, राष्ट्रिय पक्षाला धक्का दिल्याचा नाही म्हटले तरी आनंद होताच. अर्थात हा आनंद काही फार काळ टिकला नाही. भाजपवर सेना गुरकावत तरी होती. इथे काँग्रेस समोर शिवसेना गप्प बसते. पण सत्ता स्थापनेपासुन शिवसेनेच्या निधर्मी होण्यासाठी चाललेल्या कोलान्टऊड्या, कंगना प्रकरणाची हाताळणी आणि नौदल अधिकार्‍याला मारहाण, ह्याशिवाय शिवसेनेवर टीका केली म्हणुन इतर हिन्दुत्ववादी कार्यकर्त्यांनावर दाखल होणारे गुन्हे यातून गेलेला संदेश म्हणजे शिवसेनेने हिन्दुत्ववादी राजकारणाला दिलेली सोडचिठ्ठी, त्यामुळे परत सेना नकोच.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा गुरुवार, 09/10/2020 - 10:19 नवीन
खरे आहे.. पण गोची अशी आहे की, थोरले पवार असेपर्यंतच राष्ट्रवादी आजच्या स्वरूपात राहील.. त्यामुळे अजून ५ वर्षांनी जेव्हा ते फारसे सक्रिय नसतील तेव्हा राष्ट्रवादीचे नेमके स्वरूप काय असेल? त्यांच्यात अंतर्गत देखील खूप कुरघोडीचे राजकारण चालू आहे. सबब, वादासाठी मान्य केले तरी शिवसेना आणि काँग्रेस यांची मते आटत जाऊन विभागली जाईल असे मला वाटत नाही. अवांतर - शिवसेना राष्ट्रवादी विलिनीकरण कसे वाटेल बघायला? शिवसेनेतल्या मोठ्या नेत्यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश द्यायचा.. उरलेल्यांना मनसेत पाठवायचे.. काँग्रेसमधले असंतुष्ट पण गळाला लावायचे, की झाले काम. पण उत्तराधिकारी कोण?
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 09/10/2020 - 11:25 नवीन
महाराष्ट्रीय दृष्ट्या ने विचार केला तर, शरद पवार, गोपीनाथ मुंडे, विलास राव देशमुख, नितीन गडकरी, बाळासाहेब ठाकरे, दिघे यांच्या नंतर ह्या जागा लवकर कोणी भरेल असे मला वाटत नाही.. शिवसेनेतील इतर नेते मला अजिबात अनुभव आणि कामाचा तडाखा असलेले वाटले नाहीत.. कामाच्या बाबतीत राष्ट्रवादी आत्ता सर्वात पुढे अ आहेत असे मला वाटते तरी प्रतिमेच्या बाबतीत ते मागे पडतात.. भाजपाचे नेते, देवेंद्र, महाजन आणि चंद्रकांत पाटील हे नेते आणि आयात केलेले काही नेते यांना लोकनेता म्हणता येऊ शकते? हा प्रश्न त्यांना हि पडला पाहिजे.. राष्ट्रवादी मध्ये जयंत पाटील आणि नविन नेतृत्व रोहित पवार मला दिलखेचक वाटतात.. रोहित चे त्याच्या मतदार संघातील काम भारीच वाटतेय (काय केले विचारू नये, वेळोवेळी follow केले आहे, लोकांशी बोललो आहे तिथल्या.. येथे तो मुद्दा नसावा ) पण एकंदरीत असे नेते होणे नाही.. जसे देशाला अलीकडच्या काळात मिळालेले अटल बिहारी जी आणि मनमोहन सिंग यांच्या सारखे चांगले नेतृत्व मिळाले तसे देशात हि पुन्हा नेतृत्व मिळेल का असे वाटत नाही, पण माझा अवाका महाराष्ट्रा पुरता असल्याने कोणी तसे असेल अशी आशा करतो.. बाकी महाराष्ट्रात नंतर, पक्ष विलीन होतील का नाही माहित नाही, पण भविष्यात केंद्रातील बड्या नेत्यांपुढे महाराष्ट्राला कायम नमते घ्यावे लागेल, महत्वाची कॉन्ट्रॅक्ट,नविन उद्योग धंदे आणि इतर नविन project महाराष्ट्रात येण्याला अवघड होईल हे नक्की.. बऱ्याच लोकांना, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनेच कामे करावी लागतील.. महाराष्ट्रातल्या नेत्यांना कोणी विचारणार नाही.. आणि बरेच.. चार-पाच दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या DPIIT विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या व्यवसाय सुधार कृती आराखड्या (BRAP) अंतर्गत Ease of Doing Buissness २०१९ चं राज्यांना देण्यात आलेलं रँकिंग जाहीर करण्यात आलं. या रँकिंगमध्ये महाराष्ट्र तेराव्या क्रमांकावर आहे. याबाबत राज्याच्या विरोधी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी फेसबुकवर विस्तृत पोस्ट लिहून राज्य सरकारवर टीका केली. महत्वाचं म्हणजे Ease of Doing Buissness २०१९ चं जे रँकिंग जाहीर केलं ते मुळातच केंद्र सरकारने सांगितलेल्या सुधारणा कशाप्रकारे अंमलात आणल्या या आधारावर केलेलं असून २०१९ साठीचं आहे. दुसरं म्हणजे २०१६ मध्ये या रँकिंगमध्ये महाराष्ट्र १० व्या क्रमांकावर होता, तर २०१७-१८ मधील रँकिंग मध्ये १३ व्या क्रमांकावर घसरला आणि २०१९ मध्येही हा १३ वा क्रमांक कायम आहे. आता यामध्ये महाविकास आघाडी सरकारचा काय संबंध? आणि समजा सबंध असेल तर मग यात फक्त सध्याच्या सरकारचीच जबाबदारी आहे का? मागच्या सरकारची जबाबदारी नव्हती का? त्यामुळे विरोधाला विरोध न करुण आपण मुळ प्रश्न विचारात का घेत नाही, की आपली अधोगती का होतीये.. असो..
  • Log in or register to post comments
अ
अथांग आकाश गुरुवार, 09/10/2020 - 11:52 नवीन
परवा कामासाठी चिपळूणला जाणे झाले. तिकडे परिचितांच्या घरी जवळच्या गावचे वयस्कर सरपंच आले होते. हे गृहस्थ हाडाचे शिवसैनिक. त्यांच्या व्यथा ऐकल्यावर असं होण्याची शक्यता जास्त वाटत्ये. त्यातले काही मुद्दे भावनिक असले तरी ते बरोबर वाटले. निवडणूक प्रचारादरम्यान प्रतिस्पर्धी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी झालेले राडे आणि राजकीय भूमिकेतून निर्माण झालेले शत्रुत्व यांचा चांगला फटका पक्षाला बसला आहे. शिवसेनेचे पद्धतशीर खच्चीकरण सुरु असून निवडून आलेला लोकप्रतिनिधी त्यांना सहकार्य करत नाही. त्यामुळे कामे होत नसल्याने गावकरी आणि कार्यकर्ते नाराज आहेत. आणीआमचे नेते मात्र ज्यांच्या विरोधात आम्ही रान उठवले होते त्यांच्या मांडीला मांडी लाऊन सरकारमधे बसले आहेत. ज्या छगन भुजबळांनी त्यांच्यासाठी देवासमान असलेल्या बाळासाहेबांना अटक करायला लावली होती त्यांच्या मुलाच्या मंत्रिमंडळात भुजबळांना दिलेले स्थान. त्यावरून पण नाराजी आहे.मला वाटते अशी लोकभावना राज्यात अनेक ठिकाणी असावी.अशी नाराज मंडळी भाजपा किंवा राष्ट्रवादी कडे वळण्याची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 09/10/2020 - 09:06 नवीन
राज ठाकरेनी मोदी विरोधात लाव रे तो व्हिडीओ म्हणून सभा घेतल्या की लगेच त्यांना ईडी ची नोटीस येते , चौकशी मागे लागते , तेव्हा तुझा धर्म कुठे जातो राधेसुता ! हॅ हॅ हॅ .. हे राजकारण आहे हे असेच असते.
  • Log in or register to post comments
र
राघव Mon, 09/14/2020 - 07:55 नवीन
राठांची तर जाणत्या राजांनी पार गोची करून टाकलेली आहे. इतकं पेटवलं रान, फायदा शून्य. आता सेना भाजपसोबत नाही तरीही यांना भाजपसोबत जाण्यासाठी तोंड ठेवलेलं नाही. त्यामुळे न आड न विहिर.. इथं फक्त रुक्ष माळावरची पायवाट उरली आहे. पण खरंतर आता त्यांनी संधी साधून भाजपसोबत हातमिळवणी करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावेत. सेनेचे भाजपसोबत पुन्हा सूत जुळायच्या अगोदर असे केले तर मनसेला जीवदान मिळण्याची चांगली शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 22 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 23 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 23 hours ago
  • सुंदर !!
    1 day 23 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 23 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा