Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

कार विकत घेण्यासाठी मार्गदर्शन हवे आहे

क
कांदा लिंबू
Mon, 07/20/2020 - 03:47
🗣 135 प्रतिसाद
मला मध्यम बजेटची एक नवीन कार विकत घेण्यासाठी मिपाकरांचे मार्गदर्शन हवे आहे.
  • शहर - हैद्राबाद
  • बजेट - पाच ते सात लाख*
  • प्रवासी - मी, पत्नी, दोन शाळकरी अपत्ये, (काही वेळा माझी आई)
  • प्रवास - दरवर्षी अंदाजे ६००० किमी
ऑफिस घरापासून ३८ किमी दूर आहे. लॉकडाउनपूर्वी मेट्रोने जायचो. सध्या डिसेम्बरपर्यंत WFH सुरु आहे. नंतरही काही रोज कार घेऊन जाणार नाही. वर्षातील चार-सहा महिने बाहेरगावी (बेन्गालुरू, पुणे, चेन्नई, कोलकाता दिल्ली इ.) काम असतं. त्यावेळी शनिवार-रविवार घरी येतो. वर्षातून तीन-चार वेळा २८० किमी दूर गावी प्रवास होतो. सध्या रेल्वेने जातो. कार घेतल्यावर कारने जाईन. पूर्वीचा कार चालवण्याचा फारसा अनुभव नाही. ही पहिलीच कार विकत घेत आहे. पायी, सायकल, बाईक कार, रेल्वे विमान इ. च्या प्रवासाचा अनुभव आणि आवड आहे. सध्याच्या आणि आधीच्या बाईकांचा प्रवास अकरा वर्षांत ९०००० किमी झाला आहे. आधी, दोन-अडीच लाखांपर्यंतची एक जुनी गाडी घ्यावी असा विचार होता (अजूनही निर्णय होत नाहीये). पण ओएलेक्स / ट्रू वॅल्यू / इतर आणि प्रत्यक्ष जाऊन पाहून आलो. किंमती जास्त वाटत आहेत. मी आइडेंटिफाय केलेल्या गाड्या - टाटा टिआगो Tata Tiago XZ Plus(Petrol) ₹७४१५५/- ह्युंदाई सॅन्ट्रो स्पोर्ट्झ Hyundai Santro Sportz Petrol ₹६४३५२०/- ह्युंदाई ग्रँड आइटेन Hyundai Grand i10 Sportz 1.2 Kappa ₹७४११९५/ - रेनॉ क्विड Renault Kwid RXT 1.0 ₹५१४६३९/-
  1. यापैकी किंवा इतर कोणती अखूडशिंगी, बहुदुधी कार घ्यावी?
  2. फक्त पेट्रोल की पेट्रोल + सीएनजी घ्यावी?
  3. मला मॅन्युअल ट्रान्समिशन आवडेल, ऑटोमॅटिक नाही. हे योग्य आहे का?
  4. रंग कोणता घ्यावा? (लाल सोडून इतर)
  5. जुनी गाडी घ्यावी का?
  6. इतर सल्ला मार्गदर्शन व माहिती?
सर्व ह्युंदाई गाड्यांचे माहितीपत्रके टाटा गाड्यांची माहिती मारुती गाड्यांची माहिती मदत, सल्ला, मार्गदर्शन इ.बद्धल मिपाकरांचे आगाऊ धन्यवाद.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 91679 views

🗣 चर्चा (135)
य
योगी९०० Mon, 07/20/2020 - 05:31 नवीन
टोटल पाच जण आणि वर्षाकाठी एक दोन सहली असे असेल तर मागे डीकी असलेली गाडी घ्या. नाहीतर सामान ठेवायचे वांदे होतात. स्विफ्ट डिझायर चा माझा अनुभव खूप छान आहे.पेट्रोल कारच घ्यावी असे मत आहे. दोन महिने जरी पडून राहीली तरी पहिल्या किकला (म्हणजे चावी पिरगळ्याला) चालु होते. मी पाच वर्ष वापरत आहे, अजून अ‍ॅवरेज,मेंटेनन्स वगैरे एकदम लिमिटमध्ये आहे.
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Mon, 07/20/2020 - 06:52 नवीन
मी तुमच्याजागी असतो, तर मारुती सुझुकी वॅगन आर सीएनजि+पेट्रोल चा विचार केला असता. किंवा मारुती सुझुकी अर्टिगा हायब्रीड चा विचार केला असता.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Mon, 07/20/2020 - 07:14 नवीन
पार्कींगची सोय आहे का ?
  • Log in or register to post comments
क
कांदा लिंबू Mon, 07/20/2020 - 09:43 नवीन
पार्कींगची सोय आहे का ?
हो, आहे.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 07/20/2020 - 07:29 नवीन
सेफ्टी चा विचार करता मारुती च्या गाड्या योग्य नाहीत , बाकी सगळे उत्तम आहे पण जीव सर्वात महत्वाचा! ह्युंडाई चे इंजिन आणि परफॉर्मन्स सर्वोत्तम आहे, पण एव्हरेज कमी आहे. त्यामुळे टाटा टियागो किंवा लो एन्ड अलट्रोज घ्या असे सुचवेन .
  • Log in or register to post comments
क
कांदा लिंबू Mon, 07/20/2020 - 09:53 नवीन
मारुती व ह्युंदाई बद्धल हाच फीडबॅक माझ्या मित्रांनी दिलाय. हं, टिआगो पसंत पडेल असं वाटतंय.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Mon, 07/20/2020 - 11:43 नवीन
टाटा टियागो बेस्ट ओप्श्न आहे. माझ्या पत्नीस गाडी घ्यायची होती तेंव्हा कपिलमुनिने हिच सजेस्ट केलेली मला. टियागो एक्स झेड आहे. अ‍ॅलॉय व्हील, हर्मन साउंडस, एबीएस आणि इबीडी. २ एअरबॅग आहेत. व्हाईट कलर आहे.(पुधे मागे धंदा काहीच जमला नाही तर ओलाला किंवा ट्रव्हलला लावायचा आणि ड्रायव्हर मणून काम करायचा विचार असलेने व्हाईट) त्यावेळी टाटाचा सेल्स मॅनेजर क्लासमेट असलेने बरेच डिसकाउंट अ‍ॅड करुन ६ लाखाला ऑनरोड मिळाली.(११ फेब २०१९) स्विफ्ट किंन्वा सॅन्ट्रो ची कंपेअर केली तर टेक्निकली आणि लुकनुसार टियागो साधारण वाटते पण काहि वैषिष्ट्ये टियागो सुपिरिअर आहे. एकतर बिल्ड क्वालिटी. नवीन स्विफ्टचा पत्रा पातळ केलाय, वेट ही कमी केलेय खुप मायलेज वाढवण्यासाठी. टियागो मज्बूत आहे तुलनेने. एनकॅप रेटिंग ला ४ स्टार आहेत. अ‍ॅक्सिडेंटला जास्त हानी होत नाही. स्विफ्टचे जरी ४ सिलिंडर आणि टियागोचे ३ सिलिंडर इंजिन असले तरी पेट्रोल मॉडेल ला टियागो जास्त अ‍ॅव्हरेज देते. साधारण २० किमी गावात आणि २५ किमी हायवेवर पडते. स्मूथ आहे. सुरुवातीच्या टियागोत व्हायब्रेशन प्रॉब्लेम होता पण आता नाहीये. पॉवर स्टीअरिंग रिस्पोन्सिव्ह आहे. जागा एका कुटुंबास पुरेशी आहे. लुक म्हणले तर नवीन टियागो मध्ये रॅपाराउंड हेडलॅम्प आणि न्यु ग्रिले आहेत. चांगला दिसतो तो. नवीन यलो कलरही कॅची आहे. सॅन्ट्रो आणि स्विफ्ट्पेक्षा हायवेवर सुरक्षित आणि पॉवर्फुल परफॉर्मन्स देते. फक्त इंजिन रिफाईनमेंटमध्ये उन्नेस बीस फरक आहे. पार्किंग इझी आहे. हरमन कार्डनचे ६ साउंड जबरदस्त आहेत. टाटा कनेक्ट ने अ‍ॅन्ड्रोईड कनेक्टिव्हिटी मिळते. सरव्हिसिंग कॉस्ट कमी आहेत. चांगल प्लॅन घेतले कंपनीचे तर स्वस्तात आण्खीनच पडते. पिकप ड्रॉप सर्व्हिस मिळते. आता टाटाचे पब्लिक बरेच सुधारले आहेत. चांगली सर्व्हिस देतात. फक्त फॅक्टरी फिटेड सीएनजी ऑप्शन अजुन नाही अ‍ॅव्हेलेबल. चलवायच्या दृष्टीने म्हणले तर मलाही आधी येत नव्हती. लायसन होते पन कॉन्फीडन्स नव्हता. प्रॅक्टीसने १ महिन्यात आली व्यवस्थित. ३ ट्रिप सोलापुरच्या झाल्या. १ मुंबईअची. सो आता जमते ठिकठाक.
  • Log in or register to post comments
क
कांदा लिंबू Tue, 07/21/2020 - 07:37 नवीन
अभ्या, सविस्तर प्रतिसाद आवडला. First-hand experience मस्त लिहिलाय. तुमचा फोन नंबर मला व्यनी कराल का? ... टिआगो मॅन्युअल चालवण्याचा अनुभव अजून कुणाला आहे का?
  • Log in or register to post comments
व
विनोद वाघमारे Mon, 07/27/2020 - 09:26 नवीन
Oct. २०१८ ला रेड कलर पेट्रोल टियागो एक्स झेड घेतली. आधी येत नव्हती. पण आता येते, गावी अहमदनगर - राहुरी ला ५-६ वेळा जाऊन झाले. हीच गाडी घेऊन प्रचंड समाधानी आहे. ऐसपैस जागा, मोठी डिकी, सेफ्टी फीचर्स, चालवायला सोपी, आणि सर्वात खास मुझिक सिस्टम. खूप चांगली गाडी आहे, सर्विस सेन्टर्स पण चांगली सर्विस देतात. मायलेज मला हायवे वर २३ पर्यंत मिळते, माळशेज मार्गे जाताना, आणि कल्याण मार्गे मुंबई मध्ये घुसल्यावर पुन्हा १७ - १८ पर्यंत खाली येते. पण तक्रार काहीच नाही.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 07/20/2020 - 13:27 नवीन
मुनिवर्यांंना +++++ १११११ टीएगो इज बेस्टस बेस्ट..फेमिली कार! मारुती अल्टो(पेट्रोल सीएनजी) मी गेली 9 वर्ष वापरतो आहे. मेंटेनन्स नाही..पण मारुतीची गाडी बॉडी पत्रा कोलिटी टुकार आहे. त्याबाबतीत टाटा ग्रेट.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 07/20/2020 - 07:32 नवीन
ह्युंडाई एक्सेंट चा अनुभव चांगला आहे. सेदान आहे आणि कम्फर्ट खूप चांगला आहे. पेट्रोल चे अ‍ॅव्हरेजही बरे आहे. तुमचे रनिंग ही कमी आहे. सँट्रो ही हॅच बॅक आहे. सामानाला जागा उरत नाही. मात्र गाडी खूपच चांगली आहे. आय टेन लाँग रन साठी कम्फरटेबल वाटत नाही. तसेच जागा लहान पडते. ( चार लोकांसाठी चांगली आहे) रेनॉल्ट क्वीड ही फारच लहान गाडी आहे. सुझुकी एर्टीगा उत्तम आहे. मात्र यात अगदी मागची रांग फारच अडचणीची आहे. सामान असल्यास तर खूपच अडचणीची ठरते. टाटा टियागो उत्तम आहे. जुन्या गाडी साठी जाणार असाल तर ह्युंडाई एक्सेंट चा पर्याय पहा. सुझुकी स्विफ्ट डिझायर ही चांगली आहे.
  • Log in or register to post comments
क
कांदा लिंबू Mon, 07/20/2020 - 09:57 नवीन
टाटा टियागो उत्तम आहे. विचार चालू आहे.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 07/20/2020 - 07:51 नवीन
मिसल्पव सहेब, तुम्चे नव कुप कुप अवदले ! खालील धागे वाचा, काहीतरी हाती लागून जाईलः १) कुठली घ्यावी कार ? २) सेकंड हॅण्ड कार घ्यायची आहे, कोणती घ्यावी????">सेकंड हॅण्ड कार घ्यायची आहे, कोणती घ्यावी???? ३) कुठली कार घेऊ?">कुठली कार घेऊ? ४) चार चाकी वाहन खरेदी
  • Log in or register to post comments
क
कांदा लिंबू Mon, 07/20/2020 - 09:47 नवीन
मिसल्पव सहेब, तुम्चे नव कुप कुप अवदले !
सुरुवातीला मला मिसळपाव हे सदस्यनाम घ्यायचं होतं, पण त्याचं मिसल्पव झालं. आता झालं ते झालं, जाऊ द्या. आपलं नाव कुणालातरी आवडलंय यातच आनंद मानून खाली बसतो. बाकी जुन्या धाग्यांच्या लिंकांबद्धल धन्यवाद, साहेब! वाचतो आहे.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 07/20/2020 - 17:21 नवीन
:-) संपादक मंडाळा विनंती करून नाव सुधारणा करता येईल ! (पण मिसळपाववर मिसळपाव कसं तरीच वाटतं ना ? त्यापेक्षा कांदालिंबू नांव घ्या )
  • Log in or register to post comments
ट
टिवटिव Wed, 07/22/2020 - 17:40 नवीन
:) :)
  • Log in or register to post comments
क
कांदा लिंबू Mon, 07/27/2020 - 18:32 नवीन
त्यापेक्षा कांदालिंबू नांव घ्या )
तुमच्या सुचनेचा मान राखून कांदा लिंबू सदस्यनाम घेतले आहे.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Tue, 07/28/2020 - 10:00 नवीन
ज्जे बात हैं ! एक नंबर ! मिसल्पव चे कांदा लिंबू झालात ! ग्रेट, कांदा लिंबू साहेब ! नामांतर चिरायू होवो ! :-)))
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Mon, 07/20/2020 - 09:34 नवीन
ह्युंदाई ग्रँड आइटेन Hyundai Grand i10 Sportz 1.2 Kappa ₹७४११९५/ - सुखद रंग बघून घेऊन टाका ! एकदा चालवायला लागलात की माझी आठवण काढाल !
  • Log in or register to post comments
क
कांदा लिंबू Mon, 07/20/2020 - 10:12 नवीन
गोंधळ उडतोय राव.
  • मारुतीच्या गाड्या - सुरक्षितता नाही
  • ह्युंदाईच्या गाड्या - वापराचा खर्च जास्त
  • टाटाच्या गाड्या - परफॉर्मन्स नाही (म्हणजे काय?)
असा फ़ीडबॅक मिळतोय. त्यात, क्रंपल झोन, एबीएस, इबीडी, एअर बॅग्स... अशी भुते दिवट्या घेऊन नाचताहेत. कोणता झेंडा घेऊ हाती?
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 07/20/2020 - 10:37 नवीन
मी १० वर्षे i10 वापरत आहे, हुंडाई च्या गाड्या 5 लोकांसाठी आरामदायी नसतात, वर सुचवलेलें कप्पा इंजिन 12-14 मायलेज देते. शिवाय लोकल कंपनीला महत्व द्या , टाटा समूह समाजाप्रति बांधिलकी दाखवतो आहे आणि शिवाय गाड्या मध्ये सर्व फीचर आहेत, सो लोकल ला व्होकल करा
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Mon, 07/20/2020 - 12:36 नवीन
काहीही विचार न करता ह्युंदाई ग्रँड आइटेन Hyundai Grand i10 Sportz 1.2 Kappa ₹७४११९५/ - सुखद रंग बघून घेऊन टाका ! कारवाल्यानी खर्चाचा विचार करायचा नाही > सगळं सुख केरात जाईल > कंफर्ट बघा > एक नंबर गाडीये !
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 07/20/2020 - 10:38 नवीन
टाटांच्या गाड्या परफॉर्मन्स नाही म्हणणारे अजून इंडिका च्या काळात वावरत आहेत. तुम्ही टेस्ट राईड घ्या, कम्फर्ट बघा ,रनिंग कोस्ट काढा आणि पुन्हा धाग्यावर या
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 07/20/2020 - 13:34 नवीन
टाटाची इंडिगो डिझेल, आणि टाटाची झेष्ट पेट्रोल वापरलीय. झेष्ट मस्त होती. पेट्रोलचा खर्च जास्त वाटत होता, त्यामुळे ती विकली. तिला एक स्पीडचं बटन होतं ते खूप आवडायचं मला. चांगला रोड लागला त्याला प्रेस केलं ना अहाहा.....! नव्या टाटाच्या कोणत्या गाड्य आहेत आता माहिती नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 07/20/2020 - 11:10 नवीन
गाड्यांचे जास्त अनुभव नाही.. पण नवीन गाडी घ्यायची असती तर बजेट थोडे सैल करून मी Vokeswagan किंवा टोयोटो च्या कुठल्या गाड्या आहेत हे पाहिले असते असे वाटते.. पोलो /ameo /liva ect पण तुम्ही जितके जास्त ऐकत वाचत जाल त्यात confusion जास्त होत जाईल असे वाटते..
  • Log in or register to post comments
व
विटेकर Mon, 07/20/2020 - 13:02 नवीन
घेऊन टाका .. याच धंद्यात आहे म्हणून अगदी छातीठोक पणे सांगतो ... पैसा वसूल गाडी आहे ! - विटेकर ( गेली ३२ वर्षे आटोमोबाइल क्षेत्रात खुड्बुड करणारा )
  • Log in or register to post comments
क
कांदा लिंबू Tue, 07/21/2020 - 07:43 नवीन
तुमचा फोन नंबर मला व्यनी कराल का?
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Tue, 07/21/2020 - 09:45 नवीन
कशी आहे हो ?
  • Log in or register to post comments
भ
भीडस्त Tue, 07/21/2020 - 16:47 नवीन
चालवून बघा मैं तो खुश हूँ (ए एम टी लॅग सोडला तर, पण आता दीड वर्षात सवय झालीय)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 07/20/2020 - 13:27 नवीन
बलेनो घ्या. चाम्गली आहे. अवरेज पण थोडी मागे आदळते असे वाटते. पण इतकं तितकं चालायचंच. -दिलीप बिरुटे (बलेनोवर खुश असलेला)
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 07/20/2020 - 14:51 नवीन
मी बलेनो घेणार होतो , पण एकदा खड्डे असलेल्या रस्र्यावर टेस्ट राइड घेतलि , अरारा ... सस्पेशन अतिशय खराब !... त्यामुळे लगेच रद्द केली. बलेनो मध्ये सर्वाधिक लेग रूम आहे . त्यामुळे रीअर सीट कन्फर्ट मस्त आहे .
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 07/21/2020 - 09:08 नवीन
आपले भारतीय रस्ते हायवे सोडले तर जवळ जवळ खड्ड्यांनीच भरलेले आहेत. सस्पेन्शनच्या बाबतीत सहमते...... -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 07/20/2020 - 16:47 नवीन
मागच्या वर्षी माझी इंडिका जुनी झाली म्हणून नवी गाडी घ्यायची होती तेंव्हा काही संशोधन केले. मारुती ह्युंदाई आणि टाटा या गाड्या भारतात कुठेही दुरुस्त होतात. त्यामुळे या तीनचाच विचार केला होता. आता शहरात गाडी चालवायची म्हणून स्वयंचलितच घ्यायची ठरवली होती त्यामुळे मारुती स्विफ्ट डिझायर AMT ह्युंदाई XCENT AUTO टिगॊर AMT पहिली गाडी मारुती ८०० होती. पण त्याचा पत्रा फारच पातळ आहे आणि एकंदर बांधणी मजबूत नाही अन्यथा मारुतीच्या देखभालीला दुसरा पर्याय नाही. मारुती स्विफ्ट डिझायर गाडी फार छान प्रशस्त आहे पण वजन ८५० किलो. ह्युंदाईच्या गाड्या तुलनेत महाग आहेत आणि सुटे भाग बरेच महाग पडतात. तेवढे( बजेट) सोडले तर गाड्या उत्तम आहेत. टाटाची इंडिका १२ वर्षे चालवत होतो त्यामुळे टाटाच्या गाडीचा भरवसा नक्की आहे. म्हणून शेवटीं टाटा टिगॊर XZA हि गाडी सव्वा सात लाखाला घरपोच घेतली. टिगॊर वजन १०४० किलो. (स्विफ्ट डिझायर वजन ८५० किलो.) हा फरक का? असे विचारले असताना टाटांचे व्यवस्थापक म्हणाले डॉक्टर साहेब A B C तिन्ही पिलर्स मध्ये सुरक्षिततेसाठी ट्विस्टेड आयर्न बार्स आहेत स्टील घरचंच आहे. बाकी टाटा च्या गद्यातील सर्वात चांगल्या बाबी काय आहेत? १) ए सी उत्तम असतो ( नॅनो चा एसी सुद्धा) २) सस्पेन्शन उत्तम असते टाटा च्या गाड्या स्वस्त अशी एक जनमानसात "प्रतिमा तयार करण्यात आली" आहे. त्याच्या पलीकडे पाहायला शिकलात तर टाटा इतकी उत्तम गाडी तितक्या कमी पैशात मिळणार नाही बाकी कपिलमुनी यांनी लिहिलेल्या ताजमहालाला माझी वीट लावू इच्छित नाही
  • Log in or register to post comments
क
कांदा लिंबू Tue, 07/21/2020 - 07:42 नवीन
टाटा इतकी उत्तम गाडी तितक्या कमी पैशात मिळणार नाही.
+१
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Mon, 07/20/2020 - 20:01 नवीन
ज्या वेळेस नवी गाडी घ्यायचा विचार करत आहात, (त्याच वेळी उद्या ७ ते १० वर्ष्यानी तिला समजा विकून पुन्हा नवी गाडी घ्यायची वेळ येईल तेव्हा), रिसेल व्हॅल्यू कुठल्या गाड्यांना चांगली मिळेल, असाही एक अँगल, विचारात घ्यावा, असे सुचवितो.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 07/21/2020 - 06:31 नवीन
7 ते 10 वर्षात टेक्नाॅलाॅजी इतकी बदललेली असूल की जुध्या गाड्यो एकदम विंटेज ठरतील नंतर गाडीविकल्यावर इतके पैसेयेतील हा विचार आत्या करू नका.
  • Log in or register to post comments
क
कोहंसोहं१० Mon, 07/20/2020 - 20:30 नवीन
२०३० पर्यंत 'electric vehicle' पॉलिसी अंतर्गत पेट्रोल डिझेल गाड्यांच्या अस्तित्वावर मोठा परिणाम व्हायची शक्यता आहे. जी गाडी ठरवाल ती लागल्यास electric vehicle मध्ये सहजपणे रूपांतरित करता येईल की नाही हेही विचारून बघा.
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Mon, 07/20/2020 - 20:40 नवीन
हो आणि बजेट सैलवणार असाल तर मग, "टेस्ला"चाही विचार करावा.
  • Log in or register to post comments
उ
उमेश पाटील Mon, 07/20/2020 - 20:53 नवीन
टाटा अल्ट्रोज किंवा रेनॉल्ट ट्रीबर घ्या Image removed.
  • Log in or register to post comments
उ
उमेश पाटील Mon, 07/20/2020 - 20:54 नवीन
रेनॉल्ट ट्रीबर घ्या Image removed.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 07/21/2020 - 06:27 नवीन
ट्रायबर ही स्पेस च्या दॄष्टिने बेस्ट एम पी व्ही आहे . पण ... ३ सिलेंडर १.० इन्जिन ७ सीटर साठी खुप कमी आहे. त्यातून ते टर्बो चार्ज नाही. त्यामूळे पर्फोर्मन्स वर परिणाम होतो. शिवाय अव्हरेज कमी आहे. अजुन NCAP crash अजुन टेस्टींग झाले नाही, त्यामुळे सेफ्टि ची खात्री रिझल्ट नंतर देता येईल. मोठ्या फॅमिलि साठी उत्तम गाडी आहे, रेनॉ यासाठी टर्बो चार्ज इंजिन आणणार आहे , ते आल्यावर गाडी उत्तम होइल. बजेट असेल तर अल्त्रोज बेस्ट इन क्लास अहेच .
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 07/21/2020 - 06:41 नवीन
ट्रायबर हि मारुती व्हॅन किंवा इको च्या वर्गातील गाडी आहे. १ लिटरचे ७२ बी एच पी इंजिन घेतले तर ७ जणांना घेऊन घाट चढायला गाडीला कष्ट होतील. शिवाय ए सी जेमतेम चालेल. जास्त माणसे भरायची असतील तर उत्तम तियागो ५ सीट आणि १२०० सिसि इंजिन ८४ बी एच पी. तुलना करून पहा. आरामदायक गाडी हवी असेल तर वर सुचवलेल्या पैकी कोणतीही आपल्या आवडीची गाडी घ्या
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 07/21/2020 - 05:37 नवीन
हल्ली मोठी डिकी का नसते? मागे चपाटल्याने किमि वाढतात?
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 07/21/2020 - 07:25 नवीन
बरीच कारणे आहेत. टॅक्स हे तर आहेच पण काहीजण कमी पार्किंग जागेसाठी हचबॅक प्रेफर करतात. हॅचबॅक त्याच्याच सेदान पेक्षा थोडेसे जास्त मायलेज देते. ट्रॅफिक मध्ये सोपी जाते चालवायला. फक्त थोडासा जागेचा आणि डिकी चां त्याग इंडियन लोक आरामसे करतात कारण सेदान १ लाखाने तरी महाग असते. सामान ठेवायला हाचबॅक ला लहान का होईना डिकी असते. जास्त असेल तर छतावर करिअर बसवायची सोय असतेच. जवळ जवळ सगळ्याच कंपन्या सेदान आणि हच्बॅक अशा एकाच इंजिन स्पेसिफि केशन चां काढतात. पुंतो आणि लीनिया. इंडिका आणि इंडिगो, टीयागो आणि तीगोर, फिगो आणि अस्पायर, स्विफ्ट आणि डिझायर, लोक त्यांच्या खिषानुसार आणि आवडीनुसार घेतात.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 07/21/2020 - 06:33 नवीन
टॅक्सेस कमीहोतात
  • Log in or register to post comments
क
कांदा लिंबू Tue, 07/21/2020 - 07:41 नवीन
इथे #SaferCarsForIndia या मोहिमेअंतर्गत केलेल्या चाचण्यांचे निकाल आहेत. इथे टिआगोच्या चाचणीचा रिपोर्ट आहे. टिआगोच्या चाचणीचा विडिओ ... सुरक्षिततेचा विचार केल्यास टिआगो / अल्ट्रॉझ घ्यावीशी वाटतेय.
  • Log in or register to post comments
व
व्हय Tue, 07/21/2020 - 19:03 नवीन
स्वानुभवावरून सांगतो, हैद्राबाद मध्ये प्रामुख्याने गाडी राहणार असेल तर अशी गाडी घ्या कि गाडीला कुणी घासलं, ओरखडा पडला, चढता/उतरता दाराला पोचा आला, सिग्नलला कुणीतरी बम्परला धडकला (किंवा हे असं होणारच आहे हे डोक्यात ठेवा) तर तुमच्या डोक्याला त्रास होणार नाही आणि दुरुस्तीचं काम थोडक्यात भागेल. तुम्ही नवी आणि जुनी असे दोन्ही पर्याय खुले ठेवलेत म्हणून, वर ज्या ज्या गाड्या सर्वानी बघा म्हणून सांगितल्या आहेत त्या एकदा चालवून पहा आणि २-३ वर्ष जुनी गाडी घ्या. आपण नोकरदार लोक आहोत, कशाला नव्या गाडीचा घसारा भरायचा? जर नवी घेणार असाल तर ती गाडी पार आयुष्यभर वापरा ( हे माझे मत!).
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Tue, 07/21/2020 - 19:09 नवीन
ड्रीमच राहणार! Shevrolet cruise घ्यायची होती तेव्हा पैसा अन लायकी नव्हती आज थोडा आहे तर गाडीच बंद झाली, चलता है.... परत कधी घेऊचे सगळे पॅरामीटर्स अन आमची गणिते जुळून आली तर मला महिंद्रा थार घ्यायला आवडेल , त्या गाडीत चार्म वाटतो राव एक अलगच
  • Log in or register to post comments
R
rain6100 Wed, 07/22/2020 - 09:17 नवीन
आपली ड्रीम कार सिम्पल स्कोडा रॅपिड रायडर किंवा रायडर प्लस फायनल झालीय ... पुढच्या महिन्यात घेणार आहे ..
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 07/22/2020 - 09:33 नवीन
माझी ड्रीम कार हिंदुस्तान काँटेसा- . रग्गड पैसे असतिल तर २.० इंजिन टाकून रिस्टोअर करायचे ड्रीम . भारतातील एकमेव मसल्स कार Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 21 hours ago
  • सुंदर !!
    1 day 21 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 21 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा