Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

कार विकत घेण्यासाठी मार्गदर्शन हवे आहे

क
कांदा लिंबू
Mon, 07/20/2020 - 03:47
🗣 135 प्रतिसाद
मला मध्यम बजेटची एक नवीन कार विकत घेण्यासाठी मिपाकरांचे मार्गदर्शन हवे आहे.
  • शहर - हैद्राबाद
  • बजेट - पाच ते सात लाख*
  • प्रवासी - मी, पत्नी, दोन शाळकरी अपत्ये, (काही वेळा माझी आई)
  • प्रवास - दरवर्षी अंदाजे ६००० किमी
ऑफिस घरापासून ३८ किमी दूर आहे. लॉकडाउनपूर्वी मेट्रोने जायचो. सध्या डिसेम्बरपर्यंत WFH सुरु आहे. नंतरही काही रोज कार घेऊन जाणार नाही. वर्षातील चार-सहा महिने बाहेरगावी (बेन्गालुरू, पुणे, चेन्नई, कोलकाता दिल्ली इ.) काम असतं. त्यावेळी शनिवार-रविवार घरी येतो. वर्षातून तीन-चार वेळा २८० किमी दूर गावी प्रवास होतो. सध्या रेल्वेने जातो. कार घेतल्यावर कारने जाईन. पूर्वीचा कार चालवण्याचा फारसा अनुभव नाही. ही पहिलीच कार विकत घेत आहे. पायी, सायकल, बाईक कार, रेल्वे विमान इ. च्या प्रवासाचा अनुभव आणि आवड आहे. सध्याच्या आणि आधीच्या बाईकांचा प्रवास अकरा वर्षांत ९०००० किमी झाला आहे. आधी, दोन-अडीच लाखांपर्यंतची एक जुनी गाडी घ्यावी असा विचार होता (अजूनही निर्णय होत नाहीये). पण ओएलेक्स / ट्रू वॅल्यू / इतर आणि प्रत्यक्ष जाऊन पाहून आलो. किंमती जास्त वाटत आहेत. मी आइडेंटिफाय केलेल्या गाड्या - टाटा टिआगो Tata Tiago XZ Plus(Petrol) ₹७४१५५/- ह्युंदाई सॅन्ट्रो स्पोर्ट्झ Hyundai Santro Sportz Petrol ₹६४३५२०/- ह्युंदाई ग्रँड आइटेन Hyundai Grand i10 Sportz 1.2 Kappa ₹७४११९५/ - रेनॉ क्विड Renault Kwid RXT 1.0 ₹५१४६३९/-
  1. यापैकी किंवा इतर कोणती अखूडशिंगी, बहुदुधी कार घ्यावी?
  2. फक्त पेट्रोल की पेट्रोल + सीएनजी घ्यावी?
  3. मला मॅन्युअल ट्रान्समिशन आवडेल, ऑटोमॅटिक नाही. हे योग्य आहे का?
  4. रंग कोणता घ्यावा? (लाल सोडून इतर)
  5. जुनी गाडी घ्यावी का?
  6. इतर सल्ला मार्गदर्शन व माहिती?
सर्व ह्युंदाई गाड्यांचे माहितीपत्रके टाटा गाड्यांची माहिती मारुती गाड्यांची माहिती मदत, सल्ला, मार्गदर्शन इ.बद्धल मिपाकरांचे आगाऊ धन्यवाद.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 91679 views

🗣 चर्चा (135)
ज
जेम्स वांड Wed, 07/22/2020 - 09:39 नवीन
कसलं रग्गड प्रकरण आहे राव. तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी शुभेच्छा, देव तुमचे मागणे मंजूर करो हीच प्रार्थना. रच्याकने, कॉन्टेसा घेतली तर थेट केरळात धाडा, काही मित्रांचे अनुभव अन युट्युब मुशाफिरीवरून एक लक्षात येतंय की केरळी लोक गाड्या मोडीफाय, रिस्टोर अन सुंदर बनवण्याच्या कलेत क्रेझी टॅलेंटेड असतात.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 07/23/2020 - 15:08 नवीन
Contessa is not technically a Muscle car as the original meaning of muscle car is that a performance car built to be focused for drag racing which is a two-door coupe. Contessa is a four-door sedan model, not a drag racing focused car and has only limited power output. १८०० सी सी च्या इंजिनाची शक्ती फक्त ८८ बी एचपी होती. त्या काळात ती शक्ती भरपूर होती. ( उदा मारुती ८०० ची ३७ बी एच पी होती). परंतु आता अगदी सध्या मिड साईझ कार सुद्धा त्यापेक्षा जास्त शक्तीची इंजिने असलेली आहेत. आपली सध्या असलेली टियागो सुद्धा ८४.५ बीएचपी ची आहे टिआगो JTP सुद्धा ११२. ५ बी एच पी ची येते.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 07/23/2020 - 16:26 नवीन
@डॉक्टर: टाटा टिगोर मध्ये मागच्या सीटची रचना तीन लोकांसाठी आराम दायक आहे का ? इंडिका ही मागच्या सीटसाठी सेगमेंट मध्ये सर्वोत्तम होती, टिगोर मध्ये तेवढी स्पेस आहे का ?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 07/23/2020 - 16:40 नवीन
तिगोरची लांबी टियागो पेक्षा २३ सेमी ने जास्त आहे (376. 5 सेमी विरुद्ध 399. 3 मिमी) आणि व्हील बेस ५ सेमी ने जास्त आहे ( टिगॊर हि टियागो खेचून लांब केल्यासारखी आहे). त्यामुळे मागच्या सीट च्या लेग स्पेस मध्ये सहा इंचाचा फरक आहे यामुळे टियागो पेक्षा टिगॊर च्या मागच्या सीट वर उंच माणसांना जास्त आरामशीर पणे बसता येते. अर्थात स्त्रियांना/ कमी उंचीच्या माणसांना फारसा फरक पडत नाही कारण दोन्हीची रुंदी सारखीच आहे १६७.७ सेमी. माझी टिगॊर आहे आणि पत्नीची टियागो त्यामुळे थेट तुलना करून पाहिली आहे. https://www.cardekho.com/compare/tata-tiago-and-tata-tigor.htm
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 07/23/2020 - 16:40 नवीन
पत्नी ची नव्हे पुतणीची
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 07/23/2020 - 16:42 नवीन
इंडिका ची रुंदी १६६. ५ सेमी होती आणि टियागो /टिगॊर १६७.७ सेमी.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 07/23/2020 - 16:57 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 07/22/2020 - 20:06 नवीन
पण व्यवहारिक अडचणी मांडू शकतो. 1) भारतातील रस्त्यांची अवस्था बघता ग्राउंड clearance cha vichar करायला हवा. 2) जास्त वेगाने धावणारी गाडी आपल्या इथे योग्य नाही रस्ते धड नाहीत त्या मुळे जास्तीजास्त 100 ते 150 हाच उच्च वेग झाला 3) गाडी ची मजबुती हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे अपघात झाला तर कमीत कमी धोका निर्माण व्हावा. 4) गाडीचा दुरुस्ती खर्च आणि सुटे भाग ह्यांची किंमत कमी असावी आणि उपलब्धता जास्त असावी. 5) कमीत कमी तांत्रिक कमतरता असावी . अपघाताचे तांत्रिक दोष हे मोठे कारण आहे. 6) शहरात पार्किंग ची जागा हा मोठा प्रश्न आहे त्या मुळे गाडीचा आकार पण विचारात घेणे. 7) शेवटी किंमत. आपल्या परवडेल तेवढीच असावी . बँका कर्ज देण्यास तयारच असतात पण गाडी पासून होणारा फायदा आणि त्या वर आपण करत असलेला खर्च ह्याचे गुंनोत्तर योग्य असावे..
  • Log in or register to post comments
T
Trump Sat, 12/25/2021 - 14:17 नवीन
+१
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक गुरुवार, 07/23/2020 - 20:50 नवीन
कार पेक्षा sub 4 मीटर SUV म्हणजे compact SUV चा विचार करावा असे मी सुचवेन. मग त्यामध्ये टाटांची नेक्सॉन, ह्युंदाईची व्हेन्यु आणि महिंद्राची XUV300 हे पर्याय आहेत. मारुतीने आणि रेनो वा निस्सान ने पण काही मॉडेल आणले आहे वाटते नक्की आठवत नाही. माझ्याकडे टाटा इंडिका व्हिस्टा (फियाटचे डिजेल इंजिन) सुमारे आठ वर्षापासून आहे, चांगली गाडी आहे, किंमत आणि सुविधा यांचा विचार केल्यास नक्कीच स्वस्त आहे. देखभाल खर्चही जास्त नाही.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 07/24/2020 - 06:43 नवीन
व्हिस्टा (फियाटचे डिजेल इंजिन) हे १.३ लिटरचे डिझेल इंजिन जगातील सर्वात जास्त निर्मिती झालेल्या आणि अत्याधिक लोकप्रिय असलेल्या इंजिनपैकी एक आहे. हे अतिशय उत्तम दर्जाचे, थोडेसे आवाज करणारे असले तरी डिझेलचा पुरेपूर वापर करणारे ( कमी डिझेल वापरून जास्तीत जास्त शक्ति देणारे) इंजिन आहे. आता याचे उत्पादन थांबवले असले तरी पुढची १० वर्षे याचे सुटे भाग विकत मिळतील अशी कंपनीने ग्वाही दिली आहे तेंव्हा आपल्याकडे असलेली गाडी आपल्याला अजून ७ वर्षे सुखात चालविता येईल. (तोवर विजेवर चालणाऱ्या मोटारी येतीलच) https://auto.economictimes.indiatimes.com/news/auto-components/goodbye-fiat-1-3-litre-multijet-diesel-engine/73600804
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Fri, 07/24/2020 - 10:23 नवीन
माहितीबद्दल धन्यवाद. इंजिन चांगले आहे पण माझ्या कारचे मायलेज तितकेसे चांगले मिळत नाही. अर्थात तो तितकासा महत्वाचा मुद्दा नाही. मला खरं तर टाटा इंजिन असलेली व्हिस्टा घ्यायची होती पण त्यात VX हे सर्वात वरचे मॉडेल नसल्याने मी फियाट इंजिनची गाडी घेतली.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 07/24/2020 - 09:53 नवीन
मारूती, ह्युंडाई, टाटा इ. चर्चेवरुन नुकताच मला एकाने पाठवलेला हा मथळ्यासकट्चा मजेशीर व्हिडो तुकडा आठवला : टाटांनी इंडिका हे अतिशय सुमार दर्जाचे डिझेल इंजिन वाहन भारतीय बाजारपेठेत उतरवल्यानंतर पुढील वीस वर्षांत प्रदुषण पातळीत किती भयंकर वाढ होईल याचे भाकित इ.स. २००० मध्येच वर्तविण्यात आले होते. त्यावेळी स्वस्त डिझेल कार आणि डिझेल प्रदुषणाची बरीच चर्चा झाल्याचे आठवतेय ! इंडींका गेमचेंजर ठरली, बाकी इतर कंपन्यांनी देखील अश्या गाड्या बाजारात आल्या. काही वर्षांनंतर प्रदुषण हा विषय दुय्यम होत गेला !
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Fri, 07/24/2020 - 10:38 नवीन
इंडिका जास्त प्रदूषण करते असे कधी सिद्ध झाले ? इतर कोणत्याही वाहनांप्रमाणेच टाटाची वाहने देखील त्या त्या काळची प्रदूषण मानकांची पुर्तता करणारी आहेत. (बी एस २, ३ वा ४ ई). माझी २०१२ साली घेतलेली व्हिस्टा BS4 मानकांची पुर्तता करणारी आहे. बाकी उत्पादकाने कितीही चांगली , कमी प्रदूषण करणारी वाहने बनवली तरी पुढे तिची योग्य ती आणि वेळचे वेळी देखभाल करणे चालक/मालक यांची जबाबदारी आहे. आणि वाहनचालक हे करतायत की नाही ह्यावर लक्ष ठेवणे ही वाहतूक शाखेची / सरकारची जबाबदारी आहे. याआधीचा PUC हा प्रकार अगदीच निष्प्रभ ठरला होता. आता online PUC मुळे खोट्या सर्टिफिकेटला बराच आळा बसेल अशी आशा करुयात (अर्थात त्यावरही काही जुगाड काढले नाहीतर) . जर टॅक्सी चालकाने आपली इंडिका व्यवस्थित ठेवली नसेल आणि त्यामुळे प्रदूषण वाढले तर त्यात टाटा कंपनीचा दोष कसा ? तसेच डिझेल मध्ये भेसळ होत असेल का ? असल्यास त्यामुळे प्रदूषण किती वाढत असेल याचाही विचार व्हायला हवा.
  • Log in or register to post comments
ल
लिओ Sat, 07/25/2020 - 09:26 नवीन
येणारा काळ हा बॅटरी / इलेक्ट्रिक वाहनाचा आहे, यात काहि शंका नाहि, मध्यंतरि काहि बातम्यात एकले कि भारतात डिझेलचे भाव काहि ठिकाणी पेट्रोल च्या भावापेक्षा जास्त झाले. हि परिस्थिती तात्पुरती आहे कि भविष्यात डिझेलचे भाव पेट्रोलचे भाव सर्वसाधारण एकाच पातळीवर राहतील, यावर थोडा प्रकाश टाकावा, डिझेलचे भाव, पेट्रोलचे भाव यामुळे मालवाहतुक, शेती , उद्योग क्षेत्र यावर होणारा परिणाम हे बाजुला ठेवुन फक्त वैयक्तिक प्रवासी वाहनावर काय परिणाम होइल यावर चर्चा अपेक्षित आहे धन्यवाद
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Sat, 07/25/2020 - 11:05 नवीन
टाटा नेक्सन पेट्रोल ऑटोमॅटिक वापरण्याचा अनुभव कुणाला आहे का?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 07/25/2020 - 15:59 नवीन
मी टेस्ट ड्राइव्ह घेतला आहे. इंजिन टिगॊर चंच आहे. परंतु तेच इंजिन टर्बो चार्जेड असल्याने आणि त्याचा पॉवर मॅप वेगळा असल्याने त्याची शक्ती बरीच जास्त आहे. १२० पी एस आहेआणि टॉर्क १७० एन एम आहे पण तो १७५० आर पी एम इतक्या खालच्या पातळीला येत असल्याने त्या गाडीला जोरदार पीक अप आणि शक्ती आहे. ( तुलनेसाठी टिगॊर ८६ पी एस. टॉर्क ११३ एन एम @ ३३०० आर पी एम). त्यातून स्पोर्ट मोड वर ठेवून चालवली तर एखाद्या रेस कार सारखी वेग घेते. शिवाय NCAP च्या सुरक्षा चाचणीत ५ स्टार आहेत. ( टिगॊर ४ स्टार) ज्याला एस यु व्ही घ्यायची आहे त्याच्यासाठी अतिशय उत्तम. ती गाडी चालवून मी खरं तर तिच्या प्रेमातच पडलो. परंतु माझी एकंदर गरज एवढी ( खरं तर मला गाडीची गरजच) नाही. आणि ती १० लाखाच्या वर जाते. त्यामुळे मी तो विचार सोडला. तुम्हाला आवडली असेल तर एकदा चालवून पहाच.
  • Log in or register to post comments
प
पाटीलभाऊ Mon, 11/29/2021 - 09:35 नवीन
माझ्या कडे BS4 टाटा नेक्सन पेट्रोल ऑटोमॅटिक आहे. गाडी अतिशय मजबूत, ग्राउंड क्लिअरन्स उत्तम. शिवाय ऑटोमॅटिक असल्याने लॉन्ग रनिंगला थकवा जाणवत नाही. मात्र गाडीचे मायलेज बऱ्यापैकी कमी आहे, हायवे ला १५-१६ तर शहरात ११-१२, खूप जास्त ट्राफिक असेल तर मात्र ८-९ कि.मी./ली. आणि AMT असल्याने गियर लॅग प्रकर्षाने जाणवतात. सुरक्षिततेच्या दृष्टीने एक नंबर गाडी.
  • Log in or register to post comments
क
कांदा लिंबू Mon, 07/27/2020 - 18:56 नवीन
टिआगो, अल्ट्रॉझ, आइटेन निऑस आणि आज... निक्सन. आतापर्यंत चार चाचणी-चालने (टेस्ट ड्राइव्हज्) करून झाल्यात. सर्वच गाड्या (safety, comfort, mileage, maintenance...इ चा विचार करता) आपापल्या परीने योग्य वाटत आहेत. घरापासून ३.५ किमीवर सर्वच गाड्यांची दुकाने एका ओळीत आहेत. टाटाच्या शोरूममध्ये अगदी थंड प्रतिसाद मिळाला. ह्युंदाईच्या शोरूममध्ये राजेशाही स्वागत झालं. डाउन पेमेंटची जोड झाली तर किमतीला ९.८४ पर्यंत जाणारी निक्सन एक्सएमए पेट्रोल आवडेल असं वाटतंय. Image removed. गाडीच्या ड्राइव्हर सीटवर कांदा लिंबू बसेल पण गाडीच्या ग्रिलला मात्र लिंबू मिरची असेल!
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 07/27/2020 - 21:49 नवीन
९.८४ लाख बजेट असेल तर एकदा होंडा अमेझ ची टेस्ट राईड घेउन बघा
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 07/28/2020 - 04:52 नवीन
अमेझ भारीच आहे. पण १० लाखापर्यंत बजेट म्हणाल्यावर खूप ऑप्शन उपलब्ध आहेत. आधीचे ५ ६ लाखाचे बजेट असलेने तुलनेने कमी ऑप्शन होते. बऱ्याच सेडान, मिनी एस्युवही किंवा टॉप एन्ड ह चबॅक १० लाखापर्यंत मिळू शकतात. अगदी स्कोडा रॅपिड रायडर सुध्दा ह्या विभागात येते
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 07/28/2020 - 07:09 नवीन
स्कोडा रॅपिड रायडर हि गाडी उत्तम आहे विशेषतः त्याच्या व्हेरिएबल जॉमेट्री टर्बोचार्जर मुळे त्याला जबरदस्त शक्ती आहे. परंतु या जास्त गुंतागुंतीच्या रचनेमुळे ( आणि फोक्सवागेन गटातील गाडी असल्यामुळे) त्याचे सुटे भाग भरपूर महाग आहेत. पाच वर्षात गाडी विकून टाकायची असेल तर विचार करावा
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 07/28/2020 - 07:02 नवीन
अमेझ ला होंडा सिटीचा ग्लॅमर नाही किंवा होंडा सिटीची मुलायमता हि नाही. केवळ स्वस्तात गाडी उपलब्ध करून द्यायची म्हणून होंडा सिटीची काटछाट करून ठोकळेबाज (BOXY) गाडी बनवली आहे हे मा वै म १० लाखाच्या बजेट मध्ये नेक्सन हि नक्कीच जास्त चांगली आहे.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Tue, 07/28/2020 - 07:34 नवीन
शिवाय अत्यंत क्मी ग्राऊंड क्लिअरंस! (अवांतर, सिटीची काटछाट न्व्हे, तर ब्रियोला डिक्कि जोडलीय)
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Tue, 07/28/2020 - 06:34 नवीन
जबर आहे! घेऊन टाका! एक्सेंट काढल्यावर मी ती किंवा सेल्टॉस (बजेट मध्ये बसली तर) घ्यायच्या विचारात आहे!!
  • Log in or register to post comments
ल
लॉरी टांगटूंगकर Tue, 07/28/2020 - 07:46 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा! बहुतांश गाड्यांची चर्चा झालेली असतांना नविन लॉन्च झालेली ऑरा, आणि जुलै मधला लाँच पुढे गेलीली आय २० मिस झालेली दिसते आहे. आय २० एक दोन महीन्यात लॉन्च होईल असे दिसते आहे. सुंदर गाडी. ऑटोमॅटीकच बघत असल्यास एएमटी च्या ऐवेजी सीव्हीटी अथवा डीसीटी बघणे. बाकी नेक्सॉन अतिषय खतरनाक गाडी आहे. दुकानात निर्ल्लज होउन डिस्काउंट घेणे. आत्ता सर्व ऑटो कंपन्या सेल्स नंबर कमी असल्याने प्रेशर मध्ये आहेत. जितक्या अ‍ॅक्सेसेरीज पदरात पाडता येतील त्या पाडणे. टाटा वाले शोरुम हॅन्डलींग चार्जेस च्या नावाखाली दहा एक हजार घेतात. ते घासाघीस करुन कमी करणे. शोरुम ने न ऐकल्यास कंपनीला मेल करणे. क्रिपा होनी चाहीये. शोरुम मधील अ‍ॅक्सेसेरीज महाग असतात. त्या गळ्यात मारायचा जोरदार प्रयत्न होईल. हाणून पाडणे. विमा ऑफ मार्केट कम्पेअर करणे. तिथे दोन पाच हजार कमी होउ शकतात. अ‍ॅन्टी रस्ट /टेफ्लॉन/ईतर कोटींग न घेणे. ते नवीन गाडीला कंपनीने देलेलं अस्तय. एक काही तरी वॉरंटी मध्ते पहील्या वर्षाचे किंवा पंधरा हजार कीमीचे ऑईल आम्ही देउ म्हणून काही तरी पैसे घेतात (गोल्ड किंवा एंजिन प्रोटेक्शन म्हणून) ते न घेणे. कारण ऑईल स्वस्त पडतं आणि त्यातून पहील्या वर्षात (दहा हजार किमी मध्ये ऑईल बदलावे लागत नाही. थोडक्यात एक्स शो रुम सोडल्यास प्रत्येक पैशाचे कारण आणि वर्थ चेकवणे आणि ठरवणे. सर्विसिंग चे लोक वेगळे असतात त्यामुळे नंतरच्या रिलेशन वर याचा परिणाम होणार नाही.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 07/28/2020 - 08:18 नवीन
ऑटोमॅटीकच बघत असल्यास एएमटी च्या ऐवेजी सीव्हीटी अथवा डीसीटी बघणे. ए एम टी (ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन) हे सर्वात स्वस्त ट्रान्समिशन आहे आणि त्यात तुम्ही गियर बदलण्याऐवजी योग्य वेळेस कॉम्प्युटर गिअर बदलतो. यामुळे गाडी तुम्हाला पाहिजे तेंव्हा आणि तेवढ्या पटकन वेग घेत नाही. परंतु गाडीचे ऍव्हरेज हे मॅन्युअल गियर इतकेच( आणि आपले ड्रायव्हिंग खराब असेल तर आपल्यापेक्षा जास्त) मिळते. सी व्ही टी ( कंटीन्यूअस व्हेरिएबल ट्रान्समिशन) यात आपल्याला गिअर बदलल्याचे धक्के अजिबात बसत नाहीत आणि गाडी स्मूथ पणे वेग घेते. तुलनाच करायची असेल तर मोटार सायकल चे ट्रान्समिशन आणि ऍक्टिव्हा चे ट्रान्समिशन पहा. फरक हा आहे कि मोटारीला सी व्ही टी ( कंटीन्यूअस व्हेरिएबल ट्रान्समिशन) बसवले तर इंजिनची शक्ती जास्त असावी लागते त्यामुळे त्याचे ऍव्हरेज कमी येते. ( त्याच सीसी च्या गाडीत सी व्ही टी ऍव्हरेज जास्त मिळते) आणि सी व्ही टी ( कंटीन्यूअस व्हेरिएबल ट्रान्समिशन) उत्पादन खर्च जास्त असल्याने गाडीची किंमत महाग असते शिवाय देखभालीचा खर्च जास्त येतो. परंतु गाडी अतिशय मुलायम चालते डीसीटी (ड्युअल क्लच ट्रान्समिशन) यात गिअर पटकन बदलतो आणि यामुळे गाडीला वेग पटकन मिळतो पण गाडी ऍव्हरेज मध्ये मार खाते आणि अर्थात उत्पादन खर्च जास्त असल्याने गाडीची किंमत महाग असते शिवाय देखभालीचा खर्च जास्त येतो. शोरुम मधील अ‍ॅक्सेसेरीज महाग असतात. त्या गळ्यात मारायचा जोरदार प्रयत्न होईल. हाणून पाडणे. एक्स शो रुम सोडल्यास प्रत्येक पैशाचे कारण आणि वर्थ चेकवणे आणि ठरवणे. सर्विसिंग चे लोक वेगळे असतात त्यामुळे नंतरच्या रिलेशन वर याचा परिणाम होणार नाही. बाडीस
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 07/28/2020 - 11:16 नवीन
एक कल्पना ( भारतात उपलब्ध आहे कि नाही माहित नाही, नसल्यास दुर्लक्ष करा ) नवी कोरी किंवा दुसऱ्या हाती गाडी घेण्यापेक्षा शोरूम ची जी दाखवण्यासाठी वाहने ठेवलेली असतात ती पहिल्या वर्षात ते कमी किमतीत विकतात ! अर्थात त्यात उरलेली वॉरंटी जशीच्या तशी जिवंत राहते का ? हे सर्वात महत्वाचे आहे .. बघा विचारा .. मला तरी एकदा याचा चांगलं अनुभ आलं आहे , ५ पैकि चार वर्षाची आणि ट्रान्समिश् न ची १० पैकी ९ वर्षाची वॉरंटी ( मित्सुबिशी ३८०) मिळाली आणि पैसे चांगलेच वाचले
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 07/28/2020 - 21:21 नवीन
भारतात हा पर्याय उपलब्ध आहे पण टेस्ट राईड साठी चालवणारे सगळेच उत्तम सारथी नसतात त्यामुळे क्लच आणि गियर बॉक्स चे काम निघते.
  • Log in or register to post comments
अ
अनय सोलापूरकर गुरुवार, 07/30/2020 - 08:59 नवीन
नमस्कार , आपल्या निवडक गाड्या उत्तम आहेत. सब ४ मीटर एस यु वी सेगमेन्टचा नक्की विचार करा, असे सुचवेन. ओटोमेटिक पण पहा. शहरातील गर्दी किन्वा रिकामा हायवे , ड्राईव आरामदाई एकदम. !! मी ग्र्यान्ड आय १० पेट्रोल - स्पोर्ट्स ओटोमेटिक २०१७ सप्टेम्बर पासून वापरत आहे. ओन रोड रु.७ लाख. २ एअर ब्याग्स, उत्तम सस्पेन्शन. [पण ए.बी.एस. नाही, आत्ता च्या मोडेलचे स्पेसिफिकेशन्स माहिती नाही] पुणे शहर तसेच , पुणे सोलापूर हायवे, लातूर , सातारा, गोवा, कर्णाटकात शिवमोग्गा पर्यन्त मित्र व कुटुम्बासोबत प्रवास झाला , एकूण २१+ ह. कि.मी. ओटोमेटीक मुळे थकवा कमी जाणवतो. माझा अनुभव. सलग १२ तास असा ३ वेळा प्रवास केला आहे. साधारण - एसी - १४-१६ कि.मी प्रती लीटर / विना एसी - १५-१७ कि.मी प्रती लीटर सरविसिन्ग चार्जेस पण कमी आहेत. नवीन कार साठी शुभेछा. शुद्ध् लेखन चुकान्साठी माफी असावी. ` अनय'
  • Log in or register to post comments
प
प्रविन ९ Fri, 07/31/2020 - 01:23 नवीन
मी Eco Sport Titanium ही घेण्याचा विचार करत आहे. स्विफ्ट डिझायर गेल्या महिन्यात विकली आणि मारुती ने सर्व डिझेल गाड्या बंद केल्याने Brezza कॅन्सल. महिन्द्रा XUV 300 W6 Diesel च्या तुलनेत Eco Sport Titanium उजवी वाटतेय. Alloy Wheel, Inbuilt GPS, Projector Headlamp, Fog Lamp, DRL, Auto ORVM, Boot Space, Ground clearance, Key less entry, Dual tone Interior etc. याबाबत मला फरक जाणवला.
  • Log in or register to post comments
प
प्रविन ९ Fri, 07/31/2020 - 01:29 नवीन
Xuv 300 W6 आणि Ecosport Titanium दोन्ही गाड्यांची किंमतीत With Accessories मला 50,000 फरक जाणवला. Ecosport Titanium जास्त फिचर्स देत आहे. कोणाला या गाडी चा अनुभव असेल तर कृपया मार्गदर्शन करावे
  • Log in or register to post comments
क
कांदा लिंबू Mon, 08/03/2020 - 13:37 नवीन
मिपाकरांच्या बहुमूल्य मार्गदर्शनानंतर, आज टाटा नेक्सन एक्सएम पेट्रोल मॅन्युअल ग्रे रंग बुक केली.‌ पुढचं अपडेट कार हातात आल्यावर करीन.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Mon, 08/03/2020 - 13:50 नवीन
अभिनंदन!
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Mon, 08/03/2020 - 13:52 नवीन
मस्त. आवडला चॉइस.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 08/03/2020 - 16:56 नवीन
अभिनंदन..
  • Log in or register to post comments
क
कांदा लिंबू Mon, 08/03/2020 - 15:40 नवीन
रच्याक, कारचा इन्शुरन्स अजून ठरायचा आहे. एक वर्ष पूर्ण अधिक दोन वर्ष थर्डपार्टी साठी, डीलर चाळीस हजार वजा दहा हजार डिस्काउंट = तीस हजार असे म्हणत आहे. त्याचसाठी, पॉलिसी बाजार वर तेवीस हजार असा आहे. नवीन वाहनासाठी, डीलरव्यतिरिक्त इतर ठिकाणाहून कुणी इन्शुरन्स घेतला आहे का? माझा सध्याचा हिशेब कारची किंमत: ७७०००० आरटीई: ९४०५० लॉजिस्टिक: ९५०० हायपोथिकेशन: १५०० फास्टटॅग: ५०० ------------------ एकूण: ८७५५५० वजा : ९५०० सूट ----------------- निव्वळ एकूण: ८६६०५० मोफत अक्सेसरी: १०००० याशिवाय- इन्शुरन्स: सुमारे २३००० अंतिम एकूण सुमारे: ८८९०५०
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 08/03/2020 - 21:46 नवीन
सात लाख ते नऊ लाख बजेट हाइक झालि
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 08/04/2020 - 06:47 नवीन
होऊ द्या खर्च. गाडी फारच छान आणि आरामशीर आहे. निदान ७ वर्षे तरी चिंता नाही. शिवाय पंचतारांकित सुरक्षा आहे. गाडी हातात आली कि पहा. चालवण्याचे काय सुख आहे ते.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 08/08/2020 - 19:19 नवीन
हार्दिक अभिनंदन, कांदा लिंबूसाहेब ! आता होऊ द्या जोरदार आउटींग, टाटा नेक्सन संगे ! पुणे, पिंचिंवाडीत आला तर आम्हाला राईड द्यायची विसरू नकात ! आता आय डी बदलुन कांदा नेक्सन असं करायला हरकत नाही :-)
  • Log in or register to post comments
क
कांदा लिंबू Mon, 09/21/2020 - 02:02 नवीन
दीर्घ प्रतीक्षेनंतर शेवटी काल टाटा निक्सन एक्सएम पेट्रोल मॅन्युअल कार हातात आली. महिनाभर वापरल्यावर रिव्यू लिहीन. डॉ. खरे, श्री. विटेकर आणि अभ्याशेठ यांनी फोनवर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांचे आणि सूचना, सल्ले व मार्गदर्शनाबद्धल सर्व व्यक्त-अव्यक्त मिपाकरांचे मनःपूर्वक आभार. - कांदा लिंबू
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 09/21/2020 - 06:21 नवीन
उत्तम. पंच तारांकित गाडी हातात आली. त्यातील म्युझिक सिस्टीम अत्युत्कृष्ट आहे. अभिनंदन
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Mon, 09/21/2020 - 18:39 नवीन
अभिनंदन कांदा लिंबु! आता मी ही नवीन कार घ्यायचा विचार करतोय. नुकतीच लॉन्च झालेली किया सॉनेट कशी आहे? मार्कॅटींग तर जबरदस्त चालु आहे. २० लाखाच्या गाडीचे फिचर्स १० लाखात अशी मार्केटींग स्टेटमेंट वाचनात आले. घ्यावी का?
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 09/21/2020 - 20:40 नवीन
१० लाखात येणारी ८३ पी एस ची अंडर पॉवर वाटली . १.० टर्बो ची किंमत ११ च्या आस्पास आहे
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 09/25/2020 - 16:35 नवीन
कांदा लिंबूजी, टाटा निक्सन हाताt आली. अभिनंदन !
  • Log in or register to post comments
स
सेरू०९२७ गुरुवार, 10/01/2020 - 07:06 नवीन
Medium sized Automatic transmission असलेली सध्या चांगली फॅमिली कार कोणती?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 10/01/2020 - 07:36 नवीन
https://www.misalpav.com/comment/1074206#comment-1074206 हे वाचून पहा
  • Log in or register to post comments
स
सेरू०९२७ गुरुवार, 10/01/2020 - 07:44 नवीन
Thanks!
  • Log in or register to post comments
स
सेरू०९२७ Sat, 10/03/2020 - 10:47 नवीन
Hyundai Grand I-10 NIOS Magna (Corporate) ही कार कशी आहे?
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Mon, 11/30/2020 - 19:06 नवीन
@कांदा लिंबु गाडी घेऊन महिना झाला. रिव्यु लिहिणार होतात त्याची आठवण करुन देतो. मी ही गेले कित्येक दिवस कार घ्यायचा विचार करत आहे पण काहीनाकाही कारणाने निर्णय घेणे पुढे जात आहे. माझे मत अल्ट्रोझ्/टियागो/टिगोर आणि अगदीच जास्त झाले तर नेक्सॉन ह्या टाटा च्या गाड्याकडे झुकतेय पण कुटुंबाला सनरूफ हवे आहे आणि कार ऑटोमॅटीकच हवी आहे त्यामुळे अल्ट्रॉझचा पर्याय रद्द झाला. सेदान च्या ऐवजी कॉम्पॅक्ट एस.यु.वी घेण्याकडे जास्त कल आहे. वेन्यु,क्रेटा,एक्स.यु.वी ३००,नेक्सॉन आणि ब्रेझा ह्या सर्वांची टेस्ट ड्राईव्ज घेऊन झाल्यात. पण निर्णय होत नाही. माँ का आशिर्वाद आणि जेब मे कुछ पैसे लेकर एम.जी हेक्टर ही पाहुन आलो. भन्नाट गाडी आहे. (किंमत २० + लाख) क्रेटा घेण्याचा विचार करणार्यांनी हा पर्याय ही विचारात घ्यायला हरकत नाही. पण बजेट १४ लाख क्रॉस झाले तर पाच आसनी गाडी घेणे महागडे वाटते.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 21 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 22 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 22 hours ago
  • सुंदर !!
    1 day 22 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 22 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा