Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

कधी होणार सामान्य माणसाचे आयुष्य सुखकर

आ
आर्यन मिसळपाववाला
Sat, 08/15/2020 - 19:10
🗣 194 प्रतिसाद
कोण आहे जबाबदार ह्या सर्व गोष्टींना. 1. पूर्णतः कोलमडलेली प्रशासकिय व्यवस्था 2. बेफान राजकीय बजबजपुरी आणि भ्रष्ताचार 3. बेफिकीर सामान्य माणूस 4. धर्म जात आधारित प्रचंड लोकसंख्या 5. प्रादेशिक अजेन्डा (नोकरी आणि धंदा करणारी जमात) 6. अडाणी आणि अशिक्षित लोक 7. परदेशी स्थायिक नागरिक 8. राजकीय व्यवस्थेचा भयंकर तिटकारा असणारे सो कॉल्ड सुशिक्षित लोक 9. व्यवस्थेला लुटणारे भांडवलदार आणि टॉप सरकारी अधिकारी खेदाने म्हणावे वाटतेय कि गुलामी ब्रिटिश सरकार बरे होते, सामान्य लोकांचे तरी विचार करायचे देशाची लुट करून... **** इतर आवांतरे, व्यक्तिगत टिका, शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी आणि धागा विषयास संबॅधित चर्चा सहभागासाठी अनेक आभार

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 56081 views

🗣 चर्चा (194)
प
प्रलयनाथ गेंडा… Sat, 08/15/2020 - 20:56 नवीन
(३० वर्षे वाट पाहून ) राम मंदिर झालंय, म्हणजे प्रभु रामाला सुद्धा एव्हडी वाट पाहावी लागली... सर्व सामान्यांनी त्या प्रपोर्शननुसार मनाची तयारी करावी... वाट बघा..
  • Log in or register to post comments
G
Gk Sun, 08/16/2020 - 03:46 नवीन
तुमच्याकडे अजून मोदी पंतप्रधान झाले नाहीत ?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 08/16/2020 - 04:45 नवीन
भारी होता....=)) आता आमच्याकडे कोणतेही प्रश्न उरलेले नाहीत. आमच्या मेंदूचं आता काहीही काम उरलेलं नाही, म्हणजे आता कोणतेही प्रश्न उरलेले नाही सर्व अलबेल आहे. That's All. -दिलीप बिरुटे (दिवा-बत्तीत खुश असलेला आत्मनिर्भर)
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sun, 08/16/2020 - 07:02 नवीन
लोकशाही स्वतःच्या लायकीचं नेतृत्व निवडते आणि जनतेच्या जीवनाचं भवितव्य मग त्या नेतृत्वाच्या हाती जातं. थोडक्यात, आपल्या आयुष्याचं काय करायचं हा निर्णय सामन्य माणूसच घेतो. त्यामुळे सामान्य मानसाच्या जीवनात तुम्ही नमूद केलेली सर्व सुखं येण्यासाठी दोनच मार्ग आहेत : १. समाज प्रबुद्ध होणं किंवा २. ज्याला हे बदल घडावेसे वाटतायंत त्यानं राजकारणात सक्रीय सहभागी होणं. पहिला मार्ग वेळ काढू असला तरी हमखास आहे आणि दुसरा मार्ग डायरेक्ट दिसला तरी अवघड आहे; शिवाय तो पुन्हा लोकांनी तुमच्याकडे नेतृत्व सोपवण्यावर म्हणजे त्यांच्या प्रबुद्धतेवरच अवलंबून आहे. तस्मात, वेल इन्फॉर्म्ड डेमॉक्रसी हा एकमेव उपाय सामान्यांचं जीवन सुखकारक करतो. भारताचं दुर्दैव असं की आतापर्यंत अशिक्षित आणि गोरगरीबांना फसवून लोक सत्ता काबीज करत होते आणि सुशिक्षितांनी कितीही आपटली तरी फरक पडत नव्हता कारण शेवटी बहुमताचा प्रश्ण ! आताच्या सरकारनं सुशिक्षितांना उल्लू बनवून सत्ता काबीज केली आहे त्यामुळे आता देशाचं भवितव्य कायमचं अंधारात गेलंय ! सुशिक्षितांची पोटं भरलीयेत, त्यांना गरीबी फक्त ऐकून माहिती आहे. त्यांना नोटबंदीत किती मेले, बुलेट ट्रेनचा देशाला काय उपयोग आहे, पटेलांच्या पुतळ्यानं देशाचं काय भलं झालं, सर्जिकल स्ट्राईकसारख्या निर्बुद्ध लॉकडाऊनमुळे करोडो लोकांचे किती अतोनात हाल झाले, जिएसटीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची काय वाट लागलीये, रिजर्व बँकेच्या पावणे दोन लाख कोटींच्या गंगाजळीवर सरकारनं कसा हातोहात डल्ला मारला आहे. सत्तेतले भ्रष्ट आणि गुन्हेगार नेते हद्दपार झाले का त्याहीपेक्षा बिकट परिस्थिती ओढवली आहे ? न खाऊंगा, न खाने दूंगा वाला स्वतःच ऐतखाऊपणा करुन सगळा पब्लिक सेक्टर स्वतःची इस्टेट असल्यासारखा वापरतोयं का ? पेट्रोल, डिजेल आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती किती वर गेल्यात ?.... याच्याशी काही देणंघेणं नाही. त्यांना राममंदीराचा खुळखुळा मिळाला की खुष, ज्याला साधं समोर लिहिलेलं वाचता येत नाही त्याच्या योजनांना किती हवा देतोयं याची कल्पनाच नाही. आता काही अपूर्व चमत्कार घडला तरच देशातल्या सामान्यांचं आयुष्य सुखकर होईल.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 08/17/2020 - 13:43 नवीन
आताच्या सरकारनं सुशिक्षितांना उल्लू बनवून सत्ता काबीज केली आहे त्यामुळे आता देशाचं भवितव्य कायमचं अंधारात गेलंय ! हे जर खरे असेल तर दोन, तीन गोष्टी सिद्ध होतात १) दोन्ही सुशिक्षित आणि अशिक्षित यानं उल्लू बनवले असणार ... त्याशिवाय ३०० चा आकडा कसा गाठता आला ? २) वरील दोन्ही प्रकारचे लोक त्याच लायकीचे असले पाहिजेत नाही का? त्याशिवाय उल्लू कसे बनले आणि त्या मुले आता तक्रारीला जागा नाही ,, बसा बोंबलत आणि जाता जाता .. गेली ६० वर्षे जनता उल्लू नवहती वाटत..खूप डोकं लढवून त्यांनी एकाच कुटुंबाला भरघोस ( ४००+ राजीव गांधी आठवा) मते दिली नाही का ! आणि आपले कल्याण करून घेतले .
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक गुरुवार, 08/20/2020 - 11:45 नवीन
खूप डोकं लढवून एकाच कुटूंबाला भरघोस मते! :)) :))) ;)
  • Log in or register to post comments
प
प्रलयनाथ गेंडा… Sun, 08/16/2020 - 07:37 नवीन
लोकशाही स्वतःच्या लायकीचं नेतृत्व निवडते आणि जनतेच्या जीवनाचं भवितव्य मग त्या नेतृत्वाच्या हाती जातं.
१०० टक्के सहमत. आताच्या घडीला, कोरोना सुद्धा, इष्टापत्ती वाटून घेण्याचा ऍटीट्युड, शिस्तबद्ध पद्धतीने प्रचारीत केला जातोय. उदा. (मत देण्याचे) कर्मण्ये वाधिकारस्ते, (सर्व सामान्यांनी) मा फलेषु कदाचन.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 08/16/2020 - 18:00 नवीन
देशात अन्न धान्य च पुरवठा मुबलक होत आहे देशात रेल्वे सेवा व्यवस्थित चालू आहे देशात शिक्षण सर्वांना मिळत आहे देशात रोजगार उपलब्ध आहे. देशात रोज दंगे होत नाहीत. देशात तुमच्या घरात घुसून तुम्हाला कोणी बाहेर काढत नाही. देशात तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. देशात सर्रास तुमची संपत्ती लुटली जात नाही. कष्ट करण्याची तयारी असेल तर देशात कोणीच उपाशी नाही. सरकार निवडणे जनतेच्या हातात आहे चांगले लोक निवडा सरकार चांगले मिळेल.
  • Log in or register to post comments
आ
आर्यन मिसळपाववाला Sun, 08/16/2020 - 19:07 नवीन
प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वाचे धन्यवाद. लोकशाही स्वतःच्या लायकीचं नेतृत्व निवडते १००% सहमत. याचा अर्थ लोकाना पन हेच पाहिजे आहे अस काधु शकतो का ??
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sun, 08/16/2020 - 19:55 नवीन
याचा अर्थ लोकाना पन हेच पाहिजे आहे अस काधु शकतो का ??
