Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

कोविड१९ : व्याप्ती आणि भवितव्य

ह
हेमंतकुमार
Fri, 07/31/2020 - 08:45
🗣 243 प्रतिसाद
करोना सार्स २ - धडकी भरवणारे विचित्र शब्द ! या विषाणूने कोविड१९ची महासाथ घडवली. आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक अभूतपूर्व घटना. तिच्या उगमाला सात महिने उलटले तरी अजूनही तिची घातकता जाणवतेच आहे. या विषयावर आतापर्यंत मी इथे दोन धागे असे प्रकाशित केलेत: १. हात, जंतू, पाणी आणि साबण २. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज. वरील दुसर्‍या धाग्यावर बरीच साधक-बाधक चर्चा झालेली आहे. तिथल्या प्रतिसादांची संख्या आणि मजकूर एव्हाना विस्तृत झाला आहे. त्याला अनुसरून काही वाचक मित्रांनी अशी सूचना केली, की आता यावर नवा धागा उघडावा. त्यास मान देऊन हा धागा चालू करतोय. आपल्या सर्वांच्या सहभाग आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 107305 views

🗣 चर्चा (243)
ह
हेमंतकुमार Sun, 10/04/2020 - 06:12 नवीन
या महासाथीचे एक वैशिष्ट्य म्हणजे अधिकतर लोक लक्षणविरहित राहिले, पण त्यांच्यामार्फत बराच फैलाव झाला. हा संसर्ग लक्षणविरहित असण्यासंबंधी बरेच संशोधन होत आहे. त्यापैकी हे एक रोचक वाटले. या प्रतिपादनानुसार सार्स २ चे जे टोकदार प्रथिन आहे ते शरीरातील वेदना जाणवण्याच्या संदेश यंत्रणेला दाबून टाकते. त्यामुळे जरी विषाणू शरीरात वाढत असले तरी संबंधितास वेदना/ त्रास जाणवत नाही. ज्या बाधितांचे बाबतीत विषाणूला असे यश मिळते, ते लोक लक्षणविरहित राहतात. काहीच त्रास न जाणवल्यामुळे ते जरा जास्तच जनसंपर्कात राहतात आणि रोगप्रसार करतात. या संशोधन चमूचे प्रमुख भूलतज्ञ आहेत.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 10/05/2020 - 06:42 नवीन
• अमेरिकी अध्यक्षांना कोविडचा उपचार म्हणून Regeneron कंपनीचे अद्याप रुग्णप्रयोग पूर्ण न झालेले औषध दिले गेले आहे. त्याबद्दल माहिती : • हे औषध २ antibodies चे मिश्रण आहे. ते रक्तवाहिनीतून ‘ड्रीप’ पद्धतीने देतात. • ते या विषाणूच्या टोकदार प्रथिनाशी संयोग करून त्याला कमकुवत करते. • गेले चार महिने त्याचे ४ प्रकारच्या अभ्यासगटांवर प्रयोग चालू आहेत. • त्याचे निष्कर्ष समाधानकारक आहेत.
  • Log in or register to post comments
स
सतीशम२७ Wed, 10/07/2020 - 07:03 नवीन
<<अमेरिकी अध्यक्षांना कोविडचा उपचार म्हणून Regeneron कंपनीचे अद्याप रुग्णप्रयोग पूर्ण न झालेले औषध दिले गेले आहे. + त्याचे निष्कर्ष समाधानकारक आहेत. >> अध्यक्ष back to white house , removed mask ==> सर, ह्या उदाहरणावरून positive निष्कर्ष वा नविन उपचारांची दिशा दिसू शकते का ? जगातील सर्वांत प्रबळ व्यक्तीला दिली जाणारी treatment must tried somewhere with positive results. Some other than scientific global indicator are already in positive trend.....
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 10/07/2020 - 07:44 नवीन
ह्या उदाहरणावरून positive निष्कर्ष वा नविन उपचारांची दिशा दिसू शकते का ? >>
चांगला प्रश्न. यानिमित्ताने Regeneron कंपनीच्या वरील विशेष औषधाबद्दल लिहितो. हे औषध दोन ताकदवान अँटीबॉडीजचे मिश्रण आहे. शरीरात गेल्यावर या अँटीबॉडीज सार्स-२ च्या टोकदार प्रथिनाशी संयोग करतात. हा विषाणू दरमहा दोन जनुकीय बदल करतोय. मात्र त्या प्रक्रियेत हे प्रथिन टिकून राहते. त्यामुळे या प्रथिनावर आघात करणारी औषधे ही खूप उपयुक्त ठरणार आहेत, कारण ती बदलत्या विषाणूचाही समाचार घेतील. त्यादृष्टीने हे मिश्रण वरदान ठरू शकेल. डिसेंबर 2020 पर्यंत ते मान्यताप्राप्त होऊन बाजारात येण्याची अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments
स
सतीशम२७ Wed, 10/07/2020 - 08:49 नवीन
डिसेंबर 2020 पर्यंत ते मान्यताप्राप्त होऊन बाजारात येण्याची अपेक्षा आहे. ==> ++11 दरमहा दोन जनुकीय बदल करतोय==> बहुतेक हा सर्वांत मोठा अड्थळा असावा .
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 10/09/2020 - 06:14 नवीन
कोविडमुळे रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांचे बाबतीत गरज व आजार-तीव्रतेनुसार केल्या जाणाऱ्या रक्तचाचण्या : Image removed.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Fri, 10/09/2020 - 12:16 नवीन
आयुष मिनिस्ट्री कडुन https://in.yahoo.com/style/prevent-treat-covid-19-ayurveda-142308644.html
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Sun, 10/11/2020 - 07:52 नवीन
एक धक्कादायक बातमी वाचनात आली की IAS सुधाकर शिंदे यांची covid -19 टेस्ट निगेटिव्ह असुनही त्यांच निधन झाल. https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/ias-officer-sudhakar-shinde-passes-away-in-pune/articleshow/78581981.cms वरील बातमी covid -19 टेस्ट वर संदिग्धता दर्शवनारी आहे की अजुनही टेस्ट foolproof नाही आहेत.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 10/11/2020 - 08:41 नवीन
आज आठेकमहिने झाले तरी आपण नक्की अशा टेष्टकिटवर विश्वास ठेवावा यावर मन तयार नाही. साधं सर्दीपडसे वाले अंग कसकस करतात तेही पॉझीटीव येत असतील असे मला वाटते. सालं विश्वासच राहीला नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 10/11/2020 - 08:33 नवीन
गोंधळी, बातमी वाचली. Foolproof चा प्रश्न नाही. मुळात RT-PCR + येण्याच्या काही अंगभूत मर्यादा अशा आहेत: नाकातील swab : सुमारे ६५ % घशातील swab : ...... ४० % श्वसनमार्गात खालपर्यंत खोलवर जाऊन नमुना घेतल्यास ते प्रमाण ९४% च्या आसपास असते. पण हे नियमित स्वरुपात करणे शक्य नसते. म्हणून काही वेळेस रुग्णाची प्रत्यक्ष तपासणी, CT इत्यादी प्रतिमाचाचण्या असे सर्व बघून निदान करावे लागते.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 10/11/2020 - 23:48 नवीन
प्राडॉ, कुणावरही विश्वास ठेवता येत नाही हे जे तुम्ही म्हणता ते अगदी खरंय. इथे अमेरिकी सरकारचं एक पीडीएफ कागदपत्र आहे : https://www.fda.gov/media/134922/download यांत पान क्रमांक ३९ ( पीडीएफ क्रमांक ४०) वर खालील मजकूर आहे : Image removed. अधोरेखीत केलेलं वाक्य : Since no quantified virus isolates of the 2019-nCoV are currently available, ... याचा अर्थ 'कोविद २०१९-एनसीओव्ही' हा विषाणू आजूनपर्यंत ( म्हणजे १३ जुलै २०२० पर्यंत) पूर्णपणे विलग केला गेला नाही. हे अमेरिकी सरकारचं अधिकृत विधान आहे. तरीपण तो ओळखणाऱ्या चाचण्या मात्र बिनदिक्कीतपणे चालू आहेत. नंतर म्हणे त्यावर लस निघणार आहे. यांस सामान्यजनांच्या भाषेत भंपकपणा म्हणतात. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 10/14/2020 - 14:19 नवीन
आपल्या येथील, म्हणजे मिपावरील तज्ञ काय म्हणतात ? प्रतीक्षेत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 10/15/2020 - 06:44 नवीन
गा पै याचा अर्थ 'कोविद २०१९-एनसीओव्ही' हा विषाणू आजूनपर्यंत ( म्हणजे १३ जुलै २०२० पर्यंत) पूर्णपणे विलग केला गेला नाही. हे अमेरिकी सरकारचं अधिकृत विधान आहे. तरीपण तो ओळखणाऱ्या चाचण्या मात्र बिनदिक्कीतपणे चालू आहेत. नंतर म्हणे त्यावर लस निघणार आहे. यांस सामान्यजनांच्या भाषेत भंपकपणा म्हणतात. आपण चुकीचा निष्कर्ष काढलेला आहे. विलग केलेला सार्स कोव्ही २०१९ विषाणू हा कोणत्याही छोट्या मोठ्या प्रयोगशाळेत उपलब्ध नाही जेथे विषाणूची अत्यन्त काटेकोर अशी व्यवस्था नाही (कारण तेथून तो जनतेत पसरु शकतो) परंतु मोठ्या प्रयोगशाळा उदा राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा पुणे (NIV) सारख्या प्रयोगशाळांमध्ये हा उपलब्ध आहे किंवा तेथून तो संशोधन करणाऱ्या प्रयोगशाळांसाठी उपलब्ध होऊ शकतो. पहा On January 22, 2020, CDC received a clinical specimen collected from the first reported U.S. patient infected with SARS-CoV-2. CDC immediately placed the specimen into cell culture to grow a sufficient amount of virus for study. SARS-CoV-2, the virus that causes COVID-19, was isolated in the laboratory and is available for research by the scientific and medical community. https://www.cdc.gov/coronavirus/2019-ncov/lab/grows-virus-cell-culture.html आणि हि ५ मे ची बातमी आहे.;
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 10/15/2020 - 17:00 नवीन
खरे डॉक्टर, तुम्ही दिलेला दुवा वाचला. यातनं आजूनेक प्रश्न उद्भवतो. जर या विषाणूचा यथोचित नमुना उपलब्ध असेल तर विषाणूरोगविभागाने ( Division of Viral Diseases ) त्या पीडीएफ धारिकेत नकारार्थी उल्लेख का केला आहे? अमेरिकी सरकारच्या रोगनियंत्रण व प्रतिबंध खात्याच्याच दोन विभागांत समन्वय नाही, असा अर्थ निघतो. ब्रिटीश मेडिकल जर्नल मध्ये एक लेख आला आहे : https://www.bmj.com/content/371/bmj.m3925 हा लेख व्यावसायिक वैद्यकीय प्रकाशनात छापायच्या लायकीचा आजिबात नाही. ब्रिटीश मेडिकल जर्नल एक नाणावलेले प्रकाशन आहे. त्यांनी हे असले राजकीय लेख छापायला नकोत. मुरार येवलेकर या मुंबईच्या डॉक्टरने निषेध व्यक्त केला आहे. साहजिकच वैद्यकजगतातले अनेक डॉक्टर लोकं कोविडच्या अस्तित्वाविषयी शंका प्रदर्शित करीत आहेत. वरील लेखाचे प्रतिसाद इथे आहेत : https://www.bmj.com/content/371/bmj.m3925/rapid-responses प्रतिसादांत दोन डॉक्टरांनी 'Since no quantified virus isolates of the 2019-nCoV are currently available ....' या विधानाचं स्पष्टीकरण मागितलं आहे. अशी वेळ ब्रिटीश मेडिकल जर्नल वर येणं हेच कोविड हे थोतांड असल्याचं प्रमुख लक्षण आहे. निदान मी तरी तसंच मानतो. बाकी वाचकांची आपापली मर्जी. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 10/16/2020 - 06:53 नवीन
दोन डॉक्टरांची राजकीय आणि पूर्वग्रहदूषित वक्तव्ये यापलीकडे त्याच्याकडे कोणी ढुंकूनही बघत नाही.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 10/14/2020 - 06:18 नवीन
करोना हे थोतांड आहे. टाळेबंदी हे महाथोतांड आहे. ऐकून धन्य झालो परत एकदा आता किती दिवस उगाळणार हे पैलवान ? बास कि आता. एवढे मेले जगभर कि ते जिवंतच आहेत? आणि त्यांना मोहावी किंवा थर च्या वाळवंटात दडवून ठेवलाय !
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 10/14/2020 - 14:43 नवीन
चौकस२१२, १.
ऐकून धन्य झालो परत एकदा
तुम्हांस धन्य व्हायला इतका वेळ लागला हे पाहून अंमळ खेद झाला. पण काही हरकत नाहो. देरसे आये दुरुस्त आये, असं म्हणूया. २.
आता किती दिवस उगाळणार हे पैलवान ?
2019-nCoV चे quantified virus isolates मिळेपर्यंत तरी हेच उगाळायचा बेत आहे. नंतरचं नंतर बघू. ३.
बास कि आता. एवढे मेले जगभर कि ते जिवंतच आहेत? आणि त्यांना मोहावी किंवा थर च्या वाळवंटात दडवून ठेवलाय !
मृत्यूच्या प्रमाणपत्रावर करोनाचा शिक्का मारायला काय थोर अक्कल लागते? असो. मी पहिल्यापासनं करोना हे थोतांड आहे व टाळेबंदी हे महाथोतांड आहे असं म्हणंत होतो. त्या भूमिकेपासनं मी तसूभरही ढळलेलो नाही. याबद्दल मी स्वत:ची पाठ स्वत:च थोपटून घेत आहे. धन्यवाद ! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
आ
आंबट चिंच Fri, 10/16/2020 - 16:02 नवीन
मी पहिल्यापासनं करोना हे थोतांड आहे>>>> ओ गा. पै मागे खफवर तुम्हाला मी जेव्हा सांगितले की तुम्ही करोना रुग्णांची देखभाल (थोडीशी सेवा) करणार का तेव्हा आठवडाभर इकडे फिरकलातच नाहीत. आता सुध्दा तिथे परदेशात असलात तर कोणत्याही करोना सेंटरला भेट देवुन तिथल्या लोकांची तरी सेवा करा की बिनधास्त, घाबरयंचंच नाही. बोला आहात कबुल? आपल्या विटेकर साहेबांना विचारा त्यांच्या मुलाने ती सेवा प्रत्यक्ष केली आहे. आणि जर तुम्ही म्हणताय तर इथे साधी (जनरल) प्रक्टीस करणार्या डॉ. लोकांनी कशाला घाबरुन मुखवटा, पीपीई किट या गर्मीत घालण्याचा अट्टाहास केला असता. त्यात त्यांचा काय वैयक्तीक फायदा?
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 10/16/2020 - 18:43 नवीन
आंबट चिंच, सेवा करायला गेलो आणि मी मेलो म्हणजे? करोना हा फ्ल्यूसारखा आहे. त्याची भीती माझ्यासारख्या हृदयविकारी वा तत्सम पूर्वपीडित लोकांना आहे. बाकीच्यांना नाही. चाचण्या आणि मुखपट्टी यांचा सर्वसाधारण मनुष्यास फुटक्या कवडीइतकाही उपयोग नाही. फ्ल्यूमुळे दरवर्षी हजारोंनी विकारप्रवण लोकांचे मृत्यू होतात. कधी फ्ल्यूची साथ आल्याचं ऐकलंय का? मग करोनाचीच साथ कशी काय आली? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 10/17/2020 - 07:00 नवीन
कधी फ्ल्यूची साथ आल्याचं ऐकलंय का? https://www.cambridge.org/core/journals/epidemiology-and-infection/article/lessons-from-40-years-surveillance-of-influenza-in-england-and-wales/C0D2582BC6DA0CF65D167DDE4A1EAA07/core-reader https://en.wikipedia.org/wiki/2009_swine_flu_pandemic_in_the_United_Kingdom https://en.wikipedia.org/wiki/2009_swine_flu_pandemic_by_country https://www.expressandstar.com/news/uk-news/2020/03/03/history-of-major-virus-outbreaks-in-the-uk-in-recent-times/#:~:text=The%20UK%20has%20been%20hit,20%20and%2050%20million%20people.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 10/17/2020 - 08:32 नवीन
खरे डॉक्टर, यु.के.च्या दुव्यांबद्दल धन्यवाद. हा एक दुवा उघडला : https://www.expressandstar.com/news/uk-news/2020/03/03/history-of-major-virus-outbreaks-in-the-uk-in-recent-times/#:~:text=The%20UK%20has%20been%20hit,20%20and%2050%20million%20people त्यात स्वाईन फ्ल्यू मुळे २००९/१० साली ४५९ मृत्यू झाल्याचं दिसलं. १९१८/१९ साली स्पॅनिश फ्ल्यू आला होता तेव्हा २,००,००० मृत्यू झाले होते. त्या पार्श्वभूमीवर ४५९ हा अत्यंत किरकोळ आकडा आहे. तरीही स्वाईन फ्ल्यूची 'साथ आल्या'चं म्हंटलं जातं. आता असं बघा की, इंग्लंड व वेल्स मध्ये साध्या फ्ल्यू मुळे दरवर्षी सुमारे १०,००० लोकं मरतात (संदर्भ : https://www.greenwichccg.nhs.uk/News-Publications/news/Pages/Around-10,000-deaths-are-caused-by-flu-each-year-in-England-and-Wales.aspx ) . पण तरीही साध्या फ्ल्यूची 'साथ आल्या'चं मानीत नाहीत. हा भेदभाव कशामुळे? 'करोनाची साथ आल्या'चं मानावं का? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 10/17/2020 - 09:17 नवीन
साध्या फ्ल्यूची 'साथ आल्या'चं मानीत नाहीत. फ्ल्यू चा हंगाम/ सिझन असल्याचे मानले जाते. साथ नाही. याचे कारण हे दरवर्षी थंडीच्या मोसमात तेथेच वातावरण असलेले विषाणू सक्रिय होतात आणि एकाच वेळेस फार मोठ्या लोकसंख्येला प्रादुर्भाव होत नाही. ( खरं तर साथ आणि हंगाम यातील रेषा फार धूसर आहे). शिवाय विषाणूतील जनुकीय बदलामुळे दर वर्षी वेगळी लस तयार करावी लागते याचा खर्च मोठा आहे. या साथीमध्ये साधारण निरोगी माणसांना काहीहि होत नसल्याने आणि रोज मरे त्याला कोण रडे या न्यायाने कायमच असलेल्या फ्ल्यू च्या सीझनकडे थोडे दुर्लक्ष होते हा वस्तुस्थिती. कोव्हीड हा खरं तर एक फ्ल्यू सारखाच आजार आहे परंतु एकाच वेळेस लक्षावधी लोकांना लागण झाली, कोणतेही आजार नसलेले निरोगी तरुण याला बळी पडले आणि सार्वजनिक न्यासावर त्याच्या कहाण्या भडक स्वरूपात रंगवून सांगितल्यामुळे जनमानसात घबराट पसरली आहे.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Fri, 10/16/2020 - 06:46 नवीन
https://epaperdivyamarathi.bhaskar.com/nashik/247/16102020/0/3/ रुग्णालयांची लोकांना भिती वाटते असे म्ह्टले आहे. इतके दिवस होउन ही लोकांच्या मनातील भिती दुर करता आली नाही हे एक अपयशच.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 10/16/2020 - 15:22 नवीन
खरे डॉक्टर,
दोन डॉक्टरांची राजकीय आणि पूर्वग्रहदूषित वक्तव्ये यापलीकडे त्याच्याकडे कोणी ढुंकूनही बघत नाही.
मूळ प्रश्न तसाच आहे. 2019-nCoV खरोखरंच अस्तित्वात आहे का? अमेरिकी सरकारच्या रोगनियंत्रण खात्याचा एक विभाग हो म्हणतोय तर दुसरा नाही म्हणतोय. शक्य झाल्यास तुमचं मत ऐकायला आवडेल. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 10/16/2020 - 15:40 नवीन
2019-nCoV खरोखरंच अस्तित्वात आहे का? हो १०० % खात्रीने. पण तो प्रयोगशाळेत मुद्दाम तयार केला (संकरित बियाणे सारखा दोन विषाणूंचे जनुकीय मिलन करून) जैविक शस्त्र म्हणून कि नैसर्गिक याबद्दल सांगता येणार नाही
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 10/16/2020 - 16:31 नवीन
पृथ्वी सपाट आहे याबद्दल तुमचं काय मत आहे ? ;-)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 10/17/2020 - 08:55 नवीन
हा प्रतिसाद काढून टाका रे कोणीतरी......! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 10/16/2020 - 17:38 नवीन
खरे डॉक्टर, हा विषाणू अस्तित्वात असेल तर तो ओळखायची चाचणी नेमकी काय आहे? तिची विश्वासार्हता काय आहे? यावर एखादा लेख जमलं तर लिहा म्हणून सुचवेन. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
A
Ajit Gunjal Fri, 10/16/2020 - 17:23 नवीन
Covid 19 मास्क वापरणे व सोशियाल अंतर पाळणे आवश्यक आहे. कोव्हीडची रुग्णसंख्या लोकांच्या भयगंडामुळे नव्हे कोव्हीड पसरू न देण्यासाठी आवश्यक काळजी न घेतली गेल्यामुळे वाढली.
Ahmednagar News
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 10/17/2020 - 11:35 नवीन
एकदम बरोबर
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 10/17/2020 - 12:05 नवीन
खालील दुवे संशोधनातील प्रगतीच्या एका दिशे संदर्भाने विषय तज्ञांसाठी आहेत, संशोधन अद्यापी अपुर्णावस्थेतील असल्याने सर्वसामान्यांनी डॉक्टरी सल्ल्यांशिवाय स्वयंप्रयोग करू नयेत हे वेगळे सांगणे न लगे. * Until Covid-19 vaccine arrives, nitric oxide can cure patients, save lives | Study * Harnessing nitric oxide for preventing, limiting and treating the severe pulmonary consequences of COVID-19 * Nitric oxide supplements: Benefits, effectiveness, and risks citrulline सारखी काही संज्ञा दिसते आहे ज्या बद्दल सामान्य ज्ञानाच्या दृष्टीने तज्ञांकडून अधिक जाणून घेणे आवडेल.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 10/17/2020 - 13:11 नवीन
माहीतगार, तुमचा NO याबद्दलचा प्रश्न खूप चांगला आहे. सविस्तर उत्तर तयार करत आहे. जरा वेळाने देईन
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 10/17/2020 - 14:09 नवीन
नायट्रिक ऑक्साईड (NO) हा वायू श्वसनाद्वारे उपचार म्हणून पूर्वीपासून वापरात आहे. ARDS यासम आजारांत जेव्हा रुग्ण तीव्र ऑक्सीजनन्यून होतात, तेव्हा तातडीचा उपचार (rescue) म्हणून त्याचे महत्त्व प्रस्थापित आहे. कोविड संदर्भात गेल्या काही महिन्यांपासून त्याचे रुग्णप्रयोग चालू आहेत. हा वायू जेव्हा श्वसनाद्वारे दिला जातो तेव्हा त्याचे शरीरातील गुणधर्म असे असतात : १. फक्त फुप्फुसातील रक्तवाहिन्या प्रसरण पावतात २. दाह प्रतिबंधक ३. रक्तगुठळी प्रतिबंधक ४. श्वासनलिकाना मोकळ्या करणे (bronchodilator) ५. त्याच्या प्रत्यक्ष सार्स-२ विषाणूविरोधी गुणधर्मबाबत अभ्यास चालू आहे. गेल्याच महिन्यात त्याच्या उपचाराबाबत एक मर्यादित रुग्णप्रयोग गरोदर स्त्रियांवर करण्यात आला. या सर्व स्त्रियांना तीव्र कोविड झालेला होता. त्यांना कुठलेही अन्य विषाणूविरोधी औषध दिलेले नव्हते. थेट या वायूचे उपचार 22 दिवस दिले गेले. त्यातून त्यांचा श्वसनअवरोध आणि धाप खूपच सुधारले आणि रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाणही चांगले झाले. अजून मोठ्या प्रमाणावरील ट्रायलस (RCT) झाल्यानंतरच याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. पुढे चालू....
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 10/17/2020 - 14:10 नवीन
सर्व कोविड रुग्णांसाठी NO हा वायू उपचार म्हणून वापरण्यात मात्र काही महत्त्वाच्या अडचणी आहेत : १. हा वायू शरीरात अत्यल्प काळ टिकतो २. तो नाकाद्वारे देणे हे बरेच कटकटीचे काम असते ३. तो खूप महाग आहे. येत्या काही महिन्यात याबाबतचे अधिक संशोधन होईल अशी आशा आहे
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 10/17/2020 - 14:53 नवीन
डॉ. कुमार, क्लिष्टता टाळून सोप्या शब्दात आकलन सुलभ माहिती देण्यासाठी अनेक आभार.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 10/28/2020 - 07:26 नवीन
कोविड विरोधी औषधशोध : घडामोडी १. Remdesivir : एकमेव एफडीए मान्यताप्राप्त औषध. फक्त गंभीर आजाराने रूग्णालयात दाखल असलेल्यांसाठी (ठराविक) शिफारस. उपयुक्ततेबाबत अंतरराष्ट्रीय एकमत नाही. २. Remdesivir + bamlanivimab ही antibody : रूग्णालयात दाखलच्या बाबतीत निष्कर्ष उपयुक्त न निघाल्याने प्रयोग थांबवले. ३. दोन antibodies चे मिश्रण : प्रयोग शेवटच्या टप्प्यात. निष्कर्ष बरेच आशादायक.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Wed, 10/28/2020 - 13:39 नवीन
हा विषाणू फुफ्फुसावर परीणाम करतो हे माहीत होतो. ह्या बातमीत , त्याचा मेंदुवर देखील परीणाम होतो असे म्हटले आहे. हे कसे काय होते https://www.loksatta.com/desh-videsh-news/brains-of-patients-recovering-from-covid-19-may-age-ten-years-finds-new-research-scsg-91-2313876/
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 10/28/2020 - 15:10 नवीन
ममा, या बातमीचा मूळ स्त्रोत पाहता सध्या ते संशोधन अन्य तज्ञांच्या परीक्षणातून गेलेले नाही. तथापि, कोविडचा मेंदूवर परिणाम यावर आतापर्यंत ज्या थिअरीज मांडल्या गेल्या आहेत त्या अशा : १. विषाणूचा मेंदु पेशींवर थेट हल्ला २. रक्त गुठळी >> मेंदूचा ऑक्सिजन पुरवठा कमी >> स्ट्रोक. मेंदूच्या शुभ्र भागास (white mater) इजा होणे. ३. या जोडीला जर फुफ्फुसे व यकृतावर देखील परिणाम झाला असेल तर त्याचाही अप्रत्यक्ष परिणाम मेंदूवर होतो. या महत्त्वाच्या विषयावर अधिक संशोधनाची व तज्ञ परीक्षणाची गरज आहे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 10/30/2020 - 05:10 नवीन
देशभर आणि महाराष्ट्रात एकूणच रुग्णसंख्या कमी होत आहे, असे दिसत आहे. नेमकं काय घडत असावे त्यामुले हे प्रमाण कमी दिसत आहे, त्याचबरोबर इतर काही देशात पुन्हा लॉकडाऊन केल्याचे बातम्या येतांना दिसत आहे. रुग्णसंख्या प्रमाणाबाहेर वाढत आहे, तर आपल्या देशातील धोका टळत आहे काय ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 10/30/2020 - 05:50 नवीन
प्राडॉ,
तर आपल्या देशातील धोका टळत आहे काय ?
एक मुद्दा ध्यानात घ्यावा. महासाथ कधी एकदम जात नाही. सुरवातीस खूप जोर असतो. >> ओसरतो. >> पुन्हा डोके वर काढते >> पुन्हा ओसरते . हे चक्र किमान २ वर्षे चालते. >>>> तो आजार सामान्य होतो. म्हणजे सध्या आपण वरील चक्रात २ वर आहोत तर अन्य काही देश ३ वर आहेत. सध्या निरीक्षण करूया. ठाम सांगता येत नाही. संयम ठेवावा लागेल.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Fri, 10/30/2020 - 05:57 नवीन
म्हणजे पुन्हा एकदा पुरेशा अवधी शिवाय टाळेबंदीची शक्यता आहे ? (खुप घाबरलेला चेहरा कल्पावा)
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 10/30/2020 - 12:41 नवीन
डॉ.कुमार, जिथे दुसरी किंवा तिसरी लाट येते आहे तिथे आधीच्याच म्युटेशनची लागण झालेल्यांची संख्या किती या बद्दल बातम्यात काही दिसत नाही त्याबद्दल काही अधिक माहिती आहे का?
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 10/30/2020 - 06:07 नवीन
जोपर्यंत रुग्णसंख्या घटती/स्थिर आहे तोपर्यंत काळजी नसावी. जर का थंडीत वाढ दिसली तर त्यानुसार यथायोग्य निर्णय होईल. नाही तसे झाले तर छानच.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 10/30/2020 - 12:37 नवीन
डॉ. कुमार, ड्युक विद्यापीठातील कुणी डॉ. पुरुषोत्तम टाटा म्हणून आहेत त्यांनी मानवी शरीराबाहेर मानवी फुफ्फुसावर प्रयोग करण्याची सक्षमता मिळवल्याचे मागच्या आठवड्यात हे एनडीटीव्ही वृत्त होते. मुलाखतीतून हे मानवी फुफ्फुसावरील प्रयोग आहेत अथवा प्रतिकृतीवरील हे नीटसे लक्षात आले नाही प्रतिकृती असेलतर हुबेहुब पणा कसा साध्य केला आणि मानवी अवयवदानातील असेल तर शरीराबाहेर सक्रीय कसे ठेवले? आणि मानवी अवयवदानातून असेल तर प्रत्येक प्रयोगासाठी वेगळे अवयवदान मिळावयास हवे तेवढाच प्रयोगांचा वेग कमी राहील का? आणि आतापर्यंतच्या प्रयोगाचा आढावा इत्यादी बद्दल जिज्ञासा आहे . एनडीटीव्ही वृत्त युट्यूब दुवा https://www.youtube.com/watch?v=aDGwdHc8lc8
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 10/30/2020 - 12:43 नवीन
तुमचा दुवा फ्रांस व मुस्लीम ..... हे दाखवतोय !
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 10/30/2020 - 12:46 नवीन
सॉरी, दुवा पुन्हा एकदा देतोय https://www.youtube.com/watch?v=RCBmntVkZeg
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 10/30/2020 - 14:00 नवीन
मागा दुवा पाहिला. सदर संशोधकांनी प्रयोगशाळेमध्ये मानवी फुप्फुसाच्या मूळ पेशींपासून शरीराबाहेर फुप्फुसपेशी तयार केल्या. या पेशी अगदी शरीरातील मानवी पेशी प्रमाणेच असतात. आता त्यांच्यावर प्रत्यक्ष विषाणूचा संसर्ग घडवला आणि ज्या काय रासायनिक घडामोडी होतात त्या अभ्यासल्या. (अवयवदानाचा काहीही संबंध नाही. मानवी अवयव प्रत्यक्ष तयार केला आहे !) हे एक सुंदर अभ्यास प्रारूप आहे. याचा अजून पुढे फायदा आहे. एकदा प्रयोगशाळेत आपल्या डोळ्यांसमोर शरीरातील रासायनिक घडामोडी दिसल्या, की मग तिथेच निरनिराळ्या औषधांचे प्रयोग देखील सुलभपणे करता येतात. सध्या मूळ पेशीच्या संशोधनाने खूपच मोठी मजल मारलेली आहे. हा त्याचा एक सुंदर आविष्कार म्हणता येईल. इथे मिपावर मूळ पेशी या विषयांवर पूर्वी एक सुरेख चर्चा झालेली आहे त्याचा हा दुवा
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 10/30/2020 - 15:08 नवीन
खरेच छान माहिती आहे. पेशींवरील परिणाम प्रत्यक्षात आणि जवळून अभ्यासता येणे हा मोठाच फायदा म्हणता येईल. त्यांच्या चाचण्यांना लौकर यश यावे अशी इच्छाकरूयात. प्राण्यांवरचे प्रयोगाची स्टेज टाळणे इत्यादी फायदे होतीलच. वीषाणूंचे अस्तीत्व नाकारणारे महाभाग आहेत त्या मंडळींनाही संशोधक खोलात अभ्यास करून माहिती देताहेत याचाही विश्वास देता येईल.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 10/31/2020 - 13:11 नवीन
नेहमीच्या ‘फ्लू’ विषाणूंच्या तुलनेत सध्याच्या विषाणू संदर्भात शरीराचा अँटीबॉडीज प्रतिसाद बराच वेगळा व काही वेळेस विचित्र आलेला आहे. काही ठळक मुद्दे : १. सहसा संसर्गनंतर तीन आठवड्यांनी अँटीबॉडीची पातळी चांगली असते. सध्याच्या संसर्गात अगदी 10 ते 12 व्या दिवसापासून देखील अँटीबॉडीची पातळी मोजण्याइतकी दिसून आली. २. अँटीबॉडी चाचणी ++ असतानाही काही रुग्ण RT-PCR + दाखवत आहेत. ३. शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीजपैकी काही ठराविकच विषाणूमारक प्रकारच्या आहेत. पण त्यामुळे प्रत्येक रुग्णाला भावी संरक्षण मिळेलच असे नाही. काहींच्या बाबतीत तर त्यांनी शरीराला अधिक इजा घडवली. त्यामुळेच मूळ आजार वाढत गेला. ४. एखाद्या व्यक्तीत अँटीबॉडीज असल्या तरीही तो इतरांसाठी रोगप्रसारक ठरू शकतो. त्यामुळे या चाचणीकडे ‘सुरक्षा चाचणी’ म्हणून पाहता येणार नाही. (काही लोक कामवाल्या व्यक्तींना बोलावण्यासाठी याचा आधार घेत आहेत). या चाचणीतून आपण सुरक्षेबाबत खात्रीशीर काही बोलू शकत नाही.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 10/31/2020 - 14:34 नवीन
डॉ. कुमार क्र. २ आणि ४ महत्वाचे मुद्दे वाटतात, यांचा विचार मला वाटते डोळस स'तर्क'तेने व्हावयास हवा का. शरीरात अँटीबॉडी असल्या आणि त्यांनी वीषाणू विरोधी 'यशस्वी झूंज' दिली तरी झूंज चालू असतानाच्या कालावधीत शरीरात प्रयत्नरत वीषाणू असणारच आणि ते संक्रमित होऊ शकणार असेच काहीसे आपल्याला म्हणायचे आहे का? या वरून आठवले, माननीय पंप्रच्यां एका सभेसाठी कोविड होऊन गेलेल्या पोलीसांना सुरक्षेसाठी वापरल्याची बातमी होती तेव्हा मला हाच प्रश्न पडला होता.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 21 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 22 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 22 hours ago
  • सुंदर !!
    1 day 22 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 22 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा