कार विकत घेण्यासाठी मार्गदर्शन हवे आहे
मला मध्यम बजेटची एक नवीन कार विकत घेण्यासाठी मिपाकरांचे मार्गदर्शन हवे आहे.
- शहर - हैद्राबाद
- बजेट - पाच ते सात लाख*
- प्रवासी - मी, पत्नी, दोन शाळकरी अपत्ये, (काही वेळा माझी आई)
- प्रवास - दरवर्षी अंदाजे ६००० किमी
- यापैकी किंवा इतर कोणती अखूडशिंगी, बहुदुधी कार घ्यावी?
- फक्त पेट्रोल की पेट्रोल + सीएनजी घ्यावी?
- मला मॅन्युअल ट्रान्समिशन आवडेल, ऑटोमॅटिक नाही. हे योग्य आहे का?
- रंग कोणता घ्यावा? (लाल सोडून इतर)
- जुनी गाडी घ्यावी का?
- इतर सल्ला मार्गदर्शन व माहिती?
दुसरी गोष्ट म्हणजे बॅटरीचे आयुष्य किती वर्षे आहे आणि ती बदलायचा खर्च किती आहे याबद्दल नक्की माहिती उपलब्ध नाही.-------- हिरो लेक्ट्रो या इलेक्ट्रिक सायकलची किंमत सध्या २२,००० रु. आहे. तीच्या बॅटरीचे आयुष्य ५०० Charging Cycle आहे. बॅटरी बदली करायची तर तीचीच किंमत १२,००० रु. आहे. आता एका २२००० रु.च्या सायकलला इतका खर्च येतो तर ईलेक्ट्रिक कारला कीती खर्च येईल याचा विचार करावा लागेल.