लोकांना एक दिखावा दाखवला गेला की : १. भ्रष्टाचार संपेल २. किंमती कमी होतील ३. फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापित करुन सगळे गुन्हेगार राजकारणातून हद्दपार होतील ४. एकूणात सगळ्यांसाठी अच्छे दिन येतील अश्वासनं देणार्‍यांचा इतिहास आणि संपूर्ण सायकॉलॉजीचा यथासांग अभ्यास करुन मी इथे २०१४ सालीच सांगण्याचा प्रयत्न केला की हा फ्रॉड आहे. पण प्रचाराचा धुराळा इतका बेमालूम उडवला गेला की विरोधात बोलणारा देशद्रोही, त्याला पाठवा वन-वे तिकीट देऊन सिरियाला ! आणि शेवटी बहुमताच्या जोरापुढे काय पाड लागणार ? जबरस्त बहुमत मिळाल्यावर वाट्टेल ते केलं आणि त्याचे काहीही परिणाम झाले तरी सगळं भारी चाललंय असा इतका भयानक प्रचार केला गेला की देशातले सगळे आवाज दाबले गेले. २०१९ ला पाच वर्षात `सामान्य माणसाचं आयुष्य सुखकारक झालं की नाही' हा मुद्दाच निकालत निघाला ! जे काही झालंय (वरचा प्रतिसाद बघा) तेच भव्य दिव्य आहे आणि आता हा अश्वमेधाचा वळू कुणीही रोखू शकत नाही अशी परिस्थिती झाली. आता लोकांना सामान्य माणसाचं आयुष्य सुखकारक झालं की नाही यात काहीही इंटरेस्ट राहिला नाही. सर्वेसर्वा त्यांचासाठी युगपुरुष झालेत. ते म्हणतील ते देशाचं हित आणि त्यांच्याविरुद्ध बोललात की तुमचं काय होईल याचा नेम नाही. त्यासाठी तुम्हाला घराबाहेर पडायला हवं असं काही नाही. कोणताही पब्लिक फोरम, तुमचं घर, तुमचे मित्र, तुमचे नातेवाईक कुठेही तुमची परिस्थिती दयनीय होऊ शकते.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sun, 08/16/2020 - 20:25 नवीन
यथासांग अभ्यास करुन मी इथे २०१४ सालीच सांगण्याचा प्रयत्न केला की हा फ्रॉड आहे > वाचा : अरविंदबरोबर दीड तास
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 08/17/2020 - 06:27 नवीन
अरेरे आपल्याकडे कुणीच लक्ष देत नाहीये का? तेसुद्धा २०१४ पासून ? मग आता २०२४ला पण हेच सरकार येणार आहे तुम्ही काय करणार?
  • Log in or register to post comments
ज
जिन्क्स Mon, 08/17/2020 - 09:23 नवीन
प्रत्येक धाग्यावर असं वैयक्तिक होणं टाळता येईल का? आशा कुसपटीतुन सुरू झालेला वाद पुढे बऱ्याच वैयक्तिक अपशब्दांपर्यंत जातो. आशचर्य याचं वाटत की तुमच्या अपशब्दांकडे संयोजक मंडळ सपशेल दुर्लक्ष करते. शेवटी All are equal. But some are more equal than others हेच खरं
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Mon, 08/17/2020 - 10:13 नवीन
संक्षी साहेब ते सगळं जावु द्या. आम्हाला एकदाच सांगा सर्व बाजुंनी परिपक्व, तुमच्या सगळ्या मते मांडलेल्या बाजुंनी चालणारे असे कोणत्या पक्षाचे सरकार तुम्हाला सत्तेत यायला हवंय? हे एकदा कळलं तर आम्ही उपकृत होवु.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Mon, 08/17/2020 - 10:34 नवीन
सध्या अमक्यालाच (डायरेक्ट) पंतप्रधान करायचं हे ठरवून संपूर्ण देश मतदान करतो ही फंडामेंटल चूक सर्वांनी मनातून हद्दपार केली पाहिजे. त्यामुळे आपल्या मतदारसंघातल्या उमेदवारांची कोणतीही पारख न करता सरसकट पक्षाला मतदान केलं जातं. उमेदवार नालायक असेल तर तुमच्या मतदारसंघात काय प्रो-पब्लिक पॉलिटिक्स होणार ? तो उमेदवार केवळ शीर्षस्थ नेत्याची आरती ओवाळण्यात धन्यता मानणार, त्याला मतदारांचा विचार करण्याची गरजच वाटणार नाही. तस्मात, प्रत्येक नागरिकानं आपाल्या मतदारसंघातल्या उमेदवाराला मत देतांना या गोष्टी बघायला हव्यात : १. उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी > कामीत कमी गुन्हेगारी खटले असलेला उमेदवार हवा. २. त्याची शैक्षणिक आहर्ता ३. त्यानी आतापर्यंत तुमच्या मतदारसंघासाठी केलेलं काम ४. त्याच्याशी जनसंपर्क करण्याची सुलभता मग भले तो उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो. एक माणूस म्हणून तो जवाबदार, सुशिक्षित आणि कमीतकमी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला हवा. इतकं साधं धोरण सर्वांनी अवलंबलं तर राजकीय परिस्थिती एकाच निवडणूकीत बदलेल. अर्थात, याव्यतिरिक्त सत्ताबदलाचा कोणताही मार्ग नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Mon, 08/17/2020 - 11:39 नवीन
उमेदवार केवळ शीर्षस्थ नेत्याची आरती ओवाळण्यात धन्यता >>> असे उमेदवार काँन्ग्रेस मध्ये किती होते याची यादी बनवा. आणि भाजप मध्ये कीती होते याची पण बनवा. गेला बाजार तुम्ही म्हणताय त्या प्रमाणे कोणत्याही वार्डात असा उमेदवार सापडणं कठिण आहे. आणि जरी सापडला तरी त्याला बाकीचे निवडुन आलेले उमेदवार साथ देणार नाहीत. कारण लोकांनाही असा प्राणामिक शिकलेला उमेदवार नको असतो. आणि असा पक्ष सुध्दा निवडुन आला तरी मतैक्यासाठी त्रिशंकु स्थिती निर्माण होते हे तर तुम्ही जाणताच.
  • Log in or register to post comments
आ
आंद्रे वडापाव Mon, 08/17/2020 - 12:41 नवीन
आता प्रमोद साहेब तुम्हीही सांगा पाहू ... कोणत्या पक्षाचे सरकार तुम्हाला सत्तेत यायला हवंय? की ज्यामुळे , लेखात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील ... आणि सामान्य माणसाचे आयुष्य सुखकर होईल तुम्ही ही आढेवेढे न घेता उत्तर द्या पाहू ... तुमची याबतीतील मत एकदा कळलं तर आम्हीही उपकृत होवु.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Mon, 08/17/2020 - 12:57 नवीन
अरे आंद्रे एव्हढं काय मनाला लावुन घेतोस शोन्या! माझा कधी प्रतिसाद पाहिलास का कि ज्यात मी प्रतिस्पर्धी म्हणुन सारखं हे सरकार किंवा ते सरकार पाहिजे असं पिंका टाकत असतो नाही ना. मी संक्षींना त्यांना कोणते सरकार हवं आहे जे आजच्या घडीला अति निस्पृह आहे असं वाटतंय म्हणुन त्यांचे मत पहात होतो. पण तु आलास चालत्या गाडीत चढायाला. मि. कुल गाय नाईस (थंड डोक्याच्या माणासा) मला कोणतही सरकार चालेल जे हा १५० कोटी लोकांचा गाडा पुढे घेवुन जाईल… साला ब्रम्हदेवाचा बाप जरी आला तरी काहीच होणार नाही कारण एकच लोकसंख्येचा भस्मासुर… सालं आकाश फाटलं तर ठिगळं तरी कुठे कुठे लावत बसणार….. म्हणुन ते नियंत्रण कराणारे कोणतेही सरकार मग साम्राज्य शाही, हुकुमशाही अथवा राजेशाही काही हे आणा. कॉंग्रेस असो , भाजपा असो वा जनता दल कोणतही चालेल.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Mon, 08/17/2020 - 13:05 नवीन
तुम्ही आपापसात बखेडा करण्यापेक्षा माझा मुद्दा बघा, एकदम नामी आहे. हे पक्षीय राजकारणच भारताच्या लोकशाहीला मिळालेला शाप आहे.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Mon, 08/17/2020 - 12:55 नवीन
१.
असे उमेदवार काँन्ग्रेस मध्ये किती होते याची यादी बनवा. आणि भाजप मध्ये कीती होते याची पण बनवा.
काय मिळणार अशी यादी मिळवून ? तुम्ही माझा प्रतिसाद वाचा : नागरिकांनी (पक्षाकडे न पाहता) केवळ उमेदवाराची लायकी पहायला हवी. २.
गेला बाजार तुम्ही म्हणताय त्या प्रमाणे कोणत्याही वार्डात असा उमेदवार सापडणं कठिण आहे.
आमच्या मतदार संघात २०१९ ला, मुकुंद किर्दत नांवाचा एम. टेक., अत्यंत लोकाभिमुख आणि शून्य गुन्हेगारी बॅकग्राउंडचा उमेदवार `आप'नी दिला होता. माझं धरुन त्याला ७९० मतं पडली ! आणि हाइट म्हणजे आमचा मतदारसंघ अत्यंत सुशिक्षित आणि प्रबुद्ध समजला जातो ! जवळच्या मित्रांना आणि नातेवाईकांना विचारलं तर त्यांना हा उमेदवारच माहिती नव्हता. मला म्हणाले तू आधी का नाही सांगितलंस ! हीच का आपली जाण ? ३.
आणि जरी सापडला तरी त्याला बाकीचे निवडुन आलेले उमेदवार साथ देणार नाहीत. कारण लोकांनाही असा प्राणामिक शिकलेला उमेदवार नको असतो.
एकदा सर्वांनी चांगला उमेदवारच निवडायचा म्हटल्यावर बाकीचे कोण येणारेत ? आणि लोकांना असा प्राणामिक शिकलेला उमेदवार नको असतो ? हे लोक कोण ? अहो, आपणच तर मतदार आहोत ! ४.
आणि असा पक्ष सुध्दा निवडुन आला तरी मतैक्यासाठी त्रिशंकु स्थिती निर्माण होते हे तर तुम्ही जाणताच
तीच तर लोकशाहीची मेख आहे : तुम्ही चांगला उमेदवार निवडा (पक्ष बघू नका) > एकदा चांगले लोक एकत्र आले की तुम्हाला चांगलं सरकार मिळेल. आणि लोकशाहीत सामान्य माणसाचं जीवन सुखकारक व्हायला सुशिक्षितांनी राजकारणाभिमुख होणं गरजेचं आहे. माझ्यावर इथे किती हल्ले झाले ते बघा. परिणामांची तमा न बाळगता इथे जिएसटीचा मी एकहाती विरोध केला, आता सध्याच्या वाढलेल्या किंमती पाहा. शेवटी एकमेव मार्ग हाच आहे > पक्ष बघू नका चांगला उमेदवार निवडा, तुम्हाला चांगलं सरकार मिळेल.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 08/18/2020 - 16:18 नवीन
आमच्या मतदार संघात २०१९ ला, मुकुंद किर्दत नांवाचा एम. टेक., अत्यंत लोकाभिमुख आणि शून्य गुन्हेगारी बॅकग्राउंडचा उमेदवार `आप'नी दिला होता. माझं धरुन त्याला ७९० मतं पडली ! आणि हाइट म्हणजे आमचा मतदारसंघ अत्यंत सुशिक्षित आणि प्रबुद्ध समजला जातो ! जवळच्या मित्रांना आणि नातेवाईकांना विचारलं तर त्यांना हा उमेदवारच माहिती नव्हता. मला म्हणाले तू आधी का नाही सांगितलंस ! हीच का आपली जाण ? हायला जो माणूस १० लाखाच्या मतदारसंघात निवडणुकीच्या अगोदर केवळ ७९० इतक्याच माणसांना ओळखतो, तो निवडून आल्यावर बाकी नऊ लाख९९ हजार माणसांना भेटणार केंव्हा आणि त्यांची कामे केंव्हा करणार? ज्या माणसाला राजकारणात काम करायचं आहे त्याचा जनसंपर्क जबरदस्त असायला पाहिजॆ. आपल्या वातानुकूलित केबिन मध्ये बसून जनतेची कामे होत नाही. फार तर असा माणूस प्रशासनिक सेवेत यशस्वी होऊ शकेल. बाकी अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पक्षातील सर्व लोकांना उल्लू बनवून आपला स्वार्थ साधला आणि अण्णा हजारे सारख्या माणसांचाहि विश्वासघात केला त्याचे राज्य आपल्याला यायला हवंय? पांडुरंग हरी. .
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Tue, 08/18/2020 - 20:28 नवीन
का २०१४ नंतर खास लावून घेतली ? त्यांना समोर धरलेलं वाचता येत नाही, तुम्हाला वाचता येतं पण मुद्दा समजत नाही. १.
जो माणूस १० लाखाच्या मतदारसंघात निवडणुकीच्या अगोदर केवळ ७९० इतक्याच माणसांना ओळखतो, तो निवडून आल्यावर बाकी नऊ लाख९९ हजार माणसांना भेटणार केंव्हा आणि त्यांची कामे केंव्हा करणार ?
तुमचा खासदार तुम्हाला ओळखतो का ? तुमच्या मतदारसंघातल्या अडचणींसाठी किती वेळा तुम्ही त्याला फोन केला आहे ? २.
ज्या माणसाला राजकारणात काम करायचं आहे त्याचा जनसंपर्क जबरदस्त असायला पाहिजॆ.
निवडणूका झाल्यापासून तुमचा खासदार किती वेळा मतदार संघात आला ? तुम्हाला भेटला का ? तुमच्या मतदारसंघातल्या किती प्रष्णांचा पाठपुरावा तुम्ही किमान फोन करुन तरी केला आहे ? ३.
आपल्या वातानुकूलित केबिन मध्ये बसून जनतेची कामे होत नाही. फार तर असा माणूस प्रशासनिक सेवेत यशस्वी होऊ शकेल.
तुमचा खासदार कुठे बसतो हे तुम्हाला माहिती आहे का ? निवडणूकांनंतर बघितला तरी का कुठे ? मुकुंद किर्दतला मी व्यक्तिशः ओळखतो. तो तुमच्या खासदारासारखा जनतेच्या पैशावर ऐतखाऊपणा कदापि करणार नाही. ४.
बाकी अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पक्षातील सर्व लोकांना उल्लू बनवून आपला स्वार्थ साधला आणि अण्णा हजारे सारख्या माणसांचाहि विश्वासघात केला त्याचे राज्य आपल्याला यायला हवंय?
पक्षीय राजकारण आणि फालतू मुद्दे काढून विषय भरकटवणं एवढाच काय तो तुमचा वकूब ! अहो, मुद्दा लक्षात घ्या मुकुंद किर्दत अपक्ष असता तरी मतदारसंघात तोच एकमेव लायक उमेदवार होता. आणि तेच मी सांगतोयं उमेदवार बघा, पक्ष नाही. आता प्रामाणिकपणे सांगा तुमच्या खासदाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी काय आहे ? त्याची शैक्षणिक आहर्ता काय ? तुमच्या मतदारसंघातले नेमके कोणते प्रष्ण त्यानी सोडवल्यामुळे तुम्ही त्याला मत दिलंत ? आणि उत्तर देता येत नसेल तर अडाण्यासारखे कमळासमोरचं बटन दाबणारे आणि तुम्ही यात काहीएक फरक नाही.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 08/19/2020 - 06:53 नवीन
आपलंच खरं हे आयुष्यभर रेटत राहिलात तरी तसं होत नाही. आमचा पूर्वीचा खासदार श्री किरीट सोमय्या यांचा ऑफिस मुलुंडला नीलम नगर मध्ये आहे तेथे कोणीही आपली तक्रार घेऊन जाऊ शकत असे. त्यांची पत्नी श्रीमती मेधा सोमय्या आणि मुलगा श्री नील सोमय्या ( हा आपल्या वरून मोहितेंचा चांगला मित्र होता) हे आपल्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी नेहमी उपलब्ध असत. आताच खासदार श्री मनोज कोटक यांनी एक प्रणाली करून ठेवली आहे. आपला प्रश्न सुरुवातीला आपल्या नागरसेवकाकडे त्यांनतर आमदाराकडे वर्ग करा. कारण हे लोक आपल्या जवळ राहतात. आमच्या सोसायटीतील दीड शहाण्या पदाधिकाऱ्यांनी घरगुती कर्मचाऱ्यांना येण्यास बंदी केली होती. त्याविरुद्ध मी एक लेखी अर्ज दिला होता कि मी आणि माझी पत्नी दोघे डॉक्टर असून आम्ही अत्यावश्यक सेवेत मोडतो तर आमच्या घरी घरगुती कर्मचाऱ्यांना परवानगी द्यावी कारण तसा सरकारचा नियम आहे. असे असूनही त्या दीड शहाण्या लोकानी आमच्या सेविकेस येण्यास मनाई केली तेंव्हा श्री मिहीर कोटेचा या आमच्या आमदाराला फोन केला त्यांनी सोसायटीच्या सचिवाला फोन करून सज्जड दम भरला कि सरकारी नियमाप्रमाणे आपण घरगुती कर्मचाऱ्यांना मनाई करू शकत नाही तसे केल्यास आपल्याविरुद्ध फौजदारी कार्यवाही केली जाईल. यामुळे १ ऑगस्ट पासून आमच्या घरात घरगुती सेविका येणे सुरु झाले आहे. आमचा अगोदरचा आमदार श्री तारा सिंह हे काम कसे करतात हे मी प्रत्यक्ष पहिले आहे. एकदा काही कामासाठी रेशन कार्यालयात गेलो असताना श्री तारा सिंह तेथे बसून येणाऱ्या जाणाऱ्या माणसांचे काय प्रश्न आहेत तें विचारत असत आणि त्याचे उत्तर ताबडतोब देत असत. श्री तारा सिंह तेथे दर मंगळवारी २ ते ४ बसत असत आमदार समोर बसला असल्याने रेशन सरकारी कर्मचारी नम्र पणे वागत होते. उद्या या परवा या असली अरेरावी त्यांना करता येत नसे. . त्यामुळे प्रश्न लगेच सुटला नाही तर पुढच्या वेळेस ते बसलेले असताना परत तोच प्रश्न घेतला जाऊन सोडवला जात असे. या अगोदरचे आमचे अनेक खासदार खरोखरच चांगलं काम करणारे होते. ज्यात माझ्या आठवणीतील लोक म्हणजे डॉ सुब्रमण्यम स्वामी, श्री गुरुदास कामत, श्री प्र्मोद महाजन, श्रीमती जयवंतीबेन महेता, आणि श्री संजय दीना पाटील हे आहेत. उगाच कुणालाही माहिती नसलेला माणूस खासदार म्हणून उभा राहतो आणि अर्थात त्याची अनामत रक्कमही जप्त होते म्हणून तुम्ही जनतेच्या अकलेबद्दल बेफाट विधाने करताय? अडाण्यासारखे कमळासमोरचं बटन दाबणारे आणि तुम्ही यात काहीएक फरक नाही. आपले मत १ लाख मतांच्या इतके अमूल्य आहे असला अहंगंड बाजूला ठेवा. दुसर्याबद्दल माहिती नसताना @ सुबोध खरे : मुद्दा न समजण्याची सवय बालपणापासून आहे असली बेजबाबदार विधाने करणे आता तरी सोडून द्या
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Wed, 08/19/2020 - 10:39 नवीन
हेच तर मी सांगतोयं की गुन्हेगारी बॅकग्राउंड नसलेला, सुशिक्षित, तुमच्या मतदारसंघात काम केलेला आणि तुम्ही संपर्क करु शकाल असा उमेदवार निवडा. मनोज कोटकची शैक्षणिक आहर्ता काय आणि त्याच्यावर दोन फौजदारी गुन्हे दाखल आहेत का ? हे मतदानापूर्वी तुम्ही बघितलं का ?
  • Log in or register to post comments
व
वगिश Sat, 08/22/2020 - 22:39 नवीन
माझ्या मुलाला भटके कुत्रे चावले, सोसायटी WhatsApp समूहात कुत्रे हाकलून लावा अशी तक्रार केली असता त्या मेसेज चि प्रत पोलिस स्थानकात जमा करून एका कुत्रे प्रेमी ताई न गुन्हा दाखल केला, त्या वकिल आहेत त्यामुळे हर ते कायदे शोधून गुन्हा दाखल केला आहे. भटकी कुत्री ही माझी मुले आहेत अस त्यांच म्हणण आहे, पण त्या मुलांची अन्य जबाबदारी त्या ताई घेत नाही असो मुद्दा असा की गुन्हा दाखल कुणावरही होऊ शकतो, तो सिद्ध झालाय का? तुमचा मित्र पडला म्हणून एवढे चिडून जाऊ नका.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sun, 08/23/2020 - 14:15 नवीन
माझ्या ओळखीचा उमेदवार निवडून आला नाही हा मुद्दा नाही. उमेदवाराची शैक्षणिक आहर्ता, त्याच्यावर दाखल असलेले फौजदारी गुन्हे, त्यानी मतदारसंधात केलेलं काम, त्याची संपत्ती याची माहिती मतदार घेत नाहीत. केवळ अमक्याला पंतप्रधान करायचं या निर्बुद्ध विचारानी, उमेदवार न बघता, पक्षाच्या चिन्हासमोरचं बटन दाबतात हा मुद्दा आहे. गुन्हा सिद्ध झाल्यावर निवडणूक लढवता येत नाही (जर दोन वर्ष तुरुंगवासाची सजा झाली असेल तर), याची तुम्हाला कल्पनाच दिसत नाही.
  • Log in or register to post comments
क
कोहंसोहं१० Sun, 08/23/2020 - 23:26 नवीन
"उमेदवाराची शैक्षणिक आहर्ता, त्याच्यावर दाखल असलेले फौजदारी गुन्हे, त्यानी मतदारसंधात केलेलं काम, त्याची संपत्ती याची माहिती मतदार घेत नाहीत. केवळ अमक्याला पंतप्रधान करायचं या निर्बुद्ध विचारानी, उमेदवार न बघता, पक्षाच्या चिन्हासमोरचं बटन दाबतात हा मुद्दा आहे" >>>>>>> लोक माहिती घेत नाहीत म्हणून त्यांच्यावर आरोप करत बसण्यापेक्षा स्वच्छ प्रतिमेच्या आणि खरेच काम केलेल्या उमेदवाराने किंवा ज्यांचा त्या उमेदवारावर खरोखरच विश्वास होता त्यांनी तो उमेदवार निवडून यावा यासाठी स्वतःच्या उमेदवाराचे काम आणि बाकी उमेदवारांच्या गुन्ह्याचे, शैक्षणिक अर्हतेचे पितळ जनतेसमोर उघड पाडण्यासाठी किती प्रयत्न केले हे बघणे जास्त सयुक्तिक नाही का? लोकशाही राजकारणात जनतेला दोष देणे हा सर्वात मोठा निर्बुद्धपणा आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 08/17/2020 - 13:35 नवीन
'त्यामुळे आपल्या मतदारसंघातल्या उमेदवारांची कोणतीही पारख न करता सरसकट पक्षाला मतदान केलं जातं. भारतापुरता म्हणत असाल तर एकवेळ खरे असले पण भारतासारख्याच असलेल्या संसदीय लोकशाहीत ( अमेरिका नाही तर कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड इत्यादी) इतर देशात साधारण पणे "पक्षाची धोरणे" हा महत्वाचाच मुद्दा असतो आणि त्या नुसार पारंपरिक पद्धतीने बरेचदा लोक मतदान करतात.. तिथे सुद्धा पंतप्रधान पदाचा उमेदवार आधी ठरलेलं असतो तरी पण याचे कारण बहुतेकदा असे असेल कि - दावे उजवे आणि आजकाल पर्यावरणवादी अश्या साधारण तीन विचारसरणी खूप काळ रुजलेल्या आहेत त्यांच्या मुख कलमांमध्ये फार मोठा बदल होत नाही - वयक्तिक / घराणे यावर बेतलेला पक्ष ( जिथे आमचे साहेब तिथे आम्ही ) असे फारसे नसते स्थिर आणि परिपक्व लोकशाही साठी पक्षानुसार राजकारण ( यात पक्षाने आपली धोरणनशी वर्षानुवर्षे प्रामाणिक राहणे हे गृहीत आहे म्हणा ) हेच जास्त योग्य वाटते.. स्थानिक मुद्दे आणि उमेदवार हे कोण आहेत काय हे जरी महत्वाचे असले तरी लांब पल्य्या साठी "पक्षानुसार " हेच जास्त निरोगी, असा साधारण येथील अनुभव दशकानुदशके सांगतो .. भारतात "व्यक्ती तितके पक्ष" हे जाऊन २-३ सुधृद पक्ष उभे राहतील तर बरे असे वाटते ..
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 08/17/2020 - 13:57 नवीन
" देशातले सगळे आवाज दाबले गेले.." आपण ७५ सालचे बोलताय कि सध्याचा कर्दनकाळ नमो यांचं बद्दल? बरोबर आहे बहुतेक आपण णमोकाळाबद्दल बोलत असणार हि नवीनच माहिती! गेला बाजार खालील लोकांची दुकाने चालू आहेत , आवाज ऐकू येतात तरी आपण असा दावा करता ? आश्यर्य आहे! - शेखर गुप्ता, रवीशकुमार, निखिल वागळे, द प्रिंट , द quint , राजदीप सरदेसाई, बरखा दत्त म्याडम , गिरीश कुबेर , प्रयाग राज , कमला हसन , भट साहेब , अरुंधती रॉय, तमाम भाई लोक, नासिर , जावेद, "असहिष्णुता" अश्या अवघड शब्दांचा उच्चार न करता येणार बडा भाई , "असुरक्षित वाटायला लागले" आता पाणी वाला भाई आणि त्यांची मिसेस .. इत्यादी आत्तापर्यंत हे सगळे ७५ सारखे कोठडीत गेले पाहिजे होते नाही का? किंवा सायबेरिया किंवा " री येडुकाशन " साठी चीन मध्ये ? नमोजी अहो ऐकताय न... वरील सगळ्या लोकांना लगेच घ्या ई हो ताब्यात .. म्हणजे वरील दिवटी विधान खरे असे तरी म्हणता येईल ! लवकर
  • Log in or register to post comments
G
Gk Mon, 08/17/2020 - 14:00 नवीन
धोनीने प्रचार करायला नकार दिला म्हणून घालवला म्हणे कायतरी लोया आहे , असे लोक कुजबुजत आहेत
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Fri, 08/21/2020 - 10:54 नवीन
लोकांना एक दिखावा दाखवला गेला की : १. भ्रष्टाचार संपेल २. किंमती कमी होतील ३. फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापित करुन सगळे गुन्हेगार राजकारणातून हद्दपार होतील ४. एकूणात सगळ्यांसाठी अच्छे दिन येतील --- २०१४ आधी देशात वरिल समस्या होत्या, हे तुम्ही मान्य करताय. याचा अर्थ, कॉंग्रेसने वस्तुंच्या भरमसाठ किमती वाढवून, करोडो रुपयाचे भ्रष्टाचार व घोटाळे करुन सर्वसामन्य भारतीय जनतेला लुटले हे देखील तुम्हाला मान्य आहे तर. मग देशातील जनतेने वर्तमान सरकारच्या (दिखाव्याला?) पाठींबा दिला तर त्यात चूक काय ? देशातील जनतेने कॉंग्रेससारखा भ्रष्टाचारी व घोटाळेबाज सरकारला पुन्हा निवडून द्यायला हवे होते की काय ? --- गेल्या सहा वर्षात देशात झालेल्या एका तरी घोटाळ्याचे अथवा भ्रष्टाचाराचे नाव सांगा ?
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 08/21/2020 - 17:07 नवीन
१. नोटाबंदी हा मोदींचा सर्वस्वी एकट्यानं घेतलेला सर्वात चुकीचा निर्णय. ४.५० लाख कोटींचं चलन सर्क्युलेशनमधून बाद होईल अशी हमी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात केली होती > १०० % पैसे परत आले. नोटाछपाईचा खर्च सुद्धा लोकांनी भरलेल्या टॅक्समधून वसूल झाला नाही. जनतेचा नाहक अतोनात छळ झाला, बँकीग व्यवस्थेवर कमालीचा ताण आला, अर्थव्यवस्थेची वाट लागली. मोदींना ना खेद ना खंत; आता तो विषयच काढत नाहीत. २. बुलेट ट्रेन हा केवळ मोदींची हौस म्हणून १.१० हजार लाख कोटींचा प्रकल्प > देशाला शून्य उपयोग > सध्या तो गुंडाळला गेला आहे. त्या कर्जाची परतफेड कशी होणार याचा काही ठावठिकाणा नाही. ३. जिएसटी ही मोदींची महत्वाकांक्षी योजना > अर्थव्यवस्थेचा बोजवार उडाला आहे. कायदा येऊन सव्वा तीन वर्ष झाली अजून घोळ संपत नाहीत. मोदी त्याबद्दल अवाक्षर काढत नाहीत. ४. काय वाट्टेल ते करुन प्रत्येक राज्यात आपलीच सत्ता हवी या हव्यासापोटी लोकांनी नाकारलेले काँग्रेस नेते घेऊन सत्ता काबीज करणे. ५. महाराष्ट्रात निर्लज्जपणे एका रात्रीत, भ्रष्ट नेत्याशी हातमिळवणी करुन सत्तास्थापनेचा प्रयत्न. त्यासाठी रातोरात राष्ट्रपती आणि राज्यपालांची संमंती मिळवून देशाच्या नितीमत्तेला राजकारणाची निम्नतम पातळी दाखवून दिली. फडणवीस या घटनेत मोदी आणि शहा यांची संमती मान्य करतात पण त्याला गनिमी कावा असं निर्लज्ज नांव देऊन पुन्हा झालं ते योग्यच होतं असा दिखावा करतात. ६. जिएसटीमुळे अपेक्षित रेवेन्यू जनरेट होत नाही असं दिसल्यावर, रिजर्व बँकांचे गवरनर्स बदलून १.७५ लाख कोटींच्या गंगाजळीवर हात मारला. ७. पब्लिक सेक्टर कंपन्यात संबीत पात्रासारखे डिरेक्टर्स नेमून, पक्षाचा भसाडा लाऊड स्पिकर म्हणून त्याला तिथून पेमेंट ! पब्लिक सेक्टर कंपन्यांची इफिशियंसी वाढवायची सोडून त्या स्वतःची प्रॉपर्टी असल्यासारख्या विकायला काढल्या. ८. गंगा शुद्धिकरणाचा इतका बेंडबाजा वाजवला, शून्य प्रगती. उज्वला गॅस योजनेसारखी निर्बुद्ध योजना, हजारो कोटी रुपये खर्च केले. गरिबांकडे दुसरा रिफिल घ्यायला पैसे नाहीत. सगळी योजना पाण्यात गेली. संबीत पात्रा ज्या घरात जेवायला बसला आहे तिथे सिलेंडर फळीवर आहे आणि स्वयंपाक चुलीवर चालू आहे असा फोटो वायरल झाला. ९. सरकारी खर्चानी वारेमाप परदेश दौरे, परदेशी गुंतवणूकीत कोणताही लक्षणीय फरक नाही. स्वतः परराष्ट्र मंत्री असल्यासारख्या गळाभेटी पण पण परराष्ट्रसंबंधाचा बोजवारा. देशाच्या परराष्ट्रनितीच्या प्रोटोकॉलला हरताळ फासून अमेरिकेत ट्रंपच्याबरोबर हातमिळवून अबकी बार ट्रंप सरकार अशी अत्यंत बाववळट घोषणा. १०. देशाच्या पैश्यानी वाट्टेल ती शो बाजी, उदा. लाखो रुपये खर्चून गुहेत बसून ध्यान आणि त्याचे फोटो वायरल होतील अशी सोय करणे. निवडणूक प्रचाराची मुदत संपल्यावर स्वतःच्या संसदीय भाषणातून बिनधास्तपणे प्रचार करणे. ११. सर्जिकल स्ट्राईकसारखा, कोणतीही पूर्वसूचना न देता देशव्यापी लॉकडाऊन, फाळणीनंतर स्वतंत्र भारतात नागरिकांचे मरणप्राय हाल. अर्थव्यवस्थेची संपूर्ण वाट लावली. एकूण परिणाम शून्य. मोदी गायब.
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Fri, 08/21/2020 - 18:22 नवीन
सगळया नाही.. पण बर्याचश्या मुद्यांशी सहमत..
  • Log in or register to post comments
ऋ
ऋतुराज चित्रे Fri, 08/21/2020 - 18:33 नवीन
संक्षी अगदी योग्य मुद्दे मांडलेत. ह्यावर कोणीच सरकारचा बचाव करायला पुढे येणार नाहीत.फक्त एकच प्रश्न तुम्हाला विचारतील ,तुम्ही ह्या गोष्टी कशा हाताळल्या असत्या? कुठल्या घोटाळ्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाच्या खिशाला चाट पडत होती? परंतू नोटबंदी ,जी एस टी मुळे सामान्यातल्या सामान्य माणसाला आर्थिक भुर्दंड पडत आहे.
  • Log in or register to post comments
क
कोहंसोहं१० Fri, 08/21/2020 - 20:11 नवीन
प्रश्न चांगला आहे ऋतुराज परंतु यावर सामान्य माणसाने उत्तर देणे म्हणजे बॅटही पकडता न येणाऱ्या व्यक्तीने टीव्ही समोर बसून सचिन तेंडुलकरने हा बॉल अश्या पद्धतीने फटकारला पाहिजे होता म्हणजे आऊट होण्याऐवजी सिक्स गेला असता हे सांगण्यासारखे आहे. या निमित्ताने पुलंच्या मुंबईकर पुणेकर की नागपूरकर मधील महापालिकेच्या उंदीर मारणाऱ्या विभागातील अधिकाऱ्याचे अमेरिकेच्या आर्थिक घडीवरचे विवेचन हा जोक आठवला. खरा प्रश्न हा आहे की सध्याचे देशासमोरचे बरेचसे प्रश्न निर्बुद्ध राहुलने कसे हाताळले असते? १५-२० वर्षांपासून साधं स्वतःच्या constituency चा विकास करता आला नाही त्या जोकरला...शेवटी तिथूनही पराभूत होऊन पळावे लागले. तो पंतप्रधान झाला असता तर देशाचे काय झाले असते यावर न बोललेलंच बरं. सत्तेत आलो तर गरिबांना दर वर्षी ७२ हजार देउ हे आमिष साधी सीट सुद्धा वाचवू शकली नाही त्याची. आणि त्याचे कारण हे गरिबातल्या गरीब आणि अडाण्यातल्या अडाण्याला सुद्धा ठाऊक आहे. पुढचे लाम्बच. पण जोकर गांधीचे अकर्तृत्व लपवण्यासाठी मोदीद्वेषाचे पांघरुण घेणे आवश्यक ठरते काँग्रेस समर्थकांना नाहीतर प्रसाद_१९८२ यांनी विचारलेल्या सरळसोप्या प्रश्नांना हो किंवा नाही असा प्रतिसाद देण्याऐवजी मोदीविरोधी घंटा वाजवली नसती प्रतिसाद्कर्त्याने. असो. जनता आता हुशार होत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षाला मतदान करत आहेत. ६० वर्षात काँग्रेसचे तथाकथित धुरंदर नेते फार काही करू शकले नाहीत तर पुढे हा जोकर काय करणार हे जनतेला कळून चुकले आहे. याउलट मॅनिफेस्टो मधील एकेक वचने सध्याचे सरकार पूर्ण करत चालली आहे त्यामुळे पुढच्या १५-२० वर्षात हे सरकार नक्कीच चांगले करून दाखवू शकेल जर सत्तेत राहिले तर. त्यानंतर मात्र ७० वर्षाच्या तरुण राहुल गांधीला थोडा वाव असू शकतो जर तोपर्यंत थोडीफार अक्कल आली असेल तर. तोपर्यंत मोदी/भाजपद्वेषी यांचा ओरडा चालूच राहील.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋतुराज चित्रे Sat, 08/22/2020 - 11:23 नवीन
पण जोकर गांधीचे अकर्तृत्व लपवण्यासाठी मोदीद्वेषाचे पांघरुण घेणे आवश्यक ठरते काँग्रेस समर्थकांना तुम्ही तरी काय वेगळं करत आहात? पंतप्रधानांचे नोटाबंदी आणि जीएसटी चे अपयश झाकण्यासाठी राहुल गांधींच्या क्षमतेवर शंका उपस्थित करत आहात. खरंतर राहुल गांधींचा ना मी उल्लेख केला ना त्यांच्या क्षमतेची पंतप्रधानांबरोबर तुलना केली. विषय भरकटवणे हाच एकमेव उद्देश असेल तर चालू द्या!
  • Log in or register to post comments
क
कोहंसोहं१० Sun, 08/23/2020 - 22:40 नवीन
पंतप्रधानांचे नोटाबंदी आणि जीएसटी चे अपयश झाकण्यासाठी राहुल गांधींच्या क्षमतेवर शंका उपस्थित करत आहात>>>>>>> ऋतुराज, इथे नोटाबंदी आणि जीएसटी हा विषयच नाही मुळात. जेंव्हा प्रतिसादाला प्रतिसाद दिला जातो तेंव्हा माफक अपेक्षा हि असते की विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत किंवा निदान मुद्द्याला धरून लिहावे. वर एका आयडी ने २०१४ पूर्वीच्या समस्या, आधीच्या सरकारचे भ्रष्टाचार घोटाळे याविषयी काही प्रश्न विचारले आणि एका महाशयांनी त्याला प्रतिसाद म्हणून नेहमीच्या सवयीला धरून मोदी बॅशिंग सुरु केले ज्यात नोटाबंदी आणि जीएसटी आणले ज्याचा प्रतिसादाशी काहीच संबंध नाही. तुम्ही हे वाचले नसेल वर तर पुन्हा देतो "....नाहीतर प्रसाद_१९८२ यांनी विचारलेल्या सरळसोप्या प्रश्नांना हो किंवा नाही असा प्रतिसाद देण्याऐवजी मोदीविरोधी घंटा वाजवली नसती प्रतिसाद्कर्त्याने"
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 08/21/2020 - 20:18 नवीन
या मागची सायकॉलॉजी फार गहन आहे. स्वतःला आगापिछा काही नाही, म्हणजे हे फकीर अशी भव्य प्रतिमा पहेले छूटच निर्माण केली. थोडक्यात, स्वतःच्या बाबतीत भ्रष्टाचाराची शक्यताच नाहिशी करुन टाकली आणि देशातल्या खुळ्या जनतेनं ते सर्वस्वी मान्य केलं. पण आतला डाव फार भारी आहे. मोदींना ऐय्याषीचा भयंकर शौक आहे. मग करायचं काय की हस्तेपरहस्ते ललित मोदी, मेहूल चोकसी किंवा तत्सम व्यक्तीला सांगायचं की बराक ओबामांसमोर मोदी उठून दिसतील असा सूट त्यांना हवा. त्या व्यक्तींना अशा काही सवलती मिळालेल्या असतात की ते मोदींचं संपूर्ण नांव चांदीच्या धाग्यांनी लिहिलेला, दहा लाखांचा सूट ह्यांना भेट म्हणून पाठवणार (म्हणजे मोदींच्या खात्यात एक पैशाची उलाढाल नाही पण रुबाब बघा). बराक ओबामा जगाच्या सर्वात बलाढ्य राष्ट्राचा प्रेसिडेंट, त्याला काय घंटा फरक पडणार ? खुद्द ओबामा स्वतःची छत्री धरुन उभे आणि मोदी खुळ्यासारखे त्याच्या शेजारी दहा लाखांचा सूट घालून मिरवतायंत ! पुन्हा मेडीयात बोंबाबोंब झाल्यावर सूट लिलावाला तयार ! आता काय काम आहे सूटचं, आपली हौस झाली काम संपलं ! आहे की नाही भारी आयडीया ? अरुण शौरींचे परराष्ट्र मंत्रालयात दोस्त आहेत. मोदींचे इतके अफाट दौरे बघून त्यांनी चवकशी केली की या दौर्‍यांचं फलित काय ? कारण परदेश दौर्‍यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्या दौर्‍यातल्या महत्त्वाच्या गोष्टी मेडीयाला सांगायचा प्रघात आहे. एकतर देशाचा पैसा त्या दौर्‍यात लागलेला असतो आणि दुसरं म्हणजे जे करार झाले त्याचा देशाच्या भवितव्याशी संबंध आहे. काय सांगावं शौरींना परराष्ट्र मंत्रालयातल्या वरिष्ठांनी ? कसलं फलित, अहो ते फक्त `सेल्फि दौरे' आहेत ! आहे की नाही भन्नाट आयडीया ? परराष्ट्र मंत्री कोण, प्रोटोकॉल काय, सगळं काशीला पाठवून, देशाच्या पैशावर परदेशात भटकण्याची हौस पुरवून घ्यायची ! आणि स्वतःच्या खात्यात उलाढाल शून्य ! अल्बर्ट हॉल मधला इंटरव्यू तर हाईट होता ! संपूर्ण स्क्रिप्टेड प्रकार, त्यात प्रसून जोशीसारखा दरबारी भाट प्रश्ण विचारतोयं. काय त्या प्रश्णांची लायकी आणि काय ती उत्तरं ! निव्वळ प्रतिमा उच्चीकरणाशिवाय काहीही साधण्याचा उद्देश नाही पण टायटल काय भारी `भारतकी बात, सबके साथ !' ज्या माणसाला समोर लिहिलेलं धड वाचता येत नाही. जो स्ट्रेंग्थचं स्पेलींग STREANH करतो आणि ते सुद्धा चायनीज डेलीगेशन समोर ! त्याला उभ्या आयुष्यात अल्बर्ट हॉलमधे विंगेत उभं रहायची तरी संधी मिळाली असती का ? थोडक्यात फंडा काय, मनसोक्त वापरा आणि भोगा, फुल ऐय्याशी करा, मालकी दुय्यम आहे. आपल्याला कुणीही विचारणारं नाही. फक्त खात्यात उलाढाल होऊ देऊ नका ! कारण एकतर त्यानं बालंट येण्याची शक्यता हमखास आणि दुसरं म्हणजे आपल्यामागे आहे कोण ? सर्वांनी एकच शहाणपणा शिकायचा, भोग महत्त्वाचा, मालकीचा आग्रह हा मूर्खांचा हव्यास आहे. काय बिशादे भ्रष्टाचार शाबीत होण्याची ? तस्मात, मनसोक्त भोगत, हे फकीर आता तहहयात पंतप्रधान राहणार!
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 08/21/2020 - 21:35 नवीन
फक्त सायकॉलॉजी हा एक सीए म्हणून माझा भ्रष्टाचाराचा अभ्यास आहे आणि तो विधानांनी शाबित होतो. १. मोदींचा १० लाखांचा सूट (नेटवर उपलब्ध) २. अरुण शौरींचा इंटरव्यू ज्यात त्यांनी परराष्ट्र मंत्रालयात केलेल्या विचारणेचा उल्लेख आणि मिळालेलं उत्तर आहे (माझ्याकडे आहे) ३. अल्बर्ट हॉल इंटरव्यू नेटवर उपलब्ध आहे. ४. मोदींना समोर लिहिलेलं वाचता येत नाही (एमए डिग्री असून सुद्धा, (म्हणजे डिग्रीच्या खरेपणाबद्दल सुद्धा संदेह ! ) > लिंक प्रतिसादात दिली आहे.
  • Log in or register to post comments
क
कोहंसोहं१० Fri, 08/21/2020 - 22:42 नवीन
सव्वाशे कोटी लोकसंख्या आणि सव्वाशे लाख कोटीपेक्षा जास्त जीडीपी असलेल्या देशाच्या पंतप्रधानाने जगातल्या सर्वात बलाढ्य देशाच्या राष्ट्रपतीसोबत मीटिंग साठी घातलेला १० लाखाचा सूट हा भ्रष्टाचार? हाहाहा. अगदी हा भ्रष्टाचार जरी मानला तरी ह्यापेक्षा भ्रष्टाचाराचे चांगले उदाहरण देऊ शकला नाहीत हेच मोदींचे यश. बाकी १० लाखाचा सूट भ्रष्टाचार तर १० वर्षाच्या राज्यात काँग्रेसने केलेला हजारो कोटींच्या घोटाळ्याला काय म्हणाल? एखादा चांगला शब्द सापडल्यास नक्की सुचवा. "मोदींना ऐय्याषीचा भयंकर शौक आहे" >>>> छान विनोद. पण मग उठसूट काहीही काम न करता सुट्टीसाठी थायलंडला पळणाऱ्या युवराजच्या सवयीला काय म्हणाल? समाजसेवा? किंवा इटलीच्या बार डान्सर ला एका प्रतिष्ठित (?) घराण्याची सून म्हणून आणणाऱ्या माजी पंतप्रधानांच्या कृत्याला काय म्हणाल? आंधळे प्रेम की धर्मनिरपेक्षता? थोडा विचार करून बघा ऐय्याषी शब्द इथे जास्त चांगला सूट होतो का? "परदेश दौर्‍यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्या दौर्‍यातल्या महत्त्वाच्या गोष्टी मेडीयाला सांगायचा प्रघात आहे" >>> हो का? मग चायना बरोबर सत्तेत असताना आणि नसताना घेतलेली गुप्त भेट आणि गुपचूप केलेला करार पत्रकार परिषद घेऊन मीडीयाला किंवा देशाला सांगायचा प्रघात नाही वाटत? "थोडक्यात फंडा काय, मनसोक्त वापरा आणि भोगा, फुल ऐय्याशी करा, मालकी दुय्यम आहे. आपल्याला कुणीही विचारणारं नाही. फक्त खात्यात उलाढाल होऊ देऊ नका" ---> हे मात्र काँग्रेसने केलेल्या भ्रष्टाचाराला चपखल बसते. तरी बिचारे खूप काळजी घेऊनही नॅशनल हेराल्ड मध्ये अडकत चालले आहेत. बाकी परराष्ट्र दौऱ्याचे यश काय लिहीत बसणार. जगातल्या महत्वाच्या देशांव्यतिरिक्त १५७ मुस्लिम देश आणि त्यातील काही प्रमुख देश जे पाकिस्तानसारख्या मुस्लिम देशाच्या विनंती किंवा धमक्यांना भीक न घालता मोदींचे गुणगान गातात यातच सर्वकाही आले. बाकी ३७० कलम आणि शत्रुदेश वगळता जगात कोणीही न केलेला विरोध, विनंतीवरून वेळेवर राफेल मिळणे, भारताला UN security counsil आणि स्थायी सदस्यत्वासाठी लाभलेला बहुसंख्य देशांचा पाठिंबा (तसेही तुम्हाला सांगून काही उपयोग नाही माहित आहे त्यामुळे सध्या एवढेच पुरे) बाकी ह्याही प्रतिसादात मोदी बॅशिंग करून (बरेचसे मुद्दे मात्र खरेच हास्यास्पद आहेत...पुढच्या वेळी थोडा अभ्यास करून चांगले आणा) माझ्या वरच्या प्रतिसादातले हे वाक्य "पण जोकर गांधीचे अकर्तृत्व लपवण्यासाठी मोदीद्वेषाचे पांघरुण घेणे आवश्यक ठरते काँग्रेस समर्थकांना नाहीतर प्रसाद_१९८२ यांनी विचारलेल्या सरळसोप्या प्रश्नांना हो किंवा नाही असा प्रतिसाद देण्याऐवजी मोदीविरोधी घंटा वाजवली नसती प्रतिसाद्कर्त्याने" पुन्हा खरे ठरवल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sat, 08/22/2020 - 20:03 नवीन
काँग्रेस भ्रष्ट होती म्हणून यांना सत्तेत आणले. हे भ्रष्टाचाराचं समूळ निर्मूलन करणार होते. आता यांच्या भ्रष्टाचाराची तुलना काँग्रेसशी करुन यांना जस्टीफाय करण्याइतका निर्लज्जपणा दुसरा नाही ! एकूण परदेश दौर्‍यांचं फलित शून्य आहे. सर्व सभोवतालच्या देशांशी संबंधांची वाट लागली आहे. ट्रंपबरोबर हात उंचावून केलेली `अबकी बार ट्रंप सरकार' अशी घोषणा हा अत्यंत निर्बुद्ध प्रकार होता, जो देशाच्या प्रोटोकॉलमधे बसत नाही. इतके परदेश दौरे करुन आणि कोट्यावधी रुपये उडवून, इतर देशांशी झालेले व्यापारी करार आणि देशात झालेली परदेशी गुंतवणूक यात अजिबात वाढ नाही. त्यामुळे देशाच्या रोजगार निर्मितीत काहीही फरक पडलेला नाही.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Sat, 08/22/2020 - 20:26 नवीन
बरोबर आहे. काश्मीरमधे ३७० हटवल्यावर संपूर्ण जगाने भारताला वाळत टाकले. ओआयसी तर भारतावर आक्रमण करायला निघाली आहे. `अबकी बार ट्रंप सरकार' अशी घोषणा ट्रंपच्या २०२०२ निवडणुकीला उद्देशुन केली असल्यामुळे भारताला खजील व्हावं लागलं आहे. चीनसारखा प्राणप्रीय पारंपारीक मित्र आज आपला कट्टर वैरी झाला आहे. मोदी तसा कर्मदरिद्री माणुस. पंतप्रधानपद भेटल्यावर तर चेकाळलाच. फुकटात विदेशी दौरे करायला मिळताहेत म्हटल्यावर कशाला संधी सोडणार तो. बसला जगभर फेर्‍या मारत. जनतेच्या पैशाचा चुराडा नुसता. २०१४ पुर्वी भारताची प्रतिमा एक सहनशील, जबाबदार देश अशी होती. काहि भरकटलेले लोकं यायचे. थोडे फार बाँबस्फोट करायचे, काहि लोकांना त्रास व्हायचा, थोडीफार जीवीतहानि व्हायची. पण भारताने कधि संयम सोडला नाहि. नेमस्तपणे आपली बाजु मांडत राहिला. मोदी इतका आतातायी आणि युद्धखोर... उगाच सैन्याला बंदुका उडवायला लावल्या. भारताची प्रतिमा खराब केली. भारतीय जनता देखील किती नालायक. केजरीवालांसारख्या उमद्या माणसाला नाकरुन या मोदिच्या मागे लागली. केजरीवाल स्वच्छ माणुस. अगदी मैफील रंगवणारा. सर्वप्रथम त्याने आपल्या पक्षातच साफसफाई केली.. कुमार विश्वास वगैरे अनावष्यक लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला. देश पातळीवर लोकांना एकत्र करुन, आपल्यापेक्षा लायक माणुस भेटला तर त्याचा सन्मान करुन, जनसेवेचं व्रत साधणारे सगळे गुणत्याच्या अंगी असुनही जनतेने मोदिला निवडुन दिलं. भोगा म्हणावं आपल्या कर्माची फळं आता.
  • Log in or register to post comments
क
कोहंसोहं१० Sun, 08/23/2020 - 23:00 नवीन
इतका निर्बुद्ध युक्तीवाद फक्त भक्तच करु शकतात ! --------> हजारो करोड च्या घोटाळ्याकडे मुद्दाम कानाडोळा करून १० लाख रुपयाच्या सूट ला भ्रष्टाचार म्हणण्याचा निर्बुद्ध युक्तिवाद काँग्रेसचे चमचेच करू शकतात. बाकी "(मिपावर) आयडी ब्लॉक झाला नसता तर २०१९ च्या निवडणुकीत सत्तांतर होण्याची शक्यता होती" ह्या तुमच्या अजून एका निर्बुद्ध युक्तिवादाला एखादा छानसा अलंकारिक शब्द सापडला तर जरूर कळवा. बाकी अलंकारिक मराठीत मोदीविरोध ग्लोरिफाय करण्याच्या नादात तुम्ही हे विसरून गेलात की तुम्ही लिहिलेले बरेच मुद्दे काँग्रेसला जास्त लागू होतात. ते दाखवण्याची मला संधी दिली याबद्दल मात्र धन्यवाद :) तिथे गेली अनेक दशके साडीला इस्त्री करण्यात धन्यता मानणाऱ्या काँग्रेसच्या २३ महाभागांनी राजकारणातील त्यांचे पुढील भवितव्य ओळखून अध्यक्ष बदलण्यासाठी बंडाचा झेंडा हातात घेतला आहे. इथे तुमचा मोदीविरोधी अजेंडा पुढे चालवण्यापेक्षा तिकडे पक्ष पडझड वाचवण्यासाठी काही उपाय सापडले (निर्बुद्ध असले तरी चालतील) तर श्रेष्ठींना जरूर कळवा. बाकी मोदींच्या बाबतीत हाथी चले बाजार.....ही म्हण मात्र चपखल बसते.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Mon, 08/24/2020 - 15:30 नवीन
१.
हजारो करोड च्या घोटाळ्याकडे मुद्दाम कानाडोळा करून १० लाख रुपयाच्या सूट ला भ्रष्टाचार म्हणण्याचा निर्बुद्ध युक्तिवाद काँग्रेसचे चमचेच करू शकतात.
मोदींनी भ्रष्टाचार केला हे मान्य करुनही तुम्ही त्यावर पांघरुण घालता हे लज्जास्पद आहे. आणि याचा अर्थ तुमचं कायद्याचं ज्ञानही शून्य आहे. कायद्यान्वये भ्रष्टाचारात प्रतवारी नाही. २.
२०१९ च्या निवडणुकीत सत्तांतर होण्याची शक्यता होती"
यावर आतापर्यंत अनेक वेळा उत्तर देऊनही तुम्हाला प्रकाश पडत नाही म्हणजे कमाल आहे. जिएसटीचं काय ज्ञान आहे तुम्हाला ? जिएसटीमुळे अर्थव्यवस्थेची काय वाट लागली आहे याचं सुतराम आकलन नसतांना पुन्हापुन्हा तोच निर्बुद्धपणा करु नका. आता नीट वाचा : जुलै २०१७ ते एप्रिल २०१९ हा कालावधी मोदीसरकारनी केलेल्या या तद्दन मूर्खपणाबद्दल देशात जनजागृती करायला पुरेसा होता. मोदीभक्त इतके बावळट आहेत की त्यांना व्यावसायिकांनी पूर्वीच्या बेस किंमतीवर जिएसटी लावला आहे इतकी उघड गोष्ट लक्षात आली नाही. शिवाय हे भक्त इतके मूर्ख आहेत की अजूनही त्यांना जिएसटी फेल गेला हे लक्षात येत नाही. वेळच्यावेळी या गोष्टी लक्षात आल्या असत्या तर खुळ्यासारखे अच्छे दिनची वाट बघणारे जागे होऊ शकले असते. आता तुम्हाला जिएसटीबद्दल काय माहिती आहे ते लिहा आणि काही येत नसेल तर असले निरर्थक प्रतिसाद देऊ नका.
  • Log in or register to post comments
क
कोहंसोहं१० Mon, 08/24/2020 - 17:40 नवीन
"मोदींनी भ्रष्टाचार केला हे मान्य करुनही तुम्ही त्यावर पांघरुण घालता हे लज्जास्पद आहे" >>>>>>> काँग्रेस ने हजारो कोटींचा भ्रष्टचार करून त्यावर काहीच न बोलता दहा लाखाच्या सूट ला (काय करणार ६ वर्षात अजून काही चांगले मिळालेच नाही तुम्हाला) भ्रष्टाचार म्हणून प्रसिद्धी देण्याचा जो निरर्थक प्रयत्न तुम्ही चालवला आहे तो सर्वाधिक लज्जास्पद आहे. यावर आतापर्यंत अनेक वेळा उत्तर देऊनही तुम्हाला प्रकाश पडत नाही म्हणजे कमाल आहे. >>>>> प्रश्न जीएसटी चूक कि बरोबर हा नसून तुमच्या लिखाणामुळे देशात होऊ शकत असलेले पण आयडी मिपावर बॅन असल्याने न झालेले सत्तांतर या तुमच्या दाव्यातली जी अतार्किकता आहे ती किती अवास्तविक आणि निर्बुद्ध आहे हेही स्पष्टीकरण तुम्हाला वारंवार देऊनही तुम्ही पुन्हा तुमच्या दाव्याची पाठराखण करण्याचा जो केविलवाणा प्रयत्न करता ही खरी कमाल आहे. "आता तुम्हाला जिएसटीबद्दल काय माहिती आहे ते लिहा आणि काही येत नसेल तर असले निरर्थक प्रतिसाद देऊ नका" ---> प्रतिसादाला प्रतिसाद देत राहायचे, विचारलेल्या प्रश्नांना बगल देऊन विषयाची गाडी भरकटवुन हळूच जीएसटी आणि नोटबंदी वर वळवायची आणि प्रत्येक प्रतिसादातून मोदीविरोधी अजेन्डा पुढे हाकायचा हेच तुम्ही करत आलात. यापुढे असले निरर्थक प्रतिसाद देऊ नका.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Mon, 08/24/2020 - 17:57 नवीन
१. मोदींनी भ्रष्टाचार केला हे तुम्हाला कबूल आहे त्यामुळे पुढच्या चर्‍हाटाचा काही उपयोग नाही. २. जिएसटीचा विषय तुम्हीच पुन्हापुन्हा काढतायं हे लक्षात येत नसेल तर लेखन आणि स्मृती यांचा संबंध संपला आहे असा अर्थ होतो.
  • Log in or register to post comments
क
कोहंसोहं१० Mon, 08/24/2020 - 18:35 नवीन
मोदींनी भ्रष्टाचार केला हे तुम्हाला कबूल आहे त्यामुळे पुढच्या चर्‍हाटाचा काही उपयोग नाही. >>>>>> अरेरे! अजून एक केविलवाणा प्रयत्न. कदाचित तुम्हाला मराठी नीटसे कळत नसावे. माझ्या प्रतिसादात मोदींनी भ्रष्टाचार केला हे कबूल केले नसून उलट तुम्ही १० लाखाचा घातलेला सूट हा भ्रष्टाचार म्हणून ग्लोरिफाय करण्याचा आणी गळी उतरवण्याचा जो प्रयत्न करताय अन त्याचबरोबर काँग्रेसच्या भ्रष्टाचाराबद्दल मात्र अवाक्षरही न बोलता सोयीस्कररीत्या त्याकडे कसे दुर्लक्ष करताय हे मी दाखवून देत आहे. जिएसटीचा विषय तुम्हीच पुन्हापुन्हा काढतायं हे लक्षात येत नसेल तर लेखन आणि स्मृती यांचा संबंध संपला आहे असा अर्थ होतो >>>>>> हाहाहा. चोराच्या उलट्या बोंबा. जिएसटीचा विषय तुम्हीच पुन्हापुन्हा काढतायं हे सूर्यप्रकाशासारखं स्वच्छ असूनही अशी विधाने करून तुम्ही स्वतःचीच शोभा करताय. हरकत नाही...सुरु ठेवा. त्यानिमित्ताने तुमचा खोटारडेपणा वाचकांच्या समोर येईल.
  • Log in or register to post comments
ड
डॅनी ओशन Mon, 08/24/2020 - 18:08 नवीन
भ्रष्टाचार शब्दाचा फार मुक्तहस्ते वापर चाललाय असे नाही वाटत. 10 लाखाचा सूट फकीर माणूस कसा घालतो वैगेरे ऐकायला मस्त आहे, टाळ्या पण पडतील. कायद्याच्या कोणत्या संज्ञेमध्ये हा भ्रष्टाचार आहे हे सांगावे अशी विनंती. फॉरेन डेलिगेशनने भेटी स्विकारण्याबद्दल परराष्ट्र खात्याची परवानगी लागते असे वाचलेले. असा नियम पंतप्रधान पदाबद्दल काही आहे काय ? त्यानंतर त्याचा लिलाव करून रक्कम सरकारदरबारी जमा झाली या बाबीचा काही फरक पडतो काय, कायदेशीरदृष्ट्या ? आणि सरतशेवटी, मोदींनी डॅमेज कंट्रोल म्हणून जरी लिलाव केला असला तरी त्यात वावगे काय ? डॅमेज कंट्रोल झालंच नव्ह ? (जर असा कायदा असेल, तर ओशो सारखे गुरु रोल्स रॉईस घेऊ शकतात, पण वर्ल्ड लिडर्सना भेटण्यासाठी मोदी सूट घेऊ शकत नाहीत असे म्हणावे का ?)
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 08/21/2020 - 19:24 नवीन
भारताच्या स्वतंत्र काळापासून सर्व सरकार जबाबदार आहेत. सरकारी योजना 100 रुपयाची असेल तर जनतेच्या हातात 5 ते 10 रुपयेच पडतात बाकी सर्व नेते,अधिकारी,बाकी दलाल गायब करतात. हे खूप वर्षा पासून चालू आहे आणि आज पण तीच स्थिती आहे. सरकारी कामात प्रचंड पैसे मधल्या मध्ये हडप केला जातो त्या मुळे ती काम निकृष्ट दर्जाची होतात. रस्ते निर्मित साठी करोडो रुपये मंजूर केले जातात आणि रस्ता तयारच होत नाही. सरकार आली आणि गेली काही ही फरक पडला नाही. बाकी gst, नोट बंदी ह्या मुळे जे नुकसान झाले आहे ते वरील सर्व प्रकार समोर अत्यंत किरकोळ आहे. आज पण सरकारी ऑफिस मध्ये पैसे दिल्या शिवाय काम होत नाही. भ्रष्ट चार पहिला पण खुलेआम चालला होता आणि आज पण खुले आम् चालू आहे. फक्त लोक बदलतात पण यंत्रणा तशीच कुचकामी राहते त्या मध्ये काहीच फरक पडत नाही. सरकार बदल झाला आहे ह्याचे दृश्य परिणाम 0 असतात. त्या मुळे लोक neutral झाली आहेत निवडणुकी विषयी. फक्त T N शेशन hya महान व्यक्ती नी निवडणुकीत चालणारा भ्रष्ट कारभार खूप मोठ्या प्रमाणात नष्ट केला. असे दहा वीस अधिकारी जरी असतील तरी खूप मोठ्या प्रमाणात देश सुधारेल.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 08/21/2020 - 21:43 नवीन
gst, नोट बंदी ह्या मुळे जे नुकसान झाले आहे ते वरील सर्व प्रकार समोर अत्यंत किरकोळ आहे ?
या दोन निर्णयांमुळे संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था ज्याप्रकारे गाळात गेलीये तशी अवस्था स्वातंत्रोत्तर काळात एकदाही आली नव्ह्ती. आणि आता ती लवकर सुधारण्याची शक्यताही नाही. कितपत अभ्यास आहे तुमचा अर्थशास्त्राचा आणि कशाच्या जोरावर तुम्ही हे विधान केलंय ?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 22 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 23 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 23 hours ago
  • सुंदर !!
    1 day 23 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 23 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा